Home Blog Page 2541

‘अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला, बाळासाहेबांची परंपरा मी पुढे घेऊन जातोय’- उद्धव ठाकरे

0

मुंबई. आज शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमिवर पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात शिवसेनेच्या नेत्यांसोबत भगवा ध्वज फडकवला आणि पक्षाचे नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ‘मला काहीजण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहे. पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत,’ असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.आपल्या संवादात ठाकरे म्हणाले की, ‘अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचे कवच आहे. शिवसैनिकांचे कवच आणि त्यांचा वचकसुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे.’

‘राम मंदिराचा निकाल आला आणि आपल्याकडे मुख्यमंत्रिपद आले’

‘विश्वास ठेवणे हा आमचा कमकुवतपणा नाही, ती आमची संस्कृती आहे. ‘प्राण जाय पर वचन न जाये’ ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेना पक्ष प्रमुख सुद्धा लाचार होणार नाही. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आहे आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे. शिवसेनेने आपली विचारधारा बिलकुल बदललेली नाही. मी शिवनेरीला आणि एकविरा देवीच्या दर्शनाला गेलो. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. यानंतर आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आले. शिवनेरीच्या मातीचीही कमाल आहे.’

देशात करोना नावाचे विचित्र संकट

देशातील कोरोना परिस्थितीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘करोना हे आपल्या देशावर आलेले विचित्र संकट आहे. वादळ येऊ द्या, चक्रीवादळ येऊ द्या किंवा कोणतेही संकट येऊ, तुमच्यासारखा शिवसैनिक माझ्यासोबत जोपर्यंत आहे मला कशाचीही भीती नाही. कस्तुरबा रुग्णालय आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या. आता त्यांची संख्या वाढवून आपण 100 केली, लॅब आणखीन वाढवणार आहोत. शिवसेनेच्या शाखा या आता दवाखाने बनतील,’ असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘6 जूनपर्यंत सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होते, नंतर त्याने जायला सांगितले’,-रिया चक्रवर्तीचा जबाब

0

मुंबई. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी पोलिसांनी बोलवले होते. चौकशीदरम्यान रियाने आपल्या जबाबात सांगितले की, 6 जूनपासून ती सुशांतसोबत त्याच्या घरी राहत होती. परंतू, काही दिवसानंतर सुशांतने एकटे राहण्याचे कारण सांगत, तिला तिच्या घरी जाण्यास सांगितले.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची काल(ता.18) जवळपास 11 तास पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास 10 वाजता संपला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी त्याचे कर्मचारी, निकटवर्तीयांसह 13 जणांचे जबाब नोंदवले आहेत. आपल्या जबाबात रिया चक्रवर्तीने म्हटले की, ‘माझी सुशांतसोबत 2013 मध्ये ओळख झाली. त्यावेळी सुशांत ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपट करत होता, तर मी ‘मेरे डॅडी की मारुती’ सिनेमा करत होते. या दोन्ही चित्रपटाचे सेट जवळ-जवळ असल्याने आमची त्या ठिकाणी भेट झाली. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि वेगवेगळ्या पार्टीमध्ये अनेक भेटी झाल्या. यानंतर आम्ही एकमेकांचे नंबर घेतले आणि अधून मधून भेटू लागलो. तेव्हा सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता.’

पुढे रियाने सांगितले की, ‘2017-2018 च्या दरम्यान आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. सुशांत खूप विचारी होती. त्याच्या मनात सतत काही ना काही विचार चालत असायचा. पण, त्या तो कधीच त्याबाबत कोणाला सांगायचा नाही. त्याला काही टेंशन आल्यास तो एकांतवासात जायचा किंवा पुण्यातील त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन राहायचा. तो सतत तणावात असायचा. त्यानंतर तो डॉक्टरकडे गेला आणि तेव्हापासून त्याचे डिप्रेशनचे औषध सुरू झाले. पण, मागील काही काळापासून त्याने औषध घेणे बंद केले होते.’

‘6 जूनपासून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी होते. त्यावेळी तो पुन्हा डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने एकटे राहण्याचे कारण सांगून, मला घरी जाण्यास सांगितले. मला वाटलं त्याला काही दिवस एकट्यात राहायचे असेल, म्हणून मी त्याच्या घरुन माझ्या घरी राहायला गेले. त्यानंतर थेट 14 जूनला त्याने आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडली आणि धक्का बसला. तो इतके टोकाचे पाऊल उचलेल, असे मला कधीच वाटले नव्हते,’ अशी माहिती रियाने पोलिसांच्या जबाबात दिली आहे.

अनेकांचे जबाब नोंदवले आहेत

मुंबई पोलिसांसाठी सुशांतने आत्महत्या केलेल्या ठिकाणाचा पंचनामा आणि त्याच्या जवळील लोकांचा जबाबत खूप महत्वाचा होता. कारण, यांच्याच माहित्याच्या आधारे सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येऊ शकते. पोलिसांनी सुशांतसोबत त्याच्याच घरात राहणाऱ्या क्रिएटिव मॅनेजर सिद्धार्थ पीठानी, सामान आणणारे दीपेश सावंत, दोन कुक आणि चाबी बनवणाऱ्या व्यक्तीसोबतच सुशांतचे वडील केके सिंह आणि दोन्ही बहिणींचा जबाब नोंदवला आहे.

सुशांतचा मित्र मेहश शेट्टीचा जबाब घेतला

पोलिसांनी सुशांतचा खास मित्र आणि अभिनेता महेश शेट्टीचाही जबाब नोंदवला आहे. आत्महत्येच्या आदल्या रात्री सुशांतने महेशला कॉल केला होता, पण त्याने रिसीव्ह केला नव्हता. रात्री 1 वाजता महेश सुशांतचा कॉल रिसीव्ह करुन शकला नाही, त्यानंतर त्याने सकाळी 12 वाजता सुशांतला कॉल केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.

महेशचा जबाब यासाठी महत्वाचा आहे, कारण महेश सुशांत आणि रियाचा कॉमन फ्रेंड होता. रिया आणि सुशांतचे नाते कसे होते, हे जाणून घेणे पोलिसांसाठी महत्वाचे आहे. पोलिसांनी सुशांतच्या डॉक्टरांचाही जबाब नोंदवला आहे, ज्यांच्याकडे सुशांत आपल्या डिप्रेशनचा उपचार करण्यासाठी जात होता. यासोबतच पोलिसांनी सुशांत्या शेवटच्या चित्रपटाचे डायरेक्टर मुकेश छाबराचाही जबाब नोंदवला आहे. छाबरासोबत 7 तास पोलिसांनी चौकशी केली, पण छाबराने सांगितल्याप्रमाणे, त्याला सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती नव्हती.

डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळेंनी घेतले गाव दत्तक

0

मंडणगड (अंबडवे )  निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांपैकी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असलेले आंबडवे  ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी हे आहे. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की ) चे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आंबडवे गाव दत्तक घेत असल्याचे येथे आज जाहीर केले. डिक्की संस्थेबरोबरच खादि ग्रामोद्योग  विकास मंडळ व डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटु ) या प्रकल्पाबरोबर सहयोगी संस्था म्हणून कार्यरत राहणार असल्याचे पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी यावेळी सांगितले.
या संकल्पनेत संपूर्ण गाव आत्मनिर्भर होणार असून या गावातील प्रत्येक घरात  लघुउद्योग राबवून स्वयंरोजगाराची यामुळे संधी निर्माण होणार आहे. सदर योजनेत अगरबत्ती तयार करणे, सोलर हातमाग, रुमाल तयार करणे अशा पद्धतीने प्रत्येक घराला एक प्रकल्प व यंत्र देण्यात येणार आहे. यासाठीचा कच्चा माल खादी ग्रामोद्योग मंडळ पुरवणार आहे. तसेच यासाठीचे तंत्रप्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटु) करणार आहे. उत्पादित झालेला पक्का माल उत्पादनाला बाजारपेठहि मिळवून देण्याची जबाबदारी सदर संस्थांनी घेतली आहे. अशा पद्धतीने एखादे गाव दत्तक घेण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे दिसून येते. यामधून गाव हे स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होणार असून या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि देशात एक नवा आदर्श निर्माण होणार असल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले. सदर गावामध्ये ३१ मागासवर्गीय कुटुंब व  ४९ सर्वसाधारण वर्गातील कुटुंब  अशी एकूण ८० कुटुंब आहेत. या सर्वांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी आंबडवे गाव आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी दत्तक घेण्याची घोषणा मिलिंद कांबळे यांनी केली
आंबडवे गावाला भेट देते वेळी,गावातील घरांचे नुकसान झाल्यामुळे डिक्की संस्थेने सर्व घरासाठी ३४,६६८ चौरस फूट सिमेंट पत्रे ,तर प्रत्येक घरासाठी ४३३ चौरस फूट पत्रे आणि इतर साहित्य ग्रामस्थांना देण्यात आले. तसेच प्रत्येक घराला जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले तसेच बऱ्याच दिवसांपासून या भागात वीज नसल्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी सोलर एल इ डी दिवेही देण्यात आले.
खादी  व ग्रामोद्योग विकास मंडळाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी खादी  विलेज इंडस्ट्री पूर्ण मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पश्चिम विभागाचे उप -कार्यकारी अधिकारी, संजय हेडव यांची समन्वयक म्हणून तात्काळ नियुक्ती केली आहे. तसेच श्री हेडाव खादी  मंडळाच्या महाराष्ट्राच्या अधिकार्यांसह जुलैच्या पहिल्या आठवड्यात आंबडवे गावाला भेट देऊन प्राथमिक अहवाल करून पुढील कार्यवाहीची सुरुवात करणार आहेत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटु) चे कुलगुरू डॉ. वेदला राम शास्त्री यांनी या गावाच्या विकासासाठी विद्यापीठाचे स्किल व उद्योजकता विकास विभाग पूर्ण सक्रियपणे काम करेल असे सांगितले. यासाठी विद्यापीठाकडून दोन प्राध्यापकांची प्रा. संपत खोब्रागडे व प्रा. वर्हाडकर यांची समन्वयक म्हणून तात्काळ नियुक्ती केली. यावेळी तेही उपस्थित होते.
यावेळी डिक्की टीम चे प्रमुख पदाधीकारी अविनाश जगताप, अनिल होवाळे, सीमा कांबळे, अमित औचरे , मैत्रेयी कांबळे उपस्थित होते

