Home Blog Page 285

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन

पुणे, दि. १ : “शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, आमदार बापूसाहेब पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, प्र. विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, मराठा चेबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. संजय सावंत, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, शेती फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी नसून उद्योग, शास्त्रज्ञ, शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे. शासनामार्फत ॲग्री स्टॅक, डिजिटल क्रॉप सर्व्हे, स्मार्ट सिंचन, कृषी डेटा मिशन, एफ.पी.सी. सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यांसारखे अनेक उपक्रम राबवित आहोत. शेतीमधून शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी आपण किती समर्पण भावनेनं काम करतो यावर महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं भविष्य अवलंबून आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ॲग्री स्टॅक नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फॉर्मर आयडी (Unique Farmer ID) दिला जात आहे. हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख – जशी आपली आधारकार्डवर ओळख असते, तशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल. या नंबरद्वारे शेतकऱ्याची जमीन, घेतलेली पिके, मिळालेली अनुदानं, विमा, कर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल. त्यामुळे भविष्यात कुठलीही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्रं देण्याची गरज भासणार नाही.

शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल. कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल. आजपर्यंत या योजनेत महाराष्ट्रातील १ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करुन आपला नंबर प्राप्त करुन घेतला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठी, कृषी सहायक किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे, व्यवस्थित त्याची जाहिरात होणे, बाजारपेठ मिळणं आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे.

हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हाने आहेत. एका क्षणात शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणं, आपला विचार, अभ्यास, प्रत्यक्षात आणणं, त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणं ही खरी काळाची गरज आहे.

या ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या संशोधकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची संधी मिळेल. यशस्वी संकल्पनांना वित्तीय आणि तांत्रिक मदतही दिली जाणार आहे. तसेच, खाजगी कंपन्यांच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यात येईल, ही बाब महत्वाची आहे. पुणे आंतरराष्ट्रीय ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’हे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषि हॅकॅथॉनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञ यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले, भविष्यात शेती सुरक्षित व संरक्षित कशी करता येईल यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. तसेच पुढील काळात शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीची पोत खराब होत असल्याने रासायनिक शेती हळूहळू कमी करुन सेंद्रीय शेतीकडे जाणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी मार्केट महत्वाचे असून, मार्केट लिंकींग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारतातील कंपन्या पुढाकार घेण्यास तयार आहेत. राज्यात विभागस्तरीय सहा अद्यावत शेती प्रयोगशाळा, शॉपिंग मॉल उभारण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशिल आहे. उत्तम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्यास कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अधिक प्रगतशील होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती व शेतकरी सक्षम होण्यासाठी शासनामार्फत विविध धोरण राबविण्यात येतील. या कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी त्याचा फायदा इतरांनाही होण्यासाठी प्रयत्न करावेत.

कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून नवनवीन माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच सर्वसमावेशक व शेतकऱ्यांच्या फायद्याचे कृषी धोरण राबविण्याचा विचार कृषी विभाग करत आहे, असे त्यांनी सांगितले.

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, शेतीत उत्पादन जास्त होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत नाही यासाठी नविन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे. या ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतमालाच्या उत्पादनासोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत हाईल. यावेळी माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या कृषी विषयक विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध कृषी उत्पादकांकडून माहिती जाणून घेतली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲग्री हॅकॅथॉन आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ, नविन तंत्रज्ञानाची माहिती, शेतीविषयक समस्या व त्यावरील त्रांत्रिक उपाय, पाणी टंचाई, जमीनीचे व्यवस्थान उत्पादनात वाढ या बाबींची माहिती शेतकऱ्यांना ॲग्री हॅकॅथॉन मधून मिळेल. या उपक्रमात १४० जणांची निवड झाली आहे. हे सर्व जण प्रदर्शनात सहभागी होऊन सादरीकरण करणार आहेत. यातून अंतिम १६ जणांची पहिल्या व दुसऱ्या स्थानासाठी निवड होईल. २ व ३ जून रोजी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, 3 जून रोजी समारोप होईल, असे त्यांनी सांगितले. डॉ. महानंद माने यांनी आभार व्यक्त केले.

सुभाष जगताप,सुनील टिंगरे राष्ट्रवादीला आता २ शहर अध्यक्ष तर रूपाली ठोंबरे,प्रदीप देशमुख सह 4 कार्याध्यक्ष

पुणे- सुभाष जगताप,सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीला आता २ शहर अध्यक्ष मिळाले आहेत तर रूपाली ठोंबरे,हाजी फिरोज शेख प्रदीप देशमुख अक्रूर कुदळे असे 4 कार्याध्यक्ष मिळाले आहेत अशी घोषणा आमदार चेतन तुपे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या सुचने नुसार केली आहे.तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत पुणे शहराचे पूर्व पुणे व पश्चिम पुणे असे दोन भाग करून प्रत्येक भागासाठी एक शहराध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष अशी रचना करण्यात आली आहे.

पुणे शहराचे पूर्व पुणे यामध्ये कसबा कॅन्टोन्मेंट हडपसर व वडगाव शेरी मतदारसंघाचा समावेश करण्यात आला तर
या चार मतदारसंघाला पूर्व पुणे म्हणून संबोधन पूर्व पुण्याच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे यांची निवड तर कार्याध्यक्षपदी श्रीमती रूपाली ठोंबरे व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून हाजी फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे.

पश्चिम पुणे, शहराच्या पश्चिम पुण्यामध्ये पर्वती, खडकवासला, कोथरूड ,व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेशया चार मतदारसंघाला पश्चिम पुणे म्हणून संबोधून पश्चिम पुण्याच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची फेरनिवड व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून श्री अक्रूर कुदळे यांची निवड करण्यात आली आहे
या निवडीची घोषणा आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली व या सर्वांची नियुक्तीपत्रे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेले आहेत
अजितदादांच्या सूचनेवरून आमदार चेतन तुपे यांनी ही नावे जाहीर केली
.

ज्येष्ठाला सहा कोटींचा गंडा घालणारा सायबर चोरटा अटकेत

पुणे- मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्टची भीती घालून ज्येष्ठाला सहा कोटी २९ लाखांचा गंडा घालणाऱ्या सायबर ठगाला पोलिसांनी पनवेल येथून सापळा लावून ताब्यात घेतले. सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाजंत्री याने पुण्यातील एका ज्येष्ठाला ९ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फोन करून पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या विरोधात मनी लॉंड्रिंगची केस असल्याचे सांगितले. तसेच चौकशीच्या बहाण्याने डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठाला पैसे पाठविण्यास सांगितले. ज्येष्ठाने वाजंत्री याला तब्बल सहा कोटी २९ लाख रुपये पाठविले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ज्येष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सायबर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. आरोपीच्या बँक खात्याचा तपास सुरू असताना ११ नोव्हेंबर २०२४ रोजी २० लाखांची रक्कम फिर्यादीच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आरोपीने ९० लाख आणि २० लाख रुपयांची एफडी केली. हे बँक खाते कोकबन येथील श्री. धावीर कन्स्ट्रक्शन यांचे असल्याचे उघड झाले. तर आरोपी हे बांधकाम व्यवसायिक असल्याचे समोर आले. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपी वाजंत्री आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहोचले. मात्र आरोपी साथीदारासह तिथून पसार झाले. आरोपी पनवेल मध्ये असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाजंत्री याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार अद्याप फरार आहे.

आरोपी तुषार वाजंत्री याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात ‘नॅशनल सायबर पोर्टल’वर एकूण पाच तक्रारी आहेत. या पाच गुन्ह्यात वाजंत्री याचा सहभाग असल्याचे उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. केरळ पोलीसही या आरोपींच्या मागावर होते. सायबर पोलीस केरळ पोलिसांच्या संपर्कात राहून या आरोपींचा शोध घेत होते. पोलीस वाजंत्रीच्या साथीदाराचा शोध घेत आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण, मुंढे, कोंडे, बाळासो चव्हाण, जानवी भडेकर, संदिप पवार, संदिप यादव, सचिन शिंदे, सतिश मांढरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; धनकवडीतील पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल


पुणे:सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लग्नात १५ लाखाचा खर्च करून देखील सासरकडील मंडळींकडून होणाऱ्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हरपळे आळी परिसरात घडली असून 6 एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतीक्षा राजेंद्र हरपळे (वय-27) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पती अभिषेक आनंद खळदकर, सासरे आनंद खळदकर, सासू सविता खळदकर, दीर चेतन खळदकर, जाऊ वैभवी खळदकर (रा. सर्व धनकवडी, पुणे) व निर्मला आवटे (पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उषा राजेंद्र हरपळे (वय ४७, रा. हरपळे आळी, फुरसुंगी ता हवेली जि पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उषा हरपळे या फुरसुंगी परिसरात राहतात. फिर्यादी यांचे पती राजेंद्र हरपळे यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. फिर्यादी यांनी शेती करून कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर मुलांना उच्च शिक्षण दिले. उषा हरपळे यांची मुलगी प्रतीक्षा हिचा अभिषेक खळदकर याच्याबरोबर सन 2020 साली विवाह झाला. यावेळी फिर्यादी यांनी सात तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १५ लाख रुपये खर्च करून विवाह मोठ्या थाटात साजरा केला होता.

प्रतीक्षाच्या विवाहाच्या काही दिवसानंतर पती अभिषेक खळदकर हा हाणमार करू लागला. त्यानंतर सासरकडील मंडळींनी माहेरहून पैसे आन म्हणून तगादा लावला होता. या वारंवार होणाऱ्या शारीरीक व मानसिक त्रासाला प्रतीक्षा कंटाळली होती. भांडणे सोडविण्यासाठी माहेरकडील मंडळी गेली असता, अभिषेक खळदकरच्या नातेवाईकांनी जोरदार भांडणे केली. तसेच प्रतीक्षाला घरात घेतले नाही.

दरम्यान, याप्रकरणी प्रतीक्षाच्या सासरकडील मंडळींच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४९८ अ ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये तक्रार नोंद केली असुन त्याची न्यायालयात सुनावली सुरु आहे. तसेच पोटगीसाठी कौटुंबिक न्यायालयात खटला सुरु आहे. प्रतीक्षाने लग्नात घातलेल्या दागिन्याची मागणी केली असता, पती अभिषेक खळदकर याने नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फिर्यादी उषा हरपळे यांनी प्रतीक्षाला माहेरी आणले होते.सासरकडील मंडळींनी दिलेल्या त्रासामुळे प्रतीक्षा ही खूप मानसिक तणावाखाली होती. या तणावाखाली तिने टोकाचे पाऊल उचलून राहत्या घरी लोखंडी खुर्चीच्या मदतीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशी फिर्याद प्रतीक्षाच्या आईने फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार पतीसह सासरकडील मंडळीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३१६ (२), ३५१ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

प्रतिक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये, अभिषेककडून माझे सगळे डाग आणि लग्नाचा खर्च घ्या. तस पण इथुन पुढे माझे आयुष्य खराबच झाले. माझ्या नशीबात हेच होते. मी मेल्यावर तरी सुखी होईल असे प्रतिक्षाने लिहिले आहे.

नशाबाज कार चालकाने सदाशिव पेठेत 12 जणांना उडवले..

पुणे :सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ एका चहाच्या टपरीवर एका वेगाने येणाऱ्या हुंडई ऑरा कारने जोरदार धडक दिली. या टपरीमध्ये एमपीएससीच्या ५ विद्यार्थ्यांसह १२ जण जखमी झाले. दारू पिलेल्या चालकाने गाडीवरील नियंत्रण गमावले आणि विद्यार्थी चहा पिण्यासाठी जमलेल्या स्टॉलवर धडक दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १२ जण जखमी झाले आहेत, ज्यात ५ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एका मुलीसह इतर ४ जणांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी संचेती आणि मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने अपघातस्थळी पोहोचले. निरीक्षक पवार यांच्या म्हणण्यानुसार, “चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि भरधाव वेगाने येणाऱ्या कारने भावे हायस्कूलजवळ रस्त्यावरील काही वाहनांना आणि लोकांना धडक दिली.” चालकाला अटक करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे.

1) किशोर हरिभाऊ भापकर वय 57 वर्षे
2) पायल आवेश कुमार दुर्गे वय 26 वर्षे
3) गुलनाज सिराज अहमद वय 23 वर्ष
4) सोनाली सुधाकर घोळवे वय 30 वर्ष
5) मंगेश आत्माराम सुरूसे वय 33 वर्षे
6) अमित अशोक गांधी वय 45 वर्षे
7) समीर श्रीपाद भालकीकर वय 45 वर्षे
8) सोमनाथ केशव मेरुकर व 28 वर्षे
9) प्रशांत ब्रह्मदेव बंडगर वय 30 वर्ष
10) अविनाश फाळके
11) प्रथमेश पतंगे
12)संदीप खोपडे

जागतिक स्तरावर भारतीय निर्यातदारांना वाढत्या संधी

  • डॉ. अजय सहाय यांचे प्रतिपादन; ‘फिओ’ व ‘मिटकॉन’ यांच्यातर्फे ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’
  • केंद्र सरकारच्या विविध निर्यातपूरक व उद्योगाभिमुख योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे: “देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख जागतिक पातळीवर सातत्याने उंचावत आहे. तसेच राष्ट्रीय स्तराप्रमाणे जिल्हास्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या निर्यातीसाठी विविध योजना आहेत. भारतीय व्यावसायिकांना निर्यातीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत”, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ-फिओ) महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी केले. या पार्श्वभूमीवर उद्योगाभिमुख व विविध निर्यातपूरक योजनांच्या मदतीने निर्यातवाढीच्या संधींचा निर्यातदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयांतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (एफआयईओ), मिटकॉन पुणे व कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’चे (निर्यात परिषद) आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘एफआयईओ’चे महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी वाढते निर्यात अर्थकारण, ई-कॉमर्स क्षेत्रातील निर्यात, निर्यात क्षेत्रातील जोखीम तसेच निर्यातीच्या संधी, योजना अशा मुद्यांवर विवेचन केले. याप्रसंगी फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स आणि मिटकाॅन यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या व कराराचे आदानप्रदान करण्यात आले. तसेच डॉ. अजय सहाय यांच्या हस्ते मिटकॉनच्या पिंपरी-चिंचवड केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे परिसरातील सात ते आठ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. मिटकॉनचे चेअरमन अजय अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे, चंद्रशेखर भोसले, डॉ. गणेश खामगळ, संकेत लोंढे आदी उपस्थित होते.

नगर रस्त्यावरील हॉटेल नोवोटेल येथे झालेल्या कार्यक्रमात ‘डीजीएफटी’चे अमित शर्मा, रिझर्व्ह बँकेच्या विदेशी चलन विनिमय विभागाच्या महासंचालक लता राधाकृष्णन, ईसीजीसीच्या महासंचालक अर्पिता सेन, इंडिया पोस्ट पुणे विभागाचे संचालक अभिजीत बनसोडे, कॅनरा बॅंकेच्या ट्रेझरी विभागाचे उपसंचालक केजेएस नाईक, मिटकाॅनचे व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विदेशी व्यापार महासंचालनालय, भारतीय पोस्ट, कॅनरा बँक, मिटकॉन व एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे २०० हून अधिक निर्यातदार, उद्योजक आणि स्टार्टअप प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते.

डॉ. सहाय यांनी केंद्र सरकारच्या निर्यात धोरणातील तरतुदी व बदल यांची माहिती उपस्थितांना दिली. ‘निर्यातीच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा घटक होण्याची संधी उद्योजकांसह स्टार्टअपवाल्यांनीही घेतली पाहिजे. त्यांच्यासाठी एफआयईओची प्रादेशिक कार्यालये त्यांना साह्यकारी ठरतील. डिजिटल माध्यमाद्वाराही निर्यातीच्या अनेक संधी आहेत. भारतीय टपाल विभागाच्या अनेक योजना आहेत. ई-कामर्स निर्यात क्षेत्र विस्तारत आहे. हे सर्व घटक अभ्यासून उद्योजकांनी देशांतर्गत व्यापारवृद्धीसह आंतरराष्ट्रीय पातळीवरही निर्यातीतून ठसा उमटवावा. २०३० पर्यंत दोन ट्रिलियन डाॅलर्सच्या निर्यातीचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे, ते साध्य करण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावे’, असेही डॉ. सहाय म्हणाले.

आनंद चलवादे यांनी सामंजस्य करार झाल्याचा आनंद व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड परिसरात मोठे औद्योगिक क्षेत्र विकसित झाले असून, राज्याच्या निर्यातीमध्ये मोठी भर घालण्याची क्षमता त्यामध्ये आहे. पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, मराठवाडा, खान्देशसह इतर भागात निर्यातीला पूरक क्षेत्र विकसित होत आहे. त्यामुळे निर्यात प्रशिक्षण अभ्यासक्रम, निर्यातदारांची समुपदेशन, मेन्टॉरिंग, याची सुविधा उपल्बध होईल. निर्यात क्षेत्रासंबंधी सर्व माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यातून दरवर्षी सुमारे १००० निर्यातदार तयार करण्याचे ध्येय आहे. त्यातून देशाची व राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल,. नवीन रोजगार उपलब्ध होतील, असे चलवादे यांनी नमूद केले. या उपक्रमात ‘फिओ’ सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन विभागीय संचालक श्री. तिवारी यांनी दिले.

अमित शर्मा यांनी ‘डिजिटल माध्यमातून निर्यातवाढ’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘जिल्हा निर्यात केंद्रे विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे’, असे ते म्हणाले. निर्यात कल, रिझर्व्ह बँकेची त्याविषयीची धोरणे, व्यापारवृद्धीतील चलन विनिमयासंबंधीच्या नियमावली, यांची माहिती लता राधाकृष्णन यांनी दिली. निर्यातवाढीसाठी एक्स्पोर्ट क्रेडिट इन्शुअरन्सचे महत्त्व, या विषयावर अर्पिता सेन यांनी सादरीकरण केले.

अभिजीत बनसोडे यांनी टपाल विभागामार्फत निर्यातीच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. डाकघर निर्यात केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा पातळीवरही निर्यातीची सुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. थेट पार्सल सेवाही सुरू असून, त्याचा लाभ निर्यातदारांनी घ्यावा, तसेच इंटरनशनल मेल प्राॅडक्ट ऑफरिंग सुविधाही असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सीएसनाईन एंटरटेनमेंट्सचे चेतन गिरी यांनी केले.

पुणे विमानतळाला ‘स्लॉट वाढीचा’ बूस्टर

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
  • हवाई वाहतुकीत वाढीसाठी मोकळा मार्ग

पुणे (प्रतिनिधी)

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उड्डाण स्लॉटमध्ये १५ ने वाढ करण्यात आली असून त्यामुळे येत्या काळात विमानांची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत २२० स्लॉट उपलब्ध होते. आता वाढलेल्या स्लॉटसह एकूण संख्येचा आकडा २३५ वर पोहोचला आहे. यामुळे विमानांची संख्या वाढणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विमान कंपन्यांची आणि प्रवाशांची पुणे विमानतळाला असणारी वाढती मागणी लक्षात घेता, अधिकचे स्लॉट उपलब्ध होणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हवाई दलाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यावरूनच हवाई दलाचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी स्लॉट वाढवल्याचे पत्र पाठवले आहे. सकाळी ६ ते रात्री १०ः२९ या वेळेत हे स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पुणेकरांना अधिक फ्लाइट्स, विविध गंतव्ये आणि उड्डाणांच्या वेळांमध्ये लवचिकता मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे विमानतळाच्या क्षमतेचा प्रश्न सातत्याने चर्चा होत होती. शहराची औद्योगिक, आयटी आणि शैक्षणिक वाढ लक्षात घेता, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मागणी वाढली आहे. स्लॉट वाढल्यामुळे नवीन फ्लाइट्ससाठी संधी उपलब्ध होणार असून, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबादसह काही नव्या शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी अपेक्षित आहे. स्लॉट ढीमुळे विमान कंपन्यांना सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळांमध्येही फ्लाइट्स सुरु करण्याची अधिक संधी मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या वेळेनुसार पर्याय मिळतील, तर कंपन्यांना अधिक महसूल संधी उपलब्ध होतील.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ वेगाने करण्याचा आमचा प्रयत्न आहेच, मात्र पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विविध पातळ्यांवर सक्षमीकरणालाही आमचे प्राधान्य आहे. याचाच भाग म्हणून विमानांची संख्या वाढविण्यासाठी अधिकचे स्लॅाट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. ज्याला यश आले असून आता उपलब्ध स्लॉटची संख्या २३५ वर गेली आहे. यामुळे विमानांच्या फेऱ्यांची संख्या वाढणार असून पुण्याची हवाई कनेक्टिव्हीटी आणखी मजबूत होणार आहे.’

सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली ‘आयसीएमएआय’ पुणेचे अध्यक्ष

दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या २०२५-२६ या कार्यकाळासाठी पदाधिकाऱ्यांची घोषणा
पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया च्या पुणे चॅप्टरच्या २०२५-२६ या कार्यकाळासाठी पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सीएमए राहुल चिंचोळकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सीएमए हिमांशू दवे यांची सचिव म्हणून तर सीएमए तनुजा मंत्रवादी यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

मावळते अध्यक्ष सीएमए निलेश केकाण यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला.  कार्यकारिणी सदस्य म्हणून सीएमए निलेश केकाण, सीएमए नागेश भागणे, सीएमए अमेय टिकले, सीएमए अनुजा दाभाडे आणि सीएमए निखिल अग्रवाल हे काम पाहतील. कर्वेनगर येथील सीएमए भवन येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

नवनियुक्त अध्यक्ष श्रीकांत इप्पलपल्ली म्हणाले, मागील २० वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत असून ‘आयसीएमएआय’ पुणे मध्ये ६ वर्षांपासून आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढविणे, सभासदांसाठी काही वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांच्या ज्ञानात कशा प्रकारे भर घालता येईल, याकरिता विशेष प्रयत्न करणार आहोत. पुणे  चॅप्टरचे नाव आजपर्यंत ज्या उंचीवर पोहोचले आहे, त्यामध्ये भर घालत ते अधिक उंचीवर नेण्याचा आम्ही प्रयत्न करू. ज्येष्ठ सदस्य सीएमए डॉ. डी.व्ही. जोशी, सीएमए डॉ. संजय भार्गवे, सीएमए अमित आपटे, सीएमए नीरज जोशी, सीएमए चैतन्य मोहरीर, सीएमए डॉ. एन. के. निमकर यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांचे व सर्व सभासदांचे आभार इप्पलपल्ली यांनी मानले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत.सन १९६५ साली पुण्यात स्थापन झालेल्या या विभागाने आजवर ४० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले असून २२०० हून अधिक विद्यार्थी प्रमाणित कॉस्ट अकाउंटंट्स म्हणून घडवले आहेत.

बाह्यस्त्रोत वीज प्रवाहाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महावितरण सकारात्मक – संचालक श्री. राजेंद्र पवार

पुणे, दि. ३१ मे २०२५ : महावितरणच्या ग्राहकसेवेचे कर्तव्य करण्यासाठी बाह्यस्त्रोत वीज कर्मचारी कर्मचारी देतात. त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी महावितरणचे प्रशासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी दिली (दि. ३१)

शनिवार पेठ येथील स्व. पोलीस दलाच्या मार्गदर्शक म्हणून संचालक श्री. पवार बोलत होते. सार्वजनिक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भूपेंद्र वाघमारे, प्रदेश अध्यक्ष श्री. नीलेश खरात, महामंत्री श्री. सचिनमध्ये गाळे समूह प्रमुख होती. मानव संसाधन विकास संस्था निवडीबद्दल श्री. पवार जगामधून सत्कार करण्यात आला.

संचालक श्री. राजेंद्र पवार सांगितले, महावितरणमधील विद्युत सहायक पदाच्या भरतीसाठी नुकतीच परीक्षा आहे. या भरतीमध्ये बाह्यस्त्रोत वीज वीज उत्पादन वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. तसेच अनुभव प्राप्त करण्यासाठी १० गुण देण्यात येत आहे. त्याचा अर्थी वीज उत्पादन निश्चित होईल.

कार्यक्रमाला उपमहामंत्री श्री. राहुल बोडके, संघटन मंत्री श्री. उमेश आगमनराव, पुणे झोन सचिव श्री. निखिल टेकवडे लोकसभा २२ उमेदवार उपस्थित होते.

PMO उपसचिवपदावरून नवल किशोर राम आता पुन्हा पुण्यात:महापालिका आयुक्त म्हणून रुजू

पुणे- महानगरपालिका महापालिका आयुक्त पदाचा पदभार नवल किशोर राम (भा.प्र.से) यांनी डॉ. राजेंद्र भोसले (भा.प्र. से) यांचे कडून आज दि. ३१/०५/२०२५ रोजी स्वीकारला. डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
पुणे महानगरपालिका महापालिका आयुक्त पदाचा पदभार नवल किशोर राम (भा.प्र.से) यांनी स्वीकारल्या नंतर, त्यांनी सांगितले कि, पुणे महानगर पालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे, तसेच सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे.
या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त, उपआयुक्त व खातेप्रमुख उपस्थित होते.नवल किशोर राम यांनी यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनतर त्यांची दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली होती. आता ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत येत राज्य शासनाच्या सेवेत रुजू होत आहेत. पुणे महापालिकेच्या कारभारात प्रशासनिक अनुभव असलेले आणि लोकाभिमुख कार्यपद्धती असलेले नवल किशोर राम यांची आयुक्तपदी झालेली ही नियुक्ती पुण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काही वर्षे काम केलेल्या आणि नंतर बदली होऊन गेलेल्या शितल तेली उगळे (Sheetal Teli-Ugale) यांच्याकडे पुण्यातील क्रीडा आणि युवा आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

पुणे महापालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आज 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर भारतीय प्रशासन सेवेतील (IAS) अधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, नवल किशोर राम यांनी आज 31 मे रोजी डॉ. भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारला . सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले होते .

नवल किशोर राम हे 2008 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून ते मूळचे बिहार राज्यातील आहेत. 2007 साली त्यांनी भारतीय शासकीय सेवेत प्रवेश केला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या सेवेला सुरुवात झाली. यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच बीड व संभाजीनगर जिल्हाधिकारी पदावर काम पाहिले आहे.

शिवसेना पक्षातर्फे विविध मतदार संघात व्यसनांची जाहीर होळी.

पुणे- ३१ मे जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त शिवसेना पक्षातर्फे पुण्यातील विविध विधानसभा मतदार संघात तंबाखूजन्य व्यसनांची जाहीर होळी करण्यात आली. कोथरूड, खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, येरवडा, गुडलक हॉटेल चौक अशा विविध ठिकाणी व्यसनांच्या होळीचे आयोजन शिवसेना पक्षातर्फे करण्यात आले.
या विविध कार्यक्रमात व्यसन विरोधी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती दिली. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा वर्ग हा व्यसना कडे ओढत चालला आहे , आणि याकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने जे जे लोक तंबाखू, गांजा, अमली पदार्थ पीक घेतात त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची शेती जप्त करावी. तसेच छोट्या छोट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं अशा कारखानदारांना कडक शासन देऊन त्यांची सर्व मालमत्ता जप्त करावी! या धुम्रपान वनस्पतीचा पाला कुठलाही प्राणी, जनावर खात नाही तरी माणूस का खातो? हे जनावरांना समजत पण माणसांना समजत नाही असे डॉक्टर गंगवाल म्हणाले.
पुणे महानगर प्रमुख व माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले शिवसेनेच्या वतीने आम्ही पुण्यामध्ये या धुम्रपान, ड्रग्ज आणि तंबाखूच्या विरोधात कायम आंदोलन करत राहू व जिथे जिथे ड्रग्ज सारख्या वस्तूंच प्रोडक्शन असेल तिथे छापे टाकून पोलिसांच्या मार्फत कारवाई करत राहू व तरुणांना या व्यसनापासून रोखण्याचा प्रयत्न करू. व्यसनमुक्ती क्षेत्रात गेली ४० वर्षे काम करणारे डॉ. कल्याण गंगवाल यांना पद्मश्रीने गौरविण्यात यावे असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देत असून पुढे केंद्र शासनाकडे देखील त्याची शिफारस होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे ते म्हणाले.
येरवडा येथील कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे हेमंत बत्ते, हडपसर येथे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे, गुडलक चौक येथे युवा सेना राज्य सचिव किरण साळी, खडकवासला येथे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, कोथरुड येथे श्रीछत्रपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर उदय भेलके आदींनी व्यसनांच्या होळीचे भव्यतेने आयोजन केले. यावेळी सुधीर जोशी, अविनाश खेडेकर, निलेश गिरमे, सुदर्शना त्रिगुणाईत राजाभाऊ चौधरी ,शंकर संगम ,उद्धव गलांडे ,विनोद करतात ,उदय खांडके मनोज अष्टेकर, रमेश साळुंखे, श्याम ताठे तसेच हडपसर व खडकवासला येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता आम्ही व्यसन करणार नाही याची शपथ घेऊन सिगारेट, तंबाखू याची होळी करून करण्यात आली.

घोडबंदर – भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार !मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदेंनी लाच घेतल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप.

राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट, तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा.

नवी दिल्ली/मुंबई, दि. ३१ मे २०२५
घोडबंदर-भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पावरून सुप्रीम कोर्टाने राज्यातील भाजपा युती सरकारला मोठी चपराक लगावली आहे. कोर्टात सरकारचे पितळ उघडे पडल्याने निविदा रद्द करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. या प्रकल्पात मोठे गौडबंगाल असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ हजार कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, या प्रकल्पातून दुसऱ्या निविदाधारकाचे टेंडर तांत्रिक बाबीचे कारण देत रद्द केले, या कामाचे टेंडर ज्या कंपनीला दिली ती मेघा इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? यामागे काय गौडबंगाल होते? हे आता सर्वांसमोर आले आहे. एमएमआरडीएने आता टेंडर रद्द केल्याने हा विषय संपत नाही, हा विषय भ्रष्टाचाराचा आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराचा कॉरिडॉर तयार केला असून एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, एसआरए यांचे एक सर्कल आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाराचे हे सर्कल सुरु आहे. यासाठी लाडके अधिकारी नियुक्त केले जातात आणि यातून लाडका ठेकेदार योजना राबविली जाते.

हा विषय केवळ एका प्रकल्पापुरता नसून राज्यात समृद्धी महामार्ग, पुणे रिंगरोड, विरार अलिबाग कॅारिडॅार व आता शक्तीपीठ महामार्ग हे सर्व प्रकल्प भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहेत. सत्तेतून संपत्ती व संपत्तीतून सत्ता हे दुष्टचक्र सुरु असून. ठाणे, मुंबई परिसरातील प्रकल्प हे या गौडबंगालाचे भाग आहेत. ५० खोके एकदम ओके चा पैस यातूनच आला. निवडणुकीतही पैसा फेक तमाशा देख चा पैसाही यातूनच आला होता, यांना सर्व रान मोकळे आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मिरा-भाईंदर, नवी मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांवर प्रशासक राज आहे आणि प्रशासक राज्य सरकार नियुक्त करतो. फडणवीस व शिंदे यांनी या माध्यमातून रॅकेट सुरु केले आहे. यातून तब्बल १ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत आहे. म्हणून या सर्व प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मराठी बासनात गुंडाळली…
शिवसेना नेते व परिवहन मंत्री प्रताप सरकारनाईकांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सरनाईक भाजपाचा अजेंडा चालवत आहेत, त्यांना मराठी नेस्तनाबूत करायची आहे आणि हिंदी व हिंदूराष्ट्र करायचे आहे. त्याच अजेंड्याची री सरनाईकांनी ओढली आहे. एकनाथ शिंदे सुरतमार्गे गुवाहाटीला पळाले तेव्हाच या पक्षाने मराठी बासनात गुंडाळून ठेवली आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सर्वात आधी आवाज उठवला, त्यानंतर इतर पक्षांनी तीच भूमिका घेतली होती. सक्ती शब्द परत घेण्याची घोषणा केली पण अद्याप त्याचा शासन निर्णय निघालेला नाही. यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे स्पष्ट असून महाराष्ट्राचे खरी मुख्यमंत्री अमित शाह असून राज्यात कठपुतलीचा खेळ सुरु आहे. परंतु मराठी व महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे असे सपकाळ म्हणाले.

माणिकराव कोकाटे ढेकळ्या मंत्री-

कृषी मंत्रालय हे ओसाड गावची पाटीलकी आहे या माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, हे मंत्री आहेत का वाचाळवीर असे म्हणायची वेळ आली आहे, त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली, आता त्यांनी जे विधान केले त्याचा अर्थ म्हणजे शेती राहिली नाही, उद्योगपतींची चाकरी करा असा आहे. हे कृषिमंत्री नाही तर ढेकळ्या मंत्री आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला..

भाजपकडून राज्यातील २२ नव्या जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा

मुंबई -भारतीय जनता पक्षाने राज्यातील रिक्त राहिलेल्या जिल्हाध्यक्षपदांवर आज अखेर घोषणा करत २२ नव्या नेत्यांकडे जिल्हास्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. याअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश असून, पक्ष संघटनात्मक पातळीवर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

याआधी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भाजपने जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली होती. मात्र काही जिल्ह्यांची नावे प्रलंबित होती. अखेर आज भाजप प्रदेश कार्यालयाकडून त्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

नव्याने नियुक्त करण्यात आलेले जिल्हाध्यक्ष:

    पालघर – भरत राजपूत

    वसई-विरार – प्रज्ञा पाटील

    अहिल्यानगर शहर – अनिल मोहिते

    नाशिक शहर – सुनील केदार

    नाशिक दक्षिण – सुनील बच्छाव

    नाशिक उत्तर – यतीन कदम

    पुणे दक्षिण – शेखर वडणे

    कोल्हापूर शहर – विजय जाधव

    गडचिरोली – रमेश बारसागडे

    चंद्रपूर शहर – सुभाष कासमगुट्टवार

    चंद्रपूर ग्रामीण – हरिश शर्मा

    वर्धा – संजय गाते

    परभणी ग्रामीण (शहराध्यक्ष) – सुरेश भुबंरे

    छत्रपती संभाजीनगर शहर – किशोर शितोळे

    तालुर शहर – अजित पाटील कव्हेकर

    लातूर ग्रामीण – बसवराज पाटील

    नांदेड उत्तर – किशोर देशमुख

    नांदेड दक्षिण – संतुकराव हंबर्डे

    बीड – शंकर देशमुख

मुंबईतील नियुक्त्या:

    उत्तर पश्चिम मुंबई – ज्ञानमूर्ती शर्मा

    दक्षिण मध्य मुंबई – निरंजन उभारे

    दक्षिण मुंबई – शलाका साळवी

भाजपच्या या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुताईंच्या नावे इच्छुक वर मुलांची फसवणूक:लग्नासाठी मुली असल्याचे दाखवून भामट्यांचा पैसे उकळण्याचा प्रयत्न; ममता सपकाळांचा इशारा

हवालदिल पालकांचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न

पुणे:

अनाथांच्या माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने काही भामटे लग्न न होणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी जनेतला अशा अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

ममता सिंधुताई या प्रकाराची माहिती देताना म्हणाल्या की, माई, पद्मश्री डॉ सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सोशल मीडियावर खोटे अकाउंट तयार करून, त्यावर लग्नासाठी मुली आहेत अस भासवून, त्यासाठी अमुक एक रक्कमेचा उल्लेख करून आपल्या मुलांसाठी मुलगी शोधत असणाऱ्यांची फसवणूक करणार्याच्या सध्या मी शोधात आहे.
दुसऱ्याच्या गरजांचा फायदा उठवणारे हे जे कोणी आहेत त्यांना कशाचीही भिती का बरे वाटत नसेल?

आम्ही पोलिसांची मदत घेणार

मध्यंतरी मी, दीपक दादा व विनय, आम्ही एक व्हिडिओ करून त्या द्वारे सध्या संस्थेत लग्नासाठी मुली नाहीत हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. पण आजच्या समाजाचं चित्रच इतकं विदारक आहे की लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. त्यामुळे अशा जाहिरातींना लोकं बळी पडताना दिसत आहेत. आम्ही पोलिसांची मदत सुद्धा घेणार आहोतच. पण त्याचबरोबर ठराविक काळाने ह्या पोस्ट सोशल मिडियावर टाकत राहणार आहोत.

ममता पुढे म्हणाल्या, मुळात आजवर आमच्या संस्थामध्ये जितके विवाह पार पडले ते जणू घरातली लेकबाळ सासरी जाते आहे या हेतूनेच तिची रीतसर पाठवणी केली गेली आहे. त्यासाठी आम्ही मुलाकडून एक पैसा घेतलेला नाही. आणि या जाहिराती बघाल तर त्यात पैशाच्या बदल्यात केवळ आमिष दाखवलेलं दिसून येत आहे. आजच्या घडीला माईंच्या कुठल्याही संस्थेत लग्नासाठी मुलीच नाहीयेत. कारण ज्या आहेत त्या आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. त्या त्यांच्या पायावर उभ्या झाल्याशिवाय संस्था त्यांना लग्नासाठी आग्रह करणारच नाही.

