जुन्नरमध्ये उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक
सायबर गुन्हेगारीमध्ये भारतीयांची फसवणूक अधिक- संदीप गादिया
सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सायबर सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी गोखले बोलत होते. ‘सुर्यदत्ता’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या राष्ट्रीय परिषदेवेळी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, सायबर सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा, सायबर कायदेतज्ज्ञ ऍड. राजेश पिंगळे, सायबर तज्ज्ञ ऍड. प्रशांत माळी, संदीप गादिया, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, संचालक डॉ. शैलेश कासंडे, कॅप्टन शालिनी नायर, व्यवस्थापक सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी संभाजी कदम, ऍड. प्रशांत माळी, संदीप गादिया यांना ‘सूर्यदत्ता नॅशनल सायबर इंटेलिजन्स अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.
दत्तात्रय शेकटकर म्हणाले, “वाढती सायबर गुन्हेगारी आव्हानात्मक बनली आहे. विविध सोशल नेटवर्ककींग साईट्स, मोबाईल ऍप्समुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण त्याच्या आहारी जात असून, इंटरनेट बंद पडले की आपले सर्व काम थांबते, अशी स्थिती आहे. येत्या काळात मोबाईल फोन मानवापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. काही मुलांकडे दोन-तीन मोबाईल असल्याचे दिसते. हे चुकीचे असून, इंटरनेटचा गरजेपुरता वापर व्हावा. भारतीय भूमीवर खूप बुद्धीमानी लोक जन्माला येतात. त्यांच्या बुद्धीची अमेरिकेसारख्या देशालाही भीती वाटते. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करून अभ्यास-वाचन करण्यावर भर दिला पाहिजे.”
संभाजी कदम म्हणाले, “जगाच्या कान्याकोपऱ्यात बसून अनकेजण ऑनलाईन फसवणूक करत आहेत. त्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. त्यासाठी सोशल मीडिया, ऑनलाईन शॉपिंग अश्या गोष्टीचा वापर करताना काळजी घ्यावी. तसेच देशात बँकिंग फसवणूक वाढत चालली आहे. प्रत्येकाने आपली बँकेसंबंधित वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नये. फक्त इंटरनेट आणि कॉम्प्युटरची गरज असल्यामुळे सध्या ‘फिजिकल’ गुन्हेगारीपेक्षा ‘व्हर्चुअल’ गुन्हेगारी वाढत आहे. सध्या सोशल मीडियावर इतरांचे प्रोफाइल हॅक करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आपले प्रोफाईल हॅक होऊ नये, यासाठी आपल्याला येणाऱ्या फसव्या ईमेल आणि मेसेजवर करडी नजर ठेवावी. लाखो रुपयाच्या लॉटरीचे अमिष दाखवले जाते. ऑनलाइन शॉपिंगवेळी आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती वेबसाईटवरून चोरली जाऊ शकते. याचा गांभीर्याने विचार करून प्रत्येकाने इंटरनेट आणि सोशल साईट्स वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.”
डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा म्हणाले, “सायबर गुन्हा करणारे हॅकर इतर देशांत असून आर्थिक, मानसिक फसवणूक करतात. त्यामुळे त्यांना पकडणे खूप कठीण असते. त्यात्या देशाचे संरक्षणविषयक धोरण ठरलेले असते, त्यामुळे आपल्या पोलिसांना जाऊन त्यांना पकडणे अवघड जाते. फसवणूक झालेल्या व्यक्तीला लवकर न्याय मिळत नाही. यासाठी आपण त्यांना बळी पडू नये. भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्याचपद्धतीने स्वच्छ सायबर अभियान राबवणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारने पाऊल उचलणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीची सजगताच आपल्या सर्वाना सुरक्षित ठेवू शकते.”
ऍड. प्रशांत माळी म्हणाले, “मोबिफिया नावाचा रोग सध्या जोमात आहे. सतत मोबाईल हातात असणे, त्याचा वापर करत राहणे, यामुळे हा रोग झाला आहे. अनकेजण मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहण्यात घालवतात, वेगवेगळ्या साइटवरून लिंक ओपन होताना दिसतात आणि त्या लिंकमध्ये पैसे भरण्यासाठी सांगितले जाते. त्यातून आपली आर्थिक लूट केली जाते. पॉर्न व्हिडिओ मोबाईलमध्ये ठेवल्यास कायद्याने गुन्हा ठरतो. तसेच १८ वर्षाखालील मुलींचे व्हिडिओ पाहत असाल किंवा आपल्या मोबाईलमध्ये ठेवाल, तर सात वर्ष कैद आणि १० लाखांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे चित्रफिती पाहताना किंवा साठवून ठेवताना आपण विचार करणे गरजेचे आहे.”
संदीप गादीया म्हणाले, “मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तींच्या ठिकाणाच्या डिजिटल फूटप्रिंट उमटलेल्या असतात. आपण कुणाच्या तरी निगराणीखाली असतो. ‘गुगल’कडे आपली प्रत्येक माहिती आहे. आपल्या फिरण्या-खाण्याविषयी, काय करतो त्याविषयी अशा सर्व हालचालींवर ‘गुगल’चे लक्ष आहे. बऱ्याचदा इतरांचा मोबाईल, कॉम्प्युटर घेतो, हे कायद्याने गुन्हा आहे. नायजेरियन फ्रॉडमध्ये लॉटरी लागल्याचे सांगून फसवले जाते. यामध्ये सर्वात जास्त भारतीयांची फसवणूक होत आहे. नासासारख्या जागतिक संस्थानाही सायबरचा फटका बसला आहे. रशियाच्या हॅकरने त्यांच्या सॅटेलाईटची दिशा बदलली होती. त्यामुळे सायबर धोका किती मोठी आहे याची प्रचिती येते.”
..आणि सकाळी आठ वाजता आला तो क्षण (व्हिडीओ )
पुणे: उत्स्फुर्तपणे दर्शनाला लोटलेल्या भक्तगणांच्या डोळ्याचे पारणे फेडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजाने आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुणेकरांचा निरोप घेतला. या गणरायाच्या छोट्या मूर्तीचे पांचाळेश्वर घाट येथील हौदात विसर्जन करण्यात आले. मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीत पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विनायक रथालरील एलईडी दिव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विलोभनीय दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी अलका चौकात मोठी गर्दी केली होती. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी अलका चौकात गणपतीची आरती केली. यानंतर महापौरांनी या गणपतीच्य रथाचे सारथ्यही केले.
श्रीमंतांचे ते मोहक रूप,नयनी साठवाया ,लक्ष्मी रस्त्यावर भक्तगण लोटला (व्हिडीओ)
पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजावर श्रद्धा असणारी आणि त्याचे मोहक रूप सदैव डोळ्यात जपू पाहणारी भक्त गण मंडळी पहाटे 4 वाजता श्रीमंतांची स्वारी लक्ष्मी रस्त्यावर येताच.. तृप्त जाहली … गणराजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या समयीचे दर्शन घेण्यासाठी भाविक रात्र जागून काढतात .तो क्षण चुकायला नको म्हणून श्रीमंतांची प्रतीक्षा करतात आणि स्वारी चे दर्शन होताच तृप्त होवून माघारी परततात .. लक्षी रस्त्यावरील श्रीमंतांच्या मिरवणुकीची हि एक झलक ..
उदयनराजे भोसले 14 तारखेला पंतप्रधानांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. अखेरीस त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 14 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
उदयनराजेंनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याच चर्चा सुरु होती.पुण्यातील मोदी बागेत उद्ययनराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीनंतर उदयनराजेंचं मनपरिवर्तन होईल आणि ते भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, उदयनराजे 14 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 सप्टेंबर रोजी साताऱ्यात येत असलेल्या महा जनादेश यात्रेत ते सामील होणार असल्याचंही बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन
मुंबई, दि. 12: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आदी मान्यवर तसेच कुटुंबीय उपस्थित होते.
“राज्यातील दुष्काळ व पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभारी घेण्याचे बळ दे, राज्याच्या जनतेवरील सर्व संकटे दूर करण्यासाठी, दुष्काळमुक्तीसाठी राज्य शासनातर्फे करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर समृद्धीचे हास्य घेऊन पुढच्या वर्षी लवकर ये,” असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणरायाला साकडे घातले.
श्री गणरायाच्या निरोपासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी
मुंबई, दि. 12 :- श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली.
यावेळी उद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पदुम मंत्री महादेव जानकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास, महापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणूक अनुभवण्यासाठी विविध देशांतून आलेली पर्यटक, विविध देशांच्या दुतावासातील उच्चाधिकारी, मान्यवर आदी उपस्थित होते. चौपाटीवर श्री गणेशाच्या विसर्जनासाठी जनसमुदायाची अलोट गर्दी झाली होती.
