Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कोरोनाचा रुग्णदर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Date:

कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी असणाऱ्यांच्या कामाचे कौतुक

  • आवश्यक त्या मूलभूत सेवा-सुविधा यापुढेही राज्य शासन गतीने उपलब्ध करुन देणार
  • कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे
  • रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन द्यावेत
  • कोमॉर्बिलिटी नागरिकांची विशेष काळजी घ्यावी

पुणे,जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येत असलेल्या सेवा सुविधा, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री व आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्ती एस. चोक्कालिंगम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे प्रभारी अधिष्ठातता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्यानंतर श्री. देशमुख म्हणाले, शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती होण्यासाठी तसेच वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रशासनाने शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन योग्य तऱ्हेने हाताळावे. कोविड-19 विरुध्दच्या लढाईत आरोग्य विभाग अग्रेसर आहे. आरोग्य विभागासह या लढ्यात सहभागी असणाऱ्या अन्य विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. तसेच या काळात आरोग्य व अन्य विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, स्वच्छता कर्मचारी आदींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेवून आवश्यक तपासणी करुन घ्यावी, असे सांगून कोरोनामुळे आजवर काहींना आपला जीव गमवावा लागला, त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी राज्य शासन सुरुवातीपासूनच सक्रीय आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णांलयांना पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर, औषधसाठा कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असून यापुढेही राज्य शासन आवश्यक त्या सेवा सुविधा गतीने उपलब्ध करुन देईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबद्दल जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. कोविड बरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, याची दक्षता घ्यावी. झोपडपट्टी परिसरात तपासणी क्षमता वाढवून उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसन विकार आदी आजार असणाऱ्या (कोमॉर्बिलिटी) नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे सांगून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्धारीत करण्यात आलेला औषधोपचार करावा, असेही ते म्हणाले.
अन लॉकच्या अनुषंगाने बोलताना श्री. देशमुख म्हणाले, त्या-त्या भागात परिस्थिती नुसार निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात येण्यासाठी नागरिकांनी देखील सोशल डिस्टनसिंग व स्वच्छतेचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. खाजगी व शासकीय डॉक्टरांनी समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले.
यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले नियंत्रण कक्ष, शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन, प्रशासनाच्या उपाययोजना, स्वॅब तपासणी क्षमता, मिशन बिगीन अगेन.. आदी विविध विषयांचा आढावा श्री. देशमुख यांनी घेतला.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आजवर तपासणी करण्यात आलेले नागरिक, यापैकी बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या नागरिकांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या, करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयाच्या वतीने देण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा-सुविधांची माहिती दिली.
महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या व यापुढील कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.
ससूनचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी ससून रुग्णालयामध्ये आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, वयोमानानुसार रुग्ण दर, मृत्यूदर, क्षेत्रनिहाय दाखल रुग्ण, अतिदक्षता विभाग व अन्य विभागात देण्यात येत असलेल्या सुविधा आदींची माहिती दिली.
यावेळी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रंगयात्री ॲप – नाट्यगृह बुकिंगसाठी क्रांतिकारी उपक्रम,ज्यामुळे दलाल आणि एजंट राज समाप्त-महापालिकेचा दावा

पुणे- ‌‘रंगयात्री‌’ या ऑनलाईन आरक्षण सुविधेमध्ये त्रुटी जाणवत असल्याने...

‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध:महापालिका प्रशासनाविरोधात बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घोषणा देत प्रशासनाचा निषेध

पुणे : महापालिकेच्या प्रस्तावित ‌‘रंगयात्री‌’ या ऑनलाईन आरक्षण सुविधेमध्ये...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्फोटातील पीडितांची घेतली भेट

नवी दिल्‍ली, 12 नोव्हेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि....