Home Blog Page 2532

वीजबिलांबाबत शंका, तक्रारी दूर करण्यासाठी महावितरणकडून ग्राहक तक्रार निवारण कक्ष

0

वेबिनार’  मेळाव्यांद्वारे ग्राहकांशी संवाद साधणार

मुंबई,दि२६ जून २०२०: जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या, मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहेत.

महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये माहे जून २०२० महिन्याच्या वीजबिलाची आकारणी सांगण्यात येईल व ग्राहकांच्या तक्रारी व शंका दूर करण्यात येईल. तसेच शहरी भागात मोठमोठ्या रहिवाशी क्षेत्रांत किंवा सोसायट्यांमध्ये आणि ग्रामीण भागात गाव किंवा वाडी पातळीवर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून वीजबिलांबाबत संभ्रम व तक्रारी दूर करण्यात येणार आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-19 संदर्भात सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.  यासोबतच मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यास्तरावर  ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे.

याशिवाय जिल्हा पालकमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच खासदार, आमदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांची महावितरणचे अधिकारी तात्काळ भेट घेऊन त्यांना माहे जून 2020 महिन्याच्या वीजबिलाबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल. हे वीजबिल रीडिंगनुसार अचूक आहे तसेच वीजग्राहकांवर एकाही पैशाचा भुर्दंड पडलेला नाही याबाबत सविस्तरपणे लोकप्रतिनिधींना समजून सांगण्यात येणार आहे.

महावितरणने ग्राहकांना पाठविलेल्या तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाबाबत सोशल मीडियावरून मेसेजद्वारे अफवा पसरविण्यात येत आहे. मात्र ग्राहकांनी या मेसेजवर विश्वास ठेऊ नये. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या  https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिलाची सविस्तर आकारणी तपासून पाहणे सोयीचे झाले आहे. महावितरणने एसएमएसद्वारे ही लिंक  वीजग्राहकांना पाठविली आहे. यानंतरही काही शंका किंवा तक्रारी असल्यास महावितरणच्या कार्यालयात वीजबिलाबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.  यासोबतच वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट” ला शहर सुधारणा समिती ची मान्यता (व्हिडिओ)

0

पुणे शहर बनणार आता जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक बाईक वापरणारं शहर !
पुणे:पुणे शहरामध्ये वाढते प्रदुषण व  वाढती वाहतुक कोंडी  कमी करण्यासाठी व्हि -ट्रो मोटर्स प्रा. लि.( V-tro motors Pvt ltd) या कंपनीच्या माध्यमातुन ग्रीन पुणेसाठी “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट” हि संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार असुन इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट” ला शहर सुधारणा समिती ने आज (शुक्रवारी) मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष  नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1415841541938870/

 या इलेक्ट्रिक बाईक ने प्रवास करण्यास केवळ कमीत कमी ९० पैसे प्रती कि.पासुन जास्तीत जास्त ४ रु प्रती किमी  खर्च पुणेकरांना येणार आहे . प्रकल्प राबविण्यासाठी एका ठिकाणी १० बाईक चार्ज होतील असे मुख्य रस्त्यावर एक चार्जींग स्टेशन अशा प्रकारचे पुणे शहराच्या विविध भागामध्ये मुख्य रस्त्यांवर ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता आज पुणे शहर सुधारणा समिती मध्ये देण्यात आली .


“या प्रकल्पामुळे भविष्यात पुणे मेट्रो ने प्रवास करणार्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असुन एकुणच शहरातील वाहतुक कोंडी, प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी पुणे मनपा ला कोणतीही आर्थिक गुंतवणुक करायची नाही .प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी व पुणे मेट्रो चे सुधा सहकार्य मिळणार आहे”, असेअमोल बालवडकर यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी देशाची जाहीर माफी मागावी -मोहन जोशी(व्हिडिओ)

