Home Blog Page 2590

जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

 

पुणे दि.13:- कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच आरोग्य विभागाच्या अधीकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, डॉ. संगीता तिरुमणी तसेच महापालिकेच्या संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी नियुक्त वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सुविधेतील कर्मचा-यांची त्यांनी यावेळी माहिती घेतली, तसेच रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, विलगीकरण कक्ष व अन्य विविध कक्षांची पाहणी केली. त्याचबरोबर कोविड 19 च्या उपचारासाठी आवश्यक असणा-या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी रुग्णालयाला आवश्यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करुन द्यावी, असे सांगून तेथे करण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही श्री. हर्डीकर यांना सूचना केल्या.

या रुग्णालयामध्ये 120 खाटांची क्षमता असून अतीदक्षता विभागात 50 खाटांची सोय करण्यात आली असून 6 व्हेंटीलेटर्स राहणार आहेत, अशी माहिती श्री. हर्डीकर यांनी दिली.‍
00000

कोरोना मुक्तीचा पंढरपूर पॅटर्न

0

पंढरपूर, दि. 13 : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस  वाढ होत आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सोलापूर  शहरात तसेच पंढरपूर तालुक्याच्या आजुबाजूला कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. पंरतू  पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या योग्य नियोजन, कडक अंमलबजावणी तसेच समन्वय आणि नियमांचे काटेकोर पालनकरुन ‘पंढरपूर पॅटर्न’ तयार केला आहे.

पंढरपूर तालुका कोरोनामुक्त ठेवण्यात प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांनी केलेल्या काटेकोर नियोजनाला व प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी गाव आणि वॉर्ड पातळीवर राबवलेल्या पंचसूत्रींमुळे पंढरपूर तालुका आतापर्यंत ‘कोरोना मुक्त’ राहिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली. तालुका प्रशासनाने सुरुवातीपासून नागरिकांना घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले. जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला घरपोच करण्याची व्यवस्था केली. शहरात व ग्रामीण भागात  मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. तसेच शहरात व तालुक्यातील  गावांमध्ये विविध ठिकाणी निर्जंतुकिकरण केले.  घरोघरी वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर सारीची माहिती गोळा केली. तसेच घरोघरी थर्मल चाचणी केली. ज्यावेळस इतर शहरात रुग्ण वाढत होते त्यावेळेस तालुक्यातील प्रशासनाने या सर्व बाबी अतिशय तातडीने आणि नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून पूर्ण केल्या. शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला होता त्याला नागरिकांनी साथ देत पूर्णपणे यशस्वी झाला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण ग्रामस्तरीय समितीची स्थापना  करण्यात आली. या समितीमध्ये सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांचा समावेश करण्यात आला. या समितीकडून  बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली.  जीवनाश्यक वस्तू पुरवठा, आरोग्य सुविधा समितीमार्फत घरपोच देण्यात आल्या. अनेक ठिकाणी वस्तू खरेदीसाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करण्यात आला. त्यामुळे नागरीक आपोआप घरातच थांबले. तसेच तालुक्यातील सुमारे 70 गावांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पूर्णपणे पाळला होता.

संचारबंदीच्या कालावधीत पोलीस प्रशासनाने तालुका आणि शहरात येणारे रस्ते बंद केले. चेक नाके उभारून २४ तास तपासणी केली.  तसेच मॉर्निंगवॉक करणारे नागरीक, विनाकारण फिरणारे नागरीक यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली त्याचबरोबर  गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले.

नगरपालिकेमार्फत शहरात विविध  ठिकाणी फवारणी करुन निर्जंतुकीरण करण्यात आले.  शहातील प्रत्येक वार्डात वार्डस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली.  त्याद्वारे शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची माहिती वॉर्डस्तरीय समितीकडून संकलित करण्यात आली. शहरातील सुमारे 90 हजार नागरिकांचे आतापर्यंत थर्मल स्क्रींनिग करण्यात आले. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचे 14 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असतानाच  ग्रामीण भागाचे अर्थकारण सुरळीत ठेवण्यासाठी गावांतील गरजा गावातच भागविण्यात येतील, अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात जीवनाश्यक वस्तू, दूध, भाजीपाला, आरोग्य सुविधा सुरळीत राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

कोराना मुक्तीसाठी तालुका प्रशासनाची पंचसुत्री….

•       पंढरपूर शहरातील व तालुक्यातील प्रत्येक नारिकांची आरोग्य तपासणी.

•       परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची माहिती शहरातील वॉर्डस्तरीय समितीकडून तर ग्रामीण भागातील ग्रामस्तरीय समितीकडून संकलित.

•       परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे 14 दिवसांचे होम क्वारंटाईन बंधनकारक.

•       तालुक्यात व शहरात बाहेरुन येणाऱ्या वाहनांचे सॅनिटाझिंग तसेच वाहनचालकांची आरोग्य तपासणी.

•       पोलीस प्रशासनाकडून चेक नाक्यावर वाहनांची व नागरिकांची कडक तपासणी.

000000

गर्दी, संपर्क व संसर्ग टाळणे भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा

0

निर्णयाची अंमलबजावणी 15 मे पासून – आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती

मुंबई, दि. 13 : कोविड -19 चा संसर्ग जगभरासह देशात आणि राज्यात वाढला असल्याने 22 मार्च 2020 पासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक वस्तुखेरीज सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र 4 मे 2020 पासून किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू काही ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

सदर निर्णय राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्यसेवा देण्याबाबतचा आदेश 11 मे 2020 रोजी निर्गमित केला आहे.या आदेशाबाबत क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांना याबाबत करावयाच्या कारावाईबाबत आदेश देण्यात आले आहेत. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी 14 मे 2020 पासून सकाळी 10 वाजल्यानंतर करण्यात येणार होती. परंतू क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सदर आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय मिळविणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे इत्यादी प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस आवश्यक असल्याने या आदेशाची अंमलबजावणी 15 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

घरपोच मद्यसेवा ही सोय ज्या जिल्ह्यात मद्यविक्री सुरु आहे त्या जिल्ह्यात आणि संबधित जिल्हाधिकारी यांनी मद्यविक्री करीता ज्या वेळा, दिवस आणि क्षेत्र निर्धारित केलेले आहे त्यातच सदर सोय उपलब्ध होऊ शकते.

0000

नागपूरात पाच हजार बेड क्षमतेचे ‘कोव्हिड केअर सेंटर’ सज्ज

0

• देशातील सर्वात मोठे केअर सेंटर

• महापालिकेचे सुक्ष्म नियोजन प्रत्यक्ष अमलात

नागपूर, दि.13 : नागपूर महापालिकेने राधास्वामी सत्संग न्यास संस्थेच्या सहकार्याने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील आश्रमाच्या परिसरात सुमारे पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे देशातील पहिले ‘कोव्हिड केअर सेंटर’ ठरू शकते.

या सेंटरला आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली.  विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला  व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यावेळी उपस्थित होते.

कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात सारे काही सध्या नियंत्रणात असले तरी भविष्यात उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी नागपूर महापालिकेने सूक्ष्मनियोजन करून हे ‘कोविड केअर सेंटर’ उभारले असल्याची माहिती आयुक्त मुंडे यांनी दिली.

सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे 42 विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे. भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय अशा ठिकाणी व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावे, यादृष्टीने मनपाने ‘कोव्हिड केअर सेंटर’ची संकल्पना मांडली. या संकल्पनेला राधास्वामी सत्संग न्यासने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

मॅटींग, बॅरिकेटींग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांसाठी सात्विक भोजन आदी व्यवस्था सुद्धा संस्थेने केली आहे. डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था नागपूर महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. एकूणच केंद्र शासन आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच हे ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. या सेंटरला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. महापालिकेने अल्पावधित उभारलेल्या या व्यवस्थेबद्दल आयुक्त मुंडे यांची त्यांनी प्रशंसा केली.

‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये सद्यस्थितीत 500 बेड तयार करण्यात आले असून गरजेनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. येथे महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील. प्रत्येक 100 बेडच्या मागे 20 डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचाऱ्यांची टिम कार्यरत असणार आहे. डिस्टन्सिगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीसह ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यांचे तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. याशिवाय रुग्णांचे येथे स्वॅब घेण्यात येईल. स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात करण्यात येईल. मात्र पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल. रुग्णांसोबतच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंसिडंट कमांडर व अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना या सेंटरची जबाबदारी देण्यात आली आहे.

0000

परराज्यातील मजुरांच्या प्रवासी शुल्कासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी

0

५४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग

मुंबई, दिनांक १३ : लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजूर अडकले आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मजुरांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या ३६ जिल्ह्यांना ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ७० रुपयांचा निधी देण्यात आला असून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

कोविड १९ च्या साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील कामगार आणि  मजूर अडकले. तसेच महाराष्ट्रातील कामगार आणि स्थलांतरीत मजुरही इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळेल. सचिव आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभाग यांनी  दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या  यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे हे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्याना देण्यात आलेला निधी असा:

अक्र       जिल्हा           प्रदान केलेली  रक्कम

1           मुंबई शहर         12,96,00,000

2           मुंबई उपनगर     10,00,00,000

3            ठाणे                  4,80,00,000

4            रायगड              2,50,00,000

5            रत्नागिरी            1,50,00,000

6             पालघर              3,00,00,000

7             सिंधुदूर्ग             1,00,00,000

8             नाशिक                40,00,000

9             धुळे                     25,00,000

10           नंदुरबार               25,00,000

11           जळगांव              20,00,000

12           अहमदनगर         20,00,000

13            पुणे                 8,00,00,000

14           सातारा                95,81,270

15           सांगली               30,00,000

16           सोलापूर              50,00,000

17           कोल्हापूर          1,25,91,400

18           औरंगाबाद           80,00,000

19            जालना              50,00,000

20            बीड                   30,00,000

21            परभणी              50,00,000

22            हिंगोली                 6,00,000

23             नांदेड                20,00,000

24             उस्मानाबाद        20,00,000

25              लातूर               60,00,000

26             अमरावती          30,00,000

27               अकोला           12,74,400

28                वाशिम            10,00,000

29                बुलढाणा          20,00,000

30                यवतमाळ         35,00,000

31                 नागपूर         1,20,00,000

32                 वर्धा                30,00,000

33                 गोंदिया            25,00,000

34                 भंडारा             24,00,000

35                  चंद्रपूर             30,00,000

36                   गडचिरोली      15,00,000

………………………………………………….

कूण रूपये                54,75,47,070

परराज्यातील मजुरांच्या प्रवासासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५४ कोटी ७५ लाख

0

मुंबई, दिनांक १३ : लॉकडाऊन कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी तसेच इतर राज्यात महाराष्ट्रातील स्थलांतरीत कामगार, मजूर अडकले आहेत त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी अशा मजुरांच्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या ३६ जिल्ह्यांना ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ७० रुपयांचा निधी देण्यात आला असून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

कोविड १९ च्या साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील कामगार आणि  मजूर अडकले. तसेच महाराष्ट्रातील कामगार आणि स्थलांतरीत मजुरही इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळेल. सचिव आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभाग यांनी  दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या  यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ ज्या कारणासाठी वितरित करण्यात आला आहे त्यासाठीच करता येणार आहे हे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्याना देण्यात आलेला निधी असा:

अक्र       जिल्हा           प्रदान केलेली  रक्कम

1           मुंबई शहर         12,96,00,000

2           मुंबई उपनगर     10,00,00,000

3            ठाणे                  4,80,00,000

4            रायगड              2,50,00,000

5            रत्नागिरी            1,50,00,000

6             पालघर              3,00,00,000

7             सिंधुदूर्ग             1,00,00,000

8             नाशिक                40,00,000

9             धुळे                     25,00,000

10           नंदुरबार               25,00,000

11           जळगांव              20,00,000

12           अहमदनगर         20,00,000

13            पुणे                 8,00,00,000

14           सातारा                95,81,270

15           सांगली               30,00,000

16           सोलापूर              50,00,000

17           कोल्हापूर          1,25,91,400

18           औरंगाबाद           80,00,000

19            जालना              50,00,000

20            बीड                   30,00,000

21            परभणी              50,00,000

22            हिंगोली                 6,00,000

23             नांदेड                20,00,000

24             उस्मानाबाद        20,00,000

25              लातूर               60,00,000

26             अमरावती          30,00,000

27               अकोला           12,74,400

28                वाशिम            10,00,000

29                बुलढाणा          20,00,000

30                यवतमाळ         35,00,000

31                 नागपूर         1,20,00,000

32                 वर्धा                30,00,000

33                 गोंदिया            25,00,000

34                 भंडारा             24,00,000

35                  चंद्रपूर             30,00,000

36                   गडचिरोली      15,00,000

आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान मोदींचे मजबूत पाऊल! : माजी खासदार संजय काकडे

पुणे- कोरोना महामारीने भारत देशासह संपूर्ण जगाला ग्रासलेले असताना आता पुढे काय होणार या चिंतेत सर्व भारतीय नागरिक होते. मोलमजुरी करणाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांमध्येच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतिहास घडविणारी घोषणा केली. आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा करताना पंतप्रधानांनी त्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय ‘न भूतो न भविष्यती’ असा असल्याचे राज्यसभेचे माजी खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी म्हटले असून याबद्दल पंतप्रधान मोदी यांना संजय काकडे यांनी कोटी कोटी धन्यवाद दिले आहेत.

संजय काकडे म्हणाले की, महाराष्ट्राचा वार्षिक महसूल 2 लाख कोटी रुपये आहे. आत्मनिर्भर भारतासाठी जाहीर केलेले 20 लाख कोटी रुपये म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महसूलाच्या दहापट रक्कम. आणि देशाच्या जीडीपी च्या ती दहा टक्के आहे.

सगळीकडे अंधार दाटलेला असताना पंतप्रधान मोदी यांनी विकासाचा प्रखर तेजस्वी दिवा यानिमित्ताने पेटविला आहे. देशातील युवा पिढी व उद्योग क्षेत्राला एकविसाव्या शतकातील आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले. या आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्माणासाठी पंतप्रधान मोदी यांनी 2014 पासूनच अर्थव्यवस्था, प्रशासन आदी अनेक पातळीवर सकारात्मक बदल घडवून आणण्यासंदर्भात सुरुवात केली आहे. त्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी त्यांच्या कालच्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केला. आणि यापुढेही हे सकारात्मक बदल सुरू राहतील असेही स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत शेतकरी, मोल मजुरी करणारे गोरगरीब ते नोकरदार व मध्यमवर्गीय, पर्यटन, उत्पादन क्षेत्र, प्रक्रिया उद्योग, गृह उद्योग आणि इतर सर्वच लहान, मध्यम उद्योग ते मोठमोठ्या उद्योग क्षेत्राला सामावून घेण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक मंदीतून आपला देश यामुळे सही सलामत बाहेर येण्यास मदत होईल. आत्मनिर्भर भारत योजनेमुळे जगाच्या बाजारपेठेत भारताचे स्थान अधिक मजबूत होईल. ही आत्मनिर्भर भारतासाठीची योजना म्हणजे भारताला, आपल्या देशाला महासत्ता बनविण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेले अतिशय मजबूत व आश्वासक पाऊल आहे, असेही माजी खासदार संजय काकडे यांनी सांगितले आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीविषयी देशाच्या अर्थमंत्र्यांमार्फत आजच सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

देशातील उद्योजक, विविध क्षेत्रातील जाणकार ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वजणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेचे विशेष कौतुक वाटत आहे. कोरोना महामारीमुळे आलेली मरगळ झटकून आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आता प्रत्येकाने सज्ज व्हावे, कार्यप्रवृत्त व्हावे, असे आवाहनही माजी खासदार संजय काकडे यांनी केले आहे.

कोथरुड मधून 150 कामगार तेलंगाना ला रवाना

पुणे-कोथरूड भागातील विविध मजुरांसाठी पुण्याहून तेलंगणाला जाण्याची बसेसची सोय  राष्ट्रवादी चे  नेते आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केली होती  यासाठी विशेष सहकार्य सिनिअर पीआय जाधव यांचे लाभले.  जाणाऱ्या प्रवाशांना मेडिकल चेकअप, फूड पैकेट, पाण्याच्या बोटल आदि सुविधा देऊन त्यांना रात्री निरोप देण्यात आला.

 

पुण्यातून लाखावर कामगारांचे मूळ गावी होणार स्थलांतर

पुणे-टाळेबंदीमुळे पुण्यात एक लाख आठ हजार ६०८ मजूर, कामगार अडकले असून ही संख्या प्रशासनाने शोधलेल्या व्यक्तींची आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील २५ हजार ८१६, बिहारमधील १३ हजार, मध्य प्रदेशातील दहा हजार ६०२, पाच हजार १६८ झारखंड आणि इतर अन्य राज्यांमधील आहेत.आतापर्यंत पुण्यातून बारा हजार मजूर, कामगार त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यामध्ये मध्य प्रदेशात चार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे प्रत्येकी एक रेल्वे गाडी सोडण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तरांचल, झारखंड, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांमधील पुण्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना मूळ गावी सोडण्यासाठी येत्या आठवडाभरात २३ रेल्वे गाडय़ा पुण्यातून पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील उद्योग, व्यवसाय सुरू होत असल्याने आतापर्यंत ३०० मजुरांनी मूळ गावी जाण्यास नकार दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

टाळेबंदीमुळे पुण्यात अडकलेल्या मजूर, कामगारांना सोडण्यासाठी संबंधित राज्यांशी संपर्क करण्यात येत आहे. त्यानुसार मजुरांची यादी करण्यात आली असून दररोज दोन ते तीन यानुसार येत्या आठवडय़ात २३ रेल्वे गाडय़ा पुण्यातून विविध राज्यांत पाठवण्यात येतील. तसेच पुण्यातून महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्य़ात जाण्यासाठी एसटी आणि खासगी बसगाडय़ांची सोय करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत १५० बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत

पंतप्रधानांनी काय ते स्पष्ट सांगावे, पीआर गीरी करून देशाला गोंधळात टाकू नये

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधत ‘लॉकडाऊन ४’ चे संकेत दिले. तसेच मध्यमवर्गियांसाठी पॅकेज जाहीर केले. या संपूर्ण भाषणात गरजेच्या असलेल्या ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप करत पंतप्रधानांच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उडवली आहे. पंतप्रधानांना ठोस सांगायच नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचे? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची नाहीय. केंद्रीय अर्थमंत्री किंवा राज्यांतील मुख्यमंत्र्यांकरवी तशा बातम्या वदवून घेतल्या जातील.कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.मग जर काही ठोस सांगायचेच नसेल तर लाईव्ह येऊन देशवासियांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण का करायचे ? असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केलाय.

नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही

पुणे-.आम्ही जिवाचं रान करून आज हा पक्ष आज जो झालेला आहे, तो आमच्या ताकदीनं, मेहनतीनं आणि आमचा खारीचा वाटा होता म्हणून झालेला आहे. यांचं काय योगदान आहे पक्षामध्ये? कितीवेळा हे तुरूंगात गेले? कितीवेळा दगड खाल्ले? आम्ही सायकलवर फिरलो. हमालासारखं फिरलो. कित्येक वर्ष तुरूंगात काढली. त्या हालअपेष्टांना पक्षामध्ये काही किंमत आहे की नाही? यांच्या सामाजिक समीकरणामध्ये पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे बसत नव्हते का? जुन्या माणसांचा जेवढा जनाधार आज आहे, तेवढा नवीन माणसांचा जनाधार आहे का? वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना डावलून तुम्ही अशा पद्धतीनं उपरे अंगावर घेत असाल, जे आम्हाला शिव्या घालतात. जे मोदींना शिव्या घालतात, अशांना घेतल्याचं वाईट वाटतं. विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले. विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही,” असा घणाघाती हल्ला एकनाथ खडसे यांनी भाजपा राज्यातील नेत्यांवर केला

मी सदस्य असलेल्या राज्याच्या काेअर कमिटीने माझ्यासह पंकजा मुंडे आणि बावनकुळेंच्या नावाची विधान परिषदेसाठी शिफारस केली. परंतु, हे नाटक हाेते. सरळ फसवणूक असल्याची बाब आता लक्षात आली आहे. मला उमेदवारी नसल्याचा निराेप रात्री ११ वाजता मिळाला. परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता विधान भवनात हाेते. त्यांनी उमेदवारी अर्जाची तयारी, स्टॅम्प आणि एनआेसीची कागदपत्रे ही मार्च महिन्यात तयार केलेली हाेती.हे सर्व पूर्वनियाेजित असल्याचे स्पष्ट हाेत असल्याचे पक्षाने माझ्यासाेबत दगाफटका केला आहे. पक्षात वारंवार खच्चीकरण करणे, कट-कारस्थाने रचून मला पक्षाबाहेर ढकलण्याचे प्रयत्न पक्षातील काही लाेक जाणीवपूर्वक करीत आहेत. संघटनेत पूर्वीसारखी स्थिती नाही, पक्षात लाेकशाही उरलेली नाही. राज्यात पक्ष विशिष्ट मूठभर लाेकांच्या हाती एकवटला आहे, असा खळबळजनक आराेप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलामंगळवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले.

हे सर्व पूर्वनियाेजित असल्याचे स्पष्ट हाेत असल्याचे पक्षाने माझ्यासाेबत दगाफटका केला आहे. पक्षात वारंवार खच्चीकरण करणे, कट-कारस्थाने रचून मला पक्षाबाहेर ढकलण्याचे प्रयत्न पक्षातील काही लाेक जाणीवपूर्वक करीत आहेत. संघटनेत पूर्वीसारखी स्थिती नाही, पक्षात लाेकशाही उरलेली नाही. राज्यात पक्ष विशिष्ट मूठभर लाेकांच्या हाती एकवटला आहे, असा खळबळजनक आराेप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बेधडकपणे काही बाबी मांडल्या. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील स्वत: सुरक्षित मतदारसंघ देऊन निवडून आणणाऱ्या मेधा कुलकर्णींना संधी न मिळणे याेग्य नाही. विधान परिषदेसाठी पंकजा, मी आणि बावनकुळे यांची शिफारस केंद्रीय समितीकडे केली असल्याचा दावा चंद्रकांत पाटील करीत आहेत. मग पडळकरांसह अन्य चाैघांनी उमेदवारी अर्जासाठी लागणारे स्टॅम्पपेपर, विविध कार्यालयांच्या एनआेसी मार्च महिन्यातच कशा तयार करून ठेवल्या? ही निष्ठावंतांची शुद्ध फसवणूक आहे.

यासंदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांना फाेन केला हाेता. परंतु ते फाेनवर आलेच नाहीत. त्यांना आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी याबाबत विचारणा करणार आहे. मी विराेधी पक्षनेता असताना एकट्याच्या बळावर राज्यात सत्ता आणली हाेती. परंतु, त्यानंतर प्रमुख स्पर्धक असल्याने माझ्यावर नकाे ते आराेप करीत, षडयंत्र रचून मला बाहेर काढले. विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवारी मिळू दिली नाही. घरात वाद निर्माण करण्यासाठी मुलीला उमेदवारी दिली आणि तिचा पराभव करण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न केले. पक्षातील विराेधक अजूनही शांत नाहीत. मी पक्षाच्या बाहेर कसा जाईल, याचेच प्रयत्न ते करीत आहेत. या विधानसभा निवडणुकीत मूठभरांमुळे पक्षाची सत्ता गेली. विराेधी पक्षात बसावे लागले. असेच चालत राहिले तर १०५ चे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही, ही बाब मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहे.

दाेन वेळा आॅफर : विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फाॅर्म माझ्याकडे पडून हाेता. परंतु, मी ज्या पक्षात आयुष्याची ४० वर्षे वेचली ताे पक्ष न साेडण्याचा निर्णय घेतला. परवा विधान परिषदेसाठी पक्षाने डावलल्यानंतर काँग्रेसने सहाव्या जागेसाठी आॅफर दिली. पक्षात माझ्यावर अन्याय हाेत आहे, हे पाहत असलेल्या ६ ते ७ आमदारांनी फाेन करून मला मतदान करण्याची तयारी दर्शविली, परंतु तरीदेखील मी ही आॅफर नाकारली. मी पक्षात राहण्याचे प्रयत्न करीत असताना काही लाेक मला पक्षाच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आराेप माजी मंत्री खडसेंनी केला

भाजपा सामाजिक समीकरणाच्या मांडणीविषयी बोलताना खडसे म्हणाले, “नव्यानं मांडणी करत असताना प्रामाणिकपणे मांडणी करावी. हा पक्ष ज्यावेळी पाहत होतो, त्यावेळी आणिबाणीचा कालखंड होता. जनता पार्टीचा कालखंड होता. त्यानंतर स्वतः मी कार्यरत होतो. तेव्हा या पक्षाची ओळख जी होती, ती मारवाडी, ब्राह्मण अशा पक्षाची ओळख होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, मी असेल, भाऊसाहेब फुंडकर असतील, या सर्वांनी मिळून या पक्षाला बहुजनांचा चेहरा दिला. तोपर्यंत बहुजनांचा चेहरा नव्हता. इथे कुणी यायला तयार नव्हतं. ओबीसींच्या संघटना तयार झाल्या. ओबीसींचे नेते तयार झाले. वर्षानुवर्षे ज्यांनी पक्षाला बळ दिलं. चेहरा बदलवला. तो चेहरा बदलवणं आता आम्हाला सांगता आहात का?,” असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

 

पुणे विभागातील 1 हजार 359 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-प्रत्यक्षात एक्टीव्ह रूग्ण संख्या 1986

पुणे विभागात  आजवरचे एकूण कोरोना बाधित 3 हजार 532 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.12  : पुणे विभागात गेल्या दोन महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 हजार 532 वरून 1 हजार 986 पर्यंत कमी झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रूग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्या रूग्णांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच आता पर्यंत 1 हजार 237 रूग्ण बरे होऊन आपल्या घरी देखील परतले आहेत. दरम्यान मंगळवार (दि.12) रोजी एका दिवसांत 167 नवीन रूग्णांची भर पडली असून, तर 12 रूग्णांचा मृत्यू झाला.

पुणे विभागातील 1 हजार 359 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 532 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 986 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 187 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 128 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 80 बाधीत रुग्ण असून 1 हजार 240 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 675 आहे. कोरोनाबाधित एकूण 165 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 119 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयातील 121 कोरोना बाधीत रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 84 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 275 कोरोना बाधीत रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 210 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 38 कोरोना बाधीत रुग्ण असून 28 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 36 हजार 218 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 33 हजार 591 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 626 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 30 हजार नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 532 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 96 लाख 11 हजार 214 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 15 लाख 86 हजार 99 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 327 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण :
दि.10.05.2020 रोजी परदेशातून एकूण 202 व्यक्तीचे विभागामध्ये आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.
परप्रांतीय व्यक्तीसाठी रेल्वेची सुविधा : –
दि. 12.05.2020 रोजी दु. 4.00 वा. पर्यंत पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी – 5, उत्तरप्रदेशासाठी – 2, उत्तराखंडासाठी -1, तमिळनाडूसाठी -1 व राजस्थानसाठी-1 अशा एकूण 10 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून 11 हजार 329 प्रवासी रवाना करणत आलेले आहेत. तसेच दि.12.05.2020 रोजी सायं 5.00 वा. सातारा येथून रेवा (म.प्र.) येथे 1 हजार 450 प्रवाशांसाठी तसेच सायंकाळी 6 वा. कोल्हापूर येथून नागोर (राजस्थान) येथे 1 हजार 460 प्रवाशांसाठी रेल्वे गाडया रवाना होत आहेत.
0000

पुण्यातून 9 हजार लोक आपापल्या गावी रवाना

पुणे : लॉकडाऊनच्या कालावधी वाढविल्यानंतर शासनाने अडकलेल्या कामगारांना परत त्यांच्या गावी पाठविण्यास मंजूरी दिल्यानंतर ९ मेपासून आतापर्यंत पुणे शहरातून तब्बल ६ हजार ९९० कामगार मुळ गावी रवाना झाले आहेत. तर पुणे शहरातील विद्यार्थी, कामगार व इतर अशा २ हजार ६२० नागरिकांना खासगी वाहनाने राज्याच्या विविध जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहेत.

कामगाराची नोंदणी करण्यास ३ मेपासून शहरातील पोलीस ठाण्यात सुरुवात करण्यात आली आहे. ५ मे पासून खासगी बसने या कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यास सुरुवात झाली. ९ मेपासून पुणे रेल्वे स्टेशनवरुन रेल्वेगाड्याद्वारे कामगारांची पाठवणी सुरु झाली. लखनौला ११३१, प्रयागराज येथे १२००, हरिद्वार येथे १४४, जबलपूर येथे १४५६ नागरिकांची रवानगी करण्यात आली. जोधपूर येथे १४०० कामगार रेल्वेने गेले. अशाप्रकारे गेल्या ४ दिवसात ५ हजार ३३१ कामगार, नागरिक व त्यांची मुले पुण्यातून गावी पाठविण्यात आले आहे़त.या सर्व परप्रांतीयांची नोंदणी करणे, त्यांच्या याद्या करणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करवून घेणे़ तसेच त्यांच्याशी संपर्क साधून रेल्वेगाडीच्या अगोदर त्यांना शहरातील विविध भागातून पीएमपी बसने फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करुन पुणे रेल्वे स्टेशनला आणण्याचे काम शहर पोलीसदलाने केले़. याबरोबर शहराच्या विविध भागातून खासगी ट्रॅव्हल्स व खासगी वाहनातून आतापर्यंत १ हजार ६५९ परप्रातीयांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे.
या परप्रांतीयांना प्रवासाचे वेळी सुरक्षित अंतर ठेवून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर, मास्क, साबण वगैरे देण्यात आले.. तसेचप्रवासात लागणाऱ्या खाण्याची व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेगाड्यांमधून जाणाऱ्या प्रवाशांना फुड पॅकेट, पाणी बॉटल, तसेच दुध, गुळ ढेप वाटप करण्यात आले. या नागरिकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी मदत करुन मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करुन दिली.

पोलीस आयुक्त डॉ. के़. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे,नोडल अधिकारी उपायुक्त सारंग आवाड, तसेच पुणे शहरातील पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त व सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्याने ही कामगिरी पार पाडली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत रंगला मंगल परिणय सोहळा

पुणे-
लॉकडाउनमुळे अनेकांना विवाहाचा मुहूर्त बदलावा वा पुढे ढकलावा लागला आहे. तसेच, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन पुन्हा पुढे ढकलले गेले तर या भीतीने लग्नासाठी बघितलेल्या सर्व स्वप्नांना मुरड घालत काहींनी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
गुलटेकडी येथील प्रशांत सलगर आणि मार्केटयार्डमधील रेखा सोनटक्के हे जोडपेही यातलेच एक. त्यांनी रविवारी साध्या पद्धतीने सप्तपदी घेतल्या. यांच्या लग्नासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती.
गुलटेकडी डायस प्लॉट भागात राहणारा प्रशांत सलगर आणि मार्केटयार्ड प्रेमनगर वसाहत येथील रेखा सोनटक्के यांचा साखरपुडा जानेवारी महिन्यात झाला आणि त्यांचा विवाह एप्रिलमध्ये करण्याचे ठरले होते. मात्र, लॉकडाउन वाढल्याने हा सोहळा दोनदा पुढे ढकलण्यात आला. विवाह होणार की नाही अशा चिंतेत असलेल्या कुटुंबाचा प्रश्न भाजप झोपडपट्टी आघाडीचे गणेश शेरला व गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने सोडवण्यात आला.
ना वरात, ना कसला गाजावाजा फक्त वरा कडील मोठा भाऊ व वधू कडील आई आणि आमदार पाटील, माजी  सभागृह नेते नगरसेवक श्रीनाथ भिमाले, भाजप झोपडपट्टी आघाडीचे शेरला, बुद्ध विहाराचे अध्यक्ष गणेश चव्हाण, सचिन खंडाळे, अमोल खंडाळे, भन्ते सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत सातारा रस्ता येथील तक्षशिला बौद्ध विहारात हा विवाह सोहळा संपन्न झाला.
या वेळी शेरला म्हणाले, प्रशांत सलगर गुलटेकडी डायस प्लॉट झोपडपट्टीत राहत असून लग्न समारंभात डेकोरेशनची कामे करतो. सलगर यांनी विवाह बाबत अडचण सांगितली. त्याप्रमाणे या विवाहाची जबाबदारी घेऊन ती पार पाडण्यात आली. तसेच, प्रशांत सलगर म्हणाले, लॉकडाउन दोन वेळा पुढे ढकलले गेल्याने दोन्ही कुटुंबातील घरची मंडळी चिंताग्रस्त झाली होती. मात्र, गणेश शेरला यांच्या प्रयत्नातून हे लग्न पार पडले.

नॉन कंटेंमेन्ट झोन मध्ये आणखी दुकाने 12 तास खुली ठेवण्यास परवानगी

पुणे- कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी एका आदेशान्वये कळविले आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाची 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. केवळ दवाखाने सुरू ठेवण्यास सांगितले आहे.

तर, ज्या भागांत कोरोना चा जास्त प्रभाव नाही अशा ठिकाणी12 तास दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी कोणती दुकाने सुरू करावीत याबाबत आतयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

दुकाने सुरू करताना फिजिकली डिस्टन्स ,मास्क,इत्यादी सूचनांचे पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.

इस्त्री, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणारे कच्चा मालाचा पुरवठा करणारे व्यवसाय, वाहन दुरुस्ती, फर्निचर विक्री, गृह उपयोगी सामुग्री, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री या दुकानांना आणखी काही दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

ही दुकाने सुरु करण्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी 12 तासांची वेळ ठरवून देण्यात आली आहे. या दुकानातील कामगार आणि दुकानमालक हे कोरोना नसलेल्या क्षेत्रातील असावे. दुकानांत काम करताना सुरक्षित अंतर ठेवावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायजरचा वापर करणे आवश्यक आहे. अशा अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक दिवशी सुरू राहणाऱ्या व्यवसायांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

  • सोमवार – इस्त्री व लॉन्ड्री दुकान, स्टेशनरी दुकाने, वैद्यकीय साहित्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने.
  • मंगळवार- वाहन दुरूस्तीचे साहित्य, गृहपयोगी सामग्री, तयार फर्निचरची विक्री.
  • बुधवार – इस्त्री व लॉन्ड्री दुकाने, फूटवेअर, स्टेशनरी तसेच वैद्यकीय साहित्यसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने.
  • गुरूवार – वाहन दुरूस्तीची साहित्य विक्री करणारी दुकाने. गृहपयोगी सामग्री, स्टेशनरी, तयार फर्निचरची दुकाने.
  • शुक्रवार – इस्त्री व लॉन्ड्रीची दुकाने, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने, वैद्यकीय साहित्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणारी दुकाने.
  • शनिवार – वाहन दुरस्तीचे साहित्य विक्री करणारी दुकाने, गृहपायेगी सामग्री, इस्त्री व लॉन्ड्री तसेच बांधकाम साहित्याची दुकाने, तयार फर्निचरची दुकाने.
  • रविवार – वाहन दुरूस्तीचे साहित्य विक्री करणारी दुकाने,गृहपायोगी सामग्री, स्टेशनरी, फूटवेअर, बांधकार साहित्याची विक्री