Home Blog Page 2838

द इंडियन सेंट लेजर शर्यतीत ऍडज्युडिकेट विजेता

0

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019

पुणे: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत  द इंडियन सेंट लेजर या शर्यतीत ऍडज्युडिकेट या घोड्याने 2800 मीटर या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात लांब अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील  द इंडियन सेंट लेजर  या महत्वाच्या लढतीत सुम स्टड फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी मिसेस डी खैतान, मिस्टर अँड मिसेस ए खैतान आणि मिसेस डी जालन, एरियन हॉर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी डी.ए.नंदा, ईशा नंदा भोजवानी व अमिताभ नंदा यांच्या मालकीच्या ऍडज्युडिकेट या घोड्याने 3 मिनिट 07 सेकंद व 944 मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा ए संदेश हा जॉकी होता, तर जेम्स मिकोन ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:  द इंडियन सेंट लेजर
विजेता: ऍडज्युडिकेट, उपविजेता: रॉबर्टा.

500 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात’, लष्कर प्रमुखांची माहिती

0

चेन्नईः भारताने उद्ध्वस्त केलेल्या बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’च्या दहशतवाद्यांची ठिकाणे पाकिस्तानने पुन्हा एकदा सक्रिय केली आहेत. बालाकोटमध्ये असलेले हे दहशतवादी पुढेही जावू शकतात. कमीत कमी ५०० दहशतवादी पीओकेमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज चेन्नईत बोलताना दिली. इस्लामचा गैरवापर केला जात असून धर्म गुरुंनी इस्लामचा खरा अर्थ लोकांना सांगायला हवा, असेही रावत म्हणाले जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने उघडपणे म्हटलेय की, आम्ही दहशतवादी पाठवू. म्हणून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावा यासाठी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जाते. आम्ही बालाकोटपेक्षा अधिक पुढे जाऊ शकतो, असा थेट इशारा लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी शिबीरे पुन्हा एकदा सक्रिय झाली आहेत. ही शिबीरे नुकतीच सुरू करण्यात आली आहेत. तसेच पीओकेमधून ५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे, असे बिपिन रावत म्हणाले.
घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहेत. घुसखोरीचे अनेक प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले आहेत, असेही लष्करप्रमुख म्हणाले. भारतीय वायुदलाच्या विमानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर अनेक दिवस जैशचा हा अड्डा बंद झाला होता.

भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडून श्रीमंत गनाधीशांना अभिषेक

0

पुणे : भारतामध्ये सर्वत्र सत्ता मिळो,महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यश व विजय मिळो… संपूर्ण देशामध्ये सुख-समृद्धी नांदो… अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दगडूशेठ गणपती चरणी अभिषेकातून केली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…अशा गणेशनामाच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केलेल्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला.

 श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने जे.पी.नड्डा यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा चे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही.सतिश, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, सुनील रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय पुण्याचे खासदार गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक यांसह स्थानिक नगरसेवक व भाजपा चे पदाधिकारीही उपस्थित होते.

पुण्यामध्ये लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जे.पी.नड्डा यांनी प्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात येऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अभिषेक देखील केला. यामध्ये आगामी निवडणुकीत भाजपा ला यश मिळू देत, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले. त्यानंतर गणरायाची आरती देखील केली. ट्रस्टतर्फे महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन अशोक गोडसे व हेमंत रासने यांनी नड्डा यांचा सन्मान केला.

’रीना नाईक यांच्या आगळ्या-वेगळ्या कलेचे प्रदर्शन’

0

मुंबई-माजी पुरस्कारप्राप्त एचआर प्रोफेशनल रीना नाईक यांचे ब्रास इंप्रेशन्स, चौदा नितांत वास्तविकतेवर आधारित पेंटिंग्स, देवाच्या पितळ शिल्पांचे कॅनव्हासवर ऑइल पेंटने रेखाटलेल्या चित्रांचे पहिले-वहिले प्रदर्शन दिनांक 24 सप्टेंबर रोजी मुंबईच्या प्रख्यात नेहरू सायन्स सेंटर येथे आयोजित करण्यात आलेले आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत इतर कलाप्रेमींना अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

पितळाचा रंग हा नेहमीच कलाकार रीना नाईक ह्यांना उत्साही करत आला आहे ह्या कारणावश त्या ह्या कलेकडे झुकल्या गेल्या. रीना नाईक यांनी घडविलेल्या १४ सुंदर अश्या कलाकृती ज्या देवत्व चा घटकवर्ण मांडतात, त्या  पितळेचे संस्कार आपल्या अंतःकरणावर अमिट छाप सोडण्याचे वचन देतात.

बासरी वाजविणारा श्री कृष्ण, कलिंगा सापावरिल किशोर वयातील गोविंदा, शंखामध्ये विराजमान गणपती बाप्पा, गुलाबाच्या पाकळ्यांद्वारे अर्पिलेली भक्ती एक अविस्मरणीय नमुना बजावतात. ह्या कलाकृती पाहता रीना नाईक यांच्या कलेतून कॅनव्हासवर जणू काही देवचं जीवित होत असल्याचा भास होतो.

स्वतःच्या अंतःकरणाचे अनुसरण करून आपल्या आवडीला आपला व्यवसाय  बनवणऱ्या रीना नाईक म्हणतात की, “मला पितळाचा रंग आणि आरास खूप आवडते. पितळ हा एक पवित्र धातू आहे आणि त्याचे ठसे कायमचे उमटतात. आपण ज्या देवतांची मनोभावे उपासना करतो त्यांचीचं यथार्थवादी छाप आपल्याला या चित्रांतून दिसून येते.”

ऑइल पेंट्सद्वारे कॅनव्हासवर कमालीची यथार्थवादाची शैली सहजपणे निर्माण करणाऱ्या रीना म्हणाल्या की, “ही प्रक्रिया सोपी आहे.  पेन्सिल न वापरता  मी फक्त ब्रश एका रिक्त कॅनव्हासवर वापरते.”  त्या फक्त सर्वशक्तिमानाने पूजत असलेल्या प्रतिभेचा शोध घेत आहेत असे त्यांना वाटते. यासंदर्भी त्या सांगतात की, “मी फक्त सकारात्मक उर्जा माझ्याद्वारे वाहू देते आणि तीच कॅनव्हासवर उमटते. तपशीलांवर अवलंबून, एखादी कलाकृती पूर्ण करण्यास पंधरा दिवसांपासून ते महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो.”

हे सर्व जितके सोपे सुंदर दिसते आहे तितकेच रीना साठी ते सोपे नव्हते! एका अपघातामुळे, त्यांना कार्पल टर्लन सिंड्रोम ह्या रोगास सामोरे जावे लागले आणि डॉक्टरांनी त्यांना त्यांचा उजवा हात न वापरण्यास सांगितले. या अपघाताबद्दल सांगताना त्या म्हणतात की, “जेव्हा डॉक्टरांनी मला हे सांगितले तेव्हा मला वाटले की, कला क्षेत्रात माझी कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली आहे. काही महिन्यांच्या थेरपीनंतर, मी बरी झाले आणि पुन्हा एक नवीन सुरुवात केली.” तब्येत खराब असतानाही आणि वारंवार इस्पितळात दाखल व्हावे लागत असुनही रीना यांनी त्यांच्या सध्याच्या प्रदर्शनासाठी पंधरापैकी चौदा कलाकृतीं पूर्ण केल्या आहेत.

जिद्द आणि चिकाटीने प्रत्येक संकटावर मात करता येऊ शकते याचे आणखीन एक नवीन उदाहरण बनणाऱ्या रीना नाईक यांच्या प्रदर्शनास भेट देने म्हणजे नक्कीच एक योग्य वेळ घालवण्याची निवड असेल.

एमआयएमने ठरविले तर आम्ही त्यांच्या सोबतच …प्रकाश आंबेडकर

0

पुणे : महापुरुषांची स्मारकं गरजेची आहेतच परंतु त्याहीपेक्षा लाेकांच्या जगण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे म्हणत खासगी धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.. “वंचितच्या समितीकडून एमआयएमसोबत चर्चा सुरू आहे. एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे,”  ” मागील काही दिवसांपासून आमच्या दोन्ही पक्षात वाद सुरू असल्याची माध्यमांमध्ये चर्चा ऐकण्यास मिळत आहे. पण आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे वाद किंवा निवडणुक लढविण्याबाबत चर्चा करण्याचे दारे बंद करण्यात आली नाही. उलट त्यांच्याकडून दाराला कुलूप लावण्यात आलेले नाही. त्यांच्याकडे त्या कुलूपाची चावी आहे,” असं सांगत “एकत्र येण्यास तयार आहोत,” असं आंबेडकर म्हणाले.

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. आंबेडकर म्हणाले, राज्यात काही भाग ओला आहे तर काही भाग हा दुष्काळी आहे. राज्यात जशी सरकारी धरणं आहेत तशीच अनेक खाजगी धरणे देखील आहेत. टाटाच्या पाच धरणांमधून वीज निर्मिती केली जाते. सध्या राज्यात विजेचे अतिरिक्त उत्पादन हाेत आहे. विजेची जास्त मागणी असते तेव्हा देेखील अतिरिक्त वीज उरत आहे. त्यामुळे या धरणांमधून करण्यात येणारी वीज निर्मिती टप्प्याटप्प्याने बंद करुन या धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे. टाटा धरणामधील पाणी नद्यांच्या मार्फत उजनी धरणापर्यंत पाेहचवता येईल. तसेच तेथून मराठवाड्यातील विविध भागाला पाणी पुरवता येईल. वंचित सत्तेत आल्यास टाटा ग्रुपशी बाेलून ही याेजना अमलात आणता आणेल असा विश्वास देखील त्यांनी यावेेळी व्यक्त केला.

तसेच वीज निर्मिती करण्याचे इतर मार्ग असून त्याचा विचार सरकारने करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच सध्या राज्यात वीजेचा कृत्रिम तुटवडा असून सरकारने इच्छाशक्ती दाखवल्यास वीज सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविता येणे शक्य असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले

मुख्यमंत्र्यांनी घाबरुन वंचित विराेधपक्ष असेल असे म्हंटले
मुख्यमंत्र्यांनी वंचित हे विराेधपक्षात असेल असे म्हंटले हाेते, ते त्यांनी वंचितला घाबरुन म्हंटले हाेते. आम्ही विराेधीपक्षात नाहीतर सत्तेत असू असा विश्वास देखील आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केला.

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम

0

पुणे, दि. 23 – भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे सर्व विभाग प्रमुखांनी काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सर्व विभागप्रमुख, नोडल अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, रेल्वे, बँकाचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी राम म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घेण्याकरीता आचारसंहितेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी-व्हीजल या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सुविधा व सुचनांचेही प्रत्येकाने पालन करुन ही निवडणूक सर्वांनी एकत्रित मिळून शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.

           विधानसभा निवडणुकीची अंमलबजावणी करतांना आदर्श आचार संहितेचे उल्लघंन होणार नाही, याची काळजी घेवून आचार संहितेचे पालन करावे. तसेच निवडणूकीदरम्यान राजकीय पक्षांनी आपले प्रचार कार्य करतांना  प्रचाराच्या विविध माध्यमाचा वापर करण्यापूर्वी ते प्रमाणित करुन घ्यावे. प्रचारावर होणाऱ्या सर्व खर्चाचे विवरण सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले

             राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल बँका, तसेच सहकारी बँका निवडणूक काळात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच आर्थिक व्यवहार होतील. यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले की,  बँकांनी उमेदवारांची खाती प्राध्यान्यक्रमाने उघडून घेवून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 10 लाखापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराची माहिती महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांच्याकडे नोंदवावी. बँकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करतांना सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.

यावेळी विविध विभागाचे प्रमुख, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, बँकाचे अधिकारी, नोडल अधिकारी, विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

मुलीसाठी सुरू झालेली पहिली शाळा आज ही राष्ट्रीय स्मारक होत नाही ही मोठी शोकांतिका- रघुनाथ ढोक

0
पुणे- सावित्रीमाई ने आपल्या भारत देशात प्रथम सुरू केलेली मुलींची पहिली शाळा राष्ट्रिय  स्मारक म्हणून घोषित करून त्या वास्तूचे जतन व्हावे यासाठी  फुलेप्रेमींनी आक्रोश व मशाल मोर्चा समता भूमी ,महात्मा फुले वाडा ते भिडे वाडा दि.20 सप्टेंबर 2019 रोजी काढला होता.
याबाबत फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष रघुनाथ ढोक म्हणाले की आपल्या देशात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हजारो वर्षापासून  चुल व मुलं या पूर्ती मर्यादित असलेली महिलांनसाठी पहिली शाळा 1 जाने 1848 रोजी या भिडे वाड्यात सुरू केली त्यास आज 171 वर्ष पूर्ण झाले तरी त्या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित होऊन जतन होत नाही ही मोठी शोकांतिका आहे. तसेच या शाळेपुढे एका मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी   आजूबाजूला असलेली महत्वाची जागा  त्याकामी सहज मिळू शकली. सावित्रीमातेमुळे आपण शिकलो  शैक्षणिक ,विज्ञानयुगांत उंच भरारी घेतली याची जाणीव न ठेवता हजारोंच्या संख्येने या शाळेपुढे व मंदीरापुढे गणेशोत्सवात गणेश पूजनासाठी पहाटे महिला रस्त्यावर  बसतात पण त्याना व सरकार आणि पुरातत्त्व विभागास भारतीय पहिली शाळा पूर्ण मोडकळलेली दिसत नाही हे एक अजबच गोस्ट आहे. या साठी राज्यभरातील हजारो तरुण तरुणी ,संघटना,संस्था गेली अनेक वर्षांपासून अदोलन करीत आहे तरी त्याकडे दुर्लक्ष करून सरकारी यंत्रणा बिल्डर,भाडेकरू कोर्ट याचे कारणे देऊन वेळ काडूपणा करीत आहे. पुढे ढोक असेही म्हणाले की सरकारच्या मनात आले तर एखादी वास्तू ,जागा ताब्यात घेऊन त्या बिडरला त्या जागेतील एफअसआय दुसरीकडे दुप्पट देऊन तसेच भाडेकरुना आजूबाजूला शेजारीच नवीन होणाऱ्या इमारतीत योग्यरित्या गाळे देऊन पूनर्वसन    सहज करु शकते एवढे अधिकार असतात. सरकारला ह्या  ऐतिहासिक वास्तुचे राष्ट्रीय स्मारक करताना,भाडेकरू, बिल्डर यांचे सोबत तोडगा काडून मार्ग काढणे काहीही अवघड नाही.
या मोर्चात संसद खासदार सौ नवनीत राणा,आमदार रवी राणा सहभागी होऊन फुले शाहू आंबेडकर यांचे नुसते नावं घेऊन उपयोग नाही तर त्यांचे विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे  तसेच सावित्रीमाईनी या ठिकाणावरून ज्ञानाची गंगा सुरू केली त्या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक   होंत नाही तोपर्यंत आम्ही अखंड लढा देणार आहोत म्हणूनच  खास अमरावती वरून आलेचे सांगितले.
या मोर्चात सावित्रीबाई यांचे वेशभूषेत सहभागी झालेल्या प्रा. राखी रासकर यांनी सद्या जीर्ण अवस्थेत मोडकळीस आलेल्या भिडे वाड्यावर भिडे वाडा  बोलला ही कविता सादर करून वास्तवता सांगितली.
या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार कमल नानी ढोले पाटील,दीपक जगताप,आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समितीचे चे कल्याण जाधव ,अमर हजारे, समन्वयक गोविंद डाके,युवा माळी च्या सुनीता भगत,वृषाली शिंदे तसेच हजारोचे संख्येने फुले प्रेमी व राज्यभरातून विविध संघटनेचे पदाधिकारी या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.सर्व फुले प्रेमी ची  पुणे मनपा कडून अपेक्षा आहे की या जागेत काही गैर प्रकार घडतात, ते या पुढे घडू नये,ह्या  ऐतिहासिक वास्तूला सद्या वॉचमन ठेऊन पावित्र्य राखण्याचे काम करावे ही मागणी पण केली.मोर्चा सम्पल्यावर भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई सह 70 कार्यकर्त्यांनी चौकात ठिय्या आंदोलन केले म्हणून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन सायंकाळी सोडले .

सिंधू संस्कृतीवर वैदिकांची मालकी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न गैर- संजय सोनवणी

0

पुणे- वंश संकल्पना वैज्ञानिक दृष्ट्या कधीच रद्दबातल झालेली असताना राखीगढी येथील ४६०० वर्षांपुर्वीच्या एका स्त्रीच्या सांगाड्यातील जनुकांवरून “आर्य हे येथलेच होते.” असा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न गैर आहे. शिवाय हा सांगाडा जेंव्हाचा आहे तेंव्हा स्वत:ला आर्य म्हणवणा-या समाजांचा व त्यांच्या वैदिक धर्माचा उदयही झाला नव्हता. इराणमध्ये वैदिक धर्म जन्माला आला व धर्मप्रसाराच्या माध्यमातून भारतात पसरला हे वास्तव असले तरी ही घटना साडेतीन हजार वर्षांपेक्षा जुनी नाही. त्या नंतरच भारतीय जनुकप्रवाहात इराणी वे स्टेपे येथील जनुकांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. डा. वसंत शिंदे व डेव्हीड राइश प्रभुतींनी सेल आणि सायंस नियतकालिकांत प्रसिद्ध केलेल्या दोन शोधनिबंधातही हेच नि:ष्कर्ष काढले आहेत. तरीही डा. शिंदे यांनी माध्यमांना माहिती देतांना आपल्याच शोधनिबंधातील निष्कर्षांना छेद देणारे दावे केले आहेत ही पुरातत्वविद्येचा अवमान करणारी खेदकारक घटना आहे असे प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि साहित्यिक संजय सोनवणी यांनी म्हटले आहे. ते आदिम हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या “सिंधू संस्कृती कोणाची? हिंदुंची की वैदिकांची?” या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

डा. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर दावे करताना हरप्पा संस्कृतीची भाषा संस्कृत होती व वैदिक धर्म तेथे साडेचार हजार वर्षांपुर्वीच प्रस्थापित झाला होता असेही दावे केले. जनुकांवरुन कोणाचीही भाषा समजत नाही. वैदिक धर्म इराणमध्येच पारशी धर्माच्या समकक्ष स्थापन झाला याचा लिखित पुरावा ऋग्वेद तर देतोच पण पारशी धर्मीयांचा धर्मग्रंथ अवेस्ताही देतो. असे असताना आणि आपल्या शोधप्रबंधात असले कसलेही विधान नसतांना केवळ वैदिक धर्मियांच्या तुष्टीकरणासाठी माध्यमांसमोर हे अशास्त्रीय दावे करत सिंधू संस्कृती ही वैदिकांचीच निर्मिती  हे जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने मान्यतापाप्त विद्यापीठाच्या कुलगुरुने सांस्कृतीक राजकारणाचा भाग बनत भारताचा सांस्कृतीक इतिहास डागाळावा हे दुर्दैव आहे असेही सोनवणी म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी सेल व सायंसमधे प्रकाशित झालेले शोधनिबंध आणि आजवर सिंधू संस्कृतीवर मालकीहक्क सांगण्याच्या प्रयत्नांचा इतिहास आधाराला घेतला.

आदिम हिंदू महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पानपत्ते यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देत प्रास्ताविक केले. पत्रकार भवन, नवी पेठ येथे हे व्याख्यान संपन्न झाले.

पाकव्याप्त काश्मीर ला नेहरू जबाबदार – अमित शाह-युती वर भाष्य मात्र नाही

0

मुंबई- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत येऊन भाजपच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. पण त्यांच्या भाषणात त्यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत आवाक्षरही काढलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. उलट महाराष्ट्रात भाजपचंच सरकार पूर्ण बहुमताने येणार आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा शहा यांनी केली. राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलेलं असताना शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणंही टाळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून शिवसेना-भाजप युती तुटल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान जम्मू काश्मीरमधील कलम ३७० वरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले. “आजच्या पाकव्याप्त काश्मीरला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत. १९४७ मध्ये जम्मू काश्मीरात घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याशी भारतीय लष्कर लढत होते. पण, ऐनवेळी नेहरूंनी युद्धविरामाचा निर्णय घेतला आणि पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला,” असा आरोप शाह यांनी काँग्रेसवर केला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर सभेत ते बोलत होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरातील कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याल विरोध केला आहे. तसेच काश्मीरातील परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांच्या आरोपाला शाह यांनी उत्तर दिले. शाह म्हणाले, “राहुल गांधीजी तुम्ही आता राजकारणात आले आहात. पण, जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यासाठी  भाजपाच्या तीन पिढ्यांनी बलिदान दिले आहे. भाजपासाठी हा राजकीय मुद्दा नाही, तर अखंड भारताचा संकल्प आहे,” असं सांगत शाह म्हणाले, “जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याची मागणी केली. त्याचा विरोध करण्यासाठी मुखर्जी काश्मीरात गेले. तिथे त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर तुरूंगात त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हे काश्मीरसाठी केलेले पहिले बलिदान होते.

कलम ३७० आणि ३५ ए हे भारत आणि काश्मीरमधील अडथळा होते. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद मला म्हणाले, काश्मीर भारताचे अंग आहे मग कलम ३७० हटविल्याने काय होणार. सगळे तसेच म्हणत होते. महाराष्ट्र, गुजरात केरळबाबत बोलताना हे बोललं जात नाही. पण काश्मीरविषयीच म्हटले जात होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० आणि ३५ए रद्द केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे शाह म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ६३० संस्थानांना भारतात आणण्याचे काम केले. फक्त एकट्या जम्मू काश्मीरचा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे होता. पण, सोडता आला नाही. काश्मीर भारतात विलीन झाले नाही. १९४७मध्ये अचानक पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. त्यानंतर भारताच्या लष्कराने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. लढत भारतीय लष्कर पुढे जात होते. पण, चुकीच्या वेळी अचानक नेहरूंनी युद्धविराम केला आणि पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला,” असे शाह यांनी काँग्रेसला सुनावले.

त्यांना धडा शिकवा, गुलाल उधळायला मला बोलवा -साताऱ्यात पवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

0

सातारा:

“मी राष्ट्रवादी, “मी साहेबां सोबत’ तसेच “मी शरद पवार’ असे लिहिलेल्या टोप्या घालून “एकच नेता एकच आवाज शरद पवार… शरद पवार’ असा शरद पवार यांचा जयघोष करणाऱ्या हजारो युवकांनी हलगी पासून ढोल ताश्‍यांपर्यंतच्या वाद्यांचा गजरात काढलेल्या रॅलीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज (रविवार) साताऱ्यात जोरदार स्वागत करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या उघड्या जीपमधून पवार हे विराजमान झाले. हजारो युवकांच्या समवेत पोवई नाका येथे रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी “” तो पत्ता करतो गुल..आमचा नेता पॉवर फुल्ल’ या गीतावर युवकांनी सतत ठेक्‍यावर नाच सुरु ठेवत शरद पवार यांच्यासमवेतच आम्ही खंबीरपणे आहोत अशी ग्वाही दिली.

स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशकडूनभारतावर हल्ले झाले. साताऱ्यातील जवानांनी हे हल्ले परतवून लावले. महाराष्ट्र घडवणारे यशवंतराव चव्हाणही याच मातीतले आहेत. त्यामुळे हा जिल्हा विचारांशी कधीच प्रतारणा करणार नाही, असं सांगतानाच ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली त्याला धडा शिकवा, असं आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला. तसेच विधानसभाच नव्हे तर साताऱ्याची लोकसभेची जागाही जिंकायची आहे. कामाला लागा आणि विजयानंतर गुलाल उधळायला बोलवा, असंही पवार म्हणाले. भोसले यांच्यावर शरसंधान साधलं. विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकविण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली, त्यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, असं सांगतानाच ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाहीत. काळ्या आईशी इमान राखणाऱ्यांना जर हे मदत करत नसतील तर यांना सत्तेतून खाली खेचण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. आम्ही तरुणांच्यापाठी ताकद उभी करावी, असं लोकांचं मत आहे. त्यामुळे आम्ही तरुणांच्या पाठी ताकद उभी करणार! मी २० तास काम करेल, पण चुकीच्या लोकांच्या हातात महाराष्ट्र जाऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. स्वाभिमानाचा इतिहास कुठाय?

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…?, असा सवाल करत उदयनराजेंनी स्वाभिमान गहाण टाकल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

अजित पवारांचे षटकार …कार्यकर्त्यांना सुनावले बोल ..पुणेकरांचे टोचले कान,बागुलांना दिला धक्का (व्हिडीओ)

0

पुणे-दुष्काळ असतानाही मी पुण्याला पाणी कमी पडू दिले नाही आणि आता सारी धरणे भरून वाहत असतानाही पुण्यातल्या लोकांना पाण्यासाठी आंदोलने करावी लागत आहेत ,आम्ही सुरु केलेल्या भामा आसखेड योजनेचे काम ५ वर्षे झाली तरी भाजपला पुरे करता आलेले नाही ,पुण्याला यांनी नवीन काय दिले हो ..अहो पुणेकरांनो विचार करा जरा ..अशा प्रकारचे आवाहन करत आज राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी पद्मावती येथील कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना आपल्या खास ढंगात खडे बोल सुनावत ,पुणेकरांना आवाहन करत विशिष्ट मिडियाचेही कान टोचण्याचा प्रयत्न केला .आघाडीच्या उमेदवाराचे  काम केलेच पाहिजे असे सांगत 25 वर्षे नगरसेवक असलेल्याआणि आता सहाव्यांदा नगरसेवक झालेल्या  कॉंग्रेसच्या आबा बागुलांच्या  स्वप्नांना लावलेले पंख कापत पर्वती मतदारसंघासह वडगाव शेरी,हडपसर आणि खडकवासला हे मतदार संघ राष्ट्रवादी लढवेल आणि शिवाजीनगर ,कसबा ,कँटोमेंट असे तीन मतदार संघ कॉंग्रेस लढवेल आणि कोथरूड मात्र अन्य मित्र पक्षाला दिला जाईल असे जाहीर करून बागुल समर्थकांना जोरदार धक्का दिला .पुण्यातील आण्णाभाऊ साठे रंगमंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयाेजन करण्यात आलेे हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्थित हाेते.

पुण्यातील आठ जागांपैकी चार जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे असणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. पुण्यातील अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात आयाेजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी ही घाेषणा केली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्तिथ होते. निवडणुकांच्या ताराखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी तर्फे आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, आघाडीमध्ये पुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढविणार आहे. त्यात पर्वती, वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासल्याच्या जागेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार निवडणुक लढविणार आहेत. तसेच इतर 3 जागांवर काॅंग्रेस निवडणुक लढविणार असून एक जागा मित्र पक्षाला साेडण्यात येणार आहे. बऱ्याच नव्या चेहऱ्यांना यंदा उमेदवारी देणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच जे गेले जे गेले त्यांना महत्व देण्याची गरज नाही. जुने गेल्यामुळे नवीन लोकांना संधी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच केवळ राष्ट्रवादीच्याच नाहीतर आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी काम करण्याचा सल्ला देखी पवारांनी यावेळी दिला. निवडणुकीला सगळे गटतट विसरुन सामारे जा असे म्हणत, निगेटिव्ह बाेलू नका नाहीतर निवडणुकीपर्यंत आजाेळी जाऊन रहा असे म्हणत पवारांनी कार्यकर्त्यांचे कान देखील टाेचले. तसेच आघाडीचेच सरकार येणार हा विश्वास देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेला अनेकांनी विविध पद्धतीने विराेध केला. जनादेश यात्रेसाठी अनेकांची धरपकड करण्यात आली. आम्ही सत्तेत असताना कधीही दडपशाही केली नाही. महाराष्ट्र पाण्यात गेला तरीही जनादेश यात्रा थांबविण्यात आली नाही. गेल्या दाेन महिन्यात साडेतीनशे जी आर काढण्यात आले. निवडणूक आली की लाेकांना प्रलाेभने दाखविण्याचे काम सरकार करते. सत्तेची मस्ती सरकारला चढली आहे. असे म्हणत मुख्यमंत्री साहेब कधीच काेणाचे दिवस नसतात असा टाेला अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. पवार म्हणाले, शिक्षणाचा खेळ खंडोबा केल्याने शिक्षण खातं विनोद तावडे यांच्याकडून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं. 5 वर्ष सरकारने शेतकऱ्यांना फसवलं. लोकांची दिशाभूल करण्याचं काम भाजपकडून लोकसभेला करण्यात आलं. आता कलम 370 पुढे करून विधानसभेला लाेकांची दिशाभूल करण्यात येत आहे. काश्मीर मधील निवडून आलेले नेते अजूनही नजर कैदेत आहेत. गुलाब नबी आझाद यांना काश्मीर मध्ये जाण्यासाठी सर्वोच न्यायालयात जावं लागलं. पुण्याबद्दल बाेलताना पवार म्हणाले पुण्यातील सर्व धरणं भरली असली तरी पाण्यासाठी पुणेकरांना आंदोलने करावी लागत आहेत. मी 10 वर्ष पालकमंत्री असताना दुष्काळ असताना देखील पुण्याला पाणी कमी पडु दिले नाही. स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून दुसरीकडे अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत.भामा असखेडच्या प्रकल्पला आम्ही मंजुरी दिले तरी त्यांना 5 वर्षात पाईपलाईन टाकता आली नाही.पुण्याचे प्रश्न एकही आमदार विधानभेत मांडताना दिसले नाही.निवडणुक आली की राम मंदिर, जात, धर्म यावर राजकारण भाजपा करते. आम्ही अनेक गोष्टी केल्या पण त्याचा गाजा वाजा केला नाही. घाेटाळे बाहेर निघु नये म्हणून पक्षांतर
घाेटाळे बाहेर निघु नये म्हणून अनेकांनी पक्षांतर केले असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. अनेकांच्या साखर कारखान्यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन भाजपात घेतले असल्याचे देखील पवार म्हणाले.

रत्नागिरी जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ करा

0

मुंबई (प्रतिनिधी) : पर्यटनासाठी परिपूर्ण असलेला रत्नागिरी जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करण्याची मागणी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रमोद जठार यांनी आज राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत आपल्या भाषणात रत्नागिरी जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ घोषित करण्याचे सूतोवाच केले होते हा संदर्भ प्रमोद जठार यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना पाठविलेल्या पत्रात देऊन रत्नागिरी जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.

रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनासाठी अत्यंत योग्य आणि जिल्ह्याच्या विकासासाठी तर अधिक योग्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर रत्नागिरी जिल्ह्यालाही पर्यटनाचा दर्जा मिळाला तर कोकणात पर्यटकांची संख्या वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे. शिवाय कळीचा मुद्दा असलेला बेरोजगाराचा प्रश्नही निकालात निघेल, असे श्री.जठार यांनी सांगितले.

पर्यटनासाठी समृद्ध असलेला रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, वेळणेश्वर, गुहागर, हर्णे, जयगड यासारखे अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत.पावस, मार्लेश्वर, राजापूरची गंगा, परशुराम देवस्थान यासारखी अनेक धार्मिक स्थळे आहेत. जयगड, मंडणगड, गोपाळगड, भगवतीगड, यशवंत गड किल्ले आहेत. रत्नागिरी जिल्हा ही नररत्नांची भूमी म्हणून ओळखली जाते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे असंतोषाचे जनक  लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी.जी. खेर, बाळासाहेब सावंत यांची ही जन्मभूमी रत्नागिरी जिल्हा ही जन्मभूमी तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही कर्मभूमी आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठासह ब्रह्मदेशाचे राजा थिबा पॅलेस व माचाळ राजापूर हे थंड हवेचे ठिकाणही रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

कोकण रेल्वे, मुंबई-गोवा नॅशनल हाय वे आणि पश्चिम महाराष्ट्रातून जोडलेल्या रस्त्यांमुळे  पर्यटकांसाठी दळणवळणाची अनेक साधने रत्नगिरी जिल्ह्यात उपलब्ध झाली आहेत. नजीकच्या काळात रत्नागिरी येथील विमानतळ उडान योजनेंतर्गत सुरू होणार असल्याने देशी, विदेशी पर्यटकांना या जिल्ह्यातील अनेक स्थळे पाहण्यास मिळणार आहे.

आंबा म्हटले की रत्नागिरीचा हापूस आंबा जग प्रसिद्ध असल्याने हा हापूस मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात येतो.  राजापूर बंदर हे ब्रिटिशांची वखार म्हणून प्रसिध्द आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गावागावात पुरातन काळातील कातळ शिल्पे आढळतात.

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे विभागातील प्रशासन सज्ज!

0

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांनी मतदान करावे

विभागीय आयुक्त डॉदीपक म्हैसेकर

           पुणे दि. 22: पुणे विभागातील 5 जिल्ह्यामध्ये 58 विधानसभा मतदारसंघापैकी 21 मतदार संघ पुणे जिलह्यात, सातारा व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी 8, कोल्हापूर जिल्ह्यात 10 तर सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी सात मतदार संघ राखीव असून संपुर्ण विभागात 1 कोटी 90 लाख 94 हजार 159 मतदार असून त्यामध्ये 99 लाख 90  2 हजार 677 पुरुष मतदार, 91 लाख 90 हजार 990 स्त्री मतदार तर 492 तृतीयपंथी मतदार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

                  पुणे विभागाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.

                  डॉ. म्हैसेकर म्हणाले, लोकसभा निवडणूकीवेळच्या मतदार यादीची तुलना करता 18 ते 19 वयोगटातील तरुण मतदारांची 90 हजार 782 नव्याने नोंद झालेलीअसून लोकसभेशी तुलना करता ही वाढ 24टक्के असून एकूण त्या वयोगटातील मतदारांशी तुलना करता हे प्रमाण 43.29 टक्के आहे. तसेच 20 ते 29 वयोगटातील 1 लाख 65 हजार 72 नव मतदारांची नोंद झाली असून लोकसभेशी तुलना करता ही वाढ 4.60 टक्के इतकी आहे.

पुणे विभागात 98.51 टक्के मतदारांना फोटो ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे मतदान यादीत नाव आहे मात्र त्यांच्याकडे ओळखपत्र नाही ते निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या 11 ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र दाखवून मतदान करू शकतात. पुणे विभागाचा मतदार यादीचा पुरुष-स्त्री प्रमाण 935 आहे.

नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा अंतिम दिनांक 4आक्टोबर असून मतदारांना मतदार यादीमध्ये आवश्यक ते बदलाचे सर्व फॉर्म क्र. 6, 6अ, 7, 8 व 8अ हे या तारखेपूर्वी 10 दिवस अगोदरपर्यंत जमा करता येतील. या तारखेपर्यंत जमा झालेले अर्ज समावेशनासाठी पात्र राहतील. त्यानंतरच्या अर्जावर नंतर निर्णय घेतला जाईल.

पुणे विभागात एकूण 10 हजार 266 मतदान स्थळे (PSL) असून एकूण 20 हजार 198 मतदान केंद्रे (PS) आहेत.

त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 7 हजार 922, सातारा जिल्ह्यात 2 हजार 978, सांगली जिल्ह्यात 2 हजार 435, कोल्हापूर जिल्ह्यात  3 हजार 342 तर सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 521 मतदान केंद्रे आहेत.

पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतर

पुणे जिल्हयातील 1 हजार 11 पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्रांपैकी एकूण 890 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे. पक्क्या इमारतीत 480 व तात्पुरत्या स्वरुपातील शेडमध्ये 410 मतदान केंद्रे स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे. तसेच फक्त 121 मतदान केंद्रे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अद्यापी असून त्यांना लिफ्टची सोय आहे. सदर ठिकाणी दिव्यांग व वयस्कर मतदारांना लिफ्टचा वापर करण्याबाबतचे नियोजन आहे.  तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 7 व सोलापूर जिल्ह्यातील 2 पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याचे नियोजन आहे.

पुणे विभागात विधानसभा मतदार संघ निहाय सर्व 58 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच प्रत्येक विधान सभा मतदार संघात किमान 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 पूरग्रस्त बाधीत भागातील मतदान केंद्रे यांचे काही ठिकाणी नुकसान झाले असून ती नवीन ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले आहेत. यामध्ये  कोल्हापूर  जिल्ह्यातील 61 पूराने बाधीत झालेली 47, तळमजल्यावर स्थलांतरीत 7 व इतर कारणांमुळे 7, सांगली जिल्ह्यात 40 पैकी पूराने बाधीत झालेली 37 व  सातारा जिल्ह्यात 35 मतदार केंद्रांचा समावेश आहे.  सदर स्थलांतराला आयोगाकडून मंजूरीनंतर मतदारांना नवीन ठिकाणांची माहिती होण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी देण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

पुणे विभागात निवडणूक विषयक कामकाजासाठी 1 लाख 18 हजार 515 इतके अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता आहे. तसेच एकूण 1 लाख 40 हजार 362 अधिकारी-कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच विविध कामांसाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.  विभागात 1 हजार 207 व्हिडिओग्राफर्स, 887 सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहेत. 264 भरारी पथके, 278 एसएसटी म्हणजेच स्थीर पथके, 189 व्हिडिओ सर्व्हायलन्स पथके आणि 70 व्हिडिओ  पाहणी पथके तर 73 लेखापथके नियुक्त करण्यात येत आहेत.  आवश्यकतेनुसार त्यात बदल केले जातील.

सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या आश्वासीत सुविधा AMF देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रॅम्प, पाणी, फर्निचर, वीज, प्रसाधन गृह, सायनेजेस (फलक), शेड, मदतकेंद्र, पाळणाघर यांचा समावेश आहे.

पुणे विभागात एकूण 1 लाख 28 हजार 518 दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आलेली असून लोकसभेशी तुलना करता (94,292) 34,226 ने वाढ झालेली आहे. जिल्हा परिषद कार्यालयांनी दिव्यांग उन्नत अभियांनातर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे. तसेच अपंग कल्याण आयुक्तालयाकडून, दिव्यांग व्यक्तींची सांख्यिकीय माहिती प्राप्त करुन सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेली आहे. विभागात एकूण मतदान स्थळे (PSL) 10 हजार 266 असून आजअखेर व्हिल चेअरची उपलब्धता 8 हजार 110 आहे. तसेच प्रत्येक मतदार स्थळावर किमान 1 व्हिलचेअर उपलब्ध करुन  देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.  तसेच दिव्यांगांना मदतीसाठी 17 हजार 852 स्वयंसेवक उपलब्ध आहेत.  तसेच त्यांना विविध प्रकारच्या आश्वासीत सुविधा (AMF) उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मतदानासाठी प्रवृत्त करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे.  तसेच गरजेनुरुप वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत सी-व्हिजिल या नव्या मोबाईल ॲपची निर्मिती भारत निवडणुक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे. तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी नागरिक भारत निवडणूक आयोगाच्या मुख्य वेबसाइटचा वापर करु शकतात. तसेच 1800111950  किंवा राज्य संपर्क केंद्रावर 1950 या क्रमांकावर राष्ट्रीय संपर्क केंद्राला फोन कॉल करु शकतात. नागरिक NGRS व्दारे ही तक्रार दाखल करु शकतात.

शस्त्र परवान्याबाबत छाननी करुन जी शस्त्रे जमा करणे आवश्यक असतील, ती जमा करुन घेणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. अवैध मद्यविक्री, वाहतूक यावर छापे टाकून जप्त करणे त्याचप्रमाणे परवानाधारक मद्य विक्री दुकानांमधून विकल्या जाणाऱ्या मद्याच्या खपावर लक्ष ठेवणे तसेच ज्या ठिकाणी खप जादा होत असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी आणि तत्पूर्वी 48 तास आधी ड्राय डे म्हणून घोषित केला जातो. निवडणूक संबंधी विविध गुन्हयांसाठी आयपीसी मधील कलम 171 व त्यातील पोट कलमांतर्गत गुन्हे दाखल करणे. संवेदनशील क्षेत्रामध्ये सीआरपीएफ व पोलीसांचे संचलन करणे. विविध भरारी पथके व स्थिर पथकांमार्फत निवडणूक काळातील अवैध पैसे, दारु, शस्त्र वाहतुकीची तपासणी करुन नियंत्रण आणणे. सीआरपीसीच्या कलम 107, 108, 109, 110 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करणे, बंधपत्र (बाँड) घेणे. अवैध शस्त्र साठा /स्फोटके जप्त करणे. अवैध शस्त्र निर्मिती ठिकाणावर छापे घालून जप्ती करणे. परवानाधारक शस्त्र जमा करण्याकरीता समितीच्या सल्ल्याने शस्त्र परवाने जमा करुन घेणे. शस्त्र जमा करुन घेणे किंवा परवाने रद्द करणे इ. अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करणे.  व्हलनरेबल वाडी/ पाडे/ पॉकेट इत्यादी निश्चित करणे, त्या ठिकाणच्या मतदारांचे मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी अशा ठिकाणांना भेटी देणे. संवेदनशील- (Vulunareble) / गंभीर   – (Critical)

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागात मतदार संघ निहाय आचार संहिता अंमलबजावणी कक्ष, जिल्हा संपर्क कक्ष, मदत व तक्रार निवारण कक्ष, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, माध्यम समन्वय कक्ष असे कक्ष स्थापन करुन या कक्षांमार्फत निवडणूकीचे काम नियोजनबध्द पाडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम

1)निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करणेचा दिनांक 27/09/2019 (शुक्रवार)

2)नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 04/10/2019 (शुक्रवार)

3)नामनिर्देशन पत्राची छाननी  दिनांक 05/10/2019 (शनिवार)

4)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 07/10/2019 (सोमवार)

5)मतदानाचा दिनांक 21/10/2019 (सोमवार)

6)मतमोजणी दिनांक 24/10/2019. (गुरुवार).

7)निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 27/10/2019 (रविवार).

मतदान ओळखपत्र नसेल तर

1) पासपोर्ट,

2) वाहन चालक परवाना

3) केंद्र/ राज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र

4) बँक/ पोस्ट ऑफिसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक

5) पॅन कार्ड

6) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड

7) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड

8) श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

9) फोटोसह पेंशन दस्तऐवज

10) खासदारांना / आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र

11) आधार कार्ड

मुलांच्या जडणघडणीत पालक-शिक्षकांचा वाटा मोलाचा-अनंत भिडे

0
पुणे : “आई आणि शिक्षक मुलाना घडवत असतात. त्यांच्यामुळेच देशाला चांगला व्यवसायिक, खेळाडू, डॉक्टर, इंजिनिअर मिळत असतो. समाज समृद्ध होऊन विकासाच्या दिशेने जात असतो. त्यामुळे मुलांच्या जडणघडणीत पालक व शिक्षकांचे योगदान मोठे आहे. त्याची जाणीव ठेऊन मुलांनी त्यांच्याप्रती कृतज्ञ राहायला हवे,” असे प्रतिपादन मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राचे संचालक अनंत भिडे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे यांच्या वतीने दिला जाणारा ‘बिझनेस एक्सलन्स अवार्ड’ अनंत भिडे यांना रोटरीचे प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रसंगी साक्षरता दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शिवानी सुतार, मुक्ता जगताप, विकास पाटोळे, वर्षा रांका, गीतांजली बोधनकर, नेहा निरगुडकर, भारती बक्षी, संदीप नाटेकर आदींचा समावेश होता. रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, संजय पडवळ, भारती बक्षी, सुरेखा पाठक आदी उपस्थित होते.
अनंत भिडे म्हणाले, “हा सन्मान माझा नसून माझ्यासोबत कार्य करणाऱ्या असंख्य व्यक्तींचा आहे. व्यावसायानिमित्त विदेशात होतो. भारतात आल्यानंतर समाजकार्य करायला लागलो. ही शिकवण शिक्षकांकडून मिळाली. त्यांनीच योग्य दिशा दिल्यामुळे उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात चांगले काम करत आहोत. माझ्या आईचाही यामध्ये मोठा वाटा आहे. तिच्यामुळेच आम्ही चांगले व्यक्ती बनू शकलो. वडीलदेखील आमचे आदर्श आहेत. आईवडील आणि शिक्षकांमुळे आयुष्य समृद्ध झाले असे वाटते.”
रवी धोत्रे म्हणाले, “समाजामध्ये आपण चांगले काम करतो, तेव्हा आपल्या चांगल्या कामांकडे कोणाचेही लक्ष जात नाही. चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला, तर त्यातून इतरांना प्रेरणा मिळते. त्यांच्या पातळीवर ते चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रोटरी क्लब चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सत्कार करते व समाजासमोर आदर्श ठेवते.”
माधवी वझे म्हणाल्या, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींमुळेच आपल्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे त्यांचा सत्कार व्हायला हवा. अशा व्यक्ती विविध विचारधारांच्या लोकांना एकाच छताखाली आणून त्यांना ते समाजकार्य करण्यास प्रोत्साहित करत राहतात. सूत्रसंचालन डॉ. समीर सावरकर यांनी केले. आभार विनायक पाटील यांनी मानले.

वडीलधाऱ्यांचा आदर हीच भारतीय संस्कृतीची शिकवण-नरेंद्र गोईदानी

0
पुणे : “वडीलधाऱ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मात्र, आज दुर्दैवाने अनेकदा तरुणपिढीकडून त्याचा अभाव दिसतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येत नाही. मनात सकारात्मक विचार आणून त्रासून न जात आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यासह इतरांचेही जीवन आनंदी बनेल,” असे मत प्रसिद्ध लेखक नरेंद्र गोईदानी यांनी व्यक्त केले.
बाणेर रस्त्यावरील यशदा येथे आयोजित पुणे इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये नरेंद्र गोईदानी यांच्या १२ मराठी आणि १२ इंग्रजी अशा २४ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संदीप तापकीर उपस्थित होते.
नरेंद्र गोईदानी म्हणाले, “सुरुवातीच्या काळात मुले मोठ्यांचा आदर करायचे. त्यांना ते घाबरत असायचे. परंतु आजची पिढी मोठ्यांना आदर देत नाही. स्वतःच्या विश्वात ते अधिक रमतात. त्यांच्या विचारांचा माणूस असला, तर ते त्यांना आदर देतात. इतरांच्या विचारांचाही आदर करता आला पाहिजे. चांगली पिढी घडली तरच चांगला समाज घडेल आणि हे सर्व घडवून आणायचे असेल तर पुस्तकांची आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तके आपण वाचली पाहिजेत.”
विशाल सोनी म्हणाले, एकाच वेळी मराठीची तीस आणि इंग्रजी ची तीस पुस्तके प्रकाशित करण्याचा प्रयत्न आम्ही केला. मराठी प्रकाशन विश्वात हे एक वेगळे पाऊल असून, ही सगळी पुस्तके आपल्याला वाचनातील वैविध्याचा अनुभव देतील. संदीप तापकीर यांनी सूत्रसंचालन केले.