गणेश भाविकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दल, एसआरपीएफ, फोर्स वन, क्युआरटी, फोर्स वन, रॅपिड ॲक्शन फोर्स, एनडीआरएफ, महापालिकेच्या विविध यंत्रणा, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक सज्ज होते. सुरक्षेच्या कारणास्तव चौपाट्या आणि विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांनी ड्रोनद्वारेही लक्ष ठेवण्यात आले होते.
मानाच्या पाच गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन (नयनरम्य व्हिडीओ)
पुणे – शहरातील मनाच्या गणपतीच्या मिरवणूकीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. महापौर मुक्ता टिळक आणि खासदार गिरीश बापट, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मनाच्या कसबा गणपतीची आरती करून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भाजप शहराध्यक्ष मधुरीताई मिसाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, नगरसेवक प्रसन्न जगताप, महेश लडकत, आदित्य माळावे, राजेश येनपुरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, गायत्री खडके , मनीषा लडकत, रिपाईचे मंदार जोशी यावेळी उपस्थित होत्या. दरम्यान, या मानाच्या पहिल्या गणपतीचे पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्यात मनमोहक दृश्य कैद करण्यात आले आहेत.
मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला 10 वाजल्यापासून सुरुवात झाली. यावेळी गणरायासाठी चौका-चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या. सर्व मार्गाने पायघड्या आणि ध्वजमय वातावरण झाले. याच दरम्यान राणी लक्ष्मीबाई मुलींची शाळा यांच्या वतीने मुलींकडून मल्लखांबचे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आले आहे. शहरातील गणेश विसर्जनसाठी खडकवासला धरणातून सकाळी 11 पासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. रात्री 1700 क्यूसेक असलेला विसर्ग सकाळी 11 वाजता 3400 क्यूसेक करण्यात आला आहे.
मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी रवाना
मानाचा पहिला कसबा गणपती दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी टिळक चौकातून महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ स्वीकारून विसर्जनासाठी रवाना झाला. फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरासाठी सुमारे 5 तास लागले.
4.20 PM – पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीचे मुठा नदीच्या नटेश्वर घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन. सकाळी साडेदहा वाजता कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती.
4.50 PM – मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचेही नटेश्वर घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन.
5:52 PM – मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे नटेश्वर घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन.
5:55 PM – तुळशीबाग आणि केसरी वाडा गणपती मिरवणुकीचा अंतिम टप्पा असलेल्या अलका चौकातून पुढे विसर्जनासाठी रवाना.
6:07 PM – मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन.
सायंकाळी 6: 30 -मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचेही पांचाळेश्वर घाटावर कृत्रिम हौदात विसर्जन
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन झाले आहे..सकाळी साडेदहा वाजता या गणपतींच्या मिरवणुकीला सुरवात झाली होती..त्यानंतर सायंकाळी 6: 30 मिनीटांनी या मानाच्या गणपतींची मिरवणूक संपली…
मनसेच्या रुपाली पाटील यांना विसर्जन मिरवणूक काळात शहर बंदी…
पुणे- कसबा विधानसभा मतदार संघातील मनसे च्या इच्छुक उमेदवार म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ,त्या मनसे च्या माजी नगरसेविका अॅड.रुपाली ठोंबरे पाटील यांना आज पोलिसांनी सी आर पी सी १४४ (२) अन्वये नोटीस बजावून पुणे शहर पोलीस दलाच्या परिमंडल 1 च्या हद्दीत वास्तव्य आणि प्रवेश करण्यास मनाई करणारा हुकुम बजावला असल्याची माहिती खुद्द रुपाली पाटील यांनी दिली .या आदेशान्वये त्यांना दिनांक ११ तारखेला नोटीस बजावले पासून ते १३ तारखे पर्यंत या हद्दीत राहता येणार नाही या हद्दीच्या बाहेर राहावे लागणार आहे . गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी हि नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय होतो आहे . आणि या कारवाई चा धिक्कार करत रुपाली पाटील यांनी ,पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हि सूड बुद्धीने केलेली कारवाई आहे असे म्हटले आहे .
या नोटिशीची प्रत आणि त्या सोबत रुपाली पाटील यांनी आपले म्हणणे माध्यमांकडे पाठविले आहे , हि नोटीस त्यांना परिमंडल 1 च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या सहीने देण्यात आली आहे .ज्यात असे म्हटले आहे कि हिंजेवाडी,बिबवेवाडी,विश्राम बाग आणि खडक पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत .२०१४ पासून आपणा नवनवीन पद्धतीने दहशत पसरवून गुन्हेगारी कृत्य करून सार्वजनिक शांतता भंग करीत आहात .पुणे शहरात २०१९ गणेशोत्सव सुरु आहे .विसर्जन मिरवणूक काळात आपल्या आक्रमक वागणुकीमुळे आणि वर्तणुकीमुळे कायदा सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे माझे मत झाल्याने आपण परिमंडल 1 च्या कार्यक्षेत्रात प्रवेश करू नये अथवा वास्तव्य करू नये असा आदेश देण्यात येतो आहे .आदेशाचा भंग केल्यास कलम १८८ अन्वये आपल्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी .


दरम्यान या नोटिशीला तीव्र आक्षेप घेत रुपाली पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांणी हि सूड बुद्धीने केलेली कारवी आहे असे म्हटले आहे . आपण कसबा विधानसभा लढविण्यास इच्छुक असून , गणपती मंडळांच्या मागण्यांसाठी , पत्रकार परिषद घेऊन , चंद्रकांत दादा यांनी मंडळाचे अध्यक्ष होवून पाहावे असे आव्हान दिले होते . आणि त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले होते . पालकमंत्री यांनी मागण्या मान्य केल्या आणि आपल्यावर कारवाईची नोटीस बजावली असे त्यांनी म्हटले आहे .दरम्यान पोलिसांनी याबाबत आपली कोणतीही भूमिका माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींपर्यंत पोहोचवली नव्हती
- नेमके रुपाली पाटील यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात पुढे वाचा ….
महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा १३ सप्टेंबरपासून,शनिवारी पुण्यात,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे समारोप
पुणे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेचे दोन टप्पे यशस्वी झाले असून शुक्रवार १३ सप्टेंबर ते गुरूवार १९ सप्टेंबर या कालावधीत महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्पा प्रारंभ होऊन नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.महाजनादेश यात्रा शनिवारी (ता. १४ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता पुणे शहरात येणार आहे.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता येथे हडपसर येथे पुणे शहर भाजपच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रेच्या मार्गावर सुमारे ६० छोट्या मोठ्या चौकात मगरपट्टा, पूलगेट, गोळीबार चौक, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट, सारसबाग, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, दत्तवाडी, नळ स्टॉप, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शेतकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, आरटीओ, जहांगीर रुग्णालय, तारकेश्वर चौक, येरवडा, नगर रस्ता मार्गे चंदननगर असा यात्रेचा मार्ग आहे. दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता दांडेकर पूल येथून यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेस पहिल्या व दुस-या टप्प्यात सर्वत्र उस्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विशेषतः युवक, महिला, मुस्लिम महिला व ग्रामीण भागात शेतकरी यांचा सहभाग व उपस्थिती लक्षणीय होती. आधीच्या दोन टप्प्यात महाजनादेश यात्रेचा राज्यातील २४ जिल्ह्यातील १०६ विधानसभा मतदारसंघातून २२०८ कि. मी. प्रवास झाला. आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाऊन मांडणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री आहेत.
महाजनादेश यात्रेचा प्रारंभ अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाला होता. दुस-या टप्प्यात जालना येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते. महाजनादेश यात्रेच्या दुस-या टप्प्याचा समारोप सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस व निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झाला.
महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून प्रारंभ होईल. तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा १३ जिल्ह्यातील ६० विधानसभा मतदारसंघातून १,५२८ कि. मी. प्रवास करणार आहे. गुरूवार १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे महासभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.
‘पी.ए. इनामदार इन्स्टिट्यूट ऑफ इम्फर्मेशन टेक्नोलॉजी’ संस्थेची स्थापना
पूरग्रस्तांना वाचविणाऱ्या मच्छीमार बंधूंचा पुण्यात सत्कार
पुणे : पलूस (सांगली )च्या पुरात ६ दिवस ३०० जणांना वाचविणारे मच्छीमार बंधू एजाझ अहमद पठाण, हसन अब्दुल पठाण यांना अवामी महाज ‘संस्थेच्या वतीने ‘ फक्र_ ए- महाराष्ट्र ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
‘अवामी महाज’ सामाजिक संस्था आणि इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री दहा वाजता हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र(स्वारगेट) येथे झाला.उद्घाटन राज्याचे माजी अल्पसंख्यक विकास मंत्री आरिफ नसीम खान यांनी केले
अरिफ नसीम खान म्हणाले, ” सर्व धर्मसमभाव, एकात्मतेला नजर लागली आहे. त्याबद्दल विचार करायला कोणाला वेळ नाही, ही चिंतेची बाब आहे. या देशाच्या हिंदू – मुस्लीमांमध्ये दुरी उभी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांविरूध्द लढा देण्याची गरज आहे. देशाला बरबाद करणाऱ्यांना सरदार म्हणता येणार नाही ”
पुणे फेस्टिव्हल मधील हा मुशायरा १९९२ पासून सुरु आहे आणि पुण्यातील गणेशोत्सवातील मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सहभाग या कार्यक्रमात असल्याने या मुशायऱ्याला दोन्ही समाजातील स्नेह आणि सलोख्याचे प्रतीक मानले जाते .
एस ए इनामदार ,डॉ. सतीश देसाई, अभय छाजेड, सुरेश ( काका ) धर्मावत ,वाहिद बियाबानी , इम्तीयाझ मुल्ला , डॉ. मुश्ताक मुकादम,लतीफ मगदूम उपस्थित होते.
मुशायऱ्याच्या आयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली होती, त्यात डॉ परवेझ इनामदार,डॉ मुश्ताक मुकादम ,वाहिद बियाबानी ,इम्तियाझ मुल्ला ,प्रा . उझ्मा तस्नीम यांचा समावेश होता .
प्रदूषण विरहित विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब्स’चा पुढाकार
एक पात्रींमधून उमगले हसण्याचे महत्व
पुणे-
दैनंदिन जीवनातील विविध घटनांवर आधारित किस्से व त्याचे सादरीकरण, विविध राशींच्या स्वभाव गुणांचे
विनोदी किस्से, मिमिक्रीतून राजकीय नेते, अभिनेते यांच्या आवाजातून विनोदी किस्से व हास्यषटकाराणे
हास्योत्सव एकपात्रींचा हा कार्यक्रम रंगला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद टिल्लू यांनी, हास्य्योगाद्वारे
जगण्यासाठी हसा आणि हसण्यासाठी’ जगा हा संदेश दिला.
पुणे फेस्टिवल अंतर्गत बालगंधर्व रंगमंच येथे हसायदान फाउंडेशनच्या वतीने हास्योत्सव एकपात्रींचा हा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विश्वास पटवर्धन, दिलीप हल्याळ, योगेश सुपेकर, अभय देवरे,
वनराज कुमकर,कल्पना देशपांडे या कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला. सुत्रसंचालन मकरंद टिल्लू यांनी
केले. प्रारंभी पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश
देसाई, माजी पोलीस महासंचालक दैठणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (ट्राफिक) सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते
कलाकरांचा सत्कार करण्यात आला. श्री दैठणकर यांचा कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते तर सुरेंद्र देशमुख यांचा
डॉ. सतीश देसाई यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. मोहन टिल्लू व श्रीकांत कांबळे यावेळी
उपस्थित होते.
योगेश सुपेकर यांनी रामदास आठवले यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या राजकीय नेत्यांचे, मराठी व हिंदी
अभिनेते यांच्या हुबेहूब आवाजातून विनोदी किस्से सादर केले. त्याला प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून
प्रतिसाद दिला.
विश्वास पटवर्धन यांनी प्रत्येक राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये विविध विनोदी किस्यांमधून उलगडले त्याला
रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.
अभय देवरे आणि वनराज कुमकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्या अजरामर
साहित्याचे नाट्यमयरीत्या सादरीकरण केले. त्याला प्रेक्षकांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला.
कल्पना देशपांडे यांनी ‘अस्सा नवरा’ या कार्यक्रमातून नवर्यांच्या विविध गुणांचे, स्वभाव वैशिष्ट्यांचे विनोदी
किस्से सादर केले. त्याला उपस्थित महिलांचा व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे किस्से ऐकताना पुरुष
आपल्याला त्यामध्ये स्वत:ला तर स्रिया आपल्या नवऱ्याला पडताळून पाहत होत्या. त्यामुळे सभागृहात एकाच
हास्यकल्लोळ उडाला.
दिलीप हल्याळ यांनी बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या जीवनातील तीन अवस्थांवर सादर केलेले प्रसंग,
बालपण आणि तरुणपणातील किस्से आणि म्हातारपणातील एकटेपणावर प्रकाश टाकतानाच जगण्यासाठी
हसावे हसण्यासाठी जगावे हा संदेश देवून उपस्थितांची मने जिंकली.