0

पुणे- २० भारतीय जवानांना शहीदत्व प्राप्त झाले. ते लढले आणि हुतात्मे झाले .पण तरीही त्यांच्या शहीदत्वामागचे कारणही पंतप्रधान आणि सरकार सांगू शकत नाही .यामुळे अंतर राष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी देखील झाली . या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी तातडीने या देशाच्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे असे माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटले आहे . शहिदांना सलाम या कार्क्रमचे आयोजन करून यावेळी शहर कॉंग्रेसच्या वतीने चायनाच्या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या २० जवानांना आदरांजली वाहण्यात आली .
महापालिकेतील विपक्ष नेते आबा बागुल , कमल व्यवहारे ,सचिन आडेकर अभय छाजेड,लता राजगुरू, विठ्ठल थोरात ,एडविन रोबर्ट ,वीरेंद्र किराड ,सुजाता शेट्टी आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठा शहिद स्मारक, कॅम्प येथे पुष्पचक्र वाहून व मेणबत्या प्रज्वलित करून ‘शहिदो को सलाम दिवस’ पाळण्यात आला. शहिद स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्त्या पेटवून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शहिदांप्रती आपल्या भावना व्यनक्त करताना कार्यक्रमास्थळी राष्ट्रध्वजही लावण्यात आला. शहिद जवानांना वंदन करून भारताच्या सशस्त्र सैन्य दलाला समर्थनार्थ व चीन सैनिकांनी हडपलेली भारतभूमी परत घेण्यासंबंधीची केंद्र सरकारकडे मागणी करणारे फलक यावेळी कार्यकर्त्यांकडे होते.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1503222703220636/

६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२५: राज्यात आज ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार  ४५३ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार  ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६९ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले १०९ मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१,मीरा-भाईंदर मनपा-१,वसई-विरार मनपा-२,रायगड-१ जळगाव मनपा-१, जळगाव-४, नंदूरबार-१, पुणे-१, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-४, सातारा-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-८, अकोला-१, अकोला मनपा-१, बुलढाणा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील असून इतर राज्यातील २ मृत्यूंचा समावेश आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (७०,८७८), बरे झालेले रुग्ण- (३९,१४९), मृत्यू- (४०६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७,६५९)

ठाणे: बाधित रुग्ण- (२९,४८८), बरे झालेले रुग्ण- (१२,४२४), मृत्यू- (८१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६,२५३)

पालघर: बाधित रुग्ण- (४२६३), बरे झालेले रुग्ण- (११८८), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९७६)

रायगड: बाधित रुग्ण- (३०८५), बरे झालेले रुग्ण- (१८२०), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६९)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण- (३७४), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१४७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)

पुणे: बाधित रुग्ण- (१८,०१५), बरे झालेले रुग्ण- (९७०६), मृत्यू- (६५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६५०)

सातारा:  बाधित रुग्ण- (८९१), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५)

सांगली: बाधित रुग्ण- (३२०), बरे झालेले रुग्ण- (१९४), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७७४), बरे झालेले रुग्ण- (७००), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२४४०), बरे झालेले रुग्ण- (१३२१), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८३)

नाशिक: बाधित रुग्ण- (३२७६), बरे झालेले रुग्ण- (१७७३), मृत्यू- (१९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०९)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३०२), बरे झालेले रुग्ण- (२३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

जळगाव: बाधित रुग्ण- (२६५२), बरे झालेले रुग्ण- (१३६१), मृत्यू- (२०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (९०), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

धुळे: बाधित रुग्ण- (६१५), बरे झालेले रुग्ण- (३७२), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (४०८४), बरे झालेले रुग्ण- (२०५०), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२३)

जालना: बाधित रुग्ण- (४११), बरे झालेले रुग्ण- (२८२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७)

बीड: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१६५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

परभणी: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२६५), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

नांदेड: बाधित रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण (२२५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१४०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)

अमरावती: बाधित रुग्ण- (४८६), बरे झालेले रुग्ण- (३३२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०)

अकोला: बाधित रुग्ण- (१३५२), बरे झालेले रुग्ण- (८२७), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५३)

वाशिम: बाधित रुग्ण- (८६), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१८१), बरे झालेले रुग्ण- (१३१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१७३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७)

नागपूर: बाधित रुग्ण- (१४१८), बरे झालेले रुग्ण- (९६५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४०)

वर्धा: बाधित रुग्ण- (१५), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०३), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (६५), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६०), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१२१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८)

एकूण: बाधित रुग्ण-(१,४७,७४१), बरे झालेले रुग्ण- (७७,४५३), मृत्यू- (६९३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(६३,३४२)

 (टीप- आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १९१ मृत्यूंपैकी १०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८३ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ४०, ठाणे जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत मनपामधील ३१, पालघर -४, सोलापूर -४, मालेगाव – १, यवतमाळ -१, जळगाव – १ आणि पुणे -१ यांचा समावेश आहे.  हे ८३ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यात यावर्षी दही हंडी उत्सव होणार नाही

0

मुंबई. कोव्हिड-19 च्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात भव्य दिव्य पद्धतीने साजरा होणाऱ्या दही हंडी उत्सवाला रद्द करण्यात आले आहे. हा निर्णय दही हंडी समन्वय समितीकडून घेण्यात आला आहे. परंतू, कृष्ण जन्माष्टमीची पुजा साध्या पद्धतीने केली जाईल. पोलिस अधिकाऱ्यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव (अष्टमी पूजा) ला साध्या पद्धतीने साजरी करण्याचे निर्देश दिले.

दही हांडी समन्वय समितीचे बाळा पडेळकर यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे यावर्षी दही हंडी उत्सह रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सहावत मोठ्या संख्येने लोक जमा होतात आणि एकमेकांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात, यामुळे कोरोना संक्रमण वाढू शकते. यामुळे कमेटीने यावर्षीचा उत्सव रद्द केला आहे. या निर्णयावर समिती ठाम आहे आणि पुनर्विचारही केला जाणार नाही, असेही बाळा यांनी सांगितले.

समितीने म्हटले-आमचा आदेश संपूर्ण राज्यात मान्य असेल

दही-हांडी समन्वय समितीचे अरुण पाटिल यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रमध्ये अंदाजे 1100-1200 दही हांडी मंडळ आहेत. यातील अनेक मुंबई आणि ठाण्यात आहेत. आम्ही घेतलेला निर्णय नागरिकांसाठी आहे, याचे पालन राज्यातील सर्व मंडळाना करावे लागेल.

आज ३६६१ जणांना घरी सोडले

0

मुंबई, दि. २५ : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५२ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
आज सोडण्यात आलेल्या ३६६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात २८४४ (आतापर्यंत एकूण ५४ हजार ५८१) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४०१ (आतापर्यंत एकूण ११ हजार ७००), नाशिक मंडळात १४२ (आतापर्यंत एकूण ३७९४), औरंगाबाद मंडळ ७७ (आतापर्यंत एकूण २६३९), कोल्हापूर मंडळ ३२ (आतापर्यंत एकूण १४१५), लातूर मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण ६००), अकोला मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण १५१६), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण १२०८) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

कोरोनावरील प्रभावी औषधे जुन अखेरीस जिल्ह्यात उपलब्ध होणार ;आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0

राज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अँटी बॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय

खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानी दर आकारणीवर नियंत्रण

मुंबई, दि.२५:  राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होणारी सामान्य रुग्णांची पिळवणूक थांबावी यासाठी खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यांचा प्रति किमी दर निश्चित करून त्याप्रमाणेच दर आकारणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा म्हणून ओळख असलेल्या आशा कार्यकर्तींच्या मानधनात २००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील ७१ हजार आशा कार्यकर्त्यांना लाभ मिळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध निर्णयंबाबत माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आरोग्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह संवादातील ठळक मुद्दे असे:

· कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने आकारणी केली जाते. त्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागामार्फत समिती नेमण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णवाहिकांची यादी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त या रुग्णवाहिका ताब्यात घेतील आणि त्यांचे प्रति किमी दर निश्चित केले जातील. त्यानुसार रुग्णांकडून दराची आकारणी होईल. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल. सामान्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

· कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेमीसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे मागणी केली. त्यानुसार आता राज्यात जून महिन्याच्या अखेरीस ही औषधे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होतील.

·  राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत आज राज्याच्या मंत्रिमंडळाने ठराव केला असून तो केंद्राकडे पाठवणार आहे. असा ठराव करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परिक्षा ऑगस्टमध्ये नियोजीत आहे. मात्र हे विद्यार्थी परिक्षेच्या अभ्यासाला लागल्यावर राज्यातील रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्सची कमतरता जाणवेल. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे परिक्षा पुढे ढकलण्याचा ठराव केला आहे.

· शहरी भागातील आरोग्य सेवेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून समन्वय व्हावा यासाठी यपुढे संचालक (शहरी आरोग्य) हे नविन पद निर्माण करण्यात आले असून त्याची येत्या दोन दिवसात नियुक्ती केली जाईल.

· ग्रामीण भागात आशा वर्कर ७४ प्रकारचे विविध कामे करतात त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो मात्र राज्य शासनाकडून २००० रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारे आशा वर्कर आता १५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळवी शकतात. गटप्रवर्तकांना ३००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

·  कोरोना बरोबर जगण्यासाठी एसएमएस ही त्रीसुत्री अंगीकारावी लागेल. यातील एस म्हणजे सोशल डिस्टसिंग, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायजरचा वापर करणे.

· राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी ३० दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्के आहे.

· मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज सुमारे २० हजार चाचण्या केल्या जात आहेत. ॲण्टीजेन आणि ॲण्टीबॉडी चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोस्टल गुजरात पॉवर कंपनीकडून वीज खरेदीस मान्यता- ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत

0

मुंबई, दि. २५: कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड या गुजरात येथील औष्णिक वीज प्रकल्पातून पूरक वीज खरेदीसाठी करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. या प्रकल्पातून निर्माण होणारी 760 मेगावॅट वीज खरेदीसाठी 22 एप्रिल 2007 रोजी महावितरण कंपनीने दीर्घ मुदतीचा करार केला असून त्याचा समतल दर 2 रुपये 26 पैसे प्रती युनिट इतका आहे. 

कोस्टल गुजरात प्रकल्पासंदर्भात उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी विचारात घेऊन सर्व वीज खरेदीदार राज्यांची संयुक्तपणे एक समान दराने समान अटी व शर्तींसह पूरक वीज खरेदी करार करण्यास सहमती असल्यास केंद्रीय विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेच्या अधिन राहून पूरक वीज खरेदी करार करण्यात येईल. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

कॉंग्रेसने मतपेटीचे राजकारण आणि आतंकवादाचे दुष्टीकरण केले-गडकरी

0

पुणे, ता. २५ जून

सुखी, समृद्ध राष्ट्र निर्मितीसाठी केवळ राज्य बदलायचे नाही तर समाज बदलायचा आहे. समाजाचे सामाजिक, आर्थिक परिवर्तन झाले पाहिजे. राजकारण हे त्याचे माध्यम आहे. देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा महत्वाची आहे. कॉंग्रेसने मात्र मतपेढीचे राजकारण आणि आतंकवादाचे दुष्टीकरण केल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र जनसंवाद या व्हर्च्युअल रॅलीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या २० हजारहून अधिक बूथ प्रमुख आणि वीस लाखांहून अधिक नागरिकांना मार्गदर्शन करताना गडकरी बोलत होते. मोदी सरकारच्या दुसर्या पर्वातील प्रथम वर्षपूर्तीनिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश हळदणकर, खासदार गिरीश बापट, पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरली मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे आदी पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

गडकरी म्हणाले, ‘अस्पृश्यता, जातीयता, सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करायची आहे. सुखी संपन्न, समृद्ध राष्ट्रनिर्मितीसाठी सुशासन आणि विकास साधायचा आहे. त्यासाठी र्इ-गव्हर्नन्स महत्वाचे आहे. अंत्योदय ही प्रेरणा आहे. जीवननिष्ठा आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांना अपेक्षित समाजातील दरिद्र नारायणाला देव माणूस त्याची सेवा करावी, रोटी, कपडा, मकान मिळावे हे आपली जीवन निष्ठा आहे. कार्यकर्त्यांचे चाल, चलन आणि चरित्र महत्वाचे आहे.’

गडकरी म्हणाले, ‘या देशात गुलामगिरीचे प्रतिक असणारे ३७० कलम मोदी सरकारने काढून टाकले. थेट लढून भारताचा मुकाबला करता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर जम्मू कश्मिरमध्ये पाकिस्तानने आतंकवादी संघटन आयात करण्याचे धोरण आखले. पण आज सरकार खंबीर आहे. आपल्या कृतीतून मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले. गेल्या सहा वर्षांत आतंकवादाचे समूळ नष्ट करून आणि जम्मू कश्मिरचा विकास करण्याचे सरकारचे धोरण आहे. आतंकवादाबरोबर नक्षलवादाविरोधात खंबीर लढा सुरू आहे. आदिवासींच्या विकासासाठी सुवर्णसंधी प्राप्त करून दिली. देशाच्या एकता आणि अखंडतेबाबत तडजोड करणार नाही अशी सरकारची ठाम भूमिका आहे. त्यामुळे देशात बाह्य आणि अंतर्गत सुरक्षितता निर्माण झाली आहे.’

गडकरी पुढे म्हणाले ‘देश आर्थिक संकटातून चालला आहे. कोरोनाची लढार्इ महत्वाची आहे. त्याविरोधात आपल्याला यश मिळेल. जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत लढायचे आहे.  नकारात्मकता, नैराश्यावर मात करायची आहे. आत्मविश्वास वाढविला पाहिजे. तसा  विश्वास समाजात आणि देशात निर्माण झाला पाहिजे. देशाच्या हितासाठी पंतप्रधानांनी कठोर निर्णय घेतले. त्यात राजकारण केले नाही. संघर्षात यशस्वी होण्यासाठी सकारात्मकता महत्वाचे आहे. ते आपल्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. ती निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि नेत्यांची आहे. मजबूत राजकीय इच्छाशक्ती, सकारात्मकता आणि आत्मविश्वास या त्रिसुत्रीतून कोरोनाविरोधात यशस्वी होऊ.’

गडकरी पुढे म्हणाले, ‘उद्योजक, लघुउद्योग, हातमाग उद्योग अडचणीत आहेत. सरकार त्यांच्यामागे उभे आहे. सर्वांनी सकारात्मकता ठेवावी. शेतकरी कठीण परिस्थितीत आहे. साखर उद्योग अडचणीत आहे. शेतकर्याचे रक्षण कसे होर्इल हा महत्वाचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने इथेनॉल धोरण आणले. त्याची अर्थव्यवस्था २० हजार कोटी रुपयांची झाली आहे. ती एक कोटीपर्यंत न्यायची आहे. उसाच्या रसापासून थेट इथेनॉल करायचे आहे. साखरचे उत्पन्न थांबवण्याची गरज आहे. त्यामुळे उसउत्पादक शेतकरी वाचू शकेल.’

पश्चिम सुरत अहमदनगर १२ हजार कोटी रुपयांचा मार्ग नव्याने प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, मुंबर्इ परिसरात  नवीन विकासाचा मार्ग उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.    

रस्त्याची मोठ्या प्रमाणातील विकासकामे, पालखी मार्ग, उरमोडी, म्हैसाळ, टेंभू अशी अपुरी राहिलेली धरणे पूर्ण केली, कोल्हापूर वैभववाडी रेल्वे, स्मार्ट सिटी, मेट्रो, साखर कारखानदारी वाचविण्यासाठी प्रयत्न असे महत्‌वाचे प्रकल्प मार्गी लावल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.

पाटील पुढे म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात तत्परतेने रुग्णालयांची निर्मिती, पीपीर्इ किट निर्मिती, वेळेत लॉकडाउन, लॉकडाउन काळात साधनांची उपलब्धता, मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोदींचे उत्तम नियोजन आणि दूरदृष्टी या मुळे अन्य देशाच्या तुलनेत कोरोनाचा प्रतिबंध करण्यात यश मिळाले.’  

लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतमजूर कुटुंबाकडून आत्महत्येचा प्रयत्न

0

जुन्नर -लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतमजूर कुटुंबाने विहिरीत आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून की काय या सर्वांचे प्राण वाचले आणि माणसातल्या माणुसकीचा प्रत्यय सुद्धा या कुटुंबाने अनुभवला.

मूळचे संगमनेर(ता.नगर) येथील शेतमजुराने त्याची पत्नी व दोन लहान मुलींसह जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीच्या शिंदे बाम्हणे मळा येथील एका विहिरीत मंगळवारी 23 जून रोजी दुपारी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तेथे असलेल्या तरुणाने चौघांना विहिरीतून काढून जीवदान दिले आहे.विहिरीत पडलेल्या त्या चौघांचा आवाज ऐकून तेथील ग्रामस्थांनी आरडाओरड केला तेथून जवळच  पिंपळवंडी गावचे माजी उपसरपंच नंदकुमार बाम्हणे यांच्या शेतात  बोरी(ता.जुन्नर) येथील युवक दीपक शंकर सुर्यवंशी हा  काम करत होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारली आणि त्या चौघांना पाण्याच्या बाहेर काढले.त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना वर काढण्यात आले आणि तत्काळ आळेफाटा(ता.जुन्नर) येथील युनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.  युनिक हॉस्पिटलचे डॉ.आकाश आवारी,डॉ.राहुल पावडे व डॉ.सतीश कजबे हे त्यांच्यावर मोफत उपचार करणार आहेत.

संगमनेर येथील शेतमजूर विजय गुंजाळ, पत्नी रेश्मा गुंजाळ, दोन लहान मुली दिव्या(वय 3) आणि  तनुष्का(वय 6) यांच्यासह चार दिवसांपूर्वी आळेफाटा येथे काम शोधण्यासाठी आले होते. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांना कुणीही काम देत नव्हते. काम नसल्याने खाण्यासाठी जवळ पैसे नव्हते यात कुटुंबाची उपासमार होत होती. यातून नैराश्य येऊन विजय यांनी कुटुंबासह आत्महत्येचा निर्णय घेतला आणि पिंपळवंडी येथील विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला .

लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवस्थापकाची आत्महत्या

0

पुणे-सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका हॉटेल व्यवस्थापकाने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार आज गुरुवार सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडीस आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमनाथ कृष्णा शेट्टी (वय: 43 वर्षे, रा. हॉटेल राज, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचं नाव आहे. राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांनी प्राण गमावले. पण या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. याच नैराश्यातून पुण्यात हॉटेल व्यवस्थापकाने टोकाची भूमिका घेतली आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ हे गेल्या सात वर्षांपासून ‘हॉटेल राज’ चालवत होते. लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून हॉटेल बंद होतं. त्यामुळे नैराश्य येऊन त्यांनी हॉटेलमध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एका कर्मचाऱ्याने हॉटेल उघडल्यानंतर सदर घटना उघडीस आली.

दरम्यान, घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून ‘लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. त्यामुळे मला नैराश्य आल्यानं मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये’ असं त्यात लिहिलं आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

‘मन की बात’मध्ये पेट्रोल किमतींवर बोलण्याचे आवाहन जनतेने मोदींना करावे:मोहन जोशी

पुणे-. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर रविवारी ‘मन की बात’ मध्ये आकाशवाणीवरून देशाला संबोधित करताना अनेक विषयांवर भाष्य करतात. जनतेशी संवाद साधताना त्यांनी ‘मन की बात’साठी विषय सुचवण्याचे आवाहनही ते करतात. मोदींचे हे आवाहन लक्षात घेऊन राज्यातील जनतेने त्यांना यावेळच्या ‘मन की बात’साठी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचा विषय लाखो लोकांनी सुचवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केले आहे. 

जोशी पुढे म्हणाले की, पंतप्रधान राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांबरोबरच अगदी छोट्याशा गावातील स्तुत्य उपक्रमाची नोंद घेऊन त्याचाही उल्लेख ‘मन की बात’मध्ये करतात पण देशाला भेडसावत असलेल्या मुख्य विषयांना मात्र जाणीवपूर्वक बगल देतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सलग १९ व्या दिवशी वाढ झाली असून किमतीच्याबाबतीत डिझेलने पेट्रोललाही मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या चार महिन्यांपासून कच्च्या तेलाचे भाव निच्चांकी पातळीवर आहेत. मोदी सरकारने याचा थेट फायदा जनतेला देण्याचे टाळून नफेखोरी करण्यावर भर दिला आहे. सध्याचे कच्च्या तेलाचे दर पाहता पेट्रोल-डिझेल प्रति लिटर ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीला विकणे शक्य आहे.

डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीएचे सरकार असताना कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल १६४ डॉलरपर्यंत पोहचले होते, अशा परिस्थितीतही त्यांनी पेट्रोलियम पदार्थांच्या किमती स्थिर ठेवून जनतेवर जादा बोझा पडणार नाही याकडे लक्ष दिले होते. मोदी सरकार व मनमोहनसिंग सरकारच्या काळातील कच्च्या तेलाच्या किमतींची तुलना करता पेट्रोल-डिझेलच्या किमतीही निच्चांकी पातळीवर आणणे शक्य आहे. जनतेला महागाईचे चटके बसत असताना त्याची जाणीव पंतप्रधान मोदी यांना करुन देण्यासाठी लाखो लोकांनी ‘मन की बात’ मध्ये किमती कमी करण्याचा विषयावर बोलण्याचे आवाहन करावे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

राज्यात ५ लाख ९१ हजार व्यक्ती ‘क्वारंटाईन’

0

मुंबई, दि. २५ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ५ लाख ९१ हजार व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २४ जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार १,३५,४३१ गुन्हे नोंद झाले असून २७,५६९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ८ कोटी ८७ लाख ५५  हजार ५६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी  ५ लाख १२ हजार २७५ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २७९ घटना घडल्या. त्यात ८५८ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर वर १ लाख ४ हजार फोन

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,०४,४९२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७४६ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९१,५२९  व्यक्ती Quarantine  आहेत, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८४,४६१ वाहने जप्त करण्यात आली.

पोलीस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३३ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३४, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २ ठाणे २ पोलीस व ठाणे ग्रामीण १अधिकारी २, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना  पोलीस अधिकारी १, उस्मानाबाद १ अशा ५४ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १०६ पोलीस अधिकारी व ८८४ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कॅम्प

राज्यात सध्या एकूण ९५ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ३,१७४ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 7 हजार 548

0

पुणे विभागातील 13 हजार 576 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 22 हजार 59 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 25 :- पुणे विभागातील 13 हजार 576 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 22 हजार 59 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 7 हजार 548 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 472 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.54 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.24 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 17 हजार 905 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 10 हजार 601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 664 आहे. कोरोनाबाधित एकूण 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 365 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.21 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.57 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 706 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 631, सातारा जिल्ह्यात 14, सोलापूर जिल्ह्यात 22 , सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 864 रुग्ण असून 680 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 143 आहे. कोरोनाबाधित एकूण 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 209 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 388 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 585 आहे. कोरोना बाधित एकूण 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 316 रुग्ण असून 197 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 110 आहे. कोरोना बाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 765 कोरोना बाधीत रुग्ण असून 710बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 46आहे. कोरोना बाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 48 हजार 902 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 45 हजार 750 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 152 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 23 हजार 364 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 22 हजार 59 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 25 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

भाजपच्या ढिसाळ कारभारामुळे स्मार्ट पुण्याची पाण्याअभावी शोकांतिका – आबा बागुलांचा आरोप

0

पुणे- महावितरणच्या केबल बंद पडल्यामुळे निम्म्या पुण्यात पाणीपुरवठा होऊ शकला नाही ,स्मार्ट म्हणविणाऱ्या पुण्याची हि शोकांतिका सत्ताधारी भाजपच्या ढिसाळ कारभारा मुळे झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे नवनिर्वाचित गटनेते आबा बागुल यांनी केला आहे.

पर्वती जल शुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफार्मर व केबल बंद पडल्यामुळे संपूर्ण दक्षिण पुणे व परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. कोरोनाला नागरिक धीराने तोंड देत असताना अशी आपत्ती येणे हि दुर्दैवी बाब आहे. पुणे स्मार्ट सिटी बनले आहे. असा धिंडोरा पिटत असताना वस्तुस्थिती किती विदारक आहे याचे हे चित्र आहे. पाणी पुरवठा वेळेत सुरु झाला नाही तर नागरिकांनी करायचे काय ? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे असे आबा बागुल यांनी म्हंटले आहे.

आज पहाटे दोन वाजता पर्वती जलकेंद्र येथे मोठा बिघाड झाल्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता संपूर्ण पर्वती परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आज शहरातील सर्व पंम्पिंग स्टेशनकडे  एमएसइबीच्या केबल लाईन दुहेरी असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा आपत्तीना तोंड देण्यासाठी एमएसीबीच्या दुहेरी केबल टाकण्याची  व बॅकअपसाठी येथे जनरेटरची   तरतूद करावी लागेल . यासाठी यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तानी लक्ष घालून अशा आपत्कालीन संकटांना तोंड कसे द्यायचे याची भविष्यात आखणी करावी व अश्या प्रकारे पुणेकरांना आकस्मित संकटांना सामोरे जावे लागू नये पाण्याच्या लाईन बरोबरच  सुएज ट्रीटमेंट लाईनला देखील एमएसबीची दुहेरी केबल लाईन असणे गरजेचे आहे. जेणेकरून अश्याप्रकारे संकट आल्यास त्वरित दुसऱ्या लाईनवर ट्रार्न्सफार्मर लगेच सुरु होतील व पुणेकरांना अश्या संकटाना सामोरे जावे लागणार नाही. तसेच पर्वती जलकेंद्रातील बंद पडलेली महावितरणची लाईन लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे असे संकट पुन्हा ओढवू नये यासाठी महापौरांनी खबरदारी घ्यावी असे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले अंदाजे ५० लाख लोक संख्येचे पुणे असताना एक  लाईन बस्ट  झाल्याने  अर्ध्या पुण्याचा पाणी पुरवठा बंद होतो. जर १५ दिवस हा संकट ओढवले तर पुणे शहर कोणाच्या भरवश्यावर राहील याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. स्मार्ट सिटी बनवत असताना  या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे असे आबा बागुल शेवटी म्हणाले