Home Blog Page 2537

राष्ट्रवादी , अर्बन सेल व महिला विभाग यांच्या विद्यमाने ३ दिवसीय ‘URBANTALKS’ चर्चासत्र संपन्न …

0

पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, अर्बन सेलच्या प्रदेश अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला विभागाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जून ते २२ जून पर्यंत कोव्हीड महामारीच्या काळामध्ये शहरी नागरिकांना भेडसावणाऱ्या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले. या परिसंवादात विविध क्षेत्रातील मान्यवरांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात  आले होते.

पहिल्या दिवसाचेसत्र, महाराष्ट्राच्या पहिल्या माजी पोलीस महासंचालक श्रीमती. मीरा बोरवणकर यांच्या ‘कोव्हीडच्या काळातील संधी’ या विषयावरील मार्गदर्शनाने संपन्न झाले.

कोरोनामुळे उद्भवलेली परस्थिती हि स्वतः चे आरोग्य व  व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी आहे. श्रीमती बोरवणकर यांनी आयुष्यातील सफलतेचा मंत्र सांगितला ज्यात सेहद, संतुलन, संकल्प, संयम या गोष्टीवर भर देणे आवश्यक आहे.असे नमूद केले .

लिंगभेदावर श्रीमती बोरवणकर म्हणाल्या, हा प्रश्न नेहमीच त्यांना विचारला जातो त्यासाठी “महिलांनी मी एकटी आहे, मला जमेल का?” असा विचार करू नये. हेच प्रश्न राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय पातळीवरही ऐकायला मिळतात.

दुसऱ्या दिवसाच्या सत्रात, ज्येष्ठ पत्रकार व दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांनी ‘लढा करोनाशी आणि विषमतेशी’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कोरोना नंतरचे जग या विषयावर बोलताना श्री. आवटे म्हणाले, कोरोनामुळे आर्थिक व सामाजिक स्वरुपाची विषमता वाढणार आहे. जागतिकीकरणानंतर प्रत्येक गोष्ट जागतिक झाली त्यामुळे आजारपणाचा प्रादुर्भावही जागतिक झाला आहे.कोरोना सोबतच आता आपल्याला जगावे लागणार आहे. डीजीटलायझेशनमुळे कामगार हि संकल्पना बदलुन ऑटोमेशनकडे जग जाण्याची शक्यता आहे, तसेच Online गोष्टींचा वापर अधिक वाढणार त्यामुळे Online Access नसलेल्यांना अडचणीचा सामना करावा लागणर. आदिवासी व गोरगरीब लोक ज्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान नाही ते विकासापासून वंचित राहण्याची शक्यता आहे आणि यामुळे आणखीण विषमता वाढण्याची शक्यता आहे.भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याला खूप अडचणी निर्माण होऊन सर्वसामान्यांचे अधिक हाल होऊ शकतात. यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर, शहरीकरणाची व्यवस्था बदलावी लागेल आपण शहरीकरणाचे केंद्रीकरण केले आहे, त्यांचे विकेंद्रीकरण करून छोट्या शहरांना सक्षम करणे, अधिक बळ देणे गरजेचे आहे असेही श्री. आवटे म्हणाले

आज तिसऱ्या सत्रात, नगररचना तज्ञ श्रीमती. सुलक्षणा महाजन यांनी ‘कोव्हीड नंतरचा नागरी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.लॉकडाऊनमध्ये शहरांची घडी विस्कटलेली आहे. सामाजिक व आर्थिक संकट निर्माण झाले आहे, पर्यायाने त्याचा लोकांच्या जीवनावर परिणाम झालेला दिसत आहे. मुलभूत सुविधा उदा. पाणी, रस्ते, दळणवळण असे प्रश्न उभे राहिलेत ते सोडविणे गरजेचे आहे.स्थानिक पातळीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक शहराचा एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असतो त्यानुसार शहरांचा विकास घडवायला हवा.लोकप्रतिनिधीनी तज्ञांच्या मदतीने दळणवळण, नदी, नाले, पाणी, घनकचरा यासाठी धोरणे ठरविणे, अर्थव्यवस्था समजून घेणे, पर्यावरणाचे रक्षण करणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर लोकप्रतिनिधीना वाढीव अधिकार देणे आज काळाची गरज आहे.

