Home Blog Page 2551

जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केली दौंड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

0

पुणे, दि.10: जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप पाटील यांनी आज दौंड येथील गोवा गल्ली व सिंधी गल्ली प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

यावेळी विलगीकरण कक्ष, नागरिकांसाठी देण्यात आलेल्या सेवा- सुविधा, भोजन सुविधा याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी घेतली. तसेच येथील कोरोना परिस्थितीबाबत महसूल, पोलीस विभाग व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

श्री. राम म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी सोशल डिस्टनसिंगची व स्वच्छतेच्या खबरदारीची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होवू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांची माहिती अद्ययावत करुन त्यांच्या तपासणीवर भर देऊन अधिक काळजी घ्यावी, असे श्री. राम यांनी सांगितले. नागरिकांनी देखील स्वयंशिस्त पाळण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज चा वापर व सोशल डिस्टनसिंग पाळून कोरोनवर मात करावी, असे आवाहन श्री. राम यांनी नागरिकांना केले.

दौंड तालुक्यात आजपर्यंत आढळलेले संशयित रुग्ण, बाधित रुग्ण, स्वॅब टेस्टिंग, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्वेक्षण, जनजागृती अशा विविध स्वरूपाच्या करण्यात आलेल्या कामकाजविषयी त्यांनी माहिती घेतली.

यावेळी पोलीस उप अधीक्षक ऐश्वर्या शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पुणे विभागात प्रत्यक्षात आहेत 4 हजार 221 ॲक्टीव रुग्ण

0

पुणे विभागातील 8 हजार 198 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 13 हजार 28 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 10 :- पुणे विभागातील 8 हजार 198 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 हजार 28 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 221 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 277 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 10 हजार 81 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 6 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 250 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.29 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 366 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 230, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 107, सांगली जिल्ह्यात 04 तर कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 669 कोरोना बाधीत रुग्ण असून 401 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 240 आहे. कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 410 कोरोना बाधीत रुग्ण असून 792 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 493 आहे. कोरोना बाधित एकूण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 176 कोरोना बाधीत रुग्ण असून 97 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 73 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 692 कोरोना बाधीत रुग्ण असून 528 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 156 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 5 हजार 552 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 1 हजार 575 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 977 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 88 हजार 345 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 13 हजार 28 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.(टिप : – दि. 10 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

बंधपत्रित अधिपरिचारीकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे

0

मुंबई दि. 09 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने सेवेत सामावून घेण्यात यावे.  कोविड-19 साथरोग तसेच अन्य आरोग्य सुविधांच्या बाबतीत अधिपरीचारीकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. बंधपत्रित अधिपरीचारीकांपैकी अनेकांनी शासकीय सेवेतील प्रवेशाची वयोमर्यादा ओलांडली आहे.  त्यांना अचानक सेवेतून कमी करणे उचित नाही, यादृष्टीने सहानुभूतीपूर्वक धोरण आखणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

आज विधान भवन, मुंबई येथे नागपूर विभागातील बंधपत्रित अधिपरिचारीकांच्या सेवा समस्यांसदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यात यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये या अधिपरिचारीकांना सेवेत कायम करण्यात आले तर काही जिल्ह्यामध्ये असे झाले नाही. ही उणिव दूर व्हावी आणि नागपूर विभागात भंडारा, गोंदिया जिल्हयात यापुढील भरतीप्रसंगी अशा अधिपरिचारीकांना प्राधान्याने कायम करण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी दिले आहेत.

या बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त अनुपकुमार यादव व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

साकोली, लाखनी व लाखांदूर नगरपालिका पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता द्या – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांअंर्तगत भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व साकोली येथील नगर पालिकेच्या नळ पाणीपुरवठा योजनांसदर्भात आज विधान भवन, मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या तीनही योजनांसाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश पालकमंत्री सुनिल केदार यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना दिले. या योजनांसाठी प्रशासकीय मान्यता आणि अन्य आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना श्री.पटोले यांनी यावेळी दिल्या.

