Home Blog Page 2816

स्नॅपडीलच्या धनतेरस ई-स्टोअरचा शुभारंभ

0
  • मौल्यवान नाणी, दागिने, भांडी, झाडू, खातेवह्या आणि अशाच अजून खास खरेदीसाठी खास धनतेरस ई-स्टोअर
  • सोन्याच्या नाण्यांच्या खरेदीवर विशेष सूट, चांदीची नाणी फक्त १४९ रुपयांपासून पुढे
  • बँक कार्ड्स वापरून केलेल्या खरेदीवर २५% पर्यंतची अतिरिक्त सूट

 नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या स्नॅपडीलने आपल्या ग्राहकांची दिवाळीची खरेदी सहजसोपी, आनंद आणि लाभ मिळवून देणारी व्हावी यासाठी खास धनतेरस ई-स्टोअर सुरु केले आहे.  धनत्रयोदशी आणि संपूर्ण दिवाळीच्या सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू स्नॅपडीलच्या या खास धनतेरस ई-स्टोअरमध्ये एकाच ठिकाणी खरेदी करता येतील.  भांडी, सोने व चांदीची नाणी, भांडी, जेम्सटोन्स, पूजेचे साहित्य, दिवाळीच्या साफसफाईसाठी झाडू आणि इतर वस्तू, घराच्या सजावटीच्या विविध गोष्टी अशी सगळी खरेदी या एकाच ठिकाणी करता येईल.

 स्नॅपडील धनतेरस ई-स्टोअरमध्ये तुम्ही सोन्याच्या नाण्यांवर विशेष सूट मिळवू शकता.  याठिकाणी चांदीची नाणी देखील अगदी सहज परवडण्याजोग्या किमतीत फक्त १४९ रुपयांपासून खरेदी करता येतील.  सोन्या-चांदीची नाणी आणि बार एमएमटीसी पम्प, बंगलोर रिफायनरी, नॅशनल इंडिया बुलियन रिफायनरी (एनआयबीआर), गोल्डसिक्का ज्वेल्स आणि इतर ब्रॅंड्सचे आहेत. श्रीगणेश, श्री लक्ष्मी तसेच राधाकृष्ण यांच्या प्रतिमा असलेली नाणी देखील यामध्ये आहेत.

 जेम्सटोन्सवर देखील कमीत कमी ५०% सूट दिली जात आहे.  याशिवाय सोन्याचे आकर्षक कानातले, मंगळसूत्र, अंगठ्या, हार, नथनी, चेन्स, पेन्डन्ट्स आणि इतर अनेक दागिन्यांचे एकापेक्षा एक सरस प्रकार याठिकाणी उपलब्ध आहेत.  आपल्या आवडीप्रमाणे १४, १८ किंवा २२ कॅरेटचे दागिने तुम्ही याठिकाणी खरेदी करू शकता.

 उत्पादनांवर तर भरघोस सूट मिळत आहेच शिवाय जर तुम्ही बँक कार्डांचा वापर करून खरेदी करत असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे.  पीएनबी कार्ड्सवर २५%, रूपे कार्ड्सवर २०%, आरबीएल बँक कार्ड्स आणि फेडरल बँक डेबिट कार्ड्सवर १५% अशी आकर्षक सूट खरेदीसोबत लगेचच मिळेल.

 स्नॅपडील प्रवक्त्याने याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले, “या स्टोअरमधील सर्व वस्तूंच्या डिझाइन्समध्ये परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ दिसून येतो. धनत्रयोदशीसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी, अगदी विनासायास करता यावी यादृष्टीने सर्व उत्पादने याठिकाणी उपलब्ध आहेत.”

 गोदरेज आणि ओझोन या नामांकित ब्रँड्सच्या घरगुती वापराच्या तिजोऱ्यांच्या किमती २४९९ रुपयांपासून पुढे आहेत.

 स्नॅपडीलवर धनत्रयोदशीच्या खरेदीमध्ये ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या तांब्याच्या भांड्यांचे १२,००० पेक्षा जास्त पर्याय याठिकाणी आहेत.  तसेच खातेवह्या, झाडू यासारख्या धनत्रयोदशीच्या खास वस्तू देखील याठिकाणी खरेदी करता येतील.

 देवांच्या मूर्ती, यंत्रे, पूजेची सजविलेली ताटे, तसेच पूजेचे सर्व आवश्यक साहित्य अनेक विविध प्रकारांमध्ये याठिकाणी उपलब्ध आहे.  दिवाळीच्या निमित्ताने घराची खास सजावट करण्याचे मनात असेल तर अगदी आयत्यावेळी देखील मनपसंद खरेदीसाठी स्नॅपडील धनतेरस ई-स्टोअरवर या.  पडदे, उशांचे अभ्रे, टेबल मॅट्स आणि घर सजावटीच्या इतर अनेक वस्तूंची शानदार खरेदी करून अगदी कमी वेळात आणि कमी मेहनतीत तुम्ही तुमचे घर मस्त सजवू शकाल.

 स्नॅपडील

ग्राहकांना सर्वाधिक मूल्य प्रदान केले जावे यावर भर देणारी स्नॅपडील ही भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ आहे.  दर महिन्याला तब्बल ७० मिलियनपेक्षा जास्त युजर्स स्नॅपडीलला भेट देतात आणि स्नॅपडीलवरील ५००,००० स्वतंत्र नोंदणीकृत विक्रेत्यांनी सादर केलेल्या २०० मिलियन वस्तूंमधून खरेदी करतात.

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९ मध्ये झळकणार नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे नाव !

0
सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडे असो वा गँग्स ऑफ वासेपुरच्या दोन्ही भागातील फैजल खान, अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीने आपल्या अभिनयाने जागतिक स्तरावर करोडो लोकांच्या मनावर राज्य केलेले आहे. म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल, नवाजुद्दीन सिद्दीकी यांना कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सीआयएफएफ) चे संस्थापक राहिल अब्बास यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी यांना प्रतिष्ठित गोल्डन ड्रॅगन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर करत पुढे सांगितले की, “नवाज आमचे खास पाहुणे आहेत.” आंतरराष्ट्रीय सीआयएफएफशी संबंधित उपक्रमांचे आंतरराष्ट्रीय संचालक सुहेल सय्यद यांनीही राहिल यांनी केलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सन्मानाच्या घोषणेची पुष्टी केली. ते म्हणाले, “राहिलच्या प्रतिसादाने मी भारावून गेलो आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना ही बातमी कळविताना मला खूप आनंद झाला, नवाज यांनी या महोत्सवासाठी उपस्थित राहण्याची देखील हमी दिलेली आहे.”

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उपस्थितीच्या प्रतिक्षेत असलेले नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतात की,”ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेण्यास मी खूप उत्सुक आहे. यावर्षी महोत्सवात प्रदर्शित होणार्‍या सर्व चित्रपटांचे मी अभिनंदन करू इच्छितो.”

नवाजुद्दीन सिद्दीकीशिवाय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहिया, बेथन सैय्यद – असेंम्बली मेम्बर अँड चेअरमनऑफ कल्चर अँड मीडिया (वेल्स), नोमेन जे, फ्लॉरेन्स एईसी – ऑस्कर नामित डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर, वॉरेन – दिग्गज ब्रिटिश दिग्दर्शक, कीथ विलियम्स – वीडियो कॉन्सेप्चुअल आर्टिस्ट आणि जो फ़ेरेरा – ब्रिटिश अभिनेता यांसारखी विख्यात व्यक्तिमत्त्वे २०१९ च्या कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास ज्यूरी म्हणून लाभणार आहेत.

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सीआयएफएफ) चे संस्थापक राहिल अब्बास म्हणतात की,“एक राष्ट्र म्हणून वेल्स, कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थित असलेल्या सर्व चित्रपट निर्मात्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि चित्रपट निर्मात्यांना वेल्स येथील सौंदर्य आणि प्रतिभा पाहण्यासाठी आमंत्रित करीत आहे.”

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २४ ऑक्टोबर २०१९ ते २७ ऑक्टोबर २०१९ या काळात कार्डिफ बे, या वेल्सच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक पियरहेड इमारतीत आयोजित केला जाईल.

मराठी विज्ञान परिषदतर्फे ‘आयोडिनची कमतरता’ विषयावर व्याख्यान

0
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोडिनची कमतरता : वास्तव आणि संशोधन या विषयावर रसायनशास्त्राच्या प्रा. डॉ. निलिमा राजुरकर यांचे व्याख्यान आयोजिले आहे. येत्या गुरुवारी (दि. २४ ऑक्टोबर) सायंकाळी ६.१५ वाजता भारतीय शैक्षणिक संस्था, मयुर कॉलनी, कोथरुड येथे हे व्याख्यान होणार असून, सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी दिली आहे. 
आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड, शरीराची वाढ खुंटणे आणि थायरॉइडच्या समस्यांपासून अनेक व्याधी उद्भवण्याचा धोका असतो. जगभरात आयोडिन कमतरतेमुळे दोनशे कोटींहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळेच २१ ऑक्टोबर हा ‘जागतिक आयोडिन न्यूनता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतातही आयोडिन न्यूनतेची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र शासनाने १९६२ पासून राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कायक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. १९९२ मध्ये राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रमाचे नाव बदलून ‘राष्ट्रीय आयोडिन न्यूनता विकार नियंत्रम कार्यक्रम’ असे करण्यात आले. याबाबत अधिक विस्तृतपणे डॉ. राजूरकर बोलणार आहेत.

सीबीआरईने भारतात सुरू केले ‘सीबीआरई केअर्स’ हे आपले फाउंडेशन

0

नवी दिल्ली: सीबीआरई साउथ एशिया प्रा. लि. या जगातील आघाडीच्या रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्मने कॉर्पोरेट फिलांथ्रोपी प्रोग्रॅम असलेले ‘सीबीआरई केअर्स’ हे आपले फाउंडेशन भारतात सुरू केल्याची घोषणा आज केली आहे आणि देशातील विविध ठिकाणच्या स्थलांतरित कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या (महिला व बालके) आरोग्याशी व पोषणाशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले आहे.  सीबीआरईने देशात 25 यशस्वी वर्षे पूर्ण केली असताना सीबीआरई केअर्स सुरू होत आहे.

सीबीआरईच्या जागतिक कार्यक्रमाची सीबीआरई केअर्सएक पहल ही भारतातील आवृत्ती सीबीआरई ग्रुप इंकचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट ई. सलेंटिक व भारत, आग्नेय आशिया, मध्य पूर्व व आफ्रिका येथील अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगझिन यांच्या हस्ते सुरू करण्यात आली.

नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने (एनएसएसओ) दिलेल्या आकडेवारीनुसार, बांधकाम क्षेत्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एम्प्लॉयर असून त्यामध्ये अंदाजे 50 दशलक्ष लोक कार्यरत आहेत. यातील बहुसंख्य लोकसंख्या स्थलांतरित कामगारांची व त्यांच्या कुटुंबीयांची आहे आणि त्यांच्यासाठी मूलभूत आरोग्य सुविधा, स्वच्छ वातावरण व जागृती यांची सहज उपलब्धता होत नाही व त्यांना तीव्र कुपोषण व असुरक्षित वातावरण यांचा सामना करावा लागतो. स्थलांतरित कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मूलभूत आरोग्यसेवा उपलब्ध होण्यातील दरी भरून काढण्याच्या हेतूने “एक पहल” हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना, सलेंटिक यांनी सांगितले, “वेगळेपण सिद्ध करणे, हे सीबीआरई केअर्स प्रोग्रॅमचे विशेष वैशिष्ट्य आहे आणि “एक पहल” उपक्रम स्थलांतरित कामगार व त्यांचे कुटुंबीय यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सीबीआरईमध्ये, आम्ही समाजाचे ऋण फेडण्याला महत्त्व देतो आणि त्यामध्ये योगदान देण्यासाठी एक पहल हा उपक्रम इतरांनाही प्रेरणा देईल, याची खात्री आहे,” असे त्यांनी सांगितले.

याविषयी बोलताना, सीबीआरईचे भारत, आग्नेय आशिया, मध्य पूर्व व आफ्रिका येथील अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगझिन यांनी सांगितले, “सीबीआरई फाउंडेशन भारतात आणणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. स्थलांतरित कामगारांना मदत करणे, ही आमची जबाबदारी आहे आणि एक पहल उपक्रम हे मोठे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. या उपक्रमाने दिलेल्या योगदानाची निश्चित दखल घेतली जाईल.”

येत्या काही महिन्यांत, सीबीआरई केअर्सची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सीबीआरई सरकार, कॉर्पोरेट्स व नॉन-प्रॉफिट संस्था यांच्याशी सहयोग करणार आहे. चॅरिटेबल संस्थेची निवड करताना, राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प राबवण्याची आणि स्थलांतरित कामगारांना सहभागी करून घेण्याची, त्यांच्या समस्या समजून घेण्याची व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य व पोषणविषयर समस्या सोडवण्याची क्षमता ही पात्रता तापसली जाणार आहे.

देशातील स्थलांतरित कामगारांसमोर असणारे काही प्रश्न आहेत – दुर्लक्ष, असुरक्षित पर्यावरण, कुपोषण, अस्थिरता, शाळा सोडणे, दर्जेदार आरोग्यसेवा व पोषण यांची अनुपलब्धता, वेगळ्या किंवा चांगल्या जीवनाबद्दल आशेचा अभाव याकडे लक्ष दिले जाणार आहे.

शांततेत व सुरळीतपणे मतदान विधानसभेसाठी ६०.४६ टक्के मतदान – मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

0

मुंबईदि. 21 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, शिरीष मोहोड आदी उपस्थित होते.  

राज्यातील विधानसभा मतदानाची आकडेवारी सांगताना श्री. सिंह म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदार यादीत नावे नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही. 

राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात 83.20 टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी 80.19, कागल 80.13 टक्के, शिराळा 76.78 टक्के तर रत्नागिरी 75.59 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात 40.20 टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवा 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले.

जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे

अहमदनगर 64.93 टक्के, अकोला 56.88 टक्के, अमरावती 59.33, औरंगाबाद 65.06, बीड 68.03, भंडारा 66.35, बुलढाणा 64.41, चंद्रपूर 63.42, धुळे 61.90, गडचिरोली 68.59, गोंदिया 64.06, हिंगोली 68.67, जळगाव 58.60, जालना 67.09, कोल्हापूर 73.62, लातूर 61.77, मुंबई शहर 48.63, मुंबई उपनगर 51.17, नागपूर 57.44, नांदेड 65.40, नंदुरबार 65.50, नाशिक 59.44, पालघर 59.32, परभणी 67.41, पुणे 57.74, रायगड 65.90, रत्नागिरी 58.59, सांगली 66.63, सातारा 66.60, सिंधुदुर्ग 64.57, सोलापूर 64.23, ठाणे 47.91, उस्मानाबाद 62.21, वर्धा 62.17, वाशिम 61.33 आणि यवतमाळ जिल्ह्यात 63.09 टक्के मतदान झाले.

इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी प्रत्यक्ष वापरात 1 लाख 12 हजार 328 बॅलट युनिट (बीयु), प्रत्येकी 96 हजार 661 इतक्या कंट्रोल युनिट (सीयु) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स होत्या. तर राखीव 24 हजार 625 बीयु, 21 हजार 277 सीयु आणि 28 हजार 992 व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आज प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात 3 हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (522 बीयु, 949 सीयु आणि 1 हजार 974 व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यात 4 हजार 69 इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये 665 बीयु (0.59%), 596 सीयु (0.62%) आणि 3 हजार 437 व्हीव्हीपॅट (3.56%) नादुरुस्त झाल्या.

प्रारुप मतदानाच्या वेळी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली इव्हीएम व्हीव्हीपॅट त्वरीत दुरुस्त करण्यात / बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.

इव्हीएम संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 152, शिवसेना 89 व इतर 120 अशा एकूण 361 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यवाहीसाठी त्वरीत पाठविण्यात आलेल्या आहेत.

मतदानाची वैशिष्ट्ये :-

महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-

⦁ पुणे जिल्ह्यातील 215-कसबापेठ मतदारसंघामध्ये, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून प्रथमच ‘बार कोडींग’चा वापर करण्यात आला.

⦁ दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी एकूण 5 हजार 435 इतकी मतदान केंद्रे वरच्या मजल्यावरुन तळ मजल्यावर स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.

⦁ अतिवृष्टी झाल्यामुळे 259-कराड उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 31 या केंद्राचे स्थलांतर मतदानाच्या आदल्यादिवशी करण्यात आले.

⦁ काल दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दिवसा व रात्री महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस झाला. उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि सातारा येथे मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पोलिंग पार्टीच्या दळणवळणामध्ये अडचण निर्माण झाली होती. मात्र पोलिंग पार्टी वेळेवर कर्तव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आणि मतदान सुरळीतपणे पार पाडण्यात आले.

⦁ रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णालयातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

⦁ विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीजनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले.

⦁ शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही, मतदानाचे प्रमाण चांगले राहिले आहे.

आदर्श आचारसंहिता (एमसीसी) :-

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एफएसटी (1567), एसएसटी (1660), व्हीएसटी (1092) इतकी पथके नेमण्यात आली होती. या व्यतिरिक्त दक्ष नागरिकांना आचारसंहिता भंगाची प्रकरणे नोंदविण्यासाठी आयोगाने सी- व्हिजिल हे अँड्रॉईड ॲप उपलब्ध करुन दिले होते.

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) :- 

राजकीय पक्षांच्या  व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टिफिकेशन अँण्ड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी  यांच्या अध्यक्षतेखालील  समिती समोर ऑडीओ, व्हिडीओ व पोस्टरसाठी आतापर्यंत पुढीलप्रमाणे विविध राजकीय पक्षाकडून  विनंती प्राप्त झाली आहे.

राजकीय पक्ष मंजूर एकूण आक्षेप एकूण
ऑडीओ व्हिडीओ पोस्टर पथनाट्य ऑडीओ व्हिडीओ पोस्टर पथनाट्य
शिवसेना 37 39 230 306 15 8 30 53
भारतीय जनता पक्ष 20 72 200 8 300 9 17 29 5 60
वंचित बहूजन आघाडी 9 3 11 23 8 1 9
काँग्रेस 5 15 7 27 5 6 11
राष्ट्रवादी कॉंग्रेस 7 9 2 18 1 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 8 8 1 1
एकूण 86 138 450 8 682 31 39 60 5 135

वरील दोन्ही समितीच्या निर्णयाविरुद्ध अपिल करण्याकरिता  मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती समोर आजच एक पेड न्यूज संदर्भातील अपील दाखल झाले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. एकच अपील प्राप्त झाले आहे हे पाहता वरील दोन्ही समित्यांनी त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत, असे स्पष्ट होत आहे.

