पुणे, ता. २६ ः वाणिज्य, विज्ञान, कला या ज्ञान शाखांमुळे लौकिक जगात जगण्याचे शिक्षण मिळते. अलौकिक जग साध्य करण्यासाठी वाडमयाची गरज असते. त्यासाठी पुस्तक हा श्वासाचा भाग व्हावा अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत साहित्यिक प्रविण दवणे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या ग‘ंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना श्री. दवणे विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. आशीष पुराणीक, व्ही. व्ही. घाणेकर, संजय साळवे, प्रशांत साठे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. दवणे पुढे म्हणाले, ‘ त्याला मन, स्पंदन, ङ्गुफ्ङ्गस, श्वास अशी जीवंतपणाची लक्षणे पुस्तकात असतात. उद्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्ये असते. पुस्तक वाचनाने मनाचे पोषण होते. वाचनामुळे भविष्यातील कल्पना वर्तमानात कळतात. त्यामुळे भविष्य सुकर होते. म्हणून वाचनाचे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी वाचनात गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न आावश्यक आहेत.’
प्रदर्शनात विविध विषयांची व प्रकाशनांची पाच हजारहून अधिक पुस्तके मांडण्यात आली आहेत. उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. प्रदर्शनाचे हे चोविसावे वर्ष आहे.
पुस्तक हा श्वासाचा भाग व्हावा -साहित्यिक प्रविण दवणे
पुण्यात आणखी पाच दिवस पाऊस..टांगेवाला सोसायटीत 10 जणांचा मृत्यू; पाच मृतदेह सापडले
पुणे-बुधवारी रात्रीपासून शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे पुणेकरांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दहा जणांना जीव गमावावा लगाला आहे. तर अनेक गाड्या आणि जनावरेही पाण्यात वाहून गेली आहेत. गुरूवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पुण्यात ९० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाचही दिवस पुण्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यात बुधवारी झालेल्या प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच मृतदेह मिळून आले असून, अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफच्या तीन पथकांकडून सुरू होते.
टांगेवाला सोसायटी नेमकी नाल्याला खेटून आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर नाल्याचे पाणी वाढले. अक्षरशः रौद्र रूपाने वाहणारे पाणी कॉलनीतील घरांमध्ये घुसले. भिंती खचल्याने येथील काही घरे पडली. अंगावर भिंती पडल्याने काही जणांच्या मृत्यू झाला. तर काही जण प्रवाहासोबत वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले.
आतापपर्यंत पाच मृतदेह आढळले आहेत. यातील तीन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, अन्य दोन मृतदेह काढण्याचे काम एनडीआरएफची तीन पथकं करीत होते. येथील हजारे नामक महिला त्यांची आठ आणि दहा वर्षांची दोन मुले, रवी आमले (वय 15), संतोष कदम (वय 45) अशी आतापर्यंत मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. आणखी मृतदेहांचा शोध सुरू आहे.
पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात ५१ ते ७५ टक्के पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुण्यात यंदाच्या पावसाळ्यातील एक हजार मिलिमीटरचा टप्पा पावसाने बुधवारी गाठला. एक जूनपासून ते २५ सप्टेंबरपर्यंत शहरात १०१८.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
परतीच्या पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात पुढील चोवीस तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; तर त्यानंतर महिनाखेरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडत राहील.
जागतिक हृदयदिनानिमित्त माधवबागद्वारा मुंबईतील डबेवाला संघटनेच्या सदस्यांसाठी हार्ट अटॅक प्रथमोपचार प्रात्यक्षिक
मुंबई-हार्ट अटॅक कुणालाही कधीही येउ शकतो. आज भारतात दर तेहतीस सेकंदाला एक व्यक्ती हार्ट अटॅकने मृत्यूमुखी पडते आहे. अशावेळी पहिल्या सहा मिनिटांत सी.पी.आर हे प्रथमोपचार त्या व्यक्तीला दिले असता त्याच्या जगण्याची शक्यता खूप वाढते. यामुळे जास्तीतजास्त भारतीयांनी हे शिकले पाहिजेत.
मुंबईतील डबेवाला ही संघटना कित्येक वर्ष मुंबईकरांना घरचा आहार पोहोचवण्याचे काम चोखपणे व नियोजनबद्ध रीतीने करत आहे. लोकांच्या पोटाची काळजी घेत असतानाच आता ते कुणाचा प्राण वाचवण्याचे कामही करू शकतात. कारण माधवबागने एका खास उपक्रमामध्ये त्यांना सी.पी.आरप्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले आहे. चर्चगेट स्टेशनबाहेर इरॉस थिएटरपाशी सकाळी ११.१५ ते १२ दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माधवबागचे संस्थापक व सी.ई.ओ. डॉ. रोहित माधव साने आणि मुंबई जेवण डबे वाहतूक संघ अध्यक्ष श्री रामदास करवंदे उपस्थित होते. यावेळी डबावाल्यांसमोर सोप्या भाषेतील विवेचनासह सविस्तर सी.पी.आर. प्रात्यक्षिक करण्यात आले. माधवबागचे वेस्टर्न मुंबई मेडिकल हेड डॉ. बिपिन गोंड यांनी हे प्रात्यक्षिक दिले. भारतात दरवर्षी सुमारे २८ लाख व्यक्ती हृदयविकाराने बळी पडत आहेत या पार्श्वभूमीवर हे सी.पी.आर प्रथमोपचार अनेकांचे प्राण वाचवू शकतात.
यामुळे माधवबागद्वारा जागतिक हृदय दिनाच्या निमित्त असे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. २००६ मध्ये डॉ. रोहित साने यांनी माधवबागची स्थापना केली आणि थोड्या कालावधीतच हृदयरोगावरील एक विश्वासार्ह आणि उपयुक्त उपचार करणारी वैद्यकीय संस्था म्हणून माधवबाग प्रसिद्ध झाले. ‘आवश्यक ते सर्व काही’ हे ब्रीदवाक्य असलेले माधवबाग आपल्या उपचारपद्धतीमधील अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या, आयुर्वेदीक उपचार व आहारव्यायामातील योग्य जीवनशैली बदल यांच्या समावेशामुळे ओळखले जाते. गेल्या १३ वर्षांमध्ये दहा लाखाहून अधिक रुग्णांनी या उपचारांचा लाभ घेतला आहे. माधवबागचे उपचार हे कठोर संशोधन व शास्त्राधारित आहेत.
माधवबागला नुकताच ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रॅन्ड हा पुरस्कार मिळाला असून डॉ. रोहित साने यांचा ‘इंडियाज ग्रेटेस्ट लीडर’ असा सन्मान एशियन बिझनेस ॲन्ड सोशल इन्व्हेस्टर फोरम२०१८-१९च्या १२व्या एडिशनद्वारा करण्यात आला. माधवबागच्या २ हॉस्पिटल आणि २००हून अधिक क्लिनिक्समधून हृदयविकार व संबंधित आजारांवर विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदीक पद्धतीने उपचार केले जातात.
बुधवारच्या पावसामुळे १२५ हजार वीज ग्राहकांना फटका
पुणे –
बुधवारी रात्री झालेल्या अतीवृष्टीमुळे पुणे शहरातील महावितरणच्या पद्मावती, पर्वती, रास्तापेठ व शिवाजी
विभागासह पुणे ग्रामीण परिसरातील मुळशी विभागातील जवळपास १२५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला
होता. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले व गुरुवार संध्याकाळी ५
वाजेपर्यंत जवळपास सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला . या पावसामुळे वीज यंत्रणेचे प्रचंड नुकसान
झाले असून यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार पद्मावती विभागातील १४ पैकी ११ वीज उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरक्षतेच्या कारणासाठी रात्री बंद
ठेवावे लागले. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले व गुरुवार संध्याकाळ ५
वाजेपर्यंत जवळपास सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. भिलारवाडी ओढ्याजवळील ३ रोहित्रे
पाण्यामुळे जमीनदोस्त झाली तर काही ठिकाणी विजेचे खांब कोलमडून पडले.
रास्तापेठ विभागातील जवळपास १५००० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. कोंढवा खुर्द, कोंढवा बुज्रूक,
लुलानगर, एनआयबिएम व घोरपडी बाजारातील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. कोंढवा खुर्द व कोंढवा
बुज्रूक चा परिसर वगळता बहुतेक भागाचा वीज पुरवठा दुपारपर्यंत सुरळीत करण्यात आला होता.
पर्वती विभागातील धायरी, सहकार नगर व सिंहगड रोड येथील भागात उच्चदाब वाहीनीचे ७ खांब पडले व काही
ठिकाणी फिडर पिलर पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास २५०० ग्राहकांचा वीज पुरवठा रात्री १२ ते सकाळी ७
वाजेपर्यत खंडित झाला होता.
पुणे ग्रामीण परिसरातील खेड, नरसापूर व शिवापूर येथिल नदीकाठी असलेले रोहित्रे पाण्यात गेल्याने बंद ठेवावे लागले
तर या भागातील ५ रोहित्रे पाण्यात वाहून गेलेली आहेत. या परिसरातील जवळपास २५०० ग्राहकांचा वीज पुरवठा
खंडित झाला होता.
त्याचप्रमाणे पुणे शहरातील शिवाजीनगर विभागातील बालेवाडी, म्हाळुंगे, सुसगाव, बाणेर व बोपोडी गावठाण, इ.
परिसरातील जवळपास ३००० ग्राहकांचा वीज पुरवठा रात्री खंडित झाला होता.
पुणेकरांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, मी प्रशासन आणि नियंत्रण कक्षाच्या संपर्कात – मुख्यमंत्री
नवी दिल्ली – पुण्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला असून, अनेकांचे नुकसान झाले आहे. पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तात्काळ मदत देवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिले.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
पुण्यात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. पुणेकरांना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे. काही जण वाहून गेले आहेत. मी सतत जिल्हाधिकारी आणि नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. एनडीआरफच्या 2 तुकड्या तेथे पाठवण्यात आल्या असून आतापर्यंत 15 हजार लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. बारामतीतील कऱ्हा नदीलाही पूर आला आहे. प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकार बारकाईने नजर ठेवून आहे.
पावसामुळे पुण्यात मोठे नुकसान
पुणे शहर व उपनगरांत बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. पुण्यातील कात्रज, सिंहगड रोड आणि परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. तर विविध ठिकाणी 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
..तर पाकिस्तान शोधायला वास्को द गामाला याव लागेल
सुनील माने यांच्यातर्फे झालेल्या व्याख्यानात
लेफ्टनंट जनरल डॉ. शेकटकर यांचा गर्भित इशारा
पुणे : कलम ३७० हटवून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. सर्वार्थाने भारतापुढे कमजोर असणाऱ्या पाकिस्तानकडून आता अणू बॉम्बच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. परंतु, हा विचारही त्यांच्यासाठी घातक ठरेल. त्यांनी ही चूक केल्यास त्यांचे अस्तित्व नकाशातून नष्ट होईल. पाकिस्तानचा भूभाग शोधण्यासाठी पुन्हा एखाद्या वास्को द गामाला याव लागेल, असे ठणकावत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी शेकटकर यांनी पाकिस्तानला गर्भित इशारा दिला.
