Home Blog Page 2545

बालगृहातील बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घ्या- महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

0

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि आयजेएमच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार संपन्न

मुंबई,: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर एक वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीस आपण सामोरे जात आहोत. बालगृहांमध्ये मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची तसेच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन (आयजेएम)’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्रातील बालगृहे, बालनिरीक्षणगृहे यांच्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर बोलत होत्या.

लॉकडाऊनच्या काळात बालगृहांमध्ये करावयाची व्यवस्था तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना वेगळ्या पद्धतीने प्रमाणित कार्यप्रणालीचा अवलंब करावा लागेल. त्यानुसार विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. याकरिता तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे.  तसेच मुलांनादेखील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शिकविणे ही काळाची गरज आहे. बालगृहातील मुलांना आरोग्यविषयक सवयी तसेच स्वच्छते विषयक सवयी शिकविणे, मास्क वापरणे या सर्व उपाययोजनांचा वापर कोरोना  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आला पाहिजे. त्यादृष्टीने वेबिनारद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीचा उपयोग करण्याच्या सूचनाही महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिल्या.  

कोविड-१९ च्या अनुषंगाने बालगृहे/ बाल निरीक्षण गृहे/ बाल संरक्षण संस्थांमधील बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करून प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव श्रीमती सीमा व्यास यांनी सांगितले.

आयजेएमच्या संचालक श्रीमती मेलिसा यांनी लॉकडाउनच्या नंतरच्या काळात सर्वसमावेशक योजना तयार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. राज्यातील बाल  संरक्षण संस्था / बालगृहे यांनी आगामी आव्हानांवर एकत्रितरीत्या तोडगा काढला पाहिजे. काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके व विधी संघर्षग्रस्त बालके यांचे हितरक्षक म्हणून काम करताना अशा बालकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करणे व आताच्या कठीण काळात त्यांच्या सुरक्षिततेविषयी जागृत राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.

महिला व बाल विकास आयुक्त ऋषिकेश यशोद यांनी कोरोना परिस्थितीमध्ये बालकांना पुरेशा साधन सामुग्रीचा पुरवठा प्राधान्याने होण्याकरिता विभागामार्फत आधुनिक कार्यप्रणालीचा वापर करण्यात येईल असे म्हटले.

माहिती दिली की करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना १५ जूनच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केल्याचे  शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी यांनी सांगितले.  डिजिटल माध्यमांचा वापर करून, दीक्षा ॲप, दूरदर्शन, खाजगी वाहिन्या तसेच दुर्गम भागातील मुलांसाठी रेडिओ या माध्यमांचा वापर अध्यापनासाठी करण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. बालगृहातील बालकांच्या शिक्षणासाठी दूरदर्शन, टॅबलेट, गूगल क्लासरूम या डिजिटल माध्यमांच्या मदतीने शिक्षण देण्यासाठी महिला व बालविकास विभागाबरोबर कार्यप्रणाली निश्चित करता येईल असे ते म्हणाले.

आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी कोरोना विषाणूची उत्पत्ती, त्याचा प्रसार, विविध लक्षणे, निदान निश्चिती आदीविषयी माहिती दिली.

या प्रशिक्षण कार्यशाळेत राज्यातील महिला व बालविकास विभाग, बाल कल्याण समिती, बालगृहे / बाल निरीक्षण गृहे/ बाल संरक्षण संस्था, बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी व बालकांच्या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ असे सुमारे साडेपाचशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये विविध क्षेत्रातील वक्त्यांनी विषयाच्या अनुषंगाने मते मांडली.

प्रेरणा संस्थेच्या सहसंस्थापक व संचालक श्रीमती प्रीती पाटकर यांनी बालकांना बालगृहात प्रवेश देताना व बाहेर सोडताना घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर माहिती दिली. केईएम रुग्णालयाचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉक्टर हरीश पाठक यांनी बालगृहे, बालनिरीक्षणगृह, बाल संरक्षण संस्थांमधील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर, विलगीकरण आदी उपाययोजनांबाबत माहिती दिली. महिला व बाल विकास आयुक्तालयाचे उपायुक्त रवी पाटील यांनीही कायद्यातील तरतुदींची उपयुक्त माहिती दिली.

