Home Blog Page 2525

एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार पदांच्या भरतीसाठी ६ जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावे

0

पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती

मुंबई, दि. ४ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांचेकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने ६ ते ८ जुलै २०२० या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी ८ ते १२ जुलै २०२० या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.  

सद्यस्थितीत कोरोनाच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यातून बरेचशे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरीत झाले आहेत. परंतु राज्याच्या विकासासाठी राज्यातील पायाभूत प्रकल्प सुरू राहण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदार यांच्याकडे सुमारे १७ हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सिंग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार (श्रमिक) मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यापैकी ऑनलाईन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदे भरली जाणार आहेत. ही विविध प्रकारची रिक्तपदे विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in  वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही रिक्तपदे मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील आहेत. एमएमआरडीएची विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे एकूण सुमारे १७ हजार रिक्तपदे आहेत. हे कंत्राटदार  त्यांच्याकडील रिक्तपदे टप्याटप्प्याने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर अधिसूचित करीत आहेत. त्यांच्याकडील रिक्तपदे जसजशी अधिसूचित करण्यात येतील त्याप्रमाणे भविष्यात वेळोवेळी अशा प्रकारचे ऑनलाइन रोजगार मेळावे पुन्हा आयोजित करुन ही पदभरती करण्यात येईल.

ही रिक्तपदे भरण्याकरिता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे आयोजन करणे शक्य व योग्य नसल्याने या विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

अर्ज कसा करावा

राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी. तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील Thane अथवा Mumbai Suburban जिल्हा निवडून त्यातील Action – view details या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच, रिक्तपदांची माहिती वेबपोर्टलवर नोंदणी अथवा Apply करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलमधील “Field Offices” या टॅबमध्ये उपलब्ध आहेत.

45 मिनिटात रिपोर्ट -रॅपिड अँटिजेन किटद्वारे एक लाख तपासण्या होणार

पुणे-करोनाबाधित, संशयित रुग्णांचे तातडीने निदान व्हावे या दृष्टीने उपयुक्त ठरणारी रॅपिड अँटिजेन किट महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार बुधवारपासून टप्प्याटप्प्याने या किटद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे पाऊण तासात रुग्णाचा अहवाल प्राप्त होणार असून करोना संसर्ग रोखण्यासही त्यामुळे मदत होणार आहे. सध्या महापालिके ने एक लाख किटची खरेदी के ली असून त्याद्वारे एक लाख नागरिकांची तपासणी होणार आहे.

शहरातील करोनाबाधित आणि संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे पाचशेच्या पुढे गेली आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिके कडून विविध स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या दृष्टीने चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी रॅपिड अँटिजेन किटची खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर सोमवारी महापालिके ला एक लाख किट प्राप्त झाले आहेत. या किटद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येईल. या किटद्वारे तपासणी के ल्यानंतर पाऊण तासात त्याबाबतचा अहवाल प्राप्त होणार आहे.

त्यामुळे करोनाबाधितांचे वेळेवर निदान करता येणे शक्य होणार असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. अँटिजेन चाचणीमुळे करोनाबाबतचे शहरातील चित्र बदलण्याची शक्यता आहे. करोना स्वॅब चाचण्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, ससून रुग्णालय प्रयोगशाळा आणि खासगी प्रयोगशाळा यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. अँटिजेन चाचण्या सुरू के ल्याने हे अवलंबित्व कमी होईल. एवढेच नव्हे तर स्वॅब चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत किमान एक दिवसाचा वेळ जातो. करोना बाबत भीतीमुळे हा वेळ नागरिकांना तणावामध्ये घालवावा लागतो. अँटिजेन चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर अल्पावधीतच त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यामुळे सर्वार्थानेच अँटिजेन चाचणी महत्त्वाची ठरेल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.दरम्यान, बुधवारपासून टप्प्याटप्प्याने या किटचा वापर सुरू होणार आहे. जास्त संसर्ग असलेल्या ठिकाणी त्याचा पहिल्या टप्प्यात वापर करण्यात येईल. किट वापरासंदर्भात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून गुरुवार-शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

आर्थिक भार होणार हलका

करोनाच्या स्वॅब चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना २५०० रुपये एवढे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अँटिजेन चाचणीची किं मत ४५० रुपये एवढी असून त्यावर अल्प प्रमाणात जीएसटी लागणार आहे. म्हणजेच चाचणीचे शुल्क काही हजारांवरून काहीशे रुपये एवढे कमी होणार आहे. त्यामुळे वेळेबरोबरच आर्थिक भारही हलका होणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

पीएम मोदी अचानक लेह ला- चीन ला इशारा

0

लेह : वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) वरील तणावपूर्ण वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहला पोहचले आहेत. त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे देखील उपस्थितीतहोते. लडाखमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठी मोदींनी अचानकपणे केलेल्या या दौऱ्यातून चीनला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. 15 जून रोजी गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर भारत-चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. गलवान खोऱ्यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सीडीएस रावत यांच्यासोबत लेह दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. पण अचानकपणे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.मोदींनी आज संरक्षण प्रमुखांसमवेत लेहला भेट दिल्यामुळे चीनला भारताकडून थेट इशारा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या भागात तैनात असलेल्या लष्कर, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नीमू येथील पोस्टवर जाऊन लष्करी आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत याठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वी याठिकाणी केवळ CDS बिपिन रावत येणार होते. मात्र मोदींनी अचानक याठिकाणी भेट देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मागील दोन महिन्यांपासून भारत-चीन यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. वादग्रस्त मुद्यावर चर्चेतून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी चिनी सैन्यासोबत तसेच राजनैतिक स्तरावर चर्चा सुरु आहे. नीमू पोस्ट समुद्रसपाटीपासून 11 हजार फूट उंचीवर आहे. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली पोस्ट म्हणून नीमू पोस्ट ओळखली जाते. याठिकाणी अचानक भेट देत मोदींनी 14 कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी दक्षिण लष्करी कमांडचे लेफ्टनंट जनरल वायके जोशी, लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह देखील उपस्थितीत होते.

मोदींनी लडाखमध्ये जवानांना संबोधित केले. जवानांच्या शोर्याचा आणि बलिदानाचा देशाला अभिमान आहे. जवानांनी सर्व जगाला आपले शोर्य दाखवून दिले आहे. विस्तारवादाला थारा नाही, असे म्हणत त्यांनी चीनची आरेरावी सहन करणार नसल्याचा इशाराच चीनला दिला आहे.

लडाख हे भारताचे मस्तक आहे. त्यामुळे चीनने आपला विस्तारवाद विसरावं. विस्तारवादाचं युग आता संपलं आहे, आता विकासाचं युग आहे. विस्तारवादामुळे नेहमीच मानवजातीचा विनाश झाला आहे, असं म्हणत मोदींनी चीनला कठोर शब्दात सुनावलं आहे.

भारतीय जवानांचे बाहू पर्वतासारखे मजबूत आहेत. जवानांचे शौर्य आणि साहस, माँ भारतीच्या सुरक्षेसाठीचे त्यांचे समर्पन अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही इतक्या उंचीवर देशाच्या सुरक्षेसाठी ढाल बनून उभे आहात, त्याची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. तुमचा निश्चय या पर्यतांच्या कठोरतेपेक्षाही अधिक आहे. देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे. त्यामुळे मीआणि सर्व भारवासी निश्चिंत आहोत. तुम्ही जे शौर्य दाखवले आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला आपली ताकद काय आहे याची प्रचिती आली आहे असं म्हणत मोदींनी जवानांचे धैर्य वाढवले आहे.

व्लादिमिर पुतीन यांच्यासाठी राज्यघटनेतच बदल; 2036 पर्यंत सत्तेवर?
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी कवी रामधारी सिंह दिनकर यांच्या काही ओळी जवानांना ऐकवल्या-

जिनके सिंहनाद से सहमी
धरती रही अभी तक डोल,
कलम, आज उनकी जय बोल.
मैं आज अपनी वाणी से आपकी जय बोलता हूं…

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या शहीदांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांचा पराक्रम आणि सिंहनादाने भूमाता अजूनही जयकारा करत आहे. आज सर्व देशवासियांचे मस्तक तुमच्या समोर आदरपूर्वक नमन होत आहे. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमची विरता आणि पराक्रमाने फुगली आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये


भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज भाजपाचे प्रदेश पदाधिकारी घोषित केले असून भाजपाचे तरूण सहमुख्य प्रवक्ते तसेच माध्यम संपर्क प्रमुख केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.
 
श्री. उपाध्ये हे गेल्या २० वर्षाहून अधिक काळ भाजपात काम करीत आहेत. तत्कालिन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये प्रथम त्यांच्या टीममध्ये प्रवक्ते म्हणून उपाध्ये यांची नियुक्त केली. अभ्यासू वृत्ती, पत्रकारीतेची पार्श्वभूमी आणि पक्की वैचारीक बैठक याबरोबरच राजकीय व सामाजिक जाण यातून त्यांनी प्रवक्ते म्हणून अल्पावधीतच छाप पाडली. सर्व मराठी तसेच हिंदी, राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर अभ्यासपूर्ण शैलीत आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
 
अभाविपची पार्श्वभूमी असलेले उपाध्ये यांनी पुण्याच्या रानडे इस्ट्यिट्यूट येथून पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला. दै पुढारी, दै लोकसत्ता, मुंबई तरूण भारत या दैनिकात त्यांनी काम केले. मुळात पत्रकार असल्याने केशव उपाध्ये यांनी वृत्तपत्रे, ब्लॉग, तसेच समाज माध्यमातून पक्षाची बाजू मांडणारे लेखन तसेच इतर सामाजिक आणि ललित विषयांवर देखील विपुल लेखन केले आहे
 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या दोन अभ्यास गटांत त्यांचा समावेश होता. नक्षल चळवळीचा छ्त्तीसगडच्या विकासावर होणारा विपरित परिणाम यावर २००६ साली संशोधनात्मक अभ्यास करून अहवाल तयार केला. हा अहवाल प्रबोधिनीने प्रसिद्ध केला. सोलापूर दंगलीनंतर प्रबोधिनीने पाठवलेल्या सत्यशोधन समितीमध्ये त्यांचा सहभाग होता.

महापालिकेच्या नाट्यगृहांचे खासगीकरण नको : दीपाली धुमाळ

पुणे-मराठी सिने नाट्य सृष्टीतील लॉबी,फसवेगिरी याबाबत चर्चा घडू लागली असताना महापालिकेच्या नाट्यगृहांचे खाजगीकरण करण्याचा डाव आखला जातो आहे . या पूर्वीच महापालिका नाट्यगृहे ठराविक धेंडांच्या नावे तारखा ठेऊन त्यांचा काळाबाजार होत असल्याच्या चर्चा अनेकदा झडल्या आहेत या सर्व पार्श्वभूमीवर आता नाट्यगृहांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जातोय .नाट्यगृहंचे खाजगीकरणकरू नये, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. नाट्यगृह हे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे साधन किंवा माध्यम नाही. ही पुणेकरांना सांस्कृतिक कार्यक्रम देण्याची सेवा आहे. प्रशासनाला उत्पन्न वाढविण्याची इच्छा असेल तर अनेक विभाग आहेत. त्या विभागाची वसुली करण्याकडे लक्ष द्यावे. असेही त्यांनी म्हटले आहे.

नाट्यगृहांच्या खासगीकरणाच्या निर्णयामुळे सांस्कृतिक वसा जोपासलेल्या तसेच सांस्कृतिक क्षेत्रात हयात घालविलेल्या कलावंतांचा अपमान आहे. त्यामुळे आमचा नाट्यगृहांच्या खाजगिकरणाला विरोध असल्याचे विरोधी पक्षनेत्या धुमाळ यांनी सांगितले.

त्या संदर्भात त्यांनी नाराजी दर्शविणारे पत्र महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे.नाट्यगृहांच्या खाजगिकरणामुळे महापालिकेचे अस्तित्व संपून ठेकेदाराला महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे मनमानी कारभार सुरू होईल. स्थानिक नाट्य संस्था आणि कलावंतांना नाट्यगृहांत कार्यक्रम राबविण्यासाठी सध्याची सोयीस्कर पध्दत बंद होईल.

साफसफाई किंवा इतर गोष्टी खाजगी संस्थांकडून नीट सांभाळल्या गेल्या नाहीत तर त्यांना जाब कोण विचारणार? नाट्यगृहांच्या विकासासाठी पुणे महापालिकेला लक्ष घालावे लागणार असेल तर खाजगिकरण करण्याचा हा कुटील डाव का? असे अनेक सवाल दीपाली धुमाळ यांनी उपस्थित केले आहेत.

भाजपची कार्यकारिणी जाहीर

मुंबई -भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. या प्रमुख कार्यकारणीत  12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. असे चंद्रकांत पाटलांनी घोषित केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, या कार्यकारणीत याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करत असतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. यासोतबच प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत असणार असल्याचंही ते म्हणाले.

कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल.

कार्यकारणीची यादी 

  • महामंत्री

सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

  • उपाध्यक्ष

संजय कुटे, माधव भंडारी, माजी मंत्री राम शिंदे, चित्रा वाघ, जयकुमार रावल, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील

  • सेक्रेटरी 

माजी आमदार प्रमोद जठार, अर्चना तेहटकर, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, संजय पुराम, दयानंद चोरगे, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे,

  • मुख्य प्रतोद आणि प्रतोद 

मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद – माधुरी मिसाळ

आज कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि. ३ : राज्यात आज कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ९११ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ४ हजार ६८७ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख  ४९ हजार २७७ नमुन्यांपैकी  १ लाख ९२ हजार ९९० नमुने पॉझिटिव्ह (१८.३९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार  ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी  १५० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३४ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले १५० मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-२, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-५, मालेगाव मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-३, जळगाव मनपा-२, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१६,सोलापूर मनपा-५, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-४, जालना-५, लातूर-१, अकोला-२, अकोला मनपा-१, अणरावती-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (८२,०७४), बरे झालेले रुग्ण- (५२,३९२), मृत्यू- (४७६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,९१२)

ठाणे: बाधित रुग्ण- (४३,६३४), बरे झालेले रुग्ण- (१७,२२७), मृत्यू- (१०७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५,३३१)

पालघर: बाधित रुग्ण- (६८३७), बरे झालेले रुग्ण- (२८६६), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५४)

रायगड: बाधित रुग्ण- (५२३८), बरे झालेले रुग्ण- (२५३६), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५९४)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (६७७), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२३४), बरे झालेले रुग्ण- (१५५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)

पुणे: बाधित रुग्ण- (२५,४५४), बरे झालेले रुग्ण- (१२,२१८), मृत्यू- (८२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२,४१०)

सातारा:  बाधित रुग्ण- (१२२२), बरे झालेले रुग्ण- (७५७), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६)

सांगली: बाधित रुग्ण- (३७६), बरे झालेले रुग्ण- (२३९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८८६), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२६९५), बरे झालेले रुग्ण- (१६३१), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०)

नाशिक: बाधित रुग्ण- (४६५६), बरे झालेले रुग्ण- (२६१६), मृत्यू- (२२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (३४०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५१)

जळगाव: बाधित रुग्ण- (३८५६), बरे झालेले रुग्ण- (२१९४), मृत्यू- (२६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०१)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (७९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)

धुळे: बाधित रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (६८०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (६०६१), बरे झालेले रुग्ण- (२६१४), मृत्यू- (२७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७०)

जालना: बाधित रुग्ण- (६१९), बरे झालेले रुग्ण- (३६३), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२)

बीड: बाधित रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

लातूर: बाधित रुग्ण- (३९६), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२)

परभणी: बाधित रुग्ण- (११०), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

नांदेड: बाधित रुग्ण- (३७१), बरे झालेले रुग्ण (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१८०), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

अमरावती: बाधित रुग्ण- (६२५), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)

अकोला: बाधित रुग्ण- (१५९९), बरे झालेले रुग्ण- (११०६), मृत्यू- (८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०९)

वाशिम: बाधित रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२७७), बरे झालेले रुग्ण- (१६०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (२२१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)

नागपूर: बाधित रुग्ण- (१६२४), बरे झालेले रुग्ण- (१२४१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६८)

वर्धा: बाधित रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१५५), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१०६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)

एकूण: बाधित रुग्ण-(१,९२,९९०), बरे झालेले रुग्ण-(१,०४,६८७), मृत्यू- (८३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह रुग्ण-(७९,९११)

(टीप-आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी १५० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ४८ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये ठाणे मनपामधील २३, सोलापूर मनपा -१०, पनवेल -३, कल्याण डोंबिवली -२, उल्हासनगर -२,भिवंडी -१, मीरा भाईंदर -१, वसई विरार,- १,रायगड -१, अहमदनगर -१, जळगाव – १, पिंपरी चिंचवड -१ आणि  अमरावती -१ यांचा समावेश आहे. हे ४८ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सांगली जिल्ह्यातील ५१ रुग्ण इतर जिल्ह्यांतील असल्याने त्यांचे रिकॉन्सिलेशन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांच्या एकूण रुग्ण संख्येमध्ये बदल झाला आहे. तथापी राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत बदल झालेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

भारतात निर्मित होणाऱ्या कोरोनावरील लसीबाबत आशादायी

0

मुंबई, दि. ३ : कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. (बीबीआयएल) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले आज यासंदर्भात आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारपणे महत्त्वाच्या १३ ते १४ हॉस्पिटल्समध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ७ जुलै पर्यंत ह्या क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनीकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ.भार्गव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. याबाबत मी आशादायी असून सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

माझा विरोध वृक्षतोडीला आणि बेकायदा बाबींना – सुभाष जगताप

पुणे– तळजाई येथे होऊ घातलेल्या आणि राजकीय वर्चस्वाच्या वादात सापडलेल्या जैववैविध्य पार्कबाबत आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधींसह सर्व पक्षीय प्रतिनिधी आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली . या बैठकीत त्यांनी स्थायी समिती, मुख्य सभा यांची मान्यता अगोदर घ्या आणि नंतर काही समस्या निर्माण होत असतील तर आपल्यापर्यंत घेऊन या असे सांगितले. दरम्यान आपला विरोध प्रकल्पाला नसून त्यासाठी होत असलेली वृक्ष तोड आणि बेकायदा बाबी यास असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. 

 ते म्हणाले,’ आज अजित दादांनी तळजाई बाबत माहिती घेतली  तेथील १०८ एकर जागा , सुप्रीम कोर्टाचे आदेश, प्रशासनाचे म्हणणे , आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींचे मत त्यांनी ऐकून घेतले.आणि या प्रकल्पास मुख्य सभेची मान्यता नसल्याचे निदर्शनास आणून देताच , अगोदर महापालिकेच्या स्थायी समितीची हवे तर मुख्य सभेची मान्यता घ्या ,सर्व जन एकत्रित बसून पुण्याच्या हिताचा ,पुण्याला एक चांगला प्रकल्प द्या असेच निर्देश अजितदादांनी दिल्याचे सुभाष जगताप यांनी सांगितले. माझे तर असे म्हणणे आहे कि , राज्य सरकार जोपर्यंत हि जागा पार्कची आहे डोंगर माथा डोंगर उतार आहे ,कि बीडीपी झोनची आहे याबाबत निर्णय घेऊन तो घोषित करीत नाही तोवर प्रशासन मुख्य सभेत प्रस्तावच ठेऊ शकत नाही . येथे वृक्ष तोड करणे, बेकायदेशीर मार्गाने प्रकल्प रेटून नेणे यास आपला विरोध आहे.महापालिकेने राबविलेल्या  सोलर प्रकल्पांची अगोदर माहिती घ्यावी नंतर येथे कशा पद्धतीने कोणी हा प्रकल्प राबवावा याबाबत निर्णय घ्यावा असा टोला हि जगताप यांनी मारला.

तळजाई चे जंगल ,मानवनिर्मित उद्यान बनवू नका -महेश वाबळे

पुणे- तळजाई चे जंगल हे नैसर्गिकरीत्या जंगलाच राहू द्यात ,ते मानवनिर्मित उद्यान बनवू नका हि पर्यावरणप्रेमी यांची मागणी असून तिच्याशी आपण सहमत असल्याने तीच मागणी आज आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांच्यापुढे मांडल्याचे या भागातील भाजपचे नगरसेवक महेश वाबळे यांनी सांगितले . आज पुण्याच्या विधान भवनात उपमुख्यमंत्री यांनी तळजाई येथील नियोजित जैववैविध्यपार्क च्या संदर्भात मते आजमाविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेतली या बैठकीस भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आणि नगरसेवक महेश वाबळे ,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने तसेच अन्य पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

१०८ एकर जागेवर जैववैविध्य पार्क उभारण्याच्या प्रकल्पाचे कॉंग्रेसचे माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नेते ,सध्याचे महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत . त्यादृष्टीने सदू शिंदे स्टेडीअम चे उद्घाटन हि पूर्वीच संपन्न झाले . आणि नंतर सोलर प्रकल्प आणि बांबू उद्यानाचे काम सुरु होताच त्यास विरोध सुरु झाला . आणि हा संपूर्ण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला . या प्रकल्पास अधिकृत मान्यता नसल्याची भूमिका आज भाजपच्या वतीने मांडण्यात आली .या प्रकल्पाच्या अनुषंगाने वृक्षतोड आणि काँक्रीटीकरण वाढणार असल्याचा आरोप करण्यात आला . यामुळे उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी एकत्रित येऊन सहमतीने पुण्याला चांगला प्रकल्प देता येईल अशा पद्धतीने अगोदर स्थायी समिती हवे तर मुख्य सभा यांची मान्यता घेऊन नंतर आपणाकडे प्रकल्प घेऊन या असे सांगितल्याचे वाबळे यांनी सांगितले.SHOW LESS

आबा बागुल म्हणतात ,तळजाई प्रकल्पाला अजितदादांचा पाठिंबाच

पुणे- किती दिवस पुणेकरांना सारसबाग ,पेशवे बाग दाखविणार ..निसर्गाचे जतन करून ,कोणतीही हानी न करता तळजाईवर सुरु झालेल्या जैववैविध्य प्रकल्पातील सदु शिंदे स्टेडीयम चे तर उद्घाटन झाले पण पुढील कामाला राजकीय श्रेयवादातून विरोध   सुरु झाला आणि या प्रकल्पाला ग्रहण लागले. बरे झाले आज खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या प्रकल्पाला जणू पाठिंबाच दिला . आज त्यांनी स्थानिक प्रतीनिधी अधिकारी यांच्याशी चर्चा केली .आणि स्थायी समिती आवश्यक वाटले तर मुख्य सभेची मंजुरी घ्या आणि नंतर काही अडचण आली तर माझ्याकडे या असे हि सांगितले. असा दावा आज महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी मायमराठी शी बोलताना केला. पहा आबा बागुल काय म्हणाले …. 

नेमका काय आहे हा प्रकल्प यावर बोलताना ते म्हणाले ,शहराची फुफ्फुसे असलेल्या टेकड्या आणि त्यावरील जैववैविध्य यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी माझ्या संकल्पनेतून एक सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे ५ एकर जागेवर कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम साकारण्यात आले आहे. या स्टेडियमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या उभारणीत सिमेंट आणि काँक्रीटचा वापर टाळून स्थानिक पातळीवर मिळणार्‍या दगड, मातीचा वापर केला आहे. त्यामुळे हे स्टेडीयम पूर्णपणे पर्यावरणपूरक  आहे. त्याचबरोबर    बांबू उद्यान, नक्षत्र गार्डन ,सोलर रूफ पॅनल  पार्किंग या प्रकल्पांचेही   भूमिपूजन झालेले  असून कामे सुरु आहेत. 30वर्ष मी राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहे. अनेक पथदर्शी प्रकल्प माझ्या कारकिर्दीत शहरात साकारले आहेत.  शहराच्या फुफ्फुसांपैकी महत्वाची असलेल्या तळजाई टेकडीच्या जतनासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्यानुसार सुमारे १०७ एकर क्षेत्रावर आणि महापालिकेच्या ताब्यात असलेल्या डोंगर माथा, डोंगर उताराच्या जागेवर  जैववैविध्य उद्यान साकारले जात आहे. मात्र    त्यासाठी कोणत्याही वृक्षाला इजा न पोहोचविता आणि पर्यावरणाला बाधा न आणता पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी कायद्यातील तरतुदीनुसारच होत आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात वाहनांचा वापर टाळण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे. तेथेच सौर ऊर्जा प्रकल्प  उभारण्यात येणार आहे. तेथून सर्वत्र सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. ३०० किलोवॉट वीजनिर्मिती होणार असून वाहनतळात अंदाजे १४४ चारचाकी, २०१ दुचाकी , १०० सायकल आणि दोन बस पार्क होतील अशी क्षमता आहे.या सोलर रूफ पार्किंग येथे नागरिकांनी वाहने लावायची आणि तिथून व्यायामासाठी, फिरण्यासाठी जावे असे नियोजन वन्यजीव अधिवासाच्या संरक्षणासाठी आहे. नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान, रानमेवा उद्यान, मसाल्याच्या वनस्पतींचे उद्यान, वनौषधी उद्यान, पुष्प उद्यान आणि सुगंधी वनस्पतींचे उद्यान असे सात संकल्पनाधारित उद्याने हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यात नक्षत्र आणि बांबू उद्यान, सोलाररुफ पार्किंग  याचे काम सुरु होत आहे. या प्रकल्पांच्या विकासकामांना आणि टेकडीवरील झाडांना कै. वसंतराव बागुल उद्यान येथे सुरु केलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पातून दररोज  पाच लाख लिटर पाण्याचा वापर होत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य असलेल्या या पाण्यामुळे आता तळजाई टेकडी वर्षभर हिरवीगार राहणार आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची बचतही  होत आहे.

कोरोना का वाढतोय पुण्यात ?

पुणे- उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली . विभागीय आयुक्त कार्यालयातील या बैठकीस मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी,विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, ससून चे नियंत्रक एस. चोक्कलिंगम,जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना या बैठकीत काय झाले याबाबत विचारले असता पहा नेमके ते काय म्हणाले …त्यांच्या शब्दात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु.

पुणे- आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) चालवण्यात येणारी महानगरपालिकेची इ लर्निंग शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा ठरली आहे. काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेली हि शाळा आधुनिकतेची कास धरून गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सदैव प्रेरित करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाउन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. राजीव गांधी इ लर्निंग स्कूलचा निकाल मार्च महिन्यात देण्यात येतो व नवीन वर्षाची शाळा १ एप्रिल पासून सुरु होते. परंतु कोरोनामुळे हे शक्य झाले नाही व मुलांचे एप्रिल महिन्यापासून शैक्षणिक नुकसान झाले. परंतु आता लॉक डाउन शिथिल करण्यात आले असून त्यामुळे शिक्षक व कर्मचारी शाळेवर येण्यास सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते व ज्यांच्या संकल्पनेतून शाळा साकारली ते आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली राजीव गांधी इ लर्निंग मधील विध्यार्थ्यांना ऑनलाईन  शिकवण्यास १६ जून पासून सुरुवात करण्यात आली आहे. ज्युनियर केजी ते १० वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना एजुमित्र व दीक्षा अँपद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येते. वेळापत्रक तयार करून सर्व विध्यार्थ्यांना देण्यात आले असून प्रत्येक तासानुसार वेगेळापत्रकाप्रमाणे शिक्षक शालेय वेळेत विध्यार्थ्यांना  दर्जेदार ऑनलाईन शिक्षण देत आहेत. विशेष म्हणजे विध्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने घरातच भरणाऱ्या ऑनलाईन शाळेचा आनंद घेत असून शाळेचा युनिफॉर्म परिधान करून न चुकता शिक्षण घेतात, अशी माहिती शाळेचे व्यवस्थापक अरुण कामठे व एफसीबा मोरे यांनी दिली

संगीत मैफिलीतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पुणे : छोड दो आंचल जमाना क्या कहेगा… ये राते ये मौसम नदी का किनारा… रिमझिम गिरे सावन…पिया बावरी पिया बावरी… मेरे मेहबूब कयामत होगी… पान खाये सैंयाँ हमारो… नीले नीले अंबर पर… मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है… अशा एक से बढकर एक अवीट गीतांनी रंगलेल्या संगीत मैफलीतून कोरोना संकटात धैर्याने लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना अभिवादन करण्यात आले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंट स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सीए स्थापना दिवसाच्या निमित्ताने ‘एक संगीतमय शाम कोरोना वॉरीयर्स के नाम’ या लाईव्ह संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. गायिका मधुरा दातार, गायक जितेंद्र अभ्यंकर यांच्या सुमधुर गायनाने अनेक मेलडी गीतांनी सजलेली मैफिल रंगली. सचिन जांभेकर (संवादिनी), अपूर्व द्रविड (तबला), अभिजित भदे (रिदम), सागर खांबे (साउंड) यांनी साथसंगत केली. ‘कजरारे कजरारे’ या सुमधुर गीताने मैफिलीची सांगता झाली.

सीए रेखा धामणकर, सीए महेश लुंकड यांनीही गीतांचे सादरीकरण केले. ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए समीर लड्डा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सीए जगदीश धोंगडे यांनी निवेदन केले. सीए चंद्रशेखर चितळे, सीए श्रीकांत दंडवते आदीनी कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

बॉलिवूडच्या ‘नृत्यगुरू’ हरपल्या- सांस्कृतिक कार्यमंत्री-अमित देशमुख

मुंबई  : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडच्या नृत्यगुरू हरपल्या, अशी शोकभावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक प्रसिद्ध गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सरोज खान यांच्या नृत्य शिकवणीमुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे करिअर झालं आहे. सुरुवातीच्या काळात चित्रपटात नृत्यदिग्दर्शन यासाठी फक्त पुरुष नृत्य दिग्दर्शकाचा विचार केला जायचा, त्या काळात सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले. त्यांच्यामुळेच आज वेगवेगळ्या चित्रपट पुरस्कारांमध्ये नृत्यदिग्दर्शकालाही त्याच्या कामासाठी नावाजले जाऊ लागले.

मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया, परदेस, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका, कलंक या चित्रपटांसाठी त्यांनी केलेले नृत्यदिग्दर्शन आपल्या सर्वांच्या कायम लक्षात राहील. सरोज खान यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, अशी सांत्वनपर भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.