Home Blog Page 2850

नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर ‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार

0

शहरी नातेसंबंधांभोवती गुंफण्यात आलेल्या ‘मीडियम स्पाइसी’ या रोमांचक चित्रपटाच्या निमित्ताने अनेक प्रतिभावंत कलाकार एकत्र आले आहेत. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिकांसह सागर देशमुख, जेष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या सहाय्यक भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षीचा कलाकारांची मांदियाळी असणारा चित्रपट ठरणार आहे. दरम्यान, आता या चित्रपटात नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर दिसणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे.

मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाचा प्रवास नावाप्रमाणेच लज्जतदार असून प्रदर्शनापूर्वी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.नेहा जोशी हिची ओळख मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. ‘फर्जंद’, ‘झेंडा’, ‘पोस्टर बॉईज’ आणि ‘नशीबवान’ यांसारख्या चित्रपटांमधून नेहाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून, मागील वर्षी तिला ‘नशीबवान’ साठी राज्य पुरस्कारामध्ये उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच अभिनेता पुष्कराज चिरपुटकरला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील आशूच्या भूमिकेसाठी रसिकांचे प्रेम मिळाले, याच भूमिकेसाठी त्याला २०१५ साली झी मराठी अवार्ड मिळाला आहे. गत काही वर्षात अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्याने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असून त्यातील ‘मंत्र’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला राज्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

 

सैन्य दलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी-16 सप्टेंबर रोजी मुलाखती

0

 

मुंबई शहर जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत 16 सप्टेंबर रोजी मुलाखती

मुंबई, दि. 6 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवांराना एसएसबी प्रशिक्षण वर्ग छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीव्दारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्राच्या नवयुवक, युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एस एस बी परीक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना एस एस बी मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक 19 सप्टेंबर 2019 ते 27 सप्टेंबर 2019 असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर राहावे असे कळविण्यात आले आहे.

एस.एस.बी. प्रवेश वर्गासाठी खालील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व ह्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत आणणे आवश्यक आहे.

1) कंबाईन्ड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

2) एनसीसी (सी) सर्टिफिकेट ए/बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.

3) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

4) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिकरोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रं. 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत (सकाळी 10.00 ते सायं. 5.30) संपर्क साधावा.

गडकिल्ल्यांसंदर्भात येत असलेल्या चुकीच्या बातम्यांच्या अनुषंगाने पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

0

मुंबई, दि. 6 : राज्यातील वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल, असे स्पष्टीकरण पर्यटन विभागाने केले आहे.

गडकिल्ल्यांसंदर्भात येत असलेल्या चुकीच्या बातम्यांच्या अनुषंगाने पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

स्पष्टीकरणात म्हटले आहे की, राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात. राज्यातील वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये, असे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.

पर्यटनमंत्री जयकुमार रावलयांनी पहा काय म्हटले आहे

चाळीस लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना करातून सुट – सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई, दि. ६ : वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांची वर्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यापाऱ्यांना नोंदणी दाखला घेण्यापासून आणि कर  भरण्यापासून सुट देण्यात आली आहे.  राज्यातील कित्येक लहान करदात्यांना फार मोठा लाभ झाल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

नोंदणी प्रक्रिया झाली सोपी

वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत नोंदणीची प्रक्रिया ही पूर्णत: ऑनलाईन आणि सोपी आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, नोंदणी करतांना करदात्यांना अर्ज व त्यासंबंधीची कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  व्यापाऱ्यांना नोंदणी, दुरुस्ती, अथवा नोंदणी रद्द करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आल्याने त्याला कर विभागात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर साधारणत: ३ दिवसात व्यापाऱ्यांना नोंदणी दिली जाते.  ज्या छोट्या व्यापाऱ्यांनी उलाढाल मर्यादा ओलांडली नाही त्यांनाही त्यांची इच्छा असल्यास  वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत स्वत:ची नोंदणी करता येऊ शकते.

नोंदणीकृत व्यापाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी

या सुटसुटीत व्यवस्थेमुळेच महाराष्ट्रात १५ लाखांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत स्वत:ची नोंदणी करून घेतली आहे. ही संख्या भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त असल्याचेही वित्तमंत्री म्हणाले.

वस्तू आणि सेवा कर प्रणालीत जर वेगवेगळ्या राज्यातून व्यापार होत असेल तर राज्यासाठी एक नोंदणी घेणे आवश्यक आहे. व्यापारी व उद्योगांकडून एकाच राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगळ्या नोंदणीची मागणी झाल्याने आता त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे श्री.मुनगंटीवार म्हणाले.

नोंदणीचे फायदे

नोंदणी करण्याचे प्रामुख्याने दोन लाभ आहेत. एक म्हणजे  करदाता अधिकृतपणे त्यांच्या ग्राहकाकडून कर गोळा करू शकतो व त्याच्या नोंदित ग्राहकांना या कराची वजावट उपलब्ध होऊ शकते.  दुसरा लाभ म्हणजे करदाता खरेदीवर  दिलेल्या  कराची वजावट घेऊन त्याच्या पुरवठ्यावरील कराचा भरणा करू शकतो.

सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स, द ईगल्स संघांचा दुसरा विजय

0

पुणे, दि. 6 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाने फाल्कन्स संघाचा तर द ईगल्स संघाने  रिबाउंड ब्लॅक हॉक्स संघाचा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाने फाल्कन्स संघाचा 4-3 असा पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय संपादन केला. सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात हर्षवर्धन आपटे व विनित रुकारी यांनी मंदार विंझे व राजशेखर करमरकर यांचा 21-20, 21-12 असा, तर गोल्ड खुल्या मिश्र दुहेरी गटात सुधांशू मेडसीकर व दिपा खरे यांनी पराग चोपडा व दिप्ती सरदेसाई यांचा 21-11, 21-12 असा पराभव करत सामन्यात आघाडी घेतली. सिल्व्हर मिश्र दुहेरी गटात प्रशांत वैद्य व तुषार मेगळे यांनी अभिषेक ताम्हाने व राहूल परांजपे यांचा15-04, 15-05 असा पराभव करत संघाचा डाव भक्कम केला. सिल्व्हर खुल्या दुहेरी गटात आकाश सुर्यवंशी व आशय कश्यप यांनी आरुषी पांडे व निखिल चितळे यांचा 15-08, 15-06 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.

दुस-या लढतीत द ईगल्स संघाने  रिबाउंड ब्लॅक हॉक्स संघाचा 4-3 असा पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. गोल्ड खुल्या दुहेरी गटात बिपिन देव व तेजस चितळे यांनी अमोल मेहेंदळे व करण पाटील यांचा  21-05, 21-11 असा पराभव करत सामन्यात विजयी सुरूवात केली.  वाईजमन गटात अविनाश दोशी व संजय फेरवानी यांनी बाळ कुलकर्णी व नरेंद्र पटवर्धन यांचा 21-14, 21-18 असा पराभव करत सामन्यात आघडी घेतली. गोल्ड खुल्या दुहेरी गटात आर्य देवधर व बिपिन चोभे या जोडीने सिध्दार्थ निवसरकर व विक्रांत पाटील यांचा 21-16, 21-19 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.

अन्य लढतीत इम्पेरियल स्वान्स संघाने पेलिकन स्मॅशर्स संघाचा 5-2 असा पराभव केला तर स्कॅवेंजर्स संघाने अर्बन रेवन्स संघाचा 4-3 पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

ब्लेझिंग ग्रिफिन्स वि.वि फाल्कन्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: कुणाल पाटील/प्रथम पारेख पराभूत वि आनंद घाटे/रणजीत पांडे 18-21, 18-21; सिल्व्हर खुला दुहेरी गट: हर्षवर्धन आपटे/विनित रुकारी वि.वि मंदार विंझे/राजशेखर करमरकर 21-20, 21-12; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: सुधांशू मेडसीकर/दिपा खरे वि.वि पराग चोपडा/दिप्ती सरदेसाई 21-11, 21-12; वाईजमन: गिरिश करंबेळकर/राजेंद्र नखरे पराभूत वि अनिल देडगे/निलेश केळकर 15-21, 15-21; सिल्व्हर मिश्र दुहेरी गट: प्रशांत वैद्य/तुषार मेंगळे वि.वि अभिषेक ताम्हाणे/राहूल परांजपे 15-04, 15-05; सिल्व्हर खुला दुहेरी गट: आकाश सुर्यवंशी/आशय कश्यप वि.वि आरुषी पांडे/निखिल चितळे 15-08, 15-06; गोल्ड खुला दुहेरी गट: चिन्मय चिरपुटकर/जयदिप गोखले पराभूत वि मधुर इंगळहाळीकर/तन्मय आगाशे 19-21, 16-21);

द ईगल्स वि.वि  रिबाउंड ब्लॅक हॉक्स 4-3( गोल्ड खुला दुहेरी गट: बिपिन देव/तेजस चितळे वि.वि अमोल मेहेंदळे/करण पाटील  21-05, 21-11; सिल्व्हर खुला दुहेरी गट: अनिरूध्द आपटे/देवेंद्र चितळे पुढे चाल वि आलोक तेलंग/अशुतोष सोमण 1-0;  गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: चेतन वोरा/गौरी कुलकर्णी पराभूत वि सारंग आठवले/राधिका इंगळहाळीकर 02-21, 11-21;  वाईजमन: अविनाश दोशी/संजय फेरवानी वि.वि बाळ कुलकर्णी/नरेंद्र पटवर्धन 21-14, 21-18;  सिल्व्हर मिश्र दुहेरी गट: विमल हंसराज/शिवकुमार जावडेकर पराभूत वि समिर जालन/अमर श्रॉफ 08-15, 10-15;  सिल्व्हर खुला दुहेरी गट: आयुष गुप्ता/पार्थ केळकर पराभूत वि अनया तुळपुळे/ जयकांत वैद्य 15-13, 08-15, 13-15;  गोल्ड खुला दुहेरी गट: आर्य देवधर/बिपिन चोभे वि.वि सिध्दार्थ निवसरकर/विक्रांत पाटील 21-16, 21-19).

इम्पेरियल स्वान्स वि.वि.पेलिकन स्मॅशर्स 5-2(गोल्ड खुला दुहेरी गट: आदित्य काळे/अनिश राणे पराभूत वि. हर्षद बर्वे/प्रथम वाणी 21-19, 15-21, 18-21; सिल्व्हर खुला दुहेरी गट: प्रीती फडके/विनायक भिडे वि.वि.भाग्यश्री देशपांडे/नितल शहा 21-14, 21-08; गोल्ड मिश्र दुहेरी गट: तेजस किंजिवडेकर/आदिती रोडे वि.वि. प्रतीक धर्माधिकारी/चैत्राली नवरे 21-20, 21-15; वाईजमन: हेमंत पाळंदे/संदीप साठे पराभूत वि. सचिन जोशी/विनायक लिमये 10-21, 12-21;   सिल्व्हर खुला मिश्र दुहेरी गट: विश्वेश कटक्कर/ईशान भाले वि.वि सचिन अभ्यंकर/ शरयु राव 15-09, 15-08;   सिल्व्हर खुला दुहेरी गट: केदार देशपांडे/विक्रम ओगले वि.वि अंकुश मोघे/प्रियदर्शन डुंबरे 15-14, 15-13;   गोल्ड खुला दुहेरी गट: मिहिर केळकर/तुषार नगरकर वि.वि नितिन कोनकर/सिध्दार्थ साठ्ये 09-21, 21-18, 21-15);

स्कॅवेंजर्स वि.वि  अर्बन रेवन्स  4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: अमित देवधर/वृशी फुरीया वि.वि अनिकेत शिंदे/संग्राम पाटील  21-14, 21-14; सिल्व्हर खुला दुहेरी गट: अभिजीत राजवाडे/अनिश रुईकर पराभूत वि अनिकेत सहस्त्रबुध्दे/गिरिष मुजुमदार 15-21, 18-21; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: तन्मय चोभे/शताक्षी किनिकर वि.वि केदार नाडगोंडे/सारा नवरे 21-08, 21-09; वाईजमन: रमन जैन/विरल देसाई पराभूत वि श्रीदत्त शानबाग/विवेक जोशी 13-21, 15-21;  सिल्व्हर मिश्र दुहेरी गट: अनिश शहा/अमोल दामले वि.वि आनंद शहा/चिन्मय चोभे 15-14, 15-14, 15-13;  सिल्व्हर खुला दुहेरी गट: कविता रानडे/तन्मय चितळे पराभूत वि देवेंद्र राठी/रोहित भालेराव 07-15, 06-15; गोल्ड खुला दुहेरी गट: मकरंद चितळे/मिहिर विंझे वि.वि अव्दैत जोशी/अजिंक्य मुठे 21-13, 21-10);

एमपीएससी उत्तीर्ण होवूनही नौकरीसाठी सरकार दरबारी भिक मागण्याची तरुणांवर वेळ

0
नियुक्तीसाठी भावी अधिकाऱ्यांचा सरकारला दंडवत
राज्यसेवेचे ३७७, तर सहायक मोटार वाहन निरीक्षकचे ८३२ अधिकारी नोकरीच्या प्रतीक्षेत 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा व सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्यापही नियुक्त करून घेण्यात आलेले नाही. शासनाने त्वरित नियुक्त करून घेण्याच्या मागणीसाठी या भावी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सरकारकडे लोटांगण घातले. तसेच नोकरीवर रुजू करून घेण्याची मागणी करत भीक मांगो आंदोलन करीत बेमुदत उपोषण या अधिकाऱ्यांनी सुरु केले आहे.

राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार यासह सहायक मोटार वाहन निरीक्षक असे वर्ग १ व वर्ग २ पदावरील अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. समांतर आरक्षणाच्या खटल्यामुळे ही नियुक्ती रखडली आहे. मात्र, यातील ९५ टक्के उमेदवारांचा याच्याशी संबंध नाही. न्यायालयीन लढाईमध्ये या अधिकाऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या टोलवाटोलवीमुळे निवड होऊनही हे अधिकारी आज हलाखीचे जीवन जगत आहेत.

सकाळी पुणे स्टेशनजवळील गांधी पुतळयाला अभिवादन करून तेथे त्यांनी दंडवत घातला. नोकरीवर तात्काळ रुजू करून घ्यावे, अशी मागणी केली. तेथून हे सर्व जवळपास ६००-७०० अधिकारी विधानभवन येथे आले. तेथे सरकारला दंडवत घालत विनवणी केली. कठोर परिश्रम करून मिळालेल्या नोकरीवर त्वरित रुजू करून घेण्याची मागणी करत भीक मांगो आंदोलन केले व बेमुदत उपोषण सुरु केले. सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाचे ८३२, तर राज्यसेवेच्या ३७७ पदांचा समावेश आहे. राज्यसेवेच्या निकालाला १६ महिने, तर सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या निवडीला ३२ महिने उलटून गेले आहेत. तरीही हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

याबाबत बोलताना अभिजित बाविस्कर म्हणाले, “गेल्या अनेक महिन्यांपासून आमची निवड होऊनही आम्ही अजून बेरोजगारीचा सामना करीत आहोत. रात्रंदिवस एक करून राज्यसेवा उत्तीर्ण झालो. मात्र, नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे सगळीकडून दबाव येत आहे. मानसिक, सामाजिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने आमच्या मेहनतीचा विचार करून त्वरित नियुक्ती करावी. तहसीलदार साळुंखे साहेब यांच्याकडे राज्यसेवा अधिकाऱ्यांच्या मागण्याचे निवेदन दिले आहे.”

रोहित पवार म्हणाले, “दोन-अडीच वर्षे उलटूनही आम्हाला नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कौटुंबिक कलह वाढत आहे. आम्हा मुलांमध्ये नैराश्याची भावना येत असून, प्रचंड मेहनतीने जे यश मिळवले, त्याच्या नियुक्तीसाठी रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन आणि उपोषण करावे लागत आहे, याचे वाईट वाटते. देशसेवा करण्याची इच्छा मनात बाळगून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लढा द्यावा लागत आहे.”
विविध पक्ष, संघटनांचा उपोषणाला पाठिंबा
वर्ग १ आणि वर्ग २ च्या भावी अधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या या उपोषणाला शहरातील विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या अधिकाऱ्यांना शासनाने त्वरित नियुक्ती देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली .युवक क्रांती दलाचे संदीप बर्वे, एमपीएससी स्टुडन्ट राईट्सचे महेश बडे यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवत सरकारकडे त्यांच्या नियुक्तीची मागणी केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे यंत्रणांना निर्देश

0

मुंबई, दि. 5 : आगामी विधानसभा निवडणुका यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज होऊन समन्वयाने काम करावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी आज दिले.

राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा श्री.सिन्हा यांच्यासह निवडणूक आयोगाचे अन्य उप निवडणूक आयुक्त चंद्र भूषण कुमार, सुदीप जैन, महासंचालक दिलीप शर्मा, धीरेंद्र ओझा यांनी आज राज्यस्तरीय समन्वय अधिकाऱ्यांबरोबर (नोडल ऑफिसर्स) हॉटेल हयात रिजन्सी येथे आयोजित बैठकीत घेतला. यावेळी प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.

निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा आणि मद्याचा वापर यावर आळा घालण्यासाठी तसेच अवैधरित्या मद्य आणि रोकड वाहतूक यावर लक्ष ठेवण्यासाठी पाळतीची यंत्रणा सक्षम यंत्रणा निर्णय करावी, असे निर्देश यावेळी उप निवडणूक आयुक्तांनी दिले. आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागांनी टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि नियंत्रण कक्ष तात्काळ कार्यान्वित करावेत.  नागरिकांना याबाबत माहिती द्यायची असल्यास त्यासाठी नियंत्रण कक्ष, व्हॉट्सॲप क्रमांकाची प्रसिद्धी वृत्तपत्रातून नियमित जाहिरातीद्वारे तसेच सोशल मीडियावरून करण्यात यावी. सी-व्हिजिल या ॲपवर येणाऱ्या तक्रारी सर्व संबंधित यंत्रणाकडे तात्काळ पाठवाव्यात, अशाही सूचना देण्यात आल्या.

यावेळी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी निवडणुकीसाठी वाहन व्यवस्था आराखड्याचा आढावा दिला. परिवहन विभागाने वाहनांच्या अधिग्रहणासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या ‘सुगम’ या वाहन व्यवस्थापन यंत्रणेचा उपयोग करावा. अधिग्रहण केलेल्या वाहनांचे चालक मतदानापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. राजकीय पक्षांच्या तसेच उमेदवारांच्या वाहनांना परवानगी देत देण्यासाठी गतिमान व्यवस्था राबवावी, आदी निर्देश आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

निवडणुकीदरम्यान 10 हजार रुपयांवरील सर्व व्यवहार डिजिटल पेमेंट किंवा धनादेशाने करण्यासाठी उमेदवारांना प्रोत्साहित करावे. रोख रक्कमेची वाहतूक  तसेच हवालाद्वारे पैशाचे हस्तांतरण यावर लक्ष ठेवावे.

बँकांनी निवडणूक काळात दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड काढण्याच्या प्रकरणांची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी तसेच आयकर विभागाला द्यावी.

उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि अवैध पैशाचा वापर याबाबत काटेकोर पर्यवेक्षण करण्यात यावे. पैशाच्या वापरावर आळा घालण्यासाठी अंतर्गत माहिती यंत्रणा सक्षम करून अशा प्रकरणात तात्काळ छापे आणि जप्तीसारखी कारवाई करावी,

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग तसेच एमजीएसटी विभागाने केलेली चेकपोस्ट, जलद प्रतिसाद पथक आदींच्या व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. माहिती व जनसंपर्क विभागाने माध्यमाकडून करावयाच्या कामकाजाबाबतही सूचना यावेळी देण्यात आल्या. रेल्वे, बीएसएनएल, सीआरपीएफ, भारतीय विमानतळ प्राधिकरण, राज्यस्तरीय बँकर्स कमिटीची अग्रणी बँक, अंमली पदार्थ विरोधी ब्युरो आदींचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…

0

पुणे -इंदापूरची जागा राष्ट्रवादी लढवणार की काँग्रेसला सोडली जाणार? यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे असतानाच हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी व पवार कुटुंबीयांवर आरोप केले. हे आरोप आमच्यासाठी धक्कादायक आहेत, असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत, आणि यापुढेही राहतील, असा विश्वासही खा. सुळे यांनी व्यक्त केला.

सुप्रिया सुळे यांच्या खासदार निधीतून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागातील कचरा गोळा करण्यासाठी तीन घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या गाड्यांचे लोकार्पण गुरुवारी महापालिकेसमोर करण्यात आले. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटप संबंधी चर्चा सुरू आहे. काही जागांचा तिढा सुटला असून इंदापूरच्या जागेसंदर्भात अद्याप कसलेही बोलणे झालेले नाही. या जागेचा निर्णय होणे बाकी असताना हर्षवर्धन पाटील यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी स्वतः कालपासून संपर्क करत आहे, मात्र त्यांचा फोन बंद लागत आहे. एका जबाबदार व्यक्तीकडे मी निरोप पाठवला आहे. त्यांच्याशी संपर्क होईल, अशी मला अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.

जे लोक राष्ट्रवादी सोडून जात आहेत, त्यांची कारणे पक्षावर किंवा पवार कुटुंबीयांवर नाराजी, अशी नाहीत. कारखाना, बँक, ईडीची चौकशी, अशा प्रकारची आहेत. जे कोणी जात आहेत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काहीना काही योगदान दिले आहे. त्यामुळे मी त्यांचा द्वेष न करता त्यांना शुभेच्छा देते.

नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका नेत्याच्या वडिलांना भाजपने प्रवेश नाकारल्याचे ऐकायला मिळाले. वडिलांचा अवमान झालेला असतानाही हे नेते भाजपमध्ये गेले. चाळीस चाळीस वर्ष एका पक्षात राहिलेल्या आणि विचारांशी बांधील असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मुलांसाठी मानहानी पत्करावी लागते, हे दुर्दैव आहे. असेही त्या म्हणाल्या.

सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये.. विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

0

पुणे दि.५ सप्टेंबर.शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक असून सक्षम व आदर्श पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असल्याच्या भावना विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केल्या.
शिक्षक दिनानिमित्त आज येरवडा येथील पुणे महानगरपालिकेच्या कै. गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक विद्यालयात आयोजित शिक्षक गौरव कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पुणे महानगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती मीनाक्षी राऊत,सहायक प्रशासकीय अधिकारी विजय आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपले शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत तर जगण्याची कला शिकवत असतात.विद्यार्थ्यांवर संस्कार,संस्कृती, आदर असे पैलू पडण्याचे काम गुरुजन करतात असे सांगून श्री. म्हैसेकर म्हणाले,ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन एखादी कलाकृती साकारतो अगदी त्याप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून जबाबदार नागरिक घडवीत असतात.आपले शिक्षक आपल्या आईवडीलानंतर आपले पालकच असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.
यावेळी विभागीय आयुक्तांनी शाळेतील शिक्षकांचा पुष्प व पुस्तके देऊन सत्कार केला.याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा कदम,संभाजी बांडे,सुभाष सातव ,राधिका बडगुजर ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कस्तुरबा विद्यालयातील शिक्षकांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार
शिक्षक दिनानिमित्त आज विभागीय आयुक्तांनी कोरेगाव पार्क येथील पुणे महानगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी प्राथमिक इंग्लिश विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार केला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत गिरी, शिक्षक मोनिका शिरसाट,रुपाली सोनवणे,महादेव कोळी,नितीन कांबळे तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

संयुक्त कुष्ठरुग्ण शोध व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम

0
पुणे दि.5 : पुणे जिल्हयात 13 ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान, 
सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. 
या अभियानाच्या यश्स्वीतेसाठी संबंधीत सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी  सक्रीय सहभाग नोंदवावा,
 असे आवाहन सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)               डॉ. हुकुमचंद पाटोळे यांनी केले आहे.
            जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रीय क्षयरुग्न शोध मोहिम व 
असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरुकता अभियानासंदर्भात आयोजित बैठकीत श्री.पाटोळे बोलत होते यावेळी जिल्हा
 क्षयरोग अधिकारी डॉ.संजय दराडे, अभियानाचे समन्वयक डॉ.बसवराज पाटील, अतिरिक्त जिल्हाआरोग्य 
अधिकारी डॉ.सचिन खरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदाळे, जिल्हा पर्यवेक्षक दिनेश कुकडे 
आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            श्री.पाटोळे म्हणाले, पुणे जिल्हयात 13 ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत संयुक्त कुष्ठरुग्ण 
शोध अभियान, सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविण्यात येणार
 आहे. या अभियानात आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत घरातील सर्व व्यक्तींची तपासणी करुन संशयीत
 रुग्ण शोधले जाणार आहेत. शोधण्यात आलेल्या संशयीत रुग्णांची त्वरित वैद्यकीय अधिकारी यांच्याव्दारे तपासणी 
करुन त्यांना योग्य औषधोपचार सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.संजय दराडे यांनी या अभियानासाठी तालुकास्तरीय कृती कार्यक्रमाचे 
नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. हे अभियान पुणे जिल्हयातील 13 तालुक्यांत राबविण्यात येणार आहे.
 नागरी भागातील झोपडपट्टी, स्थलांतरीत लोकसंख्या असणाऱ्या भागात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 
एकुण 14 दिवसाच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ.दराडे यांनी सांगितले .यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या मालक व चालकांना भारत शिल्ड फोर्सचे आवाहन

0

पुणे शहर हद्दीतील व्यवसाय करणाऱ्या चालक व मालकांनी १ दिवस पुणे बंदोबस्तासाठी दिल्यास आपण किमान १००० पेक्षा जास्त सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवक देऊ शकतो. गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच वेळी येत असल्याने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सणादरम्यान कोणतेही गालबोट लागू नये,अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी आपण जनतेची सेवा म्हणून देशसेवा करू शकतो.

बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने कडेकोट व्यवस्था केली असून, संपूर्ण यंत्रणाही सज्ज आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी, गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी दुपारपासून पुणे शहरामध्ये लाखो भाविक गर्दी करतील. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि घातपाती कृत्य करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यास पोलीस दल सज्ज आहे. आपले उत्तरदायित्व किंवा उपकाराची परतफेड म्हणून सर्व परवानाधारक खाजगी सुरक्षा रक्षक संस्थेच्या मालकांनी आपले किमान २ ते ४ असे प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी पोलीस दलाच्या ताफ्यात देवुन त्याच्या आदेशाचे पालन करतील.

बंदोबस्तातील नियमनासाठी दहशतवादाचा धोका, पाकीटमार, मोबाईल चोर, शांततेचा भंग करणारे टोळके, सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट व भुरट्या चोरांचा उच्छाद या सा-या गर्तेत सुरक्षा यंत्रणेला हे मोठे आव्हान आहे त्यात ट्रॅफिक वॉर्डन, फायर वॉर्डन, रोड रोमिओंवर आळा घालण्यासाठी रक्षकांच्या माध्यमातून स्वयंसेवकांची फळी सज्ज करून पोलिसांच्या मदतीला आपण उभे राहिले पाहिजे. आपण एक आदर्श नागरिक म्हणून आपला सहभाग वाढवला पाहिजे. सालाबादप्रमाणे पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असले तरी यंदाच्या बंदोबस्तात नाविण्यपूर्ण यंत्रणांचा समावेश असला तरी पण अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे.

गणेशोत्सवात शहरात येणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी आपण मालकांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे त्यात पुणे पोलिस,सशस्त्र दलाचे जवान, होमगार्ड, वाहतूक रक्षक, जलसुरक्षा दलाचे जवान, एसआरपीएफ, फोर्स वनचे  जवान, वाहतूक पोलिसांच्या मदतीला आपले  स्वयंसेवक सज्ज ठेवण्याची गरज आहे. शहरातील अतिसंदेवनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्या ठिकाणी जे आजी माजी सैनिकी, पोलीस अधिकारी आणि तसेच महाविद्यालयीन आजी माजी एन.सी.सी कॅडेट सह आपण स्वतः पोलिसांच्या मदतीला उभे राहिले पाहिजे.

खाजगी सुरक्षा रक्षक हे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मॉल, हॉटेल अँड रेस्टोरंट-पब, सर्व प्रकारची दुकाने, आय टी कंपनी, खाजगी बंगले, बँक- ए. टी. एम, सर्व प्रकारची ऑफिस, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, उद्याने, सार्वजनिक पे अँड पार्क पार्किंग, कॉमेर्सिअल कॉम्प्लेक्स, ज्वेलरी शॉप, बिग बाजार, डी मार्ट, सिनेमा गृह, शासकीय निमशासकीय संस्था, सरकारी कार्यालय, कारखाने, औद्योगिक वसाहत, विविध बाजारपेठ इ. ठिकाणी  खाजगी सुरक्षा कर्मचारी सुरक्षा रक्षक काम करतात त्या सर्व ठिकाणच्या सर्व मुख्य नियुक्ताने त्यांच्या कडील जी सिक्युरिटी एजन्सी कामकाज पाहते त्यातील किमान २ तरी सुरक्षा गार्ड बंदोबस्तासाठी दिल्यास हि पण एक देशसेवा आहे त्यातून आपले पुणे आपण स्वतः सुरक्षित करू शकतो. गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, विशेष सुरक्षा पुरविण्याच्या कामी आवाहन करतो.

संपर्क:- सचिन मोरे भारत शिल्ड फोर्स (संस्थापक) 9623612463

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर संपन्न

0

पुणे  :  चिंचवड येथील  यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट सायन्स  (आयआयएमएस)च्यावतीने   फिट  इंडिया मोहिमेअंतर्गत  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन  करण्यात  आले होते.

चिंचवड  येथील  ब्रम्हचैतन्य  सुपर स्पेशॅलिटी  हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात  आलेल्या  या आरोग्य शिबिरात   रक्तदाब,  मधुमेह  लक्षणे, हिमोग्लोबीन तसेच  बीएम आय  इंडेक्स  आदींबाबत  तपासणी करण्यात  आली. तसेच आरोग्यविषयक सल्ला  आणि आहाराबाबतसुद्धा  मार्गदर्शन करण्यात  आले.

या शिबिराचा  लाभ संस्थेतील  सर्व  शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचाऱ्यानी  घेतला. आपल्या  रोजच्या धकाधकीच्या  जीवनशैलीमुळे प्रत्येकाचे स्वतःच्या  आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे  वेळोवेळी  आरोग्य तपासणी करून  व्यायाम, चांगला आहार याबद्दल आपण जागरूक असणे गरजेचे आहे असे मत यावेळी संस्थेचे अधिष्ठाता  डॉ. राजेंद्र  सबनीस यांनी  व्यक्त केले. या आरोग्य शिबिरासाठी  डॉ.महेश शिरसाळकर  व डॉ. भरत दुधाळ यांनी  मार्गदर्शन  केले. तर  पवन  शर्मा  यांनी विशेष   सहकार्य  केले.

 

पुढची पिढी घडविण्यासाठी कार्य करा- डॉ.विकास आबनावे

0

पुणे-चुकीच्या मार्गावर जावू न देता पुढची पिढी घडविण्यासाठी कार्य कराअसे आवाहन डॉ. विकास आबनावे यांनी येथे केले.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीवर बोलत असताना समाजाचा खरा शिल्पकार म्हणून शिक्षकांची भूमिका खूपच महत्त्वाची असल्यानेच शिक्षक संवेदनशील असायला हवेत. विद्यार्थ्यांच्या भावना सहजच त्याच्या लक्षात येणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन शिकविले पाहिजे चाकोरीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव दिला पाहिजे. आजची परीक्षा पद्धती, मुल्याशिक्षणाचा अभाव, विद्यार्थ्यांचा बुध्यांक  अशा विविध विषयावर भाष्य केले. प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा मागोवा घेऊन आपली ज्ञानमय परंपरा  जपून विद्यार्थी हा ज्ञानार्थी  बनविण्यासाठी शिक्षकांनी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी आपल्या चुका सुधारून पुढची पिढी घडविण्याचे कार्य अविरतपणे करण्याचे आवाहन या शिक्षक दिनाच्या प्रसंगी उपस्थितांना केले. कार्यक्रमाची सुरवात डॉ. विकास आबनावे सचिव, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ पुणे व संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांचे  हस्ते  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या शिक्षण शाखातील शिक्षकांचा अध्यापनात विशेष नैपुण्य मिळविल्याबद्दल प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सत्कारमुर्तीना वृक्षारोपणाची प्रेरणा मिळावी म्हणून बिया, सेंद्रिय खत आणि कुंडी असणारे किट भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी शिक्षकांनी आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अवलंब करण्याचे अवाहन केले.   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांनी केले तर सत्कारार्थीच्या वतीने प्रा.मनोज मुळीक व प्रा.रमा गायकवाड यांनी  मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी डॉ. विकास आबनावे, संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड, खजिनदार श्री.विजयसिंह जेधे, धैर्यशील वंडेकर, कृष्णराव सोनावणे, श्रीराम गायकवाड, सर्व  महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलेश जाधव व प्रा.स्नेहल वीर यांनी केले.

 

 

सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत अर्बन रेवन्स, पेलिकन स्मॅशर्स, द ईगल्स संघांची विजयी सलामी

0

पुणे, दि. 5 सप्टेंबर 2019- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित सातव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत अर्बन रेवन्स, पेलिकन स्मॅशर्स आणि द ईगल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सलामीच्या लढतीत अर्बन रेवन्स संघाने  इम्पेरियल स्वान्स संघाचा 4-3  असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून आनंद शहा, गिरीश मुजुमदार,  श्रीदत्त शानबाग, विवेक जोशी, देवेंद्र राठी, रोहित भालेराव, केदार नाडगोंडे, संग्राम पाटील यांनी अफलातून कामगिरी केली.

दुस-या लढतीत पेलिकन स्मॅशर्स संघाने स्कॅवेंजर्स संघाचा 4-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. पेलिकन स्मॅशर्स संघाकडून सचिन जोशी, विवेक लिमये, सचिन अभ्यंकर, नितल शहा, प्रथम वाणी व सिध्दार्थ साठे यांनी सुरेख कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.  तिसऱ्या लढतीत चेतन वोरा, तेजस चितळे, बिपीन चोभे, बिपीन देव, विमल हंसराज, शिवकुमार जावडेकर, आर्य देवधर, देवेंद्र चितळे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर द ईगल्स संघाने फाल्कन्स संघाचा 4-3 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.

स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे आणि ट्रूस्पेसचे मालक आश्विन त्रिमल व उल्हास त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, सारंग लागू, अभिषेक ताम्हाणे, रणजित पांडे, गिरीश करंबेळकर, विनायक द्रविड, देवेंद्र चितळे, तुषार नगरकर, अभिजीत खानविलकर आणि कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्धार्थ निवसरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
अर्बन रेवन्स वि.वि.इम्पेरियल स्वान्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी गट: अद्वैत जोशी/अजिंक्य मुठे पराभूत वि.मिहीर केळकर/तेजस किंजिवडेकर 12-21, 17-21; सिल्वर खुला दुहेरी गट : आनंद शहा/गिरीश मुजुमदार वि.वि.प्रिती फडके/विक्रम ओगले 21-15, 21-08; गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट: अनिकेत शिंदे/सारा नवरे पराभूत वि.अनिश राणे/आदिती रोडे 06-21, 21-19, 16-21;  वाईजमॅन  : श्रीदत्त शानबाग/विवेक जोशी वि.वि.हेमंत पाळंदे/संदीप साठे 21-10, 21-12;  सिल्वर मिश्र दुहेरी गट:अनिकेत सहस्रबुद्धे/प्रांजली नाडगोंडे पराभूत वि.ईशान भाले/केदार देशपांडे 13-15, 15-14, 11-15; सिल्वर खुला दुहेरी गट:देवेंद्र राठी/रोहित भालेराव वि.वि.विनायक भिडे/विश्वेश कट्क्कर 15-10, 15-07; गोल्ड खुला दुहेरी गट: केदार नाडगोंडे/संग्राम पाटील वि.वि. आदित्य काळे/तुषार नगरकर 21-12, 21-19);

पेलिकन स्मॅशर्स वि.वि स्कॅवेंजर्स  4-3( गोल्ड खुला दुहेरी गट:    हर्षद बर्वे/प्रतिक धर्माधिकारी पुढे चाल वि अतुल बिनिवाले/मकरंद चितळे 0-1;सिल्वर खुला दुहेरी गट :   भाग्यश्री देशपांडे/दत्ता देशपांडे पराभूत वि अभिजीत राजवाडे/अनिश रुईकर 06-21, 10-21;  गोल्ड खुला मिश्र दुहेरी गट:   हर्षद बर्वे/चैत्राली नवरे पराभूत वि तन्मय चोभे/शताक्षी किनिकर 13-21, 11-21;  वाईजमॅन : सचिन जोशी/विवेक लिमये वि.वि रमन जैन/विरल देसाई21-06, 21-00;   सिल्वर मिश्र दुहेरी गट:   सचिन अभ्यंकर/नितल शहा वि.वि मनिष शहा/अमोल दामले 15-08, 12-15, 15-14; सिल्वर खुला दुहेरी गट:  अंकुश मोघे/मिथाली कुलकर्णी पराभूत वि कविता रानडे/तन्मय चितळे 11-15, 12-15;  गोल्ड खुला दुहेरी गट:    प्रथम वाणी/सिध्दार्थ साठ्ये वि.वि अमित देवधर/मिहिर विंझे 21-20, 16-21, 21-17);


द ईगल्स वि.वि  फाल्कन्स 4-3(
 गोल्ड खुला दुहेरी गट:    चेतन वोरा/ तेजस चितळे वि.वि आनंद घाटे/राजशेखर करमरकर 21-14, 21-15; सिल्वर खुला दुहेरी गट :  बिपीन चोभे/बिपीन देव वि.वि मधुर इंगळालीकर/मंदार विंझे 21-06, 21-13; गोल्ड खुला मिश्र दुहेरी    अनिरूध्द आपटे/गौरी कुलकर्णी पराभूत वि पराग चोपडा/दिप्ती सरदेसाई 12-21, 13-21;  वाईजमॅन  :  अविनाश दोशी/संजय फेरवाणी पराभूत वि अनिल देडगे/निलेश केळकर 14-21, 20-21;    सिल्वर मिश्र दुहेरी गट:      विमल हंसराज/शिवकुमार जावडेकर वि.वि निखिल चितळे/रोहन छाजेड 15-02, 15-12;  सिल्वर खुला दुहेरी गट:    अमोल काने/अयुष गुप्ता पराभूत वि अभिषेक ताम्हाणे/राहूल परांजपे 04-15, 10-15;  गोल्ड खुला दुहेरी गट:   आर्य देवधर/देवेंद्र चितळे वि.वि रणजीत पांडे/तन्मय अगाशे 21-16, 20-21, 24-16).   

अक्कासाहेब महाराज ट्रॉफी शर्यत येत्या शनिवारी 7 सप्टेंबर रोजी रंगणार

0
पुणे, 5  सप्टेंबर 2019 : मौसमातील प्रतिष्ठेची अश्‍वशर्यत असलेल्या अक्कासाहेब महाराज ट्रॉफी शर्यत शनिवारी 7 सप्टेंबर रोजी द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब मध्ये आयोजित करण्यात आली असून या दर्जेदार शर्यतीमध्ये एकाहून एक सरस अश्वामधील चुरस  रेस शौकिकांना पाहायला  मिळणार आहे.

अक्कासाहेब महाराज ट्रॉफी हि अश्वशर्यत  7 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता सुरु होणार असून या शर्यतीसाठी पुणेकर शौकिनांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित आहे. 1977मध्ये कोल्हापूरच्या राजघराण्यातील अक्कासाहेब महाराज यांनी या शर्यतीची सुरुवात केली होती. असा मोठा ऐतिहसिक वारसा असलेल्या या शर्यतीला मोठे महत्व असून यामध्ये  4 वर्षे व त्यापुढील वयाच्या अश्वाचा सहभाग असून 1200 मीटर अंतराची ही रेस असणार आहे.