Home Blog Page 2827

भरतनाट्यम सादरीकरणाद्वारे उलगडली नवदुर्गेची कथा…

0

र्गोत्सवामध्ये “अमृतवर्षीणी”ला रसिकांची उत्स्फूर्त दाद…

शास्त्रीय कलांशी निगडीत प्रदर्शनाचा समारोप…

पुणे: शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री हि नवदुर्गेची विविध रूपांची अनुभूती भरतनाट्यमद्वारे पुणेकरांनी घेता आली. बंगाली असोशिएशनतर्फे आयोजित दुर्गापुजेमधील ‘अमृतवर्षीणी’ या कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. मृदंगम,तालम,वीणा,बासरी ,घटम आदि वाद्यांच्या साथसंगतीने परिसर दुमदुमून गेला.

पौराणिक देवीरुपी स्त्री ते नावीन्य देवीरुपी स्त्री यांच्यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न ‘अमृतवर्षीणी’ या कार्यक्रमात केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात गणेशपर्णाने केली गेली, विविध सुगंधित फुलांची पुष्पांजलीची ओंजळ नवदुर्गेला अर्पण करत दुसरी रचना सादर करण्यात आली. चंडमुंड राक्षसांचा संहार करण्यासाठी महिषासुर मर्दिनीने जेंव्हा आपलं रौद्ररूप धारण केलं याची रचना हि आजही लोकांच्या हृदयात स्थान करून आहे. हि रचनादेखील भरतनाट्यमद्वारे सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता आईगिरी नंदिनी या प्रचलित रचनेने झाली.

बंगाली असोशिएशनतर्फे दरवर्षी बाणेर भागात दुर्गा पुजेबरोबर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तीन दिवसाच्या महोत्सवामध्ये सई परांजपे प्रस्तूत ‘अमृतवर्षीणी कार्यक्रमाबरोबरच शास्त्रीय कलांशी निगडीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध आभुषणे, कपडे, दागिणे याबरोबरच शास्त्रीय कलेशी निगडीत इतर वस्तू देखील होत्या. दुर्गोत्सवामध्ये लेफ्टनंट जनरल तापस कुमार बंडोपाध्याय हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

आमदार जगदिश मुळीक यांनी प्रचाराचा नारळ फोडला…

वडगाव शेरी ः गेल्या पाच वर्षामध्ये वडगावशेरी मतदार संघाचा विकास झाला आहे.  विकासाची गती कायम ठेवण्यासाठी नगरीक भाजपला साथ देतील असा मला विश्वास आहे असे मत वडगावशेरी मतदार संघतील महायुती भाजप चे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी व्यक्त केले.  विधानसभा निवडणूकीचे  वडगाव शेरी मतदार संघातील भाजप महायुतीचे आमदार जगदिश मुळीक यांच्या प्रचाराचा नारळ येरवडा येथे फोडला. या प्रचार रॅलीला नागरीकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
वडगावशेरी मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी येरवडा येथील पर्णकृटी पोलिस चौक येथे प्रचाराचा नारळ फोडला . त्यांनतर   येरवडा गावठाणामध्ये प्रचार फेरी  काढली. यावेळी  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेवक बापुसाहेब कर्णे गुरूची, अनिल टिंगरे, अॅड अविनाश साळवे,  संदिप ज-हाड, राहुल भंडारे, मारुती सांगळे, शितल सावंत, फरजाना शेख, मुक्ता जगताप, ऐश्वर्या जाधव, सुनिता गलांडे, शितल शिंदे, श्वेता चव्हाण, श्वेता खोसे गलांडे , शिवसेनेचे आनंद गोयल, संतोष राजगुरू यांच्या सह  भाजप, शिवसेना, आरपीआय चे कार्यकर्ते आणि नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते. 
यावेळी आमदार मुळीक म्हणाले की,  मतदार संघामध्ये पायाभुत सुविधा सह  महाराष्ट्रातील पहिला बंदिस्त फुटपाथ केला. सेवन डी थियटर, पाम उद्यान आणि  दोनशे पेक्षा जास्त ओपन जीम केले आहेत. मतदार संघातील 11 हजार कुटुंबांना पाईपलाईनव्दारे गॅस पुरवठा केला जात आहे. लोहगाव मध्ये शंभर खाटाचे रुग्णालय, लोहगाव विमानतळीच् विस्तारीकरणाचे काम केले. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये डायलेसिस सुविधा केंद्र, तारकेश्र्वर देवस्थानला क दर्जाचे पर्यंटन स्थळाचा दर्जा मिळवणून दिला. लोहगाव हिरण तळाचा विकास करण्यात येणार आहे. यासारख्या अनेक विकासकामे वडगाव शेरी मतदार संघामध्ये केले आहे. राष्ट्रवादीच्या काळात वडगावशेरी मतदार संघ समस्यांचा आगार बनला होत. पण गेल्या पाच वर्षात वडगावशेरी मतदार संघाचा चांगला विकास झाला. 

हडपसर:वंचित चे उमेदवार घनश्याम हाक्के यांच्या प्रचाराचा शुभारंभ

0
पुणे– हडपसर विधानसभा मतदारसंघातील वंचीत बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार घनश्याम (बापू) हाक्के यांच्या प्रचाराचा शुभारंभ  हडपसर ससानेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला .यावेळी उपस्थित लोकांना बोलताना घनश्याम हाक्के यांनी म्हटले की ,आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपा शिवसेनेने जनतेची फसवणूकच केली आहे त्यामुळे हडपसर चा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर वंचीत आघाडीला संधी   दयावी असे आवाहन त्यांनी केले.
              यावेळी वंचित आघाडी आणि घटक पक्ष आनि संघटनेच्या कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरवात करण्यात आली .ही पदयात्रा ससाने नगर ,काळे पडळ सह परिसरातील वस्त्यांमध्ये काढण्यात आली .छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर ,राजश्री शाहू महाराज,अहिल्यादेवी होळकर ,यांच्या घोषनांनी परिसर  दणाणून गेला होता .’एक संधी वंचीत आघाडीला ‘ यासारख्या घोषणा युवक कार्यकर्ते देत होते .या पदयात्रेत युवक आनी महिला कार्यकर्त्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती यावेळी  पराग बरकडे, सुफियान शेख ,तुषार आरने,किसन कोळपे, किशोर गोरे, प्रवीण करे, सुनील गडदे,विठ्ठल मदने,अतिष आलटे, हिना खान,देवा परदेशी ,चेतन शिरोळे, राजू पवार,भरत मोरे,प्रकाश देवकते, सौरभ महाडिक, इस्माईल रंगरेस आदीअसंख्य कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होते

लतादीदी-किशोरदांच्या गाण्यांनी बहरला नवरात्रौत्सव

0

पुणे : भारतीय चित्रपट संगीताला आपल्या अवीट गोडीच्या गळयाने अजरामर गाण्यांची भेट देणारे महान पार्श्वगायक किशोर कुमार आणि गानसम्राज्ञी भरतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने पुणे नवरात्रौत्सव संगीतमय सूरांनी बहरला. पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवात युवा गायक आणि कलाकारांनी जितेंद्र भुरुक प्रस्तुत ‘तुम आ गए हो’ हा कार्यक्रम सादर झाला. लता मंगेशकर यांच्या ९० वाढदिवसानिमित्त आणि किशोर कुमार यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त गायकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पोलीस अधिकारी प्रदीप देशपांडे, प्रकाश गायकवाड यांच्यासह महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रसिध्द गायक जितेंद्र भुरुक यांच्यासह रश्मी मुखर्जी यांनी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या द्वंद्व गीते गाऊन कार्यक्रमाला ‘चार चाँद’ लावले. नितीन शिंदे (तबला, जेंबे), किरण एकबोटे (ढोलक), दिनेश पांडे (साईड ऱ्हिदम), अभिजित भदे (ऑक्टोपॅड), बाबा खान (सॅक्सोफोन), निलेश देशपांडे (बासरी), विशाल थेलकर (गिटार), मिहिर भडकमकर (सिंथेसायझर), बिशाल रायकर (बेस गिटार) यांनी गायकांना अप्रतिम सुरेल साथसंगत केली. रत्ना दहिवेलकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. ‘हम दोनो दो प्रेमी’, ‘आपकी आखो मे कुछ’, ‘तेरे चेहरे से’, ‘गुम है किसी के प्यार मे’, ‘शोखियो मे घोला जाए’, ‘तेरे बिना जिंदगी से कोई’ अशा अजरामर गीतांचा नजराना रसिकांसमोर पेश करत गायक आणि वादकांनी आपल्या अप्रतिम अदाकारीने कार्यक्रमात रंगत आणली. आबा बागुल यांनी स्वतः ‘सलामे इश्क’ हे गाणे गात उपस्थितांची मने जिंकली.

सनदी लेखापालांमुळे ‘जीएसटी’ संकलनात मोठी वाढ- कृष्णा मिश्रा

0

पुणे : “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठीच आणलेला आहे. त्यामध्ये सुधारणेला जरुर वाव असून, त्यासाठी जीएसटी कौन्सिल नियमित बैठक घेऊन ‘जीएसटी’ला ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षात चार्टर्ड अकाउंटंट अनेक महत्वाच्या सेवा पुरवीत आहेत. या सर्वांमुळे ‘जीएसटी’मुळे कर संकलनात मोठी वाढ झाली आहे,” असे प्रतिपादन ‘सीजीएसटी’च्याप्रधान मुख्य आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने ‘जीएसटी’वर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कोथरूड येथील एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी ‘सीजीएसटी’चे आयुक्त राजीव कपूर, ‘आयसीएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए अतुल गुप्ता, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, ‘आयसीएआय’चे सीए सुशीलकुमार गोयल, सीए राजेंद्र कुमार, सीए यशवंत कासार, सीए आनंद जाखोटिया, सीए समीर लड्डा, सीए अभिषेक धामणे, सीए काशिनाथ पठारे, यशवंत कासार आदी मान्यवर उपस्थित होते.

सीजीएसटी कमिशनर राजीव कपूर म्हणाले, “ऑनलाईन जीएसटी भरण्यात तक्रारी येत आहेत. त्यांना त्वरित मदत करणे गरजेचे आहे. ‘सब का विश्वास’ अंतर्गत अभियान सुरु आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जीएसटी समाजाने काहीजणांना अवघड असल्याने अनेक अडचणी जाणवतात. मात्र, त्या समजून सांगतानाच सोडविण्याचाही प्रयत्न केला जात आहे. जीएसटी भरणा करून करदात्यांनी सरकारला सहकार्य केले पाहिजे. बोगस जीएसटी बिल काढण्याचे प्रमाण वाढत आहेत, त्यांना पकडणे सहज शक्य आहे. प्रत्येकाला एकाच छत्राखाली घेऊन येणे खूप कठीण आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल परंतु सर्व काही सुरळीत होईल.”

अतुल गुप्ता म्हणाले, “सीए हा देशाच्या विकासात, तसेच सामाजिक आणि आर्थिक सुधारणांमध्ये मध्यस्थ म्हणून सीएची भूमिका महत्वाची आहे. सीएची गुणवत्ता अबाधित करण्यासाठी ‘आयसीएआय’कडून सतत उपक्रम राबविण्यात येतात. डिजिटल हब, युडीआयएन यासारखे व्यासपीठ उभारले आहेत. सीए आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा मेळ घालत अभ्यासक्रम अद्ययावत केला जात आहे. नियमित मार्गदर्शन सत्र, कार्यशाळा घेऊन सीए अधिकाधिक प्रगल्भ होईल, यावर भर दिला जात आहे. सीएचे काम, सेवा स्वयंचलीत आणि चांगली करण्यासाठी ‘आयसीएआय’ प्रयत्नशील आहे.”

प्रास्ताविकात चंद्रशेखर चितळे यांनी ‘सनदी लेखापाल जीएसटीला अधिक सुलभ करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात आणून देत योग्य त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अाणि सनदी लेखापालांते योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गौरविले आहे’ असे सांगितले. सीए ऋता चितळे व सीए अभिषेक धामणे यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. सीए नेहा फडके, सीए ऐश्वर्या गुंदेचा, पूजा महेश्वरी, राजश्री सहल यांनी सूत्रसंचलन केले. सीए काशिनाथ पठारे यांनी आभार मानले.

नेत्रतर्पण शिबिराचा २०५ जणांना लाभ

0

पुणे : ऑक्टोबर सेवा सप्ताहानिमित्त तर्पण आय क्लिनिक व आरोग्यवर्धिनी चिकित्सालय यांच्या पुढाकारातून लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रलतर्फे वाहतूक पोलीस आणि सामान्यांसाठी मोफत नेत्रतर्पण व नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामचंद धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयात झालेल्या या शिबिरात एकूण २०५ जणांनी नेत्रतर्पण केले. ३५ डॉक्‍टर्सच्या टीमने यामध्ये सहभाग घेतला.

प्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, लायन्स क्लबचे श्रीकांत बाहेती, राजेश सोनी, नवनाथ धनावडे, जयप्रकाश सोनी, जितेंद्र मेहता, हिरालाल छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही नेत्रतर्पण करून घेतले. वैद्य हरीश पाटणकर व वैद्य स्नेहल पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर झाले. शेठ ताराचंद रुग्णालयाजवळील वाहतूक पोलीस आणि रास्ता पेठ पोलीस स्थानकातील पोलीस यांनीही या शिबिराचा लाभ घेतला.
नेत्रतर्पण उपचारामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते, तसेच चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सतत संगणकावर काम करणारे, उन्हात आणि धुळीत प्रवास करणारे यासह सर्वच नागरिकांनी नेत्रतर्पण केले पाहिजे. डोळ्यांना ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करण्याचे काम नेत्रतर्पण करते. या उपचारासाठी २०-२५ मिनिटांचा वेळ लागतो, असे डॉ. हरिश पाटणकर व स्नेहल पाटणकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रवक्तेपदी गोपाळ तिवारी यांची नियुक्ती

0

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या ‘प्रवक्ते’पदी जेष्ठ काॅंग्रेस कार्यकर्ते, अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीचे माजी सदस्य व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तिवारी यांच्या नियुक्तीचे पत्र टिळक भवन, मुंबई येथे दिले. 

 
गोपाळ तिवारी हे अभ्यासू, कार्यक्षम व निष्ठावान कार्यकर्ते असून, ते गेल्या  काही महीन्यांपासून माध्यमांमध्ये पक्षाची बाजू समर्थपणे मांडत असुन, चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्या कार्याला अधिक वाव मिळावा, तसेच पक्षाची बाज़ू अधिक सक्षमतेने  मांडता यावी, या हेतूने त्यांना ‘प्रदेश काॅंग्रेस प्रवक्ते’पदी नियुक्ती केल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

 
प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल गोपाळ तिवारी यांनी आनंद व्यक्त केला असून, ‘प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू व पक्षाच्या आणि नेत्यांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांना खरे ऊतरण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे.

रंगभूमीवर पुन्हा एकदा गंधर्वयुग “संगीत बालगंधर्व”

0

बालगंधर्व हा प्रत्येक कलाकाराच्याच नव्हे तर प्रत्येक प्रेक्षकांच्या दृष्टीने एक कुतूहलाचा विषय. त्यात मराठी मन हे बालगंधर्व यांच्याविषयी एक हळवा कोपरा ठेवणारं ! एखादा देवलोकीचा गंधर्व खाली यावा आणि देवाने दिलेल्या आशीर्वाद व शापानुसार त्याने इथे आयुष्य कंठावे असे बालगंधर्व जगले. आपल्यासोबत घडणार्‍या घटनांची ना त्यांनी कधी दखल घेतली, ना त्याविषयी तक्रार केली. गंधर्वानी मराठी रंगभूमीला काही स्वप्ने दाखवली आणि ती सत्यात उतरवण्यासाठी स्वत: झटले. गंधर्वयुग हा मराठी रंगभूमीसाठी सुवर्णकाळ मानला जातो. गंधर्वांच्या संपूर्ण जीवनाचा वेध घेणारे संगीत नाटक आता लवकरच रंगमंचावर येत आहे. ‘अभिजात’ नाट्यसंस्था निर्मित “संगीत बालगंधर्व” हया नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रविवार दि. १३ ऑक्टोबर, दुपारी १२ वाजता टिळक स्मारक मंदिर पुणे आणि शनिवार दि. १९ ऑक्टोबर, रात्रौ ८ वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे संपन्न होणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील ‘होय मी सावरकर बोलतोय’ नाटक, मराठी रंगभूमीवरील सोनेरी पान ठरलेले ‘टिळक आणि आगरकर’ हे दोघांच्या मैत्रीवरील नाटक अशा उत्तम चरित्र नाटकांच्या निर्मितीनंतर ‘अभिजात’ ही तिसरी चरित्र निर्मिती ‘संगीत बालगंधर्व’ रसिकांना अर्पण करीत आहे. ज्येष्ठ लेखक अनंत शंकर ओगले लिखित हे सशक्त नाटक एकूण ३० कलाकारांच्या संचात रंगभूमीवर येत आहे. ‘संगीत बालगंधर्व’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षक गंधर्वांचे वैभव पाहण्यास संगीत नाटकांकडे वळेल अशी आशा निर्माते आकाश भडसावळे यांनी व्यक्त केली आहे.

नाटकाचे दिग्दर्शन आणि बालगंधर्व, केशवराव भोसले, गणपतराव बोडस, नाना जोगळेकर, गोविंदराव टेम्बे, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, अन्नपूर्णा, हरी आत्या, गोहर, श्रीकृष्ण देशपांडे, भांडारकर आणि लक्ष्मी नारायण यांच्या भूमिका कोण साकारीत आहे याबद्दल मात्र गुप्तता ठेवण्यात आली आहे. तसेच अभिनेते अंशुमन विचारे यात प्रमुख भूमिकेत आहे. पण त्यांची भूमिका कोणती ? या प्रश्नांची उत्तरे प्रयोगाच्या दिवशी रसिकांना मिळतील. त्यासाठी तरी नाटक पहावंच लागेल. गंधर्व ज्यांना अन्नदाते म्हणत ते रसिक मायबाप या नाटकाला नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा निर्माते व कलाकार यांनी व्यक्त केली आहे.

मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी दिली पोस्ट ऑफिसला भेट

0
पुणे-डिजिटायझेशनच्या जमान्यात पत्र,पत्रलेखन,पोस्टाची तिकिटे आदीबद्दल मुलांना फार अपुरी माहिती आहे.आधुनिकतेच्या युगात विद्यार्थ्यांना या गोष्टी समजणे व माहिती होणे गरजेचे आहे.एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका देशातून दुसऱ्या देशात पत्र कशा पद्धतीने पोहोचते,पत्रांचे वेगवेगळे प्रकार,पूर्वीपासून पत्रव्यवहाराच्या चालत आलेल्या पद्धती आणि नवीन पद्धती याविषयी विद्यार्थांना माहिती व्हावी म्हणून भूगोल विषयांतर्गत क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.जनसंज्ञापनाच्या या महत्त्वाच्या पारंपारिक साधनांची तंत्रशुद्ध माहिती आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी.यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर,पुणे या शाळेतील इ.6 वी.च्या मुलांनी पोस्ट ऑफिस मध्ये प्रत्यक्षात जाऊन सर्व माहिती घेतली.यामध्ये शाळेतील  मुलांसाठी पत्रलेखन उपक्रम घेण्यात आला.याप्रसंगी मुलांना पोस्ट ऑफिस कर्मचारी प्रियंका पंडीत,पोस्टमन सतिश पवार यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पत्राचे नमुने दाखविले.त्यामध्ये पोस्टाची तिकिटे,आंतरदेशीय पत्र,पोस्ट कार्ड,पोस्ट पॉकिट,मनी ऑर्डर फॉर्म,पैसे भरण्याची व पैसे काढण्याची पावती,स्पीड पोस्टची माहिती आदींचा समावेश होता.मुलांना फक्त पोस्टातून पत्र पाठवले जाते एवढेच माहीत होते.परंतु आजच्या उपक्रमामुळे प्रत्यक्षात पत्र लेखन कसे करावे हे प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना समजले.पोस्टाची प्रक्रिया कशी चालते.ते स्पष्ट करून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी खूप रंजक व जिज्ञासू प्रश्न विचारले.आपल्याला कोठे कोठे पत्र पाठवता येतात.व आता व्हाट्सअप आहे मग त्यासारखे मेसेज पोस्टातून जाऊ शकत नाही का ? स्पीड पोस्ट म्हणजे काय? या मुलांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन शंका निरसन केले.स्पीड पोस्ट या शब्दाचा अर्थ जलद गतीने जाणे असे समजून सांगितले.तसेच पोस्ट ऑफिस मधील सर्व योजनांची व ई-टपाल सर्व्हिस,पोस्ट तिकिटाची व पत्राच्या नमुन्याची प्रत्यक्षात माहिती दिली.विद्यार्थ्यांनी विविध पत्राचे नमुने व पोस्ट तिकिटे स्वतः हाताळून माहिती घेतली.सर्व मुलांनी एक एक पत्र लिहून आनंद व्यक्त केला.पत्र कसे लिहावे ? पत्ता कसा लिहावा ? पीन कोड याविषयी पोस्ट मास्तर चंदा घुले यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
 विद्यार्थी म्हणाले,आम्ही आता आमच्या सर्व नातेवाईकांना व मित्रांना पत्र पाठवू शकतो.यावेळी मुख्याध्यापिका संगिता लकारे म्हणाल्या की,विद्यार्थी स्वतःआता पोस्टात जाऊन पोस्टाचे कोणतेही व्यवहार करू शकतील.हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. नवीन काहीतरी केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.या उपक्रमाचे आयोजन खंडू खेडकर,नवेश पाटील,अमित ओमासे यांनी केले.या क्षेत्रभेटीसाठी उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे,पर्यवेक्षिका सीमा कूळधरण यांचे मार्गदर्शन मिळाले.या उपक्रमाचे संस्थेचे कौतुक कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख व संस्थेच्या सहकार्यवाह,नगरसेविका,पुणे महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.

कसब्यात महापौरांची कारकीर्दच त्यांना उत्तर देईल ..रवी धंगेकर यांचा दावा (व्हीडीओ)

पुणे-कसबा विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसकडे आपण जरूर उमेदवारी मागितली होती,पण कॉंग्रेस ने अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली ,कॉंग्रेस ची लढाई जनहितासाठी आहे या मुळे अशा काळात कॉंग्रेसला साथ दिली पाहिजे या हेतूनेच कोणताही स्वार्थ ,मागणी न करता आपण कॉंग्रेसच्या शिंदे यांच्या समवेत त्यांच्या प्रचारात कसब्यातून तसेच अन्य मतदार संघातील कॉंग्रेस आघाडीच्या  उमेदवारांच्या समवेत प्रचारात उतरलो आहे. कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो भाजपचा पराभव करून त्यांचा मुखवटा खेचू शकतो कसब्याचे बोलायचे झाले तर तिथे भाजपच्या उमेदवार या महापौर आहेत त्यांची महापौर पदाची कारकीर्द आणि या कारकिर्दीत झालेले गैरप्रकार याबाबत त्यांना निश्चित जनतेच्या मतदानातून उत्तर मिळेल असा दावा देखील यावेळी कॉंग्रसचे नगरसेवक रवी धंगेकर यांनी केला आहे. पहा आणि ऐका त्यांनी नेमके काय म्हटले आहे. त्यांच्याच शब्दात ….

तुडुंब उत्साहात रमेश बागवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ….(व्हीडीओ)

0

पुणे- कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराचा नारळ आज ग्रामदैवत भवानी माता मंदिर येथे फोडण्यात आला.

याप्रसंगी प्रसंगी खासदार वंदनाताई चव्हाण, काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, जयदेव गायकवाड, कमलताई ढोले पाटील, पी. ए. ईनामदार, राष्ट्रवादी चे प्रवक्ते अंकुश काकडे, रिपब्लिकनचे राहुल डंबाळे, माजी महापौर  प्रशांत जगताप, अभय छाजेड, शिवाजी केदारी, प्रदिप जगताप, लताताई राजगुरु, सुजाता सदानंद शेट्टी, अविनाश बागवे, अजित दरेकर,रवींद्र धंगेकर, रफिक शेख, चाँदबी नदाफ, विनोद मथुरावाला, करण मकवाना, मंजूर शेख,माजी महापौर  रजनीताई त्रिभुवन, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, संगीता पवार, भोलासिंग अरोरा, विठ्ठल गायकवाड, गौतम महाजन कॉंग्रेसच्या सोनाली मारणे, शर्वरी गोतरणे, शिलार रतनगिरी, दीपक रामनानी, विशाल मलके, साहिल केदारी सह मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

याप्रसंगी बोलताना रमेश बागवे यांनी सांगितले की भाजप-शिवसेना यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्णता नकारात्मक स्वरूपाचाच आहे. सत्ता कालावधीमध्ये त्यांना शिक्षण-आरोग्य-रोजगार- सामाजिक सुरक्षा- झोपडपट्टी धारकांचे प्रश्न, कॅंटोन्मेंट भागातील नागरिकांचे प्रश्न याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेता आलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने लोकहिताच्या राबविलेल्या योजना बंद करण्याचे  काम झाले असल्याने जनतेमध्ये सत्ताधार्यां बद्दल असलेल्या रोषाचा फायदा मिळणार आहे.

मागील पाच वर्षांपासून मतदारसंघांमध्ये ठेवलेला सततचा संपर्क, सरकारविरोधी केलेली आंदोलने ,मित्रपक्ष व सहानुभूतीदार यांची बांधलेली पक्की मोट या मला विजयापर्यंत घेऊन जाण्यास सक्षम असल्याने संपूर्ण प्रचार कालावधीत आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देणार आहोत.

भवानी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत नागरिकां कडून तुफान प्रतिसाद मिळाला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले आहे.

आयटी आणि अभियांत्रिकी व्यावसायिकांशी सिद्धार्थ शिरोळे यांचा संवाद

पुणे : तरुण आणि विचारी व्यक्तीमत्व असल्याने आम्ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीच्या शिवाजीनगर मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना पाठिबा देत असल्याची ग्वाही आज शहरातील आयटी आणि अभियांत्रिकी व्यावसायिकांनी दिली. आज सिध्दार्थ शिरोळे यांच्या कार्यालयामध्ये या सर्व आयटी आणि अभियांत्रिकी व्यावसायिकांनी त्यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. नवी शिकलेली पिढी राजकारणामध्ये आपले मत व्यक्त करीत त्यामध्ये सक्रीय सहभाग घेत आहे ही कौतुकाची बाब असल्याचे सिद्धार्थ शिरोळे यांनी या वेळी नमूद केले.

याबरोबरच आज सकाळी सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे- मुंबई रेल्वे लाईन गेट क्र. २० च्या आजूबाजूला राहणा-या रहिवाश्यांची देखील भेट घेतली. लवकरच रेल्वे लाईनचे विस्तारीकरण होणार असून त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्या येणार आहेत. या समस्या दूर करीत यावर उपाय लवकरच उपाय काढू, असे आश्वासन या वेळी शिरोळे यांनी दिले. बोपोडी गावठाण प्रभागाचे नगरसेवक प्रकाश ढोरे हे देखील यावेळी उपस्थित होते.

याशिवाय काल सायंकाळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सभागृह, माॅडर्न महाविद्यालय रस्ता, शिवाजीनगर येथे कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सिद्धार्थ शिरोळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करीत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विकासाची यात्रा आपल्या भागातील सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचा असेही ते यावेळी म्हणाले. पुणे शहराचे विद्यामान खासदार गिरीश बापट, माजी खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे यांबरोबर नगरसेविका ज्योस्त्ना एकबोटे, अर्चना मुसळे, नीलिमा खाडे, नगरसेवक दत्ता खाडे, अशोक येनपुरे, आदित्य माळवे, विजू शेवाळे, सतीश बहिरट, राजश्री काळे, मधुकर मुसळे ,गणेश घोष, रमेश ठोसर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश ढोरे यांनी केले होते.

पुण्यातील 21 मतदार संघातील 71 उमेदवारांचे अर्ज छाननीत झाले बाद

0

पुणे : शहरासह जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 444 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 71 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 373 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

शहरातील आठ मतदारसंघात 208 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यात 43 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सर्वाधिक 27 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 85 उमेदवारी दाखल झाले होते. त्यापैकी 58 अर्ज वैध झाले असून, 27 अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांनी दिली.

पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मुख्य राजकीय पक्षाचे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.त्यामध्ये  कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे रमेश बागवे,,भाजपचे सुनील कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे, एमआयएमच्या हिना मोमीन, आम आदमी पार्टीचे खेमदेव सोनवणे, मनसेच्या मनिषा सरोदे, बहुजन मुक्ती पार्टीचे हुलगेश चलवादी यांच्यासह बंडखोरी केलेले काँग्रेसचे सदानंद शेट्टी, भाजपचे बंडखोर उमेदवार भरत वैरागे, शिवसेनेच्या बंडखोर पल्लवी जावळे यांच्यासह उर्वरित अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी कसबा पेठ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार नरेंद्र पावटेकर या अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात आला त्यांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवारांनी 19 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यामुळे 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार फैय्याज मुश्‍ताक सय्यद राज यांच्या एबी फॉर्मवर पांढऱ्या शाईने खाडाखोड आणि एकच प्रस्तावक असल्याच्या कारणास्तव तो अर्ज नामंजूर करण्यात आला

शिरोळे घराणं भाजपशी अत्यंत प्रामाणिक – खासदार काकडे

0
पुणे : माजी खासदार अनिल शिरोळे, सिद्धार्थ शिरोळे हे अत्यंत संयमी व शांत स्वभावाचे असून शिरोळे घराणं भाजपशी अत्यंत प्रामाणिक आहे. पक्षाचा कोणताही निर्णय ते मान्य करतात. विद्यमान खासदार असताना अनिल शिरोळे यांनी तिकीट मिळाले नाही तरी त्याक्षणी गिरीश बापट यांची स्वतः भेट घेऊन शुभेच्छा दिल्या, असे मत भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केले.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार संजय काकडे बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार अनिल शिरोळे, खासदार गिरीश बापट, उमेदवार सिद्धार्थ शिरोळे, दत्ता खाडे, बंडु ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक विधानसभा मतदार संघाप्रमाणे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी 31 जण इच्छुक होते. मात्र, उमेदवारी एकालाच मिळते आणि ती सिद्धार्थ शिरोळे यांना मिळाली आहे. आता इतर सर्वांनी शिरोळे यांच्या विजयासाठी काम करायचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे काम घराघरात पोहोचवायचे आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा या विधानसभा निवडणुकीत शिरोळे यांना जास्त मताधिक्य मिळेल आणि सुमारे 35 ते 40 हजार मतांनी ते विजयी होतील, असेही खासदार काकडे म्हणाले.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ हा तसा आकाराने लहान आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाबाबत विशेष सूचना दिल्या असून त्यांचे सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहनही खासदार संजय काकडे यांनी केले.

चंद्रकांत दादांच्या विजयासाठी गिरीश बापटांवर विशेष जबाबदारी

0

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोथरूड विधानसभा मतदारसंघात ‘ विशेष काळजी’ घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता खासदार गिरीश बापट यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.

पालकमंत्री पाटील यांच्या उमेदवारीला पक्षान्तर्गत पातळी वरुन छुप्या पद्धतीने फलकबाजी करत कोथरूडमध्ये झालेला विरोध आता कमी झाला आहे, असे दिसत आहे. तरीही रिस्क नको म्हणून भाजपने आता खासदार बापट यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे.

या बाबतचे पत्र प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी शनिवारी बापट यांना दिले. त्यामुळे पाटील यांच्या विजयाबरोबरच मताधिक्य पण चांगले असेल, यावर बापटाना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि स्थानिक इछुकांच्या ऐवजी चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी दिल्याने प्रचंड विरोध केला जात होता.