Home Blog Page 2605

अजितदादांनी सांगूनही धान्य मिळेना , मरणानंतरही रुग्णाच्या वाट्याला अपेष्टा – वसंत मोरे (व्हिडीओ)

पुणे- नगरसेवकांच्या वार्ड स्तरीय  निधीतून नागरिकांना घरपोच धान्य मिळावे अशी आपण मागणी केल्यानंतर ,खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसेच आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना निर्देश देवूनही याबाबत त्यांनी कार्यवाही केली नसल्याचा ठपका आज मनसे चे गटनेते वसंत मोरे यांनी ठेवला . या शिवाय महापालिकेतील खाते प्रमुख यांच्या ढिसाळ वृत्तीमुळे कोरोना ग्रास्तांची मृत्युनंतर हि हेळसांड होता असल्याचा ठपका त्यांनी ठेवला

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आज महापालिकेतील विरोधी पक्षांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी नेमके वसंत मोरे काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …

कोरोना – विरोधी पक्षांच्या गट नेत्यांकडून महापालिका आयुक्तांच्या कारभाराबाबत नाराजी (व्हिडीओ)

mymarathi.net पुणे -शहरातील कोरोनाचे संकट रोखण्यासाठी महापालिका आयुक्गतांकडून योग्य नियोजन होत नसून घाबरट वृत्तीने पुणे शहर त्यांनी देव भरोसे सोडल्याचा गंभीर आरोप आज कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला .   कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी नेमके अरविंद शिंदे काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …

घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नका

0

मुंबई दि 3: परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळते आहे. हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची  आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव , पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार व श्रमिकांची पाठवणी त्यांच्या त्यांच्या राज्यात सुरु झाली आहे. भिवंडी, नाशिकहून विशेष रेल्वे रवाना झाल्या आहेत. मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर देखरेख व समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत. सुमारे ५ लाख परप्रांतीय मजुरांची राज्य शासनाने त्यांना निवारा देऊन तसेच जेवणाखाण्याची साधारणत: ४० दिवस व्यवस्था केली तसेच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था आजही सुरूच आहे.

हे मजूर रोजीरोटी कमावणारे व हातावर पोट असणारे आहेत. ते गरीब असून कोरोनामुळे हतबल झाले आहेत, अशा परिस्थितीत त्यांना रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी पुरेसे पैसेही नसतील. काही ठिकाणी तर स्वयंसेवी संस्था, व संघटना यांनी तिकिटाचे कमी पडलेले पैसे भरून या मजुरांना दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना जर तिकिटाचे पैसे माफ केले तर या काळात त्यांना आधार मिळेल असेही मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.

सध्या या राज्यांतील कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी रेल्वेशीदेखील चांगला समन्वय ठेवण्यात आला आहे. इतर राज्य सरकारांशी सुद्धा चांगला समन्वय ठेवावा तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी व इतर कागदपत्रे यांची पूर्तता करून घेऊन त्यांना पाठवावे. यामध्ये कुठेही गोंधळ होऊ नये असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

निवारा केंद्रातील सार्व कामगारांची यादी अद्ययावत करावी तसेच आज ना उद्या मुंबई, ठाणे , पुणे येथून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झाल्यास या कामगारांच्या प्रवासाचे  व्यवस्थित नियोजन जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यांतर्गत ठिकठिकाणी अडकलेल्या व्यक्ती व प्रवाशांचे गट यांना त्या त्या जिल्ह्यांत जाण्याची परवानगी ही सर्व बाबींचा विचार करून व लॉकडाऊन नियमाप्रमाणे करावी तसेच यात तक्रारी येऊ देऊ नयेत. अडकलेल्या व्यक्ती या नागरिक आहेत, परिस्थितीमुळे त्यांना थांबावे लागले आहे त्यादृष्टीने याकडे पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भारतीय सैन्य दलाचे वतीने पुणे महापालिकेस मानवंदना-आमचे मनोबल वाढविणारी : शेखर गायकवाड

पुणे-कोरोना विषाणू प्रादुर्भाव लढा हा वेगळा आहे. या शतकातील ही वेगळीच घटना आहे. या लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने या माध्यमातून केलेला सन्मान नक्कीच मनोबल वाढविणारा असल्याचे प्रतिपादन येथे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले .

करोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात यशस्वी लढा देणाऱ्या पुणे महापालिकेस भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने अर्थात भारतीय सैन्य दलाच्या वतीने सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली.
पुणे मनपा अधिकारी, कर्मचारी संघटना, डॉक्टर्स, आरोग्यसेवक अशा विविध पातळीवर लढा देणारांचा सन्मान व मानवंदना देण्याचा गौरव सोहळा मनपाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संपन्न झाला.
कार्यक्रमप्रसंगी प्रथमतः कोरोना विषाणू प्रादुर्भाव बाधित मुळे मृत झालेल्या व्यक्तींना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पित केली.
करोना विषाणू विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱयांना भारतीय सैन्यदल मानवंदना देत असल्याचे चित्र स्वरूप याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांना सन्मानार्थ प्रदान करण्यात आले. भारतीय सैन्य दलाच्या अधिकार्‍यांचे वतीने केक आणण्यात आला होता.
याप्रसंगी सफाई कर्मचारी व डॉ. संजीव वावरे यांच्या हस्ते केक कापून सैन्य दलाचे वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सैन्य दलाने याप्रसंगी उपस्थितांना मिठाईचे वाटप केले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांना मनपा कॉफी टेबल बुक व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुस्तक भेट दिले. अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांना भारतीय राष्ट्रध्वज प्रदान केला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना सबएरिया पुणेचे चीफ स्टेशन कमांडर ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी सांगितले की भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आले की कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात देण्यात येत असलेला लढा अत्यंत महत्वपूर्ण आहे. या लढ्यात योगदान देणारे योद्धे, शासन यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्थातील सफाई कर्मचारी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, अधिकारी, पोलिस कर्मचारी यांचा लढा अतुलनीय आहे. या लढ्यातील योद्धय्यांचे मनोबल उंचावण्याचा दृष्टीने त्यांचा सन्मान करणे, मानवंदना देणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण भारतभर अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशावर संकटे आल्यावर धावून जाणे सैन्य दलाचे काम आहे. सैन्य दलाने लढा दिल्यावर नागरिकांनी सैन्य दलाची प्रशंसा केली व मनोबल वाढविले.
परंतु करोना विषाणू विरोधातील लढाई ही पूर्णपणे वेगळी आहे. जे लढत आहेत ते नागरिक आहेत. यामध्ये सफाई कर्मचारी, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी अशा विविध घटकांचा सहभाग आहे. पोलिस कर्मचारी घराबाहेर राहून लढत आहेत व आपले संरक्षण करीत आहेत. त्यामुळे अशा योद्ध्यांची प्रशंसा व मनोबल वाढविणे आमचे कर्तव्य आहे.
पुणे मनपाच्या कर्मचारी, अधिकारी यांची प्रशंसा करणे व मनोबल वाढविण्याची संधी पुणे मनपाने आम्हास दिल्याबद्धल त्यांनी आभार मानले.
या लढ्यात मनपाने सर्व स्तरावर प्रशंसनीय काम केलेले आहे. त्यामुळे त्यामुळे मनपाचे आम्ही कौतूक करीत आहोत. या लढ्यात भारतीय सैन्य दल आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच या लढ्यात आपल्याला यश मिळेल.
या लढ्यातील मनपाच्या कार्यकर्तृत्वाला भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आम्ही सलामी देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांना मानवंदना दिली. मनपा आयुक्त गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, १८९० ते १९१३ या कालावधीत प्लेग साथीचे रोगाने थैमान घातले होते त्यावेळी काही प्रमाणात उपचार व सावधानता यावर आधारित लढा देण्यात आला होता.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव लढा हा वेगळा आहे. या शतकातील ही वेगळीच घटना आहे. या लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने या माध्यमातून केलेला सन्मान नक्कीच मनोबल वाढविणारा असल्याचे सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने कोरोना विरोधात लढणाऱ्या योद्धय्यांचे आभार मानण्याकरिता व त्यांचे खऱ्या अर्थाने मनोबल उंचावण्याकरिता केलेला सन्मान व दिलेली मानवंदना मनोबल उंचावण्यासारखी आहे. या कार्यक्रमाकरिता स्वतः ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी उपस्थित राहून आमचे मनोबल वाढविले आहे. मनपाचे वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, “भारतीय सैन्य सीमेवर दिवस रात्र लढा देत आहेत व देशवासीयांचे संरक्षण करीत आहेत. या लढ्याबद्धल संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केलेल्या भावनेबद्धल आम्हीही सलामी देत आहोत.”

अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले व सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे यांनी केले व आभार प्रदर्शन अतिरिक्त मनपा आयुक्त शंतनू गोयल यांनी केले.
कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे अडकलेले ९७७ नागरिक रवाना; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दिला निरोप

नागपूर दि 3 –  लॉकडाउनमुळे नागपूर विभागात  वेगवेगळ्या निवारागृहात  असलेल्या 977 नागरिकांना घेऊन आज नागपूर ते लखनऊ  विशेष  श्रमिक स्पेशल रेल्वे  गाडी क्रमांक 01902 रात्रौ 7.30 वाजता रवाना झाली.

पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी  आपल्या गावी परत जात असल्याबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले.

श्रमिक स्पेशल रेल्वे मध्ये  विभागातील 977 प्रवाशांमध्ये गडचिरोली 108, चंद्रपूर 289 , भंडारा 133, वर्धा 220, नागपूर 227  प्रवासी यांचा समावेश आहे

यावेळी रेल्वे मंडळ प्रबंधक सोमेश कुमार, अतिरिक्त डीआर एम मनोज तिवारी, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ मंडळ  सुरक्षा अधिकारी  आशुतोष पांडे, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त राम जोशी, उपविभागीय महसूल अधिकारी नीता पाखले चौधरी आदी अधिकारी  उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंग पालन करून चोख व्यवस्था केली होती.

या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही  रेल्वे पूर्ण पणे सॅनिटाईज करण्यात आली असून  प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची  खात्री करुन घेण्यात येत होती. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती . तसेच सोबत सुके खाद्यपदार्थही देण्यात आले.

राज्यात आज ६७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १२ हजार ९७४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. ३ : राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत  ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या  १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण  १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७० हजार १३९ नमुन्यांपैकी  १ लाख ५६ हजार  ७८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२ हजार ९७४  जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ८१ हजार ३८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून  १३ हजार १५८  लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५४८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २१, पुण्यातील ४, भिवंडीतील १, नवी मुंबईमधील १ मृत्यू आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ११ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर १०  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे.  या २७ रुग्णांपैकी १३ जणांमध्ये ( ४८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ८८०० (३४३)

ठाणे: ६० (२)

ठाणे मनपा: ४८८ (७)

नवी मुंबई मनपा: २१६ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: २१२ (३)

उल्हासनगर मनपा: ४

भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)

मीरा भाईंदर मनपा: १४१ (२)

पालघर: ४४ (१)

वसई विरार मनपा: १५२ (४)

रायगड: ३० (१)

पनवेल मनपा: ५५ (२)

ठाणे मंडळ एकूण: १०,२२३ (३७१)

नाशिक: १२

नाशिक मनपा: ४३

मालेगाव मनपा:  २२९ (१२)

अहमदनगर: २७ (२)

अहमदनगर मनपा: १६

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: २० (१)

जळगाव: ३४ (११)

जळगाव मनपा: १२ (१)

नंदूरबार: १२ (१)

नाशिक मंडळ एकूण: ४१३ (३०)

पुणे: ८१ (४)

पुणे मनपा: १२४३ (९९)

पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)

सोलापूर: ७

सोलापूर मनपा: १०९ (६)

सातारा: ३७ (२)

पुणे मंडळ एकूण: १५४९ (११४)

कोल्हापूर: १०

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: २९

सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)

सिंधुदुर्ग: ३ (१)

रत्नागिरी: ११ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ६१ (३)

औरंगाबाद:५

औरंगाबाद मनपा: २३९ (९)

जालना: ८

हिंगोली: ४२

परभणी: १ (१)

परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: २९७ (१०)

लातूर: १२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ३१ (१)

लातूर मंडळ एकूण: ४७ (२)

अकोला: १२ (१)

अकोला मनपा: ५०

अमरावती: ३ (१)

अमरावती मनपा: ३१ (९)

यवतमाळ: ७९

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: १९८ (१२)

नागपूर: ६

नागपूर मनपा: १४६ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: ४

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १५८ (२)

इतर राज्ये: २८ (४)

एकूण:  १२ हजार ९७४ (५४८)

टीप – ही माहिती कोरोना पोर्टलवरील आयसीएमआरने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. )

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ७८ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५१.०५ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा

पुणे दि.3 : – पुण्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पुणे जिल्हयासह सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्हयातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, या संख्येत झालेली वाढ, गंभीर रुग्णांची स्थिती, मृत रुग्णांची माहिती व प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना, शासनाकडून आवश्यक असलेली मदत, ग्रीन झोन क्षेत्रातील उद्योग सुरू करणेबाबतची माहिती, व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाची सविस्तर माहिती दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगवेळी पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे यांच्यासह इतर विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

येरवडा येथील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह तात्पुरते कारागृहाकरीता अधिग्रहीत – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे दि. 3 : राज्यात कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19) उद्भवणा-या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव संपुर्ण राज्यात 3 मे 2020 पर्यंत संचार बंदीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तात्पुरते कारागृह घोषित करणेसाठी केलेल्या विनंती नुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
त्यानुसार कोव्हीड-19 या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात नव्याने दाखल होणारे बंद्यांना तात्पुरते क्वॉरंटाईन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह , प्रेस कॉलनी समोर, येरवडा पुणे -6 या इमारतीत तात्पुरते कारागृह घोषित करण्यात आले आहे. तसेच या इमारतीत नव्याने दाखल होणा-या बंद्यांना क्वॉरंटाईन करणेसाठी तात्पुरत्या कारागृहासाठी पुढील आदेशापर्यंत अधिग्रहीत करीत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त, पुणे शहर यांनी सदर तात्पुरते कारागृहाचे ठिकाणी सुरक्षेकरीता आवश्यक तो पोलीस बंदोबस्त 24 तास पुरविण्याचे तसेच तात्पुरते कारागृह येथे दैनंदिन कामकाजासाठी एक तुरुंगाधिकारी व एक लिपीक / रक्षक यांची नियुक्ती अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे यांनी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
0000

प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती आरोग्य तपासणीतून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी-जिल्हाधिकारी

पुणे कॅन्टोनमेंट हॉस्पीटलसाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देणार
पुणे, दिनांक ३- पुणे कॅन्टोनमेंट क्षेत्रातील मोदीखाना व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना व आरोग्य सुविधाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली. प्रतिबंधित क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान वीस नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात यावी तसेच या आरोग्य तपासणीतून कोणताही व्यक्ती सुटणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. तसेच पुणे कॅन्टोनमेंट हॉस्पीटलसाठी साधनसामुग्री व अन्य बाबींसाठी निधीची आवश्यकता असेल तर निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे कॅन्टोनमेंट क्षेत्रातील मोदीखाना व लगतच्या महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या हे दोन्ही क्षेत्र प्रतिबंधित केले आहेत. येथे महानगरपालिका व जिल्हा प्रशासनासोबतच पुणे कॅन्टोनमेंटच्या वतीने विविध उपाययोजना करून कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक शोधण्यात येत आहेत. यासोबतच येथील नागरिकांची आरोग्य तपासणी, नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. या सर्व उपाययोजना व आरोग्य सुविधाबाबतची पाहणी व येथील नागरिकांशी जिल्हाधिकारी राम यांनी संवाद साधला. यावेळी पुणे कॅन्टोनमेंटचे स्टेशन कमांडर बिगेडीयर कुलजित सिंग, पुणे कॅन्टोमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डीसीपी सरदेशपांडे, डॉ. गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे कॅन्टोनमेंट हॉस्पीटलसाठी यापूर्वी अडीच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी साधनसामुग्री व अन्य बाबींसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येकाने मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, पुणे कॅन्टोनमेंट व पुणे महानगरपालिकेने आवश्यकतेप्रमाणे मास्कचा पुरवठा तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा घरपोहोच करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्यकविषयक सर्वेक्षण करण्यावत यावे, डॉक्टारांनी आवश्यतक ती खबरदारी घेवून रुग्णांची वैद्यकीय तपासणी करावी, वैद्यकीय तपासणीच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी राम यांनी या प्रतिबंधित क्षेत्रातील शौचालयांचा वापर, वैयक्तिक स्वच्छता ठेवा, मास्कचा वापर, निर्जंतूकीकरण आदी विषयाबांबत नागरिकांशी संवाद साधत परिसराची पाहणी केली. यावेळी पुणे कॅन्टोनमेंट, पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

कोरोना यौद्धांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना

पुणे, दिनांक ३- देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे.संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्यनेमाने आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते कोरोना यौद्धा आहेत. दरम्यान त्यांच्या सन्मानासाठी भारतीय सैन्य दलाने आज संपूर्ण देशभरात आकाशातून पुष्पवृष्टी करत कोरोना यौद्धांचा सन्मान केला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय सैन्य दलाच्या विशेष विमानाने पुष्पवृष्टी केली. पुण्यातही कोरोनावर उपचार करणा-या रुग्णालयावर देखील पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला असल्याचे मेजर जनरल नवनीत कुमार यांनी व्यक्त केले. तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सतत कार्यरत असलेले विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचा त्यांनी विशेष गौरव केला.

विभागीय आयुक्त कार्यालयात प्रांगणात सोशल डिस्टन्सिंग ठेवून भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल शर्मा, आर. एस. पाटीयाल आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मेजर जनरल नवनीत कुमार म्हणाले, कोरोनाच्या लढाईतील यौध्दांना बळ देणे हे आपले कर्तव्य असून पुणे विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या 22 जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी सतत कार्यरत आहेत, सोबतच लॉकडाऊनच्या काळात शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी देखील अत्यंत समन्वयाने कार्य करत आहेत,या सेवा देणा-या कोरोना सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भारतीय सैन्य दलाच्या या उप्रकमाबाबत आभार व्यक्त केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव,उपायुक्त ( सामान्य ) संजयसिंह चव्हाण,उपायुक्त जयंत पिंपळगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे, तहसिलदार मीनल भोसले, सहा.उप संचालक ( आरोग्य) आडकीकर, उपसंचालक खांडकेकर,तहसिलदार मनिषा देशपांडे, लेखा अधिकारी गणेश सस्ते, नायब तहसिलदार बाळासाहेब क्षिरसागर, स्वीय सहायक अनिकेत जोशी, स्वीय सहायक संजय भुकण, अर्चना फडणीस, लिपीक सचीन सांगडे, वाहनचालक बाळु खाडे, शिपाई गुलाब गिजरे शिपाई शरद टेकवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय सैन्यदलाकडून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा सत्कार

कोरोना योद्ध्यांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना
पुणे, दिनांक ३- कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्य आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धे आहेत. दरम्यान, त्यांच्या सन्मानासाठी भारतीय सैन्य दलाने आज संपूर्ण देशभरात आकाशातून पुष्पवृष्टी करत कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला असल्याचे सांगत कोरोनाच्या लढाईत भारतीय सैन्य दल आपल्या सोबत आहे. कोरोनाच्या लढाईत या कोरोना योद्ध्यांना बळ देणे आवश्यक असल्याचे मत मेजर जनरल नवनीत कुमार यांनी व्यक्त केले. तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सतत कार्यरत असलेले जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा त्यांनी विशेष गौरव केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात सोशल डिस्टंसिंग ठेवून भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, कर्नल शर्मा, आर. एस. पाटीयाल आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उप्रकमाबददल आभार व्यक्त करून जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून भारतीय सैन्य दल प्रशासनासोबत समन्वय ठेवून आहे. जिल्ह्यात पूरस्थिती किंवा संकट आले त्यावेळी भारतीय सैन्य दल कायम प्रशासनासोबतच असते. आजच्या कोरोना संसर्गाच्या स्थितीत प्रशासनाला पाठबळ देण्याचे काम भारतीय सैन्य दलाने केले, कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यामध्ये हिंमत देण्याची भारतीय सैन्य दलाची परंपरा असल्याचे सांगत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा हा सन्मान असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पुणे विभागात कोरोना बाधित 2 हजार 147 रुग्ण

-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.3 :- पुणे विभागातील 463 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 147 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 571 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 72 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 2 हजार 147 बाधित रुग्ण असून 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 912 बाधीत रुग्ण असून 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 74 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 114 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 हजार 604 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 21 हजार 446 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 125 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 19 हजार 266 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 147 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 71 लाख 46 हजार 385 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 79 लाख 84 हजार 598 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 624 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
0000

वयाच्या ९२व्या वर्षीही सेवेचाच ध्यास -माणिकचंद दुगड परिवाराकडून रोज ५ हजार जेवणाची पाकिटे (व्हिडीओ)

पुणे- आज त्यांचा ९२ वा वाढदिवस होता, पण ते गेल्या १७ तारखेपासून सातारा रस्त्यावरील पुष्प मंगल  कार्यालयात च रोज ५ हजार लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेत दंग आहेत . अर्थात त्या उद्योजक माणिकचंद दुगड यांच्या सोबत त्यांचा पूर्ण परिवार हि त्यांचा हा ध्यास सोबत घेऊनच इथे वावरतो आहे. कोरोनाच्या थैमाना ला पायबंद घालताना असंख्य सेवेकरी पुण्यात दिसून येतात . दुगड परिवार हे त्यातल एक वरचं  नाव मानांव लागेल. पुष्प मंगल कार्यालयात जेवण बनवून त्याची पाकिटे बनविणे आणि ती वेगवेगळ्या भागात आवश्यक्यता आहे तिथे पाठविणे असे काम हा परिवार आपल्या स्नेही सोबतींना बरोबर घेऊन करतो आहे . प्रत्यक्ष  तिथे जाऊन आमचे प्रतिनिधी मयूर आणि अभिषेक लोणकर यांनी बनविलेला  हा एक व्हिडीओ रिपोर्ट

उत्तर प्रदेशातील मजुरांना जिल्हा प्रशासनाने केले रवाना

0

चंद्रपूर, दि. 3  : चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये 15 तालुक्यात काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील 307 नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जवळपास 25 वाहनांची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून हे सर्व व कामगार लखनऊकडे रवाना झाले आहेत.

नागपूर येथून नागपूर ते लखनऊ पर्यंत एका विशेष ट्रेनला आज रवाना करण्यात आले. विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी या संदर्भात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना आपापल्या जिल्ह्यातील उत्तर प्रदेशातील मजूर वर्गाला पाठविण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात जिल्हाभरात नियोजन करण्यात आले होते.

उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 6 वाजता नागपूर येथून रवाना झालेल्या या विशेष रेल्वेमध्ये चंद्रपूर तालुक्यातील 84, राजुरा 22, भद्रावती 18, मुल 47, गोंडपिंपरी 29, गडचांदूर 12, सावली 10, जिवती 13, वरोरा 2 व बल्लारपूर येथील 70 अशा एकूण 307 मजुरांना रवाना करण्यात आले. यामध्ये 289 मजुरांचा समावेश होता. इतर त्यांची मुले पकडून हा आकडा 307 झाला आहे. जिल्हा प्रशासनाने या मजुरांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी मदत केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील मजुरांनी स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहे.

परराज्यातील जनतेला आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ई-पासची सुविधा

0

– महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेले मजूर तसेच नोकरी व काम-धंद्यासाठी आपले मुळगाव सोडून शहरांकडे आलेल्या लोकांची त्यांच्या मूळगावी जाण्याची व्यवस्था शासनाने केली आहे.  कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या मूळ निवासस्थानी सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे, अशी माहिती कोकण महसूल अयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना राबविलेल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा व परिणामकारक असा उपाय म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊन घोषित केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात आटोक्यात आला असल्याचे दिसून आले आहे. परंतु याच लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील मजूर ज्या ज्या ठिकाणी कामाकरिता गेले होते ते त्या त्या ठिकाणीच अडकून पडले.  कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे  परराज्यातील अडकून पडलेले नागरिक आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले आहे. कोकण विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमधून परराज्यामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या  कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या मूळ निवासाच्या इच्छित स्थळी जाण्याकरिता निश्चित कार्यपद्धती अवलंबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यामध्ये सध्या विविध कॅम्पमध्ये जे मजूर आहेत त्यांच्याबाबतीत ते ज्या राज्यातील निवासी आहेत अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मजूरांच्या यादीसह संपर्क साधून त्यांची सहमती घेण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून सहमती मिळल्यानंतर या मजूरांना वाहनाद्वारे त्यांच्या मूळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.  मूळ गावी वास्तव्याच्या जिल्ह्यात जावू इच्छित असतील, अशा व्यक्तींनी प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नावासह तसेच वाहनाचा प्रकार व क्रमांक या बाबी नमूद करुन संबंधित जिल्ह्यातील e-Pass  या ॲपवर अर्ज करावा.  विभागातील जिल्ह्यांमधून बाहेर राज्यामध्ये जाणाऱ्या  कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी खालील प्रमाणे जिल्हानिहाय लिंकवर माहिती भरावी.

माहिती भरण्यासाठी संपर्क क्रमांक

ठाणे-    https://covid19.mhpolice.in       ०२२- २५३८१८८६/२५३०१७४०/२५३८१८८६/२५३०१७४०

पालघर –  http://c19trformpalghar.webstag.net/  ०२५२५- २५२५२० / २९७४७४

रायगड –  https://forms.gle/fgEGNoGTxber4HRs5 ०२१४१-२२२११८

रत्नागिरी –  https://forms.gle/g4yi1DHK5eijGphQ6 ०२३५२- २२२२३३ / २२६२४८

वरील लिंक मध्ये माहिती भरल्यानंतर तसेच e-Pass या ॲपद्वारे अर्ज केल्यानंतर परराज्यात जावू इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवार, दि.३ मे, २०२० पासून परवानगी देण्यास सुरुवात केली जाणार आहे.

प्रवास करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने ते सध्या जेथे राहत आहेत तेथील नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय किंवा नोंदणीकृत खाजगी दवाखाना येथे संपर्क साधून संबंधित डॉक्टरकडून स्वत:ची तपासणी करुन घेऊन वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेणे बंधनकारक राहील व ते वैद्यकीय प्रमाणपत्र प्रवासादरम्यान स्वत: सोबत बाळगणे तसेच स्वत:स १४ दिवस गृह विलगीकरण (Home Quarantine) करुन घेणे बंधनकारक असणार आहे.

जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्याप्रमाणे कार्यवाही करावी व  जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त श्री. शिवाजी दौंड यांनी केले आहे.