चीन सीमेवरील हुतात्मा भारतीय सैनिकांना पुण्यातील मशिदींमध्ये श्रद्धांजली

0

ऑन लाईन नमाज दरम्यान सैन्यासाठी दुवा पठण 
पुणे :
चीन सीमेवरील चकमकीत  वीर गती प्राप्त झालेल्या  भारतीय सैनिकांना पुण्यातील मशिदींमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली . 
शुक्रवार (जुम्मा ) च्या ऑन लाईन नमाज दरम्यान दुवा पठण करण्यात आले त्यात वीर गती प्राप्त झालेल्या शूर भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी दुवा पठण करण्यात आले.हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कसोटीच्या प्रसंगात साथ देण्याची भूमिका जाहीर करण्यात आली.  
आझम कॅम्पस शैक्षणिक ,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार यांनी या संबंधी शुक्रवारी सकाळी सर्व मशिदींच्या धर्मगुरू आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवाहन केले होते . त्या नुसार पुण्यातील सर्व मशिदींमध्ये शुक्रवार चे (जुम्मा) नमाज दरम्यान दुवा पठण करताना या भूमिकेचा उच्चार करण्यात आला. आझम कॅम्पस मशिदीमध्ये  ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले . शहरातील इतर मशिदींमध्ये पेश इमाम यांनी दुवा पठण केले . मात्र ,कोरोना साथीमधील नियमांनुसार  मशिदीमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी करण्यात आली नाही .  
आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवारच्या ‘फेसबुक लाईव्ह’ नमाज पठणास प्रतिसाद            
  कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत शुक्रवार (जुम्मा ) नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे . 
मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी  नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे पासून हा उपक्रम दर शुक्रवारी  सुरु आहे.अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.१९ जून रोजी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. 
आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली. 
एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा  धोका लक्षात घेऊन  शुक्रवारी मशिदीत जाता येत  नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. 

मागील महिन्यात  रमजान ईद च्या दिवशी देखील सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले.नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.मग,ईद -उल -फित्र ची नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ सांगण्यात आली.पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी  नमाज अदा केली. सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले होते.आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळली होती.  
———————      

इंडस्ट्रीतील गटबाजीचा बळी ठरला सुशांत सिंह राजपूत, दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ‘पानी’ चित्रपटानंतर झाली वादाला सुरुवात

0

मुंबई. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पूर्ण देशभरात बॉलीवूडच्या गटबाजीची चर्चा सुरू आहे. बॉलीवूडमध्ये असलेला वर्चस्ववाद आणि गटबाजीमुळे सुशांतने आत्महत्या केली, असे सर्वांना वाटू लागले आहे. मात्र अजून त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नाही.

दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ‘पानी’ चित्रपटानंतर झाली वादाला सुरुवात

इंडस्ट्रीमध्ये मोठे पंडित मानले जाणारे यशराज, साजिद नाडियादवाला आणि धर्मा यांनी टॅलेंट मॅनेजमेंटची सुरुवात केली आहे. ते ज्यांना लाँच करतात त्यांच्यासोबत तीन चित्रपटांचा करार होतो. त्यानंतर कलाकार कोणत्याही नवीन बॅनरसोबत काम करू शकत नाही. हा करार लिखित स्वरूपात असताे. याचा उद्देश क्षमता असलेल्या कलाकाराला आपल्यापर्यंत मर्यादित ठेवणे हा आहे. यासाठी रणवीरसिंह, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि अनुष्का शर्मासारखे मोठे कलाकार येतात. ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही यशराजसोबत केली. यशराजने सुशांतसोबतही तीन चित्रपटांचा करार केला होता. यामध्ये‘ब्योमकेश बक्शी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि शेखर कपूरच्या ‘पानी’चा समावेश होता. या पूर्ण प्रकरणात पानी या चित्रपटापासून गडबड सुरू झाली. शेखर कपूर सुरुवातीला हा चित्रपट हॉलीवूडसाठी बनवत होते. नंतर भारतात बनवण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचे बजेट वाढत गेले आणि शेवटी यशराज यांच्याकडून हात काढून घेण्यात आले. येथेच सुशांत आणि यशराज यांचे संबंध बिघडले.

एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

0

पुणे : बिबवेवाडी येथील सुखसागरनगरमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 4 जणानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आला. दरम्यान, आर्थिक विवंचनेतुन ही आत्महत्या घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), त्यांच्या पत्नी रा. जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) व अंतरा अतुल शिंदे (वय 3, सर्व रा.अहिरन्त, सर्वे नं 15/1, गल्ली क्रमांक 1, सुखसागर नगर) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखसागरनगर येथील एका कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतला असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला गुरुवारी रात्री अकरा वाजता मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली. त्यावेळी घरामध्ये शिंदे कुटुंबातील पती, पत्नी व त्यांच्या दोन मुलानी अशा एकूण चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. संबंधित कुटुंबाने एक ते दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असण्याची शक्यता ही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलयात पाठविले. आत्महत्या करण्याचे ठोस कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र, आर्थिक विवंचनेतुन ही आत्महत्या घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

अतुल शिंदे विविध प्रकारचे ओळखपत्र छपाई करण्याचे काम करीत होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालये बंद असल्याने व व्यावसाय बंद असल्यामुळे आर्थिक विवंचना निर्माण झाली, त्यातुनच शिंदे कुटुंबाने आत्महत्या केली, अशी चर्चा सुरु आह

कोरोनाच्या रुग्णांकडून लाखो रुपयांची बिले आकारणा-या खासगी रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करावी -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0


मुंबई दि. १८ जून – मुंबईच्या उपनगरातील विविध खासगी रुग्णालयांकडून कोरोनोच्या रुग्णांची लयलूट सुरु असुन त्यांना विनाकारण लाखोंची बिले आकारली जात आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने याची दखल घेऊन रुग्णांना वेठीस धरणा-या खासगी रुग्णायांवर तातडीने कारवाई करावी व कोरोनाच्या रुग्णांवर वेळेत योग्य उपचार होतील याची दक्षता घ्यावी अश्या सूचना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आणि पावसाळयातील कामकाजासंदर्भात चर्चा करण्यासाठी संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांसमवेत कांदिवली पश्चिम येथे महानगर पालिका परिमंडळ- ७ चे उप-आयुक्त शंकरवार यांच्या दालनात विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पालिकेच्या अधिका-यांनी दरेकर यांना पालिका परिमंडळामधील कोरोनाच्या सद्य स्थितीची माहिती दिली. तसेच कोरोना रोखण्यासाठी सुरु असलेल्या सध्याच्या उपाययोजनांचीही माहिती दिली.
यावेळी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, खाजगी रुग्णालयांवर महापालिकेचे नियंत्रण राहिलेले नाही. कोरोनाच्या प्रत्येक रुग्णावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्यात येतील अशी भूमिका राज्य सरकार घेत आहे. तर दुसरीकडे मात्र खाजगी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांकडून एक लाखा पासून १५ लाखापर्यंतची बिले आकारात आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांकडून लाखो रुपयांची लूट करित आहेत. यावर दुर्दैवाने महापालिका यंत्रणेचे कुठेही नियंत्रण दिसत नाही. पश्चिम उपनगरात ही परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे ही अवाजवी लूट महापालिकेने तात्काळ रोखावी तसेच रुग्णांकडून अवास्तव बिले आकारणा-या खाजगी रुग्णालयांवर तातडीने कारवाई करण्याची सूचना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी दिल्या.
महापालिकेकेडे आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे व रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांकडे उपचारासाठी जावे लागत आहे हे गंभीर असल्याचेही दरेकर यांनी नमुद केले.
यावेळी या कार्यालयात तयार केलेल्या कोविड नियंत्रण केंद्राचीही विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पाहणी केली व तेथील नियोजनाचा आढावा घेतला.
पावसाळ्याच्या पूर्वी पोयसर- दहिसर नदीची सफाई तसेच छोटे नाले व मोठे नाले यांची सफाई, त्याचप्रमाणे ज्या भागात पाणी तुंबत आहे, त्यासंदर्भातला आढावा पालिका अधिका-यांकडून घेतला. पावसाळ्यापूर्वीची कामांची दखल शीघ्र गतीने घ्यावी अशा सूचना प्रविण दरेकर यांनी दिल्या.
या बैठकीला आर उत्तर विभागाचे पालिका आयुक्त संध्या नांदेडकर, आर मध्य विभागाचे पालिका आयुक्त कापसे, आर दक्षिण विभागाचे पालिका आयुक्त संजय कु-हाडे, विभागीय वैदयकीय अधिकारी डॉ. मदन तसेच प्रत्येक विभागाचे वैदयकीय अधिकारी, मध्यवर्ती यंत्रणेचे कार्यकारी अभियंता एसडब्ल्यूडी,सहाय्यक अभियंता(परिरक्षण), भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, प्रभाग समिती अध्यक्षा प्रितम पंडागळे, नगरसेविका आसावरी पाटील, नगरसेविका सुनिता यादव, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

५३ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0

मुंबई, दि.१८: राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज  १६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख १७ हजार ६८३  नमुन्यांपैकी  १ लाख २० हजार  ५०४  नमुने पॉझिटिव्ह (१६.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८१ हजार  ६५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ९२ हजार १४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-९९ (मुंबई ६७, भिवंडी २७, ठाणे ४, वसई-विरार १), नागपूर-१ (नागपूर मनपा १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६६ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५७५१ झाली आहे.

 राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६२,८७५), बरे झालेले रुग्ण- (३१,८५६), मृत्यू- (३३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७,७००)

ठाणे: बाधित रुग्ण- (२१,०९३), बरे झालेले रुग्ण- (८९८८), मृत्यू- (६७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,४३१)

पालघर: बाधित रुग्ण- (२८५३), बरे झालेले रुग्ण- (९६०), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१०)

रायगड: बाधित रुग्ण- (२१६६), बरे झालेले रुग्ण- (१४१२), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (४७२), बरे झालेले रुग्ण- (३१२), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६१), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

पुणे: बाधित रुग्ण- (१४,०००), बरे झालेले रुग्ण- (७५८५), मृत्यू- (६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८०५)

सातारा:  बाधित रुग्ण- (७९१), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

सांगली: बाधित रुग्ण- (२७३), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७३६), बरे झालेले रुग्ण- (६४६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२०६१), बरे झालेले रुग्ण- (८८०), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९९७)

नाशिक: बाधित रुग्ण- (२३०६), बरे झालेले रुग्ण- (१३६८), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२५५), बरे झालेले रुग्ण- (१९८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)

जळगाव: बाधित रुग्ण- (२०३१), बरे झालेले रुग्ण- (९२९), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

धुळे: बाधित रुग्ण- (४६६), बरे झालेले रुग्ण- (२७८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३०६४), बरे झालेले रुग्ण- (१६७६), मृत्यू- (१६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२०)

जालना: बाधित रुग्ण- (३१९), बरे झालेले रुग्ण- (२०१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०६)

बीड: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

लातूर: बाधित रुग्ण- (२०१), बरे झालेले रुग्ण- (१२७), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

परभणी: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२४३), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

नांदेड: बाधित रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण (१६४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१६१), बरे झालेले रुग्ण- (१२३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

अमरावती: बाधित रुग्ण- (३८६), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

अकोला: बाधित रुग्ण- (११२६), बरे झालेले रुग्ण- (६७४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९५)

वाशिम: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१४२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

नागपूर: बाधित रुग्ण- (११५४), बरे झालेले रुग्ण- (६५१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९०)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५)

भंडारा: बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५७), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)

एकूण: बाधित रुग्ण-(१,२०,५०४), बरे झालेले रुग्ण- (६०,८३८), मृत्यू- (५७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टिव्ह रुग्ण-(५३,९०१)

(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १७१ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )      

९ मार्च २०२० रोजी राज्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर मागील सुमारे ३ महिन्याच्या काळात राज्यातील रुग्ण वाढीचा वेग (साप्ताहिक सरासरी) क्रमशः कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोविड १९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

३१ मार्च: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी १२ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी ३.५ दिवस

३० एप्रिल: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी ७ टक्के,  रुग्ण दुपटीचा कालावधी १०.२ दिवस

३१ मे: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी ४ टक्के, रुग्ण दुपटीचा कालावधी २०.१ दिवस

१६ जून: रुग्ण वाढ दराची साप्ताहिक सरासरी ३ टक्के,  रुग्ण दुपटीचा कालावधी २५.९ दिवस

00000

पुणे विभागाची ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 5 हजार 828

0

पुणे विभागातील 10 हजार 756 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 17 हजार 342 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 18 :- पुणे विभागातील 10 हजार 756 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 हजार 342 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 828 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 296 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.02 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.37 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 13 हजार 685 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 8 हजार 351 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 794 आहे. कोरोनाबाधित एकूण 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 275 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.02 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.95 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 873 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 766, सातारा जिल्ह्यात 4, सोलापूर जिल्ह्यात 86, सांगली जिल्ह्यात 15 तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 770 कोरोना बाधीत रुग्ण असून 571 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 161 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 897 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 48 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 685 आहे. कोरोना बाधित एकूण 164 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 262 रुग्ण असून 130 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 124 संख्या आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 728 रुग्ण असून 656 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 64 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 27 हजार 828 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 29 हजार 927 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 901 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 6 हजार 329 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 17 हजार 342 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 18 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

गुलटेकडी ला जमिनीखालील सीएनजी गॅस वाहिनी फुटली-मोठी दुर्घटना टळली

0

पुणे : ड्रेनेजलाईन टाकण्याकरिता रस्त्याची खोदाई सुरू असताना जमिनीखालून गेलेली सीएनजी गॅस वहिनी फुटली. गळती लागलेल्या वाहिनीमधून मोठ्या प्रमाणावर गॅस बाहेर फेकला जात होता. त्यावेळी शेजारच्या वस्तीमध्ये , झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घाबरलेले नागरिक गॅस सिलेंडर घेऊन घराबाहेर पळाले. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना यावेळी घडली नाही. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गुलटेकडी येथे घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित नेहरू रस्त्यावरील गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट चौकादरम्यान ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे अनेक दिवस रखडलेले हे काम आयुक्तांच्या परवानगी नंतर सुरू करण्यात आले. डायस प्लॉट चौकात एमएनजीएलचा सीएनजी पंप आहे. याठिकाणी ही सीएनजी वाहिनी जोडण्यात आलेली आहे. मलवाहिनी टाकण्यासाठी याठिकाणी खोदाई करण्यात येत होती.सिमेंटचा रस्ता फोडून ही खोदाई सुरू होती. ही खोदाई सुरू असताना जमिनीखालील सीएनजी गॅस वाहिनी फुटली. त्यानंतर हे काम तात्काळ थांबविण्यात आले. याची माहिती एमएनजीएल कंपनीला कळविण्यात आली. दरम्यान, प्रेशरमुळे गॅस मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागला होता. जवळपास सात ते आठ फुटांपर्यंत हा वायू वर उडत होता. वायू गळतीमुळे आवाजही होत होता. त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पळाले. अनेकांनी तर घरातील सिलेंडर्स घेऊन पळ काढला. स्थानिक कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर स्वारगेट पोलीस घटनास्थळी धावले. पोलीस बंदोबस्त लावत तात्काळ गर्दी हटविण्यात आली. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून सर्वांना घरी पाठविले.
एमएनजीएलचा आपत्कालिन विभाग, पालिकेचा आपत्कालिन विभाग, अग्निशमन दलाच्या जवानांनी एकत्रित रित्या ही गळती थांबविली.

परप्रांतीय कामगारांची वापसी सुरू; पोलिसांकडून खबरदारी,सर्व कामगारांची नोंद, थर्मल तपासणी व होम क्वॉरंटाईन

0

मुंबई दि. 18 : लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद थर्मल तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परत येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास 15.50 हजार कामगार येत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. त्या यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद, तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम क्वॉरंटाईनसाठी पाठवण्यात येते. मुंबईमध्ये बेस्टमार्फत पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

राज्यातील गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः 4 ते 5 हजार तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात 11 ते 11.50 हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या मर्यादित रेल्वे सुरू असल्याने ही संख्या कमी आहे, पण आपल्याकडील उद्योगधंदे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत निश्चितच वाढ होईल. त्यावेळी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.

यंदाचा गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून, समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई दि. 18-  यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार, आमदारांसह मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. शिर्डी सिद्धिविनायक व या सारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांची सर्वांचे आभार मानले.

बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत.  कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल.  ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ. पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू. यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू असेही मुख्यमंत्री म्हणाले. गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आरोग्याची काळजी घ्यावी -उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, पुण्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्याचे सर्वांनी अनुकरण करावे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीने देखील शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

कोरोनाची समस्या जागतिक असून पुढील काळ कदाचित अधिक आव्हानात्मक असेल. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी आणि तसे नियोजन करावे. पुढील काळात आषाढी, दहिहंडी, स्वातंत्र्य दिन असे महत्त्वाचे सण-उत्सव आहेत. हे सण उत्सव साजरे करताना उत्साह कायम ठेवावा व घरातच थांबून ते साजरे करावेत. यासाठी जनजागृती आवश्यक आहे. पाऊस आणि कोरोना या दोन आव्हानांविरुद्ध लढाई आहे. सर्वांनीच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

गणेशोत्सवासाठी पोलीस दल सज्ज: गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोनाविरुद्धची लढाई गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. आपले पोलीस थोडे थकले आहेत पण त्यांची हिंमत कायम आहे. परप्रांतीय कामगारांची वापसी, पावसाळा, कोरोना संक्रमण अशा अडचणी आहेत. पण शासन गणेशोत्सव साजरा करण्याबाबत ज्या काही सूचना देतील, त्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याची निःसंदिग्ध ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.

मान्यवरांनी केल्या उपयुक्त सूचना

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी कोरोना नियंत्रित आहे पण धोका टळला नाही असे सांगून उत्सवाच्या वेळी एकत्रित येणे हे कोरोना परिस्थितीमध्ये घातक ठरेल. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन केले. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या तयारीबाबतची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलीस दलाच्या तयारीची माहिती बैठकीत दिली. या बैठकीत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर, सर्वश्री जयेंद्र साळगावकर, माजी आमदार विनोद घोसाळकर, दगडूशेठ हलवाई गणेश मंडळातर्फे अण्णासाहेब थोरात, बृहन्मुंबई गणेश मुर्तीकार संघाचे अध्यक्ष यांनीही अत्यंत महत्वाचा व उपयुक्त सूचना मांडल्या.

गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रस्तावना केली. कोरोना पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून राज्यातील विविध मंडळांचे पदाधिकारी यात सामील झाले असल्याची माहिती दिली. तसेच बैठकीचे संचलन ही त्यांनी केले. प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले. या बैठकीस राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिवसेनेने जाळला चीनचा राष्ट्रध्वज; फोडले चायना मोबाईल, टीव्ही

0

पुणे – हिंदुस्थानी जवानांवर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेना पुणे शहराच्यावतीने आज, गुरुवारी निषेध करण्यात आला. संतप्त शिवसैनिकांनी चायना मोबाईल, टिव्ही फोडून, चीनचा राष्ट्रध्वज जाळला. तसेच चीन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलन प्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, माजी शहरप्रमुख रामभाऊ पारिख, नगरसेवक विशाल धनवडे, विधानसभा प्रमुख योगेश मोकाटे, अभय वाघमारे, आनंद गोयल, बाळासाहेब मालुसरे, गजानन पंडित, विभाग प्रमुख उत्तम भुजबळ, राहुल जेकटे, अनिल दामजी, राजेंद्र शहा, राजेश मोरे, प्रविण डोंगरे, चंदन साळुंखे, सनी गवते, अजय परदेशी, रिजवान शेख, विजय नायर, नितीन निगडे, महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, रोहिणी कोल्हाळ, संदिप गायकवाड, नितीन शिंदे, आनंद घरत, बाळासाहेब गरुड, संदीप गायकवाड, युवराज पारिख, परेश खांडके, राजेश मुप्पीड, सुरेश झोळ, बाळासाहेब मोडक, मानव शहा, आदित्य ठाकूर, धनंजय जवळेकर, योगेश होळकर, परवेश राव, फरीद शेख, शफीक मेमन, ईस्माईल शेख, जावेद शेख, ईम्तियाज शेख, सत्यजित कवडे, सुनील परिहार, मनोज यादव, गौरव सिन्नरकर, हर्षद ठकार, मुकेश दळवे, धनंजय नागवडे, योगेश खेंगरे, रवी निंबाळकर, निलेश ढवळे, नीलेश राऊत, समीर कोतवाल, व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

चीनने भ्याड पध्दतीने हल्ला करून आपले जवान मारले आहेत. त्याचा बदला घेण्यासाठी देशवासीयांनी चीनच्या वस्तूंविरोधात बहिष्कार घालावा, असे आवाहन संजय मोरे यांनी केले.

तर, आमचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्याबरोबर संपूर्ण देश आहे. 56 इंच छाती दाखवून आता चीन विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, असे विशाल धनवडे यांनी सांगितले.संपूर्ण देश नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आहे. आमचाही त्यांना पाठिंबा आहे. चीनला चांगला धडा शिकविण्याची गरज असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.दरम्यान, चीनला धडा शिकविण्यासाठी त्यांच्या वस्तू न खरेदी करण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले.

महाराष्ट्रातील ४५५ जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स प्रतिपॅड १ रूपये दराने उपलब्ध

0

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 455 जनऔषधी केंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स 1 रूपया प्रतिपॅड दराने उपलब्ध होत आहेत. देशभर कोविड-19 च्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून केंद्रीय औषधीनिर्माण विभागाच्यावतीने प्रतिपॅड 1 रूपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले येत आहेत.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ, स्वस्थ आणि सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी सॅनिटरी नॅपक्निसची किंमत कमी करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.  जनऔषधी  केंद्रामार्फत विक्री करण्यात येणारे पॅड हे पर्यावरणाला अनुकूल आहेत. या पॅडसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे जैव-विघटनशील आहे. हे साहित्य ‘एएसटीएम डी-6954’ मानकांनुसार बनविण्यात आलेले आहे.

बाजार भावानुसार प्रति पॅड सॅनिटरी  नॅपकिन्सची किंमत 3 ते 8 रूपये आहे. बऱ्याच महिलांना ते परवडण्या सारखे नसते. त्यामुळेच प्रतिपॅड 1 रूपया दराने सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे.

वर्तमानात कोविड-19 च्या कठीण काळात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे सुरू आहेत. या केंद्रामार्फत औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा निरंतर केला जात आहे. या सर्व जनऔषधी केंद्रांमधून सॅनिटरी नॅपकिन्स 1 रूपये प्रतिपॅड दराने उपलब्ध करून दिले जात आहेत.

महाराष्ट्रातील  जिल्हानिहाय जनऔषधी केंद्र

अहमदनगर (08), अकोला (09), अमरावती (10) औरंगाबाद (12) बीड (24)भंडारा (01) बुलढाणा (19) चंद्रपूर (05) धुळे (05) गडचिरोली (01) गोंदिया (05) हिंगोली (04) जळगाव (12) जालना (27) कोल्हापूर (12) लातूर (47) मुंबई (01) मुंबईशहर (34) मुंबई उपनगर (03) नागपूर (09) नांदेड (17) नंदूरबार (02) नाशिक (16) उस्मानाबाद (12) पालघर  (12) परभणी (17) पुणे (24)रायगड (09)रत्नागिरी (01) सांगली (12) सातारा (15) सोलापूर (15) ठाणे (44) वर्धा (02) वाशिम (05) यवतमाळ (04)

रेडलाईट भागात युक्रांदचा मदतीचा हात

0

पुणे :
 कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर संकटांच्या काळात पुण्यातील रेड लाईट भागातील महिलांना युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी शहर सचिव सुदर्शन चखाले यांच्या मार्गदर्शना खाली ५०० रेशन कीट आणि  जीवनोपयोगी साहित्याची मदत केली.  
 या भागातील स्थानिकांचे जगण्या मरण्याचे प्रश्न भयंकर आहेत. लॉकडाऊन असल्याने या लोकांचे अन्नधान्याच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत.उपासमारीचे दिवस या महिलांवर आलेले आहेत.त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

 या महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रेशन कीट युक्रांद संघटनेने उपलब्ध करून दिले. हे किट त्यांनी जॉन पॉल फौंडेशन या स्थानिक संस्थेच्या माध्यमातून या भागातील महिलांपर्यंत पोहचवले.तर जॉनपॉल या संस्थाने या भागात रक्तदाब ,मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधे पुरवली  असंही चखाले यांनी सांगितले . 

या कामात संदीप बर्वे, कार्यवाह, युक्रांद, जाबवंत मनोहर ,राज्यसंघटक, युक्रांद, नागेश गायकवाड आणि जॉन पॉल  फौंडेशन  संस्थेच्या धनश्री जगताप याचं मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले