Home Blog Page 282

मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते महाआवास अभियान अंतर्गत पुरस्कारांचे वितरण

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार;घरकुलांसाठी ग्रामीण भागात ८० हजार कोटींची गुंतवणूक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नव्याने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुल देणार-केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान

पुणे, दि.३: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी ३० लाख घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल, या माध्यमातून ग्रामीण भागात ८० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रत्येकाला घर देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ग्रामविकास व पंचायत राज व राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण- गृहनिर्माण विभागाच्यावतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्र.विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव गया प्रसाद, राजाराम दिघे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

विक्रमी संख्येने महाराष्ट्रासाठी घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर केल्याने केंद्रीय मंत्री श्री.चौहान यांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, २०११ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात बेघर असलेल्यांना घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. राज्याचे उद्दीष्ट अत्यंत कमी होते. २०१७ मध्ये हे उद्दीष्ट पुरेसे नसल्याने अधिक उद्दीष्ट मंजूर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर आलेल्या आवास प्लस योजनेत नोंदणीची सुविधा केंद्राने दिल्याने ३० लाख बेघराची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्याची घरे पूर्ण करीत असतांना केंद्राने २० लाख घरकुलांना मंजूरी दिली. त्यापैकी १० लाख घरांचा पहिला हप्ता ग्रामविकास विभागाने जमा केले आहे. आता नव्याने १० लाख घरकुलांचे पत्र मिळाल्याने जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी घरकुलाशिवाय राहणार नाही. शिवाय अजून कुणी सुटले असल्यास नव्याने सर्वेक्षण करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

घरकुलांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महत्वाचे निर्णय
घराची मुलभूत गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्धार केला असून राज्य शासनाने घरकुलासाठी ५० हजार रुपये अधिक देण्याचा निर्णय घेतला. दीनदयाल उपाध्याय घर खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या घराला सोलर पॅनल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.घरासोबत इतर मुलभूत सुविधा गरीब माणसाला देण्यासाठी वेगाने काम करण्यात येत आहे. घरकुलांचे उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभाग अत्यंत वेगाने काम करीत आहे. बेघरमुक्त महाराष्ट्राची संकल्पना राबविण्याचे प्रयत्न होत आहे. जागेची कमतरता असतांना दुमजली घरे, गृहसंकुलासारख्या संकल्पना राबवून ती समस्या दूर करण्यात आली. गायरान जमिनी देण्याचा निर्णय घेण्यात आला, गावठाणाची हद्दवाढ करीत जमिनीचे पट्टे देऊन घरकुलाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रकारच्या योजना राबवून नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यायचा आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर शासनाचा भर
‘लखपती दिदी’ योजनेच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती होत आहे. राज्यातही यादृष्टीने प्रयत्न होत असून मागील वर्षी २६ लाख ‘लखपती दिदी’ झाल्या असून यावर्षी २५ लाख महिला लखपती दिदी होतील. अशा एक कोटी महिलांना ‘लखपती दिदी’ करण्याचे राज्याचे उद्दीष्ट आहे. आमच्या बहिणी याद्वारे सक्षम होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.यासाठी ग्रामविकास विभागाच्या मागे राज्य शासन खंबिरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या नावाने घर देण्यात यावे, असे आवाहनही श्री.फडणवीस यांनी केले.

प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुल देणार-केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
आजचा क्षण अभिमानास्पद आणि ऐतिहासिक असल्याचे नमूद करून केंद्रीय मंत्री श्री.चौहान म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केलेला संकल्प आज पूर्ण होत आहे. आज १० लाख घरकुलांचे उद्दीष्ट मंजूर केल्यानंतर एकही गरीब घरावाचून वंचित राहणार नाही. या घरकुलांच्या माध्यमातून गरिबांना केवळ घर मिळणार नाही, २० लाख घरांच्या माध्यमातून होणाऱ्या ६५ हजार कोटींच्या गुंतवणूकीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अद्यापही २०१८ च्या यादीतून नाव सुटलेल्यांना घरे देण्यासाठी सर्वेक्षण करावे, नव्या सर्वेक्षणानंतर प्रत्येक बेघर माणसाला घर देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

घरकुल हा प्रत्येकाचा मुलभूत हक्क आहे. त्यामुळे घरकुल मंजूर करण्यासाठी असलेल्या अटी कमी करण्यात आल्या आहेत. आता दुचाकी असलेल्या, अडीच एकर बागायती किंवा ५ एकर जिरायती शेतजमीन असलेल्यांना किंवा १५ हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्यांनाही नव्या सर्वेक्षणात घरकुल मंजूर करण्यात येईल. महिलांनाही सन्मानाने जगता यावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे अर्ध्या लोकसंख्येला न्याय मिळाला असून या महिलांना ‘लखपती दिदी’ बनविण्याचे कामही करायचे आहे. या महिलांना उद्योगाशी जोडून समृद्ध करण्याचे कार्य करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

विकसीत भारतासाठी विकसीत शेती आणि समृद्ध शेतकरी उद्दीष्ट समोर ठेवून केंद्र सरकार काम करीत असून ग्रामीण भागात कृषी वैज्ञानिक मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. या विकसीत कृषी संकल्प अभियानात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.चौहान यांनी केले.

हक्काच्या घरामुळे गरिबांना स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचा आधार मिळाला-उपमुख्यमंत्री अजित पवार
ग्रामविकास विभागाचा हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादीत नूसन आपल्या ग्रामविकास क्षेत्रात सामुहीक यश आणि प्रयत्नांचा उत्सव असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आपले घर ही फक्त वास्तू नसून स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचा आधार असतो, हा आधार राज्यातील लाखो नागरिकांना मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत यावर्षी देखील लाखो नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. देशात ३ कोटी नागरिकांना घर देण्याचे उद्दीष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. महाआवस अभियान राज्य शासनाचे अभिनव पाऊल होते. यात घरासोबत वीज, शुद्ध पाणी, रस्ता, गॅस जोडणी, स्वच्छता गृह आणि मनरेगा अंतर्गत रोजगार आदी मिळत असल्याने घर समृद्ध आणि राहण्याजोगे बनले आहे.

महाराष्ट्राला केंद्र सरकारने २० लाख घरकुलांचे उद्दीष्ट दिल्याबद्दल केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्री.चौहान यांना धन्यवाद देऊन श्री.पवार पुढे म्हणाले, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी क्षमतेने काम केल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. यापुढेदेखील या प्रयत्नात सातत्य ठेवून वेगाने घरकुले उभारावे लागतील. घरकुलासाठी गायरान जमीन देण्याचा क्रांतीकारी निर्णय शासनाने घेतल्याने अनेकांचे घराचे स्वप्न पुणे होईल. ग्रामीण गृहनिर्माण अभियान यशस्वी करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. कष्टकरी सर्वसामान्य माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

घरकुलांची उद्दीष्टपूर्ती होण्यासाठी भरीव प्रमाणत निधी उपलब्ध करून देण्यात आला असून प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम आवास योजना, पारधी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजनांसारख्या योजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या प्रकल्पांची ग्रामीण भागात वेगाने अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केली. राज्याच्या ग्रामविकास विभागाने देशपातळीवर चांगली कामगिरी करून राज्याचा लौकीक उंचावला असून घरकुलाचे उद्दीष्ट पूर्ण करून या लौकीकात भर घातली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामविकास मंत्री श्री.गोरे म्हणाले, सर्वांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करीत असतांना गेल्या ७ वर्षात राज्याला प्रधानमंत्री आवास योजनेचे १३ लाख ५७ हजार उद्दीष्ट मिळाले होते. यावर्षी २० लाख घरांचे विक्रमी उद्दीष्ट मिळाल्याने या योजनेच्या अंमलबजावणीला गती येईल. या घरांना मंजूरी देण्याचे काम ४५ दिवसात करण्यात आले आणि मंजूरी पत्र एकाच दिवशी देण्यात आले. घर बांधत असतांना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घरकूलासाठी ५० हजाराचे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला.

घर बांधण्यासाठी वाळूची अडचण दूर करण्यासाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूमिहीन लाभार्थ्याला घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गायरान, गावठाण जमीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पं.दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० हजाराहून अधिक घरे पूर्ण केली असून पुढील वर्षभरात सर्व २० लाख घरे उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या वर्षभरात ५० लाख ‘लखपती दिदी’ करण्यात येतील, असेही श्री.गोरे म्हणाले.

यावेळी ‘अमृत ग्राम महा आवास अभियान-महाराष्ट्राची गौरवगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत पुरस्कार विजेत्यांची यशोगाथा देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रतिनिधीक स्वरूपात महा आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांच्या चावीचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० लाख घरांचे उद्दीष्ट पत्र सुपूर्द करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींची यादी

अमृत महाआवास अभियान २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे विभाग, जिल्हे, तालुके, ग्रामपंचायतींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
कोकण विभाग प्रथम, नाशिक विभाग द्वितीय तर नागपूर विभाग तृतीय

राज्य पुरस्कृत आवास योजना
नाशिक विभाग प्रथम, कोंकण विभाग द्वितीय तर पुणे विभाग तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
अहिल्यानगर जिल्हा प्रथम, सिंधुदुर्ग जिल्हा द्वितीय, गोंदिया जिल्हा तृतीय.

राज्य पुरस्कृत आवास योजना
अहिल्यानगर जिल्हा प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय, सातारा जिल्हा तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका प्रथम, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड द्वितीय, सातारा जिल्ह्यातील जवळी तालुका तृतीय.

राज्य पुरस्कृत आवास योजना
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुका प्रथम, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी द्वितीय, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुका तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
सातारा जिल्ह्यातील येळगाव ता.कराड ग्रामपंचायत प्रथम, सातारा जिल्ह्यातील भुडकेवडी ता.पाटण द्वितीय तर वाशीम जिल्ह्यातील चोंढी ता.मानोरा तृतीय.

राज्य पुरस्कृत आवास योजना
सातारा जिल्ह्यातील बोंद्रे ग्रामपंचायत ता. पाटण प्रथम, वाशीम जिल्ह्यातील कारखेडा ता. मानोरा द्वितीय, रत्नागिरी जिल्ह्यातील कुळवंडी ता.खेड ग्रामपंचायत तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतीसाठी जळगाव जिल्ह्यातील हनुमंत खेडे ग्रामपंचायत ता.धरणगाव प्रथम, भंडारा जिल्ह्यातील भोसा (टाकळी) ता.मोहाडी द्वितीय तर वाशीम जिल्ह्यातील मोहगव्हान ग्रामपंचायत ता. मानोरा तृतीय.

राज्य पुरस्कृत आवास योजना
सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतीसाठी नाशिक जिल्ह्यातील अंतापूर ग्रामपंचायत ता. बागलाण प्रथम, परभणी जिल्ह्यातील डोंगरजवळा ग्रामपंचायत ता.गंगाखेड द्वितीय, पुणे जिल्ह्यातील शिंद ग्रामपंचायत ता.भोर तृतीय.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
सर्वोत्कृष्ट गृहसंकुलासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील वांगदरी ग्रामपंचायत ता.श्रीगोंदा प्रथम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गणोरी ता. फुलंब्री द्वितीय,सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी दहिवडी ग्रामपंचायत ता. मंगळवेढा तृतीय.

राज्य पुरस्कृत आवास योजना
सर्वोत्कृष्ट गृहसंकुलासाठी अहिल्यानागर जिल्ह्यातील नांदगाव ग्रामपंचायत ता. अहिल्यानगर प्रथम, पुणे जिल्ह्यातील कुशेर बु. ता.आंबेगाव द्वितीय, चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत ता. राजुरा तृतीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

पुणे, दि. ३: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील ‘उमेद सावित्री’ या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन विकास मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, आमदार जगदीश मुळीक, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते.

मान्यवरांनी दालनाची पाहणी करून महिलांशी संवाद साधला आणि दालनातील वस्तूंची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी बचत गटातील महिलांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पुणे विमानतळ संचालक संतोष डोके, पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे विमानतळातील पहिलेच दालन
पुणे जिल्हा परिषद महिला बचत गटांच्या वस्तूंच्या एकत्रित विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी तसेच या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. त्यातूनच सन २०२४ मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पुणे यांच्या माध्यमातून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ केंद्रावर विक्री केंद्र मिळविण्यासाठी प्रयत्न केला. त्याला विमानतळ प्रशासनाने सकारात्मक सहकार्य केले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे ‘अवसर’ या योजनेंतर्गत स्थानिक स्वयं सहायता समूहातील कुशल कारागीरांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी विमानतळावर विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेंतर्गत ‘उमेद’च्या स्वयंसहायता बचत गटांच्या महिलांना या दालनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रात महिला बचत गटांना पहिल्यांदाच अशी संधी मिळाली आहे.

पुण्याच्या ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ नाट्यकृतीने मने जिंकले

पुणे, दि. ०३ जून २०२५: महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात मंगळवारी (दि. ३) थाटात उद्घाटन झाले. त्यानंतर पुणे परिमंडलाने सादर केलेल्या ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या नाट्यकृतीने रसिकांची मने जिंकली.

पुणे प्रादेशिक नाट्यस्पर्धेचे उद्घाटक म्हणून संचालक श्री. सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प) व श्री राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे (पुणे), श्री. स्वप्निल काटकर (कोल्हापूर) व श्री. धर्मराज पेठकर (बारामती) उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी महावितरणकडून नाट्यस्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या व्यासपीठावर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. महावितरणमधील आपापली जबाबदारी सांभाळून हौशी नाट्यकलावंत दर्जेदार नाट्यकृती सादर करतात. त्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो ही आनंदाची बाब असल्याचे सांगत संचालक श्री. सचिन तालेवार व संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.   

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे म्हणाले की, वर्षभर विविध पदांचे कर्तव्य बजावत असताना नाट्य कलावंताना कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळते. या संधीचे सोने करण्यासाठी प्रचंड मेहतन घेतली जाते. व्यावसायिक दर्जाच्या बरोबरीने नाटकांचे सादरीकरण होते, ही समाधानाची व आनंदाची बाब आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी केले. मराठी संस्कृतीचा नाटक हा अविभाज्य भाग आहे. नाटकांची ही समृद्ध परंपरा महावितरण देखील जोपासत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंते सर्वश्री ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नाट्यस्पर्धेच्या पहिल्या सत्रात अजित दळवी लिखित ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या नाटकाच्या कसदार सादरीकरणातून पुणे परिमंडलाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. वैद्यकीय सेवा हा व्यवसाय आहे की धंदा यातील संघर्ष चितारताना पुण्याच्या नाट्यकलावंतांनी नाट्यसंहितेचे अप्रतिम सादरीकरण केले. यात प्रामुख्याने सोनाली बाविस्कर (वैदेही), भक्ती जोशी (रत्ना), सचिन निकम (डॉ. पेंडसे), विजय जोशी (शिरीष), अभिजित भालेराव (पवार) यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तर विशाल कानपिळे, अविनाश लोखंडे, स्नेहलता हंचाटे, शैलेंद्र भालेराव यांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला. बुधवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता बारामती परिमंडलद्वारे शफाअत खान लिखित ‘राहिले दूर घर माझे’ ही नाट्यकृती सादर होईल. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरणचा कार्यक्रम होईल.

राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश ! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांचे संघटनेने मानले आभार

मुंबई : राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्स ना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबत चे परिपत्रक आज दिनांक 3 जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटी पर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडिया मधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महा अधिवेशनादरम्यान सुद्धा तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुरावामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे.

राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचा यशस्वी पाठपुरावा

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील12हजार हून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत सन 2019 पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राज मान्यता व शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्याने अखेर यश मिळाले आहे.

प्रादेशिक, भाषिक संस्कृती जोपासणारे राज्यच प्रगती करू शकतील-कॉ. अजित अभ्यंकर

बंधुता दिनी सातव्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवात विश्वबंधुता भूषण पुरस्काराने सन्मान

पुणे: “स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली. भाषिक अस्मिता व प्रादेशिक संस्कृती जपणारी दक्षिणेकडील राज्ये आजही प्रगती करताना दिसत आहेत. भाषा आचार व विचार प्रसाराचे माध्यम आहे. आपली मराठी भाषा, संस्कृती संपवली जात असताना आपण गप्प बसणे योग्य नाही. बंधुतेच्या तत्वाने त्याचा विरोध करून मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी केले. ज्यांच्या घामाने इमारती उभ्या राहता, त्यांना राहायला घर नाही. मात्र, राज्यकर्त्यांच्या मेहेरबानीने ठराविक लोक २०-२५ मजल्याच्या बंगल्यात राहतात, हा विरोधाभास आजही कायम असून, ही आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आपण एकत्रितपणे लढा द्यायला हवा, असेही ते म्हणाले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुता दिनाच्या निमित्ताने आयोजित सातव्या बंधुता काव्यमहोत्सवाच्या समारोपावेळी कॉ. अजित अभ्यंकर व प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांना ‘विश्वबंधुता भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र, संविधानाची प्रत व तिरंगी उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष प्रा. भारती जाधव, निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, कवयित्री संगीता झिंजुरके आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय नगरकर म्हणाले, “सध्याच्या काळ भयानक असून, जाती-जातीमध्ये उभ्या झालेल्या भिंती, वर्णभेद अयोग्य आहे. यातून बाहेर पडून चांगला समाज घडायचा असेल, तर बंधुतेचा विचार तळागाळात रुजणे खूप आवश्यक आहे. साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून नवीन पिढीला सत्य आणि संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे लिखाण करायला हवे.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “वयाच्या अठराव्या वर्षांपासून बंधुतेची कावड खांद्यावर घेऊन समाजात बंधुभाव व समतेचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. पाच दशकांच्या या प्रवासात प्रेमाने, आपुलकीने माणसांची संपत्ती कमावता आल्याचे समाधान आहे. बंधुता विचारच मानवी जीवनात शांतता व समृद्धी आणू शकते. त्यामुळे बंधुतेचा विचार खोलवर रुजविण्याची गरज आहे.”

प्रा. भारती जाधव यांनी स्वागत केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी आभार मानले.

भ्रष्टाचार हाच भाजपमध्ये जाण्याचा मार्ग:प्रकाश महाजन यांची टीका

संभाजीनगर -भाजपने ज्यांच्याविरोधात मोर्चे काढले, तेच लोक आज भाजपसोबत सत्तेत आहेत. भाजपच्या या स्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मंगळवारी केली. यावेळी त्यांनी सध्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश मिळत असल्याची खंतही व्यक्त केली.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11 व्या स्मृतीदिनानिमित्त प्रकाश महाजन यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपच्या विद्यमान धोरणांवर निशाणा साधला. ते म्हणाले, पूर्वी भाजपमध्ये चळवळीत काम करणाऱ्यांना प्रवेश दिला जात होता. गोपीनाथ मुंडे हे स्वतः चळवळीतून आले होते. त्यांचे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध होते. पण आज भाजपची अवस्था पाहिल्यावर खंत वाटते. आता भ्रष्टाचारातून भाजपमध्ये एन्ट्री मिळते. अशोक चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासारखे लोक आज भाजपसोबत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सिंचन घोटाळ्यासंबंधी एक मोर्चा निघाला होता. त्यात गोपीनाथ मुंडे यांचे डोके फुटले होते. ज्यांच्याविरोधात हा मोर्चा निघाला होता, तेच लोक आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसल्याचे दिसतात. ही दुर्दैवी गोष्ट आहे. संघर्षाच्या काळात अनेकजण भाजपसबोत होते. पण सत्ता आल्यानंतर ते कुठेच दिसत नाही. भाजप आज प्रोफेश्नल पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे त्यांचे शिष्य समजल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी पक्षाची ही अवस्था केली आहे, असे ते म्हणाले.

प्रकाश महाजन यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पाठिंब्याची एक आठवणही सांगितली. गोपीनाथ मुंडे यांचा स्वभाव आव्हानांना सामोरे जाण्याचा होता. त्यांनी कधीही आव्हानांना पाठ दाखवली होती. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या रात्री एक बैठक झाली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला एका मोठ्या नेत्याने विरोध केला होता. पण गोपीनाथ मुंडेंनी त्यांचे काहीही ऐकले नाही. त्यांनी फडणवीस यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

माझे वडील काँग्रेस व नेहरूंच्या विचारसरणीचे होते. त्यामुळे गोपीनाथ मुंडे आमच्याकडे आले की, पहिल्यांदा त्यांची भेट घ्यायचे. त्यावेळी आमचे वडील त्यांना म्हणायचे की, गोपीनाथ तू यांच्या (भाजप) नादी लागू नकोस. काँग्रेसमध्ये जा. तिथे तू मुख्यमंत्री होशील. पण दुर्दैवाने ते मुख्यमंत्रीपदापासून फक्त एकच पाऊल मागे राहिले, असेही प्रकाश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.

ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांची पर्यावरण प्रबोधनाची वारी…!

कीर्तनातून रंजन करता-करता डोळ्यांत अंजन घालण्याची किमया कीर्तनकार पार पाडीत असतात. आपल्या कृतीतून,वाणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचं काम सातत्याने कीर्तनकार करीत असतात. 

ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे बारामती, पुणे इथल्या इंग्रजी माध्यमात शिक्षिका म्हणून काम करीत असतानाच महिला कीर्तनकार म्हणून नावारूपाला आल्या. अध्यात्माचा आणि पर्यावरणाचा सुवर्णमध्य साधून ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे यांचा चालू असलेला प्रवास अविश्वसनीय आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना पर्यावरणासाठी काही तरी करावं, या उद्देशानं त्या ज्या-ज्या खेडेगावात कीर्तनासाठी जातात तिथं-तिथं एक रोप लावत आणि त्या रोपाची काळजी घेण्याची जबाबदारी तिथल्या गावकऱ्यांवर सोपवतात. पुन्हा त्याच ठिकाणाहून कीर्तनाचं निमंत्रण आल्यावर दिलेल्या रोपाची योग्य ती निगराणी राखली जाते का, त्याची काळजी घेतली जाते का… हे पाहूनच त्या कीर्तनाला होकार किंवा नकार देतात.

आपल्या या कृतीतून पर्यावरणशिक्षणाची एक चळवळ त्यांनी निर्माण केली आहे.  ‘आजूबाजूला अनेक नकारात्‍मक गोष्‍टी घडत असल्‍या तरी त्‍यांतील सकारात्‍मक बाबींवर लक्ष केंद्रित करून त्‍यांना प्रकाशझोतात आणण्‍याचं काम मला महत्त्वाचं वाटतं, ‘ असं ह.भ.प. अश्विनी महाराज टाव्हरे म्हणतात.

‘माझ्या कीर्तनातून समाजाला आदर्शांकडे नेण्याचा माझा प्रयत्न आहे.’ असं त्या सांगतात. परिवर्तनाचा प्रयत्न करत आपल्या धरणीमातेला, निसर्गाला, पर्यावरणाला समृद्ध करण्याचा त्यांचा संकल्प त्यांना वेगळं ठरवतो. येत्या ५ जूनला ‘पर्यावरण दिन’ आहे. या दिनाचं औचित्य साधत त्यांच्या कीर्तन सादरीकरणाचा विशेष भाग  ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये रंगणार आहे. या शोमध्ये  ह. भ. प. अश्विनी महाराज टाव्हरे आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकतील.

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवार, सकाळी ८.०० वाजता सोनी मराठी वाहिनीवरून प्रसारित होत आहे.  

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी, एमएसपी सारख्या १६ आश्वासनांचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ

यवतमाळच्या आर्णीतून सुरु झालेला शेतकरी संघर्षाचा आवाज मुंबईमार्गे दिल्लीपर्यंत पोहचवू.

पंतप्रधान मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी यवतमाळच्या दाभडीत काँग्रेसची शेतकरी सन्मान पदयात्रा.

यवतमाळ/मुंबई, दि. ३ मे २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली नाही. शेतकऱ्यांची अवस्था आज अत्यंत बिकट झालेली आहे, म्हणून शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाने सन्मान यात्रा काढली असून या यात्रेचा आवाज आर्णीतून मुंबईमार्गे दिल्लीत पोहचवू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली लोकसभा निवढणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिरापासून शेतकरी सन्मान पदयात्रा काढण्यात आली. यात्रा सुरु करण्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. या पदयात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभेने झाला. यावेळी माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या व प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, खा. प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री अनिस अहमद, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री वसंत पुरके, आ. राजेश राठोड, आ. अनिल मांगुळकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, सचिन नाईक यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, लाखो गेले तरी चालतील पण पोशिंदा जगला पाहिजे असे म्हटले जाते पण या पोशिंद्याचेच प्रचंड हाल होत आहेत. आज हरभरा, कापूस, सोयाबीन, तूर, कांद्यासह कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, कष्टाचा पैसा मिळत नाही. सोयाबीन तेलाची किंमत १६५ रुपये लिटर आहे आणि सोयाबीनला भाव मात्र किलोला ३५-४० रुपये मिळतो. तेलाचा भाव पाहता सोयाबीनला ९ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे पण तो मिळत नाही, मधला मलिदा कोण खातो तर तो अदानी खातो. भाजपाने हर घर तिरंगा अभियान केले पण त्यासाठीचे झेंडे मात्र पॉलिस्टरमध्ये बनवले आणि हे पॉलिस्टर चीनमधून मागिवले. भाजपा सरकार फक्त अदानी-अंबानीचे भले करत आहे. आज या सरकारला जाब विचारला पाहिजे, आज जाब विचारला नाही तर भविष्यकाळ अत्यंत कठीण असेल. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष लढाई लढत आहे या लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
यावेळी गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, खा. प्रणिती शिंदे, खा. प्रतिभा धानोरकर यांनी भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून हल्ला चढवला.

अभियांत्रिकीचा दुपारी झालेला पेपर विद्यार्थ्यांना रात्री पुन्हा लिहिण्यास देणाऱ्या सातव नामक प्राध्यापकाला रंगेहाथ पकडले

मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, वाघोली मधील प्रकार

पुणेदुपारी झालेल्या अभियांत्रिकीच्या पेपरच्या, दिलेल्या उत्तरपत्रिका रात्री पुन्हा देऊन त्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्याचा कारभार करणाऱ्या सातव नावाच्या प्राध्यापकाला पुणे पोलिसांनी रंगे हाथ पकडले आहे. प्रतिक किसन सातव वय ३७ वर्षे रा.केसनंद वाघोली, पुणे असे या प्राध्यापकाचे नाव असून सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या विषयाचे लिहीलेले उत्तरपत्रिकेचे ६ बंडल, रोख रक्कम २,०६,०००/- रुपये व उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रुमची चावी असे मुद्देमालसह आणि विद्यार्थ्यांसह ते रंगेहाथ पकडले गेले .

पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ०२/०६/२०२५ रोजी युनिट ६ कडील सपोनि मदन कांबळे, यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, बायफ रोड, वाघोली, पुणे येथील मेकॅनिकल इंजिनियरींग कॉलेजचे प्राध्यापक नामे प्रतिक सातव हे कॉलेजमध्ये दुपारी झालेला पहिल्या वर्षाचा इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ हा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याकडुन पैसे घेवुन पुन्हा पेपर लिहिण्यासाठी देणार आहे.
सदर प्राप्त गोपनीय माहीतीचे अनुषंगाने दि.०३/०६/२०२५ रोजी युनिट ६ पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, सदर कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनियरींग कॅडकॅमचे प्राध्यापक १) प्रतिक किसन सातव वय ३७ वर्षे रा.केसनंद वाघोली, पुणे २) आदित्य यशवंत खिलारे वय २० वर्ष रा. वाघोली पुणे. ३) अमोल आशोक नागरगोजे, वय १९ वर्ष, रा. वाघोली पुणे ४) अनिकेत शिवाजी रोडे, वय २० वर्ष रा. वाघोली पुणे हे सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या विषयाचे लिहीलेले उत्तरपत्रिकेचे ६ बंडल, रोख रक्कम २,०६,०००/- रुपये व उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रुमची चावी असे मुद्देमालसह मिळुन आले.
तसेच सदर ठिकाणी पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, वाघोली पुणे या कॉलेजमधे शिकणारे प्रथम वर्षाचे एकुण ०८ विदयार्थी मिळुन आले. नमुद प्राध्यापक व त्याचे साथीदार यांनी विद्यार्थ्यांना इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या विषयामध्ये नापास होण्याची भिती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरुन त्यांचे कडुन स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता संगनमत करुन १० ते ५० हजार रू. स्विकारले आणि पार्वतीबाई गेणबा गोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, वाघोली या कॉलेमधील परिक्षा कंट्रोल रुमची बनावट चावी बनवुन त्या चावीद्वारे कॉलेमधील परिक्षा कंट्रोलरुम उघडून त्यामधील इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स २ या उत्तरपत्रिकेचे सहा सिलबंद बंडल काढून घेवुन विद्यार्थ्यांना त्यांची मुळ उत्तरपत्रिका पुन्हा लिहीण्यासाठी देवुन शासनाची फसवणुक केली. म्हणुन त्यांचे विरुध्द वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. २२६/२०२५भा. न्या. सं.क.३०३ (२), ३१८ (२),३१८ (३),३१८ (४),६१ (२) सह सार्वजनीक परिक्षा (आयोग साधनांचे प्रतीबंध) विधेयक २०२४ चे कलम ४,५,१०,११ अन्वये गुन्हा नोद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), पुणे शहर निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १), गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार कारखेले, सकटे, तांबेकर, काटे, डोंगरे, व्यवहारे, ताकवणे, धाडगे, मांदळे, पानसरे यांनी केली आहे.

एयर इंडियातर्फे ४ नव्या इंटरलाइन पार्टनरशीप्स युरोप आणि मध्य आशियासाठी कनेक्टिव्हिटी विस्तारण्यासाठी करार

·         एयर इंडियाच्या प्रवाशांना ६ देशांतील १६ ठिकाणी प्रवास करता येणार

गुरुग्राम, ३ जून २०२५ – एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या जागतिक विमानवाहतूक कंपनीने उदयोन्मुख बाजारपेठांतील चार प्रमुख विमान कंपन्यांसह इंटरलाइन भागिदारी केल्याची घोषणा केली. यामुळे युरोप विशेषतः बाल्टिक प्रदेश आणि पूर्व युरोप तसेच मध्य आशियातील प्रदेशांशी असलेली कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

या भागिदारीमुळे एयर इंडियाच्या प्रवाशांना या भागातील ६ देशांतील १६ ठिकाणी जास्त सहजपणे प्रवास करता येणार असून संबंधित भागीदार विमानकंपन्यांच्या प्रवाशांसाठी भारतात येणं सोप होणार आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या ८१ व्या आयटा एजीएममध्ये एयर इंडियाने एयरबाल्टिक, बल्गेरिया एयर, सायप्रस एयरवेज, उझबेकिस्तान एयरवेज यांच्याशी इंटरलाइन करार केले.

नव्या भागिदारींमुळे एयर इंडियाचे जागतिक कनेक्टरचे स्थान आणखी मजबूत होणार असून प्रवाशांना एकाच तिकाटावर वेगवेगळ्या खंडात भागीदार विमान कंपन्यांसह तसेच सुनियोजित बॅगेज अलावन्स आणि हाताळणीसह प्रवास करता येणार आहे.

४ भागीदार विमान कंपन्यांसह सोयीस्कर वन- स्टॉप कनेक्टिव्हिटी:

·         एयरबाल्टिक: रिगा (लॅटव्हिया), टल्लिन (इस्टोनिया) आणि व्हिलनियस (लिथुअनिया) या ठिकाणी एयर इंडियाच्या अमस्टरडॅम, पॅरिस, कोपेनहेगन, फ्रँकफर्ट, लंडन गॅटविक, मिलान- मालपेन्सा, व्हिएन्ना, झुरिच किंवा दुबईतील गेटवेद्वारे प्रवेश मिळणार आहे.

·         बल्गेरिया एयरएयर इंडियाच्या लंडन हिथ्रो, पॅरिस, अमस्टरडॅम, फ्रँकफर्ट, मिलान, झुरिच आणि तेल अविव येथे असलेल्या गेटवेजग्वारे सोफियासारख्या पूर्वीय युरोपिय शहरात प्रवास करणे शक्य होईल. एयर इंडियाच्या प्रवाशांना सोफिया ते वर्ना आणि बुरगाससारख्या इतर बल्गेरियन शहरांत प्रवास करणेही सोपे होणार आहे. 

·         सायप्रस एयरवेज: लार्नाका (सायप्रस) इथे एयर इंडियाच्या पॅरिस, मिलान आणि दुबई येथील युरोपीय गेटवेजद्वारे प्रवेश मिळणार असून त्यामुळे भारतीय प्रवाशांना मेडिटेरियनमधल्या या प्रमुख सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्राला भेट देणे शक्य होईल.

·         उझबेकिस्तान एयरवेज: दिल्ली, मुंबई आणि गोवा- मोपा (जीओएक्स) येथून ताश्कंदला प्रवास करता येईल तसेच ताश्कंद ते  बुखारा, कार्शी, नुकुज, उर्गेन्च, तेरमेझ, समरकंद, फर्गाना आणि नामागन या ठिकाणी कनेक्शन्स मिळतील.

एयर इंडियाद्वारे चार भागीदार विमानकंपन्यांच्या प्रवाशांना ३० पेक्षा जास्त भारतीय शहरांत प्रवास करणे शक्य होणार असून त्यात दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, अहमदाबाद, अमृतसर, गोवा आणि कोचीसह बऱ्याच शहरांचा समावेश आहे.

या चार नव्या इंटरलाइन भागिदारींमुळे एयर इंडियाची व्याप्ती जगभरात विस्तारणार असून त्यामुळे आजच्या सर्वात महत्त्वाच्या उद्योन्मुख बाजारपेठा व शहरांत प्रवेश करणे शक्य होणार आहे, असे एयर इंडियाचे प्रमुख कमर्शियल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले. ‘एयरबाल्टिक, बल्गेरिया एयर, सायप्रस एयरवेज आणि उझबेकिस्ना एयरवेज यांच्यासह करण्यात आलेल्या भागिदारीमुळे प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि आमच्या वाढत्या प्रवासी वर्गाला सहजपणे जगभरात प्रवास करणे शक्य होईल. यामुळे जागतिक विमानवाहतुकीचे केंद्र असे भारताचे स्थानही आणखी मजबूत होईल.’

या इंटरलाइन कनेक्शन्सचे बुकिंह एयर इंडियाचे संकेतस्थळ (www.airindia.com), मोबाइल अप आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे लवकरच खुले होईल.

राष्ट्रनिर्मिती आणि विश्वशांतीसाठी डॉ. कराड यांचे कार्य अतुलनीय

अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. मधू कृष्णन यांचे विचार
डॉ. कराड ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हॉर्मोनी अँड इंटरफेथ डॉयलॉग’ पुरस्कारा ने सन्मानित
पुणे दि. ३ जून :
“सृष्टीवर वाढत जाणार्‍या आतंकवादी घटना, नरसंहारामुळे मानव जात अशांतीच्या दलदलीत अडकली आहे. त्यातच धर्माच्या नावाने सर्व मानवजाती विखुरलेल्या आहेत. अशा वेळेस डॉ. कराड हे विश्वशांतीसाठी करीत असलेले कार्य मानव कल्याणासाठी आहे. तसेच राष्ट्रनिर्मिती आणि विश्वशांतीसाठी विद्यार्थ्यांना जोडून त्यांचे योगदान कसे घेता येईल यावर सर्वांनी कार्य करावे.” असे विचार अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य रेक्टर प्रो.डॉ. मधू कृष्णन यांनी व्यक्त केले.
यूएसए येथील अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसची एक टीम पुण्यात येऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हॉर्मोनी अँड इंटरफेथ डॉयलॉग’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
तसेच द अमेरिकन युनिव्हर्सिटी यूएसए यांच्या वतीने ‘प्रॉपेनंट ऑफ ग्लोबल पीस अवार्ड २०२५’, ‘सर्टीफिकेट ऑफ एक्सीलेन्स’,‘बेस्ट नॅशनल बिल्डर्स लिडर्स अ‍ॅवार्ड २०२५’ आणि युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस यांच्या वतिने ‘पीस अ‍ॅम्बेसेड ’ हे सन्मानपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. विश्वनाथ कराड यांना ‘इंटरनॅशनल डिप्लोमॅटचे कार्ड’ देण्यात आले. हे १२० देशात लागू आहे. त्यामुळे डॉ. कराड हे आंतरराष्ट्रीय व्यक्ती झाले आहेत.
याप्रसंगी अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बिजॉयकुमार दास, बिशप अनिष विजागर, फ्रिडम फाउंडेशन बंदिजन सुधारणा व पूर्नवसन केंद्राचे संस्थापक व बिशप प्रदीप वाघमारे आणि उच्च न्यायालयाचे अ‍ॅड विपीन बावर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
प्रा.डॉ. मधू कृष्णन म्हणाले, “विश्वशांतीसाठी जगणे, वागणे आणि त्याला व्यवहारात आचरण करणारे डॉ. कराड हे चालते फिरते विश्वशांतीचे राजदूत आहेत. शांती निर्मितीसाठी युनाइटेड नेशन खूप मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहेत. त्याचवेळेस डॉ. कराड यांनी डोमची निर्मिती करून सृष्टीवर शांती स्थापीत करण्याचे कार्य करीत आहेत.”
“उच्च शिक्षित लोकांकडूनच बर्‍याच वेळा हुंडा घेतला जातो. त्यामुळे सर्वांनी अशी शपथ घ्यावी की हुंडा घेणार नाही आणि देणार नाही. यामुळे होणारे अत्याचार थांबून, विश्वशांतीच्या दिशेने पाऊल उचलले जातील असेही ते म्हणाले.”
सत्कारानंतर उत्तर देतांना प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“मानवतेचे कल्याण हे शांतीमध्ये दडलेले आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाच्या आधारे जगात विश्वशांती येऊ शकते. प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून कुटुंब, समाज, देश आणि सृष्टीसाठी कार्य करावे. विश्वशांती निर्मित डोम हा मोठा नाही तर त्यातून दिला जाणार संदेश हा सर्वात मोठा आहे.”
डॉ. बिजॉय कुमार दास म्हणाले,“जे गुरू असतात ते साक्षात ईश्वरांचे स्वरूप असतात. विश्व गुरूच्या रूपात डॉ. कराड यांच्याकडे पाहतो. पूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारखे गुण त्यांच्यात दिसतात. त्यांनी आळंदी, विश्वधर्मी मानवता तीर्थ रामेश्वर रूई या गावाचे परिवर्तन केले आहे.”
डॉ. मिलिद पांडे म्हणाले,“चार दशकांहून अधिक काळ शिक्षण, तत्वज्ञान, अध्यात्म, जागतिक शांती, सांप्रदायिक सद्भाव, वैश्विक बंधुत्व आणि इतर क्षेत्रात अहोरात्र कार्य करणारे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे खर्‍या अर्थाने विश्व शांतीचे राजदूत आहेत.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी डॉ. कराड यांच्या शिक्षण, अध्यात्म आणि विश्वशांतीसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच अ‍ॅड. विपीन बावर यांनी सांगितले की देशाच्या विकासासाठी शांती अत्यंत महत्वपूर्ण आहे. बिशप प्रदीप वाघमारे यांनी स्वागतपर भाषण सांगितले की शांती करणारे ते धन्य कारण त्यांना ईश्वराचे मुले असे पृथ्वीवर गणले जाईल.
प्रा. डॉ. आशिष पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

पुण्यात रस्त्यावरील विजेच्या खांबाला धक्का: आठ वर्षीय मुलीचा मृत्यू -महावितरण म्हणाले ..महापालिकेचा हा कारभार

पोलिसांनी तातडीने दोषी अधिकाऱ्यांना अटक करण्याची जोरदार मागणी

नाना पेठ येथे डोके तालीम परिसरात वीज खांबामध्ये उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून एका सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक मुलगा जखमी झाला आहे. रविवारी (दि. १) घडलेल्या या घटनेतील वीजखांब हा पथदिव्याचा आहे. सदर पथदिव्याचा वीजपुरवठा तसेच देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेकडे आहे. या दुर्दैवी घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

पुणे : विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून आठ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. नाना पेठेतील डोके तालीमजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आणखी एक मुलगा जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली. सायली डंबे (वय ८, रा. डोके तालीमजवळ, नाना पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार , सायली डंबे आणि मुले रविवारी दुपारी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात खेळत होते. त्या वेळी इनामदार चौकातील एका खांबाला सायलीचा स्पर्श झाला. या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. सायली आणि तिच्याबरोबर असलेला एक मुलाला विजेचा धक्का बसला. हा प्रकार तेथून निघालेल्या एका बसचालकाने पाहिला. त्याने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल उपचार करण्यात आले. उपचारांदरम्यान सायलीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर नाना पेठ परिसरात शोककळा पसरली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

“शाळकरी मुलीचा विजेचा धक्क्याने मृ्त्यू प्रकरणी महावितरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली. याबाबतचा अहवाल महावितरणकडून आल्यानंतर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.”-उमेश गित्ते, वरिष्ठ निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे

अमर, अकबर आणि अँथनी येणार भेटीला

मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता मात्र ‘खूब जमेगा रंग, जब मिल बैठेंगे तीन यार संग’ असं म्हणत प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर यांच्या दोस्तीची दुनियादारी पहायला मिळणार आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या आगामी ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटात अमर, अकबर आणि अँथनी नावाच्या तीन मित्रांच्या मैत्रीची धमाल गोष्ट पहायला मिळणार आहे.

मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर हे जबरदस्त त्रिकुट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून तिघांसोबत या चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. पोटापाण्याच्या शोधात मुंबईत आलेल्या अमर,अकबर आणि अँथनी या तिघांच्या आयुष्यात एका अनपेक्षित घटनेने कशी खळबळ उडते? याची धमाल गोष्ट ‘ऑल इज वेल’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. आणि ही उलथापालथ निस्तरताना त्यांची मैत्री कशी खुलते, हे मजेशीर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक योगेश जाधव यांनी या चित्रपटामधून केला आहे.

चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. पटकथा, संवाद प्रियदर्शन जाधव यांनी लिहिले आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी ‘ऑल इज वेल’ चित्रपटातील गाणी गायली आहेत.

प्रियदर्शन, अभिनय, रोहित हे जबरदस्त त्रिकुट २७ जूनला ‘ऑल इज वेल’ म्हणत चित्रपटगृहात येत आहेत.

हायकोर्टाने कमल हासन यांना विचारले- तुम्ही इतिहासकार आहात का? लोकांच्या भावना दुखावणे याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही.

कमल हासन म्हणाले होते- जर मी चूक नसेन तर मी माफी मागणार नाही

चेन्नई-मंगळवारी कर्नाटक हायकोर्टात अभिनेता-दिग्दर्शक आणि नेते कमल हासन यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांनी अभिनेत्याच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती नागाप्रसन्ना म्हणाले की, तुम्ही (कमल हासन) कोणत्या आधारावर कर्नाटकातील लोकांच्या भावना कमी लेखत आहात? तुम्ही इतिहासकार आहात की भाषाशास्त्रज्ञ?न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला भावना दुखावण्याचा अधिकार नाही. न्यायालयाने असेही म्हटले की, पाणी, जमीन आणि भाषा नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. भाषेच्या आधारावर देशाचे विभाजन होऊ नये. एका कार्यक्रमात कमल हासन यांनी कन्नड भाषेची उत्पत्ती तामिळ भाषेतून झाली असल्याचे म्हटले होते.

न्यायमूर्ती नागाप्रसन्ना म्हणाले- जर तुम्ही माफी मागणार नसाल तर तुम्हाला कर्नाटकात चित्रपट का प्रदर्शित करायचा आहे? ते जाऊ द्या. लोकांच्या भावना दुखावणे याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. जर तुम्ही माफी मागितली तर काही हरकत नाही. तुम्हाला कर्नाटकातूनही काही कोटी कमवायचे आहेत.

कमल हासन यांनी कन्नड भाषेवरील त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास दोनदा नकार दिला आहे. ३० मे रोजी चेन्नई येथे त्यांच्या ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ते म्हणाले, “भारत हा एक लोकशाही देश आहे. मी कायदा आणि न्यायावर विश्वास ठेवतो. मला यापूर्वी धमक्या देण्यात आल्या आहेत, परंतु जर मी चुकीचा असेन तर मी माफी मागेन, जर मी चूक नसेन तर मी माफी मागणार नाही.”

यापूर्वी २८ मे रोजी त्यांनी केरळमध्ये म्हटले होते- मी जे बोललो ते प्रेमाने बोललो आणि अनेक इतिहासकारांनी मला तेच शिकवले आहे. आपण एक कुटुंब आहोत आणि भाषा त्याचा भाग आहेत. माझ्याकडून, हे उत्तर नाही तर स्पष्टीकरण आहे. प्रेम माफी मागणार नाही.

खरंतर, कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (केएफसीसी) ने कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. केएफसीसीचे अध्यक्ष एम नरसिंहालू यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, जर कमल हासन यांना त्यांचा चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर त्यांना माफी मागावी लागेल.

खरं तर, २४ मे रोजी चेन्नईमध्ये ‘ठग लाईफ’च्या ऑडिओ लाँच दरम्यान, कमल म्हणाले होते की कन्नड भाषा ही तमिळ भाषेतून आली आहे. या विधानानंतर, कन्नड समर्थक संघटनांनी कन्नड लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान, कमलने कन्नड अभिनेता शिव राजकुमार यांच्याकडे लक्ष वेधत एक टिप्पणी केली होती. राजकुमार यांच्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले होते- ‘शिव राजकुमार माझ्या कुटुंबासारखे आहेत, म्हणूनच ते इथे आहेत. मी माझे बोलणे जीवन, नातेसंबंध आणि तमिळ भाषेपासून सुरू केले. तुमची भाषा (कन्नड) तमिळमधून आली आहे, म्हणून तुम्ही देखील आमचा एक भाग आहात.’

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २८ मे रोजी कमल हासन यांनी कन्नड भाषेवरील केलेल्या टिप्पणीवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, ‘कन्नड भाषेचा इतिहास खूप जुना आहे. बिचारे कमल हासन यांना याची माहिती नाही.’

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेवर कमल हासन यांनी केरळमध्ये म्हटले होते की, अनेक इतिहासकारांनी मला भाषेचा इतिहास शिकवला आहे. राजकारणी भाषेबद्दल बोलण्यास पात्र नाहीत. त्यांच्याकडे त्याबद्दल बोलण्याची पात्रता नाही, माझ्यासह. आपण या गंभीर मुद्द्यांवर चर्चा इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भाषा तज्ञांवर सोडली पाहिजे.

काँग्रेससोबतच भाजपनेही अभिनेत्याच्या विधानावर टीका केली. कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा म्हणाले की, इतरांच्या भाषेचा अपमान करणे हे असभ्य वर्तन आहे. कमल हासन यांनी कन्नडसह अनेक भाषांमध्ये काम केले आहे, परंतु तमिळ भाषेच्या गौरवात अभिनेता शिव राजकुमार यांचा समावेश करून त्यांनी कन्नड भाषेचा अपमान केला आहे.

केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये त्रिभाषा धोरणाबाबत वाद सुरू आहे. २०२० च्या नवीन शिक्षण धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना ३ भाषा शिकता येतील अशी शिफारस करण्यात आली होती, परंतु कोणतीही भाषा सक्तीची करण्यात आलेली नाही. राज्ये आणि शाळांना कोणत्या ३ भाषा शिकवायच्या हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. तामिळनाडू सरकार हिंदी भाषेला विरोध करत आहे.

२१ फेब्रुवारी रोजी कमल हासन यांनी त्रिभाषिक (तमिळ, हिंदी आणि इंग्रजी) वादाबद्दल म्हटले होते – तमिळ भाषा ही त्यांची सांस्कृतिक ओळख आहे. त्यासाठी लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यात गोंधळ घालू नका.

चेन्नई येथे त्यांच्या पक्षाच्या मक्कल नीधी मय्यमच्या ८ व्या स्थापना दिनी बोलताना, हासन म्हणाले, “भाषेचा मुद्दा हलक्यात घेऊ नये. तामिळनाडूच्या मुलांनाही माहित आहे की त्यांना कोणती भाषा हवी आहे. त्यांची स्वतःची समज आहे.”

अपात्र महिलांना पैसे देणे हा निवडणुकभ्रष्टाचार आणि मोठा निवडणूक घोटाळा

सरसकट पैसे देणे ही चूक झाली तर प्रशासन व मंत्र्यांवर कारवाई का नाही?
बोगस लाडक्या बहिणी’ हा निवडणूक पूर्व मोठा आर्थिक घोटाळाच!
हा पाचशे कोटीचा निवडणूकपूर्व आमिष घोटाळा?: आप चा सवाल

पुणे-मागील वर्षी महायुती सरकारला प्रचंड बहुमत आणि मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर महिलांचे मतदान मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेमधून बोगस आणि अपात्र महिलांना पैसे देणे हा निवडणुकपूर्व मोठाआर्थिक घोटाळाच होता आणि हा निवडणूक भ्रष्टाचार हि होता असा आरोप आज आम आदमी पार्टी चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला राज्य सरकारी कर्मचारी तसेच आर्थिक निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज प्रामुख्याने महायुतीच्या भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट,शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टॉल लावून, पक्ष कार्यालयातून भरले. हे सर्व फॉर्म निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती भरून पूर्ण केले गेले. त्यामुळे अपात्र महिलांनाही पात्र ठरवण्यामागे मुख्यत्वे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्तेच होते. इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यापासून दूर राहणेच पसंत केले होते. आता मात्र याच्यातून तब्बल वीस लाख महिला या अपात्र ठरवल्या जाणार असे उघड झालेल्या आकडेवारीवरून दिसते आहे. त्यामुळे या बोगस, अपात्र महिलांना निवडणुकीतील आमिष म्हणूनच कोट्यवधी रक्कमचे वाटप केले गेले.

काल अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ‘ज्यावेळी ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार कमी काळ होता दोन-तीन महिन्यात लगेच निवडणुका लागणार होत्या त्यामुळे काहींनी अर्ज केले आता दिलेले पैसे काढून घेण्याचा प्रश्न येत नाही मान्य आहे चूक झाली’ असे स्पष्टीकरण दिले आहे. महिलांनी अर्ज करायला नको होते या अपात्र महिलांवर कारवाई नाही असे ही अजितदादा पवार म्हणाले.

या अपात्र महिलांवर कारवाई करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, परंतु ज्या खात्याच्या मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी संगनमताने हे अर्ज मान्य केले व त्यांचे नावे पैसे दिले यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी पैसे देताना त्याची व्यवस्थित तपासणी करूनच पैसे देऊ असे फडणवीस आणि सातत्याने सांगितले होते. या लडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 4800 कोटीची रक्कम वितरित झाली असल्याचे ही आकडेवारी पाहता 500 कोटी पेक्षा अधिकचा हा भ्रष्टाचार असू शकतो. हा साधा तांत्रीक गैरप्रकार घडला असे नसून मतांच्या बदल्यात अपात्र महिलांनाही पैसे वाटपाचे हे निवडणूक काळातील षडयंत्रच , आर्थिक घोटाळाच होता आणि त्यामुळे याबाबत स्वतः अर्थमंत्री तसेच महिला बालविकास विभाग याला जबाबदार असून या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी आपचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे. तसेच ही एकूण गैरवाटपाची रक्कम किती याची आकडेवारी सरकारने तातडीने जाहीर करायला हवी अशी मागणी केली आहे.