राष्ट्रवादी , अर्बन सेल व महिला विभाग यांच्या विद्यमाने ३ दिवसीय ‘URBANTALKS’ चर्चासत्र संपन्न …

Date:

पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, अर्बन सेलच्या प्रदेश अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला विभागाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जून ते २२ जून पर्यंत कोव्हीड महामारीच्या काळामध्ये शहरी नागरिकांना भेडसावणाऱ्या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले. या परिसंवादात विविध क्षेत्रातील मान्यवरांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात  आले होते.

पहिल्या दिवसाचेसत्र, महाराष्ट्राच्या पहिल्या माजी पोलीस महासंचालक श्रीमती. मीरा बोरवणकर यांच्या ‘कोव्हीडच्या काळातील संधी’ या विषयावरील मार्गदर्शनाने संपन्न झाले.

कोरोनामुळे उद्भवलेली परस्थिती हि स्वतः चे आरोग्य व  व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी आहे. श्रीमती बोरवणकर यांनी आयुष्यातील सफलतेचा मंत्र सांगितला ज्यात सेहद, संतुलन, संकल्प, संयम या गोष्टीवर भर देणे आवश्यक आहे.असे नमूद केले .

लिंगभेदावर श्रीमती बोरवणकर म्हणाल्या, हा प्रश्न नेहमीच त्यांना विचारला जातो त्यासाठी “महिलांनी मी एकटी आहे, मला जमेल का?” असा विचार करू नये. हेच प्रश्न राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय पातळीवरही ऐकायला मिळतात.

दुसऱ्या दिवसाच्या सत्रात, ज्येष्ठ पत्रकार व दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांनी ‘लढा करोनाशी आणि विषमतेशी’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कोरोना नंतरचे जग या विषयावर बोलताना श्री. आवटे म्हणाले, कोरोनामुळे आर्थिक व सामाजिक स्वरुपाची विषमता वाढणार आहे. जागतिकीकरणानंतर प्रत्येक गोष्ट जागतिक झाली त्यामुळे आजारपणाचा प्रादुर्भावही जागतिक झाला आहे.कोरोना सोबतच आता आपल्याला जगावे लागणार आहे. डीजीटलायझेशनमुळे कामगार हि संकल्पना बदलुन ऑटोमेशनकडे जग जाण्याची शक्यता आहे, तसेच Online गोष्टींचा वापर अधिक वाढणार त्यामुळे Online Access नसलेल्यांना अडचणीचा सामना करावा लागणर. आदिवासी व गोरगरीब लोक ज्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान नाही ते विकासापासून वंचित राहण्याची शक्यता आहे आणि यामुळे आणखीण विषमता वाढण्याची शक्यता आहे.भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याला खूप अडचणी निर्माण होऊन सर्वसामान्यांचे अधिक हाल होऊ शकतात. यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर, शहरीकरणाची व्यवस्था बदलावी लागेल आपण शहरीकरणाचे केंद्रीकरण केले आहे, त्यांचे विकेंद्रीकरण करून छोट्या शहरांना सक्षम करणे, अधिक बळ देणे गरजेचे आहे असेही श्री. आवटे म्हणाले

आज तिसऱ्या सत्रात, नगररचना तज्ञ श्रीमती. सुलक्षणा महाजन यांनी ‘कोव्हीड नंतरचा नागरी विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.लॉकडाऊनमध्ये शहरांची घडी विस्कटलेली आहे. सामाजिक व आर्थिक संकट निर्माण झाले आहे, पर्यायाने त्याचा लोकांच्या जीवनावर परिणाम झालेला दिसत आहे. मुलभूत सुविधा उदा. पाणी, रस्ते, दळणवळण असे प्रश्न उभे राहिलेत ते सोडविणे गरजेचे आहे.स्थानिक पातळीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक शहराचा एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असतो त्यानुसार शहरांचा विकास घडवायला हवा.लोकप्रतिनिधीनी तज्ञांच्या मदतीने दळणवळण, नदी, नाले, पाणी, घनकचरा यासाठी धोरणे ठरविणे, अर्थव्यवस्था समजून घेणे, पर्यावरणाचे रक्षण करणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर लोकप्रतिनिधीना वाढीव अधिकार देणे आज काळाची गरज आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नाले सफाई, ड्रेनेज सफाई बाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – महापौरांचा इशारा

पुणे- पावसाळ्यात नाले सफाई आणि ड्रेनेज सफाई न झाल्याने...

वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर-सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावाला जाण्याची ओढ आणि एकदा...

सत्कारासाठी पुष्पगुच्छाऐवजी झाडाचे रोप द्यावे-शशिकांत कांबळे यांची मागणी; 

 पद्मा फाउंडेशनतर्फे महापौर, महापालिका आयुक्तांना निवेदन पुणे: विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये...