Home Blog Page 2530

राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२८: राज्यात आज कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार  ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ९६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ६० मृत्यू हे मुंबई मनपा-२३, ठाणे मनपा-२,नाशिक-३, नाशिक मनपा-५, पुणे मनपा-२०, सोलापूर मनपा-४, सांगली-१, रत्नागिरी-१. या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहायॲक्टिव्हरुग्णांचा तपशील

मुंबई : बाधित रुग्ण- (७५,५३९), बरे झालेले रुग्ण- (४३,१५४), मृत्यू- (४३७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,००६)

ठाणे : बाधित रुग्ण- (३४,२५७), बरे झालेले रुग्ण- (१४,३३५), मृत्यू- (८४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,०७६)

पालघर : बाधित रुग्ण- (५२६७), बरे झालेले रुग्ण- (१७६७), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३९९)

रायगड : बाधित रुग्ण- (३६६९), बरे झालेले रुग्ण- (१९२४), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४८)

रत्नागिरी :  बाधित रुग्ण- (५६९), बरे झालेले रुग्ण- (४२३), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०)

सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१५१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

पुणे : बाधित रुग्ण- (२०,८७०), बरे झालेले रुग्ण- (१०,७०८), मृत्यू- (७१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४४८)

सातारा :  बाधित रुग्ण- (१००४), बरे झालेले रुग्ण- (७०३), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७)

सांगली : बाधित रुग्ण- (३४७), बरे झालेले रुग्ण- (२०१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

कोल्हापूर : बाधित रुग्ण- (८२४), बरे झालेले रुग्ण- (७१०), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४)

सोलापूर : बाधित रुग्ण- (२५८८), बरे झालेले रुग्ण- (१४३०), मृत्यू- (२४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१२)

नाशिक : बाधित रुग्ण- (३९०२), बरे झालेले रुग्ण- (२०६३), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६२२)

अहमदनगर : बाधित रुग्ण- (३९९), बरे झालेले रुग्ण- (२४९), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३६)

जळगाव : बाधित रुग्ण- (३००२), बरे झालेले रुग्ण- (१७९३), मृत्यू- (२२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८९)

नंदूरबार : बाधित रुग्ण- (१६६), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)

धुळे : बाधित रुग्ण- (९६२), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५७)

औरंगाबाद : बाधित रुग्ण- (४८३३), बरे झालेले रुग्ण- (२२२२), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३८४)

जालना : बाधित रुग्ण- (४८८), बरे झालेले रुग्ण- (३१३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)

बीड : बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

लातूर : बाधित रुग्ण- (३०३), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५)

परभणी : बाधित रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३)

हिंगोली : बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

नांदेड : बाधित रुग्ण- (३३७), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

उस्मानाबाद : बाधित रुग्ण- (२०३), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

अमरावती : बाधित रुग्ण- (५२८), बरे झालेले रुग्ण- (३६८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

अकोला : बाधित रुग्ण- (१४६३), बरे झालेले रुग्ण- (८६९), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२०)

वाशिम : बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

बुलढाणा : बाधित रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१४०), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

यवतमाळ : बाधित रुग्ण- (२८३), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)

नागपूर : बाधित रुग्ण- (१४२१), बरे झालेले रुग्ण- (१०३७), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७०)

वर्धा : बाधित रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४)

भंडारा : बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)

गोंदिया : बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

चंद्रपूर :  बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

गडचिरोली : बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये : बाधित रुग्ण- (७४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

एकूण:बाधित रुग्ण-(१,६४,६२६),बरे झालेले रुग्ण- (८६,५७५),मृत्यू- (७४२९),इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(७०,६०७)

(टीप-आजराज्यात एकूण नोंदविलेल्या १५६ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ९६ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत.यामृत्यूंमध्ये मुंबईतील ६४,ठाणे२४,जळगाव,जालनाआणि अमरावतीयांचा समावेश आहे.हे९६ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.हीमाहिती केंद्र सरकारच्या आय.सी.एम.आर.पोर्टलवरमान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.प्रयोगशाळाअहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो)

वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राला निधीची मागणी करणार – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

