Home Blog Page 2589

महापालिकेचे २२ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

पुणे : महापालिका कोरोनासोबत   सामना करत असतानाच पालिकेचेच २२ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. यामध्ये पालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या रुग्णांपैकी ८ रुग्ण बरे झाले असून चार जणांचा मात्र मृत्यू झाला आहे. उर्वरीत दहा जणांवर उपचार सुरु आहेत.
शहरातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढ    लेला आहे. पालिकेच्या जवळपास सर्वच विभागातील कर्मचारी कोरोनाशी दोन हात करीत आहेत. पालिकेची यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. नागरिकांचे प्रबोधन, जनजागृती, उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह बरीच कामे पालिकेला करावी लागत आहेत.कंटेन्मेंट आणि नॉन कंटेन्मेंट झोनमधील स्वच्छतेसह अन्य आवश्यक आणि अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी पालिकेचे कर्मचारी अधिकारी नेमण्यात आलेले आहेत.
ज्या भागात कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत अशा भागात काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आजवर एकूण २२ जणांना लागण झाली असून यामध्ये स्वच्छता कर्मचारी, आया, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी, लिपिक, फिटर, बिगारी, आरोग्य निरीक्षक, वाहनचालक, कंत्राटी चालक, अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत या आजारातून आठ जण बरे होऊन घरी गेले असून अन्य चौघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर, उर्वरीत दहाजण उपचार घेत आहेत.

 

केंद्रीय सशस्त्र दलाच्या 120 जणांची तुकडी पुण्यात बंदोबस्ताला येणार

पुणे- कोरोनाचा सामना करणाऱ्या शहर पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची १२० जवानांची एक तुकडी पुणे शहरात दाखल होणार आहे.असे वृत्त मान्यवर वृत्त संस्थानी दिले आहे.

या वृत्तात असे म्हटले आहे की,राज्यात कोरोनामुळे पोलिस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (CAPF) वीस पथकांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या ३२ पथके कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलिस दल कार्य करत आहे. मात्र, पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनादेखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची २० पथके मिळावीत, अशी मागणी केली आहे.

पोलिसांच्या मदतीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय सशस्त्र दलाच्या २० तुकड्यांची मागणी केंद्राकडे केली आहे. त्या तुकड्या राज्यात दाखल झाल्यानंतर मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र दलाच्या १२० जवानांची तुकडी पुणे शहराला मिळणार आहे. शहरात ६९ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी पुणे पोलिसांना ही तुकडी बंदोबस्तासाठी सहाय्य करेल, अशी माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन काळात पोलिस दल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तात अडकलेले आहे़. तर राज्यात सुमारे एक हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे़. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलिसांना क्वारंटाईन करावे लागले आहे. तसेच ५५ वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून रजा देण्यात आली आहे़. त्यामुळे उरलेल्या पोलिस दलावर बंदोबस्ताचा मोठा ताण आला आहे.

सरकारने ताबड़तोब देवस्थानांचे सोने कर्जाने ताब्यात घ्यावे

0

मुंबई -केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशवासीयांना संबोधित केले. यावेळी, आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार आहेत. मोदींच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, मी यापूर्वीच बोललो होतो, देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे चव्हाण यांनी म्हटले.

चव्हाण यांनी ट्विट करुन देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी एक उपायही सूचवला आहे.

देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. ही समाधानाची बाब आहे, आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा, असे ट्विट चव्हाण यांनी केले होते. त्यासोबत, त्यांनी यापूर्वीच मागणी केलेल्या वृत्ताचे वर्तमानपत्रातील कात्रणही शेअर केले. त्यानंतर, चव्हाण यांनी आणखी एक ट्विट करुन केंद्र सरकारला अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी पर्याय सूचवला आहे.

पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉरंटाईन सेंटरची भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहाणी

पुणे –

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील कॉरंटाईन सेंटरची भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहाणी केली. यावेळी कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींच्या देखभालीसाठी तैनात वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

पुण्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये संशयित रुग्णांना इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या केंद्राला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देऊन येथील सुविधांचा आढावा घेतला.

सध्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी कर्मचारी सर्वस्व अर्पण करून काम करत असल्याने सर्वांचे आभार मानले. तसेच, डॉक्टर आणि सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे व्यक्तिश: आभार मानले. तसेच पोलिसांनाही धन्यवाद दिले.

यावेळी श्री. पाटील यांच्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक दीपक पोटे आणि महापालिका उपायुक्त डॉ. राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.

नको म्हणत असताना मुलीला जबरदस्तीने तिकीट दिले, उपकार नाही केले-खडसे

मुंबई : भाजपकडून माझ्या घरात फक्त मला आणि माझ्या सुनेलाच उमेदवारी दिली आहे. भाजपने विधानसभेला माझ्या मुलीला दिलेली उमेदवारी मी मागितलेली नव्हती. वारंवार सांगितलं मुलीला तिकीट देऊ नका. यांनी मुलीला जबदस्तीने तिकीट दिलं, म्हणजे उपकार केले नाहीत. पक्षाने आम्हाला दिलं हे मान्यच आहे, पण पक्षासाठी आम्ही काहीच केलं नाही का? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विचारला. सोबतच चंद्रकांत पाटील यांचं भाजपमध्ये शून्य योगदान आहे. त्यांचं मोठं योगदान विद्यार्थी परिषदेत आहे. तरीही त्यांना भाजपने स्वीकारलंच ना, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

“नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत.

त्यांनी भाजपला मोठं करण्यात योगदान आहेत. मात्र अनेकांनी काही अपेक्षा न करता काम केलं. तसं नाथाभाऊंना पक्षाकडून खूप काही मिळालं आहे. अनेकांची तिकीटं कापून त्यांनी स्वत:च्या घरात नेली त्यावेळी त्यांनी खंजीर खुपसला नाही का?” असं चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. त्यावर एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं.

…तरीही भाजपने चंद्रकांत दादांना स्वीकारलंच ना!
एकनाथ खडसे म्हणाले की, “एकासाठी एक निकष आणि दुसऱ्यासाठी दुसरा हे मला पटत नाही. चंद्रकांत पाटलांचा आदर करतो. त्यांनाच विचारायचं आहे की, उभा महाराष्ट्र पिंजून काढला, तळागाळात पोहोचलो, आंदोलनं केली. 40 वर्ष पक्षात काम करत होतो, तेव्हा चंद्रकांतदादा भाजपमध्ये होते का? ते विद्यार्थी परिषदेत होते. तरीही विद्यार्थी परिषद ही परिवारातली संघटना आहे म्हणून अध्यक्ष म्हणून मान्यता मिळाली की नाही? त्यांचं भाजपमध्ये शून्य योगदान आहे. त्यांचं मोठं योगदान विद्यार्थी परिषदेत आहे. तरीही त्यांना भाजपने स्वीकारलंच ना.”

शिव्याशाप देणारे आमदारकीसाठी पात्र
गोपीचंद पडळकर यांना कोणत्या मेरिटवर उमेदवारी दिली असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. “राज्यसभेसाठी माझ्यासाठी शिफारस केली होती. त्यावेळी तिकीट मिळालं नाही तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेसाठी तिकीट देण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी मी तिकीट मागितलं नव्हतं. पक्षाने मला अनेक पदं दिली त्याचं समाधान आहे. परंतु पडळकरांना कोणत्या मेरिटवर तिकीट दिलं? भाजपला शिव्याशाप देणारे आमदारकीसाठी पात्र समजले जातात. मोहिते पाटलांचं आय़ुष्य राष्ट्रवादीत गेलं. मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापलं, विधानपरिषदेचं तिकीट कापलं.”

पुणे विभागात कोरोना चे ॲक्टीव रुग्ण 2 हजार 43

पुणे विभागातील 1 हजार 503 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 3 हजार 742 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.12 :- पुणे विभागातील 1 हजार 503 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 742 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 43 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 128 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 258 बाधीत रुग्ण असून 1 हजार 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 730 आहे. कोरोनाबाधित एकूण 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 117 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयातील 123 कोरोना बाधीत रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 86 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 299 कोरोना बाधीत रुग्ण असून 72 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 208 आहे. कोरोनाबाधित एकूण 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 41 कोरोना बाधीत रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 21 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 37 हजार 381 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 35 हजार 142 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 239 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 31 हजार 367 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 742 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 99 लाख 13 हजार 60 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 28 लाख 80 हजार 229 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 452 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
0000

जम्मू काश्मीरसाठी ८० जण रवाना- जिल्हाधिकारी राम

पुणे, दि.१३- पुणे येथे शिकणारे जम्मू-काश्मीरचे ६५ विद्यार्थी व १५ नागरिकांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
तेथून हे सर्व ८० जण जम्मू काश्मीरला रेल्वेने जातील. लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी यांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्याचा
शासनाने निर्णय घेतला.
त्यानुसार पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी नीता शिंदे आणि समन्वय सहायक विवेक जाधव यांनी नियोजन केले. या नागरिकांकडून हमीपत्र भरून घेणे, आरोग्य तपासणी करणे याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आली. तीनही बस रवाना करण्यापूर्वी
फूड पॅकेट, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिगचे पालन,
मास्कचा वापर या सर्व बाबींचा अवलंब करण्याच्या सर्व प्रवाशांना सूचना देण्यात आल्या होत्या.

उद्योगासाठी कामगारांची पर जिल्ह्यातून ने- आण करता येणार नाही- डॉ. म्हैसेकर (व्हिडिओ)

0

उद्योजक व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला संवाद

पुणे दि. १३ :कामगारांचे स्थलांतर होत असून अशा परिस्थितीत उद्योग सुरु राहण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देवून या मनुष्यबळाचा वापर करुन घेण्याबाबत उद्योजकांनी विचार करावा, असे आवाहन करत. उद्योगासाठी कामगारांची पर जिल्ह्यातून ने- आण करता येणार नाही. याबाबत शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हयातील उद्योजक व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्हीडीओ कॉन्फरन्स व्दारे संवाद साधला.

यावेळी औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, संजीव देशमुख, उद्योग विभागाचे सहसंचालक श्री. सुरवसे उपस्थित होते. यावेळी ४०० हून अधिक असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक व्हीडीओ कॉन्फरन्स व्दारे बैठकीमध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी उद्योग क्षेत्राला येणाऱ्या अडचणींबाबत ‍ माहिती देवून विविध सूचना केल्या.

यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, उद्योग धंद्याबाबत शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय झाल्यावर प्रशासन आदेश जारी करेल. पुणे, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील काही कन्टेन्मेंट क्षेत्रातून कामगारांची व आवश्यक मालाची ने- आण करता येणार नाही.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही भाग प्रतिबंधित क्षेत्र असल्याने या भागात सध्या उद्योग सूरु करता येणार नाहीत. तसेच संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत हालचाल करता येणार नाही. परंतु 17 तारखेनंतर येथे उद्योग सुरू करण्याबाबत राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय झाल्यानंतर याबाबत विचार केला जाईल.

कामगारांचे स्थलांतर होत असून अशा परिस्थितीत उद्योग सुरु राहण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देवून या मनुष्यबळाचा वापर करुन घेण्याबाबत उद्योजकांनी विचार करावा, असे आवाहन डॉ.म्हैसेकर यांनी केले. उद्योगासाठी कामगारांची पर जिल्ह्यातून ने- आण करता येणार नाही. याबाबत शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.

उद्योग समुहाने कोरोना कालावधीत सोशल डिस्टनसिंग ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे, हातांची स्वच्छता राखणे आदी खबरदारी घेवून उद्योग क्षेत्रातील कामे सुरु ठेवावीत, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोरोनाचे आज १४९५ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण २५ हजार ९२२

0

मुंबई, दि. १३ : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. आज १४९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४२२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५५४७ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३० हजार ८५७ नमुन्यांपैकी २ लाख ०३ हजार ४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २५ हजार ९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ९७५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २,  औरंगाबाद शहरात २, वसई विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २१ महिला आहेत.

आज झालेल्या ५४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहेत. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १५,७४७ (५९६)

ठाणे: १५७ (३)

ठाणे मनपा: ११२२ (११)

नवी मुंबई मनपा: १०१८ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: ४१२ (३)

उल्हासनगर मनपा: ७२

भिवंडी निजामपूर मनपा: ३९ (२)

मीरा भाईंदर मनपा: २४५ (२)

पालघर: ४० (२)

वसई विरार मनपा: २८६ (११)

रायगड: १५८ (२)

पनवेल मनपा: १५० (८)

ठाणे मंडळ एकूण: १९,४४६ (६४४)

नाशिक: ८८

नाशिक मनपा: ४६

मालेगाव मनपा:  ६१७ (३४)

अहमदनगर: ५४ (३)

अहमदनगर मनपा: १०

धुळे: ९ (३)

धुळे मनपा: ६२ (३)

जळगाव: १६२ (१७)

जळगाव मनपा: ४४ (९)

नंदूरबार: २२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १११४ (७१)

पुणे: १८० (५)

पुणे मनपा: २८३० (१६१)

पिंपरी चिंचवड मनपा: १५१ (४)

सोलापूर: ९

सोलापूर मनपा: ३११ (२१)

सातारा: १२५ (२)

पुणे मंडळ एकूण: ३६०६ (१९३)

कोल्हापूर: १६ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३५

सांगली मिरज कुपवाड मनपा: ६ (१)

सिंधुदुर्ग: ७

रत्नागिरी: ६० (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: १३० (५)

औरंगाबाद:९४

औरंगाबाद मनपा: ५८६ (१७)

जालना: १६

हिंगोली: ६१

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ७५९ (१८)

लातूर: ३२ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ४

बीड: १

नांदेड: ५

नांदेड मनपा: ५२ (४)

लातूर मंडळ एकूण: ९४ (५)

अकोला: १८ (१)

अकोला मनपा: १७४ (११)

अमरावती: ५ (२)

अमरावती मनपा: ८४ (११)

यवतमाळ: ९९

बुलढाणा: २५ (१)

वाशिम: ३

अकोला मंडळ एकूण: ४०८ (२६)

नागपूर: २

नागपूर मनपा: ३१५ (२)

वर्धा: १ (१)

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ३२४ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण:  २५ हजार ९२२  (९७५)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २२० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १४३९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १३ हजार ८०३ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ५७.६५  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध सुविधा

0

मुंबई, दि.१३ : कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढणाऱ्या पोलीस दलातील योद्ध्यांसाठी गृह विभागामार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी गृह विभागामार्फत घेण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यातील पोलीस दल कोरोना विरुद्धच्या या युद्धात २४ तास कार्यरत आहे. कार्यक्षमतेच्या दुपटीने पोलिसांना काम करावे लागत आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्या आरोग्यावर तसेच कुटुंबियाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. राज्यातील जवळपास नऊशे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या सर्वांच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाने पोलिसांसाठी विविध सुविधा दिल्या आहेत. यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश आहे.

Covid-19 हेल्पलाईन

राज्यातील पोलिसांना विविध कोविड रुग्णालयांमध्ये तातडीने उपचार मिळावेत, याकरिता एक कोविड हेल्पलाइन पूर्ण राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. या या हेल्पलाईनद्वारे तज्ज्ञांकडून समुपदेशन व मार्गदर्शन केले जाते. अशाच प्रकारचे कक्ष मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत देखील मुंबई पोलिसांसाठी तयार केले आहेत. दहा अपर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात दहा कोविड कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याद्वारे पोलिसांसाठी राखीव असलेल्या रुग्णालयातील रिक्त बेडची संख्या, तसेच इतर अनुषंगिक माहितीही दिली जाते.

साधन सामुग्री

राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आतापर्यंत जवळपास ७.५ लाख विविध प्रकारचे  मास्क १५ हजार लिटर सॅनिटायझर, २२ हजार फेस शिल्ड, ४४ हॅन्ड ग्लोव्हज्, ड्रोन कॅमेरा अशा आवश्यक असलेल्या जवळपास चार कोटी रुपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे.

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलिसांसाठी देखील जवळपास २.५ कोटी रुपयांच्या अशाच आवश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत. विविध वित्तीय संस्था, कंपन्या सामाजिक संस्था, यांच्याकडूनही देणगी स्वरूपात अशा वस्तू मिळाल्या आहेत. याखेरीज बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी अल्पोपहार व मिनरल वॉटरची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

खरेदीचे अधिकार

पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वस्तूंची कमतरता पडू नये, याकरिता  कोविड 19 प्रतिबंधात्मक आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदी करीता पोलीस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले आहेत. असे अधिकार मुंबई पोलीस आयुक्तालयालाही देण्यात आले आहेत. जवळपास १३७ कोटी रुपयांचा निधी, पोलीस कल्याण निधीतून मंजूर करण्यात आला. तसेच प्रत्येक अपर आयुक्तालय क्षेत्रासाठी १० कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. आवश्यकता भासल्यास यातून सर्व खरेदी करण्यात येईल.

प्रतिबंधात्मक औषधे

पोलीस बांधवांना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी, त्यांची प्रतिबंधात्मक शक्ती वाढावी तसेच शारीरिक क्षमता टिकून राहावी यासाठी  विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप देखील करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने होमिओपॅथी औषधी. तसेच vitamin C, D, Multivitamin या गोळ्यांचे वाटप घटक स्तरावर करण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातही अशाच प्रकारच्या १० कोटी रुपयांच्या प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात येत आहे.

कोविड अग्रीम

कोविड बाधित पोलिसांना पोलीस कल्याण निधीतून एक लाख रुपचांचा अग्रीम देण्यात येत आहे. आतापर्यंत तीन कोटी रुपयांचा अग्रीम मंजूर करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातही अशाच प्रकारचे अग्रीम वाटप करण्यात आले आहे.

शासकीय अनुदान

कोविड संदर्भात साधनसामुग्री घेण्याकरिता राज्यात पोलीस विभागाला ९ कोटी रुपयांचे अनुदान कार्यालयीन खर्चापोटी देण्यात आले. तर मुंबई पोलीस आयुक्तालयातही आतापर्यंत १ कोटी ४५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.

रोकड विरहित उपचार

महाराष्ट्र पोलीस कुटुंब योजनेअंतर्गत कोविड 19 उपचार राज्यातील नामांकित रूग्णालयात करण्यात येत आहेत. कोविड बाधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बाबत घटक प्रमुखांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत याकडेही लक्ष आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाशी देखील संवाद साधला जात आहे. कोविड 19 कक्षाच्या माध्यमातून राज्यात व मुंबई पोलीस आयुक्तालयात  पोलिसांची काळजी घेतली जाते.

कर्तव्यात सूट

५० वर्षाच्या वरील पोलीस कर्मचाऱ्यांना जनतेशी संपर्क येईल अशी कोणतीही कामे दिली जात नाहीत. तसेच ५५ वर्षावरील पोलिसांना रजा घेण्याची परवानगी देखील देण्यात आलेली आहे.

वारसांना नुकसान भरपाई

कर्तव्य बजावत असताना कोविड बाधा होऊन दुर्दैवाने पोलीस कर्मचारी मृत्यूपावल्यास त्यांच्या कुटुंबाप्रती विभागास सहानुभूती आहेच. मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत आतापर्यंत १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस फाऊंडेशन मार्फत १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. राज्यातही हुतात्मा निधी मार्फत १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान कुटुंबियांना देण्यात येते.

प्रशंसापात्र रक्कम

मुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत पोलिसांना कर्तव्यावर असताना कोरोना बाधा झाली, तर त्यास १० हजार रुपये प्रशंसापात्र रक्कम देण्यात येत आहे. आयुक्तालयामार्फत आतापर्यंत २५ लाख ८० हजार रुपये थेट पोलिसांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

ताप तपासणी केंद्र (Fever checking center)

कोविड संदर्भात काही लक्षणे दिसल्यास अथवा शंका आल्यास मुंबई मध्ये महानगरपालिकेच्या सहकाऱ्याने दोन ठिकाणी ताप तपासणी केंद्र देखील सुरू केली आहेत. या ठिकाणी पोलीस व त्यांचे कुटुंब येऊन तपासणी करू शकतात. आतापर्यंत ११०८ व्यक्तींची तपासणी या केंद्रात झाली आहे.

अशाप्रकारे विविध सुविधा सोयी देऊन पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न गृह विभागामार्फत, शासनामार्फत होत आहे. नागरिकांनीदेखील पोलिसांना योग्य ते सहकार्य करून कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग द्यावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे.

राज्यात ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

0

मुंबई, दि. 13 : राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे मे महिन्यात घेणे बंधनकारक असलेली ग्रामसभा यंदा होऊ शकणार नाही. यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनास तसे निर्देश देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, ग्रामपंचायतींच्या कामकाजात लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने गावांमध्ये ग्रामसभा घेतल्या जातात. प्रत्येक वित्तीय वर्षात किमान ४ ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. या ग्रामसभा न घेतल्यास सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. तथापी, राज्यात सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या काळात सर्व प्रकारचे मेळावे, कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली असून लोकांना अधिक संख्येने एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गावांमध्ये ग्रामसभांचे आयोजन केल्यास होणाऱ्या गर्दीची स्थिती लक्षात घेता ती टाळण्यासाठी राज्यात ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात बंधनकारक असलेल्या ग्रामसभेचे यंदा आयोजन करण्यात येऊ नये. तसेच पुढील आदेश होईपर्यंत इतर कोणत्याही ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन मंत्री श्री.मुश्रीफ यांनी केले.

९४ वर्षाच्या आजींची कोरोनावर यशस्वी मात

0

शुभेच्छा देत आजीला मिळाला मिरज कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज

सांगली, दि.१३ : कामेरी येथील ९४ वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मिरज कोरोना रुग्णालयातुन करोनामुक्त ९४ वर्षीय आजीला डिस्चार्ज दिला आहे. यावेळी डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवत शुभेच्छा देत डिस्चार्ज देण्यात आला.

सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ९४ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. या महिलेवर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफकडून योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. त्यांची काळजी घेण्यात आली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे ९४ वर्षे कोरोनामुक्त झाल्या. आयसोलेशन कक्षात दाखल केल्यापासून १४ दिवसानंतर आजींची स्वाब टेस्ट घेण्यात आली. दोन टेस्ट मध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या महिलेस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा मिरजेतील कोरोनाच्या रुग्णालयात दोन वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावरही यशस्वी उपचार करून त्यालाही कोरोनामुक्त करण्यात आले आहे.

सर्वच रुग्णांना या हॉस्पिटलचे डॉक्टर्स व सर्व स्टाफ अत्यंत चांगल्या प्रकारे व गुणवत्तापूर्ण सेवा देतात. रुग्ण हा केंद्रबिंदू समजून सेवा दिली जाते. जिल्हा प्रशासन व कोविड हॉस्पिटल यांच्यात अत्यंत चांगला समन्वय आहे.

अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज हे कोविड-19 हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले असून या हॉस्पिटलने आतापर्यंत अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. या ठिकाणी अत्यंत नेटके नियोजन आहे. ९४ वर्षाच्या आजीबाईंना या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफने अत्यंत भक्तीभावे सेवा दिली असून आता त्यांची तब्येत स्थिर आहे. इथून पुढेही १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक गिरीगोसावी. डॉ रुपेश शिंदे, एम एस मूर्ती, वंदना शहाणे,यांच्यासह सर्व डॉक्टर,नर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.

२० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा अर्थमंत्र्यांकडून तपशीलवार उलगडा

0

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. आपल्या 30 मिनिटाच्या भाषणात त्यांनी देशा ‘आत्मनिर्भर’ म्हणजेच स्वावलंबी बनण्याचा नवा मंत्र दिला. पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज जीडीपीच्या 10 टक्के असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे पॅकेज सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी असून देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजूर तसेच कर भरणाऱ्या मध्यम वर्गासाठी आहे.

पंतप्रधानांनी त्यावेळी आपल्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यासंदर्भातील विस्तृत माहिती देतील, असे सांगितले होते. त्यानुसार पंतप्रधानांच्या या घोषणेच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेत २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा तपशीलवार उलगडा केला आहे.

सीतारमण यांनी यावेळी MSME उद्योगांना तीन लाख कोटींचे कर्ज देणार असल्याची घोषणा केली. याअंतर्गत सूक्ष्म, लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येईल. याकरिता कोणत्याही प्रकारच्या हमीची आवश्कता नसेल. जवळपास ४५ लाख MSME उद्योगांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याचीही गरज नसेल.

त्याचबरोबर सीतारमण यांनी EPFच्या बाबतीतील सरकारच्या मोठ्या निर्णयाची घोषणा केली. ज्यामध्ये १५ हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे. पगाराच्या २४ टक्के EPF सरकारकडून देण्यात येणार आहे. संकटाच्या या प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या हाती पैसे राहावेत या उद्देशाने पीएफ योगदान आहे, बारा टक्क्यांहून कमी करत पुढील तीन महिन्यांसाठी दहा टक्के करण्यात आले आहे.

ईपीएफच्या मागोमाग सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या नव्या आर्थिक पॅकेजमध्ये टीडीएस दरात कपात करण्यात आल्याचीही घोषणा करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२०-२०२१ साठी टीडीएस दरात २५ टक्क्य़ांची कपात करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

  • इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली
  • NBFC साठी ३० हजार कोटींची लिक्विडिटी योजना
  • पुढच्या तीन महिन्यांपर्यंत देणार योगदान
  • EPF मध्ये सरकार देणार २४ टक्के योगदान
  • २०० कोटींपर्यंत ग्लोबल टेंडर नाही
  • MSME ना मिळणार विनातारण कर्ज
  • सेवा क्षेत्रातील उद्योग देखील लघु उद्योगात येणार, लघु उद्योगाची व्याख्या बदलली
  • ३१ ऑक्टोबरपर्यंत कर्ज घेण्याची मुभा
  • ४ वर्षात करता येणार कर्जाची परतफेड
  • मध्यम, सूक्ष्म, कुटीर आणि लघु उद्योग मिळणार तारण विरहीत कर्ज
  • जनधन खात्यात थेट निधी पाठविण्यात आला
  • कुटीर, लघु उद्योगांसाठी पॅकेज दिले जाणार
    • स्थानिक ब्रँड्सना जागतिक बनवण्याचं लक्ष्य
    • कोरोनाच्या काळातही देशासमोर संधी असल्याचं पंतप्रधान मानतात.
    • आवास, आणि उज्ज्वला योजनांतून गरिबांना फायदा होत आहे.
    • 18000 कोटी रुपयांचा आयकर परतावा करदात्यांना आतापर्यंत दिला, 14 कोटी मध्यमवर्गीयांना त्यातून फायदा मिळाला.
    • MSME कंपन्यांसाठी करमाफीसाठी 25 कोटी रुपये,
    • 12 महिन्यांचा करहप्ता स्थगित करण्याची सोय,
    • लघु आणि कुटीर उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपयांची कर्ज योजना

    अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी 15000 कोटी रुपयांचा निधी

    • मध्यम आणि सूक्ष्म आकाराच्या आणि अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी 15000 कोटी रुपयांचा निधी तयार करणार.
    • 45 लाख उद्योजकांना याचा फायदा होईल.
    • लघु, कुटीर उद्योगांना दिलं जाणारं कर्ज 4 वर्षं मुदतीचं.
    • कर्जासाठी तारण आवश्यक नाही.
    • पहिले 12 महिने कर्जाचा हप्ता स्थगित.
    • सरकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांची व्याख्या बदलली
    • सूक्ष्म उद्योग – 1 कोटींपर्यंतची गुंतवणूक
    • लघु उद्योग – 5 कोटींची गुंतवणूक आणि 10 कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्या
    • मध्यम आकाराचे उद्योग – 10 कोटींची गुंतवणूक आणि 20 कोटींची वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्या

    टीडीएसच्या दरात 25 टक्क्यांनी कपात

    • टीडीएसच्या दरात 25 टक्क्यांनी कपात.
    • ही कपात मार्च 2021 पर्यंत लागू.
    • इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली.
    • टॅक्स ऑडिटची मुदत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढवली

    वीज कंपन्यांना 90 हजार कोटींची मदत

    • वीजबिल आकारणी थांबल्यामुळे वीज कंपन्यांचं नुकसान होतं आहे.
    • त्यासाठी सरकार 90000 कोटी रुपयांची मदत करणार.
    • बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न
    • नोंदणी आणि पूर्णत्वाचा दाखला सादर करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवण्याचा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

    जून-जुलै-ऑगस्ट महिन्यांचा EPF हप्ता केंद्रसरकार भरणार

    • 2500 कोटी रुपयांची रोखता, लवचिकता यातून येणार.
    • 3 लाख 66 हजार संस्थांना याचा फायदा मिळणार.
    • कोव्हिड-19 नंतर उद्योजकांचा माल खपावा यासाठी ट्रेड फेअर शक्य होणार नाहीत. अशावेळी ई-फेअरची सोय करून देणार
    • ज्यांना आधी लिहिलेला लाभ मिळणार नाही, अशांसाठी आता EPF चा हप्ता 12 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
    • यातून लोकांकडे जास्त पैसे खेळतील. सरकारी कर्मचाऱ्यांना ही सूट नाही. ते 12 टक्के EPF हप्ताच भरतील.
    • वित्तसंस्थांसाठी 30 हजार कोटींची रोखता योजना, या संस्थांचे इन्व्हेस्टमेंट डेब्ट पेपर्स सरकार विकत घेणार

अशी आहे आत्मनिर्भर भारत योजना, थोडक्यात आढावा

  • देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधानांनी व्हिजन समोर ठेवले
  • आवास आणि उज्ज्वल योजनेतून गरीबांना होत आहे मदत
  • रोज वेगवेगळ्या सेक्टरबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत
  • लँड, लेबर आणि लिक्विडिटीवर विशेष भर देणार
  • लोकल ब्रँड्सना ग्लोबल बनवण्याचे लक्ष्य

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड 19 वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले कौतुक

 

पुणे दि. 13 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘कोविड 19 वॉर रुम’ ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. येथून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना यावेळी सूचना केल्या.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय तसेच महापालिकेतील संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या ‘कोविड 19 वॉर रुम’ मधून होणाऱ्या कामाचे कौतुक करुन महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेले कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेलीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), डेलीकेटेड कोविड हॉस्पीटल (डीसीएच) मध्ये आजवर वैद्यकीय सुविधा घेतलेल्या नागरिकांची संख्यात्मक माहिती डॉ. म्हैसेकर यांनी घेतली.

गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणाबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती घेऊन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करताना विशेष दक्षता घ्यावी, असे सांगितले. गृह विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या जीपीएस ट्रॅकींगवर भर द्यावा, असे सांगून संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी फ्लू सेंटर मध्ये तपासणी केलेले रुग्ण, कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पीटल येथील खाटांची व्यवस्था, महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब तपासणीसाठी आतापर्यंत घेण्यात आलेले सॅम्पल, त्यातील पॉझिटीव्ह, निगेटीव्ह, प्रलंबित सॅम्पल ची संख्या, आतापर्यंतचे पॉझिटीव्ह, निगेटीव्ह व मृत रुग्ण, दैनंदिन वाढत जाणा-या केसेस, कोविड 19 बाबत जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजना, स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेली निवारा केंद्रे, याबाबत श्री. हर्डीकर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोना विषयक कामासाठी जवळपास दोन हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पिंपरी-चिंचवड मधील प्रतिबंधित क्षेत्रांची डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

 

पुणे, दिनांक १३: पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगर वसाहत (‍चिंचवड स्टेशन ) व रुपीनगर (तळवडे), भोसरी या प्रतिबंधित क्षेत्राला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली. कोरोना नियंत्रणासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी केल्या.
प्रतिबंधित क्षेत्राच्या पाहणी दरम्यान महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधीकारी डॉ. के. अनील रॉय, डॉ. पी.एच.ताडे, डॉ.रामनाथ बच्छाव, क्षेत्रीय अधीकारी आशादेवी, सहायक आरोग्य अधीकारी एम.एम.शींदे तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी- चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी कंटेन्मेंट क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत. तसेच प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करुन रुग्ण वाढू नयेत, यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी महापालिका व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीवर भर द्यावा. प्रतिबंधीत क्षेत्रातील कोविड 19 सदृश्य लक्षणे आढळणा-या नागरिकांच्या तपासणीसाठी या परिसरानजीक कोविड फ्लू सेंटर सुरु करावे. याबरोबरच घरोघरी जावून नागरिकांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करावे. सर्वेक्षण करतांना ज्येष्ठ नागरिक व उच्च रक्तदाब, श्वसनाशी ‍संबंधीत आजार असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत विशेष दक्षता घ्यावी. या व्यक्तींच्या तपासणीसाठी शीबीर घ्यावे, असे सांगून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करावे, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या साफ-सफाईवर भर द्यावा, येथील नागरिकांना मास्क व सॅनिटायझर पुरवावे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करावा, जेणेकरुन येथील नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. गृहभेटीव्दारे केलेल्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी वेळोवळी घेण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजना राबवण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रशासनाच्या वतीने मदत करण्यात येईल, असे सांगून प्रतिबंधित परिसरातील नागरिकांना निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त कोणालाही ये-जा करता येणार नाही, याची दक्षता घ्यावी. येथील रहिवाशांना भाजीपाला, दूध अशा जीवनावश्यक वस्तू त्याच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी असेही ते म्हणाले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
00000000000