अजून किमान तीन वर्षे तरी संस्थेत लग्न नाही. आणि हेच आम्ही दररोज आम्हाला येणाऱ्या फोनवर सांगत असतो. अशा वेळी सुंदर मुलींचे फोटो दाखवून जर लग्नासाठी मुलगी हवी असेल तर आधी गेट पास काढा आणि त्यासाठी पंधरा हजार ऑनलाइन भरा अस सांगणारे विकृतच म्हणू नये तर काय म्हणावं. आधीच समाजातील मुलींची संख्या कमी असताना, नवऱ्या मुलासाठी मुलगी मिळत नसताना अशा हवालदिल आईबापांच्या मनस्थितीचा फायदा उचलणारे किती नीच मानसिकतेचे असतील याची कल्पना न केलेलीच बरी. म्हणूनच ही पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी, असे त्या म्हणाल्या.माईंच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या कृत्यांना वेळीच आळा घातला पाहिजे नाहीतर भोळ्या भाबड्या लोकांची फसवणूक यापुढेही होत राहील. माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या आसपास जर कोणी अशा पद्धतीने कुणाची फसवणूक करत असेल तर तो प्रकार लगेच उघडकीस आणा. संस्थेशी संबंधित संपर्क नं आहेत त्यावर कळवा. खात्री करून घ्या. आणि अशा भूलथापांना बळी पडू नका. सोबत स्क्रीनशॉट जोडले आहेत. गेल्या चार दिवसात बऱ्याच ठिकाणाहून मला हे स्क्रीनशॉट आले आहेत. यामध्ये जे मोबाईल नं आहेत त्यावर मी फोन करून झाले आहे. सुरुवातीला मलाही हा सिंधुताई सपकाळांचा महिलाश्रम आहे असं सांगण्यात आलं. जेंव्हा मी त्यांचीच मुलगी बोलते आहेत म्हणाले तेंव्हा फोन कट केलाय. माझ्याकडे ते ही रेकॉर्डिंग आहे, असेही ममता सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्य त्रिशताब्दी जन्मोत्सवा भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन


पुणे:- पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्य तिनशेव्या जन्मशताब्दीनिम्मित भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करणयात आले सारसबागे समोरील अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभा यावेळी आयोजित करण्यात आली
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे ,राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, राजेंद्र शिळीमकर, सुभाष जंगले ,वर्षा तापकीर ,प्रमोद कोंढरे, हर्षदा फरांदे विकास लवटे यांच्या सह नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात पारंपारिक वेष परिधान करून उपस्थित होत्या
यावेळी बोलताना शहराध्यक्ष घाटे म्हणाले ‘देशभरामध्ये गेले पंधरा दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन करण्याचे कार्यक्रम हे पक्ष स्तरावरचे दिले समाजात वेगवेगळ्या संस्था संघटनांनी सुद्धा राजमाता अहिल्यादेवींच्या त्री शताब्दी जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम केले पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे विचारधारा ही कायमच आपल्या देशातील महापुरुषांना वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो तीनशे वर्षांपूर्वी आपल्या देशातील एक महिना हा राज्यकारभार सांभाळत असताना खऱ्या अर्थाने धर्मनिष्ठ राज्यकारभार अहिल्यादेवींनी त्यावेळेस सांभाळला . आज आपण तीनशे वर्षानंतर या देशांमध्ये पाहतोय पण ३०० वर्षांपूर्वी त्या काळामध्ये महिला समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये पुढे येत नव्हत्या अशा काळामध्ये राजमाता अहिल्यादेवी राज्यकारभार सांभाळला ज्या काळामध्ये अनेक अनिष्ट रुढी होत्या त्या अनिष्ट रूढींना फाटा देत व दत्तक विधान असेल हुंडाबळी सरकार कायदा असेल या विषयावरती राजमाता अहिल्यादेवींनी काम खाजगी निधी मधला देशभरामध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी मंदिरांचा निर्माण असेल घाट बांधले असतील धर्मशाळा बांधले असतील या आहिल्यादेवी होळकरांच्या राज्याच्या कारभारात त्या काम करत असताना त्यावेळेस हे सगळे विकास काम ३०० वर्षांपूर्वी झाली आज आपण पाहतोय आज आपल्या देशात पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी हे सुद्धा राजमाता अहिल्यादेवींनी आखून दिलेल्या याच मार्गावरती त्याच विचारांचे काम आज देशभरामध्ये करता य यामध्ये अनेक ठिकाणी मंदिराचा निर्माण होतोय मंदिराचा अनेक ठिकाणी नवीन घाट बांधले जातात आपण अहिल्यादेवींच्या विचारांना अनुसरून राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करतोय असं या निमित्ताने मला सांगावसं वाटतं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी अहिल्यादेवींच्या त्रीशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने मी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी आहिल्यादेवींच्या पवित्र अभिवादन करतो आणि आज केवळ तिचा कार्यक्रम किंवा तीनशे वी जयंती आहे म्हणून आपण कार्यक्रम करून एवढ्या वरती थांबलो असेल तर भविष्यात पुढच्या काळामध्ये सुद्धा अहिल्यादेवींचा वारसा पुढे नेण्याचं काम चालू नाही तर काम आमच्या महिला पदाधिकारी महिला कार्यकर्त्यात यासुद्धा करतील आणि प्रत्येक महिला पदाधिकारी मी आलेल्या असं मनामध्ये निर्धार करून पुढच्या काळात आपण चांगलं काम या शहरांमध्ये करूयात आपल्या शहरातली मंदिरातील शहराचा घाट असेल याची स्वच्छता असेल अहिल्यादेवी या महादेवाच्या शंभू महादेवाच्या भक्त होत्या पुणे शहरामध्ये खूप ठिकाणी अशी प्राचीन सेवा मंदिर आहे या शिवमंदिरांची स्वच्छता असेल अनेक ठिकाणी असा या मंदिरांचा जीवनात झाला असेल आपल्या खासदार मीनाताई कुलकर्णी या ठिकाणी स्वागत करतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे काम हा वारसा देण्याचं काम आहे भविष्यात आपण आपल्या माध्यमातून करूयात आपल्या सर्वांच्या मदतीने मी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो’