Home Blog Page 2851

पी ए इनामदार यांना मुस्लिम बँक अध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्याच्या सहकार मंत्र्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती

0
पुणे :
डॉ पी  ए इनामदार यांना मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँक अध्यक्ष पदावरून अपात्र ठरविण्याच्या

सहकार मंत्र्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने आज ५ सप्टेंबर रोजी स्थगिती दिली आहे . २८ ऑगस्ट २०१९  रोजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सहकार आयुक्तांचा निर्णय कायम करीत डॉ पी ए इनामदार यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय त्यांच्याच  अपिलावर दिला होता . सहकार मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात इनामदार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते . त्यावर उच्च न्यायालयात न्या.एम एस   कर्णिक यांनी आज ५ सप्टेंबर २०१९ रोजी स्थगितीचा निर्णय दिला.
 डॉ पी ए  इनामदार यांच्या वतीने उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील एड .व्यंकटेश   दौंड ,एड . प्रशांत नाईक ,एड . पाटील यांनी काम पाहिले .
एस एम इकबाल ,असिफ खान ,इम्तियाझ शिकीलकर यांनी केलेल्या तक्रारींवर सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी १८ एप्रिल २०१९  रोजी इनामदार यांच्या अपात्रतेचा आदेश काढला होता .या आदेशाला सहकार मंत्री यांच्याकडे  तसेच उच्च न्यायालयात डॉ पी ए इनामदार यांनी आव्हान दिले होते . त्यावेळेस उच्च न्यायालयाने दिलेल्या  स्थगितीवर आज ५ सप्टेंबर रोजीही  पुन्हा शिक्कामोर्तब केले .

वीज कर्मचाऱ्यांना पगारात 32.50 टक्क्यांची वाढ

0

मुंबई- राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयामुळे राज्यातील वीज

कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या 32.50 टक्के वेतनवाढ दिली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आणली आहे. राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरगोस वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कंपन्यांच्या कर्मचारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत करत ऊर्जामंत्र्यांचे आभार मानले आहेत.
राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना
पूर्वीच्या मूळ वेतनाच्या 32.50 टक्के तर विविध भत्त्यांमध्ये 100 टक्के
वाढ करण्यात येणार आहे .

चित्रा वाघ ,धनंजय महाडिक भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी :गोगावले भिमालेंची नियुक्ती

0

मुंबई-

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी धनंजय महाडिक, शेखर इनामदार आणि चित्रा वाघ
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी खालील संघटनात्मक नियुक्त्या केल्या –
प्रदेश उपाध्यक्ष – धनंजय महाडिक (कोल्हापूर)
प्रदेश उपाध्यक्ष – शेखर इनामदार (सांगली)
प्रदेश उपाध्यक्ष – चित्रा वाघ (मुंबई)
मा. प्रदेशाध्यक्षांनी नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याबद्दल संपर्क अभियान व जनजागरण अभियानासाठी समिती –

संपर्क अभियान जनजागरण अभियान
संयोजक राजेश पांडे
मुंबई -राजीव पांडे ,सुनील राणे
कोकण -सुभाष काळे ,दीपक जाधव
पश्चिम महाराष्ट्र -भरत पाटील,नामदेव ताकवणे
उत्तर महाराष्ट्र -अरविंद जाधव ,सुनील बच्छाव
मराठवाडा – बसवराज मंगरुळे,राम कुलकर्णी
विदर्भ मा-देवेंद्र दस्तुरे , शिवराय कुलकर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्याविषयी समिती –
   प्रदेश संयोजक – योगेश गोगावले
मुंबई –  विनोद तावडे, आशिष शेलार,  योगेश सागर
कोकण – . संजय वाघुले, ॲड. हर्षद पाटील
विदर्भ – राजेंद्र डांगे,. मिलिंद भेंडे
मराठवाडा – संजय केणेकर, सुरेंद्र कुलकर्णी,  शैलेष गोजमगुंडे
उत्तर महाराष्ट्र – . उन्मेष पाटील, . प्रशांत पाटील
पश्चिम महाराष्ट्र – . शेखर इनामदार, . श्रीनाथ भिमाले

700 रुपयांत इंटरनेट, मोफत कॉलिंग, एचडी टीव्हीसह डिश… रिलायन्स ‘जियो गीगा फायबर’ सेवा सुरू

0

मुंबई- रिलायन्स जिओची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा ‘जिओ गीगा फायबर’ गुरुवारपासून सुरू करण्यात येत आहे. यामध्ये ग्राहकांना किमान 100Mbps इंटरनेट स्पीड मिळेल. सोबतच, आयुष्यभर मोफत कॉलिंग, मोफत एचडी टीव्ही आणि डिश दिला जात आहे. या सर्व सेवा मिळवण्यासाठी आपल्याला फक्त 700 रुपये प्रतिमहा द्यावा लागणार आहे. जिओ लँडलाइनवरून 500 रुपये महिना देऊन अमेरिका आणि कॅनडामध्ये अनलिमिटेड आंतरराष्ट्रीय फोन कॉल सुद्धा केले जाऊ शकतील.रिलीजिंगच्या दिवशी घरच्या टीव्हीवर पाहा नवीन चित्रपट
जिओ गीगा फायबरचे प्लॅन 700 रुपयांपासून 10,000 रुपये प्रति महा असतील. 2020 मध्ये तर रिलायन्स अशी सेवा घेऊन येत आहे, ज्यात प्रीमियम ग्राहकांना घरबसल्या रिलीजच्या दिवशीच नवीन चित्रपट घरातील टीव्हीवर पाहता येईल. फर्स्ट डे फर्स्ट शो असे या सेवेचे नाव असून ती प्रीमियम ग्राहकांसाठी राहील. यासाठी किती फी आकारली जाईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. जे ग्राहक वार्षिक प्लॅन घेतील त्यांना एलईडी टीव्ही आणि सेट-अप बॉक्स देण्याचा देखील विचार केला जात आहे.लॅनच्या माध्यमातून डीटीएच सेवा देखील देणाऱ्या जिओच्या नवीन प्लॅनचा इतर कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो. सध्या भारतातील अनेक डीटीएच कंपन्यांचा केवळ एचडी टीव्ही चॅनल्सचा प्लॅन जवळपास 500 रुपयांच्या घरात जातो. जिओ टीव्ही या एचडी चॅनल्ससह चक्क हायस्पीड इंटरनेट आणि कॉलिंगसुद्धा मोजक्या किमतीत उपलब्ध करून देत आहे. जिओ गीगा फायबरमुळे काहींना तत्काळ आपल्या किमती कमी कराव्या लागतील. तर काहींना हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागेल. त्यातही दर्जा कायम ठेवणे हे सर्वांसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे.

युतीच्या जागावाटपाची पहिली बैठक पूर्ण; भाजप 160 तर शिवसेना 110 जागांवर लढण्याची शक्यता

0

मुंबई – विधानसभा निवडणुका थोड्याच दिवसांवर आल्या आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यातील निवडणुकीतील जागावाटपाबाबतची पहिली नुकतीच पार पडली. यात भाजप 160 तर शिवसेनेने 110 जागा लढावाव्यात असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात बुधवारी जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाबाबतचा ठरल्याची माहिती आहे. आज यासंदर्भात दुसरी बैठक होणार असल्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप-शिवसेना 270 जागांवर लढणार आहेत. तर उर्वरित 18 जागा मित्र पक्ष लढणार असल्याची शक्यता आहे. या फॉर्म्युलात भाजप 160, शिवसेना 110 आणि मित्र पक्ष 18 लढतील असा फॉर्म्युला पहिल्या बैठकीत ठरवण्यात आला आहे. ठरलेला हा फॉर्म्युला भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांना मंजुर असल्याचे समजते. तसेच 270 जागांपैकी किती जागा वाटून घ्यायच्या याबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे.

पेट्रोल-डीझेल गाड्यांवर बंदी घालण्याचा आमचा विचार नाही’- नितीन गडकरी

0

नवी दिल्ली- बड्या कंपन्यांनी निर्माण केलेल्या सार्वजनिक वाहतूक सेवेकडे लोक वळावेत म्हणून विविध मार्गे देशभर सुरु  खाजगी वाहन चालक मालकांचा छळपोलीस यंत्रणेद्वारे होत असताना आणि याच माध्यमातून पोलिसातील भ्रष्टाचाराने  प्रचंड उसळी घेतली असताना अशा कारणांनी  खाजगी वाहन उद्योगांवर संक्रांत आल्यावर ; रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरींनी आज(गुरुवार) सांगितले की, सरकारचा पेट्रोल आणि डीझेल वाहनांवर प्रतिबंध लावण्याचा कोणताच विचार नाहीय.

ते सोसायइटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफैक्चरर्स (सियाम) च्या वार्षिक कन्वेंशनमध्ये बोलत होते. सध्याची आकडेवारी पाहता ऑटो सेक्टर सध्या अडचणींचा सामना करत असल्याचेही त्यांनी मान्य केले.या महिन्यांपासून लागू झालेल्या वाहन नियमांचा बचाव करत गडकरी म्हणाले की, नागरिकांवर फक्त जास्त दंड लावणे, हा सरकराचा उद्देश नाहीये. अपघात कमी व्हावेत, हा आमचा उद्देश आहे. देशात दरवर्षी 5 लाख अपघात होतात, ज्यात दिड लाखांपेक्षा अधिल लोकांचा मृत्यू होतो.

प्रदुषण ही देशासमोरील एक गंभीर समस्या
गडकरी पुढे म्हणाले की, सरकार विज आणि पेट्रोल डिझेल व्यतिरिक्त इतर इंधनांवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्यासाठी चालना देत आहे. याचे कारण म्हणजे पेट्रोलियम आयातीचा 7 लाख कोटी रुपयांचा वार्षिक भार सरकारवर पडत आहे. त्याशिवाय देशाला प्रदूषणासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
मंदीतून बाहेर येण्यासाठी सरकार पूर्ण मदत करेल
देशातील उद्योगांना सरकारकडून लागेल ती मदतीचे आश्वासन गडकरींनी यावेळी दिले. वाहनांसाठी कर्ज न मिळाल्यास कंपन्या स्वतः आपला एनबीएफसी करुन कर्ज देऊ शकते. यात त्यांच्या वाहन विक्रीला मदत मिळेल. सरकार आपल्या परीने पूर्ण मदत करत आहे.

बंधुत्वाच्या तत्वानेच मानवतेचे महत्व जपता येते- डॉ. रामचंद्र देखणे

0
पुणे : “आजचे शिक्षण ज्ञानाची तृष्णा भागवण्यापेक्षा पदवी मिळविण्यापुरते झालेले आहे. अंधाराला कोंडून विद्यार्थ्यांच्या मनात उजेड निर्माण करण्याचे व उत्कृष्ट अभिव्यक्तीचे बळ देण्याचे काम शिक्षकांचे आहे. जातीविरहित समाज निर्मितीचे काम या संमेलनातून करायचे आहे. जे कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेने यापूर्वीच सुरू केले आहे. सर्वांनीच चांगल्या लेखकांची पुस्तके वाचावीत व त्यांना ऐकावे म्हणजे उत्कृष्ट लेखन करता येईल,” असे मत जेष्ठ विचारवंत डॉ. रामचंद्र देखणेयांनी व्यक्त केले. मानवतेचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला बंधुत्वाचे तत्व अंगिकारले पाहिजे, असेही डॉ. देखणे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच सहाव्या विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते झाले. यावेळी  पार पडले. या संमेलनाचे उद्धाटन देखणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकड़े, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, संमेलनाध्यक्ष प्राचार्य अरुण आंधळे, समन्वयक डॉ. रवींद्र पाटील, संयोजक महेंद्र भारती आदी उपस्थित होते.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, ”शिक्षक-विद्यार्थी व साहित्यिक यांच्या त्रिवेणी संगमावर हे साहित्य संमेलन होत आहे. रयत शिक्षण संस्था हे एक जिवंत तीर्थ आहे. बंधुत्वाच्या तत्वानेच मानवतेचे महत्व जपता येते. स्वतः कार्य करत करत दुसऱ्यांनाही कार्य करण्याची प्रेरणा देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र कर्मभूमीत हे संमेलन होत आहे, याचा आनंद आहे.” रयत शिक्षण संस्था व संत परंपरा माणसातील माणूसपण जिवंत ठेवण्याचे काम करत असल्याचे प्राचार्य अरुण आंधळे यांनी सांगितले.
प्रबोधनयात्री संमेलनात विलास चव्हाण, भक्ती पानसरे, प्रगती जाधव, ऋषिकेश पवार, क्षितीज देशमुख, माधुरी धायगुडे, संकेत जाधव, शैलेश जंगम, शिवाजीराव शिर्के, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, निलेश जाधव, संतोष मोहोळकर, मधुश्री ओहाळ व शंकर आथरे यांनी आपल्या कविता सादर केल्या. दादासाहेब खांदवे, माधव गव्हाणे, प्रा. धर्मवीर पाटील यांना प्रबोधनयात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समारोपावेळी ज्येष्ठ साहित्यिक ऍड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतीदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श रयत सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

वर्ल्डस्किल्स’मध्ये श्वेता रतनपुराची कांस्य पदकाची कमाई

0

रशियातील कझानमध्ये झालेल्या इंटरनॅशनल स्किल ऑलिम्पिक्समध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला
जगभरातील ६३ देशातील १३५४ स्पर्धकांचा सहभाग; भारतासाठी पदक जिंकल्याचा मनस्वी आनंद : श्वेता

पुणे : रशियाच्या काझानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य ऑलिम्पिक अर्थात इंटरनॅशनल स्किल ऑलिम्पिक्स ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेत ग्राफिक डिझाईन टेक्नॉलॉजी प्रकारात डिझाईन मीडिया अँड एंटरटेनमेंट स्कुलची विद्यार्थिनी श्वेता रतनपुरा हिने कांस्यपदक पटकावले आहे. देशासाठी ग्राफिक डिझाईन टेक्नॉलॉजीच्या प्रकारात कांस्यपदक पटकावणारी श्वेता पहिली भारतीय महिला ठरली आहे. अंतिम ३५ स्पर्धांमधून उल्लेखनीय कामगिरी करीत श्वेताने कांस्यपदकाची कमाई केली. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन’अंतर्गत श्वेताने भारताकडून प्रतिनिधित्व केले.

तिच्या या कामगिरीबद्दल पुण्यातील डिझाईन मीडिया आणि एंटरटेनमेंट स्कूलच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. रास्ता पेठेतील शांताई हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला उद्योजक जयप्रकाश श्रॉफ, डिझाईन मीडियाचे संचालक आणि श्वेताचे मार्गदर्शक सतीश नारायणन, श्रीदेवी सतीश, श्वेताचे वडील विनीतकुमार, आई अमिता यांच्यासह मीडिया डिझाईन अँड एंटरटेनमेंट स्कुलचे मॅनेजर विप्लव पाटीदार आदी उपस्थित होते. यावेळी कझानमध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा रशियाच्या कझानमध्ये ही स्पर्धा झाली. जगभरातील ६३ देशांमधील १३५४ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ४४ विविध प्रकारच्या कौशल्यांसह ४८ जणांचा भारतीय संघ या स्पर्धेत उताराला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाने इतिहास रचत एक सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य आणि १५ जणांनी यशस्वी कामगिरीसाठी ‘मेडल ऑफ एक्सलन्स’ मिळवले आहे.

श्वेता रतनपुरा म्हणाली, “जगभरातील ३५ स्पर्धकांशी माझा सामना होता. ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेसाठी इंडिया स्किल्सच्या प्रादेशिक स्पर्धेत भाग घेतला, तेव्हापासूनच गेल्या वर्षभरापासूनसराव सुरु होता. स्टेजवरचा प्रवास सोपा नव्हता. बऱ्याचदा नैराश्य, तणाव यायचा. त्यासाठी सतीश नारायणन यांचे मार्गदर्शन, आईवडिलांचा पाठींबा आणि नियमित व्यायाम, योगा, ध्यान उपयुक्त ठरले. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवतानाच माझ्यातील नकारात्मक गोष्टी शोधून काढल्या आणि त्यावर काम केले. चार दिवसांच्या या स्पर्धेत विविध गोष्टी सहा तासांमध्ये करायच्या होत्या.

“इंडिया स्किल्स प्रादेशिक स्पर्धेनंतर ग्राफिक डिझाईन टेक्नॉलॉजीच्या ‘वर्ल्ड स्किल्स कझान २०१९’ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अनेक फेऱ्यातून श्वेताची निवड करण्यात आली. तिने पुण्यातील डिझाईन मीडिया अँड एंटरटेनमेंट स्कूलमध्ये त्यासाठी प्रशिक्षण घेतले. सतीश नारायणन यांचे मार्गदर्शन व श्वेताची मेहनत यामुळे भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी तिने केली आहे,” अशा शब्दात जयप्रकाश श्रॉफ यांनी तिच्या सत्कारावेळी सांगितले.

सतीश नारायणन म्हणाले, “२०१३ मध्ये ‘वर्ल्डस्किल्स’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पहिल्यांदाच भारताकडून सहभागी झाल्याचा आनंद होता. मात्र, पदक जिंकण्यात मला यश आले नव्हते. पण आज माझ्या मार्गदर्शनाखाली श्वेताने कांस्यपदक जिंकत माझ्यासह भारतीयांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली आहे.”

निहारिका दुबे ठरली यंदाची मिस पुणे फेस्टिव्हल

0

पुणे – व्यक्तीमत्व, बुद्धीमत्ता, सौंदर्य, सर्वसाधारण ज्ञान आणि जीवनाबद्दलचा दृष्टीकोन अशा सर्वंच बाबींमध्ये आघाडी घेत निहारिका दुबे हिने यंदाचा मिस पुणे फेस्टिव्हलचा बहुमान मिळवला. श्रावणी पोमण हिने दुसरा क्रमांक पटकावतानच ती फेव्हरिटही ठरली, तर याज्ञी नवाथे हिने तिसरा क्रमांक मिळवला. मिस पुणे फेस्टिव्हल ठरलेल्या निहारिका दुबे हिला अभिनेता आणि मॉडेल अभ्यंग कुवळेकर आणि फॅशन तज्ञ कमरताज पठाण मुकुट यांनी प्रदान केला. मिस पुणे फेस्टिव्हल निहारिका आणि साक्षी गोडसे यांना मिस कूबा इंटरनॅशनल स्पर्धेत वाइल्ड कार्डने प्रवेश मिळणार आहे. मिस पुणे फेस्टीव्हल सौंदर्य स्पर्धेचे संयोजन सुप्रिया ताम्हणे यांनी केले होते. या सर्व स्पर्धकांसाठी ग्रुमिंग मेंटर व फॅशन कोरियोग्राफर म्हणून जुई सुहास यांनी काम पाहिले.

मिस पुणे फेस्टीव्हल  स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाशिवाय युवा कांक्रीया हिचे हास्य सर्वाधिक मोहक ठरले. साक्षी गोडसे हिला बेस्ट हेअर, वैष्णवी हेमाडे बेस्ट टॅलेंट, स्टेफी शाजी मिस फोटोजनिक आणि श्रावणी पोमण फेव्हरीट ठरली. यंदाच्या ३१ व्या पुणे फेस्टिव्हलमधील मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेची अंतिम फेरी आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाली. यावेळी पुणे फेस्टीव्हलच्या संयोजनक समितीचे डॉ. सतीश देसाई, अभय छाजेड, काका धर्मावत, रवींद्र दुर्वे, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे, दिपाली पांढरे, संयोगीता कुदळे आणि संतोष कांबळे आदी उपस्थित होते. अंतिम फेरीसाठी दहा जणींची निवड करण्यात आली. सन 2018 ची पुणे फेस्टीव्हल फर्स्ट रनरअप काव्या जोशी हिने श्रावणीला तर 2018 ची दुसरी रनर अप ठरलेल्या सिमरन नायक हिने मुकुट याज्ञी नवाथे हिला प्रदान केला. अंतिम फेरीत निवड झालेल्या 10 जणींना पुण्यातील तरूणींच्या खासियत बद्दल समायिक प्रश्न विचारण्यात आला होता.

या सौंदर्य स्पर्धेत .आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्वाचे पैलू व हजरजबाबीपणा, सर्वसामान्य ज्ञान व सामाजिक दायित्व या पैलूंवर भर देण्यात आला होता. रॅमवर चालणे, हसणे यांना विशिष्ट्य गुण देण्यात आले. स्पर्धेचे फोटोग्राफर अश्विन कोडगुले तर ड्रेस डिझायनर अनुपम जोशी होते. परिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीच्या तज्ञ गीता कॅस्टिलिनो, अभिनेता मॉडेल अभ्यंग कुवळेकर, फॅशन तज्ञ कमरताज पठाण, प्रसिद्ध ग्रुमिंग तज्ञ लवेल प्रभू आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर श्रुती मंगेश यांनी काम पाहिले. या जजेससाठी डिजिटल पार्टनर सी वर्ल्ड यांनी खास अ‍ॅप बनवले होते.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पाकिझा संकल्पनेवर आधारित वेषभूषा धागा बुटीकचे अनुपम जोशी यांनी खास ड्रेस तयार केले होते. दहा अंतिम स्पर्धकांसाठी बॉलरूम गाऊन्स आकार बाय कांचन यांनी दिले होते. ग्लॅम क्यू सलोन अ‍ॅन्ड स्पा, करण डी हायड्रेटेड फ्रुटस् डिवाईन लव्ह, डेंटल वर्ल्ड यांनी पारितोषिके दिली होती. मिस पुणे फेस्टिव्हलच्या अंतिम फेरीची आयएसएएस यांचे मेक उप व हेअर स्टाईल तर डेंटल वर्ल्ड दिवाईन लव, ग्लॅम क्यू पार्लर,एथनिक अशा नामवंत ब्रॅण्डसच्या सहयोगाने स्पर्धेची रंगत आणि चुरस वाढवली.

स्पर्धेचे यंदाचे 7 वे वर्ष असून यापूर्वीच्या या स्पर्धेतील विजेत्या राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. या युवतींना ८  दिवस रॅम्प वॉकचे प्रशिक्षण दिले गेले. याबरोबरच सर्व स्पर्धकांचे डेंटल वर्ल्ड तर्फे दन्त चिकित्सा केली गेली. मॉडेलिंग मधील करीयर या विषयावर आंतरराष्ट्रीय किर्तीच्या तज्ञ गीता कॅस्टिलिनो यांनी व्याख्यान दिल. या युवतींचे फोटोशूट क्रिएटि सिटी मॉल मध्ये युवतींचे फोटोशूट झाले.  योग्य आहाराबाबत आहार तज्ञ डॉ. अवंती दामले यांनी मार्गदर्शन केले.

यावर्षी 150 युवती सहभागी झाल्या होत्या.  त्यातून २० युवतींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे त्यातून अंतिम ३ विजेत्या निवडण्यात करण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन अगरवाल यांनी केले. वर्ज्य डान्स ग्रुपच्या नृत्यांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली. अंतिम फेरीसाठी तरूणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत टाळ्या कडकडाटात ते प्रत्येकीला प्रोत्साहनही देत होते.

 

आशा काळे यांच्या उपस्थित पुणे फेस्टिव्हलमध्ये पाककला स्पर्धा संपन्न

0

पुणे-सिनेतारका आशा काळे आणि ज्योती बोरा यांनी स्वतः सादर केलेली उकडीच्या मोदकांची प्रात्यक्षिके, आशा काळे यांनी  फुगड्यांमध्ये घेतलेला सहभाग. सुमारे ३०० हून अधिक महिलांनी केलेले तिखट व गोड महाराष्ट्रीयन पदार्थ, शेफ सर्वेश जाधव यांची रुचकर खाद्य पदार्थांची प्रात्यक्षिके व त्यानंतर सादर झालेले मंगळागौरीचे खेळ अशा वातावरणात पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित महिला महोत्सवातील पाककला स्पर्धा आज नवी पेठेतील संकल्प हॉल येथे पार पडली. चित्रपट निर्माते व ‘सार्वजनिक काका’ सन्मानाने विभूषित कै. चारूकाका सरपोतदार यांचा स्मृतीप्रित्यर्थ याचे  आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत विस्मृतीत गेलेले  खास महाराष्ट्रीयन तिखट पदार्थ महिला स्पर्धकांनी घरून करून आणायचे होते तर गोड पदार्थ स्पर्धेच्या ठिकाणी करायचे होते. तिखट पदार्थांमध्ये भासवाडी रस्सा, कोवळ्या बांबूची भाजी व लोणचे, दाल ढोकले, खाकरा, भाकरीचा काला अशा पदार्थांबरोबरच गोड पदार्थांमध्ये सुधारस, मोदक, शिरा अशा खाद्य पदार्थांना महिला स्पर्धकांनी विशेष पसंती दिली होती. परीक्षक म्हणून अभिनेत्री व गायिका सायली सांभारे, अभिनेत्री दीप्ती सोनावणे-क्षीरसागर उर्फ चंदा, निवेदिका स्वाती सदरे, शब्दप्रभू जगदीश खेबुडकर प्रतिष्ठानच्या सचिव अंगाई खेबूडकर, दूरदर्शन आकाशवाणी सुप्रसिद्ध निवेदिका रत्ना दहिवेलकर आणि चीफ को-और्डीनेटर अजित कुमठेकर यांनी काम पाहिले.

स्पर्धा संपत असतांना सिनेतारका आशा काळे आणि ज्योती बोरा यांनी खास उकडीचे मोदक तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवून सर्वांची वाह वा मिळवली. त्यांचा हस्ते विजेता स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी त्या म्हणाल्या कि, मोदक हा माझा आवडता पदार्थ असून स्वतःचे हाताने मोदक तयार करणे यावर माझा कटाक्ष असतो. साचा वापरून मोदक केलेले मला आवडत नाही. मी केलेले मोदकाचा सारण आणि मोदक सर्वांना फार आवडतात त्याचा मला आनंद आहे. चारूकाका सरपोतदारांमुळे मी चित्रपट सृष्टीत आले त्या मुळेच या कार्यक्रमात मी आवर्जून सहभागी झाले.

 पूना गेस्ट हाउसऑस्टिन 40 कॅफे हाऊस आणि इट आउट @ टपरी यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे पुणे फेस्टिव्हल करता आयोजन केले होते. पूना गेस्ट हाउस चे किशोर सरपोतदार, अंजली वागळे, रचना पाटील आणि शेफ सर्वेश जाधव यांचा संयोजनात मोठा सहभाग होता.

स्पर्धेच्या निकाल प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे डॉ. सतीश देसाई आणि मोहन टिल्लू उपस्थित होते. भारत गॅस हे याचे प्रायोजक होते.

यावेळी मनस्विनी ग्रुप ने मंगळागौरीचे विविध खेळ सादर करून प्रचंड टाळ्या मिळवल्या. त्यामध्ये विविध प्रकारच्या फुगड्या, पाणी लाटा, अट्टूश पान, सईबाईचा कोंबडा, दिंड, तांदूळ सडू, सोमू गोमुचा गाडा, भोवर भेंडी, किस बाई किस दोडका किस, आगोटा पागोटा, ताम तवली, गागेडे, साळुंकी साळकी, पिंगा, फस्ट पिंगा, गोफ इत्यादी खेळ रंगले. फुगड्यांमध्ये तर सिनेतारका आशा काळे स्वतः सहभागी झाल्या तेव्हा तर टाळ्यांचा कडकडाट झाला.

बाल किर्तनकारांच्या किर्तनाने रसिक तृप्त

0

पुणे- पुणे फेस्टिवल अंतर्गत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवामध्ये बाल किर्तनकारांनी निरूपण करत सादर केलेल्या किर्तनातील विविध प्रकारांनी अवघे वातावरण भक्तिमय झाले. आपल्या ओघवत्या वाणीने या बाल किर्तनकारांनी रसिकांना तृप्त केले.

पुणे फेस्टिव्हल मध्ये यंदा प्रथमच बालगंधर्व रंगमंदिर येथे नारदीय किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते. याप्रसंगी नम्रताताई मेहेंदळे  यांच्या हस्ते हभप ताराबाई राजाराम देशपांडे व नंदकुमार मेहेंदळे यांच्या हस्ते हभप श्रीरामचंद्रबुवा बोर्‍हे यांचा सन्मान करण्यात आला. पुणे फेस्टिवलचे डॉ. सतिश देसाई,  तारका फौंडेशनचे अध्य्क् आशिष कांटे, मोहन टिल्लू, फेस्टिवलचे बालगंधर्व रंगमंदिराचे प्रमुख श्रीकांत कांबळे हे यावेळी उपस्थित होते.  डॉ. सतीश देसाई व आशिष कांटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हभप रामचंद्र भिडे , हभप नचिकेत मेहेंदळे, हभप तन्मयी मेहेंदळे या कलाकारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्राची सांस्कृतिक-धार्मिक परंपरा असणार्‍या कीर्तन परंपरेतील विविध प्रकार यावेळी १२ कीर्तनकार  व ५ साथ संगतकारांनी यावेळी सादर केले. सामुदायीक कीर्तन, सहयोगी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, चक्री कीर्तन, युगल कीर्तन-जोड आख्यान आदी कीर्तन प्रकारांचा यात समावेश होता. याप्रसंगी ह.भ.प. कीर्तनकलानिधी रामचंद्रबुवा प्रभाकर भिडे (निरूपणकार), ह.भ.प. नम्रता मेहेंदळे, ह.भ.प. ओवी काळे, ह.भ.प. आनंदी कर्‍हाडकर, ह.भ.प. पियुष कुलकर्णी, ह.भ.प. वर्धन बुरसे, ह.भ.प. तन्मयी मेहेंदळे, ह.भ.प. धनदा गदगकर, ह.भ.प. विकासबुवा दिग्रसकर,ह.भ.प. श्रेयसबुवा कुलकर्णी, ह.भ.प. नंदकुमार मेहेंदळे, ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे आदी कीर्तनकार व कलाकारांनी यात सहभाग घेतला. याचबरोबर वादक संगीतकार म्हणून रेशीम खेडकर – पायपेटी,सुखदा जोशी – संवादिणी,नचिकेत मेहेंदळे – तबला, मयूर गुजर – तबला, ईशान मेहेंदळे – झांज यांनी साथसंगत केली.

यावेळी कीर्तन परंपरेप्रमाणे सर्वांचे कपाळावर बुक्का लावून व प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. या महोत्सवाला रसिकांनी गर्दी केली होती.

हभप निवेदिता मेहेंदळे यांनी स्वागत केले व आभार मानले.

महापालिकेचा लोगो असलेले टी शर्ट बाजारात उपलब्ध ..

0

पुणे-महापालिकेचा  लोगो छातीवर झळकवून तुम्हाला जर पालिकेचे अधिकारी,कर्मचारी म्हणून मिरवायचे असेल , शायनिंग मारायची असेल किंवा एखादी सुरक्षा भेदायची असेल तर अशा लोकांना नामी संधी सहज उपलब्ध करवून देणारी बाब एका पुणेकराने उघडकीस आणली आहे . ती म्हणजे पुण्यातील मध्य वस्तीत शिवाजी रोड वर मामलेदार कचेरी जवळ महापालिकेचा लोगो असलेले टी शर्ट विकत मिळत आहेत . या पुणेकराने येथील दुकानात शो केस मध्ये लावलेल्या या टी शर्ट चे फोटो ,दुकानासह मोबाईलवर काढून माय मराठी कडे पाठविले आहेत .

हि बाब अत्यंत धक्कादायक असून या परिसरातील कार्यकर्ते ,नगरसेवक ,अधिकारी यांच्या लक्षात कशी आली नाही हे समजू शकलेले नाही .असंख्य बड्या बड्या घोटाळ्यांची चौकशी ज्या महापालिकेत गुंडाळून ठेवली गेली अर्थात त्या महापालिकेत याबाबत चौकशी केली जाईल अशी अपेक्षा नाही .त्यामुळे कोणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांने या गौडबंगाला चा पर्दाफाश करावा अशी मागणी या पुणेकराने केली आहे .

झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाकडे सादर ! (जाणून घ्या सविस्तर )

0

पुणे व पिंपरीतील पात्र झोपडपट्टी धारकांचे कालबद्ध नियोजन पद्धतीने पुनर्वसन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम !!!….
इमारतीची उंची, एफ.एस.आय., झोपडयांची घनता यामध्ये वाढ करून सुधारित झोपडपट्टी नियमावलीचा प्रस्ताव शासनाकडे सादर !!!….
पुणे–राज्यातील प्रमुख शहरात वाढत्या नागरिकरणामुळे विशेषत: पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात
खाजगी, शासकीय तसेच निम शासकीय जमीनींवर वसाहती स्वरूपात अतिक्रमणे होऊन मोठया
प्रमाणात झोपडपट्टया तयार झाल्या आहेत व त्यामध्ये दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे. या अनधिकृत
वसाहतींमध्ये कोणत्याही मुलभूत सुविधा नसल्यामुळे किंवा अपुऱ्या सुविधांमुळे तसेच तेथिल अस्वच्छ
व गलिच्छ वातावरणामुळे अशा वसाहती तसेच त्यांच्या आसपासचे क्षेत्र आरोग्याच्या दृष्टीने
अपायकारक झाले आहे. अशा वसाहतींमधील अरूंद रस्ते व दाटीवाटीने एकमेकांस जोडून बांधलेल्या
तळमजली तसेच बहुमजली झोपडयांमुळे या ठिकाणी योग्य नागरी सुविधा पुरविणे देखिल अशक्यप्राय
झाले आहे. त्यामुळे अशा सर्व वसाहतींचे महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मुलन व पुनर्वसन)
अधिनियम 1971 च्या तरतुदी व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणांन्वये तसेच स्थापन करण्यात
आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नियमावली अंतर्गत कालबद्ध नियोजन पद्धतीने पुनर्वसन करणे
क्रमप्राप्त झाले आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांनी पुणे व
पिंपरी शहरातील सुमारे 600 झोपडपट्टयांमधील सुमारे अडीच लाख पात्र झोपडपट्टी धारकांचे त्यांना
कालबद्ध नियोजन पद्धतीने सर्व सुविधांयुक्त मोफत घर देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा महत्त्वाकांक्षी
कार्यक्रम निश्चित केला आहे. याचाच प्राथमिक व महत्त्वाचा भाग म्हणुन प्रचलित झोपडपट्टी पुनर्वसन
प्राधिकरण नियमावलीमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणाऱ्या विकसक / वास्तुविशारद, तसेच आसरा, क्रेडाई या
विकसकांच्या संस्था हे, योजना राबविताना येणाऱ्या अडचणी, तसेच योजनेची प्रभावी अंमलबजावणी
होणेसाठी बऱ्याचशा सुचना या प्राधिकरणाकडे वेळोवेळी चर्चेमध्ये कार्यालयात सादर करत असतात.
‘आसरा’या विकसकांच्या संस्थेने विकास नियंत्रण नियमावलीमधिल अडचणी संबंधात शासनास सादर
केलेल्या त्यांचे दि. 16 जानेवारी 2019 चे पत्रान्वये प्रचलित नियमावलीमध्ये प्रचलित चटई निर्देशांक,
पुनर्वसन घटकातील इमारतींची उंची, झोपडपट्टी पुनर्विकासामधुन निर्माण होणाऱ्या TDRच्या
वापरावरील मर्यादा यासारख्या प्रमुख मुद्दयांवर योग्य ते बदल करणेबाबत शासनास विनंती केली आहे.
त्यामुळे या कार्यालयाने वरिल संदर्भान्वये सादर केलेल्या सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन
योजनेमध्ये येणाऱ्या अडीअडचणी तसेच झो.पु. योजनेतील इमारती / सदनिका यांचा उत्तम दर्जा
राखण्यासाठी व योजना, विहीत कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी तसेच झोपडी धारकांचा पुनर्विकास
करताना त्यांचे झोपडीमधुन पक्क्या घरामध्ये स्थित्यंतर होताना त्यांचे राहणीमान व दृष्टीकोन यामध्ये
सकारात्मक बदल घडविण्यासाठी देखील प्राधिकरणामार्फत समुपदेशनाचे सहाय्याने करावयाची
कार्यवाही या सर्व बाबी विचारात घेऊन त्यानुसार महत्त्वाचे बदल अंतर्भुत करून कलम 3 ब खालील
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे साठीचे ;सर्वसाधारण झोपडपट्टी
योजना सुधारणेचे सुधारित प्रारूप; त्याचे योग्य त्या कारण मिमांसेसह सादर करणेत आले आहेत.

अ) पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील झोपडयांचे पुनर्वसन करताना सद्या प्रामुख्याने
खालील मुख्य अडीअडचणी विचारात घेऊन त्यानुसार प्रचलित नियमावलीमध्ये आवश्यक ते प्रमुख
बदल पुढीलप्रमाणे सुचविण्यात आले आहेत:-
1) झोपडयांचे पुनर्वसन करताना सद्याचे नियमावलीनुसार झोपडीधारकांना 25 चौ.मी. (269
चौ.फुट) चटई क्षेत्राची विनामुल्य निवासी सदनिका देण्याची तरतुद आहे. झोपडपट्टी पुनर्वसन
प्राधिकरण, मुंबई यांच्या प्रचलित नियमावलीनुसार मात्र त्यांचे क्षेत्रातील झोपडयांचे पुनर्वसन
करताना झोपडीधारकांना 27.88 चौ.मी. (300 चौ.फुट) चटई क्षेत्राची विनामुल्य निवासी
सदनिका देण्याची तरतुद आहे. तसेच या कार्यालयात सदर नियमावली बदलाबाबत झालेल्या
चर्चासत्राचे वेळी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी यांनी देखिल शासनाचे यापुढे झोपडीधारकांना
27.88 चौ.मी. (300 चौ.फुट) चटई क्षेत्राची विनामुल्य निवासी सदनिका देण्याचे धोरण असणार
आहे असे सांगितले आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई च्या धर्तीवर तसेच
शासनाचे अपेक्षित धोरणानुसार झोपडयांचे पुनर्वसन करताना सद्याचे नियमावलीनुसार
झोपडीधारकांना 25 चौ.मी. (269 चौ.फुट) चटई क्षेत्राच्या ऐवजी 27.88 चौ.मी. (300 चौ.फुट)
चटई क्षेत्राची विनामुल्य निवासी सदनिका देण्याबाबत प्रस्तावित करणेत आले आहे.
2) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे अंतर्गत योजना राबविताना सद्या योजनेच्या भूखंडावर चटई
क्षेत्र निर्देशांकाची 3 इतकी कमाल मर्यादा लागू असल्याने व पुनर्वसन घटक व मुक्त विक्री घटक
मिळुन अनुज्ञेय होणारे बांधकाम प्रत्यक्षात योजनेच्या ठिकाणी करता येऊ शकत नाही. परिणामी
बहुतांशी योजनांमध्ये मुक्त विक्री घटक नाममात्र अथवा काही योजनांमध्ये अजिबात होत
नसल्याने अशा सर्व योजनांची व्यवहारिकताही अशा योजनांमधुन शिल्लक राहणाऱ्या TDR
वरच पूर्णपणे आवलंबून राहते. तसेच TDRचे बाजारभाव मूल्य बांधकाम क्षेत्रातील बदलत्या
परिस्थितीनुसार अत्यंत अनिश्चित स्वरूपाचे असल्याने व ते मागिल काही वर्षांपासून दिवसेंदिवस
मोठया प्रमाणावर कमी झाल्याने सुमारे 4 ते 5 वर्षांपुर्वी योजना सुरु करताना असलेले TDRचे
भाव आज सुमारे निम्म्याहुन कमी इतके खाली आलेले आहेत. साहजिक अशा सर्व योजना सद्या
अर्धवट स्थितीत बंद अथवा अत्यंत धिम्या गतीनेसुरू आहेत. तसेच यामुळे भविष्यात देखिल
केवळ TDR वर अवलंबित झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना विकसक / जमीन मालक यांचेकडून
योग्य प्रतिसाद मिळु शकणार नाही. त्यामुळे सद्यस्थितीतील चटई क्षेत्र निर्देशांकाची 3 ही कमाल
मर्यादा वाढवून ती किमान 4 अथवा प्रत्यक्षात जास्तीत जास्त पुनर्वसन घटक व मुक्त विक्री घटक
बांधकामास चालना मिळेल या दृष्टीने वाढवण्यात आली आहे.
3) आजमितीस प्रचलित व यापुर्वी प्रस्तावित केलेल्या नियमावलीत देखील प्रति हे. 360 अशी घनता
विचारात घेऊन पुनर्वसन घटक अनुज्ञेय केले जाते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे अंतर्गत
पुणे शहरामध्ये सुमारे 516 हे. क्षेत्रावर सुमारे 48६ ठिकाणी अंदाजे 2 लाखापेक्षा अधिक
झोपडया तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सुमारे 110 हे. क्षेत्रावर सुमारे 71 ठिकाणी अंदाजे 50
हजार पेक्षा अधिक झोपडया आहेत. यापैकी नदीपात्र, डोंगर उतार, विकास आराखडयातील
आरक्षणे यावरील विकसन न होऊ शकणाऱ्या झोपडया विचारात घेतल्या तर झोपडपट्टी पुनर्वसन
प्राधिकरण, पुणे अंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडयांची सरासरी घनता ही प्रती
हे. सुमारे 400 ते 450 पेक्षा अधिक होईल. तसेच या कार्यालयाकडे मेट्रो व पुणे व पिंपरी-
चिंचवड महानगरपालिका यांचेकडून त्यांचे महत्त्वाचे व प्राधान्याचे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या
व अतिक्रमण केलेल्या कुटुंबांना सरसकट त्यांची पात्रता विचारात न घेता त्यांचे पुनर्विकासासाठी
सदनिकांची वेळोवेळी मागणी केली जाते. त्यामुळे भविष्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील
जास्तीत जास्त झोपडयांच्या पुनर्वसनास चालना मिळणेकरिता तसेच या दोन्ही शहरातील

मेट्रोसारख्या प्रकल्पांनी बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्विकासास वाव मिळून संबंधित प्रकल्प
वेळेत पुर्ण व्हावेत याकरिता सदर प्रचलित प्रति हे. 360 ही झोपडयांची घनता वाढवून ती 450
इतकी प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
4) पुनर्वसन घटकाकरिता अनुज्ञेय होणारे बांधकाम प्रत्यक्षात योजनेच्या ठिकाणी करताना सद्य
स्थितीत 40 मी. उंचीची मर्यादा असल्याने उपलब्ध झोपडपट्टी व्याप्त क्षेत्रामुळे शहरातील
महत्त्वाच्या व मोक्याचे ठिकाणी असलेल्या मौल्यवान जमीनींचा अत्यंत मर्यादीत स्वरूपात वापर
होतो. तसेच उपरोक्त परिच्छेद 3 मध्ये आता प्रचलित प्रति हे. 360 ही झोपडयांची घनता
वाढवून ती 450 इतकी प्रस्तावित करणेत आली आहे. त्यामुळे सद्य स्थितीत पुनर्वसन
घटकाकरिता अनुज्ञेय असलेल्या 40 मी. उंचीच्या मर्यादेऐवजी अनुज्ञेय असणारे संपूर्ण बांधकाम
क्षेत्र विकसित होण्याचे दृष्टीने स्थानिक विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत अनुज्ञेय होणारी उंची
प्रस्तावित करणेत आली आहे.
5) वरिल परिच्छेद 4 मध्ये नमूद केलेनुसार सद्यस्थितीत पुनर्वसन घटकाकरिता अनुज्ञेय असलेल्या
40 मी. उंचीच्या मर्यादेऐवजी स्थानिक विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत अनुज्ञेय होणारी
उंची प्रस्तावित करताना संबंधित इमारतींच्या सभोवताली सोडावयाच्या सामासिक अंतरामध्ये
देखील इमारतीची सुरक्षा अग्नीशामक व इतर सुविधांकरिता आवश्यक किमान अंतरे विचारात
घेऊन योग्य ती सुट प्रस्तावित करणेत आलेली आहे.
6) उपरोक्त परिच्छेद 2 मध्ये नमूद केलेनुसार मागिल काही वर्षांपासुन TDR चे बाजारभाव मूल्य हे
दिवसेंदिवस मोठया प्रमाणावर कमी झाल्याने त्याचा विपरित परिणाम झोपडपट्टी पुनर्वसन
योजनांवर प्रत्यक्षपणे झालेला आहे. तसेच नविन भूसंपादन व पुनर्वसन अधिनियमांतर्गत संपादीत
जमीनीच्या मूल्यांकनाचा दर वाढल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी संपादीत
जमीनीच्या रोख मुल्यांकनाच्या वाढीव दराबरोबर TDR चे ही प्रमाण 1:2 या प्रमाणात
वाढविलेले आहे. तसेच या दोन्ही महापालिकांनी मागील काही कालावधीमध्ये त्यांचे विकास
नियंत्रण नियमावलीमध्ये प्रिमियम घेऊन अधिक FSI देण्याचे धोरण स्विकारले आहे. साहजिकच
त्यामुळे या शहरांमध्ये विकास योजनेतील आरक्षणे विकसित करताना व अन्य द्वारे मोठया
प्रमाणात TDR निर्मिती होत आहे. तथापि सद्य स्थितीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतुन निर्माण
होणाऱ्या TDRच्या वापरावर 20% कमाल मर्यादा लागू आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन
योजनेतुन निर्माण होणाऱ्या TDRच्या वापरास अधिक चालना मिळुन TDRचे भविष्यातील दर
संतुलित राहण्यासाठी सदर TDR वापराची किमान मर्यादा 33% व तो प्राधान्याने
वापरण्याबाबत प्रस्तावित करणेत आलेले आहे.
7) झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविताना सद्याचे व यापूर्वी प्रस्तावित केलेल्या नियमावलीनुसार
योजनेअंतर्गत व्याप्त झोपडीधारकांपैकी किमान 70% झोपडी धारकांची संमती आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल
करून खाजगी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी एकुण सभासदांपैकी केवळ 51%
सभासदांची संमती ही पुरेशी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्राचाही
पुनर्विकास करताना झोपडपट्टी धारकांना मोफत व चांगल्या दर्जाचे घर देऊनही केवळ योजनेस
विरोध करून अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर आळा बसवून झोपडपट्टी पुनर्विकासास अधिक
चालना मिळणेकरिता प्रचलित 70% ही मर्यादा कमी करून ती 51% इतकी प्रस्तावित करणेत
आली आहे.

ब) झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविताना उपरोक्त नमूद अडीअडचणीचे निराकरण करण्यासोबतच
झो.पु. योजनेतील इमारती / सदनिका यांचा उत्तम दर्जा राखण्यासाठी व योजना विहीत
कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबरच झोपडीधारकांचे पुनर्वसन करताना त्यांचे झोपडीमधुन पक्क्या
घरामध्ये स्थित्यंतर होताना त्यांचे राहणीमान व दृष्टीकोन यामध्ये सकारात्मक बदल
घडविण्यासाठी देखील प्राधिकरणामार्फत समुपदेशनाचे सहाय्याने करावयाची कार्यवाही काही
नियमामध्ये सुधारणा तर कांही नवीन नियम खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात आलेले आहेत :-
1) झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील पुनर्वसन घटक आणि मुक्त विक्री घटक इमारतीच्या
बांधकामाचा दर्जा व मानके (specifications) यामध्ये बऱ्याच वेळा लक्षणीय तफावत आढळून
येते. पुनर्वसन घटक इमारती व त्यामधील सदनिका यांच्या बांधकामाचा दर्जा उत्तम
राखण्यासाठी किमान आवश्यक बांधकाम मानके (Construction specifications) ठरवून
देण्यात आलेली आहेत. यामध्ये दरवाजे / खिडक्या, फरशी, रंगरंगोटी, स्वयंपाकासाठीचा ओटा,
इमारतींचे बाहय रंग इत्यादीबाबत सविस्तर मानके प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.
जेणेकरून सर्व झो.पु. योजनेतील पुनर्वसन घटक इमारतीचा दर्जा गुणवत्तापूर्ण होवून
झोपडीधारकास किमान आवश्यक सामुहिक सुविधांसह मोफत घरे प्राप्त होतील.
2) यापूर्वी लागू विशेष नियमावली नुसार झो.पु.योजना पूर्ण करण्यासाठी कालावधी नमूद नसल्याने
योजना विविध कारणांमुळे प्रलंबित राहून झोपडीधारकास सदनिका मिळण्यासाठी बराच
कालावधी जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा प्रकरणी कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी
यांच्या वेळ व उर्जा विनाकारण खर्च होते. तसेच यामुळे झोपडीधारकांच्या तक्रारीमध्येही वाढ
होऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एकंदरीत कामकाज व निर्णय क्षमतेवर अविश्वास
निर्माण होतो व याचा प्रत्यक्ष प्रतिकुल परिणाम शहरातील अन्य झोपडीधारकांच्या त्यांचे
पुनर्विकास योजनेमध्ये सहभागी होण्याच्या प्रक्रीयेवर होतो. यासाठी झो.पु.योजनेतील सदनिका
संख्येनुसार योजना पूर्ण करण्याचा कमाल कालावधी ठरवण्यात आलेला आहे. त्यामुळे मुदतीत
योजना पूर्ण होवून झोपडीधारकास किमान वेळेत घर मिळण्यास व एकंदरित झो.पु.
प्राधिकरणाच्या प्रति विश्वास वाढविण्यास व भविष्यातील पुनर्विकास योजनांना चालना देण्यास
मदत होईल.

अ.क्र.- योजनेमधील पुनर्वसन सदनिकांची संख्या – बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राच्या दिनांका पासून कालावधी
1        –       1 -100                                              –           18
2        –       101 – 200                                        –           24
3         –    201 – 300                                          –            30
4         –    301 – 500                                          –            36
5           –   501 आणि जास्त                                 –             48

3) झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविताना, मोबदल्यापोटी विकसकास बांधकामाच्या विविध
टप्प्यावर, जसे जोते तपासणी 25%, आर.सी.सी. / वीट बांधकाम 35%, इमारत पुर्णत्वासाठी
(भोगवटा) 30%, आणि झोपडीधाकाची सहकारी गृहनिर्माण संस्था गठण/नोंदणी व जमीन
हस्तांतरणानंतर 10% TDR संबंधित म.न.पा. मार्फत प्रदान करण्यात येतो. यामधील चौथा
टप्पा पूर्ण होण्यासाठी विकसकाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. ती टाळण्यासाठी वरील
चार टप्प्यामधील TDR मोबदला प्रत्येक टप्प्यावर 25% इतका प्रस्तावित केला आहे. तसेच
सद्यस्थितीत झोपडपट्टी (स्लम) TDR बाबतचे विकास हक्क प्रमाणपत्र (DRC) हे संबंधित

म.न.पा.चे आयुक्त यांचेमार्फत देण्यात येत असल्याने यामध्ये प्रदीर्घ कालावधी जात असल्याचे
विकसकाचे अनुभव आहेत. तसेच या संदर्भात मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी देखिल
झो.पु.प्रा. बाबतची सर्व प्रक्रीया झो.पु. प्राधिकरण कार्यालयाकडून राबविण्यात येत असल्याने व
त्यासाठी स्वतंत्रपणे मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांची नियुक्ती झाली असल्याने यापुढे
झोपडपट्टी (स्लम) TDR बाबतचे विकास हक्क प्रमाणपत्र (DRC) हे मुख्य कार्यकारी अधिकारी,
झो.पु.प्रा. यांचे स्वाक्षरीने वितरित करणेबाबत व सदर विकास हक्क प्रमाणपत्र (DRC) पुणे
म.न.पास TDR खर्ची कामी कळविण्यासाठी योग्य ते आदेश होण्याबाबत त्यांचे दि. 31 मे 2019
चे पत्रान्वये शासनाकडे प्रस्तावित केले आहे. (पत्राची प्रत संलग्न) सबब भविष्यातील झोपडपट्टी
(स्लम) TDR बाबतची कार्यवाही विनाविलंब व वेळेत पुर्ण करण्यासाठी संबंधित विकास हक्क
प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा, पुणे यांनी देण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलेले
आहे. त्यामुळे झो.पु.योजना पूर्ण करण्याच्या कामास गती मिळेल, असे मत आहे.
4) झोपडीधारकांचे पुनर्वसन करताना त्यांचे सुरूवातीला तात्पुरत्या निवारा (संक्रमण) इमारतीमध्ये
स्थलांतरीत केल्यानंतर व योजना पुर्ण होऊन पक्क्या इमारतीमध्ये पुनर्वसन केल्यानंतरही
संबंधित काही झोपडी धारकांच्या अस्वच्छता व त्यामुळे होणारे आरोग्याचे प्रश्न, व्यसन व अन्य
चुकीच्या सवयी त्याचबरोबर त्यांचे कौशल्य विकास, मुलांचे शिक्षणाचे महत्त्व इ. सारख्या
महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्याने त्यांचे राहणीमानामध्ये प्रत्यक्षात कोणतेही सकारात्मक
बदल होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे झो.पु. योजनेतील इमारती / सदनिका यांचा उत्तम दर्जा
राखण्यासाठी व योजना विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबरच झोपडी धारकांचा पुनर्विकास
करताना तो केवळ भौतिक दृष्टया मोफत घर देण्यापर्यंतच मर्यादित न करता त्यांचे सामाजिक,
आर्थिक, आरोग्य, स्वयंरोजगार / कौशल्य विकास तसेच त्यांचे झोपडीमधुन पक्क्या घरामध्ये
स्थित्यंतर होताना त्यांचे राहणीमान व दृष्टीकोन यामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी
देखील प्राधिकरणामार्फत त्यांचे समुपदेशनाचे सहाय्याने करावयाची कार्यवाही करणे आवश्यक
वाटते. त्यामुळे प्रस्तावित नियमावलीमध्ये नव्याने नियम आर.32 चा समावेश करून
विकसकांकडून जमा करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरूस्ती शुल्काच्या व्याजामधुन संबंधित
विषयामधील पारंगत संस्था तसेच पुणे व पिंपरी चिंचवड म.न.पा. यांचे समन्वयाने मुख्य
कार्यकारी अधिकारी आवश्यक तो वाजवी खर्च करून संबंधित झोपडीधारकांचे समुपदेशनाची
उचित कार्यवाही करणेबाबतची तरतुद नमूद करणेत आलेली आहे.
वरिलप्रमाणे प्रचलित व यापूर्वी प्रस्तावित केलेल्या नियमावलीबाबत झोपडपट्टी पुनर्विकासाशी
संबंधित सर्व विकसक, वास्तु विशारद तसेच गृहनिर्माण विभागाकडील व मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास
प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी सुचविलेले योग्य ते बदल देखिल विचारात
घेणेत आलेले आहेत. त्यासाठी या कार्यालयाने विकसक, वास्तुविशारद, आसरा, क्रेडाई, मराठी बांधकाम
व्यावसायिक असो., पुणे, नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल, मुंबई यांची दि.18/07/2019
रोजी तसेच गृहनिर्माण विभागातील अधिकारी, झो.पु.प्रा. मुंबई, पुणे म.न.पा., पिंपरी चिंचवड
म.न.पा., पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे अशा विविध विभागातील अधिकारी यांचे
दि.25/07/2019 व दि.26/07/2019 असे दोन दिवसाचे चर्चासत्र या कार्यालयामध्ये आयोजित करून
त्यानुसार सदर नियमावलीतील बदल एकमताने प्रस्तावित केलेले आहेत. तथापि प्रस्तावित
नियमावलीमध्ये झो.पु.प्रा. योजनेकरिता पुनर्वसन घटकाच्या तुलनेत द्यावयाच्या मुक्त विक्री घटक व
TDR बाबत शासनाने दि. 17/12/2018 अन्वये प्रस्तावित केलेला रेशो यामध्ये कोणताही बदल
प्रस्तावित न करता तो तसाच कायम ठेवण्यात आला आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे दि 30 जून 2005 रोजी अस्तित्वात आले असून सदर
प्राधिकरण स्थापन झालेपासून मागील 15 वर्षांमध्ये प्रत्यक्ष केवळ सुमारे 8343 झोपडीधारकांचे
म्हणजेच एकुण झोपडीधारकांपैकी 4% पेक्षा कमी इतके पुनर्विकासाचे काम पुर्ण झाल्याचे दिसून येत
आहे. व प्रचलित नियमावली ही सक्षम पुनर्वसनाचे आवश्यक असणाऱ्या बाबींशी सुसंगत नसणे हेच
याचे प्रमुख कारण आहे. झो.पु. प्राधिकरणाने आता पुढील 5 वर्षांमध्ये म्हणजेच सन 2025 पर्यंत
विकसन होवू शकणाऱ्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सद्याचे एकूण सुमारे 550 झोपडपट्ट्यांपैकी
किमान 50% झोपडपट्टयांचे व अस्तित्त्वात असलेल्या झोपडीधारकांपैकी किमान 1,00,000
झोपडीधारकांना पक्की घरे देऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याचे महत्वाकांक्षी
नियोजन केले आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांची प्रचलित कलम 3ब योजनेमधील चटई क्षेत्र
निर्देशांक, झोपडयांची किमान घनता, इमारतीची उंची तसेच सामासिक अंतरांमधील सवलती या
सारख्या प्रमुख तरतुदी पाहता वरील (अ) मध्ये सुचविलेल्या तरतुदीनुसारच किंबहुना त्यापेक्षाही अधिक
पुनर्विकासास वाव देणाऱ्या आहेत. त्यामुळे सदर उद्दीष्टानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील
झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेस योग्य व जलदगतीने चालना देणेकरिता शासनास पूर्व मंजूरीसाठी सादर
करणेत आलेल्या सर्वसाधारण झोपडपट्टी योजनेच्या सुधारित प्रारूपामध्ये आवश्यक त्या सुधारणा
होऊन, त्यानुसारची सुधारित नियमावली लागू होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता दि. 15 सप्टें.2019 पासून लागू होण्याची
शक्यता आहे. विषयांकित बाबीची निकड विचारात घेता सदर प्रस्तावित योजनेस शासनाची पूर्व मंजुरी
मिळून हरकती / सूचना मागवण्यासाठी सदरची सुधारित प्रारूप योजना प्रसिद्ध करणे कामी झोपुप्रा,
पुणे व महाराष्ट्र शासनाकडून योग्य ती कार्यवाही करणेत येत आहे.
प्रचलित झोपडपट्टी पुनर्वसन नियमावली सुधारणेसह प्राधिकरणाने खालीलप्रमाणे 12 कलमी
कार्यक्रम निश्चित केला आहे : –
1) योजनेच्या अंमलबजावणीत अंतर्भूत अडथळे दूर करण्यासाठी आणि विशेषतः कमीतकमी
विनामूल्य विक्री घटक आणि योजनेच्या व्यवहार्यतेमध्ये संतुलन राखण्यासाठी विद्यमान
नियमांमध्ये बदल.
2) माहिती तंत्रज्ञान विभाग (आयटी), अभियांत्रिकी व देखभाल विभाग इत्यादी अतिरिक्त
आवश्यक विभागांच्या निर्मितीसह विद्यमान संवर्ग आणि कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधात सुधारणा
करून वाढ करणे.
3) सद्याची कार्यालयीन जागा अपुरी व योग्य सुविधांसह नसल्याने सर्व आवश्यक व पुरेशा
सुविधांसह नुतन कार्यालयीन जागेत स्थलांतर करणे.
4) कार्यालयीन अधिकारी / कर्मचारी आणि विकसक इ. यांची क्षमता वाढविणे.
5) कार्यक्षम निर्णय घेण्याच्या प्रक्रियेसाठी शास्त्रोक्त माहिती व्यवस्थापन वाढविणे.
6) झोपडपट्ट्यांचे त्यांचे क्षमतेनुसार वर्गीकरण करून त्यानुसार प्राधान्याने त्यांचे पुनर्विकास
पात्रता देणे.
7) सर्व झोपडपट्टीधारकांचे कालबद्ध सर्वेक्षण करणे.
8) कालबद्ध व दर्जात्मक पुनर्विकास योजनांना चालना देण्याकरिता सर्व प्रकल्पांचे वेळोवेळी
परिक्षण (ऑडीट) करणे.
9) संक्रमण आणि इतर उद्देशांसाठी घरांचा अतिरिक्त साठा तयार करण्यासाठी PPP च्या
सहभागासाठी प्रोत्साहित करणे.

10) गुणात्मक आणि कालबद्ध पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टीधारकांच्या संमतीचे प्रमाण
सध्याच्या 70% वरून 51% कमी करणे.
11) पुनर्वसन केलेल्या झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक आणि वर्तणुकीशी
संबंधित विकासाच्या दृष्टीने आधारभूत आधार देणे.
12) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे आणि इतर सरकारी / निम-सरकारी संस्था विशेषत: पुणे
महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यात समन्वय साधणे.
-मुख्य कार्यकारी अधिकारी
झो.पु.प्रा.,पुणे

भुजबळांना शिवसेनेत नो एन्ट्री : संजय राऊत

0

नाशिक -“नारायण राणे यांना भाजपात प्रवेश द्यायचा की नाही हा भाजपाचा प्रश्न आहे. त्यांच्या प्रवेशाला आमचा विरोध नाही. तसेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मांडली आहे.

छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध असणाऱ्या येवला मतदारसंघातील शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिकांनी पक्षाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. भुजबळांना पक्षात घेऊ नका, अशी मागणी त्यांनी केली. “भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही”, असे आश्वासन राऊत यांनी दिले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, “आर्थिक मंदीमुळे देशात बेरोजगारी वाढत आहे. भारतात रशियासारखी परिस्थिती निर्माण व्हायला नको. मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात. काँग्रेस सरकारच्या काळातही मोठी मंदी आली होती, मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अत्यंत उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढले”, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना राऊत म्हणाले, “आगामी निवडणुकीसाठी समान जागा वाटप होणार आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात तसं ठरले आहे. गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुका जाहीर होतील, असे सांगत नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला आमचा विरोध नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले. “सगळ्यांना पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखून नेत्यांना पक्ष प्रवेश देत आहोत. छगन भुजबळ यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. “मी आहे तिथेच बरा आहे.” असे भुजबळ यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट झालेले आहे”, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

 

आगामी निवडणुकीत समान जागावाटप होणार

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं आहे

नारायण राणेंना भाजपने घ्यावं की नाही हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या प्रवेशाला आमचा विरोध नाही.

सगळ्यांना पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखून नेत्यांना पक्ष प्रवेश देत आहोत.

भाजप राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतो, आम्ही देखील तयारी करत आहोत.

उत्तर महाराष्ट्र हे सध्या राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे.

उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी आज चर्चा केली.

मी आहे तिथे बरा आहे असं काल भुजबळ स्वतः म्हणाले. त्यामुळं चित्र स्पष्ट झाले आहे.

आर्थिक मंदीमुळे या देशात बेरोजगारी वाढत आहे. रशियासारखी परिस्थिती होऊ नये

आर्थिक मंदीवर सरकारने लवकर उपायोजना कराव्यात

काँग्रेस सरकारच्या काळातही मोठी मंदी आली होती; मात्र मनमोहन सिंग यांनी अत्यंत उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं

 

द इदर गोल्ड ट्रॉफी शर्यतीत बुशटॉप्स विजेता

0

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019

पुणे, 4 सप्टेंबर 2019: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत  द  इदर गोल्ड ट्रॉफी  या शर्यतीत बुशटॉप्स या घोड्याने  2400मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील   द  इदर गोल्ड ट्रॉफी या  महत्वाच्या लढतीत फाईव्ह स्टार शिपिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी विजय बी. शिर्के, जय व्ही. शिर्के, के एन धनजीभॉय आणि जे के धनजीभॉय यांच्या मालकीच्या बुशटॉप्स या घोड्याने 2मिनिट 30सेकंद व 596मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा एन.एस. परमार हा जॉकी होता, तर एम.के. जाधव ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:

 द  इदर गोल्ड ट्रॉफी

विजेता: बुशटॉप्स, उपविजेता: ऍडज्युडिकेट