भारतीय जनता पक्षाचे सदस्य, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्यातर्फे त्यांचे ‘कलम ३७०, काश्मीर आणि आपण’ या विषयावर व्याख्यान ठेवले होते. यावेळी ते बोलत होते. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीशजी बापट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक अजय खेडेकर, अमोल बालवडकर, दीपक पोटे, किरण दगडे पाटील, व्हीजन नेक्स्ट फाउंडेशनचे प्रमुख डॉ. अंबरीश दरक, सामजिक कार्यकर्ते दत्ताजी गायकवाड, विनोद सातव उपस्थित होते. डॉ. शेकटकर यांनी समर्पक दाखले देत अत्यंत विस्ताराने काश्मीर विषय आपल्या व्याख्यानातून मांडला. दुसरे महायुद्ध, पाक व्याप्त काश्मीर, चीनची कटकारस्थाने, भारताची मवाळ भूमिका, फोफावलेला आंतकवाद, आर्थिक, राजकीय, सामाजिक समीकरणे अशा चौफेर संदर्भातून त्यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत काश्मीर प्रश्नाचे विश्लेषण केले.
शेकटकर म्हणाले की, पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य घटक आहे. भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या विरुद्ध १० पाकिस्तान उभे राहिले तरी ते बेचीराख होतील. पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न चिघळत ठेवण्यात चीनचा असणारा धूर्त हेतूही अनेकदा जगासमोर आला आहे. परंतु, काश्मीरची एक इंचही जमीन पाकिस्तानला मिळू देता कामा नये. एक घाव दोन तुकडे करण्याची आता खरी वेळ आली आहे. हा प्रश्न तडीस नेण्याचे सामर्थ्य आपल्या देशात असून याविषयी कोणाचीच मध्यस्थी आम्हाला नको.
यावेळी बापट म्हणाले, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कलम ३७०ला विरोध होता. संसदेमध्ये हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला त्या क्षणाचा मी साक्षीदार होतो. हा अनुभव अत्यंत रोमांचकारक व स्फूर्तीदायक होता. हे कलम रद्द करण्याच्या बाजूने ३७० मते पडली हा एक योगायोग म्हणावा लागेल. दोन्ही सभागृहात झालेले मतदान हे भाजपच्या खासदारांपेक्षा जास्त होते. यावरून पक्षापेक्षा देशहिताला संसदेमध्ये प्राधान्य दिले जाते हे सिद्ध झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आजची तरुण पिढी फार अलिप्तपणे पाहत आहे याची खंत वाटते. जर या परिस्थितीत बदल झाला नाही तर आंतकवाद आपल्या दारात येईल. याचे गांभीर्य समजवण्यासाठी डॉ. शेकटकर यांनी पुस्तक लिहून हा प्रश्न घरोघरी पोहोचवावा.
सुनील माने यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. शेकटकर यांचा परिचय करून दिला. ते म्हणाले, ‘पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना त्यांची कार्यपद्धती जवळून अनुभवता आली. त्याचे शैक्षणिक आणि लष्करातील कर्तुत्व अफाट आणि असीम आहे. त्यांच्यासमवेत थिंक टॅंक संकल्पनेवर काम कारायला मिळाले हे माझे भाग्य समजतो.’ या व्याख्यानास तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. जयेश कासट यांनी आभार मानले.
७० वर्षे गेली आता ७० महिने तरी द्यायला हवेत: डॉ. शेकटकर
डॉ. शेकटकर यांच्या व्याख्यानाने प्रभावित झालेल्या तरुणांचा कार्यक्रम संपल्यावर त्यांच्याभोवती एकच घोळका जमला. राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या प्रत्येक तरुणाच्या मनातील एकच प्रश्न सातत्याने पुढे येत होता, “सर आता पाक व्याप्त काश्मीर प्रश्न कधी मार्गी लागणार? यावेळी या प्रश्नाचे स्मितहस्याने स्वागत करत डॉ. शेकटकर म्हणाले, तुमचा प्रश्न रास्त आहे. तुम्हा तरुण पिढीकडून राष्ट्राविषयी हीच तळमळ मला अपेक्षित आहे. पण कलम ३७० रद्द करायला ७० वर्षे जावी लागली. तर किमान ७० महिने तरी आपण पाक व्याप्त काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी द्यायला हवे.
सलाम ‘त्या ‘पुणेकरांना….
सलाम त्या प्रत्येक कार्यकर्त्याला, सलाम त्या प्रत्येक सुजाण पुणेकराला जो रात्रभर विविध रस्त्यांवर थांबून वाहतुकीचे नियोजन करत होता. जो आपल्या परिसरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी धडपडत होता, जो अनोळखींना त्यांचे नाव गाव न विचारता लिफ्ट देत होता…
एव्हाना पहाट झालीए. सुदैवाने वरुणराजा जरा शांत झालाय, सगळीकडचे पाणी ओसरलय (किमान आत्तातरी) आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आलीए… नेहमी ज्या पुण्याच्या रस्त्यांवरून उत्साह ओसंडून वाहत असतो, टिपीकल पुणेरी बाणा जिथे जागोजागी आपले अस्तित्व दाखवत असतो त्या पुणे शहरात एवढी तणावग्रस्त आणि भयावह रात्र मी कधीच अनुभवली नव्हती. एकाच रात्री सायरन चे एवढे आवाज कधीच अनुभवले नव्हते. पण सांगायला खरजच आनंद होतो की संपूर्ण पुणे शहरात असा एक रस्ता नव्हता जिथे जर पुढे काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्या आगोदरच वाहतुक दुसरीकडे वळवायला कार्यकर्ते किंवा स्थानिक नागरिक नव्हते. युध्दजन्य परिस्थितीत सैनिक कसे आपला चेकपोस्ट सांभाळत असतात त्याप्रमाणे हजारो पुणेकर मदतकार्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अंगात कार्यकर्तागिरी भिनलेले कार्यकर्ते तर अशा वेळी घरात बसूच शकत नाही पण एक दोन ठिकाणी तर मी असे पण लोक पाहिले की जे आपल्या बायकोच्या मदतीने किंवा घरातल्या तरुण मुलीला रात्री २ वाजता बरोबरीने घेऊन रस्त्यावर अडकलेल्या नागरिकांना मदत आणि मार्गदर्शन करत होते. अगदी काही तासांच्या या धुमाकुळाने काही भागांमधे तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना वरच्या मजल्यावर स्थानांतरित व्हावे लागले पण खात्री आहे असे एक कुटुंब नसेल की ज्याला आता कुठे जाऊ? कुठे राहू? असे प्रश्न पडले असतील… देव करो पुन्हा अशी रात्र न येवो… कमी झालेल्या पावसाच्या कृपेने परिस्थिती आत्ता जरी नियंत्रणाखाली असली तरी आंबिल ओढा आणि अजून काही भागांमधील हजारो नागरिकांना आजूबाजूच्या शाळा, सरकारी इमारती इथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. देव करो आणि त्यांना लगेच आपाआपल्या घरी जाण्याची संधी मिळो पण जर तसे नाही होऊ शकले तर मात्र या बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंची गरज पडेल. तेंव्हा स्थानिक कार्यकर्ते, मंडळे यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी किंवा मदतकार्यात सहभागी होण्यासाठी वंदेमातरम् संघटना कृत युवा वाद्य पथकाचा ९८२२२३९७९० हा हेल्पलाईन क्रमांक २४तास उपलब्ध आहेच.
हे आकस्मिक संकट रात्री आले हे जरा बरय, कारण बहुतांश लोक कामधंद्यावरुन घरी पोहचले होते पण जर हे दिवसा घडले असते तर परिस्थिती अजूनच वाईट झाली असती. अजून पण अशा पावसाची शक्यता आहेच. टक्केवारीच्या भस्मासुरांनी कसेही केलेले सिमेंट, कॉंक्रिट रोड , चुकीची झालेली अतिक्रमणे यांना वेळीच विरोध न केल्यामुळे आपण आगोदरच माती खाल्ली आहेच त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा उदभवु नये यासाठी किमान यापुढे तरी शहाणे होऊयात, एक होऊयात… अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपआपला परिसर आणि प्रत्येक माणूस आपला मानून सांभाळला तरी सगळं नियंत्रणात राहू शकतं. कदाचित कालची रात्र ही भविष्यासाठी फक्त एक संकेत असेल…
-वैभव वाघ
अतिवृष्टीमुळे 5 तालुक्यातील शाळा, महाविद्यालये यांना 26 सप्टेंबर रोजी सुट्टी
– जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, दि.26 : काल झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना गुरुवारी दि. 26 सप्टेंबर, 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.
