Home Blog Page 2542

रेडलाईट भागात युक्रांदचा मदतीचा हात

0

पुणे :
 कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संकटांच्या काळात पुण्यातील रेड लाईट भागातील महिलांना युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी शहर सचिव सुदर्शन चखाले यांच्या मार्गदर्शना खाली ५०० रेशन कीट आणि  जीवनोपयोगी साहित्याची मदत केली.  
 या भागातील स्थानिकांचे जगण्या मरण्याचे प्रश्न भयंकर आहेत. लॉकडाऊन असल्याने या लोकांचे अन्नधान्याच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत.उपासमारीचे दिवस या महिलांवर आलेले आहेत.त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

 या महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रेशन कीट युक्रांद संघटनेने उपलब्ध करून दिले. हे किट त्यांनी जॉन पॉल फौंडेशन या स्थानिक संस्थेच्या माध्यमातून या भागातील महिलांपर्यंत पोहचवले.तर जॉनपॉल या संस्थाने या भागात रक्तदाब ,मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधे पुरवली  असंही चखाले यांनी सांगितले . 

या कामात संदीप बर्वे, कार्यवाह, युक्रांद, जाबवंत मनोहर ,राज्यसंघटक, युक्रांद, नागेश गायकवाड आणि जॉन पॉल  फौंडेशन  संस्थेच्या धनश्री जगताप याचं मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले

२५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प-डॉ.नितीन राऊत

0

नागपूर १८ जून :  राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर  ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी  योग्य जागा शोधण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे विद्युत भवन नागपूर येथून व्ही.सी.द्वारे आयोजित बैठकीत दिल्या.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी महानिर्मिती आणि महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांशी संवाद  साधताना पुढे सांगितले कि, एनटीपीसीने हा वीज प्रकल्प तयार करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. महानिर्मितीने प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा शोध घेऊन याचा सविस्तर अहवाल सादर करावा.
राज्याला हरित ऊर्जेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण महापारेषण आणि वीज नियामक आयोग यांनी समन्वयातून  एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.  सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, घन कचऱ्यापासून वीज निर्मिती यासारख्या हरित ऊर्जा प्रकल्पाकडे सर्वानी गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
सौर आणि पवन ऊर्जेचा संयुक्त प्रकल्प होऊ शकतो काय यावर देखील वीज क्षेत्रातील तज्ज्ञानी विचार करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील १६ मेगावॅटच्या सौर ऊर्जा  प्रकल्पाची माहिती त्यांनी यावेळी घेतली. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्यात असून लवकरच यातून वीजनिर्मिती सुरु होईल अशी माहिती महानिर्मितीतर्फे  डॉ. राऊत यांना देण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला. या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित झाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्याना दिल्या.
या बैठकीस प्रधान सचिव(ऊर्जा) दिनेश वाघमारे, महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालिका शैला ए, महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) थंगपांडियन , हाय पॉवर कमिटीचे अनिल नगरारे, मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, राजकुमार तासकर, मिलिंद नातू, राजेश पाटील, नागपूर प्रभारी प्रादेशिक संचालक महावितरण सुहास रंगारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

भिंतीवर “वॅाल पेंटिग”काढून कोरोना योद्ध्यांचा गौरव.”

0

पुणे,- कोरोनासारख्या जागतिक महामारीने संपुर्ण जग संकटात असताना या संकटाचा सामना करण्यासाठी काही ठराविक क्षेत्रातील कोरोना योध्दे लढत आहेत. त्यांच्यामूळेच आपण सर्वजण निश्चिंत आहोत. मात्र, अशा या कोरोना योध्यांचा गौरव करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. हिच संकल्पना डोक्यात ठेऊन नगरसेवक सुभाष जगताप यांनी कोरोना योध्यांचे वॅाल पेंटिग काढून त्यांचा गौरव केला आहे. निलेश आर्टिस्ट यांनी हे अतिशय सुंदर आणि आकर्षक वॅाल पेंटिग साकारले आहे. शिंदे हायस्कुल, सहकारनगर येथील चौकात कोरोना योध्दा असणारी वॅाल पेंटिग करण्यात आली आहे. या वॅाल पेंटिग मध्ये डॉक्टर्स, पोलिस, जवान,शेतकरी, नर्स, पत्रकार व साफसफाई कामगार यांचा समावेश आहे. तसेच त्या पेटिंग मध्ये ‘मी’ म्हणून व्यक्तीचे ही चित्र काढण्यात आले आहे. इतर कोरोना योद्ध्यांसमवेत स्वतःचा ही कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला आहे. डॉक्टर्स, पोलिस, जवान, शेतकरी, नर्स, पत्रकार व साफसफाई कामगार हे कोरोनाच्या संकटाच्या काळात सुध्दा आपआपल्या ठिकाणी उपस्थित राहून सेवा करित होते. त्यामूळे या सर्व योध्दांचा गौरव या वॅाल पेटिंगच्या माध्यमातून करण्यात आला आहे.याविषयी बोलताना नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले, “जगावर कोरोनाचं संकट असताना ही डॉक्टर्स, पोलिस, जवान, शेतकरी, नर्स, पत्रकार व साफसफाई कामगार हे आपल्यासाठी मुठीत जीव घेऊन काम करित होते. म्हणून त्यांचा गौरव केला पाहिजे या उद्देशाने हे वॅाल पेंटिग साकारण्यात आले आहे. समाजातील प्रत्येकाने कोरोना योध्दांचा गौरव केला पाहिजे. तरच, त्यांना काम करण्याचे समाधान लाभेल आणि प्रेरणा मिळेल. या सर्वांविषयी आपण सहानुभूवती व प्रेमाची भावना जागविली पाहिजे.असे जगताप म्हणाले

रेल्वे चिनी कंपनीला दिलेलं ५०० कोटींचं कंत्राट रद्द

भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे आणि चीनच्या हेकेखोरीला उत्तर देण्यासाठी आता केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. चीनला आर्थिक दणका देण्याच्या उद्देशाने सरकारने योजना तयार केली आहे. त्यानुसारच भारतीय रेल्वेशी संबंधित कंत्राटे चिनी कंपन्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यापूर्वी चिनी कंपन्यांना मिळालेल्या कंत्राटांवरही याचा परिणाम होण्याची चिन्ह दिसत आहेत.  टेलिकम्युनिकेशन्श क्षेत्राशी संबंधित सरकारच्या मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएललाही नवीन प्रणाली बसवताना चिनी सामान न वापरण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.

देशाच्या पूर्वेकडील काही भागांमध्ये रेल्वेची कामं ज्या चीन रेल्वे सिग्नल अ‍ॅण्ड कम्युनिकेशन कॉर्पोरेशनला (सीआरएससी) देण्यात आली आहेत त्यासंबंधितील करार रद्द करण्याची सहमती देण्यात आली आहे. २०१६ साली सीआरएससीला हे कंत्राट देण्यात आलं होतं. या कंत्राटानुसार ४०० किमी रेल्वे मार्गांवरील सिग्नल यंत्रणा बसवणे आणि देखभाल करण्याचे काम ही चिनी कंपनी करणार होती. भारतीय रेल्वेच्या या महत्वकांशी प्रकल्पामध्ये सीआरएससी ही एकमेव चिनी कंपनी होती. या प्रकल्पामाधील इतर सर्व कंपन्या या भारतीयच आहेत.सीआरएससीला देण्यात आलेलं हे कंत्राट ५०० कोटींचे होते. यामध्ये यंत्रणेची रचना करणारे, पुरवठा, बांधकाम, टेस्टींग यासारख्या गोष्टींचा समावेश होता. बहुलपूर-मुगलसराई रेल्वे मार्गासाठी हे कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र आता हे कंत्राट रद्द करण्यात येणार आहे.या प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन लिमिटेडने (डीएफसीसीआयएल) याआधीच जागतिक बँकेकडे या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य करण्यासंदर्भात पत्र व्यवहार सुरु केला आहे. या प्रकल्पावर या चिनी कंपनीकडून होणारे कामही अत्यंत संथ गतीने सुरु होते. अधिकारीही या कामावर समाधानी नव्हते. त्याचबरोबर कामासंदर्भातही काही तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळेच कंपनीला या प्रकल्पामधून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्यासंबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

Oppo Find X2 फोन भारतात लाँच इव्हेंट रद्द

चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या भारतातील लाँचिंगसाठी आयोजित केलेला लाइव्ह इव्हेंट रद्द केला. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे कंपनीने नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँच न करता केवळ एक 20 मिनिटांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन Oppo Find X2 फोन भारतात लाँच केल्याची घोषणा केली. लाइव्ह लाँचिंगऐवजी केवळ व्हिडिओ का अपलोड करण्यात आला याबाबत वृत्तसंस्था Reuters ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यावर ओप्पोकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

Oppo Find X2 स्मार्टफोन गुरुवारी संध्याकाळी लाँच केला जाणार होता. कंपनीकडून हा डिव्हाइस संध्याकाळी 4 वाजता एका ऑनलाइन ओन्ली इव्हेंटमध्ये लाँच केला जाणार होता. या कार्यक्रमाची लाइव्ह स्ट्रीमिंग YouTube वर होणार होती. पण ही YouTube लिंक नंतर गायब झाली आणि लाइव्ह लाँचिंग रद्द झालं. लाइव्ह लाँचिंगऐवजी कंपनीने 20 मिनिटांचा एक प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन फोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध झाल्याची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये भारतात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओप्पोने कशाप्रकारे मदत केली हे दखील कंपनीने दाखवले.

“राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी ट्रम्प यांनी मागितली चीनची मदत “

0

न्यूयॉर्क : करोना या जागतिक महामारीवरून मागील काही दिवसांपासून अमेरिकेने चीनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनविरोधान वातावरण निर्माण झाल्यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या पुस्तकातून छपाईपूर्वीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोल्टन यांनी आपल्या या पुस्तकातून चीन आणि अमेरिकेच्या संबंधांविषयी गौप्यस्फोट केला आहे. तसेच अमेरिकेत २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी ट्रम्प यांनी चीनकडे मदत मागितल्याचाही दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरच गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही नामांकित इंग्रजी वर्तमानपत्रात बोल्टन यांच्या पुस्तकातील काही भाग प्रकाशित करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये जपानच्या ओसोका येथे जी -२० शिखर परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. तसेच चीनची आर्थिक क्षमता कशाप्रकारे अमेरिकेतील निवडणूक प्रचारावर प्रभाव टाकू शकते, यावर त्याच्यात चर्चा झाली. तसेच जिनपिंग यांच्याकडे ट्रम्प यांनी निवडणूक जिंकवण्याचे आवाहनही केल्याचा दावा बोल्टन यांनी केला आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेतील शेतकर्‍यांचे महत्त्वावर चर्चेदरम्यान जोर दिला आणि चीनने सोयाबीन आणि गहू खरेदी केल्याने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो, यावरही भाष्य केले. ट्रम्प यांनी चीनबरोबर व्यापार युद्ध संपविण्याची आणि पश्चिम चीनमधील उइगर मुस्लिमांसाठी शिबिर सुरू करण्याची ऑफर दिली होती, असा दावा बोल्टन यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

दुसरीकडे बुधवारी अमेरिकेने चीनमधील उइगर मुस्लिमांविरूद्ध चीनविरोधात कारवाई करणारे विधेयक मंजूर केले. त्याअंतर्गत त्यांच्या देखरेख ठेवणाऱ्या आणि त्यांना नजरकैद केंद्रात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. चीनविरोधात उचलण्यात आलेले हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ हे हवाईमध्ये चीनच्या अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी गेले असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सीमेवर तणाव वाढल्यास भारताला चीन व्यतिरिक्त पाकिस्तान आणि नेपाळच्या सैन्यदलांचा दबाव सहन करावा लागेल

0

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने पाकिस्तान आणि नेपाळ चीनसोबत असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला

बीजिंग. गलवान खोऱ्यात लष्करांच्या चकमकीनंतर चीनने पुन्हा एकदा एका सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. चिनी सरकारचे मुखपत्र माउथपीस ग्लोबल टाइम्सनुसार, एलएसीवर तनाव वाढला तर भारताला चीन व्यतिरिक्त पाकिस्तान आणि नेपाळ सेनेचा दबाव सहन करावा लागेल. याचा अर्थ भारत-चीन सीमेवर बिघडलेल्या परिस्थितीत पाकिस्तान आणि नेपाळ चीनला पाठिंबा देऊ शकतात.

सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांत झडप झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. दरम्यान चीनचे 43 सैनिक मारले गेले किंवा जखमी झाल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

मानसिक दबाव निर्माण करण्याचे षड्यंत्र

ग्लोबल टाईम्स हे चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे. त्यातील लेख चीन सरकारच्या मतानुसार असतात. हे वृत्तपत्र अनेक दिवसांपासून भारताला धमकावणारे लेख प्रकाशित करत आहे. वृत्तपत्राने शांघाय अकॅडमी ऑफ सोशल सायन्सच्या संशोधक फेल हू झियोंग यांचा एक लेख प्रसिद्ध केला आहे. यामध्ये झियोंगने म्हटले की, “सध्या भारताचा चीन व्यतिरिक्त पाकिस्तान आणि नेपाळसोबत सीमा वाद सुरू आहे. पाकिस्तान आणि चीनचे जवळचे संबंध आहेत. नेपाळही आमची सहयोगी आहे. दोन्ही देश चीनच्या वन बेल्ट रोड प्रकल्पाचा भाग आहेत.”

भारताकडे इतकी सैन्य ताकद नाही

झियोंग पुढे म्हणतात, ” भारताने सीमेवर तणाव वाढवल्यास तीन मोर्चांवर लष्करी दबावाचा सामना करावा लागेल. या दबावाला सामोरे जाण्याची ताकद भारताच्या सैन्याकडे नाही. भारताचा दारुण पराभव होऊ शकतो.” झियोंगनुसार, चीन एलएसी बदलू इच्छित नाही. गलवान खोऱ्यात जे काही घडले त्याला भारतीय सैन्यच जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला. कारण, भारतीय सैन्यानेच चिनी सैनिकांना चिथावले होते.

भारताने चौकशी करावी

लेखात पुढे म्हटले की, “गलवान खोऱ्यासारख्या घटना भविष्यात पुन्हा घडणार नाहीत हे भारताने ठरवायला हवे. भारत सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. जबाबदार लोकांना कठोर शिक्षा द्यावी.” या वृत्तपत्राने चीनमधील लष्करी तज्ञाचे एक विधानही प्रसिद्ध केले आहे. परंतु त्यांचे नाव सांगितले नाही. या विधानानुसार, चीनने आपल्या मृत किंवा जखमी झालेल्या सैनिकांची संख्या किंवा नाव यासाठी प्रसिद्ध केले नाही कारण यामुळे तणाव आणखी वाढू शकतो.

 15 जूनला चिनी राष्ट्राध्यक्षांना वाढदिवसाची भेट देण्यासाठी चिनी लष्कराची  नीच कुरापत 

गलवान खोऱ्यात १५ जून रोजी जेव्हा चिनी सैनिक विश्वासघातकीपणे भारतीय सैनिकांना घेरून कौर्य करत होते, तेव्हा चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वाढदिवसाचा समारंभ सुरू होता. पीएलएचे हे कृत्य म्हणजे जिनपिंग यांच्या वाढदिवसाची भेट असल्याचे भारतीय लष्करी सूत्र सांगताहेत. शहिदांच्या शरीरावरील जखमा याचा पुरावा आहेत. २० शहिदांपैकी १६ जणांच्या शरीरावर काठ्या आणि दगडाचे वार यांच्या खोलवर जखमा आहेत. चार जवानांचा मृत्यू शिखरावरून पडल्याने झाला. मात्र त्यांना धक्का दिला की या झटापटीत ते वरून पडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुमारे १५ हजार फूट उंचीवर हा हिंसाचार जेथे झाला तेथे खूपच कमी जागा आहे. ज्या सीमा चौकीवर आक्षेप नोंदवण्यासाठी कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. संतोष गेले होते. तेथे चिंचोळी वाट खाली जाते. तेथून चिनी सैनिक या चौकीतून तंबू परत नेताना दिसले होते. मात्र, कर्नल संतोष यांची तुकडी पोहोचल्यानंतर पीएलएने पवित्रा बदलला आणि त्यांना घरून मारण्यास सुरुवात केली. सूत्रांनुसार, मंगळ‌वारी हेलिकॉप्टरने चिन्यांनी जखमी सैनिकांना बाहेर काढले. येथून ४६ स्ट्रेचर जाताना दिसले. मात्र, यापैकी किती जखमी आणि किती मृतदेह होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चिनी कुरापतीच्या विरोधात बुधवारी देशभर संताप उसळला. माजी लष्करी अधिकाऱ्यांनी चिनी दूतावासासमोर निदर्शने केली. गलवान खोऱ्यात शहीद जवानांना बुधवारी लेहच्या लष्करी रुग्णालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. येथून पार्थिव मूळ गावी नेण्यात आले.

खोटारडेपणा : चिनी परराष्ट्रमंत्री म्हणाले, चकमक चीनच्या हद्दीत

चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी १५ जूनच्या घटनेबद्दल म्हटले आहे की, “दोन्ही सैनिकांत जेथे चकमक झाली तो भाग चीनच्या नियंत्रणात आहे. भारतीय लष्कर एलएसी ओलांडून तेथे पोहाचले.’ मात्र, चीनचा खोटारडेपणा १६ जूनच्या सॅटेलाइट इमेजमधून दिसला. १६ जूनला सायंकाळच्या या छायाचित्रात चिनी सैनिक भारतीय हद्दीत दिसत आहेत. म्हणजे घटनेच्या दुसऱ्या दिवशीही घुसखोर तेथेच होते.

भारत-चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची फोनवर चर्चा, पुढे तणाव वाढू नये या मुद्द्यावर एकमत :

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली. हा तणाव वाढवणारी कारवाई करण्याऐवजी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्न करण्यावर दोघांत एकमत झाले. जयशंकर यांनी या वेळी गलवान खोऱ्यातील घटनेबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, तणाव कमी करण्यासाठी ६ जूनला लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत जवान हटवण्यावर एकमत झाले होते. मात्र, चिनी सैनिक भारतीय हद्दीत तंबू उभारण्यासाठी हट्टाला पेटले होते. यावरून वाद झाला.

उद्याने बंद करण्याची महापौरांनी काय सांगितली कारणे

0

पुण्यातील उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्याची ५ प्रमुख कारणे

१) ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असते. उद्यानातील लहान मुलांची खेळण्याची साधने अथवा ज्येष्ठ नागरिकांची व्यायामाची साधने लोखंडी असल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो.

२) मास्क घालून व्यायाम करू नये, असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे उद्यानात मास्क घालून व्यायाम करणे फायद्याचे ठरणार नाही.

३) उद्याने सुरू झाल्यानंतर, आज कोरोना कामासाठी लावलेली उद्यान विभागाची यंत्रणा काढून सुरक्षारक्षक, माळी काम करणारे इ. परत उद्यानात कामाला आणावे लागेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण वाढेल.

४) उद्यान सुरू झाल्यानंतर भेळ, पाणीपुरी इ. हातगाड्या बाहेर लागतील, त्यामुळे अतिक्रमण खात्यातील मनुष्यबळ जे कोरोनासाठी लावलेल्या यंत्रणेवर ताण पडेल.

५) अत्यावश्यक गरज नसताना उद्यान चालू करणे म्हणजे संसर्गाला आमंत्रण देणे, रोगाचा प्रसार वाढणे. त्यामुळे त्याचा फार मोठा तोटा होवू शकतो. तसेच कोरोना यंत्रणेत मनुष्यबळ आधीच कमी आहे, आणि त्यामुळे यंत्रणेवर ताण वाढेल.

त्यामुळे उद्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या फिरण्यासाठी टेकडी, मैदाने खुले आहेत, त्यामुळे उद्यान सुरू करण्याचा निर्णय समाजाच्या हिताचा नाही, भविष्य काळात त्याचा विचार करू.

मुरलीधर मोहोळ,
महापौर, पुणे

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी

0

पुणे _महापालिकेच्या माध्यमातून साकारत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेची आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली जागा, तूर्त उपलब्ध असलेली जागा, कर्मचारी निवासाचे स्थलांतर आणि अतिक्रमण अशा विविध मुद्द्यांवर प्रत्यक्ष पाहणी करुन चर्चा केली. कमीत कमी कालावधीत सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करुन वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील असून सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवणार आहे.

यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्य प्रमुख
डॉ. रामचंद्र हंकारे, उपायुक्त राजेंद्र मुठे,विजय दहिभाते, अविनाश सकंपाळ, सुनिल इंदलकर, माधव जगताप शिवाजी लंके,अंजली साबणे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय सल्लागार कंपनी अधिकारी व अनेक मनपा अधिकारी उपस्थित होते.

आज कोरोनाच्या ३३०७ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.१७: राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात आज  १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५९ हजार १६६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३३०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण ९८ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ९५४  नमुन्यांपैकी  १ लाख १६ हजार  ७५२  नमुने पॉझिटिव्ह (१६.६५ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८२ हजार  ६९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ११४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७८ (मुंबई ७७, मीरा भाईंदर १), नाशिक- ११(जळगाव ७, नंदूरबार २, मालेगाव २), पुणे- २२ (पुणे ३, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड १), लातूर-२ (लातूर २), अकोला-१ (यवतमाळ १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८८ पुरुष तर २६ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७६ रुग्ण आहेत तर ३० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या ११४ रुग्णांपैकी ८४ जणांमध्ये (७३.७ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५६५१ झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६१,५८७), बरे झालेले रुग्ण- (३१,३३८), मृत्यू- (३२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६,९९७)

ठाणे: बाधित रुग्ण- (२०,१६७), बरे झालेले रुग्ण- (८५९१), मृत्यू- (६४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,९३३)

पालघर: बाधित रुग्ण- (२६९१), बरे झालेले रुग्ण- (९२२), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८७)

रायगड: बाधित रुग्ण- (२०६७), बरे झालेले रुग्ण- (१३२०), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५९)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (४५९), बरे झालेले रुग्ण- (३०७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५८), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

पुणे: बाधित रुग्ण- (१३,२५०), बरे झालेले रुग्ण- (७४१०), मृत्यू- (६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२३०)

सातारा:  बाधित रुग्ण- (७८३), बरे झालेले रुग्ण- (४९१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७)

सांगली: बाधित रुग्ण- (२६७), बरे झालेले रुग्ण- (१४४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (६१५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१९९०), बरे झालेले रुग्ण- (७०२), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११०४)

नाशिक: बाधित रुग्ण- (२१८८), बरे झालेले रुग्ण- (१३१४), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

जळगाव: बाधित रुग्ण- (१९३६), बरे झालेले रुग्ण- (८८०), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

धुळे: बाधित रुग्ण- (४६४), बरे झालेले रुग्ण- (२७७), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२९६०), बरे झालेले रुग्ण- (१६५४), मृत्यू- (१६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३८)

जालना: बाधित रुग्ण- (३१४), बरे झालेले रुग्ण- (१९४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८)

बीड: बाधित रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

लातूर: बाधित रुग्ण- (१९८), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

परभणी: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२४३), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

नांदेड: बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण (१६४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (१२३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

अमरावती: बाधित रुग्ण- (३८५), बरे झालेले रुग्ण- (२६८), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०)

अकोला: बाधित रुग्ण- (१०९९), बरे झालेले रुग्ण- (६३४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८)

वाशिम: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२०५), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

नागपूर: बाधित रुग्ण- (११२९), बरे झालेले रुग्ण- (६४७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७०)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५)

भंडारा: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१००), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५०), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८)

एकूण: बाधित रुग्ण-(१,१६,७५२), बरे झालेले रुग्ण- (५९,१६६), मृत्यू- (५६५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टिव्ह रुग्ण-(५१,९२१)

(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १५८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )     

28 कोटींची निविदा कुणाच्या मान्यतेने काढली – विशाल तांबे यांचा आयुक्तांना सवाल(व्हिडीओ)

0

पुणे-अतिक्रमण विभागाकरिता मजूर पुरविणे ही 6 कोटींची तरतूद असताना 28 कोटींची निविदा फक्त 5 वर्षांकरिता कुठल्या प्रशासकीय मान्यतेच्या आधारे प्रसिद्ध करण्यास मान्यता दिली ?, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी उपस्थित केला आहे.

तीन वर्षांकरिताच निविदा काढायची अट असून, 20 टक्केच तरतूद उपलब्ध आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात यावी, अशी तांबे यांनी मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.मागील काही काळात नवीन अंदाजपत्रकीय वर्षात उत्पन्न वाढीच्या शीर्षकाखाली काही विषयांना मान्यता देण्यात आली.त्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहरातील 6 मीटर रुंदीचे 200 रस्ते, 800 कि. मी. लांबीचे रस्ते 9 मीटर रुंद करण्याकरिता मान्यता दिली. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसुली उत्पन्न मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते.नुकत्याच मान्यता दिलेल्या पुनर्वसन प्रकल्पातील निवासी व व्यावसायिक गळ्यांचे हस्तांतरण सुरू करणे यामधून 250 कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असा दावा केलेला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रकाच्या सुरुवातीला टप्प्यात उत्पन्नाची साधने उपलब्ध असताना 60 ते 70 टक्के अंदाजपत्रकाला कात्री लावणार असल्याचे सांगण्यात आले होते.अंदाजपत्रकातील स – यादीमधील तरतुदी तसेच विकासकामांसाठी अंदाजपत्रकातील प्रशासकीय तरतुदी यांच्याबाबत भेदभाव न करता उपलब्ध तरतुदीप्रमाणे त्वरित निविदा प्रक्रिया महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय ते मुख्य खाते अशा स्तरावर ताबडतोब सुरू करावी, अशी मागणी विशाल तांबे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

कोरोनासाठी आरोग्य सुविधा उभारणीची महाराष्ट्राने देशासमोर मांडली यशोगाथा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

बीकेसी टप्पा २ठाणे येथील कोरोना रुग्णालयांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण

मुंबई,: कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेड्स निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली आहे. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या वतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या कोरोना रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि ठाणे येथे उभारण्यात आलेल्या १००० खाटांचे कोरोना रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी मान्यवर सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, बीकेसी मैदान आणि ठाणे येथे ही दोन्ही रुग्णालये युद्ध पातळीवर उभारण्यात आली आहेत, याचा मला अभिमान आहे. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या मागे नाही तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे.  

मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर १० ते १५ दिवसांच्या कालावधीत १००० खाटांचे सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती होते ही कामगिरी थक्क करणारी आहे. देशात अन्यत्र कुठेही अशा प्रकारच्या मोकळ्या मैदानावरील रुग्णालयात आयसीयूची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची सचित्र माहिती आपण पंतप्रधानांशी संवाद साधताना देऊ, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात डॉक्टर्स, नर्स हे कोरोना योद्धे लढताहेत त्यांना आयुधं म्हणून ह्या आरोग्य सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण रुग्णालये आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कुणावरही येऊ नये, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दाट लोकवस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षांवरील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात आहे, जेणेकरुन अशा व्यक्तींना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वेळीच रोखणे शक्य होईल. ट्रॅकिंग, ट्रेसिंगचा मालेगाव आणि धारावीमध्ये यशस्वी झालेल्या प्रयोगाचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री मदत निधीसाठी एका ८५ वर्षींय महिला डॉक्टरांनी आज सकाळी धनादेश सुपूर्द केला असे सांगताना त्या महिला म्हणजे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री. राजीव यांच्या मातोश्री असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आणि त्यांना मनापासून नमस्कार करतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

असे आहे बीकेसीवरील टप्पा २ रुग्णालय

साधारणत: एक महिन्याभरापूर्वी बीकेसी येथील मैदानावर १००० खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. त्याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त १२०० खाटांचे आयसीयू, डायलेसिसीच सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले. त्याचा आज हस्तांतरण सोहळा झालाय हे रुग्णालय आज मुंबई महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले.  येथे १०८ बेड्स आयसीयूचे असून १२ बेड्स डायलेसिससाठी आहेत. तर ४०६ बेड्स विना ऑक्सिजन आणि ३९२ बेड्स ऑक्सिजन सुविधायुक्त आहेत.

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत असून सद्यस्थितीत ५०० पेक्षा अधिक रुग्ण सदर हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांपासून दर दिवशी सुमारे ३० रुग्ण निरोगी होऊन घरी परतत आहेत.  डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (फेज-२) येथे व्हेंटिलेटर मशीन (३०), डायलिसिस मशीन (१८), आय. सी. सी. यु. बेल्स (५) फंक्शन मोटराईझड बेड (१०८), पेशंट वॉर्मर, सिटीस्कॅन मशीन, आर. ओ. सिस्टीम (१२५० LPH ), क्वारंटाईन बेड्स, ऑक्सीजन पाईप लाईनचे कनेक्शन, नॉईसलेस सक्शन, पोर्टेबल एक्स-रे मशीन, ई.सी.जी. मशीन, पल्स ऑक्सिमीटर, कम्प्युटर रॅडिओलॉजी सोल्युशन्स अशा प्रकारचे वैद्यकीय उपकरणे आहेत.

२४ दिवसांमध्ये रुग्णालयाची उभारणी-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

ठाणे कोरोना रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अवघ्या २४ दिवसांमध्ये या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. बाळकुम-साकेत येथे १०२४ बेड्सचे तळ अधिक १० मजल्यांचे हे रुग्णालय आहे. आयसीयू बेड, डायलिसीस, प्रयोगशाळा, सीटीस्कॅन, एक्सरे आदी सर्व सुविधा याठिकाणी करण्यात आल्या आहेत. याकामासाठी एमएमआरडीएसह १९ विकासकांनी योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी येथे अशा प्रकारे रुग्णालये उभारणीचे काम सुरू असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

या हॉस्पिटलमुळे ठाणेकरांसाठी मोठी सुविधा झाली आहे. त्यातील ५०० बेड्स हे सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. यातील ७६ बेड्स हे आयसीयूचे असून १० बेडस डायलेसिस रूग्णांसाठी तर १० बेड्स ट्राएजसाठी ठेवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. आवश्यकता वाटल्यास या रुग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेड्स निर्माण करता येऊ शकतात, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

0

उपसरपंचांच्या खात्यावर पहिल्यांदाच १५.७२ कोटी रुपये जमा

मुंबई,: राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येणार आहे, आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते. आता यासंदर्भातील लेखाशिर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करणे आदी सर्व प्रक्रिया पार पाडून एकूण ८ महिन्यांचे एकत्रित मानधन उपसरपंचांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, यासाठी एकूण १५.७२ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत, असे ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यात सुमारे २८ हजार ग्रामपंचायती असून त्यातील ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेल्या २४ हजार ४८५ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांच्या खात्यावर सध्या मानधन जमा झाले आहे. उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल, असेही ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितले.

उपसरपंचांना मिळणार ‘इतके’ मानधन

· २००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १००० रुपये

· २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा १५०० रुपये

· ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा २००० रुपये

सरपंचांनाही मिळाले प्रलंबित मानधन

दरम्यान, राज्यातील सरपंचांचे मानधन नोव्हेंबर २०१९ पासून प्रलंबित राहिले होते. हे मानधन तातडीने अदा करण्यात यावे, अशा सूचना विभागास दिल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करुन विभागामार्फत प्रलंबित मानधनापोटी सरपंचांच्या खात्यावर नुकतेच २२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहितीही ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा -महावितरण

0

वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

महावितरणचे वीजग्राहकांना आवाहन

पुणे, : महावितरणच्या ग्राहकांना योग्य वीजवापराचे अचूक वीजबिल देण्यासाठी मीटरचे रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोणाच्याही संपर्कात न येता घराबाहेर असलेल्या वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील शहर व ग्रामीणमध्ये स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंटमेंट एरिआ) वगळून वीजग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. संबंधीत एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना हॅण्डग्लोव्हज, मास्क, सॅनिटाजर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रिडींग घेताना कोणाशीही संपर्क येत नाही. सर्व मीटर ग्राहकांच्या घराबाहेर असल्याने तसेच अपार्टमेंटमध्ये वीजमीटरची तळमजल्यावर स्वतंत्र खोली असल्याने रिडींगसाठी घरात किंवा इमारतीमध्ये जाण्याची गरज नाही. मीटर रिडींगची प्रक्रिया महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे होत आहे. मोबाईलद्वारे एका मीटर रिडींगचा फोटो काढणे व रिडींग घेणे यासाठी केवळ 8 ते 10 सेकंदाचा कालावधी लागतो. मीटर रिडींग घेणारे कर्मचारी हे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्यविषयक दक्षता घेऊनच मीटर रिडींग घेत आहेत. एकच कर्मचारी कोणाच्याही संपर्कात न येता रिडींग घेत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग घेण्याचे तात्पुरते थांबविण्यात आले होते. गेल्या मार्च महिन्यानंतर आता जूनमध्ये स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून मीटर रिडींग घेण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग उपलब्ध होऊ न शकल्याने वीजग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार सरासरी वीजबिल देण्यात आले. आता जूनमध्ये घेतलेल्या प्रत्यक्ष रिडींगद्वारे गेल्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमधील अचूक वीजवापरानुसार वीजबिल दुरुस्त करण्यात येत आहे. तसेच बिलांची रक्कम भरल्यास त्याचे योग्य समायोजन करण्यात येत आहे.

ज्या भागातील ग्राहकांच्या वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळाली आहे मात्र कर्मचाऱ्यांना रिडींग घेण्यासाठी सोसायटीत प्रवेश नाकारला जात असेल तर तेथील वीजग्राहकांना पुन्हा सरासरी वीजबिले जाण्याची शक्यता आहे. तसेच अचूक बिलासाठी पुन्हा पुढील महिन्यातील मीटर रिडींगसाठी प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे मीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोरोनावर माहिती न देता ,संसर्गाचे कारण देत पालिकेची मुख्यसभा तहकूब (व्हिडीओ)

0

पुणे -शहरातील कोरोनाचे थैमान, नागरिकांच्या समस्या सोडविताना नगरसेवकांना येणाऱ्या अडचणी ,प्रशासनाला हवे असलेले सहकार्य ,आणि प्रशासनाच्या मर्यादा यावर कोणत्याही प्रकरची माहिती न देता ,चर्चा न करता ,आज कोरोनाच्या संसर्गाचेच कारण देऊन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन महिने सभा होऊ शकलेली नसताना तिसऱ्या महिन्यातील सभा आज बहुमताच्या आधारावर तहकूब केली .

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/257413229009015/

महापौर मुरलीधर मोहोळ यांसह, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सभागृहात येण्याअगोदर सॅनिटायझरने हात स्वच्छ केले तसेच स्क्रीनिंग करून मनपात दाखल झाले. सभागृहात प्रत्येक नगरसेवक करिता सोशल डिस्टंन्सिंग ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी शहराच्या सद्यस्थितीवर प्रशासन कशाप्रकरे काम करत आहे, यावर चर्चा झाली पाहिजे. अशी विरोधकांकडून मागणी करण्यात आली. मात्र महापौरांनी आपण मोठ्यासंख्येने एकत्र जमलो आहोत, कोरोना संसर्गाच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचे सांगत चर्चा करण्यास नकार दिला.सोशल डिस्टंसिंग पालन करून झालेल्या सभेत महाविकास आघाडीने गेल्या तीन महिन्यात कोरोनावर झालेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, खूप वेळ नगरसेवकांनी एकत्र बसायला नको, या सबबीखाली सत्ताधाऱ्यांनी मुख्य सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. त्याचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला. विरोधी पक्षांनी कोरोनाच तारतम्य ठेवायला हवं, असा टोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना लगावला.

सुरु झालेला पावसाळा,त्या अनुषंगाने घरपडी,पूर अशा निर्माण होऊ शकणार्या आपत्ती , पुणे महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाने म्हणजे भाजपने 6 मीटर रुंदीचे सर्वच रस्ते ९ मीटर रुंद करून त्यावर टीडीआर देण्याचा बहुमताने संमत केलेला प्रस्ताव आणि त्याला राज्य सरकारने दिलेली स्थगिती ,महापालिकेतील कंत्राटी कामगारांची आर्थिक बिघडलेली अवस्था या सर्वांवर मुख्य सभेत भाजप सह सर्वच नगरसेवकांना विविध प्रश्न सतावित असताना अशा कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही . सभागृह नेते धीरज घाटे यांनी मान्यवरांच्या निधनानिमित त्यांना श्रद्धांजली वाहून हि सभा तहकूब करावी असा प्रस्ताव दिला पण त्यास विशाल तांबे , अरविंद शिंदे, अविनाश बागवे आदींनी अगोदर गरजेच्या अत्यावश्यक प्रश्नांवर चर्चा होऊ द्यात अशी मागणी करत तहकुबीला विरोध केला यावेळी नगरसचिव सुनील पारखी यांनी मतदान घेऊन  भाजपच्या सदस्य संख्येच्या  बहुमताने सभा तहकूब केली