Home Blog Page 2557

१५ मेपासून आतापर्यंत ९ लाख ४७ हजार ग्राहकांना घरपोच मद्य विक्री

0

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप  यांची माहिती

मुंबई -दि.१५ मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 5 जून 2020 या काळात 9 लाख 47 हजार 859  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. आज दिवसभरात 59 हजार 498 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात 34 हजार 004 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 7,261 अनुज्ञप्ती सुरू  आहेत. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात दि.15-05-2020 पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थलावरऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याचीसुविधा उपलब्ध आहे. 1 मे 2020 ते 31 मे 2020 या काळात 1 लाख 20 हजार 547 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 10 हजार 763 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्याकार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुनमिळू शकतात.

दि.24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करीरोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. दि.5 जून 2020 रोजी राज्यात 77 गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 43 आरोपींना अटक करण्यात आली असून 9 लाख 60 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.24 मार्च, 2020 पासुन दि.5 जून 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यातएकूण 7,225 गुन्हे नोंदविण्यात आले असून 3,344 आरोपींना अटककरण्यात आली आहे. 662 वाहने जप्त करण्यात आली असून 18 कोटी 67 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.  यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून  commstateexcise@gmail.com हा ई-मेल आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पुणे-‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्याच्या मावळ, खेड आणि जुन्नर तालुक्यातील विविध गावांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.

मावळ तालुक्यातील भोयरे, पवळेवाडी, खेड तालुक्यातील करंजविहीरे, शिवे गावांना भेट देऊन येथील नुकसानीची पाहणी केली.

बाधित शेतकरी, नागरिक, गावकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. कोणत्याही बधितांचे नुकसानीचे  पंचनामे राहता कामा नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी आ. सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही त्यांनी पाहणी केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

माणगाव एमआयडीसीमध्ये एक लाख कोटींची गुंतवणूक; हजारोंना मिळणार रोजगारांची संधी-सुभाष देसाई

0

मुंबई, दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे.  या निर्णयामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दक्षिण रायगड जिल्ह्यात डीएमआयसीसाठी एकूण १२,१४० हेक्टर क्षेत्र २०११ मध्ये अधिसूचित करण्यात आले. त्यापैकी ३२७७ हेक्टर क्षेत्राचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांनी संमती न दिलेली व वन विभागाच्या ताब्यातील क्षेत्रे यापूर्वीच वगळण्यात आलेली आहेत.

यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात डीएमआयसीअंतर्गंत उद्योगनगरी स्थापन केली आहे. परंतु केंद्र सरकारने मान्य केलेले सहाय्यक अनुदान प्राप्त न झाल्याने विकासाची गती काहीशी धीमी झाली. दरम्यान, रायगड जिल्ह्यात थेट परकीय गुंतवणुकीतून व देशांतर्गंत उद्योग समूहांकडून विशाल प्रकल्प उभारण्यासाठी भूखंडांची मागणी होत आहे. माणगाव तालुक्यात ३२७७ हेक्टर इतक्या क्षेत्राचा ताबा एमआयडीसीला प्राप्त झाला असून महामंडळ स्वतःच्या व खाजगी सहभागातून या क्षेत्रावर पायाभूत सुविधा निर्माण करू शकते. राज्याची स्वतःची क्षमता, गुंतवणुकदारांची मागणी व कोकणात रोजगार निर्मितीची निकड लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे, असे उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले.

भूखंड मागणीसाठी दहा गुंतवणुकदारांनी एमआयडीसीकडे विचारणा व मागणी केली आहे. सदर चर्चा प्रगत अवस्थेत असल्यामुळे माणगाव एमआयडीसी स्थापन करण्याच्या विषयचा उद्योग विभागाने पाठपुरावा केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रस्तावाची माहिती दिली व मंगळवारी मंत्रिमंडळाने सहा हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंजुरी दिली.

दरम्यान, नुकतेच देशातील प्रमुख औषध उत्पादकांना उद्योगमंत्र्यांनी वेबिनारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले असता उद्योगपतींनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. परदेशी व देशातंर्गत गुंतवणुकीतून विशाल प्रकल्प उभे राहिल्यास फार मोठ्या संख्येने लघु व मध्यम उद्योगांचे जाळे या क्षेत्रावर विकसित होऊन सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित होईल, शिवाय हजारोंच्या संख्येने नोकऱ्या व अप्रत्यक्ष रोजगारास चालना मिळेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यात सध्या ५५ हजार उद्योग सुरू झाले असून त्यात साडेतेरा लाख कामगार रुजू झाले आहेत. येत्या काही दिवसांत इतर ठिकाणीचे उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांना पाठविण्यात येईल, असेही उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपये तातडीची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

0

अलिबाग-निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

तत्पूर्वी आज सकाळी मुख्यमंत्र्यांचे मुंबईहून बोटीने मांडवा येथे आगमन झाले. त्यानंतर  त्यांनी थळ येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार भरतशेठ गोगावले, रविशेठ पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, महेश बालदी, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्रा,  जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ५३ हजार पास वाटप-अनिल देशमुख

0

५ लाख ६० हजार व्यक्ती क्वारंटाईन; ६ कोटी ४२ लाखांचा दंड -गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि.०५-  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ५३ हजार ४७७ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ६० हजार व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ४ जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख २२ हजार ७७२ गुन्हे नोंद झाले असून २३ हजार ८२७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ४२ लाख ८३ हजार २११ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई

 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५८ घटना घडल्या. त्यात ८३८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर-१ लाख फोन

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १ लाख २०३ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे अशा ७१८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५ लाख ६० हजार ३०३ व्यक्ती क्वारंटाईन (Quarantine) आहे, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३० वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७९ हजार ८०२ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील १८ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण १९, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३१ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १९५ पोलीस अधिकारी व १३०४ पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात सध्या एकूण ५९७ रिलिफ कँप आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३६ हजार ७२२ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी वस्तू व सेवा कर कर्मचारी सहकारी पतपेढीच्या वतीने सव्वा लाखांचा निधी

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपुर्द

मुंबई -‘कोरोना’च्या लढ्यासाठी वस्तू व सेवा कर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबईच्या वतीने 1 लाख 25 हजार रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. संस्थेचे प्रमुख कार्यवाह प्रमोद तावडे यांनी  मंत्रालयात मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे काल सुपुर्द केला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत वस्तू व सेवा कर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबईच्या वतीने 1 लाख 25 हजार रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्यात आला आहे.

‘ॲपोकॅलिप्टीक’ असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नाही – प्रधान सचिव अनुप कुमार यांचे स्पष्टीकरण

0

मुंबई-पोल्ट्रीमध्ये कोरोना विषाणूपेक्षा भयंकर असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता असून त्यामुळे मानव समूहामध्ये कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यता अमेरिकेतील आहारतज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांचा हवाला देऊन एका वृत्तवाहिनीद्वारे बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी सांगितले.

ॲपोकॅलिप्टीक व्हायरस असे शास्त्रीय नाव असणारा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसून ॲपोकॅलिप्टीक या शब्दाचा अर्थ जगाचा विनाश करणारा असा असून डॉ. मायकल यांनी तो त्या अर्थाने वापरला असावा. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार ॲपोकॅलिप्टीक व्हायरस नावाचा विषाणूंचा आंतरराष्ट्रीय पातळीवार पशूंमधील रोगांचे संनिरिक्षण करणाऱ्या ओआयई संस्थेने नमूद केलेल्या कोबड्यांना बाधित करणाऱ्या विषाणूंच्या यादीमध्ये समावेश नसल्याचे श्री. अनुप कुमारयांनी म्हटले आहे.

डॉ. मायकल ग्रेगर यांच्या लिखीत पुस्तकावर आधारित आहे व डॉ. मायकल ग्रेगर हे आहारतज्ज्ञ असून मानवी स्वास्थ तज्ज्ञ नसल्याचे व सदरील बातमी शास्त्रीयदृष्ट्या शहानिशा न करता प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. यावरून असे लक्षात येते की, ॲपोकॅलिप्टीक व्हायरस आजमितीस अस्तित्वात नसल्याचे व भविष्यात असा एखादा व्हायरस येऊ शकतो अशी कल्पना डॉ. मायकल यांनी मांडल्याचे दिसून येत असल्याचे श्री. अनुप कुमार यांनी सांगितले.

राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू- राजेश टोपे

0

आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्णांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई,राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.

राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ९३ (मुंबई ५४, ठाणे ३०, वसई विरार १, कल्याण डोंबिवली ७, भिवंडी १), नाशिक- २४ (जळगाव १४, नाशिक ३, मालेगाव ८), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), कोल्हापूर- ५ (रत्नागिरी ५) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), औरंगाबाद-१.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १३९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७८ रुग्ण आहेत तर ५३  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १३९ रुग्णांपैकी ११० जणांमध्ये ( ७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८४९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी २७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  २१ एप्रिल ते २ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ११२ मृत्यूंपैकी मुंबई ४१, जळगाव -१३, ठाणे ३०,कल्याण डोंबिवली -७, मालेगाव -८, रत्नागिरी -५, पुणे- ३, भिवंडी -१, सोलापूर -२,  नाशिक २ असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४६,०८०), बरे झालेले रुग्ण- (१८,७७८), मृत्यू- (१५१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५,७६८)

ठाणे: बाधित रुग्ण- (११,८७७), बरे झालेले रुग्ण- (४४४५), मृत्यू- (२९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१४०)

पालघर: बाधित रुग्ण- (१२८५), बरे झालेले रुग्ण- (४६८), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०)

रायगड: बाधित रुग्ण- (१३६२), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०१)

नाशिक: बाधित रुग्ण- (१३६७), बरे झालेले रुग्ण- (९७८), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४)

धुळे: बाधित रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

जळगाव: बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (३७४), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

पुणे: बाधित रुग्ण- (९०५१), बरे झालेले रुग्ण- (४८९३), मृत्यू- (३९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७६८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१२१७), बरे झालेले रुग्ण- (५७२), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५१)

सातारा:  बाधित रुग्ण- (५८७), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२१)

सांगली: बाधित रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (७९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (१२९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७८१), बरे झालेले रुग्ण- (११४८), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४३)

जालना: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (७८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२०५), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

परभणी: बाधित रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (१३२), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१०६), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

बीड: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६२), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

अकोला: बाधित रुग्ण- (७२७), बरे झालेले रुग्ण- (४०५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८८)

अमरावती: बाधित रुग्ण- (२७५), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

वाशिम: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१)

नागपूर: बाधित रुग्ण- (६८१), बरे झालेले रुग्ण- (४११), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५९)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधित रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३०), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

एकूण: बाधित रुग्ण-(८०,२२९), बरे झालेले रुग्ण- (३५,१५६), मृत्यू- (२८४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(४२,२१५)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १०४ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३४७९ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ०२६ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६९.१८  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्धतेबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने डॅश बोर्ड ची सुरुवात-डॉ म्हैसेकर

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून पुणे विभागात डॅश बोर्ड विकसित

पुणे,कोरोना रुग्णांसाठी शासकीय व खाजगी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या संकल्पनेतून डॅश बोर्ड स्थापन करण्यात आला आहे.

या डॅश बोर्ड ची सुविधा www.divcommpunecovid.com/ccsbeddashboard या लिंक वर संगणकीय प्रणाली द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रुग्णालयातील बेड च्या उपलब्धतेची माहिती या डॅश बोर्ड वर वेळोवेळी अद्ययावत करण्याच्या सूचना विभागातील रुग्णालय प्रशासन व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. ही माहिती रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या संस्थांनाही देण्यात येणार आहे, जेणेकरुन बेड उपलब्ध असणाऱ्या नजीकच्या रुग्णालयात रुग्णाला जलदगतीने दाखल करणे शक्य होईल. यामुळे प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही या डॅश बोर्ड सुविधेचा निश्चितच उपयोग होईल.

नागरिकांना डॅश बोर्ड ची माहिती मोबाईल अँप द्वारे पाहता येण्यासाठी काम सुरु आहे. लवकरच ही सुविधा DivCompunebeds या मोबाईल अँप द्वारे देखील एका क्लीक वर पाहता येणे शक्य होणार आहे. यासाठी आय टेक बिझनेस सोल्युशन्स या पुण्यातील कंपनीचे शैलेंद्र फाटक यांनी तांत्रिक काम केले आहे.

पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली 11 हजार 438

पुणे विभागातील 6 हजार 486 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 11 हजार 438 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

   पुणे-पुणे विभागातील 6  हजार 486 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  11  हजार 438  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 428 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 258 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 8 हजार 916 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 111 आहे. कोरोनाबाधित एकूण 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.  
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 352 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 312, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 9, सांगली जिल्ह्यात 4,  कोल्हापूर जिल्ह्यात 8 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील 597 कोरोना बाधीत रुग्ण असून 251  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या 322  आहे. कोरोनाबाधित एकूण 24  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 1 हजार 144 कोरोना बाधीत रुग्ण असून 476 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  571 आहे. कोरोना बाधित एकूण 97  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 128 रुग्ण असून 78 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 46 आहे. कोरोना बाधित एकूण 4  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील 653 कोरोना बाधीत  रुग्ण असून 269 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 378 आहे. कोरोना बाधित एकूण 6  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 96 हजार 596 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी       87 हजार 475 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 121 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  80 हजार 885  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 11 हजार 438 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.   

(टिप : – दि. 5 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

कोरोनाचा रुग्णदर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

0

कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी असणाऱ्यांच्या कामाचे कौतुक

  • आवश्यक त्या मूलभूत सेवा-सुविधा यापुढेही राज्य शासन गतीने उपलब्ध करुन देणार
  • कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे
  • रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन द्यावेत
  • कोमॉर्बिलिटी नागरिकांची विशेष काळजी घ्यावी

पुणे,जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येत असलेल्या सेवा सुविधा, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री व आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्ती एस. चोक्कालिंगम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे प्रभारी अधिष्ठातता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्यानंतर श्री. देशमुख म्हणाले, शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती होण्यासाठी तसेच वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रशासनाने शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन योग्य तऱ्हेने हाताळावे. कोविड-19 विरुध्दच्या लढाईत आरोग्य विभाग अग्रेसर आहे. आरोग्य विभागासह या लढ्यात सहभागी असणाऱ्या अन्य विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. तसेच या काळात आरोग्य व अन्य विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, स्वच्छता कर्मचारी आदींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेवून आवश्यक तपासणी करुन घ्यावी, असे सांगून कोरोनामुळे आजवर काहींना आपला जीव गमवावा लागला, त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी राज्य शासन सुरुवातीपासूनच सक्रीय आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णांलयांना पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर, औषधसाठा कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असून यापुढेही राज्य शासन आवश्यक त्या सेवा सुविधा गतीने उपलब्ध करुन देईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबद्दल जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. कोविड बरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, याची दक्षता घ्यावी. झोपडपट्टी परिसरात तपासणी क्षमता वाढवून उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसन विकार आदी आजार असणाऱ्या (कोमॉर्बिलिटी) नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे सांगून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्धारीत करण्यात आलेला औषधोपचार करावा, असेही ते म्हणाले.
अन लॉकच्या अनुषंगाने बोलताना श्री. देशमुख म्हणाले, त्या-त्या भागात परिस्थिती नुसार निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात येण्यासाठी नागरिकांनी देखील सोशल डिस्टनसिंग व स्वच्छतेचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. खाजगी व शासकीय डॉक्टरांनी समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले.
यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले नियंत्रण कक्ष, शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन, प्रशासनाच्या उपाययोजना, स्वॅब तपासणी क्षमता, मिशन बिगीन अगेन.. आदी विविध विषयांचा आढावा श्री. देशमुख यांनी घेतला.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आजवर तपासणी करण्यात आलेले नागरिक, यापैकी बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या नागरिकांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या, करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयाच्या वतीने देण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा-सुविधांची माहिती दिली.
महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या व यापुढील कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.
ससूनचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी ससून रुग्णालयामध्ये आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, वयोमानानुसार रुग्ण दर, मृत्यूदर, क्षेत्रनिहाय दाखल रुग्ण, अतिदक्षता विभाग व अन्य विभागात देण्यात येत असलेल्या सुविधा आदींची माहिती दिली.
यावेळी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.

लॉकडाउनने भारतात कोरोनाच्या मुसक्या बांधायचे काम केले-आ.चंद्रकांत पाटील


पुणे-जगभर चौखूर उधळलेल्या कोरोना नामक खोंडाच्या भारतातील लॉक डाउन ने मुसक्या आवळण्याचे यशस्वी प्रयत्न केलेत हे येणारा काळ स्पष्ट करेल असा दावा चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे . कोरोनाचा मुकाबला, ऐतिहासिक निर्णय, गरीबांचे कल्याण, आत्मनिर्भर भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे येथे केले.

मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला आहे. भारताची लोकसंख्या आणि कोविडचा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र एकसारखीच लोकसंख्या असूनही १ जून २०२० ला या १४ देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी कोविडचा संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या २२.५ पट अधिक आहे. या १४ देशांमध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे. वेळीच लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटपट वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यामुळे हे शक्य झाले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनतेने देशभरात लॉकडाऊनचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य झाले.

ते म्हणाले की, कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतकऱ्यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले.

त्यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघू उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल.

ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी घालणे, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरू करणे तसेच पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधील पीडीत धार्मिक अल्पंसख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले. गेली अनेक दशके ज्यांची देशवासियांना आस होती, असे निर्णय या सरकारने घेतले आहेत आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली आहे

फूल बाजार 15 जून पासून सुरु होणार

पुणे- मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील भुसार, फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग सुरू आहे. मात्र, फुलाचा बाजार अद्याप बंद आहे. आडते आणि शेतकऱ्यांकडून बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे. 15 जूननंतर बाजार सुरू करणाचा विचार कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.
सध्या लॉकडाऊनमुळे मंदिर बंद आहेत. लग्नकार्यही फारशी होत नाहीत. सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याच्या अडचणीचा विचार करून अद्याप बाजार बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, फुल बाजार आडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क करून बाजार सुरू करण्याबाबत विचारणा केली असून, शेतकऱ्यांकडून याबाबात मागणी होत आहे.

कोरोना-पुण्यात मदतगार आणि लूटमार -कुठे छापा तर कुठे काटा ..

पुणे -कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाउनच्या काळात एकीकडे मदतीचे हाथ पुढे होत असताना दुसरीकडे नफेखोरी करत किराणा, चिकन, मटन आणि सलून दुकानदार यांनी आधीच नोकरी च्या ,पगाराच्या चिंतेने हैरान झालेल्या, व्यवसाय ठप्प झालेल्या मध्यमवर्गीयाची मोठी लूट शहरात केल्याचे दिसून आले आहे.दुर्दैवाने शासकीय स्तरावर याबाबत म्हणावी तशी 99 टक्के हालचाल दिसून आली नाही.

वेगवेगळी कारणे पुढे करत अत्यावश्यक वस्तू आणि किराणा चढ्या भावाने विकला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एमआरपीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागल्याचा आक्षेप ७१ टक्के ग्राहकांनी नोंदवला आहे.

मूळ उत्पादकांनी वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ केलेली नाही. कमिशनही घटवलेले नाही, तरीही किरकोळ व्यापाऱ्यांनी सवलती रद्द करून जास्त दराने विक्री केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अवघ्या २५ टक्के ग्राहकांनी मूळ किंमतीत वस्तू मिळाल्याचे म्हटले आहे. वस्तू घरपोच देणे, मजुरांची टंचाई, हमाली, वाहतुकीचा वाढलेला खर्च अशी कारण देत चढा भाव लावल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

काय म्हणाले होते राजीव बजाज , लॉक डाउन बाबत

0

देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत राजीव बजाज यांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखत घेतली.

यावेळी काय म्हणाले होते राजीव बजाज

राजीव बजाज यांनी सांगितले की, पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत केंद्र सरकारने अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले.

त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. या वर्गातील लोकांना सध्या अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती डोळ्याला दिसत असूनही केंद्र सरकार त्यापासून काही धडा शिकायला तयार नाही.

उद्योगपती राजीव बजाज व राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारवर इतक्या परखडपणे देशातील कोणत्याही उद्योगपतीने जाहीर टीका केली नव्हती. लॉकडाऊन व केंद्र सरकारच्या धोरणांबाबत राजीव बजाज यांनी हातचे काहीही राखून न ठेवता आपली मते या मुलाखतीत मांडली.
राजीव बजाज म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक त्रुटी आहेत. या निर्णयामुळे देशाचे दुहेरी नुकसान झाले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही व अर्थव्यवस्थेचेही कंबरडे मोडले आहे. भारतामध्ये झाले त्या पद्धतीने जपान, सिंगापूर, युरोप, अमेरिकेमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेले नाही, असे त्या देशांत राहाणाऱ्या माझ्या नातेवाईक, मित्रमंडळींनी कळविले आहे. जागतिक महायुद्धांच्या काळातही अशा वाईट पद्धतीने लॉकडाऊन अमलात आले नव्हते.

सरकारविरोधात बोलल्यास कोसळते संकट
राजीव बजाज म्हणाले की, एखाद्या घटनेचा नामवंत लोकांना तडाखा बसतो तेव्हा तो चर्चेचा विषय होतो; परंतु आफ्रिकेमध्ये ८ हजार मुले भुकेने तडफडून मरतात, तिथे कोणाचेही लक्ष जात नाही. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर हजारो स्थलांतरित मजूर पायी चालत आपल्या गावाकडे निघाले. हे मजूर बेकार झाले होते. त्यांच्याकडे ना पुरेसे पैसे होते, ना पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न. या स्थलांतरितांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठीच राजीव बजाज यांनी आफ्रिकेतील मुलांच्या उदाहरणाचा सूचकतेने वापर केला. ते म्हणाले की, देशातील उद्योगजगतच नाही, तर सर्वसामान्य माणसेही केंद्र सरकारला वचकून राहातात. या सरकारविरोधात काही बोललो, तर आपल्यावर संकट कोसळेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे. अशी स्थिती असूनही मी माझ्या मनातील विचार अत्यंत मोकळेपणाने मांडण्याचा निर्णय घेतला.

लोकांच्या मनातील भीती घालवा
प्रख्यात उद्योगपती राजीव बजाज यांनी सांगितले की, सर्वात प्रथम लोकांच्या मनातून भीती घालविली पाहिजे. या गोष्टीवर सर्वांनीच मोकळ्या मनाने विचार केला पाहिजे. मला वाटते देशातील जनता पंतप्रधानांचे ऐकते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात असून, या आजाराला घाबरू नका, असे आता सरकारने लोकांना सांगण्याची गरज आहे. जगातील अनेक देशांनी जे आर्थिक पॅकेज जाहीर केले, त्यातील दोनतृतीयांश रक्कम जनतेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र, भारतात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील फक्त १० टक्के रक्कमच लोकांच्या हाती पडणार आहे.)