उड्डाणपूल पाडण्यास कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकरांचा विरोध

0

जनतेच्या पैशांची नासाडी नको

पुणे- विद्यापीठ आणि भोसलेनगर चौकातील दोन्ही उड्डाणपूल पाडून जनतेच्या पैशांची नासाडी होणार असल्याची भावना कॉंग्रेस सह राष्ट्रवादीच्या देखील काही कार्यकर्त्यात दडून बसली असताना आता दोन्ही पुल पाडण्यात येऊच नयेत अशी स्पष्ट आणि जाहीर मागणी करण्याचे धाडस अखेर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर आणि माजी मंत्री ,माजी शहराध्यक्ष बाळासाहेब शिवरकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या पुलाचा आराखडा नामवंत विदेशी तज्ज्ञांनी केला आहे. हा पूल स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि उपयुक्त असल्याचेही शिवरकर यांनी म्हटले आहे.सध्या हा पूल पाडण्यासाठीचा खर्च अव्यवहार्य व अनावश्यक आहे. ‘पीएमआरडीऐ’तर्फे हा पूल पाडण्याला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे.मेट्रोच्या कामासाठी हे उड्डाणपूल अडचणीचे ठरत आहेत. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी पूल पाडण्यास विरोध केल्याने याकडे अनेकांचे लक्ष वेधले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने हे पूल पाडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.याच वेळी हे दोन्ही उड्डाणपूल पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल बांधताना महापालिका कोणताही खर्च देणार नाही, नवीन टेंडर मंजूर होईपर्यंत पूल पडू नये आणि वाहतुकीचे नियोजन करावे, अशा उपसुचनेसह पूल पाडायला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तर्फे हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. हे दोन्ही पूल चुकल्याने रोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते.असा दावा करत हे उड्डाणपूल पडून नव्याने उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत.उड्डाण पूल आणि मेट्रो यांचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आला आहे. पीएमआरडीएकडून त्याचे काम करण्यात येणार आहे.उड्डाणपूल पाडून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २४० कोटी रुपये खर्च होणार आहे.

जावळी खोऱ्यात महावितरणची झुंज प्रतापगडसह 16 दुर्गम गावे प्रकाशमान

0

सातारा, दि. 10 जून 2020 : ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने जावळी खोऱ्यातील घनदाट जंगल व दऱ्याखोऱ्यांत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारण्यासाठी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चार दिवस यशस्वी झुंज देत मंगळवार (दि. 9)पर्यंत सातारा जिल्ह्यातील प्रतापगडसह अतिदुर्गम 16 गावे (ता. महाबळेश्वर) प्रकाशमान केली आहेत.

याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वर येथील महावितरणच्या वेण्णालेक उपकेंद्रातून प्रतापगड उच्चदाब 22 केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीद्वारे सह्याद्री डोंगररांगेत असलेल्या अतिदुर्गम जावळी खोऱ्यातील प्रतापगड, मेटतळे, वाडा कुंभरोशी, शिरवली, कासरूड, हतलोट, बिरवाडी, डिरमणी, जावळी, दुधोशी, फरोशी, पारसोंड, प्रतापगड आदी 16 गावांतील सुमारे 1250 वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. सुमारे 70 किलोमीटर लांबीची ही वीजवाहिनी जावळी खोऱ्यातील दऱ्या व किर्र अरण्यामधून गेलेली आहे. महाबळेश्वरपासून निघालेल्या या वाहिनीचे शेवटचे टोक प्रतापगडावर आहे.

गेल्या 3 जून रोजी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने विविध ठिकाणी मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने या उच्चदाब वीजवाहिनीचे 8 वीजखांब तसेच अडीच किलोमीटर वीजतारा जमीनदोस्त झाल्या. तसेच वाहिनीशी संलग्न 26 लघुदाबाचे वीजखांब कोसळले. त्यामुळे वाडा कुंभरोशी, मेटतळे, प्रतापगडसह 16 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. वादळाचा प्रथमच असा तडाखा बसला. चक्रीवादळाच्या दिवशी महाबळेश्वर तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र दुसऱ्या दिवशी तालुक्यात तब्बल सरासरी 162 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे महावितरणला वीजयंत्रणा दुरुस्तीचे काम दुसऱ्या दिवशीही सुरु करता आले नाही. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी चक्रीवादळानंतर सातारा जिल्ह्यातील वीजयंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी तसेच प्रतापगडसह 16 गावांचा वीजपुरवठा लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याप्रमाणे वाईचे कार्यकारी अभियंता श्री. संजय सोनवलकर यांनी या भागात भेटी देऊन वीजयंत्रणेच्या उभारणीच्या कामाला सुरवात केली.

अतिशय घनदाट जंगलात दोन ठिकाणी कोसळलेल्या ठिकाणी नवीन वीजखांब नेणे जिकरीचे व अतिशय मुश्कील होते. वनविभागाची परवानगी घेऊन मेटतळे, कुंभरोशी, जावळी या गावांतील ग्रामस्थांच्या मदतीने नवीन दोन वीजखांब नेण्यात आले. यासह मेटतळे परिसरातील आणखी तीन वीजखांब व वीजतारांची यंत्रणा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. दुसरीकडे दुधोशीजवळ अत्यंत खोल दरीमधील तीन वीजखांब पडल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. मात्र तेथेही नवीन वीजखांब रोवण्याचे व वीजतारा ओढण्याचे काम सुरु करण्यात आले.

डोंगरदऱ्यांच्या निसरड्या वाटा, चिखल व पावसाची रिपरिप, ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश नाही, सर्वदूर धुके अशा स्थितीत काम करताना तोल गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र हे सर्व धोके दूर ठेऊन महावितरणचे जिगरबाज उपकार्यकारी अभियंता श्री. चेन्नास्वामी रेड्डी, सहाय्यक अभियंता सनी पवार, अमोल गिरमे (वाई), बाळासाहेब चोरमले तसेच जनमित्र नितीन मोरे, लखन नावीलकर, अमित मोरे, रमेश मोरे, दिनेश जाधव, मयूर गायकवाड यांच्यासह कंत्राटदारांचे 15 कर्मचारी व सुमारे 40 ग्रामस्थ यांनी सलग चार दिवस वीजयंत्रणा उभारण्याचे काम केले. दररोज सकाळी 7.30 ते रात्री वाहन किंवा मोबाईलच्या प्रकाशझोतात 8.30 पर्यंत अविश्रांत काम सुरु होते. साताऱ्याचे प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. सुनीलकुमार माने यांनी नवीन वीजखांब, इतर साहित्य पाठविण्याचे तत्परतेने काम केले. तर वाडा कुंभरोशीच्या ग्रामस्थांनी महावितरणची झुंज पाहून कर्मचाऱ्यांच्या जेवणाची एक वेळ व्यवस्था केली होती.

चार दिवसांच्या कालावधीत उच्चदाबाचे सर्वच 8 वीजखांब उभारल्यानंतर मंगळवार (दि. 9) पर्यंत प्रतापगड, वाडा कुंभरोशी, मेटतळे आदींसह सर्वच 16 गावांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. चक्रीवादळामुळे कोसळलेले लघुदाबाचे 26 खांब उभारण्याचे काम सध्या सुरु आहे. हे लवकरच काम पूर्ण झाल्यानंतर दोन-तीन घरांच्या वाड्या-वस्त्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे. महावितरणचे अभियंते तसेच वीजयंत्रणा उभारण्यासाठी कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी कौतुक केले आहे व सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

.तर महाराष्ट्रात पुन्हा लॉक डाऊन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई – राज्यभरामध्ये सध्या ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत बऱ्याच गोष्टी पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्या तरी लॉक डाऊन पूर्णपणे शिथिल करण्यात आला नाही. अशातच सध्या लागू असलेला लॉक डाऊनच्या पाचव्या टप्प्याची मुदत ३० जून रोजी पूर्ण होत आहे. याच पार्श्ववभूमीवर ३० जूननंतर लॉक डाऊन पूर्णपणे उठवला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, राज्यातील जनतेच्या मनामध्ये घोंघावत असलेल्या या प्रश्नाला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून त्यांनी, जर शिथीलता जीवघेणी ठरत आहे असं वाटलं तर आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो असा इशारा दिला आहे. निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वक्तव्य केले.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे

येत्या २२ तारखेपासून आपल्या विधिमंडळाचे जे अधिवेशन घेण्याचं योजलं होतं, त्या अधिवेशनाबद्दल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. एकूणच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला हे अधिवेशन घेता येणे कठीण आहे. २२ जूनला सुरु होणारे अधिवेशन हे ३ ऑगस्टला घेण्याचे ठरलेले आहे.

गेले २ महिने आपण कोरोनाविरुद्धची लढाई लढतो आहोत. आपण सर्वजण सोबत आहात. ज्या सूचना सरकार म्हणून नागरिकांना देण्याची आवश्यकता आहे, त्या देत असताना तुम्ही प्रसार माध्यमे फार महत्वाची भूमिका पार पाडत आहात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो.

चक्रीवादळाबद्दल, साधारणत: आम्ही सगळे तिकडे जाऊन आलो आहोत. नुकसान खूप झालेलं आहे. आम्ही आढावा घेतला, पंचनामे तर सुरू आहेत. पंचनामे झाल्यानंतर अधिक माहिती घेऊन त्याची भरपाई होईलच.

ज्यावेळी मी गेलो तेव्हा रायगड जिल्ह्यासाठी तत्काळ ₹ १०० कोटी त्यानंतर रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदुर्गला २५ कोटींची मदत करण्यात आली. जे जे करणे शक्य आहे, ते करण्यात येईल. कोणालाही आम्ही उघडे पडू देणार नाही. ज्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना महाविकास आघाडीचे सरकार खंबीरपणे साथ देईल.

सरकार अतिशय सावधतेने पावले टाकत आहे. जसं आपण लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने करत होतो, त्याचप्रमाणे शिथिलता आणताना टप्प्याटप्प्याने सगळं पूर्वपदावर आणावं लागेल. अजूनही संकट टळलेलं नाही, अजूनही लढा संपलेला नाही. पण कोरोनाबरोबर लढत असताना आपल्याला अर्थचक्र बंद करून चालणार नाही.

जे सरकारने सांगितले की सकाळी ५ पासून संध्याकाळी ७ पर्यंत तुम्ही मैदाने किंवा इतर ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकता, व्यायामाला जाऊ शकता. पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली, ती झुंबड बघितल्यानंतर थोडी घाबरुक वाटली. व्यायाम करायला आरोग्यासाठी सांगितले आहे, आरोग्य खराब करायला नाही.

सरकार परिस्थितीचा अंदाज घेत आहे.जर वाटल की ही शिथिलता जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे, जनता सरकारचं ऐकत आहे. कारण त्यांना माहिती आहे की सरकार जे करत आहे, ते आपल्या हिताचं आहे. मी जनतेला सांगतो की गर्दी टाळा.

सर्व यंत्रणा पहिल्यापासून सज्ज होती. एक गोष्ट नक्की की जे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत ते खांब उभारता येऊ शकतात, ते खांब उभारण्याचे काम सुरू आहे.पण वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी जी तांत्रिक टीम लागते, त्या टीम आम्ही इतर जिल्ह्यातून बोलावलेल्या आहेत आणि ते काम सुरू झालेलं आहे.

प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

0


पुणे दि. 10: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच जिल्हयातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या नमुना तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी प्रयोगशाळांनी कोविड-19 ची नमुना तपासणीची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा अशा, सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी भेट देवून कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत संस्थेच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ.प्रिया ॲब्राहम, शीतज्वर विभागाच्या विभागप्रमुख डॉ. वर्षा पोतदार, वैज्ञानिक डॉ. मनोहर चौधरी, डॉ. सुमित भारद्वाज यावेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 नमुना तपासणीसाठी येत असतात त्या नमुना तपासणीचा रिपोर्ट वेळेत प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच नमुना तपासणीचे काम करत असतांना योग्य ती दक्षता घेतली गेली पाहिजे. प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक ते वैद्यकीय साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाकडे याबाबत प्रस्ताव सादर करावेत. आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही श्री. म्हैसेकर यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या नमुना तपासणीबाबतची माहिती घेतली.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील कोविड-19 ची नमुना तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेची पहाणी डॉ.म्हैसेकर यांनी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रस्ते रुंदीकरणाचे समर्थन पण भाजपचा डोळा मलीद्यांवर -सुभाष जगताप(व्हिडीओ)

0

पुणे-  भाजपच्या 6 मीटर रस्त्याच्या ९ मीटर रुंदिकरणाच्या विषयाचे एकीकडे समर्थन करताना  राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते ,महापालिकेतील माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांनी या विषयाला कायदेशीर मार्गाने कोणी दाद मागितली तर स्थगिती येवू शकते असे सांगत भाजपचा डोळा नेहमीच मलीद्यांवर राहिला आहे,भाजपने महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटले आणि त्याची भरपाई ३ वर्षापासून पुणेकरांकडून वसूल केली जाते आहे   असा आरोप केला आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या विधानासह एकूणच भाजपच्या ३ वर्षाच्या कारकिर्दीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत

फक्त 323 रस्तेच का, शहरातील सर्वच 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करून रस्त्यांबाबत पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याने भाजपला ‘मिरच्या झोंबल्या’ आहेत. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक ‘दादां’वर दादागिरी केली म्हणून बिनबुडाचे आरोप करीत आहेत, आशा शब्दांत राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी हल्लाबोल केला. पुणेकर सुज्ञ आहेत. मुळीक यांचा डोळा कोणत्या मालिद्यावर आहे, हे त्यांना चांगलंच माहीत आहे, असा शेराही त्यांनी मारला.

भाजपचे तत्कालीन पालकमंत्री सर्वच बाबतीत अपयशी ठरल्यानंतर अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भामा – आसखेडचा निर्णय धडाडीने घेतल्याची सल मुळीक यांना कुठेतरी बोचत आहे, असे त्यांच्या गोंधळलेल्या अवस्थेवरून दिसून येत आहे. भाजपने बहुमताच्या जोरावर शहरातील नागरिक, विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था यांना विश्वासात न घेता चुकीचे निर्णय घेतले आहेत, असा आरोप जगताप यांनी केला आहे.

शहरातील 6 मीटरचे 323 रस्ते 9 मीटरचे करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून अजित पवार यांनी फक्त 323 च रस्ते नको तर शहरातील सर्वच 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करावेत, असे महापालिकेला सांगितले. पुणे शहराचा पुनर्वलोकन विकास आराखडा महानगरपालिकेची मुदत संपली नसताना तत्कालीन भाजपच्या राज्य सरकारने हुकूमशाही पध्दतीने काढून स्वतःच्या ताब्यात घेतला. हे जगदीश मुळीक विसरले का, असा सवालही सुभाष जगताप यांनी उपस्थित केला आहे.

डीपीमध्ये 300 हून अधिक मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या आहेत. या जागा म्हणजे पुणेकरांना मोकळा श्वास घेता यावा, हॉस्पिटल्स, गार्डन, शाळा, आदींच्या या सार्वजनिक सुविधांच्या जागा होत्या. त्यामध्ये शहर भाजपच्या मंडळींनी काय काय गोष्टी केल्या आहेत, ते संपूर्ण शहराला माहीत झाल्या आहेत. पुणेकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत देऊन जनादेश दिला खरा, मात्र गेल्या साडेतीन वर्षांत भाजपने पुणेकरांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे. भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यामुळे पुणेकर भाजपला जागा दाखविल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशाराही जगताप यांनी दिला आहे.

आरोपीला 2 कोटीला लुटणाऱ्या, पीआयची रवानगी कारागृहात-सीपींची जोरदार कारवाई

0

पुणे – फसवणूक व अपहाराच्या गुन्हामध्ये अटक न करण्यासाठी एका वृद्ध नागरीकाकडुन 70 लाख रुपये खाल्ले. शिवाय सुमारे दीड कोटीचा त्याचा फ्लैट बळकाविला, त्यानंतरही त्याला अटक करून टेम्भा मिरवीणाऱ्या पी आय रौफ शेख ला पोलिस आयुक्तांनी,आणि उपायुक्त संभाजी कदम यांनी चौकशी करून जेल चा रस्ता दाखविला, या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खडकी पोलिसांनी शेख यास मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.पुणे शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या हा पी आय विशेष शाखेत कार्यरत होता.

पोलिसातील माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्यावर 2017 मध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना अटक झाली नव्हती.या गुन्ह्याचा तपास सायबर व आर्थिक गुन्हे शाखेकडे होता. तो गुन्हा वरिष्ठांच्या आदेशानुसार रौफ शेख यांच्याकडे तपासासाठी देण्यात आला होता. मात्र यावेळी रौफ शेख यांनी या गुन्ह्यातील आरोपी आणि आताचे तक्रारदारास अटक न करण्यासाठी त्यांच्याकडून 70 लाख रुपये आणि खडकी परिसरातील जवळपास दीड कोटी रुपयांचा फ्लॅट मागितला. त्यांनी पैसे घेतले आणि फ्लॅटचा ताबा देखील घेतला. मात्र त्यांनतर देखील तक्रारदारास रौफ शेख यांनी अटक केली. तक्रारदार अटक झाले. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. यानंतर दोन महिन्यांनी त्यांना जामीन मिळाला.

त्यानंतर हे तक्रारदार थेट पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम यांच्याकडे गेले आणि त्यांनी दोन पाणी अर्ज लिहून सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी आयुक्तांनी तात्काळ रौफ शेख यांच्या चौकशीचे आदेश दिले. सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांचायकडे ही अर्ज चौकशी गेल्या 4 महिन्यापासून सुरू होती. त्यानुसार त्यांनी 70 लाख आणि फ्लॅट घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रौफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे – जिल्हाधिकारी नवल किशोर राम


पुणे दि.9:- कोरोना विषाणुच्या अनुषंगाने ज्या परिसरात नव्याने कोविड-19 चे बाधीत रुग्ण आढळून येतील त्या भागात तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. या त्यातील पोटकलम २(अ) नुसार जिल्हाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 12 मार्च 2020 पासून लागू करुन 2,3 व 4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. तसेच ज्या परिसरात नव्याने कोविड-19 ये बाधीत रुग्ण आढळून येतील. त्या भागात तात्काळ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे.
सद्यस्थितीत पुणे जिल्हयात उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांचे मार्फत कोरोना विषाणू बाधित भागात प्रतिबंधित क्षेत्र किंवा सुक्षम प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना परिसरात 1 किंवा 2 रुग्ण आढळले असताना संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात घेत आहे. त्यामुळे त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना देखील बंद करण्यात येत आहेत असे निदर्शनास येत आहे.
तरी सर्व उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांना सूचित करण्यात येते की, त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना 1 किंवा 2 रुग्ण आढळून आल्यास त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना बंद करण्यात येऊ नयेत. सोसायटी मध्ये रुग्ण आढळला असल्यास, सोसायटी मधील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात यावा, परंतू सोसायटी जवळील स्वतंत्र उद्योग व औद्योगिक आस्थापना बंद करू नयेत.
उद्योग व औद्योगिक आस्थापनेमध्ये 1 किंवा 2 रुग्ण आढळल्यास, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे कॉन्टॅक ट्रेसिंग करुन आरोग्य तपासणी करण्यात यावी. सर्व उद्योग व औद्योगिक आस्थापना बंद करण्यात येऊ नये, तसेच रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन, कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने बंद करणे आवश्यक असल्यास, याबाबत जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेण्यात यावी. त्यानंतरच तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावा, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशीत केले आहे.
००००

स्थायी समितीच्या बैठकीत बेकायदा ठराव मंजूर -भाजपा च्या जुन्या जाणत्यांचा इशाऱ्यासह जोरदार टोला

पुणे- 6 ते साडेसात मीटर रुंदीचे 323 रस्ते 9 मीटर रुंद करावेत या आयुक्तांच्या प्रस्तावाला सर्वच 6 मीटर चे रस्ते रुंद करावेत अशी उपसूचना देत स्थायी समिति ने मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव बेकायदा असून तो त्वरीत मागे घ्या, अन्यथा या विरोधात सरकारकडे, नंतर न्यायालयकडे दाद मागावी लागेल असा जोरदार ईशारा आणि टोला भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांनी आज स्पष्टपणे महापालिकेला सोशल मीडिया त ऑडियो क्लिप आणि आयुक्तांच्या नावे पत्र लिहून लगावला आहे , हा टोला ‘आपले पुणे’ या संस्थेच्या नावाने उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, आणि सेनेचे प्रशांत बधे यांनी लगावला आहे . महापालिकेत महापौर,आणि सर्व पदाधिकारी भाजपचे 99 नगरसेवक अशी एक हाथी सत्ता असताना हा टोला लगावल्याने भाजपच्या वर्तुळात ज्येष्ठ , कधी काळी सभागृह गाजवलेल्या ,अभ्यासू नेत्यांना सुद्धा सत्तेच्या आहारी गेलेले पदाधिकारी जुमानित नसल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे.

दरम्यान केसकर ,कुलकर्णी ,बधे यांनी आयुक्ताना दिलेल्या जाहिर निवेदनात असे म्हटले आहे की,

मा.आयुक्त पुणे मनपा

यांसी सप्रेम नमस्कार

विषय — स्थायी समिती विषयपत्र मआ/श.अ/९१- दि. २८|५|२०२०
महोदय, पुणे शहरातील  कुठल्याही रस्त्याची प्रमाण रेषा निश्चित करण्याचे अधिकार आपल्याला आणि मा.स्थायी समितीला आहेत.कायद्याने दोघांनी काय काय करावे हे स्पष्ट नमूद केले आहे.MMC Act कलम 210(1)(अ) अनव्ये करावयाची कारवाही आपण करावयाची असून  ती पूर्ण झाल्यानंतर मंजुरीसाठी मा.स्थायी समितीच्या बैठकीत विषय मंजुरीसाठी ठेवावी लागते.मग मा.स्थायी समिती कडून उक्त कायद्याच्या कलम 210(1)(ब) अनव्ये कार्यवाही केली जाते.कायदा सांगतो स्थायी समितीच्या पूर्वमान्यते शिवाय रस्ता रूंदीची रेषा अस्तित्वात येऊ शकत नाही.स्थायी समितीच्या ज्या बैठकीत 210(1)(ब) अनव्ये मंजुरी दिली जाईल त्यापूर्वी 1 महिना आयुक्तांनी स्थानिक वृत्तपत्रे आणि विशेष नोटीस स्वतःच्या सहीने जो रस्ता रुंद करणार आहे त्याठिकाणी लावली पाहिजे. जोपर्यंत स्थायी समिती आलेल्या हरकती बाबत आपला प्रस्ताव लेखी सादर करून ज्या स्थायी समितीच्या बैठकीत उक्त कायद्याच्या कलम  210 ‘1’ ‘ब’ मान्यता देणार आहे त्या बैठकीच्या आधी किमान  तीन दिवस नगर सचिवांना हा अहवाल सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे.वरील बाबींचा विचार करता विषयांकित विषय पत्र हे कायद्याला धरून नाहीत हे या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो जरी स्थायी समितीने मान्यता दिली तरी आपण याची अंमलबजावणी कशी करणार तसेच आता पुणे शहरातील सर्वच रस्ते हे ९ मीटर रूंदीचे करण्याची जी उपसूचना स्थायी समितीने मंजूर केली आहे तिची अंमलबजावणी कशी होणार या बाबत आपण कृपया मा.विधान सल्लागार यांचा याबाबत लेखी अभिप्राय मागवावा हि विनंती     अन्यथा आम्हाला उक्त कायद्याच्या कलम 451 अनव्ये मे. राज्य सरकारकडे दाद मागावी लागेल तरी आमची आपणांस विनंती आहे की 2015 पूर्वी सहा मीटर च्या रस्त्यावर टीडीआर वापरण्याची परवानगी होती तशी परवानगी पुन्हा देण्यासाठी मा. शहर सुधारणा समिती मार्फत MR & TP कलम 37 अनव्ये कार्यवाही सुरू करावीहि विनंती.
धन्यवाद

आपले पुणे
उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,प्रशांत बधे

सामान्यांना बिल्डरांच्या दावणीला बांधणारा प्रस्ताव – सुतार (व्हिडीओ)

पुणे- भाजपने आज महापालिकेतील स्थायी समितीत उपसूचना देत मंजूर केलेल्या 6 मीटर रस्त्यांच्या ९ मीटर रुंदीकरणाच्या प्रस्तावाला शिवसेनेने देखील स्पष्ट विरोध केला आहे. हा निर्णय सर्वांसाठी चांगला कसा होऊ शकेल ? असा प्रश्न विचारीत रस्ते रुंदीकरणाला विरोध नाही पण गरीबातल्या गरीब घरमालकावर ,भाडेकरू वर अन्याय होता कामा नये अशी शिवसेनेची भूमिका आहे . आणि भाजपने बहुमताच्या आधारावर मंजूर करवून घेतलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी आहेत . निव्वळ ३२३ रस्त्यांसाठी या प्रस्तावाचा वापर सर्वप्रथम होऊ शकतो हे ध्यानात घ्यायला हवे असे शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी म्हटले आहे. नेमके सुतार यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात ……

राज्यात ४४ हजार ८४९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ९ : राज्यात आज १६६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ६३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २२५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ७७ हजार ८११ नमुन्यांपैकी ९० हजार ७८७ नमुने पॉझिटिव्ह (१५.७१ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६८ हजार ०७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे : ठाणे- ८३ (मुंबई ५८, ठाणे १३, मीरा-भाईंदर ६, पनवेल ३, नवी मुंबई १, वसई-विरार २), नाशिक- ३ (नाशिक ३), पुणे- १८ (पुणे १६, सोलापूर २), कोल्हापूर- १ (रत्नागिरी १),औरंगाबाद-१० (औरंगाबाद १०), अकोला -३ (अकोला २, अमरावती १), नागपूर-१ (नागपूर १), इतर राज्य-१ (मध्ये प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू नागपूरमध्ये झाला आहे.)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८० पुरुष तर ४० महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६२ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ९१ जणांमध्ये (७५.८ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२८९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ११ मे ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७१ मृत्यूंपैकी मुंबई ४५, ठाणे -११,मीरा भाईंदर -६, औरंगाबाद – ३, पनवेल -२, नाशिक -१, रत्नागिरी -१, वसई विरार -१ व इतर राज्यातील १ मृत्यू आहे.

जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५१,१००), बरे झालेले रुग्ण- (२२,९४३), मृत्यू- (१७६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६,३९१)

ठाणे: बाधित रुग्ण- (१४,०६३), बरे झालेले रुग्ण- (५२१८), मृत्यू- (३५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४८९)

पालघर: बाधित रुग्ण- (१६३६), बरे झालेले रुग्ण- (६०८), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८५)

रायगड: बाधित रुग्ण- (१५००), बरे झालेले रुग्ण- (९२६), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१४)

नाशिक: बाधित रुग्ण- (१६६०), बरे झालेले रुग्ण- (१०९४), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

धुळे: बाधित रुग्ण- (२९०), बरे झालेले रुग्ण- (१२९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

जळगाव: बाधित रुग्ण- (११४९), बरे झालेले रुग्ण- (५१६), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

पुणे: बाधित रुग्ण- (१०,०७३), बरे झालेले रुग्ण- (५९०३), मृत्यू- (४२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७४२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (६२७), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२९)

सातारा:  बाधित रुग्ण- (६५८), बरे झालेले रुग्ण- (३५९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६७०), बरे झालेले रुग्ण- (४३०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२)

सांगली: बाधित रुग्ण- (१८०), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९९)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३७८), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०८५), बरे झालेले रुग्ण- (१२७१), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०४)

जालना: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

परभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

लातूर: बाधित रुग्ण- (१३९), बरे झालेले रुग्ण- (११२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

बीड: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

नांदेड: बाधित रुग्ण- (१७१), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

अकोला: बाधित रुग्ण- (८४८), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२)

अमरावती: बाधित रुग्ण- (३०३), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

वाशिम: बाधित रुग्ण- (१२), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४)

नागपूर: बाधित रुग्ण- (७८८), बरे झालेले रुग्ण- (४७८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (३४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८)

एकूण:बाधित रुग्ण-(९०,७८७), बरे झालेले रुग्ण- (४२,६३८), मृत्यू- (३२८९),इतरकारणांमुळेझालेलेमृत्यू-(११),ॲक्टिव्ह रुग्ण-(४४,८४९)

(टीपआयसी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातीलदिनांक७ मे २०२० पासूनच्या १६२ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाहीहीमाहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआरपोर्टलवरमान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहेप्रयोगशाळाअहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३७५० झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ९९४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६९.१६  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.    

6 चे 9 मीटर रस्ते आजचा मंजूर विषयही नियमबाह्यच -आबा बागुल

पुणे शहरातील बंगले संस्कृती समाप्त पेन्शनरचे पुणे आता विसरून जायचे का?

पुणे- आज भाजपने बहुमताच्या आधारावर 6 मीटर चे सर्वच रस्ते ९ मीटर करणारी उपसूचना मंजूर करून ३२३ रस्ते रुंदीकरणाचा साधलेला डाव हा नियमबाह्य च असून या विरोधात आम्हाला आता कलम ४५१ नुसार राज्य सरकारकडे दाद मागावी लागेल असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी ‘माय मराठी’ शी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, शहरातील 6 मीटर रुंद असलेले रस्ते 9 मीटर करण्याचा घाट भाजपने घातला आहे.त्यामुळे पेन्शनरचे पुणे आता विसरून जायचं का? असा सवाल काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी आबा बागुल यांनी विचारला आहे.पुणे शहरातील नागरिकांनी भाजपला बहुमत दिले आहे.परंतु पुणेकरांच्या हिताचा विसर पडून बहुमताच्या जोरावर बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी 6 मीटर रस्त्याचे 9 मीटर रस्ते करण्याचा निर्णय चुकीचा आहे. महाराष्ट्र मूनसिपल कॉर्पोशन ऍक्ट मधील कलम 210 नुसार महानगरपालिका अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे मायनर मोडीफिकेशन करू शकते परंतु शहरातील 103 किमी असलेले 323 रस्त्यांचे मोडीफिकेशन करायचे असेल तर एमआरटीपी ऍक्ट मधील कलम 37 नुसार राज्य सरकारला हे मोडीफिकेशन करण्याचे अधिकार असताना सत्ताधारी भाजप बहुमताच्या जोरावर महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंग ऍक्टचे उल्लंघन करून मनमानी कारभार सुरू आहे असे आबा बागुल म्हणाले.आजच्या निर्णयामुळे भाजपने महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंग ऍक्टला पूर्णपणे छेद दिला आहे.यापुढे कलम 37 ची कारवाई करणे गरजेचे नाही असे भाजपला वाटते.ज्या पुणेकरांनी त्यांना बहुमत दिले त्या पुण्याची संस्कृती,पुणेरीपण, पेन्शनरचे पुणे,बंगले संस्कृती पूर्ण नष्ट करण्याचे काम आज भाजपाने केले आहे.आजचा दिवस पुणेकरांच्या आयुष्यभर लक्षात राहील.व इतिहासात त्याची काळा दिवस म्हणून नोंद होईल असे आबा बागुल म्हणाले,पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नियमबहाय्य असलेला हा निर्णय बदलावा अन्यथा आम्हाला पुणेकरांच्या हितासाठी या निर्णयाविरुद्ध कलम 451 नुसार राज्य सरकारकडे दाद मागावी लागेल.असे काँग्रेस पक्षाच्यावतीने आबा बागुल म्हणाले

…हा तर डाव चंद्रकांतदादांचा …अरविंद शिंदेंनी सांगितली अंदर कि बात (व्हिडीओ)

पुणे- शहरातील 6 मिटरचे ३२३ रस्ते ९ मीटरचे करवूनच घेणे हा तर डाव आहे कोथरूडच्या आमदार चंद्रकांतदादा यांचा या प्रस्तावाचे उगम स्थानच ते आहे ,३२३ च का ? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर सर्वच रस्ते करू म्हणत पहिल्या टप्प्यात का होईनात हे ३२३ रस्ते रुंदीकरणात दाखवून कोणाचा कसा फायदा मिळवून द्यायचा हीच तर अंदर कि बात आहे असे सांगत …आपले म्हणणे थेट मांडले आहे महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी ..नेमके त्यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात ….