Home Blog Page 2518

लॉकडाऊन काळात ५३० सायबर गुन्हे दाखल; २७४ जणांना अटक

0

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५३० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ८ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप-  १९९ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स –  २२३ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ-  २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १५ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६१ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७४ आरोपींना अटक.

■  १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ मुंबई शहरांतर्गत बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ,त्यामुळे या विभागातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ३२ वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात एका  व्यक्ती  विरुद्ध बदनामी कारक आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या ट्विटर  प्रोफाईल वर पोस्ट केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

लॉकडाऊन जाहीर होताच ग्राहकांची लुटमार सुरु …पुण्यात सुमारे १ लाख बेरोजगार वाढले

0

पुणे- येत्या सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर होण्याचा उशीर तो लगेचच पुण्यातील विविध दुकानांमधील विविध वस्तू जादा दराने विकण्यास प्रारंभ झाल्याचे चित्र दिसले. वाईन शॉप्स सह किराणा दुकानात गर्दी होत गेली . आणि वाईन शॉप मधूनही बाटलीमागे २० ते २५ रुपये जादा दर आकारणी सुरु झाली किराणा मालाच्या विविध वस्तूंच्या किमतीत हि भरमसाठ वाढ झाली . आधीच नौकरी गमावलेल्या अर्धवट पगार मिळालेल्या चाकरमान्यांचे व्यापाऱ्यांच्या या नाफेखोरीने आणखीच कंबरडे मोडले . मार्च अखेरीस सुरु झालेल्या या व्याधीने व्यापारी ,कंपन्या विविध संस्था , माध्यमे यामधील सुमारे १ लाख जणांचा रोजगार गेल्याचे कामगार नेत्यांचे म्हणणे आहे. मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या हाल अपेष्टांना पारावर उरणार नाही असे स्पष्ट चित्र दिसते आहे. सरकारचा महामारीचा फायदा घेऊन दरवाढ करून लुट करणाऱ्या व्यापारी दुकानदार आणि बेरोजगारी वाढविणाऱ्या कंपन्या यांच्यावर कोणताही अंकुश उरला नसल्याचे स्पष्ट चित्र आहे . त्यामुळे पुण्यातील हि महामारी आता पोलिसांना गुन्हेगारीच्या स्वरूपातही दिसू शकण्याची शक्यता नाकारता येणार नाही .

आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश – उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द

0

पुणे- उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना विरुध्द लढ्यासाठी देण्यात आली आहे. तसेच इतर आवश्यक साहित्यही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक संजय पणीकर तसेच विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 15 हजार 525 : एकुण 1 हजार 401 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 25 हजार 507 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 42 हजार 433 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 10 :- पुणे विभागातील 25 हजार 507 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 42 हजार 433 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 15 हजार 525आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 743 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.11 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.30 टक्के इतके आहे.अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 35 हजार 528 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 21 हजार 411 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 132 आहे. या मध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 हजार 770,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 636 व कॅन्टोंन्मेंट 91, खडकी विभागातील 60, ग्रामीण क्षेत्रातील 522, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 53 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 985रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मध्ये पुणे महानरगपालिका क्षेत्रातील 796 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 94,पुणे कॅन्टोंमेन्ट 25, खडकी विभागातील 13, ग्रामीण क्षेत्रातील 37, जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील 20 रुगणांचा समावेश आहे. तसेच 557 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.27 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 191 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 921 , सातारा जिल्ह्यात 56, सोलापूर जिल्ह्यात 150, सांगली जिल्ह्यात 33 तर कोल्हापूर जिल्ह्यात 31 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 543 रुग्ण असून 934 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 548 ॲक्टीव रुग्ण संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 3 हजार 699 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 84 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 296 आहे. कोरोना बाधित एकूण 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 581 रुग्ण असून 282 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 284 आहे. कोरोना बाधित एकूण 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 1 हजार 82 कोरोना बाधीत रुग्ण असून 796 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 265आहे. कोरोना बाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 27 हजार 581 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 22 हजार 195 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 396 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 79 हजार 383 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 42 हजार 433 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
( टिप :- दि. 10 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा सेवेत मृत्यू झाल्यास कुटुंबियांना १० लाख

0

मुंबई, दि. १० : राज्यातील पेन्शन लागू नसलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा त्याची सेवा १० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास मदत व्हावी यासाठी त्यांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील पेन्शन लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्यात येतो. १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश होतो. राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या अशा कर्मचाऱ्याचा १० वर्ष सेवा पूर्ण होण्यापूर्वी सेवेत असताना दुर्भाग्यवश मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते. तथापी, ही योजना फक्त राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असून ती जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत लागू नव्हती. आता यासंदर्भात काल शासन निर्णय जारी करुन ही योजना जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. शिवाय अशा कर्मचाऱ्यास पेन्शन लागू नसल्यास त्याच्या कुटुंबाची भविष्यात मोठी आर्थिक ओढाताण होते. त्यामुळे कमी सेवा कालावधी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अशा वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत होण्यासाठी ही योजना लागू करण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्याची नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसास ही मदत दिली जाईल. काही कारणास्तव संबंधित कर्मचाऱ्याचे अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे खाते नसले तरी त्याच्या कुटुंबियांना ही मदत केली जाईल. तसेच संबंधीत मृत कर्मचाऱ्याच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या खात्यात जमा असलेली संचित रक्कमही कुटुंबियास देण्यात येईल, मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

पुण्यात १३ ते २३ जुलै पुन्हा लॉकडाऊन

0

पुणे- पुणे पिंपरी परिसरात कोरोना मुळे १३ ते २३ जुलाई पर्यंत पुन्हा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलेली माहिती ….

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाऊन; अजित पवार

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यात बैठक झाली. पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये येत्या सोमवार ( दि. 13 जुलै ) पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा व नवीन नियमावली हे आज सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे..

अजित पवारांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत पुणे व पिंपरी चिंचवड मधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यात उपाय योजनांवर देखील सखोल चर्चा झाली. सर्वानुमते पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या लॉकडाऊनच्या पर्यायावर अजित पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी देखील या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला अनुमती दिली आहे. पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये येत्या सोमवार ( दि. 13 जुलै ) पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा व नवीन नियमावली हे आज सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे..

गेल्या काही दिवसांत पुणे व पिंपरीत कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. जवळपास शहरातील रुग्णांचा आकडा हा 25 हजारांच्या वर गेला आहे. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचा पर्याय वापरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा लॉकडाऊन पंधरा दिवसांचा राहणार असून तो 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांसह व इतर वरिष्ठ अधिकारी मिळून घेणार आहे..लॉकडाऊन संबंधी तयारी करण्याच्या सूचना देखील पोलिसांसह प्रशासनाला देण्यात आल्या आहे.

सरकार अफू पिऊन निर्णय घेत आहे काय ? अजय शिंदे

0

पुणे- ..तर पुण्यात पुन्हा लॉक डाऊन अशा इशाऱ्यावरून ,पुण्यात पुन्हा लॉक डाऊन अशी बातमी पसरताच त्यावर प्रतिक्रिया देखील उमटली . मनसेच्या अजय शिंदे यांनी हे सरकार अफू पिऊन निर्णय घेते आहे काय ? असा सवाल त्यावर केला

नव्याने लॉक डाऊन करणे म्हणजे नागरिकांना अक्षरशः आर्थिक संकटात टाकणे आहे
हे सरकार अफू पिऊन निर्णय घेत आहे जून महिन्याच्या सूरवातीला लॉक डाऊन नंतर करोना गेला संपला अश्या पद्धतीने मातोश्रीच्या आता स्वतःला कोंडून घेतलेल्या मा.मु नी निर्णय घेतले आता त्याची पुनरावृत्तीउपमुख्यमंत्र्यांनी केली आहे खुली सूट दिल्याने अनिर्बंध पणे वाढलेल्या आणि पुणे शहरात सरासरी 20 बळी दररोज गेल्या नंतर आणि करोनाग्रस्तांना हॉस्पिटल मध्ये जागाही मिळेनश्या झाल्या नंतर घाबरलेल्या आणि सर्वच आघाड्यांवर फेल झालेल्या सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य जनतेला अक्षरशः कर्जबाजारी करेल. असे मनसेचे अजय शिंदे यांनी तातडीने म्हटले.

परंतु हि बातमी देईपर्यंत लॉकडाऊन बाबत अधिकृत बातमी आली नव्हती .

पुण्यात पुन्हा कडक लॉकडाउनचा इशारा

0

पुणे : पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिला. कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण कोरोना चाचण्या वाढविण्यासोबतच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. सर्वांनी सजग राहून कामे करावीत, असे निर्देशही पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची आपत्ती लक्षात घेता महानगरपालिका व इतर यंत्रणांमार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यास अधिक प्रभावीपणे काम करणे शक्य होईल. टाळेबंदीच्‍या शिथिलीकरणानंतर यंत्रणांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे योग्य अंतर राखणे, मास्क वापरणे आदींचा अवलंब होत नसल्यास कारवाई करून शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे. कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्रमुख आव्हान आहे. जिथे उद्योग- व्यवसायांना परवानगी देण्यात आली तिथे लक्ष केंद्रीत करून अधिक काळजी घ्यावी, अशा सूचनाही श्री पवार यांनी दिल्या.

ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे शहर तसेच लगतच्या गावात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी वेळीच कडक उपाययोजना कराव्यात तसेच ‘फिव्हर क्लिनिक’मध्ये आवश्यक मनुष्यबळ व सामग्री उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर उपचार मिळणे शक्य होईल. कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्यविषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध, घरोघरी सर्व्हेक्षण तसेच कोरोना चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. कोरोना चाचणीसाठी स्‍राव नमुना घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी विलंब होणार नाही, याची दक्षता घ्या तसेच घरोघरी जावून करण्यात येत असलेले सर्वेक्षण वाढविण्यासोबतच यामध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तसेच सोसायटीचे अध्यक्ष यांचाही सहभाग घ्यावा, अशा सूचना करून झोपडपट्टी क्षेत्रातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री मेहता यांनी दिल्या.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी पुणे जिल्ह्याची कोरोना बाबतची सद्यस्थितीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोरोना वाढीचा दर, बरे होण्याचा दर, मृत्यू दर याचा अंदाज घेत जुलैअखेर अपेक्षित असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असल्याने त्यादृष्टीने व्यापक नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठीचे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. ज्या गावात कोरोना रुग्ण आढळत आहे, त्या संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगून शहरानजीकच्या गावातील वाढता संसर्ग विचारात घेत उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

आज कोरोनाच्या ६८७५ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.९ : राज्यात गेल्या नऊ दिवसात ३४ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१९ टक्के असून आज कोरोनाच्या ४०६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले.आतापर्यत एकूण संख्या १ लाख २७ हजार २५९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६८७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख  २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४८ हजार १९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २१९ मृत्यू हे मुंबई मनपा-६८, ठाणे-८, ठाणे मनपा-२०, नवी मुंबई मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-३, भिवंडी-निजापूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-३, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-९, पनवेल मनपा-८, नाशिक-३, नाशिक मनपा-१, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, जळगाव-६, जळगाव मनपा-१, नंदूरबार-२, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-४, सोलापूर मनपा-४, सातारा-३, जालना-१, लातूर मनपा-१,नांदेड-१,अमरावती-१,नागपूर-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील 

मुंबई: बाधित रुग्ण- (८९,१२४), बरे झालेले रुग्ण- (६०,१९५), मृत्यू- (५१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७८५)

ठाणे: बाधित रुग्ण- (५४,८११), बरे झालेले रुग्ण- (२२,८२१), मृत्यू- (१४८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,५०६)

पालघर: बाधित रुग्ण- (८५७५), बरे झालेले रुग्ण- (४१५२), मृत्यू- (१६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२६२)

रायगड: बाधित रुग्ण- (७१५२), बरे झालेले रुग्ण- (३३६२), मृत्यू- (१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६४६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (८२३), बरे झालेले रुग्ण- (५३१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२५४), बरे झालेले रुग्ण- (२०१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

पुणे: बाधित रुग्ण- (३३,३९४), बरे झालेले रुग्ण- (१५,१७९), मृत्यू- (९८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७,२२६)

सातारा:  बाधित रुग्ण- (१५३३), बरे झालेले रुग्ण- (८८४), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८४)

सांगली: बाधित रुग्ण- (५२३), बरे झालेले रुग्ण- (२८२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१०४३), बरे झालेले रुग्ण- (७५९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३५३९), बरे झालेले रुग्ण- (१९०७), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०२)

नाशिक: बाधित रुग्ण- (६२३३), बरे झालेले रुग्ण- (३४३५), मृत्यू- (२६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (६६१), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८)

जळगाव: बाधित रुग्ण- (४९९६), बरे झालेले रुग्ण- (२८५०), मृत्यू- (३१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२३६), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६)

धुळे: बाधित रुग्ण- (१३८८), बरे झालेले रुग्ण- (८२४), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (७४१३), बरे झालेले रुग्ण- (३४०८), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९१)

जालना: बाधित रुग्ण- (८५२), बरे झालेले रुग्ण- (४७४), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४३)

बीड: बाधित रुग्ण- (१८५), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

लातूर: बाधित रुग्ण- (५५२), बरे झालेले रुग्ण- (२७७), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४७)

परभणी: बाधित रुग्ण- (१६७), बरे झालेले रुग्ण- (९६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (२६८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

नांदेड: बाधित रुग्ण- (५०२), बरे झालेले रुग्ण (२४६), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

अमरावती: बाधित रुग्ण- (७५४), बरे झालेले रुग्ण- (५३०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९२)

अकोला: बाधित रुग्ण- (१७८४), बरे झालेले रुग्ण- (१४१६), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७६)

वाशिम: बाधित रुग्ण- (१४६), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३७७), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०३)

नागपूर: बाधित रुग्ण- (१८५५), बरे झालेले रुग्ण- (१३४५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१)

वर्धा: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

भंडारा: बाधित रुग्ण- (९९), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१२७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१६६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९)

एकूण: बाधित रुग्ण-(२,३०,५९९), बरे झालेले रुग्ण-(१,२७,२५९), मृत्यू- (९६६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२१),ॲक्टिव्ह रुग्ण-(९३,६५२)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो..)

‘पक्षप्रवेश झाल्यानंतर समजलं की, ते नगरसेवक शिवसेनेचे होते’- अजित पवार

पारनेर- शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली. यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मौन सोडले आहे. पक्षप्रवेशानंतर ते नगरसेवक सेनेचे असल्याचे समजले, असा दावा अजित पवारांनी केला आहे.

सारथीवरुन सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘मी त्या दिवशी बारामतीत होतो. गर्दीत मी सगळ्यांना सांगत होतो, काळजी घ्या. तेव्हा काही वाहने आली. तिथे आमदार निलेश लंके आले होते. त्यांना विचारले की, काय काम आहे, तर ते मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात गमछे टाकले आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर कळले की, ते नगरसेवक शिवसेनेचे होते.’

‘यानंतर मी निलेश लंकेंना याबाबत विचारल्यावर, त्यांनी सांगितले की, दादा ते भाजपात जाणार होते. राष्ट्रवादीने घेतले नाही, तर आम्ही भाजपात जाऊ, असे ते म्हणू लागले.’ यानंतर पवार म्हणाले की, ‘आम्ही फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी निलेश लंकेंना बोलावून याबाबत सांगितले आहे,’ असे अजित पवारांनी सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दोन तासात ‘सारथी’ला मिळाले ८ कोटी रुपये

0

मुंबई, दि. 9 : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातंच सदर निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून तसे पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णयक्षमता व झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. यानिमित्ताने ते पुन्हा सिद्ध झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. दुपारी दिड वाजता पत्रकार परिषदेत 8 कोटी देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने पत्र क्र.संकिर्ण 2019/प्र.क्र.117/महामंडळे, दि. 9 जुलै 2020 निर्गमित करण्यात आले असून त्याद्वारे सुमारे 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ज्येष्ठ सिनेपत्रकार, नाट्य-चित्रपट समीक्षक दीनानाथ घारपुरे यांचे निधन

0

मुंबई-ज्येष्ठ सिनेपत्रकार, नाट्य-चित्रपट समीक्षक दीनानाथ घारपुरे यांचे काल ८ जुलै २०२० रोजी निधन झाले.

नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीने अध्यक्ष शीतल करदेकर यांनी त्यांच्या निधनानिमित्त दुखः व्यक्त केले आहे.


दीनानाथ घारपुरे यांचा अल्पपरिचय.
दीनानाथ घारपुरे यांनी ३८ वर्षं आकाशवाणीच्या नाशिक, बीड आणि मुंबई केंद्रांवर विविध अधिकारी पदांवर काम केले. तसेच, सिनेपत्रकार म्हणूनही त्यांनी या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कित्येक कलाकारांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. अत्यंत मितभाषी स्वभावाचे घारपुरे राज्य नाट्यस्पर्धांच्या परीक्षणासाठी आवर्जून हजर असायचे आणि त्याच्या वृत्तसंकलनाची जबाबदारीही त्यांनी कित्येक वर्षें निभावली. दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्येही त्यांचे ‘चित्रनगरी’ हे दर शनिवारी नाट्यसमीक्षा, चित्रपट परीक्षण आणि कलाकारांच्या मुलाखतींचे सदर विशेष प्रसिद्ध होते.

‘सारथी’ बंद होणार नाही, स्वायत्तता कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 9 : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहील. ‘सारथी’ला उद्याच तातडीने 8 कोटींचा निधी दिला जाईल. समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन 2020-30’ हा दहा वर्षांचा आराखडा तयार केला जाईल. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या. ‘सारथी’च्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचे सांगून यापुढच्या काळात ‘सारथी’वरचे हेत्वारोप टाळून बदनामी थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले.‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार विनायक मेटे आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी विचार मांडले. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, ‘सारथी’संस्थेसंदर्भात विविध व्यक्ती, संस्था, मान्यवरांकडून आलेली निवेदने, पत्रे, मागण्यांची नोंद घेण्यात आली आहे, त्यांचा एकत्रित विचार करुन सर्वांच्या मनासारखा सकारात्मक निर्णय व्हावा, ही सरकारची भूमिका आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजाच्या विविध विद्याशाखा, अभ्यासक्रमात शिकणाऱ्या, स्पर्धापरिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क त्वरीत मिळावे यासाठी उद्याच 8 कोटी रुपये ‘सारथी’ला उपलब्ध करुन दिले जातील. ‘तारादूत’ यांना दोन महिन्यांचा प्रलंबित निधी तात्काळ दिला जाईल. मराठा समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी काम करणारी ‘सारथी’ आणि आर्थिक विकासासाठी काम करणारे ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ या दोन्ही संस्था अनुक्रमे ओबीसी व कौशल्य विकास मंत्रालयाऐवजी पुढच्या काळात नियोजन विभागाच्या अंतर्गत काम करतील. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करुन घेण्यात येईल. याचाच अर्थ या दोन्ही संस्थांची जबाबदारी आता नियोजनमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:कडे घेतली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करुन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला  आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘सारथी’च्या आगामी वाटचालीबद्दल म्हणाले की, ‘सारथी’चा कारभार पुढच्या काळात अधिक पारदर्शक व नियमानुसारंच होईल. संस्थेकडून होणारा खर्च दरमहा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. दर दोन महिन्यांनी कामाचा आढावा घेऊन, आलेल्या नवीन सूचना, कल्पना विचारात घेऊन वाटचालीची पुढची दिशा निश्चित करण्यात येईल. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेशा पद्धतीनं, त्यांचा गौरव वाढवणारा असेल, याची काळजी घेऊ. ‘सारथी’चा गौरव वाढवण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले. ‘सारथी’ची नाहक बदनामी करण्याचे प्रकार थांबवावेत, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही उपमुख्यमंत्र्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन बैठक आयोजित केल्याबद्दल तसेच या दोन्ही संस्थांची जबाबदारी स्विकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही छत्रपतीं संभाजीराजेंनी निमंत्रणाचा स्विकार करुन बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज स्वॅब तपासणीकरीता बंद-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे दि.9 : जिल्हयातील हवेली तालुक्यामधील ग्रामीण कार्यक्षेत्रामधील थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज कोरोना विषाणू तपासणीच्या अनुषंगाने संशयास्पद असल्याने थायरोकेअर तपासणी प्रयोगशाळा कोवीड-19 च्या कोरोना स्वॅब तपासणीकरीता बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
उपविभागीय अधिकारी हवेली यांच्याकडील अहवालानुसार कोरोना आजाराच्या संशयित रुग्णांची तपासणी करणा-या आय.सी.एम.आर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या यादीमध्ये थायरोकेअर प्रयोगशाळेचा समावेश आहे. या प्रयोगशाळेमध्ये मौजे खानापुर ता.हवेली येथील धुमाळ कुटूंबातील व्यक्तींनी कोरोना विषाणूची तपासणी केली असता दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व एका लहान मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या अहवालाच्या निष्कर्षावर कुटूंबाने संशय व्यक्त केल्याने त्यांचे अहवाल पुन्हा एन.आय.व्ही. पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, सर्व धुमाळ कुटूंबाचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक जनतेने व गावातील इतर रुग्णांनी थायरोकेअर या प्रयोगशाळेच्या कामकाज व निष्कर्षाबाबत संशय व्यक्त केला असल्याने ही कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.