सोशल मिडिया मॉनिटरिंग

पोलीस विभागाच्या सायबर शाखेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत सोशल मिडियाचे निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने मॉनिटरिंग करण्यात आले.

जप्तीची प्रकरणे (सीझर्स) :-

आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये सदुसष्ट कोटी बावन्न लाख (67.52) इतकी रोख रक्कम, रुपये चौप्पन्न कोटी पन्नास लाख (54.50) रकमेचे सोने, रुपये तेवीस कोटी एकवीस लाख (23.21) रकमेचे मद्य व रुपये वीस कोटी पंच्याहत्तर लाख (20.75) मादक पदार्थ, याप्रमाणे एकूण रुपये एकशे पासष्ट कोटी नव्यान्नव लाख (165.99) इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. आचार संहितेच्या उलंघनाबाबत 2124 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याव्यतिरिक्त Prohibition Act, Food & Drugs Act या कायद्याखाली 11506  इतके गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मतदार यादी :-

सन 2019 या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन जानेवारी, 2018 पासून मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.  मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता ‘स्वीप’अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा खुप चांगला परिणाम झाला. व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 (8,85,65,547) च्या तुलनेत विधानसभा निवडणूक – 2019 मध्ये मतदारांची संख्या 8,98,39,600 इतकी झाली. म्हणजेच मतदारांची संख्या 2,74,053 ने वाढली.

दिव्यांग मतदार :-

भारत निवडणूक आयोगाने यावेळी दिव्यांग मतदारांसाठी ‘सुलभ निवडणूका’ (Accessible Elections) हे घोषवाक्य जाहीर केले होते. याअंतर्गत दिव्यांग मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना मतदान करणे सुलभ व्हावे याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. त्याचे चांगले फलित म्हणून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये 3,09,233 इतके दिव्यांग मतदार होते परंतू यावेळी सुमारे तीन लाख शहाण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर (3,96,673) इतक्या दिव्यांग व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. म्हणजेच सुमारे 90 हजार नवीन दिव्यांग  मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

मतदान केंद्र :

यावेळी एकूण शहाण्णव हजार सहाशे ऐकसष्ठ (96,661) इतक्या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सन 2014 च्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये एकूण आठ हजार एकशे एकसष्ठ (8,161) इतकी वाढ झाली आहे. तसेच आताच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान केंद्रांमध्ये सखी मतदान केंद्र-352, आदर्श मतदान केंद्र-288 दिव्यांग मतदान केंद्र-106 व वेब कास्टिंग-10013 याही मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

निवडणूक कर्मचारी :-

       संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे सात लाख पन्नास हजार (7,49,374) इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे एक लाख चार हजार (1,04,000) इतक्या पोलीसांची नियुक्ती करण्यात आली होती. याप्रमाणे सुमारे साडे आठ लाख (8,50,000) इतके कर्मचारी या  निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.

        गडचिरोली जिल्ह्यामध्ये 69-अहेरी या मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेले एक पोलीस अधिकारी श्री. बापू पांडू गावडे (वय 45 वर्षे ) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरने चंद्रपूर येथील शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पंरतु उपचारादरम्यान दुपारी 1-30 वाजता मृत्यू झाला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेले शिक्षक श्री. सर्जेराव भोसले यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

       तसेच ठाणे येथील नुतन शाळा, रामबाग या ठिकाणी बंदोबस्तावर नेमण्यात आलेल्या श्री. जयराम तरे (बक्कल नंबर 5352) वय 48 वर्षे यांना ह्रदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांना वेळीच इस्पितळामध्ये दाखल करण्यत आले. आता त्यांच्या जीवावरील धोका टळलेला आहे.

‘ येथे ‘ झाले शून्य टक्के मतदान ….

0

सातारा-कोयना विभागातील मळे , कोळने , पाथरपुंज या तीन गावातील मतदारांनी आपल्या  मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. यामुळे येथे मतदान झालेच नाही.

कोयना विभागातील कामरगाव , रासाटी , नवजा , कोयनानगर , गोवारे , हुंबरळी , देशमुखवाडी , हेळवाक , भराडवाडी येथे चांगले मतदान झाले. मळे , कोळने , पाथरपुंज या चांदोली अभयारण्यात येणाऱ्या या गावांनी आपल्या प्रलंबित राहिलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला होता.

या निर्णयावर ठाम राहिल्याने या मतदान केंद्रावर अखेर पर्यंत शुकशुकाट होता.

याबाबत या तीन गावातील ग्रामस्थांनी माहिती दिली. आमच्यावर आजपर्यंत सत्तेवर असलेल्या सर्वच शासनाने अन्याय केला आहे. युती शासनाने आमच्या प्रश्नावर तोडगा काढला असला तरी घेतलेला निर्णय जाहीर न केल्यामुळे आम्ही आजही या ठिकाणी खितपत पडून आहोत. सन 1894 मध्ये चांदोली अभयारण्याची निर्मिती झाली आहे. सन 2004 मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा देण्यात आल्यानंतर या तीन गावातील अनेक गोष्टीवर बंदी आली आहे.

कोयना अभयारण्य व चांदोली अभयारण्य मिळून शासनाने सह्याद्री व्याघ्रप्रकल्प निर्माण केला आहे. यामुळे तिन्ही गावातील जनता विकासापासून कोसो दूर होवून मागास राहिल्याने तसेच मागण्या मान्य न झाल्याने मतदानावर बहिष्कार टाकल्याचे प्रकाश चाळके , संजय पवार , रवी डांगरे , शिवाजी चाळके , अंकुश पवार , पांडुरंग डांगरे आदी ग्रामस्थांनी नमूद केले.

