Home Blog Page 2528

नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

0

कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार – मुख्य सचिव संजय कुमार

मुंबई, दि. 30 : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या श्री.संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव श्री.अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. कोरोना नियंत्रणासाठी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करतानाच अर्थव्यवस्थेला बळकटी, खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाला मूर्त स्वरूप देण्याला प्राधान्य असेल, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी याप्रसंगी सहकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.

यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री.मेहता यांनी मुख्य सचिव संजय कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य सचिव म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून राज्याचे प्रशासन कोरोना संकटाचा यशस्वी मुकाबला करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी केली जाईल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्न करतानाच राज्यातील खरीप हंगामासाठी जे नियोजन करण्यात आले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्यात येईल. पावसाळा सुरू झाला आहे. या काळात रोगराईचे प्रमाण वाढू शकते ते रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येतील.

मुख्य सचिव संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या 1984 च्या तुकडीचे असून आता पर्यंतच्या 36 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. 1985 मध्ये अमरावतीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांची त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.

1997 मध्ये उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेचे प्रकल्प समन्वयक, ऊर्जा नियामक आयोगाचे सचिव, पुणे महापालिका आयुक्त, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष, औरंगाबाद विभागीय आयुक्त, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले तर  महिला व बालकल्याण, गृहनिर्माण या विभागांचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे गृह विभागाचा अतिरीक्त कार्यभारही देण्यात आला होता.

चक्रिवादळग्रस्तांचे पंचनामे अद्यापही अपूर्ण, नुकसानभरपाईचे निकषही चुकीचे -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


अलिबाग दि.३० जून :- कोकणातील चक्रिवादळाच्या तडाख्यात सापडलेले कोकणवासीय अद्यापही सावरले नाहीत. सरकारने नुकसानभरपाईची केलेली घोषणा ही अतिशय तुटपुंजी आहेत. इतक्या दिवसानंतरही येथील चित्र अतिशय विदारक आहे. या ठिकाणचे पंचनामे अजूनही अपूर्ण आहेत. चक्रिवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देतानाचे निकषही चुकीचे असून यामुळे जनतेच्या पैशांच्याच अपव्यय होत आहे. त्यामुळे चक्रिवादळग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासमवेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड येथे कोरोना नियंत्रणाबाबत व निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आमदार रविशेठ पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड. महेश मोहिते, सीईओ दिलिप हळदे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निसर्ग वादळामुळे झालेले नुकसान साधारणता ७० ते ७५ टक्के इतके आहे.निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या नुकसानीचे काही पंचनामे पूर्ण झाले असून काही अजूनही अपूर्ण आहेत. काही घरांचे केवळ पत्रे उडाले आहेत अशांना देखील दीड लाखांची मदत करण्यात येते. काही नुकसान झाले नाही अशांनी देखील दीड लाख रुपये मिळणार असतील तर हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. म्हणून जनतेच्या पैशांचा अपव्यय होता कामा नये अशी ठाम भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली.हे राजकीय पार्श्वभूमीतून होतंय का याबाबत चौकशी करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.एका गावात दहा लोकांचा पंचनामा होत असताना बाकीच्या वीस लोकांचा पंचनामा होत नसेल तर यामागे राजकीय पाठबळ आहे का याचीही चौकशी व्हावी अशी मागणी दरेकर यांनी केली.त्याचबरोबर कोकणातील वादळग्रस्तांचे अपूर्ण पंचनामे पूर्ण करा,१५ टक्के ते २५ टक्के नुकसानीला २५ हजार तर ५० टक्के नुकसानीला ५० हजार मदत तात्काळ द्या, जे पंचनामे राजकीय उद्देशाने गावस्तरावर आणि तालुकास्तरावर झाले आहेत त्याची चौकशी करा असे निर्देश दरेकर रायगड रायगड यांनी दिले.

दरेकर म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठ मोठ्या निधीची घोषणा करून कोकणच्या जनेतला खोटी आश्वासनं दिली. तरी येथे राज्य शासनाचा नेमका किती निधी आला,जाहीर केलेला किती निधी वितरित करण्यात आला,वितरणात काही प्रशासकीय अडचणी आहेत का त्याचबरोबर आणखी कशाप्रकारे यांना मदत करत येईल या उद्देशाने आपण रायगड जिल्ह्याचा दौरा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निसर्ग वादळाचा तडाखा बसला त्याच्या दुसऱ्याच दिवशी सर्वप्रथम कोकणला भेट दिली. सरकारचे लक्ष वेधले.माझया दौऱ्यानंतर मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील येथे येऊन पाहणी केली. असे असताना तिसऱ्यांदा इकडे येऊन नेमकं या विषयात काय मदत झाली आहे, पुन्हा काही मदत होईल का याचा आढावा घेतला.तरी कोकणाला मदत करत असताना राज्य शासनाच्या काही त्रुटी असल्यास त्या सरकारला सांगून वेळप्रसंगी कठोर पावले उचलू असा इशारा दरेकर यांनी दिला.

