Home Blog Page 2873

बँक ऑफ बडोदाने 10 शहरांत दाखल केल्या स्टार्ट-अप शाखा

दोन वर्षांत 1000 हून अधिक स्टार्ट-अपशी जोडले जाणार, टेलर-मेड बँकिंग उत्पादने देणार

 मुंबईबँक ऑफ बडोदा या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने स्टार्ट-अपसाठी पसंतीची बँकिंग पार्टनर बनण्यासाठी आणि येत्या दोन वर्षांत किमान 1000 स्टार्ट-अपशी जोडले जाण्यासाठी बडोदा स्टार्ट-अप बँकिंग कार्यक्रम दाखल केला आहे.

स्टार्ट-अप्समुळे रोजगारनिर्मिती होऊन आणि नावीन्य साधले जाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप व्यवस्था आहे, 15,000 हून अधिक स्टार्ट-अप्सना सरकारने मान्यता दिली आहे. येत्या काही वर्षांत 5,000 स्टार्ट-अप्सची वाढ होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमांतर्गतबडोदा स्टार्ट-अप ब्रँचेस विविध प्रकारची बँकिंग उत्पादने व सेवा सादर करणार असून त्यांची निर्मितीस्टार्ट-अप्सच्या विशेष बँकिंग गरजांच्या अनुषंगाने केली आहेउत्पादनांमध्ये बँकेच्या सध्याच्या उत्पादनांबरोबरच, कस्टमाइज्ड स्टार्ट-अप करंट अकाउंट, अद्ययावत पेमेंट गेटवे, कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड व क्रेडिट सुविधा यांचा समावेश आहे.

बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. जयकुमार यांनी सांगितले, “स्टार्ट-अप्सच्या विशिष्ट गरजांबद्दल मार्केट रिसर्चमधून मिळालेल्या तपशिलाच्या अनुसार आम्ही हा कार्यक्रम तयार केला आहे.बडोदा स्टार्ट-अप ब्रँचेसमध्ये विशेष रिलेशनशिप मॅनेजर असतील आणि ते स्टार्ट-अप्सबरोबर भागीदारी करतील व त्यांना सहभागी करून घेतील. यामुळे सरकारच्या स्टार्ट-अप इंडिया योजनेतही योगदान दिले जाईल.”

सध्या, बँकेने गुरूग्राम, दिल्ली, नोएडा, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, पुणे व हैदराबाद अशा देशातील महत्त्वाच्या स्टार्ट-अप केंद्रांवर 10 स्टार्ट-अप ब्रँच सुरू केल्या आहेत. पुढील टप्प्यात, बँक लखनऊ, इंदोर, कोलकाता, कोची व चंडीगड येथे स्टार्ट-अप शाखा सुरू करणार आहे.

स्टार्ट-अप्ससाठी परिपूर्ण बँकिंग सेवा देण्याबरोबरचस्टार्ट-अप्सना क्लाउड क्रेडिट, को-वर्किंग स्पेस, कायदेशीर/अकाउंटिंग सेवा व डिजिटल मार्केटिंग अशा अन्य सेवा देण्यासाठी बँकेने अशा सेवा देणाऱ्यांशी भागीदारी केली आहे.

‘डीईएस’ सुरू करणार सहा आयटीआय डॉ. शरद कुंटे यांची माहिती

0

पुणे, ता. ९ ः शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना किमान एकतरी व्यावसायिक कौशल्य विकसित करता यावे या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) वतीने सहा खासगी आयटीआय सुरू करणार असल्याची घोषणा सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी केली.
डीईएसच्या संस्थापक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात डॉ. कुंटे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. वरिष्ठ अधिव्या‘याता ऍड विद्याधर शिंत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, नवलमल ङ्गिरोदिया विधी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  ऍड. नितीन आपटे, प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. कुंटे पुढे म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा नुकताच जाहीर झाला आहे. त्यावर चर्चा ही सुरू आहेत. आराखड्यात नमूद केलेल्या विविध विषयांवर डीईएसने खूप आधीपासून तयारी सुरू केली आहे. बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहाता येईल अशाप्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक‘मांची समाजाकडून मागणी होत आहे. समाजाच्या संस्थेकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विविध योजना सुरू करणार आहोत.’
ऍड शिंत्रे म्हणाले, ‘आपण प्रयत्न केला तर यश मिळते. परंतु ते दर वेळेला मिळेलच असे नाही. परंतु अपयशाने खचून जाण्याची आवश्यकता नाही. अपयश पचविण्याची शक्ती तेवढीच महत्त्वाची असते.’
कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी अहवाल वाचन केले. डॉ. रोहिणी होनप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जगदीश लांजेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. डॉ. अनघा बलदोटा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रताप साळुंके यांनी आभार मानले.

शंभर टक्‍के पंचनामे पूर्ण होण्‍याची वाट न पहाता पूरग्रस्तांना तातडीने मदतीचे आदेश

0

पुणे, दिनांक 9- जिल्‍ह्यातील पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्‍या नागरिकांना मदत करतांना शंभर टक्‍के पंचनामे पूर्ण होण्‍याची वाट न पहाता, जसे पंचनामे होतील तशी लगेच मदत देण्‍यात यावी, असे स्‍पष्‍ट आदेश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, जिल्‍ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागामध्‍ये झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे पुराचे पाणी शहरी व ग्रामीण भागामध्‍ये पसरले होते. या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्‍या कुटुंबियांना विशेष दराने मदत देण्‍यात येणार आहे. ही मदत देतांना पंचनामे झाले की लगेच देण्‍यात यावी.

पूर परिस्थिती आणि त्‍यावरील व्‍यवस्‍थापनाबाबत अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून त्‍यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी अशाही सूचना त्‍यांनी दिल्‍या. आपापल्‍या विभागातील भविष्‍यकालीन पूरबाधित होऊ शकणा-या गावांची यादी तयार करणे, तेथील नागरिकांना सुरक्षितस्‍थळी हलवणे आदीबाबत योग्‍य ती दक्षता घेणे तसेच या काळात कोणीही मुख्‍यालय सोडून जावू नये, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

बाधित पूल, पाण्‍याखाली गेलेले पूल, बंद असलेले रस्‍ते, त्‍याबाबतची सद्यस्थिती, दूरसंवाद यंत्रणाची पर्यायी व्‍यवस्‍था, वीजपुरवठा, पूरग्रस्‍त भागात वैद्यकीय पथक, वैद्यकीय सुविधा, औषध फवारणी, औषध पुरवठा, परिसर स्‍वच्‍छता, स्‍वच्‍छ आणि शुध्‍द पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय याबाबत अद्ययावत माहिती ठेवून आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

सांगलीतील पूरग्रस्तांसाठी पाण्‍याच्‍या बाटल्‍या आणि बिस्‍कीटे रवाना

पुणे सांगली आणि कोल्‍हापूर येथील पूरग्रस्‍तांसाठी स्‍वच्‍छ पिण्‍याचे पाणी आणि ‘रेडी टू इट’ असे खाद्यपदार्थ पाठविण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात कोल्‍हापूर आणि सांगली साठी स्‍वतंत्र मदत कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहेत. जिल्‍हाधिकारी राम यांनी केलेल्‍या आवाहनाला प्रतिसाद म्‍हणून शिरुर येथून सांगलीतील पूरग्रस्तांसाठी 12 हजार लिटर पाण्याच्या बाटल्या (एक ट्रक) आणि बिस्कीटांचे पुडे (एक ट्रक) रवाना करण्यात आले. यासाठी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे तसेच त्‍यांच्‍या सहका-यांनी पुढाकार घेतला.या दोन्‍ही ट्रकना विभागीय आयुक्तांच्या परवानगीने टोलमधून सूट देण्यात आली आहे.

पुणे-पिंपवड मध्ये ४ हजार कुटुंबांचे स्थलांतर-जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर

0

पुणे दि.09:- पुणे जिल्हयातील मुळा, मुठा व इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुरामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या पुणे शहरा मधील जुनी सांगवी, दापोडी , पिंपरी, रावेत, रहाटणी, वाकड, आदर्शनगर, शांतीनगर, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, खिलारे वस्ती इत्यादी परिसरातील पुराने बाधित झालेल्या सुमारे 1685 कुटुंबांचे तर अप्पर तहसिलदार, पिंपरी-चिंचवड यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सादर केलेल्या अहवालानुसार 2227 कुटुंबांचे स्थानिक पातळीवर स्थलांतर करण्यात आलेले आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या आपत्तीग्रस्तांना मोफत धान्याचा पुरवठा करण्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वितरणाचा आढावा घेवून तात्काळ धान्यपुरवठा करण्याचे आदेश दिले. या आढावा बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या दिनांक 8 मार्च व 7 ऑगस्ट 2019 च्या शासननिर्णय व पत्रानुसार 10 किलो गहू व 10 किलो तांदळाचा मोफत पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने माहे ऑगस्ट 2019 मधील मंजूर अन्नसुरक्षा नियतनातून वाटप करुन शिल्लक राहिलेल्या नियतनातून परिमंडळ अधिकारी यांच्याकडून प्राप्त बाधित कुटूंबाच्या यादीनुसार व दुकानदार निहाय दिनांक 5 ऑगस्ट 2019 च्या आदेशाप्रमाणे पुणे शहर व पिंपरी-चिंचवड, भोसरी इ. बाधित ठिकाणच्या परवानाधारक दुकानांमधून या मोफत धान्यांचे वितरण करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली आणि कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन

0

पुणे- पुण्‍याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगली व कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदत करण्‍यासाठी तातडीने कक्ष उभारून आवश्यक ती कार्यवाही करण्‍यासाठी वरिष्ठ महसूल अधिका-यांना सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पुडे, मेणबत्त्या, टॉर्च, नवीन शाली, नवीन ब्‍लँकेट, नवीन चटई, रेडी टू इट असे खाद्यपदार्थ द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले. कक्षाकडे जमा होणारी मदत विभागीय आयुक्‍त कार्यालयातील मदत केंद्राशी समन्‍वय साधून पुरग्रस्‍तांकडे पाठविण्‍यात येईल, असे सांगून जिल्‍हाधिकारी राम यांनी मुख्यमंत्री सहायता निधीलाही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍ह्यातील पूरस्थितीचा आढावाही घेण्‍यात आला. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली आणि कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षातील अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी -समन्वय अधिकारी – अजय पवार (उपजिल्हाधिकारी) -मोबाईल 8856801705, श्रीमती आरती भोसले (उपजिल्हाधिकारी) – 9822332298, श्रीमती नीता शिंदे (उपजिल्हाधिकारी) – 9421118446 आणि सांगली जिल्ह्यासाठी समन्वय अधिकारी – भारत वाघमारे (उपजिल्हाधिकारी) – 9850791111, श्रीमती सुरेखा माने (उपजिल्हाधिकारी) – 7775905315, रवी कोळगे (स्‍वी. सा.) मो. 9511251475.

सांगली आणि कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या अधिका-यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवाहन केले आहे.

पूरग्रस्तांना उपजिल्‍हाधिकारी सुरेखा माने यांचा मदतीचा हात

0

पुणे, दिनांक 9- सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाल्यामुळे त्याठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणाहून सुरू झाला आहे. उपजिल्‍हाधिकारी सुरेखा माने यांनीही मदत करुन माणुसकीचा प्रत्‍यय दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यात तहसीलदार पदावर कार्यरत असताना जलसंधारणाचे काम उल्लेखनीयरित्या केल्याने उपजिल्हाधिकारी श्रीमती सुरेखा माने यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले होते, त्यांनी पुरस्काराची सर्व रक्कम पुरग्रस्तांसाठी देऊन संवेदनशीलतेचा प्रत्यय दिला. मदतीचा धनादेश सुरेखा माने यांनी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍याकडे सुपूर्द केला. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे उपस्थित होते.

पुण्‍याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुद्धा सांगली व कोल्हापूर मधील पूरग्रस्तांना मदत करण्‍यासाठी तातडीने कक्ष उभारून आवश्यक ती कार्यवाही करण्‍यासाठी वरिष्ठ महसूल अधिका-यांना सूचना दिल्या. तसेच पुणे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती चा आढावा घेऊन विविध विषयासंदर्भात तातडीने जिल्हा स्तरावर समन्वय अधिका-यांच्‍या नियुक्त्या करून कामाला सुरुवात देखील केली आहे. बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपस्थित महसूल अधिका-यांनीही पुरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचे जाहीर केले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्रकार व अन्य उपजिल्हाधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

15 ऑगस्ट रोजी सर्वात मोठा तिरंगा फडकवण्यासाठी टीम 360 एक्सप्लोरर माउंट एल्ब्रूस मोहिमेसाठी रशियाला रवाना

0

युरोपातील सर्वोच्च शिखर सर करणारा साई कवडे ठरणार सर्वात लहान आशियाई पुरुष

महाराष्ट्रातील रेकॉर्ड होल्डर गिर्यारोहक सागर नलावडे, तुषार पवार, भूषण वेताळ हेही एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार रशियातील सर्वोच्च शिखर सर

पुणे-जगातील सर्वोच्च शिखरांपैकी असलेले युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस सर करण्यासाठी महाराष्ट्रातील गिर्यारोहक निघाले असून एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 360एक्सप्लोरर मार्फ़त या मोहिमेत अनेक विक्रम होणार आहेत.

हे शिखर सर करणारा 10 वर्षाचा साई कवडे हा आशिया खंडातील सर्वात लहान मुलगा ठरणार आहे.

याशिवाय लिंगाणा फक्त 16 मिनिटात सर करणारा विक्रमवीर कोल्हापूर येथील सागर नलावडे, पोलीस दलातील सातारा येथील तुषार पवार, किलीमांजारो सर करणारा पहिला स्टेट बँक कर्मचारी भूषण वेताळ हेही या मोहिमेअंतर्गत शिखर सर करणार आहेत. “मोहीम सह्याद्रीच्या लेकरांची” असे या मोहिमेला नाव दिले असून या मोहिमेचे नेत्तुत्व एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे हे करणार आहेत. आनंद बनसोडे यांनी 2014मधेच हे शिखर सर करून अनेक विक्रम केले होते.

         रशिया मध्ये असलेले युरोप मधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्या मध्ये हे शिखर वसलेलं आहे. जॉर्जिया देशाच्या बोर्डर पासून २० किमी अंतरावर माउंट एल्ब्रूस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असेल्यापैकी एक असा हा  निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचे तापमान उणे 25 डिग्री पर्यंत जात असते. वर्षभर येणारी सततची सुरु असलेली मोठ-मोठी वादळे माउंट अल्ब्रूस चढाईतील मुख्य अडचण आहे.

      10 वर्षाचा साई कवडे हा मूळचा पुणे येथील गिर्यारोहक हे शिखर सर करून सर्वात लहान आशियाई बनणार असून यांसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे या मोहिमेकडे लक्ष लागून राहणार आहे. साई कवडे याने 360एक्सप्लोरर मार्फ़त वेगवेगळ्या मोहिमा केलेल्या आहेत व आम्हाला त्याच्या यशाबद्दल खूप विश्वास आहे असे त्याव्हे आई-वडील सुधीर व केतकी कवडे यांनी सांगितले.

आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या 360 एक्सप्लोरर मार्फत गेल्या काही वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमा आयोजित केल्या गेल्या आहेत. साहसी मोहिमांच्या आयोजनामध्ये 360 एक्सप्लोरर महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च स्थानी आहे.

“या मोहिमेद्वारे भरपूर विक्रम केले जाणार असून भारताचा सर्वोच्च तिरंगा यावर फडकवला जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती या शिखरावर नेहून सह्याद्रीची लेकरांची मोहीम हे नाव आम्ही साध्य करणार आहोत”

– सागर नलावडे 

(लिंगाणा विक्रमविर गिर्यारोहक)

“या मोहिमेत ‘युनायटेड वी स्टँड’ असा संदेश देऊन जातीय सलोखा राहावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भारतातील पहिला SBI कर्मचारी बनण्याचा मान मला मिळत आहे त्याबद्दल खूप आनंद होत आहे.

– भूषण वेताळ 

(SBI चा प्रथम गिर्यारोहक)

“पोलीस दलातुन  जास्तीत जास्त गिर्यारोहक बनावेत यासाठी महाराष्ट्रातील प्रथम पोलीस या आंतरराष्ट्रीय मोहिमेवर जात आहे. 15 ऑगस्ट रोजी भारतमातेला अभिवादन करणार आहे”

– तुषार पवार

( महाराष्ट्र पोलीस गिर्यारोहक)

आरडब्लूआयटीसी क्लबवर ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी आणि टर्फ क्लब ट्रॉफीचे आयोजन

0

पुणे, 9 ऑगस्ट 2019 : येत्या शनिवारी, 10 ऑगस्ट व रविवार 11 ऑगस्ट रोजी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) यांच्या तर्फे अश्वशर्यतींच्या यंदाच्या मौसमातील दोन अत्यंत रोमांचकारी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी आणि टर्फ क्लब ट्रॉफी या दर्जेदार शर्यतींमध्ये एकाहून एक सरस अश्वामधील चुरस अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

यातील शनिवारी होणार्‍या पहिल्या रंगतदार शर्यतीत द ईव्ह चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या अश्वांमधील झुंज पाहता येणार आहे. ही शर्यत शनिवारी, 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार असून ही प्रतिष्ठेची शर्यत 15 फेब्रुवारी 1941 रोजी सर्वप्रथम सर व्हिक्टर ससून यांच्या हस्ते सुरु करण्यात आली होती. या शर्यतीत अत्यंत उच्च कामगिरीचा इतिहास असणार्‍या 4 वर्षे वयाच्या अश्वाचा सहभाग असून अश्वशर्यतींच्या विश्वात या रेसला महत्व आहे.

रविवारी होणार्‍या टर्फ क्लब ट्रॉफी या दुसर्‍या शर्यतीतही दर्जेदार अश्व आणि उत्तम जॉकी यात झुंज रंगणार आहे. रविवार 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार्‍या टर्फ क्लब ट्रॉफी या मोठा इतिहास असलेल्या शर्यतीतही उत्तम रितीने प्रशिक्षित केलेल्या अश्वांमध्ये चुरस रंगणार आहे. सर्वप्रथम मुंबई येथे 1947 मध्ये टर्फ क्लब कप या नावाने सुरु झालेली शर्यत अखेरच्या टप्प्यातील स्प्रिंटसाठी महत्वाची मानली जाते. 1400 मीटर अंतराच्या या शर्यतीला विशेष ग्रेडच्या शर्यतीचा दर्जा देण्यात आला आहे.

 

होंडा टुव्हीलर्स इंडिया आणि शेल ल्युब्रिकंट्सतर्फे इंजिन ऑइलची नवी श्रेणी लाँच

 दिल्ली – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. आणि शेल ल्युब्रिकंट्स, फिनिश्ड उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठेतील आघाडीची कंपनीने इंजिन ऑइलची नवी श्रेणी लाँच करण्यासाठी धोरणात्मक भागिदारी केली आहे. होंडा टुव्हीलर्स आणि शेल ल्युब्रिकंट्स यांची ही भागिदारी भारतीय बाजारपेठेतील दुचाकी तेल विभागातील पहिली भागिदारी आहे.

वाहन चालकांना दररोज रस्त्यांवर येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी योग्य उत्पादन उपलब्ध करून देण्याच्या प्रवासाची सुरुवात या भागिदारीद्वारे करण्यात आली आहे. नवी श्रेणी शेलचे तंत्रज्ञानविषयक ज्ञान आणि होंडाचे आधुनिक वाहन ब्लूप्रिंट यांच्या मिश्रणातून खास तयार करण्यात आली आहे. या श्रेणीमध्ये सुधारित पिक अप आणि अक्सलरेशन, अधिक चांगली इंधन कार्यक्षमता, उच्च तापमानाला इंजिन संरक्षण, सफाईदारपणे गियर बदलणे, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सहजपणे गाडी चालवण्याची क्षमता असे नवे फायदे समाविष्ट करण्यात आले आहेत.

या भागिदारीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या ग्राहक सेवा विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रदीप कुमार पांडे म्हणाले, होंडामध्ये आम्ही सातत्याने ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि सेवा पुरवल्या आहेत. ग्राहकांना अशाच प्रकारे मूल्यवर्धित उत्पादने देण्यासाठी होंडाने शेल ल्युब्रिकंट्स इंडियाशी भागिदारी केली असून त्याद्वारे वाहन चालवण्याचा जास्त चांगला अनुभव ग्राहकांना दिला जाणार आहे. भारतीय दुचाकी उद्योगात नवे मापदंड तयार करण्यासाठी भविष्यात ही भागिदारी मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

शेल ल्युब्रिकंट्सचे देश प्रमुख मानसी त्रिपाठी म्हणाले, आमच्या ओईएम भागिदारांबरोबर दीर्घकालीन भागिदारीसाठी गुंतवणूक करणे आणि त्यातून नवनिर्मिती करणे ही कायमच शेलची प्रमुख बांधिलकी राहिली आहे. होंडाबरोबर भागिदारी केल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि भारतीय बाजारपेठेत वाहनविषयक नाविन्य व नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ही भागिदारी ग्राहकाला नव्या सुविधा देऊन देशातील वाहतूक व्यवसायाच्या भविष्याला चालना देण्याचे आमचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

 

होंडा दुचाकींसाठी ल्युब्रिकंट्सची नवी श्रेणी 0.8 लीटर, 0.9 लीटर आणि 1 लीटर पॅकमध्ये उपलब्ध केली जाईल.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) – होंडा मोटर कंपनीची 100 टक्के उपकंपनीने, जपान (जगातील पहिल्या क्रमांकाची दुचाकी कंपनी) मे 2001 मध्ये भारतीय दुचाकी कामकाजाची सुरुवात केली. आज 19 व्या वर्षात असलेल्या होंडा टुव्हीलर्स इंडियाने आतापर्यंत भारतातील 43 दशलक्ष ग्राहकांना आनंदित केले असून कंपनीची चार कारखान्यांची एकत्रित उत्पादनक्षमता वार्षिक पातळीवर 6.4 दशलक्ष आहे. होंडा दुचाकीच्या विस्तृत श्रेणीमध्ये सहा स्कुटर्स (अक्टिव्हा 5जी, अक्टिव्हा 125, अक्टिव्हा आय, एव्हिएटर, डिओ आणि ग्राझिया), 9 मोटरसायकल्स (सीडी 110 ड्रीम, ड्रीम युगा, लिवो, सीबी शाइन, सीबी शाइन एसपी, सीबी युनिकॉर्न, सीबी हॉर्नेट 160आर, एक्स- ब्लेड आणि सीबीआर 250आर) आणि देशांतर्गत श्रेणीमध्ये 6 फन बाइक्स (सीबी300आर, सीबीआर650आर, आफ्रिका ट्विन, सीबी1000आर, सीबीआर1000आरआर आणि गोल्ड विंग) यांचा समावेश आहे.

 शेलबद्दल
शेल ही 8500 कर्मचारी असलेली भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण आंतरराष्ट्रीय उर्जा कंपनी अपस्ट्रीम, डाउनस्ट्रीम, इंटिग्रेडेट गॅस, अक्षय उर्जा आणि आर अँड डी, डिजिटायझेशन व व्यावसायिक कामकाजामध्ये सखोल क्षमता बाळगून आहे. कंपनी कर्नाटक, तमिळ नाडू, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या सहा राज्यांत रिटेल पातळीवर कार्यरत असून सद्या ती देशभरातील फ्युएल स्टेशन्सचे आपले नेटवर्क विस्तारण्याचे काम करत आहे.

कंपनीची भारतात ल्युब्रिकंट्सची संपूर्ण मूल्य साखळी असून त्यात संकल्पनेपासून विकासापर्यंत आणि उत्पादनापासून वितरणापर्यंतच्या सर्व टप्प्यांचा समावेश आहे. त्याशिवाय यात 115 दशलक्षपेक्षा जास्त लीटर्सची क्षमता असलेल्या जागतिक दर्जाच्या ल्युब्रिकंट ऑइल ब्लेंडिंग कारखान्याचा आणि 185 पेक्षा जास्त मोठे वितरण नेटवर्क व 60 हजार रिटेलर्सचा समावेश आहे. कंपनी हाजिरा येथे स्वतःचे एलएनजी रि- गॅसिफिकेशन टर्मिनल चालवते. बीजी एक्सप्लोरेशन अँड प्रॉडक्शन इंडिया लिमिटेड या उपकंपनीद्वारे शेल पन्ना- मुक्ता तेल आणि वायू क्षेत्रातील 30 टक्के हिश्श्यासह संयुक्त चालक आहे. डिजिटायझेशन आणि भविष्यासाठी तयार, शाश्वत उपाययोजनांच्या मदतीने कंपनी भारतातील इकोसिस्टीमचा विकास करत असून त्याच्या जोडीला स्टार्ट अप्ससाठी शेल ई4, शेल इको मॅरेथॉन आणि हस्क पॉवर व क्लीनटेक सोलर अशा नव्या, उर्जा कंपन्यांसह उर्जा क्षेत्रातील संशोधनाला चालना देत आहे. त्याशिवाय शेल समाजासाठी सकारात्मक योगदान देत असून त्यादृष्टीने एनएक्सप्लोरर्स, अक्सेस टु एनर्जी आणि रस्ते सुरक्षा इत्यादी उपक्रम भारतात राबवत आहे.

फॉलो @shell_India @makethefuture @shell_ecomar आणि जाणून घ्या कशाप्रकारे कंपनी उर्जा क्षेत्रातील समीकरणे बदलत आहे.

रॉयल डच शेल पीएलसी

रॉयल डच शेल पीएलसी ही इंग्लंड आणि वेल्समध्ये स्थापन झालेली कंपनी असून द हॉग येथे तिचे मुख्यालय आहे. कंपनीची लंडन, अमस्टरडॅम आणि न्यू यॉर्क एक्सचेंजवर नोंदणी झालेली आहे. शेल कंपन्यांचे 70 पेक्षा जास्त देशांत आणि प्रदेशांत कामकाज सुरू असून कंपनी तेल आणि वायू उत्खनन व निर्मिती, द्रवीकरण केलेला नैसर्गिक वायू आणि वायू ते द्रव निर्मिती व विपणन, तेल उत्पादने, रसायने, अक्षय उर्जा उत्पादनांचे विपणन आणि शिपिंग या व्यवसायांत कार्यरत आहे.

दीडशे पूरग्रस्तांना महिनाभराच्या रेशन चे वाटप

0
पुणे-आज बाणेर-बालेवाडी येथील मुळा नदीलगत असलेल्या  पुरग्रस्थांना मदत म्हणुन नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते सुमारे १५० पुरग्रस्त कुटुंबांना एक महिण्याचे रेशन वाटप करण्यात आले,.
यावेळी पुर परिस्थितीमध्ये स्थलांतरीत कुटुंबियांना जेवणाची, ब्लॅन्केट्स, चादर, दैनंदिन उपयोगी वस्तु पुरवुन व वैद्यकिय सेवा देणार्या विविध संस्था त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बाणेर-बालेवाडी मेडीको असोसिएशन, बाणेर-बालेवाडी रेसिडेन्स असोसिएशन, वसुंधरा अभियान, बालेवाडी वुमन्स क्लब, आर्ट आॅफ लिविंग, लायन्स क्लब, राॅबिन हुड आर्मी, बाणेर-पाषाण लिंक रोड विकास समिती, बाणेर बालेवाडी व्यापारी संघटणा या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे परिसरातील पुर परिस्थितीप्रमाणेच कोल्हापुर, सातारा, सांगली येथे अडकलेल्या महापुरातील नागरीकांना देखिल पिण्याच्या पाण्याच्या बाॅटल्स व मदत पोहचवण्याचे आवाहन सर्व संस्थांना व नागरीकांना खासदार गिरीषजी बापट साहेब यांनी केले.
यावेळी उद्योजक सुनिलजी माने, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, शिवम सुतार, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, दिलिप मुरकुटे, आबा सुतार, भास्कर कोकाटे, औंध-बाणेर महा.पालिका सहा.आयुक्त, प्रकाश तापकीर, अनिल बालवडकर, बालेवाडी वुमन्स क्लबच्या अध्यक्षा रुपाली बालवडकर, डाॅ.राजेश देशपांडे, मित विज, सागर बालवडकर, पोलिस पाटील, अनंता कांबळे, किरण धेंडे, विकास बालवडकर व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सदस्य उपस्थित होते.

दिल्लीकरांना ‘फ्री’ इंटरनेट, केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

0

नवी दिल्ली – दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली आहे. येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधेला सुरुवात होईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे आम्ही निवडणुकांच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत. त्यामुळे निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन असं काहीही नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीकरांसाठी महत्तपूर्ण घोषणा केल्या आहेत. दिल्लीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तर, सीसीटीव्हीमुळे महिलांची सुरक्षा होत असून चोरीसारख्या घटनांना आळाही बसत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार असून 4 हजार हॉटस्पॉट हे शहरातील 4 हजार बस स्टॉपवर बसविण्यात येतील. तर, उर्वरीत 7 हजार वायफाय हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 याप्रमाणे बसविले जातील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डेटा दरमहा वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे. दिल्लीतील मोफत इंटरनेट सेवा पीपीपी तत्वाने सुरू करण्यात येत असून यासाठी 100 कोटींचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले

कश्मीर मधील काही कैद्यांना आग्र्याच्या तुरुंगात हलविले

0

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले.

मोदी यांच्या भाषणाआधी जम्मू काश्मीरच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांना हवाई दलाच्या विमानांमधून आग्रायेथी तुरुंगात हलविण्यात आले आहे. जम्मूमध्ये परिस्थिती बिघडल्यास तेथील तुरुंग अपुरे पडू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

पूरग्रस्तांना सोडून सांगलीचे पालकमंत्री पुण्यात भाजपा बैठकीला?

0

पुणे : पुरात अडकलेल्या सांगलीला वाऱ्यावर सोडून सांगलीचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीला गुरूवारी (दि. ८) उपस्थित राहिले. यावेळी मतदारांबरोबर संपर्क कसा ठेवायचा याबद्दल बूथकेंद्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक होती.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डीपी रस्त्यावरील एका कार्यालयात ही बैठक झाली. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

पक्षाच्या बैठकीनंतर सुभाष देशमुख यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतलेल्या पूर आढावा बैठकीस उपस्थिती लावली. यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगलीतील अनुपस्थितीबद्दल छेडले असता देशमुख म्हणाले, सांगलीतील सरकारी यंत्रणेच्या मी सातत्याने संपर्कात आहे. आज सकाळीच मी तिथून पुण्यात आलो. संध्याकाळी पुन्हा सांगलीलाच जाणार आहे. पूरग्रस्तांसाठी मदत मिळवण्यासाठी मी पुण्यात आलो होतो. पुरग्रस्तांना सोडून मी पुण्यात आल्याच्या चर्चांमध्ये अर्थ नाही.

प्रशासकीय बेपर्वाईमुळे ब्रह्मनाळमध्ये निरपराधांचे बळी! – अशोक चव्हाण

0

मुंबई – सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून गेलेले ११ बळी हे अपघाताचे नसून, सरकारची तुटपुंजी उपाययोजना व प्रशासकीय बेपर्वाईचे बळी असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

या घटनेबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे. या अपघाताचे वृत्त आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी ब्रह्मनाळमध्ये संपर्क साधून संपूर्ण माहिती घेतली.त्याआधारे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, स्थानिकांनी तहसील प्रशासनाकडे बोटीची मागणी केली होती. परंतु, ग्रामपंचायतकडे बोट असल्याने ब्रह्मनाळला बोट देण्याची गरज नाही, असे बेपर्वाईचे उत्तर देऊन ही मागणी फेटाळण्यात आली. प्रशासनाने हात वर केल्यामुळे गावकऱ्यांना नाईलाजास्तव ग्रामपंचायतची गळकी बोट वापरावी लागली व हा अपघात घडला. प्रशासनाने वेळीच बोट पुरवली असती किंवा ग्रामपंचायतची बोट वापण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी पाठवले असते तर ११ निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले नसते.

त्यामुळे सरकारला या अपघाताची जबाबदारी नाकारता येणार नाही. एक तर राज्य सरकारने पुरेशी उपाययोजना केली नाही. आवश्यक तेवढ्या बोटी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या नाहीत. शिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बेपर्वाई केल्याने हा अपघात झाला असून, सरकारने याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

ब्रिटनच्या संसदेत उमटले जम्मूतील कलम 370 हटवण्याचे पडसाद

0

लंडन : जम्मू काश्‍मीरसंबंधी असणारे कलम 370 केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. कारण भारत सरकारच्या या निर्णयावर पाकिस्ताननंतर आता ब्रिटनच्या संसदेत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनिक राब यांनी स्वत: या प्रकरणावरुन भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.

भारत सरकारच्या निर्णयावरुन ब्रिटन संसदेत चर्चा करण्यात आली. त्यावेळी संसदेच्या काही सदस्यांनी भारताच्या निर्णयावरुन चिंता व्यक्त केली तर काही सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. काश्‍मीर मुद्द्यावरुन असणाऱ्या स्थितीवर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी बोलून चिंता व्यक्त केली. भारताच्या स्थितीवर ब्रिटन लक्ष ठेऊन असल्याचं सांगितले

जम्मू-काश्‍मीरच्या बाबतीत सरकारने घेतलेला निर्णय काही जणांना रुचत आहे तर काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, भारताच्या दृष्टीकोनातून ब्रिटनने या प्रश्नाची व्याप्ती समजून घेतली तसेच सध्याच्या परिस्थितीत शांतता राखण्यात यावी असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केले आहे