Home Blog Page 2561

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिष्टचिंतन

0

नव्वदी पूर्ण केल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि.१ :-  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बाबांनी आपल्या चळवळीतून ‘एक गाव-एक पाणवठा’, ‘अंगमेहनती कामगार’, ‘कष्टाची भाकर’ या संकल्पना महाराष्ट्रात रुजविल्या. हमाल पंचायतीच्या माध्यमातून हमाल-मापड्यांना कामगार म्हणून ओळख दिली. भटके-विमुक्त, काचपत्रा कामगार, वीटभट्टी कामगार संघटना, देवदासी अशा अनेक वंचित घटकांना त्यांनी संघटीत केले. त्यांचे विषमता आणि जाती निर्मुलनाचे काम कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असे आहे. विषमता निर्मुलनाच्या शिबिरातून महाराष्ट्रातील अन्य पुरोगामी चळवळींचा उगम झाला. महात्मा जोतिराव फुलें यांच्या विचारांचे कृतीशील कार्यकर्ते असणाऱ्या बाबांनी महाराष्ट्रातल्या अनेक चळवळींचे नेतृत्त्व केले आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वंचित घटकांपर्यंत पोहचून, त्यांच्या न्याय मागण्यांना बाबांनी आवाज दिला आहे. त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आहे.

महाराष्ट्राच्या समाज मनाच्या जडणघडणीत बाबा आढाव यांचे योगदान अमुल्य आहे. ते आमच्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थानी आहेत. बाबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तसेच त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडेतीन पटीने वाढले

0

मे मध्ये रिकव्हरी रेट ४३.३५ टक्के

मुंबई, दि. १: राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून ४३.३५ टक्के एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलींग रेट) ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर ३१ मार्च अखेर राज्यात ३०२ रुग्ण होते त्यातील ३९ रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १२.९१ टक्के एवढे होते. एप्रिल अखेर राज्यात १० हजार ४९८ रुग्ण होते. त्यातील १७७३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १६. ८८ टक्के होते.

३१ मे अखेर राज्यात ६७ हजार ६५५ रुग्णांपैकी  २९ हजार ३२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले त्यामुळे मे अखेरीस राज्याचा रिकव्हरी रेट मार्चच्या तुलनेत सुमारे साडे तीन पटीने वाढत ४३.३५ टक्के एवढा झाला आहे. राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजना, लागू केलेले लॉकडाऊन, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळे त्यासोबतच केंद्र शासनाने सुधारीत डिस्चार्ज पॉलिसी जाहिर केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी ८००० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम नोंदविला गेला, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्यमत्र्यांनी सांगितले.

१२ कोटी हडपण्याचा डाव तर उधळला ..दोषींचे काय ? अरविंद शिंदेंचा सवाल (व्हिडीओ)

पुणे- आंबील ओढ्याला क्ल्व्हरट बांधण्याच्या कामासाठी ३२ ते ३८ कोटीच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या टेंडर मधून सुमारे १२ कोटी हडपण्याचा डाव तर उधळला आयुक्तांनी ,अतिरिक्त आयुक्तांमार्फत केलेल्या प्राथमिक चौकशीत आता हा डाव संगनमताने रचणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे हि स्पष्ट झाली .पण आता या दोषींवर कारवाई करणार कोण ? आणि कधी ? असा सवाल करत महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी ,तातडीने स्थायी समितीने देखील पुढील कारवाई चा आग्रह धरला पाहिजे अन्यथा स्थायी समितीबाबत देखील संशय निर्माण होईल असे सांगत कारवाई साठी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. या प्रकरणाची हकीकत अशी कि आंबील ओढ्यावर तातडीने कलव्हर्त बांधण्यासाठी आलेले पूर्वगणनपत्रकाहून  कमी किमतीचे आलेले टेंडर न स्वीकारता ज्यादा दराने आलेले टेंडर अपात्र असताना स्वीकारून त्याबाबत स्थायी समितीची मान्यता घेण्यात आली . हा प्रकार अरविंद शिंदे यांनी लेखी पत्र देवून आक्षेप  घेत घडकीस आणला . त्यानंतर या टेंडर ची पुढील प्रक्रिया थांबवून आयुक्तांनी ,याप्रकरणाची चौकशी अतिरिक्त आयुक्तांमार्फत प्राथमिक चौकशी सुरु केली असे सांगून अरविंद शिंदे म्हणाले ,’ या चौकशीचा अहवाल देखील आला असल्याची माहिती आम्हाला समजली आहे . या अहवालानुसार या अधिकाऱ्यांना  निलंबित करून त्यांची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून पुढील कारवाईची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे . आता आयुक्तांनी तातडीने हि कारवाई करावी म्हणजे महापालिकेची तिजोरी लुटू पाहणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आला बसेल .शिवाय संबधित ठेकेदारावर देखील कारवाई केली पाहिजे यात चाल ढकल केल्यास या प्रवृत्ती आणखी फोफावतील . आणि स्थायी समितीने आता आम्ही अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून या टेंडर ला मान्यता दिल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे . त्यामुळे आता स्थायी समितीने देखील कारवाईचा आग्रह धरला पाहिजे ,अन्यथा स्थायी समिती बाबत हि संशयाचे वातवरण निर्माण होईल . पहा नेमके याबाबत अरविंद शिंदे यांनी काय म्हटले आहे ते ऐका नेमके त्यांच्याच शब्दात …..

नगरसेवक वेडेपाटलांचे युद्ध सुरूच (व्हिडीओ)

पुणे- मार्च मध्ये पुण्यात आलेला कोरोना अजूनही पुण्यातील नागरिकांना जेरीस आणतो आहे अशा अवस्थेत बावधणचे  नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी देखील न थांबतां अविरतपणे कोरोनाशी लढा -युद्ध सुरूच ठेवले आहे . गेय २/ अडीच महिन्यापूर्वी  सुरु केलेल्या कोरोना विरोधातील लढ्याला  त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य  साधून आणखी वेग देण्याचा प्रयत्न केला . दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करत त्यांनी काही सोसायट्या आणि वस्त्यांना हाथ धुण्याचे यंत्रे  दिली, तर डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविला आणि अर्सोनिक अल्बम या रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप करत सफाई कामगारांना अन्नधान्याचे कीट वाटप केले . भाजपचे संघटन सचिव राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर  , वेडे पाटील यांचे सहकारी नगरसेवक किरण दगडे , अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून वेडे पाटील यांना शुभेछ्या दिल्या .  

संगीतकार वाजिदखान यांचे निधन

मुंबई:-बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. ते ४२ वर्षांचे होते.
वाजिद खान व्हेटिंलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारांच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला आहे.
साजिद-वाजिद जोडी आणि सलमान खान यांचं ‘हिट कॉम्बिनेशन’ होतं. सलमानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं. अलीकडेच सलमानच्या भाई-भाई आणि प्यार करोना या चित्रपटांसाठी या जोडीने संगीत दिलं आहे.
दबंग’, ‘वॉन्टेड’, ‘वीर’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘पार्टनर’ यासह सलमानच्या विविध चित्रपटांची गाणीही वाजिद यांनी गायली होती. साजिद-वाजिद जोडीने ‘एक था टायगर’, ‘दबंग’, ‘दबंग २’, ‘दबंग ३’, ‘पार्टनर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘रावडी राठोड’, ‘हाउसफुल २’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना संगीत दिलं आहे.
साजिद-वाजिद जोडगोळीचा नेहमीच बॉलिवूडमध्ये दबदबा राहिला. टीव्हीवरील प्रसिद्ध ‘सारेगमप २०१२’, ‘सारेगमप सिंगिंग सुपरस्टार’ शोसाठी या जोडीने परीक्षक म्हणून काम पाहिले होते. आयपीएल-४ चं थीम सॉंग ‘धूम धूम धूम धडाका’ याच जोडगोळीने संगीतबद्ध केलं होतं. हे गाणं वाजिद यांनी गायलं होतं. वाजिद यांच्या निधनाने अनेक हिट गाणी देणाऱ्या साजिद-वाजिद या दोन भावांची ताटातूट झाली आहे. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद शराफत अली खान हे त्यांचे वडील होते.

पॉझिटिव्ह रूग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस

0

मुंबई/ अमरावती, दि. 31 : अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज सायंकाळी या रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना दिलासा दिला.

गत काही आठवड्यांपासून अमरावतीच्या जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी आज सायंकाळी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट देऊन ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

यावेळी ॲड.ठाकूर म्हणाल्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, डॉ.रवी भूषण यांची टीम जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेऊन काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेवा देत असते. आज मी स्वत: पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत.

मंत्री ॲड.ठाकूर यांनी माहिती दिली, कोविड रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची स्वत: विचारपूस केली. त्यावेळी सर्व दाखल रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी अत्यंत चांगले काम करत असल्याची माहिती या सर्व रूग्णांनी दिली.

त्या म्हणाल्या, अजूनही आपली लढाई संपलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचे प्रकार कुणीही करता कामा नये. आपल्या सगळ्यांनी मिळून एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 212 रूग्ण आढळून आले आहेत. त्यातले 120 रूग्ण म्हणजेच आढळलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक बरे होऊन घरी परतले आहेत. याच रूग्णालयात त्यांनी उपचार घेतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार होत आहेत. 

डॉक्टर व त्यांची टीम या रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.  रुग्णांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. डॉक्टर व आरोग्य यंत्रणा रूग्णांसाठी व समाजासाठी देवदूत ठरली आहे. या काळात सर्वांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे व एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करून त्यावर मात करूया, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

मार्केटयार्डमध्ये आज 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक

पुणे- कोरोनामुळे तब्बल 50 दिवस बंद असलेले गुलटेकडी येथील मार्केटयार्ड अखेर रविवारी (दि. 31) सुरू झाले. आज पहिल्याच दिवशी 200 गाड्यांमधून 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली.

मार्केटयार्ड सुरू झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी रात्री ९ वाजल्यापासूनच बाजार आवारामध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल घेऊन येण्यास परवानगी देण्यात आली होती.

रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत सुमारे २०० गाड्या शेतीमालाची आवक झाली. बाजार समिती प्रशासनाला पहिल्या दिवशी किमान ४०० ते ४५० गाड्या शेतीमालाची आवक होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

मोशी, उत्तमनगर व मांजरी या उपबाजारांमध्ये 4 हजार क्विंटल शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. शहरातील मुख्य बाजार आणि उपबाजार मिळून 471 गाड्यांमधून 15 हजार क्विंटल मालाची आवक झाली.

गेल्या 50 दिवसांपासून बंद असलेला बाजार पूर्वपदावर येण्यास आणखी काही दिवस लागतील. त्यानंतर आवक व मागणी वाढून भाव नियंत्रणात राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

गर्दी कमी ठेवण्यासाठी एका दिवशी पन्नास टक्के आडते आणि दुसऱ्या दिवशी पन्नास टक्के आडते यांना मालाच्या विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

बाजार आवारातील सर्व प्रवेशद्वारांवर कडक चेकपोस्ट ठेवण्यात आले असून, प्रवेश करणा-या प्रत्येक व्यक्तींचे थर्मल स्क्रीनिंग, मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

पुणे शहरामधील अनेक लहान- मोठ्या मंडई सध्या बंद असल्याने शेती मालाला उठाव देखील कमी होत आहे.

बाजार समितीने निर्धारित केल्याप्रमाणे आडते, कामगारांना ओळखपत्र तपासून गेट क्रमांक 1 आणि 4 ने प्रवेश दिला जाणार आहे.

शेतीमाल घेऊन जाणारी वाहने दुपारी 12 नंतर बाहेर काढण्यात यावी, शेतीमाल क्रेट आणि गोनिमध्ये आणावा, कोरोनाचा पार्श्वभूमीवर मास्क वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे, मास्क घातल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, केवळ आडत्यांनाच शेतीमालाची विक्री करता येणार आहे.

निर्धारित केलेल्या वेळेतच शेतीमालाची विक्री करणे, घाऊक विक्री करणे बंधनकारक राहणार आहे, दुबार आणि किरकोळ विक्री करता येणार नाही, बाजार आवारात रिकामी वाहने उभी करू नयेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासकांनी दिला आहे.

तसेच, ओळखपत्र जप्त करून कायमस्वरूपी प्रवेश नाकारला जाणार आहे, आशा अनेक अटी घालून बाजार सुरू करण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.३१ : राज्यात आज १२४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ६२ हजार १७६ नमुन्यांपैकी ६७ हजार ६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४४ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७८ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३५८५ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २७२२ एवढे आहे. राज्यात ५ लाख ५८ हजार १०० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३४ हजार ४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.

राज्यात ८९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९,  कल्याण डोंबिवली ४), नाशिक- ६ (मालेगाव ६), पुणे- ११ (पुणे ९, सोलापूर २), लातूर-१ (उस्मानाबाद १), अकोला-१(यवतमाळ १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर ४३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४७  रुग्ण आहेत तर ३५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ८९ रुग्णांपैकी ५६ जणांमध्ये (६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२८६ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे २७ एप्रिल ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५० मृत्यूंपैकी मुंबई २७, नवी मुंबई -९, मालेगाव -६,कल्याण डोंबिवली -४, ठाणे -३, सोलापूर- १ असे आहेत.

राज्यातीलजिल्हानिहायक्टिव्हरुग्णांचातपशील

मुंबई महानगरपालिका : बाधित रुग्ण- (३९,६८६), बरे झालेले रुग्ण- (१६,७९१), मृत्यू- (१२७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६१०)

ठाणे: बाधित रुग्ण- (९५८५), बरे झालेले रुग्ण- (३४००), मृत्यू- (२००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९८५)

पालघर: बाधित रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१०)

रायगड: बाधित रुग्ण- (११०८), बरे झालेले रुग्ण- (५७३), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)

नाशिक: बाधित रुग्ण- (११३५), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

धुळे: बाधित रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

जळगाव: बाधित रुग्ण- (६१६), बरे झालेले रुग्ण- (२७७), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

पुणे: बाधित रुग्ण- (७९१९), बरे झालेले रुग्ण- (३६९९), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८९१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८९७), बरे झालेले रुग्ण- (३७१), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५६)

सातारा:  बाधित रुग्ण- (५२३), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४५७), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०३)

सांगली: बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५०१), बरे झालेले रुग्ण- (९८६), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)

जालना: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

परभणी: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (१९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

बीड: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१११), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

अकोला: बाधित रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (३१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३६)

अमरावती: बाधित रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (६२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (५७४), बरे झालेले रुग्ण- (३५८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६)

वर्धा: बाधित रुग्ण- (१२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)

भंडारा: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)

एकूण:बाधित रुग्ण-(६७,६५५), बरे झालेले रुग्ण- (२९,३२९), मृत्यू- (२२८६),इतरकारणांमुळेझालेलेमृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३६,०३१)

(टीपआयसी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातीलदिनांक७ मे २०२० पासूनच्या ३२३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.हीमाहिती केंद्र सरकारच्या आय.सी.एम.आर.पोर्टलवरमान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.प्रयोगशाळाअहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३१५७ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ४९० सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ७०.१४  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

मान्सून आला रे आला!

0

कोची, 31 मे : शेतकऱ्यांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांची मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून वेळेआधीच 2 दिवस लवकर केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती स्कायमेटनं दिली आहे. स्कायमेटनं याबाबत माहिती दिली आहे. रविवारी सकाळी दक्षिण भारतासह अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

तामिळनाडूसह पश्चिम कर्नाटकात ढगाळ वातावरण असल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटक आणि गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मुंबईसह कोकणात सातत्यानं हवामान बदलत आहे.

यंदा मान्सून वेळेतआधी दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या वेशीवर असलेला मान्सून महाराष्ट्रात कधी येणार याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. यंदा मान्सून सरासरीच्या 100 टक्के म्हणजे सामान्य असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या वृत्ताला हवामान विभागाकडून अद्याप दुजोरा देण्यात आला नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात वेगानं बदल होत असल्याचं म्हटलं आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना झालेल्या सेमिस्टरची सरासरी काढून गुण देणार- उद्धव ठाकरे

0
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/286355495825282/

उद्धव यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे-

  • 3 जूनपासून आपण हातपाय हलवायला सुरुवात करू. अनेकजण सकाळी व्यायामाला जातात. तरुण मंडळी खुल्या जागेत व्यायाम करतात. बाहेर फिरताना अंतर ठेऊन फिरा. हे अंतर कोरोनापासून अंतर फिरायला मदत करेल. भेटल्यानंतर ठराविक अंतरावरून हाय हॅलो करा. गप्पाटप्पांमध्ये दंग होऊ नका. व्यायाम, जॉगिंग, सायकलिंगला परवानगी.
  • सगळी दुकानं बंद होती. पण 5 जूनपासून लहानमोठ्या शहरातील रस्त्याच्या दुतर्फा जी दुकानं आहे ती समविषम पद्धतीने खुली होतील.
  • गर्दी करायची नाहीये. आपण आधी प्रयोग केले होते, तेव्हा झुंबड उडाली होती. या गोष्टी टाळायला हव्यात. महाराष्ट्राचा आदर्श अन्य राज्यांनी घ्यायला हवा.
  • 8 तारखेपासून कार्यालयं सुरू करत आहोत. 10 टक्के उपस्थितीने सुरूवात करू.
  • आपण कोरोनाच्या सर्वोच्च बिंदूशी आलो आहोत किंवा सर्वोच्च बिंदूजवळ आहोत. केसेसची संख्या वरखाली होऊन कमी होऊ लागली आहे. आपण बंधनं पाळली तर संख्या कमी राहील. ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी घराबाहेर पडू नये.
  • मधुमेह, रक्तदाब, हदयविकार असणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घरातच राहावं. हाय रिस्क गटातील नागरिकांना कोरोना विषाणूचा धोका सर्वाधिक. 55 ते 60 आणि त्यापेक्षा वयाच्या नागरिकांनी घरीच राहावे.
  • मध्यमवयीन तसंच युवांनी घरी गेल्यावर आपल्या माध्यमातून विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घ्या. कपडे धुवा, हात धुवा. लक्षणं आढळली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, तोंडाची चव जाणं, थकवा ही लक्षणं आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • राज्यात 65,000 केसेस आहेत. पहिला रुग्णही यात आहे. 28,000 आसपास रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्देवाने काहीजणांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह केसेस 34,000 आहे. यापैकी 24,000 रुग्ण ज्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. ते क्वारंटीनमध्ये आहेत. काही आयसोलेशनमध्ये आहेत. 24,000 मध्येही मध्यम आणि तीव्र लक्षणं असलेल्यांची संख्या 9,000 आसपास आहे. 1200 जण गंभीर स्थितीत आहेत. यापैकी 200 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
  • आकडे बघून मुंबईत, महाराष्ट्रात गंभीर स्थिती आहे, लष्कराला पाचारण करा अशी टीका होते आहे. त्यांनी आकडेवारी नीट पाहावी
  • महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान आपलीच माणसं करतात, याचं दु:ख आहे.
  • पुढच्या रविवारपासून वृत्तपत्रं घरोघरी पोहचवली जातात. वृत्तपत्रं वितरण करणाऱ्या मुलांना मास्क, सॅनिटायझर दिलं जाईल. त्यांनी काळजी घ्यायला हवी.
  • राज्यात 77 चाचणी केंद्र आहेत. लवकरच चाचणी केंद्रांची संख्या शंभरापलीकडे जाईल. टेस्टिंग वाढवण्याची आवश्यकता कारण पावसात सर्दी, ताप, खोकला हे आजार होतात. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवणं आवश्यक. चाचण्यांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी प्रयत्न
  • राज्यात 2576 कोरोना हॉस्पिटलं. राज्यात एकूण अडीच लाख बेड्स. 25 हजार ऑक्सिजनची सुविधा देऊ शकणारे बेड्स
  • जास्तीत जास्त रुग्णांना ऑक्सिजन लागतो आहे. त्यासाठी व्यवस्था करत आहोत.
  • रुग्ण शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आहे. माझा एक कार्यकर्ता शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये आला. दुखणं अंगावर काढू नका. अनेक रुग्ण वेळेत आल्याने चांगले उपचार होऊ शकले आहेत.
  • मृत्यूदर खाली आणायचा असेल तर डॉक्टर सज्ज आहेत. डॉक्टरांना औषधं वेळेत मिळत आहेत, त्याचवेळी रुग्णही वेळेत त्यांच्यासमोर यायला हवा
  • 16 लाख मजुरांना रेल्वे, बसेसमधून परराज्यात सोडलं आहे
  • पीयुष गोएल यांना धन्यवाद देतो आहे. त्यांनी ट्रेन्स उपलब्ध करून दिल्या.
  • एसटीच्या माध्यमातून सव्वा पाच लाखांहून अधिक मजुरांना गावी सोडलं
  • यासाठी मुख्यमंत्री निधीतून 85 ते 90 कोटी रुपये खर्च
  • 1 ते 30 मे काळात 32 लाखापेक्षा लोकांना शिवभोजन थाळी
  • शाळा,कॉलेजेस कसं सुरू करायच्या याविषयी विचार सुरू आहे.
  • मलेरियावरच्या HCQ औषधाबाबत WHOने युटर्न घेतलाय का?.

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलीटर 2 रूपये वाढ

0

मुंबई: महसुलाची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर प्रति लीटर दोन रूपयांनी वाढवले आहेत. त्यातून राज्य सरकारला दरमहा तीनशे कोटी रूपयांचे वाढीवर उत्पन्न मिळणार असून या वाढीमुळे सरकारी तिजोरीत वार्षिक 3600 कोटी रूपयांची भर पडणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील पेट्रोलचा दर 78 रूपये 31 पैसे आणि डिझेलचा दर 68 रूपये 21 पैसे इतका झाला आहे.

सेस मधील वाढीच्या स्वरूपात ही वाढ करण्यात आली आहे. सध्या पेट्रोलवर प्रति लीटर 8 रूपये 12 पैसे इतका सेस होता तो आता 10 रूपये 12 पैसे इतका झाला असून डिझेलवरील सेस 1 रूपयावरून तीन रूपये इतका करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात वाहने बऱ्यापैकी बंद असल्याने इंधनाची विक्रीही मंदावली होती त्यामुळे इंधनापासून मिळणाऱ्या कर महसुलातही मोठी घट झाली होती.

तथापि आता आंतरराज्य आणि राज्या अंतर्गत असलेले वाहतूक निर्बंध उठवण्यात आल्याने इंधनाच्या खपात पुन्हा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यातील पेट्रोलचा खप 17 टक्‍क्‍यांनी तर डिझेलचा खप 26 टक्‍क्‍यांनी घटला होता. महसुल वाढवण्यासाठी अन्य राज्यांनीही इंधनाच्या दरात सेस वाढ करण्याचा निर्णय अवलंबला आहे.

राज्यातील तंबाखू मुक्ती केंद्रातून साडेपाच लाख रुग्णांवर उपचार

0

मुंबई, दि. ३१ : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला तंबाखू मुक्तीची शपथ देतानाच महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याची शपथही घेतली. राज्यात असलेल्या २२४ तंबाखू मुक्ती केंद्रांच्या माध्यमातून सुमारे साडेपाच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दोन दिवस आधी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध आणि थुंकण्यास बंदी आदेश लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेमार्फत घोषवाक्यही दिले जाते. ‘तरुणांना तंबाखू उद्योगांच्या तावडीतून वाचवा आणि त्यांना तंबाखू व निकोटीनच्या वापरापासून दूर ठेवा’ असे घोषवाक्य या वर्षासाठी देण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात २६ हजार ४१८ शाळा आणि २४४२ आरोग्य संस्था तंबाखू मुक्त करण्यात आल्या आहेत. तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत सुमारे ६ कोटी ५४ लाख २४ हजार ४३० इतका दंड वसुल करण्यात आला आहे. २२४ तंबाखू मुक्ती केंद्राच्या माध्यमातून ५ लाख ४१ हजार ४१५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून २५ हजार २७५ जण तंबाखू मुक्त करण्यात आले आहेत. जुलै २०१८ पासून राज्यात हुक्का बंदी देखील करण्यात आली आहे. गेली चार वर्ष राज्यामध्ये मौखिक कर्करोग तपासणी शिबिरे देखील घेण्यात आली आहेत.

