Home Blog Page 2524

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 13 हजार 242

पुणे विभागातील 20 हजार 916 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 35 हजार 409 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे:- पुणे विभागातील 20 हजार  916 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 35 हजार 409 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  13 हजार 242 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 648 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.07 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.53 टक्के इतके आहे.अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 29 हजार 403 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 17 हजार 329  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव  रुग्ण संख्या  11 हजार 199  आहे. कोरोनाबाधित एकूण 875 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 492 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.94  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.98 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 552 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 356 , सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 109, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापूर 25 जिल्ह्यात  अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 334 रुग्ण असून 791 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  488 ॲक्टीव रुग्ण संख्या  आहे. कोरोनाबाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 3 हजार 211 कोरोना बाधीत रुग्ण असून  1 हजार 786  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 129 आहे. कोरोना बाधित एकूण 296 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 495 रुग्ण असून 267 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 216 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील  966 कोरोना बाधीत रुग्ण असून 743 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.ॲक्टीव रुग्ण संख्या 210 आहे. कोरोना बाधित एकूण  13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 6 हजार 270 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 2 हजार 243 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  4 हजार 27 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  1 लाख 66 हजार  467 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 35 हजार  409 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.    

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणार्या शिक्षणाची आवश्यकता-रामराजे निंबाळकर

पुणे, ता. ६ जुलै : ‘शिक्षण आणि शिक्षक यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समोर बसलेल्या विद्यार्थ्याच्या बौध्दिक पातळीवर जावून त्याला समजेल असे तणावरहित शिक्षण देण्याची गरज आहे. पाठ्यपुस्तक शिकवत असताना विविध क्षेत्रांत काय घडतय ते शिकविले पाहिजे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणार्या शिक्षणाची आवश्यकता आहे.’ असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीर्इएस इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘मातृमंदीर संस्कार केंद्र’ या पूर्व प्राथमिक विभागाच्या विस्तारीत आणि स्वतंत्र इमारतीचे भूमिपूजन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून निंबाळकर बोलत होते.

खासदार गिरीश बापट प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

निंबाळकर पुढे म्हणाले, ‘शिक्षकांनी शेवटपर्यंत विद्यार्थी बनून शिकत राहिले पाहिजे. त्यामुळे नवीन काय घडतय याची माहिती त्यांना मिळेल. चांगले शिक्षक घडविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घ्यावा.’

खासदार बापट म्हणाले, ‘जगाच्या बाजारीकरणात दोन पाय पक्के रोवून उभे राहायचे असेल तर शालेय शिक्षण महत्त्वाचे आहे. शाळा, शाळांतील अभ्यासक्रम, शिक्षक, संस्कार यातून विद्यार्थी घडतो तसाच तो मैदानावर घडतो. त्याचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे शाळांची मैदाने सुरक्षित राहतील याची काळजी घेतली पाहिजे.’

गणित तज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर व्हिडिओद्वारे संवाद साधताना म्हणाल्या, ‘कोणीतरी सांगितले म्हणून अभ्यास करू नये. मुलांमध्ये अभ्यासासाठी आवड निर्माण झाली पाहिजे. शिक्षकांनी मुलांना अभ्यासासाठी उद्युक्त केले पाहिजे. छोटे खेळ, कोडी यातून आवड निर्माण करता येते. कृतीतून शिक्षण द्यावे. पूर्वी पाठांतरावर भर होता. आताही पाठांतर पूर्ण काढता येणार नाही. आवश्यक ते पाठांतर चटकन कसे होर्इल यासाठी सोप्या पद्धतीने शिकविले पाहिजे.’

डॉ. कुंटे म्हणाले, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी १३० वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेची ६० शाळा महाविद्यालये आहेत. संस्थेचा विस्तार करीत असताना गुणवत्ता राखून ती सातत्याने वाढविण्यासाठी संस्था कसोशीने प्रयत्न करीत असते. शिक्षक हा समाजाचा आधार आणि मार्गदर्शक असला पाहिजे. त्या दृष्टिने आम्ही समाजासाठी विविध उपक्रम हाती घेत असतो.’

डॉ. शरद कुंटे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डीर्इएस प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी आभार मानले.

इंधन समायोजन धरून वीज दरवाढ नाही : महावितरण

0

मुंबई, दि. ६ जुलै २०२० : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजदरामध्ये इंधन समायोजन आकार धरून सरासरी  दरवाढ झालेली नाही, असे स्पष्टीकरण महावितरणकडून करण्यात आले आहे.

