Home Blog Page 2811

देव आंदोलकांना सद्बुद्धी देवो! ..खासदार संजय काकडेंकडून राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा खरपूस समाचार

0

 

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीत भाऊबीज निमित्त मतदार संघातील महिला माता-भगिनींना साडी भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नेत्यांनी याप्रकरणी अतिशय हीन पातळीवर जाऊन राजकारण केले व आंदोलन केले. हिंदू संस्कृतीत भाऊबीज निमित्त भाऊ बहिणीला साडी भेट देतो आणि चंद्रकांत पाटील यांनी भाऊ समजूनच कोथरुड मतदार संघातील माता-भगिनींना साडी भेट दिली. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने याविषयी केलेल्या या आंदोलनाची नोंद काळा दिवस म्हणून होईल. ईश्वर या आंदोलकांना सद्बुद्धी देवो, अशा खोचक शब्दांत भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादी च्या आंदोलकांचा खरपूस समाचार घेतला.

कोथरुड विधानसभा मतदार संघात आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाऊबीज निमित्त साडी भेट दिल्यावरुन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा जाहीर निषेध करतानाच भाजपचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आपली भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आंदोलन रस्ते, पाणी अशा विकासाच्या मुद्यांवर असते तर, आपण एकवेळ समजू शकलो असतो मात्र, हे आंदोलन करून त्यांनी भावा-बहिणीच्या नात्याविरोधातच त्यांचे संस्कार असल्याचे दाखवून दिले आहे. वास्तविक चंद्रकांत दादा पाटील हे निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवाळी सणात त्यांच्या मतदार संघातील माता-भगिनींबद्दल आपुलकीचे नाते ठेवून भाऊबीज साजरी करतात. याचे स्वागत करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुण्यातील नेत्यांना त्याचे घाणेरडे राजकारण करावेसे वाटते. त्यांनी आंदोलन का केले हेच समजत नाही. देशात किंवा जगात अशाप्रकारे आंदोलन झाले नसेल. यातून त्यांची परिपक्वता लक्षात येते. देव त्यांना ही परिपक्वता लवकर देवो, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

चंद्रकांत दादा पाटील हे बारामती लोकसभा मतदार संघ, पश्चिम महाराष्ट्र आणि एकूणच राजकारणात खूप सक्रिय होते व आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून चंद्रकांत दादा पाटील यांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन लक्ष करण्यात येत आहे. याचा मी जाहीर निषेध करतो, असेही खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.

टेनिस स्पर्धेत संदेश कुरळे याचा मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का

0
पुणे- ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या अकराव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात संदेश कुरळे याने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या संदेश कुरळे याने चौथ्या मानांकित चेतन गडियारचा 6-3, 1-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या यशराज दळवीने आपला राज्य सहकारी साहिल तांबटचा 6-1, 2-6, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. अव्वल मानांकित भूपेंदर दहियाने सिद्धार्थ बैसितीचे आव्हान 6-2, 6-4 असे मोडीत काढले.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने तामिळनाडूच्या लक्ष्मी प्रभा अरुणकुमारला 6-3, 6-3असे पराभूत केले.चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर हिने अपूर्वा वेमुरीला 7-5, 6-3 असे नमविले. तिसऱ्या मानांकित बेला ताम्हणकरने पाचव्या मानांकित पूजा इंगळेचा 7-5, 2-6, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-उपांत्यपूर्व फेरी- मुले:
भूपेंदर दहिया(1)वि.वि.सिद्धार्थ बैसिती 6-2, 6-4;
यशराज दळवी(5)वि.वि.साहिल तांबट 6-1, 2-6, 6-2;
संदेश कुरळे(8)वि.वि.चेतन गडियार(4) 6-3, 1-6, 6-3;
दक्ष अगरवाल वि.वि.अनर्घ गांगुली 6-0, 4-6, 6-3;
मुली:
आकांक्षा नित्तुरे(1)वि.वि.लक्ष्मी प्रभा अरुणकुमार 6-3, 6-3;
वैष्णवी आडकर(4)वि.वि.अपूर्वा वेमुरी 7-5, 6-3;
बेला ताम्हणकर(3)वि.वि.पूजा इंगळे(5) 7-5, 2-6, 6-2;
प्रेरणा विचारे(2)वि.वि.अभया वेमुरी 6-4, 6-2.

फ्री कॉलिंग बंद ,डेटा दरवाढीचे संकेत…

0

आर्थिक संकटातील टेलीकॉम कंपन्यांना दिलासा देण्यासाठी उचलणार पाऊल

नवी दिल्ली – टेलिकॉम क्षेत्रावरील वाढता आर्थिक दबाव कमी करण्याचे उपाय सुचवण्यासाठी सरकार कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिवांची एक समिती नेमणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम कंपन्यांना १.४२ लाख कोटी रुपयांची जुनी थकबाकी देण्याचे आदेश दिल्याच्या काही दिवसांनंतरच सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारने ट्रायलाही काही उपायांवर विचार करण्यास सांगितले आहे. यात फ्री-कॉलिंग बंद करणे आणि डेटाचे दर वाढवणे या उपायांचा समावेश आहे.

टेलिकॉम कंपन्यांच्या स्पेक्ट्रमचे पैसे देणे काही काळ टाळण्याबरोबरच कंपन्यासाठी युनिव्हर्सल सर्व्हिस फंडात (यूएसओएफ) योगदानाच्या नियमांचा ही समिती फेरविचार करू शकते. समितीत वित्त सचिव, दूरसंचार सचिव आणि विधि सचिवांसह अन्य मंत्रालयाचे सचिवही असतील. टेलिकॉम कंपन्यांच्या एजीअारच्या गणनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच आलेल्या आदेशानंतर कंपन्यांनी वाढत्या आर्थिक संकंटाबाबत चर्चा केली होती. भारती एअरटेलने एजीआरच्या मुद्दयांमुळे सप्टेंबर तिमाहीचे निकाल १४ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलले आहेत. कंपनी आपल्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल मंगळवारी जाहीर करणार होती.

ट्राय निश्चित करू शकते कॉलिंग, डेटाचे किमान शुल्क : एकीकडे सचिवांची समिती उपाय शोधेल तर दुसरीकडे टेलिकॉम नियामक ट्राय कॉलिंग आणि डेटा सेवांसाठीचे किमान शुल्क निश्चित करण्यावर काम करू शकते. अशात मोफत कॉलिंगची सुविधा रद्द होण्याची शक्यता आहे.

मर्सिडीझ-बेन्झची जीएलईच्या सर्व गाड्या योजनेच्या आधीच तीन महिन्यात विकल्या…

0
  • ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे जीएलईच्या नवीन गाडीच्या शुभारंभाच्या तीन महिने आधीच सध्याच्या सगळ्या जीएलई विकल्या गेल्या आहेत.
  • मर्सिडीझ-बेन्झच्या नवीन जीएलईच्या बुकिंग्सचा शुभारंभ आजपासून
  • २०२० मध्ये ऑटो-एक्स्पोच्या आधी नवीन जीएलई गाडी भारतात सादर केली जाईल.
  • मर्सिडीझ-बेन्झ इंडियाच्या बेस्टसेलर्स गाड्यांमध्ये जीएलईचा समावेश, शुभारंभापासून जवळपास तब्बल १३००० गाड्यांची विक्री.
  • सणासुदीच्या काळात संपूर्ण देशभरातून मर्सिडीझ-बेन्झ गाड्यांना अभूतपूर्व मागणी, दिल्ली एनसीआरचा उत्तर भाग, पंजाब, पश्चिम मुंबई, पुणे आणि गुजरातेतून मागणीचा ओघ सर्वात जास्त.   
  • मर्सिडीझ-बेन्झची नाविन्यपूर्ण सुविधा विश बॉक्सला प्रचंड प्रतिसाद, ५०० पेक्षा जास्त कन्व्हर्जन्स याआधीच झाली आहेत.
  • २०१९ च्या तिसऱ्या तिमाहीपासून मर्सिडीझ-बेन्झच्या मागणीत वाढ

 पुणे: यंदा सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक मर्सिडीझ-बेन्झच्या जीएलई मॉडेलच्या सर्वच्या सर्व गाड्या विकल्या गेल्या आहेत.  संपूर्ण देशभरातून मर्सिडीझ-बेन्झला अभूतपूर्व मागणी येत असल्यामुळे आधी आखणी करण्यात आलेल्या योजनेच्या तीन महिने आधीच सर्व जीएलई गाड्या विकल्या गेल्याची घोषणा मर्सिडीझ-बेन्झ इंडियाने केली आहे.  २०२० मधील ऑटो-एक्स्पोच्या आधी भारतीय बाजारपेठेत येणार असलेल्या नवीन जीएलईच्या बुकिंग्सना सुरुवात झाली आहे.  मर्सिडीझ-बेन्झच्या सर्वात प्रमुख गाड्यांमध्ये जीएलईचा समावेश झाला असून भारतात जवळपास १३००० गाड्या विकल्या गेल्या आहेत.  नवीन जीएलई गाडी त्यातील अतुलनीय वैशिष्ट्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे लक्झरी एसयूव्ही विभागात एक नवा, आधुनिक मापदंड ठरेल.

 

कार डिलिव्हरीचा आणखी एक नवा उच्चांक, धनत्रयोदशीला दिल्ली एनसीआरमध्ये:

दसरा आणि नवरात्रीमध्ये मुंबई व गुजरातेत २०० पेक्षा जास्त मर्सिडीझ-बेन्झ गाड्यांची विक्रमी डिलिव्हरी केल्यानंतर आता दिवाळीत देखील देशभरात सर्वत्र सर्वाधिक लोकप्रिय लक्झरी कार ब्रँड हा मान मर्सिडीझ-बेन्झने कायम राखला आहे.  एकट्या दिल्ली-एनसीआरमध्ये २५० पेक्षा जास्त कार ग्राहकांना सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबरीने मुंबई, पुणे, गुजरात, कोलकाता, दिल्ली एनसीआर व पंजाब या प्रमुख बाजारपेठांमध्ये देखील मर्सिडीझ-बेन्झच्या 600 गाड्या सणांच्या सुमुहूर्तांवर ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.

 

मर्सिडीझ-बेन्झचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले, सणासुदीचा काळ आमच्यासाठी खूपच लाभदायक ठरला आहे.  आमच्या गाड्यांना देशभरातील सर्व भागांमधून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत.  आमच्या सध्याच्या सर्व जीएलई गाड्या योजनेच्या तीन महिने आधीच विकल्या गेल्या आहेत.  आता आम्ही नवीन जीएलईसाठी बुकिंग्स सुरु करत आहोत.  ही नवीन गाडी ऑटो एक्स्पो २०२० च्या आधी भारतात येईल.  आम्हाला पक्की खात्री आहे की, आमची अत्याधुनिक नवीन जीएलई गाडी लक्झरी गाड्यांच्या विभागात नवी क्रांती घडवेल.”

 

ते पुढे म्हणाले, “ही सर्वोत्कृष्ट, अतुलनीय गाडी विकत घेण्याचा योग्य निर्णय घेणाऱ्या आमच्या ग्राहकांचा सणासुदीचा आनंद द्विगुणित झालेला पाहताना आम्हाला खूप समाधान मिळाले.  सणांच्या दिवसांमध्ये कार डिलिव्हरीजची प्रचंड मोठी संख्या आमच्या ग्राहकांचा मर्सिडीझ-बेन्झ ब्रँडवरील विश्वास किती वाढला आहे ते दर्शविते.  बाजारपेठेतील स्थिती आव्हानात्मक असताना देखील लक्झरी कार उत्पादक म्हणून ग्राहकांची इतकी मोठ्या प्रमाणावर पसंती आम्हाला मिळाली हे खूप महत्त्वाचे आहे.  ग्राहकांनी आमच्या धोरणांना अनुकूलता दर्शविली आहे.  आमच्या ग्राहककेंद्री दृष्टिकोनाचे इतके चांगले लाभ मिळत आहेत, ग्राहक इतके खुश आणि समाधानी आहेत ही आमच्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाची बाब आहे.  विश बॉक्स या आमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने किमया घडवून आणली आहे.  यामुळे लक्झरी कार विभागात मागणीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे आणि जास्तीत जास्त ग्राहक मर्सिडीझ-बेन्झ खरेदी करत आहेत.”

 

टी अँड टी मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विदुर तलवार यांनी सांगितले,यंदाच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून आम्ही रोमांचित झालो आहोत.  दिल्ली एनसीआर हे टी अँड टी मोटर्ससाठी खूप महत्त्वाचे मार्केट आहे.  याठिकाणी आमच्या मॉडेल्सना मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादातून ग्राहक आमच्या ब्रँडबद्दल किती आनंदी आणि समाधानी आहेत हे दिसून येते.  गेली दोन दशके या बाजारपेठेत एक विश्वसनीय ब्रँड हे आमचे स्थान कायम आहे.  बाजारपेठेतील चढउतारांच्या काळात देखील ग्राहकांकडून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहक ठरत आहे.  आधुनिक लक्झरी कार खरेदीदाराच्या मनात मर्सिडीझ-बेन्झ ब्रँडबद्दल किती विश्वास आहे ते यातून दिसून येते.”

 

सिल्वर ऍरोजचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ श्री. तुषार कुमार यांनी सांगितले,मर्सिडीझ-बेन्झसोबत भागीदारी ही सिल्वर ऍरोजसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.  बाजारपेठेत सणासुदीच्या काळात मिळत असलेला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद पाहून आम्ही खूप खुश आहोत.  आमची उत्पादने आणि ब्रँड यांच्याबद्दलची निष्ठा अधिक दृढ झाली आहे.  लक्झरी कार बाजारपेठेत आमची उत्पादने अतुलनीय आहेत हा विश्वास बळावला आहे.  मर्सिडीझ-बेन्झचा पोर्टफोलिओ अतिशय मजबूत आहे, ब्रँड आणि मालकीचा अनुभव बेजोड आहे.  डिलिव्हरीजच्या विक्रमी आकड्यांमधून देखील हे सिद्ध झाले आहे.  आम्हाला खात्री आहे की ही सकारात्मकता पुढे देखील कायम राहील आणि मागणी अजून जास्त वाढेल.”

‘कांटा लगा गर्ल’ शेफालीची बिग बॉस १३ मध्ये …..

0

जवळपास १७ वर्षांपूर्वी एका म्युझिक व्हिडिओमुळे एक सुंदर मुलगी बरीच प्रसिद्ध झाली. या मुलीच नाव आहे शेफाली जरीवाला. जुन्या गाण्याचे रिमिक्स करून तयार करण्यात आलेले ‘कांटा लगा..’ हे गाणे त्यावेळी सर्वांच्याच आवडीचे झाले होते. डिस्कोपासून पार्ट्यांपर्यंत तसेच अगदी हळदी समारंभातही हे गाणं वाजवलं जायचं. या गाण्यामुळे शेफाली रातोरात प्रसिद्ध झाली आणि तिला लोक ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखू लागले. सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटात आयटम साँग करताना दिसली. ‘बुगी वुगी’, ‘नच बलिये ५’ आणि ‘नच बलिये ७’ या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.

हीच आता शेफाली बिग बॉसच्या माध्यमतातून लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या या शोचे १३ वे पर्व सुरु असुन यात शेफालीची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. खरं तर, २९ ऑक्टोंबरलाच तिने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. येत्या काही दिवसात तो भाग टीव्हीवर प्रदर्शित केला जाईल. दरम्यान या नव्या स्पर्धाकाला पाहण्यासाठी बिग बॉसचे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

विधिमंडळ नेतेपदी निवड-भाजपाकडून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित

0
  • भाजपकडून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचे दावेदार
  • 4 दिवसांत शपथविधी होणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई-देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले  यांनी अनुमोदन दिले. याद्वारे आता भाजपाकडून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावेळी ते म्हणाले, “गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे कारभार सांभाळला. गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना त्यांनी अनेक प्रश्न खुबीनं सोडवले. त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणाचेही नाव पुढे येऊ शकत नाही.” या प्रस्तावाला भाजपाच्या १२ आमदारांनी अनुमोदन दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य करू -फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाजप विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्यानंतर आमदारांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचेही आभार मानले. सोबतच, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे राज्य करू असे म्हटले होते. हे सरकार पुढील पाच वर्षे चालणार असा दावा सुद्धा फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला आहे.

विधिमंडळाच्या बैठकीत पंकजा मुंडेंचाही समावेश

परळी विधानसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांनी देखील विधिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती. त्यातच त्यांनी विधिमंडळाच्या बैठकीत उपस्थिती लावून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरुवात केली. त्यांना विधान परिषदेवर नियुक्ती देऊन मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा

महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बुधवारी बैठक अपेक्षित होती. परंतु, ऐनवेळी ही बैठक रद्द करण्यात आली. एका मराठी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी बुधवारी दुपारी फोनवर चर्चा केली. दोघांनीही लवकरच भेटून तोडगा काढण्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेकडून गुरुवारी नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेचा विधीमंडळातील नेत्याची निवड केली जाणार आहे.

शिवसेनेला उपमुख्यमंत्री, १३ मंत्रिपदे; भाजपची ‘ऑफर’

मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना आग्रही असतानाच, भाजपनं शिवसेनेसमोर सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला ठेवला आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि १३ अन्य मंत्रिपदे देण्याबाबतचा प्रस्ताव भाजपनं ठेवला असल्याचं कळतं. तर मुख्यमंत्रिपद आणि अन्य २६ मंत्रिपदं ही भाजपकडेच राहतील, असंही समजतं. भाजपच्या या ‘ऑफर’नंतर शिवसेना काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडेल -दिल्लीश्वरांचा विश्वास

0

मुंबई: दिल्लीतून निरोप येताच  शिवसेना आपला आग्रह बाजूला ठेवून अखेरीस सत्तेत सहभागी होईल असे सांगण्यात येत असले तरी  शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या सुरू असलेलं वाकयुद्ध अजून थांबण्याचं नाव घेत नाही. भाजपचे वरिष्ठ नेते अद्याप संयम राखून आहेत. भाजप-शिवसेना युतीतील तणावाचं वातावरण निवळेल, या प्रतीक्षेत ते आहेत. संख्याबळाच्या आधारावर सत्तेत वाटा आणि समझोता होईल, असं त्यांना वाटतं. एका भाजप नेत्याच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे येत्या ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ‘लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता. तसे आश्वासन दिलेच नव्हते’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केल्याने खळबळ उडाली होती. ‘शिवसेनेने अजून कोणताही प्रस्ताव दिलेला नसून, त्यांच्या प्रस्तावावर मेरिटनुसार विचार केला जाईल. त्यांच्या योग्य मागण्या मान्य केल्या जातील’, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या विधानांनंतर शिवसेना आक्रमक झाली असून, पक्षाने मंगळवारी जागावाटपाबाबत होणारी युतीची बैठकच रद्द केली .

भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्याचा कारभार चालवणार असं शिवसेनेला ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस हे येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर सध्या ठाम असलेली शिवसेना एक पाऊल मागे घेईल, अशी भाजपची अपेक्षा आहे.

सरकार स्थापनेचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता

भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष सुरू असतानाच, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांची बुधवारी भाजप आमदारांच्या होणाऱ्या बैठकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या बैठकीत फडणवीस यांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर सरकार स्थापन करण्याचा प्रस्तावही ठेवणार आहेत, असं सांगितलं जातं.

सत्तेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागण्याचा भाजपचा प्रयत्न -आझाद

0

मुंबई-महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निडवणुकीचे निकाल हाती आल्यानंतर हरियाणामध्ये भाजपाने सत्ता स्थापन केली असली तरी महाराष्ट्रात सत्तेची समिकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी याच जुळवाजुळवीवरुन भाजपाला टोला लगावला आहे. ‘भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत आहे,’ अशी टीका आझाद यांनी केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची स्वबळावर सत्ता येईल असा अंदाज एग्झीट पोलने व्यक्त केला होता. मात्र दोन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळवण्यात भाजपाला अपयश आले आहे.“देशात जर लोकशाही असती तर आज जे काश्मीरमध्ये सुरु आहे ते झाले नसते. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चोर दरवाजाने काश्मीरसंदर्भातील विधेयक आणले. लोकशाहीचे मंदीर असणाऱ्या संसदेमध्ये ते हुकमशाही पद्धतीने वागत आहेत,” असं टोलादेखील  आझाद यांनी लगावला आहे.

“नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल पाहून मला भारतीय मतदारांचे अभिनंदन करायचे आहे. हरियाणा असो किंवा महाराष्ट्रातील निवडणूक किंवा पोटनिवडणुक भाजपा पूर्णपणे हरला आहे. आता ते चौटाला आणि इतर अपक्षांसमोर सत्ता स्थापनेसाठी भीक मागत आहेत. त्यांना अद्याप महाराष्ट्रात सत्ताही स्थापन करता आली नाही,” असा टोला आझाद यांनी लगावला आहे. दिल्लीमधील एका जाहीर सभेमध्ये भाषणादरम्यान त्यांनी ही टीका केली. देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपा दोन तृतीयांश जागांवर पराभूत झाल्याचा टोलाही आझाद यांनी लगावला आहे.

“निवडणूक जवळ आल्यावर मते मिळवण्यासाठी क्षेपणास्त्रे डाकण्याचे भाजपाचे समिकरण जनतेने नाकारले आहे. आता लोकांना शेकतकऱ्यांचे आत्महत्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था यासारख्या समस्या महत्वाच्या वाटू लागल्याचे हे संकेत आहेत. मात्र भाजपाला या प्रश्नाबद्दल काहीच वाटत नाही,” असं आझाद आपल्या भाषणात म्हणाले आहेत. “भाजपाला जनतेची चिंता नाही. नोटबंदी अनेकांचे रोजगार बुडाले किंवा जीएसटीमुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले तरी भाजपाला त्याचे काहीच वाटत नाही. पेट्रोलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सरकार रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेत आहे,” असंही आझाद आपल्या भाषणामध्ये म्हणाले आहेत.

भाजपा केवळ निवडणुका लढण्यासाठी सत्तेत आलेला पक्ष आहे अशी टीकाही आझाद यांनी केली आहे. “भाजपावाले स्वप्नातही निवडणुकाच लढवत असतात. ते कामाच्या वेळीही केवळ निडवणुकांच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात व्यस्त असतात,” असं आझाद म्हणाले आहेत. “देशात जर लोकशाही असती तर आज जे काश्मीरमध्ये सुरु आहे ते झाले नसते. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चोर दरवाजाने काश्मीरसंदर्भातील विधेयक आणले. लोकशाहीचे मंदीर असणाऱ्या संसदेमध्ये ते हुकमशाही पद्धतीने वागत आहेत,” असं टोला आझाद यांनी लगावला आहे.

मंत्री पदांच्या वाटपासाठी ,शिवसेना -भाजपा सत्तासंघर्ष

0

 

मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभा निवडणुकीत अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा (५०-५०) फॉर्म्युला ठरला होता, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडुन काढला. त्यावर शिवसेनेने प्रत्त्यूत्तर देत लोकसभेच्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या महायुतीचा व्हिडिओ शेअर करत alt147जरा याद कराे जुबानी’ असे म्हणत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. शिवसेनेच्या या व्हिडिओनंतर त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेत मंगळवारी सायंकाळी alt147५०-५० फाॅर्म्यूल्या’ची बाब माझ्यासमोर आली नाही, असे म्हणाले. दरम्यान, त्यामुळे मंत्रीमंडळाच्या चर्चेबाबत होणारी बैठक ऐनवळी रद्द झाल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

  • फडणवीस : पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहीन, भाजपने ५०-५० चे आश्वासन दिले नाही
  • शिवसेना: जुना व्हिडिओ दाखवून करून दिली आठवण, भाजप सोबतची बैठक रद्द
  • राज्यात महायुतीचे सरकार स्थापणार, सीएमचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात आमचे सरकार पुन्हा स्थापन होईल, यात माझ्या मनात शंका नाही. शिवसेना आणि भाजपच्या बैठका सुरू आहेत. यातून लवकर योग्य तो तोडगा निघेल. मुख्यमंत्री यांनी सकाळी ताठर, सायंकाळी नरमाईची भूमिका घेतली .

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर शिवसेना नाराज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठका कश्याला घ्यायच्या, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे शिवसेना-भाजपची मंंत्रीमंडळ स्थापन करण्याबाबतची बैठक रद्द झाली आहे. ही माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परीषद घेऊन दिली. भाजपचे केंद्रातील दोन नेते आणि शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नेते मंगळवारी मंत्रिमंडळाबाबत चर्चा करणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ५०-५० चा फार्म्यूला ठरला नसल्याचे सांगितले आहे.

आमच्याकडे प्लान बी नाही, प्लान ए १०० टक्के यशस्वी होईल

शिवसेना आम्हाला पाठिंबा देणार नाही, अशी वेळ येणार नाही. आमच्याकडे कुठलाही प्लान बी नाही. पण प्लान ए १०० टक्के यशस्वी होईल. एकत्र लढलो आहोत. सरकारही एकत्र स्थापन करू,असा दावादेखील मुख्यमंत्र्यांनी केला.

शिवसेनेचे ४५ आमदार भाजपच्या संपर्कात : संजय काकडे यांचा दावा

शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार संजय काकडे यांनी केला आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार यावे अशी अनेकांची इच्छा आहे. त्यातही शिवसेनेचे आमदार आग्रही असल्याचे काकडे यांनी सांगितले.

माझ्यावर आत्मचरित्र लिहिण्याची वेळ आली नाही

शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराच्या प्रश्नावर बोलताना, प्रचार सभेत पावसात भिजायचं असत, हा अनुभव आमच्याकडे नव्हता, अशी टिप्पणी त्यांनी केली. तर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या आत्मचरित्र लिहण्याच्या वक्तव्यावर त्यांनी माझ्यावर अजून आत्मचरित्र लिहण्याच्या वेळ आलेली नाही, मी योग्य वेळी लिहीन, असे त्यांनी सांगितले. तिकीट वाटपात आम्ही आमच्या काही नेत्याची ताकत जोखण्यात कमी पडलो. त्यामुळे बरेच बंडखोर निवडून आले.

फिफ्टी- फिफ्टी वगैरे काही नाही: ५ वर्षे मीच मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

0

मुंबई-पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पत्रकारांना आज दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आलं होतं. त्यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं आहे. पावसात भिजावं लागतं त्यात आम्ही कमी पडलो असा टोलाही देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना लगावला.

विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागले. या निकालांमध्ये भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हा पेच महाराष्ट्रापुढे आहे. खरंतर निकालाच्या दिवशीच झालेल्या पत्रकार परिषदेत सगळं काही ठरल्याप्रमाणे होईल महायुतीचा विजय झाला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आता मी भाजपाच्या सगळ्या अडचणी समजून घेणार नाही असं स्पष्ट केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. दरम्यान शनिवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत ५०-५० च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं आणि याबाबत लेखी घ्यायचं असा ठराव झाला.

शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंकडे मागणीही केली. एवढंच काय मातोश्रीबाहेर आणि वरळीत आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर ५०-५० चा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. भाजपाच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन होईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अगदीच आडमुठी घेणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ही बाब विशेष नमूद करावी लागेल. कारण काही मागण्या मेरिटवर तपासून पाहू असंही त्यांनी म्हटलं आहे. पावसात भिजावं लागतं त्यात आम्ही कमी पडलो असा टोलाही देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना लगावला.

सत्ता स्थापनेसाठी अन्य पर्याय स्वीकारण्यास भाग पाडू नका -संजय राऊत

0

मुंबई – शिवसेनेकडे सत्ता स्थापनेसाठी पर्याय खुले आहेत, पण ते स्वीकारण्याचे पाप करू इच्छित नाही असे शिवसेना नेते संजय राउत म्हणाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावर कुरघोडी सुरूच आहे. या दोन्ही पक्षांनी अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. उलट शिवसेना आणि भाजप आता छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मनवण्याच्या तयारीत आहेत. अशातच सोमवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांची वेग-वेगळी भेट घेतली. शिवसेना सातत्याने भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, राज्यात सरकार स्थापनेच्या चर्चेसाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी एकमेकांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्रात कुणीच ‘दुष्यंत’ नाही -राउत

सरकार स्थापनेसाठी होणाऱ्या विलंबावरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना महाहाराष्ट्रत कुणीही दुष्यंत नाही ज्याचे वडील तुरुंगात असतील असे संजय राउत म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजपने चौटाला कुटुंबातील दुष्यंत चौटाला यांना उप-मुख्यमंत्री पद देऊन हरियाणात सरकार स्थापित केले. आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजप हाच फॉर्मुला अजमावून पाहण्याच्या प्रयत्नात आहे. त्यावरच खोचक टीका करताना राउत बोलत होते.

शरद पवारांचे केले कौतुक

राउत पुढे म्हणाले, आम्ही सत्याचे राजकारण करतो. शरद पवार यांनी भाजपच्या विरोधात एक वातावरण तयार केले आहे. आणि काँग्रेस कधीच भाजपसोबत जाणार नाही. यावेळी त्यांनी प्रामुख्याने शरद पवारांचे कौतुक करून भाजपवर पुन्हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेसने आधीच शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याची ऑफर दिली आहे. भाजपसोबत राहून उप-मुख्यमंत्री किंव अडीच वर्षांचे मुख्यंत्री पद घेणार की आमच्यासोबत येऊन 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पद घेणार हे शिवसेनेवर अवलंबून आहे असे काँग्रेसने यापूर्वीच म्हटले आहे.

‘भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे’, धनंजय मुंडेंनी दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा

0

पुणे-विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या व बहीण पंकजा मुंडेंचा दणदणीत पराभव करुन जिंकून आलेले राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“जिव्हाळ्याचे नाते दर दिवसागणिक उजळत राहू दे…भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे… महाराष्ट्रातील माझ्या सर्व भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!” असं ट्विट करत मुंडेंनी भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्यात.

यापूर्वी काल(दि.२८) धनंजय मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटोही ट्विटरद्वारे शेअर केला. सुप्रिया सुळेंच्या फोटोसोबत ट्विट करताना मुंडेंनी “मानलेलं जरी असलं…तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं…बहिण भावाचे नातं असंच अनमोल असतं! उद्या भाऊबीज व आजच गोविंदबागेत सुप्रियाताई सुळे यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. भाऊबीजेच्या आधीच मला आशीर्वादरुपी भाऊबीज मिळाली त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणं सुद्धा कठीण आहे. ” असं म्हटलं होतं.

दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा-बहिणींची लढत झाली. यात मुंडे यांनी बाजी मारताना तब्बल 30 हजारांहून अधिक मताधिक्य घेत भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव केला.

 

दोन दिवसांत केली 37.89 कोटींची कमाई -9 व्या क्रमांकावर ‘हाउसफुल 4’

0

अक्षय कुमार स्टारर ‘हाउसफुल 4’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे 19.08 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तसेच दुसऱ्या दिवसाची कमाई 18.81 कोटी रुपये आहे. बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 37.89 कोटी रुपये झाले आहे.

ओपनिंगच्या बाबतीत अक्षयच्या मागील 4 चित्रपटांपेक्षा आहे मागे…

जर अक्षय कुमारच्या करिअरबद्दल बोलायचे तर पहिल्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत ‘हाउसफुल 4’ त्याच्या पहिल्या चार हिंदी चित्रपटांपेक्षा मागे आहे. त्याच्या बॉलिवूड करिअरचा सर्वात मोठा ओपनर ‘मिशन मंगल’ आहे, ज्याने पहिल्या दिवशी 29.16 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. ‘हाउसफुल 4’ या लिस्टमध्ये 6 व्या क्रमांकावर येतो.

अक्षयचे टॉप 5 सर्वात मोठे ओपनर चित्रपट…

चित्रपट पहिल्या दिवसाचे कलेक्शन 1 मिशन मंगल – 29.16 कोटी रुपये 2 गोल्ड – 25.25 कोटी रुपये 3 केसरी – 21.06 कोटी रुपये 4 सिंह इज ब्लिंग – 20.67 कोटी रुपये 5 2.0 (हिंदी व्हर्जन) – 20.25 कोटी रुपये

नोट : अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर ‘2.0’ चे सर्व व्हर्जन (हिंदी, तमिळ, तेलगु) ने पहिल्या दिवशी एकूण 81 कोटी रुपये कमवले होते.

यावर्षीचा सर्वात 9 वा सर्वात मोठा ओपनर…

जर यावर्षी आतापर्यंत रिलीज झालेल्या बाकीच्या हिंदी चित्रपटांच्या ओपनिंग कलेक्शनची तुलना केली तर ‘हाउसफुल 4’ 9 व्या क्रमांकावर येतो. या लिस्टमध्ये ऋतिक रोशन आणि टाइगर श्रॉफ स्टारर ‘वॉर’ 53.35 कोटी रुपयांच्या कमाईसोबत टॉपवर आहे, तर 10 व्या क्रमांकावर अजय देवगण, अनिल कपूर, अरशद वारसी आणि माधुरी दीक्षित स्टारर ‘टोटल धमाल’ आहे, ज्याने पहिल्या दिवशी 16.50 कोटी रुपये कमवले होते.

ही आहे टॉप 10 ची लिस्ट…

चित्रपट पहिल्या दिवसाचे कलेक्शन 1 वॉर – 53.35 कोटी रुपये 2 भारत – 42.30 कोटी रुपये 3 मिशन मंगल – 29.16 कोटी रुपये 4 साहो (हिंदी व्हर्जन) – 24.40 कोटी रुपये 5 कलंक – 21.60 कोटी रुपये 6 कबीर सिंह – 20.21 कोटी रुपये 7 केसरी – 21.06 कोटी रुपये 8 गली बॉय – 19.40 कोटी रुपये 9 हाउसफुल 4 -19.08 कोटी रुपये 10 टोटल धमाल – 16.50 कोटी रुपये

‘हाउसफुल’ फ्रॅन्चायसीचा सर्वात मोठा ओपनर…

‘हाउसफुल 4’ या फ्रॅन्चायसीचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनला आहे. सीरीजचा पहिला चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता. जर पहिल्या चित्रपटापासून चौथ्यापर्यंतच्या कलेक्शनवर नजर टाकली तर यामध्ये वृद्धी झाल्याचे कळते.

चार चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन…

चित्रपट पहिल्या दिवसाचे कलेक्शन हाउसफुल (2010) – 10 कोटी रुपये हाउसफुल 2 (2012) – 14 कोटी रुपये हाउसफुल 3 (2016) – 15.21 कोटी रुपये हाउसफुल 4 (2019) – 19.08 कोटी रुपये

चित्रपटाचे पहिले दोन पार्ट्स साजिद खान, तिसरा पार्ट साजिद सामजी-फरहाद सामजी आणि चौथा पार्ट फरहाद सामजीने डायरेक्ट केला आहे.

धनत्रयोदशीला देशात ३० टन सोने विक्री

0

नवी दिल्ली – सोमवारी इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारा (आयबीजेए) आयोजित अर्धा तासाच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये देशभरात १०० किलो सोने आणि ६०० किलो चांदीची विक्री झाली. मागील सत्राच्या तुलनेत सोन्यांत घसरण तर चांदीत तेजीने व्यवहार झाले. विशेष म्हणजे यंदा धनत्रयोदशीला देशभरात ३० टन सोन्याची विक्री झाली.

आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, मागील वर्षाच्या तुलनेत सोने आणि चांदीचे चढ्या किमतीत व्यवहार झाले. मात्र धनत्रयोदशीला जो सोन्याचा भाव होता त्यापेक्षा कमी किमतीवर सौदे झाले, तर चांदीत मात्र चढ्या दराने सौदे झाले. असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुहुर्त ट्रेडिंग दरम्यान २४ कॅरेट सोने १० ग्रॅमला ३८,६६६ रुपये या दराने विक्री झाले तर धनत्रयोदशीला (२५ नोव्हेंबर) २४ कॅरेट सोन्याची किमत ३८७७५ रुपये अशी होती. चांदीचे सौदे ४६,७५१ रुपये प्रतिकिलो किमतीने झाले.

इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रांना ईडीने बजावली नोटीस

0

मुंबई – इक्बाल मिर्ची मालमत्ता तपास आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांच्यापर्यंत पोहोचला आहे. इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. इक्बाल मिर्ची या कुख्यात गुंडासोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला. यासाठी ईडीने कुंद्रा यांना 4 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र राज कुंद्रांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मिर्चीसोबतच्या जमिनीच्या व्यवहारावरुन ईडीने समन्स बजावला होता.

राज कुंद्रांनी इक्बाल मिर्चीचा साथीदार रंजीत सिंघ बिंद्रासोबत हा व्यावसायिक करार केल्याची माहिती ईडीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. रंजित बिंद्रा इक्बाल मिर्चीसाठी काम करत असल्याचा आरोप आहे. त्याचमुळे राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र राज कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान 2011 मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागदपत्रे माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिले आहे.