Home Blog Page 2597

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्यास यातून लवकर सुटका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद (व्हिडिओ)

0

मुंबई दि. ८ : महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले तसेच ते पुढे म्हणाले की, लॉकडाऊन संपवणे आपल्या हातात आहे. आपण जेवढी शिस्त पाळू, संयम ठेऊन वागू तेवढी आपल्याला कोरोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य यापुढेही करावे, शिस्त पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3699038323502944&id=1501539223422053

आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमातील थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

अस्वस्थ होऊ नका मुख्यमंत्र्यांचे आवाहन

औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झालेल्या अपघाताने व्यथीत झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातील मजूर-कामगार आणि लोकांना महाराष्ट्र शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, तुमच्या राज्याबरोबर, केंद्र सरकारबरोबर बोलणी सुरु असून तुम्हाला तुमच्या घरी, तुमच्या राज्यात सुखरूप पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, रेल्वे, बसची व्यवस्था करण्यात येत आहे त्यामुळे संयम सोडू नका, अस्वस्थ होऊ नका,गर्दी करू नका आणि अफवांना बळी पडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्य सुविधेत वाढ

कोरोनाचे संकट मोठे होत आहे तशा आपण आरोग्य सुविधाही वाढवत आहोत, रेसकोर्स मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगावचे एक्झिबिशन सेंटर येथे आपण रुग्णांच्या विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था करत आहोत.  हे करतांना तोंडावर येऊन पोहोचलेल्या पावसाचाही विचार करावा लागत आहे. ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी  रेल्वे, बीपीटी आणि लष्कराची रुग्णालये वापरण्याची परवानगी आपण केंद्र शासनाकडे मागितली आहे. त्यास केंद्राने मान्यताही दिली आहे. सध्या सगळी यंत्रणा तणावाखाली आहे. पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार हे आपल्यासाठी लढत आहेत, आजारी पडत आहेत, दुर्देवाने काही पोलिसांचे मृत्यू देखील झाले आहेत. ते आजारी पडल्यानंतर त्यांना बाजूला करणे चुकीचे आहे, त्यांना थोड्या काळासाठी विश्रांती मिळावी म्हणून, पोलिसांना आलेला थकवा जावा म्हणून केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण करत आहोत.

हॉस्पिटलमध्ये गलथानपणा चालणार नाही

हॉस्पीटलधील गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही असा इशारा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस, डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावर हल्ला करू नका, कडक कारवाई होईल. पण हे करतांना डॉक्टरांनीही गलथानपणे काम करू नये, कारवाईची वेळ आणू नये. टास्कफोर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, आपल्यासोबत आहेत,  ही लढाई आपण एकमेकांच्या सहकार्याने सक्षमपणे लढत आहोत. तरी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आयुष, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी पुढे येऊन सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्याची विभागणी केली आहे रेड झोनमधील नियम अधिक कडक करतांना इतरत्र काही अटी आणि शर्थीच्या अधीन राहून आपण व्यवहार सुरु केले आहेत. लॉकडाऊन हे गतिरोधक आहे, त्यामुळे गती कमी झाली परंतू साखळी तोडण्यात अजून यश आले नाही. अजून काही ठिकाणी लोक शिस्त पाळताना दिसत नाहीत, तसे होऊ नये, आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. आपण सर्व मिळून एकदाच कडक बंधने पाळू आणि ही साखळी तोडू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

2 लाख चाचण्या

परदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जाणार आहे अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, दोन लाखाच्या आसपास राज्यात कोरोना चाचण्या  झाल्या आहेत. काही जण अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत आहेत त्यामुळे इच्छा असूनही त्यांना वाचवता येत नाही. जर सर्दी, पडसे आणि खोकला असेल तर न घाबरता फिव्हर रुग्णालयात स्वत: येऊन तपासणी करून घ्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले.

सव्वा तीन हजार रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात कोरोनाच्या १८ हजार केसेस पैकी सव्वातीन हजार लोक बरे होऊन घरी गेले आहेत. ही संख्या वाढते आहे काही गर्भवती महिला  ज्या कोरोना पॉझेटिव्ह आहेत त्या प्रसुत झाल्यानंतर बाळाला कोरोनाची लागण नाही हा चमत्कारही दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले

रस्ते ,गटारे,पदपथ अर्धवट कामे तातडीने पूर्ण करा -संदीप खर्डेकरांची मागणी

पुणे- शहरात  अनेक ठिकाणी रस्ते ,गटारे ,पदपथ अर्धवट खोदून त्यांची कामे लॉकडाऊन मुळे आणि अर्थसंकल्पीय समस्येमुळे तशीच अर्धवट सोडून देण्यात आली आहेत ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. आता पावसाळा येईल, तुमची तांत्रिक समस्या काय असतील त्या शासकीय पातळीवर जरूर सोडवा पण रस्त्यावर परिस्थिती अशीच अर्धवट ठेवू नका ती कामे तातडीने पूर्ण करा अशी मागणी क्रिएटीव्ह फौंडेशन चे संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे

या निवेदनात असे म्हटले आहे कि,  मी केलेल्या मागणीनंतर आपण विकासकामे पूर्ण करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ दिली होती.मात्र Lockdown १७ मे पर्यंत वाढविण्यात आल्यानंतर विकासकामां बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे समजते.केवळ पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व इतर कामे सुरु करण्यात आली आहेत.मात्र अनेक ठिकाणी रस्ते / पदपथ खणलेल्या अवस्थेत आहेत.अनेक ठिकाणी ड्रेनेज वा बांधकाम अशी विकासनिधीतील अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यात याचा नागरिकांना मोठा त्रास भोगावा लागण्याची शक्यता आहे.सध्या आपण ग्रीन झोन मधे लॉकडॉउन शिथिल केले आहे.अश्या सर्व भागातील अर्धवट स्थितीतील कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन घेतल्यास नागरिकांना मन:स्ताप होणार नाही.तरी लॉकडॉउन काळातील सर्व नियम पाळून अर्धवट विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती

पुणे विभागात कोरोना बाधित 2 हजार 885 रुग्ण

-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 8:- पुणे विभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 2 हजार 885 बाधित रुग्ण असून 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 537 बाधीत रुग्ण असून 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 762 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 634 आहे. तर 86 रुग्णगंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयात 114 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 14 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 98 आहे.
सोलापूर जिल्हयात 182 बाधीत रुग्ण असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 141 आहे.
सांगली जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 26 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 आहे.
कोल्हापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 6 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे.
आजपर्यंत विभागात एकुण 29 हजार 319 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 27 हजार 795चा अहवाल प्राप्त झाला आहे. 1 हजार 524 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 24 हजार 930 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 885 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागात 85 लाख 23 हजार 712 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 46 लाख 46 हजार 506 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 74 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
00000

कोरोना संकटामुळे ठप्प अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञगटाचा अहवाल सादर

0

मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच अहवालावर अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री

मुंबई, दि. 8 : कोरोनामुळे संकटात असलेल्या राज्य अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञ गटाने त्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे आज मंत्रालयात सादर केला. तज्ज्ञगटाच्या या अहवालात सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत आज विचारविमर्श करण्यात आला. उपसमिती सदस्यांनी सुचविलेल्या सूचना, शिफारशींसह हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात येईल व मंत्रिमंडळाच्या बैठकीतच त्यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक, ऊर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते, तर अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, अर्थ सचिव राजीव मित्तल, कृषी सचिव एकनाथ डवले आदी तज्ञगट सदस्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा अहवाल उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला. सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी सर्वश्री जे. एस. साहनी, सुबोधकुमार, रामनाथ झा, उमेशचंद्र सरंगी, जयंत कावळे, सुधीर श्रीवास्तव यांच्यासह अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, आर्थिक सुधारणा विभागाचे प्रधान सचिव, कृषी सचिव आदी तज्ञांचा समावेश असलेल्या गटाने हा अहवाल तयार केला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या सूचना, शिफारशींसह हा अहवाल लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

मुंडे-खडसेंचा पत्ता कापला, भाजपत पुन्हा आयारामांना संधी

 

मुंबई-२१ मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ४ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेले एकनाथ खडसे आणि परळीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा निष्ठावंतांना संधी नाकारत पक्षात नवीन आलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे ४ उमेदवार असणार आहेत. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून या चार उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं असून तशी यादीही जाहीर करण्यात आलेली आहे.

संख्याबळानुसार महाविकास आघाडीला पाच तर भाजपला चार जागा मिळणार असल्याने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणारी निवडणूक बिनविरोधच पार पडेल. भाजपने तर तसे संकेत आधीच दिले आहेत. नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २९ मतांची आवश्यकता असेल. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावावर १६९ सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. काही छोटे पक्ष तेव्हा तटस्थ राहिले होते. भाजपचे १०५ आमदार असून, सात अपक्ष किंवा छोटय़ा पक्षाच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. म्हणजेच भाजपकडे ११२ मते आहेत.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपला चौथी जागा निवडून आणण्याकरिता चार मते कमी पडत असली तरी गुप्त मतदान असल्याने ही मते मिळण्यात काहीच अडचण येणार नाही, असे भाजपचे नेते ठामपणे दावा करतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीला सहा उमेदवार निवडून आणण्याकरिता १७४ मते लागतील. विश्वासदर्शक ठरावावर १६९ मते मिळाली होती. परिणामी महाविकास आघाडीने जोर लावल्यास सहावी जागा निवडून आणणे शक्य आहे. पण त्यासाठी मतांची फाटाफूट होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. मुख्यमंत्री किंवा एखादा वरिष्ठ नेता राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात असतो तेव्हा धोका पत्करला जात नाही. तेव्हा शक्यतो निवडणूक बिनविरोधच होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल, अशीच चिन्हे आहेत.

‘सत्ताधाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी असल्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाजपला चार जागा मिळणार असल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजपच्या गोटातून याआधीच सांगण्यात आले आहे.

सुंदर आकाश… (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

देवा तुझे किती । सुंदर आकाश

सुंदर प्रकाश । सूर्य देतो…

लहानपणी ऐकलेली ही कविता आता पुन्हा वाचायला, ऐकायला मिळतेय. व्हाट्सअपवर जवळजवळ सर्वच ग्रुपवर ही व्हायरल झाली आहे. कारणही तसंच आहे म्हणा. सध्या या कवितेतील ओळी प्रत्यक्ष अनुभवता येत आहेत. कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला आणि काही चांगले परिणामही दिसू लागले. त्यापैकीच हा एक परिणाम सुंदर आणि नितळ आकाश दिसण्याचा. सगळीच वाहनं जागच्या जागी थांबली आहेत, स्टॅच्यू म्हटल्यासारखी. प्रदूषण कमी झालं आहे. सकाळी सकाळी असलेले धुरांचे लोट जाऊन आता शुभ्र निरभ्र आकाश दिसतंय. माझ्या  नात्यातील  अद्वैत पाटील व त्याच्या  आईला निलाक्षीला  छायाचित्रणाचा छंद आहे. त्यांनी  आकाशाच्या विविध छटा त्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या आहेत.

अर्थात केवळ आकाशच शुभ्र दिसत नाही तर इतरही चांगले बदल घडून येत आहेत. माणसांचा वावर आणि प्रदूषण नसल्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात या हंगामात फ्लेमिंगोच्या (रोहित पक्षी) संख्येत जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी फ्लेमिंगोचे आगमन उशिरा झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्या मात्र वाढली आहे. दक्षिण मुंबईत मलबार हिल, केम्स कॉर्नरच्या परिसरातील नागरिक तर एक सुखद अनुभव घेत आहेत. राजभवनाच्या विस्तीर्ण परिसरात नेहमीच मोरांचा वावर असतो. मुंबईचे रस्ते मोकळे झाल्यानं आणि नेहमीचा कोलाहल नसल्यानं मोरांनीही राजभवन सोडून आजूबाजूच्या परिसरात आता भटकंती सुरू केली आहे. एवढंच नाही तर सतत पर्यटकांची गर्दी असलेल्या नॅशनल पार्कमध्येही असेच काहीसे दृश्य आहे. नॅशनल पार्कमधील चिंचपाड्यात राहणाऱ्या नितेशने सांगितले की हरण, सांबर, ससे मस्तपैकी पार्कातील रस्त्यांवर बिनधास्त फिरताना दिसतात.

मुंबईसारखीच परिस्थिती दिल्लीत देखील तेथील नागरिकांना पाहायला मिळाली. नोएडा इथल्या जीआयपी मॉलजवळ नीलगायने हजेरी लावली तर केरळमधल्या कलीकट इथं रस्त्यांवर सिव्हेट हा प्राणी हुंदडताना दिसला. दिल्ली आणि मुंबई ही सगळ्यांत जास्त प्रदूषण असणारी शहरे आता हळूहळू ग्रीन झोनमध्ये बदलत असल्याचे दिसून आले आहे. फुफ्फुस, अस्थमा आणि हृदयविकार असणाऱ्यांना श्वास घेताना होणारा त्रास कमी झालाय.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान गंगा नदी स्वच्छ दिसू लागली आहे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालाय – त्यात देवभूमी उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील गंगा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ दिसत आहे. लॉकडाऊनमुळे औद्योगिक प्रदूषकांची संख्या कमी झाली असून घाटांवर पर्यटकांच्या अनुपस्थितीमुळे गंगा नदीतील प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. लक्ष्मण झुलाजवळ घेतलेल्या या व्हिडिओमध्ये गंगेचे पाणी स्वच्छ, स्वच्छ आणि स्वच्छ दिसत आहे.

पृथ्वीचं सुरक्षा कवच आणि धोकादायक अतिनील किरणांपासून बचाव करणारा ओझोनचा थर पूर्ववत होत आहे.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामरूपपर्यंत भारतामध्ये एरव्ही श्वास घेणेही ज्यामुळे अवघड होत होते त्या प्रदूषणाची पातळी गेले काही दिवस लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे कमी झाली आहे. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाची वाढ रोखण्याची आणि त्या सकारात्मक परिणामांसाठी दीर्घकालीन उपाय योजण्याची आवश्यकता आहे.

दरवर्षी 22 एप्रिलला ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जातो, या दिवशी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ठिकठिकाणी प्रदर्शनं, निदर्शनं तसेच स्वच्छता मोहीमा हाती घेतल्या जातात. यावेळेचा पृथ्वीदिन मात्र वेगळाच होता. कोरोना विषाणूच्या साथीचं संकट जगभरात पसरलं आहे. निसर्गाने आपली किमया दाखवून हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा केलाय हेही खरं. हे सुंदर चित्र (म्हणजे प्रदूषणविरहीत निसर्ग ) कायम राहावं असंच वाटतं.

निरभ्र आकाश, स्वच्छंदीपणे उडणारे पक्षी, स्वच्छ नद्या असे हे दृश्य सुखावणारे असले तरी उद्योगधंदे, कारखाने बंद, वाहन प्रवास बंद अशी परिस्थिती सातत्यानं असणं कोणत्याही विकसनशील देशाला कायमस्वरूपी परवडणारं नाही. निसर्गाच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा. तेव्हा कुठे ही धरती, हे पाणी आणि आकाश नेहमी स्वच्छ , निरभ्र आणि सुंदर दिसेल. अगदी कवितेतल्या ओळींसारखं हे जग आपल्या पुढच्या पिढीलाही प्रत्यक्ष अनुभवता येईल…!

  • देवा तुझे किती । सुंदर आकाश
  • सुंदर प्रकाश । सूर्य देतो… 

© पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

नांदेड चे ३८ मजूर पुण्याहून रवाना- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे, दि.८: लॉक डाऊन काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधुन आज पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

या मजुरांना पाठविण्यापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समन्वय साधून याबाबत एकमेकांना परवानगी दिली. नांदेड जिल्हाधिकारी यांची परवानगी आल्यानंतर कोविड-१९ च्या अनुषंगाने या कामगारांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या वाहनांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.

त्यांना पाठविण्यापूर्वी ग्रामीण मुळशी तालुक्यामध्ये लॉक डाऊन शिथिल केल्यामुळे, उद्योगधंदे सुरु असून आपल्या हाताला मिळणारे काम खंडित होणार नाही, याची त्यांना कल्पना देण्यात आली, तथापि, ते थांबण्यासाठी तयार नसल्यामुळे, आज या मजुरांना रवाना करण्यात आले. तहसील कार्यालयातर्फे प्रत्येक प्रवाशाला ऑरेंज ज्यूसची बॉटल सोबत देण्यात आली. प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेऊन सोशल डिस्टनसिंग पाळून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

या ३८ प्रवाशांना नांदेड जिल्ह्यात पाठविण्यासाठी कासार आंबोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तलाठी श्री. पासलकर, मंडळ अधिकारी सुहास कांबळे यांनी नियोजन केले.

मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण व पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी या तीनही वाहनांतील मजूरांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

शिर्डी येथून विशेष रेल्वेने १४०२ वीटभट्टी कामगार उत्तर प्रदेशातील लखीमपूरकडे रवाना

0

शिर्डी,दि.8: कोरोनाचा प्रादूर्भावा रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता आणि शिर्डी परिसरात नऊ वीट भट्टयांवर काम करणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील 1402 कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना आज दुपारी साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले. यामध्ये साकुरी येथील 437, राहाता येथील 218, पिंपळस येथील 98, पुणतांबा येथील 55, खडकेवाके येथील 29, वाळकी येथील 35, रुई येथील 67 आणि एकरुखे येथील 89 कामगारांचा समावेश आहे.  जवळपासत सत्तावीस तासांच्या प्रवासानंतर ही रेल्वे लखीमपूर येथे पोहोचेल.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या   पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. राज्याच्या विविध भागात अन्य राज्यातून आलेले कामगार, नागरिक,पर्यटक,विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते. या सर्वांना विहित प्रक्रिया पार पडून त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबधित तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना प्राधिकृत केले होते. यासंबधीची विहित प्रक्रिया साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतिश दिघे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, रेल्वे स्थानक व्यवस्थापक बी.एस.प्रसाद, साई संस्थान प्रसादालयाचे मुख्य व्यवस्थापक विष्णु थोरात तसेच तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पाडून संबधितांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. पोलीस निरिक्षक नितीन गोकावे, दीपक गंधाले, मिथुन घुगे तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे रामजी मीना,अनुप देशमुख यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवला होता.

लॉकडाऊनमुळे शिर्डी येथे अडकून पडलेल्या जवळपास 1251 कामगारांना यापूर्वीच त्यांच्या मूळ गावी रेल्वेने पाठविण्यात आले आहे. आज 1402 कामगार व त्यांच्या कुटुंबीय उत्तर प्रदेशातील लखीमपूरकडे रेल्वेने मार्गस्थ झाले. सर्व प्रवाशांना यावेळी प्रशासनाच्यावतीने भोजनाचे पॅकेटस, पाणी, प्रवरा मेडीकल ट्रस्टच्यावतीने मास्क  पुरविण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्टेशनवर पुरेशा औषधांसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने संबधितांची आरोग्यविषयक तपासणी केली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन या सर्वांची रेल्वे डब्यात बसायची व्यवस्था करण्यात आली होती.

स्वगृही परत जाण्याचा आनंद सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. लॉकडाऊनसारख्या अडचणीच्याप्रसंगी तालुका प्रशासनाने आत्मीयतेने केलेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सोयी सुविधांमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाणे शक्य झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी आहोत, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

केवळ अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा होणार

0

मार्गदर्शक सूचना आणि विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेऊन परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ८ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन कालावधी सुरू आहे. त्या अनुषंगाने युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या दिनांक १ जुलै ते ३० जुलै या दरम्यान घेण्यात येतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवरून आज विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला.

श्री. सामंत म्हणाले, समितीने दिलेल्या अहवालाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेण्यात येत आहे. जर राज्यात  कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली व लॉकडाऊन कालावधी वाढला तर पुन्हा एकदा दि. २० जूनपर्यंत या विषयी फेरआढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

समितीने केलेल्या शिफारशीनुसार ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स व मार्क्स ही त्यांना दिले जातील. मार्क्स देण्याची पद्धती ही विद्यार्थ्यांना मिळणारी ५० टक्के ग्रेड ही अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत व ५० टक्के या पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार आहे. पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षांच्या बाबत १०० टक्के अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे. या गुणांबाबत काही शंका असल्यास तसेच त्यामध्ये मुल्यवर्धन करण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्यास ऐच्छिक परीक्षा देता येणार आहे. अशा प्रकारच्या परीक्षांबाबत विद्यापीठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच दुर्दैवाने जर एखादा विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास झाला तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल पण, त्यांना नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या विषयीचे वेळापत्रकाचे निर्णय ही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणार आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असणार आहे. हा निर्णय घेत असताना कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता येईल, असेही श्री. सामंत यांनी संगितले.

विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरासन करून त्याच्या सामुपदेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन करण्यात येईल.

अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी १ जुलै ते ३० जुलै दरम्यान परीक्षा होणार आहेत असे नजरेसमोर ठेऊन अभ्यास सुरू करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांनीही सुट्टी आहे, अभ्यास नाही म्हणून घरा बाहेर न पडता घरातच रहावे.

उन्हाळी सुट्टीबाबत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचा विचार  करून प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार शैक्षणिक वर्ष हे दि. १ सप्टेंबर पासून सुरू करावयाचे आहे. त्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग काम करत आहे. समितीने दिलेल्या या अहवालास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सहमती दर्शवली आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये उपस्थित होते असे गृहीत धरूनच त्यांची उपस्थित गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारच्या संभ्रमास बळी पडू नये व आपल्या अभ्यासावर व शैक्षणिक सत्रांवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहनही श्री.सामंत यांनी यावेळी केले.

● स्वायत्त विद्यापीठांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.

● चार वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच पाच वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ १० व्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल.

● ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा वार्षिक होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येईल.

● दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा होईल.

● गोंडवाना विद्यापीठ हे हिरव्या पट्ट्यामध्ये (ग्रीन झोन) येत असल्यामुळे तेथील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत मुभा दिली आहे. या विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. येथील भोगोलिक परिस्थिती पाहून विद्यापीठ  स्वतःच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेईल.

● एसएनडीटी विद्यापीठाच्या राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील इतर राज्यातील त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार होतील.

● उन्हाळी सुट्टीबाबत सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा विचार करून संबंधित विद्यापीठ अंतिम निर्णय घेईल.

● नवीन शैक्षणिक वर्ष हे १ सप्टेंबर पासून सुरू करण्यासाठी सर्व परीक्षांचे निकाल हे दि.१५ ऑगस्ट पर्यंत लावण्यात येतील.

● सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) बाबतीत येत्या ८ दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल.

● पदविका, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा जर महाविद्यालयात घेता आल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जर्नल किंवा ऑनलाईन ओरल घेऊन गुणांकन केले जाईल.

गरीबांच्या खात्यात तातडीने ७५०० रुपये ट्रान्सफर करण्याची वेळ: राहुल गांधी

0

लॉकडाउन उठवण्यासाठी आता मोदी सरकारने पावलं उचलावीत

नवी दिल्ली –
गरीबांच्या खात्यात तातडीने ७५०० रुपये जमा करावेत अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी सरकारने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यासाठी ६५ हजार कोटींची गरज आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. लॉकडाउन उठवण्यासाठी मोदी सरकारने आता योग्य नियोजन करावं असंही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.स्थलांतरित मजुरांसाठी वेगळी उपाय योजना करा असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. या सगळ्यांना आज मदत करण्याची गरज आहे. आपली अर्थव्यवस्था ढासळत आहे. अशावेळी गरीबांना, मजुरांना, लघु आणि मध्यम उद्योजकांना आज मदत करायला हवी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पुण्यात ३५ हजार ८४९ क्विंटल अन्नधान्य, ८ हजार ४६१ क्विंटल भाजीपाल्याची आवक

पुणे, दि.8 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 1 हजार 845 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 17 हजार 696 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 7 मे 2020 रोजी  101.800 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.215 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 28 हजार 658 स्थलांतरित मजुरांची सोय1 लाख 458 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 148 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 167 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 383 रिलिफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 28 हजार 658 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  458 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विद्यार्थी गृहाचा वर्धापनदिन यंदा साधेपणाने साजरा होणार

पुणे : शिक्षण क्षेत्रातील नामांकित पुणे विद्यार्थी गृह संस्थेचा १११ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे शासकीय नियमांचे आणि फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम-लक्ष्मण आणि कुलगुरू कै. दादासाहेब केतकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे यंदा वेदघोष आणि स्वागत समारंभ रद्द करण्यात आले आहेत. संस्थेचे देणगीदार, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि कर्मचारी-सेवक वर्गाने याची नोंद घ्यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच थांबून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

‘आयसीएआय’तर्फे येत्या सोमवारी (११)’ लाईव्ह वेबिनार’द्वारे करिअर कौन्सलिंग

पुणे : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स व सीए क्षेत्रातील संधी या विषयावर मोफत करिअर मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकासा) यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यास मंडळाच्या अंतर्गत सोमवार, दि. ११ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता युट्युबवरून लाईव्ह वेबिनारद्वारे हे मार्गदर्शन होणार आहे. हे वेबिनार मोफत असले, तरी नियोजनाच्या दृष्टीने पूर्वनोंदणी आवश्यक आहे. https://www.surveymonkey.com/r/M972BZW यावर नावनोंदणी करावी. हे वेबिनार www.youtube.com/puneicaiofficial यावर लाईव्ह पाहता येणार आहे.
‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए जय छायरा, ‘डब्ल्यूआयआरसी’ खजिनदार सीए आनंद जाखोटीया, पुणे शाखेचे चेअरमन सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशीनाथ पठारे यांच्यासह विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ या मार्गदर्शन सत्रात करिअर कौन्सलिंग करणार आहेत. विदयार्थी आणि पालकांच्या मनात कोणत्या क्षेत्रात काय संधी आहेत, असा मोठा प्रश्न असतो. त्याचे शंका निरसण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजिला आहे. सीएची भूमिका, सीएचे महत्त्व, सीए नंतर विविध क्षेत्रातील संधी, सीए होण्यासाठीची तयारी कशी करावी, अशा वेगवेगळ्या विषयी माहिती दिली जाणार आहे.

रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. ८ : औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी  ५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे, तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आज सकाळी या दुर्दैवी घटनेसंदर्भात कळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव तसेच रेल्वे  प्रशासनाच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांशी चर्चा केली व घटनेविषयी जाणून घेतले.

परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यात अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे, त्याठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जाईपर्यंत आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करत आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका.

रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे व सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मजुरांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

0

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवणार; जीव धोक्यात घालून कुणीही असुरक्षित प्रवास करु नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ८ : जालना-औरंगाबाद रेल्वेमार्गावर बदनापूर ते करमाडदरम्यान रेल्वे रुळांवर झोपलेल्या १६ जणांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजूरांची घरी परतण्याची अधिरता, तळमळ, चाललेली पायपीट मन विषण्ण करणारी आहे. परप्रांतीय मजूर बांधवांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. केंद्र व सबंधित राज्यांच्या सहकार्याने सर्व मजूरांना त्यांच्या राज्यांत पाठविण्यात येत आहे, परंतू आपला नंबर येईपर्यंत, त्यासाठीची व्यवस्था होईपर्यंत मजूरबांधवांनी धीर धरावा, जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

औरंगाबादनजिक रेल्वे रुळावर झालेल्या दुर्घटनेतील मृतांना उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. श्री.पवार म्हणाले की, महाराष्ट्राने लॉकडाऊन दरम्यान राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या साडे सहा लाख मजूर बांधवांच्या अन्नपाणी, निवारा, वैद्यकीय उपचारांची सोय केली, ती व्यवस्था आजही सुरु आहे, यापुढेही सुरु राहील. महाराष्ट्रात काम करणाऱ्या आमच्या परप्रांतीय मजूरबांधवांची राज्य शासन काळजी घेत असताना काहींचा असा अपघाती मृत्यू होणे दुर्दैवी, क्लेषदायक आहे.

राज्यात अडकलेल्या व आपापल्या राज्यात, घरी जावू इच्छिणाऱ्या मजूर बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. केंद्र आणि संबंधित राज्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडली जात आहे. टप्प्याटप्याने सर्वांना आपापल्या राज्यात जाता येणार आहे. ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आपापल्या घरी जाता येईल. परंतू, त्यासाठी घाई करु नये. ही घाई जीवघेणी ठरु शकते. मजूर बांधवांनी जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, कोरोनाच्या संकटावर आपण सर्वांनी मिळून लढायचं आहे, जिंकायचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं स्वत:ची, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी सुरक्षितता बाळगली पाहिजे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.