Home Blog Page 2567

राज्यात कोरोनाच्या ३७ हजार १२५रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.२७: राज्यात आज कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ०३ हजार ९७६ नमुन्यांपैकी ५६ हजार ९४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३७ हजार ७६१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९ ,नवी मुंबई मध्ये ७, रायगडमध्ये ७,  अकोल्यात ६, औरंगाबाद मध्ये ४, नाशिक ३,  सोलापूरात ३, सातारा -२, अहमदनगर १, नागपूर १, नंदूरबार १, पनवेल १तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साता-याचे २,अहमदनगरचा १, नंदूरबारचा १ मृत्यू आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५०  रुग्ण आहेत तर ४५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या १०५ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३४,०१८), बरे झालेले रुग्ण- (८४०८), मृत्यू- (१०९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,५०७)

ठाणे: बाधित रुग्ण- (७७८१), बरे झालेले रुग्ण- (२२२४), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४०८)

पालघर: बाधित रुग्ण- (७७१), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८१)

रायगड: बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (४८८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८२)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०१२), बरे झालेले रुग्ण- (७५०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)

धुळे: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)

जळगाव: बाधित रुग्ण- (५०५), बरे झालेले रुग्ण- (२१८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)

पुणे: बाधित रुग्ण- (६६१४), बरे झालेले रुग्ण- (३०८६), मृत्यू- (२९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२३७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (२८७), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४०)

सातारा:  बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (१२८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३४६), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२७)

सांगली: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१९२), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३३५), बरे झालेले रुग्ण- (७९३), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८५)

जालना: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (२३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१३३), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)

परभणी: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)

लातूर: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)

बीड: बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)

नांदेड: बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)

अकोला: बाधीत रुग्ण- (४८७), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६३)

अमरावती: बाधीत रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२)

वाशिम: बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)

नागपूर: बाधीत रुग्ण- (४८४), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४१)

वर्धा: बाधीत रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)

भंडारा: बाधीत रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)

एकूण: बाधीत रुग्ण-(५६,९९८), बरे झालेले रुग्ण- (१७,९१८), मृत्यू- (१८९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण-(३७,१२५)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ११९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

●       राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.५ दिवस होता तो आज १४.७ दिवस झाला आहे.

●       देशाच्या एकूण प्रयोगशाळा तपासणीच्या ( ३२,४२,१६०) सुमारे १२. ४ टक्के तपासणी महाराष्ट्रात झाली असून दर दहा लक्ष लोकसंख्येमागे राज्यात ३१४२ जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. हे प्रमाण देशपातळीवर २३६३ एवढे आहे. 

●       राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ३१.५ % एवढे आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २६८४ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार ११९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६८.०६  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २६ : अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी मे २०१८ यांनी संशयास्पदरित्या आत्महत्या केली होती. यासंदर्भात अलिबाग पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद सुध्दा करण्यात आली. या प्रकरणात योग्य तपास झाला नसून या प्रकरणाचा फेरतपास व्हावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी केली होती. याता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सी.आय.डी) कडे देवून फेरतपास करण्यात येणार असल्याची माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९/२०१८, भादंवि ३०६, ३४ प्रमाणे तसेच गु.र.नं. ११४/२०१८ भांदवि कलम ३०२ प्रमाणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. दरम्यान करण्यात आलेल्या तपासापासून आपण असमाधानी असल्याने गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी) मधील कलम १७३ (८) मधील अधिकाराचा वापर करुन हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे. तसेच तत्कालीन संबंधित तपास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी / न्यायिक अधिकारी यांच्या विरुध्द चौकशी करण्यात यावी, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गुहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.या संदर्भात शासनाने मंगळवार दि. २६ मे ला निर्णय घेवून अलिबाग पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ५९/२०१८ व गु.र.नं. ११४/२०१८ चा फेरतपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना आदेश देण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा फेरतपास होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात

0

मुंबई दि.२७- महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दि.२७ मे पर्यंत जवळपास ९ लाख ८२  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ६९६ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३७४ बिहारमध्ये १६९, मध्य प्रदेशमध्ये ३३, झारखंडमध्ये ३०, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १३, राजस्थान १५, पश्चिम बंगाल ३३, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ६९६ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधून १११, लोकमान्य टिळक टर्मिनस ११२, पनवेल ४२, भिवंडी १०, बोरीवली ५२, कल्याण ८, ठाणे २८, बांद्रा टर्मिनल ५८, पुणे ६९, कोल्हापूर २३, सातारा १३, औरंगाबाद १२, नागपूर १४  यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून  विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई. दि. २७ – देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचं स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत पंडितजींचं अमूल्य योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी  त्यांच्या कुटुंबानं केलेला त्याग, स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत त्यांनी दिलेलं योगदान देशवासियांच्या चिरंतन स्मरणात राहणार आहे. पंडितजींनी उभारलेल्या शैक्षणिक, संशोधन संस्था, पायाभूत प्रकल्पांचा रचलेला पाया, युवकांच्या नेतृत्वविकासाला दिलेली दिशा, लोकशाही रुजवण्यासाठी, भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न हे सारं अलौकिक आहे.

पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचं स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो.

इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक

0

‘महाराष्ट्र सायबर’ च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन

मुंबई दि २७:- सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात आपली फसवणूक होऊ नये यासाठी सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे.

अनेक जण बऱ्याचदा चुकून किंवा अन्य कुतूहलापोटी पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करतात व कालांतराने त्यांना एक मेसेज वा धमकीवजा ई-मेल येतो की, ज्यात असे लिहले असते ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या वेबसाईट बघत होता व तुम्ही वापरत असलेले device (कॉम्प्युटर /मोबाईल) हे आमच्या कंट्रोलमध्ये आहे व तुमची सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट देखील आमच्याकडे आहे. आम्ही ठरविले तर तुमच्या ऑनलाईन कृती व तुम्ही कोणत्या वेबसाईट बघता हे सर्व तुमच्या कॉन्टॅक्टसना कळवू शकतो, जर तसे नको असल्यास तुम्ही या ई-मेल/मेसेज मध्ये नमूद केलेल्या अकाउंटमध्ये बिटकॉईन्सच्या स्वरूपात अमुक अमुक रक्कम २४ तासात जमा करावी ‘.

महाराष्ट्र सायबर विभागामार्फत यासंदर्भात असे आवाहन करण्यात येते की, असे मेसेज हे चुकीचे असून नागरिकांनी त्यांना बळी पडू नये व कोणत्याही प्रकाराची  रक्कम व आपल्या बँक खात्याची माहिती कोणासही देऊ नये. तसेच सर्व नागरिकांनी हे लक्षात ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे की, आपल्या देशात माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ब अन्वये child pornography शोधणे देखील  गुन्हा आहे. तसेच  पोर्नोग्राफिक वेबसाईट पाहताना त्यामधून malware पाठवून तुमच्या कॉम्प्युटर/मोबाईलचा ताबा घेतला जाऊ शकतो त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा वेबसाईट पासून शक्यतो अलिप्त रहावे. तसेच अशा प्रकारच्या फ्रॉडपासून वाचायचे असेल तर आपल्या ई-मेलचे व बँक खात्यांचे पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. सगळ्या अकॉउंटसचे पासवर्ड एकच ठेवू नका. सर्व अकाउंट्सना टू वे ऑथेंटिकेशन (२ way authentication) वापरा जेणेकरून जर कोणी तुमच्या ई-मेल किंवा बँक खात्यामध्ये लॉगिन करायचा प्रयत्न केल्यास तुम्हाला लगेच संदेश येईल. तसेच अत्याधुनिक व अपडेटेड अँटिव्हायरस (antivirus) आपल्या मोबाईल व कॉम्पुटरमध्ये इन्स्टॉल करा व त्याने आपले मोबाईल व कॉम्पुटर नियमितपणे स्कॅन करा.

आर्थिक व्यवहारात सावधानता

 सध्या लॉकडाऊनच्या काळात बरेच लोक स्वतःचे आर्थिक व्यवहारसुद्धा ऑनलाईन व विविध अप्स द्वारे करत आहेत. यातील काही वापरकर्त्यांना एक एसएमएस किंवा फोन किंवा ई-मेल येतो की तुमचे  केवायसी डॉक्युमेंट (kyc documents) ची वैधता संपली असून त्यामुळे तुमचे अकाउंट बंद केले आहे. तुम्ही खालील नंबरवर फोन करून किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करून आपले KYC documents update करा. अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका व त्या मेसेजमधील लिंकवर क्लिक देखील करू नका. असे मेसेज किंवा ई-मेल आल्यावर नागरिकांनी सदर मोबाईल अँपच्या (paytm ,bhim google pay इत्यादी) ग्राहकसेवा केंद्राला (customer care) ला फोन करून या मेसेज किंवा ई-मेलची सत्यता पडताळून बघा व मगच त्यावर विश्वास ठेवा.

Paytm कंपनीचे अधिकृत kyc पॉईंट आहेत, आपल्या नजीकच्या kyc पॉईंटला शक्यतो  वैयक्तिकरित्या भेट देऊन आपले kyc update करा. तसेच आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर quickdesk, anydesk, team viewer या सारखे अँप व सॉफ्टवेअर वापरू नका, कारण या सॉफ्टवेअरद्वारे सायबर भामटे तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा ताबा घेऊ शकतात व तुमची सर्व माहिती हस्तगत करू शकतात.

जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद मजकूर असणाऱ्या आशयाचे मेसेजेस आले तर घाबरून जाण्याचे कारण नाही, आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची तक्रार नोंदवा व http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील याची माहिती द्यावी, असे आवाहन सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे.

फेकाफेक करून आणि खोटं बोलून राज्याचं भलं होणार नाही: फडणवीस (व्हिडीओ)

0
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/735452433937685/

मुंबई: केंद्र सरकारडून दिल्या जाणाऱ्या मदतीवरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षात जोरदार जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दावे महाआघाडीने पत्रकार परिषद घेऊन खोडून काढल्यानंतर फडणवीस यांनीही तात्काळ पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. राज्य सरकारच अभासी आकडे दाखवत आहे. फेकाफेक करून आणि खोटं बोलून राज्याचं भलं होणार नाही. महाराष्ट्राचा मित्र कोण? आणि शत्रू कोण? हे राज्यातील जनतेला माहीत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राज्याला केंद्राकडून मिळालेल्या मदतीची जंत्रीच सादर केली होती. एवढी मदत करूनही राज्य सरकार काहीच करताना दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. महाविकास आघाडीचे नेते अनिल परब, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्या दाव्यांची चिरफाड केली होती. फडणवीसांनी अभासी आकडे दाखवण्याचा काल प्रयत्न केला. केंद्राकडे राज्याचा ४२ हजार कोटींचा निधी थकीत असून हा निधी अद्यापही आम्हाला मिळालेला नाही, असा दावा महाआघाडीच्या नेत्यांनी केला होता.

भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू; राष्ट्रवादीचा खरमरीत सवाल

फडणवीस यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन महाआघाडीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर दिले. केंद्राने राज्याला कापूस खरेदीचे पैसे दिले आहेत. केंद्राने राज्याला २६ मे पर्यंत ९ लाख ८८ हजार पीपीई किट्स आणि १९ लाख मास्क दिले आहेत. या पीपीई किट्स विकत घेण्यासाठी राज्याला ४६८ कोटी रुपयेही दिले आहेत. नोव्हेंबरपर्यंतचे जीएसटीचे पैसेही देण्यात आले आहेत, असं सांगतानाच मुंबईतील रुग्णालयात रुग्णांसाठी बेड नाही. टेस्टिंगची संख्याही कमी करण्यात आलीय. देशात करण्यात येत असलेल्या टेस्टमध्ये ५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. मात्र महाराष्ट्रात ही संख्या १३ टक्के आहे. मे महिन्यात ही संख्या ३२ टक्के आहे. ज्या राज्यात देशातले ३३ टक्के रुग्ण आहेत, ज्या राज्यात करोना रुग्णांचा मृत्यूदर ४० टक्के आहेत. त्या राज्यातील राज्यकर्ते कशाच्या आधारावर स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत? असा सवाल फडणवीस यांनी केला. सरकारकडून अभासी घोषणा केल्या जात आहेत. खोटे आकडेवारी देऊन, फेकाफेक करून महाराष्ट्राचं भलं होणार नाही. आम्ही महाराष्ट्राला मदत करायला तयार आहोत, पण फेकाफक होतच असेल तर सरकारचा पर्दाफाश करावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. भूमिपुत्रांना स्थलांतरीत मजुरांच्या जागी काम देण्याचं आम्ही नेहमीच स्वागत केलं आहे. या मजुरांना काम द्यायचंच असेल तर त्याच्याकडे जे स्किल आहे, तेच काम द्यावं लागेल, असंही ते म्हणाले.  

कामगारांपेक्षा पीएमपी ला चिंता ठेकेदारांची – विरोधी पक्षनेत्या धुमाळ यांचा आरोप

 पुणे- पीएमपीएमएल प्रशासनाने सेवकांना वेतन न देता इतर ठेकेदार व कंपन्यांचे बिल व वेतन अदा केले आहे. कामगारांपेक्षा ठेकेदारांचेच हित पीएमपी जोपासत आहे असा आरोप आज विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी येथे केला.

त्या म्हणाल्या , ‘पीएमपीएमएल’च्या रोजंदारीवर काम करणाऱ्या 2 हजार 169 कामगारांना पगार मिळालेला नाही. यामध्ये कंड्क्टर, ड्रायव्हर, वर्कशॉपमध्ये काम करणारे सेवक यांचा समावेश आहे. त्यामुळे रोजंदारी पदावरील सेवकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रोजंदारीवर काम करणारे काही सेवक हे भाड्याच्या घरात राहतात. या सेवकांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेस होतो. परंतु, एप्रिल २०२० या कालावधीतील पगार अद्यापही अदा करण्यात आलेला नाही. पगार न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

रोजंदारी सेवकांचा पगार देण्यास ‘पीएमपीएमएल’कडे फंड उपलब्ध नाही. परंतु, पुणे महानगरपालिकेकडून वेतन देण्याचा हिस्सा पीएमपीएमएल प्रशासनाकडे जमा करण्यात आला असूनही सेवकांना वेतन दिले जात नाही, ही गंभीर बाब असल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सांगितले.याउलट पीएमपीएमएल प्रशासनाने सेवकांना वेतन न देता इतर ठेकेदार व कंपन्यांचे बिल व वेतन अदा केले आहे.महाराष्ट्र शासन उद्योग उर्जा व कामगार विभाग यांच्याकडून कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार घरी राहावे लागत असले तरी ते कर्मचारी कामावर आहेत, असे समजून त्यांना वेतन व भत्ते अदा करण्यात यावे, असा शासनाचा आदेश आहे.त्यामुळे तातडीने पावले उचलून रोजंदारी पदावरील सेवकांना तातडीने पगार अदा करण्यात यावा, असे पत्र पीएमपीएमएल प्रशासनास देण्यांत आले आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे संपुर्ण भारतात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. पुणे शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.परिणामी सगळीकडे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे पीएमपीएमएलमधील कायम व रोजंदारी पदावरील सेवकांना मार्च २०२० या कालावधीतील पगार अदा करण्यात आलेला होता.वास्तविक प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखेस सर्व कायम सेवकांचे पगार अदा करण्यात आलेले आहे. मात्र, रोजंदारीवरील कामगारांचा पगार करण्यात आला नाही. पीएमपीएमएलला कामगारांच्या हितापेक्षा ठेकेदार व कंपण्यांचे हित जास्त महत्वाचे असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

गटनेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महापौरांनी कोणताही निर्णय घेऊ नये –

2020-21 च्या संपूर्ण बजेटला महापालिका प्रशासन कात्री लावण्याच्या तयारीत आहे. हे बजेट कमी करण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलेल्या पत्रात केले आहे.

पुणे महापालिकेचे सन 2020-21चे अंदाजपत्रक मंजूर होऊन या संबंधी दि.1 एप्रिलपासून प्रत्यक्ष या अंदाजपत्रकातील विकासकामांना सुरुवात होणे गरजेचे होते. परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बजेटवर परिणाम झाला आहे. सर्व महापालिका प्रशासन या रोगावर मात करण्यात प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन आणखी किती दिवस सुरू राहील, याची कोणतीही शाश्वती नाही.कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द आयुक्तांनीच बजेटचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपण बजेट संदर्भात सर्व पक्ष नेत्यांबरोबर विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, असेही दीपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे चक्राकार पद्धतीने ड्यूटी दिली जात नाही
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे कोव्हिड रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना चक्राकार पध्दतीने सात दिवस प्रत्येकी सहा तासांची ड्यूटी देणे आवश्यक आहे. मात्र, नायडू रुग्णालयासह महापालिकेच्या सर्व रूग्णालये आणि कोव्हिड सेंटरमध्ये या नियमांचे पालन होत नाही.त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर आयुक्तांनी वेळीच लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.पुणे शहरासह संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नायडू रूग्णालयात गेल्या 3 महिन्यांपासून डॉक्टर, परिचरिका व इतर सेवक कार्यरत आहेत. जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करीत आहेत. सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात राहावे लागत असल्याने मागील 10 दिवसांत 5 परिचरिकांना बाधा झाली आहे. मात्र, प्रशासनातर्फे कोणतीही दाखल घेतली नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली ससून मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची थेट भेट

कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर,रुग्णांशी संवाद; जाणून घेतल्या अडचणी

पुणे- कोरोनामुळे पुणे आणि मुंबईतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.याच पार्श्वभूमीवर (दि.२७) रोजी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे येथील ससुन हॉस्पिटलला भेट देत तेथील रुग्णांशी संवाद साधला.यावेळी आ.पवारांना अतिदक्षता विभागात जाण्याबाबत विचारणा करण्यात आली त्यावेळी आ.पवार न घाबरता आवर्जुन त्या ठिकाणी जाऊन जे गंभीर रुग्ण आहेत त्यांची व कोरोनाशी लढा देत असताना संक्रमित झालेल्या डॉक्टर,नर्स,सुरक्षारक्षक आदींची भेट घेतली. ‘काळजी घ्या’ असा आपुलकीचा सल्ला दिला.यावेळी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या असणाऱ्या अडचणी व तेथील परिस्थितीही जाणून घेतली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याबरोबरच पुणे येथील हॉस्पिटलवरही बारकाईने लक्ष आहे.कोरोना वॉरीयर्सना लागणारी मदतही ते पोहोचवत आहेत.असे आ. रोहित पवार बोलताना म्हणाले.

दरम्यान मानदेशी फाऊंडेशनच्या वतीने ससून हॉस्पिटलसाठी पी.पी.ई.किट, गॉगल व एन-९५ मास्क आ. रोहित पवार यांचेकडे देण्यात आले होते.हे सर्व साहित्य ससुन हॉस्पिटलचे डीन डॉ.मुरलीधर तांबे यांच्याकडे सुपूर्द केले.कोरोनाशी लढणाऱ्या
सर्वच डॉक्टर कर्मचाऱ्याचे आ. रोहित पवार यांनी विशेष आभार मानले.अनेक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत.अनेक रुग्ण सध्या कोरोनावर यशस्वी मातही करत आहेत.कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असताना आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाशी लढा देणाऱ्या कोरोना वॉरीयर्सना संरक्षित करण्यासाठी आमदार रोहित पवारांनी मागील काही दिवसांपूर्वी पुण्यातील रुग्णालयांना सॅनीटायझर पुरवले.कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता आणखी काय उपाय योजना करता येतील का? याबाबत आ. पवार हे प्रयत्नशील आहेत.
यावेळी डॉ.योगेश गवळी, डॉ.हरीश ताटीया, डॉ.मुरलीधर बिरादार व इतर डॉक्टर,नर्स व कर्मचारी उपस्थित होते.


मतदारसंघातील ‘त्या’ रुग्णाचीही घेतली भेट!
आ. रोहित पवारांनी ससुन हॉस्पिटलमधील रुग्ण,डॉक्टर नर्स आदींना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान मतदारसंघातील रुग्ण देखील याच हॉस्पिटलमध्ये असल्याचे आ.पवार यांना समजताच त्या रुग्णाचीही आवर्जून भेट घेतली. कोरोनाला हरवुन लढाई जिंकायची आहे असे म्हणत प्रोत्साहित केले.


त्यांच्या भेटीचाही ‘शब्द’ पाळला!
मागील काही दिवसांपुर्वी आ.पवार यांनी नायडू रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी आदींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.त्यांना प्रोत्साहित केले.तेथील डॉक्टर, नर्स आदींनी रुग्णालयात येवून जा असा आग्रह धरला होता.आ.पवारांनी त्या ठिकाणी जाऊन सर्वांची भेट घेऊन सर्वांचे आभार मानले. आणि दिलेला शब्द पाळला.

कोथरुडमधील सागर कॉलनीतील १२०० जणांची मोफत आरोग्य तपासणी

आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने कोथरूडमधील सागर कॉलनी या प्रतिबंधित क्षेत्रांमधील स्थानिक नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून भारत सरकारच्या आयुष मंत्रालय निर्देशानुसार कोरोनाच्या साथीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे होमिओपॅथीक अर्सेनिक अल्बम ३० औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोथरुडचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये गरजुंना मोफत अन्नधान्य वाटप, गावी परतणार्या नागरीक आणि मजुरांची मोफत तपासणी करुन प्रमाणपत्र देणे आदींचा समावेश आहे. यामध्येच आता कोथरुड मधील सागर कॉलनी हा प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून या भागातील नागरिकांची मोफत तपासणीचा उपक्रम राबविण्यात आला. याचे उद्घाटन सरचिटणीस पुणे शहर माननीय श्री राजेशजी पांडे व पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री या श्री रविजी अनासपुरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये स्थानिक १२०० नागरिकांची तपासणी करून अर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथी औषध देण्यात आले. या शिबिरामध्ये डॉ संदीप बुटाला, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. गौरव पाटील, डॉ चिन्मय चोपडे, डॉ प्रशांत बोरुडे व सहकारी डॉक्टरांनी औषधांची घेण्याची पद्धत व त्याचे डोस घेण्याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी नगरसेवक श्री. दिलीप वेडे पाटील, श्री. किरण दगडे पाटील, सौ. श्रद्धाताई प्रभुणे पाठक, सौ. अल्पनाताई वर्पे, श्री. पुनितजी जोशी, स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब टेमकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरासाठी अॅड. रुपेश भोसले, राहुलदादा देशपांडे, उमेश मोकाटे, विजय राठोड, अमित बांडागळे, अभिजित ठाकूर, हनुमंत थोरात, रामदास तुरपे, अभिजित मुळे, अजित शिगवण, राहूल बिराजदार, महादेव टेंगसे, जितेंद्र सुर्यवंशी, धनंजय रसाळ, जाधव काका, अमर वाघमारे, कुंडलिक दुपारगुडे, पिंटू कानगुडे, अशोक नरवडे, अखिल सागर कॉलनी मित्र मंडळ, एकदंत फ्रेंड्स सर्कल ट्रस्ट यांनी सहकार्य केले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 3 हजार 904

पुणे विभागातील 3 हजार 841 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 8 हजार 122 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

   पुणे दि. 27 :- पुणे विभागातील  3 हजार 841 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 122 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 904 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 200 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार 604  बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 355 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 954 आहे. कोरोनाबाधित एकूण 295  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 193  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 403 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील 394 कोरोना बाधीत रुग्ण असून 122 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 653 कोरोना बाधीत रुग्ण असून 297  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.     ॲक्टीव रुग्ण संख्या 292  आहे. कोरोना बाधित एकूण 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील  कोरोना बाधीत 88 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 39  आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील 383 कोरोना बाधीत  रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 360  आहे. कोरोना बाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 77 हजार 117 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी      72 हजार 747 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 370 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 64  हजार 516 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8 हजार 122  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.     

(टिप : – दि.27 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

ज्येष्ठ एकट्या बेसहारा कलाकारांना घरे देण्यासाठी अभिनेते विक्रम गोखलेंनी दिला अडीच कोटीचा भूखंड

पुणे-ज्येष्ठ अभिनेते  विक्रम गोखले यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराची जागा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नावाने करून द्यायचा निर्णय घेतला. आज या जागेची बाजार भावानुसार किंमत जवळपास अडीच कोटी रुपये इतकी आहे. या जागेवर ज्येष्ठ व एकटे राहणाऱ्या कलावंतांना आसरा मिळावा म्हणून मोफत निवारा  देण्यात यावा म्हणून हा  निर्णय विक्रम गोखले यांनी घेतल्याचे वृत्त आहे .याचसाठी त्यांनी ही पूर्ण जमिन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली. अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभे  करण्याचे ठरवले असून त्यांनी विक्रम गोखले यांचे आभार मानले आहेत.काही कलावंत आपल्या घराचा वारसा घेऊनच आलेले आहेत मग तो अभिनयातील असो वा दानधर्माचा. विक्रम गोखल्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले हे दरवर्षी देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपल्या कमाईतील काही भाग नित्यनेमाने भारतीय सैन्य दलाला मदत म्हणून देत असत.विक्रम यांनीही वडिलांचा हा वारसा पुढे सुरू ठेवला. त्यांचा हा स्तुत्य वारसा पुढे सुरू ठेवला असून दरवर्षी विक्रम गोखलेही त्यांच्या कमाईतील रक्कम मदत म्हणून देत असतात. दरम्यान, कोरोना व्हायरस या महामारीशी सामना करण्यासाठी अनेक कलाकार आपआपल्या परिने मदत करत आहेत. च्या पार्श्वभूमीवर सर्वच कलाकार काही ना काही मदत करीत आहेत. विक्रमजींनी स्वतः मदत तर केलीच शिवाय बॉलीवूड मधील इतर कलावंतानाही हक्काने मराठी चित्रपटसृष्टीतील सहकलाकारांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.आतापर्यंत विक्रमजींनी ज्येष्ठ कलावंतांची होणारी फरफट पाहिली आहे. त्यासाठी काहीतरी उपाय शोधावा अशी त्यांची कायमच भावना होती. आपली ही मनीषा पूर्ण करण्यासाठी त्यांनी यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा देत ही जबाबदारी पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची हि कसोटीची वेळ

  • विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
    पुणे, दि. 27 – पुणे विभागतील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयांत कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. कंटेनमेंट झोनमध्ये रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून गतीने उपचार सुरू करावेत तसेच कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे सांगतानाच कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही ख-याअर्थाने कसोटीची वेळ असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सांगितले.
    विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत असलेले आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
    डॉ. म्हैसेकर म्हणाले, आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका व इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्मनक उपाययोजना करण्यामत येत आहेत. यासोबतच परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे सुलभ होईल व कोरोना प्रतिबंधासाठी उपयोग होईल. मृत्यूदर कमी करण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन आवश्यक आहे. पल्स ऑक्सीमीटर, बीपी तपासणी तसेच शुगर तपासणीला प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य सर्वेक्षण अचूक असावे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
    कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून, तालुक्याचा हद्दीत व ग्रामीण भागात बाहेरुन प्रवास करुन येणाऱ्या नागरीकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे असे निर्देशही देवून डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याकरीता विशेष खबरदारी म्हणून संबंधित ग्रामीण भागामध्ये बाहेरुन प्रवास करुन जे प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा इतर कोणताही नागरीक प्रवेश करेल, या सर्व प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा नागरीक यांना संस्थात्मक विलगीकरण करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबतचे अंमलबजावणी करीता तसेच गावपातळीवर कार्यरत असलेल्या ग्रामसेवक, तलाठी किंवा आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
    पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात आतापर्यंत झालेली उपाययोजनांची अंमलबजावणी, स्थानिक स्थिती, संभाव्य स्थिती व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नव्याने करावयाचे उपाय आदी बाबींसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेचे अधिकारी यांनी आपल्या जिल्हातील उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सबंधित जिल्हा प्रशासनातील कोरोना जबाबदारी देण्यात आलेले समन्वय अधिकारी उपस्थित होते.

‘राहुल गांधींची भूमिका दुटप्पीपणाची

0

मुंबई. ‘आम्ही महाराष्ट्रातील सरकारला पाठिंबा दिला असला, तरी आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही,’ या राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरपू समाचार घेतला. ‘काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. सत्तेत असूनही निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवावी’, असा हल्लाबोल विखे पाटलांनी माध्यमांशी बोलताना केला.

राहुल गांधींच्या वक्तव्यावर विखे पाटील म्हणाले की, ‘राहुल गांधींचे विधान दुटप्पीपणाचे आहे. एकीकडे सरकारमध्ये राहायचे आणि दुसरीकडे आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगायचे. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, तर तुम्ही सरकारमध्ये कशाला थांबलात?’, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. पुढे ते म्हणाले की,’ काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार नाही तर सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवा. सध्या काँग्रेसची अवस्था डबलढोलकी सारखी झाली आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

‘महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. परंतू, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे हा यातला फरक आहे’, असे राहुल गांधी म्हणाले होते.

राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

0

मुंबई दि. 27:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी दि. 15 जूनपर्यंत पूर्ण करावी अशा सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. आज मंत्रालयातून राज्यातील कापूस खरेदीबाबत जिल्हाधिकारी, डीडीआर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे आढावा  घेऊन संवाद साधला, त्यावेळी सहकारमंत्री श्री. पाटील यांनी वरील सूचना केल्या.

मंत्री श्री. पाटील  म्हणाले,  कापूस खरेदीला गती द्यावी त्यासाठी गाड्यांची मर्यादा वाढवावी, शेतकरी ऑनलाईन नोंदणीच्या याद्या अद्ययावत कराव्यात ,कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची कापूस खरेदी त्या-त्या दिवशीच पूर्ण करण्यात यावी. सर्व खरेदी विक्री व्यवहारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, इतर राज्यातील कापूस खरेदी संपुष्टात आल्याने सीसीआय ने आपले ग्रेडर राज्यातील केंद्रांवर तातडीने  उपलब्ध करुन द्यावेत.

सीमेलगतच्या जिल्ह्यात परराज्यातून अवैध मार्गाने येणाऱ्या कापसाच्या खरेदीची शक्यता असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या हद्दींवर चेक पोस्टद्वारे त्यावर नियंत्रण ठेवावे.

वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी ,कापूस खरेदी केंद्रावरील तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामे कमी पडणार नाहीत त्यामुळे कापूस खरेदीला गती द्यावी अशा सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.

यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, सीसीआच्या सीएमडी श्रीमती अल्ली राणी, कॉटन फेडरेशनचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन संचालक सुनील पवार, वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवशंकर उपस्थित होते.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारची परवानगी

  • महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
  • ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य शासनाची मान्यता
  • पुढील प्रक्रिया तातडीने करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे (प्रतिनिधी)

पुणे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ स्थायीचे समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी ही संकल्पना मांडत विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला होता. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यास महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.

महापौर मोहोळ यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या महाविद्यालयाची संकल्पना मांडून निधीही उपलब्ध करुन दिला होता. हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय परिसरात साकारणार असून त्यासाठी १० एकर जागा राखीव करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्यसभेत गेल्या वर्षी २८ ऑगस्टला मान्यता मिळाली होती. या संदर्भातील पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत महापौर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकासचे मुख्य सचिव महेश पाठक यांच्याकडे व्यक्तिशः पाठपुरावा केला होता.

या संदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘मुख्य सभेच्या मान्यतेनंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत अहमदाबाद महापालिकेने साकारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर या संदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करत वेगाने पाठपुरावा केला. आणखी काही तांत्रिक मान्यता घेऊन पुढील वर्षीच्या जूनमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ५०० खाटा असणारे सुसज्ज आणि अद्ययावत महाविद्यालय करण्याचा मानस आहे. या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे पुणेकरांच्या वतीने मी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो’.

५९५ पदांची निर्मिती आणि ६२२ कोटींची गरज

‘महाविद्यालयात प्रत्यक्ष साकारताना विविध प्रवर्गातील ५९५ पदांची निर्मिती करुन भरती प्रक्रिया पार पडणार असून येत्या सहा वर्षात यासाठी टप्प्याटप्प्यात ६२२ कोटी रुपयांची आवश्यकता असणार आहे’, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.