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दि. ३० मार्चला चौथ्या नियंत्रण कालावधीसाठी संपूर्ण नियामक प्रक्रियेचा अवलंब करून बहुवर्षीय वीजदर आदेश (२०१९ चे प्रकरण क्र. ३२२) जारी केला आहे. यामध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ ते आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी वीजदर निश्चित केले आहेत. सदर वीजदर आदेश दि. १ एप्रिल २०२० पासून लागू आहे. सदर आदेशानुसार घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठीच्या सरासरी वीजदरात सुमारे ५ टक्क्यांची घट केलेली आहे. त्यामुळे, वीजदरांमध्ये ५० पैसे ते १ रुपया इतकी वाढ झाली असे म्हणणें संयुक्तिक नाही. वीजखरेदी खर्चामधील सध्या लागू असलेल्या वीजदर विनियमातील तरतुदीनुसार आयोगाने मान्य केलेल्या वीज खरेदीच्या खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्यास त्याच्या वसुलीसाठी इंधन समायोजन आकार आकारण्यात येतो. त्यामुळे इंधन समायोजन आकार हा वीजदराचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच ग्राहकांच्या वीजदरांची तुलना करताना इंधन समायोजन आकाराचा त्यामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. वीजखरेदी खर्चामधील होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेऊन मा. आयोगाने इंधन समायोजन आकार ह्या घटकाचा समावेश आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ करिताच्या वीजदरात केला आहे.

फेब्रुवारी २०२० ला लागलेला इंधन समायोजन आकार विचारात घेऊन नवीन बहुवर्षीय वीजदर आदेशामध्ये मंजूर केलेल्या वीजदरांची तुलना केल्यास जवळपास सर्व वर्गवारींच्या वीजदरात घट झालेली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील सुरुवातीच्या काही महिन्यांचा इंधन समायोजन आकार हा उणे (Negative) येणे अपेक्षित असल्याने आयोगाने इंधन समायोजन आकारातील संभाव्य फरक लक्षात घेऊन महावितरणला इंधन समायोजन आकार स्थिरीकरण निधीपोटी फक्त रु. १५०० कोटी इतक्या मर्यादेपर्यंत रक्कम मान्य करून दिली. जर भविष्यकाळात वीज खरेदी खर्चात अनपेक्षीत वाढ झाल्यास सदर रकमेचा वापर इंधन समायोजन आकाराकरिता करता येईल आणि सदर रक्कम संपुष्टात येईपर्यंत ग्राहकांना इंधन समायोजन आकार लावण्यात येणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या वीजदरात स्थिरता येईल.

घरगुती वर्गवारीसाठी लागू असलेल्या अस्थिर आकाराची तुलना खालीलप्रमाणे आहे.

लघुदाब घरगुतीअस्थिर आकार (इंधन समायोजन आकारासह) फेब्रुवारी २० रु/युनिटअस्थिर आकार एप्रिल २० रु/युनिटटक्के बदल
लघुदाब (): लघुदाबघरगुती (दारिद्र्य रेषेखालील ग्राहक)१.३२१.१२-१५%
लघुदाब () : लघुदाबघरगुती 
१-१०० युनिट्स४.९४४.९१-१%
१०१-३०० युनिट्स९.३१८.८८-५%
३०१-५०० युनिट्स१२.५५११.७७-६%
५०० युनिट्स पेक्षा जास्त१४.३११३.१६-८%

विशेष म्हणजे जरी स्थिर आकारांमध्ये ग्रामीण भागासाठी रु. १० प्रति महिना आणि शहरी भागासाठी रु. २० प्रति महिना इतकी किरकोळ वाढ झाली असली तरीही उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे विद्युत आकारात लक्षणीय घट करण्यात आलेली असून परिणामतः ग्राहकांना भराव्या लागणाऱ्या देयकांमध्ये घट झालेली आहे. त्यामुळे प्रति युनिट सरासरी ४६ पैसे वाढ झाली असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात आज कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान

0

राज्यात कोरोनाच्या ११ लाख चाचण्या – आरोग्यमंत्री

मुंबई, दि.५: राज्यात आज कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  १२ हजार ४४२ नमुन्यांपैकी २ लाख ६ ६१९ नमुने पॉझिटिव्ह (१८.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४ हजार  ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १५१ मृत्यू हे मुंबई मनपा-६९, ठाणे-१ ठाणे मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-४, नाशिक-२, धुळे-४,जळगाव-६,जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (८४,५२४), बरे झालेले रुग्ण- (५५,८८४), मृत्यू- (४८९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७३२)

ठाणे: बाधित रुग्ण- (४७,९३५), बरे झालेले रुग्ण- (१८,१५६), मृत्यू- (१२७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,५०८)

पालघर: बाधित रुग्ण- (७४७०), बरे झालेले रुग्ण- (२९६५), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३७९)

रायगड: बाधित रुग्ण- (५८४०), बरे झालेले रुग्ण- (२७४१), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९९१)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (७१२), बरे झालेले रुग्ण- (४७१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२४६), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९)

पुणे: बाधित रुग्ण- (२८,१४२), बरे झालेले रुग्ण- (१३,४०६), मृत्यू- (८७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,८६४)

सातारा:  बाधित रुग्ण- (१३३७), बरे झालेले रुग्ण- (७६९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९)

सांगली: बाधित रुग्ण- (४३०), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (९२०), बरे झालेले रुग्ण- (७३२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३२१४), बरे झालेले रुग्ण- (१६९२), मृत्यू- (२९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२५)

नाशिक: बाधित रुग्ण- (५२१६), बरे झालेले रुग्ण- (२९३५), मृत्यू- (२२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०५६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५८०), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०८)

जळगाव: बाधित रुग्ण- (४२३६), बरे झालेले रुग्ण- (२४२०३), मृत्यू- (२७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५३८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०५)

धुळे: बाधित रुग्ण- (१२४८), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (६५६८), बरे झालेले रुग्ण- (२७८८), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४८६)

जालना: बाधित रुग्ण- (७१९), बरे झालेले रुग्ण- (३८०), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१५)

बीड: बाधित रुग्ण- (१४२), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)

लातूर: बाधित रुग्ण- (४२५), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४)

परभणी: बाधित रुग्ण- (१२८), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२९४), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

नांदेड: बाधित रुग्ण- (३९४), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

अमरावती: बाधित रुग्ण- (६९०), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९)

अकोला: बाधित रुग्ण- (१६६२), बरे झालेले रुग्ण- (११९९), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७६)

वाशिम: बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३३८), बरे झालेले रुग्ण- (२३५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१७१९), बरे झालेले रुग्ण- (१२९६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८)

वर्धा: बाधित रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१६७), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (११०), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१३३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८)

एकूण: बाधित रुग्ण-(२,०६,६१९), बरे झालेले रुग्ण-(१,११,७४०), मृत्यू- (८८२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१७),ॲक्टिव्ह रुग्ण-(८६,०४०)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका,कामगारांना वाऱ्यावर सोडू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई दि ५: जगभरातच कोरोनाची परिस्थिती विचित्र आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न करून या साथीला रोखत असलो तरी जीवन पूर्वपदावर कधी येणार हे सांगता येत नाही. या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये, जुन्या कामगारांना नौकरीवरून घरी बसवू नका कारण त्यांच्या उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका. आपण स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मुंबई आणि पुण्यासारख्या भागात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. मात्र, एप्रिल शेवटापासून आपण ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना अटी आणि शर्तींच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. आज अनेक उद्योग त्या ठिकाणी सुरु झाले असून कामगारही रुजू झाले आहेत. पुरेशा क्रयशक्तीच्या अभावी अद्याप बाजारपेठांत ग्राहक नसल्याने काहीशी अडचण आहे. परंतु परिस्थिती सुधारत जाईल. आपण कुठेही मालवाहतुकीला थांबवलेले नाही, माणसांची वाहतूक थांबवली आहे जेणेकरून साथीचा प्रसार होणार नाही. जिथे उद्योग सुरु झाले आहेत तिथे आपण व्यवस्थापन आणि कामगार यांच्या कोविड दक्षता समित्या स्थापन करू शकतो का, ते पाहिले पाहिजे जेणेकरून उद्योगांत आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण तयार होईल.

जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका

काही उद्योग आणि व्यवसायांतून नोकर कपात सुरु आहे असे कळते. ते चुकीचे असून कामगारांना नोकरीवरून काढू नका अशी आपली प्रथमपासून भूमिका आहे. आपण स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहोत. एकीकडे कारखाने हे परराज्यातील गावी गेलेल्या कामगारांची वाट पाहत आहेत तर दुसरीकडे स्थानिक भूमिपुत्र नोकरीसाठी इच्छुक आहेत. अशा स्थितीत जे उपलब्ध आहेत त्यांना लगेच नोकऱ्या द्या आणि व्यवसाय सुरु करा, पण नव्या नोकऱ्या देताना जुन्यांच्या नोकऱ्या घालवू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.      

औद्योगिक कामगार ब्युरो सुरु

याप्रसंगी बोलताना उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले, औद्योगिक कामगारांच्या नोकरीविषयक तक्रारी तुलनेने कमी आहेत परंतु सेवा क्षेत्र मात्र अडचणीत आलेले आहे. त्यांचा व्यवसायसुद्धा कमी झाला आहे. कंपन्या आणि मालकांसमोरसुद्धा अडचणी आहेत. मात्र कामगार, कर्मचारी याचे कुटुंब चालेल, चूल पेटेल अशी समंजस भूमिका घेणे गरजेचे आहे. मालकांशी सातत्याने संवाद साधून मार्ग काढता येईल. देशातील पहिल्या औद्योगिक कामगार ब्युरोचे उद्घाटन आपण करीत आहोत जेणेकरून कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळेल.

यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सर्वश्री सुर्यकांत महाडिक, अजित साळवी, मनोहर भिसे, विनोद घोसाळकर, रघुनाथ कुचे, संजय कदम, विजय वालावलकर, मनोज धुमाळ, जीवन कामत, उदय शेट्ये, प्रभाकर मते-पाटील आदींनी सूचना केल्या.

काही व्यवस्थापन परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कामगार कपात करीत आहेत, विशेषत: कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या जात आहेत. सेवा उद्योग अडचणीत आहे. सर्व हॉटेल्स मेटाकुटीला आले आहे, कायम कामगारांवर वेतन कपातीची टांगती तालावर आहे. डिसेंबरपर्यंत ही वेतन कपात करावी असे सांगण्यात येत आहे. हॉटेल्स, आयटी, लॉजिस्टिकमध्ये कामगारांना कमी करणे सुरु आहे, छोट्या कंपन्यांनी तर कपातीचाच मार्ग अवलंबिला आहे अशा प्रकारच्या अडचणी यावेळी मांडण्यात आल्या.

परदेशी अडकलेले ३० हजार ८३ नागरिक १९५ विमानांनी मुंबईत दाखल

0

मुंबई, दि. ५: परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत १९५ विमानांनी ३० हजार ८३ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ८८० आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १०३११ आहे तर इतर राज्यातील ८८९२ प्रवासीही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत.  राज्यात १५ जुलै २०२० पर्यंत आणखी ५४  विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरून घेऊन त्यांना क्वारंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.

प्रवासी विविध देशातून आले असून त्यात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशिअस, ब्राझील, थायलंड, केनिया, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, जर्मनी, युनायटेड अरब अमिरात, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, इजिप्त, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, फ्रान्स, जॉर्जिया, कॅमेरुन या देशांचा समावेश आहे.

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम  जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. ‘वंदेभारत’ अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि.  यांच्या समन्वयाने केले जात आहे.

वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

राज्यातील हॉटेल्स सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई -मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन.  पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच  लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह  व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा  फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.  

हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार , कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले. 

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले कारण . पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या  शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करतांना भविष्यातील  वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली   कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला  नियम घालणे महत्वाचे आहे.

मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले की, हॉटेल्स  १०० टक्के लगेच सुरु करता येणार नाही पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरु करण्याचे नियोजन आम्ही करतो आहोत.  प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले की,  हॉटेल्स सुरु करतांना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक ठिकाणी सरकारला या नियमांची पूर्तता होते किंवा नाही हे पाहणे शक्य होणार  नाही यासाठी स्वयंशिस्त ठेवणे गरजेचे आहे 

इंडियन हॉटेल्स असोसिएशनचे गुरुबक्ष सिंग कोहली म्हणाले की  या उद्योगाला आता खेळते भांडवल आवश्यक आहे. शासनाने आम्हाला देखील कोरोना योद्धा म्हणून पाहावे. सर्वत्र  नोकऱ्या जात आहेत मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत. आमचा प्रयत्न शासनाबरोबर राहण्याचा आहे. 

आज आमच्याकडे ८० टक्के स्थलांतरीत कामगार आहे.काही प्रमाणात  हॉटेल्स आणि रेस्टोंरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरु करायला परवानगी द्यावी, इतर राज्यांशी आपली स्पर्धा असते. त्यामुळे पर्यटकांनी जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहावे जेणे करून पर्यटन उद्योगाला वाव मिळेल. 

विवेक नायर म्हणाले की,  विजेची देयके कमी करावीत. हॉटेल्सना औद्योगिक दरात पाणी आणि वीज उपलब्ध करून द्यावा. कमलेश बारोट म्हणाले की, या उद्योगाला खुले केल्यास अनेक फायदे होतील.  हॉटेल्स आणि रेस्टोंरंटच्या खुल्या जागेत व्यक्तींच्या संख्येवर कमीतकमी मर्यादा असावी  अन्यथा उत्पन्न आणि कर मिळणार नाही.  हॉटेल्स आणि रेस्टोंरंटबाबत वेळेची मर्यादा वाढवून द्यावी. सध्या ६ लाख कोटींपेक्षा जास्त फटका  हॉटेल्स आणि रेस्टोंरंट उद्योगाला बसत आहे. विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु झाली आहे.  फ्लाईटमध्ये प्रवाशांना 8 -8 तास एकत्र बसावे लागते. हॉटेल्समध्ये एखादे कुटुंबीय सर्व प्रकारची काळजी घेऊन आणि सुरक्षितता ठेवून येऊ शकते. टेबल्सची मांडणी त्यादृष्टीने केल्यास, स्वच्छता ठेवल्यास काहीही अडचणी येणार नाही 

एस पी जैन म्हणाले की, हॉटेल्समधील सुविधा उद्योग आणि व्यवसायही वापरू शकते, त्यामुळे उत्पन्न वाढू शकेल.   मुंबईतील हॉटेल्स सध्या पालिकेने कोविड काळासाठी घेतल्या आहेत शिवाय काही सुविधा स्वत:हुन आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत, याचा कमीतकमी मोबदला काही प्रमाणात मिळाला तर आम्हालाही येणारे खर्च भागवता येतील. पुनीत चटवाल म्हणाले की, अनेकांना त्यांच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांत कपात करावी लागत आहे त्यामुळे हॉटेल्स काही प्रमाणात सुरु केल्यास व्यवसाय वाढेल. देवेंद्र भरमा, प्रदीप शेट्टी, हरप्रीत सिंग, तेज टकले यांनी देखील आपल्या सुचना केल्या.

पुणे विभागात आता कोरोनाचे ॲक्टीव रुग्ण 12 हजार 291

पुणे विभागातील 20 हजार 341 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 33 हजार 857 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 05 :- पुणे विभागातील 20 हजार 341 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 33 हजार 857 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 12 हजार 291 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 225 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 617 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, मृत्युचे प्रमाण 3.62 टक्के तर ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.08 टक्के इतके असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 28 हजार 47 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 16 हजार 723 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 467 आहे. कोरोनाबाधित एकूण 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 463 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.62 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 971 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 767, सातारा जिल्ह्यात 53, सोलापूर जिल्ह्यात 101, सांगली जिल्ह्यात 13 तर कोल्हापूर जिल्ह्यात 37 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 304 रुग्ण असून 784 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 465 आहे. कोरोनाबाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 3 हजार 102 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 834 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 979 आहे. कोरोना बाधित एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 463 रुग्ण असून 262 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 189 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 941 कोरोना बाधीत रुग्ण असून 738 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 191 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 2 हजार 407 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 97 हजार 617 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 760 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 63 हजार 434 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 33 हजार 857 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 5 जुलै रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

वीजबिलाबाबत तक्रारकर्त्या 98 टक्के ग्राहकांचे शंका निरसन

पुणे, दि. 04 जुलै 2020: लॉकडाऊनच्या कालावधीमधील वीजवापराचे जून महिन्यात मीटर रिडींगप्रमाणे महावितरणकडून बिल देण्यात आले आहे. मात्र या बिलाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या तक्रार निवारण कक्षांमध्ये गेल्या आठवड्याभरात सुमारे 40 हजार 800 पैकी सुमारे 40 हजार (98 टक्के) वीजग्राहकांच्या तक्रारींचे व शंकांचे जागेवरच निरसन करण्यात करण्यात आले आहे.

जून महिन्यामध्ये मागील एप्रिल व मे या दोन महिन्यांसह मीटर रिडींगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंका निरसन व तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, वेल्हे व मुळशी तालुक्यांमध्ये महावितरणच्या प्रत्येक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आला आहे. 

गेल्या आठवड्याभरात पुणे शहरात सुमारे 20 हजार 500, पिंपरी चिंचवड शहरात 11 हजार 200 आणि हवेली ग्रामीण, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, वेल्हे व मुळशी तालुक्यांमध्ये 9100 ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयांमध्ये जूनच्या वीजबिलासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यापैकी सुमारे 40 हजार तक्रारकर्त्यांचे जागेवरच शंका निरसन करण्यात आले. उर्वरित सुमारे 800 ग्राहकांच्या वीजबिलांवर मीटर सदोष असणे, घर बंद असल्याने किंवा अन्य कारणांमुळे रिडींग घेता न येणे किंवा घेतले नसणे आदी कारणे दिसून आलेली आहेत. या तक्रारींच्या निवारणाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

पुणे परिमंडलात आतापर्यंत 179 सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तसेच शाखा, उपविभाग, विभाग कार्यालयस्तरावर 749 वेबिनारचे आयोजन करून जूनच्या वीजबिलासंदर्भात सविस्तर माहिती देऊन नागरिकांचे शंका समाधान करण्यात आले आहे. तसेच https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकद्वारे देखील घरगुती ग्राहक वीजबिल तपासून किंवा पडताळून पाहत आहेत. यासोबतच लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन त्यांना जूनच्या वीजबिलाबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.  

जूनच्या वीजबिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील (सुमारे 90 ते 97 दिवस) प्रत्यक्ष वीजवापरानुसार युनिट संख्या व बिलाची रक्कम नोंदविण्यात आली आहे. रिडींग प्रमाणे असलेल्या या एकूण युनिट संख्येला तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब व दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही अशी ग्वाही देत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दत्ता साने यांच्या निधनाची बातमी दुःखद- आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) कोरोना विषाणूमुळे निधन झाले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असं टोपे यांनी ट्विट केले आहे.

https://twitter.com/rajeshtope11/status/1279294532186599424/photo/1

पुण्याच्या महापौरांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण

पुणे- महापौर मुरलीधर मोहोळ यांना काल कोरोनाची लागण झाली त्यानंतर आज त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांनाही या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. महापौर मोहोळ यांच्यावर कोथरूडमधील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोहोळ यांच्या कुटुंबातील 17 सदस्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर, इतर सदस्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

महापौर यांचे आई-वडील, मुलगी, पत्नी आणि जवळचे नातेवाईक यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये काही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मोहोळ यांच्या कुटुंबातील ज्या लहान मुलांना सौम्य लक्षणे आहेत, ते घरातच राहणार आहेत .परवा पुण्यातील विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळी महापौर मोहोळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महापौर मोहोळ यांनी काल स्वतः बाबत ट्विट्द्वारे माहिती दिली. थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर आहे. लवकरच बरा होऊन पुन्हा सर्वांच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असे महापौरांनी ट्विट्मध्ये म्हटले होते .पुणे शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या नंतर फेसबुक ,ट्विटर वर महापौर मोठ्या प्रमाणावर सातत्याने जनसंपर्क साधून होते .या शिवाय ते शहराच्या विविध भागात होणाऱ्या बैठकांना,कार्यक्रमांना हजर राहत होते.महापालिकेतील स्थायी समिती च्या बैठका होत असल्या तरी मात्र आपल्या अधिकारात , आणि सर्व पक्षनेत्यांना विश्वासात घेऊन मुख्यसभा कोरोनाच्याच कारणाने घेणे त्यांनी बंद केले होते .त्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ त्यांचे पती तसेच कॉंग्रेसचे अविनाश बागवे यांना कोरोनाची लागण झाली होती मात्र कोरोनावर यशस्वी मात करून धुमाळ ,बागवे हे सुखरूप घरी परतले . महापालिकेत सुमारे २०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येत असताना आता महापौरांनादेखील कोरोना झाल्याने याप्रकरणी अति गंभीर वातावरण दिसून येते आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा

0

मुंबई, दि. ५ : गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, “आपल्या राज्याला, देशाला गुरू-शिष्य परंपरेचा वैभवशाली वारसा लाभला आहे. राजकीय, सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्यापैकी सर्वांनीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेली आहे. सार्वजनिक जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण खूप काही शिकत असतो. ते देखील आपले गुरुच असतात. आपल्याला जीवनध्येय सांगणाऱ्या आणि ते गाठण्याचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन. आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

शिक्षणाची वारी (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर )

0

“काय सांगू मॅडम…मुलं सकाळी सात वाजल्यापासून शाळेत येऊन बसली होती. ‘घरी जा’ सांगितलं तरी ऐकायला तयार नव्हती. शेवटी त्यांच्या पालकांना बोलावून सांगावं लागलं की मुलांना घरी न्या.” सुनीता मॅडम फोनवर सांगत होत्या. लॉकडाऊन असल्यामुळे अजून तरी शाळा सुरू झाल्या नाही, तरी नेहमीच्या सवयीप्रमाणे मुलं मात्र शाळेत १५ जूनला आपले मित्रमैत्रीण आणि शिक्षकांची आतुरतेने वाट बघत वर्गात येऊन बसली. वाड्यातील एका शाळेतील हा ह्रदय प्रसंग. बाई आणि मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंदच एवढा होता की लॉकडाऊनमुळे शाळा अजून सुरू होणार नाही हे ती मुलं  स्वीकारायलाच तयार नव्हती. ज्या ठिकाणी मुलांना मनोरंजनाशिवाय दुसरे काहीच साधन उपलब्ध नाही, शाळा हीच त्यांची शिकण्याची आणि बागडण्याची जागा, ज्या मुलांना शाळेतच जास्त वेळ घालवायला आवडतं, त्यांना पटवून कसं द्यायचं की यावर्षी शाळेचा काही नेम नाही. त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मॅडमच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं.

जून महिना सुरू झाला की कधी एकदाची शाळा सुरु होतेय आणि आपण मित्रमैत्रिणींना भेटतोय, सुट्टीतील गमतीजमतीही सांगतोय, असं मुलांना झालं असतं. शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भारलेला असतो. नवीन वह्या – पुस्तके, स्कूल बॅग, युनिफॉर्म, नवा वर्ग, वर्गशिक्षक सगळ्यांचेच खूप कुतूहल असते. यंदा लॉकडाऊनमुळे या सगळ्या आनंदावर विरजण पडलं.

दहिसरमधील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ड्रॉईंग’ विषय शिकविणाऱ्या टीचरने सांगितले की जूनमध्ये शाळा सुरू होणार नाहीत हे लक्षात आल्यावर मे पासूनच आम्ही शिक्षकांनी तयारी करायला सुरूवात केली. ऑनलाईन कसं शिकवायचं यासाठी आमचं ट्रेनिंग होतं. त्यानुसार ड्रॉईंग ह्या विषयाचं मी पीपीटी प्रेझेन्टेशन देते. मेमरी ड्रॉईंग असेल तर ते कसं काढायचं याचा व्हिडीओ बनवते, त्यांना ऑनलाईन करेक्शन सांगते. थोडं कठीण पडत आहे हे सगळं पण नुसतं घरी बसून राहण्यापेक्षा मुलं काहीतरी करताहेत तेवढंच समाधान. गूगल मीटवर आम्ही शिकवतो. क्लासमध्ये व्यक्तीशः फिरून आम्ही बघायचो मुलं कसं ड्रॉईंग काढताहेत…तो फरक ऑनलाईन शिकवताना नक्कीच जाणवतो. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत.

ड्रॉईंग, योगा, कार्यानुभव यांसारखे प्रात्यक्षिक विषय ऑनलाईन शिकविताना अडचणी येत आहेत. योगा आणि वर्क एक्सपिरिअन्स शिकविणाऱ्या  अंधेरीतील एका इंटरनॅशनल स्कूलमधील टीचरने सांगितले की गुगल मीट ऍपवर आम्ही शिकवणार आहोत. मी अजून तरी या सगळ्यांशी तेवढी कम्फरटेबल नाही. मी मात्र मोबाईलवरच शिकवणार आहे, त्यासाठी आता ट्रायपॉड सुद्धा विकत घ्यावा लागला. योगाचे काही प्रकार सोडले तरी सगळेच प्रकार ऑनलाईन शिकवता नाही येणार.

मालाडच्या आईसीएसइ स्कूलमधील एका शिक्षिकेने सांगितले की त्यांचे तर ऑनलाईन जुनिअर ते 10वी पर्यंत सगळे क्लासेस चालू आहेत. ‘मायक्रोसॉफ्ट टीम’ हे सॉफ्टवेअर शाळेने खासकरून घेतले आहे. त्याचा इमेल आयडी, पासवर्ड तसेच टाइमटेबल मुलांना दिले गेले आहे. मोठ्यांसाठी अडीच तास तर लहान मुलांसाठी दीड तास अशी रोज ऑनलाईन शाळा भरते. आमच्या शाळेतील मुलं तर ऑनलाईन स्कूल खूप एन्जॉय करताहेत. ३ महिने लॉकडाऊनमुळे मुलं घरी बसून कंटाळली आहेत. किमान ऑनलाईन ते त्यांच्या मित्रांना बघू शकतात, त्यांच्याशी बोलू शकतात. पालकांशीही बोलतो आम्ही, त्यांच्याकडून अडचणी जाणून घेतो. ऑनलाईन स्कूलचे काही नियम आहेत ते हळूहळू आम्हाला आणि मुलांनाही अंगळवणी पडू लागले आहेत. समोरासमोर मुलांशी बोलून त्यांना शिकवता येत नाही ही खंत आहेच. ऑनलाईन स्कूल हा पर्याय सध्या तरी स्वीकारला आहे. मुलं दिवसभर घरी बसून टीव्ही बघणार किंवा मोबाईलवर गेम खेळत बसणार…मग रोज अडीच तास ऑनलाईन स्कूल असेल तर बिघडलं कुठे. अगदीच काही नाही त्यापेक्षा एवढं तरी शिकता येतंय.

ठाण्यातील एका खाजगी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षिका सौ. कणिकदळे यांनी सांगितले,  ‘आमची शाळा नर्सरी ते दहावीपर्यंत चालू झाली आहे. पण ठराविक अशी वेळ नाही. आम्ही व्हिडीओ करून त्याची लिंक पाठवतो पालकांना. त्यात होमवर्क आणि वर्कशीट्स आहेत. मुलं ती दिवसभरात कधीही बघू शकतात आणि त्याप्रमाणे अभ्यास करतात.’

ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी शेजारच्यांचे मोबाईल घेतले आहेत. काही ठिकाणी एकाच मोबाईलवर आलटून पालटून चारपाच जणं अभ्यास करताना दिसून येताहेत.

दादरला राहणाऱ्या सौ. कुडसकर म्हणाल्या की आधी थोडं कठीण गेलं ऑनलाईन शाळा, पण आता हळूहळू जमतंय. मुलं आवडीने करताहेत. पण सगळ्यांच्याच घरी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नाही. मोबाईल असला तरी तो स्मार्ट फोन पालकांकडे असेलच असे नाही. नेटचा प्रॉब्लेम ही होतोच. आर्थिक परिस्थिती सगळ्यांची चांगली असेलच असे नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. दुसरं म्हणजे मुलं जरी ऑनलाईन शिकत असली तरी ते सोडून  भलतंच काही ऑनलाईन बघताहेत का ह्यावर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. अर्थात मुलांच्या नजरेतून पाहिले तर तेही या आगंतुक परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सतत मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप समोर बसून राहणे याचे मुलांवर दुष्परिणाम होणार आहेत. लॉकडाऊनमध्ये या सगळ्या बाबींचा विचार करायला हवाय. मुलांना येणाऱ्या अडचणी तर आहेतच, त्यांची मानसिकता जाणून घ्यायची तर या विषयावर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.

सांगली जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या आश्रमशाळेत मुख्याध्यापक असणारे बाळासाहेब लिंबिकाई सर सांगत होते की, आश्रमशाळेतील मुलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणची असतात. सद्यस्थितीत निवासी शाळा सुरू होणं कठीण दिसतंय. काही मुलांचा संपर्क होणेही कठीण आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा विचारही करू शकत नाही. अशा मुलांना औपचारिक शिक्षण व पोषणासाठी शाळांवर अवलंबून रहावे लागते. ‘ऑनलाइन शिक्षण शैक्षणिक विषमतेला एकप्रकारे खतपाणी तर घालत नाही ना?’ असाही विचार मनात डोकावतो. काही पालकांचं काम बंद आहे. शिक्षणापेक्षा पोषणाचाच प्रश्न बिकट झालाय.

शिक्षणाचा विचार व्यापक दृष्टिकोनातून केला तर घरातील, परंपरागत व्यवसायातील, शेतातील वेगवेगळ्या कामांत केलेल्या मदतीतूनही शिक्षण घडतच असतं. त्यास अध्ययननिष्पत्तीमध्ये स्थान मिळायला हवं. उदा. घरकामात आईला भाजी चिरून देणे.

शैक्षणिक वर्ष हा एक व्यवस्थेचा भाग असतो. ते वाया गेलं म्हणून पालकांनी चिंता करण्याचं काहीच कारण नाही. घरी मुलांसाठी वेळ देणे, मुलांना गोष्टीची पुस्तके वाचून दाखवणे, मनमोकळ्या गप्पा मारणे, एकत्रित चित्रं काढणे, स्वयंपाक करणे, घर आवरणे अशा कितीतरी गोष्टी लहान मुलांसोबत करू शकतो. यामुळे बालवाडी, पहिलीत दाखल होणारी मुलं खरंतर मोकळा श्वास घेतील. त्यांच्या स्नायूंचा आवश्यक विकास, हस्तनेत्र समन्वय, तोंडीभाषेचा विकास होण्याअगोदर पालकांना शिकवण्याची घाईच लागलेली असते!

शाळा सध्या चालू होणार नाहीत. लॉकडाऊनमुळे मुलं हल्ली पूणर्पणे घरी असल्यामुळे पालक आणि शिक्षक या दोघांनाही प्रश्न पडलाय की मुलांसाठी नेमकं काय करायचं. त्यासाठी सांगली येथील ‘लुल्ला फौंडेशन’च्या सहकार्याने मग पालक आणि शिक्षकांसाठी ‘वाचू आनंदे’ हा ऑनलाईन कोर्सही चालू केला गेला. अलाहाबादपासून गोव्यापर्यंतच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील लोकांनी या कोर्सचा लाभ घेतला.

पालकांच्या मनात दुविधा आहे, लॉकडाऊन संपल्यावर मुलांना शाळेत पाठवायचं की नाही. काही पालक अशा निर्णयाप्रत आलेत की सप्टेंबरनंतर शाळा सुरू झाल्या तर केवळ ५ महिन्यांसाठी शाळेची वारी कशाला करायला लावायची…त्यात आरोग्य सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे. पुस्तकं तर आधीच पैसे खर्च करून मागवली आहेत. आम्ही दोघेही त्याला घरी शिकवू शकतो. इतर काही मटेरियल लागेल ते हवं तर आम्ही घेऊ. त्यामुळे आम्ही होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. मुलाला डायरेक्ट पुढच्या वर्षी शाळेत पाठवणार.

अंधेरीतील उमा मेस्त्रींनी सांगितले की शाळा कधी सुरू होणार याची निश्चिती नाही. त्यामुळे यावर्षी शाळेचा विचारच डोक्यातून काढून टाकायचा. एक वर्ष फुकट गेलं तरी चालेल. उगाच मुलांसाठी रिस्क कशाला घ्यायची?

शाळा कधी चालू करायची, चालू झाल्यावर शाळेचे स्वरूप कसे असेल, काय नियमावली हवी, या बाबतीत अजून तरी पारदर्शकता किंवा वाच्यता नाही.  

वर्षोनुवर्षे अखंड चालू असणारी ही शालेय शिक्षणाची वारी, यावर्षी मात्र करोनामुळे खंडित झाली. सर्व काही सुरळीत होऊन लवकरात लवकर ही  ज्ञानार्जनाची वारी पुन्हा त्याच जोशाने, उत्साहाने, नवचैतन्याने सुरू व्हावी हीच मनोमन प्रार्थना !

© पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग, 

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.), 

मुंबई – 400068

दिल्लीमध्ये जगातील सर्वात मोठे 10 हजार बेडचे कोव्हिड केअर सेंटर

0

राजधानी दिल्लीमध्ये जगातील सर्वात मोठे कोव्हिड केअर सेंटर रविवारी सुरू करण्यात आले. केंटोनमेंटमध्ये बनलेल्या या अस्थायी सेंटरचे नाव सरदार वल्लभ भाई पटेल कोव्हिड-19 हॉस्पीटल ठेवण्यात आले आहे. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या हॉस्पीटलमध्ये 250 आयसीयू बेडसह 10 हजार बेड्स आहेत.

या कोव्हिड केअर सेंटरला 11 दिवसात तयार केले आहे. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी या हॉस्पीटलचे उद्घाटन केले. यावेळी देशाचे गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. डीआरडीओचे चेअरमन जी सतीश रेड्‌डी आणि आयटीबीपीचे चीफ एसएस देसवालदेखील या ठिकाणी आले होते. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, डीआरडीओ, गृह मंत्रालय आणि टाटा सन्स अँड इंडस्ट्रीज सह अनेक संघटनांनी सोबत मिळून हे हॉस्पीटल तयार केले आहे. हे हॉस्पीटल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या दिशा-निर्देशांनुसार तयार करण्यात आले आहे. जिथे आपण कोरोना रुग्णांना चांगला उपचार देऊन आजारापासून वाचवत आहोत, तर दुसरीकडे सीमेवर सैन्य शत्रुंपासून आपले रक्षण करत आहे.

लेह दौऱ्यानंतर पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

0

भारत-चीन सीमेवरील तणाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान पंतप्रधानांनी अचानक लेह दौरा केला. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. या भेटीत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील अनेक महत्वांच्या विषयावर चर्चा झाली. अर्धा तास ही बैठक सुरू होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले. सुमारे अर्ध्या तासाच्या या बैठकीत या दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती नाही.  एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली.अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी भारत आणि चीनमधील परिस्थितीबद्दल राष्ट्रपतींशी चर्चा केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपूर्वी लेहहून परत आले आहेत. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी अचानक लेह येथे पोहोचले. यावेळी त्यांनी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना संबोधित केले. नंतर ते जखमी सैनिकांना भेटले.