वंचित समाजाला सत्ता मिळवून देणार -अँड.प्रकाश आंबेडकर
भाजपकडून पुण्यातील १०३ जणांना व्हायचंय आमदार ..(व्हिडीओ)
पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात दुपारी १२ वाजता मुलाखतींना सुरूवात होणार होती मात्र प्रत्यक्षात दुपारी दीड वाजता मुलाखती सुरु झाल्या . समर्थक कार्यकर्त्यांसह इच्छुक या मुलाखतींना उपस्थित होते. त्यामुळे पक्ष कार्यालय गजबजून गेले होते. . मतदारसंघानुसार इच्छुकांना बोलावून एकाच वेळी त्यांना प्रश्न विचारत या मुलाखती झाल्या. वैयक्तिपणे शेलार भेटतील व माहिती घेतील,प्रश्न विचारतील अशी इच्छुकांची अपेक्षा फोल ठरली .
शिवाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. सर्वात कमी म्हणजे ४ इच्छुक पर्वती मतदारसंघात होते. शहरातील सर्वच म्हणजे आठही मतदारसंघामध्ये भाजपाचेच आमदार आहेत. त्या सर्वांनीच आपापल्या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखती दिल्या. त्यांच्याबरोबरच त्यात्या मतदारसंघातील नगरसेवक, पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
मुलाखतीनंतर तुमच्याबरोबर शहराध्यक्ष बोलतील असे सांगत आशिष शेलार माध्यम प्रतिनिधींबरोबर न बोलताच निघून गेले. मिसाळ यांनी सर्व मुलाखती शांततेत पार पडल्या असल्याचे सांगितले. आमदारांशिवाय अन्य जणेही मुलाखत देतात याचा अर्थच पक्षात लोकशाही आहे असे त्या म्हणाल्या, तुमच्या मतदारसंघात सर्वाधिक कमी इच्छुक आहेत असे लक्षात आणून दिल्यानंतर याचा अर्थ माझे काम चांगले आहे असे उत्तर त्यांनी दिले. खासदार बापट म्हणाले, पक्षसंघटनेत अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे असेच ही गर्दी सांगत आहेत. या मुलाखतींचा अहवाल शेलार प्रदेश शाखेकडे देतील. त्यानंतर तो निवड समितीकडे जाऊन केंद्रीय समिती त्यावर निर्णय करेल असे त्यांनी सांगितले.
सिद्धार्थ शिरोळे
डॉ राजेंद्र खेडेकर
रवींद्र साळगांवकर
विजय शेवाळे
अजय दुधाने
उषा बाजपेयीं
महेंद्र कदम
अशोक मुंडे
नितीन कुंवर
अनिल भिसे
नंदकुमार मांडोरा
अनिल पवार
वसंत अमराळे
अपरण गोसावी
दत्तात्रय खाडे
संतोष लांडगे
नीलिमा खाडे
सुधीर आल्हाट
शामराव सातपुते
सतीश बहिरट
अर्चना मुसळे
मधुकर मुसळे
गणेश गायकवाड
ज्योत्स्ना एकबोटे
शिरीष नाईकारे
शंतनू खिलारे पाटील
सुधीर मांडके
संजय सावळे
लहूदास कुलकर्णी
महेश लडकत
दिलीप काळोखे
अशोक एनपुरे
हेमंत रासने
मनिष साळुंके
पर्वती विधानसभा मतदार संघ –
श्रीनाथ भिमाले
माधुरी मिसाळ
गोपाळ चिंतल
जगदीश मुळीक
महेंद्र गलांडे
उषा बाजपेयीं
राजेश लोकरे
संजय पवार
मेधा कुलकर्णी
मुरलीधर मोहोळ
अमोल बालवडकर
राजेश बराटे
संदीप खर्डेकर
मंजुश्री खर्डेकर
शामराव सातपुते
सुशील मेंगडे
निलेश निधाळकर
विशाल गंधिले
योगेश राजपुरकर
राहुल कोकाटे
योगेश टिळेकर
विकास रासकर
जीवन जाधव
बाबासाहेब शिंगोटे
अनुपसिंहा गौड
मारुती तुपे
ज्ञानेश्वर कुदळे
मेघना प्रमाणिक
उमेश गायकवाड
भीमराव तापकीर
सुनील मारणे
राजेंद्र खेडकर
प्रसन्न जगताप
संगीतादेवी राजेनिंबाळकर
राजू लायगुडे
हेमंत दांगट पाटील
दिलीप वेडे पाटील
राजाभाऊ जोरी
अभिजित देशमुख
दीपक माने
अरुण राजवाडे
मिलिंद दत्त बहिरट
सुनील माने
संजय पवार
सुखदेव अडागळे
दिलीप कांबळे
प्रकाश सोनवणे
किरण कांबळे
बाप्पू कांबळे
अतुल गायकवाड
प्रवीण गाडे
वर्षा गाडे
विरसेन जगताप
विष्णू हरिहर
पांडुरंग शेलार
रमेश काळे
राहुल बोराडे
डॉ भरत वैरागे
प्रवीण जगताप
श्रीधर कसबेकर
सिद्धार्थ सोनवणे
राहुल माने
पांडुरंग भिकोबा शेलार
खासदार संजय काकडे यांना शुभेच्छ्या देण्यासाठी पुणेकरांची गर्दी
पुणे- राज्यसभा सदस्य आणि भाजपचे सहयोगी खासदार ज्यांच्या नावाची राज्यातील राजकीय वर्तुळात वारंवार असंख्य वेळा चर्चा होत आली ,सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्यांच्या भूमिकेबाबत औत्स्युक्याचे वातावरण कायम राहिले त्या संजय काकडे यांच्या वाढदिवशी सर्व पक्षीय राजकीय कार्यकर्ते ,पुणेकर तसेच त्यांच्या चाहत्यांनी आज त्यांना शुभेच्छ्या देण्यासाठी तुडुंब गर्दी केली .
गणेश मंडळांच्या स्वागत कमानी व रनिंग मंडपांसाठीचे शुल्क माफ
पुणे मनपा स्थायी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर ; नगरसेवक हेमंत रासने यांच्या प्रयत्नांना यश
पुणे : गणेशोत्सवासाठी केवळ महाराष्ट्रातून नव्हे, तर देशाच्या कानाकोप-यातून किंबहुना परदेशातूनही नागरिक पुण्यामध्ये मोठया प्रमाणात येतात. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत कमानी व रनिंग मंडप उभारण्यात येतात. यासाठी पुणे महापालिकेकडून आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच रनिंग मंडपांवरील जाहिरातींचे शुल्क देखील घेण्यात येणार नसल्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्य करण्यात आला.
ठरावाला सूचक नगरसेवक हेमंत रासने आणि अनुमोदन नगरसेवक दीपक पोटे यांनी दिले. गणेश मंडळांच्या स्वागत कमानी व रनिंग मंडपासाठीचे शुल्क माफ करावे, यासाठी पुणे मनपा स्थायी समिती सदस्य व नगरसेवक हेमंत रासने यांनी यापूर्वी अनेकदा मागणी केली होती.
मंगळवारी झालेल्या बैठकीत हा ठराव दाखल करण्यात आला होता. त्यावर बुधवारी चर्चा करुन ठराव स्थायी समितीत मान्य करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती हेमंत रासने यांनी केली आहे.
हेमंत रासने म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव हा नागरिकांचा उत्सव असून नागरिक स्वयंस्फूर्तीने आणि समर्पित भावनेने हा उत्सव साजरा करतात. यामध्ये कोणाचाही स्वार्थ नसतो. उत्सवात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा फार मोलाचा वाटा असतो. त्यामुळे मंडळांतर्फे उभारण्यात येणा-या कमानी व रनिंग मंडपांकरीता मनपातर्फे आकारण्यात येणारे शुल्क माफ करावे, अशी मागणी मी यापूर्वी केली होती. त्याला यश आले असून स्थायी समितीमध्ये हा ठराव मंजूर झाला असून सर्वसाधारण सभा देखील मान्यता देईल, त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात प्रशासनाने याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती देखील त्यांनी केली.
पुणे पोलिसांच्या निषेधार्थ महापालिकेत अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन ..(व्हिडीओ)
‘त्या’ अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार नाही,खून करणाऱ्यास पकडले -पोलीस
पुणे-पुण्यात काल अडीच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणाने खळबळ उडवून पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीकेचा सूर उमटत असताना आज पोलिसांनी सांगितले कि, त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. या मुलीचा पूर्ववैमन्यस्यातून खून करण्यात आल्याचे बंडगार्डन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांनी सांगितले. आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना बुधवारी पुणे स्टेशनच्या परिसरातील प्रथमेश बाळू गायकवाड या तरुणाकडे आधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील आणि मामासोबत आरोपीच्या झालेल्या वादातून अडीच वर्षांच्या चिमुरडीचा खून करण्यात आल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. याप्रकरणी प्रथमेश बाळू गायकवाड (वय १९) या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने खून केल्याची कबूली दिली आहे. दरम्यान, आज शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकातील फुटपाथवर ही पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ती आईजवळ झोपलेली असताना आरोपी प्रथमेश बाळू गायकवाड याने तिला गुपचूप उचलून नेले. काही अंतरावर असलेल्या रेल्वेच्या बोगीमध्ये गेल्यावर त्याने तिला मारहाण केली आणि तो पसार झाला. त्यानंतर काही तासाने डोक्यावर आणि गालावर जखमा झालेल्या बेशुद्धावस्थेत ती आढळून आली. पोलिसांनी तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मुलीचे आई-वडील तिचा शोध घेत असताना पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले आणि तिची ओळख पटली. मात्र, काही वेळात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला..
विद्यार्थी-प्राध्यापकांनी संशोधक वृत्ती वाढवावी- डॉ. योगेश पाटील
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संदर्भ सूची (Bibilography)’ या विषयावर डॉ. पाटील यांचे व्याख्यान आयोजिले होते. मयूर कॉलनीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात झालेल्या व्याख्यानावेळी प्रा. विनय र. र., राजेंद्र सराफ आदी उपस्थित होते. महाविद्यालय व विद्यापीठात अनेक विषयांवर संशोधन होत असते. अनेक तंत्रज्ञ, अभियंते, शास्त्रज्ञ प्रयोग करून नवीन निर्मिती करतात. त्यांनी केलेल्या संशोधनाच्या सादरीकरणात वेगवेगळ्या संदर्भांची मांडणी कशी करावी, याबद्दल डॉ. पाटील यांनी सांगितले. संशोधने, जर्नल, शोधनिबंध जागतिक पातळीवरील नियतकालिकात प्रसिद्ध करण्याविषयी माहिती दिली.
डॉ. योगेश पाटील म्हणाले, “विविध क्षेत्रातील लहानातील लहान गोष्टींचे संशोधन होणे आवश्यक आहे. संशोधनाची मांडणी करताना संशोधनाचे विश्लेषण, वापरलेल्या संदर्भांची माहिती, त्याचा परीणाम याविषयी लेखन व्हावे लागते. निरनिराळ्या विषयांवर तयार करण्यात येणाऱ्या जर्नलची मांडणी पारदर्शक पद्धतीने व्हावी. जर्नलसची सत्यता सध्याच्या विकसित तंत्रज्ञाच्या माध्यमातून पडताळली जाते. त्यामुळे इंटरनेटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. पैसे देऊन जर्नलचे परीक्षण करणाऱ्या नियतकालिकांमध्ये आपले संशोधन प्रसिद्ध करू नये. त्यामुळे तुमच्या कामाचे योग्य मूल्यमापन होत नाही.”
उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र सराफ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष विनय र र यांनी आभार प्रदर्शन केले.
मानस धामणे, ऋतुजा चाफळकरसह इतर 25 खेळाडूंना पीएमडीटीए वार्षिक पुरस्कार प्रदान
पुणे, 28 ऑगस्ट 2019: पीएमडीटीएच्या वार्षिक दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यांतील उत्कृष्ट टेनिस खेळाडू म्हणून कुमार राष्ट्रीय टेनिसपटू मानस धामणे आणि ऋतुजा चाफळकर यांना पीएमडीटीए-अरुण वाकणकर मेमोरियल पुरस्कार आणि अरुण साने मेमोरियल शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या पुरस्काराचे वितरण पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर करण्यात आले.
यावेळी पुण्यातील माजी आंतरराष्ट्रीय डेव्हिस कप प्रशिक्षक नंदन बाळ, डेव्हिस कूपर गौरव नाटेकर, संदीप किर्तने, नितीन किर्तने, अर्जुन कढे, फेड कप खेळाडू राधिका तुळपुळे-कानिटकर, अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले यांना पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना( पीएमडीटीए)चे सभासदत्व प्रदान करण्यात आले.
पीएमडीटीए-अरुण वाकणकर मेमोरियल वार्षिक पुरस्काराचे वितरण पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे मानद सचिव व पीएमडीटीएचे उपाध्यक्ष सुंदर अय्यर, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, भारताची अव्वल महिला टेनिसपटू अंकिता रैना, एमएसएलटीएचे उपाध्यक्ष प्रशांत सुतार, नंदन बाळ, अपर्णा वाकणकर आणि आशा साने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच, याशिवाय जिल्ह्यांतील 2018च्या यादीत विविध वयोगटात अव्वल क्रमांक पटकावलेल्या नमिश हूड, तेज ओक, प्रिशा शिंदे, पार्थ देवरूखकर, श्रावणी देशमुख, आर्यन कोटस्थाने, अवंती राळे यांना याप्रसंगी अरुण वाकणकर मेमोरियल पदक आणि शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, याप्रसंगी नुकत्याच पार पडलेल्या पीएमडीटीए जुनियर टेनिस लीग स्पर्धेतील विजेत्या विपार स्पिडिंग चिताज संघाला करंडक प्रदान करण्यात आला.
जिल्ह्यांतील २०१८ची खेळाडूंची वार्षिक मानांकन यादी खालीलप्रमाणे:
8 वर्षाखालील मिश्र गट-1. नमिश हुड, 2. रित्सा कोंदकर, 3. आर्यन किर्तने, 4. निरज जोरवेकर, 5. सुजय देशमुख
10 वर्षाखालील मुले- 1. तेज ओक, 2. अमोघ दामले, 3. सुर्या काकडे, राज दर्डा, 5. सक्षम भन्साली
10 वर्षाखालील मुली- 1. प्रिशा शिंदे, 2. मृणाल शेळके, 3. हृितीका कापले, 4. मेहेक कपुर, 5. काव्या देशमुख
12 वर्षाखालील मुले- 1. पार्थ देवरूखकर, 2. अर्जुन किर्तने, 3. श्लोक गांधी, 4. केयुर म्हेत्रे, 5. अर्णव पापरकर
12 वर्षाखालीली मुली- 1. श्रावणी देशमुख, 2. अलिना शेख, 3. सिमरन छेत्री, 4. रितीका मोरे, 5. सानिका लुकतुके
14 वर्षाखालील मुले- 1. आर्यन कोठस्थाने, 2. इशा देगमवार, 3. आर्यन हुड, 4. निशित रहाणे, 5. अनमोल नागपुरे
14 वर्षाखालील मुली- 1.अवंती राळे, 2. श्रावणी देशमुख, 3. कश्यपी महाजन, 4. इशीका राजपुत, 5. याशिका बक्षी
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.28 : शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, की शासनाव्दारे प्रधानमंत्री किसान मानधन योजना व पी. एम.किसान, पूर परिस्थिती मदत वाटप, शासकीय वसूली, 7/12 संगणीकरण व स्कॅनिंग, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदी योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. आतापर्यंत राबविण्यात आलेल्या योजनानिहाय आढावाही या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्रातील 21.7% लोकांना मास्क्ड हायपरटेन्शनचा त्रास, इंडिया हार्ट पाहणीतील निष्कर्ष
अशा व्यक्तींना निदान न होण्याचा धोका असतो, त्यातून अचानक हृदय व किडनीबाबत गुंतागुंत किंवा स्ट्रोक होण्याची भीती
पुणे: इंडिया हार्ट पाहणीतील (आय.एच.एस.) निष्कर्षांनुसार, महाराष्ट्रात (मुंबई वगळता) पाहणीत सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी 19.1% जण व्हाइट-कोट हायपरटेन्सिव्ह होते, तर 21.7% जणांना मास्क्ड हायपरटेन्शन असल्याचे आढळले, यामुळे जवळजवळ 41% लोकांना मिसडायग्नॉसिसचा (व्हाइट-कोट हायपरटेन्शनच्या बाबतीत) आणि ‘मिस्ड’ डायग्नॉसिसचा (मास्क्ड हायपरटेन्शनच्या बाबतीत) धोका असल्याचे दिसून आले आहे. पाहणीमध्ये राज्यातील 2026 जण सहभागी झाले होते. त्यामध्ये 1288 पुरुष व 738 स्त्रिया होत्या.
मास्क्ड हायपरटेन्शन म्हणजे डॉक्टरांकडे तपासल्यावर ब्लड प्रेशर नॉर्मल दिसते, परंतु घरी उच्च असते; व्हाइट-कोट हायपरटेन्शन म्हणजे केवळ क्लिनिकमध्ये गेल्यावर ब्लड प्रेशर वाढल्याचे दिसून येते. व्हाइट-कोट हायपरटेन्सिव्ह हे मिसडायग्नॉस्ड असतात आणि त्यांना अँटि-हायपरटेन्शन औषधे सुरू असतात. त्यांना विनाकारण औषधोपचार घ्यावे लागतात. तर दुसरीकडे, मास्क्ड हायपरटेन्सिव्हचे निदान होत नाही आणि त्यामुळे त्यांना हृदय, किडनी, मेंदू यामध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते व त्यामुळे अकाली मृत्यू होऊ शकतो.
भारतीयांमध्ये पहिल्या ऑफिस व्हिजिटमध्ये (डॉक्टरचे क्लिनिक) 42% इतक्या मोठ्या प्रमाणात मास्क्ड हायपरटेन्शन व व्हाइट-कोट हायपरटेन्शन असल्याचे इंडिया हार्ट पाहणीमध्ये आढळले आहे. भारतीयाचा सरासरी रेस्टिंग हार्ट रेट प्रति मिनिट 80 ठोके असल्याचेही पाहणीत दिसून आहे. हे ठोके प्रति मिनिट 72 असणे अपेक्षित आहेत. पाहणीतील आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, भारतीयांना सकाळच्या तुलनेत संध्याकाळी हाय ब्लड प्रेशर असते. अन्य देशांमध्ये असे दिसून येत नाही. यामुळे डॉक्टरांनी अँटि-हायपरटेन्शनच्या औषधांची मात्रा सुचवताना पुनर्विचार करणे अपेक्षित असल्याचे अधोरेखित होते.
आय.एच.एस.मध्ये प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर राहिलेले, बात्रा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या अकॅडेमिक्स व रिसर्चचे डीन व अध्यक्ष, कार्डिऑलॉजिस्ट डॉ. उपेंद्र कौल यांनी सांगितले, “भारतात हायपरटेन्शनचे अधिक चांगल्या पद्धतीने क्लिनिकल व्यवस्थापन गरजेचे असल्याकडे इंडिया हार्ट पाहणी निर्देश करते. ही सर्व आकडेवारी भारताबद्दलची आहे आणि तिचा उपयोग भारतीयांमधील हाय ब्लड प्रेशरचे निदान करण्यासाठी योग्य पद्धती अवलंबण्यासाठी व्हायला हवा. पाहणीमध्ये हायपरटेन्शनच्या विविध पैलूंबाबत सविस्तर माहिती दिली आहे.”
| एरिस लाइफसायन्सेसने इंडिया हार्ट पाहणी केली व ही पाहणी बात्रा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर याअंतर्गत करण्यात आली. |
एरिस लाइफसायन्सेसचे मेडिकलचे अध्यक्ष डॉ. विराज सुवर्णा म्हणाले, “मास्क्ड हायपरटेन्शनचे निदान झाले नाही तर घातक ठररते. यासंदर्भात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, क्लिनिकव्यतिरिक्त घरी असतानाही ब्लड प्रेशरची पाहणी करणे महत्त्वाचे ठरते. या आजाराशी सामना करत असताना व आरोग्याची काळजी घेत असताना, हायपरटेन्शनचे अचूक निदान होणे गरजेचे असते.”
आय.एच.एस.चे समन्वयक आणि आरोग्य क्लिनिक व रुबी हॉल क्लिनिक येथील कार्डिऑलॉजिस्ट डॉ. जे. एस. हिरेमठ म्हणाले, “हाय रेस्टिंग हार्ट रेट आणि अनियंत्रित ब्लड प्रेशर यामुळे हृदय व किडनी अशा अवयवांना इजा पोहोचते. दीर्घकाळामध्ये याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सावधगिरी म्हणून, लोकांनी घरच्या घरी ब्लड प्रेशरची नियमित तपासणी करावी आणि ब्लड प्रेशर कसे नियंत्रित करावे हे डॉक्टरांना विचारावे.”
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. तुषार दिघे यांच्या मते, “कार्डिओ-व्हस्क्युलर गुंतागुंतीव्यतिरिक्त, हाय ब्लड प्रेशरमुळे किडनीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. शरीराचे कार्य सुरळित होण्यासाठी किडनी निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने, लोकांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा आणि कोणतीही मोठी गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून ब्लड प्रेशर नियमितपणे तपासावे. इंडिया हार्ट पाहणीने महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या हायपरटेन्शनबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. ही माहिती भविष्यात अनेक प्रकारे उपयुक्त ठरणार आहे.”
या पाहणीचे वेगळेपण म्हणजे, ही पाहणी ‘ड्रग-नेव्ही’ (कोणतेही अँटि-हायपरटेन्शन औषध सुरू नसलेल्या व्यक्ती) सहभागींवर करण्यात आ. यासाठी ब्लड प्रेशरची आकडेवारी घेण्याची सर्वंकष प्रक्रिया वापरण्यात आली. पाहणी करणाऱ्यांनी 15 जिल्ह्यांतील 1233 डॉक्टरांच्या मदतीने नऊ महिने कालावधीमध्ये 18,918 सहभागींचे (पुरुष व स्त्रिया) ब्ड प्रेशर तपासले. सलग 7 दिवस दिवसातून चार वेळा सहभागींचे ब्लड प्रेशर घरच्या घरी तपासण्यात आले.
एरिस लाइफसायन्सेसविषयी
एरिस लाइफसायन्सेस ही आघाडीच्या इंडियन फार्मास्युटिकल मार्केटमधील (आयपीएम) आघाडीच्या 25 कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी अनुपालन, थेरॉपेटिक, डायग्नॉस्टिक्स या बाबतीत भारतातील कमतरता भरून काढण्यासाठी कार्यरत आहे. रुग्णसेवेला प्राधान्य देण्याच्या कंपनीच्या तत्त्वाला अनुसरून, रुग्णांना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी कंपनी एबीपीएम ऑन कॉल (24 तास बीपी तपासणे), होल्टर ऑन कॉल अशा पेशंट केअर उपक्रमांना पाठिंबा देते.
क्रांती रेडकरने लाँच केला तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ’
अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदा-या उत्तमरित्या साकारणारी अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडेमधील आणखी एक टॅलेंट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. आणि ते नेमके टॅलेंट कोणते याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही.
उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन करुन प्रेक्षकांचे लक्ष पडद्यावर खिळवून ठेवणा-या क्रांतीने तिचा स्वत:चा क्लोथिंग ब्रँड लाँच करुन तिची आणखी एक नवी बाजू सर्वांना दाखवून दिली. नुकतेच, मुंबईमध्ये क्रांती रेडकरचा क्लोथिंग ब्रँड ‘ZZ ZIYA ZYDA’ लाँच करण्यात आला. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट करतो तेव्हा आपल्याला चिअर अप करण्यासाठी आपल्या खास मित्र-मैत्रिणींच्या शुभेच्छा आपल्यासोबत असतातच आणि त्याचप्रमाणे क्रांतीच्या खास जवळ असणा-या व्यक्ती आणि आपल्या सिनेसृष्टीतील कलाकारांच्या विशेष उपस्थितीत क्रांतीचा क्लोथिंग ब्रँड लाँच करण्यात आला आणि त्यांनी क्रांतीला शुभेच्छा देऊन तिच्या नवीन उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झालेली क्रांती अशा एका प्लॅटफॉर्मच्या शोधात होती जिथे तिच्या नवीन कल्पना, योजना समजून घेतल्या जातील आणि त्याच दरम्यान तिची भेट अक्षय बर्दापूरकर आणि ‘प्लॅनेट टॅलेंट’शी झाली. आणि जसा प्लॅटफॉर्म हवा होता तसाच प्लॅटफॉर्म क्रांतीला ‘प्लॅनेट टी’च्या माध्यमातून मिळाला आणि या माध्यमाच्या मदतीने तिने तिच्यातील टॅलेंट म्हणजेच ‘ZZ ZIYA ZYDA’ प्रेक्षकांसमोर आणले.
‘ZZ झिया झायदा’ या नवीन क्लोथिंग ब्रँडच्या नावातच आकर्षण तर आहेच आणि या माध्यमातून क्रांतीची फॅशन स्टाईल आणि युनिक कलेक्शन पाहायला मिळणार याची उत्सुकता देखील आहे.
शिवानी सुर्वे झळकणार ‘ट्रिपल सीट’ मध्ये
अभिनेता अंकुश चौधरीच्या आगामी ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये अंकुश बरोबर दिसणाऱ्या दोन अभिनेत्री नेमक्या कोण आहेत? याबद्दल अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. त्यातील एका नावाचा सस्पेन्स अखेर आज संपला, ती अभिनेत्री म्हणजे सध्या गाजत असलेल्या ‘बिग बॉस’ या शो मधील फायनलिस्ट आणि विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली शिवानी सुर्वे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या वाढदिवशी ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाचे खास पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट्स, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’च्या या नव्या पोस्टरमध्ये कॅज्युअल लुकमध्ये शिवानी सुर्वे एका खुर्चीवर बसून तर अंकुश चौधरी त्याच खुर्चीला टेकून कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसतात. मात्र, इथे थोडा ट्वीस्ट आहे, शिवानीच्या कानाला एक मोबाईल आहे, तर अंकुश मात्र दोन्ही कानांना मोबाईल लाऊन बोलताना दिसतो. यामुळे तो एका व्यक्तीशी बोलतोय की दोन व्यक्तींशी असा प्रश्न आपल्याला पडतो. शिवाय, तो बसलेला आहे त्या ठिकाणी आणखी काही मोबाईल दिसत आहेत. तसेच या पोस्टरवर विविध भावना व्यक्त करणाऱ्या इमोजी देखील आहेत. यामुळे ‘वायरलेस प्रेमाची गोष्ट’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात नक्की काय आहे? याची उत्कंठा वाढली आहे.
संकेत प्रकाश पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांनी असून सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. अंकुश आणि शिवानी पहिल्यांदाच एकत्र झळकत असलेला ‘ट्रिपल सीट’ मध्ये ती दुसरी अभिनेत्री कोण? तसेच यात आणखी कोणते कलाकार दिसणार याची उत्सुकता आता वाढली आहे. ह्या दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांकडून आफ्रिकन देशाला सॅनिटरी पॅड्स रवाना
पुणे :
आर्थिक मागास असलेल्या आफ्रिकेतील मालवी देशातील विद्यार्थिनींसाठी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांकडून आफ्रिकन देशाला सॅनिटरी पॅड्स रवाना करण्यात आली . सॅनिटरी पॅड्स अभावी मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण या देशात कमी आहे .
आझम कॅम्पस येथे झालेल्या कार्यक्रमात ‘ग्लोबल फ्युचर्स नेटवर्क ‘ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेकडे हे पॅड्स सुपूर्द करण्यात आले . यूनायटेड नेशन्स चे प्रतिनिधी डॉ . निहाल मयूर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .इशरत शेख,डॉ ज्योती सोनटक्के,सतीश खाडे यांनी मार्गदर्शन केले .
प्राचार्य डॉ शैला बूटवाला,मनसुरा मुलाणी ,शबाना शेख ,डॉ . राहुल मोरे ,उझ्मा सरखोत ,प्रा रईसा शेख ,तस्नीम सय्यद,तसेच दरनान शेख ,अदनान परसा हे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते .हा कार्यक्रम गुरुवारी झाला .
आदिवासी , ग्रामीण कलाकार निर्मित गणेश प्रतिमा ,कलावस्तू चे प्रदर्शन
भारतातील विविध भागांतील गणपती प्रतिमा आणि त्याच्याशी निगडित कलाकुसरीच्या वस्तू, भेट वस्तू , सजावटीसाठीच्या वस्तू हे सर्व एका ठिकाणी पाहता येणार आहेत . राजस्थानातील टेराकोटा च्या गणेशमूर्ती ,ओडिशातील आदिवासींनी तयार केलेली पाम वृक्षापासून केलेले गणेश प्रतिमा रंगविलेले बुक मार्क ,राजस्थानातील आदिवासींनी केलेले धातूंच्या सफेत गणेशमूर्ती ,पट्ट चित्र प्रकारातील गणेश प्रतिमांचे पेंटिंग ,पश्चिम बंगाल च्या कलाकारांनी कागद आणि ज्यूट(ताग ) पासून केलेल्या गणेश प्रतिमांच्या कलावस्तू हे या प्रदर्शनाचे आकर्षण आहे .
नगरसेविकेच्या आक्रमकतेनंतर उघड झाला -अडीच वर्षाच्या मुलीवरील अत्याचार ..
पुणे -स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईसोबत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला मंगळवारी पहाटे उचलून नेत तिच्यावर रेल्वेच्या बोगीत नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या या चिमुकलीला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. भाजपच्या नगरसेविका राजश्री काळे यांनी लक्ष घालून पाठपुरावा केल्याने या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होवून पुढील कारवाई सुरु झाली अन्यथा एका गरीब मुलीवरील अत्याचार दडपून जाईल आणि अकस्मात मयत नोंदवून बेवारस म्हणून प्रकरण रफादफा होईल अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते
पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकाजवळील रस्त्यावर पीडीत मुलीचे आई-वडील फुटपाथवर राहतात. ते लिंबू, मिरची, खेळणी विकून उदरनिर्वाह करतात. ते बारामतीमधून उदरनिर्वाहासाठी पुणे स्टेशन परिसरात आले होते. पीडीत मुलीची आई मुकबधिर आहे. तिचे दोन विवाह झालेले आहेत. ही मुलगी पहिल्या पतीपासून झालेली आहे. सोमवारी रात्री ती मालधक्का चौकातील फुटपाथवर मुलीसह झोपली होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने मुलीला उचलून नेले. मुलीच्या आईला जाग आल्यानंतर त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. पण, मुलगी सापडली नाही.
लोहमार्ग पोलिसांना पुणे रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना रेल्वेच्या डब्यामध्ये मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. लोहमार्ग पोलिसांनी तिला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करून तिच्या पालकांचा शोध घेतला. मालधक्का चौकात पोलिसांकडून चौकशी करताना मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे छायाचित्र ओळखले. पोलिसांनी त्यांना मुलीवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून हे प्रकरण बंडगार्डन पोलिसांकडे वर्ग केलं आहे. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे तपास सुरू आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी दिली.नेमके याप्रकरणी नगरसेविका राजश्री काळे यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच श्बदात ऐका ….




