बचतगटाच्या महिलांसाठी ‘फिक्की फ्लो’कडून ‘घरोबार’चे व्यासपीठ
३१व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत सतार व व्हायोलनची जुगलबंदी सादर
पुणे-३१व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. ११ सप्टेंबर रोजी 'सुरेल संवाद' हा कार्यक्रम सादर झाला. रंजनी प्रस्तुत’सुरेल संवाद’ या अभिनव कार्यक्रमात सतार व व्हायोलीन या वाद्यांचा सहवादन व वाद्यवृंदातून तसेच नृत्यप्रस्तुतीतून शब्द स्वरलयीचा संवादात्मक आविष्कार सादर झाला. सतारवादक कलाकार जया जोग आणि व्हायोलीन वादक डॉ. नीलिमा राडकर यांच्यावाद्यवृंद आणि नृत्यरचनांचा यात समावेश होता.
कार्यक्रमाचा प्रारंभ जया जोग आणि नीलिमा राडकर यांच्या यमन रागातील सहवाद्नाने झाला. त्यानंतर या दोघींच्या शिष्या प्रज्ञा
मेने, मानसी दांडेकर व अवंती गोखले (सतार) आणि पल्लवी ताम्हणकर, मृदुला साठे व दीपा कुडतरकर (व्हायोलीन) वाद्यवृंदानी रचना सादर केली.
सुरुवातीला ‘तू बुद्धी दे’ ही प्रार्थना व नंतर नीलिमा राडकर यांनी स्वरबद्ध केलेली भूप रागातील ”भावतरंग’ ही रचना तसेच
लोकप्रिय ‘छेड सखी सरगम’ हे गीत व जया जोग यांनी स्वरबद्ध केलेली इंद्रधनू ही सुद्ध स्वरांची रचना सादर केली. तबल्याची साथ केदार तळणीकर व आशिष बागेवाडी यांनी केली. कार्यक्रमाचे सहज सुंदर निवेदन रंजना काळे यांचे होते.
कार्याक्रमाची सांगता नृत्यप्रस्तुतीने झाली. शर्वरी भिडे, ऐश्वर्या साने व भक्ती झळकी यांनी कथ्थक नृत्य सादर केले. सुरुवातीला
नीलिमा राडकर यांनी शब्दस्वरबद्ध केलेली व अतुल खांडेकर यांनी गायलेली हे अधिनायक ही गणेशवंदना व त्यानंतर जया जोग
यांनी सतारीवर प्रस्तुत केलेल्या काफी रागातील स्वरचित रचनेवर नृत्यप्रस्तुती सादर केले. या प्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष
सुरेश कलमाडी यांचा हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सौ. मीरा कलमाडी, डॉ सतीश देसाई, मोहन टिल्लू,
श्रीकांत कांबळे याप्रसंगी उपस्थित होते.
दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर १५ सप्टेंबर २०१९ पासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मान्यतेखाली होणार आहे.
अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे, पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड आणि स्पर्धेचे प्रायोजक गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड यांनी सांगितले की, स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, पूना क्लब, डेक्कन जिमखाना, केडन्स, क्लब ऑफ महाराष्ट्र, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, आर्यन्स, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, अँबिशियस क्रिकेट क्लब, डीवाय पाटील क्रिकेट अकादमी, कंबाईन क्लबचा संघ आणि एमसीएने निवड केलेले महाराष्ट्रातल्या ५ झोनमधले ५ संघ (उत्तर, पश्चिम, पूर्व, मध्य आणि दक्षिण विभाग) असे एकूण १६ संघ निमंत्रित करण्यात आले आहेत. माजी महाराष्ट्राचे कर्णधार राजू भालेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज यांनी प्रायोजित केल्याने आम्ही त्यांचे आभार असल्याचे द्रविड यांनी सांगितले. या स्पर्धेचं वैशिष्ठ म्हणजे एकोणीस वर्षांखालील जिल्याहातील संघांना पुण्यातील क्लब मधील संघानंबरोबर खेळण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही एकमेव स्पर्धा आहे.
तसेच, हि स्पर्धा एकदिवसीय स्वरूपाची ४५ षटकांची घेण्यात येणार असून यामुळे कुमार स्तरावर अधिक चुरशीची अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतील सहभागी १६ संघांची चार गटात विभागणी करण्यात आली असून हि स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. चारही गटानंमधल्या सर्वोत्तम संघाना उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे.
अनिल छाजेड म्हणाले कि, क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांशी जोडले जाणे हा एक आनंददायक अनुभव असतो. त्यातच जेव्हा असे उपक्रम गुणवान खेळाडूना लक्ष ठेवून केलेले असतात. पीवायसी येथे होणाऱ्या या स्पर्धेबाबतही असेच म्हणता येईल. या स्पर्धेसाठी सर्व सुविधा आणि क्रीडा साहित्य तर देणार आहोतच पण या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या गुणवान खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीत सर्वोतोपरी मदत करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेला गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजला मुख्य प्रायोजकत्व म्हणून जोडले जाताना आनंद वाटत आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बीसीसीआयच्या वतीने १९ वर्षाखालील मुलांसाठी एकदिवसीय स्पर्धांना प्रारंभ होत असून या स्पर्धेमुळे आगामी मौसमासाठी सर्व खेळाडूंना तयारी करण्यास मदत मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना राजू भालेकर करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांनादेखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.
वाहतूक नियमभंग प्रकरणी वाढविलेल्या दंड आणि शिक्षेचा फेरविचार करावा – परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते
मुंबई : केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंड आणि शिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. याबाबत जनतेमध्ये मोठा रोष असून केंद्र शासनाने याचा फेरविचार करावा, तसेच याबाबत मोटार वाहन कायद्यात योग्य ते बदल करावेत, असे आपण केंद्र शासनास पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत केंद्रीय परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासनाने लागू केलेल्या दंडवाढीसंदर्भात राज्यात जोपर्यंत राज्य शासनाची अधिसूचना निघत नाही तोपर्यंत केंद्राने लागू केलेल्या दंडवाढीची राज्यात अंमलबजावणी होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. रावते म्हणाले की, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून आतापर्यंत केंद्र शासनाच्या मोटार वाहन कायदा १९८८ नुसार दंड आकारणी आणि शिक्षा केली जात होती. पण यानुसार होणारी दंडाची रक्कम ही फारच तुरळक असल्याने वाहनचालक त्याबाबत बेफिकीर असत. हे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने आपल्या अधिकाराचा वापर करुन २०१६ मध्ये दंडाच्या रकमेमध्ये थोडी वाढ केली. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि त्यांच्या जिवीताचे रक्षण व्हावे हा त्याचा उद्देश होता. रस्ते सुरक्षेबाबत राज्य शासन गंभीर असून लोकांनी वाहतुकीचे नियम काटेकोर पाळावेत, अशी अपेक्षा आहे.
पण, दरम्यानच्या काळात केंद्र शासनाने मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये सुधारणा करुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंड आणि शिक्षेमध्ये मोठी वाढ केली. याबाबत देशभरात लोकांमध्ये मोठी नाराजी असून ती वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत आहे. राज्यातही या दंड आणि शिक्षावाढीबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे वाढविण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा यांचा केंद्र शासनाने फेरविचार करावा, तसेच याबाबत मोटार वाहन कायद्यात योग्य ते बदल करावेत, असे आपण केंद्र शासनास कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी धरणावरुन 1 हजार 680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली आहे. या योजनेचा औरंगाबाद शहरातील सुमारे 16 लाख लोकसंख्येला लाभ मिळणार आहे.
मराठवाड्याची जीवनरेखा असणाऱ्या जायकवाडी धरणातील पाण्यातून औरंगाबादकरांची तहान भागविली जाते. वेगाने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहराची लोकसंख्यादेखील वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढत आहे. यासाठी जायकवाडी धरणातून जास्तीचे पाणी औरंगाबादला उपलब्ध करुन देण्याच्या पाणीपुरवठा योजनेस मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विश्वगुरू भारताला सामर्थ्य प्रकट करण्याची गरज -स्वामी गोविंददेव गिरी
पुणे-“ भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रनायक बनवायचा असेल तर या देशाला समर्थ स्वामी रामदास यांचे साहित्याचे वाचन करणे गरजेचे आहे. तसेच, भारत हा विश्वगुरू आहे फक्त आम्हाला त्याचे सामर्थ्य प्रकट करण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील प्रत्येकाला सशक्त बनने गरजेचे आहे.” असे विचार स्वामी गोविंददेव गिरी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. नारायण गुणे लिखित ‘विश्वगुरू भारत’ व प्राचार्य प्रभाकर नानकर लिखित ‘मनुष्यबळ व्यवस्थापन व दासबोध’ या ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवहर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू. डॉ. एस. परशूरामन, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, लेखक प्रा. नारायण गुणे, लेखक प्राचार्य प्रभाकर नानकर, डॉ. रामभाऊ रईच, अरूण आंबेकर, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ व प्रा.मिलिंद पात्रे उपस्थित होते.
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले,“भारताला विश्व गुरू बनण्याची गरज नाही कारण प्राचीन काळापासूनच तो आहेच. या देशात भारतीय संस्कृती, परंपरा ही सशक्त असल्याने या देशात कोणताही विचार बाहेरून आलेला नाही. आमच्या येथे वेदांपासून ज्ञान चालत आलेले आहे. फक्त आम्हाला ते व्यक्त करता आलेले नाही. त्यामुळे या देशाला जागविण्यासाठी समर्थ रामदास स्वामींना समजणे गरजेचे आहे.”
“आमच्या देशाची ऋषी परंपरा, आचार्य परंपरा संपूर्ण जगाला आव्हान करीत आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीची आंतरिक चेतना जागविण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले. शिकागो येथील त्यांच्या भाषणानंतर भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलेला आहे. २१व्या शतकात भारत विश्वगुरू होणार या संकल्पाचा शुभारंभ आज एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत होत आहे. ही विश्वगुरू होण्याची ही सुरूवात आहे.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारतीय संस्कृती ही वैष्णव परंपरा असून राम हे भारतीय संस्कृतीचे स्वरूप आहे. ७३० वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञान, विज्ञानाचा संदेश संपूर्ण मानवजातीला दिला होता. त्याचेच उच्चारण स्वामी विवेकानंदांनी वैदिक शिक्षण प्रणालीच्या माध्यामातून समाजाला दिला आहे. २१व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणून उदयास म्हणून येईल.”
प्रभाकर नानकर म्हणाले,“ दासबोध हे भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक आहे. १७ व्या शतकात खचलेल्या भारतीय समाजाला बळ देण्यासाठी समर्थांनी दासबोधाच्या माध्यमातून प्रबोधन केले. त्यांनी मनुष्य घडविण्याचे कार्य केले. त्यांच्याच वापर आज संपूर्ण जागतीक व्यवस्थापन शास्त्रात वापरल्या जाते. प्रत्येकाचा, घराघरातला, कुटुंबातील, समाजातील व देशाच्या व्यवस्थापनेचा खजिना यात आहे.”
प्रा.नारायण गुणे म्हणाले,“ या पुस्तकाची संकल्पना एक दिवस एक पान एक विचार अशी आहे.भारताचे दूरदर्शी ध्येय काय आहे. विश्वगुरू म्हणून भारत कसा उदयास येई शकतो आणि कोणत्या उपयांनी ते प्रत्यक्षात आणू शकतो हे नमूद केले आहे. यात स्वामी विवेकानंदांचे ३६५ विचारांचा समावेश आहे.”
पं. वसंतराव गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. अर्पिता वैशंपायन यांचे गीत गायन झाले. तसेच, आसावरी गुणे करमरकर यांनी सरस्वती वंदना केली.
प्रा.गौतम बापट यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.
पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत वेदांत खानवलकरचा मानांकीत खेळाडूवर विजय
पुणे, : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत बिगर मानांकीत वेदांत खानवलकरने सहाव्या मानांकीत स्वरनीम येवलेकरचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केली.
अक्षय शहाणे टेनिस अकादमी, भुगाव येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगर मानांकीत वेदांत खानवलकरने सहाव्या मानांकीत स्वरनीम येवलेकरचा 5-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुस-या मानांकीत नमिश हुडने विहान तिवारीचा 5-1 असा पराभव केला. सनत कडलेने सक्षम भन्सालीचा तर शौनक रणपीसेने अथर्व येलभरचा 5-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात अव्वल मानांकीत आरोही देशमुखने काव्या पांडेचा 5-3 असा तर दुस-या मानांकीत अस्मी टिळेकरने हर्षिता रत्नोजीचा 5-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकीत काव्या तुपेने सारा फेंगसेचा 5-2 तर वंशिका अगरवालने श्रीया होनकरचा 5-4(2) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
वेदांत खानवलकर वि.वि स्वरनीम येवलेकर(6) 5-3
ईडी चौकशीनंतर राज ठाकरे यांचे बोलणे कमी झाले
बारा मती – ईडी चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बोलणे कमी झाले, असे धक्कादायक विधान माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. बारामतीतील सोमेश्वर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकश्यांची भीती दाखवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 22 ऑगस्ट रोजी ईडीने राज ठाकरे यांची साडेआठ तास चौकशी केली होती. यावेळी ईडीच्या प्रश्नांना राज यांनी काय उत्तरे दिली ते अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. अशा कितीही चौकशा केल्या तरी माझं तोंड बंद राहणार नाही अशी पहिली प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेवर अजित पवार यांनी टोला लगावला आहे. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर राज ठाकरे यांचे बोलणे कमी झाले असल्याचे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इव्हीएम, मनुष्यबळासह सर्व पूर्वयारी पूर्ण- मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग
मुंबई: आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून इव्हीएम, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रशिक्षण आदी सर्व पूर्वतयारी झाली असून नि:पक्ष, निर्भय आणि पारदर्शी पद्धतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज दिली.
विधानसभा निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी श्री. सिंह यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी आबासाहेब कवळे उपस्थित होते.
हा पत्रकार संवाद केवळ निवडणूक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी असून निवडणूक तारखा जाहीर होण्याशी काहीही संबंध नाही असे प्रारंभीच स्पष्ट करत श्री. सिंह यांनी मतदार यादी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदींबाबत यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आल्यानंतर दि. 31 ऑगस्ट, 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आहे. असे असले तरी नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवसापूर्वी 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येत असल्याने यापूर्वी नोंदणी करु न शकलेल्या मतदारांना अजूनही मतदार नोंदणीची संधी आहे, असेही ते म्हणाले.
31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदार असून त्यामध्ये 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला आणि 2 हजार 593 तृतीयपंथी मतदार आहेत. 15 जुलै, 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार 4 कोटी 63 लाख 27 हजार 241 पुरुष, 4 कोटी 22 लाख 57 हजार 193 महिला आणि 2 हजार 527 तृतीयपंथी असे एकूण 8 कोटी 85 लाख 86 हजार 961 मतदार होते. 15 जुलैनंतर नंतर मतदार यादीमध्ये सुमारे 10 लाख 75 हजार 528 इतके नवीन मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत; तर 2 लाख 16 हजार 278 इतके मतदार वगळण्यात आले आहेत.
विहित केलेल्या कार्यपध्दतीचे पालन करुन मयत, अन्यत्र स्थलांतरीत, किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अंतिम मतदार यादीतील तसेच वगळण्यात आलेल्या नावांची यादी https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, तहसिलदारांच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. तेव्हा मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी आणि वगळण्यात आलेल्या नावांबाबत समस्या असल्यास पुन्हा योग्य पुराव्यांच्या आधारे मतदार नोंदणी करुन घ्यावी. ऑनलाईन मतदार नोंदणी तसेच यादीतील तपशिलात बदल करण्यासाठी ऑफलाईनबरोबरच ऑनलाईन सुविधाही उपलब्ध असून www.nvsp.in या संकेतस्थळाचा त्यासाठी वापर करावा.
राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यामध्ये 4 हजार 144 मतदान केंद्रांच्या वाढीसह एकूण 95 हजार 473 मतदान केंद्रे होती. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात येत असून लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या 700 ते 800 ने वाढण्याची शक्यता आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुलभ निवडणूका’ (ॲक्सेसिबल इलेक्शन्स) या घोषवाक्यानुसार अपंग मतदारांसाठी सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने पहिल्या किंवा त्यापेक्षा वरच्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रांना तळ मजल्यावर आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी यंत्रणेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच पुरेशा संख्येने इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध करुन घेण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे मतदान केंद्रांच्या तुलनेत बॅलट युनिट 175 टक्के, कंट्रोल युनिट 125 टक्के आणि व्हीव्हीपॅट 135 टक्के इतकी उपलब्ध करुन घेण्यात आली आहेत. सर्व इव्हीएमचे प्रथम स्तरीय चाचणीची (फर्स्ट लेव्हल चेक) कार्यवाही पूर्ण झाली असून याप्रसंगी राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
पूरग्रस्तांची मतदार ओळखपत्रे मोफत उपलब्ध करुन देणार
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे कागदपत्रे नष्ट झालेल्या मतदारांना विनामूल्य मतदार ओळखपत्रे देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे :
• इव्हीएम पूर्णत: सुरक्षित, सक्षम आणि दोषविरहीत असून कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाद्वारे त्याची सुरक्षितता भेदता येणे अशक्य आहे. त्याला सुरक्षिततेचा ‘हाएस्ट सेक्युरिटी प्रोटोकॉल’ आहे. विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये देखील या यंत्रणेला योग्य ठरविण्यात आले आहे. मात्र तरीही या यंत्रणेबद्दल काही घटकांकडून अपप्रचार केला जात आहे, ही बाब योग्य नाही त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये.
• सर्व मतदान केंद्रावर आवश्यक पाणी, वीज, शौचालय आदी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
• गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲप, राजकीय पक्षांना विविध परवानग्या देण्यासाठी ‘सुविधा’ पोर्टल, 1950 हा मतदार मदत क्रमांक या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
• राज्य सरकारचे ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारीदेखील संबंधित निवडणूक कार्यालयाकडे वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अभय योजना २०१९ अंतर्गत ३ हजार 500 कोटी रुपयांचा कर भरणा – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : वस्तू आणि सेवा कर विभागाने अंमलात आणलेल्या अभय योजना २०१९ अंतर्गत विवादित कर, व्याज, शास्ती, विलंब शुल्काच्या थकबाकीच्या रकमेपोटी ऑगस्ट २०१९ पर्यंत साधारणत: ३ हजार 500 कोटी रुपयांचा कर भरणा झाला असल्याची माहिती वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यात एक जुलै २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाली. त्यापूर्वी राज्यात करविषयक अनेक कायदे अमलात होते. काही कर विषयक कायद्यांचा वस्तू आणि कर प्रणालीत समावेश करून ते निरसित करण्यात आले. जुन्या कायद्यातील ३.७३ लाख प्रकरणे आणि खटले प्रलंबित असून त्यात कोट्यवधी रुपयांचा कर महसूल अडकून पडला होता, म्हणून शासनाने वस्तु आणि सेवा कर कायदा येण्यापू्र्वी अस्तित्वात असलेल्या कायद्याअर्तगत ३० जून २०१७ रोजी किंवा त्यापूर्वी संपणाऱ्या कालावधीसाठी आकारलेले कर, व्याज, शास्ती, किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीच्या तडजोडीसाठी अभय योजना २०१९ आणली व त्यातून विवादित कर, व्याज, शास्ती, किंवा विलंब शुल्क, थकबाकीची तडजोडीच्या प्रकरणांना अंशत: माफी देऊन कर भरण्यास प्रोत्साहन दिले. यातून १.४० लाख प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन ३ हजार पाचशे कोटी रकमेचा भरणा केला आहे, अशी माहिती ही श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
पुणे महापालिकेकडून 100 कंत्राटी कामगारांना डच्चू …
पुणे- महापालिकेच्या मुख्य इमारतीत आणि शहरातील महापालिकेच्या अन्य ठिकाणी असलेल्या कार्यालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सुमारे १५० कंत्राटी कामगारांना या महिनाभरात महापालिकेने डच्चू दिला असून याबाबत मोठी गोपनीयता पाळण्यात आल्याचे दिसून आले आहे . यातील अनेक कामगार ५ ते १० वर्षांपासून पालिकेच्या सेवेत होते असे दिसून आले आहे .
कंत्राटी पद्धतीवर कामगार घ्यायचे आणि त्यांच्या कंत्राटी कंपन्यांची नावे वर्ष ,सहा महिन्यांनी बदलत राहायचे आणि तेच कामगार कामावर ठेवायचे या पद्धतीने गेली १० वर्षापासून महापालिकेत असंख्य कामगार काम करत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.असे सुमारे 200 कामगार काम करत होते असे सांगण्यात येते आहे, यातील 100कामगारांना गेल्या चाळीस दिवसात डच्चू देण्यात आला आहे . यामध्ये महापालिकेच्या विविध वास्तूत लिफ्टमन म्हणून काम करणारे पूर्वी सुमारे ७० कामगार होते आता केवळ ३५ लिफ्टमन उरले आहेत . महापालिका भवनात केवळ महापौरांसाठी स्पेशल लिफ्ट ठेवून त्यावर लिफ्टमन ठेवण्यात आला आहे आणि आयुक्त कार्यालयात नेणाऱ्या लिफ्ट वर लिफ्ट मन ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या मुख्य भवनात असलेले अन्य लिफ्टमन घरी पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. मध्यंतरी पावसात एका लिफ्ट मधून धो धो पावसाची गळती झाली होती हि बाब मुख्य सभेत उपस्थित केली गेली नाही . सुरक्षा कर्मचारी या वर्गातील कर्मचाऱ्यांची मोठी कपात करण्यात आली आहे. सातत्याने ठेका पद्धतीवर बदल करून येथे कामगार पिळवणूक मोठ्या प्रमाणावर होत असताना येथे वर्गण्या गोळा करणारी कर्मचारी नेते मंडळी देखील कामगार हिता ऐवजी स्वहित जपत असल्याचा आरोप होतो आहे. महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये ,रुग्णालये ,कोठ्या अशा अनेक ठिकाणी कामगार हिताची गळचेपी होता असून तरुण वर्ग यात भरडला जातो आहे पण याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देत ना अधिकारी ,ना कामगार नेते लक्ष देतात अशी स्थिती असल्याने गरजू ,कंत्राटी तरुणाई ला कोणी वाली उरला नसल्याचे दिसते आहे .मान्य पदांवर भरती करायची नाही त्या जागा रिक्त ठेवायच्या त्या भरण्याबाबत काहीही कार्यवाही करायची नाही आणि एखाद्या ठेकेदाराशी संगनमत करून त्यामार्फत कामगार नेमणूक दाखवायची आणि या ठेकेदाराच्या कंपनीचे नाव सातत्याने बदलत ठेवून तेच कामगार विविध कंत्राटदारामार्फत पालिकेचे काम करत असल्याचे दाखवायचे हि पद्धत आता रूढ होत चालली आहे.
गेल्या २ वर्षापूर्वी माय मराठी ने मिळकत कर विभागात काही तरुण अनधिकृत रित्या काम करत असल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते .त्यावेळी संबधित एका तरुणावर पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला तर दुसऱ्या तरुणाला आसरा देण्यात आला. या सर्व प्रकार मागे काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे संगनमत असल्याचे समजते आहे .अशा पद्धतीने सुमारे २०० कामगार कोणतेही नियुक्तीपत्र नसताना ,ओळखपत्र नसताना महापालिकेत काम करत असल्याचे स्पष्ट होवून देखील याकडे दुर्लक्ष करून मौन पाळत हे विषय मागे टाकण्यात आले होते .त्यानंतर कंत्राटी पद्धतीला प्राधान्य देण्यात आले पण त्यात अशा पद्धतीची पिळवणूक सर्रास होते आहे .आज ना उद्या आपण महापालिकेच्या सेवेत घेतले जावू या आशेने अवघ्या ७ ते ९ हजार रुपये पगारावर गरजू तरुणाई ची फसवणूक होताना दिसत असूनही सारे कसे मौन धरण करीत आहेत हे गूढ आहे .
हर्षवर्धन पाटीलही गेले -भाजपची इंदापूर येथून मिळणार उमेदवारी
मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशासोबतच आगामी विधानसभा निवडणीत इंदापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाची 5 वर्षांपासून प्रतीक्षा होती असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी हर्षवर्धन बोलतांना म्हणाले की, कार्यकर्त्यांना अद्याप वाटत नाही की मी भाजपामध्ये आलो. हा अन्यायग्रस्त समाज आहे पण या समाजाला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ द्यावे. आम्ही एका विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत, पण आता आम्ही विकासाच्या मुद्यांवर इथे आलो आहोत. मी कुठलीही अट घालून पक्षात आलेलो नाही. मुख्यमंत्र्यांचा हसरा चेहरा आहे, आता त्यांच्याबरोबर हर्षवर्धन आलेला आहे. मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजार नाही. आमच्या मतमतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडवा असेही ते म्हणाले.
गणेश विसर्जन काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण सज्ज
पुणे -गणेश विसर्जन व मिरवणुकीच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणद्वारे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले असूनअधिकारी व कर्माचा-याचे पथक मिरवणुकीच्या मार्गावर व विसर्जनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. विजेबाबतकोणतीही तक्रार असल्यास त्वरित त्याचा निपटारा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
गणेश विसर्जनाच्या व मिरवणुकीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व वेळीच मदत देण्यासाठी नियंत्रण कक्षाकडून यावरलक्ष ठेवण्यात येणार आहे. गणेश मंडळाकडून व नागरिकांकडून तक्रार आल्यावर त्वरित कारवाई करण्यात येणार असून नियंत्रणकक्षाकडून याचा पाठपुरवा करण्यात येईल. विजेबाबत कोणतीही तक्रार असल्यास महावितरणच्या टोल फ्रि क्रमांक १९१२\१८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
मिरवणुकीच्या मार्गावर उच्च व लघुदाब वाहिन्या, फिडर पिलर तसेच अन्य यंत्रणा आहेत. तेंव्हा मिरवणुकीची वाहने व देखावे हे
मिरवणुकीच्या वेळी सुरक्षित अंतरावर राहतील याची गणेश मंडळानी काळजी घ्यावी, असे आहवान महावितरणद्वारे करण्यात येतआहे.
केंद्र सरकारच्या चूकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदीचे सावट – रमेश बागवे
पुणे-केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे आणि सेवा ठप्प झाल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम
महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजुर तसेच समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्यांक आणि
दारिद्रय रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे. या आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई,
शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योगधंदे याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा
काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन
करण्यात आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, केंद्र सरकारच्या चूकीच्या
आर्थिक धोरणामुळे देशात मंदीची परिस्थती निर्माण झाली आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळात
सन २०१० ते २०११ मध्ये १०.८% असलेला जीडीपी २०१९ मध्ये विद्यमान सरकारच्या
काळात ५% पर्यंत घसरला आहे. देशातील सुमारे १९ लाख कंपन्यांना वर्षभरामध्ये टाळे लागले
असून त्यापैकी सर्वाधिक १.९२ लाख कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. जागतिक बँकेच्या
अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेची ५ व्या स्थानावरून ७ व्या स्थानावर घसरण झाली
आहे. वाहन क्षेत्रात २ लाख नोकऱ्यांवर गदा आली आहे व १० लाख रोजगारावर कुऱ्हाड कोसळली
आहे. महाराष्ट्रावर सुमारे ५ लाख कोटीचे कर्ज आहे. भारताच्या बेरोजगारीने ४५ वर्षांचा उच्चांक
मोडला आहे. मंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या
आहेत. उद्योगक्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रावर देखील मंदीचा परिणाम झाला आहे. मराठवाड्यामध्ये
अपुरा पाऊस झाला आहे व या भागातील पिके पावसा अभावी करपून गेली आहेत. स्वामीनाथन
आयोगाची अमंलबजावणी, शेती मालाला दिड पट हमी भाव, संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी
पेन्शन आदी कारणांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी जूनमध्ये संप केला होता. मात्र सरकारने
शेतकऱ्यांच्या मागण्यांना जाणीवपूर्वक बगल दिली आहे. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत
आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असताना सुध्दा गुन्हे रोखण्यात ते अपयशी ठरले. सरकारने
अर्थव्यवस्थेला लागलेली उतरती कळा थांबविण्यासाठीतातडीने पाऊल उचलावे अन्यथा जनतेच्या
हिताकरीता तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षातर्फे करण्यातयेईल.’’
आमदार अनंतराव गाडगीळ, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड यांचीही भाषणे झाली.
त्यानंतर काँग्रेस पक्षाचे शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी मा. नवल किशोर राम यांना भेटून निवेदन
सादर केले.
यावेळी नगरसेवक मनीष आनंद, अविनाश बागवे, रफिक शेख, रमेश अय्यर, महिला
अध्यक्षा सोनाली मारणे, रजनी त्रिभुवन, साहिल केदारी, सुजित यादव, राजेंद्र शिरसाट, यासीन
शेख, प्रशांत सुरसे, गोपाळ पायगुडे, संजय कवडे, चेतन आगरवाल, सचिन आडेकर, सुनिल घाडगे,
प्रदिप परदेशी, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, अशोक लांडगे, बाबा नायडू, शिलार रतनगिरी,
नारायण पाटोळे, लुकस नायडू, लतेंद्र भिंगारे, राजू गायकवाड, विनय ढेरे, संतोष डोके, रणजित
गायकवाड, कल्पना भोसले, मंदा जाधाव, वैशाली पारखी, शितल जाधत, अलका मोरे, सुरेखा
जाधव, शर्वरी गोतारणे, रजिया बल्लारी, ज्योती अरवेन, छाया जाधव, नंदा ढावरे, मीरा शिंदे, दुर्गा
देशमुख, ललिता जगताप, रूपाली गायकवाड, संगीता क्षिरसागर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मायमराठी चा दणका …पालिकेची कारवाई
पुणे-महापालिकेचे लोगो असलेले टी शर्ट बाजारात उपलब्ध या हेडिंग ची बातमी फ़ोटो सह मायमराठी ने 4 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केल्यावर संबधित कापड व्यापाऱ्या वर कारवाई करून पालिकेच्या भवानी पेठ क्षत्रीय कार्यालयाने हे टी शर्ट जप्त केले आहेत. अशी माहिती जनसंपर्क प्रमुख संजय मोरे यांनी कळवली आहे.भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांनी ही कारवाई केली.
एका जागरूक पुणेकराने हि बाब फ़ोटो काढून निदर्शनास आणून दिली होती, आणि या टी शर्ट वर लोगो पालिकेचा असल्याने ते कोणी घालून पालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवू शकतात याकडे लक्ष वेधित सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता.




