Home Blog Page 2544

रिचर्डसन क्रूडास कोविड केअर सेंटरची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून पाहणी

0

मुंबई,- मुंबईतील भायखळा येथील रिचर्डसन क्रूडास कंपनीच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या कोविड  केअर सेंटरला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

बृहन्मुंबई  महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये एक हजार रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आली आहे. या कोविड  सेंटरचे दोन भाग  करण्यात आले असून पहिल्या सेंटरमध्ये डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये 300 रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आयसीयूची गरज नसणारे रुग्ण येथे उपचार घेऊ शकतात.

दुसऱ्या सेंटरमध्ये कोणतीही लक्षणे नसणाऱ्या सातशे रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आलेली आहे. हे केअर सेंटर लवकरच कार्यरत करण्यात येणार आहे.  यावेळी आमदार अमीन पटेल, जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेंद्र गुजर यांनी या केअर सेंटरमधील सुविधा आणि कार्यपद्धतीची माहिती दिली.

मराठी चित्रपटसृष्टीतही विशिष्ट लॉबी करते मानसिक खच्चीकरणाची कारस्थाने- महेश टिळेकर

0

मुंबई-अभिनेता सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्या प्रकरणाने एकूणच सिनेसृष्टीतील लॉबी, खच्चीकरण कारस्थानांचा विषय ऐरणीवर आला आहे,मराठी चित्रपट सृष्टीतील पड़द्यामागचे राजकारण असे शीर्षक देऊन मराठी निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही आपल्या अनुभवातून दिसलेले वास्तव आज सोशल मिडियातून कथन केले आहे, पण अशा लोकांना आपण पुरुन उरलो ,टिकलो आणि चांगली कामगिरी करून दाखविली असे त्यांनी स्पष्ट केले आहे . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे .. त्यांच्याच शब्दात..

https://www.facebook.com/1501539223422053/posts/2641885902720707/

भारत-चीन चकमक:20 भारतीय जवान शहीद,43 चीनी सैनिक मारले.

0

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री झालेल्या भीषण चकमकीनंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये चीनला लागून असलेल्या भारतीय सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. गलवान खोऱ्यातील या चकमकीमध्ये कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. चीनच्या बाजूलाही जिवीतहानी झाली आहे.

भारताने इंटरसेप्ट केलेल्या मेसेजनुसार त्यांचे ४३ सैनिक ठार तसेच गंभीर झाले आहेत. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सीमावर्ती भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांनी सर्व गुप्तचर यंत्रणांना सक्रिय केले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

लाहौल, स्पिती आणि किनौर जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील चीनसीमेवर गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तणाव सुरू होता.गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने आले होते. तणावाची स्थिती निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चाही सुरू होती.परंतु, त्या चर्चेनंतरच हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. देशाची अखंडता आणि राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य ठामपणे कटिबद्ध आहे, असं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलंय. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार चीनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडल्यामुळं हा प्रकार घडला आहे. समुद्र सपाटीपासून उंचावर असलेल्या या भूभागात शून्यापेक्षा खाली तापमान असताना ही चकमक घडली आहे.

आज कोरोनाच्या २७०१ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.१६: राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज  १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५७ हजार ८५१ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७०१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ४४ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ८४ हजार २६८  नमुन्यांपैकी  १ लाख १३ हजार  ४४५  नमुने पॉझिटिव्ह (१६.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८६ हजार  ८६८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ८१ मृत्यू झाले आहेत. याशिवाय आज मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत आहे. त्यात जिल्हानिहाय आकडेवारी अशी: अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड ११, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६. राज्याचा मृत्यूदर ४.८ झाला आहे.

आज नोंद झालेल्या ८१ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा (५५), कल्याण-डोंबिवली मनपा (२), भिवंडी-निजामपूर मनपा (२), मीरा-भाईंदर मनपा (११), अहमदनगर (२), पुणे (१), पुणे मनपा (७), पिंपरी चिंचवड मनपा (१).

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (६०,२२८), बरे झालेले रुग्ण- (३१,०४१), मृत्यू- (३१६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव रुग्ण- (२६,०१२)

ठाणे: बाधित रुग्ण- (१९,३२८), बरे झालेले रुग्ण- (८३६३), मृत्यू- (६४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१०,३२३)

पालघर: बाधित रुग्ण- (२५९३), बरे झालेले रुग्ण- (७९७), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१७१४)

रायगड: बाधित रुग्ण- (१९७२), बरे झालेले रुग्ण- (१३०७), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (५७७)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (४४५), बरे झालेले रुग्ण- (३००), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६२)

पुणे: बाधित रुग्ण- (१२,८८८), बरे झालेले रुग्ण- (७२९३), मृत्यू- (५८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५००७)

सातारा:  बाधित रुग्ण- (७६०), बरे झालेले रुग्ण- (४७३), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२५३)

सांगली: बाधित रुग्ण- (२५५), बरे झालेले रुग्ण- (१४४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१००)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७३३), बरे झालेले रुग्ण- (५३२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१९५५), बरे झालेले रुग्ण- (६९२), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०७९)

नाशिक: बाधित रुग्ण- (२१०१), बरे झालेले रुग्ण- (१२१८), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७५१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (१७९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५७)

जळगाव: बाधित रुग्ण- (१८८१), बरे झालेले रुग्ण- (७९८), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९१४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३५)

धुळे: बाधित रुग्ण- (४४८), बरे झालेले रुग्ण- (२५४), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१४२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२८५७), बरे झालेले रुग्ण- (१५७३), मृत्यू- (१६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१११६)

जालना: बाधित रुग्ण- (२९५), बरे झालेले रुग्ण- (१८१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०२)

बीड: बाधित रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (२४)

लातूर: बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५६)

परभणी: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४६)

नांदेड: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण (१६१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१५१), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०)

अमरावती: बाधित रुग्ण- (३६५), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७९)

अकोला: बाधित रुग्ण- (१०५०), बरे झालेले रुग्ण- (५६९), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (४२४)

वाशिम: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१३८), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४७)

नागपूर: बाधित रुग्ण- (१११०), बरे झालेले रुग्ण- (६३१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४६७)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५)

भंडारा: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (९३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७३)

एकूण: बाधित रुग्ण-(१,१३,४४५), बरे झालेले रुग्ण- (५७,८५१), मृत्यू- (५५३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टिव रुग्ण-(५०,००४)

(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १४४ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)      

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची केंद्रीय पथकाने घेतली माहिती

0

अलिबाग, दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची आणि झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे  केंद्रीय पथकाला दिली.

यावेळी केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना सूचना दिल्या की, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबतची संख्यात्मक माहिती देताना छोट्या छोट्या गोष्टींचीही बारकाईने नोंद घेण्यात यावी. कृषी विभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण या संबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची बारकाईने नोंद घेऊन त्याप्रमाणे अहवाल तयार करावा, या अहवालाचा अभ्यास करून हे पथक पुन्हा एकदा जिल्ह्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळाच्या या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली, संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले, त्यात बऱ्याच अंशी यश मिळाले आहे, गरजूंना अत्यंत तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत केंद्रीय पथकात केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकातील सदस्य सहसचिव (प्रशासन व सीबीटी) रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर.बी.कौल, संचालक, उर्जा मंत्रालयाचे एल.आर.एल.के.प्रसाद, ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव एस.एस.मोदी, कृषी मंत्रालयाचे आर.पी.सिंग आदींचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अधिसंख्य पदावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा व निवृत्तीविषयक बाबींच्या अभ्यासासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट

0

जात प्रमाणपत्र आणि अनुसूचित जमाती अवैध प्रमाणपत्रच्या आधारे सेवेत अधिसंख्य पदावरील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या सेवा आणि निवृत्तीविषयक लाभाबाबतचे प्रकरण

मुंबई, : मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र.8928/2015 व इतर याचिका यामध्ये दि.6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत रुजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचा दि.21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेतला आहे. अधिसंख्य पदावर नेमणूक दिल्यानंतर त्यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवाविषयक आणि सेवानिवृत्ती विषयक लाभांबाबत सविस्तर अभ्यास करुन शासनास शिफारशी करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे. याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

समितीच्या अध्यक्षपदी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ असतील तर अभ्यास गटामध्ये सदस्य म्हणून आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी.पाडवी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे मंत्री असतील. तर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव हे सदस्य सचिव आहेत. तसेच प्रधान सचिव, विधी व न्याय आणि अपर मुख्य सचिव, वित्त हे आमंत्रित सदस्य असतील. त्याचप्रमाणे इतर प्रशासकीय विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना आवश्यकतेनुसार अभ्यास गटाच्या बैठकींना आमंत्रित करण्यात येणार आहे. 

हा अभ्यास गट दि.21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-1 (अ) ते (इ) मधील कर्मचाऱ्यांपैकी केवळ दि.17 ऑक्टोबर 2001 रोजी अथवा त्यापुर्वी सेवेत नियुक्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदांवर दर्शविण्यात येणे अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा देखील अधिसंख्य पदांवर दर्शविण्यात येणे त्याचप्रमाणेअधिसंख्य पदांवर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदावर त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत चालू ठेवाव्यात किंवा कसे ? तसेच अधिसंख्य पदांवर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना, पदोन्नती, वार्षिक वेतनवाढ, सेवानिवृत्ती वेतन, कुटुंब सेवानिवृत्ती वेतन, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती यासारखे व इतर सेवाविषयक लाभ देण्यात यावेत किंवा कसे ? त्याचबरोबर जे अधिकारी, कर्मचारी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करताच शासन सेवेतून नियत वयोमानुसार अथवा स्वेच्छा निवृत्तीने सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अथवा अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ असतील, अशा सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना, मृत्यू पावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांचे सेवानिवृत्ती विषयक सर्व अनुज्ञेय लाभ अनुज्ञेय करावेत किंवा कसे याबाबत अभ्यास गटाने, आपल्या शिफारशी तीन महिन्यात शासनास सादर कराव्यात, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

0

सहा जिल्ह्यात झालेल्या सिरो सर्व्हेचा निष्कर्ष

मुंबई,: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ( आयसीएमआर ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचा निष्कर्ष या सर्व्हेत आढळून आहे.

राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिकारशक्ती निर्माण करणे, कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी शारीरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेची स्वच्छता, नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागाची स्वच्छता या उपायांवर भर देणे आवश्यक असून प्रभावी सर्वेक्षण आणि काटेकोर कंटेनमेंट धोरण यावर अधिक भर देण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली. त्याद्वारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा (ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली, राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्था, चेन्नई आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र, चेन्नई या संस्थांनी तांत्रिक सहकार्य केले.

 या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांचा तपशील असा:

बीड – (एकूण घेतलेले नमुने: ३९६, त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: ४,पॉझिटिव्ह प्रमाण: १.०१)

परभणी – (एकूण घेतलेले नमुने: ३९६, त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: ६,पॉझिटिव्ह प्रमाण: १.५१)

नांदेड – (एकूण घेतलेले नमुने: ३९३, त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: ५, पॉझिटिव्ह प्रमाण: १.२७)

सांगली – (एकूण घेतलेले नमुने:४००, त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: ५, पॉझिटिव्ह प्रमाण: १.२५)

अहमदनगर – (एकूण घेतलेले नमुने:४०४,त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने:५, पॉझिटिव्ह प्रमाण: १.२३)

जळगाव – (एकूण घेतलेले नमुने: ३९६, त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: २, पॉझिटिव्ह प्रमाण: ०.५)

एकूण : (एकूण नमुने: २३८५, त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: २७, पॉझिटिव्ह प्रमाण: १.१३)

उदय सामंत यांची पुण्यातील शिक्षण संस्थांबरोबर ऑनलाईन बैठक

0

पुणे- पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी,  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,  शिक्षण प्रसारक मंडळी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था या चार नामवंत शिक्षण संस्थांची आज महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर  ऑनलाइन बैठक पार पडली. 
कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांना भेडसावणारे ज्वलंत प्रश्न सामंत यांच्यासमोर मांडण्यात आले.  डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी ऑनलाइन शिक्षण  देण्यासाठी तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी  होऊ घातलेल्या प्रचंड वाढीव खर्चाविषयी सामंत यांना अवगत केले.  
शिक्षण प्रसारक मंडळीचे  अध्यक्ष ऍड. एस. के. जैन यांनी शिक्षण संस्थांची सरकारकडे थकीत असलेली शिष्यवृत्तीची रक्कम लवकरात लवकर मिळावी  अशी भूमिका मांडली. त्याच प्रमाणे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षण संस्थांना सरकारने आधार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी अभ्यासक्रमांची प्रलंबित असलेली  परवानगी तसेच अनुदानित  महाविद्यालयांमध्ये प्रलंबित असलेली  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करावी  अशी भूमिका मांडली.  
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजन  गोऱ्हे यांनी किमान या वर्षी  केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया न राबवता संस्थांना  थेट प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी सरकारने द्यावी,  विज बिल आणि मिळकत करात संपूर्ण  सूट द्यावी तसेच जीएसटी दरामध्ये कपात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.  
माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आवर्जून वेळ काढून या चर्चेला अत्यंत सकारात्मक  प्रतिसाद दिला. वर उल्लेख केलेल्या  सर्व मुद्द्यांची त्यांनी काळजीपूर्वक नोंद घेतली आणि  आठवडाभरात पुन्हा एकदा अशाच ऑनलाईन बैठकीचे आश्वासन दिले. 
डेक्कन एज्युकेशन  सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीराम नेर्लेकर यांनी माननीय मंत्र्यांचे स्वागत केले आणि संस्थेचे  कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

एसटीच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ – परिवहनमंत्री अनिल परब

0

मुंबई, : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे,  ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे,अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी.

दि.२२ मार्च २०२० पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परिणामस्वरूप २२ मार्चपूर्वी एसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रेमासिक पास काढले होते परंतू एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगारप्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री श्री. परब यांनी संगितले.

वंदेभारत अभियान ७८ विमानातून १२ हजार ९७४ प्रवासी मुंबईत दाखल

0

१ जुलै पर्यंत आणखी ८० विमानांनी येणार प्रवासी

मुंबई,: वंदेभारत अभियानांतर्गत 78 विमानांनी 12974 प्रवासी विविध देशातून मुंबईत दाखल झाले. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 4841 इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4119  इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4014 इतकी आहे. 1 जुलै, 2020 पर्यंत आणखी 80 विमानांनी मुंबईत प्रवासी येणे अपेक्षित आहे.

आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विड, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो या देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत कॉरंटाईन केले जात आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते व त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

बालगृहातील बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घ्या- महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

0

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि आयजेएमच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार संपन्न

मुंबई,: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर एक वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीस आपण सामोरे जात आहोत. बालगृहांमध्ये मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची तसेच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन (आयजेएम)’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्रातील बालगृहे, बालनिरीक्षणगृहे यांच्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर बोलत होत्या.

लॉकडाऊनच्या काळात बालगृहांमध्ये करावयाची व्यवस्था तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना वेगळ्या पद्धतीने प्रमाणित कार्यप्रणालीचा अवलंब करावा लागेल. त्यानुसार विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. याकरिता तंत्रज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे.  तसेच मुलांनादेखील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शिकविणे ही काळाची गरज आहे. बालगृहातील मुलांना आरोग्यविषयक सवयी तसेच स्वच्छते विषयक सवयी शिकविणे, मास्क वापरणे या सर्व उपाययोजनांचा वापर कोरोना  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आला पाहिजे. त्यादृष्टीने वेबिनारद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीचा उपयोग करण्याच्या सूचनाही महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिल्या.  

कोविड-१९ च्या अनुषंगाने बालगृहे/ बाल निरीक्षण गृहे/ बाल संरक्षण संस्थांमधील बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करून प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव श्रीमती सीमा व्यास यांनी सांगितले.

आयजेएमच्या संचालक श्रीमती मेलिसा यांनी लॉकडाउनच्या नंतरच्या काळात सर्वसमावेशक योजना तयार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. राज्यातील बाल  संरक्षण संस्था / बालगृहे यांनी आगामी आव्हानांवर एकत्रितरीत्या तोडगा काढला पाहिजे. काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके व विधी संघर्षग्रस्त बालके यांचे हितरक्षक म्हणून काम करताना अशा बालकांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करणे व आताच्या कठीण काळात त्यांच्या सुरक्षिततेविषयी जागृत राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.

महिला व बाल विकास आयुक्त ऋषिकेश यशोद यांनी कोरोना परिस्थितीमध्ये बालकांना पुरेशा साधन सामुग्रीचा पुरवठा प्राधान्याने होण्याकरिता विभागामार्फत आधुनिक कार्यप्रणालीचा वापर करण्यात येईल असे म्हटले.

माहिती दिली की करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना १५ जूनच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केल्याचे  शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी यांनी सांगितले.  डिजिटल माध्यमांचा वापर करून, दीक्षा ॲप, दूरदर्शन, खाजगी वाहिन्या तसेच दुर्गम भागातील मुलांसाठी रेडिओ या माध्यमांचा वापर अध्यापनासाठी करण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. बालगृहातील बालकांच्या शिक्षणासाठी दूरदर्शन, टॅबलेट, गूगल क्लासरूम या डिजिटल माध्यमांच्या मदतीने शिक्षण देण्यासाठी महिला व बालविकास विभागाबरोबर कार्यप्रणाली निश्चित करता येईल असे ते म्हणाले.

आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी कोरोना विषाणूची उत्पत्ती, त्याचा प्रसार, विविध लक्षणे, निदान निश्चिती आदीविषयी माहिती दिली.

या प्रशिक्षण कार्यशाळेत राज्यातील महिला व बालविकास विभाग, बाल कल्याण समिती, बालगृहे / बाल निरीक्षण गृहे/ बाल संरक्षण संस्था, बालकल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी व बालकांच्या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ असे सुमारे साडेपाचशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये विविध क्षेत्रातील वक्त्यांनी विषयाच्या अनुषंगाने मते मांडली.

प्रेरणा संस्थेच्या सहसंस्थापक व संचालक श्रीमती प्रीती पाटकर यांनी बालकांना बालगृहात प्रवेश देताना व बाहेर सोडताना घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर माहिती दिली. केईएम रुग्णालयाचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉक्टर हरीश पाठक यांनी बालगृहे, बालनिरीक्षणगृह, बाल संरक्षण संस्थांमधील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर, विलगीकरण आदी उपाययोजनांबाबत माहिती दिली. महिला व बाल विकास आयुक्तालयाचे उपायुक्त रवी पाटील यांनीही कायद्यातील तरतुदींची उपयुक्त माहिती दिली.

वन महोत्सव काळात सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करणार – वनमंत्री संजय राठोड

0

१५ जून ते ३० सप्टेंबर या काळात वन महोत्सव

मुंबई, : वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेचा सहभाग वाढावा ,वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी, जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे, या हेतूने राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर  2020 या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या वन महोत्सवाच्या काळात वनविभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येतील अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान

वनमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले,राज्यात सुरु असलेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यापुढेही चालू राहावा म्हणून ‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत खाजगी मालकीचे पडीत क्षेत्र आणि शेताच्या बांधावर, रेल्वे दुतर्फा ,कालवा दुतर्फा क्षेत्रात सामूहिक पडीत क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्वसाधारण कालावधीत 9 महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप) 15 रुपयांना तर 18 महिन्याचे रोप (मोठ्या पिशवीतील रोप) हे  75 रुपयांना  एक याप्रमाणे देण्यात येते. परंतु या वनमहोत्सवाच्या काळात 9 महिन्यांचे रोप केवळ 8 रुपयांना तर 18 महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप 40 रुपयांना एक याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

राज्यात वन महोत्सवाच्या काळात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांचा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेण्यात येणार आहे.ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे अशा यंत्रणांना रोपनिर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास त्यांना रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल .यासाठी त्यांनी, लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी लगतचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी,सामाजिक वनीकरण यांचेकडे पत्राद्वारे करावी. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनता ,शेतकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी घेऊन  वनेत्तर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

लॉकडाऊन काळात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ४८० गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक

0

मुंबई दि.- विविध समाजमाध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने कठोर पावले उचलली असून राज्यात सायबरसंदर्भात ४८०  गुन्हे दाखल झाले आहेत,  २५८ जणांना अटक करण्यात आली असून कोरोना महामारीला जातीय व धार्मिक रंग देऊन टिकटॉकवर व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करणाऱ्याविरुद्ध बीडच्या परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४८० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ एनसी आहेत) नोंद १५ जूनपर्यंत झाली आहे. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय  गुन्हे दाखल

 ■ व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – १९६ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २५ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया ( ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ५१ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत  २५८ आरोपींना अटक.

■  १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

सायबर भामट्यांपासून सावधान! – महाराष्ट्र सायबरचे आवाहन

0

मुंबई, : सध्याच्या काळात सायबर भामटे लोकांना फसविण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करीत असून त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

मोबाईलवर एक एसएमएस या भामट्यांकडून पाठविला जातो, त्यात तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले असून मेसेज मधील नंबरवर कॉल करून तुमची माहिती अपडेट करा, किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करून तुमची माहिती अपडेट करा. तुम्ही माहिती दिलीत तर त्याची खात्री करण्यासाठी येणारा ओटीपी पण मागितला जातो व तुमच्या खात्यामधील पैसे अनोळखी अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातात . या सर्व संभाषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे भामटे कधीही सर्व संभाषणात तुमच्या बँकेचे नाव घेत नाहीत . तुमचे कार्ड ब्लॉक केले आहे अशा स्वरूपाचे हे एसएमएस असतात.

अशा स्वरूपाच्या फसव्या एसएमएसपासून सावध राहा, त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा फोन करू नका असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.  कुठलीही बँक कोणत्याही खातेदाराची वैयक्तिक माहिती जसे कि सीव्हीव्ही क्रमांक ,पिन क्रमांक फोनवर विचारणार नाहीत,तसेच ओटीपी कन्फर्म करण्यासाठी कॉल करणार नाहीत . जर तुम्हाला असा फोन आला व पलिकडील व्यक्ती त्या संभाषणामध्ये तुमच्या बँकेचे नाव घेत नसेल तर तो फेक कॉल असण्याची शक्यता जास्त आहे .तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या  गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा आणि www.cybercrime.gov.in  या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करण्याचे आवाहन  महाराष्ट्र सायबरने केले आहे.

राज्यात कोळशाऐवजी या पुढे अपारंपारीक उर्जेला प्राधान्य : उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेतला निर्णय

0

मुंबई 16 जून :  राज्यात अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली .या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, दिनेश वाघमारे, प्रधान सचिव (ऊर्जा),सुभाष डुंबरे, महासंचालक महाऊर्जा व इतर संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोळशावर आधारीत वीज उत्पादनाऐवजी सौर वा तत्सम स्वरुपाच्या अपारंपारिक उर्जेला प्राधान्य देण्यात यावे यांसाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली व अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
राज्यात सहवीज निर्मितीचे 2000 मेगावाट क्षमतेचे प्रकल्प असून त्यात आणखी सुमारे 1000 मेगावाट भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून पवन वगळता अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा  क्षेत्रांना  प्राधान्य देण्यात येणार आहे.
राज्यात पारंपरिक कृषिपंप जोडणीचे हजारो अर्ज प्रलंबित असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करून दिलासा देण्यात येणार आहे. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीचे प्रलंबित अर्ज निकाली काढता येणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अनुदान अनुसूचित जाती-जमाती , विजा/भज,इमाव, मराठा इत्यादी कंपोनंट मधून करण्यात येणार आहे.
पारेषण विरहित सौर ऊर्जेवर आधारित शेती पूरक (व्यक्तीगत लाभार्थी) विविध योजनांचा या धोरणात समावेश करण्यात आला असूनशहरी घनकचऱ्या पासून वीज निर्मिती व बायो सीएनजी प्रकल्पांचा विकास यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.—————————–