दरेकर म्हणाले, बागायतदारांचे नुकसान झालं त्यासाठी शेतकऱ्यांना ५० हजार इतकी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली.तरी प्रत्येक गुंठ्या मागे पाचशे रुपये द्या अशी मागणी केली. या मागणीचा विचार राज्य शासनाने केला नाही याबाबत खंत व्यक्त करताना ते म्हणाले, झाडांसाठी नुकसानभरपाई देत असताना प्रत्येक झाडामागे नुकसानभरपाई द्या अशी मागणी आम्ही केली. याला आदरणीय शरद पवार यांनी देखील दुजोरा दिला. असे असताना ५० हजार हेक्टरी मदतची घोषणा राज्य शासनाने केली ही अत्यंत तुटपुंजी आहे. या मदतीचा कोकणवासीयांना काडीमात्र उपयोग होणार नाही.एक झाड पंधरा ते वीस वर्ष उत्पन्न देतं.इतक्या वर्षाचं पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर ५० हजार इतकी राज्य शासनाची मदत कूचकामी असल्याची टीका दरेकर यांनी केली

कोकणातील बागा उध्वस्त झाल्याने येथील बागायतदार पूर्णपणे हवालदिल झाला आहे. त्याला पुन्हा उभा करण्यासाठी फलोत्पादन करणे आवश्यक आहे. तरी फलोत्पादनासाठी बी-बियाणं , झाड रोप सरकारने मोफत द्यावी. यासाठी कोणतेही पैसे आकारले जाऊ नये. त्याचबरोबर सरकारने कोकणात पाच लिटर रॉकेल देणार असल्याचे सांगितले. परंतु रॉकेलसाठी पैसे आले नसल्याचे सांगून एक ते दोन लिटर दिले जात आहे असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.सरकार ५ लिटर रॉकेल देणार असल्याचे सांगून आता पैसे नसल्याचे कारण देते त्यामुळे सरकार संकटातही गंभीर नसून याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 9 हजार 531

0

पुणे विभागातील 16 हजार 372 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 26 हजार 974 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 30 :- पुणे विभागातील 16 हजार 372 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 26 हजार 974 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 9 हजार 531 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 588 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.70 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.97 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 22 हजार 135 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 13 हजार 98 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 414 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.35 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 25 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 898, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 79, सांगली जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर जिल्ह्यात 8 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 31 रुग्ण असून 720 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 268 आहे. कोरोनाबाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 609 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 733 आहे. कोरोना बाधित एकूण 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 360 रुग्ण असून 226 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 122 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 839 कोरोना बाधीत रुग्ण असून 716 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 113 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 74 हजार 95 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 71 हजार 155 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 940 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 43 हजार 853 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 26 हजार 974 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 30 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

‘त्या’ अधिकाऱ्याचे २८ कोटीचे ‘टेंडर षड्यंत्र’ हाणून पाडणार -आबा बागुल (व्हिडीओ)

0

प्रथम कोरोनाशी लढा नंतर विकास व नागरी प्रश्न सोडवण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रमावर भर देणार

पुणे- महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते पदी माझी निवड करून माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल काँग्रेसपक्ष अध्यक्षा  श्रीमती सोनिया गांधी,   खासदार राहुल गांधी, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात ,जेष्ठ नेते पृथ्वीराज  चव्हाण व अशोक चव्हाण,शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी गटनेते अरविंद शिंदे   आणि पुण्यातील पक्ष्याचे सर्व नेते पदाधिकारी,नगरसेवक यांच्याबद्दल कृतज्ञता  व्यक्त करतो १९९२ पासून सलग सहा वेळा मी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे, पक्षाने अनेक पदांची जबाबदारी माझ्यावर टाकली.  या गेल्या २८ वर्ष्यांच्या अनुभवाचा फायदा पुण्याचा विकास आणि प्रश्न सोडवण्यासाठी नक्की होईल हा मला विश्वास वाटतो 
पुण्यात सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या आधारे नागरिकांच्या हिता  विरुद्धचे निर्णय घेऊ नये याबद्दल मी दक्ष राहिलच याशिवाय काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. त्यांच्याकडून पुण्याचे नागरी प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकास योजना राबविण्यासाठी मोठा निधी मित्र पक्षाच्या सहकार्याने राज्य सरकारकडून आणण्यावर माझा भर राहील.
पुण्याच्या पाच प्रमुख प्रश्नांबाबत मी विशेष जागृतीने व आग्रही भूमिकेतून काम करणार आहे. पुण्याची कोरोना च्या पार्श्वभूमीवर  पुण्याची सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम करून पुणे सिटिझन्स हेल्थ ग्रीन कार्ड सारखी योजना राबविणे, इंदिरा संजीवनी झोपडपट्टी पुनर्वसन  योजनेस मान्यता घेऊन झोपडपट्या  आणि झोपडपट्टीवासियांचे सक्षम पुनर्वसन करणे , पुण्याच्या वाहतूक प्रश्नावर  रामबाण उपाय असणाऱ्या हाय कपॅसिटी मास ट्रानझिट रोड (एचसीएमटीआर) हा मूळ प्रस्तावित २४ मीटर चा एलेवेटेड मार्ग पूर्ण करून घेणे, तळजाई टेकडी पर्यावरण पूरक हरित कवच निर्माण  व्हावी यासाठी तळजाई विकास प्रकल्प राबविणे आणि जपानच्या जायका  कंपनीतर्फे पुरस्कृत मुठा नदी विकास प्रकल्प पूर्ण क्षमतेने व गतीने राबविणे.पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पाच बाबींवर  मी प्राधान्याने काम करणार आहे. या सोबतच कचरा व्यवस्थापन व  शुद्ध पाणीपुरवठा, प्रदूषण नियंत्रण आणि युवावर्ग  व महिलांना चांगला रोजगार आणि महिलांना सुरक्षित वातावरण याला देखील  काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून मी प्राधान्य देणार आहे. 
पुणेकर नागरिकांचे मोलाचे सहकार्य मला लाभावे आणि पुणेकरांचे नागरी प्रश्न सुटण्यास व पुण्याचा चौफेर विकास गतिमान होण्यासाठी मी करणार असलेल्या कामास पुणेकरांचे आशीर्वाद मिळावेत हि भावना हे पद स्वीकारताना मी व्यक्त करतो.

पुण्याच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी सेवक भरती करून त्यांच्याकडून अतिक्रमने काढणे या कामासाठी अवघे ५ वर्षात तीन हजार रुपये नफा मिळेल अशा पद्धतीचे संशयास्पद टेंडर आलेले आहे. यामागे षड्यंत्र आहे. गोरगरीबांना उल्त्णारे हे षड्यंत्र आपण यशस्वी होऊ देणार नाही . एकीकडे लॉक कोरोना मुळे आर्थिक विवंचनेत असताना गळफास घेऊन आत्महत्या करत आहेत तर अनेक जन पोट भरण्यासाठी रस्त्यावर शक्य तो व्यवसाय करून जगण्यासाठी धडपड करत आहेत अशा अवस्थेत ज्या अधिकार्याने अशा गरिबांच्या पोटावर पाय देण्यासाठी हे टेंडर षड्यंत्र उभे करून भाजपची साथ घेतली आहे . त्या अधिकाऱ्याला आपण त्याची जागा दाखवून देऊ ,पण कोणत्याही परिस्थितीत हे षड्यंत्र राबवू देणार नाही . आपल्या पुढे कोराना चे संकट प्रामुख्याने पुढे उभे आहे त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे यास सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल असे आबा बागुल यांनी स्पष्ट केले.

‘कोरोना’ संकटाविरुद्धच्या लढ्याबद्दल डॉक्टरांचा ऋणी;डॉक्टर बांधवांचं स्थान लोकांच्या हृदयात कायम राहील… – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, :- ‘रुग्णसेवे’च्या माध्यमातून मानवतेची सेवा करणारे डॉक्टर समाजासाठी नेहमीच आदरणीय आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या फळीतील योद्धे म्हणून ते लढत असताना त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला आहे. कोरोना संकटात डॉक्टर बांधवांकडून होत असलेली मानवसेवा इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली जाईल, त्यांचं स्थान आपल्या हृदयात कायम राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार संदेशात म्हणतात की, ‘कोरोना’च्या संकटाविरुद्ध जगभरातील डॉक्टर जोखीम पत्करुन एकजुटीने लढत आहेत. जगभरातील डॉक्टरांची एकजूट, ज्ञानाच्या, अनुभवाच्या आदानप्रदानाने हा लढा आपण नक्की जिंकू. जगभरातील डॉक्टर आज कोरोनाच्या संकटाविरुद्ध ज्या जिद्दीनं, ज्या भावनेनं लढत आहेत त्याला सलाम आहे. डॉक्टरांच्या सेवाकार्याबद्दल आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत. कृतज्ञ आहोत. आपणा सर्वांना डॉक्टर दिनाच्या मनापासून शुभेच्छा…

राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ५१२ गुन्हे दाखल; २७३ लोकांना अटक

0

मुंबई, – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५१२ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५१२ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय  गुन्हे दाखल

 ■ व्हॉट्सॲप- १९६ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – २१३ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ११ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६० गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक.

■  १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद

बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ५४ वर गेली आहे.

■ या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला धार्मिक रंग देणारा टिकटॉक व्हिडिओ बनवून प्रसारित केला,  त्यामुळे परिसरात काही काळ तणाव तयार झाला होता ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  शकला असता.

महाराष्ट्र सायबरचे आवाहन

शासनाने कोरोना महामारीच्या काळात म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हालचालींवर काही निर्बंध आखून दिले होते व त्याकरिता नियम देखील केले होते . सध्याच्या काळात सरकारने हे  घातलेले निर्बंध , नियम आणि अटी या शिथिल केल्या आहेत व ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपले दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यास मदत होईल.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून विविध सोशल मीडियावर काही मेसेज व पोस्ट फिरत आहेत की, “सर्वसामान्य जनता सोशल डिस्टनसिंग व अन्य काही नियमांचे पालन करत नाही, त्यामुळे सर्व शिथिल केलेल्या अटी ,नियम व निर्बंध सरकार पुढे चालू ठेवणार आहे.”

वरील नमूद आशयाचा मजकूर खोटा असून अशा कोणत्याही मेसेज व पोस्टवर विश्वास ठेवू नका व तुम्हीदेखील कोणाला फॉरवर्ड करू नका,असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

कोरोना महामारी संदर्भातील कोणत्याही माहितीबाबत केंद्र व राज्य सरकार हे नागरिकांना नियमितपणे अधिकृतरीत्या निवेदन करून सर्व माहिती तपशीलवारपणे देत असते ,त्यामुळे सर्व नागरिकांनी फक्त त्याच माहितीवर विश्वास ठेवा. तुम्ही जर व्हॉट्सॲप ग्रुप एडमिन  किंवा ग्रुप क्रियटर असाल व त्या ग्रुपवर कोणी असे मेसेज पाठवत असेल तर त्या ग्रुप सदस्यास तात्काळ ग्रुपमधून काही काळाकरिता  काढून टाकावे आणि ग्रुप settings बदलून only admins असे करण्याच्या सूचनाही महाराष्ट्र सायबरने दिल्या आहेत. अफवा पसरविणे हा कायदेशीर गुन्हा तर आहेच पण एक सामाजिक गुन्हा देखील आहे, हा गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा महाराष्ट्र सायबरने दिला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त अजित पवारांचे पांडुरंगाला साकडं, वारकऱ्यांनाही वंदन

0

देवा पांडुरंगा, यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे…बळीराजाच्या शेतात, घरात सुखसमृद्धी नांदू दे…
— उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाचं संकट दूर कर, कोरोनायोध्यांचे संरक्षण कर, महाराष्ट्राचं भलं करं, आव्हानं पेलण्याची शक्ती आम्हाला दे..
–उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, :- “देवा पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… ‘कोरोना’चं संकट दूर करुन सर्वांना चांगलं आरोग्य दे… जनतेला सुखी ठेव… कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोनायोद्ध्यांना बळ दे.. त्यांचं संरक्षण कर… देवा विठ्ठला महाराष्ट्राचं भलं कर, राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे…” असं साकडं पंढरपुरच्या पांडुरंगाचरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगभक्तांना, वारकऱ्यांना, राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकदशीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वंदन केलं असून महाराष्ट्राला, देशाला, जगाला कोरोनामुक्त कर, अशी आळवणी भगवंत विठ्ठलाकडे केली आहे. पंढरपुरच्या वारीची शेकडो वर्षांची परंपरा यावर्षीही प्रतिकात्मक पद्धतीनं कायम राखली गेली. संतांच्या पादूका परंपरेनुसार पंढरपूरला पोहचल्या, याचा आनंद व्यक्त करत असतानाच कोरोनाचं संकट लक्षात घेऊन आपापल्या घरी थांबून, आषाढी एकदशीला घरूनच पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्मरण, पूजा, भक्ती करत असलेल्या लाखो वारकऱ्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केलं आहे. त्यांचे आभार मानले आहेत. पुढच्या एकादशीला कोरोनाचं संकट जगातून हद्दपार झालेलं असेल आणि पुन्हा आपण नाचत, गाजत पंढरपूरची वारी करु, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन पांडुरंगभक्तांनी, राज्यातील जनतेनं अधिक काळजी घ्यावी. असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

वीजग्राहकांनो! विश्वास ठेवा, वीजबिल अचूकच!!

0

लॉकडाऊनच्या कालावधीमधील वीजवापरानुसारच युनिट संख्या

पुणे, लॉकडाऊनमुळे मार्चनंतर प्रथमच वापरलेल्या विजेचे प्रत्यक्ष रिडींग जून महिन्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे जूनच्या वीजबिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील (सुमारे 90 ते 97 दिवस) वीजवापरानुसार युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. या युनिट संख्येला सुमारे तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही अशी ग्वाही देत वीजग्राहकांनी विश्वास ठेवावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, जूनमध्ये मीटर रिडींगनुसार देण्यात येणारी वीजबिले अचूकच आहे. केवळ मीटर रिडरकडून अनावधानाने रिडींग घेण्यात काही चूक झाली असल्यासच वीजबिल चुकीचे असू शकते. मात्र महावितरणकडून रिडींगप्रमाणे देण्यात येणारी वीजबिल चुकीचे आहे हा गैरसमज ग्राहकांनी करून घेऊ नये असा स्पष्ट निर्वाळा वीजक्षेत्रातील तज्ञांनी देखील दिला आहे.

लॉकडाऊनमुळे एप्रिल व मे महिन्यात मीटर रिडींग उपलब्ध होऊ न शकलेल्या वीजग्राहकांना मागील तीन महिन्यांच्या वीजवापरानुसार सरासरी वीजबिल पाठविण्यात आले. मात्र जून महिन्यात मीटर रिडींगची प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे मार्चपासून ते जूनपर्यंत वीजवापरांची एकूण युनिट संख्या ही जूनच्या वीजबिलात नोंदविण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात ही युनिट संख्या केवळ जून महिन्याची नाही तर लॉकडाऊनच्या कालावधीमधील सुमारे 90 ते 97 दिवसांची आहे. या युनिट संख्येला तीन महिन्यांनी विभागून स्लॅबप्रमाणे 31 मार्चपूर्वीच्या व 1 एप्रिलनंतरच्या वीजदरानुसार बिलांची आकारणी करण्यात येत आहे.

समजा जूनच्या बिलामध्ये एकूण 612 युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. तर तीन महिन्यांसाठी प्रत्येकी 204 युनिटचा वापर झाला आहे असा हिशेब करून त्यातील पहिल्या 100 युनिटला 0 ते 100 आणि दुसऱ्या 104 युनिटला 101 ते 300 युनिट स्लॅबनुसार वीजदर लावण्यात येत आहे. यामध्ये आकारणी करण्यात आलेल्या एकूण रकमेत एप्रिल व मे महिन्यांचे वीजबिल भरलेले आहे असा हिशेब करून फिक्स चार्जेस व त्यावरील वीजशुल्क वगळून उर्वरित भरलेली रक्कम वजा करण्यात येत आहे. मात्र एप्रिल किंवा मे महिन्याचे बिल ग्राहकांनी भरलेले नसल्यास ते थकबाकी म्हणून दाखविण्यात येत आहे. याबाबतचा संपूर्ण हिशेब प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे.

वीजग्राहकांनी रिडींगप्रमाणे दिलेल्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. एप्रिल, मेमधील लॉकडाऊनचा कालावधी, प्रखर उन्हाळा व सर्वच जण घरी असल्याने वाढलेला वीजवापर आदींमुळे युनिटची संख्या वाढलेली आहे. मात्र 2019 मधील एप्रिल ते जूनच्या कालावधीतील वीजवापराचा विचार केल्यास यंदाच्या एप्रिल ते जूनपर्यंत तेवढाच वीजवापर झाल्याचे दिसून येत आहे. जूनमध्ये मागील दोन महिन्यांच्या युनिटच्या बिलाची रक्कम लावली असल्याने हे वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यात उद्यापासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’

0

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई,: राज्यात उद्यापासून कृषि दिनानिमित्त ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे कृषी सप्ताहाची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते आणि कोणे या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार आहेत. याचबरोबर कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील.

पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब करीत उद्यापासून ते 7 जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी  दि. 1 जुलै रोजी कृषिदिन साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते त्यासाठी कृषि विभागातील अधिकारी – कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि कृषि विस्तार यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत कृषि विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्था यांनी संशोधित केलेल्या अद्ययावत कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश कृषिमंत्री श्री.भुसे यांनी दिले आहेत. 

या सप्ताहांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आहे, असे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

या सप्ताहामध्ये गावात बैठक आयोजित करतानाच शेतकऱ्यांनी राबविलेल्या कृषिविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांना देखील भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी मोहिम हाती घ्यावी. पुरस्कारप्राप्त शेतकरी, प्रयोगशील शेतकरी तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांचे तालुकास्तरीय कार्यक्रमात व्याख्यान आयोजित करावे, कृषि विषयक योजना, पतपुरवठा याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणिवजागृती मोहिम हाती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू

0

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई, : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने 24 फेब्रुवारी 2020 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करून सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस ठरवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर येत्या 4 जुलै 2020 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ज्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा पाणीपुरवठा केंद्रावरील नियमित आस्थापना, रूपांतरित स्थायी/अस्थायी आस्थापना आस्थापना, कार्यव्ययी आस्थापना, रोजंदारीवरील आस्थापना, सफाई कामगार यांना हा आदेश लागू राहणार नाही.

शासनाच्या नगरविकास विभागाने 21 जानेवारी 1984 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरी सेवा नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने 23 मार्च 2017 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम व शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे केली होती. या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करून विभागाने व शासनाने ही मागणी मान्य केली व कर्मचारी हिताचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

या निर्णयानुसार  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सर्व कार्यालयांची कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवण्यात आली असून येत्या 4 जुलैपासून कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत राहणार आहे. दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान अर्ध्या तासासाठी भोजनाची सुट्टी देण्यात येणार आहे. कार्यालयातील शिपायांसाठी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत कामकाजाची वेळ ठरविण्यात आली आहे. 

माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला रवाना

0

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विधीवत पूजन

एसटी बसद्वारे पालखीचे प्रस्थान

अमरावती : गत सव्वाचारशे वर्षांची परंपरा असलेल्या कौंडण्यपुरातील रुक्मिणीमातेच्या पालखीचे आज एसटी बसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते माता रूक्मिणीच्या पालखीचे विधीवत पूजन होऊन पालखी रवाना झाली. यावेळी ‘जयहरी विठ्ठल’च्या जयघोषात विदर्भाची पंढरी कौंडण्यपूरनगरी दुमदुमून गेली होती.

शतकानुशतकांची परंपरा असलेल्या व विविध शतकांतील संत-महात्म्यांच्या सहवासाने पुनित झालेली ही पालखी परंपरा कोरोना संकटकाळातही अखंडित राहिली. आज सकाळी दहाच्या सुमारास 20 वारकऱ्यांचा समावेश असलेली ही पालखी एसटी बसने आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला रवाना झाली.  

जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज सकाळी रुक्मिणी मातेच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. मंदिरापासून  पालखी मार्गक्रमण करत गावाच्या वेशीपर्यंत आणण्यात आली व नंतर 20 वारक-यांसोबत पादुका पंढरपूरकडे रवाना करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीनामाच्या जयघोषाने यावेळी आसमंत दुमदूमून गेला होता. पालखी सोहळ्यात वारक-यांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. पालकमंत्र्यांनीही यावेळी फुगडी खेळली. ‘माऊली माऊली’च्या जयघोषाने अवघी कौंडण्यपूर नगरी चैतन्यमय झाली होती. 

येथून दरवर्षी तीनशेहून अधिक वारकरी पायी पालखी घेऊन निघतात. पुढेही ठिकठिकाणी शेकडो वारकरी बांधव या पालखीशी जोडले जातात. यंदा कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन दक्षतेच्या अनुषंगाने 20 वारकरी रवाना झाले आहेत. सव्वाचारशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि विविध शतकांतील संत महात्म्यांच्या सहवासाने पुनित झालेली ही पालखी केवळ विदर्भातीलच नव्हे, तर समस्त महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोरोना संकट आले तरी ही परंपरा खंडित झाली नाही. योग्य ती दक्षता घेऊन पालखी आज रवाना झाली याचा खूप आनंद आहे, अशी भावना पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली.

श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर आहे. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशीला येथून सुमारे 425 वर्षांपासून पालखी पंढरपूरला जाते. रुक्मिणी मातेची पालखी ही पहिली मानाची पालखी मानली जाते. आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त दि. 1 जुलै रोजी आषाढी यात्रा श्री क्षेत्र पंढरपूर येथे भरणार आहे. यात्रेत प्रमुख संतांच्या पादुकांचा श्री पांडुरंगास भेटीचा सोहळा असतो. त्यानिमित्त राज्यभरातून पालख्या पंढरपूरला येत असतात. सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन पालख्यांवर काहीशी मर्यादा आली, मात्र महत्वाच्या पालख्यांना योग्य ती दक्षता घेऊन पालखी आणण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.  

कौंडण्यपूर येथील सव्वाचारशे वर्षांची प्राचीन परंपरा लक्षात घेऊन ही परंपरा अखंडित राहावी यासाठी शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रयत्न केले.  त्यानुसार शासनाने मान्यता दिली असून, विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहिली. आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला रवाना झाल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.

 दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौंडण्यपूरमध्ये भाविकांनी गर्दी न करता घरुनच माता रुक्मिणीचे दर्शन घेण्याचे आवाहन कौंडण्यपूर मंदिर प्रशासनाने भाविकांना केले आहे.

एक कोटीहून अधिक लोकांना ‘शिवभोजन’ चा आधार!

0

शिवभोजन योजना ठरतेय गरीबांसाठी वरदान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, : गोर-गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी  प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजना सुरू असून २६ जानेवारीपासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचा गरजूंनी लाभ घेतला आहे. या थाळीने राज्यातील गरीब, गरजूंना मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत ८४८ केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.  

महिनानिहाय थाळ्यांचे वितरण

१. जानेवारी- ७९ हजार ९१८

२. फेब्रुवारी – ४ लाख ६७ हजार ८६९

३. मार्च – ५ लाख ७८ हजार ०३१

४. एप्रिल – २४ लाख ९९ हजार २५७

५. मे – ३३ लाख ८४ हजार ०४०

६. जून- (२९ जूनपर्यंत) २९ लाख ९१ हजार ७५५ 

शिवभोजन थाळ्यांचे वितरण राज्यात झाले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर  लॉकडाऊनच्या काळात ५ रुपये थाळीप्रमाणे योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्याने काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले.

यंत्रणेचे कौतुक

या अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतुक केले आहे.

केंद्राची स्वच्छता

शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही – शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

0

अमरावती,: कोरोना संकटकाळामुळे शाळा सुरू होण्यात अडथळे निर्माण झाले तरीही विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर करून ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल. मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचीही व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे. शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन शिक्षण, जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चभाऊ कडू यांनी येथे केले.  

शिक्षण राज्यमंत्री श्री. कडू यांनी काल परतवाडा येथे शिक्षण विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, गट शिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, देवीदास खुराडे यांच्यासह अनेक अधिकारी व शाळांचे केंद्रप्रमुख उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, कोरोना संकटकाळात आरोग्याची सुरक्षितता जपण्यासह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन माध्यमांचा वापर करावा लागणार आहे. याचअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात प्रत्येकी १२ अशा २४ जि. प. शाळांमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘इझी टेस्ट ॲप’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी व उर्दू दोन्ही माध्यमांच्या शाळांत हा उपक्रम राबवला जाईल.  ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही, त्यांच्याही व्यवस्थेबाबत नियोजन होत आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या उपक्रमात सहभागी शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. इझी टेस्ट ॲपमध्ये शिक्षण, गृहपाठ, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील संवादाची सोय, उपस्थितीपत्रक, शैक्षणिक माहिती साठविण्याची सोय उपलब्ध आहे. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आदी सर्वांसाठी हे ॲप उपयुक्त आहे. प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येईल. त्याशिवाय, इतरही विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पंढरीत आज दुपारपासून गुरुवारपर्यंत संचारबंदी

0


आषाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

सोलापूर, दि. 29 : आषाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व आजूबाजूच्या परिसरात उद्या, मंगळवार (दि. 30) दुपारी दोन वाजल्यापासून ते गुरुवारी, दोन जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडता येणार नाही.पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख उपस्थित होते.
आषाढी वारीत संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नऊपालख्यांना अटी-शर्थीवर परवानगी दिली आहे. या पालख्या 30 जूनच्या रात्री 9 वाजेपर्यंत पंढरपुरात पोहोचतील. पालख्यांसोबत मानाचे 20 वारकरी असतील. त्यांची कोविड-19 चाचणी झालेली असावी, वृद्ध वारकऱ्यांना वारीत सामील होता येणार नाही. 1 जुलैला पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नींच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. यावेळी मंदीर समितीने ठरविलेले मानाचे वारकरीही असतील. स्नान करण्यास पाच वाजेनंतर परवानगी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मानाच्या नऊ पालख्या
पाच जिल्ह्यातून येणार आहेत. या प्रत्येक पालखीबरोबर 20 वारकरी असतील, त्यांची कोविड-19 ची तपासणी केलेली असावी. वृद्ध वारकऱ्यांना पालखीसोबत आणू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू, संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर, संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर, संत एकनाथ महाराज संस्थान, पैठण, संत नामदेव महाराज संस्थान, पंढरपूर, विठ्ठल-रूख्माई संस्थान, कौंडण्यपूर, चांगावटेश्वर देवस्थान, सासवड. दोन जुलैला सकाळपासून मानाच्या पालख्यांची विठ्ठल-रूक्मिणी मातेस भेटीचा आणि नैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यानंतर पालख्यांचे पंढरपूर येथून संबंधित संस्थानकडे प्रस्थान होणार आहे.

नागरिकांनी दर्शन व चंद्रभागेत स्नानासाठी विनाकारण गर्दी करू नये. केवळ मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती आणि मानाच्या पालखी प्रमुखांना प्रवेशपत्रिकेसह पादुकांसह मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. केवळ कर्तव्यासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांना परवानगी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वारीमध्ये महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 1500 पोलीस आणि एक राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी असणार आहे.

प्रसार माध्यमांना कव्हरेजचा पुरवठा
माध्यम प्रतिनिधींनी पंढरपूर परिसरात गर्दी करू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करून वृत्त संकलन करावे. मंदिरातील महापुजेचे वृत्त आणि व्हिडीओ, फोटो इत्यादींचे कव्हरेज प्रसार माध्यमांना इमेलद्वारे देण्याची व्यवस्था जिल्हा माहिती कार्यालयाने केली आहे.

भाविकांना लाईव्ह दर्शनाची सोय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. वारकरी व भाविकांनी पालख्या व विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी येऊ नये. घरातूनच लाईव्ह दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मंदिर समितीने www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर आणि जिओ टीव्ही, टाटा स्काय डिशवर श्रीचे लाईव्ह दर्शन 24 तास उपलब्ध आहे. तसेच ‘श्री. विठ्ठल रूक्मिणी देवस्थान’ या मोबाईल ॲप्लिकेशनवरही उपलब्ध आहे. गुगल प्लेस्टोअरमधून ॲप ‘श्री. विठ्ठल रूक्मिणी देवस्थान’ या नावाने उपलब्ध आहे. तसेच महापूजेच्या लाईव्हसाठी खाजगी चॅनेलने दूरदर्शनच्या डीटीएचमधून डीडी सह्याद्री ही लिंक डाऊनलोड करावी.

वीज बिल माफी करण्यासाठी मनसेची निदर्शने

0

पुणे –वीज बिल माफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अलका चौकात आज, सोमवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सरकारने नुसत्या पोकळ घोषणा न करता वाढीव वीज बिल तातडीने रद्द करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा मनसे यापुढे आक्रमकपणे सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.

मनसेचे प्रल्हाद गवळी, प्रशांत मते, राहुल गवळी, विक्रांत अमराळे, वसंत खुटवड, सुनील कदम, अभिषेक थिटे, राकेश क्षीरसागर, धनंजय दळवी, रोहन उभे, मनोज ठोकळ, उदय गडकरी, आकाश धोत्रे, शेखर बाळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
             कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्शवभूमीवर आलेल्या लॉक डाउन मुळे सर्वसामान्यांना हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जात असताना ठाकरे सरकारने वाढीव वीज बिल आकारणी करून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा भुर्दंड दिला आहे . वीज बिले आहेत कि खंडण्या ? असा जाब विचारून मनसे , पुणे शहर ने गेल्या आठवड्याभरापासून महावितरण व ऊर्जा मंत्र्यांविरोधात या विरोधात मोहीम उघडली आहे.
            रोजगार धंद्यांची वानवा आणि आखडते उत्पन्न यामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉक डाउन च्या काळातील वीज बिले सरसकट माफ करावीत अशी लेखी मागणी मनसे तर्फे या पूर्वीच .मुख्यमंत्री , ऊर्जा मंत्री व महावितरण चे मुख्य अभियंता यांकडे केली आहे . आणि सदर निर्णय होईपर्यंत महावितरण ने नागरिकांमागे वसुलीचा तगादा लावून त्यांच्या मीटर ला हाथ लावला तर म न से आपल्या पद्धतीने त्यांचा सामना करेल असाही इशारा देण्यात आला आहे.