११ वी प्रवेश प्रक्रियाही व्यवस्थित राबविण्याचेही निर्देश,ऑनलाईन वर्गाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांनी पाहिले

0

मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडूनही सूचना घेणार

मुंबई दि. २२: शालेय शैक्षणीक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येत्या काही दिवसांत शिक्षक आमदार तसेच निवडक मुख्याध्यापक, शिक्षक यांना देखील हे सादरीकरण करून त्यांच्याकडून सुचना मागवाव्यात असेही मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले. शालेय शिक्षण विभागाची व्हिसी आज त्यांनी घेतली त्यावेळी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी असावी तसेच तो सहजरीत्या ऑफलाईन देखील उपलब्ध झाला पाहिजे हे पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांनी गुगल मीट वरील एक ऑनलाईन वर्गाचे देखील प्रात्यक्षिक पाहिले. विद्यार्थ्यांना कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ देता कामा नये तसेच त्या आल्यास त्यांचे त्वरित निराकरण करणारी यंत्रणा हवी असेही ते म्हणाले.

जिओ टीव्ही वर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्ही वर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचे सुधा नियोजन आहे असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडे देखील दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

१०, १२ वी निकालाची प्रक्रिया वेगाने सुरु

यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, यंदा मार्च २० च्या दहावी परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून जुलै १५ पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावूत असे सांगितले. ९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंग ही वेगाने सुरु आहे. अशी माहिती दिली.

११ वी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबवा.

दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल एप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल अशी माहिती यावेळी विभागाने दिली.

मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
0000

पुणे व्यापारी महासंघाने अडचणीसंदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा – विभागीय आयुक्त

0

पुणे, दि.२२- पुणे व्यापारी महासंघाने आपल्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिल्या. याबाबत जिल्हाधिकारी तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांच्या समवेत या प्रस्तावावर बैठक घेऊन सर्वांगीण बाबींचा विचार करुन मार्ग काढण्यात येईल, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

कोरोना संसर्गजन्य आजाराबाबत व्यापारी संघटना यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, पुणे मर्चंट चेंबरचे पोपटलाल ओसवाल, पुणे टिंबर संघटनेचे रतन किराड, पुणे इलेक्ट्रीकल संघटनेचे सुरेश जेठवाणी, पुणे टाईल्स सॅनिटरी संघटनेचे जगदीश पटेल तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्याशी भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. व्यापारी महासंघाच्यावतीने सादर केलेल्या मागण्या विचारात घेता विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे व्यापारी महासंघाने सर्वांना सोयीस्कर ठरेल याचा विचार करुन एकत्रित प्रस्ताव तयार करावा. त्यामध्ये प्रामुख्याने कामगारांच्या राहण्याच्या सोयीबरोबरच त्यांना कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्याकरिता लागणारी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, लागणारी वीज, अग्निशामक यंत्रणा, मालाची वाहतूक, मालाची साठवण क्षमता, मालासाठी लागणारी गोदामे इत्यादी बाबीचा विचार करावा. मालाची वाहतूक करताना रहदारीचा प्रश्न निर्माण होणार याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी  यावेळी केल्या.

जिल्हाधिकरी श्री. राम म्हणाले, आपल्या मागण्या रास्त आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या वेळी अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण होणार नाही, यांची संपूर्ण काळजी प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. तसेच आगामी काळात पुणे शहरात वाढत जाणारी लोकसंख्या तसेच गर्दीची ठिकाणे लक्षात घेता पुणे व्यापारी महासंघाने केलेल्या मागण्यांच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागा उपलब्ध करुन देण्यास सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असेही श्री. राम यांनी सांगितले.

पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने आपल्या अडीअडचणीच्या अनुषंगाने शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठ शहराबाहेर हलविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, कन्व्हेक्शन सेंटर या प्रमुख मागण्याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले. ‘कोरोना’मुळे टाळेबंदीच्या काळात पुणे शहरातील दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कामगारांचे वेतन, दुकानांचे भाडे, वीज बिल यासारखे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, असेही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेशास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

0

मुंबई, दि. २२ – मुंबईतील वर्सोवा येथील शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मत्स्यव्यवसाय व सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीसाठी शासकीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याअनुषंगाने २०१९ – २० या चालू वर्षातील प्रशिक्षण वर्ग दिनांक ०१ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत होणार आहे.  या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज मागविण्याची मुदत वाढविण्यात येत असून दिनांक ३०/०६/२०२० पर्यंत पात्र व इच्छुक प्रशिक्षणार्थींनी पुढील पत्यावर अर्ज पाठवावेत अर्ज पाठविण्याचा पत्ता- शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग,तेरे गल्ली,वर्सोवा मुंबई –  ६१ या पत्त्यावर अथवा ftomumbai@gmail.com   या ईमेल वर  ३० जून २०२० पर्यंत सादर करावेत.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या मैत्री ट्रस्ट कडून पुण्यातील रंगभूमी सेवकांना आर्थिक मदत