पूरग्रस्त टांगेवाला कॉलनीतील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

0

पुणे : आंबील ओढयाला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या आणि सात जणांचा बळी गेलेल्या टांगेवाला कॉलनीमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

एकही उमेदवार प्रचारासाठी अगर मदतीसाठी फिरकला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून मदत न मिळाल्याने मतदान न करण्यावर आम्ही ठाम असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून मिलेलेली मदत तुटपुंजी आहे. याकडे प्रशासन, आमदार, खासदार आणि स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही नागरिक या निर्णयावर ठाम असल्याचे दिसुन आले. प्रशासन आणि सर्वपक्षीय उमेदवारांबद्दल प्रचंड चीड नागरिकांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती

पुणे जिल्ह्यात सरासरी 56 टक्के मतदान तर शहरात 46 टक्के मतदान

0

पुणे-विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 56 टक्के तर, शहरात 46 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये 61 टक्के मतदान झाले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या निवडणुकीत 367 ‘ईव्हीएम’ बंद पडल्या होत्या. 15 ते 20 मिनिटांत या मशीन सुरू करण्यात आल्या. हे प्रमाण 0.5 टक्के आहे. वडगावशेरी, शिवाजीनगर, पुरंदर तालुक्यात या मशीन बदलण्यात आल्या. सायंकाळी 6 नंतर 100 ठिकाणी मतदान करणे सुरू होते.सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात ३६.०८, पुणे कॅन्टोंमेंट -३८.४, शिवाजीनगर -३९.०७, वडगाव शेरी ४१.०८, कोथरुड – ४३.२३, पर्वती- ४५.०७ आणि हडपसरमध्ये ४८.८४ टक्के मतदान झाले होते. पिंपरीमध्येही केवळ ४२.६७, चिंचवडमध्ये ५१.३३, भोसरीमध्ये ५२.५२ टक्के मतदान झाले. तुलनेने ग्रामीण भागात मात्र मतदानाचे प्रमाण चांगले होते. भारतीय जनता पक्षाचे हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात चुरस असलेल्या इंदापूरमध्ये तब्बल ७४.२५ टक्के मतदान झाले होते. मावळमध्येही भाजपाचे बंडखोर सुनील शेळके राष्ट्रवादीकडून राज्य मंत्री बाळा भेगडे यांना आव्हान दिल्याने निर्माण झालेल्या चुरशीच्या वातावरणामुळे ६४.३६ टक्के मतदान झाले. बारामतीतत ६४.०६ टक्के, आंबेगाव- ६३, खेड -६१.३९, दोंड ६१.१५, जुन्नर ६०.०७, भोर- ५९.६५, शिरूर ५८.८१, पुरंदर ५७.६ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर दिवसभरात मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. दिवसभरात सुरळीत व शांततेत मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 55 ते 56टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिणी सावंत, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्हयातील सर्वच मतदार संघात उत्साहात मतदान झाले असून  जिल्हयातील सर्वच मतदारसंघात शांततेत मतदान झाले.
सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांचा उत्साह…
पुणे जिल्हयातील 7 हजार 915 मतदान केंद्रांवर सकाळी मॉकपोल घेऊन सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 21 मतदार संघातील 21 मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रावर महिला कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाजीनगर येथील सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या लक्षणीय दिसून येत होती.  केंद्रावर मतदारांसाठी पिण्यासाठी पाणी, वीज व आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
मतदान यंत्राला  व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात आल्याने मतदाराला आपण केलेल्या उमेदवारालाच मतदान झाल्याचे दिसून येत असल्यामुळे व्हीव्हीपॅट मशीनविषयीही मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. आपण केलेल्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी स्क्रिनवर  बघायला मिळत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते. निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त  ठेवण्यात होता. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांना मतदान केंद्रावरील पोलीस सहकार्य करीत असल्याचे दिसून येत होते.
नवमतदारांचा उत्साह…
निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा दिल्याने दिव्यांग मतदार, महिला मतदार, नवमतदारांनी  स्वयंस्फूर्तीने मतदान केल्याने अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या.
सकाळपासूनच प्रथमच मतदान करीत असलेल्या तरुण, तरुणीमध्ये उत्साह जाणवत होता. अनेक केंद्रावर मतदान करण्यासाठी महिला व पुरुषांसह तरुण व तरुणींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवाजीनगर येथील कु. वर्षा चांदियाल हिने प्रथम मतदानाचा हक्क बजावत असल्याचे सांगितले. शिवाजीनगर येथील विद्याभवन हायस्कूलच्या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांनी उत्साहात मतदान केले.  पुणे कॅन्टोमेंट येथील सेंट मिराज स्कूल  येथे कपिल गुलवाणी व प्रज्ञा कुकडे यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे आपला अधिकार आहे, आणि तो आपण बजावला पाहिजे, असे मत प्रज्ञा कुकडे यांनी व्यक्त केले. त्यांच्याप्रमाणेच बहुतांश नवमतदारांमध्ये उत्साह दिसत होता.
वयोवृदधांचेही उत्साहात मतदान
कसबा पेठ येथे 89 वर्षाच्या श्रीमती नलिनी परांजपे या आजींनी आपल्या कुटुंबियांसह उत्साहात मतदान करुन आजच्या तरुण पिढीला मतदानासाठी प्रोत्साहन दिले. अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व महिला मतदारांना स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने मदत करताना दिसत होते.

 

‘फिक्की फ्लो’कडून ५० युवतींना प्रशिक्षण

0
पुणे : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’ संस्थेच्या वतीने ब्रिजस्टोन, टाटा स्ट्राईव्ह यांच्या सहकार्यातुन ५० युवतींना कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टाटा स्ट्राईव्ह स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह अंतर्गत रिटेल सेल्स असिस्टंटचे प्रमाणपत्र या युवतींना देण्यात आले. रिटेल मॅनेजमेंटमधील प्रशिक्षणासाठी या उपक्रमांतर्गत २०१८ पासून भरघोस निधीची तरतूद केली जात आहे. या विस्तृत प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभागी युवतींना विविध विषयांचे धडे देण्यात आले. ९ आठवडयांचे क्लासरूम प्रशिक्षण व एक आठवड्याचे प्रत्यक्ष नोकरीचे प्रशिक्षण देण्यात आले.
सहभागीना रिटेल स्टोअर लेआउट आणि मर्चंडाइज डोमेन याचे प्रशिक्षण दिले गेले. व्यावसायिक विकासाबद्दल मार्गदर्शन, सॉफ्टस्किल, संवादकौशल्य, अर्थसाक्षरता आदी गोष्टींचा या प्रशिक्षणामध्ये समावेश होता. प्रत्यक्ष अनुभव मिळावा या हेतून प्रशिक्षण घेतलेल्या युवतींना किरकोळ दुकानात काम करण्याची संधी देण्यात आली. यातील २५ युवतींना वेगवेगळ्या रिटेल स्टोअरमध्ये नोकरी मिळाली असून, उर्वरित २५ जणींना सहा आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवतींना दापोडी येथील टाटा स्ट्राइव्ह व्यावसायिक केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला फिक्की फ्लोच्या चेअरपर्सन रितु प्रकाश छाब्रिया, वरिष्ठ उपाध्यक्ष अनीता सणस, कोषाध्यक्ष अनिता अग्रवाल, अजय सेवेकरी, पराग जैन, ब्रिजस्टोनचे रानू कुलश्रेष्ठ, टाटा स्ट्राइव्हचे सदस्य उपस्थित होते.
महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देऊन सक्षमीकरण्याचे काम फिक्की फ्लोच्या माध्यमातून केले जाते. यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्या माध्यमातून हजारो युवतींना प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांना पुरुषांइतक्याच संधी मिळाव्यात, या दृष्टीने फिक्की फ़्लो आणि ब्रिजस्टोन प्रयत्नशील आहे. त्यासाठी सीएसआर निधीमधून विविध मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. फिक्की फ्लो पुणे चॅप्टरने गेल्या पाच वर्षात ४६२ सदस्य जोडत महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. शिक्षण, कौशल्याचे प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिक सेवा, वृद्धाश्रमातील ज्येष्ठाना डायपर आणि प्राथमिक ज्ञान देण्याचे काम सुरु आहे, असे चेअरपर्सन रितू प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.

राज्यात महायुती २२० नाही तर २५० पार जाणार … पुण्यातील आठही जागा जिंकणार ; कोथरूडचा लीड १.६० लाखांवर…चंद्रकांत दादांचा विश्वास

पुणे-सकाळपासूनच प्रचंड उत्साहात नागरिकांनी केलेल्या मतदानामुळे राज्यात महायुती २२० नाही तर २५० हून अधिक जागांवर विजय होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.
मतदानाला बाहेर पडणाऱ्या नागरिकांची देहबोली पाहता पुण्यातील आठही जागांवर भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार विजयी होतील. तसेच कोथरूडमध्ये मला १.६० लाखांहून अधिक आघाडी मिळेल असा ठाम विश्वासही चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाचा आढावा चंद्रकांत दादा पाटील यांनी विविध मतदान केंद्रांवर जाऊन घेतला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.


विरोधकांनी केलेला कांगावा, याचा मतदारांवर जराही परिणाम झालेला दिसून येत नाही, असे स्पष्ट करून चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, गेल्या चार दिवसात हवा फिरली आहे, असे शरद पवार यांचे विधान अनाकलनीय आहे. हवा कोणत्या बाजूने फिरली आहे हे मात्र पवार साहेबांनी स्पष्ट केलेले नाही. नेहमीप्रमाणेच त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. हवा नक्कीच फिरली आहे पण ती पूर्णपणे महायुतीच्या बाजूने. विरोधकांमधील बेबनाव, कांगावा आणि विकासाच्या दृष्टीचा अभाव, यामुळे नागरिक आपला ठाम पाठिंबा देत आहेत तो महायुती च्या बाजूने, असे स्पष्ट निरीक्षण देखील पाटील यांनी नोंदवले.

‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे चित्रीकरण झाले पूर्ण

0

बहुप्रतिक्षित आणि मल्टिस्टारर फिल्म ‘मीडियम स्पाइसी’चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी अशा तगड्या स्टारकास्टमूळे ह्या मल्टिस्टारर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

विधि कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे चित्रीकरण मुंबई आणि पुण्यामध्ये झाले आहे.

चित्रीकरण पूर्ण झाल्याच्या बातमीला दूजोरा देताना चित्रपटाच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या,  “मीडियम स्पाइसी’ सिनेमाच्या निर्मितीची प्रक्रिया चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अतिशय मजेदार होती. नामवंत कलाकार, तंत्रज्ञ आणि मोहितसारखा उत्तम दिग्दर्शक ह्यामूळे ह्या सिनेमावर काम करतानाचा अनुभव आठवणीत राहिल. आता आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहचवायला उत्सुक आहोत. चित्रपटाची टीम सध्या पोस्ट प्रॉडक्शननंतर हा अद्भूत अनुभव अजून व्दिगुणीत करण्यासाठी झटत आहे.”

दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणतात, “माझ्यासाठी ‘मीडियम स्पाइसी’ हा गेल्या काही महिन्यांतला एक अविस्मरणीय अनुभव होता. आपण पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्याची ही प्रक्रिया खूप अव्दितीय आहे. सर्व कलाकारांचा मी आभारी आहे, की त्यांनी ह्या विलक्षण अनुभवात मला उत्तम साथ दिली. आम्ही मुंबई आणि पुण्यात चित्रीकरण केलंय. आजपर्यंत खरं तर अनेक सिनेमांतून आपण मुंबई पाहिलीय. पण ह्या सिनेमात दिसलेली मुंबईची एक आगळी छटा तुम्हांला आवडेल, ह्याचा मला विश्वास आहे. आणि कदाचित हेच तर ह्या शहराचं वैशिष्ठ्य आहे, ते तुम्हांला दरवेळी काही तरी वेगळेपण दाखवतं. पुण्यात चित्रीकरण करताना तर मी ह्या शहराच्या पुन्हा प्रेमातच पडलो.”

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’  नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी हे कलाकार आहेत. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

बरसणारी संततधार अन् कलेचा सुरेल संगम

0
तालायनच्या ‘ श्रध्दा सुमन ‘
मैफिलीतून रसिक चिंब
पुणे ता. २१: सभागृहात दर्दी रसिकांची गर्दी होती. स्वर, ताल व लयीच्या सुरेल साक्षीने मैफल बहरत होती. रसिकांची नेमक्या जागी लाभणारी उत्स्फूर्त दाद कलाकारांचा उत्साह वाढवत होती. बरसणारी संततधार अन् कलेचा सुरेल संगम अशा संस्मरणीय वातावरणात यंदाची ‘श्रद्धा सुमन’ मैफल रंगली.
तबला सम्राट पद्मविभूषण पंडित किशन महाराज यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध तबलावादक पंडित अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कलतर्फे ही मैफल घेण्यात आली. शकुंतला शेट्टी सभागृहात ही मैफल पार पडली.
या मैफिलीची सुरुवात युएसए येथील ख्यातनाम गायक मनू श्रीवास्तव यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी जैत श्री रागातील रचना व  कलावती रागातील बंदिश पेश केली. दाणेदार आवाज, रागशुद्धता, समेवर येण्याची सहजता आणि टीपेला पोहोचणारा स्वर, आकर्षक ताना आ​णि चपळ तानक्रिया अशा वैशिष्ट्यपूर्ण स्वराविष्काराने त्यांनी रसिकांना मुग्ध केले.’ म्हारे घर आओ प्रीतम प्यारा,’ या मीरा भजनाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सांगता केली.
सुमधुर तालातून व विनम्र वाणीतून बनारस घराण्यातील विख्यात तबला वादक पंडित पुरण महाराज यांनी रसिकांची मने जिंकली. आपल्या प्रस्तुतीत त्यांनी पारंपारिक तीन तालातील विलंबित, अति विलंबित पेशकार, कायदा, रेला, गत, तुकडे, परण सफाईदारपणे सादर केले. चार मात्रांची चौहाई, चक्कधार तसेच बुजुर्ग कलाकारांच्या दुर्मिळ व ठेवणीतल्या रचना पेश करत त्यांनी रसिकांची विशेष वाहवा प्राप्त केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैलीचा वारसा पुढे नेणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर यांनी पंडित किशन महाराज यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शिवकामिनी ही देवीस्तुती सादर करत त्यांनी आपल्या प्रस्तुतीस प्रारंभ केला. नृत्य व अभिनयाचा सुरेख मिलाफ त्यांच्या सादरीकरणातून रसिकांनी अनुभवला. त्यांनी सादर केलेली सप्त ताल स्वरमालेतील वैशिष्टपूर्ण रचना रसिकांना विशेष भावली. तालाचे सौंदर्य दाखवणाऱ्या तिल्लानातून नेत्रसुखद नृत्याविष्काराचाचे त्यांनी उपस्थितांना दर्शन घडविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. पंडित अरविंदकुमार आझाद यांनी आभार मानले.

EVM:काँग्रेसने ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला केल्या तब्बल २२१ तक्रारी

0

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी दिग्गज नेते, कलाकार मंडळी मतदानाचा हक्क बजावित आहे. काही भागात ईव्हीएमबाबतच्या तक्रारी येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत.

अचलपूर – १, ऐरोली – १, अकोला पूर्व – १, अकोला पश्चिम -६, अकोट -३, आंबेगाव – १, अमरावती -४, अंधेरी पश्चिम -१, अणुशक्तीनगर – १, औरंगाबाद -१३, औसा – १, बाळापूर – ३, भोकर – ५, बोरिवली – १, बुलढाणा – २, भायखळा – १, चांदिवली – ३, चंद्रपूर – ४, चिखली – १, चिमूर -१, चोपडा -१, कुलाबा -१, धुळे शहर – १, दिंडोशी -३, गडचिरोली – १, घाटकोपर – २, गोरेगाव – २, कोल्हापूर उत्तर – ६, कोल्हापूर दक्षिण -२, कर्जत जामखेड – ३, जालना -४, हिंगणघाट -२, जामनेर -१, जोगेश्वरी पूर्व – २, कराड उत्तर – १, कसबा पेठ – २, करवीर -१, खामगाव -२, किणवट -१, कोपरी पाचपाखाडी -१, कुर्ला १ अशा प्रकारे राज्यभरात ईव्हीएमबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदविल्या आहेत.

तसेच पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचे सध्या व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय. मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. मतदान करताना मोबाईल जवळ बाळगण्यासदेखील बंदी घातली आहे. परंतु असे असूनही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये आपण मतदान करतानाचे हे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

अनेक मतदान केंद्रांवर पोलिसांनीही मोबाईल बंदी घातली आहे. परंतु काही अति उत्साही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून मोबाईल मतदान केंद्राच्या आत घेऊन जात आहेत. यातून या मोबाईल बंदीचा फारसा फायदा झाला नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे.

संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 55% आणि हरियाणात 62% मतदान (Live Updates…)

0

पुणे-महाराष्ट्राच्या 288 आणि हरियाणाच्या 90 विधानसभा जागांसाठी मतदान सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघप्रमुख मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मतदान केले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर कर्नाळ येथे सायकलवरून मतदान करण्यासाठी पोहोचले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 55% आणि हरियाणात 62% मतदान झाले.

या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी पक्षांतर केले होते. या पक्षांतराचा त्यांना फायदा होणार की फटका बसणार हे 24 ऑक्टोबर रोजी कळणार आहे.

Live Updates…

मतदान टक्केवारी  -5pm पर्यंत – जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडून प्राप्त -पुढीलप्रमाणे

Poll % on suvidha @5pm
जुन्नर – 60.07
आंबेगाव – 63
खेड.39
शिरूर -58.81
दौंड- 61.15
इंदापूर -4.25
बारामती -64.06
पुरंदर -57.6
भोर -59.65
मावळ -64.36
चिंचवड -51.33
पिंपरी -42.67
भोसरी -52.52
वडगाव शेरी-41.08
शिवाजीनगर – 39.2
कोथरूड -43.23
खडकवासला-49.5
पर्वती–45.07
हडपसर  -48.84
पुणे कँटोमेंट -38.14
कसबा 36.08

मतदान टक्केवारी

वेळ महाराष्ट्र हरियाणा
9 पर्यंत 5.46% 8.73%
10 पर्यंत 5.79% 9.11%
11 पर्यंत 12.27% 11.94%
12 पर्यंत 16.35% 23.12%
1 पर्यंत 21.07% 32.43%
2 पर्यंत 30.93% 37.64%
3 पर्यंत 35.23% 41.13%
4 पर्यंत 43.65% 50.60%
5 पर्यंत 45% 55%
89 वर्षीय नलिनी परांजपे यांनी कसबापेठ मतदारसंघातील अहिल्यादेवी हायस्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला.
पुणे- जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अल्पबचत भवन येथील मतदान केंद्रावर सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पत्नी रोहिणी म्हैसेकर यांच्यासह अल्पबचत भवन येथे मतदानाचा हक्क बजावला.

 

खासदार संजय काकडे यांचे आवाहन
पुणे-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनं आपल्या सर्वांना मतदानाचा मूलभूत अधिकार दिला आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देशाचे व राज्याचे सरकार बनवतात. त्यामुळे मतदानाचा अधिकार हा अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यघटनेनं दिलेल्या इतक्या महत्वपूर्ण अधिकाराची पायमल्ली होऊ म्हणून सर्वांनी मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन संजय काकडे यांनी आज केले.
खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आज एसएनडीटी महाविद्यालय येथे मतदानाचा अधिकार बजावला.

बारामतीत पवार कुटुंबियांनी एकत्र येत मतदानाचा हक्क बजावीला. आंबेगाव तालुक्यात माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या कुुंटुंबियांसोबत मतदान केले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते, आमदार राहुल कुल, यांनीही सपत्नीक मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावीला.

जिल्ह्यात काही ठिकाणी इव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला. खेड आळंदी विधानसभा मतदार संघात वाकी बुद्रुक गावातील गारगोटे शिवार येथील मतदान २२९ क्रमांकाच्या मतदान केंद्रात इव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने मतदान तब्बल एक तास उशीरा सुरू झाले. यामुळे सकाळीच मतदान करण्यास आलेले अनेक नागरिक मतदान न करताच परत गेले. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर येथील मतदान केंद्रातील मशीन बंद पडले. नवीन मशीन येण्यास उशीर झाल्याने तो पर्यंत मतदान थांबले होते.

धुळ्यात माजी आमदार अनिल गोटेंवर हल्याचा प्रयत्न

नाशिकमध्ये दोन्ही हात नसलेल्या शेतकऱ्याने केले मतदान. हात नसल्यामुळे पायाला लावली शाई.

एटापली तालुक्यात पुरसुलगोंदी येथील मतदान केंद्रावर पायी जातांना भोवळ येऊन पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू

काँग्रेस माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब केले मतदान.

क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने बजावला मतदानाचा हक्क.

जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत मतदान टक्केवारी

परतूर –48.76 घनसावंगी – 53.63 जालना- 42.19 बदनापूर – 53.50 भोकरदन- 53.35 एकूण- 50.29 टक्के

पुणे जिल्हा दुपारी 3 वाजेपर्यंची आकडेवारी

जुन्नर- 49.03

आंबेगाव- 52.54

खेड – 48.53

शिरुर-44.86

दौंड – 49.2

इंदापूर- 52.27

बारामती -52.2

पुरंदर -46.4

भोर -48.76

मावळ -53.6

चिंचवड -35.79

पिंपरी -31.28

भोसरी -40.35

वडगावशेरी -32.07

शिवाजीनगर – 28.76

कोथरुड -35.32

खडकवासला -37.75

पर्वती -33.06

हडपसर -41.16

पुणे कॅंटोन्मेट -27.72

कसबा- 26.33

पुणे एकूण- 41 %

बुलडाणा जिल्हा दुपारी ३ वाजेपर्यंत आकडेवारी

21 मलकापूर – ४३.९७ 22 बुलडाणा – ४२.०९ 23 चिखली – ४६.२७ 24 सिंदखेड राजा – ४५.६६ 25 मेहकर – ४७.७१ 26 खामगांव- ४८.१९ 27 जळगांव जामोद – ४५.७७ एकूण – ४५.६५

नंदुरबार जिल्ह्यातील दुपारी 3 वाजेपर्यंची आकडेवारी

अक्कलकुवा 52.13 शहादा 51.62 नंदुरबार 40.83 नवापूर 58.03 एकूण 50.26

यवतमाळ जिल्हा : सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी

वणी – 19.36 टक्के

राळेगाव – 18.63 टक्के

यवतमाळ – 14.6 टक्के

दिग्रस – 21.82 टक्के

आर्णि – 18.82 टक्के

पुसद – 20.41 टक्के

उमरखेड – 18.93 टक्के

जिल्ह्याची सरासरी – 18.79 टक्के

> कोथरुड विधानसभा मतदारसंघातील 07.00 वा. ते 11.00 वा. दरम्यान 14.44% मतदान झाले आहे.

> परंडा तालुक्यातील कांदलगाव येथे मतदान केंद्र क्र.358 मध्ये व्होटिंग मशीन बंद. अद्याप एकही मतदान झाले नाही.

> पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासांत 5.65 टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

> वाळूज येथील मदर तेरेसा विद्यालयातील मतदान केंद्रावरील 2 EVM मशीन बंद पडल्याने धावपळ.

अकोला : सकाळी ९ वा. पर्यंतचे मतदान

२८- अकोट- ५.२७%

२९- बाळापूर- ५.०९%

३०- अकोला पश्चिम- ४.४९%

३१- अकोला पूर्व- ५.१९%

३२- मूर्तिजापूर- ५.०४%

> आज सकाळी 7.30 वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी धानोरा तालुक्यातील चातगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला अधिकार आणि कर्तव्य आहे. प्रत्येकाने जरूर मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

> लातूर जिल्ह्यात काल राञीपासून संततधार पाऊस. यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच मोठा पाऊस. जळकोट तालुक्यात नद्यांना पूर. काही ठिकाणी मतदानकेंद्रात जाण्यासाठी अडचणी. मात्र सर्वत्र मतदान सुरळीत असल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती. भर पावसातही सकाळपासून मतदानाला सुरूवात. माञ वेग कमी.

> स्वाभिमानी पक्षाचे वरूड मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांचे गाडीवर आज सकाळी हल्ला. गाडी पेटवण्यात आली.

> राज्यमंत्री अतुल सावे यांनी औरंगाबादमध्ये सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.

> नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मतदान.

> बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक काडेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.

> साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क.

> विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चितेगावमध्ये केले मतदान.

 

जामखेडमध्ये भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

0

जामखेड- तालुक्यातील बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे(वय २८), हर्षवर्धन शंकर फुंदे (वय २२, रा. बांधखडक) हे मतदान करण्यासाठी जात होते. यावेळी विरोधी गटातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भालेराव, वनवे यांच्या नाकावर व हातावर चाकू हल्ला केला. तर हर्षवर्धन फुंदे याच्या हातावर चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे. भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाल्यानंतर चिडलेल्या काही कार्यकर्त्यांनी तेथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फॉरच्युनर या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सहायक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच काकासाहेब खाडे व इतर अनोळखी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.