Home Blog Page 2586

लॉकडाउन शिथिलीकरणानंतर 45 टक्के वितरक आणि 30 टक्के टचपॉइंट्स पुन्हा सुरू

गुरुग्राम, 15 मे 2020 – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने (एचएमएसआय) आपली दालने टप्प्याटप्प्याने सुरू केल्यानंतर तसेच या आठवड्यात डिस्पॅचेसला सुरुवात केल्यानंतर रिटेल विक्रीने जोर पकडला असून कंपनीने रिटेल विक्रीचा 21,000 युनिट्सचा टप्पा पार केल्याचे आज जाहीर केले.

 त्याचप्रमाणे 2.5 लाख होंडा ग्राहकांनी कंपनीच्या देशभरातील डीलरशीप्स आणि अधिकृत सेवा आउटलेट्स येथे त्यांच्या दुचाकींचे सर्व्हिसिंग केले आहे.

सुरक्षेस प्रथम प्राधान्य देत 45 टक्के होंडा वितरक आणि एकूण नेटवर्कपैकी 30 टक्के टचपॉइंट्स आता परत सुरू झाले आहेत. ही सर्व दालने सरकारच्या नियमावलीचे पालन करत असून होंडाने वितरित केलेल्या सर्वसमावेशक डीलरशीप ऑपरेशन्स रिझम्प्शन माहितीपुस्तिकेचेही पालन करत आहेत.

होंडा कशाप्रकारे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आजच्या परिस्थितीत आपल्या नेटवर्कमध्ये व्यवसायातील सातत्य राखत आहे याविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभाहाचे संचालक यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, आजच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये होंडा टुव्हीलर्स इंडिया नव्या यंत्रणेशी जुळवून घेत पुढे जाण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. आरोग्य आणि स्वास्थ्याची सुरक्षा जपत होंडा नेटवर्क आपल्या ग्राहकांना आनंद देण्यासाठी सज्ज आहे. कंपनीकडे भारतातील लोकप्रिय बीएसव्हीआय उत्पादने उपलब्ध असून लवकरच रिटेल्समध्ये भरीव वाढ होईल असा आमचा अंदाज आहे. आमच्या टच पॉइंट्समध्ये सर्व्हिसिंगसाठी येणाऱ्या वाहनांची वाढती संख्या ही ग्राहकांच्या होंडा व कंपनीच्या नेटवर्कवरील त्यांना स्वच्छता व सुरक्षित अंतराच्या नव्या नियमांची काळजी घेत त्यांना सेवा दिली जाईल या विश्वासाची पावती आहे.

यापुढचे पाऊल जास्त मनःशांती देण्यासाठी व ग्राहकांना आकर्षक रिटेल वित्त योजना तसेच खरेदीतील जास्त सोयीस्करपणा देण्यासाठी होंडा नेटवर्कमध्ये उचलण्यात आले आहे. होंडा ग्राहकांना आता किंमतीच्या 100 टक्के कर्ज मिळवता येणार असून त्याचबरोबर कमी डाउन पेमेंट आणि 12,000* रुपयांपर्यंतची बचत अशा सुविधाही मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ग्राहकांना 20 पेक्षा जास्त डेबिट व क्रेडिट कार्डांच्या श्रेणीतून निवड करत ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. होंडाच्या विविध डीलरशीप्सकडे ऑनलाइन आरक्षणही उपलब्ध करण्यात आले आहे.

सुरक्षेला प्राधान्य देत कोव्हिड- 19 ची साखळी तोडण्याचे होंडाचे आवाहन

होंडा टुव्हीलर्स इंडियाने आपल्या सर्व कस्टमर टचपॉइंट्स येथे सर्वसमावेशक डीलरशीप ऑपेरशन्स रिझम्प्शन माहितीपुस्तिका वितरित केली आहे. होंडाची सर्व वितरक दालने आणि वर्कशॉप्स कोव्हिड- 19 ची साखळी तोडण्यासाठी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर तसेच सुरक्षा व आरोग्याच्या सर्व नियमांचे कसून पालन करत आहे.

दस्त नोंदणीकरीता दुय्यम निबंधक कार्यालये 18 मे 2020 पासून सुरु होणार -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

 

पुणे, दि.15 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे 2020 लॉकडॉऊन सुरु आहे. ज्या-ज्या भागात परिस्थितीत नियंत्रणात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. अशा भागातील दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व विशेष विवाह कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन 18 मे 2020 पासून सुरु होणार असल्याची माहिती जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
ही कार्यालये कार्यान्वित करतांना व त्यापुढील कामकाज करतांना कर्मचारी व नागरिक यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सह जिल्हा निबंधक, पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली सर्व 21 कार्यालये दस्त नोंदणीसाठी 18 मे 2020 पासून (सद्यस्थितीत घोषित करण्यात आलेले प्रतिबंधित क्षेत्र व भविष्यात घोषित होणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये तो घोषित कालावधी वगळून) सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
जिल्ह्यात बारामती तालुक्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, कार्यालय बारामती क्रमांक-1 सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय बारामती क्रमांक-2, शिरुर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय शिरुर व तळेगाव ढमढेरे, दौंड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय दौंड व केडगाव, भोर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय भोर, वेल्हा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वेल्हा, इंदापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय इंदापूर, जुन्नर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय जुन्नर व नारायणगाव, आंबेगाव तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय आंबेगाव, पुरंदर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय पुरदंर, मुळशी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी 1 (पौड) व मुळशी 2 (हिंजवडी), मावळ तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व लोणावळा, खेड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय, खेड 1 (खेड), खेड 2 (चाकण), खेड 3 (खेड) ही कार्यालये सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुळे एक हजारपेक्षा अधिक मृत्यू

0

मुंबई. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या गुरुवारी एक हजारांच्या पुढे गेली. मुंबई कोरोनाचा केंद्रबिंदू बनली आहे, येथे राज्यातील 60% मृत्यू झाले. जगातील 198 देशांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावरून महाराष्ट्रात परिस्थिती कशी बिघडत चालली याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. या 198 देशांमध्ये इस्त्राइल, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका यांचा समावेश आहे.

यातील पाकिस्तान असा देश आहे ज्याची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात 11 कोटी तर पाकिस्तानात 22 कोटी लोक राहतात. जागतिक कोरोना मीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगातील 213 देश आणि आयलँड कोरोनाने प्रभावित झाले आहेत. यापैकी, अशी 23 देशे आहेत जिथे कोरोनामुळे महाराष्ट्रपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

एप्रिल आणि मे मध्ये 98% मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च रोजी आढळला होता. तर 17 मार्च रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. कोरोनामुळे राज्यात 31 मार्चपर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 302 प्रकरणे समोर आली होती. यानंतर कोरोनाचा संसर्ग इतक्या वेगाने पसरला की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे मृत्यू आणि संसर्ग असलेले राज्य बनले. देशातील एकूण प्रकरणांपैकी 32% प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. तसेच 38% मृत्यू देखील याच राज्यात झाले. मे मध्ये मृत्यूंचा एक नवीन ट्रेंड दिसून आला. आता येथे दररोज 50 हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे.

तज्ज्ञ म्हणाले- धारावीमध्ये जगातील सर्वात जास्त विध्वंस होण्याचा धोका

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनामुळे आतापर्यंत 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 500 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. जर येथे शक्य तितक्या लवकर संसर्ग नियंत्रित झाला नाही तर जगातील सर्वात भयानक आपत्ती येथे येऊ शकते, अशी चिंता जगातील मोठ्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि इबोलासाठी काम करणार्‍या कृतिका कपाल्ली यांनी याबाबत चेतावणी दिली आहे. त्यांनी ट्वीट केले होते की, “गेल्या अनेक महिन्यांपासून मला याची चिंता होती. भारतातील लोकसंख्या आणि धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने रहात असलेल्या लोकांमुळे ही चिंता साहाजिकच आहे. येथे कोरोना वणव्यासारखा पसरू शकतो आणि अकल्पनीय मृत्यू आणि विनाश आणू शकतो.”

2.6 चौरस किलोमीटरमध्ये राहतात 10 लाख लोक

जगातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये सुमारे 2.6 चौरस किलोमीटर क्षेत्रात 10 लाख लोक राहतात. येथे 10 बाय 10 फूटाची खोली 8 ते 10 लोकांचे घर असते. 73 टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. एखाद्या शौचालयात 40 तर कुठे 12 आणि 20 जागा असतात. दररोज सुमारे 60 ते 70 लोक एक सीट वापरतात, म्हणजेच एका दिवसात एक हजाराहून अधिक लोक सार्वजनिक शौचालय वापरतात.

मेगा पॅकेज ब्लूप्रिंट-3 / कृषी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 लाख कोटी रुपये

0

नवी दिल्ली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सरकारद्वारे 20 लाख कोटी रुपयांच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज’चा तिसरा ब्रेकअप सांगितला. आज अर्थमंत्र्यांनी शेती आणि यासंबंधि क्षेत्रांसाठी घोषणा केल्या. अर्थ मंत्रीने म्हणाल्या की, शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीचा सामना केला आहे. लॉकडाउनमध्येही शेतकरी काम करत आहेत. यावेळी त्यांनी कृष्टी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 लाख कोटी रुपयांची घोषणा केली.

पॅकेजचा तिसरा ब्रेकअप

1) कृषि इन्फ्रास्ट्रक्चर

  • अर्थमंत्री म्हणाल्या मागील दोन महिन्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची पाउले उचलली.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार 700 कोटी रुपये टाकले.
  • लॉकडाउनदरम्यान 5600 लाख दुध कॉपरेटिव संस्थांनी खरेदी केले.
  • दुध उत्पादकांना 4100 कोटी रुपये मिळाले.
  • कृषी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 1 लाख कोटी रुपये दिले जातील.
  • यातुन कोल्ड चेन, पिक कापणीनंतर व्यवस्थापनाची सुविधा मिळेल, शेतकऱ्यांची कमाईदेखील वाढेल.

2) फूड प्रोसेसिंस

  • मायक्रो फूड एंटरप्राइजेजसाठी 10 हजार कोटी रुपये फंडची स्कीम आहे, ही क्लस्टर बेस्ड असेल.
  • यातून 2 लाख खाद्य प्रसंस्करणला लाभ मिळेल. लोकांना रोजगार मिळेल, कमाईचे साधन वाढले.

3) फिशरीज

  • मत्स्य संपदा योजनेची घोषणा बजेटदरम्यान करण्यात आली होती, याला लागू करत आहोत.
  • यातून 50 लाख लोकांना रोजगार मिळेल. भारताचा एक्सपोर्ट वाढेल.
  • मत्स्य पालन वाढवण्यासाठी मच्छीमारांना जहाज आणि त्याचा विमा दिला जाईल.
  • समुद्री आणि आंतरराष्ट्रीय मत्स्य पालनासाठी 11 हजार कोटी रुपये आणि 9 हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जारी करणार.

4) पशुपालन

  • केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले की, अनेक आजारांसाठी जनावरांना व्हॅक्सीन मिळत नाहीये.
  • यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. सर्व जनावरांचे व्हॅक्सीनेशन केले जाईल.
  • व्हॅक्सीनेशनमध्ये 13 हजार 343 कोटी रुपये खर्च होतील.
  • यातून 53 कोटी पशुधनाला आजारापासून मुक्ती मिळेल.
  • जानेवारीपासून आतापर्यंत 1.5 कोटी गाय आणि म्हशींना व्हॅक्सीन लावण्यात आले.
  • पशुपालन इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांचा फंड दिला जाईल.

5) हर्बल शेती

  • हर्बल शेतीसाठी 4 हजार कोटी रुपये मंजुर केले आहेत.
  • पुढील दोन वर्षात 10 लाख हेक्टे जमिनीवर हर्बल शेती होईल.
  • हर्बल शेतीतून शेतकऱ्यांना 5 हजार कोटी रुपयांचे कमाई होईल.
  • हर्बल प्लँटची मागणदेखील जगभरात वाढेल.
  • कोविड-19 परिस्थितीदरम्यान हर्बल प्लँट कामी येतील.

6) मधमाशी पालन

  • मधमाशी पालन करणाऱ्या 2 लाख लोकांना 500 कोटी रुपयांची योजना
  • त्यांची कमाई वाढेल आणि मधाचे उत्पानही वाढेल.

7) ऑपरेशन ग्रीन

  • ऑपरेशन ग्रीन अंतर्ग TOP म्हणजेच टमाटर, आलू, कांदा योजनेत इतर भाज्यांनाही घेतले जाईल.
  • TOP योजनेसाठी 500 कोटी रुपये दिले जातील.
  • ट्रांसपोर्टेशनमध्ये 50% सब्सिडी दिली जाईल.

8) कृषी क्षेत्रातील गुंतवणूक आणि प्रोडक्ट विक्री

  • कृषी क्षेत्रात स्पर्धा आणि गुंतवणूक वाढवण्यासाटी 1955 च्या कमोडिटी अॅक्टमध्ये बदल केला जात आहे.
  • यामुळे शेतकऱ्यांची कमाई वाढण्याची शक्यता वाढत आहे.
  • शेतकरी आपला माल आपल्या किमतीत विकू शकतील, ई-ट्रेडिंगची सुविधा दिली जाईल

३ लाख ३१ हजार व्यक्ती क्वारंटाईन-

0

 ४ कोटी १० लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई दि.१५ –  लाकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३ लाख ५६ हजार २३२ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ३ लाख ३१ हजार १५१ व्यक्तींना काँरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १४मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख ०७ हजार २५६गुन्हे नोंद झाले असून २० हजार २३७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी १० लाख ७९ हजार ४९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २२९ घटना घडल्या. त्यात ८०३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊन च्या काळात या फोनवर  ९१ हजार ७९० फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६७२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ३ लाख ३१ हजार १५१ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३०४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५७ हजार ६७० वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ६, पुणे १, सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ९ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. १२७ पोलीस अधिकारी व १०२६ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

रिलिफ कॅम्प

राज्यात एकूण ३९३२  रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३ लाख ७४ हजार ४५६ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. या काळात विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.

सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे,असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

पुढील काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने, अर्थचक्र गतिमानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व इतर मंत्रीही उपस्थित

मुंबई दि १५: लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र राज्याला ज्या महत्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

गेल्या सुमारे ५५ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसायांना सुरु करण्यात आले होते. ६५ हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून ३५ हजार उद्योग सुरु झाले आहेत तसेच ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले. परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे.उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्के पर्यंत वाढला गेला आहे. तसेच परार्ज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे अशी माहितीही देण्यात आली.

आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा रीतीने पाळायची यावरही चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारने कशी वेगाने पाउले उचलली तसेच त्याचे सकारात्मक परिणाम काय दिसले ते सांगितले. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरूपात आणि पुरेशी काळजी घेऊनच पुढील नियोजन करावे लागेल असे त्यांनी सांगितले. संकट अजून टळलेले नाही. डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मदत आपण घेतो आहोत अशीही माहिती त्यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासंमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली. केंद्र सरकारने जे पैकेज दिले आहे त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायची तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे वैद्यकीय संकट कसे रोखायचे व दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे यासाठी तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही चर्चा झाली.

परदेश शिष्यवृत्ती साठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा उत्पन्न मर्यादा 8 लाख करण्यासह लाभार्थींची संख्या 75 वरून 200 करणे विचाराधीन

0

सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय :धनंजय मुंडे

मुंबई (दि. 15 ) —– : अनुसूचित जातीच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार आता परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.तसेच ही
उत्पन्न मर्यादा 8 लाख करण्यासह लाभार्थींची संख्या 75 वरून 200 करणे विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी जागतिक क्रमवारी 1 ते 300 पैकी पहिल्या 100 विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा नव्हती व 101 ते 300 पर्यंत 6 लाख रुपये ईतकी उत्पन्न मर्यादा होती. परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या 1 ते 100 क्रमवारी असलेल्या विद्यार्थ्यांना कौटुंबिक उत्पन्नाच्या अटीशिवाय लाभ देण्यात येत होता.

परंतु यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना लाभ मिळतो आणि गोरगरीब व हुशार असलेले विद्यार्थी वंचित राहतात, यामुळे या शिष्यवृत्ती योजनेला केंद्र सरकार, ओबीसी विभाग तसेच तंत्रशिक्षण विभागाच्या धर्तीवर सरसकट उत्पन्नाची मर्यादा घालावी अशी मागणी करण्यात येत होती.

श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार विभागाकडून हा शासन निर्णय घेण्यात आला असून आता शिष्यवृत्ती साठी 1 ते 300 क्रमवारी मध्ये असणाऱ्या व लाभ मिळवण्यासाठी पात्र असलेल्या 75 विद्यार्थ्यांना क्रमवारीनुसार 6 लाखांच्या आत कौटुंबिक उत्पन्न असल्यावरच या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे. यामुळे पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी साठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना आता लाभ मिळणार आहे.

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2017 च्या शासन निर्णयानुसार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी त्याच अभ्यासक्रमातील पदवी असणे अनिवार्य होते, परंतु ही अटदेखील आता रद्द करण्यात आली असून एखाद्या शाखेतील विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठाने शासनाने ठरवून दिलेल्या अन्य शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश दिला असला तरी आता ही शिष्यवृत्ती योजना लागू असणार आहे.

दरम्यान याप्रकारच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारने 8 लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठरवून दिलेली आहे, ओबीसी विभागाने 8 लाखांची मर्यादा ठरवून दिलेली आहे तर तंत्रशिक्षण विभागाने 20 लाख रुपये इतकी उत्पन्न मर्यादा ठरवून दिलेली आहे. याच धर्तीवर सामाजिक न्याय विभागाने 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा आखून दिलेली असून त्यावरील वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थी आता सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीला पात्र असणार नाहीत. ही उत्पन्न मर्यादा 6 लाखांवरून 8 लाखांपर्यंत वाढविण्याचेही विचाराधीन आहे.

उत्पन्न मर्यादा 8 लाख करण्यासह शिष्यवृत्ती लाभधारकांची संख्या 75 वरून 200 करणे विचाराधीन

सामाजिक न्याय विभागामार्फत जागतिक पातळीवर विविध विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी तथा पीएचडी साठी इच्छुक 75 विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती देण्यात येते. ही संख्या वाढवुन 200 करण्यात यावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटना व अन्य माध्यमातून होत होती. त्याचबरोबर या शिष्यवृत्ती साठी कौटुंबिक उत्पन्नाची दिलेली 6 लाखांची मर्यादा वाढवून 8 लाखांपर्यंत वाढविण्याचेही विचाराधीन आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

छत्री,रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स, कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

0

मुंबई दि.15 : राज्यात लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या  संदर्भात आज शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेऊन छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे.

हा आदेश 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहील. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक 2  मे 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.

कोरोना योध्यांसह गरजूंच्या मदतीसाठी चॅरिटीज एड फाउंडेशन इंडियाचा पुढाकार

पुणे : ‘‘कोविड -१९ अर्थात कोरोनामुळे जग ठप्प झाले आहे. आम्ही अत्यंत

अनिश्चित, कठीण स्थितीत जगत आहोत. याहीपेक्षा कोरोनामुळे

उदभवलेली स्थिती विशिष्ट गटांसाठी अनेक पटीने धोकादायक ठरत आहे

. त्यांचे जगणे अतिशय असुरक्षित झाले आहे. कोरोनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त नुकसानग्रस्त राज्य आहे. सीएएफ इंडिया आपल्या भागीदारांसोबत सर्वांत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह असुरक्षित गटांना मदत करण्यासाठी फिल्डवर काम करीत आहे,’’ अशी माहिती चॅरिटीज एड फाउंडेशन (सीएएफ) इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी बत्रा यांनी दिली.

बत्रा म्हणाल्या,‘‘वैद्यकीय कर्मचारी संसर्गजन्य भागात काम करत आहेत. अशा ठिकाणी या कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तरीही ते त्यांचे आयुष्य धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवित आहेत. पुणे महापालिकेने विविध भागात आयसोलेशन प्रभाग तयार केले आहेत. त्या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सीएएफ इंडियाने टेट्रा पाक प्रा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) च्या सहकार्याने ३ हजारपेक्षा जास्त ‘पीपीई किट’ची मदत केली आहे. आमची टीम अशा प्रकारच्या कार्यक्रमांना पाठिंबा देत राहील. आम्ही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत उभे आहोत.’’

‘‘सीएएफ इंडियाने आतापर्यंत शहरी झोपडपट्टीत राहणाऱ्या, तसेच गावी परत गेलेल्या नागरिकांना मदत केली आहे. तसेच या संकटाच्या वेळी स्वच्छता राखणारे कर्मचारी, बांधकाम कामगार, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी सुरक्षित राहण्यासाठी अन्नाची पाकिटे, पीपीई किट्स देऊन मदत केली आहे. आमच्या सर्व देणगीदारांचे आभारी आहोत. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. वयक्तिक दृष्ट्या मदत करून सदर काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. अशा आमच्या सर्व देणगीदारांचे आभारी आहोत,’’ असेही बत्रा यांनी सांगितले.
………
सीएएफचे महाराष्ट्रातील योगदान ः
– पुण्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ३००० पीपीई किट दिल्या
– आरोग्य विभागांसाठी १० हजार एन -९५ मास्क पुरविले
– १४५ पेक्षा जास्त बांधकाम कामगारांना आवश्यक खाद्यपदार्थांचे वाटप केले
– ८०० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षक उपकरणे दिली
– मुख्यमंत्री मदत निधीसाठी १ कोटी रुपयांचा निधी
……………
सीएएफचे देशातील अन्य उपक्रम ः
– आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थानमधील मुख्यमंत्री 

मदत निधीसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये.
– मध्य प्रदेश- छत्तीसगडमध्ये ९०० हून अधिक स्थलांतरित कामगारांच्या 

कुटूंबांना अन्न पुरविले
– २,००० हून अधिक निराधार लोकांची आरोग्य तपासणी
– ७८०० पेक्षा जास्त कुटुंबांना सरकारकडून लाभ, आर्थिक मदत मिळवून दिली
– दिल्लीतील जेजे कॉलनीत राहणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्‍यांना रेशन वाटप
– गुरुग्राम आणि दिल्लीमध्ये स्वच्छता कामगारांना ७८५ पेक्षा जास्त वैयक्तिक

 संरक्षक साधनांचे वितरण
– गुरुग्राम, हरियाणा महानगरपालिकेच्या कामगारांसाठी ५,००० हून अधिक

 फेस शिल्डचे वाटप
– जागरूकता अभियान आणि स्वयंसेवी संस्था सल्ला उपक्रम
– ॲस्ट्रॅजेनिका फार्मा लि. च्या भागीदारीतून पंजाब, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील आरोग्य विभागांना १ लाख एन-९५ मास्कचा पुरवठा
– हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील सुमारे २००० बांधकाम कामगारांना आवश्यक खाद्यपदार्थ
– गुजरातमधील १२०० हून अधिक पोलिसांना पीपीई किट्स पुरविल्या

सर्व सेवा संघांतर्फे पुण्यासह राज्यभरात अडकलेल्या ६० हजार मजूर कुटुंबांना अत्यावश्‍यक वस्तूंच्या किटची घरपोच मदत

पुणे, : ‘‘वडगाव शेरी येथील सर्व सेवा संघ या स्वयंसेवी संस्थेने लॉकडाउनमध्ये पहिल्या दिवसापासून अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे ६० हजार कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे किट वाटप केली. पुण्यातील वारजे, बावधन, आंबेगाव पठार, डुक्कर खिंड, वेद विहार येथे जागेवर जाऊन ही मदत पोच करण्यात येत आहे. याशिवाय उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ बीड येथे मजुरांना शोधून काढून ही मदत करण्यात येत आहे’’, अशी माहिती या संस्थेचे मॅथ्यूज यांनी दिली.

मुकुल माधव फाऊंडेशनच्या रितू छाब्रिया, बॅंगलोर येथील विप्रो फाऊंडेशन, पर्सिस्टंट फाऊंडेशन, फोर्ब्स मशिन कंपनी, हेल्थ फॉर इननिड, एससीएनएफ फाऊंडेशन, एसीजी कंपनी, सेव्ह द चिल्ड्रेन आदींनी या मदत कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, सोशल पोलिसिंगचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मॅथ्यूज म्हणाले, ‘‘ झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आदी राज्यांतील मजुरांना ही मदत करण्यात येत आहे. या किटमध्ये तेल, आटा, साखर, साबण, तांदूळ, डाळी आदी वस्तूंचा समावेश आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांची स्थिती बिकट आहे. अशा ३५० महिलांसह हडपसर येथील किन्नर समाजाच्या १०० जणांना महिनाभर पुरेल अशा या अत्यावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. ’’

या बरोबरच सेव्ह द चिल्ड्रेन या संस्थेने सुमारे ३० हजार लोकांपर्यंत मदत पोचविली आहे. जामखेड, इंदापूर आदी ठिकाणच्या ऊसतोड मजुरांच्या मदतीलाही ही संस्था धावून गेली आहे. त्यामुळे हजारो मजुरांचे जगणे सुसह्य होण्यास मदत झाली. या सर्वांच्या मदतीने सर्व सेवा संघ अजूनही तितक्याच सेवाभावाच्या वृत्तीने गरजूंना मदत पोचवित आहे. त्यामुळे मजूरांकडून या संघाच्या कार्याचे कौतुक होत आहे.

प्लॅनेट मराठीची सहा नव्या सिनेमांच्या निर्मितीची घोषणा

निर्माते म्हणतात…

मराठी सिनेश्रुष्टीमध्ये सुसूत्रता आणून कोणत्याही बाबतीत आपण कोलमडून न जाता त्यावर मात करण्याची गरज आहे. म्हणूनच, येत्या काळात प्लॅनेट मराठी सहा नवे कोरे सिनेमे आणि वेब सिरीज घेऊन येणारं आहे. शिवाय, अनेक आर्थिक गणितं स्थिर राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

-अक्षय बर्दापूरकर (निर्माता, प्लॅनेट मराठी)

प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा धम्माल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सिनेमा आणि नाट्यगृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे ‘एबी आणि सीडी’ बरोबरीनेच इतर अनेक चित्रपटांच बॉक्स ऑफिसवरील आर्थिक गणित कोलमडल. पण, त्यामुळे डगमगून न जाता निर्माता अक्षय बर्दापूरकर आणि संपूर्ण टीमने हा चित्रपट ‘अॅमेझाॅन प्राइम’वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि लोकांनी हा सिनेमा उचलून धरला. आता ‘एबी आणि सीडी’च्या भरघोस यशानंतर प्लॅनेट मराठी सहा नव्या कोऱ्या सिनेमा आणि वेबसिरीजची निर्मिती करणार आहे. प्लॅनेट मराठीचा सर्वेसर्वा आणि निर्माता अक्षय बर्दापूरकर याने नुकतीच ही घोषणा केली आहे. शांतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हे आगामी काळातील त्यांचे दोन महत्त्वाचे चित्रपट.

सिनेमाच्या यश-अपयशाबरोबरीने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही संकटापुढे खचून न जाता त्याचा धैर्याने सामना करत येणाऱ्या भविष्याला सामोरं जाण्याची तयारी प्रत्येकाने ठेवायला हवी आणि म्हणूनच अक्षय बर्दापूरकर यांनी या अटीतटीच्या काळातही घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला धाडसच म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आपण जर ‘फिल्म इंडस्ट्री’ म्हणतो, तर त्यातून सतत निर्मिती होणं अत्यावशक असल्याचंही ते आवर्जून सांगतात. शिवाय, सिनेमाचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील सगळ्यांना येत्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करायला लागू नये म्हणून हा निर्णय त्या प्रत्येकासाठी मोलाचा ठरणारा आहे.

प्लॅनेट मराठी नेहमीच मराठी सिनेमा आणि कलाकार कोणत्याही बाबतीत मागे पडू नये म्हणून सतत प्रयत्नशील असतो. आता प्लॅनेट मराठीच्या या भविष्यातील विविध प्रोजेक्ट्समध्ये प्लॅनेट टॅलेंट मधील कलाकारांसोबतच नव्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन कलाकारांना संधी देणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. शिवाय वैविध्यपूर्ण अशा या अनेक चित्रपटामध्ये बॉलीवूडच्या बड्या कलाकारांच्या देखील भूमिका असणार आहेत. आता या सिनेमा आणि वेबसिरीजमध्ये कोण कलाकार असतील? त्यांचे दिग्दर्शक कोण असतील? आणि बॉलीवूडचे कोणते चेहरे यात झळकतील ही माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

ससून रुग्णालय नियंत्रणाचे सर्व प्रशासकीय अधिकार जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांच्याकडे

पुणे : ससून रुग्णालय नियंत्रणाचे सर्व प्रशासकीय अधिकारी विभागिय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून काढून जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांच्याकडे गुरुवारी (ता.१४) देण्यात आलेपुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गेल्या महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला. तर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय यांच्या नियंत्रण आणि प्रशासकीय निर्णयाचे अधिकार डॉ. म्हैसेकर यांना देण्यात आले होते.

त्या आदेशात बदल करून हे अधिकार आता चोकलिंगम यांना देण्यात आले आल्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या बाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव संजय कमलाकर यांनी दिले आहेत.

डॉ. म्हैसेकर यांनी ससून रुग्णालयाच्या प्रशासकीय नियंत्रक पदाचा कार्यभार चोकलिंगम यांना सूपूर्द करावा. ससून रुग्णालयातील कामकाज, तेथील मनुष्यबळ आणि साधनसामग्री याची सविस्तर तपशिलवार माहिती डॉ. म्हैसेकर यांनी चोकलिंगम यांना द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे.

डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेतलेल्या डॉ. तांबे यांच्याकडे आर्थिक अधिकार देण्यात आले होते. ते अधिकार या कायद्याने आबाधित ठेवले आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आले नाही.

डॉ. म्हैसेकर यांच्याकडे पुणे महसूल विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणांचे समन्वय व नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ही वस्तूस्थिती विचारात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

पुणे विभागात 10 हजार 876 स्थलांतरित मजुरांना निवारा तर 69 हजार 321 मजुरांना भोजनाची सोय

 

पुणे दि. 15 : – सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 95 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 13 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 164 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 10 हजार 876 स्थलांतरित मजूर असून 69 हजार 321 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

मंदिरांच्या पैशावर जगणाऱ्यांचा पोटसुळ नक्की उठेल. पण…!

सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे.

पुणे-संभाजी ब्रिगेड ची भूमिका मांडली संतोष शिंदे यांनी..त्यांच्याच शब्दात वाचा जशी च्या तशी…

सगळे ‘देव’ सध्या ‘लाॕकडाऊन’ आहेत. कारण प्रत्येक धर्म आणि धार्मिक स्थळे (मंदिर) हे माणसांवर अवलंबून आहे. त्यांचा पैसा ‘मंदिर, मज्जित आथवा चर्च’ यांच्या तिजोरीत जातो. जर माणसं जिवंत राहिली तरच मंदिर मज्जित, चर्च किंवा गुरूव्दार यांना किंमत येईल… अन्यथा या कोरोना’च्या महामारीमुळे सर्व बेचिराख होईल. कदाचित मंदिरांवर जगणाऱ्याच्या पोटात पोटसूळ उठेल. मात्र सरकारने माणसं जिवंत ठेवली पाहिजेत. त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून संकटाच्या काळात राज्यासह देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीय करण करून तो पैसा जनतेच्या हितासाठी वापरावा..हीच संभाजी ब्रिगेडची आजपर्यंत मागणी राहिलेली आहेत.

सरकारने आज इतिहासाची प्रेरणा घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही शत्रूला हात लावू दिला नव्हता. शेतकरी अडचणीत असताना त्यांचा शेतसारा माफ केला होता. शेतकऱ्यांना पेन्शन देणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय. स्वराज्यात प्रत्येकाचा संरक्षण महाराजांनी केलं होतं. ‘छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते. बहुजनांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सरकारची तिजोरी रिकामी केली होती.’ आर्थिकदृष्ट्या गरीब दीन दलित व बहुजनांचे कैवारी म्हणून शाहू महाराजांची ओळख होती. बहुजनांच्या मुलांची शैक्षणिक कुवत वाढावी व सर्वांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व मंदिरांचा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा. हीच आजच्या काळाची गरज आहे. *माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब उशिरा बोलले मात्र खरं बोलले.’* आम्ही संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून गेली १५-२० वर्षापासून सतत पत्रव्यवहार करून सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. मा. अॕड. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यापासून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या पर्यंत प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला किंवा संकटाच्या काळात (अधिवेशन असो किंवा आंदोलन अथवा जयंती) वेळोवेळी मागणी करत आलेला आहे.

सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टची नोंदी सरकारकडेच झालेली आहे. सर्व धार्मिक स्थळे व ट्रस्ट ‘धर्मदाय आयुक्तांच्या’ अंतर्गत येतात. महाराष्ट्र सरकारने राज्यात KG to PG पर्यंतचे शिक्षण दर्जेदार सर्वांना सक्तीचे व मोफत करून सर्वांसाठी खुले करावे आणि सर्वांनी राज्यातील सर्वांच्या आरोग्यासाठी ‘सर्व धार्मिक स्थळांचा पैसा सरकारने समाजहितासाठी या नैसर्गिक आपत्तीच्या काळात वापरलाच पाहिजे… अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.

सर्व मंदिरांच्या पैशावर जगणाऱ्यांचा पोटसुळ नक्की उठेल. पण…! सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. तो पैसा राज्य सरकारने जनहितासाठी वापरला पाहिजे.

– संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता

0

मुंबई. कोविड १९ संसर्गाचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास बसणार आहे. नियोजनानुसार २२ जूनपासून प्रारंभ होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

सोमवारी (दि.१८) कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारी रोजी सुरू झाले होते. ते २० मार्चपर्यंत चालणार होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात असावेत आणि प्रशासनावर अतिरिक्त ताण नको म्हणून अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेच १४ एप्रिल रोजी म्हणजेच एक आठवड्यापूर्वीच अधिवेशन गुंडाळण्यात आले होते.

सभागृह संस्थगित केल्यानंतर झालेल्या घोषणेनुसार २२ जूनपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन आयोजित केले जाणार होते. हे अधिवेशन ३ आठवड्यांचे होणार होते. प्रश्नांचा चक्रानुक्रम दाखवण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात कायम आहे. त्यामुळे विधिमंडळाचे सदस्य अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या बैठकीत अधिवेशनासंदर्भात चर्चा होईल. कोरोनोला अटकाव करण्यासाठी सरकारने मोठा खर्च केला. यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.