0

पुणे:

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या मैत्री ट्रस्ट कडून पुण्यातील रंगभूमी सेवकांना दीड लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले यांच्याकडे आज हा धनादेश देण्यात आला. यावेळी विश्वस्त श्रीराम रानडे, विश्वस्त राजन मोहाडीकर, कोथरूड नाटय परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, अरुण पोमण , पालिकेच्या नाटयगृहांचे व्यवस्थापक सुनील मते तसेच सुमारे ६० बॅक स्टेज आर्टिस्ट उपस्थित होते. हा छोटे खानी कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर आवारात झाला.

राजन मोहाडीकर म्हणाले, ‘ कोविड काळात रंगभूमी सेवक अडचणीत आहेत. घरची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत मैत्री ट्रस्ट मदतीचा हात घेऊन आले आहे. ‘
ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा ट्रस्टला २० हजाराची मदत करण्यात आली. मोहन जोशी यांनीच सर्वांचे आभार मानले.

रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले म्हणाले, ‘रंगभूमी सेवकांचे घर चालले पाहिजे, यासाठी या निधीतून रेशन किट देण्यात येणार आहे. गणपती च्या काळात थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. अतुल पेठें , विजय पटवर्धन यांच्यापासून अनेक अभिनेते मदतीसाठी पुढे येत आहेत.

मोहन जोशी म्हणाले, ‘ रंगभूमी अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक मदतीचे हात लागणार आहेत. रंगभूमी अजून २ महिने सुरू होईल असे वाटत नाही. पण, रंगभूमी मरणार नाही. पुन्हा जोमाने उभारी मिळेल. ‘

आयसीआयसीआय बँक 1 कोटी रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जाला देणार इन्स्टंट मंजुरी

0

·         ही सुविधा देणारी देशातील पहिली बँक

·         जगभरातील मान्यताप्राप्त कॉलेज व विद्यापिठे यांच्यासाठी उपलब्ध

·         पूर्णतः डिजिटल प्रक्रिया

मुंबई: आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना स्वतःला किंवा त्यांच्या मुलांना, भावंडांना व नातवंडांना जगभरातील मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळावे, यासाठी इन्स्टंट सँक्शन लेटर देणारी सुविधा आज जाहीर केली आहे. ‘इन्स्टा एज्युकेशन लोन’ नावाने असणारी ही पहिलीवहिली सुविधा लाखो पूर्व-मान्यताप्राप्त ग्राहकांना बँकेकडे असलेल्या त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर पूर्णतः डिजिटल पद्धतीने शैक्षणिक कर्ज देणार आहे. प्रवेशाची खातरजमा करण्यासाठी ग्राहकांना शैक्षणिक संस्थेमध्ये सँक्शन लेटर सादर करता येऊ शकते.

ग्राहकांना बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करून स्वतःचे सँक्शन लेटर स्वतःच तयार करण्याची सेवा दिली जाणार असल्याने ‘इन्स्टा एज्युकेशन लोन’ सुविधा ग्राहकांसाठी कमालीची सोयीस्कर ठरणार आहे. साधारतः ग्राहकांना शैक्षणिक कर्जाचे सँक्शन लेटर मिळण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. तसेच, या सुविधेमुळे, बँकेच्या शाखेत जाण्याचा आणि सगळी कागदपत्रे सादर करण्याचा ग्राहकांचा त्रासही वाचणार आहे.

नव्या सेवेविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे अनसिक्युअर्ड अॅसेट्सचे प्रमुख सुदीप्त रॉय यांनी सांगितले, “महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या फिक्स्ड डिपॉझिटवर शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी इस्टंट मंजुरी देऊन सँक्शन लेटर देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही आर्थिक चिंता न करता कॉलेज किंवा विद्यापीठाची प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. कोणतेही पेपरवर्क न करता, डिजिटल सुविधेच्या मदतीने विद्यार्थ्यां व पालकांना या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. या सुविधेमुळे, सँक्शन लेटर मिळण्यासाठी लागणारा कालावधी काही दिवसांवरून काही मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. ग्राहकांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेली रक्कम उभी करण्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट किंवा अन्य गुंतवणूक मोडीवा लागणार नसल्याने ही सुविधा त्यांच्यासाठी अतिशय सोयीची ठरणार आहे, असा विश्वास आहे”

‘इन्स्टा एज्युकेशन लोन’ची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत:

·         इन्स्टंट  मंजुरी: ग्राहकांना बँकेच्या शाखेत न जाता, तातडीने ईमेलद्वारे सँक्शन लेटर मिळेल.

·         लवचिकता: ग्राहकांना त्यांची मुले, भावंडे, नातवंडे किंवा स्वतः यांच्यासाठी, बँकेकडे असलेल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या 90% पर्यंतच्या रकमेच्या कर्जासाठी अर्ज करता येऊ शकतो.

·         कर्जाची वैविध्यपूर्ण रक्कम: आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपये या दरम्यान कर्ज उपलब्ध आहे. देशातील संस्थेमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपये ते 50 लाख रुपये या दरम्यान कर्ज उपलब्ध आहे.

·         अर्ज करणे सुलभ: ग्राहकांना बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेद्वारे कर्जाची रक्कम व 10 वर्षांपर्यंतचा परतफेडीचा कालावधी सहजपणे निवडता येऊ शकतो.

·         करविषयक फायदे: ‘इन्स्टा एज्युकेशन लोन’च्या रकमेवर 8 वर्षांपर्यंत भरलेले संपूर्ण व्याज प्राप्तिकर अधिनियम, 1961 च्या कलम 80ई अंतर्गत वार्षिक करपात्र उत्पन्नातून कर वजावटीस पात्र आहे.

ग्राहकांनी पुढील काही टप्पे पूर्ण केल्यावर त्यांना मंजुरी मिळवता येऊ शकते:

1.   लॉग इन: ग्राहकांना बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेवर लॉग इन करता येईल आणि पूर्व-मंजुरी मिळालेली ऑफर पाहता येईल.

2.   कर्जाबाबत तपशील देणे: त्यांनी कर्जाची रक्कम, परतफेडीचा कालावधी, कॉलेज किंवा विद्यापीठाचे नाव व अभ्यासासाठी येणारा खर्च असा तपशील देणे गरजेचे आहे. कॅल्क्युलेटर आपोआप इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंटची (ईएमआय) माहिती देईल.

3.   विद्यार्थ्याचा तपशील देणे: ग्राहकांनी विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व विद्यार्थ्याशी असलेले नाते अशी माहिती द्यावी. तसेच, त्यांनी अंतिम ऑफर पाहून घ्यावी, अटी व शर्ती मान्य कराव्यात आणि त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर आलेल्या वन टाइम पासवर्डद्वारे (ओटीपी) ऑथेंटिकेट करावे. त्यानंतर, प्रक्रिया शुल्क मिळाल्यानंतर लगेचच सँक्शन लेटर तयार केले जाईल.

4.   सँक्शन लेटर मिळवणे: निश्चित केलेल्या रिलेशनशिप मॅनेजरची माहिती आणि हंगामी सँक्शन लेटर नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवले जाईल.

कर्जाचे अंतिम वितरण होण्यासाठी ग्राहकांनी सँक्शन लेटर असलेल्या ईमेलमध्ये नमूद केलेल्या रिलेशनशिप मॅनेजरशी संपर्क साधणे आवश्यक आहे. प्रवेशाचे पत्र, वित्तीय कागदपत्र व स्वाक्षरी अशी आवश्यक कागदपत्रे प्राप्त केल्यानंतर बँक शैक्षणिक संस्थांना कर्ज वितरित करेल. ग्राहकांनी आयसीआयसीआय बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन कागदपत्रे सादर करावीत.

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे…

मुंबई, दि. २२ : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.१५ जून, २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण ५ हजार ०२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

नवीन ‘सरपंच प्लस’ ट्रॅक्टर श्रेणी ‘महिंद्रा’तर्फे महाराष्ट्रात सादर

·         ‘सरपंच प्लस’ श्रेणीतून 30 एचपी (22.37 किलोवॅट) ते 50 एचपी (37.28 किलोवॅट) या क्षमतेच्या ट्रॅक्टर्सची नवीन मॉडेल्स सादर

·         या ट्रॅक्टरमध्ये बसविण्यात आले आहे प्रगत, इंधन वाचविणारे ‘इएलएस’ (एक्स्ट्रॉ लॉंग स्ट्रोक) ‘डीआय इंजिन’, त्यातून 2 एचपी (1.49 केडब्ल्यू) अधिक शक्ती व उच्च ‘बॅक-अप टॉर्क’

