Home Blog Page 267

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपातसमाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही- मुख्य निवडणूक अधिकारी

मुंबई, दि. १२ : भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार, मतदारयादी मतदानकेंद्रनिहाय तयार करण्यात येते. राज्यभरातील २८८ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) ही यादी जवळपास एक लाख मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांच्या मदतीने क्षेत्रीय पडताळणी करून तयार केली. या प्रक्रियेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी, सतत माहितीची देवाणघेवाण केली जाते. आक्षेप घेण्यासाठी आणि अपील करण्यासाठी भरपूर संधीही दिली जाते. मतदारयादीत नावांची भर घालणे किंवा वगळणे याबाबत काही अतिशयोक्त दावे करण्यात आले असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध लेखाच्या अनुषंगाने, काही बाबी स्पष्ट करणे आवश्यक असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये, विधानसभा निवडणुकांपूर्वी, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण करण्यात आले आणि एक लाखाच्या आसपास असलेल्या प्रत्येक मतदान केंद्रासाठी प्रारूप व अंतिम मतदार यादींच्या (सॉफ्ट आणि हार्ड कॉपी) प्रती सर्व मान्यताप्राप्त पक्षांना प्रदान करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रातील मतदारसंख्येच्या वाढीबाबत लेखातील माहिती दिशाभूल करणारी आहे. वास्तविक माहिती पुढीलप्रमाणे आहे :
• २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान १.३९ कोटी नावांची भर पडली, तर १.०७ कोटी नावांची वजाबाकी झाली. त्यामुळे एकूण निव्वळ वाढ ३२.२५ लाख मतदारांची झाली.
• २०२४ लोकसभा ते २०२४ विधानसभा निवडणुका या काळात ४८.८२ लाख नवीन नावे जोडली गेली, आणि ८ लाख वगळली गेली. त्यामुळे निव्वळ वाढ ४०.८१ लाख इतकी होती. त्यात १८ ते २९ वयोगटातील २६ लाखांहून अधिक नवमतदार होते.
• एकूण भर (Gross Addition) ही २०१९ ते लोकसभा २०२४ मध्ये १.३९ कोटी, आणि लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ मध्ये ४८.८२ लाख इतकी होती.

मतदारांची संख्या प्रक्षेपित प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक का आहे यासंदर्भातही स्पष्टीकरण आवश्यक असून कोणतेही आकडेवारीचे साधन हे केवळ सांख्यिकीय अंदाजासाठी असते. मतदार नोंदणी ही प्रत्यक्ष फॉर्म्स, क्षेत्रीय पडताळणी, आणि कायद्याने ठरवलेल्या प्रक्रियेनुसार निर्णय घेऊन केली जाते. ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक असते आणि सर्व मान्यताप्राप्त पक्षांशी यामध्ये सातत्याने समन्वय साधला जातो.

मतदारयाद्यांचे पुनरिक्षण करताना प्रत्येक राजकीय पक्षाने बूथ लेव्हल एजंट (BLA) नेमलेले असतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्रात २८,४२१ बीएलए नियुक्त केले होते. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत या एजंटांकडून किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांकडून कोणतीही गंभीर तक्रार प्राप्त झालेली नाही. ही बाब निवडणुकीनंतरच उपस्थित केली गेली आहे.

मतदार याद्यांचे वाटप :
मतदार यादी दरवर्षी सहभागात्मक पद्धतीने पुनरिक्षणाद्वारे अद्ययावत केली जाते. या प्रक्रियेत प्रारूप आणि अंतिम स्वरूपातील यादी सर्व मान्यताप्राप्त पक्षांना विनामूल्य दिली जाते. हीच प्रक्रिया २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्येही राबवण्यात आली होती आणि यादी पक्षांना देण्यात आली होती.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली संपूर्ण मतदारयादी आयोगाच्या वेबसाइटवर सार्वजनिकरित्या डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
मतदार नोंदणी नियम १९६० च्या नियम ३३ नुसार कोणतीही व्यक्ती, संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज करून निर्धारित शुल्क भरून मतदारयादीची प्रत मिळवू शकतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने (INC) नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतरही अशाच स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केले होते. निवडणूक आयोगाने दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी यावर सविस्तर उत्तर दिले आहे. त्या उत्तराची प्रत आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
(खाली लिंक दिली आहे) https://www.eci.gov.in/eci-backend/public/api/download?url=LMAhAK6sOPBp%2FNFF0iRfXbEB1EVSLT41NNLRjYNJJP1KivrUxbfqkDatmHy12e%2FzPKLkuiExxOKadAHYzWQYgrziMWVM9RdSa49qKKjiLLCWX%2FdIawdRjv6WA2GoknYcyLIzu4lIXP3VRXySBy%2F%2Bwg%3D%3D


265 मृतदेह रुग्णालयात आणले:DNA सॅम्पलिंग सुरू; PM मोदींचा घटनास्थळी दौरा

अहमदाबाद:
एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये उड्डाण केल्यानंतर दोन मिनिटांनी कोसळले. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि १२ क्रू मेंबर्ससह २४१ जणांचा मृत्यू झाला.
पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले आहेत. ते प्रथम घटनास्थळी जातील. त्यानंतर ते रुग्णालयात जाऊन पीडितांना भेटतील. मृतांच्या नातेवाईकांनाही भेटतील.

उपायुक्त कानन देसाई यांनी रात्री उशिरा सांगितले की, २६५ मृतदेह सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये २४१ प्रवासी, ४ एमबीबीएस विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

खरं तर, आग लागताच विमान २.५ किमी अंतरावर असलेल्या बीजे मेडिकल आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीवर आदळले. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर या इमारतीत राहतात. अपघाताच्या वेळी इमारतीत ५० ते ६० डॉक्टर उपस्थित होते, त्यापैकी १५ हून अधिक जखमी झाले आहेत.

फ्लाईट क्रमांक AI-171 अहमदाबादहून लंडनला जात होती. विमानात एकूण २३० प्रवासी होते, ज्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. यामध्ये १०३ पुरुष, ११४ महिला, ११ मुले आणि २ नवजात बालकांचा समावेश होता. उर्वरित १२ क्रू मेंबर्स होते.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी १००० हून अधिक डीएनए चाचण्या केल्या जातील. गुजरातमध्ये इतक्या मोठ्या संख्येने चाचण्या करण्याची क्षमता आहे.

दोन्ही इंजिन बंद पडल्याने अपघात..मृत्यूच्या थरारक प्रवासाचा भारतासोबत अमेरिकाही करणार तपास..

६२५ फुटांवरून ४७५ फूट प्रतिमिनिट वेगाने…
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडल्यामुळे ६२५ फूट उंचीवर उडणारे विमान ४७५ फूट प्रतिमिनिट वेगाने खाली कोसळले. अहमदाबाद ते लंडनदरम्यान प्रवासासाठी सुमारे नऊ तासांचा अवधी लाग
मात्र, आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता विमान १२ तास उडू शकेल एवढे इंधन होते. सुमारे एक लाख २६ हजार ९०७ लिटर इंधन होते. इंधन जास्त असल्याने मृतांची संख्या वाढली आहे.
दरम्यान अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी यांनी भारतातील एअर इंडिया विमान अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करताना त्यांनी म्हटले आहे की भारतातील अपघातामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे…आम्ही अपघाताच्या चौकशीत भारताला मदत करण्यासाठी राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळासोबत काम करत आहोत. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे तपासकर्ते अपघातस्थळी तैनात आहेत.पुढे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक डेटा मिळविण्यासाठी आम्ही अतिरिक्त संसाधने पाठवण्यास तयार आहोत. FAA ने तपासाचा भाग म्हणून आवश्यक माहितीची पडताळणी करण्यासाठी बोईंग आणि GE ला आधीच नियुक्त केले आहे. NTSB तपासाचे नेतृत्व करत असल्याने, आम्ही कोणत्याही सुरक्षा शिफारसी लागू करण्यास मागेपुढे पाहणार नाही. आम्ही तथ्यांचे पालन करू आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊ. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अहमदाबाद विमानतळावरून ‘बोइंग ड्रीमलायनर ७८७’ विमानाने दुपारी एक वाजून ३७ मिनिटांनी उड्डाण केले. उड्डाण झाल्यावर काही सेकंदातच वैमानिकाला बिघाड झाल्याचे लक्षात आले. एक वाजून ३८ मिनिटांनी विमान कोसळले.

विमान विमानतळाच्या तीन ते चार किलोमीटर परिसरात असतानाच ते कोसळले. यावेळी विमानाने ६२५ फुटांची उंची गाठली होती. मात्र, विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडल्याने एक मिनिटाच्या आतच विमान कोसळले.

१ पक्ष्यांची धडक २ इंजिनपर्यंत इंधन न पोहोचल्याने इंजिन बंद ?इंजिन बंद का पडले? हवाई वाहतूकतज्ज्ञांनी व्यक्त केलेली मते३ जास्तीचे इंधन ४ इंजिनला ऊर्जा न मिळाल्याने ?दोन हजार अंश सेल्सिअस तापमान? अपघातग्रस्त विमानात सुमारे १०० टन इंधन होते,विमान ४७५ फूट प्रतिमिनिट वेगाने कोसळले,इंधन व कोसळण्याचा वेग लक्षात घेता मोठा स्फोट झाला

स्फोटानंतर सुमारे दोन ते अडीच हजार डिग्री सेल्सिअस तापमानाची निर्मिती,या तापमानावर स्टील, अ‍ॅल्युमिनियम, काच वितळते,परिणामी मोठ्या प्रमाणात जीवितहानी

‘ब्लॅक बॉक्स’मधून कारणांचा शोध

विमान अपघाताच्या कारणांचा शोध घेताना ‘ब्लॅक बॉक्स’ची भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरते. वैमानिकाने शेवटच्या सेकंदापर्यंत हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी जो संपर्क साधला असतो, त्याचे सर्व ‘रेकॉर्डिंग’ या ‘ब्लॅक बॉक्स’मधील व्हॉइस रेकॉर्डरमध्ये झालेले असते. यात ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’देखील असतो. त्यामुळे विमान अपघातग्रस्त होण्यापूर्वी कोणत्या उपकरणांचा वापर झाला, हेदेखील यातून समजते. यामुळे तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्यास अपघाताचे नेमके कारण समजण्यास सोपे होते.

असा असतो ‘ब्लॅक बॉक्स’-टायटॅनियम धातूपासून निर्मिती.,रंगाने केशरीइंधन, वेग, उंची यांसारख्या ८० तांत्रिक बाबींची माहिती गोळा होते.
आग, पाणी यातही सुरक्षित राहू शकते.
३४०० अंश सेल्सिअस तापमान सहन करण्याची क्षमता.
समुद्रात २० हजार फूट खोलीतही सुरक्षित राहू शकते.

चमत्कार! तो प्रवासी भयावह विमान अपघातातून वाचला…

अ हमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे ८० ते ९० टन एवढे प्रचंड इंधन त्या विमानात भरलेले होते. यामुळे या विमानाचा स्फोटाचा व्हिडीओ पाहता कोणीही प्रवासी बचावला नसेल असे सांगितले जात होते.परंतू, या विमानातून एक प्रवासी सुखरुप बचावला आहे. हा एक चमत्कारच मानला जात आहे. हा प्रवासी एवढ्या मोठ्या स्फोटातही कसा वाचला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार एअर इंडियाचे विमान जेव्हा बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला आदळले तेव्हा तुटलेल्या भागातून हा प्रवासी ४२५ फुटांवरून खाली पडल्याचे सांगितले जात आहे. अहमदाबाद विमानतळापासून काही अंतरावरील मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले. कोसळण्यापूर्वी हे विमान हॉस्टेलच्या इमारतीला आदळले होते.

हा प्रवासी A11 या सीट नंबरवरून प्रवास करत होता. त्याला सध्या उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, या भीषण अपघातात वाचलेल्या प्रवाशाचे नाव रमेश विश्वासकुमार असं आहे, ते ४० वर्षाचे मूळ भारतीय असलेले ब्रिटनचे नागरिक आहेत. या दुर्घटनेतून विश्वास रमेश वाचल्याने हा चमत्कारच मानला जात आहे. रमेश विश्वासकुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातातून बचावलेल्या रमेश यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही लोकांशी संवाद साधला.

जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा सगळीकडे मृतदेह होते. मला भीती वाटली. यानंतर मी उभा राहिलो आणि पळायला सुरुवात केली. उड्डाणानंतर सुमारे ३० सेकंदांनी मोठा आवाज झाला आणि नंतर विमान जमिनीवर आदळले. सर्व काही इतके वेगाने घडले की समजायला वेळच मिळाला नाही, असे रमेश यांनी म्हटले आहे. रमेशच्या छातीवर, डोळ्यांवर आणि पायांवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित

गडचिरोली/मुंबई दि १२ जून २५
नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधानपदावर आहेत पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करावी यासाठी काँग्रेस पक्षाने आजपासून राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले होते. आज गडचिरोलीत प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रतिभाताई धानोरकर, AICC चे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी माजी मंत्री अनिस अहमद, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार सुभाष धोटे, गडचिरोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात. स्टील सीटी करण्याच्या नावाखाली गडचिरोलीतील शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत. फडणवीस यांना गडचिरोलाचे फडणवीसस्थान करायचे आहे. सुरजागडच्या खदानीला विरोध करू नये म्हणून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खदानीला विरोध करणार नाही, मोर्चात सहभागी होणार नाही असे लिहून घेतले जाते. विरोधात बातमी छापली तर कारवाई केली जाते. मुंबई ही मराठी माणसाची, कष्टकरी, गिरणी कामगारांची होती पण आज मुंबईत मराठी माणूस दुर्बिण लावून शोधावा लागतो तीच परिस्थिती गडचिरोलीची होणार आहे. प्रदुषण वाढेल, आपल्या संस्कृतीला धोका पोहचेल आणि या खदानीमुळे स्थानिक लोक हद्दपार होऊन परराज्यातील लोकांचे वास्तव्य वाढेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, तिघे भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ असे भाजपा युती सरकारचे सुरु आहे. शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. कर्जमाफी देत नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नव्हते तर घोषणा का केल्या. शेतकऱ्यांशी बेईमानी कऱणा-या महायुती सरकारला धडा शिकवावाच लागेल. लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला, २१०० रुपये देण्याची घोषणा केली पण आता १५०० रुपयेही मिळणे अवघड झाले आहे, ५०० रुपये हातात टेकवत आहेत. सरकार कितीही सांगत असले तरी लाडकी बहिण योजना बंद करण्याचा त्यांचा डाव आहे. भाजपा युती सरकारने शेतकरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

विमान अपघातामुळे १५ जून पर्यंत मशाल मोर्चे स्थगित..
आज दुपारी अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या विमानात २४२ प्रवासी व क्रू मेंबर होते. ही घटना अत्यंत दु:खद व धक्कादायक आहे. संपूर्ण देश शोकमग्न आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आजपासून पुढचे दोन दिवस राज्यभर आयोजित केलेले मशाल मोर्चे स्थगित करून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत.

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार अन रक्तदान शिबीर संपन्न.

पुणे (दि.१२) -सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरत मित्र मंडळ महाशिवरात्र समिती व मित्र परिवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. त्यांना तुळशी हार, तुकाराम महाराज पगडी व वीणा प्रदान करण्यात आली. मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब दाभेकर, सदानंद मोरे, निरंजन दाभेकर, अनिल येनपुरे, राजेश पांडे(भाजप),संदीप खर्डेकर (भाजप),मंदार जोशी (आरपीआय),रुपालीताई पाटील(राष्ट्रवादी अजितदादा),अरविंद शिंदे(कॉंग्रेस),अभय छाजेड(कॉंग्रेस),नगरसेवक बाळासाहेब बोडके,नगरसेवक योगेश समेळ, आ.हेमंत रासने, प्रमोद घाडगे, राजेंद्र पंडित, महेश वाघ, अजित दरेकर,दत्ताभाऊ सागरे, आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध पक्षाचे पदाधिकारी,सदस्य व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना सदानंद मोरे यांनी बाळासाहेब दाभेकर यांचे सर्व पक्षातील लोकांशी प्रेमाचे संबंध आहेत ,हा जणूकाही बाळासाहेब दाभेकर यांचा पुणेरी पॅटर्न आहे असे सांगितले व सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात याचे आनुकरण सर्वत्र झाले पाहिजे व विशेषतः मुंबईने सुद्धा हा पॅटर्न राबवावा असे प्रतिपादन केले. या कार्यक्रम स्थळी रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे ८२ रक्दात्यानी रक्तदान केले. शिबिराचे तांत्रिक संचालन आचार्य आनंद ऋषीजी रक्त पेढीने डॉ.अंकिता जाधव व सुनील खताळ यांच्या निर्देशाने केले.

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १४ जून २०२५ रोजी शुभारंभ होणार आहे. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रांमधील ३०३ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा भौतिक व शैक्षणिक गुणवत्तेबाबत कायापालट होणार आहे. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढेल आणि सीएसआरच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. एसटीईएम लॅब, संगणक लॅब व कोडींगच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार केले जाईल. जर्मन व फ्रेंच भाषेचे शिक्षण देण्यात येणार असून परकीय भाषा शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जागतिक ज्ञान वाढेल. विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळेल, ज्यामुळे सर्वासाठी समान संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी कळविले आहे.
०००००

प्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. 12: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 15 जून ते 30 जून 2025 या कालावधीमध्ये प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत जनभागीदारी अभियानात राबविण्यात येणार असून यामध्ये आदिवासी लाभार्थी, शालेय विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात 11 जून रोजी आयोजित ‘धरती आबा जनभागीदारी अभियान’ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव प्रदीप देसाई आदी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, जनजातीय गौरव वर्षानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात केली आहे. केंद्र शासनाचा हा महत्त्वकांक्षी उपक्रम असून या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी बहुल भागांमध्ये पायाभूत सुविधा, वैयक्तिक स्वरूपाच्या लाभदायक योजना, तसेच रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश हा आदिवासी समुदायाचे सशक्तीकरण करणे हा आहे.

या उपक्रमात केंद्र शासनामार्फत जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील 46, आंबेगाव 23, खेड 17, मावळ 8, पुरंदर 4 व हवेली 1 असे एकूण 99 गावांचा समावेश करण्यात आलेला असून या गावातील एकूण 85 हजार 304 पेक्षा अधिक आदिवासी लाभार्थ्यांना अभियानांतर्गत लाभ देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या भागात पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीसोबत नागरिकांना विविध योजनांचा लाभ द्यावा, असेही श्री. डूडी म्हणाले.

श्री. गजानन पाटील म्हणाले, जिल्ह्यात 19 जून रोजी सिकलसेल आजार-जागृतीदिनानिमित्त आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी व 21 जून योगा दिनानिमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम आयोजित करावेत. या अभियानाअंतर्गत एकूण 17 विभागांमार्फत 25 प्रकारचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये आदिवासी समुदायातील सर्व जमातीतील लाभार्थ्यांना पक्की घरे , गावांतर्गत व गावाला जोडणारे रस्ते, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी विद्युत पुरवठा, मोबाईल मेडिकल युनिटद्वारे आरोग्य तपासणी, प्रत्येक घरात उज्वला गॅस योजनेचा लाभ, वाडी,वस्तींमध्ये अंगणवाडी केंद्र स्थापन करणे, वस्तीगृह बांधकाम करणे ,बालकांची पोषण स्थिती सुधारणे, मोबाईल कनेक्टिव्हिटी अशा विविध प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तालुकानिहाय कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे, कृषी विभाग व मत्स्य विभागाच्या योजनांचा थेट लाभ आदिवासी लाभार्थ्यांना देणे व आदिवासी बहुल भागांमध्ये पर्यटनाचा विकास करणे आदी विकास कामे केली जाणार आहेत, असेही श्री. पाटील म्हणाले.

श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील 99 गावांमध्ये लाभार्थी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून या शिबिरांच्या माध्यमातून सर्वच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका, एफआरए पट्टे, किसान क्रेडिट कार्ड, आयुष्यमान कार्ड, पीएम किसान सन्मान निधी आदी लाभ देण्यात येणार आहेत. शासकीय आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा, हस्तकला स्पर्धा तसेच कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. गाव पातळीवर विशेष ग्रामसभा आणि आदिवासी पारंपारिक नृत्य आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली.

पिंपरी चिंचवड परिवहन कार्यक्षेत्रातील 123 ऑटोरिक्षा स्टॅंण्डना मान्यता

पुणे दि . 12 : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक, वाहतुक विभागातील अधिकारी, महानगरपालिका व रिक्षा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा स्टॅण्ड चे नव्याने सर्वेक्षण करुन नुकत्याच झालेच्या बैठकीमध्ये १२३ ऑटोरिक्षा स्टॅण्डच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

मान्यता देण्यात आलेल्या १२३ थांब्यांव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आळंदी नगरपरिषद व देहुरोड कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या इतर अनधिकृत थांबे निष्कासित करण्याची तसेच अतिक्रमण हटवण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तरी पिंपरी चिंचवड कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अन्य ठिकाणी रिक्षा थांबा आवश्यक असल्यास नागरिक, रिक्षा संघटना तसेच संबंधित विभाग यांनी कार्यालयाकडे पुढील १५ दिवसात अर्ज केल्यास विहित पध्दतीने संयुक्त सर्वेक्षण करुन नियमानुसार असे थांबे मंजुर करण्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या स्तरावर यथायोग्य कार्यवाही करण्यात येईल असे, संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

पुणे : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, बोपोडी येथे सन १९९८-१९९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बुधवार, दि. ११ जून २०२५ रोजी उत्साहात व आठवणींनी भरलेल्या वातावरणात संपन्न झाला. तब्बल २६ वर्षांनंतर शालेय मित्र-मैत्रिणी, गुरुजन आणि शिक्षक पुन्हा एकत्र आल्याने वातावरण भारावून गेले होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली, त्यानंतर जुन्या आठवणींचा अक्षरशः पाऊस पडला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी, शिक्षणप्रवास आणि आजच्या यशस्वी वाटचालीचा अनुभव शेअर केला. गुरुजनांचा सन्मान करताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.

यावेळी शिक्षक कमलाकर पाटील, रंजना टंकसाळे, वाल्मीक हजारे , सिताराम वाघ , देवेदास सरोदे , जयराम पारधी ,  गीते सर , कर्णे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी, शाळेचे शिपाई ते  आता  पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे आयुक्त सोमनाथ बनकर साहेब, प्रभारी प्राचार्य जीवन कांबळे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी शिक्षकांनी देखील मार्गदर्शनपर विचार व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जुन्या फोटोंचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम व अल्पोपहाराचा आनंद सर्वांनी लुटला.

कार्यक्रमाचे आयोजन १९९८-९९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी केले होते, आणि उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत, पुन्हा एकदा अशाच भेटीचे वचन देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

भाजपकडून ठाकरे ब्रॅंड संपवण्याचा प्रयत्न या भूमिकेवर तरी राज ठाकरे कायम राहणार काय ?

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहेत. परंतु आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे आता राज ठाकरे नेमकी भूमिका काय घेणार आहेत, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

चित्रपट निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर झालेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी माझ्यासाठी महाराष्ट्राचे हित मोठे आहे तर इतर सर्व दुय्यम आहे. मी आमचे किरकोळ वाद बाजूला ठेऊ शकतो. मी उद्धव यांच्या सोबत काम करण्यास तयार आहे, परंतु प्रश्न फक्त एवढाच आहे की ते माझ्यासोबत काम करण्यास तयार आहेत का, असे विधान केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणार असे तयार झाले होते. तसेच राज ठाकरे यांनी महायुतीसह भाजपवर देखील टीका केली होती.

राज ठाकरे यांनी 15 दिवसांपूर्वीच भाजपवर जाहीरपणे टीका केली होती. एका मुलाखतीत बोलताना राज्यामध्ये भाजपकडून ठाकरे आणि पवार ब्रॅंड संपवण्याचा प्रयत्न सुरू असून यात कोणताही वाद नाही, असे स्पष्ट म्हटले होते. मात्र तो ब्रॅंड संपवणे शक्य नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. पुण्यात ‘इंडिया टूडे’च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले होते. तसेच नेते बदलले तरी ब्रॅंड राहील, असेही त्यांनी म्हटले होते.

राज ठाकरे म्हणाले होते, राज्यातील विचार करता राज म्हणाले की माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी सर्वात प्रथम राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकला होता. त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे होते. माझे वडील श्रीकांत ठाकरे सुद्धा होते.त्यांनी संगीतावर प्रभाव टाकला होता. त्या दोघांनंतर उद्धव आणि मी आहे. एकंदरीतच गेल्या काही दिवसातल्या त्यांच्या मुलाखतीतून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा वाढल्या होत्या. मात्र, आज त्यांनी फडणवीस यांची भेट घेत तासभर चर्चा देखील केली, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

भूमिकेवर ठाम राहणार की महायुतीसोबत जुळवून घेणार? ..राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते, मी एक फोटो पाहिला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, सुनील तटकरे, अशोक चव्हाण, नारायण राणे, छगन भुजबळ आणि इतर नेत्यांच्या मध्यभागी बसले होते. मी तो फोटो पाहिला तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि विचार केला की भाजपचे समर्थक त्याकडे कसे पाहत आहेत? त्यांना वाटले पाहिजे की आम्ही त्यांना सत्तेवरून हाकलून लावण्यासाठी खूप मेहनत केली आणि आता ते त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसले आहेत. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांचे भेटीनंतर राज ठाकरे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार की महायुतीसोबत जुळवून घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘टीव्हीएस अपाचे’ची दोन दशकांची गौरवगाथा : ‘नेक्स्ट-जेन टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’च्या नव्या युगाचा प्रारंभ

भविष्यासाठी घडवलेली ही मोटरसायकल ‘ओबीडी२बी’ मानकांनुसार सुसज्ज; प्रगत तंत्रज्ञान, श्रेष्ठ
कार्यक्षमता आणि आकर्षक नव्या ग्राफिक्ससह सादर

बंगळुरू- टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या दुचाकी आणि तिचाकी वाहन
क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने आज २०२५ची ‘नवीन टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’
ही मोटरसायकल सादर केली. ही मोटरसायकल २० वर्षांच्या रेसिंग परंपरेचा, अभियांत्रिकी उत्कृष्टतेचा
आणि जगभरातील ६० लाखांहून अधिक रायडर्सच्या विश्वासाचा गौरवशाली इतिहास मांडत आहे. रेसिंग
ट्रॅकवर जन्म घेऊन रस्त्यासाठी खास तयार झालेली ‘अपाचे’ मालिका ही उच्च कार्यक्षमतेचे प्रतीक ठरली
आहे. शक्ती, नियंत्रण आणि सुसूत्रता यांची मागणी करणाऱ्या रायडर्ससाठी अचूकतेने तयार करण्यात
आलेली अपाचे मालिका आजही परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये श्रेष्ठ स्थानावर आहे.
‘ओबीडी२बी’ मानकांशी सुसंगत असलेली ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’ ही मोटरसायकल
रायडिंगचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी महत्त्वाच्या सुधारणा घेऊन सादर झाली आहे. यामध्ये
नवीन ३७ मिमी अपसाईड डाऊन (यीएसडी) फ्रंट सस्पेन्शन देण्यात आले आहे. त्यामुळे तीव्र वळणांवर
गाडी स्थिर राहते आणि ती व्यवस्थित नियंत्रित करता येते. ‘हायड्रोफॉर्म्ड हँडलबार’चा समावेश असल्याने
ही मोटरसायकल सर्व प्रकारच्या रायडिंग परिस्थितीत अधिक चांगली हाताळता येते. ‘टीव्हीएस
अपाचे’मधील दैदिप्यमान रेसिंग परंपरेचे प्रतिबिंब असलेली ही मोटरसायकल प्रगत तंत्रज्ञान,
रेसिंग-प्रेरित रचनेचे घटक आणि अचूक अभियांत्रिकी यांचे सुरेख एकत्रीकरण सादर करते.
‘२०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’मधील मुख्य वैशिष्ट्ये :
 ओबीडी२बी मानकांशी सुसंगत
 ३७ मिमी अपसाईड डाऊन फ्रंट सस्पेन्शन
 अधिक चांगल्या हाताळणीसाठी हायड्रोफॉर्म्ड हँडलबार
 आकर्षक रेड अलॉय व्हीलसह नव्याने सजवलेली रचना

प्रीमियम डिझाइन उत्कृष्टता
सौंदर्यदृष्ट्या नवीन रेड अलॉय व्हील आणि अनोखे ग्राफिक्स यांच्यामुळे ही मोटरसायकल आकर्षक दिसते.
ग्लॉसी ब्लॅक, मॅट ब्लॅक आणि ग्रॅनाइट ग्रे या तीन रंगांमध्ये ती उपलब्ध असेल.
रेसिंग-प्रेरित नवोपक्रम
उच्च कार्यक्षमतेच्या रायडिंगचा वारसा पुढे नेत, ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’ मोटरसायकल ही
९,००० आरपीएमवर २०.८ पीएस एवढी कमाल शक्ती आणि ७,२५० आरपीएमवर १७.२५ एनएम टॉर्क

निर्माण करते. ही मोटरसायकल अधिक सुरक्षित ब्रेकिंगसाठी ड्युअल-चॅनल एबीएसने (एबीएस)
सुसज्ज आहे. यामध्ये अर्बन, स्पोर्ट आणि रेन हे तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत.
याशिवाय, स्लिपर क्लच, अॅडस्टेबल क्लच व ब्रेक लिव्हर्स, ब्लूटूथ आणि व्हॉइस-असिस्टसह
टीव्हीएस स्मार्टएक्सकनेक्ट™ तंत्रज्ञान, तसेच एलईडी हेडलॅम्प आणि ‘डीआरएल्स’सह पूर्णपणे
डिजिटल डिस्प्ले क्लस्टर यांचाही या गाडीत समावेश आहे.
२०१६ मध्ये बाजारात सादर झालेली ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’ ही अपाचे मालिकेतील
एक मोठी झेप होती. या मॉडेलने आधीच्या कोणत्याही मॉडेलपेक्षा अधिक धाडसी, सडपातळ आणि
आक्रमक डिझाइन ही वैशिष्ट्ये सादर केली होती. कालौघात या मॉडेलने आपल्या विभागात अनेक प्रथमच
सादर झालेली वैशिष्ट्ये दिली. त्यांमध्ये राईड मोड्स (स्पोर्ट, अर्बन, रेन), ड्युअल चॅनेल एबीएस व रिअर
लिफ्ट-ऑफ प्रोटेक्शन आणि रेस-ट्यून स्लिपर क्लच यांचा समावेश होता. विविध रस्त्यांवरील
परिस्थितींनुसार कामगिरी अॅडजस्ट करण्यासाठी राइड मोड्स देणारे हे तिच्या स्वतःच्या श्रेणीतील
पहिलेच वाहन ठरले. गाडी वेगात असताना ब्रेक लावला असता तिच्यावर अधिकचे नियंत्रण आणि
सुरक्षितता येण्यासाठी या गाडीमध्ये ‘ड्युअल चॅनेल एबीएस’सह रिअर लिफ्ट-ऑफ प्रोटेक्शन ही प्रणाली
सादर करण्यात आली. डिझाइन आणि लाइटिंगमध्येही सुधारणा करत एलईडी हेडलॅम्प व ‘सिग्नेचर
डीआरएल’चा समावेश झाला. त्यामुळे या गाडीला एक वेगळी आणि आधुनिक ओळख मिळाली.
आजच्या सादरीकरणाच्या प्रसंगी बोलताना टीव्हीएस मोटर कंपनीचे ‘प्रिमियम बिझनेस’ विभागाचे प्रमुख
विमल सुम्बळी म्हणाले, “टीव्हीएस अपाचे हा एक फक्त मोटरसायकल ब्रँड नाही, तर गेल्या दोन दशकांत
६० लाखांहून अधिक रायडर्सना प्रेरणा देणारी ती एक जागतिक चळवळ आहे. आमच्या रेसिंग डीएनएच्या
बळावर, टीव्हीएस अपाचे मोटरसायकलींनी नेहमीच कार्यक्षमतेचा, अचूकतेचा आणि प्रगत तंत्रज्ञानाचा
सुरेख संगम सादर केला आहे आणि तो जगभरातील तरुण आणि मोटरसायकलप्रेमींसाठी आकर्षण ठरला
आहे. २०२५ ची ‘अपग्रेडेड टीव्हीएस अपाचे आरटीआर ४व्ही’ मोटरसायकल हीच परंपरा पुढे नेत आहे.
नव्या युगातील रायडर्सना ट्रॅकवर तयार झालेल्या रोमांचक अनुभवाची गॅरंटी देणारी, डिझाइन आणि
अभियांत्रिकीची सीमारेषा ओलांडणारी ही गाडी आहे.”
‘टीव्हीएस अपाचे’ने जागतिक स्तरावर ६० लाख रायडर्सचा विश्वास संपादन करत एक महत्त्वपूर्ण टप्पा
गाठला आहे. पूर्वी जिथे लाखांचा आकडा गाठायला वर्षे लागायची, तिथे आता शेवटचे १० लाख रायडर
फार कमी वेळातच पार झाले. हे अपाचे ब्रँडच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि “शक्ती, अचूकता आणि
उत्कटतेने” रायडिंग करणाऱ्या रायडर्सच्या वाढत्या समुदायाचे प्रतिक आहे.
प्रत्येक नव्या सुधारणेतून ‘अपाचे आरटीआर २०० ४व्ही’ मोटरसायकलने नेहमीच आपल्या वर्गात
कार्यक्षमतेचे मापदंड निर्माण केले आहेत. रेसिंग ट्रॅकमधून आलेली अभियांत्रिकी आणि रोजच्या वापरातली
सहजता यांचा हा संगम नव्या युगातील रायडरना अपार आनंद देत आहे. ‘२०२५ ची टीव्हीएस अपाचे
आरटीआर २०० ४व्ही’ ही नवीन गाडी भारतभरातील टीव्हीएस मोटर कंपनीच्या अधिकृत वितरकांकडे
उपलब्ध असेल आणि तिची सुरुवातीची किंमत १,५३,९९० (एक्स-शोरूम दिल्ली) असेल.

अपघातग्रस्त विमानात 7 मराठी प्रवासी:4 क्रू मेंबर्स अन् 3 प्रवाशांचा समावेश; क्रू अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. मृत प्रवाशांत 4 केबिन क्रू व 3 प्रवासी अशा एकूण 7 मराठी प्रवाशांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे क्रू सदस्या अपर्णा महाडिक ह्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातलग असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI171 विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावले होते. या विमानाने दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केले. पण त्यानंतर 3-4 मिनिटांतच ते एका नागरी इमारतीवर कोसळले. विमान कोसळल्यानंतर त्यात एक मोठा स्फोट झाला. त्यामुळे या दुर्घटनेत शेकडो जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केबिन क्रू अपर्णा महाडिक तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी

एअर इंडियाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी होते. त्यात 12 क्रू मेंबर्स व 230 प्रवासी होते. 12 एक क्रू मेंबर असणाऱ्या अपर्णा महाडिक (कर्मचारी संख्या: 80008872) या खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. त्या एअर इंडियात सीनियर केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल स्वतःही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत आहेत. ते दोन तासांपूर्वी दिल्लीत लँड झालेत. त्यानंतर ते तत्काळ अहमदाबादला जाणार आहेत, असे महाडिक कुटुंबीयांनी सांगितले.

अपर्णा महाडिक यांच्याशिवाय महादेव पवार, आशा पवार, मयूर पाटील, मैथिली पाटील, दीपक पाठक, रोशणी सोंघरे या 6 मराठी प्रवाशांचाही या दुर्घटनेत बळी गेला आहे. पण त्यांची पुष्टी अद्याप झाली नाही. मैथिली पाटील (कर्मचारी संख्या: 80047429), दीपक पाठक (कर्मचारी संख्या: 81033187) व रोशणी सोंघरे (कर्मचारी संख्या: 80055146) हे तिघेजण अपर्णा महाडिक यांच्यासारखेच एअर इंडियाचे केबिन क्रू होते.

अहमदाबाद विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे. विमानातील सर्व २४२ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरात पोलिस आयुक्तांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एपीने ही माहिती दिली.विमानात २३० प्रवासी होते. यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. उर्वरित १२ जण क्रू मेंबर्स होते.

अपघातस्थळी सापडलेले बहुतेक मृतदेह इतके जळालेले आहेत की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल.या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. भाजपचे राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी एक्स वर ही माहिती दिली. तथापि, काही वेळाने त्यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली.ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात. माहितीनुसार, १५ डॉक्टर जखमी झाले आहेत.

एअर इंडियाचे विमान क्रमांक AI-171 दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले. ते दुपारी १:४० वाजता कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळले. विमान पडताच संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले.
वैमानिकाने शेवटच्या क्षणी Mayday कॉल केला होता
विमानाचा वैमानिक सुमित सुब्बरवाल यांनी शेवटच्या क्षणी मेडेला कॉल केला होता. हा एक आंतरराष्ट्रीय आपत्कालीन कॉल आहे, जो विमान गंभीर संकटात असताना आणि आपत्कालीन मदतीची आवश्यकता असताना पायलट पाठवतो.मेडे हा शब्द फ्रेंच शब्द “m’aidez” पासून आला आहे, ज्याचा अर्थ “मला मदत करा” असा होतो. तो तीन वेळा बोलला जातो – “Mayday Mayday Mayday”

ज्या इमारतीवर विमान कोसळले त्या इमारतीत ५०-६० डॉक्टर होते
ज्या इमारतीवर एअर इंडियाचे विमान कोसळले ती इमारत इंटर्न डॉक्टरांसाठी वसतिगृह होती. मिळालेल्या माहितीनुसार, येथे ५० ते ६० इंटर्न डॉक्टर होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. निवासी डॉक्टर त्याच्या शेजारील ब्लॉकमध्ये राहत होते.

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मृतांना श्रद्धांजली व्यक्त केली आहें . जखमींना मदत दिली जात आहे ती महत्वाची आहे. त्याचसोबत पुणे व इतर गंतव्यस्थानांकडे प्रवास करणाऱ्या अडकलेल्या प्रवाशांसाठी तातडीने पर्यायी विशेष विमानसेवा वा इतर प्रवाससेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, माहिती वाहिन्यांद्वारे असे स्पष्ट झाले आहे की अहमदाबाद येथून होणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांकडे जाण्याचे नियोजन असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

या प्रवाशांमध्ये काहीजण आपत्कालीन वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यवसायिक कारणांसाठी प्रवास करत होते, याचे भान ठेवून वडोदरा, सुरत अथवा जवळच्या इतर विमानतळांवरून विशेष उड्डाणांची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, वाहतूक व्यवस्था सुकर होईल आणि प्रशासनावरचा ताण कमी होईल, असेही त्या आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत.