Home Blog Page 2878

ये बंधन दोस्ती का… (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

“अंकल, वो जरा फ्रेंडशिप रिबन देना और बँड भी चाहिये और वो हाथ पर लिखने के लिये मार्कर भी चाहिये।” दुकानात आलेल्या मुलांच्या घोळक्याने त्या दुकानदाराला नुसते भंडावून सोडले होते. ” सकाळपासून सगळे पोरे लोक फ्रेंडशिप रिबनच्या मागे पडले हाय, अशी काय फ्रेंडशिप होते काय??”  दुकानदाराच्या या प्रश्नाने मलाही निरुत्तरच केले.

ऑगस्टचा पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून सगळीकडे साजरी केला जातो. तरुणाई मध्ये हा दिवस तर भलताच फेमस आहे. अगदी मैत्रीचे ते गोडवे तरी किती गायचे याला सीमाच नसते. फ्रेंडशिप बँड, हॅप्पी फ्रेंडशिप डे लिहिलेली रिबन आणि काय काय अगदी सगळ्यांच्या हातात ती बांधलेली असते. एवढंच पुरेसं नसतं म्हणून की काय हातावर, चेहऱ्यावर, पाठीवर किंवा शरीरभरच म्हणायला काही हरकत नाही, मार्कर पेनने आपल्या मित्रमंडळींची नावंही लिहिली असतात. अशा प्रकारे तो किंवा ती रंगले असले तर ते खूपच भारी असतं बुवा, म्हणजे त्याला किंवा तिला किती फ्रेंड्स आहेत याचे गोडवे गायले जातात. त्याची फोटोसकट पोस्ट फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप सगळीकडे फिरतच असते. खरंच अशा प्रकारे मैत्रीचा देखावा केलेली मैत्री असते का खरी…? जिवाभावाचे मित्र – मैत्रिणी याचं मर्म खऱ्या अर्थाने किती जणांना उमगलं असेल, हा मोठा प्रश्नच आहे.

फेसबुकवर माझी फ्रेंड लिस्ट जास्त की तुझी जास्त, अशीही चढाओढ सुरू असते. आणि त्यात अभिमानही असतो…अरे माझे कित्ती फ्रेंड्स आहेत! आली फ्रेंड रिक्वेस्ट की कर एक्सेप्ट. मग तो मित्र किंवा मैत्रीण कोण आहे, काय करतो, त्याचं प्रोफाइल काय हे बघण्याची बरेच जण तसदी घेत नाहीत. आणि नसत्या प्रलोभनाला काही जण बळी पडतातही. फेसबुकवर आधी मैत्री केली, सगळी माहिती काढली आणि मग फसवणुकीच्या काही घटनाही घडतात. सगळ्यांचाच बाबतीत असं घडतं असं नाही…काही मैत्रीचे धागेही जुळतात. माझी आणि तनूची (तनुजा इनामदार) मैत्री फेसबुकवरच जुळलेली. खूप वर्षांनी काही मित्रमैत्रिणीही फेसबुकमुळे  एकमेकांना पुन्हा जोडले गेलेत. शाळेतील आम्ही मित्रमैत्रिणीही या फेसबुकच्या आणि व्हाट्सअपच्या मुळेच पुन्हा एकत्र आलो. १९८० सालानंतर सर्वजण भेटलो ते थेट २०११ साली…तेही ऑगस्ट महिन्यात. मैत्रीच्या धाग्यात गुंफत राहिलो. सुखदुःखात एकमेकांना साथ करत.

खरंच मैत्री हे नातं खूप सुंदर आणि निर्मळ आहे. एका अंतर्मनाने घातलेली साद जेव्हा दुसऱ्या अंतर्मनाला कळते, तेव्हा खऱ्या अर्थाने मैत्री रुजते. चित्रपटसृष्टीने या मैत्रीचे गोडवे नेहमीच गायले आहेत. अगदी ‘दोस्ती’ पासून ते याराना, दोस्ताना, दिल चाहता है, थ्री इडियट्स… ‘शोले’मधील लोकप्रिय जय-वीरूची म्हणजेच अमिताभ आणि धर्मेंदची जोडी, १५ ऑगस्ट १९७५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या लोकप्रियतेचे गारुड आजही जनमानसावर कायम आहे. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ म्हणणारे जय – वीरू खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत दोस्ती  निभावतात. मैत्री अशी असली पाहिजे यार…जीवाभावाची… मैत्रीचा खरा अर्थ समजून उमजून साजरा करूया –  ‘ये बंधन दोस्ती का’ म्हणत एकमेकांना मैत्रीच्या धाग्यात बांधणारा फ्रेंडशिप डे !

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

भारतीय संस्कृती संरक्षण संस्थेतर्फे पाठवल्या जवानांना राख्या

0

पुणे – सैनिका विषयी कृतज्ञता…तुमच्यासाठी घरोघरी विविध सण,उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र, कुठलाही सण नाही की,उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो, भाऊबीज असो की,इतर सण अशा उत्सवांची ते आतुरतेने वाट पाहात असतात.म्हणून डॉ.नंदकिशोर एकबोटे आणि समृद्धी एकबोटे यांनी रक्षाबंधनानिमित्त पुणे शहरातील माता भगिनींनी,मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर,दीनदयाळ उपाध्याय पतपेढी, योग विद्या धाम संस्था,आधार मूक बधिर विद्यालय, विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून सैनिको हो तुमच्यासाठी अशी भावना व्यक्त करतात.आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून देत विद्यार्थ्यानी व सामाजिक संस्थांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी रेशीम धाग्याच्या अतिशय आकर्षक, सुबक अशा 15 हजारांहून अधिक राख्या तयार करून शिवाजीनगर येथील पोस्टऑफिस मधून पाठवल्या.डॉ.नंदकिशोर एकबोटे म्हणाले की,आम्ही 26 जुलै हा विजय दिवस म्हणून साजरा केला.आणि रक्षाबंधन असो की, दिवाळी,अशा उत्सवांना सीमेवर देशाचे रक्षण करीत असलेले सैनिक घरी परत येऊ शकत नाही.त्यामुळे देशवासियांकडून त्यांना राख्या किंवा आपल्याकडील पत्र मिळाले की सैनिकांना खूप आनंद होत असतो.सैनिकांची अनेक पत्र मी जतन केले आहेत.केवळ एका संस्थेतर्फे हा कार्यक्रम साजरा होऊ नये.तर देशभर हा उपक्रम केला गेला पाहिजे. यातून सीमेवर असणाऱ्या बाहादूर सैनिकांचे मनोबल वाढते आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभावना निर्माण होते. पोस्ट सर्विसच्या माध्यमातून सीमेवरील सैनिकांपर्यंत या राख्या पोहचविल्या जाणार असल्याचे डॉ.एकबोटेनी सांगितले.माजी सुभेदार ज्ञानेश्वर शिंदे,मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगरचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

राज्यात धुवांधार..पाऊस..अनेक धरणे भरली …पुण्यात 1 हजार कुटुंबांचे स्थलांतर

0

पुणे  – राज्याच्या विविध भागांत दमदार पावसामुळे धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ होत असून पश्चिम महाराष्ट्र, नाशिक परिसरात अनेक धरणे ओसंडली आहेत.खडकवासला धरणातून सध्या अकरा वाजल्यापासून 35574 cusecs इतका विसर्ग चालू असून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे व पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली असल्यामुळे त्या दोन्ही धरणातून अनुक्रमे 12936 व 9035 असा विसर्ग चालू असून पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढलेला असल्यामुळे दुपारी तीन वाजता खडकवासला धरणातून एकूण 41756 cusecs इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.चासकमान धरण परिसरात व भिमाशकर भागात अतिवृष्टी चालू असून गेल्या २४ तासात ३०० मीमी पावसाची नोंद झालेली आहे. आवक मोठ्या प्रमाणात आहे.चासकमान धरणातून दि.४.८.१९ आज सकाळी १०.३० वा. २६४७५ क्युसेक्स वरून ४५६३० क्युसेक्स विसर्ग वाढवणेत आला आहे येरवडा येथील शांती नगर ,भारत नगर ,इंदिरा नगर येथील अनुक्रमे २५० /७५/२०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे संजय मोरे यांनी दिली .कळस,विश्रांतवाडी ,येरवडा येथील महापालिका शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी संततधार सुरू असून आगामी तीन दिवस पावसाचा जोर टिकून राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. किनारी प्रदेशात सोसाट्याचे वारे वाहतील आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

खडकवासला, पानशेत धरण १०० टक्के भरल्याने पानशेतमधून मोठ्या प्रमाणावर नदीत विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून आज (रविवारी) सकाळी ११ वाजता ३५ हजार ५७४ क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात पूर परिस्थिती निर्माण होणार असून नदीलगतच्या अनेक भागात पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरणातून नियमितपणे मोठ्या प्रमाणावर पाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे आताच नदीपात्र ओसंडून वाहत आहे. शुक्रवारी आणि शनिवारी जोरदार पाऊस पडला असून रविवारी सकाळपासून पाऊस चालू असल्याने पानशेत व खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने प्रशासनाने पुणेकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने औंध, दापोडी, बोपोडी, येरवडा, हडपसर, शिवणे, उत्तमनागर, खिलरेवस्ती, सिंहगड रोड, शिवाजीनगर, जुना बाजार, ढोले-पाटील रोड आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, नाशिक व नगर जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील धरणे भरू लागली असून या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उद्यापर्यंत पाण्याचा वेग वाढवण्यात येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 . ८३,७७३ क्युसेक वेगाने नांदुर मधमेश्वर पिकअप वेअरमधून गोदावरी नदीमध्ये विसर्ग { गंगापूर धरणातून सकाळी नऊपासून १७७४८ क्युसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात अाल्याने गाेदावरीने नाशकात शनिवारी धाेक्याच्या पातळी गाठली. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने

नगर : भंडारदराून प्रथमच प्रवरामध्ये साडेचार हजार क्युसेक वेगाने विसर्ग. हे पाणी कायगाव टोका येथे गोदावरी-प्रवरा संगमात दाखल होईल.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो. सर्वच्या सर्व ३८ दरवाजे उघडले.

प.महाराष्ट्रात धरणे तुडुंब
पानशेत : धरण काठोकाठ भरल्याने आंबी नदीत विसर्ग सुरू.

कोयना : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस सुरू असल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांनी उचलून सुमारे २० हजार क्यूसेकने विसर्ग.

खडकवासला,पानशेत पूर्ण भरले, वरसगाव, टेमघर : ही धरणेही भरण्याच्या वाटेवर. भामा आसखेडमधून आठ हजार क्यूसेकने भीमा नदीत पाणी सोडले.

वसईत मुसळधार पाऊस, पुरात १४ वर्षाचा मुलगा वाहून गेला. मोरी गावातील दुर्दैवी घटना.

डिंभे : धरण पूर्ण भरल्याने ५ हजार क्यूसेक विसर्ग चालू.

कसारा घाटात दरड कोसळली, नाशिक-मुंबई महामार्ग बंद.

 पुणे-माणगाव हायवेवर माले या गावाजवळ पुलावर पाणी आल्यामुळे प्रवासाकरिता व पर्यटकांकरिता हायवे पौड बंद

 पुणेः घोटावडे – अंबडवेट दरम्यानच्या पूल परिसरात मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली.

पुणेः बाणेरची स्मशानभूमी पाण्याखाली, ज्युपिटर हॉस्पिटल, प्रथमेश पार्क, डीएसके गंधकोष सोसायटीत पाणी

-बोरघाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वेमार्ग बंद

-गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने मुंबई, ठाण्यातील लोकांना केले आहे.

जायकवाडीतील पाणीसाठा ११.५९%
पैठण – जायकवाडी धरणाच्या वरील भागात असलेल्या धरणांतून विसर्ग सुरू असल्याने शुक्रवारी रात्रीच्या माेजणीनुसार जायकवाडीतील पाणीसाठा ११.५९ टक्क्यांवर आला. नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक सुरूच राहणार असल्याने जायकवाडीतील पाणीपातळी रविवार संध्याकाळपर्यंत चांगली वाढू शकेल.

गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद – नाशिक जिल्ह्यातील धरण प्रकल्प क्षेत्रात सतत पाऊस चालू आहे. येत्या ३-४ दिवसांत आणखी पावसाची शक्यता पाहता जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. गोदावरी नदीलगत पूरस्थिती असल्याने गोदाकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. नदीपात्रात प्रवेश करू नये, जनावरांना मोकळे सोडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले.

मुंबई : पांडवकडा धबधब्यात ४ मुली बुडाल्या, ३ मृतदेह सापडले
मुंबई – नवी मुंबईतील खारघरजवळील पांडवकडा धबधब्यात एका कॉलेजमधील चार विद्यार्थिनी वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली. पैकी तीन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. चारही विद्यार्थिनी सहलीसाठी पांडवकडा धबधब्यावर आल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात प्रवाहात वाहून गेल्या. सकाळी ११ वाजता ही घटना घडली. मृतांत चेंबूर येथील नेहा जैन (१९) हिचा समावेश आहे.

पुणे: इंद्रायणी आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द

0

पुणे: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकल वाहतूक ठप्प झाल्याने पुणे- मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आणि पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर काही एक्सप्रेसची सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाने जोर धरल्याने मुंबईत रेल्वेचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या ठाणे, शीव, चुनाभट्टी, टिळक नगर आणि वडाळा रेल्वे स्थानकात पाणी भरल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यातच कुर्ला येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकलबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूकही विस्कळीत झाली. ही वाहतूक सेवा पूर्ववत होण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी गेल्याने मध्य रेल्वेने पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आणि पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस रद्द केली आहे. तर भुसावळ मुंबई पॅसेंजर नाशिक रोडवर तात्पुरती स्थगित केली आहे. त्यामुळे पुणे आणि भुसावळहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
रद्द झालेल्या गाड्या

१२१२८ पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस

२२१०६ पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस

स्थगित करण्यात आलेल्या एक्सप्रेस

५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर

ग्रंथालय, स्मारक उभारून ढाले यांचा सन्मान करणार -रामदास आठवले

0

पुणे : “चळवळीला पुढे नेण्यासह आपल्या परखड साहित्यातून चुकीच्या गोष्टींवर प्रहार करण्याची त्यांची शैली होती. त्यांचे लिखाण मार्मिक होते. पुस्तके हाच त्यांचा ध्यास होता आणि नव्या पिढीला साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी ग्रंथालय उभारण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी माझ्या खासदार निधीतून रमाबाई आंबेडकर नगरात ग्रंथालय उभारण्यासाठी ४० लाखांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे तो मिळण्यास विलंब झाला आणि राजा ढाले ग्रंथालय उभारण्याआधीच निघून गेले. त्यांच्या हयातीत ग्रंथालय उभारले असते, तर त्यांना फार आनंद झाला असता. आता त्यांचे ग्रंथालय उभारण्याचे अपुरे स्वप्न पूर्ण करून व त्यांचे चांगले स्मारक उभारून त्यांचा सन्मान करणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित ‘राजा ढाले आणि आंबेडकर चळवळ’ परिसंवादावेळी कालकथित राजा ढाले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रामदास आठवले बोलत होते. मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, ढाले यांच्या पत्नी दिक्षा, मुलगी गाथा, सीमा रामदास आठवले, लेखक अर्जुन डांगळे, शरणकुमार लिंबाळे, इंदिरा आठवले, डॉ. विजय खरे, चंद्रकांता सोनकांबळे, समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
रामदास आठवले  म्हणाले,”कालकथित राजा ढाले लढवय्या नेते होते. सिद्धार्थ वसतिगृहात असल्यापासून माझा-त्यांचा स्नेह होता. दलित पँथर चळवळीत त्यांचे काम आम्हाला प्रभावित करीत होते. त्यांच्यात आणि माझ्यात संवाद कमी होता. मात्र, आमच्यामध्ये वाद नव्हते. आंबेडकरी चळवळीमुळेच मला मंत्रिपदापर्यंत पोहचता आले. डॉ. आंबेडकरांप्रमाणेच ढाले नेहमी वाचनाला महत्व देत. कोणतीही बाजू अत्यंत खंबीरपणे आणि परखडपणे मांडत. राजा ढालेंनी चळवळीला एक व्यापक स्वरूप दिले होते. प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता.”
अविनाश महातेकर म्हणाले, “राजा ढाले यांचे विचार ऐकायला तरुण वर्ग नेहमी आतुर असायचा. रिपब्लिकन पक्ष मध्यंतरी खिळखिळा झाला होता. तरुण पडीही आंबेडकरांना मानायची. मात्र, रिपब्लिकन पक्षाला मानत नव्हती. तेव्हा ढाले यांनी पँथर पक्षाची स्थापना करून आंबेडकरी विचारांच्या लोकांना एकत्रित आणले आणि आंबेडकरी चळवळीतून बाहेर पडणारा वर्ग थांबवला. त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध
करून दिले. त्यामधील कालकथित हा शब्द जास्त गाजला. त्यांची शब्दांवर पकड होती. त्यांचा तर्कशास्त्रावर गाढा अभ्यास होता.” यावेळी राज्याचे पाहिले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासोबत ढाले यांच्या भेटीच्याही काही आठवणी महातेकरांनी सांगितल्या.

इंदिरा आठवले म्हणाल्या, “राजा ढाले हे लढवय्या होते. त्यांच्या समतेच्या लढाईची आजही गरज आहे. दलित साहित्य नावारूपाला येण्याचे श्रेय ढाले यांना जाते. त्यांनी बाबासाहेबांच्या लढ्याला रस्त्यावर उतरून पाठींबा दिला. सांस्कृतिक चळवळीसाठी पँथरची लढाई उपयुक्त होती. शेवटच्या माणसापर्यंत समतेची लढाई लढली गेली पहिजे, असे ते म्हणायचे. साहित्याला अनेक नवनवीन शब्द दिले. तर्कशुद्ध आणि विज्ञानवादी दृष्टीकोनातून त्यांचे साहित्य आधारलेले होते.”
शरणकुमार लिंबाळे म्हणाले, “राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरची चळवळ उभी केली. दोघांनीही आंबेडकर यांच्यानंतर तरुणांना प्रभावित केले. या दोघांनी आंबेडकर चळवळ जिवंत ठेऊन त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. त्यांची अनेक आंदोलने आणि भाषणे नेहमी प्रसिध्दीच्या झोतात राहायची. अनेकदा यामुळे वाद देखील निर्माण व्हायचे. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे चळवळ जोर पकडू शकली नाही, हे दोघे जर एकत्र राहिले असते तर आज आंबेडकर चळवळ खूप पुढे गेली असती.”परशुराम वाडेकर प्रस्ताविकात म्हणाले, “लहानपणीच पँथर चळवळीत जोडला गेलो. राजा ढाले यांचा सहवास ऊर्जा देणारा होता. ढाले अतिशय आक्रमक आणि ठाम भूमिका घेणारे होते. पँथरच्या आंदोलनामुळे अनेकांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्या, मात्र, या चळवळीकडे लक्ष दिले नाही. आजचे कार्यकर्ते फक्त सोशल मीडियावर चळवळ उभी करत आहेत.” अर्जुन डांगळे यांनी राजा ढाले यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. विजय खरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दीपक मस्के यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

अप्रकाशित साहित्य करणार प्रकाशित : दीक्षा व गाथा ढाले
“दलित पॅंथर, आंबेडकर चळवळीला पुढे नेण्यासह राजा ढाले यांनी शेवटपर्यंत लिखाण केले. शेवटच्या दिवसात विस्मृतीचा त्रास सुरू झाला होता. चिडचिड वाढली होती. मात्र, लिखाण बंद नव्हते. १०० पेक्षा जास्त प्रस्तावना लिहून झाल्या होत्या. लेखन, कामाचा ताण आणि अखेरच्या काळात चळवळीत आलेला एकाकीपणा यामुळेही ते खचले होते. आठवले यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. निळ्या झेंड्याखाली राहून रामदास समाजाच्या हिताचे काम करतोय, असे ते नेहमी संगत. चळवळीत काम करताना त्यांना पैशांची छानछान भासत असे. पण त्यांनी कधीच त्याचा बाऊ केला नाही. रात्रंदिवस चळवळ आणि साहित्यासाठी राबलेल्या राजा ढाले यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणार आहे. त्यांचे पुस्तकालय उभारण्याचे स्वप्न साकारणार असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र उभारणार आहे, असे दीक्षा आणि गाथा ढाले यांनी सांगितले.   

बहारदार नृत्यरचनांच्या ‘सरीवर सर’

0
गुरू-शिष्य नात्याची ‘अनुबद्ध’ मैफल संपन्न
पुणे: गुरूकडून आत्मसात केलेले ज्ञान आचरणात आणताना शिष्याची खरी कसब लागते. या वाटेवर यशस्वी झालेला शिष्य आपल्या कलेच्या सादरीकरणातून साक्षात गुरुचेच दर्शन घडवतो. असाच काहीसा अनुभव काल रसिक प्रेक्षकांना आला. श्रावण सरींसह बरसणाऱ्या धृपद, तालरुद्र, दादरा, त्रिवट, दशावतार, छबी, होरी, समधुन,  कठपुटली यांसारख्या नावीन्यपूर्ण व बहारदार नृत्यसरींनी रसिकांना चिंब केले.
निमित्त होते नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीतर्फे झालेल्या ‘अनुबद्ध’ कथक नृत्यमैफलीचे. संस्थेचा ७२ वा  वर्धापनदिन तसेच गुरुपौर्णिमा उत्सव असे दुहेरी औचित्य साधून ही मैफल घेण्यात आली. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे ही मैफल पार पडली. प्रथेनुसार, नृत्यभारतीच्या शिष्यांनी गुरु पं. रोहिणी भाटे यांना स्वरचित रचनांची नृत्यांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. शरदिनी गोळे यांच्या शिष्यांनी कल्पक शैलीतून ‘दुर्गा धृपद’ सादर करत कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. शंकराच्या तांडव व लास्य या दोन्हीचा सुंदर मिलाफ ‘ताल रुद्र’ यातून रसिकांनी अनुभवला.
प्राजक्ता राज यांनी आपल्या एकल प्रस्तुतीतून मिश्र खमाज रागातील ‘दादरा ‘ पेश केला.
‘तीर पर कैसे रुकूँ मैं, आज लहरों में निमंत्रण’ या नृत्यबद्ध केलेल्या कवितेसह ‘त्रिवट’ रचनेचे सादरीकरण अमला शेखर यांनी आपल्या शिष्यांसह केले. यास रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.
गतिमान नृत्याचे बारकावे दाखवत प्रस्तुत झालेल्या ‘ दशावतार ‘ या नृत्याविष्कारास रसिकांची विशेष वाहवा मिळाली. नृत्यभारती परिवाराच्या ११ शाखेतील शिष्यांनी एकत्रितपणे ‘श्याम छबी ‘ ही नृत्यरचना सादर केली. प्राप्त ज्ञानाला सूक्ष्म अभ्यासाची व रियाजाची जोड असल्याचे नीलिमा अध्ये यांच्या शिष्यांनी केलेल्या सादरीकरणातून दिसून आले. तर नीलिमा अध्ये यांनी साकारलेल्या मीरा भजनातून नृत्य आणि अभिनय यांचे दर्शन घडले.
परंपरेनुसार, कार्यक्रमाच्या सांगतेला गुरु रोहिणीताई भाटे यांची ‘कठपुतली’ ही
संरचना सादर करण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य विषयीची भावना मांडणाऱ्या या विलोभनीय रचनेने रसिकांना अंतर्मुख केले. या अनोख्या नृत्याविष्काराला रसिकांनीही भरभरून दाद दिली. यावेळी आशाताई आपटे यांच्या नावे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीतही नृत्याचा ध्यास न सोडलेल्या मयुर शितोळे या शिष्यास ही शिष्यवृत्ती जाहीर झाली.
या कार्यक्रमास अजय पराड (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), अर्पिता वैशंपायन (गायन) आणि आदित्य देशमुख (तबला) यांनी समर्पक साथ दिली. सूत्रसंचालन मनीषा अभय यांनी केले.
‘होरी’  रचनांमधून नृत्यरंगांची उधळण
 ‘होरी’ हा रंगाचा सण नृत्यातून उलगडणाऱ्या वैविध्यपूर्ण रचना यावेळी कलामंचावर सादर झाल्या. अरुणा केळकर यांची एकल प्रस्तुती, आभा वांबुरकर यांच्या शिष्या आणि रोशन दाते यांची बैठकीची  ‘होरी’  या रचनांमधून नृत्यरंगांची अक्षरशः उधळण झाली. 

इंजिनिअर्स अँड बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन शिवनेरी ता.जुन्नरच्या अध्यक्षपदी इंजिनिअर मुकेश ताजणे तर सचिव पदी आदित्य पुरवंत

0
जुन्नर /आनंद कांबळे
              इंजिनिअर्स अँड बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन शिवनेरी ता.जुन्नरच्या सन २०१९ -२० च्या कार्यकारणीच्या संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ नुकताच महालक्ष्मी लाँन्स बारव येथे संपन्न झाला .
अध्यक्षपदी इंजिनीअर मुकेश वसंत ताजणे तर सचिवपदी इंजी. आदित्य महेश पुरवंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमास आर्किटेक्ट गव्हर्नर व्हॅल्यूयर राजेंद्र कोरे, जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, एशियन बाथ डिव्हिजन महाराष्ट हेड तुषार कुलकर्णी, शिवाजी चाळक( संस्थापक शिवांजली संथा चाळकवाडी )यांसह तालुक्यातील इंजिनीअर, बांधकाम व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित  होते.
         माणसाच्या आयुष्यातील घराचे स्वप्न,कल्पना अविष्कार प्रत्यक्षात वास्तू रुपात निर्माण करण्याची व समाजाची सेवा करण्याची संधी आम्हा इंजिनिअर्सला मिळते ह्याच्या सारखा आत्मिक आनंद दुसरा नसल्याचे मत नूतन अध्यक्ष मुकेश ताजणे यांनी या कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्किटेक्ट गव्हर्नर  व्हॅल्यूयर राजेंद्र कोरे बोलताना म्हणाले कि आजच्या जागतिकीकरणाच्या जीवनात वास्तूचा पाया भक्कम करणाऱ्या इंजिनिअर्सने आपल्या निरामय आरोग्याचा हि पाया भक्कम कारणे गरजेचे आहे. या पदग्रहण कार्यक्रमप्रसंगी विनायक कर्पे, संजय गांधी, तुषार लाहोरकर, संतोष नवले आदींनी मनोगते व्यक्त केली. तसेच माजी अध्यक्ष संतोष नवले, नवनिर्वाचित अध्यक्ष मुकेश ताजणे व सर्व संचालक मंडळ यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद झगडे यांनी, सूत्रसंचालन विनय वाबळे यांनी तर आभार अनिल जाधव यांनी मानले.
               इंजिनिअर्स अँड बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन शिवनेरी जुन्नरची नवनिर्वाचित कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष मुकेश ताजणे, सचिव आदित्य पुरवंत, उपाध्यक्ष जितेंद्र काळे, खजिनदार अनिल जाधव तर विनय वाबळे, प्रदीप थोरवे, नितीन माळवदकर,संतोष केदारी,सचिन मलठणकर, संतोष कबाडी हे संचालक आहेत.

कौशल्य प्रशिक्षणाद्वारे आयुष्य यशस्वी होण्यास मदत होते – यु. टी. पवार.

0

येरवडा   मध्यवर्ती  कारागृहातील पुरुष बंदीचे कौशल्य प्रशिक्षण वर्गाचा समारोप.

पुणे  :  कौशल्य प्रशिक्षणाद्वारे  आयुष्य सुखकर आणि यशस्वी होण्यास   नक्कीच मदत होते, यासाठी बंदी पुनर्वसनासाठी कौशल्य प्रशिक्षण हा अधिक योग्य पर्याय आहे असे मत, येरवडा  मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यु. टी.पवार यांनी व्यक्त केले.  बंदी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत  टाटा  ट्रस्ट व यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स यांच्या  संयुक्त  उपक्रमाद्वारे  हाऊसकिपींगचे  कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणवर्गाच्या  समारोप कार्यक्रमात प्रशस्तीपत्र प्रदान करताना ते बोलत  होते.

यावेळी बोलताना  ते पुढे म्हणाले  की, कारागृह  ही  कैदयांची फक्त  शिक्षा  भोगण्याची  जागा  नसून त्यांच्यात  सुधारणा  घडवून आणण्याची त्यांना  नवी संधी देण्याची पूनर्वसनाची जागा आहे.  कैद्यांना त्यांची  चूक सुधारण्याची आणि नव्याने आयुष्य सुरु करण्याची संधी मिळाली पाहिजे, या हेतूने येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षा संपवून बाहेर पडल्यानंतर त्यांना सन्मानाने जगता  यावे,उदरनिर्वाहाचे साधन सहज उपलब्ध व्हावे याकरिता  कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून कैद्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या हस्ते सर्व सहभागी कैदयांना  प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

तर याप्रसंगी उपस्थित यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या  संचालिका  स्मिता धुमाळ यांनी आपल्या  मनोगतात सांगितले कि, सध्याच्या शहरीकरणाच्या काळात मॉल, चित्रपटगृहे, निवासी  व व्यापारी संकुले, रुग्णालये, हॉटेल्स  इत्यादीमधून मोठ्या प्रमाणात हाऊसकिपिंगसाठीच्या  कुशल मनुष्यबळाची गरज असते, अशावेळी   कैदयांना  या क्षेत्राचे प्रशिक्षण दिल्याने त्यांनाही सहजगत्या रोजगारसंधी उपलब्ध होऊ शकते.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात एका कैद्याने आपले मनोगतही  व्यक्त  केले.

याप्रसंगी प्रशिक्षण वर्गातील कैद्यांनी  कारागृह आवारातील फुलांचा वापर करून बनवलेले पुष्पगुच्छ पाहून उपस्थितांनी आनंद  व्यक्त केला. यावेळी  ‘यशस्वी’ संस्थेचे प्रशिक्षक  रविराज पाठक, टाटा  ट्रस्टचे  सामाजिक कार्यकर्ता अशोक  जाधव, मीनाक्षी  बडवाईक, कृष्णा  पाडवी  यांचाही  गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्य्रक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी तर आभार प्रदर्शन अंगद गव्हाणे यांनी केले.

मोदी उस्तादोका उस्ताद :राज ठाकरेंना उद्योग काय ? -रामदास आठवलेंना हव्यात पुण्यात विधानसभेच्या २ तर राज्यात १० जागा …(व्हिडीओ)

0
पुणे : नरेंद्र मोदी हे उस्तादोका उस्ताद आहेत ,तर राज ठाकरेंना उद्योग नाही काही अशा शब्दात आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी  बोलताना आपल्या राजकीय भूमिका स्पष्ट केल्या विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातून आपल्या पक्षाला भाजपने  कॅन्टोन्मेट आणि पिंपरी  अशा २ जागा सोडाव्यात राज्यातून किमान १० जागा आपल्याला द्याव्यात अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली .
ते म्हणाले ,'”ईव्हीएम मशीन कॉंग्रेसच्या काळातच आले आहे. मशीनममळे भाजपला फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे. राज ठाकरे यांना सध्या काही उद्योग नाही आणि विरोधक गलितगात्र झालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्यावरून देश फिरण्यापेक्षा महाराष्ट्रात राहून पक्षवाढीवर लक्ष केंद्रीत करावे,” असा सल्ला  आठवले यांनी दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला पिंपरी आणि कॅंटोनमेंटसह दहा जागा द्याव्यात, अशी मागणीही आठवले यांनी केली.नवीन विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अॅड. आयुब शेख, शहर कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “नरेंद्र मोदी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन राजकारण करत आहेत. त्यांच्या विकासाच्या राजकारणामुळे देशातील जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे २०२४ लाही आमचेच सरकार येईल. विधानसभेसाठी युती कायम राहावी, यासाठी माझा प्रयत्न आहे. वंचित आघाडीचा फायदा भाजपला होत नाही. काही जागांवर त्यांना मताधिक्य मिळाले असले, तरी आता त्यांच्यात फूट पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची भीती नाही.”
“लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा द्यायला नको होता. खंबीरपणे उभे राहून पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. तिहेरी तलाकवरुन कॉंग्रेसने घेतलेली भूमिका योग्य नाही. ईव्हीएम मशीन कॉंग्रेसनेच आणले. आज मात्र ते विरोध करत असून, बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली, तरी आम्हीच जिंकून येऊ,” असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे अतिशय चांगले मुख्यमंत्री आहेत. पुढेही तेच राहतील. माझे त्यांच्याशी चांगले संबंध असल्याने कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रिपब्लिकन पक्षाला एक कॅबिनेट एक राज्यमंत्री पद, तसेच ४-५ महामंडळ मिळावीत. अॅट्रोसिटी कायदा ब्राह्मण समाजाला लागू नाही. पण त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.”
अशोक कांबळे यांनी प्रास्ताविक केले. महिपाल वाघमारे यांनी आभार मानले.

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मुक्तांगण आणि भावे प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक

0
पुणे – भारतीय विद्या भवनच्या सुलोचना नातू विद्या मंदिरातर्फे आयोजित आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत विद्यार्थी गटात मुक्तांगण प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला तर शिक्षकांसाठीच्या गटामध्ये म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेने पहिला क्रमांक मिळविला.
या स्पर्धेतील मुलांच्या गटामध्ये दुसरा क्रमांक म.ए.सो.चे बालशिक्षण मंदिर तर तृतीय क्रमांक पवार पब्लिक स्कूलने मिळविला. तसेच शिक्षकांच्या गटातील दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे पी.इ.एस. मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल व एन.सी.एल. प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल या शाळांनी पटकावला.
 भजन, प्रार्थना व स्वागतगीत हा स्पर्धेचा विषय होता. स्पर्धेत शहरातील एकूण १५ शाळांनी भाग घेतला होता. विविध संघांनी मराठी
तसेच हिंदी भाषांमधील गीते रंगीबेरंगी पोशाखसह सादर केली.
 या स्पर्धेसाठी पं. मुकुंद मराठे व श्रीमती शुभांगी मुळे यांनी परीक्षक या नात्याने काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभ भवनचे संचालक व मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुलोचना नातू विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका
मुख्याध्यापिका श्रीमती आरती सचदेव, श्रीमती रत्ना साहा, संगीत शिक्षक श्री. योगेश कुलकर्णी, श्री. केदार तळणीकर यांनी विशेष प्रयत्न केले.
दोन्ही गटांतील स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली गोखले व श्रीमती गायत्री गुमास्ते यांनी केले. गेल्या १० वर्षांपासून या आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

देशातील तब्बल 58 कायदे रद्द…

0

नवी दिल्ली : 1824 पासूनचे अनेक  कायदे आज  काल बााह्य ठरवित रद्द  केले. याबाबत ‘निरसन-दुरूस्ती’ विधेयक 2019 राज्यसभेने आज सर्वसंमतीने व एकमताने मंजूर केले. या रांगेत आणखी किमान 137 जुने कायदे सरकारच्या अजेंड्यावर असल्याचे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नमूद केले.

लोकसभेने मागील महिन्यात मंजूर केलेले हे विधेयक राज्यसभेने मात्र, वादविवाद न करता मंजूर केले. प्रसाद म्हणाले, की कालबाह्य ठरलेले कायदे आजही भारतात तसेच आहेत. त्यांचा कोणाला उपयोग नाही पण ते कायद्याच्या मसुद्याचे वजन वाढवीत तसेच पडून आहेत. कालबाह्य कायदे रद्द करणे किंवा सारखेसारखेच आशय असलेले कायदे एकत्रित करून त्यांचा एक समन्वयी कायदा बनविणे याबाबत पंतप्रधानांच्या सूचनेवरून दोन सदस्यीय समिती बनविण्यात आली.या समितीच्या शिफारसीनंतर गेल्या पाच वर्षांत तब्बल 1428 कायदे रद्द करण्याची विधेयके सरकारने संसदेत मंजूर केली.

आता हे 58 व यानंतरही आणखी शेकडो कालबाह्य झालेले कायदेही रद्द किंवा सुधारणा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्राने खास राज्यांसाठी बनविलेले 228 कायदे राज्यांकडे पाठविण्यात आले असून, त्यांना त्यात सुधारणा किंवा रद्द करण्याच्या सूचना केंद्राने केल्या आहेत. काहींना जुन्या गोष्टींचे श्रेय घेणे आवडते.

आज रद्द केलेले काही जुने कायदे असे :

लोकपालांची चूक अधिनियम 1850, रेल्वे प्रवासी सीमा कर 1892, हिंदी साहित्य संमेलन संशोधन अधीनियम 1960, एककाक एशडाऊन कंपनी लिमीटेड अध्यादेश 1960, दिल्ली विद्यापीठ वटहुकूम 2002, नागरीक सुरक्षा अध्यादेश 2001, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अध्यादेश 2000

श्रावण… (लेखिका-पूर्णिमा नार्वेकर)

0

सरींवर सर बरसून

उन्हाचा कवडसा घेऊन…

ऊन-पावसाचा हा

लपंडाव खेळत…

हिरवाईने नटूनथटून

असा हा श्रावण येतो…

श्रावण! श्रावण महिना हा लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता. जून महिना चालू झाला की आपल्याला वेध लागतात ते पावसाचे. थेंबाथेंबाने ओघळणारा पाऊस, तर कधी उग्र रुप धारण करून मुसळधार कोसळणारा पाऊस, ज्‍येष्‍ठ-आषाढ सरता सरता श्रावणात हलक्याशा सरीने बरसत येतो. सर्वत्र छान मखमली हिरवळ पसरलेली असते. झाडेही पानांनी आणि विविध रंगांच्या फुलांनी नटून या श्रावण महिन्याचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. खूपच मनमोहक आणि उल्हासित वातावरण असते.

श्रावण सुरू झाला की चालू होतात व्रत-वैकल्ये, उपासतापास. देवघरातल्या देवांबरोबर जीवतीचीही पूजा केली जाते. श्रावणी सोमवार आला की भाविक शिवामुठ आणि दूध घेऊन भगवान शंकराच्या देवळापुढे रांगा लावतात, तर शनिवारी तेल-माळ घेऊन मारुतीरायांसमोर नतमस्तक होतात. श्रावण महिन्यात जीवतीला एखाद्या शुक्रवारी पुरणपोळीचा नैवेद्य करून सवाष्ण स्त्रीला जेवू घालतात. नातेवाईक, ओळखीपाळखीचे, कुणाच्या ना कुणाच्या घरचे सत्यनारायणाच्या पुजेचे बोलावणे असतेच. आणि मंगळागौर आहेच की…पूर्वीसारखे पारंपरिक खेळ खेळले जात नसले तरी 12 वाजेपर्यंत जागरण करून मजा-मस्ती करत मंगळागौर साजरी होते.

श्रावण महिन्यात सणावारांची एकापाठोपाठ एक रांगच लागलेली असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, बैल पोळा, पिठोरी अमावस्या. प्रत्येक सणाचं स्वतःचं वेगळं असं महत्त्व आणि वैशिष्ट्य.

प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत ही जातीधर्मानुसार वेगवेगळी…सांगायचंच झालं तर नागपंचमीला पाटावर नागोबा काढून कुणी खीर-पुरीचा, कुणी वरणभात, भेंडा व वाटाणा भाजी, उकडीचे मोदक तर कुणाकडे दुध व लाह्या यांचा नैवेद्य दाखवतात. नारळी पौर्णिमेला खास करून नारळीभात किंवा नारळीवड्या असा बेत असतो. गोकुळाष्‍टमीला गोडपोहे, केळ्याच्या पोळ्या असे नैवेद्यात वैविध्य असते. शिळा सप्तमीला मातीचे लाडू करून विहिरीची पूजा करतात. पिठोरी अमावस्या म्हणजेच मातृदिन, त्या दिवशी मुलाबाळांच्या सौख्यासाठी पूजा केली जाते.

काही गुजराथी समाजातही हे सण साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे. नागोबाला सुखा दाल-चावलचा नैवेद्य दाखवून, तुरीच्या डाळीची खिचडी व लाल दांड्याच्या चवळीची भाजी खाऊन एक वेळ उपवास केला जातो. भाऊबीजेसारखेच रक्षाबंधन अधिक उत्साहाने साजरा करतात. सकाळपासून भरजरी साड्या नेसून शीला बेन, नीता बेन आपापल्या भाऊरायांकडेच म्हणचे माहेरी जायला आतूर झालेल्या असतात. तर सातम-आठम साजरी करण्याची पद्धत आणि मजा काही वेगळीच. कुटुंबातील सगळ्या बायका एकत्र जमून षष्ठीलाच मस्त स्वयंपाक करून ठेवतात. पुरी भाजी, कंटोलाची भाजी, वडे, दुधपाक असा मेजवानीचा झकास बेत असतो. षष्ठीला रात्री अग्नीदेवाची पूजा करून दुसऱ्या दिवशी दिवसभर चूल पेटवत नाही. रात्रभर गप्पागोष्टी करण्यात तर काही जण पत्ते खेळण्यात घालवतात. दुसऱ्या दिवशी सातमला म्हणजेच सप्तमीला सितळादेवीची पूजा करून आदल्या दिवशी बनविलेल्या चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतात. अष्टमीला एक वेळ उपवास करतात, तर नवमीला नऊ प्रकारचे कडधान्य वाफवून (फोडणी न देता) केलेली भाजी व बाजरीची भाकरी खातात. खरोखरच वेगवेगळ्या जातीधर्मात श्रावणातील सण हे वेगळ्या पद्धतीने साजरे केले जात असले तरी त्या मागची भावना मात्र एकच असते…भक्तीची, प्रेमाची आणि आपुलकीची.

असे हे निरनिराळे सण घरोघरी साजरे होत असताना तरूणांसाठीही खास महाविद्यालयातून साजरे होणारे ‘उमंग’ आणि ‘मल्हार’ सांस्कृतिक महोत्सवही असतात. या महोत्सवांमधून विविध कलागुणांना वाव मिळतो. त्याचप्रमाणे कला, संगीत, नृत्य, साहित्य, अशा अनेकविध कलारंगांची उधळत होत असते. किंबहुना आकाशातले इंद्रधनुष्यही त्याचीच साक्ष देते.

असा हा श्रावण येतो तो आनंदाच्या, उत्साहाच्या, प्रेमाच्या, भक्तीच्या सरींवर सरी घेऊनच!

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

मालेगावच्या 20 नगरसेवकांची ‘हे’ कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी!

0

नाशिक –  राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अनेक बडे नेते सोडून गेल्यानंतर मालेगाव महानगरपालिकेतल्या 20 नगरसेवकांनी पक्षाला अलविदा केलं आहे.

मालेगावचे माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह महानगरपालिकेतल्या 20 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. परंतू पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांपेक्षा या नगरसेवकांनी मात्र वेगळं कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

राज्यसभेत नुकतेच ‘तीन तलाक’ विधेयक मंजूर झालं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी राज्यसभेत त्या विधेयकाला विरोधही केला नाही, असं कारण देत या नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे.

राष्ट्रवादीचा राजीनामा जरी दिलेला असला तरी त्यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करणार? हे आणखी सांगितलेलं नाहीये.

 

पवारांनी पेरलं तसंच उगवलं… करावं तसं भरावं लागतंय; सदाभाऊ खोतांचा प्रहार

0
सांगली -राष्ट्रवादीचे अनेक नेते पवारांची साथ सोडून सत्ताधारी भाजपात प्रवेश करत आहेत. राज्यातील  राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावर मंत्री सदाभाऊ खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केली आहे.

आत्तापर्यंत शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही आपल्याकडे म्हण आहे आणि याच म्हणीची प्रचिती शरद पवारांना सध्या येत आहे, अशी टीका खोत यांनी केली आहे.

शरद पवार यांनी वसंत दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळी वसंत दादा पाटील यांना किती दु:ख झालं असेल. त्याचं दुख: पवारांना आता कळत असेल, असं खोत यांनी म्हटलं आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनीही पवारांनी जे आधी राजकारण केलं तेच त्यांना भोगायची पाळी आली आहे. माझं सरकार पाडल्यानेच त्यांच्यावर आता अशी पाळी आली आहे, अशी टीका त्यांनी पवारांवर केली होती.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला जोरदार हादरे बसत आहेत. सचिन अहिर, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्रीपद दिले तर सोडणार नाही-चंद्रकांतदादा पाटील (व्हिडीओ)

0

पुणे-पक्ष सांगेल ते करणार ,लढ म्हटले तर लढणार  ,नको लढू म्हटले तर नाही लढणार … असे  सांगणाऱ्या पालकमंत्री  चंद्रकांत दादा  पाटील  यांच्यापुढे थेट प्रश्न आला …आणि पक्ष म्हटला  मुख्यमंत्री  व्हा तर ….दादा लगेच उत्तरले …मग काय  सोडणार काय ?

राज्यात आमची ताकद चांगलीच वाढत आहे. अनेकजण आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. 90 टक्के भाजपचे लोक राज्यात विविध पदावर काम करत आहेत. युती होणार आहे, आमच्या एकट्याच्या 200 जागा येणार असल्या तरी सत्तेत निम्मा निम्मा वाटा होईल. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. ते पुण्यातील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलत होते.

पुण्यात पत्रकार श्रमिक संघाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,” राज्यात आमची ताकद चांगलीच वाढत आहे. अनेकजण आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. तसेच राज्यात 90 टक्के जागांवर आमचेच लोक आहेत. यामुळेच आमची ताकद आणखीन वाढेल. शिवाय आमच्या एकट्याच्या 200 जागा येणार असल्या तरी सत्तेत निम्मा वाटा होईल. आमची शिवसेनेसोबतची युती अभेद्य आहे.”

“मुख्यमंत्री पदाबाबत मला माहिती नाही. अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात काय ठरले माहीती नाही, पण ते जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असेल. शरद पवार यांनी तीन जण पक्ष सोडून गेले याचा धसका घेतलाय, अजून जाणारे आहे त्याची तयारी ठेवावी.” असा टोलाही त्यांनी शरद पवारांवर लगावला.