·         या उद्योगातील सर्वात जास्त मुदतीची, 6 वर्षांची वॉरंटी

·         महाराष्ट्रात ऑनलाइन स्वरुपाची नोंदणीची सुविधा उपलब्ध

मुंबई, जून 22, 2020 – सुमारे 20.7 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या महिंद्रा उद्योगसमुहातील महिंद्रा कृषि उपकरणे विभागाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरपंच प्लस ही ट्रॅक्टरची नवीन श्रेणी सादर केली आहे. या कंपनीच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘575 सरपंच’ या ट्रॅक्टरची सुधारीत आवृत्ती ‘575 सरपंच प्लस’ या नावाने कंपनीने आणली आहे. या नव्या श्रेणीत 30 एचपी (22.37 किलोवॅट) ते 50 एचपी (37.28 किलोवॅट) या क्षमतेची इंजिने असलेल्या ट्रॅक्टर्सचा समावेश आहे.

नव्या ‘सरपंच प्लस’ श्रेणीतील ट्रॅक्टरमध्ये 2 एचपी (1.49 केडब्ल्यू) इतकी शक्ती अधिक आहे, तसेच कमाल टॉर्क, बॅक-अप टॉर्क हाही अधिक प्रमाणात आहे. ट्रॅक्टरने कसण्याच्या जमिनीची व्याप्ती त्यामुळे वाढते. महिंद्राच्या नवीन तंत्रज्ञानाच्या इंजिनांमुळे केवळ जास्त शक्ती मिळते, एवढेच नव्हे तर, इंधनाची अधिक बचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते. या मॉडेल्समधील नवीन स्टाईल आणि चालकाला अनुरुप ठरेल असे डिझाईन यांमुळे ट्रॅक्टरचालकाला आराम मिळतो आणि मालकाला असा ट्रॅक्टर बाळगल्याबद्दल अभिमान वाटतो. नवीन ‘सरपंच प्लस’ श्रेणीचे उत्पादन महिंद्राच्या देशभरातील अत्याधुनिक कारखान्यांमध्ये करण्यात येणार आहे.

नवीन सरपंच प्लस श्रेणीच्या ट्रॅक्टरसाठी महिंद्रातर्फे या उद्योगातील सर्वात जास्त मुदतीची, 6 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. या ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी M2ALL.com या वेबसाइटवर 5000* रुपये भरून नोंदणी करता येईल. खरेदीदारांकरीता विशेष कर्जयोजना व इतर सवलती उपलब्ध आहेत.

नवीन ‘सरपंच प्लस’ श्रेणी सादर करताना महिंद्रा अॅं महिंद्रा कंपनीच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे प्रमुख हेमंत सिक्का म्हणाले, ‘’भारतीय ट्रॅक्टर्सच्या क्षेत्रात अग्रणी या नात्याने, आम्ही ‘महिंद्रा’मधून अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात नेहमीच पुढे असतो. नवीन ‘सरपंच प्लस’ श्रेणीची निर्मिती हे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. आधुनिक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा विचार करून अधिक शक्ती, अधिक बॅक-अप टॉर्क, मॉडर्न स्टाइलिंग आणि चालकाला अनुरुप असे सर्वोत्कृष्ट डिझाईन या बाबी आम्ही या श्रेणीमध्ये समाविष्ट केल्या आहेत. अतिशय प्रगत अशा ‘इएलएस’ इंजिन तंत्रज्ञानामुळे या ट्रॅक्टरमध्ये अधिक शक्ती व इंधनाची बचत या दोन्ही गोष्टी साध्य होतात. त्यातून शेतकऱ्याची उत्पादकता वाढते, त्याच्या उत्पन्नात भर पडते आणि त्याची उन्नती होण्यास मदत होते.’’

महिंद्रा ट्रॅक्टरच्या तुमच्या नजीकच्या वितरकाकडेही आता नवीन सरपंच प्लस श्रेणी उपलब्ध

नवीन ‘सरपंच प्लस’ ही श्रेणी महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या महाराष्ट्रातील सर्व सक्रीय वितरकांकडे उपलब्ध आहे. आमच्या ग्राहकांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन आम्ही महिंद्राच्या सर्व वितरकांच्या शोरूम्समध्ये स्वच्छतेच्या व सुरक्षेच्या आवश्यक नियमांचे काटेकोर पालन करीत आहोत. यातून आम्हाला ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे शक्य होते. 

 ही ऑफर केवळ 30 जूनपर्यंत

**संपूर्ण ट्रॅक्टरवर 2 वर्षांची स्टॅंडर्ड वॉरंटी आणि इंजिन व ट्रान्समिशनच्या देखभालीवर 4 वर्षांची वॉरंटी. ही वॉरंटी ओइएमच्या व खराब होउ शकणाऱ्या इतर भागांवर लागू नाही.

राज्यात आजवर १ हजारावर पोलिसांना कोरोनाची बाधा

0

मुंबई दि.२० :राज्यात कोरोनाच्या आक्रमणापासून आजतागायत १ हजारावर पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून ,पोलिसांवर हल्ला होण्याच्या २७५ घटना घडल्या आहेत तर कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ६१० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. ६ लाख २६ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २१ जून या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख ३३ हजार ७३० गुन्हे नोंद झाले असून २७ हजार ४४६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ४१ लाख ३२ हजार ४६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २७५ (८५४ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०४ हजार ०४०

राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख २६ हजार ३५३

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५

जप्त केलेली वाहने – ८३ हजार ९७०

परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनाचे नोंदवलेले गुन्हे – १५

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ४८

(मुंबईतील ३१ पोलीस व १ अधिकारी असे एकूण ३२, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१,पालघर १)

कोरोना बाधित पोलीस – ११६ पोलीस अधिकारी व ९०० पोलीस कर्मचारी

राज्यातील एकूण रिलिफ कँप -९८ (सुमारे ३ हजार २६६ लोकांची व्यवस्था)

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या

0

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई,दि.२२ : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

श्री. सामंत म्हणाले, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील. असेही श्री. सामंत यांनी संगितले.

‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’च्या ‘बँकशुरन्स’ करारावर यूको बॅंकेची स्वाक्षरी; बॅंकेच्या देशभरातील ग्राहकांना आयुर्विमा योजना उपलब्ध

कोलकाता, 22 जून, 2020 : ‘यूको बॅंक’ भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची आणि  देशातील सर्वात विश्वासार्ह खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेली ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’ यांनी ‘बँकशुरन्स’ करार केला आहे. यामध्ये यूको बॅंकेच्या देशभरातील 3,086 शाखांमध्ये तिच्या ग्राहकांना व्यापक स्वरुपाच्या विमा योजना मिळू शकतील.

यूको बॅंकेच्या रिटेल बॅंकिंग, एमएसएमइ व ‘बँकशुरन्स बिझनेस’ या विभागांचे सरव्यवस्थापक निधू सक्सेना आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे कोलकता प्रदेश विभागाचे प्रादेशिक संचालक अश्विनीकुमार शुक्ला यांनी या ‘बँकशुरन्स’ करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

‘एसबीआय लाइफ’ देशात सातत्याने आपल्या विमा योजनांच्या वितरणाची व्यवस्था वाढवीत आहे. बँका, कॉर्पोरेट एजंट्स, दलाल, विमा विपणन संस्था आणि इतरांशी याबाबत अर्थपूर्ण सहकार्य या कंपनीने साधले आहे. यूको बॅंकेशी केलेल्या भागीदारीतून,  ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’तर्फे मोठ्या लोकसंख्येसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या भागीदारीवर बोलताना एसबीआय लाइफच्या झोन क्र. 3  चे प्रेसिडेंट रवींद्र कुमार म्हणाले, “विम्याची व्याप्ती सार्वत्रिक स्वरुपात व्हावी आणि त्यातून देशाची सेवा करता यावी, यासाठी जागतिक स्तरावरील संस्थांशी भागीदारी करणे महत्त्वाचे आहे. यूको बॅंकेशी भागीदारी करण्यातून आम्ही या दिशेने पावले टाकली आहेत. यातून ‘एसबीआय लाइफ’ला देशभरातील नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल व त्यांना आयुर्विम्याचे छत्र पुरविता येईल. यूको बॅंकेची देशभरातील उपस्थिती व शाखांचे जाळे आणि ‘एसबीआय लाइफ’ची डिजिटल स्वरुपाची सेवा यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या लोकसंख्येला विम्याचे समग्र लाभ देण्यास समर्थ ठरू. या भागीदारीतून दोन्ही संस्था ग्राहक हितासाठी आपापल्या सामर्थ्याच्या बळावर संधी निर्माण करीत आहेत.”

यूको बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अतुलकुमार गोयल यावेळी म्हणाले, ‘’आमच्या ग्राहकांसाठी उच्च मूल्ये प्रस्थापित करण्याचे आमचे ध्येय नेहमीच असते. नव्या भागीदारीमुळे आम्ही अतिशय विस्तृत स्वरुपाच्या विमा योजना ग्राहकांपुढे मांडू शकू. या योजनांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या किंमती यांच्या विचार करून ग्राहकांच्या हिताची मूल्ये त्यांना मिळवून देण्याचे आमचे प्रयत्न राहतील.’’

यूको बॅंकेचे कार्यकारी संचालक अजय व्यास या प्रसंगी म्हणाले, ‘’आमच्या ग्राहकांसाठी व्यापक स्वरुपाच्या विमा योजना उपलब्ध करून त्यांना आर्थिक संपन्नता मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. हे आमचे उद्दीष्ट या नव्या करारांमधून साध्य होईल. ग्राहकांना बॅंकेशी सुलभतेने व्यवहार करता यावेत, यासाठी बॅंकेतील प्रणाली ही डिजिटल व स्वयंचलित स्वरुपाची करण्याचे आम्ही ठरविले आहे.’’

१६ हजारांहून अधिक प्रवासी दाखल ● आणखी ४९ विमानांनी प्रवासी मुंबईत येणार

0

मुंबई, दि. २२: ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत  विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत  १०५ विमानांनी तब्बल १६ हजार २३४ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये ६००९ मुंबईचे तर उर्वरित महाराष्ट्रातील ५३८९ आणि इतर राज्यातील ४८३६ प्रवासी आहेत. १ जुलैपर्यंत आणखी ४९ विमानांनी प्रवासी मुंबईत दाखल होणार आहेत.

आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्वीडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया अशा‍ विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी गेल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत क्वारंटाईन केले जात आहे. 

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्यांना मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते व त्या प्रवाशांचा प्रवासी वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

‘वंदे भारत’ अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

आबा बागुल महापालिकेतील कॉंग्रेसचे नवे गटनेते

पुणे- गेली ३० वर्षे सातत्याने कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन नगरसेवक राहिलेले ,महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष ,उपमहापौर ,गटनेता अशा पदांवर काम केलेले ज्येष्ठ नगरसेवक यांच्या खांद्यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा गटनेता पदाची जबाबदारी टाकली आहे.गटनेता होण्यास इच्छुक असलेले अविनाश बागवे यांच्यासह पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊनच आपण काम करणार असून आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला बळकटी मिळेल अशा स्वरूपाचे आपले काम दिसून येईल असा विश्वास आबा बागुल यांनी ‘माय मराठी’ शी बोलताना दिला .

कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी आपली गटनेता पदाची कारकीर्द जोरदारपणे गाजविली .माय मराठी च्या मदतीने त्यांनी, अविनाश बागवे यांनी  आणि राष्ट्रवादीच्या तत्कालीन नेत्याने महापालिकेत वावरणाऱ्या बोगस कामगाराचा पर्दा फाश करण्यात महत्वाची भूमिका राबविली अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे वेळीच बाहेर काढून त्यास पायबंद घालून महापालिकेचे करोडो रुपये वाचविण्यात यश मिळविले .याच कामाच्या जोरावर कसबा विधानसभा मतदार संघात शिंदे  यांना विधानसभा लढविण्याची संधी महापालिकेने दिली . दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला . तसाच पर्वती मतदार संघात आबा बागुल यांनाच उमेदवारी द्यायचा पक्षाचा निर्णय होता पण दुर्दैवाने हा मतदार संघ वाटपात राष्ट्रवादीकडे गेला आणि आमदार व्हायचे आबांचे स्वप्न अधुरेच राहिले . त्यानंतर बागुल हे शहर कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी रेस मध्ये होते .परंतु शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बागवे यांचे धडाकेबाज काम पाहता त्यांना बदलून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होते .या पार्श्वभूमीवर आता पुन्हा गटनेता म्हणून आबांना एकीकडे संधी देत तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी या अनुषंगाने सोपविण्यात आली आहे. गटनेते आणि त्यांचे गॅटमॅट पक्षनेता बैठकीत होत असल्याची कायम चर्चा राहिली आहे . आबा बागुल यांच्या कारकिर्दीत ती होणार नाही असा दावा हि आता करण्यात येतो आहे. बागुल यांना गटनेता पदावर संधी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत आता जोरदार उत्साह आहे.

पुणे महापालिकेची इमारतच कोरोना हॉटस्पॉट ?

0

पुणे. कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढताना दिसत आहे. सामान्य व्यक्तींसह कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत आहे. दरम्यान पुण्यातून एक धोकादायक बातमी आहे. पुण्यातील महानगरपालिकेची इमारतच आता कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण पुणे पालिकेत नेहमीच येत जात असणाऱ्या नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांसह त्यांच्या नातलगांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.दरम्यान आतापर्यंत पुणे पालिकेतील 108 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता पुणे महापालिका इमारतच कोरोना हॉटस्पॉट ठरणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. कारण महापालिकेच्या इमारतीमध्ये दिवसभरात कामानिमित्त अनेक लोकांचा वावर असतो. अनेकांची पालिकेमध्ये कामं असतात. मात्र यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची दाट शक्यता आहे. पुणे महापालिकेतील एकूण 108 कोरोना बाधितांमध्ये 44 सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 108 कर्मचाऱ्यांपैकी 53 जणांनी यशस्वी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.तर 45 जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत

६० हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२१ : कोरोनाच्या ३८७० नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात  ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६५ हजार  ७४४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार  ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.

राज्यातील तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६६,४८८), बरे झालेले रुग्ण- (३३,४९१), मृत्यू- (३६७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,३१८)

ठाणे: बाधित रुग्ण- (२४,३८८), बरे झालेले रुग्ण- (९५७५), मृत्यू- (७१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,०९६)

पालघर: बाधित रुग्ण- (३४५३), बरे झालेले रुग्ण- (१०४७), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३१६)

रायगड: बाधित रुग्ण- (२५३०), बरे झालेले रुग्ण- (१५४१), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

पुणे: बाधित रुग्ण- (१५,८८१), बरे झालेले रुग्ण- (८६२२), मृत्यू- (६०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६५८)

सातारा:  बाधित रुग्ण- (८४०), बरे झालेले रुग्ण- (५८४), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१७)

सांगली: बाधित रुग्ण- (२९३), बरे झालेले रुग्ण- (१६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (६७०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२२०५), बरे झालेले रुग्ण- (१०३०), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००३)

नाशिक: बाधित रुग्ण- (२७६२), बरे झालेले रुग्ण- (१५२६), मृत्यू- (१५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (२०९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

जळगाव: बाधित रुग्ण- (२२५८), बरे झालेले रुग्ण- (११८७), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)

धुळे: बाधित रुग्ण- (५००), बरे झालेले रुग्ण- (३२९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३४००), बरे झालेले रुग्ण- (१८८०), मृत्यू- (१७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४६)

जालना: बाधित रुग्ण- (३६५), बरे झालेले रुग्ण- (२३१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३)

बीड: बाधित रुग्ण- (९३), बरे झालेले रुग्ण- (६५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

लातूर: बाधित रुग्ण- (२१७), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

परभणी: बाधित रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२५२), बरे झालेले रुग्ण- (२१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

नांदेड: बाधित रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण (१७५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

अमरावती: बाधित रुग्ण- (४४१), बरे झालेले रुग्ण- (२७८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४१)

अकोला: बाधित रुग्ण- (११८८), बरे झालेले रुग्ण- (७५७), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६७)

वाशिम: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (१६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२३३), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

नागपूर: बाधित रुग्ण- (१३२५), बरे झालेले रुग्ण- (८३३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (११४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४)

एकूण:बाधित रुग्ण-(१,३२,०७५),बरे झालेले रुग्ण- (६५,७४४),मृत्यू- (६१७०),इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टिव्ह रुग्ण-(६०,१४७)

(टीप-मुंबईमहानगरपालिकेने आज कळविलेल्या ११० मृत्यूंपैकी ४१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील असून ६९ मृत्यू हे १८ एप्रिल ते १८ जून २०२० या कालावधीतील आहेत.त्यामुळेहे ६९ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.राज्यातीलमुंबई वगळता इतर सर्व जिल्हा/मनपाक्षेत्रातील मृत्यूंचे रिकॉन्सिलिएशन करण्यात आले आहे.यामध्येजिल्ह्यांकडून प्राप्त मृत्यू विषयक माहिती,राज्यस्तरावरउपलब्ध माहिती आणि कोविड१९ पोर्टलवरील माहिती यांची पडताळणी करुन मृत्यूंची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.याप्रक्रियेमुळे ठाणे,रायगडव पालघर या जिल्ह्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीत बदल दिसून येत आहे.आयसीएमआरपोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १२९ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.हीमाहिती केंद्रसरकारच्या आय.सी.एम.आर.पोर्टलवरमान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.प्रयोगशाळाअहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)