आज येथील शासकीय निवासस्थानी आरोग्यमंत्र्यांनी तंबाखू विरोधी शपथ देताना… मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन अशी शपथही घेतली.

चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणास नियमांच्या अधीन राहून परवानगी

मुंबई, दि ३१ : गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकाकास्टिंग फाऊंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे  चित्रपटसृष्टी ठप्प झाली असून चित्रीकरणास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. आज यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी  मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.

यानुसार आता निर्मात्यांना निर्मिती पूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येतील. निर्मात्यांनी याप्रमाणे काळजी घेऊन चित्रीकरण करावयाचे असून नियमांचा भंग झाल्यास कामे बंद करण्यात येतील असेही यात म्हटले आहे. कोविड संदर्भात लागू केलेल्या प्रतिबंधातील सुचना यासाठी लागू राहतील. 

या चित्रीकरण कामांसाठी निर्मात्यांना मुंबईकरीता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव येथे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी त्या-त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.

मुख्यमंत्र्यांनी तब्बल अडीच तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्न ऐकून घेतले

0

मुंबई. कोरोना महामारीमुळे सध्या सर्वकाही ठप्प आहे. यातच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण देण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत समोर आला. याशिवाय, जूनमध्ये शालेय वर्षही सुर झाले पाहिजे यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. यासंबंधी शालेय शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक आज पार पडली.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली . त्यात मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार, आ. कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ञही उपस्थित होते. 10 वर्षांत प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तब्बल अडीच तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्न ऐकून घेतले तसेच ते सोडविण्यासाठी आश्वस्त केल्याचे आमदार कपिल पाटील यावेळी म्हणाले.

शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची आज बैठक पार पडली. यात शाळा आणि मुलांचे शिक्षण सुरूसाठी अनेक शक्यतांची पडताळणी करण्यात आली आहे. या बैठकी दरम्यान, जून पासून शिक्षण सुरू करावे असे सांगण्यात आले आहे. यात शाळाच सुरू कराव्यात असे नाही. ऑनलाइन , ऑफलाइन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्या प्रमाणे शिक्षण सुरू करुन, मुलांचे वर्ष वाया जाऊ देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.

शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये

ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल. दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात, असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे. याशिवाय, ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे असेही यात सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत जूनमध्ये आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश यात देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण विभाग बैठक महत्त्वाचे मुद्दे

• जून पासून शिक्षण सुरू करावे. शाळा च सुरू कराव्यात असे नाही.

• ऑनलाइन , ऑफलाइन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्या प्रमाणे शिक्षण सुरू व्हावे.

• मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही.

• शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये

• ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल

• दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात

• ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे

• जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे.

• कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्टाने देशाला दाखवून द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

• गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी असेही ते म्हणाले

कंटेन्मेंट झोन वगळता अनेक ठिकाणचे निर्बंध शिथिल; हॉटेल्स, मॉल्स सुरू होणार नाही; अधिसूचना जारी

0

मुंबई दि.31 : #मिशनबिगिनअगेन (पुनश्चः प्रारंभ) या अभियानांतर्गत राज्य शासनाने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यात केली जाईल. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थचक्राला पुन्हा गती मिळणार आहे. काही निर्बंधासह रिक्शा, ऑटो, स्कूटर या वाहनांना परवानगी देण्यात आली असून, दुकानेसुद्धा निर्धारित केलेल्या नियमानुसार व वेळेत सुरु राहतील. हा आदेश 1 जून पासून अंमलात येत असून तो 30 जून 2020 पर्यंत लागू राहिल.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्रीय मार्गदर्शिकेचे पालन या कालावधीत केले जाईल. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यात रात्रौ 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी राहिल. स्थानिक प्रशासन त्यांच्या अधिकार क्षेत्रासाठी सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत बंदीचे आदेश काढून त्याची कडक अंमलबजावणी करतील. 65 वर्षावरील व्यक्ती, कोमॉ बिडिज असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला आणि मुलांनी वैद्यकीय व इतर अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडू नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन्स)

•          केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्र नेमके कोणते असेल हे महापालिका/जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत ठरविण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रात पालिका आयुक्त, तर जिल्ह्यातील इतर भागासाठी जिल्हाधिकारी यांना प्रतिबंधित क्षेत्र नेमके कोणते असेल हे ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित क्षेत्राची तपासणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रात रहिवासी संकुल आणि वस्ती, झोपडी, इमारत, रस्ता, वॉर्ड, पोलीस ठाणे परिसर, छोटे गाव असू शकतील. पूर्ण तालुका, पूर्ण पालिका क्षेत्र  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यापूर्वी मुख्य सचिव यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

•          कंटेनमेंट झोन क्षेत्रात नागरिकांच्या ये-जा करण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले असून त्यावर बारकाईने देखरेख ठेवण्यात येईल. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वैद्यकीय आणि जीवनाश्यक वस्तुंना यामधून सूट देण्यात आली आहे.

निर्बंधातून सूट आणि टप्याटप्याने मोकळीक

बृहन्मुंबई महानगर पालिका आणि  पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महानगर पालिका या आधीच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आलेल्या कामांशिवाय इतर कामांनाही काही निर्बंधांसह परवानगी देण्यात येत आहे. तथापि या क्षेत्रातील कंटेन्टमेंट झोनमध्ये ही कामे करता येणार नाहीत.

मिशन बिगेन अगेन टप्पा 1 (3 जून 2020 पासून)

• बाह्य हालचाली – सायकलिंग / जॉगिंग / धावणे / चालणे यासारख्या वैयक्तिक शारीरिक व्यायामासाठी किनारपट्टी, सार्वजनिक / खाजगी क्रीडांगणे, सोसायट्या/ संस्थांची क्रीडागंणे, उद्याने आणि टेकड्यांवर काही अटी व शर्तींवर सर्वसामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बंद भागामध्ये (इनडोअर) अथवा इनडोअर स्टेडियम मध्ये कोणत्याही कामांना परवानगी देण्यात आलेली नाही.

• उपरोक्त परवानगी ही सकाळी 5 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान असेल.

• कोणत्याही सामूहिक कामास (ग्रुप अटिव्हिटी) अथवा क्रियेस परवानगी दिली जाणार नाही. तथापि, मुलांबरोबर प्रौढ व्यक्ती देखील असाव्यात.

• लोकांनी मर्यादित कालावधीत शारिरीक व्यायामासाठी घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

• इतर कोणत्याही कामाना अथवा उपक्रमांना परवानगी नाही.

• लोकांना फक्त जवळपास / शेजारच्या मोकळ्या जागांचा वापर करण्याची परवानगी आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासास परवानगी दिली जाणार नाही.

• लोकांना गर्दी असलेल्या मोकळ्या जागांना टाळावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

• सायकलिंग सारख्या शारीरिक व्यायामावर जास्त भर द्यावा, जेणेकरून सामाजिक अंतर ठेवण्यास आपोआप मदत होईल.

• प्लंबर, इलेक्ट्रिशियन, किटक नियंत्रक (पेस्ट कंट्रोल) व तंत्रज्ञ यासारख्या स्वयंरोजगार करणाऱ्यांनी योग्य सामाजिक अंतर पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून कामे करावीत.

• पूर्व परवानगी/ वेळ ठरवून घेऊन वाहनांची दुरुस्ती व वर्कशॉप सुरू करता येतील.

• सर्व शासकीय कार्यालये (आणीबाणी, आरोग्य व वैद्यकीय, तिजोरी, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, नगरपालिका सेवा वगळता जे शेवटच्या पातळीपर्यंत गरजेनुसार कामे करू शकतात) हे 15 टक्के कर्मचारी अथवा कमीत कमी 15 कर्मचारी यापैकी जी जास्त संख्या असेल त्या संख्येच्या मनुष्यबळांसह सुरू करण्यात येतील.

मिशन बिगीन अगेन – फेज २ (५ जून २०२० पासून) 

  • सर्व मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सशिवाय) ही पी – १, पी – २ बेसिसवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. (रस्ता, गल्ली किंवा एखाद्या क्षेत्रातील एका बाजूची दुकाने ही विषम तारखेला तर दुसऱ्या बाजूची दुकाने ही सम तारखेला खुली राहतील).
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने कपड्यांच्या किंवा तत्सम दुकानांमध्ये ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील याची दुकानदारांनी खबरदारी घ्यायची आहे. ग्राहकांना उभे राहण्यासाठी जमिनीवर चिन्ह तयार करणे, टोकन पद्धती, होम डिलीव्हरी आदींना प्रोत्साहन द्यावे.
  • खरेदीसाठी लोकांनी पायी जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्यतो जवळची दुकाने, मार्केटमध्ये खरेदी करावी. बिगर अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लांबच्या प्रवासाला अनुमती नाही. खरेदीसाठी वाहनांचा वापर करण्यात येऊ नये.
  • सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत दुकान, मार्केट हे प्रशासनाकडून बंद करण्यात येईल.
  •  टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, रिक्षासाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी, चारचाकी वाहनासाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ अधिक २ प्रवासी तर मोटारसायकलसाठी अत्यावश्यक सेवेकरिता १ प्रवासी याप्रमाणे अनुमती असेल.

       मिशन बिगिन अगेन – टप्पा क्रमांक 3 (8 जून पासून सुरु होईल)

• सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के मनुष्यबळासह सुरु करता येतील. इतर कर्मचारी घरी राहून काम करतील. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर यांचे नियम पाळावे लागतील. घरी परतल्यानंतर घरातील वयस्कर व्यक्तींना कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. या अनुषंगाने संबंधित आस्थापनांनी योग्य त्या सूचना/निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना द्यावे लागतील.

• जी कामे करण्यासाठी बंदी नाही ती सुरु ठेवता येतील. परवानगी असलेल्या कामांसाठी कोणत्याही शासकीय परवानगीची गरज असणार नाही. स्टेडियम आणि खुली क्रीडा संकुले ही व्यक्तिगत कवायती, व्यायामासाठी वापरात येतील. मात्र या ठिकाणी प्रेक्षक वा दर्शकांच्या सहभागावर पूर्णपणे बंदी राहील. इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही बाबीस परवानगी दिली जाणार नाही. सर्व शारीरिक कवायती आणि व्यायाम सामाजिक अंतराचे नियम पाळून करणे आवश्यक राहील.

• सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे राहील- दुचाकी एक प्रवासी, तीन चाकी किंवा ऑटो रिक्शा – 1 अधिक 2 प्रवासी, चार चाकी वाहन – 1 अधिक 2 प्रवासी.

• जिल्ह्यांतर्गत बस वाहतुकीला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह अनुमती असेल. तसेच यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे तसेच स्वच्छताविषयक काळजी घ्यावी लागेल.

• आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बस वाहतुकीला अनुमती नसेल. यासंदर्भातील आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील. 

• सर्व दुकाने, मार्केटस् हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील. गर्दी दिसल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाकडून सदरची दुकाने किंवा मार्केट तातडीने बंद करण्यात येतील.

पुढील बाबींना राज्यभर प्रतिबंध :

• शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था,विविध शिकवणी वर्ग बंद.

• प्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून)

• मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद.

• स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी न घेतल्यास रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी.

• सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह, आणि तत्सम इतर ठिकाणे बंद.

• सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या समारंभांना बंदी.

• सार्वजनिक धार्मिक स्थाने / पुजास्थळे बंद.

• केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद.

• शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद.

 • निर्बंध कमी करण्याची प्रक्रिया तसेच यातील काही बाबींना सुरू सुरू करण्यास विशिष्ट मानकांद्वारे आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून टप्प्याटप्प्याने परवानगी दिली जाईल.

विशिष्ट प्रकरणात व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचाली सुनिश्चित करण्यासाठी निर्देश

• सर्व प्राधिकाऱ्यांनी वैद्यकीय व्यवसायी, परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय हालचाली/वाहतुकीस परवानगी द्यावी.

• तथापि, लोकांच्या आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा हालचाली नियमित केल्या जातील. अडकलेले मजूर, स्थलांतरित कामगार, प्रवासी भाविक, पर्यटक इत्यादींच्या हालचालींचे नियमन वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या प्रमाणित कार्य मानके/कार्यप्रणालीनुसार (एसओपी) केले जाईल.

• श्रमिक विशेष रेल्वेगाड्या व सागरी वाहतुकदारांकडून होणाऱ्या वाहतुकीचे नियमन वेळोवेळी जारी केलेल्या एसओपीनुसार केले जाईल.

• देशाबाहेर अडकलेल्या भारतीय नागरिकांची त्यांना देशात आणण्यासाठी तसेच विशिष्ट व्यक्तींची परदेशात जाण्यासाठी हालचाल; परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविणे; भारतीय खलाश्यांचे साइन-ऑन आणि साइन-ऑफ यांचे नियमन वेळोवेळीच्या एसओपीनुसार केले जाईल.

• सर्व प्राधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या वस्तू/मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीस परवानगी द्यावी. यामध्ये रिकाम्या ट्रकच्या हालचालीचाही समावेश राहील.

• शेजारील देशांसोबतच्या करारानुसार संबंधित देशांबरोबर होणाऱ्या व्यापारांतर्गत वस्तू/मालवाहतुकीस कोणतेही प्राधिकरण अडथळा आणणार नाही.

आरोग्य सेतू ॲपचा वापर

• ‘आरोग्य सेतू’ ॲप हे संक्रमणाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास सक्षम आहे. कार्यालये व कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये ‘आरोग्य सेतु’ ॲप कार्यान्वित करण्यासाठी सर्व नियोक्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत तसेच त्याबाबतची खात्री करावी.

• जिल्ह्यातील प्राधिकाऱ्यांनी व्यक्तींना स्मार्टफोनवर ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी व त्यावर त्यांची आरोग्य स्थिती नियमितपणे अद्ययावत करण्यासाठी सल्ला दिला पाहिजे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका असू शकणाऱ्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे सुलभ जाऊ शकते.

सर्वसाधारण सूचना

  • कंटेनमेंट क्षेत्रात या पूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्यविषयक प्रोटोकॉलचे (नियमावलीचे) पालन केले जाईल.
  • या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात कोणतेही आदेश / मार्गदर्शक सूचना/ दिशानिर्देशन कोणत्याही जिल्हा, क्षेत्रीय किंवा राज्य प्राधिकरणास,  राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहमती शिवाय काढता येणार नाहीत.  

दंड तरतूद

कोणत्याही व्यक्तीने  या निर्देशांचे  उल्लघन केल्यास,  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सेक्शन 51 ते 60 अंतर्गत कारवाईस पात्र राहील.  भारतीय दंड संहिता (IPC)  सेक्शन 188, आणि इतर कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाही  केली जाईल.