0

नागपूर,दि.28 जून 2020, लॉकडाउनच्या काळात महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली.या काळातील  वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत, वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे  निधीची मागणी करणार असून लवकरच याबाबतचे पत्र केंद्राला लिहिणार असल्याचे डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले. मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे तो लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीकोनातून ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आज नागपुरातील उर्जा अतिथी गृह, बिजली नगर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. घरगुती वीज ग्राहकांचे विद्युत शुल्क, वीज बिलाचे हफ्ते तथा कालावधी, एकरकमी विजेच्या बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना सवलत, वीज बिल हफ्त्यावरील व्याज तसेच इतर राज्याने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून महावितरणने स्वयंपूर्ण प्रस्ताव दोन दिवसात सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. लॉकडाउनमुळे ग्राहकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना अतिरिक्त भुर्दंड पडू नये तसेच त्यांना वीज बिल भरण्यासाठी जास्तीत जास्त सवलत कशा पद्धतीने देता येइल यादृष्टीने महावितरणने पाउले उचलावीत. सोबतच,  बिलाबाबत ग्राहकांचे समाधान होण्यासाठी ग्राहकांशी प्रत्यक्ष अधिकाधिक संवाद वाढवावा, वीज बिल सोप्या भाषेत समजावून सांगावे , त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभावी वापर आणि जनमताच्या कौलाचा आदर देखील केला पाहिजे असेही ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी सांगितले.   मुंबई येथून प्रधान सचिव(उर्जा) दिनेश वाघमारे, संचालक(संचलन) दिनेशचंद्र साबू, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, प्रभारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, कार्यकारी संचालक (देयक व महसूल) योगेश गडकरी तर  नागपूर येथून हाय पॉवर कमिटीचे अनिल नगरारे, अनिल खापर्डे, महावितरण प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यवस्थापक वित्त व लेखा शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे प्रामुख्याने उपस्थित होते.

विठू माउली तू माऊली जगाची ..प्रार्थना तुजला या कोरोना मुक्तीची

0

कोरोना मुक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंगाला गृहमंत्र्यांचे साकडं

मुंबई/पंढरपूर दि.२८- आषाढी एकादशीची वारी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला काल भेट दिली.
महाव्दार चौकातून दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला साकडं घातलं “विठू माउली तू माऊली जगाची आर्त साद तुज ही कोरोना मुक्तीची” संपूर्ण जग भारत व महाराष्ट्रातून या कोरोनाला घालव व शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या.”
यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आ.भारत भालके उपस्थित होते.
पांडुरंगाच्या दर्शना नंतर गृहमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले की, पालखी सोहळ्याबाबत शासनस्तरावर घेण्यात येणारा निर्णय नागरिक आणि भाविकांच्या हिताचा असेल. त्या निर्णयाबाबत भाविकांनी व जनतेने सहकार्य करावे.
भाविकांनी घरातूनच नामस्मरण व पूजा करावी
-आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
गृहमंत्र्यांना यावेळी वीणा, वारकरी पारंपरिक पोशाख, तुळशी हार देण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी गृहमंत्र्यांना दिली.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
………………………………..

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात पुणे शहर काँग्रेसतर्फे उद्या आंदोलन

0

पुणेकेंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात पुणे शहर काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. २९) सकाळी १०.३० वा. साहित्यसम्राट न. चि. केळकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.

आधीच कोरोना – लॉकडाऊन ने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अनेक व्यावसायिक,नौकार्दारांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत त्यात मागील २ महिन्यापासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. या दरवाढीचा महागाईवर परिणाम झाला आहे.कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन असताना महागाई मात्र सातत्याने वाढती आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलायला तयार नाहीत. पेट्रोल-डिझेल दर कमी करावे, या मागणीसाठी प्रामुख्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे.

त्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश बागवे यांनी केले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून काँग्रेस केंद्र सरकार विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.चीनच्या वाढत्या दादागिरी विरोधात त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहे. तर, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सातत्याने होत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सोमवारी आंदोलन होणार आहे. त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

कोरोनावरील औषधोपचार, सुविधांमध्ये महाराष्ट्र मागे नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

अर्थचक्राला गती देण्यासाठीच अनलॉक, पण धोका टळलेला नाही

मुंबई, दि. २८ :- केवळ आर्थिकचक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’ सुरु केल असलं तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला नाही, गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा, असे आवाहन करताना महाराष्ट्र हा औषधोपचार आणि सुविधा देण्यात कुठेही मागे नसून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील, असेही आवाहन केले.  केसेस पुन्हा वाढतांना दिसल्या तर नाईलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. आता असे होऊ द्यायचे का याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असेही मुख्यमंत्री जनतेला संबोधित करताना म्हणाले

आज मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते

कृषी दिन आणि राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांनी १ जुलै रोजी येणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस असून हा सप्ताह शेतकरी सप्ताह म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात दिवसरात्र शेतात राबून अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनाही मी विनम्र नमस्कार करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तक्रारींची गंभीर दखल

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातून बोगस बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसुल केली जाईल.

कर्जमुक्त करणार

कर्जमुक्तीच्या योजनेची अंमलबजावणी करताना काही ठिकाणी निवडणुकीची आचारसंहिता आल्याने आणि नंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देता आला नाही ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील जनतेचा, वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल दर्शनाला जाणार

आपल्यातील एकसंघपणा कायम ठेवताना आतापर्यंत शासनाला ज्याप्रकारे सहकार्य दिले तसेच सहकार्य यापुढे ही कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मियांना धन्यवाद देतांना म्हटले की सर्वांनी सामाजिक भान ठेऊन शिस्तबद्धरितीने सगळे सण साधेपणाने आणि घरातल्या घरात साजरे केले. सर्वांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. वारीचा सोहळा यावेळी नाईलाज म्हणून संयम दाखवत साजरा केला जात असतांना वारकऱ्यांचा, राज्यातील विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठ्ठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही व त्याच्या चरणी कोरोनामुक्त राज्याचे साकडे घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहीहंडी उत्सव रद्द केल्याबद्धल आभार 

कोणतीही चर्चा न करता स्वतःहून सामाजिक भान राखत दहीहंडीचा उत्सव रद्द करणाऱ्या मंडळांचेही आभार मानले. ते म्हणाले की, सर्वधर्मियांनी आतापर्यंत अतिशय साधेपणाने सण साजरे केले आहेत. कारण आपण हे सामाजिक भान पाळले नाही तर संकटाचे दार आपोआप उघडणार आहे. त्यामुळे हे सामाजिक भान आपल्याला जपावेच लागेल.

गणेश मुर्ती ४ फुट ऊंचीची

सर्व गणेशमंडळांनीही एकसुरात सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मोठ्या २०/ २२ फुट ऊंचीच्या मुर्ती स्थापित करण्याची आजची परिस्थिती नाही. कारण मुर्ती हलवतांना जास्त माणसे लागू शकतात. ते आजच्या परिस्थितीत शक्य नाही. म्हणून ४ फुट ऊंचीपर्यंतची मुर्ती यावर्षी स्थापित करण्याचे सांगण्यात आले आहे. गणेश आगमन आणि विसर्जनाची मिरणवूक काढता येणार नाही. मग उत्सव नेमका कसा साजरा करायचा, यावर चर्चा करून फक्त परंपरा कशी जपता येईल यादृष्टीने लवकरच निर्णय कळवू असेही ते म्हणाले. विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने राज्य कोरोनामुक्त करुया, आपण ठरवलं तर ते नक्की करू शकतो असे सांगतांना त्यांनी आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीरे यासारखे जनजागृतीचे कार्यक्रम आखून आपण हा उत्सव साजरा करू असे देखील म्हटले.

औषोधोपचारात महाराष्ट्र जगाच्या बरोबरीने उभा; प्लाझ्मा दान करा

कोरोना रुग्णावरील उपचारांना आपण कुठेही कमी पडत नसल्याचे सांगतांना जी जी औषधे यासाठी सुचवली जात आहेत ती उपलब्ध करून घेऊन रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपला महाराष्ट्र उपचारात जगाबरोबरीने उभा असल्याचे सांगतांना ते म्हणाले की, प्लाझमा थेरपीची सुरुवात महाराष्ट्रात मार्च – एप्रिलपासून सुरु करण्यात आली. १० पैकी ९ रुग्ण यामुळे बरे झाले तर ७ जण घरीही गेले. प्लाझमा थेरपी करणारे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी, ॲण्टीबॉडिज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझमा दान करण्याचे आवाहन ही केले.

रेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे आपण वापरतच आहोत. याचा पुरवठा सुरळित झाला की कुठेही तुटवडा पडू देणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, शासकीय निमशासकीय रुग्णालयातही औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न आहे.

ज्येष्ठ डॉक्टरांना आवाहन

महाराष्ट्राला तुमच्या अनुभवाची गरज असल्याचे आवाहन करतांना मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ डॉक्टरांना पुढे येऊन रुग्णसेवा देण्याचे आवाहन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आपल्याला आवश्यक असलेली सर्व सुरक्षा साधने पुरवण्यात येतील. 

‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये हालचाल वाढली, संपर्क वाढल्याने रुग्णसंख्या वाढलेली दिसत असली तरी ‘चेस द व्हायरस’ ही संकल्पना मुंबईप्रमाणे राज्यात सुरु केल्याचे व औषधोपचार, टेस्ट वाढवण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पावसाळ्यात घ्या काळजी

पावसाळ्यात डेंग्यु, मलेरिया, लिप्टो यासारखे आजार डोके वर काढतात हे लक्षात घेऊन नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छता बाळगून कुठेही पाणी साठू देऊ नये, असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले. गर्दी करून कोरोनाला आपणहून निमंत्रण देऊ नका, गाफील राहू नका असे ही ते यावेळी म्हणाले.

गरीब कल्याण योजनेची मुदत ३ महिन्यांनी वाढवा

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ३० जून रोजी संपत असल्याने ती आणखी ३ महिन्यांसाठी वाढवून देण्याची विनंती आपण पंतप्रधानांसमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास

गुंतवणूकदारांना महाराष्ट्र आपला वाटतो ही गोष्ट खुप महत्त्वाची असून गेल्या आठवड्यात १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे करार विविध कंपन्यासोबत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच यामध्ये भुमीपुत्रांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळणार असून त्यादृष्टीने गुंतवणूकदारांना सोयी, सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

घरातच राहा, सुरक्षित राहा शाळा सुरु होण्यापेक्षा शिक्षण सुरु होण्याला सध्याच्या परिस्थितीत महत्त्व दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ३० जूनला लॉकडाऊन संपणार आणि सगळेच व्यवहार पुन्हा सुरु होणार या भ्रमात न राहण्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजही ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणे नाहीत. पण म्हणून त्यांना प्रादुर्भाव झाला नाही, असे नाही असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचे, मास्क वापरण्याचे, स्वच्छता पाळण्याचे, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले.

पुणे विभागात आता ॲक्टीव रुग्ण 9 हजार 19

0

पुणे विभागातील 15 हजार 95 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 25 हजार 127 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 28 :- पुणे विभागातील 15 हजार 95 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 25 हजार 127 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 9 हजार 19 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 487 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 20 हजार 577 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 11 हजार 942 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 937 आहे. कोरोनाबाधित एकूण 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 356 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.04 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.39 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 157 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 990, सातारा जिल्ह्यात 57, सोलापूर जिल्ह्यात 84, सांगली जिल्ह्यात 09 तर कोल्हापूर जिल्ह्यात 17 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 974 रुग्ण असून 711 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 221 आहे. कोरोनाबाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 434 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 515 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 666 आहे. कोरोना बाधित एकूण 253 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 328 रुग्ण असून 214 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 104 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 814 कोरोना बाधीत रुग्ण असून 713 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 91 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 67 हजार 400 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 64 हजार 561 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 39 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 25 हजार 127 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 28 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

पुणे शहरातील “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग” प्रोजेक्ट पथदर्शी ठरेल: -सतेज पाटील

0

वाहतूक राज्यमंत्र्यांकडून “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग” प्रोजेक्ट चे स्वागत 

पुणे:
पुणे शहरात प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आणि व्ही-ट्रो मोटर्स प्रा.लि. यांच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणारा
“इलेक्ट्रिक बाईक रेंटींग” प्रोजेक्ट  पथदर्शी ठरेल,राज्याचा परिवहन राज्यमंत्री म्हणून मी या उपक्रमाचे कौतुक करतो आणि अशा पर्यावरण पूरक उपक्रमांना शासनाचे नक्कीच पाठबळ राहील, अशा शब्दात रविवारी  परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रकल्पाच्या घोषणेचे स्वागत केले. 
26 जून रोजी पुणे महापालिकेच्या  शहर सुधारणा समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर आज  यासंबंधीचे  ट्विट परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी  रविवारी केले. 

शहरामध्ये वाढते प्रदुषण व  वाढती वाहतुक कोंडी  कमी करण्यासाठी व्ही-ट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातुन ‘ग्रीन पुणे’ संकल्पनेसाठी “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट” हि संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार असुन या इलेक्ट्रिक बाईक ने प्रवास करण्यास केवळ कमीत कमी ९० पैसे प्रती कि.पासुन जास्तीत जास्त ४ रु प्रती किमी  खर्च पुणेकरांना येणार आहे .या प्रोजेक्ट मधून माफक भाड्यात इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध होणार आहेत.तसेच या कंपनीच्या माध्यमातून या बाईक विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असतील.
हा प्रकल्प राबविण्यासाठी एका ठिकाणी १० बाईक चार्ज होतील, असे मुख्य रस्त्यावर एक चार्जींग स्टेशन अशा प्रकारचे पुणे शहराच्या विविध भागामध्ये मुख्य रस्त्यांवर ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता  पुणे शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.
या प्रकल्पामुळे भविष्यात पुणे मेट्रो ने प्रवास करणार्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असुन एकुणच शहरातील वाहतुक कोंडी, प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. महत्वाचे म्हणजे सदर प्रकल्पासाठी पुणे मनपा ला कोणतीही आर्थिक गुंतवणुक करावी लागणार नाही.
  परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या उपक्रमाची माहिती घेऊन आपल्या ऑफिशियल ट्वीटर अकौंट वरून उपक्रमाचे कौतुक केले आहे.

पेट्रोलची मुळ किंमत आहे साडेचोवीस रुपये लीटर..तुम्ही किती मोजताय ..?

0

कोरोना-लॉक डाउन च्या काळात सरकारने ही केली लूट 

पुणे : गेल्या मार्च पासून लोकांचे उतपन्न, कमाई,नौकरी,धंदा धोक्यात आल्याने प्रचंड नुकसान सहन करत लोक कसे बसे जगत आहेत, या काळात अनेकांनी भाव, दर वाढ मनमानी करत लूट केली आहे खुद्द सरकार ही यात मागे राहिलेले नाही त्यांनी चार महिन्यात  पेट्रोलवर 16 रुपये तर डिझेलवर 19 रुपयांचा कर वाढवला आहे.सध्या राज्यात पेट्रोलची मूळ किंमत 24.62 रुपये आहे. त्यावर केंद्र सरकारचे 32.98 तर राज्य सरकारचा 25.30 रुपये कर आकारण्यात येत आहे तर डीलरच्या कमिशन पोटी 3.16 वाहनचालकांना मोजावे लागत आहेत. डिझेलची मूळ किंमत 26.4 रुपये असून केंद्राचा 31.83 आणि राज्य सरकारचा 17.5 रुपये कर तर 2.53 रुपये डीलरचे कमिशन घेतले जात आहे. एकाच वस्तूसाठी वेगवेगळे कर भरावे लागत असल्याने व त्याची टक्केवारी देखील मोठी असल्याने इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याच्या नुसत्या पोकळ चर्चा होत आहेत. मात्र कोणतेही सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नसून त्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध करांमुळे इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल जर जीएसटीच्या अंतर्गत आले राज्यातील त्याच्या किमती निम्म्याने कमी होतील.पण याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही .पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आले तर मूळ किमतीवर 28 टक्के पेक्षा जास्त कर लावता येणार नाही. त्यामुळे मूळ किंमत 24.62 रुपये प्रति लिटर पेट्रोलवर 28 टक्के जीएसटी लावला तर त्याची किंमत 31.51 रुपये होते. तर डिझेल 33.33 रुपये प्रति लिटर होईल.

राज्यात कोरोनाच्या ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. २७ : राज्यात आज कोरोनाच्या ५३१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ४४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८४ हजार २४५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.९४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १ लाख ५९ हजार १३३ नमुने पॉझिटिव्ह (१७.७४ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार  १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.५७ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ८६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे मनपा-१,कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, वसई-विरार मनपा-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१. मालेगाव मनपा-१, धुळे-३, जळगाव-५, पुणे मनपा-१५, पिंपरी-चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-१, सातारा-१, कोल्हापूर-१, सांगली-१, औरंगाबाद -१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (७४,२५२), बरे झालेले रुग्ण- (४२,३२९), मृत्यू- (४२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७,६३१)

ठाणे: बाधित रुग्ण- (३२,७३५), बरे झालेले रुग्ण- (१३,८०२), मृत्यू- (८१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,११३)

पालघर: बाधित रुग्ण- (४८८०), बरे झालेले रुग्ण- (१५०८), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२७१)

रायगड: बाधित रुग्ण- (३५१८), बरे झालेले रुग्ण- (१८९३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२८)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५४५), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)

पुणे: बाधित रुग्ण- (१९,७६१), बरे झालेले रुग्ण- (१०,३३५), मृत्यू- (६९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७३२)

सातारा:  बाधित रुग्ण- (९४६), बरे झालेले रुग्ण- (७०१), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१)

सांगली: बाधित रुग्ण- (३३२), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८०९), बरे झालेले रुग्ण- (७१०), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२५३६), बरे झालेले रुग्ण- (१४२३), मृत्यू- (२४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७१)

नाशिक: बाधित रुग्ण- (३७०३), बरे झालेले रुग्ण- (२००७), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३३८), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)

जळगाव: बाधित रुग्ण- (२८९९), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (२१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५२)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१६५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८)

धुळे: बाधित रुग्ण- (९३५), बरे झालेले रुग्ण- (३९९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (४५८६), बरे झालेले रुग्ण- (२१६७), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१९२)

जालना: बाधित रुग्ण- (४७०), बरे झालेले रुग्ण- (३१३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)

बीड: बाधित रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

लातूर: बाधित रुग्ण- (२७५), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५)

परभणी: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

नांदेड: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

अमरावती: बाधित रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (३६८), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४)

अकोला: बाधित रुग्ण- (१३८५), बरे झालेले रुग्ण- (८६३), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४८)

वाशिम: बाधित रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

नागपूर: बाधित रुग्ण- (१४००), बरे झालेले रुग्ण- (१०२१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)

वर्धा: बाधित रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४)

भंडारा: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

एकूण: बाधित रुग्ण-(१,५९,१३३), बरे झालेले रुग्ण- (८४,२४५), मृत्यू- (७२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(६७,६००)

 (टीप- आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १६७ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८१ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, जळगाव -५, धुळे -४, अहमदनगर -२, नाशिक -२, वसई विरार -१, पिंपरी चिंचवड -१, जालना -१ आणि लातूर -१ यांचा समावेश आहे. हे ८१ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचे दिनांक ९ मार्च २०२० ते ७ जून २०२० या कालावधीतील बाधित रुग्णांच्या संख्येचे रिकॉन्सिलेशन पूर्ण झाले असून त्यानुसार जिल्ह्यांच्या/मनपाच्या प्रगतीपर रुग्णसंख्येमध्ये बदल झाले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 8 हजार 535

0

पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 23 हजार 970 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 27 :- पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 23 हजार 970 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 8 हजार 535 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 990 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 496 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 19 हजार 587 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 11 हजार 375 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 532 आहे. कोरोनाबाधित एकूण 680 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 381 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.07 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.47 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 811 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 747, सातारा जिल्ह्यात 29, सोलापूर जिल्ह्यात 10, सांगली जिल्ह्यात 06 तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 917 रुग्ण असून 689 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 186 आहे. कोरोनाबाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 350 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 640 आहे. कोरोना बाधित एकूण 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 319 रुग्ण असून 207 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 102 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 797 कोरोना बाधीत रुग्ण असून 712 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 75 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 60 हजार 717 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 58 हजार 785 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 932 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 34 हजार 487 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 23 हजार 970 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 27 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

गलवानची घटना संरक्षण मंत्रालयाचे अपयश नाही, शरद पवारांकडून केंद्र सरकारची पाठराखण

0

सातारा. भारत आणि चीनदरम्यान सीमेवर वाद सुरुच आहे. यावर काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दीक युद्ध सुरू झाल आहे. आता या मुद्द्यावर माजी संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची पाठराखण केली आहे. शनिवारी शरद पवार म्हणाले की, देशाच्या सुरक्षेचे राजकारण व्हायला नको. आपल्याला हे विसरुन नाही चालणार की, 1962 च्या युद्धानंतर चीनने जवळ-जवळ 45,000 वर्ग किलोमीटर भारतीय भूमीवर ताबा मिळवला होता.

राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी हे विधान केले

शरद पवारांचे हे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधींच्या त्या आरोपानंतर आले आहे, ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘सरेंडर मोदी’ म्हणत, आरोप लावला होता की, मोदींना भारताच्या सीमेला चीनला समर्फित केले. 15 जूनच्या रात्री पूर्व लद्दाखमध्ये चीनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारताचे 20 जवान शहीद झाले होते. प्रत्युत्तरात भारतानेही चीनचे अनेक सैनिक मारले.

भारतीय सैन्य सीमेवर नेहमी सतर्क असते

पवार पुढे हेदेखील म्हणाले की, लद्दाखमध्ये गलवान घाटीच्या घटनेला लगेच संरक्षण मंत्रालयाचे अपयश म्हणता येणार नाही, कारण भारतीय सैनिक सीमेवर नेहमी सतर्क असतात. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना पवारांनी म्हटले की, हे संपूर्ण प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. चीनकडून गलवानमध्ये भारताला डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे.

दिल्लीत बसलेल्या संरक्षण मंत्र्याचे अपयश नाही

पवार पुढे म्हणाले की, “भारत आपल्या सीमेत गलवान घाटीत एक रस्ता बनवत होता. चीनी सैनिकांनी यात अडथळा आणला. यादरम्यान आपल्या सैनिकांसोबत धक्काबुक्की झाली. हे कोणाचे अपयश नाही. जर पेट्रोलिंगदरम्यान कोणी आपल्या देशात घुसले, तर आपण याचे खापर दिल्लीत बसलेल्या संरक्षण मंत्र्यांवर फोडू शकत नाही.”

पुढे म्हणाले की, “तिथे पेट्रोलिंग सुरू होती. लढाई झाली, याचा अर्थ भारतीय सैनिक सतर्क होते. जर भारतीय सैनिक सतर्क नसते, तर चीनी सैनिक कधी भारतात घुसले, समजलेही नसते. त्यामुळे मला वाटत नाही की, अशावेळी फक्त आरोप करणे बरोबर आहे.”

त्या वेळेस खूप मोठा जमिनीचा तुकडा त्यांनी घेतला

राहुल गांधींकडून लावलेल्या आरोपाला उत्तर देताना पवार म्हणाले की, दोन्ही देशामध्ये 1962 ला झालेले युद्ध कोणीच विसरू शकत नाही. यात चीनने भारताच्या 45,000 वर्ग किमी जमिनीवर कब्जा केला होता. ती जमीन आताही चीनकडे आहे. मला आता माहित नाही की, चीनने परत कोणत्या क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे का नाही. पण, जेव्हा मी एखादा आरोप लावतो, तेव्हा मला लक्षात घ्यायला हवं की, मी सत्ते होतो, तेव्हा काय झाले होते. त्यावेळी इतक्या मोठ्या जमिनीच्या तुकड्यावर चीनने कब्जा केला, हे विसरुन चालणार नाही. अशावेळी राजकारण करणे योग्य नाही.”

संत तुकाराम महाराज अन् संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे ‘लालपरी’ तून पंढरपूरकडे होणार प्रस्थान

0

आळंदी. देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीला आळंदीतून पंढरपूरला एसटीने रवाना होतील. अवघ्या वीस व्यक्तींसोबत पोलिस बंदोबस्तात शिवनेरी बसद्वारे या पादुका पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला देण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांच्याकडे पादुका नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घातले आहे. एसटी बसमध्ये केवळ 20 जणांना बसण्याची परवानगी असणार आहे. यासोबतच फिजिकल डिस्टसिंगचे पालन करणए आवश्यक असणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका या पारंपरिक रस्त्याने 30 जून रोजी दशमीला मार्गस्थ होतील. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यासंदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिलेले आहेत.

सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा अगदी सध्या पद्धतीने होत आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान तुकोबा-माऊलींच्या गजराने आळंदी आणि देहू नगरी दुमदुमून जात होती. मात्र यावर्षी वारी रद्द करण्यात आली. यामुळे मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 12 आणि 13 जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले होते. मात्र, त्या मूळ मंदिरांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, दोन्ही संतांच्या पादुका या पंढरपूरकडे एसटीने जाणार की, हेलिकॉप्टरने जाणार याविषयी कोणताही निर्णय झालेला नव्हता. अखेर यावर निर्णय झाला आहे. लालपरीने दोन्ही संतांच्या पादुका पंढरपुरात रवाना होणार आहेत.

पडळकरांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही -फडणवीसांची वक्तव्ये प्रसिद्धी लोलुप – शरद पवार

0

सातारा-गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, त्यांचं अनेक वेळा डिपॉझिट जप्त केलं आहे, कशाला बोलायचं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी निशाणा साधला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर सर्व स्तरातून त्यांच्या विरोध करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनेही केली होती. आता स्वतः शरद पवार यांनी याविषयावर भाष्य केलं आहे. सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

शरद पवार यांना धनगर आरक्षणाचे फक्त राजकारण करावयाचे आहे. त्यामुळे शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे बेताल विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली असून ती पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे अजेंडा नाही, भूमिका नाही आणि व्हिजनदेखील नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकावयाचे, त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि त्यांच्यावरतीच पुन्हा अन्याय करण्याची नेहमी भूमिका राहिली आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

भाजपला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, यावर अनेक चर्चा झाल्या, मात्र शरद पवारांनी नंतर भूमिका बदलली असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पुढे ते म्हणाले होते की, दोन वर्षांपूर्वी एक स्थिती अशी होती. ज्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार हा निर्णय झाला होता. मात्र राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार असतील. तरीही शिवसेनेला सोबत घेऊनच चालावं लागेल असे पंतप्रधान मोदींनीकडून स्पष्ट सांगण्यात आले होते. जर काँग्रेसला बाजूला ठेवायचे असेल तर शिवसेनेला सोबत घेणे गरजेचं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना निरोप दिला होता की, जर शिवसेना नसेल तर आम्ही तुम्हाला घेत नाही.

आतापर्यंत १४५ विमानांनी तब्बल २२ हजार २५१ प्रवासी मुंबईत दाखल

0

मुंबई, दि. २७ : ‘वंदेभारत’ अभियानातून परदेशात अडकलेल्या नागरिकांना मुंबईत उतरवून घेण्याची व त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात असून आतापर्यंत १४५ विमानांनी तब्बल २२ हजार २५१ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईच्या प्रवाशांची संख्या ८०७०, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ७६८६ आणि इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ६४९५ इतकी आहे.

१ जुलै २०२० पर्यंत आणखी २६ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका,  म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स नैरोबी, न्युयार्क, जॉर्जिया आणि कामेरून अशा विविध देशातून हे प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

‘वंदेभारत’ अभियानातील कामकाज हे जिल्हाधिकारी मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट), महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि. यांच्या समन्वयाने केले जात आहे.

‘वंदेभारत’ अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

गृहनिर्माण संस्थेत घरकाम करणाऱ्या, कामगारांना प्रवेश नाकारू नये – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

0

मुंबई, दि.27 : कोविड-19 या विषाणूचा संसर्ग  टाळण्यासाठी  शासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व वाहनचालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही, त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना, कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

श्री.पाटील म्हणाले, कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांमध्ये घर कामगार व वाहनचालक यांना गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कामकाजाकरिता प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही.  मात्र काही गृहनिर्माण संस्था या कामगारांना प्रवेश प्रतिबंधित करत आहेत. तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी संस्थांच्या स्तरावर शासनाच्या निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याच्या सभासदांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

कामगारांना प्रवेश देण्यासंदर्भात गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. तसेच शासन नियमांच्या विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत, अशा सूचनाही श्री.पाटील यांनी केल्या आहेत.