वन महोत्सव काळात सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करणार – वनमंत्री संजय राठोड

0

१५ जून ते ३० सप्टेंबर या काळात वन महोत्सव

मुंबई, : वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेचा सहभाग वाढावा ,वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी, जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे, या हेतूने राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर  2020 या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या वन महोत्सवाच्या काळात वनविभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येतील अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान

वनमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले,राज्यात सुरु असलेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यापुढेही चालू राहावा म्हणून ‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत खाजगी मालकीचे पडीत क्षेत्र आणि शेताच्या बांधावर, रेल्वे दुतर्फा ,कालवा दुतर्फा क्षेत्रात सामूहिक पडीत क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्वसाधारण कालावधीत 9 महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप) 15 रुपयांना तर 18 महिन्याचे रोप (मोठ्या पिशवीतील रोप) हे  75 रुपयांना  एक याप्रमाणे देण्यात येते. परंतु या वनमहोत्सवाच्या काळात 9 महिन्यांचे रोप केवळ 8 रुपयांना तर 18 महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप 40 रुपयांना एक याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

राज्यात वन महोत्सवाच्या काळात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांचा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेण्यात येणार आहे.ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे अशा यंत्रणांना रोपनिर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास त्यांना रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल .यासाठी त्यांनी, लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी लगतचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी,सामाजिक वनीकरण यांचेकडे पत्राद्वारे करावी. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनता ,शेतकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी घेऊन  वनेत्तर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ४८० गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक

0

मुंबई दि.- विविध समाजमाध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने कठोर पावले उचलली असून राज्यात सायबरसंदर्भात ४८०  गुन्हे दाखल झाले आहेत,  २५८ जणांना अटक करण्यात आली असून कोरोना महामारीला जातीय व धार्मिक रंग देऊन टिकटॉकवर व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करणाऱ्याविरुद्ध बीडच्या परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४८० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ एनसी आहेत) नोंद १५ जूनपर्यंत झाली आहे. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय  गुन्हे दाखल

 ■ व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – १९६ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २५ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया ( ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ५१ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत  २५८ आरोपींना अटक.

■  १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

सायबर भामट्यांपासून सावधान! – महाराष्ट्र सायबरचे आवाहन

0

मुंबई, : सध्याच्या काळात सायबर भामटे लोकांना फसविण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करीत असून त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

मोबाईलवर एक एसएमएस या भामट्यांकडून पाठविला जातो, त्यात तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले असून मेसेज मधील नंबरवर कॉल करून तुमची माहिती अपडेट करा, किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करून तुमची माहिती अपडेट करा. तुम्ही माहिती दिलीत तर त्याची खात्री करण्यासाठी येणारा ओटीपी पण मागितला जातो व तुमच्या खात्यामधील पैसे अनोळखी अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातात . या सर्व संभाषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे भामटे कधीही सर्व संभाषणात तुमच्या बँकेचे नाव घेत नाहीत . तुमचे कार्ड ब्लॉक केले आहे अशा स्वरूपाचे हे एसएमएस असतात.

अशा स्वरूपाच्या फसव्या एसएमएसपासून सावध राहा, त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा फोन करू नका असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.  कुठलीही बँक कोणत्याही खातेदाराची वैयक्तिक माहिती जसे कि सीव्हीव्ही क्रमांक ,पिन क्रमांक फोनवर विचारणार नाहीत,तसेच ओटीपी कन्फर्म करण्यासाठी कॉल करणार नाहीत . जर तुम्हाला असा फोन आला व पलिकडील व्यक्ती त्या संभाषणामध्ये तुमच्या बँकेचे नाव घेत नसेल तर तो फेक कॉल असण्याची शक्यता जास्त आहे .तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या  गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा आणि www.cybercrime.gov.in  या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करण्याचे आवाहन  महाराष्ट्र सायबरने केले आहे.

राज्यात कोळशाऐवजी या पुढे अपारंपारीक उर्जेला प्राधान्य : उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेतला निर्णय

0

मुंबई 16 जून :  राज्यात अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली .या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, दिनेश वाघमारे, प्रधान सचिव (ऊर्जा),सुभाष डुंबरे, महासंचालक महाऊर्जा व इतर संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोळशावर आधारीत वीज उत्पादनाऐवजी सौर वा तत्सम स्वरुपाच्या अपारंपारिक उर्जेला प्राधान्य देण्यात यावे यांसाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली व अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
राज्यात सहवीज निर्मितीचे 2000 मेगावाट क्षमतेचे प्रकल्प असून त्यात आणखी सुमारे 1000 मेगावाट भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून पवन वगळता अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा  क्षेत्रांना  प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्यात पारंपरिक कृषिपंप जोडणीचे हजारो अर्ज प्रलंबित असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करून दिलासा देण्यात येणार आहे. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीचे प्रलंबित अर्ज निकाली काढता येणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अनुदान अनुसूचित जाती-जमाती , विजा/भज,इमाव, मराठा इत्यादी कंपोनंट मधून करण्यात येणार आहे.
पारेषण विरहित सौर ऊर्जेवर आधारित शेती पूरक (व्यक्तीगत लाभार्थी) विविध योजनांचा या धोरणात समावेश करण्यात आला असूनशहरी घनकचऱ्या पासून वीज निर्मिती व बायो सीएनजी प्रकल्पांचा विकास यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.—————————–

महा-ई-सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र सामाजिक अंतर राखून सुरु करा – जिल्हाधिकारी

0

पुणे- जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) वगळून इतर क्षेत्रातील सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र सामाजिक अंतर राखून तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणीस बांधील राहून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
शासनाने कोरोना विषाणूचा ( कोव्हिड १९) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करण्यात आलेला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. व त्यातील पोटकलम २(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. राज्यातील कोव्हीड-१९ च्या नियंत्रणाखाली लॉकडाऊन दिनांक ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आला असून, विविध औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी राम यांनी
सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्रामध्ये घ्यावयाची खबरदारीबाबतही सूचना दिल्या आहेत.

१) सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्रातील सामग्री /उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे.

२) सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्रातील केंद्र चालक व इतर ऑपरेटर यांनी स्वच्छता विषयक सर्व निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. उदा. वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी.

३) सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्रामध्ये काम करताना ऑपरेटर नाक, तोंड, व डोळ्यांना स्पर्श होणार नाही, याची दक्षता घेतील.

४) सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्रातील ऑपरेटर व येणा-या नागरिकांनी पूर्णवेळ तोंडाला मास्क वापरावा. केवळ फोटो काढण्याच्या वेळेस मास्क काढण्यास परवानगी देण्यात यावी.

५) सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्रात येणा-या नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे.

६) सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र व्यवस्थापक टेबल/ ऑपरेटर स्थानकांदरम्यान शारीरीक अंतर (किमान ६ फूट ) सुनिश्चित करण्याचे आहे. जास्त गर्दी टाळण्यासाठी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्रामध्ये अपॉईंटमेंटशिवाय येण्याची नागरीकांना परवानगी दिली जाऊ नये.

७) नागरीकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह जेथे उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे.

८) नागरिकांना किंवा कर्मचा-यांना खोकला, ताप व कफ, श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादीसारखे लक्षणे आढळल्यास त्यांनी सेतू केंद्र, महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्रात न येण्याबाबत फलक लावावेत.

९) प्रत्येक सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, व आधार नोंदणी केंद्र युआयडीएआयने पुरविलेल्या टेम्पलेटनुसार नागरीकांसाठी पत्रक दर्शनी भागात लावावेत.

१०) सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, व आधार नोंदणी केंद्र ऑपरेटरनी कोव्हीड-१९ च्या Hotspot ला जाणे किंवा अशा भागातून प्रवास करण्यास सक्त मनाई राहील.

११) प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) यामधील गावे व भागात सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात येऊ नयेत.

१२) जिल्ह्यामध्ये सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र. व आधार नोंदणी केंद्रात शिबीरे घेऊ नयेत.

१३) सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र, व आधार नोंदणी केंद्रात येणा-या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करावे व त्याची दैनंदिन नोंद ठेवावी.

वरिल नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्था शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

कात्रज ते दांडेकर पूल २००० हजार पूरग्रस्तांना कुटुंबांना आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वाटप सुरु

0

अश्विनी कदम यांच्या पाठपुराव्यास आले यश ..!
लाॅकडाऊन च्या काळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झालेले असताना दहा हजार रुपये लाख मोलाचे.


पुणे- गेल्यावर्षी 25 सप्टेंबरला आलेल्या आंबील ओढ्याच्या पुरानंतर तेथील पूरग्रस्तांना उर्वरित दहा हजार रुपये मदतीचा चेक नागरिकांना शासनामार्फत वाटण्यास अखेर सुरुवात झालेली आहे.माझ्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन झाल्याचे नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी येथे सांगितले.
त्या म्हणाल्या ,’मध्यमवर्गीय चाळी किंवा झोपडपट्टी अशा स्वरूपाच्या घरे असणाऱ्या आंबील ओढ्या लगत राहणाऱ्या नागरिकांना या भयानक पुराचा फटका बसला होता. ज्यामध्ये काही जणांचे प्राण जाऊन जीवितहानी सह घरांचे व मालमत्तेचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले होते.
याबाबत मी सातत्याने पुणे महानगरपालिकेचे सभाग्रह, जिल्हाधिकारी, पुणे शहर तहसीलदार असतील यांच्याकडे या कामांसाठी पाठपुरावा करत होते त्याचाच भाग म्हणून या पूरग्रस्त नागरिकांना त्यांच्या हक्काचे पंधरा हजारा पैकी दहा हजार रक्कम शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून येणे बाकी होते. गेल्या दीड-दोन महिन्यापूर्वी मी हा मुद्दा घेऊन लेखी पत्रव्यवहारसह पुणे शहर तहसीलदार श्रीमती तृप्ती कोलतेमॅडम यांची भेट घेतली होती.त्यानंतर मी पूरग्रस्तांना विनंती केली होती आपले बँक अकाउंट डिटेल्स हे आपण संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावे. त्या प्रमाणे त्या सर्वांनी प्रतिसाद दिल्यामुळे आज सदर चे चेक तयार झाले असून शासनाच्यावतीने संबंधित कर्मचारी हे आपल्या घरोघरी, वस्तीमध्ये हे येऊन चेक वाटप करीत आहेत. जवळ जवळ 2000 कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे.

नियम मोडण्याची स्पर्धा ,कुणासाठी हे उद्योगावर उद्योग ? आबा बागुलांचा सवाल

रस्ते टीडीआर विषयावरून २ नेत्यांत वर्चस्ववादाची लढाई

पुणे-शहरातील अरुंद रस्ते नऊ मीटर करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या निर्णयाला राज्य शासनाने स्थगिती देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचबरोबर ६ मीटरच्या रस्त्यांवर टीडीआर अनुज्ञेय करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी येथे फोनोफोनी पोहोचली ,मान्यवर माध्यमांनी त्यास प्रसिद्धी दिली आणि एकच खळबळ उडाली एकीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा दणका मानला जात असून आता यानिमित्ताने महापालिका विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तविली जात असताना महापालिकेतील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तर नियम मोडण्याची हि स्पर्धा म्हणजे उद्योगपतींसाठी उद्योग असावेत अशी शंका निर्माण करणारे असल्याचेच म्हटले आहे . या सर्व पार्श्वभूमीवर भाजपनेते आ. चंद्रकांतदादा पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यातील हा सत्ता वर्चस्वाचा संघर्ष आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित होणार आहे.

या प्रकरणाची हकीकत अशी कि, शहरातील ३२३ अरुंद रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता.मात्र, ठराविक बांधकाम व्यावसायिकांनाच डोळ्यासमोर ठेवून हा प्रस्ताव आणला असल्याचा आरोप करत महापालिकेतील आणि पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी या प्रस्तावास विरोध दर्शविला होता. आणि हे ३२३ च का ? सर्वच ६ मीटर चे रस्ते ९ मीटर करा अशी मागणीही केली होती . त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत शहरांतील सर्वच ६ मीटर चे रस्ते अरुंद करण्याचा निर्णय घेतला .मात्र आयत्यावेळी त्याला पालिकेतील विरोधी पक्षांनी विरोध केला आणि भाजपने हा प्रस्ताव बहुमतावर मंजूर केला . मात्र, हा प्रस्ताव बेकायदेशीररित्या मंजूर केल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या पालिकेतील गटनेते आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी या प्रस्तावाला राज्य शासनाने स्थगिती देण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. याबाबत अजित पवार यांनी आज मंगळवारी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांबरोबर बैठक बोलाविली. महापालिकेतील विरोधी पक्षांचे गटनेते अरविंद शिंदे ,दिपाली धुमाळ ,वसंत मोरे,पृथ्वीराज सुतार आणि स्थानिक आमदार ,राज्यसभा सदस्य यास उपस्थित होते. त्यात महापालिकेला पाच पेक्षा अधिक रस्ते रुंद करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे स्थायी समितीत मंजूर झालेला ठराव बेकायदेशीर असल्याने त्यास स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे लेखी आदेश नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक आज सांयकाळीपर्यंत पालिकेला पाठविणार आहेत.अशी बातमी दुपारी फोनोफोनी तरी महापालिकेत माध्यम प्रतिनिधींपर्यंत पोहोचली होती याशिवाय भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा मीटर रस्त्यांवर टीडीआर वापरला, जी बंधने घातली होती. ती उठविण्याचा निर्णय घेतानाच सहा मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूना दिड मीटर जे साईट मार्जिन सोडावे लागत होते, त्यातही सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या सर्वावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी खेद व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले यांनी नियमबाह्य काम केले म्हणून आपणही नियमबाह्य काम करायचे असे करत शहराचे वाट्टोळे करायचे असाच हा प्रकार आहे. ६ मीटर रस्त्यांवर टीडीआर दिला तर शहराची अवस्था काय होईल याचा साधा विचार होत नसेल तर यापेक्षा कठीण काळ कुठला असेल. टीडीआरने नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहतील प्रत्यक्ष शहराचे आणि एकूणच महापालिका हद्दीतील वातावरण ,परिस्थिती ढासळून पडेल ,पर्यावरणवादी म्हणविणाऱ्यानि निश्चित याला विरोध केला असेल .पूर्वी तत्कालीन नगरविकासमंत्री यांनी डीसी रूल मध्ये बदल करवून ६ मीटर रस्त्यांवर टीडीआर देणे बंद केले . आता पुन्हा सुरु करायचे असेल तर महापालिकेला याबाबत एम आर टी पी ३७ नुसार आणि सरकारला देखील ३७ (१) कलमाद्वारे कार्यवाही करावी लागते . म्हणजेच महापालिकेला आराखडा करून जाहिरात देऊन सूचना हरकती मागवून राज्य सरकार कडे प्रस्ताव पाठवावा लागतो आणि सरकारलाही सूचना हरकती मागवून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊन हा बदल संमत करवून घ्यावा लागतो .पण इथे असे काही होताना दिसत नाही .आणि मुळात ६ मीटर च्या रस्त्यांवर टीडीआर दिला तर उंच इमारती उभ्या राहतील पण शहराचे वाहतूक विषयक , पाण्याचे , गर्दीचे कोलाहालाचे आणि पर्यावरणाची निश्चितच धूळधाण उडेल असे आबा बागुल यांनी म्हटले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 5 हजार 21

0

पुणे विभागातील 10 हजार 156 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 15 हजार 893 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 16 :- पुणे विभागातील 10 हजार 156 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 893 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 21 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 254 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.90 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 12 हजार 389 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 922 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 952 आहे. कोरोनाबाधित एकूण 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 254 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 330 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात242, सातारा जिल्ह्यात 7, सोलापूर जिल्ह्यात 65, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 745 कोरोना बाधीत रुग्ण असून 537 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 174 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 787 कोरोना बाधीत रुग्ण असून 942 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 693 आहे. कोरोना बाधित एकूण 152 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 247 रुग्ण असून 121 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 119 संख्या आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 725 रुग्ण असून 634 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 21 हजार 4 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 17 हजार 379 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 625 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 1 हजार 228 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 15 हजार 893 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 16 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

व्यथित झालेल्या अभिनेता सुनील पाल ने आज काय सांगितले

हर शक्स यहाँ अपने गम में खोया है,

जिसे गम नही ,वो कब्र में सोया है… मौत तो आनी है एक दिन, उसे अपनी मर्जी से आने दो..आप अपनी मर्जी से मत उसे गले लगाना…
अभिनेता सुशांतसिंग राजपूत च्या आत्महत्येनंतर ओक्सा बोक्सी रडलेल्या अभिनेता सुनील पाल ने आज पहा,ऐका नेमके काय सांगितले … ..

https://www.facebook.com/1501539223422053/posts/2641037222805575/

कोरोनाच्या ५० हजार ५५४ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. १५: राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात आज  पाच हजार ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ६९ हजार ९९४ नमुन्यांपैकी  १ लाख १० हजार  ७४४ नमुने पॉझिटिव्ह (१६.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८९ हजार  १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १७८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- १४३ (मुंबई ६८, वसई-विरार २०,मीरा-भाईंदर १३, नवी मुंबई १२, ठाणे १२, पनवेल ७,  कल्याण-डोंबिवली ९, पालघर १, रायगड १), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), नाशिक-१६ (धुळे १३,जळगाव ३), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-२ (जालना २).

आज नोंद झालेल्या १७८ मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ९१ रुग्ण आहेत तर ७४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ४१ जणांच्या इतर आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १३७ रुग्णांपैकी ९५ जणांमध्ये ( ६९.३४ टक्के)  मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४१२८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी २९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. पूर्वीच्या कालावधीतील १४९ मृत्यूंपैकी मुंबई ६३, वसई विरार – १९, मीरा भाईंदर – १२, नवी मुंबई -१२,  धुळे -१०, ठाणे -११ ,  पनवेल -७, कल्याण डोंबिवली – ८, जळगाव – २, जालना -२, पालघर – १,सोलापूर -१ आणि रायगड -१ मृत्यू असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहायॲक्टिव्हरुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५९,२९३), बरे झालेले रुग्ण- (३०,१२५), मृत्यू- (२२५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६,९१०)

ठाणे: बाधित रुग्ण- (१८,७३२), बरे झालेले रुग्ण- (७८९०), मृत्यू- (४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,३६१)

पालघर: बाधित रुग्ण- (२४७६), बरे झालेले रुग्ण- (७१४), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९१)

रायगड: बाधित रुग्ण- (१९३२), बरे झालेले रुग्ण- (१२४७), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६११)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (४३५), बरे झालेले रुग्ण- (२९०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३)

पुणे: बाधित रुग्ण- (१२,४१९), बरे झालेले रुग्ण- (७२७९), मृत्यू- (४९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६४६)

सातारा:  बाधित रुग्ण- (७५२), बरे झालेले रुग्ण- (४६१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६३)

सांगली: बाधित रुग्ण- (२४६), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७२९), बरे झालेले रुग्ण- (५३२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१८८९), बरे झालेले रुग्ण- (६९०), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०६६)

नाशिक: बाधित रुग्ण- (२००६), बरे झालेले रुग्ण- (१२१४), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२४६), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

जळगाव: बाधित रुग्ण- (१७८३), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

धुळे: बाधित रुग्ण- (४३३), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२७८६), बरे झालेले रुग्ण- (१५१६), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३५)

जालना: बाधित रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (१७१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१)

बीड: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

लातूर: बाधित रुग्ण- (१८१), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

परभणी: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

नांदेड: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण (१६१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

अमरावती: बाधित रुग्ण- (३५१), बरे झालेले रुग्ण- (२५८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

अकोला: बाधित रुग्ण- (१०२६), बरे झालेले रुग्ण- (५६८), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१५)

वाशिम: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१३७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

नागपूर: बाधित रुग्ण- (१०४६), बरे झालेले रुग्ण- (६२४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१०)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५)

भंडारा: बाधित रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९)

एकूण :बाधित रुग्ण-(१,१०,७४४),बरे झालेले रुग्ण- (५६,०४९),मृत्यू- (४१२८),इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टिव्ह रुग्ण-(५०,५५४)

(टीपआयसीएमआरपोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १४४ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.हीमाहिती केंद्रसरकारच्या आय.सी.एम.आर.पोर्टलवरमान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.प्रयोगशाळाअहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)       

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आय सी एम आर ) यांच्यावतीने मे २०२० मध्ये देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो-सर्व्हे करण्यात आला.  त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली  या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी  राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली असून या प्रकारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे.

राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे परंतू याचा दुसरा अर्थ राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने अद्याप प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसून कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेची स्वच्छता,  नेहमी स्पर्श होणा-या पृष्ठभागाची स्वच्छता या उपायांवर भर देणे आवश्यक आहे. येणा-या काळातही  प्रभावी सर्वेक्षण आणि काटेकोर कंटेनमेंट धोरण यावर भर देणे आवश्यक राहणार आहे.   

भाजपच्या कामाचे श्रेय अन्य पक्षांनी लाटण्याचा उद्योग सुरु केल्याचा रुपाली धाडवेंचा आरोप (व्हिडिओ)

0

पुणे- बिबवेवाडी धनकवडी पुनर्वसन प्रकल्पातील घरे हस्तांतराचा माझा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंजूर केल्याने याबाबत चे श्रेय माझे आणि भाजपचेच आहे ,असे असताना काही अन्य पक्षातील नगरसेवक या प्रकरणाचे श्रेय लाटण्यासाठी दिशाभूल करणारा प्रचार करीत असल्याचा आरोप आज भाजपच्या नगरसेविका रुपाली दिनेश धाडवे यांनी येथे केला. ज्याची पाठराखण महापौरांसह स्थायी समिती अध्यक्षांनी देखील केली असून मंजूर झालेला प्रस्ताव हा धाडवे यांनीच दिला होता , आणि जनहितासाठी च तो आम्ही मंजूर केला असल्याचे स्पष्ट केले आहे.

धाडवे यांनी असे म्हटले आहे कि , १९८५ मध्ये अस्तित्वात आलेल्या या पुनर्वसन प्रकल्पातील घरांचे हस्तांतरण २०१० पासून महापलिका प्रशासनाने थांबविले होते . त्यामुळे प्रत्यक्ष येथे राहणाऱ्या कुटुंबाना रहिवासी ,मालकीहक्क पुरावे सादर करताना अनेक शैक्षणिक व घरगुती कामासाठी अडचणी निर्माण होत होत्या . माजी नगरसेवक दिनेश धाडवे यांनी या साठी सातत्याने प्रयत्न केले होते . २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर याबाबत आपण प्रयत्न सुरु केले , आपण याबाबत प्रस्ताव दिला ज्यावर स्थायी समितीने प्रशासनाचा अभिप्राय मागवून मंजूर केला आहे. तथापि अन्य एका पक्षाच्या सभासदाने आपण प्रस्ताव दिल्याचे समजल्यानंतर तसाच प्रस्ताव २/३ दिवसानंतर दिला .आणि याच आधारे ते आपणच हे काम केल्याचा दावा करीत जनतेची दिशाभूल करीत आहेत .वास्तविक पाहता पालिकेचे दप्तर कोणीही तपासले तरी आपलाच प्रस्ताव मंजूर झाल्याचे स्पष्ट होईल . अन्य पक्षांच्या सभासदांनी आमचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये .

https://www.facebook.com/1501539223422053/posts/2640922429483721/

काय आहे हा प्रस्ताव

पुणे महापालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बलघटकातील लोकांसाठी १९८४ -८५ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली आहे. यातील घरांची हस्तांतरण प्रक्रिया १९९६ सालापासून सुरु झाली .ती मार्च २०१० पर्यंत सुरळीत सुरु होती. यामुळे त्यावेळी पालिकेला दरमहा ३० ते ४० लाखाचे उत्पन्न मिळत होते . हि हस्तांतरण प्रक्रिया बंद झाल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान तर झालेच पण नागरिकांना शैक्षणिक आणि शासकीय कामात लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे अशक्य होऊन बसले त्यामुळे हि हस्तांतरण प्रक्रिया योग्य शुल्क आकारून ,शासन निर्णयाच्या अधीन राहून पुन्हा सुरु करावी .असा हा प्रस्ताव आहे .ज्याच्या सूचक रुपाली धाडवे आहेत आणि अनुमोदक राजेंद्र शिळीमकर आहेत .

काय आहे आयुक्तांचा अभिप्राय

बिबवेवाडी धनकवडी येथील जागांवर पुण्यातील मुठा उजवा कालवा काठच्या झोपडपट्टीवासियांचे साठी पुनर्वसन योजना राबविली आहे .जनता वसाहत ,दांडेकर पूल, डायस प्लॉट ,आंबील ओढा ,पर्वती पायथा येथील वसाहतींमधील झोपडीधारकांचे येथे पुनर्वसन करण्यात आले होते. ज्यात ६३९० घरे आणि ४३४ व्यावसायिक दुकाने आहेत .येथील मंजूर ओटा स्कीम मध्ये केवळ तळमजला न राहता आता प्लस दोन अथवा ३ मजले झालेले आहेत .८० ते ८५ टक्के ओट्यांवर वाढीव अतिक्रमणे झाली आहेत.योजना राबविताना ९९ वर्षाच्या भाडेपट्ट्याने पुनर्वसन करण्यात आले आहे. वाटप केलेय गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण आणि काही जागांवरील कोर्ट स्थगिती ,महारष्ट्र बँकेचा कमी झालेला सहभाग अशा कारणांनी १९९३ मध्ये हि योजना आटोपती घेण्यात आली .१९९६ मध्ये महापालिकेने निवासी गाळ्यांसाठी १०हजर रुपये आणि व्यापारी गाळ्यांसाठी 15 हजार रुपये घेऊन हस्तांतरास मान्यता दिली .पुढे ती 15 हजार रुपये आणि ३० हजार्रुपये अशी वाढविण्यात आली. मात्र हे हस्तांतार्ण देखील २०१० मध्ये थांबविण्यात आले. भुईभाडे २००८ च्या वाटप नियमावलीनुसार बाजार भावानुसार आक्रणे,हस्तांतर शुल्क निवासी गाल्यास ७५ हजार रुपये आणि व्यापारी गाल्यास दीड लाख रुपये आकारणे ,जे वाढीव बांधकाम अनुज्ञेय होऊ शकते ते रीतसर तडजोड शुल्क आकारून नियामान्वित करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेच्या मान्यतेने शासनाकडे पाठविणे मिळकतकर आकारणी विभागाकडील धोरणानुसार आकारणी करणे अशा उपाय योजना आयुक्तांच्या अभिप्रायात सुचविण्यात आल्या आहेत.

आज एकाच दिवशी ५ हजार ७१ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. १५ : राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधिक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दि. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

आज सोडण्यात आलेल्या ५०७१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ४२४२ (आतापर्यंत एकूण ३९ हजार ९७६) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ५६८ (आतापर्यंत एकूण ८४३०), नाशिक मंडळात १०० (आतापर्यंत एकूण २३६५), औरंगाबाद मंडळ ७५ (आतापर्यंत एकूण १९४५), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १०३०), लातूर मंडळ ११ (आतापर्यंत एकूण ४४४), अकोला मंडळ २२ (आतापर्यंत एकूण १०४८), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण ८११) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 4 हजार 27-डॉ दीपक म्हैसेकर

0

पुणे विभागातील 9 हजार 778 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 15 हजार 563 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे:- पुणे विभागातील 9 हजार 778कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 हजार 563  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 83 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.83 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.51 टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 12  हजार 147 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 619 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 27  आहे. कोरोनाबाधित एकूण  501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 255 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.12 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 365 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 270, सातारा जिल्ह्यात 12 , सोलापूर जिल्ह्यात 63, सांगली जिल्ह्यात  20 तर कोल्हापूर  जिल्ह्यात 0 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील 738 कोरोना बाधीत रुग्ण असून 508 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण 196 संख्या  आहे. कोरोनाबाधित एकूण 34  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 1 हजार 722 कोरोना बाधीत रुग्ण असून 911 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 659 आहे. कोरोना बाधित एकूण 152  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील 236 कोरोना बाधीत रुग्ण असून 117  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण 112 संख्या  आहे. कोरोना बाधित एकूण  7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील 720 कोरोना बाधीत रुग्ण असून 623 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 89 आहे. कोरोना बाधित एकूण  8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 18 हजार 411 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1  लाख 15 हजार 842  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  2 हजार 569 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 27  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  15 हजार 563  नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.    

( टिप :- दि. 15 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 च्या कामकाजाची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केली पाहणी

0

पुणे : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 च्या ‘कंट्रोल रुम’ ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना मिळत असलेल्या सेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोविड आणि इतर रुग्णांना तात्काळ उपचाराच्या दृष्टीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आणखी गतीने सेवा मिळावी यासाठी डॉ. म्हैसेकर यांनी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्याशी चर्चा करुन त्यांना यावेळी सूचना केल्या.
यावेळी ‘यशदा’च्या उपमहासंचालक नयना गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके, व्यवस्थापक डॉ. प्रवीण साधले आदी उपस्थित होते.
108 कंट्रोल रूममधून होणाऱ्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन कंट्रोल रूमच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातून दुरध्वनी आल्यानंतर किती वेळात रुग्ण रुग्णालयात पोहचतो, डॅशबोर्ड प्रमाणे बेड उपलब्धता, रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचकरेपर्यंत उपचारपध्दती, रुग्णउपचार नोंद, कोविड रुग्ण व इतर रुग्ण याबाबतची घ्यावयाची दक्षता, रुग्णवाहिका सॅनिटायझेशन आदी सुविधाची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी घेतली.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीस 108 च्या माध्यमातून पुणे विभागात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून झालेल्या सेवेचे जिल्हानिहाय विश्लेषण देण्याच्या सूचना करून डॉ. म्हैसेकर म्हणाले, रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोच करेपर्यंत रुग्णवाहिकेत केल्या जाणा-या उपचाराची घेतलेली नोंद संबंधित हॉस्पिटलला तातडीने दिली तर उपचारासाठी उपयुक्त ठरेल. शहरी व ग्रामीण भागात रुग्णाला लागणारा कालावधी तसेच व्हॅटीलेटर उपलब्धता आदींची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी 108 रुग्णवाहिका व्यवस्थापन, कॉल येताच दिला जाणारा प्रतिसाद, लोकेशेने ट्रेसिंग, रुग्णांचे रेकॉर्ड, रुग्णवाहिकेतील उपचार तसेच इतर सुविधांची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच 96 टक्के रुग्णवाहिका या ऑनरोड असतात, रुग्णवाहिकेबाबत 24 तासानंतर रुग्णांचा प्रतिसाद घेण्यात येत असून शाळा व समाजामध्ये 108 रुग्णवाहिकेबाबत जनजागृती केली जात असल्याचेळी त्यांनी यावेळी सांगितले.