Home Blog Page 2546

रायगडमधील वीज यंत्रणेच्या दुरूस्तीची कामे युध्दस्तरावर – प्रधान ऊर्जा सचिव श्री.दिनेश वाघमारे

0

    मुंबई:- अतितिव्र निसर्ग चक्री वादळामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वीज यंत्रणेचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. निसर्गाचे हे आव्हान महावितरणने स्वीकारून सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरू असल्याचे  राज्याचे प्रधान ऊर्जा सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

      निसर्ग चक्री वादळ आल्यानंतर प्रधान ऊर्जा सचिव  श्री. वाघमारे यांनी दुसऱ्यांदा  भेट देऊन रायगड जिल्हयातील वीज यंत्रणेच्या दुरूस्तीच्या कामांची पाहणी केली. या भागातील सर्वच वर्गवारीतील ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित सुरळीत व्हावा, याकरिता आवश्यकतेनुसार व अतिरिक्त साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. परंतु, अत्यंत प्रतिकुल नैसर्गिक परिस्थिती व सध्या सुरू असलेल्या पावसामुळे दुरूस्तीच्या कामात काही ठिकाणी अडथळे येत आहेत. कोणतीही नैसर्गिक परिस्थिती उद्भवल्यास त्याला नेहमीच सामोरे जाणाऱ्या महावितरणद्वारे रायगड जिल्हयातील सर्वच शहरी व ग्रामीण भागांतील ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करण्याचे युध्दस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे प्रधान ऊर्जा सचिव  श्री. वाघमारे यांनी सांगितले.

      प्रधान ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.दिनेश वाघमारे यांनी अलिबाग येथील वादळामुळे कोसळलेल्या व पुन्हा उभारण्यात आलेल्या रेवदांडा फिडर्सची पाहणी केली. पाबरे येथील अति उच्चदाब उपकेंद्रातून येणाऱ्या मुरूड इनकमर फिडर्स् तसेच म्हसळा ते श्रीवर्धन इनकमिंग फिडर्सच्या अत्यंत कठीण असलेल्या वीज यंत्रणेच्या दुरूस्तीच्या कामांची पाहणी केली. श्री. वाघमारे यांनी यावेळी प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी व श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांची भेट घेतली. या भागातील वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व एजंसीची मदत देण्यात येईल, असे श्री.धर्माधिकारी यांनी सांगितले.

     यावेळी श्री.दिनेश वाघमारे यांच्यासोबत कोंकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री.गोविंद बोडके, संचालक (संचालन) श्री.दिनेशचंद्र साबू, महापारेषणचे संचालक (संचालन) श्री.संजय ताकसांडे, भांडुप परिमंडलाच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण, पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री.दिपक पाटील व वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. राजाराम माने व इतर अभियंते सहभागी झाले होते.

महावितरणकडून मीटर रिडींग सुरु; सोबतच वीजबिल दुरुस्त करण्याची प्रक्रियाही सुरु

0

महावितरणकडून मीटर रिडींग सुरु; सोबतचवीजबिल दुरुस्त करण्याची प्रक्रियाही सुरु

पुणे,: पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, मावळ, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले मीटर रिडींग व वीजबिल वितरणाचे काम स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, 23 मार्चनंतर आता वीजग्राहकांकडील मीटर रिडींग घेतल्यानंतर प्रत्यक्ष वीजवापराच्या युनिटप्रमाणे दोन ते अडीच महिन्यांचे एकच अचूक वीजबिल दिले जात आहे. यामध्ये ग्राहकांनी एप्रिल, मे महिन्यात भरलेली रक्कम व सरासरी युनिट समायोजित केले जात आहे.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणकडून मीटर रिडींग घेणे व छापील वीजबिल वितरीत करणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. गेल्या आठवड्याभरापासून शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यासोबतच वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेणे व वीजबिल वितरीत करणे सुरु करण्यात आले आहे.

लघुदाब वर्गवारीत पुणे शहरात 16 लाख 47 हजार, पिंपरी चिंचवड शहरात 6 लाख 67 हजार तर मुळशी, मावळ, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांत 6 लाख 38 हजार वीजग्राहक आहेत. स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंटमेंट एरिआ) वगळून वीजग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, सॅनिटाजर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक असल्यास परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

वीजग्राहकांनोदोन-अडीच महिन्यांचे एकत्रित बिल आल्यास घाबरू नका लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग तात्पुरते बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले होते. तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र एप्रिल, मेजून महिन्यांत स्वतःहून रिडींग न पाठविणाऱ्या वीजग्राहकांना आता मीटर रिडींग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे.

हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व स्लॅबप्रमाणे वीजदर लावून (स्लॅब बेनिफिटसह) देण्यात येत आहे. उदा. दोन महिन्यांचे वीजबिल 330 युनिट असल्यास 330 युनिटचा स्लॅब दर न लावता मासिक प्रत्येकी 165 युनिटप्रमाणे स्लॅब दर लावण्यात येत आहे. तसेच एप्रिल व मे महिन्यांतील सरासरी युनिटचे व बिलाची रक्कम भरली असल्यास फिक्स चार्जेस, विद्युत शुल्क वगळून उर्वरित रकमेचे समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी संबंधीत वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे.

महावितरणच्या अधिकृत वीजबिल केंद्र किंवा घरबसल्या अॉनलाईनद्वारे चालू व थकीत वीजबिलांच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

0

अलिबाग:-जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. 

या चक्रीवादळात नुकसान झालेल्या रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्त विश्वनाथ विनायक गायकवाड-हेदवली रु.15 हजार, हिरा दयाराम वारगुडी-खैरवाडी रु.15 हजार, तानाजी गुणाजी वारगुडी-खैरवाडी रु.15 हजार, लक्ष्मण मोरा शिर्के-ऐनघर रु.15 हजार, मंगला दिनेश कातकरी-सुकेली आवाडी रु.15 हजार, संगीता गंगाराम बावदाने- सुकेली धनगरवाडी रु.15 हजार, देवूबाई शंकर बावदाने- सुकेली धनगरवाडी रु.15 हजार, पार्वती काशिराम शिद- सुकेली गणपतीवाडी रु.15 हजार, सुरेश भाग्या वाघमारे-हेदवली मांडवशेत रु.15 हजार, असे एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचे  मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोरशेठ जैन, पं.स.सदस्य संजय भोसले, सभापती सदानंद गायकर, ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत तानू शिंदे, उपसरपंच दिनेश धोंडू जाधव व ग्रा.पं.सदस्य अरुण तांडेल, मंगेश साळवी, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडीत राठोड, मंडळ अधिकारी दीपक चिपळूणकर आदि उपस्थित होते.

रोहा तालुक्यातीलनागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्तांना धनादेश वाटप

रोहा तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायतीतील नुकसानग्रस्त यशवंत नारायण मढवी – निडी तर्फे नागोठणे रु.15 हजार, बाळाराम यशवंत मढवी-निडी तर्फे नागोठणे रु.15 हजार, गुलाबा गोपाळ म्हात्रे-निडी तर्फे नागोठणे रु.15 हजार, एकनाथ कोडिंबा देवरे-चिकणी रु.15 हजार, येसू बबन पवार-चिकणी 1 लाख 58 हजार 500, परशुराम राणे रु.15 हजार, सुरेश बारकू पवार रु.15 हजार, सुभाष हरिश्चंद्र जैन रु.15 हजार, नामदेव हिरु ताडकर रु.15 हजार, अशोक हिरामण पवार-पाटणसई रु.15 हजार, धर्मा राघू पवार रु.15 हजार, असे एकूण 3 लाख 8 हजार 500 रुपयांचे  मदतीचे धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोरशेठ जैन, पं.स.सदस्य संजय भोसले, ग्रामपंचायतीचे सरपंच मिलींद धात्रक, मा.प.स.सभापती सदानंद गायकर, मा.उपभापती शिवराम भाऊ शिंदे, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंडीत राठोड, मंडळ अधिकारी अरुण तांडेल उपस्थित

माधवराव पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

0

मुंबई, : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक सौ. रश्मीताई ठाकरे यांचे वडील, उद्योजक श्री.माधवराव पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सौ. रश्मीताईंना पितृवियोगाचे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

कोरोनामुळे शिक्षण थांबू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुख्यमंत्र्यांनी केला शालेय शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ

कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणारऑनलाईनडिजिटल पद्धतीने देखील सुरुवात 

मुंबई, : कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होईल मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरु कराव्यात तसेच दुसरीकडे ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली.

आज दुपारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला. मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. 

ज्या ठिकाणी शाळा प्रत्यक्ष सुरु होत आहेत तिथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

ग्राम कोरोना प्रतिबंधक समितीशिक्षकांवर मोठीजबाबदारी

शाळा सुरु करण्यासाठी आता सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल, गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदि कामे केली जातील. गटागटाने पालक सभा घेऊन पालकांच्या मनातली भीती कमी करण्यात येईल. बाल रक्षक व शिक्षकांनी  शाळाबाह्य होण्याची शक्यता असलेल्या तसेच स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवायचे आहे, सरल प्रणाली अद्ययावत करणे व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक भरणे, ग्राम पंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडीओ  यांची व्यवस्था करणे जेणेकरून कुठलीच सोय नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी याची मदत होईल, गुगल क्लास रूम, वेबिनार डिजिटल प्रायोगिक तत्वावर सुरु करणे, ई शैक्षणिक साहित्य निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल ॲपचा उपयोग, शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देत राहणे अशा बाबींवर चर्चा झाली. 

रेडझोन मध्ये नसलेल्या ९, १०, १२ वी शाळा-कॉलेज जुलैपासून, ६ वी ते ८ वी ऑगस्ट पासून, वर्ग ३ री ते ५ वी ५ सप्टेंबरपासून, वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या  मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असे मुख्यमंत्री म्हणाले. 

केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्र्यांशी बोलणार

यावेळी बोलताना मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्राधान्याने दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग करून घेण्याची विनंती केली. माहिती व नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण यासंदर्भात लगेच बोलून ही माध्यमे देखील उपलब्ध करून घेतली जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पहिलीदुसरीसाठी ऑनलाईन नाही   

ऑनलाईनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. ३ ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली.      

कोकणातील वादळग्रस्त शाळांची प्राधान्याने दुरुस्ती

कोकणातील चक्रीवादळाचा तडाखा बसून ज्या शाळांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी २८ कोटीचा निधी मिळावा अशी मागणी शिक्षण विभागाने केली आहे. 

शिक्षकांची कोरोना ड्युटी रद्द करावी, पंचनामे लवकर व्हावे  शाळा निर्जंतुकीकरण खर्च १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून द्यावा, परजिल्ह्यांतून शिक्षकांना इतर जिल्ह्यांत प्रवासासाठी परवानगी मिळावी, सादिल अनुदान लवकर मिळावे, वेतनेतर अनुदान मान्यता व निधी, सफाई कामगार हवेत असे मुद्दे शिक्षण विभागाने आजच्या बैठकीत ठेवले. वर्गात कमी मुले बसविणे, व्हॉटसऍप ग्रुप्सवरून शिक्षकांनी मुलांचे शंका समाधान करणे, एक दिवसाआड शाळा, सम -विषम पर्याय अशा विविध पर्यायांचा विचार करून शिक्षण सुरु ठेवण्यात येईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहमंत्री अनिल देशमुख

0

टोल नाक्यावर सीसीटीव्ही लावा भिवापूर-उमरेड दरम्यान तपासणी नाका उभारा

नागपूर,: अवैध रेती वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या संयुक्त पथकामार्फत याबाबत कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. कारवाई करीत असताना केवळ दंड आकारुन न थांबता वाहन जप्त करावे, असे ते म्हणाले.

अवैध रेती वाहतुकीच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आमदार आशिष जैयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला व उपायुक्त महसूल सुधाकर तेलंग यावेळी उपस्थित होते.

नागपूर विभागात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीमूळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले की, अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर संयुक्तपणे कडक कारवाई करण्यात यावी. या प्रकरणी समाविष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी. भिवापूर ते उमरेड दरम्यान तसेच निलज फाटा या ठिकाणी तपासणी नाका उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व टोल नाक्यावर सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याद्वारे रेतीच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवावी असे ते म्हणाले. रेतीच्या ऑफसेट किंमतीबाबत धोरण ठरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

अवैध रेती वाहतुकीच्या तक्रारीत वाढ झाली असून महसूल व पोलीस विभागाने कडक पाऊले उचलावे, असे सांगून पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, रेतीबाबत तेलंगणा मॉडेलचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गौण खनिज नियंत्रण समिती प्रत्येक उपविभागात आहे. ही समिती सक्रिय होण्याची आवश्यकता असून तिच्या नियमित बैठका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील खापा, वडेगाव आणि सावंगी रेती घाटावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावावेत. तसेच निलज फाटा ते पवनी दरम्यान तपासणी नाका उभारावा, अशा सूचना डॉ. राऊत यांनी केल्या. 

भंडारा-निलज फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत असल्याची तक्रार करुन श्री. वडेट्टीवार यांनी निलज फाटा येथे तपासणी नाका उभारण्याची मागणी केली. रेतीची मागणी आणि पुरवठा याचा रेशो ठरविण्यात यावा, असे ते म्हणाले. रेती घाटाचा लिलाव करताना दरवर्षी उठाव होणाऱ्या रेतीचे नियोजन त्यात असावे, असे ते म्हणाले. रेती घाटावर सी.सी.टी.व्ही.  लावण्यासोबतच भरारी पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

शासनाने घरकुलासाठी पाच ब्रास रेती देण्याचा शासन आदेश 12 फेब्रवारी रोजी निर्गमित केला असून यानुसार रेती घाट आरक्षित ठेवून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार आशिष जैयस्वाल यांनी केली. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणीमधून निघणारी रेती शहरातील घरकुलास देण्यात येते. ही रेती संपूर्ण जिल्ह्यासाठी मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

नागपूर विभागात 1 जानेवारी 1919 ते 31 मार्च 2020 दरम्यान अवैध उत्खनन वाहतुकीच्या 2121 प्रकरणात 20 कोटी 52 लाखाचा दंड वसूल करण्यात आला. याप्रकरणी 177 गुन्हे दाखल करण्यात आले असून 102 व्यक्तींना अटक करण्यात आली. रेतीघाट लिलावासंबंधी भंडारा जिल्हा वगळता नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा जिल्ह्यात जनसुनावणी घेण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. भंडाऱ्यातील जनसुनावणी 14 जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत नागपूर विभागातील सर्व जिल्ह्याचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी, एम. जे. प्रदीप चंद्रन, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, गोंदियाच्या  जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे,  पोलीस  अधीक्षक  मंगेश  शिंदे, जिल्हाधिकारी, डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंघला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यासह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

तपासण्यांची संख्या वाढवा – शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

0

शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

अमरावती,: चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे कोरोनाचा रूग्ण आढळला.  या पार्श्वभूमीवर लक्षणे आढळणा-या व्यक्तींच्या तपासण्यांची संख्या वाढवावी व ग्रामीण रूग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा, असे आदेश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी चांदूर बाजार येथे नुकतेच दिले.

राज्यमंत्री श्री. कडू यांनी नुकतेच चांदूर बाजार तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बोरखडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. त्यात सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण रूग्णालयात वेगळा कक्ष उभारून मनुष्यबळ वाढवावे. आवश्यक मनुष्यबळ व साहित्याचा प्रस्ताव द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  यानिमित्त आरोग्य सुविधा व इतर कामांचाही आढावा त्यांनी घेतला.

वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवा

सध्या पेरणीचा हंगाम असल्याने कृषी केंद्रात जास्त भावाने बियाणे, खते विकण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नकली बियाण्यांचाही शिरकाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी केंद्रावर खरेदीसाठी जाणा-या नागरिकांत सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाने वेषांतर करून कृषी केंद्रांवर पाळत ठेवावी व वेळोवेळी तपासणी करावी. कुणीही दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी दिले.

बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख, दीपक भोंगाडे, ठाणेदार उदयसिंग साळुंके, सचिन परदेशी, नायब तहसीलदार अर्जुन वांदे, निलिमा मते, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, नारायण आमझरे, मुख्याधिकारी रवी पाटील, परिमल देशमुख, पूजा धर्माळे, राजेंद्र जाधव, डॉ. संध्या साळकर, डॉ. अमोल हरणे, डॉ. ज्योत्स्ना भगत आदी यावेळी उपस्थित होते.

गिरिजाशंकर विहार सोसायटीतर्फे पी एम व सी एम फंडास प्रत्येकी 25000 रुपयांची मदत.

0

कोरोनाच्या लढ्यात आर्थिक मदत देण्यासाठी सरसावलेले हजारो हात कोरोना योद्धाच – आ.चंद्रकांतदादा पाटील.

पुणे-कोरोनाच्या लढ्यात विविध प्रकारे नागरिक मदत करत आहेत,या लढ्यात आर्थिक मदत करणारे ही एक प्रकारे कोरोना योद्धाच असल्याचे प्रतिपादन भाजप चे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.प्रभाग १३ मधील गिरीजाशंकर विहार सोसायटीच्या वतीने चंद्रकांतदादांना पंतप्रधान निधीसाठी २५०००/ तर महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री निधीसाठी २५०००/ रुपये मदतनिधीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला,यावेळी नगरसेवक दीपक पोटे,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ,सारंग राडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
अनेक नागरिक मदतीसाठी पुढे येत आहेत आणि त्यामुळेच कोरोना विरुद्ध ची लढाई आपण लवकरच जिंकू असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
गिरीजाशंकर विहार सोसायटीचे संजय कबाडे (अध्यक्ष), रवींद्र गोखले (सचिव), आनंद शेलार (खजीनदार), काशीनाथ पटवेकर, अरुण दिघे (व्यवस्थापन समिती सदस्य) यांनी हे धनादेश सुपूर्द करताना आम्ही आमचे समाजाप्रतीचे कर्तव्य पूर्ण करत आहोत अशी भावना व्यक्त केली.

लोककलावंतांसाठी शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे – आ.चंद्रकांतदादा पाटील

0

शांताबाई फेम संजय लोंढे यांना मदतीचा हात

पुणे-राज्य सरकारने लोककलावंत आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ व कलाकार यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा व त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करावे असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.शांताबाई ह्या गाण्यामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले कलावंत संजय लोंढे यांना क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने सारंगशेठ राडकर व संदीप खर्डेकर यांनी चंद्रकांतदादां च्या हस्ते किराणा व अन्य मदत दिली त्याप्रसंगी त्यांनी हे मत व्यक्त केले.माझ्यासारख्या अनेक कलावंतांची परवड होत असून मी गणेशोत्सवासाठी काही गाणी शब्दबद्ध केली होती मात्र आता सर्व उत्सव रद्दबातल झाले आहेत व लॉकडॉउन मुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.अश्या परिस्थितीत संदीप खर्डेकर,सारंग राडकर व क्रिएटिव्ह फौंडेशनने केलेली मदत अमूल्य असल्याचे ही संजय लोंढे म्हणाले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही लोककलावंत व पडद्यामागील कलाकार तंत्रज्ञ यांना मदत देण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.

महापालिकेच्या १३४ किटला फुटले पाय … पोलिसांची चतुराई दोषींना नडणार ; सोडणार कि अडकवणार ?

0

पुणे- लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडलेल्या प्रतिबंधित झोन मधील गरिबांना घरपोच अन्न धान्याचे  किट वाटपात मोठ्या गमतीदार गोष्टी घडत आहेत . अशीच एक ,मजेदार गोष्ट सहकार नगर पद्मावती – परिसरात घडली . वाटपासाठी आलेले १३४ किट विणकर सोसायटीच्या सभागृहात ठेवले आणि चक्क त्यांना पाय फुटले … ते गायब झाले याबाबतची तक्रार पोलिसात जाताच तक्रार नोंदवून घेण्याआगोदर पोलिसांच्या कुशल तपासाच्या  चतुराईने  त्यांचा ठावठीकाणा जणू लागला आणि हे किट पुन्हा जागेवर येवून बसले . आता या कीट ची हि धावाधाव कोणामुळे झाली ,दोषी कोण ? या गोष्टींचा उलगडा देखील झाला असेल. पण पोलिसांची चतुराई दोषींना नडणार आणि सोडणार कि अडकवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

मात्र याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळालेली नाही .याबाबत अद्यापही पोलीस आणि महापालिका अधिकारी यांची भूमिका , त्यांच्याकडील अधिकृत माहिती मिळू शकली नाही.या प्रकरणाची हकीकत अशी कि ,  विणकर सभागृहात ठेवलेले १३४ कीट गायब झाल्याचे १२ जून ला केलेल्या पाहणीत समजले म्हणून  त्यानुसार महापालिकेच्या धनकवडी ,सहकारनगर क्षेत्रीय   कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी सहकारनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना १३ जूनला पत्र देवून गुन्हा नोंदविण्याची विनंती केली . पण  पत्र पोलिसांनी स्वीकारले नाही आणि गुन्हाही नोंदवून घेतला नाही म्हणून नितीन कदम या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कॉंग्रेसच्या अमित बागुल यांनीही आज या पत्राच्या फोटो कॉपिसह काही माध्यमांना विणकर सभागृहातून १३४ किट चोरीला गेल्याची माहिती दिली . याबाबत आवाज उठवायला सुरुवात केली .या प्रकरणी गुन्हा नोंदवा अशी मागणी करूनही पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नाहीत अशी तक्रार हि कदम यांनी केली .

आणि नंतर सोशल मिडीयावर ..हा चोर कोण .. असा ओरडा सुरु झाला . आणि कॉंग्रेस राष्टवादी च्या पदाधिकाऱ्यांनी हा ओरडा सुरु केल्याने साहजिक भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले . या दरम्यान ना पोलिसांनी, ना महापालिकेने माध्यमांना आपली भूमिका अगर माहिती देण्याची तसदी घेतली, ना फोन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीना प्रतिसाद दिला .मात्र तोवर सीसीटीव्ही फुटेज हि व्हायरल झाले.

व्हायरल सीसी टीव्ही फुटेज

एक तर महापालिका सहायक आयुक्तांचे पत्र आणि हे फुटेज या आधारावर मग साहजिक भाजपच्या नगरसेवक असलेल्या महेश वाबळे यांच्याकडे विचारणा केली असता ,त्यांनी सांगितले कि ,कीट चोरीला गेलेच नाहीत . विणकर सभागृहात किट होते, त्या जागेवरच आता आहेत . हे कीट महापालिकेच्याच एका अभियंत्याने विणकर सभागृहात अडचण होऊ लागल्याने सहकार नगर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या आंबेडकर क्रीडा संकुलात नेऊन ठेवले होते . मात्र त्याची कल्पना धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांना नव्हती .त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवा म्हणून पत्र पाठविले . पण ते पत्र तिथे पोहोचताच हे कीट महापालिकेच्याच मालकीच्या संकुलात ठेवल्याचे त्यांना तिथे समजले म्हणून त्यांनी ते पत्र तिथे दिले नाही . व त्या पत्राच्या फोटो कॉपीचा दुरुपयोग करून विरोधकांनी मात्र राजकारण सुरु केले .त्यामुळे वाद नको म्हणून पालिकेनेच आता ते सर्व कीट पुन्हा विणकर सभागृहात आणून ठेवलेले आहेत . यात विषय एवढाच आहेत कि हे कीट २४ मे पासून येथे आहेत ते वाटप करायला हवे होते ,ते एवढ्या दिवसात खराब झाले नसतील काय ? असा सवाल हि त्यांनी केला . आणि महापालिका अधिकाऱ्यांमधील असमन्वयाचा  फायदा घेवून कोणी राजकारण करू नये असे म्हटले आहे.  एकूणच या प्रकरणात विणकर सभागृहात १३४ किट  २४ मे पासून का ठेवले ? सहायक आयुक्तांनी १२ जूनला तिथे पाहणी केल्यावर ते तिथे नव्हते तर तत्क्षणी पोलिसात तक्रार दाखल का केली नाही ? १३ जूनला पत्र देवूनही पोलीसांनी तक्रार का दाखल करवून घेतली नाही याचे उत्तरे देणे अपेक्षित होते मात्र त्यांचा संपर्कच होऊ शकला नाही . पोलिसांनी हि जर सहायक आयुक्तांचे पत्र येताच गुन्हा दाखल का करून घेतला नाही . आणि गुन्हा दाखल करून   नंतर चौकशी करण्या अगोदरच या गायब झालेल्या कीट चा कसा छडा लावला ? मग त्यांना त्यात दोषी कोणी सापडले किंवा नाही ? नेमके या प्रकरणात काय घडले.. या बाबींची  माहिती स्पष्ट करणे अपेक्षित होते. मात्र या दोन्ही स्तरावरून या बाबी स्पष्ट न झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते.

अन्नधान्याचे १३४ कीट विणकर सभागृहातून गायब झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारे हेच ते महापालिका सहायक आयुक्त यांचे पत्र

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 4 हजार 965

0

पुणे विभागातील 9 हजार 552 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 15 हजार 198 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 14 :- पुणे विभागातील 9 हजार 552 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 965 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 262 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.85 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 11 हजार 877 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 457 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 931 आहे. कोरोनाबाधित एकूण 489 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 247 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.79 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 561 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 480, सातारा जिल्ह्यात 8, सोलापूर जिल्ह्यात 47, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 10 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 726 कोरोना बाधीत रुग्ण असून 499 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 196 आहे. कोरोनाबाधित एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 659 कोरोना बाधीत रुग्ण असून 866 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 647 आहे. कोरोना बाधित एकूण 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 216 कोरोना बाधीत रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 95 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 720 कोरोना बाधीत रुग्ण असून 616 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 96 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 17 हजार 920 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 13 हजार 628 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 292 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 98 हजार 178 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 15 हजार 198 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 14 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात

0

उद्या होणार १२ प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

मुंबई दि १४:  महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून 12 मोठ्या सामंजस्य करारांवर उद्या सोमवारी १५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या होणार आहेत. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई , उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचीही उपस्थिती राहील. या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका , चीन , दक्षिण कोरिया , सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली  असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे.

जागतिक स्तरावरील नामांकित उद्योजक, प्रमुख देशांचे राजदूत व देशातील मोहिमा आणि द्विपक्षीय गुंतवणूक संस्था यांच्यासमवेत संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या  उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सत्राचे आयोजन केले आहे. थेट परदेशी गुंतवणुकीसाठी शेर्पा म्हणून प्रधान सचिव  भूषण गगराणी, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी – डॉ. पी. अनबलगन हे देखील उपस्थित असणार आहेत.

कोरोना संसर्गाच्या विरोधात अवघे  विश्व लढा देत असताना जगभरातील उद्योग व व्यापार ठप्प झाले असल्याने जगाचं अर्थचक्र या गर्तेत अडकलेलं आहे त्याचा  राज्यावर देखील विपरित परिणाम झाला असला तरी या टाळेबंदीत महाराष्ट्रात साठ हजारपेक्षा अधिक उद्योग यशस्वीरित्या पुन्हा सुरू झाले असून त्यातून जवळपास १५ लाख  कामगार रुजू झालेले आहेत. 

या टाळेबंदीत राज्याला परकीय गुंतवणुकीची  संधी उपलब्ध झाली आहे, गुंतवणूक, निर्यात, स्पर्धा व व्ययसाय सुलभता या घटकांच्या आधारे राज्यातील उपलब्धतेमुळे दक्षिण पूर्व आशियामध्ये त्यांच्या पुरवठा साखळीत विविधता आणू पाहणाऱ्या उद्योगांनी उत्तम गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून प्राधान्य दिले आहे.

या विशेष संवाद कार्यक्रमात यूएसए, चायना, साऊथ कोरिया, सिंगापूर व भारतातील अनेक उद्योग समूह यांच्या दरम्यान मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून रोजगाराचाही प्रश्न सुटणार आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री इतर देशांचे राजदूत व जागतिक उद्योग संघटनांना संबोधित करणार आहेत यासह वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षरी होणार आहे. यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्या राज्यात परकीय गुंतवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल. 

या करारांमुळे  आपला मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात होईल. त्यात प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, ४० हजार एकराहून अधिक क्षेत्रफळाची लँडबँक, लवचिक भाड्याने आणि किंमतीची रचना, महापरवाना च्या माध्यमातून  ४८ तासात स्वयंचलित परवानग्या, विशेष कामगार संरक्षण मार्गदर्शन व स्थानिक कौशल्य यासाठी कामगार ब्युरो सारखे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत.

राज्यात ५३ हजार १७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.१४: राज्यात आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली आहे अशी  माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ५७ हजार ७३९ नमुन्यांपैकी  १ लाख ७ हजार  ९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख  ८७ हजार  ५९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ७७ हजार १८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:

ठाणे- ८० (मुंबई ६९, ठाणे ४, उल्हासनगर ५, पालघर १, वसई-विरार १), पुणे- १४ (पुणे ११, सोलापूर ३), नाशिक-१४ (नाशिक ३,जळगाव ११), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर -२ (उस्मानाबाद २), अकोला-२ (अकोला २).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८१ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ६६ रुग्ण आहेत तर ४० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १४ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ८० जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३९५० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८,जळगाव – ८, नाशिक -३, ठाणे -३, उल्हासनगर -३, रत्नागिरी -१ , पुणे १ मृत्यू असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५८,२२६), बरे झालेले रुग्ण- (२६,९८६), मृत्यू- (२१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,०५०)

ठाणे: बाधित रुग्ण- (१८,०८०), बरे झालेले रुग्ण- (६८७१), मृत्यू- (४३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,७७४)

पालघर: बाधित रुग्ण- (२३२६), बरे झालेले रुग्ण- (७१४), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६२)

रायगड: बाधित रुग्ण- (१८६८), बरे झालेले रुग्ण- (११६३), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३९)

नाशिक: बाधित रुग्ण- (१९३४), बरे झालेले रुग्ण- (११७८), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२३९), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

धुळे: बाधित रुग्ण- (३९३), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४३)

जळगाव: बाधित रुग्ण- (१७०२), बरे झालेले रुग्ण- (६६८), मृत्यू- (१३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)

पुणे: बाधित रुग्ण- (१२,१८४), बरे झालेले रुग्ण- (६७५०), मृत्यू- (४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९५४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१८२०), बरे झालेले रुग्ण- (६७६), मृत्यू- (१३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१३)

सातारा:  बाधित रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६९४), बरे झालेले रुग्ण- (५३२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५४)

सांगली: बाधित रुग्ण- (२२५), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (७८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३९२), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२६६८), बरे झालेले रुग्ण- (१४५५), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७८)

जालना: बाधित रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (१५९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२३९), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

परभणी: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

लातूर: बाधित रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४६), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

बीड: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

नांदेड: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण (१५१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)

अकोला: बाधित रुग्ण- (१०२१), बरे झालेले रुग्ण- (५६८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१०)

अमरावती: बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१८१), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

वाशिम: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

नागपूर: बाधित रुग्ण- (१०१३), बरे झालेले रुग्ण- (५९८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०३)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५)

भंडारा: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७०), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

एकूण: बाधित रुग्ण-(१,०,७९५८), बरे झालेले रुग्ण- (५०,९७८), मृत्यू- (३९५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टिव्ह रुग्ण-(५३,०१७)

(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १३५ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील१४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

डिप्रेशनवर उपचार घेत होता सुशांत

0

मुंबई. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुशांत काही दिवसांपासून नैराश्यावर उपचार करत होता असे काही रिपोर्ट्समध्ये समोर आलेसुशांत आत्महत्या केली त्यावेळी त्याचे मित्र देखील घरात होते. सकाळी मित्रांनी आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडला सुशांतचा मृतदेह आढळला. सुशांतच्या घरात काही कागदपत्रे देखील सापडली आहेत, ज्याद्वारे समजते की, तो नैराश्यावर उपचार करीत होता. काही निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, सुशांतचे एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध होते आणि सध्या या अफेयरमध्ये धुसफूस होती. सुशांत यामुळेही परेशान होता.

सुशांत सिंह राजपूत यांचं अचानक जाणं धक्कादायक! – उद्धव ठाकरे

0

ग्रुप डान्सर, टिव्ही अभिनेता ते बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अशी यशाची शिखरं गाठत कला क्षेत्रात य़शस्वी ठरलेला तरुण अभिनेता सुशातसिंह राजपूत याच्या अचानक निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त करताना हे धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून उद्धव ठाकरे म्हणतात, अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या अचानक निधनाची बातमी धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि जवळच्या व्यक्तींना बळ देवो.