Home Blog Page 2823

मॉबलिंचींग विरोधी कायदा करणार. – रमेश बागवे

पुणे-देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा मोब लिंचींग विरोधी कायदा
लागू करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रमेश बागवे यांनी केले.

काँग्रेस-राष्ट्रवादी, रिपब्लिकन मित्र पक्षाचे कॅंटोनमेंट विधानसभेचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ आज
काशेवाडी, हरकानगर, जुना मोटर स्टँड परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात आली यावेळी नागरिकांनी
फुलांची व गुलाब पाकळ्यांची उधळण करून बागवे यांचे स्वागत केले. यावेळी नागरिकांशी संवाद
साधत असताना राज्यातील व देशातील वाढत्या मोबलिंचींग बाबतच्या घटनांविषयी चिंता व्यक्त
करीत आतापर्यंत भटके-विमुक्त दलित व मुस्लीम तरुणांच्या जातीय व धार्मिक विदेशातून करण्यात
आलेल्या हत्या ह्या देशाच्या सार्वभौमत्वाला मारक असून त्या थांबविण्यासाठी राजस्थान, पश्चिम
बंगाल या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील मोबलिंचींग विरोधी कायदा करण्यासाठी आग्रही
राहणार असल्याचा विश्वास बागवे यांच्याकडून यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक रफिक शेख, अविनाश बागवे, शिलार रतंगिरी, राहुल डंबाळे, बबलू
सय्यद, सुरेखा खंडागळे, दयानंद अडागळे, सुरेश व्‍यास, सुंदरम मुदलियार, अरूण गायकवाड, विठ्ठल
थोरात, सुनिल भावकर, उमर शेख, राजू शेख, रईस कुरेशी, सुनिल परदेशी, शिवराम बिबवे, मीरा
दोडके, मीरा बिगे, कविता जाधव, विनोद कराळे, भारत वाघमारे, अशोक गायकवाड, शकिल शेख,
सुरेश भंडारी, अभिजीत आढाव, रूपेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आप’ दिल्ली मॉडेलची अंमलबजावणी महारष्ट्रात करणार -जाहीरनामा प्रसिद्ध

0

मुंबई-आम आदमी पक्ष या निवडणुकीत २४ विधानसभा मतदारसंघात ‘स्वच्छ राजकारण’ आणि ‘नवीन राजकीय पर्याय’ देण्याच्या उद्देशाने तसेच जातीयवादी, मनी-मसल पॉवरच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. आप दिल्ली सरकारच्या मॉडेलवर आधारित धोरण समोर ठेवून आम आदमी पक्ष राज्याच्या ५ विभागात विधानसभा निवडणुक लढवत आहे.

पक्षाच्या जाहीरनाम्यात पर्यावरण धोरणात जल, जमीन, जंगल, ऊर्जा आणि वायू या मुद्द्यांवर लक्ष देण्यात आला आहे. तसेच शिक्षण, आरोग्यसुविधा, निवारा, महिला सुरक्षा, त्याच प्रमाणे उद्योग, कृषी, दळणवळण या मुद्द्यांचा समावेश आहे.

राज्याची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे आणि आम आदमी पक्ष राज्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असेल. दिल्ली राज्य सरकारच्या माध्यमातून ‘आप’ने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अभूतपूर्व-क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. हेच दिल्ली मॉडेल राज्यातील मुख्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

“या जाहिरनाम्याच्या माध्यमातून राज्यातील विविध समस्यांना प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे त्यामुळे पूर्णतः नसले तरी दिल्ली मॉडेल काही प्रमाणात लागू करता येऊ शकते. आम्ही सत्तेत असू अथवा नसू परंतु दिल्ली मॉडेल रचनात्मक काम करण्यासाठी उपयोगी पडू शकेल.”, असे आप महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर मांदियान यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याबद्दत कारवाई करावी. – मोहन जोशी,

0

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रिय मंत्री मंडळाची बैठक झाली. या
बैठकीत केंद्र सरकारच्या १ कोटी १५ लाख कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना ५% महागाई भत्ता
देण्याचे घोषित करण्यात आले. महाराष्ट्रात व हरियाणा राज्यात विधानसभेच्या निवडुका चालू
आहेत. याची माहिती असताना सुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. अशा
प्रकारची घोषणा करून त्या राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रलोभित करण्याचा हा एक प्रकार
आहे आणि आचारसहिंतेचा भंग केलेला आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी व निवृत्त कर्मचारी यांना
महागाई भत्ता देण्यास आमची काहीही हरकत नाही परंतु निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे
पंतप्रधानांनी महागाई भत्त्याची घोषण करून आचारसंहितेचा भंग केला याचा आम्ही आक्षेप
नोंदवितो.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी पंतप्रधानांच्या या
घोषणाचा आक्षेप घेऊन केंद्रिय मुख्य निवडणुक आयुक्तांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार केली आहे व त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी अशी
मागणी केली आहे.

मोदी आणि फडणवीसांवरील विश्वासाने भाजप बनतोय महासागर …सिद्धार्थ शिरोळे (व्हिडीओ)

0

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वासाने भाजपमध्ये असंख्य मान्यवर आणि जाणकार कार्यकर्ते सातत्याने सहभागी होत असून त्याची प्रचीती आपल्याला शिवाजीनगर या मतदार संघात प्रचार करताना येते आहे . आणि या दोन्ही नेत्यांच्या वरील अशा दृढ विश्वासाने राजकीय पटलावर भाजप महासागर बनतो आहे असे संगमवाडी येथील पदयात्रे दरम्यान शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेस मधून भाजपमध्ये आलेले आनंद चंद्रकांत छाजेड ,तसेच विजय शेवाळे,निलेश रेणुसे ,पुणे महापालिकेतील , खडकी कॅन्तोंमेंट बोर्डातील आजी माजी नगरसेवक  याभागातील असंख्य मान्यवर कार्यकर्ते  सहभागी झाले होते .(पहा व्हीडीओ झलक)

दरम्यान संगणकाच्या स्मार्ट युगातही पदयात्रा काढत समाजाच्या प्रत्येक स्तरातील नागरीकांपर्यंत पोहोचण्यासाठी  सिद्धार्थ शिरोळे हे पारंपारिक प्रचारावर भर देत आहेत. गेल्या आठ दिवसात शिवाजीनगर मतदार संघातील विविध ठिकाणी पदयात्रा, प्रचारफे-या, मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांचा प्रचार सुरू आहे. याबरोबरच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयात नुकतीच सदिच्छा भेट देत प्रचारयंत्रणेचा आढावा घेत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.

आज सकाळी देखील भांडारकर रस्ता परिसरातील दत्त मंदिर, कमला नेहरू पार्क, हिरवाई वॉकिंग ट्रॅक बरोबरच डेक्कन जिमखाना हौसिंग सोसायटीमध्ये सुद्धा शिरोळे यांनी भेट दिली. नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन शुभ आशीर्वाद घेतले, चर्चा केली व त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, जोत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नाना मोरे, गणेश बगाडे, जीतू मंडोरा, दत्ता खंडागळे, प्रवीण शेळके, बाबा शिरोळे, निलेश घोडके, मिलिंद टकले आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर येरवडा येथील जय जवान नगर या ठिकाणी देखील प्रचारफेरी पार पडली. या वेळी नगरसेविका श्वेता चव्हाण, शंकर चव्हाण, केतन पवार, अंकुश राठोड, विक्रम राठोड, दीपक चव्हाण, राहुल राठोर, करण पवार, किरण चव्हाण, मोहित काकडे, निखील रणनवरे उपस्थित होते.

 

या अगोदर काल सायंकाळी औंध आयटी पार्क जवळील शांतिनिकेतन या सोसायटीला देखील सिद्धार्थ शिरोळे यांनी भेट दिली. सोसायटी सदस्यांबरोबर विविध बाबींवर या वेळी सविस्तर चर्चा करून नागरिकांच्या अपेक्षाही त्यांनी समजून घेतल्या. यावेळी नगरसेविका सुनीता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेवक विजय शेवाळे आणि माजी नगरसेवक आनंद छाजेड उपस्थित होते.

दरम्यान सिद्धार्थ शिरोळे यांची आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या वेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जानराव, आरपीआय शहराध्यक्ष अशोक शिरोळे, आरपीआय युवक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, पुणे शहर संपर्क प्रमुख अशोक कांबळे, आरपीआय ब्राह्मण आघाडीचे शहराध्यक्ष मंदार जोशी आणि शिवाजी नगर मतदार संघातील पदाधिकारी असलेले रोहित अडसूळ, अविनाश कदम, भीमराव वाघमारे, साहिल डोळस, ज्वेल अँथनी, अण्णा आठवले, नंदा निकाळजे, सुशील सरोवर, आप्पासाहेब वाडेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरीकांना नाहक त्रास देणा-यांना मतदार माफ करणार नाही -आमदार मुळीक

0
वडगाव शेरी  :
लोहगाव आणि इतर ठिकाणी सर्व सामान्य नागरीकांनी व्यवसाय आणि घराचे बांधकाम सुरू केल्यानंतर त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रकार केला जात आहे. गरीब नागरीकांना सन्मानाने जगण्याचे अधिकार आहे. गरीबांना चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. या  गरीबांना  त्रास देणा-यांना मतदार माफ करणार नाही असे मत भाजप महायुतीचे आमदार जगदिश मुळीक यांनी व्यक्त केले.
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, रिपाई, रासप आणि शिवसंग्राम  महायुतीचे उमेदवार  आमदार जगदिश मुळीक यांची प्रचार फेरी आज वडगाव शेरी , साईनाथ नगर, राघोबा पाटील नगर, वृंदावन नगर आणि  गलांडे वस्ती  या  ठिकाणी झाली. यावेळी आमदार मुळीक बोलत होते. यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, , नगरसेविका सुनिता गलांडे, नगरसेवक संदिप ज-्हाड, नगरसेविका शितल शिंदे, साधना भगत, सुधीर गलांडे तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक  आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुळीक म्हणाले की,  गरीबांना व्यवसाय करण्याचा आणि घर बांधण्याचा अधिकार आहे. अनेक जण कर्ज काढून घर बांधण्यासाठी काढतात. पोटाला चिमटा काढून व्यवसाय सुरू करतात.  अशा नागरीकांना त्रास देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. या गरीबाची भाकरी चोरणा-यांना त्यांची जागा दाखवणे गरजेच आहे. त्रास देणा-याच्या विरोधात नागरीकांनी आवाज उठवला पाहिजे.   विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपला भरघोस मतदान करून विरोधकाना त्यांची जागा दाखवा. वडगावशेरी मतदार संघाच्या  विकास करण्यासाठी कोटयावधीचा  निधी आणला आहे. या निधीतून अनेक काम केली आहेत. लोहगाव साठी २६ रस्ते व विविध विकास कामाचा शुभारंभ झाला आहे. सततच्या पावसामुळे विकास काम थांबली आहेत. पाऊस बंद झाल्यानंतर ही कामे सुरू होतील. विरोधक केवळ रस्त्यांच्या अवस्थेचे जुने फोटो सोशल मिडियावर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.  मात्र मतदार त्यांच्या खोट्या जाहिरात बाजीला फसणार नाही. पारदर्शक कारभार करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या सोबत कायम रहातील व आपल्याला पुन्हा संधी देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

मानसिक आरोग्यासंबंधी विविध उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करणार – प्रा. डॉ नितीन करमळकर

0

पुणे:  कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या “सेंटर फॉर मेंटल हेल्थ अंड डिसएबीलिटीज” या सेंटरद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्याने मानसिक आरोग्य व दिव्यांग क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाच्या विविध विभागांच्यावतीने निधी उपलब्ध करून देत दिव्यांगांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाचे औचित्य साधून कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये “सेंटर फॉर मेंटल हेल्थ अंड डिसएबीलिटीज” या सेंटरच्या उद्घाटन सामारोह्प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त संदीप खर्डेकर होते तर डॉ प्रवीण परगावकर, सेंटरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. चेतन दिवाण, महाविद्यालयाचे प्र. संचालक डॉ महेश ठाकूर, व्यवस्थापन समिती समन्वयक प्रसाद कोल्हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या स्पर्धेच्या युगात बहुतांशी विद्यार्थी व पालक हे विविध प्रकारच्या ताण- तणावाखाली वावरताना दिसून येत असून अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी, पालक तसेच समाजातील सर्वच घटकांच्या उत्तम मानसिक आरोग्यासाठी हे केंद्र उपयोगी ठरणार असून विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मदतीने विविध उपक्रम हाती घेऊन मानसिक आरोग्य व दिव्यांग क्षेत्राशी संबंधित विविध योजना, नवीन अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यासाठी चालना देण्यात येणार असल्याचे डॉ नितीन करमळकर यांनी सांगितले.

कर्वे समाजकार्य महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेले “सेंटर फॉर मेंटल हेल्थ अंड डिसएबीलिटीज” हे सेंटर कर्वे समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, महाविद्यालy परिसरातील वाडी-वस्तीमधील नागरिक आणि या क्षेत्रामध्ये अभ्यास करणाऱ्या शिक्षक व संशोधकांसाठी उपयुक्त ठरावे आणि खऱ्या अर्थाने मानसिक आरोग्य व दिव्यांग शिक्षण, संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पुढाकारासाठी हे सेंटर नावारूपास यावे अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

सेंटरचे अध्यक्ष व समन्वयक प्रा. चेतन दिवाण यांनी सेंटरची ध्येय्य, धोरण, व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दिप्प्रज्वलन व महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. डॉ. महेश ठाकूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ प्रवीण परगावकर यांनी मनोगत  व्यक्त केले. सूत्रसंचालन सायली रावराणे यांनी केले. तर आभार समीक्षा महाबळेश्वरकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहिनी दामले, सायली रावराणे, निखील डोंगरे, अपूर्वा भारमल, रोहिणी हुद्दार, दत्ता करचे, स्नेहल माहुलकर, मुकेश ठोके, प्रीतेश बदर, वैशाली अद्वैता, अरुंधती कुलकर्णी, मोतीलाल सोनटक्के, नंदा वायनगंनकर, मिलिंद सोसे, सीमा पोलाया आदींनी विशेष परिश्रम घेतले

सुमित उंद्रे, सान्वी देवरे, सक्षम भन्साळी , रिषीता पाटील , शादृल खवले , सान्वी मिश्रा , इशान देगमवार, आस्मी आडकर यांना विजेतेपद

0

 

पुणे, 11 ऑक्टोबर 2019: ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित 8, 10,12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए-केपीआयटी व आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत सुमित उंद्रे,  सान्वी देवरे,  सक्षम भन्साळी ,  रिषीता पाटील,  शादृल खवले ,   सान्वी मिश्रा , इशान देगमवार व आस्मी आडकर  यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात सुमित उंद्रेने सर्वज्ञ सरवदेचा 7-5 असा तर मुलींच्या गटात  सान्वी देवरेने श्रृष्टी सुर्यवंशीचा  7-2 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात सक्षम भन्साळीने वैष्णव रानवडेचा 7-1 असा तर मुलींच्या गटात रिषीता पाटीलचा सिध्दी मिश्राचा 7-3 असा पराभव केला.

12 वर्षाखालील मुलांच्या गटात शादृल खवलेने चिराग चौधरीचा 5-3, 4-1 असा तर मुलींच्या गटात सान्वी मिश्राने रिषीता पाटीलचा 5-3, 4-0 असा पराभव केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात इशान देगमवारने पार्थ देवरुखकरचा 4-0, 4-0 असा तर मुलींच्या गटात आस्मी आडकरने अलिना शेखचा 4-1, 4-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी-  

8 वर्षाखालील मुले- सुमित उंद्रे वि.वि सर्वज्ञ सरवदे 7-5

8 वर्षाखालील मुली- सान्वी देवरे वि.वि श्रृष्टी सुर्यवंशी  7-2

10 वर्षाखालील मुले- सक्षम भन्साळी वि.वि वैष्णव रानवडे 7-1

10 वर्षाखालील मुली- रिषीता पाटील वि.वि सिध्दी मिश्रा 7-3

12 वर्षाखालील मुले- शादृल खवले वि.वि चिराग चौधरी 5-3, 4-1

12 वर्षाखालील मुली- सान्वी मिश्रा वि.वि रिषीता पाटील 5-3, 4-0

14 वर्षाखालील मुले- इशान देगमवार वि.वि पार्थ देवरुखकर 4-0, 4-0

14 वर्षाखालील मुली- आस्मी आडकर वि.वि अलिना शेख 4-1, 4-1

रिपाइं’ महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार

0
संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची माहिती
पुणे : पुण्यातील आठ मतदारसंघांपैकी कॅन्टोन्मेंट विधानसभेची जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (A) मिळावी असा आग्रह असतानाही त्या जागेवर भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा करून ‘आरपीआय’ला जागा दिली नाही. त्यामुळे दुखावलेल्या ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी ‘रिपाइं’ नेत्यांबरोबर बैठक घेऊन मनधरणी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ‘रिपाइं’ निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होणार असून, महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणणार आहे.
भाजप व रिपाइं यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ व रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भाजपचे उज्ज्वल केसकर, ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, संघटक मोहन जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष वसंतराव बनसोडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष वसीम शेख आदी उपस्थित होते.
अशोक शिरोळे म्हणाले, “पक्षाला एकही जागा न सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्याचा परिणाम म्हणून पुणे शहरामध्ये भाजपच्या एकाही उमेदवाराचे काम करायचे नाही, असे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ठरले होते. त्याप्रमाणे गेले दहा दिवस पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने आठही मतदारसंघांमध्ये महायुतीच्या एकाही उमेदवाराचे काम केले नाही. याची दखल खासदार गिरीश बापट व माधुरी मिसाळ घेत ‘रिपाइं’च्या नेत्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत पक्षाच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांवर विचारमंथन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एकत्र बैठक घेऊन त्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन गिरीश बापट व माधुरी मिसाळ यांनी दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात रिपब्लिकन पक्षासह प्रत्येक मतदारसंघात समिती स्थापन करून रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेऊन एकत्र काम करण्याचे ठरले आहे. पक्षाच्या वतीने प्रत्येक मतदारसंघांमध्ये पन्नास हजार याप्रमाणे आठ मतदारसंघात चार लाख पत्रके वाटून मतदारांशी संपर्क साधला जाईल. उमेदवारांच्या प्रचार यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाग घेतला जाईल.”
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “महायुतीचा घटक पक्ष असलेल्या ‘रिपाइं’ प्रचारापासून दूर राहणे योग्य नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून आश्वासक तोडगा काढला आहे. भाजपने नेहमीच मित्रपक्षांचा आदर केला असून, त्यांच्या मागण्यांचे समाधान करण्यासाठी माझ्यासह शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी पुढाकार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यातील स्मारकासाठी ५-६ एकर जागा द्यावी, नोकऱ्यातील मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्वरित मिळावी, आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत १५ जागा मिळाव्यात, महापौर किंवा उपमहापौर रिपाइंला द्यावे, राज्य पातळीवरील महामंडळात पुण्यातील नेत्यांना अधिकाधिक संधी द्यावी, खडकी व पुणे कॅन्टोमेंटच्या निवडणुकीत प्रत्येकी एक जागा द्यावी, अशा मागण्या ‘रिपाइं’ने केलेल्या आहेत. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून या मागण्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार आहे.” कलम ३५३ मधील सुधारणा आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय निवडणुकीतनंतर तातडीने घेऊ असे आश्वासनही माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिले.

शहरात घड्याळाचे बारा वाजले; मुख्यमंत्री फडणवीस

0

पुणे-पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सांगितला जात होता. अजितदादा या शहराचे नेते होते. आता या बालेकिल्यात दोन उमेदवारही मिळू शकले नाहीत, अशी राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. शहरात घड्याळाचे बारा वाजले आहेत. त्यामुळे घड्याळ घ्यायला कोणी तयार नाही. पक्षात कोणी राहत नाही, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर केली. महायुतीचे शहरातील तीनही मतदार संघातील उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी-चिंचवड शहरातून भाजप-शिवसेनेने हद्दपार केले आहे.

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही. दुसर्‍याला मांडीवर ठेवून निवडणुक लढवावी लागते, हे दुर्देव आहे. हे उमेदवार सक्षम नसून त्यांचे डिपॉझिटही राहणार नाही, त्यांना शहरातील जनती स्थान देणार नाही. राजकीय जीवनात उद्वस्त झालेली ही मंडळी आहेत. त्यांना भविष्य राहिले नाही.

लक्ष्मण जगताप म्हणाले, साडेबारा टक्के, अवैध बांधकामे नियमित केले. शहरातील वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी आरक्षणाला मंजुरी दिली. शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर दिले. नागपूर पेक्षा पिंपरी-चिंचवडवर त्यांनी प्रेम केले. नागपूरनंतर आपल्या शहरात मेट्रो सुरू होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले शहराध्यक्ष, माजी नगरसेवक वसंत लोंढे, घनश्याम खेडेकर, संजय पठारे, राहूल जवळकर, प्रदिप तापकीर, निलेश नेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0

पुणे-यंदाच्या पावसाळ्यात केवळ साडेतीन महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे शहरात 54 हून अधिक नागरिक बळी गेले आहेत. याला जबाबदार धरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

आज त्यांनी या संदर्भातील पत्रक प्रसिद्धीस दिले. काल पावसामुळे सिंहगड रस्ता, धनकवडी, बिबवेवाडी अन्य परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. टिळक रस्त्यावर बस चालकाचा मृत्यू झाला. रोज पावसामुळे वाहतूक कोंडी होते. परंतु, प्रशासन व सत्ताधाऱ्यांना याचे काहीही गांभीर्य नाही.

पानशेत धरण फुटल्याच्या घटनेनंतर गेल्या साडेतीन महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकाच मौसमात बळी जाण्याची घटना यावर्षी घडली आहे.

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात नाला सफाई व पावसाळी गटारे साफ करण्याचा कामासाठी 130 कोटी रुपये खर्च केले. मात्र, पावसाने या सर्वांचा ढिसाळ कारभार उघडकीस आणला आहे. पुणे शहराचा प्रमुख या नात्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

सुधीर जानज्योत आणि सदानंद शेट्टी यांचा ही भाजपा प्रवेश

पुणे-निवडणुकीत अखेरच्या आठवड्यात भाजपाने फोड़ा फोड़ी चे तंत्र पुण्यात आज वेगाने केल्याचे दिसून आले. विमानतळावर मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत रात्री साडेनवू  वाजता गळ्यात कमळ चिन्ह असलेली उपरणे घालून  सुधीर जानज्योत आणि सदानंद शेट्टी यांना भाजपा मध्ये प्रवेश दिला गेल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस मध्ये असताना जानज्योत यांनी शिक्षण मंडळ अध्यक्ष आणि नगरसेवक पद भूषविले आहे तर शेट्टी यांनी स्थायी समिति अध्यक्षपद भूषविले आहे. कैंटोनमेंट मतदार संघात काँग्रेसचे रमेश बागवे यांचे वाढते प्राबल्य कमी करण्यासाठी ही राजकीय खेळी आयत्यावेळी केल्याचे सांगितले जाते आहे.यासमयी खासदार संजय काकडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते. एकीकडे शेट्टी यांच्या पत्नी काँग्रेस च्या नगरसेविका सुजाता या काँग्रेस चे उमेदवार बागवे यांच्या प्रचार फेरीत फिरत असताना दुसरीकडे  शेट्टी यांनी आपल्या गळ्यात भाजपचे उपरणे घालून प्रवेश केल्याचे दिसले आहे .

ततपुर्वी विमानतळ येथे मुख्य मंत्री यांची भेट घेवून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी मंत्री स्व. चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश होता.

कायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा निवडणूक आयोगाने घेतला आढावा

0

पुणे– विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी आज पुणे विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
यशदा येथे पुणे विभागातील पुण्यासह सोलापूर, सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सह जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
श्री सिन्हा म्हणाले, मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचीही विशेष काळजी घेतली जावी. मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, मतदार यादीतील क्रमांक याची माहिती वेळेपूर्वी मिळेल, याची दक्षता घेतली जावी, मतदारांना मतदार चिठ्ठया वेळेपूर्वी उपलब्ध करून दिल्या जाव्यात,
असे सांगून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे सांगितले. निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी. आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्थिर संनिरीक्षण पथके, भरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात यावा. मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पेठांना ,मूळ पुण्याला वैभवशाली बनविण्यासाठी मी उभा -विशाल धनवडे (व्हीडीओ)

0

पुणे- अजगराप्रमाणे शहर वाढले पालिकेच्या हद्दीबाहेर तर बकाल पणा वाढलाच पण उपनगरे स्मार्ट करण्याचे धोरण राबविता राबविता ,मूळ पुण्याकडे मात्र साऱ्यांनी दुर्लक्ष केले ,ज्या मूळ पुण्याच्या जीवावर आपण मोठे झालो त्या पुण्याला ,पुणेकरांना ओळख देण्याची गरज वाटत नाही एवढी ‘मोठ्ठी’ माणसे ‘ती’आहेत. त्यामुळे  आपल्या पेठेतील माणसांना ती विसरली ,त्यांच्या समस्यां त्यांना आपल्या -विशेष वाटू लागल्या नाहीत . म्हणूनच कसब्याला आता आपल्यातलाच एक सामान्य पण काम करणारा , आपल्याला आपल्या परिस्थितीला न विसरता , मूळ पुण्याला स्मार्ट बनविणाऱ्या एका आमदाराची गरज आहे हे मला जाणवू लागले आणि म्हणूनच मी पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला उभा राहिलो .राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार कसब्याला,इथल्या पेठांना आणि पेठांतील रहिवाश्यांना हव्या आहे त्या प्रवर्गात नाही मोडत . पण मी त्यांना जरूर आपला वाटतो आणि वाटेल आणि त्यांच्यातच रमून जुन्या पुण्याला स्मार्ट बनवेल या हेतूनेच हि निवडणूक लढवीत असल्याचे येथील शिवसेनेचे  बंडखोर अशी उपाधी लावून प्रचार करीत असलेले अपक्ष उमेदवार ,शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी सांगितले .

पुण्यात नाही, पाण्यात राहतो : शहरांचा विचका केलाय यांनी …..

0

‘राज्याला प्रबळ विकल्या न जाणाऱ्या  विरोधी पक्षाची गरज -माझ्या हाती विरोधीपक्ष द्या’- राज ठाकरे

मुंबई:पुण्यात नाही, पाण्यात राहतो : शहरांचा विचका केलाय यांनी …..असे सांगत  महाराष्ट्राला आज सक्षम, प्रबळ आणि कोणासमोरही घरंगळत न जाणाऱ्या विरोधी पक्षाची गरज असून ती संधी तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्या. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मनसेच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेतून महाराष्ट्रातील जनतेला केले.

राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा बुधवारी पुण्यात होणार होती. ती सभा पावसामुळे रद्द करावी लागल्यानंतर मुंबईत सांताक्रुझ येथे आज झालेली सभा शुभारंभाची सभा ठरली. या सभेत अवघ्या १५ मिनिटांच्या भाषणात राज यांनी राज्यात सत्ता नव्हे तर विरोधी पक्षाचं स्थान मिळेल इतकं बळ मनसेला देण्याचे आवाहन मतदारांना केले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. तो दाखला देत, आज सरकारला जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाची गरज आहे आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल. म्हणूनच मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन तुमच्यापुढे आलो आहे. येत्या १० दिवसांत माझ्या १८ ते १९ सभा होणार आहेत. या प्रत्येक सभेत मी ही एकच मागणी करणार आहे, असे राज यांनी सांगितले.विरोधी पक्षासाठी मतदान करा, अशी भूमिका मांडणारा मनसे हा भारतीय राजकारणाच्या इतिहासातील पहिल पक्ष असेल, असेही राज यावेळी म्हणाले. माझा आवाका मला माहीत आहे. त्यामुळे आताच मला सत्ता हवी, असे मी म्हणणार नाही. सत्ता आवाक्यात असेल तेव्ही ते मागणं घेऊन मी नक्कीच तुमच्यापर्यंत येईन. तूर्त मनसेला एक प्रबळ विरोधी पक्ष होण्यासाठी बळ द्या. मी दिलेल्या प्रत्येक उमेदवारात सरकारला जाब विचारेल इतकी आग आहे. तुमचे प्रश्न खंबीरपणे विरारू शकेल इतकी धमक आहे. मनसेचा विरोधी पक्षनेता झाला तर नक्कीच तो या सरकारला नामोहरम करेल, असा विश्वास राज यांनी बोलून दाखवला.
पुण्यात नाही, पाण्यात राहतो!
ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत. शहरांचा आज पार विचका झाला आहे. अर्ध्या तासाच्या पावसाने बुधवारी पुणे विस्कळीत झाले. मी पुण्यात नाही पाण्यात राहतो, असे सांगण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. या सगळ्याला सरकारच जबाबदार आहे, असा घणाघात राज यांनी केला.
पीएमसी बँक बुडवणारे भाजपवालेच
पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतंय, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?, असा सवालही राज यांनी उपस्थित केला.

रस्त्यावर फिरणारे लाखो मनोरुग्ण हे आजही उपेक्षित व वंचितच – डॉ भरत वाटवाणी

0

डॉ भरत वाटवाणी  यांना प्रा. डॉ देवानंद शिंदे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान

पुणे:  देशाच्या कानाकोपर्यातील विविध रस्त्यावर फिरणारे लाखो मनोरुग्ण हे आजही उपेक्षित व वंचितच राहिलेले  असून त्यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी शासकीय पातळीवरून मोठ्या प्रमाणात हालचाली होणे आवश्यक असल्याचे मत श्रद्धा पुनर्वसन केंद्राचे संस्थापक व गतवर्षीच्या रँमन मँगसेसे पुरस्काराचे मानकरी व जेष्ठ मनोविकार तज्ञ  डॉ भरत वाटवाणी यांनी कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये जीवनगौरव पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलताना व्यक्त केले.

मनोदय मेंटल हेल्थ फोरम, कर्वे समाज सेवा संस्था पुणेच्या वतीने वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या “जीवनगौरव पुरस्कार वितरण व समुपदेशन अभ्यासक्रम उद्घाटन” सोहळ्याप्रसंगी श्रद्धा पुनर्वसन केंद्राचे संस्थापक, गतवर्षीच्या रँमन मँगसेसे पुरस्काराचे मानकरी व जेष्ठ मनोविकार तज्ञ  डॉ भरत वाटवाणी  यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे कुलगुरू प्रा.डॉ. देवानंद शिंदे व जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ उल्हास लुकतुके यांच्या हस्ते “जीवन गौरव पुरस्कार- २०१९” प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कर्वे समाज सेवा संस्थेचे चेअरमन सदानंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच  संस्थेचे प्र. संचालक डॉ. महेश ठाकूर,  मेंटल हेल्थ फोरमचे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवाण तसेच फोरम चे सल्लागार डॉ सुप्रकाश चौधरी व डॉ संजय कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये हा सोहळा पार पडला.

श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून आपण आजपर्यंत जवळजवळ आठ हजाराहून जास्त रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना रस्त्यावरून उचलून त्यांच्यावर उपचार करीत त्यांचे स्वग्रही सोडून पुनर्वसन केले असले तरीही आज हि असे अनेक रुग्ण रस्त्यावर भटकत आहेत त्यांच्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली होऊन त्यांना मदत मिळणे आवश्यक असून देशातील तरुणांनी व विशेषतः समाजकार्याचे शिक्षण घेणार्या तरुणांनी यासंबंधी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मट देखील डॉ भरत वाटवाणी  यांनी व्यक्त केले.

डॉ भरत वाटवाणी  यांनी सुरु केलेले कार्य हे मानवतावादी दृष्टीकोनातून सुरु केलेले असे उल्लेखनीय कार्य असून समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या या कार्यास हातभार लावावा व समाजामध्ये अशा रुग्णाच्या उपचार व पुनर्वसनासाठी लोकजागृती करण्याचे काम करावे असे आवाहन डॉ उल्हास लुकतुके यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद देशपांडे यांनी जीवन गौरव पुरस्कार्थीं डॉ भरत वाटवाणी जीवनगौरव पुरस्कार देणे हा आमच्या संस्थेचा देखील सन्मान असल्याचे सांगत त्यांनी केलेल्या महान कार्यास समाजकार्य महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी हातभार लावावा व हे अद्वितीय कार्य असेच अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

डॉ. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, डॉ सुप्रकाश चौधरी, डॉ. संजय कुमावत यांनी मनोगते  व्यक्त करीत जीवन गौरव पुरस्कार्थी व समुपदेशन अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमाची सुरुवात दिप्प्रज्वालन व महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

मेंटल हेल्थ फोरमचे कार्याध्यक्ष प्रा. चेतन दिवाण तसेच डॉ शरद अकोले, डॉ प्रवीण पारगावकर, रॉनी जॉर्ज, शर्मिला सईद, मेधा पुजारी, अरुंधती कुलकर्णी, मोतीलाल सोनटक्के, भाग्यश्री दिक्षित, डॉ. जयदीप पाटील, नीलिमा बापट, स्मिता गोडसे,डॉ. अनुराधा पाटील, राहुल शिरुरे आदी मेंटल हेल्थ फोरमच्या सल्लागारांच्यावतीने डॉ भरत वाटवाणी यांचा मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चेतन दिवाण यांनी केले. सूत्रसंचालन शर्मिला सईद यांनी केले. तर आभार स्मिता लोंढे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली अद्वैता, नंदा वायगनकर,रुपाली खेडकर, सिमा पोलाया, अपर्णा सांगलीकर, सत्यपाल लोने, क्रांती खैरमोडे, इम्रान सय्यद, जगदीश बोरुडे आदींनी विशेष परिश्रम घेतले