Home Blog Page 2548

कृष्णा खोरे पूर आणि उपाय योजना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देणार ……

0

उपमुख्यमंत्री अजित पवार

 पुणे-     सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील दरवर्षी निर्माण होणारी पूर परिस्थिती रोखण्यासाठी आणि पाणी साठ्याचे नव्याने नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या वेळी अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालय पुणे आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे तज्ञांनी केलेले संशोधन, त्यांची निरीक्षणे आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी या बैठकीत घेतला. हि पूर परिस्थिती रोखण्यासाठी पाणी साठ्याचे नव्याने नियोजन करावे लागणार आहे. या विषयी जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून उपाययोजना निश्चित केल्या जातील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी सांगितले.  यावेळी कृष्णा खोरे, पूर आणि उपाययोजना संदर्भात तज्ञांनी सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. शिवाय तज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा देखील करण्यात आली. कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामध्ये कोयना, राधानगरी या धरणाच्या सांडव्याचा विसर्ग सुमारे ३० ते ४० टक्के असतो धरणामध्ये पावसाळ्यात तारखेनुसार किती पाणी पातळी राखावी याबाबत नव्याने नियोजन करणे आवश्यक आहे असे सांगून कोयना धरणाच्या पाणी पातळीबाबत तयार केलेले वेळापत्रक दीपक मोडक यांनी सादर केल. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, धरण पुनर्स्थापना समिती पश्चिम महाराष्ट्राचे  अध्यक्ष दीपक मोडक, डॉ.पद्माकर केळकर, डॉ. सुधीर आगाशे, डॉ. भालचंद्र बिराजदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ,  अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड, संस्थेचे सहसचिव  ॲड. संदीप कदम, ॲड. भगवानराव साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, प्रा. गणेश कोंढाळकर, प्रा. कमलेश जेठा, प्रा. अभय शेलार, डॉ. नागनाथ बनसोडे, प्रा. दिगंबर पवार  आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयाने हा  नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याने समाजामधील विविध स्तरामधून  समाधान व्यक्त होत आहे.

कोविड हा शेवट नव्हे तर सुधारणांची सुरुवात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि १२ : राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे त्याचे स्वागत असून उद्योग-व्यवसाय-कृषी क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी आणखीही निवृत्त अधिकाऱ्यांनी पुढे आल्यास त्यांचे निश्चितपणे मार्गदर्शन घेतले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज त्यांनी भारतीय प्रशासन सेवेतील जुन्या जाणत्या अधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला व त्यांच्या सुचना ऐकून घेतल्या. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी या बैठकीचे सूत्र संचालन केले.

या बैठकीत निवृत्त आयएएस अधिकारी यशवंत भावे, रामनाथ झा, सुबोधकुमार, जयंत कावळे आदींनी आपल्या सुचना मांडल्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात नवीन उद्योग आले पाहिजेत हे बरोबर आहे. मी काही महिन्यांपूर्वी सह्याद्री अतिथिगृह येथे देशातील नामवंत उद्योगपतींशी चर्चा करून त्यान येणाऱ्या अडचणींविषयी विचारले होते तसेच राज्य सरकार त्यांच्यासाठी काय करू शकते अशी विचारणा केली होती. मुळात आपण बाहेरून नव्या उद्योगांना निमंत्रित करताना आपल्याकडे पूर्वी पासूनचे जे उद्योग आहेत त्यांना काय अडचणी येताहेत, त्यांना काही मदत पाहिजे का याचा विचार करीत नाही. घरातल्या उद्योगपतींची काळजी अगोदर घेतली पाहिजे. आज आपण नागरिकांकडे केवळ कर आणि इतर माध्यमांतून उत्पन्न देणारा वर्ग एवढेच पाहतो. आज मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर वर्ग राज्याबाहेर गेला आहे. हे कामगार मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पडायचे, आता राज्यातील स्थानिकांना आपण मोठ्या प्रमाणावर या उद्योग, व्यवसाय, पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये सहभागी करून घेत आहोत. कोरोनाचे संकट गंभीर असले तरी याने आपल्याला खूप काही शिकवले आहे. अनेक संधी निर्माण केल्या आहेत. सर्वच राज्यांना सारखी संधी आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे काहीतरी खास वैशिष्ट्य हवे ज्याकडे सर्व जण आत्कृष्ट  होतील  म्हणून आपण त्या दृष्टीने आपल्या कार्य पद्धतींत तत्परतेने बदल करून, लवचिकता आणून पाऊले उचलली पाहिजेत. हे करतांना प्राधान्यक्रमही ठरविला पाहिजे. राज्याच्या प्रत्येक भागाची काही बलस्थाने आहेत. त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे, राज्याला नेमका फायदा देणाऱ्या गोष्टींत गुंतवणूक करणे आणि अशा बाबींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी हे केवळ ज्ञानी नसतात तर त्यांना एक दूरदृष्टी असते. महाराष्ट्रातील हे अधिकारी विविध क्षेत्रांत जाणकार म्हणून ओळखले जातात. एकेकाळी त्यांनी राज्याचे नाव मोठे केले आहे. आज त्यांची ताकद आम्हालाही मिळाल्यास कोरोना काळात अर्थचक्र कसे गतीने फिरवता येईल यावर त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाल्यास राज्याला फायदाच होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांना अधिकाधिक निवृत्त अधिकाऱ्यांना आपल्याबरोबर सहभागी करा, आमच्या  पुढील अनेक क्षेत्रांतील धोरण निश्चितीत आपल्या योगदानाचे आम्ही स्वागत करूत असे सांगितले.

निवृत्त भाप्रसे अधिकाऱ्यांच्या सूचनांचे स्वागत

याप्रसंगी या अधिकाऱ्यांनी अनेक सुचना केल्या. राज्यातील सूक्षम, लघू, मध्यम उद्योगांना संपूर्ण पाठबळ देण्याची गरज, त्यांना मदतीचा हात देणे, राज्यातील लँड  बँक समृद्ध करणे, पायाभूत सुविधा, बांधकामे आदि क्षेत्रे जोमाने सुरु करणे, जिल्हा उद्योग केंद्रांना अधिक कार्यतत्पर करणे, जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांना सहभागी करून घेऊन उद्योग वाढीची जबाबदारी टाकणे, सेवा क्षेत्र विस्कळीत झाले आहे ते रुळावर आणणे, जिम, वेलनेस, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, हॉटेल्स असे व्यवसाय परत पूर्ण क्षमतेने उभे राहू शकणार नाहीत त्यामुळे तेथील मनुष्यबळाला दुसऱ्या क्षेत्रात संधी देणे, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे सुरु करून कोविडच्या नियमानुसार ती चालवणे, रेल्वे आणि बसेसमध्ये मर्यादित प्रवासी संस्ख्या ठेवणे व त्यासाठी जबाबदारी निश्चित करणे, उद्योग मित्रांना प्रोत्साहित करणे, तंत्रज्ञान आणि ज्ञान यावर भर देणे, कृषी पणन क्षेत्राला उभारी देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेणे, आरोग्य क्षेत्राला बळकटी देणे, वर्क फ्रॉम होम आणि नव्या कार्य संस्कृतीला उत्तेजन देणे, गरीब व कमी उत्पन्न गटाच्या लोकसंख्येला समोर ठेऊन शहरांचे नियोजन करणे, एमएसएमई यांना त्यांच्या थकीत थकबाकीच्या रकमा, जीएसटी परतावा 8 ते १० दिवसांत देणे, महापरवाना योजना परिणामकारकरित्या राबविणे अशा अनेक सूचनांचा यात समावेश होता.

यावेळी अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बी वेणुगोपाल रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन यांनी देखील या चर्चेत सहभागी होऊन अनेक मुद्दे मांडले.

दुर्गम आणि ग्रामीण भागात कनेक्टीव्हीटी वाढवणे, अधिकारांचे विकेंद्रीकरण, पर्यटनाला विविधांगाने प्रोत्साहन व मदत देणे, कृषी क्षेत्राला वित्तीय पुरवठा, कोविड सुरक्षा नियम पाळून सार्वजनिक वाहतूक सुरु करणे, राज्यात संरक्षण क्षेत्राशी सबंधित उद्योग वाढविणे अशा सुचना केल्या तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोविड परिस्थितीत कुठले नवीन उपक्रम सुरु केले तसेच नवीन धोरणे ठरविली आहेत त्याची माहिती देण्यात आली.

राज्यात कोरोना चाचण्यांनी गाठला सव्वा सहा लाखांचा टप्पा

0
राज्यात ४९ हजार ६१६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.१२ : राज्यात आज १७१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार ७९६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४९ हजार ६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांपैकी १ लाख ०१ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात  १५५३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ६७ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

● राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ४७.३ टक्के एवढे आहे.

● राज्यातील मृत्यू दर – ३.७ टक्के

राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १०६ (मुंबई ९०, ठाणे ११, कल्याण-डोंबिवली ३, मीरा-भाईंदर १, वसई-विरार १), नाशिक- ३ (नाशिक २, धुळे १), पुणे- १२ (पुणे १२), कोल्हापूर-३ (सांगली ३), औरंगाबाद-२ (औरंगाबाद २), अकोला -१ (अमरावती १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ९२ पुरुष तर ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६७ रुग्ण आहेत तर ५२  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२७ रुग्णांपैकी ८९ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३७१७ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  २० मे ते ९ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५५, ठाणे -१०, सांगली -३, कल्याण डोंबिवली – २,पुणे -२, मीरा भाईंदर – १, वसई विरार – १, नाशिक -१, धुळे -१आणि अमरावती – १ मृत्यू असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५५,४५१), बरे झालेले रुग्ण- (२५,१५२), मृत्यू- (२०४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,२४८)

ठाणे: बाधित रुग्ण- (१६,४४३), बरे झालेले रुग्ण- (६६४५), मृत्यू- (४१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३८४)

पालघर: बाधित रुग्ण- (२०५३), बरे झालेले रुग्ण- (६८८), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१७)

रायगड: बाधित रुग्ण- (१७११), बरे झालेले रुग्ण- (१०३८), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१३)

नाशिक: बाधित रुग्ण- (१७८५), बरे झालेले रुग्ण- (११६४), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१६५), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

धुळे: बाधित रुग्ण- (३५३), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५८)

जळगाव: बाधित रुग्ण- (१५४०), बरे झालेले रुग्ण- (६३४), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)

पुणे: बाधित रुग्ण- (११,२८१), बरे झालेले रुग्ण- (६३७९), मृत्यू- (४५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४४३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१६२०), बरे झालेले रुग्ण- (६५४), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४६)

सातारा:  बाधित रुग्ण- (७१७), बरे झालेले रुग्ण- (३८४), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६८१), बरे झालेले रुग्ण- (५०४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९)

सांगली: बाधित रुग्ण- (२०७), बरे झालेले रुग्ण- (१०९), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१४८), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३९१), बरे झालेले रुग्ण- (२३९), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२४५७), बरे झालेले रुग्ण- (१३६०), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७२)

जालना: बाधित रुग्ण- (२५०), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२३६), बरे झालेले रुग्ण- (१८४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

परभणी: बाधित रुग्ण- (८१), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

लातूर: बाधित रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (९६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

बीड: बाधित रुग्ण- (६९), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

नांदेड: बाधित रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८)

अकोला: बाधित रुग्ण- (९७९), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (३२४), बरे झालेले रुग्ण- (२३६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१७१), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

वाशिम: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

नागपूर: बाधित रुग्ण- (९६९), बरे झालेले रुग्ण- (५३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२१)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)

भंडारा: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०)

एकूण: बाधित रुग्ण-(१,०१,१४१), बरे झालेले रुग्ण- (४७,७९६), मृत्यू- (३७१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१२),ॲक्टिव्ह रुग्ण-(४९,६१६)

(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २२३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 04 हजार 575

0

पुणे विभागातील 08 हजार 862 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 14 हजार 077 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 12 :- पुणे विभागातील 08 हजार 862 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 077 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 575 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 286 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.95 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 10 हजार 973 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 06 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 03 हजार 596 आहे. कोरोनाबाधित एकूण 465 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 259 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.99 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 452 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 330, सातारा जिल्ह्यात 15, सोलापूर जिल्ह्यात 92, सांगली जिल्ह्यात 06 तर कोल्हापूर जिल्ह्यात 09 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 704 कोरोना बाधीत रुग्ण असून 448 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1504 कोरोना बाधीत रुग्ण असून 805 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 567 आहे. कोरोना बाधित एकूण 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 192 कोरोना बाधीत रुग्ण असून 103 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोना बाधित एकूण 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 704 कोरोना बाधीत रुग्ण असून 594 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 102 आहे. कोरोना बाधित एकूण 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 01 लाख 10 हजार 114 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 01 लाख 06 हजार 452 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 03 हजार 662 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 92 हजार 126 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 14 हजार 077 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 12 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

केवळ 50 लोकांनी काढली दिंडी, 17 दिवसांनंतर हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाणार पादुका

0
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/590882391804635/

पुणे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. दरवर्षी पालखी सोहळ्याला लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. परंतु, यावर्षी कोरोना संक्रमणामुळे केवळ 50 लोकांना दिंडी काढण्याची संधी मिळाली. लॉकडाउनच्या कारणास्तव पालखी केवळ प्रतिकात्मकरित्या मंदिरातून बाहेर निघाली. काही अंतरावर गेल्यानंतर पुन्हा मंदिर परिसरात परत आणण्यात आली. पालखी सोहळ्यापूर्वी शुक्रवारी महापूजा देखील करण्यात आली. यानंतर इनामदार वाड्याच संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. हेलीकॉप्टरने नेणार पादुका-मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पालखी 17 दिवसांनंतर देहू येथील तुकाराम महाराज मंदिरातच राहणार आहे. यानंतर शेवटच्या दिवशी तुकारामांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. सामान्य वेळी ही यात्रा 21 दिवसांची असते. यात लोक देहू, आळंदीसह राज्यातील अनेक भागांना सर करत पायी चालत पंढरपूरला येतात. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विठ्ठलाचे दर्शन घेऊन दिंडीचा समारोप होतो. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आपल्या पत्नीसह पंढरपुरात पूजेत सहभागी होतात. आता संक्रमणाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात सहभागी होणार का हे अद्याप स्पष्ट नाही.

गेल्या 8 शतकांपासून तुकाराम पालखीची परमपरा सुरू आहे. यात भक्तांची संख्या कमी होण्याची ही 800 वर्षातील तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1912 मध्ये प्लेग या रोगाने आणि 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे या ठिकाणी भक्तांची संख्या कमी झाली होती. 2019 च्या पालखी सोहळ्याला या ठिकाणी जवळपास 5 लाख लोक आणि 350 दिंड्या सहभागी झाल्या होत्या.पंढरपूरमध्ये एका वर्षात 4 मोठ्या जत्रा भरतात. परंतु, यावर्षी कोरोना व्हायरसमुळे जत्रा भरणार नाही. एरवी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला एकत्र येतात. यामध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देश विदेशातील भक्तांचा देखील समावेश असतो. यावर्षी मात्र, पंढरपूरला कुठलीही जत्रा भरणार नाही.

१३ महिन्यांची चिमुकली आणि ७० वर्षाच्या आजीबाई दोघींनीही केली कोरोनावर मात!

0

अहमदनगर –  शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईंना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते. मात्र, आजीबाईंनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या बरे होऊन घरी परतल्या आहेत. हीच गोष्ट  संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड येथील एका १३ महिन्यांच्या चिमुकलीची! कुटुंबातील सदस्याला झालेला कोरोना तिच्यापर्यंत पोहोचला. मात्र, तीही यावर मात करीत पुन्हा सुखरूप घरी परतली आहे. उपचारांना योग्य प्रतिसाद दिला तर कोरोना पराभूत होऊ शकतो हेच या आजीबाई आणि चिमुकलीने दाखवून दिले आहे. या दोघी सोबतच एकूण १९ रुग्ण कोरोनातून बरे झाले. बूथ हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी या रुग्णांना निरोप दिला आणि पुढील चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या.

या आजीबाईंच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाने गाठले आणि तो त्यांच्यामार्फत आजीबाई पर्यंत पोहोचला. त्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. येथेही त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला. मनाचा ठाम निश्चय ठेवत त्यांनी आता या आजारावर मात केली आहे. या आजीबाई सोबत संगमनेर येथील ही चिमुकली बरी झाली. तिलाही तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या मार्फत कोरोनाचा संसर्ग झाला. तिने डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद दिला आणि तिही या आजारातून बरी होऊन घरी परतली.या दोघींनीही कोरोनातून बरे होऊन या आजाराला आपण हरवू शकतो, असा आत्मविश्वास इतरांमध्ये ही निर्माण केला आहे. हा आजार लपवून न ठेवता त्यावर योग्य वेळी उपचार घेतले पाहिजेत. लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले पाहिजेत.  योग्य वेळी उपचार घेतले तर कोरोनावर मात करू शकतो एवढे नक्की!

प्रस्तावित वीज सुधारणा विधेयक 2020 हे शेतकरी व गरीब विरोधी : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

0

मुंबई १२ जून 2020: प्रस्तावित वीज सुधारणा विधेयक  2020 हे शेतकरी व गरीब  विरोधी असल्याने ते त्वरित मागे घेण्याची विनती राज्याचे  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्राद्वारे केंद्रीय ऊर्जामंत्री यांना केली आहे.
केंद्रीय ऊर्जामंत्री यांना पाठविलेल्या पत्रात डॉ. राऊत यांनी प्रस्तावित वीज सुधारणा विधेयकात क्रॉस सबसिडी संपूर्णपणे रद्द करण्याविषयीच्या धोरणाचा खूप मोठा फटका घरगुती, शेतकरी व गरीब ग्राहकांना बसत असल्याने त्यांना वीज दर परवडणारे नसल्याने या वर्गवारीतील ग्राहकांवर मोठा आघात होणार असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, राज्य वीज नियामक आयोग हे क्रॉस सबसिडीला कमी करण्याच्या अनुषंगाने वीज दर निश्चित करून कोणत्याही ग्राहकांच्या वर्गवारीवर याचा आघात होणार नाही याची खबरदारी घेऊन नियमानुसार वीज दर निश्चित करीत असते. परंतु एकंदरीत परिस्थितीचा विचार करता व मागील ऐतिहासिक पार्श्वभूमी विचारात घेता आजच्या घडीला क्रॉस सबसिडीला पूर्णतः रद्द करणे अशक्य आहे.
त्यांनी पुढे हे स्पष्ट केले आहे की, प्रत्येक राज्यातील विशिष्ट स्थिती पाहता वेगवेगळ्या  वर्गवारीतील ग्राहकांची संख्या वेगवेगळी असून क्रॉस सबसिडीच्या गरजाही वेगवेगळ्या आहेत. जसे देशातील सगळ्यात जास्त कृषीपंप महाराष्ट्रात आहेत व कृषीपंपाचा वीज वापरही देशाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. मात्र काही राज्याचा विचार करता कृषिपंपासाठी वीज वापर फारच कमी आहे. अश्या परिस्थितीत जर वीज दर धोरण सगळ्याच राज्यात समान राहीले तर काही वर्गवारीतील ग्राहकांना ते अतिशय जाचक व आर्थिकदृष्टया न परवडणारे असल्याने सामाजिक रोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य वीज नियामक आयोगांना क्रॉस सबसिडीचे प्रमाण उत्तरोत्तर कमी करण्यासाठी योग्य ते निर्णय घेण्याचे अधिकार अबाधित ठेवणे गरजेचे असून प्रस्तावित वीज सुधारणा विधेयकातील वीज दर धोरण हे अयोग्य आहे.
प्रत्येक राज्याला त्यांच्या गरजेनुसार क्रॉस सबसिडीचे धोरण निश्चित करून व वीज पुरवठ्याचा सरासरी दर विचारात घेऊन त्यानुसार वीज दर निश्चित करण्याचे अधिकार असले पाहिजे परंतू प्रस्तावित वीज सुधारणा विधेयकामुळे हे अधिकार केंद्र सरकारच्या हातात देण्याचे प्रयोजन अनुचित आहे, असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.
प्रस्तावित वीज (सुधारणा) विधेयकात ग्राहकांना वीज पुरवठ्याच्या खर्चानुसार वीज दर आकारण्यात येणार असून त्यांना वीज बिलात कोणतीही सबसिडी देण्यात येणार नसल्याने ते बिल भरणे बंधनकारक आहे. मात्र जर त्याला वीज दरात सबसिडी द्यायची असेल तर ती त्याच्या बँक खात्यात सरळ जमा करण्यात येईल. विज बिलात त्याचे समायोजन करता येणार नाही. सबसिडीची अग्रीम रक्कम अश्या ग्राहकांच्या खात्यात वीज बिल अदा करण्यापूर्वी जमा करावी लागेल.
ग्राहकांना सबसीडीचा सरळ लाभ देण्यापूर्वी वस्तुस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. यात लाभार्त्यांची योग्य निवड करण्याबाबत खरी अडचण आहे. बहुतांशवेळी वीज मीटर हे घरमालक अथवा त्याच्या नातेवाईकाच्या नावे असते. वापरकर्ता जर भाडेकरू असेल तर त्याच्या खात्यात सबसिडी सरळ जमा होणार नाही. तसेच सध्या बहुतांश कृषीपंप ग्राहक हे वीज बिल भरत नसल्याने सबसिडीचे पैसे सरळ कसे त्याच्या खात्यात जमा करता येईल, असा प्रश्न निर्माण होतो. ह्या ग्राहकांकडून वीज बिल खूप कमी प्रमाणात भरल्या जात असल्याने थकीत बिलाच्या विलंब दंडासोबत थकीत बिलाचा बोजा अधिकच वाढेल.यामुळे वितरण कंपन्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण होईल व परिणामत: अश्या कृषीपंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करावा लागेल. ग्राहकांना सबसिडीचा सरळ लाभ देतांना याचा विचार करण्यात आलेला नाही.सोबतच थकबाकीदार ग्राहक याचा लाभ घेऊन भविष्यातील वीज देयके अदा करणार नाही. त्यामुळे वीज बिलासंबंधी वितरण कंपन्यांपुढे निर्माण होणाऱ्या सगळ्या अडचणींचा विचार ह्या सुधारणा विधेयकात करण्यात आलेला नाही. मात्र नियमितपणे विज बीलाचा भरणा करणाऱ्या औद्योगिक व पॉवरलुम सारख्या वर्गवारीतील वीज ग्राहकांना जर सरळ लाभ हस्तांतरित करता येत असेल तर तसा प्रयत्न करता येईल, असे मत डॉ. राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.———————–

‘क्रॅक द कोविड-१९ क्रायसिस’ राष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये ‘रायसोनी’च्या ‘कोविड स्ट्रायकर्स’ला उपविजेतेपद

0

पुणे : आयबीएम आणि नॅसकॉम फ्युचर स्किल्स यांच्या वतीने आयोजित ‘क्रॅक द कोविड-१९ क्रायसिस’ या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन हॅकेथॉनमध्ये वाघोली (पुणे) येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या (जीएचआरआयईटी) ‘कोविड स्ट्रायकर्स’ संघाला उपविजेतेपद मिळाले आहे. स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी ‘पॉवर टू व्हॉइस’ हा प्रकल्प (ऍप) तयार केले होते. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती वापरून कोरोनासारख्या संकटावर उपाययोजना शोधण्यासाठी या ऑनलाईन हाकेथॉनचे आयोजन केले होते. 

अक्षय तोष्णीवाल, सोहम मुनोत, हिमांशू देशमुख, सौरभ चोरडिया या विद्यार्थ्यांनी प्रा. रचना साबळे व प्रा. पंकज खांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प केला. देशभरातून २६, ४७८ संघ यामध्ये सहभागी झाले होते. त्यात आयटी प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि स्टार्टअप असे एकूण एक लाखांपेक्षा अधिक जणांनी भाग घेतला. तीन फेऱ्यानंतर अतिशय काटेकोरपणे मूल्यांकन होऊन ‘रायसोनी’च्या संघाने अंतिम फेरीत उपविजेतेपद पटकावले. कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्यांवर नवोन्मेषांवर आधारित प्रात्यक्षिक व परिणामकारक उपाय शोधण्याचा प्रयत्न यातून झाला. यामध्ये क्लाउड, डेटा कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) याचा वापर केला गेला.

हा संघ आता ‘इंटरनॅशनल आयबीएम हाकेथॉन’मध्ये सहभागी होणार आहे. उत्कृष्ट आणि उपयुक्त अशा या प्रकल्पाचे नॅस्कॉमनेही कौतुक केले आहे. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी, श्रेयस रायसोनी, अजित टाटिया, डॉ. आर. डी. खराडकर (संचालक, जीएचआरआयईटी) यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

“शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था व स्थलांतरित मजूर यांच्यातील संवाद सुलभ व्हावा, याकरिता प्रकल्प महत्वाचा आहे. देशभर मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न उभा राहिला होता, त्यावर उपाय शोधण्याचे उद्दिष्ट्य यामध्ये होते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी शासकीय कार्यालये आणि रेल्वे स्थानके यांच्यात समन्वय साधण्यास या प्रकल्पामुळे मदत होईल. या ऍपद्वारे मजुरांच्या लक्षणांचा अभ्यास करून धोक्याचा स्तरही ठरवने शक्य आहे. शिवाय या गरजू स्थलांतरितांना एखाद्या स्वयंसेवी संस्थेला काही मदत करायची असेल, तर तीदेखील शक्य होईल. विशेष म्हणजे या ऍपच्या वापरासाठी स्मार्टफोनची किंवा इंटरनेटची गरज नाही. सध्या फोनवरही याचा वापर शक्य आहे.”

– प्रा. रचना साबळे, मार्गदर्शिका

कोरोना संकटकाळातील पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे, दि. १२ : कर्तव्य पार पाडताना माणुसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलीसांप्रती नागरिकांचा आदर वाढला आहे. सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलिसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि राज्य पोलिसांच्या कामगिरीचा गौरव केला.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच पुणे शहर पोलीस कर्मचारी बॅच 2012 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भेट देऊन पोलीसांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी हे गौरवोद्‌गार काढले.

लॉकडाऊन कालावधीतील पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीची माहिती देणाऱ्या फलकाची पाहणीही उपमुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या संकटाचा धैर्याने सामना करीत उत्कृष्ट जनसेवा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांच्या कामाचे विशेष कौतुक केले. कर्तव्य बजावत असताना स्वच्छता, सुरक्षिततेची काळजी घ्या. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. सॅनिटायझरचा वापर करा. आदी सूचना त्यांनी केल्या. यावेळी ‘फील द बिट’ पुस्तिकेचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पोलिसांचे विशेष कौतुक करताना सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत कोरोना नियंत्रणासाठी निरंतर काम करुन पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढच्या काळातही सर्वांच्या एकजुटीतून कोरोनाला राज्यासह देशातून हद्दपार करण्याचा निर्धार करुया.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे तसेच लॉकडाऊन कालावधीत पोलिसांनी प्रभावीपणे केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन ते म्हणाले, पोलिसांना चांगली घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले की, लॉकडाऊन कालावधीत सोशल पोलिसिंगला प्रोत्साहन दिले पाहिजे. जनतेपर्यंत अधिकाधिक पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेताना पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षिततेची, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यापुढच्या काळातही कंटेन्मेंट झोन परिसरात कडक निर्बंध राबवण्याबरोबरच जनजागृती करण्यावर भर द्यायचा आहे. पोलीस शिपायांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संकटकाळात कर्तव्यभावनेने, सामाजिक जाणीवेतून व अगदी मनापासून काम करुन कोरोना नियंत्रणासाठी योगदान दिले आहे, त्याबद्दल त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी लॉकडाऊन कालावधीत पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरणातून माहिती दिली.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व स्थलांतरित मजुरांसंदर्भात पोलिसांनी बजावलेली कामगिरीबद्दल माहिती दिली. अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे यांनी सोशल पोलिसिंग सेलबाबत, उपायुक्त बच्चन सिंग यांनी प्रवासी पासबाबत, उपायुक्त संभाजी कदम यांनी सोशल मीडिया चित्रफितीबाबत व जनजागृती पुस्तिकांबद्दल, तर उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी पोलीसांच्या कल्याणकारी योजनांबाबत, उपायुक्त मितेश घट्टे यांनी क्वारंटाईन प्रक्रिया व ड्रोनद्वारे नियंत्रणाबाबतची माहिती दिली. संबंधित विभागांच्या पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या परिमंडळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी उपमुख्यमंत्र्यांना दिली.

‘माधव रसायन’ व ‘रस माधव वटी’चे विश्ववती चिकित्सालयातर्फे लोकार्पण

0

पुणे : श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्रातर्फे ‘माधव रसायन’ आणि ‘रस माधव वटी’ या विषाणू-जिवाणू प्रतिरोधक क्षमता निर्माण करू शकणाऱ्या औषधांचे लोकार्पण ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, संशोधन केंद्राचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांच्या प्रेरणेने, पुण्यातील प्रथितयश वैद्य समीर जमदग्नी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी वैद्य जमदग्नी यांचे ‘आयुर्वेद आणि साथीचे आजार’ यावर फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यानही झाले. 
वैद्य जमदग्नी म्हणाले, “सध्याच्या कोविड साथीच्या बिकट प्रसंगी आयुर्वेदिक औषधे प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आयुर्वेदीय दिनचर्या, आहार, विहार यांचे पालन करण्याबरोबरच मनोधैर्य वाढवण्यासाठी आयुर्वेद उपयोगी आहे. राज्य सरकारनेही आता कोविडवरील आयुर्वेदीय उपचारांना परवानगी दिली असल्याने लोकांनी यावर वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.”
आयुर्वेदातील ज्या वनस्पती विषाणूजन्य आजारावर उपयुक्त असलेल्या आणि प्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या वनस्पतींपासून या औषधाची निर्मिती केली गेली आहे. वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रसाद पांडकर, डॉ शैलेश मालेकर, डॉ गिरीश शिर्के, डॉ तुषार सौंदाणकर, डॉ सागर कवारे, डॉ राहुल शेलार यांच्याकडून या औषधाची निर्मिती झाली आहे.
श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर आदी शहरांमध्ये अत्यावश्यक सेवेतील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना या काळात ‘माधव रसायन’ व ‘रस माधव वटी’ निःशुल्क पुरवली आहे. सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा, वास किंवा चव जाणे, कफ आदी लक्षणांमध्ये ही औषधे उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
डॉ गिरीश शिर्के यांनी ट्रस्ट आणि संशोधन केंद्राबद्दल, तर डॉ पांडकर यांनी आयुर्वेदातील संशोधनाबद्दल माहिती दिली. डॉ तुषार सौंदनकर यांनी आभार मानले. प्रसंगी डॉ नवीन पाटील, डॉ तुषार सुकळीकर, डॉ देवदत्त जोशी, डॉ अभय जमदग्नी, डॉ शुभम धूत, डॉ विनय सचदेव आदी उपस्थित होते.

‘एकात्मिक पूर इशारा यंत्रणा’ मुंबईसाठी वरदान ठरेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई दि. १२: मान्सून काळात एकात्मिक पूर इशारा यंत्रणा (इं‍टिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम) ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पूर येणार आहे तसेच अगदी वादळासारख्या संकटाची देखील पूर्व सूचना मिळून सावध होता येणार आहे. या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या भागात गटारी, नदी यातील रिअल टाईम होणारी पाण्याची होणारी हालचाल, त्याचे प्रवाह याचे आडाखे बांधता येणे शक्य होईल. यामुळे मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचविणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत तयार केलेल्या एकात्मिक पूर इशारा यंत्रणेचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ.एम.महापात्रा, भारतीय हवामान विभाग मुंबईचे उपमहासंचालक डॉ.के.एस.घोसालीकर यांच्यासह देशातील विविध विभागीय हवामान वेधशाळेचे प्रमुख सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मी सर्वप्रथम भारतीय हवामान विभागाचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी मान्सून ११ तारखेला येणार असे जाहीर केले होते , त्याप्रमाणे बरोब्बर पावसाने हजेरी दिली. आणखी एका कारणासाठी अभिनंदन करायचे आहे ते म्हणजे निसर्ग चक्रीवादळाची सगळी इत्यंभूत माहिती हवामान खाते देत होते. या वादळाची दिशा बदलली तसेच त्याचा वेग मंदावला वगैरे गोष्टी आम्हाला कळत होत्या त्यामुळे तशी यंत्रणा सज्ज होती. यामुळे जीवितहानी टाळता आली.

कोणतीही आपत्ती आली तर आपण त्यापासून काय शिकतो हे महत्वाचे आहे. केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन सध्या देशातील सर्वात व्यस्त मंत्री असतील. आरोग्यमंत्री म्हणून ते कोरोनाचा मुकाबला करीत आहेत. त्यांच्या दृष्टीने आता ब्लड मॅनेजमेंट आणि फ्लड मॅनेजमेंट दोन्ही महत्वाचे आहे. मुंबईसह राज्याने २००५ मध्ये पुरामुळे नुकसान अनुभवले. यात हाय टाईड आल्यावर समुद्रातून उलटे पाणी येऊन मुंबईत पाणी साचते या बाबी लक्षात आल्या. हे टाळण्यासाठी आम्ही पंपिंग स्टेशन्सही  बसवले. त्याचकाळात पावसाळ्यानंतर लेप्टो, डेंग्यू अशा साथी आल्या. या साथींचे निदान होण्यासाठी २००७ मध्ये मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये देशातली पहिली मॉलिक्युलर लॅब आम्ही बनविली.  आता कोरोना साथीतही आम्ही शिकलो. त्यामुळेच पूर्वी २ लॅब होत्या त्या ८५ झाल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच आम्ही मंत्रिमंडळात पर्यावरण विभागाचे नाव बदलून ‘पर्यावरण आणि वातावरणीय बदल’ विभाग असे केले आहे. पर्यावरणाकडे एका वेगळ्या नजरेने आणि गांभीर्यपूर्वक पाहण्यास आमची सुरुवात झाली आहे, असे नमूद करतांनाच, येत्या काळात भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी डॉपलर रडार लवकरात लवकर बसविले पाहिजे जेणे करून हवामांचा अचूक अंदाज शक्य होईल, अशी मागणी ही श्री.ठाकरे यांनी यावेळी केली.

केंद्रीयमंत्री डॉ.हर्षवर्धन म्हणाले की, या यंत्रणेच्या निमित्ताने पुराचा इशारा देणारी देशातील अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत झाली आहे. ही यंत्रणा मुंबईसाठी खूप उपयोगी ठरणार असून ही कार्यान्वित केल्याबद्दल भारतीय हवामान खाते आणि मुंबई महापालिकेचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी श्री.घोसालीकर यांनी मुंबईत ४ डॉपलर रडार लावण्याची प्रक्रिया सुरु असून पुढच्या मान्सूनच्या आधीच रडार कार्यरत होतील, असे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते पूर इशारा यंत्रणेच्या ई- उद्घाटनासह यंत्रणेच्या डिजिटल ब्राऊचर्सचे प्रकाशन करण्यात आले.

८५% पालकांना आता वाटत आहे त्यांच्या मुलांच्या भविष्याची जास्त चिंता – ‘लीड स्कूल’ सर्वेक्षणाचा निष्कर्ष

0

मुलांचे आरोग्य ,त्यांची सुरक्षा आणि मुले अभ्यासात मागे पडतील व त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाईल या दोन सर्वात मोठ्या चिंता महाराष्ट्रातील पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

पुणे, १२ जून, २०२०:  सध्या देशातील सर्वात मोठी ‘ऑनलाईन शाळा’ चालवत असलेल्या ‘लीड स्कूल’मार्फत नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, आजाराच्या साथीमुळे शिशु वर्गांपासून बारावीपर्यंतच्या मुलांच्या पालकांना खूप मोठी चिंता भेडसावू लागली आहे.  या सर्वेक्षणातून असे निष्पन्न झाले आहे की, कोविड साथीच्या काळात समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या स्थितीमुळे आपल्या मुलांच्या भविष्याबाबत ८५% पेक्षा जास्त पालकांना आता अजून जास्त काळजी वाटू लागली आहे.

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आपल्या देशात ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे, या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रातील ५०% पेक्षा जास्त पालक असे मानतात की ऑनलाईन शाळा हा शिक्षणाचा प्रभावी मार्ग आहे आणि शाळेच्या वर्गांमध्ये बसवून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरीनेच ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवले गेले पाहिजे.  जवळपास ५३% पालक असे मानतात की, ते आपल्या मुलांना घरून चालणाऱ्या ऑनलाईन शिक्षणात मदत करू शकतात, आई आणि वडील दोघांनीही हे मत व्यक्त केले आहे.

महानगरे आणि इतर शहरांमधील जवळपास ५००० पालकांसोबत केल्या गेलेल्या या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणातून काही वास्तविक परंतु कठोर निष्कर्ष आढळून आले आहेत:  ७०% पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर कोविडमुळे होत असलेल्या प्रभावामुळे खूप काळजीत आहेत.  नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक थोडे जास्त चिंतीत झाले आहेत; सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांपैकी ७८% पेक्षा जास्त पालकांना आपल्या मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत चिंता वाटत आहे; आणि जवळपास ४०% पालकांनी त्यांची मुले अभ्यासात मागे पडतील आणि त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाईल अशी भीती व्यक्त केली आहे.

मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दलची भीती तसेच मुले अभ्यासात मागे पडतील आणि त्यांचे शिक्षणाचे एक वर्ष वाया जाईल या दोन सर्वात मोठ्या चिंता महाराष्ट्रातील पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

लीड स्कूलकडे असलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणामधील पालक असे मानतात की ते आपल्या मुलांना शिक्षणात मदत करण्यात चांगल्या प्रकारे सक्षम नाहीत.  तर दुसरीकडे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगाणा येथील पालक मानतात की, ते आपल्या मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी सक्षम आहेत.

सर्वेक्षणातून आढळून आलेली ही बाब आश्चर्यजनक नाही की, महाराष्ट्रातील ८४% पालक म्हणतात, ते आपल्या मुलांसोबत जास्त चांगल्या प्रकारे वेळ घालवण्यात सक्षम आहेत – मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रकारच्या शहरांमध्ये ही बाब आढळून आली आहे.  

भारतातील पालकांना भेडसावत असलेल्या मुख्य चिंता समजून घेणे हे या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणाचे उद्धिष्ट होते.  यामध्ये सहभागी झालेल्या पालकांनी कोविड-१९ मुळे शाळा बंद असल्याच्या समस्येला सामोरे जात असतानाचे आपले अनुभव यामध्ये मांडले आहेत, त्यासोबत मुलांच्या बाबतीत त्यांच्या निर्णयांवर सद्यस्थितीचा कसा प्रभाव होत आहे, हे देखील त्यांनी सांगितले आहे.

लीड स्कूलचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुमीत मेहता यांनी सांगितलेआपल्या मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांच्या मनात जी भीती आहे ती मी समजू शकतो.   आपल्या शाळांनी उच्च गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण अनुभव प्रदान करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून जर आपण आपल्या मुलांना शाळांमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेत असू तर त्यांचे काही नुकसान होणार नाही.  पण त्याचवेळी आपल्याला अशा पालकांच्या निर्णयाचा देखील आदर राखावा लागेल जे आपल्या मुलांना शाळेत पाठवू इच्छित आहेत.  शाळांमध्ये नियमांचे पालन होत आहे याची खात्री करून घेण्यासाठी सरकारने नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे आणि ज्या शाळा नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली गेली पाहिजे कारण पालक आणि विद्यार्थी या दोघांच्याही मनात विश्वास निर्माण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे.  पालकांनी या पर्यायाचा वापर करायला हवा आणि शाळांसोबत सहकार्य आणि समन्वयाने पुढे गेले पाहिजे कारण पालक आणि शाळांदरम्यानचे  विश्वासार्ह संबंधच कोविड-१९ ला भारतीय शिक्षण क्षेत्रासाठी सर्वात मोठी भेट बनवू शकतील.”  

लीड स्कूलने भारतातील शाळांसाठी ‘पोस्ट लॉकडाउन हँडबुक’ नुकतेच प्रकाशित केले आहे.  लॉकडाउननंतर विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही दोन्ही उद्दिष्ट्ये एकाच वेळी पूर्ण करत शाळा चालवण्यासंदर्भात शिफारशी आणि मार्गदर्शक सूचना या हँडबुकमध्ये दिल्या गेल्या आहेत.

लीड स्कूल :

‘लीडरशिप बोलेवार्ड’ ही भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करत असलेल्या शिक्षण कंपन्यांपैकी एक कंपनी लीड स्कूलची प्रायोजक आहे.  लीड स्कूलची स्थापन २०१२ मध्ये करण्यात आली.  ही शाळांसाठी तयार करण्यात आलेली एकात्मिक शिक्षण प्रणाली आहे जी विद्यार्थ्यांना उच्चतम स्तरावर शिक्षण घेण्यात मदत करते.  लीड स्कूलमध्ये तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र यांचा मिलाप घडवून आणून शिकवण्याची आणि शिकण्याची एक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, जेणेकरून देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अभ्यासातील आणि शिक्षकांची शिकवण्यातील कामगिरी सुधारता येईल.  लीड स्कूलच्या मालकीच्या सहा शाळा असून देशभरातील १५ राज्यांमधील द्वितीय ते चतुर्थ श्रेणीच्या शहरांसह ३०० पेक्षा जास्त शहरांमधील ८०० पेक्षा जास्त शाळा लीड स्कूलच्या सहयोगी आहेत.  या शाळांमध्ये मिळून जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.   

राज्यात परत लॉकडाऊन लावून दुकाने बंद करण्याच्या बातम्या चुकीच्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

स्वयंशिस्त मात्र पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक

मुंबई, दि. 12 : काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या  पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. 

पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच आहे. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.   

शहरातील सर्व नाले मोकळे करा ‘ – महापौर यांचे प्रशासनास आदेश

0

पुणे-आगामी काळात पावसाळ्याच्या धर्तीवर,पुणे शहरातील पुरप्रवण क्षेत्रांतील कामांची व नालेसफाई कामांची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. सदर पाहणीदरम्यान कोथरूड-बावधन, वारजे कर्वेनगर, ढोले पाटील रोड, येरवडा-कळस-धानोरी, नगररोड-वडगावशेरी, वानवडी-रामटेकडी आणि हडपसर-मुंढवा या क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारितील परिसराची पाहणी करण्यात आली. सदर पाहणीस . शेखर गायकवाड, महापालिका आयुक्त, सौ. सरस्वती शेंडगे,उपमहापौर , . हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती,. सुनिल कांबळे, आमदार तथा नगरसेवक,.सौ. दिपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या, पृथ्वीराज सुतार, शिवसेना तसेच सौ. वैशाली बनकर, प्रशांत जगताप, दिपक मानकर, दिलीप बराटे, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील,मा.डॉ. सौ. श्रद्धा प्रभुणे,सौ. वासंती जाधव,सौ. अल्पना वरपे,.सौ. हर्षाली माथवड, सौ. छाया मारणे, सौ. वृषाली चौधरी, . दिपक पोटे, जयंत भावे,.सौ. माधुरी सहस्त्रबुद्धे, सुशील मेंगडे, अजय खेडेकर, सचिन दोडके, राजेश बराटे, सौ. मंजुश्री खर्डेकर, उमेश गायकवाड, .सौ. मंगला मंत्री, सौ. शितल सावंत, सौ. फरजाना शेख, अनिल टिंगरे, मुक्ता जगताप, राहूल भंडारे, कर्णे गुरुजी, आदी मान्यवर उपस्थित होते. महापौर यांनी प्रशासनास खालीलप्रमाणे सूचना केल्या

१. पुणे शहरातील जे नाले सिमेंट पाईपद्वारे बंद केले आहेत ते सर्व नाले खुले करून प्रवाहीत करणे.

२. कोथरूड स्मशानभूमी येथील पिण्याच्या पाण्याची लाईन शिफ्ट करणे, कर्ल्व्हट नव्याने बांधणे आणि स्मशानभूमीची भिंत नव्याने उभारणे.

३. शितल हॉटेल, कर्वेनगर परिसरातील नाल्यावरील कर्ल्व्हटच्या खाली जमा झालेला गाळ काढणे.

४. किमया हॉटेल परिसरात पाणी तुंबले जाण्याची समस्या आहे, तरी सदर परिसरातील क्राँनिक स्पॉटची पाहणी रोजच्या रोज करून त्याअनुषंगाने व्यवस्था करणे आणि तेथील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देणे.

५. सर्व शहरातील नाल्यावरुन जाणार्‍या एमएसईबी च्या केबल्स सुरक्षित करण्याबाबत एमएसईबी प्रशासनाशी येत्या काही दिवसांत पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करणे.

६. शहरात ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा साचतो व ज्या ठिकाणी पुराचे पाणी घुसते अशा ठिकाणी ड्रेनेज विभागाच्या सेवकांमार्फत रोजचे रोज जागा पाहणी करणे व त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करणे.

७. फुलेनगर परिसरात जुने त्रासदायक ठरणारे व नुकसानकारक कर्ल्व्हट तोडून नवीन सुयोग्य कर्ल्व्हट बांधणे.

८. शांतीनगर परिसरातील नाल्यातील कर्ल्व्हट तोडून नाल्याचे पात्र मोठे करणे, शहरातील सर्व नाल्यातील पाण्याचा प्रवाहास अडथळे ठरणारी झाडे – झुडपे संबधित खात्याच्या परवानग्या घेऊन काढणे.

९. पॉवर हाऊस, रास्ता पेठ येथील नाल्यांची साफसफाई करणे.

१०. पुणे शहर व घोरपडी, अनंत टॉकीज येथे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील मैलापाण्याबाबत ब्रिगेडीअर यांचेशी पत्रव्यवहार करणे तसेच कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील मैलापाणी प्रक्रिया न करता सोडल्यास त्यांस शुल्क आकारून महानगरपालिकेने त्यावर प्रक्रिया करणे अथवा कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील मैलापाण्यासाठी प्रक्रिया प्रकल्पाची व्यवस्था करणेबाबत सुचित करणे.

११. फुलेनगर-येरवडा आंबेडकर सोसायटी परिसरात नाल्यातील काँक्रिटीकरण तोडणे व सादरीकरण करणे.

१२.धानोरी – विश्रांतवाडी येथील मयुर किलबिल परिसरातील नाला साफसफाई व खोलीकरण व कल्व्हर्ट तयार करणे.

१३. धानोरी परिसरातील नाल्यावर अतिक्रमण करून तयार करण्यात आलेली सीमाभिंत आणि दोन पुल पाडणे तसेच संबंधित बांधकाम व्यावसायीकावर तातडीने कारवाई करण्याबाबतचे आदेश मा. महापौर यांनी प्रशासनास दिले.

१४. कस्तुरबा नाला (विश्रांतवाडी) येथे काँक्रिटीकरण काढून नाला रुंदीकरण करणे.

१५. साकोरे नगर ( विमाननगर ) येथे ड्रेनजची उर्वरीत कामे त्वरीत सुरू करणे.

१६. विमाननगर येथील कोणार्क पुरम नाला उघडा करणे व राडारोडा काढणे.

१७. फिनिक्स मॉल (नगररोड ) येथील कल्व्हर्टचे काम त्वरीत सुरू करणे.

१८. केशवनगर कल्व्हर्ट येथे पडलेली झाडे काढणे, कचरा उचलणे आणि स्वच्छ संस्थेचे स्वयंसेवक परत कामावर घेणे.

१९.अॅमनोरा पार्क कल्व्हर्टच्या बाजूचा कचरा काढणे.

२०.हडपसर स्मशानभूमी च्या आसपासची पावसाळी कामे करणे.

२१. मंत्री मार्केट, हडपसर परिसरातील नाल्यावरील बांबुचे अतिक्रमण त्वरीत काढणे, त्या परिसरात गेट बांधणे, उपद्रवी ठरत असल्यास अशी झाडे योग्य त्या परवानगी घेऊन काढणे.

२२. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथील सर्व नाल्यांतील डुकरांवर प्रतिबंध घालणेबाबत त्वरीत कारवाई करणे.

२३. गंगा सॅटेलाईट परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्डशी चर्चा करून नवीन मोठा पूल बांधण्यासाठी पत्रव्यवहार करणे.

२४.कोंढवा स्मशानभुमी परिसरात नाल्यातील चॅनल फोडून नाला रुंद करणे, नाल्यातील गाळ काढणे, कचरा काढणे, नाल्याची खोली वाढवणे, नाल्यातील राडारोडा काढणे उपद्रवी झाडे झुडपे योग्य त्या परवानगी घेऊन काढणे.

पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित कोविड आरोग्य केंद्र

0
पुणे शहरात ‘कोरोना’चा पहिला रुग्‍ण सापडल्‍यानंतर सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्‍या होत्‍या. पुणे शहरानंतर मुंबई, पिंपरी-चिंचवड, मालेगाव या शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढायला लागला. टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) संक्रमण रोखण्‍यास मदत झाली. मात्र, पुण्‍या-मुंबईतील कामगार आपापल्‍या ग्रामीण भागात तसेच इतर राज्‍यातील कामगार आपल्‍या गावी परत येऊ लागल्‍यामुळे तेथे ‘कोरोना’ची काही प्रमाणात लागण झाली. पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती होती. तथापि, राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालक मंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍या उत्‍कृष्‍ट समन्‍वय आणि नियोजनामुळे ग्रामीण भागातील ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्‍यात यश मिळाले आहे.            सध्‍या पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागात ‘कोरोना’चा फैलाव कमी असला तरी भविष्‍यातील शक्‍यता गृहित धरुन ग्रामीण भागातील रुग्णांना ग्रामीण भागातच उपचार मिळावेत, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्‍न करण्‍यात येत आहेत. याचाच एक भाग म्‍हणून विप्रो कंपनीने कोविड सारखी परिस्थिती हाताळण्यासाठी नेमकी गरज ओळखून समर्पित कोविड आरोग्य केंद्र तयार करण्याची संकल्पना मांडली. पुणे जिल्हा परिषदेने त्याला सकारात्मक प्रतिसाद देवून जिल्हा परिषदेमार्फत अशा प्रकारचे पीपीपी मॉडेल (पब्लिक प्रायव्‍हेट पार्टनरशिप)  मधून समर्पित कोविड आरोग्य केंद्र सुरु करण्याचे काम हाती घेतले.संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे सुसज्ज ५०४ खाटांचे समर्पित कोविड आरोग्य केंद्र पीपीपी मॉडेल मधून सुरु करण्याचा देशात पहिला मान पुणे जिल्हा परिषदेने मिळवला आहे.           या समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या सर्व कोविड रुग्णांना महात्माफुले जीवनदायी आरोग्य योजना व पुणे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्‍या डॉ. रखमाबाई राऊत कोविड अर्थसहाय्य योजना यामधून मोफत उपचार करण्यात येणार आहे.            विप्रो ही एक आयटी कंपनी असून या कंपनीने विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर त्याचप्रमाणेपुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त  विक्रम कुमार यांचे मार्गदर्शन घेवून ३० दिवसांमध्ये कोविड हॉस्पिटलची उभारणी केली. पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम  व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद  यांनी या हॉस्पिटलच्या उभारणी करीता आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्यांची पूर्तता केली. या समर्पित कोविड केअर हॉस्पिटलमध्ये १८ व्हेंटीलेटर त्याचप्रमाणे आयसीयु सुविधा आणि ५०४ खाटांची उपलब्धता ही विप्रो कंपनीकडून करुन देण्यात आलेली आहे.            पुण्याजवळील हिंजवडी येथे विप्रो कंपनी लिमिटेड येथे हे हॉस्‍पीटल उभारण्‍यात आले आहे.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराबाबत विप्रो कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांचा सामंजस्य करार एक वर्षाकरिता  केलेला आहे. या हॉस्पिटलमध्ये सौम्य व मध्यम स्वरूपाचे पेशंटवर उपचार केले जातील. करारानंतर हे हॉस्पिटल जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत चालवण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये लागणारे मनुष्यबळ व साधन सामुग्रीची तरतूद राष्‍ट्रीय आरोग्‍य मिशनमार्फत (एनएचएम) करण्यात येणार आहे.            विप्रो कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत पुढीलप्रमाणे सुविधा देण्‍यात येणार आहेत.  हॉस्पिटलसाठी लागणारी इमारत,  एकूण खाटांची क्षमता – ५०४,  अतिदक्षता विभागामध्ये १० बेड आणि ५ व्हेन्टीलेटरची सोय, डीफेलटर मशीन – ५,  ई.सी.जी. मशीन – १,  ए.बी.जी. मशीन – १, रुग्णवाहिका-२याशिवाय  विप्रो कंपनी लिमिटेड मार्फत रुग्णाच्या मनोरंजनासाठी प्रत्येक वार्डमध्ये एक टीव्ही, कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, मासिके व वर्तमान पत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.            आहार सेवा – विप्रो कंपनी लिमिटेड मार्फत सर्व रुग्णांना आहार सेवा पुरवण्यात येणार आहे. हॉस्पिटलला लागणारे बेड शिट्स ब्‍लँकेट्स, गाद्या व पेशंटचे कपडे कंपनीकडून पुरविले जातील.            जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत पुढीलप्रमाणे सेवा देण्‍यात येणार आहेत. या रुग्णालयाचे व्यवस्थापन वैद्यकीय अधीक्षक हे पाहतील.  या हॉस्पिटलमध्ये लागणारे मनुष्यबळ व साधनसामग्रीची तरतूद राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानामार्फत करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलला लागणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, सर्व प्रकारचे टेक्नीशियन हे मनुष्यवळ जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत पुरविले जातील.            प्रयोगशाळा – रुग्णांच्या आवश्यक रक्ताच्या चाचण्या केल्या जातील. कोरोना तपासणीसाठी थुंकी नमुने घेण्याची सुविधा उपलब्ध आहे व ते तपासणीसाठी पुण्‍याच्‍या एनआयव्‍हीकडे  पाठवले जातील.जंतू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी लागणारी साधन सामग्री जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत देण्यात येणार आहे.  बायोमेडीकल वेस्ट व्यवस्थापन लाईफ सीक्यूअर या संस्थेच्या मार्फत करण्यात येणार आहे. अवैद्यकीय सेवा – वस्त्र धुलाई, स्वच्छता सेवा या कंत्राटी स्वरुपात असलेल्या सेवा बाह्य स्रोतांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.            पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्‍यात आलेल्‍या या ‘समर्पित कोविड आरोग्य केंद्राचे’ मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरण झाले. उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील लोकार्पण सोहळ्यास शुभेच्‍छा दिल्‍या.  यावेळी  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे,  खासदार सुप्रिया सुळे, विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी हे ऑनलाइन तर पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथील आरोग्य केंद्रातून  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, विप्रोचे उपाध्यक्ष हरिप्रसाद हेगडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे,  जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.      या समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्‍ये कोविड रुग्णांकरीता आवश्यक त्या उपचार सुविधा देण्यात येणार आहे. सर्व कोविड रुग्णांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना व पुणे जिल्हा परिषदेने सुरु केलेल्‍या डॉ. रखमाबाई राऊत कोविड अर्थसहाय्य योजना यामधून मोफत उपचार करण्यात येणार आहे.हे आरोग्य केंद्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्ये एक वेगळा नावलौकिक मिळवेल, अशी खात्री आहे. 

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे