भविष्यासाठी घडवलेली ही मोटरसायकल ‘ओबीडी२बी’ मानकांनुसार सुसज्ज; प्रगत तंत्रज्ञान, श्रेष्ठ
कार्यक्षमता आणि आकर्षक नव्या ग्राफिक्ससह सादर
बंगळुरू- टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या दुचाकी आणि तिचाकी वाहन
क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने आज २०२५ची ‘नवीन टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’
ही मोटरसायकल सादर केली. ही मोटरसायकल २० वर्षांच्या रेसिंग परंपरेचा, अभियांत्रिकी उत्कृष्टतेचा
आणि जगभरातील ६० लाखांहून अधिक रायडर्सच्या विश्वासाचा गौरवशाली इतिहास मांडत आहे. रेसिंग
ट्रॅकवर जन्म घेऊन रस्त्यासाठी खास तयार झालेली ‘अपाचे’ मालिका ही उच्च कार्यक्षमतेचे प्रतीक ठरली
आहे. शक्ती, नियंत्रण आणि सुसूत्रता यांची मागणी करणाऱ्या रायडर्ससाठी अचूकतेने तयार करण्यात
आलेली अपाचे मालिका आजही परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये श्रेष्ठ स्थानावर आहे.
‘ओबीडी२बी’ मानकांशी सुसंगत असलेली ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’ ही मोटरसायकल
रायडिंगचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी महत्त्वाच्या सुधारणा घेऊन सादर झाली आहे. यामध्ये
नवीन ३७ मिमी अपसाईड डाऊन (यीएसडी) फ्रंट सस्पेन्शन देण्यात आले आहे. त्यामुळे तीव्र वळणांवर
गाडी स्थिर राहते आणि ती व्यवस्थित नियंत्रित करता येते. ‘हायड्रोफॉर्म्ड हँडलबार’चा समावेश असल्याने
ही मोटरसायकल सर्व प्रकारच्या रायडिंग परिस्थितीत अधिक चांगली हाताळता येते. ‘टीव्हीएस
अपाचे’मधील दैदिप्यमान रेसिंग परंपरेचे प्रतिबिंब असलेली ही मोटरसायकल प्रगत तंत्रज्ञान,
रेसिंग-प्रेरित रचनेचे घटक आणि अचूक अभियांत्रिकी यांचे सुरेख एकत्रीकरण सादर करते.
‘२०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’मधील मुख्य वैशिष्ट्ये :
ओबीडी२बी मानकांशी सुसंगत
३७ मिमी अपसाईड डाऊन फ्रंट सस्पेन्शन
अधिक चांगल्या हाताळणीसाठी हायड्रोफॉर्म्ड हँडलबार
आकर्षक रेड अलॉय व्हीलसह नव्याने सजवलेली रचना
प्रीमियम डिझाइन उत्कृष्टता
सौंदर्यदृष्ट्या नवीन रेड अलॉय व्हील आणि अनोखे ग्राफिक्स यांच्यामुळे ही मोटरसायकल आकर्षक दिसते.
ग्लॉसी ब्लॅक, मॅट ब्लॅक आणि ग्रॅनाइट ग्रे या तीन रंगांमध्ये ती उपलब्ध असेल.
रेसिंग-प्रेरित नवोपक्रम
उच्च कार्यक्षमतेच्या रायडिंगचा वारसा पुढे नेत, ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’ मोटरसायकल ही
९,००० आरपीएमवर २०.८ पीएस एवढी कमाल शक्ती आणि ७,२५० आरपीएमवर १७.२५ एनएम टॉर्क
निर्माण करते. ही मोटरसायकल अधिक सुरक्षित ब्रेकिंगसाठी ड्युअल-चॅनल एबीएसने (एबीएस)
सुसज्ज आहे. यामध्ये अर्बन, स्पोर्ट आणि रेन हे तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत.
याशिवाय, स्लिपर क्लच, अॅडस्टेबल क्लच व ब्रेक लिव्हर्स, ब्लूटूथ आणि व्हॉइस-असिस्टसह
टीव्हीएस स्मार्टएक्सकनेक्ट™ तंत्रज्ञान, तसेच एलईडी हेडलॅम्प आणि ‘डीआरएल्स’सह पूर्णपणे
डिजिटल डिस्प्ले क्लस्टर यांचाही या गाडीत समावेश आहे.
२०१६ मध्ये बाजारात सादर झालेली ‘टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४व्ही’ ही अपाचे मालिकेतील
एक मोठी झेप होती. या मॉडेलने आधीच्या कोणत्याही मॉडेलपेक्षा अधिक धाडसी, सडपातळ आणि
आक्रमक डिझाइन ही वैशिष्ट्ये सादर केली होती. कालौघात या मॉडेलने आपल्या विभागात अनेक प्रथमच
सादर झालेली वैशिष्ट्ये दिली. त्यांमध्ये राईड मोड्स (स्पोर्ट, अर्बन, रेन), ड्युअल चॅनेल एबीएस व रिअर
लिफ्ट-ऑफ प्रोटेक्शन आणि रेस-ट्यून स्लिपर क्लच यांचा समावेश होता. विविध रस्त्यांवरील
परिस्थितींनुसार कामगिरी अॅडजस्ट करण्यासाठी राइड मोड्स देणारे हे तिच्या स्वतःच्या श्रेणीतील
पहिलेच वाहन ठरले. गाडी वेगात असताना ब्रेक लावला असता तिच्यावर अधिकचे नियंत्रण आणि
सुरक्षितता येण्यासाठी या गाडीमध्ये ‘ड्युअल चॅनेल एबीएस’सह रिअर लिफ्ट-ऑफ प्रोटेक्शन ही प्रणाली
सादर करण्यात आली. डिझाइन आणि लाइटिंगमध्येही सुधारणा करत एलईडी हेडलॅम्प व ‘सिग्नेचर
डीआरएल’चा समावेश झाला. त्यामुळे या गाडीला एक वेगळी आणि आधुनिक ओळख मिळाली.
आजच्या सादरीकरणाच्या प्रसंगी बोलताना टीव्हीएस मोटर कंपनीचे ‘प्रिमियम बिझनेस’ विभागाचे प्रमुख
विमल सुम्बळी म्हणाले, “टीव्हीएस अपाचे हा एक फक्त मोटरसायकल ब्रँड नाही, तर गेल्या दोन दशकांत
६० लाखांहून अधिक रायडर्सना प्रेरणा देणारी ती एक जागतिक चळवळ आहे. आमच्या रेसिंग डीएनएच्या
बळावर, टीव्हीएस अपाचे मोटरसायकलींनी नेहमीच कार्यक्षमतेचा, अचूकतेचा आणि प्रगत तंत्रज्ञानाचा
सुरेख संगम सादर केला आहे आणि तो जगभरातील तरुण आणि मोटरसायकलप्रेमींसाठी आकर्षण ठरला
आहे. २०२५ ची ‘अपग्रेडेड टीव्हीएस अपाचे आरटीआर ४व्ही’ मोटरसायकल हीच परंपरा पुढे नेत आहे.
नव्या युगातील रायडर्सना ट्रॅकवर तयार झालेल्या रोमांचक अनुभवाची गॅरंटी देणारी, डिझाइन आणि
अभियांत्रिकीची सीमारेषा ओलांडणारी ही गाडी आहे.”
‘टीव्हीएस अपाचे’ने जागतिक स्तरावर ६० लाख रायडर्सचा विश्वास संपादन करत एक महत्त्वपूर्ण टप्पा
गाठला आहे. पूर्वी जिथे लाखांचा आकडा गाठायला वर्षे लागायची, तिथे आता शेवटचे १० लाख रायडर
फार कमी वेळातच पार झाले. हे अपाचे ब्रँडच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि “शक्ती, अचूकता आणि
उत्कटतेने” रायडिंग करणाऱ्या रायडर्सच्या वाढत्या समुदायाचे प्रतिक आहे.
प्रत्येक नव्या सुधारणेतून ‘अपाचे आरटीआर २०० ४व्ही’ मोटरसायकलने नेहमीच आपल्या वर्गात
कार्यक्षमतेचे मापदंड निर्माण केले आहेत. रेसिंग ट्रॅकमधून आलेली अभियांत्रिकी आणि रोजच्या वापरातली
सहजता यांचा हा संगम नव्या युगातील रायडरना अपार आनंद देत आहे. ‘२०२५ ची टीव्हीएस अपाचे
आरटीआर २०० ४व्ही’ ही नवीन गाडी भारतभरातील टीव्हीएस मोटर कंपनीच्या अधिकृत वितरकांकडे
उपलब्ध असेल आणि तिची सुरुवातीची किंमत १,५३,९९० (एक्स-शोरूम दिल्ली) असेल.