वरुणराजाचा कोप- .हाहाकाराची काळरात्र..नाल्याकाठच्या अधिकृत- अनाधिकृत बांधकामांची ,रहिवाश्यांची मोठी हानी
१० महिन्याच्या बाळासह अनेकांची पुरातून सुटका (व्हिडीओ)
पुण्यात पावसाचे तांडव
अरण्येश्वर परिसरात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यु
कात्रज परिसरात बुधवारी रात्री दोन तासात प्रचंड जोरात पाऊस झाल्याने कात्रज तलाव भरुन वाहू लागला होता.
मित्र मंडळ चौकानजीकच्या आंबील ओढा ला आलेल्या पुरात सापडलेल्या अवघ्या एक वर्षा च्या मुलाला अग्निशमन दलाचे जवान मारुती देवकुळे यांनी मित्रमंडळ चौक येथे पाण्यात अडकलेल्या बाळाला कर्तव्य तत्परतेने पहा कसे वाचविण्यात आले या व्हीडीओ मध्ये
एका पैशाचा भ्रष्टाचार केला नाही, प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार – अजित पवार
मुंबई – महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 70 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. या प्रकरणी प्रतिक्रिया देत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मी एका पैशाचा घोटाळा केला नाही. शरद पवार तर संचालक मंडळावरही नव्हते, त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 25 कोटींचा गैरव्यवहार झालाच कसा? अजित पवारांचा सवाल केचा व्यवहार 12 हजार कोटींचा असताना 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा झाला? शिखर बँकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. शंका असल्यास प्रकरणाची चौकशी करावी. राज्य शिखर बँक कोणत्या एका पक्षाची नाही. शिखर बँकेत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, शेकाप सगळ्या पक्षांचे नेते होते. त्यात आम्ही भ्रष्टाचार केला नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असे अजित पवार म्हणाले.
आम्ही प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार मुंबई उच्च न्यायालयाने आमचे म्हणणे मांडायला संधी न देता एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ईडीने कारवाई केली. मात्र आम्ही प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
देवेंद्र-नरेंद्र चोर है ! पुण्यात राष्ट्रवादीची पोलीस चौकीतही घोषणाबाजी (व्हिडीओ)
पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर मंगळवारी ‘इडी’तर्फे गुन्हा दाखल केल्यानंतर आज पुण्यात राष्ट्रवादीने जोरदार निषेध नोंदवीत आक्रमक आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील , नेते अंकुश काकडे,रवींद्र माळवदकर ,माजी आमदार कमल ढोले पाटील ,डॉ. सुनिता मोरे ,सुभाष जगताप ,विशाल तांबे ,प्रदीप देशमुख,अनिस सुंडके,नितीन कदम ,शिल्पा भोसले,जयदेव गायकवाड,बापू पठारे, राकेश कामठे,महेश हांडे,बापू डाकले,स्वाती पोकळे,अश्विनी परेरा, विशाल मोरे,अजीम गुडाकुवाला,संतोष नांगरे,आप्पा रेणुसे,बाळासाहेब बोडके,हसीना इनामदार,वनराज आंदेकर, गणेश नलावडे ,काका चव्हाण,राजेंद्र खांदवे, स्वप्नील दुधाने,फहीम शेख, रईस सूंडके,हाजी फिरोज, मनाली भिलारे,वासंती काकडे,रोहिणी चिमटे,पुनम पाटील, शांतीलाल मिसाळआदी असंख्य कार्यकर्त्यांनी मंडई तील टिळक पुतळ्यासमोर आंदोलन केले .
नंतर यास आक्रमक स्वरूप येवून रस्त्यावर आणि तेथून मंडई पोलीस चौकीत देखील आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला .यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की, उदयनराजे यांना पक्षात घेतल्यावर भाजपला आकाश ठेंगणे झाले होते. मात्र, पवार यांच्या सभेला साताऱ्यात मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपच्या या कृतीचे उत्तर जनता 21 ऑक्टोबरला मतदानातून देईल, असेही ते म्हणाले. शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले ,शरद पवार साहेब हे राज्य सहकारी बँकेत कधीही संचालक नव्हते तसेच ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही सहकारी बँकेमध्ये संचालक अगर त्या संस्थेच्या प्रशासनामध्ये किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील असल्याचा काहीही संबंध नव्हता तरी सुध्दा ED ची चौकशी ???
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, आपला हा पुरोगामी महाराष्ट्र चूकीच्या हातात जावू नये, आपले भविष्य सुखरूप रहावे विशेषत: युवा पिढीच्या भविष्यासाठी साहेब हा सर्व आटापिटा करत आहेत आणि त्यांना सगळीकडे मिळणारा प्रतिसाद बघून अश्या पध्दतीने सरकार कारस्थान करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे,
साहेब महाराष्ट्र भर फिरत आहेत व त्याला लोकही खूप प्रतिसाद देत आहेत म्हणून या सरकारला पराभव दिसायला लागला आहे, असे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी सांगितले, हे सरकार ‘हिटलरशाही’ च्या मार्गावर चालत आहे. इडी नाही हा तर भाजपचा घरगडी आहे .विरोधकांना अशा पद्धतीने वागवले जात आहे त्यामुळे देशात आज आणीबाणी असल्यासारखी परिस्थिती आहे. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कामठे म्हणाले की, ‘ युवकांचा पवार यांना प्रतिसाद भाजपला अनपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी राजकीय सुडापोटी गुन्हा दाखल केला.मात्र यामुळे त्यांना युवकांचा अधिक प्रतिसाद मिळेल असे वाटते’.
पर्वती मतदार संघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार संदीप सोनवणे यांच्या प्रचाराचा प्रारंभ
‘जीआयबीएफ’मुळे स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठेत संधी : शाहू महाराज
पुणे : “स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) एक चांगले व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा उपयोग करून घेऊन आपल्या उद्योगांच्या कक्षा विस्तारत जागतिक व्यापार करण्यावर उद्योजकांनी भर द्यायला हवा,” असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले.
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा ‘बिझनेस एक्सलन्स पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ‘जीआयबीएफ’चे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, अफगाणिस्तान कौन्सिल जनरल नदीम शेरीफी, इराकचे कौन्सिल जनरल ए. एम. अलीखानी, इथोपियाचे कौन्सिल जनरल दमेके अम्बुली उपस्थित होते.
शाहू महाराज म्हणाले, “इराण, अफगाण यांचे भारताशी जुने व्यापारी संबंध आहेत. अनेक मुस्लिम राजांनी स्वातंत्र्यानंतर हे संबंध आणखी वृद्धिंगत केले. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या माध्यमातून राज्यातील उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत चांगली संधी आहे. याचा स्थानिक उद्योजकांनी लाभ घ्यावा.”
नदीम शेरीफी म्हणाले, ”अफगाणिस्तान व भारताचे व्यापार व उद्योगातील योगदान मोठे आहे. फोरमचे जगातील आणि देशातील व्यापारी संघटनेशी सामंजस्य करार आहेत. त्याचा फायदा सर्वच उद्योजक, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात होतो. अफगाणातील ड्रायफ्रूट भारताकडून आयात केले जातात, तर अफगानकडून मसाल्यांची आयात होते.”
ए. एम. अलीखानी यांनी भारत सध्या अन्य देशांशी व्यापारविषयक करार करण्यात आघाडीवर आहे. त्यांचा फायदा स्थानिक उद्योजकांना होणार असल्याचे सांगितले. दमेके अम्बुली यांनीही ग्लोबल फोरमचा उद्योगांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
डॉ. जितेंद्र जोशी प्रास्ताविकात म्हणाले, मेक इन इंडिया, स्किल डेवलपमेंट अभियानामुळे भारतासह परदेशातील कंपन्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, केमिकल, औषध, इलेक्ट्रॉनिक, अवजड उद्योगांतील, क्षेत्रांना जागतिक पातळीवर नेण्याचा मानस आहे. फोरमचे ३७ देशांमध्ये ५३ हजार सभासद असल्याने जागतिक बाजारपेठेत भागीदारीत व्यवसाय करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
संकेतस्थळ ट्रॅफिक वाढीमध्ये कल्याण ज्वेलर्स पहिल्या क्रमांकावर
दागिने क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठा ब्रँड कल्याण ज्वेलर्सने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा संकेतस्थळाच्या ट्रॅफिकमध्ये 189 टक्क्यांची वाढ नोंदवण्याची किमया केली आहे. सेमृश या ऑनलाइन व्हिजिबिलिटी प्लॅटफॉर्मने नुकत्याच केलेल्या अभ्यासाते हे दिसून आले आहे. या अभ्यास अहवालात भारतातील तीन आघाडीच्या दागिने ब्रँड्समध्ये कंपनीचा समावेश होत असल्याचे नमूद करण्यात आले असून जानेवारी ते ऑगस्ट 2019 या काळात सरासरी संकेतस्थळ ट्रॅफिकमध्ये मोठी वाढ होत 7,02,791 सरासरी संकेतस्थळ आकडेवारीवर पोहोचली आहे.
कल्याण ज्वेलर्स सातत्याने डिजिटल व्यासपीठांवरील विपणन आणि जाहिरातींचे बजेट वाढवत आहे. “आम्ही डिजिटल विपणनासाठी केलेली गुंतवणूक चांगले निष्कर्ष दर्शवत आहे,” असे कल्याण ज्वेलर्स लि. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. टी एस कल्याणरामन म्हणाले. ‘टेकसॅव्ही आणि ट्रेंडबाबत जागरूक असलेल्या पुढच्या पिढीच्या ग्राहकांबरोबर पोहोचण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. नवतरुण ग्राहकांपर्त पोहोचण्यासाठी आम्हाला त्यांच्या खरेदीविषयक निर्णयांवर प्रभाव टाकणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर उपस्थित असणे आवश्यक आहे आणि आम्ही नवतरुण ग्राहकांच्या शैलीत व त्यांच्या भाषेत संवाद साधण्याच्या हेतूने तसेच त्यांना अपेक्षित असलेला डिजिटल अनुभव देण्याच्या दृष्टीने आमचे डिजिटल धोरण तयार केले आहे.’
कल्याण ज्वेलर्स लवकरच यंदाच्या सणासुदीच्या काळासाठी नवे अभियान सादर करण्याच्या तयारीत आहे. दसरा, दुर्गा पूजा आणि दिवाळी जवळ असल्यामुळे ब्रँडने परिपूर्ण अभियान तयार केले आहे. दक्षिण भारतातील अभियान तेथील प्रादेशिक ब्रँड अम्बेसिजर प्रभू गणेशन, अक्कीनेनी नागार्जुन, शिवा राजकुमार आणि मंजू वॉरियर यांच्यावर लक्ष केंद्रित करेल, तर दक्षिण भारताबाहेर कल्याण ज्वेलर्सचे जागतिक ब्रँड अम्बेसिडर्स – अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि गुजरात, महाराष्ट्र, पंजाब व पश्चिम बंगालमधील इतर सेलिब्रेटी उदा. वामिका गब्बी, किंजल राजप्रिया, पूजा सावंत आणि रिताभारी चक्रवर्ती या अभियानात सहभागी होतील.
कल्याण ज्वेलर्स हे अभियान मल्टी- चॅनेल दृष्टीकोनासहर हाताळणार असून विविध माध्यमांतून ब्रँडचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल. कल्याण ज्वेलर्स यापुढेही आपले डिजिटल अस्तित्व मजबूत करण्यासाठी आपले डिजिटल कामकाज वाढवणार आहे.
