Home Blog Page 2539

उद्याचे सूर्यग्रहण अद्भूत -ज्योतिषी दावा

0

उघड्या डोळ्याने पाहू नका;

सूर्यग्रहणावेळी ग्रहांच्या या स्थितीचा अद्भूत योग सुमारे ५०० वर्षांपूर्वी आला होता

सन 2020 मधील पहिले सूर्यग्रहण रविवार, 21 जून रोजी लागणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. काही ठिकाणी हे ग्रहण खग्रास, तर काही ठिकाणी कंकणाकृती स्वरुपात हे ग्रहण दिसेल. हे सूर्यग्रहण या वर्षातील सर्वांत मोठे सूर्यग्रहण असेल.भारतात सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून सूर्यग्रहण लागेल आणि दुपारी 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा स्पर्श होण्यापूर्वी सुमारे 12 तास आधी वेधकाळ सुरू होतात.अनेकार्थाने यंदाचे सूर्यग्रहण अद्भूत ठरणार आहे. या सूर्यग्रहणादिनी अनेक योग तयार होत आहेत. एक म्हणजे याच दिवशी जागतिक योग दिवस, जागतिक पितृदिन आहे.

21 जूनचे आणखीन एक महत्व म्हणजे आजचा दिवस हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. सामान्यपणे दिवसातील 24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ दिवस असतो. म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो. हे सूर्यग्रहण सर्वांत मोठे सूर्यग्रहण असणार आहे.दरम्यान सूर्यग्रहणावेळी ग्रहांच्या या स्थितीचा अद्भूत योग सुमारे ५०० वर्षांपूर्वी आला होता. त्यानंतर आता तो सन २०२० मध्ये आला आहे. एका मतानुसार, हे सूर्यग्रहण मेष, सिंह, कन्या, मकर राशींना शुभफल देणारे वृषभ, तुळ, धनु, कुंभ राशींना मिश्रफल देणारे; तर, मिथुन, कर्क, वृश्चिक, मीन राशींना प्रतिकूल ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

यंदाचे सूर्यग्रहण सकाळी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांपासून होणार असून, त्याचे वेध आदल्यादिवशी रात्री म्हणजेच २० जून २०२० रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांपासून लागतील, असे सांगितले जाते.

ज्येष्ठ अमावास्येला लागणारे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे सूर्यग्रहण २६ डिसेंबर २०१९ प्रमाणे मोठे सूर्यग्रहण असेल, असे सांगितले जाते.यापूर्वी २५ ऑक्टोबर १९९५ रोजी अशा प्रकारचे मोठे सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहणाचा मध्य सुरू झाला, तेव्हा एवढा अंधार झाला होता की, पशू-पक्षी सूर्यास्त झाल्याचा भास झाल्यामुळे आपापल्या घरट्यांमध्ये निघून गेले होते.दुसरे म्हणजे यावर्षीच्या सूर्यग्रहणाचे विशेष म्हणजे देशाच्या काही भागातून हे ग्रहण खग्रास आणि काही भागातून कंकणाकृती प्रकाराचे दिसेल. त्याचप्रमाणे या शतकातील हे सर्वांत मोठे दुसरे सूर्यग्रहण ठरणार आहे.

यावेळी ‘कंकणाकृती अवस्था’ पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड येथून सुमारे एक मिनिट दिसणार असून, उर्वरित भारतातून ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या कुरूक्षेत्रावरून दुपारी १२.०१ ते १२.०२ या वेळेत फक्त एक मिनिट कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. कुरुक्षेत्रावर ब्रह्म सरोवर आहे.

कुरूक्षेत्र येथे १०.२१ ते १.४८ या वेळेत, जोशीमठ येथे १०.२८ ते १.५४, डेहराडून येथे १०.२४ ते १.५१ या वेळेत सूर्यग्रहण दिसणार आहे. या सर्व ठिकाणांहून सुमारे एक मिनिट ‘कंकणाकृती अवस्था’ दिसणार आहे. मुंबई १०.०१ ते १.२८, पुणे १०.०३ ते १.३१, औरंगाबाद १०.०७ ते १.३७, नाशिक १०.१८ ते १.५१, नागपूर १०.१८ ते १.५१ आणि जळगांव येथे १०.०८ ते १.४० या वेळेत ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसणार आहे. सूर्यग्रहण थेट पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. ग्रहण चष्म्यातूनच पाहावे. दुर्बिणीलाही योग्य फिल्टर लावूनच सूर्यग्रहण पाहावे. त्यानंतर भारतातून दिसणारी कंकणाकृती सूर्यग्रहण २१ मे २०३१, १७ फेब्रुवारी २०६४, ८ डिसेंबर २११३ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातून कंकणाकृती अवस्था दिसणारे सूर्यग्रहण खूप कालावधीनंतर ३ नोव्हेंबर २४०४ रोजी होणार आहे.

कोरोना आणि वादळामुळे लोक आधीच ग्रासलेले असताना अशी अवैज्ञानिक भाकिते चिंतेत भर टाकत आहेत. त्यामुळे ग्रहणविषयक गैरसमजुतींचे ग्रहण सुटणे आवश्यक झाले आहे.
चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते, त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो, त्यावेळी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण दिसते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल, तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असे म्हणतो. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे नैसर्गिक आविष्कार आहेत. प्राचीनकाळी ज्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते, त्यावेळी जनसामान्यांना ग्रहणांची भीती वाटणे साहजिकच होते. त्यामुळे काही प्राचीन ग्रंथांमध्ये ग्रहणकाळात पाळावयाचे नियम सांगितले गेले; परंतु विज्ञानात प्रगती झाल्यामुळे ग्रहण हा चमत्कार नसून, तो एक नैसर्गिक खगोलीय आविष्कार आहे हे सर्वांना समजून आले आहे

झूम ॲप वापरताना सावध राहा : ‘महाराष्ट्र सायबर’चे नागरिकांना आवाहन

0

मुंबई दि.२०- सध्या अनेकजण घरुन काम (Work From Home) करत आहेत.ऑनलाईन मिटिंगसाठी वापरायला सोपे असल्याने झूम (zoom) या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.सायबर भामट्यांनी झूम ॲप सदृश काही मालवेअर (malware) व खोटी ॲप बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ने केले आहे.

आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या ऑनलाईन मिटिंगसाठी झूम, मायक्रोसॉफ्ट मीटिंग, स्काईप, सिस्को वेबेक्स (zoom ,microsoft meetings ,skype ,cisco webex) आदी सॉफ्टवेअर आणि ॲप्स वापरली जात आहेत. झूम त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने  या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे .

सायबर भामट्यांनी बनविलेली झूम ॲप सदृश काही मालवेअर जर डाऊनलोड केली, तर तुमच्या सर्व मिटिंग रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा ताबादेखील हे सायबर भामटे घेऊ शकतात . ‘महाराष्ट्र सायबर’ने सर्व नागरिकांना विशेष करून झूम ॲप वापरणाऱ्यांना  हे ॲप वापरताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

झूम ॲप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. शक्यतो कुठलीही गोपनीय माहिती अशा मिटिंगमध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना ही माहिती द्यावी . मिटिंग ॲडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत. तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ॲडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींचीच लॉगिन रिक्वेस्ट स्वीकारावी.

पुढील बाबी लक्षात ठेवा

तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर पुढील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे

१) तुम्हाला जो रँडम मिटींग आयडी व पासवर्ड मिळेल त्याचाच  शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही आयडी किंवा पासवर्ड वापरू नका .

२) तुम्ही मिटींग सेटिंग अशा प्रकारे बदल करा की तुमच्याशिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही .

३) मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी लॉगिन केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे लॉगिन करू शकणार नाही .

४) मिटिंग सेटिंग अशी करा की तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात लॉगिन करू शकणार नाही.

५)तुम्ही जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा  मिटिंग संपली असेल तर लीव्ह मिटींग चा  पर्याय न वापरता एंड मिटींगचा पर्याय वापरा .

६) मिटिंगची लिंक आयडी व पासवर्ड ओपन फोरमवर शेअर करू नका .

वीज वितरण कंपनीकडून सर्व सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा…३ महिन्याचे वीज बिल माफ करा -संभाजी ब्रिगेड

0

पुणे -दरमहा बिल न पाठविल्याने आता एकदम ३ महिन्याचे बिल पाठवून वाढीव युनिट नुसार ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकण्या ऐवजी सरसकट सर्वांचे ३ महिन्याचे बिल विज्वितार्ण कंपनीने माफ करावे आणि पुढील जुलाई महिन्याप्सुंचे युनिट पकडून पुढे ऑगस्ट पासून बिल आकारणी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनीकडे केली आहे.

ते म्हणाले,’महावितरण कंपनी तीन महिन्यात लाईट बिल पाठवले नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांनी वीज बिल भरलेले नाही. उन्हाळा व लॉकडाऊन असल्याने तीन महिन्यात वापरलेली वीज अंदाजे तीनशे युनिटच्या वर गेलेली आहे. याचा अर्थ विज बिल मिळालं नसल्यामुळे विनाकारण तीनशे युनिटच्यावर विज बिल रक्कम अर्थात जास्तीचा भरणा सामान्य माणसाला करावा लागणार आहे. 100 युनिट च्या आत 3.05 रू. एवढा वीज आकार आहे. 101 ते 300 युनीट – 6.95 रूपये, 300 ते 500 युनीट 9.90 रू व 1000 च्या पुढे 12.50 रूपये इतका वीज आकार (रेट) आहे. मात्र तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल आल्यामुळे सरसकट सगळ्या नागरिकांना जास्तीच्या विज आकार (किंमत) बिल भरावे लागेल. महावितरण कंपनीने प्रत्येक महिन्याला बिल न पाठवल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी वीज बिल भरलेले नाही. त्यांना आता तीन महिन्याचा जास्तीचा भुर्दंड सामान्य नागरिकांच्या खिशावर वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे उदंड बसणार आहे. बिल पाठवणे ही कंपनीची चूक आहे. असे असताना त्याची झळ सामान्य माणसांनी का भरायचे हा आर्थिक भुर्दंड सामान्य लोकांनी का भरायचा हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी यामध्ये तात्काळ तडजोड करून सरसगट तीन महिन्याचे वेगवेगळे पैशांनी विज भरणा करून घ्यावा हा सामान्य नागरिकांच्या खिशावर पडलेला दरोडा आहे. हे विज बिल रद्द करा किंवा तिन महिन्याचे विजबील माफ करा… अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे.असा इशारा संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी दिला आहे.

विधानसभेच्या काळात काँग्रेसने 100 युनिटपर्यंत विज बिल माफ करू असे जाहीरनाम्यात सह भाषणामध्ये जाहीर केलेले आहे. मात्र सत्तेवर येऊन सुध्दा आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. दिल्लीमध्ये 100 युनिटपर्यंत वीज मोफत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा 100 युनिटपर्यंत वीज सर्वांना सरसकट मोफत मिळाली पाहिजे. मात्र सध्या कोरोनाचे संकट भयानक व महामारी स्वरूपात असल्यामुळे सर्व जण अत्यंत अस्वस्थ आहेत. त्यामुळे कोरोना महामारी च्या धर्तीवर मार्च महिन्यापासून ३ महिन्याचे सर्वांचे लाईट बिल अर्थात ‘वीज बिल माफ’ करावे अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंतीवजा मागणी आहे.

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त अडीच हजार कुटुंबाना अन्नधान्याचे कीट वाटप

0

पुणे- कॅन्टोमेंन्ट विधानसभा मतदार संघ व प्रभाग क्र १९ काॅग्रेस पक्षाचे वतीने कॉंग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी मंत्री ,शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब व गरजू लोकांना कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या हस्ते अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले .लोहियानगर काशिवाडी येथील सुमारे २५०० हजार नागरीकांना अन्नधान्य कीट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला, या प्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस विठ्ठल थोरात, सो. सुरेखा खंडाळे, प्रभाग अध्यक्ष सुनिल बावकर, शहर काॅग्रेसचे पदाधिकारी रवि पाटोळे, विजय गुजर प्रभागातील पक्षाचे स्थानिक पदधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले..

“घरात घुसून मारू म्हणत सत्तेत आलेला आता म्हणतोय , घरात कुणी घुसलंच नाही”

0

पंतप्रधानांनी केलेल्या दाव्यानंतर जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. “घरात घुसून मारू असं म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती आपले २० जवान शहीद झाल्यानंतर म्हणतेय की घरात कुणी घुसलंच नाही,” असं ट्विट करत कन्हैयानं पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.

गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. या संघर्षानंतर केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले जात असून, जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनंही याच मुद्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी स्तरावरील चर्चा सुरू असताना १५ जून रोजी गलवान खोऱ्यात मोठा संघर्ष उफाळून आला. या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. याप्रकरणावर सरकाकडून अधिकृत माहिती न आल्यानं विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. चिनी सैन्यानं भारताच्या भूभागात घुसखोरी केली नव्हती, असा दावा मोदी यांनी केला होता.

१९६७ नंतर आजपर्यंत एकदाही चीनच्या सीमेवर कुठल्याही सैनिकाने प्राण गमावलेला नाही मग आत्ताच कसे ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

पुणे-भारत-चीन सीमेवर गलवाण खोऱ्यात जर काहीच झालेलं नाही तर आपले २० सैनिक कसे मारले गेले? याच उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवं. कुठंही आक्रमण झालं,घुसखोरी झाली असं म्हणायला ते तयार नाहीत. आपली जमीन त्यांनी घेतली असंही म्हणण्यास तयार नाहीत. मग २० सैनिक कसे मारले गेले, हा प्रश्न उपस्थित राहतोच ना? तसेच देशाच्या सीमेवर १९६७ नंतर आजपर्यंत एकदाही चीनच्या सीमेवर प्राणघातक हल्ला झालेला नाही. कुठल्याही सैनिकाने प्राण गमावलेला नाही. मग आत्ताच्या घटनेची जबाबदारी कोणीतरी स्विकारायला हवी, सगळ्यांनीच हात वर केले आहेत. याचं उत्तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ किंवा संरक्षण मंत्री किंवा पंतप्रधान यांनी द्यायला हवं.”अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.पुण्यात आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“गलवाण व्हॅली आपलीच आहे त्यामुळं एक इंचही जमीन आम्ही देणार नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी घ्यायला हवी. देशाच्या सुरक्षिततेचा आणि संरक्षणाचा जेव्हा विषय येतो तसेच जेव्हा बाह्य राष्ट्रांकडून आक्रमण होतं तेव्हा आपले सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यायला पाहिजे ही या देशाची शिकवण आहे. पण सत्यही समोर यायला पाहीजे ना, सत्य न सांगता हे सर्व अशक्य आहे,”

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चेच्या प्रश्नावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. आम्ही सर्वजण बैठकींना एकत्र असतो, प्रेमानं वागतो त्यामुळे काँग्रेस नेते सरकारमध्ये नाराज असल्याचं मला तरी दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

आव्हाड म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी बैठकांना एकत्रित बसत आहोत, प्रेमानं वागत आहोत. तसंच आम्ही सध्या चेतना मानसिकतेतून पुढे जात असल्याने मला तरी यात काही दिसत नाही.” तसेच भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सरकारच्या कारभारावरील टीकेवर आव्हाड म्हणाले, ‘आज करोना विषाणूचे जागतिक संकट निर्माण झाले आहे. मात्र, राज्यातील विरोधीपक्ष नको त्या गोष्टीत राजकारण करू पाहत आहे, असं करून चालणार नाही.”

भारतीय सीमेत घुसखोरी झालीच नाही तर मग मारामारीत आपले 20 जवान शहीद का झाले ?पीएमओचे स्पष्टीकरण

0
  • नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत म्हटले होते- भारतीय सीमेत घुसखोरी झालीच नाही
  • विरोधकांनी विचारले- घुसखोरी झाली नाही, तर मग मारामारीत आपले 20 जवान शहीद का झाले ?

नवी दिल्ली. चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर वाद सुरू झाल्यावर पंतप्रधान ऑफिस (पीएमओ) ने शनिवारी स्पष्टीकरण दिले आहे. पीएमओने म्हटले की, नरेंद्र मोदींच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करुन, वाद निर्माम केला जात आहे.

पंतप्रधान काय म्हणाले होते ?

शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मोदी म्हणाले होते की, ‘लड्डाखच्या सीमेत कोणतीच घुसखोरी झाली नाही आणि आपल्या पोस्टवरही कोणी कब्जा केला नाही.’

विरोधकांनी काय म्हटले ?

काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की- पंतप्रधानांचे हे विधान खरे आहे, तर मग भारताचे 20 जवान शहीद कसे झाले ? दोन्ही देशात चर्चा का होत आहेत ? दुसरीकडे, राहुल गांधींनी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले. त्यांनी हेदेखील म्हटले की, पंतप्रधानांनी चीनच्या हल्ल्यापुढे सरेंडर केले आहे.

पीएमओचे स्पष्टीकरण

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी 15 जूनच्या मारामारीचा रेफरेंस दिला होता. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, सैनिकांच्या शौर्यामुळे भारताच्या सीमेत कोणीच घुसले नाही. आपल्या सैनिकांनी प्राण देऊन चीनी सैनिकांना हुसकून लावले.

“सर्वपक्षीय बैठकीत ही माहिती देण्यात आली होती की, यावेळी प्रत्यक्ष सीमा रेषेजवळ चिनी सैन्य पूर्वीपेक्षा अधिक संख्येनं आलं होतं. १५ जून रोजी चिनी सैन्याकडून प्रत्यक्ष सीमा रेषेजवळ भारतीय हद्दीत बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला. हे काम रोखण्यास चिनी सैन्यानं नकार दिला होता. त्यामुळे संघर्ष उफाळून आला. पंतप्रधानांनी केलेलं विधान १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाशी संबंधित होतं. ज्यात २० जवान शहीद झाले होते,” असं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

“पराक्रमी जवान देशाच्या सीमांचा रक्षण करत असताना त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी अनावश्यक वाद उभा केला जात आहे, है दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी केलेल्या विधानांवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न हा प्रोपोगंडा असून, यामुळे भारतीयांची एकत्मता कमी होणार नाही,” असं पीएमओ कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

बनावट पासपोर्ट देणाऱ्यांपासून सावध! – महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन

0

मुंबई, दि.१९- सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टच्या template या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे ९ ते २३ डॉलर या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे याचा उपयोग करून लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू आहे. तेव्हा अशा बनावट पासपोर्टपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

सायबर भामटे हे अशा टेम्लेट्स विकत घेतात व त्याला मॉडिफाय करून बनावट पासपोर्ट बनवतात व त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात. अशा बनावट ओळखपत्रांचा उपयोग करून विकत घेतली जाणारी सिम कार्ड ही ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी व अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात आहेत.

सावध रहा!

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना आवाहन करते की, सावध रहा ! तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका . तुमच्या पासपोर्टच्या scan copies ना पासवर्ड देऊन सुरक्षित करा ज्यामुळे तुमच्या शिवाय अन्य कोणाला ती फाईल open करता येणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पासपोर्टची प्रत देणार असाल तर त्या प्रतीवर निळ्या पेनाच्या शाईने सही व त्यादिवशीची तारीख पण नमूद करा . तसेच खालील काही मुद्दे हे आपल्याला खोट्या व खऱ्या पासपोर्टचा फरक समजण्यास उपयोगी होतील :

१)पासपोर्टच्या issuing date व expiry date मध्ये १० वर्षाचा फरक असला पाहिजे . २)पासपोर्टला  ३६ किंवा ६० पाने असली पाहिजेत  ३) font ची size आणि alignment एकसारखी असली पाहिजे . ४) पासपोर्ट वरील भारताचा emblem नीट तपासून बघा. ५) पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पण पासपोर्ट क्रमांक perforated स्वरूपात असला पाहिजे ६) जर जुना पासपोर्ट पण उपलब्ध असल्यास त्यावरील अन्य माहिती जसे की आई वडिलांचे व आपल्या जोडीदाराचे नाव नवीन व जुन्या पासपोर्टवर एकच असले पाहिजे. ७) जर पासपोर्ट ३६ पानी असेल तर पण क्र ३ ते ३४ वर भारताचा emblem (अशोक स्तंभ ) असला पाहिजे.

जर कोणत्याही नागरिकाची पासपोर्ट संदर्भात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंद करावी, तसेच या गुन्ह्यांची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website ) पण द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 6 हजार 213

0

पुणे विभागातील 11 हजार 528 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 18 हजार 532 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 20 :- पुणे विभागातील 11 हजार 528 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 हजार 532 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 213 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 791 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 340 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.21 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.27 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 14 हजार 725 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 9 हजार 2 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 159 आहे. कोरोनाबाधित एकूण 564 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 320 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.13 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.83 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 603 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात477 , सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 100, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर जिल्ह्यात 02 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 800 रुग्ण असून 613 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 148 आहे. कोरोनाबाधित एकूण 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 5 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 79 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 754 आहे. कोरोना बाधित एकूण 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 271 कोरोना बाधीत रुग्ण असून 160 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 103 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 731 रुग्ण असून 674 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 49 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 33 हजार 282 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 30 हजार 995 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 287 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 12 हजार 162 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 18 हजार 532 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 20 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

‘स्पाईसजेट’ने पुण्यातून व पुण्याकडे केली विक्रमी 55 टन मालाची वाहतूक

महाराष्ट्राच्या आत-बाहेरही 4,588 टन मालवाहतूक साध्य

भारतातील सर्वात मोठी एअर कार्गो ऑपरेटर व मालवाहू विमानांचा खास ताफा बाळगणारी एकमेव देशी कंपनी असणाऱ्या ‘स्पाइसजेट’ने 25 मार्च 2020 पासून आतापर्यंत पुण्याकडे व पुण्यातून 55 टन इतकी विक्रमी मालवाहतूक केली आहे. यासाठी या कंपनीने 14 मालवाहू उड्डाणे केली, तसेच प्रवासी विमानांचाही वापर केला. विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणीदेखील या कंपनीने अनेक मालवाहू उड्डाणे चालविली.

‘स्पाइसजेट’ने मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे यांसहीत संपूर्ण महाराष्ट्रात 4,588 टन इतकी मालवाहतूक केली आहे. महाराष्ट्रातून व महाराष्ट्राकडे अशी 552 उड्डाणे 25 मार्च 2020 पासून या कंपनीने केली आहेत.

‘स्पाइसजेट’च्या दृष्टीने पुणे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. आपल्या खास मालवाहू विमानांच्या ताफ्यातून अत्यावश्यक वस्तू व वैद्यकीय सामानाची ने-आण करून ‘स्पाइसजेट’ने टाळेबंदीच्या काळातही मालवाहतूक सुरळीत ठेवली.

26 मार्च 2020पासून या कंपनीने मालवाहतुकीची देशांतर्गत 14 उड्डाणे पुण्याकडे व पुण्यातून केली व त्यांतून 55 टन इतका माल वाहून नेला. यामध्ये बंगळुरू, दिल्ली, मुंबई व नागपूर या शहरांमधून झालेल्या उड्डाणांचा समावेश आहे.

‘स्पाइसजेट एअरलाइन’ने मुंबईत येणारी व मुंबईहून जाणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करणारी 162 उड्डाणे केली व त्यांमधून 2,490 टन माल नेला. अबू धाबी, बाहरीन, बँकॉक, कंबोडिया, ढाका, दुबई, जेद्दा, काठमांडू, कुवेत, मस्कत, म्यानमार, रस अल खैमाह, रियाध, शारजा आणि सिंगापूर या ठिकाणची ही ने-आण करणारी उड्डाणे होती.

त्याचबरोबर, या कंपनीने मुंबईत येणारी व मुंबईहून जाणारी देशांतर्गत मालवाहतूक करणारी 369 उड्डाणे केली व त्यांमधून 1,969 टन माल नेला. अहमदाबाद, औरंगाबाद, बंगऴुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोझिकोड, कोलकाता, कोची, नागपूर, पुणे, सूरत, तिरुअनंतपुरम आणि विशाखापट्टणम या ठिकाणची ही उड्डाणे होती.

या व्यतिरिक्त, या एअरलाइन कंपनीने औरंगाबाद येथून मालाची ने-आण करणारी दिल्ली व मुंबई येथील 2 देशांतर्गत उड्डाणेही केली व तींमधून 4.5 टन माल वाहिला. नागपूरहून पुणे, दिल्ली व मुंबई अशी 19 देशांतर्गत उड्डाणे करून त्यांतून 69 टन मालाची वाहतूकही ‘स्पाइसजेट’ने केली.

‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, “अत्यावश्यक वस्तू, थंड हवामानात ठेवण्याजोग्या वैद्यकीय वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे व मदत साहित्याचा पुरवठा कमीतकमी वेळेत व्हावा, यासाठी आपला मालवाहू विमानांचा ताफा ‘स्पाइसजेट’ने वापरला आहे. संपूर्ण देशभरात टाळेबंदी सुरू केल्यापासून जवळपास 2,570 उड्डाणांमधून 18,100 टन मालाची वाहतूक  आमच्या कंपनीने केली आहे. हे प्रमाण सर्व देशांतर्गत विमान कंपन्यांच्या एकत्रित क्षमतेच्याही दुप्पट आहे. आमची मालवाहतूक आणि प्रवासी सेवा या दोन्ही गोष्टींसाठी पुण्यात आम्हाला प्रचंड क्षमता दिसली आहे आणि आम्ही आगामी काळात या क्षमतेचा विस्तार करीत राहणार आहोत.”

“टाळेबंदीच्या कालावधीत आमची मालवाहतूक वेगाने वाढली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही सुमारे 100 कार्गो उड्डाणे चालविली. आता आम्ही एवढी उड्डाणे दोन दिवसांपेक्षा कमी वेळात करतो. आज ‘स्पाइसएक्स्प्रेस’ ज्या स्तरावर आहे, तेथे ती आणण्यासाठी ‘स्पाइसजेट’ला वेळ, ऊर्जा आणि पैसा यांची मोठी गुंतवणूक करावी लागली आहे. आम्ही वाहून नेत असलेल्या अनेक गोष्टींमध्ये रक्ताचे नमुनेदेखील असतात. त्यांना तपमाननियंत्रित वातावरणाची आवश्यकता असते. त्यासाठीची सुविधा आता आमच्या विमानांत आहेत, त्याशिवाय आमच्या ग्राउंड सपोर्ट वाहनांमध्येही आहे. आज आमच्याकडे भारतभरातील 12,500 हून अधिक ‘पिन कोड’वर अगदी दारांत सामान पोहोचविण्याची क्षमता आणि अनुभव आहे. याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या ग्राहकांना ‘स्पाइसटॅग’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत देतो. यातून प्रत्येक ग्राहकाला समर्पित अशा कार्गो ग्राहक सेवा कार्यसंघामध्ये प्रवेश मिळू शकतो.”

स्पाइसजेट नियमितपणे वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रियेची उपकरणे, सॅनिटायझर्स, फेसमास्क, कोरोना व्हायरससाठीची त्वरीत चाचणी किट, आयआर थर्मामीटर इत्यादींची वाहतूक करीत आहे. आंतरराष्ट्रीय रिटेलर्स, वैद्यकीय व औषधी कंपन्या यांना अत्यावश्यक वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे, शीतगृहाची आवश्यकता असलेल्या वैद्यकीय वस्तू आम्ही ‘कोविड-19’च्या उद्रेकाच्या काळात अगदी दारांत नेऊन देत आहोत. भारतीय शेतकर्‍यांना शेतीतील उत्पादने, ताजी फळे आणि भाजीपाला या वस्तू देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ठिकाणी नेणे सोईचे व्हावे, म्हणून विशेष मालवाहू उड्डाणे चालवून, त्यांची पुरवठा साखळी सुरू ठेवण्यास या एअरलाइनने मदत केली आहे.

देशभरात टाळेबंदी सुरू झाल्यापासून ‘स्पाइसजेट’ने आपली आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. अबू धाबी, आलमाटी, बगदाद, बाहरीन, बँकॉक, बिश्केक, कंबोडिया, कैरो, सेबू, कोलंबो, ढाका, दोहा, दुबई, गुआंगचौ, हो चि मिन्ह, हाँगकाँग, हुआंगझू, इंचेऑन, जकार्ता, काबुल, काठमांडू, खार्टूम, किर्गिस्तान, कौलालंपूर, कुवेत, माले, मॉस्को, म्यानमार, शांघाय, शारजा, सिंगापूर, सुलैमानिय्या, ताश्कंद, युक्रेन आणि इतर अनेक ठिकाणी ही सेवा आता वाढली आहे. आज, ‘स्पाइसजेट’चे मालवाहू नेटवर्क 45 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर पसरलेले आहे आणि त्यापैकी बहुसंख्य ठिकाणे ही टाळेबंदीच्या कालावधीत जोडली गेलेली आहेत.

‘स्पाइसजेट एअरलाइन्स’ने आपला समर्पित कार्गो विभाग, स्पाइसएक्सप्रेस, हा सप्टेंबर 2018 मध्ये सुरू केला होता. ‘स्पाइसजेट’ने आपल्या ‘क्यू-400’ श्रेणीतील 3 विमानांचे रुपांतर मालवाहू विमानात नुकतेच केले आहे. मध्यम व लहान शहरांमध्ये चालविण्यासाठी ती विमाने विशेष उपयुक्त आहेत. या कंपनीकडे आता आठ मालवाहू विमानांचा समर्पित ताफा आहे.

सात एप्रिल रोजी ‘स्पाइसजेट’ने प्रवासी केबिन आणि ‘बेली स्पेस’मध्ये वैद्यकीय आणि जीवनावश्यक वस्तू ठेवून भारतात प्रथमच ‘आसनावर माल’ स्वरुपाचे उड्डाण केले. तेव्हापासून, आम्ही प्रवासी केबिनमध्ये मालवाहतूक करण्यासाठी नियमितपणे आमची ‘B737’ आणि ‘Q400’ प्रवासी विमाने तैनात करीत आहोत.

पुणे,पिंपवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

0

पुणे दि.20: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली. पुणे तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समितीची स्थापना केली जाणार असून समितीच्या अभ्यासानंतर पुणे आणि पिंपरी -चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार असल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे सांगितले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात पुणे तसेच पिंपरी- चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत आढावा घेतला. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुकत शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, रतन किराड, मनोज सारडा,जयंत शेटे,सतिश मगर आदी उपस्थित होते.
गृहनिर्माणमंत्री आव्हाड म्हणाले, पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात ज्या सनदी अधिका-यांनी यापूर्वी काम केले आहे, शहरांच्या विकासासाठी योगदान दिले आहे,अशा माजी सनदी अधिका-यांचा सहभाग घेत एक समिती स्थापन केली जाणार आहे, या समितीमध्ये शहराच्या विकासात योगदान देणारे इतर जाणकार प्रतिनिधीही असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या समिती तसेच झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कार्याला अंतीम स्वरूप देण्यात येईल. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे नवीन पथदर्शी मॉडेल तयार करून गती देणार असल्याचे सांगतानाच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या वतीने झोपडपट्टीवासियांना पुढील काही महिन्यात ओळखपत्र देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी मांडलेल्या मागण्यासंदर्भात गृहनिर्माण विभागाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचेही गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी सांगितले.
तसेच झोपडपट्टी विकासाच्या धोरणाची वाटचाल, योजना अंमलबजावणीची प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सद्य:स्थिती, तेथील अडचणी, शासनाचे अर्थसहाय्य, झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, अंतर्भूत प्रकल्प, सध्याची स्थिती, अडकलेले प्रकल्प, प्रस्ताव आदी विषयांसह शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठेच्या अडचणी, त्या सोडवणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला.

राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या

0

मुंबई, दि.१९ : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार ७७३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४  नमुन्यांपैकी  १ लाख २४ हजार ३३१  नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख  ९१ हजार  ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१२४ (मुंबई ११४, ठाणे २, वसई-विरार ५, रायगड ३), नाशिक-९ (नाशिक, धुळे, जळगाव प्रत्येकी ३), पुणे-१ (सोलापूर १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ८).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६४,१३९), बरे झालेले रुग्ण- (३२,२६४), मृत्यू- (३४२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव रुग्ण- (२८,४४२)

ठाणे: बाधित रुग्ण- (२२,०३३), बरे झालेले रुग्ण- (९२८४), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१२,०७३)

पालघर: बाधित रुग्ण- (३०२९), बरे झालेले रुग्ण- (१०१६), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९२५)

रायगड: बाधित रुग्ण- (२२६७), बरे झालेले रुग्ण- (१४६९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (७०७)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (४७४), बरे झालेले रुग्ण- (३२७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६१), बरे झालेले रुग्ण- (११४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४४)

पुणे: बाधित रुग्ण- (१४,७०४), बरे झालेले रुग्ण- (८०२०), मृत्यू- (६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६०७४)

सातारा:  बाधित रुग्ण- (८१०), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (२३४)

सांगली: बाधित रुग्ण- (२७४), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१११)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७३७), बरे झालेले रुग्ण- (६६१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२११३), बरे झालेले रुग्ण- (९५३), मृत्यू- (१८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९७५)

नाशिक: बाधित रुग्ण- (२५१५), बरे झालेले रुग्ण- (१४२२), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९५६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४५)

जळगाव: बाधित रुग्ण- (२११८), बरे झालेले रुग्ण- (१०७५), मृत्यू- (१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८६४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४१)

धुळे: बाधित रुग्ण- (४७९), बरे झालेले रुग्ण- (३१८), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१०६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३१६४), बरे झालेले रुग्ण- (१७१३), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२७५)

जालना: बाधित रुग्ण- (३२७), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८९)

बीड: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (२४)

लातूर: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६६)

परभणी: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२४३), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९)

नांदेड: बाधित रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण (१६६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१६६), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (४०५), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०५)

अकोला: बाधित रुग्ण- (११४५), बरे झालेले रुग्ण- (७०८), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (३८०)

वाशिम: बाधित रुग्ण- (६७), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२२२), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६१)

नागपूर: बाधित रुग्ण- (११९१), बरे झालेले रुग्ण- (७८१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९७)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२)

भंडारा: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१८)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५२), बरे झालेले रुग्ण- (४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८९)

एकूण: बाधित रुग्ण-(१,२४,३३१), बरे झालेले रुग्ण- (६२,७७३), मृत्यू- (५८९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टिव रुग्ण-(५५,६५१)

 (टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १९२ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

ससून रुग्णालयातील कोविड चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटी ४४ लाखांचा निधी

0

पुणे, दि. १९: कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक असून त्यादृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ‘कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनां’ चा आढावा घेण्यात आला. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रम कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल विकास व सर्व्हेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड-१९ स्राव नमुना तपासणीसाठी लागणा-या साधनसामुग्रीसाठी ८ कोटी ९० लाख ९७ हजार रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी ३ कोटी ५३ लाख ६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी ७ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड-१९ चाचण्यांचे अहवाल वेळेत देण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोवीड-१९ स्राव नमुने तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळासांठी आवश्यक मनुष्यबळ महापालिका प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावे. ससून, नायडू, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या तसेच मृत्यूसंख्येची माहिती अद्ययावत होत असल्याची खात्री प्रशासनाने करावी. कोविड आणि इतर आजारांच्या रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही,असे स्पष्ट निर्देशही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले.

कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगून अत्यावश्यक बाबींसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून खर्च करावा, तसेच ससून रुग्णालय अद्ययावत यंत्रसामुग्रीयुक्त करा, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्राव नमुने तपासणी तसेच अतिदक्षता विभागातील बेड क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे सांगून यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

डॉ. सुभाष साळुंखे यांनी गरजूंना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सेवांचे दिवसनिहाय नियोजन करण्यात आल्याने कामात सुसूत्रता आल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यापूर्वी रुग्ण आढळलेल्या तालुक्यातील रुग्णसंख्या कमी करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड तसेच श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या वतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

बैठकीत स्राव तपासणी क्षमता, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, वैद्यकीय पार्श्वभूमी, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, कंटेन्मेंट झोन निहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, ग्रामीण भागातील स्थिती तसेच उपचारसुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

सोनू निगमने झगमगत्या दुनियेतील कटू सत्यावरुन पडदा उचलला

0

पुणे- आता प्रसिद्ध गायक सोनू निगमने झगमगत्या जगतातील कटू सत्यावरुन पडदा उचलला असून म्युझिक इंडस्ट्रीतूनही आत्महत्येच्या बातम्या येऊ शकता, असा इशारा दिला आहे.सुशांत सिंग च्या आत्म्हत्येनंतर सोनू ने आपले म्हणणे व्हिडीओ द्वारे कथन केले आहे. मी तर वाचलो जुना काळ चांगला होता , आता नव्या मुलांना ,नव्या पिढीला अवघड काळ आहे, अजून आत्महत्या होऊ नयेत म्हणून सोनू ने आपले विचार मांडले आहेत .

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/301938624533369/

सोनू म्हणाला, ‘ माफिया इंडस्ट्रीत आहे’

सोनूने त्याच्या साडेसात मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. तो म्हणतोय, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी ब-याच काळापासून व्हीलॉग केले नाही. वास्तविक मी मूड मध्ये नव्हतो. भारत अनेक दबावांमधून जात आहे. सुशांत सिंह राजपूत गेल्यानंतर भाविनक आणि मानसिक प्रेशर आले. दुःख होणे स्वाभाविक आहे, कारण आपल्या डोळ्यासमोर तरुण जीवांचा अंत पाहणे सोपे नाही. एखादी निष्ठूर व्यक्तीच असेल, ज्याला यामुळे काही फरक पडत नसेल.

सोनू पुढे म्हणाले, ‘मला या व्हिडीओद्वारे म्युझिक इंडस्ट्रीला एक निवेदन करण्याची इच्छा आहे, कारण आज सुशांत सिंह राजपूतचा आपल्यातून गेला. एका अभिनेत्याचा अंत झाला. उद्या तुम्ही एखाद्या गायक, गीतकार किंवा संगीतकारांबद्दल असे ऐकू शकता. कारण आपल्या देशातील म्युझिक इंडस्ट्रीतील जे वातावरण आहे, दुर्दैवाने चित्रपटसृष्टीपेक्षा मोठे माफिया संगीत उद्योगात आहेत. मी समजू शकतो की लोकांसाठी व्यवसाय करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला वाटते की त्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केले पाहिजे. मी नशीबवान होतो, की कमी वयातच या इंडस्ट्रीत आलो आणि यांच्या तावडीतून सुटलो. पण आज जी नवीन मुलं इथे येत आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा नाहीये,’ असा खुलासा सोनूने केला आहे.

म्युझिक इंडस्ट्रीवर दोन कंपन्यांचे वर्चस्व : सोनूने म्युझिक इंडस्ट्रीवर दोन मोठ्या कंपन्या वर्चस्व गाजवत असल्याचे म्हटले आहे. पण त्याने या दोन्ही कंपन्यांच्या नावाचा उल्लेख टाळला आहे. तो म्हणाला, ‘अनेक मुलंमुली माझ्याशी या विषयावर बोलले आहेत. त्यांना भविष्याची चिंता आहे. निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, संगीतकारांना काम करायचे आहे, पण म्युझिक कंपनी हा आमचा कलाकार नाही, असे सांगते. मला ठाऊक आहे, तुम्ही मोठे लोक आहात. म्युझिक इंडस्ट्रीवर तुमचा दबदबा आहे. दोन लोकांच्या हातातली ही शक्ती आहे, फक्त दोन लोक… ते ठरवतात की कोण गाणं गाणार आणि कोण नाही’, असे सोनू म्हणाला आहे.

सोनू आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला, ‘मी या सर्वांमधून गेलो आहे, मी माझ्या जगात खूप आनंदी आहे. पण नवीन गायक, नवीन संगीतकार, नवीन गीतकारांना पाहिले आहे, ते कधी कधी उघडपणे रडतात. जर उद्या त्यांचा मृत्यू झाला तर तुमच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतील.’

इतकेच नाही तर मी गायलेली गाणी डब करण्यात आली. विचार करा, माझ्यासोबत असे घडू शकते तर मग नवोदितांसोबत काय होऊ शकतं, असेही सोनू म्हणाला आहे.

यशराज प्रॉडक्शन कडे व्यावसायिक बाजू तपासण्यासाठी मागितली कराराच्या सर्व कागदपत्रांच्या प्रती

0

मुंबई. अभिनेता सुुशांत सिंह राजपूतच्य निधनानंतर पोलिस त्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आता आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी व्यावसायिक कोनातून शोध सुरू केला आहे. यासाठी पोलिसांनी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सकडून सुशांतसोबत केलेल्या कराराच्या कागदपत्रांची प्रत मागितली आहे. प्रॉडक्शन हाऊसला सुशांतबरोबर आतापर्यंत जे-जे करार केले त्या सगळ्यांच्या प्रत लवकरात लवकर पोलिसांकडे सादर करायच्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, पहिल्या हिट चित्रपटानंतर सुशांतला मोठ्या बॅनरच्या 7 चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती, परंतु नंतर निर्मात्यांनी त्याला काढून रणवीर सिंग आणि इतर अभिनेत्यांना साइन केले. काही लोकांच्या मते, हेच सुशांतच्या आत्महत्येचे कारण ठरले. परंतु पोलिसांनी याची पुष्टी केली नाही. कॉन्ट्रॅक्टची कागदपत्रे पाहून पोलिसांना आर्थिक कोनातून बॉलिवूडच्या सिंडिकेट प्रकरणाची सत्यता शोधायची आहे.

सुशांतच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरूच

सुशांतचे बिझिनेस मॅनेजर श्रुती मोदी यांनी आपल्या जबाबात सांगितले की, ती जुलै 2019 ते 3 फेब्रुवारी 2020 पर्यंत त्याच्यासोबत होती आणि छिछोरे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही तिचा सहभाग होता. सुशांत बॉलिवूडपासून दूर जाण्याच्या तयारीत होता, त्यामुळे अनेक प्रकारच्या रिअॅलिस्टिक व्हर्च्युअल गेम्सची एक कंपनी तयार करण्याच्या तो विचारात होता.

पर्यावरण आणि समाजाबरोबर काम करण्याची सुशांतची होती इच्छा

याशिवाय सुशांत नेशन इंडिया फॉर वर्ल्ड या नावाने एक संस्था स्थापन करणार होता. ही संस्था महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पर्यावरण आणि समाजासाठी काम करणार होती. या संस्थेची नोंदणी झाली की नाही, याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय सुशांतचा “जिनिअस अँड ड्रॉप आऊट्स” नावाचा एक सोशल प्रोजेक्ट होता, ज्यात समाजात नाउमेद झालेल्या परंतु अलौकिक बुद्धिमत्तेच्या लोकांसाठी एक प्रोग्राम तयार करण्यात आला होता.