Home Blog Page 2517

अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

बारामती,दि.11 : बारामती शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. शहर परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देत त्यांनी कामाचा आढावा घेतला.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ, नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर उपस्थित होते.
या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर ते माळेगाव येथील प्रस्तावित सेवा रस्ता , बारामती नगरपरिषद वाहनतळ, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, गौतम बाग येथील कॅनलच्या दोन्ही बाजूला वाढविण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहाणी केली.
या पाहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठाणच्या ‘व्हिआयटी हॉल’ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, जलसंपदा यांत्रिकी विभाग मुख्यअभियंता जिवणे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव , उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत, त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. विकासकामे करताना रस्त्यांचे सुशोभिकरण करणे, सेवा रस्त्यालागत झाडे लावण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. शासकीय जागांमध्ये असणारी अतिक्रमण हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच अवैद्य वाळू उपसा तसेच अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस विभागाला दिले.
तसेच ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोरोना विरुध्‍दच्‍या लढ्यामध्‍ये कॉर्पोरेट जगताचे सहकार्य

0

            राज्‍यात कोरोनाची पहिली व्‍यक्‍ती पुण्‍यात सापडल्‍यानंतर राज्‍याचेच नव्‍हे तर संपूर्ण देशाचे लक्ष पुण्‍याकडे होते. कोरोनाने इतर देशांत घातलेला धुमाकूळ पाहून चिंता वाटणे स्‍वाभाविक होते. कोरोना संसर्गाचा धोका ओळखून प्रशासकीय यंत्रणा अगोदरपासूनच कामाला लागली होती. उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम, पुणे महापालिकेचे आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍यासह आरोग्‍य यंत्रणा, पोलीस यंत्रणा सज्‍ज झाली होती.
            कोरोनाचे संकट किती मोठे आणि किती काळ राहील, याची कोणालाही माहिती नव्‍हती. तथापि, ते गंभीर असेल याची खात्री होती, त्‍यामुळे अल्‍प‍कालीन आणि दीर्घकालीन उपाय योजण्‍यात आले. सुनियोजित प्रयत्‍नांमुळे केंद्रीय पथकांनी भीती व्‍यक्‍त केलेल्‍या रुग्‍णसंख्‍येपेक्षा कमी रुग्‍ण संख्‍या राखण्‍यात यश मिळाले. हा रोग लपवण्‍यासारखा नसून त्‍यावर योग्य वेळी, योग्य उपचार घेतले तर तो बरा होवू शकतो, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवता आला. रुग्‍ण आणि रुग्‍णालयांना आवश्‍यक ती वैद्यकीय मदत, साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करणे, आवश्‍यकतेनुसार सध्‍या असलेल्‍या रुग्‍णालयांची क्षमता वाढविणे, प्रयोगशाळांतील नमुना तपासणीचे प्रमाण वाढविणे,  कोवीड केअर सेंटर, समर्पित कोवीड रुग्‍णालय उभारणे, खाजगी रुग्‍णालयांशी करार करणे, ग्रामीण भागातील रुग्‍णांना उपचारासाठी मदत करणे अशा उपायांचा अवलंब करण्‍यात आला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी नियोजनबद्ध  आखणी केली. कोरोनाशी लढा देतांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले. त्यांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या. नियमित बैठका घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. कोरोनाशी लढा देतांना आर्थिक मदत कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्‍यात आली. गरजेनुसार वेळोवेळी निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला. पालकमंत्री अजित पवारांनी एक टीम तयार करून अपेक्षित कामांची यादी केली, त्या कामांचे नियोजन करुन भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी नेमून त्‍यांच्‍याकडे जबाबदारी सोपवली. नियोजनाप्रमाणे किती काम झाले, अडचणी काय आहेत, त्‍यावर उपाय काय याचा दर आठवड्याला नियमित आढावा घेण्‍यात आला. गरजेप्रमाणे निधी उपलब्‍ध करुन दिला. ही कामे करत असतांना नियमांचे कुठेही उल्‍लंघन होणार नाही, गुणवत्‍तापूर्ण आणि टिकाऊ कामे होतील, याची दक्षता घेण्‍याच्‍या कडक सूचनाही त्‍यांनी दिल्‍या. या लढ्यात सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सि‍बिलीटी) निधीचीही मदत होऊ शकते, हे लक्षात घेवून उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कॉर्पोरेट जगताला आवाहन केले, तसेच या कामी पाठपुरावा करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्‍यात आली. त्‍यामध्‍ये पुणे महापालिकेचे आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त शंतनू गोयल, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला यांचा समावेश आहे. सीएसआर निधीचा उपयोग पुणे महापालिका, पुणे पोलीस आयुक्‍तालय, पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय, ससून सर्वोपचार रुग्णालय यांना आवश्‍यक ती साधनसामुग्री उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी नियोजन करण्‍यात आले. विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला, केपीएमजीचे रोहन सास्‍ते यांच्‍या प्रयत्‍नांमुळे अॅक्सिस बँकेने कोरोना लढ्यासाठी आवश्‍यक 5 कोटी रुपयांची साधनसामुग्री उपलब्‍ध करुन दिली. तसेच आयडीबीआय बँकेनेही 40 लाख रुपयांचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे सुपूर्द केला. यावेळी अॅक्सिस बँकेचे अध्‍यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्‍यवस्‍थापक संजय पणीकर, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. अॅक्सिस बँकेच्‍यावतीने पीपीइ किट 4800, एन 95 मास्‍क (धुवून वापरता येणारे) 10 हजार, सॅनिटायझर (80 टक्‍के इथेनॉल असलेले) 30 हजार, इन्‍ट्युबेशन बॉक्‍स 450, सोडीयम हायपोक्‍लोराइड सोल्‍यूशन 21 हजार किलोग्रॅम, बॅटरीवर चालणारे स्‍प्रे पंप 1126, एक वर्ष वॉरंटी असलेल्‍या थर्मल गन 285, ऑक्झिमीटर 521, निगेटीव्‍ह आयन जनरेटर 141, मोबाईल क्लिनीक 23 (एका महिन्‍यासाठी) उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. याशिवाय कोरोना उपचार विषयक कार्यवाहीचा प्रतिसाद जाणून घेण्‍यासाठी अॅप सुविधेचीही मदत देण्‍यात आलेली आहे. उपलब्‍ध साधनसामुग्रीतील काही मदत नागपूर,मुंबई, नवी मुंबईसाठीही वापरण्‍यात आली आहे.
            कोरोना लढ्यात ससून रूग्णालय, पुण्यातील प्रशासन आणि लष्कराच्या सदर्न कमांड मध्येही माहिती-तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाची कार्यवाही सुरू झाली. त्‍यानुसार लष्कराकडे उपलब्ध असलेले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच मॉड्युलर आयसीयूचे तंत्रज्ञान, उपकरणे कशी ठेवायची, कशी वापरायची याबाबतची माहिती आता प्रशासनाला मिळणार आहे. या बदल्यात राज्याकडे असलेल्‍या कोरोना नमुना तपासणीच्‍या सुविधेचा लाभ लष्कराला मिळणार आहे. एकाच वेळी 96 तपासण्‍या आणि साडेतीन तासांतच अहवाल देण्याची क्षमता पुणे प्रशासनाकडे आहे. याचा फायदा सदर्न कमांडला होणार आहे.
            पालकमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली ससून रूग्णालयात कोरोना (कोविड-19) परीक्षणासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी केली जात आहे. या प्रयोगशाळेत रोबोटीकचाही वापर करण्यात येत आहे. याशिवाय सीबी नॅट यंत्राचा वापरही सुरू करण्यात येत आहे, त्यामुळे येत्या काळात पुण्यात जास्तीत जास्त तपासण्‍या होऊन कोरोनाचे अत्यंत जलद निदान करता येऊ शकेल.
      सीएसआर च्‍या माध्‍यमातून अॅक्सिस बँकेने नॉन कोविड रूग्णांसाठी मोबाईल क्लिनिक व्हॅन, कोविड लक्षणांच्या तपासणीसाठी अद्ययावत मोबाईल व्हॅन, आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून डिजीटल एक्सरेचे विश्लेषण, वस्त्या-वस्त्यांमध्ये फिरती शौचालये, पिंपरी- चिंचवड महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी टेलिमेडीसीन सुविधा पुरवण्यासाठी अद्ययावत अॅपची निर्मिती, कोविड-19 कंटेनमेंट ऍपच्या माध्यमातून कोरोना योद्धे स्टाफ, स्वयंसेवी संस्था, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्‍या उपक्रमांचे संनियंत्रण आणि ट्रॅकींग करणे, कोरोना संसर्गाचा धोका असलेल्या रूग्णालयांमध्ये निगेटीव्ह आयन निर्मिती करणारी संयंत्र देणे, एनट्युबेशन बॉक्स,पीपीई किट-एन-95, सॅनिटायझर तसेच इतर आवश्यक साधनांचा पुरवठा करणे यासाठी मदत केली.
            आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केलेले डिजीटल एक्सरे सॉफ्टवेअर हे पूर्णपणे भारतात तयार करण्‍यात  आले आहे. तरुण अभियंत्यांची टीम यासाठी धडपड करीत होती. त्यांना या कामी कौस्‍तुभ बुटाला यांनी मार्गदर्शन केले. या सॉफ्टवेअरचे कौतुक अनेक ज्‍येष्‍ठ रेडिओलॉजिस्‍टसह आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, ससूनच्‍या रेडिओलॉजिस्‍ट विभागाच्‍या प्रमुख डॉ. शेफाली पवार आणि त्‍यांचे सहकारी, पुणे मनपाचे डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. वावरे, पिंपरी-चिंचवडचे डॉ. वाबळे यांनी केले आहे.
            कोरोनाच्‍या (कोव्हीड-19) साथीमुळे इतर आजारांनी ग्रस्त रूग्णांना उपचार मिळणे कठीण झाले होते. मात्र, सर्व सुविधांनी युक्त फिरत्या दवाखान्यांमुळे लोकांना त्यांच्या-त्यांच्या विभागात वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांनीही लोकांच्‍या आरोग्याच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावले. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना असलेला कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन खास पोलीसांसाठीही मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. या व्हॅनमध्ये प्राथमिक लक्षणांवरून निदान करता यावे म्हणून डिजीटल एक्स-रे ची सोय ही करण्यात आली आहे. 
            रूग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य सेवकांना संसर्गाचा धोका लक्षात घेता रूग्णालयांमध्ये इनट्युबेशन बॉक्स देण्यात आले आहेत. या बॉक्समुळे रूग्णाशी थेट संपर्क टाळला जातो तसेच त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचारही करता येतात. रूग्णालयांमधल्या संसर्गाचे प्रमाण वाढण्‍याची भीती असते. डॉक्टर तसेच आरोग्य सेवक सतत संसर्गाच्या छायेखाली असतात, यावर उपाय म्‍हणून आता रूग्णालयांमध्ये निगेटीव्ह आयन तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रेही रूग्णालयांना पुरवण्यात आलेली आहेत.
            संसर्गाच्या भीतीमुळे डॉक्टर्सनी आपली क्लिनिक बंद ठेवली. अशा परिस्थितीत रूग्णांना आधार देण्यासाठी सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एक टेलिमेडीसीन अॅप ही सुरु करण्‍यात आले. यासाठी आयडीबीआय बँकेची मदत झाली. स्मार्ट सारथी अॅपच्या जोडीने हे अॅप वापरता येणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या अॅपच्या माध्यमातून वैद्यकीय साह्य मिळवता येते. या अॅपचा फायदा सामान्य लोकांबरोबरच कोरोनामुळे घरीच विलगीकरण करण्यात आलेल्या रूग्णांना मिळणार आहे.
            कोरोना लढ्यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पुरवण्यात येत असलेल्या सेवा-सुविधांसाठी कार्यरत मनुष्यबळाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी टेक्नो-पर्पल अॅपचे साह्य घेण्यात आले आहे. या अॅपमुळे सामान्य नागरिक आणि प्रशासन या दोघांनाही खूप मदत होणार आहे. पीसीएमसी सारथी आणि पीएमसी केअर या दोन्ही अॅपमध्ये या अॅपचे  इंटीग्रेशन झाल्यामुळे विविध सुविधांसाठी ‘एक खिडकी’ मांडणी तयार होणार आहे. या अॅपवरील डॅशबोर्डमुळे कंटेनमेंट भागामध्ये वेळेवर सुविधा पोहोचत आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. जीपीएसचा वापर करण्यात आलेल्या या अॅपमुळे केलेल्या कामाची खात्री आणि पडताळणी करता येते. बाधित क्षेत्रामध्ये सार्वजनिक शौचालयांची कमतरता जाणवू नये म्हणून अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून फिरती शौचालयेही देण्यात आली आहेत. सीएसआरच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन प्रेरणादायी काम केलेआहे. कोरोना लढा देतांना लोकांना उत्‍तम आरोग्य सुविधा द्यायच्या, कोरोनाचा प्रसार रोखायचा त्याचवेळी जे या विषाणूशी प्रत्यक्ष लढतायत त्या कोरोना योद्ध्‍यांचे मनोधैर्य सतत वाढवत ठेवायचे, ही एक मोठी तारेवरची कसरत शासन-प्रशासन पार पाडत आहे. कॉर्पोरेट जगताला स्‍वयंस्‍फूर्तीने या लढ्यासाठी सीएसआर निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचेही आवाहन करण्‍यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ, स्‍वयंसेवी संस्‍था, कॉर्पोरेट जगताने सुरु केलेल्या कोरोना लढ्यामध्‍ये लोकांनी स्‍वयंशिस्‍त आणि खबरदारी पाळून साथ दिली तर कोरोनावर मात करण्‍यात नक्‍कीच यश येवू शकते.   


   राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी,  पुणे(मो. 9423245466)

९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.१०: राज्यात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २२६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २२६ मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-९, ठाणे मनपा-८, नवी मुंबई मनपा-१२, कल्याण-डोंबिवली मनपा-१०, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी-निजापूर मनपा-८, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१, वसई-विरार मनपा-९, रायगड-३, पनवेल मनपा-६, नाशिक-१, नाशिक मनपा-४, धुळे मनपा-४, जळगाव-४, जळगाव मनपा-३, नंदूरबार-२, पुणे-५, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-२, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, सांगली-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-१, हिंगोली-१, परभणी-१, लातूर-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-३, वाशिम-१, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

टीप:आज रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील इतर कारणांमुळे झालेले २७५ मृत्यू कळविले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (९०,४६१), बरे झालेले रुग्ण- (६१,९३४), मृत्यू- (५२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,०३५)

ठाणे: बाधित रुग्ण- (५७,१३८), बरे झालेले रुग्ण- (२४,६२४), मृत्यू- (१५३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,९७७)

पालघर: बाधित रुग्ण- (८९६३), बरे झालेले रुग्ण- (४५५४), मृत्यू- (१७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२३८)

रायगड: बाधित रुग्ण- (७६१३), बरे झालेले रुग्ण- (३५०७), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९५३)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (८३२), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२५४), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

पुणे: बाधित रुग्ण- (३५,२३२), बरे झालेले रुग्ण- (१५,५२६), मृत्यू- (१०२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,६८०)

सातारा:  बाधित रुग्ण- (१५८५), बरे झालेले रुग्ण- (९०९), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६११)

सांगली: बाधित रुग्ण- (५५०), बरे झालेले रुग्ण- (३०२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१०६२), बरे झालेले रुग्ण- (७६५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३५९५), बरे झालेले रुग्ण- (१९८६), मृत्यू- (३३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७४)

नाशिक: बाधित रुग्ण- (६५८५), बरे झालेले रुग्ण- (३६३३), मृत्यू- (२६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६८३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (७०३), बरे झालेले रुग्ण- (४७१), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१२)

जळगाव: बाधित रुग्ण- (५२६०), बरे झालेले रुग्ण- (३१४७), मृत्यू- (३२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७८७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२४०), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

धुळे: बाधित रुग्ण- (१४२३), बरे झालेले रुग्ण- (८३४), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (७६९१), बरे झालेले रुग्ण- (३५६२), मृत्यू- (३२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८०६)

जालना: बाधित रुग्ण- (८८०), बरे झालेले रुग्ण- (४७५), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९)

बीड: बाधित रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१०३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

लातूर: बाधित रुग्ण- (६०६), बरे झालेले रुग्ण- (२८४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)

परभणी: बाधित रुग्ण- (१८०), बरे झालेले रुग्ण- (९६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३२५), बरे झालेले रुग्ण- (२७५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

नांदेड: बाधित रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण (२४८), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३३२), बरे झालेले रुग्ण- (२०९), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९)

अमरावती: बाधित रुग्ण- (७९६), बरे झालेले रुग्ण- (५५१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२११)

अकोला: बाधित रुग्ण- (१७९६), बरे झालेले रुग्ण- (१४२७), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७)

वाशिम: बाधित रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (१९७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४०२), बरे झालेले रुग्ण- (२६६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१९१०), बरे झालेले रुग्ण- (१३६४), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२७)

वर्धा: बाधित रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

भंडारा: बाधित रुग्ण- (१४८), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१९९), बरे झालेले रुग्ण- (१२७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (९३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (६६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७)

एकूण: बाधित रुग्ण-(२,३८,४६१), बरे झालेले रुग्ण-(१,३२,६२५), मृत्यू- (९८९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९६),ॲक्टिव्ह रुग्ण-(९५,६४७)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

घरी परतले ;अन सारे भारावले

0

राष्ट्रवादीच्या नितीन कदम आणि त्यांच्या लेकीची कोरोनावर मात

पु णे – जनतेला धीर देणारी, जनहितासाठी सभागृहात वाघिणीची डरकाळी फोडणारी नगरसेविका असली म्हणून काय झाले , अखेर ती एक स्त्री आहे ,एक गृहिणी आहे ,कोरोनाने थेट तिच्या कुटुंबावरच आघात केला अन हि सभागृहातील वाघीण भांबावली पण नेत्यांच्या ,हितचिंतकांच्या आशीर्वादाने भारावली देखील …. सहकारनगर ,पर्वती परिसरातील अश्विनी कदम यांची हि कथा ..व्यथा ..

https://www.youtube.com/watch?v=GXvjaLk1OUI

कोरोनाशी एकूणच पुणे लढा देत असताना जनतेला मदत करण्यासाठी धावाधाव करता करता यांच्यावरच कोरोनाचा घाला झाला अन नितीन कदम अन त्यांची १३  वर्षाची  मुलगी  गौरवी यांना कोरोनाची लागण झाली त्यांना मंगेशकर हॉस्पिटल  मध्ये उपचारासाठी पाठविले गेले .आणि मुलगा विरेन यास होम आयसोलेशन करण्यात आले. सुदैव एवढेच कि नगरसेविका अश्विनी यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. पण कुटुंबच कोरोनाच्या घेऱ्यात सापडले . आणि मग घराची जबाबदारी , नागरिकांची कामे या फरफटीत नगरसेविकेतील गृहिणी भांबावून गेली . खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्यापासून सुप्रिया सुळे,वंदना चव्हाण  आणि राष्ट्रवादीचे कार्यकते त्यांना वेळोवेळी धीर देऊ लागले ज्या नागरिकांना कदमांची हि व्यथा समजली त्यांनीही धीर द्यायला सुरुवात झाली आणि मग हि भांबावलेली गृहिणी सावरली .आज रुग्णालयातून या बापलेकीला डिस्चार्ज देण्यात आला , हे दोघे घरी आले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले . शरीराने थोडेसे थकलेले कदम या टाळ्यांनी म्हणाले जणू हत्तीचे बळ आले … कोरोनाच्या काळातील असंख्य कथा आणि व्यथेत एका राजकीय कुटुंबातील एका गृहिणीची कथा म्हणून हा किस्सा कायम स्मरणात राहील .- शरद लोणकर, पुणे

मराठा आरक्षणाची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेणार – मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

0

मुंबई, : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

उपसमितीने शुक्रवारी सायंकाळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार छत्रपती संभाजे राजे, आमदार विनायक मेटे यांच्यासह समाजातील अनेक अभ्यासक, जाणकारांनी आपली भूमिका मांडली. याप्रसंगी समितीचे सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार आणि शासनाचे संबंधित अधिकारी व वकील उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, विधीमंडळाने सर्व सहमतीने पारित केलेले मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी असल्याचे चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले. समितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनीही याप्रसंगी आपली भूमिका मांडली. समाजाकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. न्यायालयीन लढा जिंकण्यासाठी सरकार कोणतीही कसूर ठेवणार नाही, असे अभिवचन त्यांनी दिले. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रसंगी बोलताना मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य यापुढेही घेतले जाईल असे सांगितले. बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीतून अनेक चांगले मुद्दे समोर आल्याचे सांगितले. या मुद्यावर असलेली एकजूट पाहता मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्चितपणे कायम राहिल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघाचा तीव्र विरोध !

0

पुणे : शहरातील व्यापारी, व्यापाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे.

आता पुन्हा लॉकडाऊन जाहिर केल्यास व्यापाराची मोठी हानी होणार असून, ती सहन करणे अवघड आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक बरोबरच मानसिक खच्चीकरण होणार आहे. झालेल्या नुकसानीमुळे शहरातील काही व्यापाऱ्यांनी यापूर्वी आत्महत्याही केलेल्या आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे ई-मेल पाठवून केली असल्याची माहिती अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने नुकताच 13 जुलैपासून 10 दिवस लॉकडाऊन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर महासंघाने ही भूमिका घेतली आहे. 17 मार्चपासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. अद्याप व्यापार सुरळीत झालेला नाही. व्यापाऱ्यांना नोकरांना पगार द्यावाच लागत आहे. कर्जाचे हप्ते आहेत, दुकान भाडे, घरभाडे, वीज बिल भरावे लागते. तीन महिने कोणतेही उत्पन्न नसताना व्यापाऱ्यांनी हे सहन केले. आता ते शक्‍य नाही. दुकाने बंद ठेवणे हा करोना संसर्गावर उपाय नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

‘सारथी’च्या कामकाजाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची पुण्यातील कार्यालयाला भेट

0

सारथी’च्या कार्यालयातील बैठकीत
उपमुख्यमंत्र्यांकडून कामकाजाचा आढावा

– ‘सारथी’ला नवीन इमारत बांधण्यासाठी
जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

– ‘सारथी’चे कामकाज प्रभावी करण्यासाठी
मनुष्यबळ व निधी उपलब्ध करुन देणार

‘सारथी’चे कामकाज राजर्षी शाहू महाराजांच्या
नावाला साजेसे व गौरव वाढवणारे असले पाहिजे

  • ‘सारथी’ संस्थेतील बैठकीत उपमुख्यमंत्र्याची माहिती

पुणे,:- मराठा समाजाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या ‘सारथी’ संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेसा, त्यांचा गौरव वाढवणारा असला पाहिजे. त्यासाठी ‘सारथी’ने भविष्याचा वेध घेऊन प्रकल्प तयार करावेत, ‘व्हिजन डॉक्युमेंट 2020-30’ तयार करुन पुढच्या दहा वर्षांचा आराखडा तयार करावा, संस्थेचं काम पूर्ण क्षमतेने होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबरोबरच शासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ‘सारथी’ संस्थेत आयोजित विशेष बैठकीत दिला. ‘सारथी’ला कायमस्वरुपी नवीन इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
‘सारथी’ संस्थेची जबाबदारी नियोजन विभागाकडे घेण्याची घोषणा काल केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लगेचच पुणे येथील ‘सारथी’च्या कार्यालयाला भेट दिली व अधिकाऱ्यांशी संवाद साधला व संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ‘सारथी’ संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, संचालक उमाकांत दांगट, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी ‘सारथी’च्या कामाला योग्य दिशा व गती देण्यासाठी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मराठा विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्थापन ही संस्था चांगली चालली पाहिजे. संस्थेच्या कामात त्रूटी राहता कामा नयेत, कारभारात पादर्शकता असली पाहिजे. संस्थेच्या निधीबाबतची माहिती वेबसाईटवर वेळच्यावेळी उपलब्ध झाली पाहिजे. युवकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरंच कौशल्यविकासावर भर द्यावा. गरज ओळखून व भविष्याचा वेध घेऊन नवीन प्रकल्प तयार करावेत, असे सांगून जुन्या प्रकल्पांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. सारथी संस्थेने दहा वर्षांचा विचार करून ‘व्हिजन डॉक्युमेंट 2020-30’ चे सर्वंकष नियोजन केल्यानंतर निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच मंत्रालयात खासदार छत्रपती संभाजीराजे आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन ‘सारथी’ला ताकद देण्यासाठी विविध निर्णयांची घोषणा केली होती. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केल्या. ‘सारथी’ला 8 कोटींचा निधीही त्यांनी तातडीने उपलब्ध करुन दिला. त्यानंतर आज लगेचच उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यातील ‘सारथी’ संस्थेला दिलेली भेट महत्वाची मानली जात आहे.

दैनंदिन कामे करताना कोरोनाविषयी आवश्यक काळजी घ्या – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील

0

पुणे : -आंबेगाव तालुक्यातील कोवीड १९ ची परिस्थिती व भविष्यात वाढणाऱ्या रूग्णांचे नियोजन करण्यासाठी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंचर येथे बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, पोलिस उप अधीक्षक विवेक पाटील, उप विभागीय अधिकारी जितेंद्र डूडी, उप विभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, आंबेगाव तालुक्यात वैद्यकीय सेवा देणारे डॉ.सुनिल खिवंसरा, डॉ.नरेंद्र लोहकरे, डॉ.सचिन गाडे, डॉ.हर्षद शेटे, डॉ.लीना गुजराथी, डॉ.खेडकर, डॉ.महेश गुडे हे उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे व इतर शहरांमधून येणारे लोक कोरोना बाधित सापडत होते. मात्र, आता स्थानिक लोक कोरोना पॉझिटीव्ह मिळू लागले आहेत. तालुक्यात सध्या २० ते ४० वयोगटातील रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत गेल्यास आवश्यक उपाययोजनांचे संपूर्ण नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले.
पुण्यातील रूग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या वाढल्याने तालुक्यातील रूग्णांवर तालुक्यातच उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्याचे नियोजन झाले. यासाठी तालुक्यात एक हजार बेडची व्यवस्था करण्याचे बैठकीत ठरले. भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पीटल बरोबरच एखादे खाजगी हॉस्पीटल घेऊन कोरोनाचे रूग्ण दाखल करता येवू शकतील. या कामात तालुक्यातील खाजगी डॉक्टर मदत करण्यास तयार असून त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊन शिथील केले असले तरी नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सध्या रस्त्यावर खूप गर्दी होवू लागली आहे. तालुक्यातील जनतेला हात जोडून विनंती आहे की सहजतेने घेवू नका. आपली दैनंदिन कामे करताना आवश्यक काळजी घ्या, असे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
इतर तालुक्यांच्या तुलनेत आंबेगाव व जुन्नर तालुका सुरक्षित आहे. हा असाच सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेवर तपासणी, आयसोलेशन व जनतेमध्ये जनजागृती या गोष्टींकडे प्रशासनाकडून लक्ष दिले जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

पालिकेच्या असहकार्यामुळे सामाजिक कार्यकर्ते,रुग्णांना अडचण -राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन जाधव यांची व्यथा

0

पुणे:-संशयित कोविड रुग्णाच्या तपासणीपासून ,रुग्णवाहिका मिळणे ,अहवाल मिळणे ,रुग्णालय मिळणे अशा सर्व बाबतीत पुणे महापालिका यंत्रणेकडून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्ते   आणि प्रत्यक्ष रुग्ण यांना प्रचंड अडचणी येत असून मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची व्यथा  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव  नितीन उर्फ बबलू जाधव यांनी व्यक्त केली आहे. पालिकेच्या कारभारामुळे स्वाब टेस्टिंग साठी पुढे येत नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. 
मार्च पासून नितीन जाधव हे कोरोना साथीमध्ये मध्यवर्ती पेठा आणि शहरातील रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. या अनुभवातून आज त्यांनी पत्रकाद्वारे काही प्रश्न उपस्थित केले . 
पालिकेच्या डॅशबोर्ड वर रुग्णांसाठी जागा शिल्लक नाही असे सांगितले जात असताना प्रत्यक्ष रुग्णालयात गेल्यावर मात्र जागा मिळते ,रुग्ण वाहिका १०८ वरून बोलावली तर दिवसभर ती उपलब्ध होत नाही. रुग्णांच्या तपासणीसाठी ८ -८ तास थांबावे लागते ,आणि एका ठिकाणी निगेटिव्ह आलेला रुग्णाचा अहवाल दुसऱ्या ठिकाणी पॉझीटिव्ह ठरतो ,अशा अनेक व्यथा आणि अडचणी नितीन जाधव यांनी आज पत्रकाद्वारे कळविल्या आहेत .
रुग्णांच्या मदतीसाठी पालिकेची यंत्रणा सहकार्य करीत नसल्याने रुग्णांना आणि त्याना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे ,असे नितीन जाधव यांनी सांगितले .पालिकेचे अधिकारी कार्यकर्त्यांना नीट उत्तरे देत नाहीत. त्यामानाने विभागीय आयुक्त मदत करायला उपलब्ध राहत असल्याची भावना नितीन जाधव यांनी व्यक्त केली आहे. पुण्याचे रुग्ण जेजुरीला पाठवायची वेळ का येते ? डॅशबोर्ड हेल्पलाईन वर संपर्क साधून काहीही उपयोग होत नसल्याचा अनुभव  जाधव यांनी सांगितले आहे . 
केवळ सी -व्हिटॅमिन ,क्रोसीन गोळ्या ,झोप येत नसल्यास एखादी गोळी आणि चांगले भोजन देणे एव्हडीच उपाय योजना असेल तर ती रुग्णांना घरीच उपलब्ध करून द्यावी ,असे आवाहन जाधव यांनी केले आहे . खासगी रुग्णालयांच्या आहारी न जा पालिकेने आर -७ अन्वये ताब्यात घेतलेल्या मालमत्ता ,सभागृहे येथे रुग्णांची व्यवस्था करावी .दिल्लीला १० हजार रुग्णांचे कोविड रुग्णालय उभारायला जमते ,ते पुणे पालिकेला का जमू नये ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे . सिंहगड रस्त्यावर डॉक्टर एका ठिकाणी बसून रुग्णांना मजले उतरवून खाली येण्यास भाग पाडतात .
  नितीन जाधव यांचे निवेदन   
दत्तात्रय शांताराम ताम्हणकर ,वय 46 याला 28 जून रोजी सकाळी त्रास झाला तेव्हां तो सावित्रीबाई फुले येथे कोविड टेस्ट साठी गेला ,तेथे त्याला सांगण्यात आले घरात पॉझिटिव्ह असेल तर किंवा डॉक्टराचे पत्र असेल तर  टेस्ट होईल ,तेव्हां तो तेथुन निघून आला ,संध्याकाळी 5 वाजता त्याला त्रास झाला आणि त्याने मला फोन केला ,संध्याकाळी 6।30 ते रात्री 11 प्रयन्त 108 अंबुलन्स सांगून आली नाही ,तेव्हा मी त्याला प्रायव्हेट गाडी मध्ये नायडू हॉस्पिटलमध्ये घेऊन ऍडमिट केले , 30 जून ला त्याची कोविड टेस्ट घेतली सकाळी 11 वाजता आणि 2 जुलै गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता कोविड रिपोर्ट नेगेटिव्ह आला ,परंतु पेशंटला ऑक्सिजन रोज लागायचा ,परंतु तेथे त्याला व्यवस्थित उपचार न मिळाल्याने त्यांना नायडू मधील डॉक्टर म्हणाले तुम्हीं तुमची बघा असे सांगितले ,तेव्हा त्यांनी तेथून प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आणि तेथे कोविड टेस्ट काल 6 जुलै रोजी केली आणि आज 7 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता रिपोर्ट आला आणि तो पॉझिटिव्ह आला आणि त्याला नायडू मध्ये रिपोर्ट निगेटिव्ह कसा आला ,हा पुणे कॉर्पोरेशन चा ढसाळ कारभार समोर येत आहे असावं लक्षात येते .
मी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा केला तेव्हां हे सर्व प्रकरण समोर आले  अशा गोष्टी मुळे महानगरपालिकेवर आणि सरकारी उपचारावर  विश्वास कसा ठेवायचा ,

  मोबाइल टॉयलेट 1 घरास 1 अशी द्यावी द्यावी   

आज सुद्धा लोक 108 अंबुलन्स वेळेत न मिळाल्या मुळे मृत्युमुखी पडत आहे अशी 1 गोष्ट 5 जुलै ला या दत्तात्रय ताम्हणकर यांच्या आई यशोदा शांताराम ताम्हणकर यांना अंबुलन्स न मिळाल्याने झाली तशीच आज 9 जुलै तोजी निंबालकरवाडी येथे घडली ,आणि यावर शासनाने पुणे महानगरपालिका यांच्यावर कडक कारवाई करावी ,पुण्याचे आयुक्त शेखर जी गायकवाड यांना 1 विनंती करावी अशी वाटते की पुण्यातील झोपडपट्टी आणि वाडे वस्ती ठिकाणी महानगरपालिका च्या वतीने मोबाइल टॉयलेट 1 घरास 1 अशी द्यावी द्यावी म्हणजे हा कोरोना पसार होणार नाही त्याची निगराणी ते कुटुंब करेल आणि  मैला ज्याला टेंडर दिले आहे ती 7 दिवसानी काढून नेतील , अजून 1 म्हणजे महानगरपालिका कडून 1 असा नंबर ज्यावर नागिरकाना प्रायव्हेट किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा कोठे आहे हे कळेल

महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाला बळकट करण्यासाठी अधिकार बहाल करण्याचा ऊर्जामंत्री यांचा निर्णय

0

मुंबई : गेल्या सरकारच्या काळात पांढरे हत्ती ठरलेल्या महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाला बळकट करण्यासाठी अधिकार बहाल करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी घेतला आहे. यामुळे महावितरणच्या कामाला गती येणार असून राज्यातील वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
गुरुवारी ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आयपीडीएस, डीडीयूजीजेवाय, आरएफ मीटर बदली व सौर कृषीपंप या योजनांच्या प्रमाण आणि वेळ मर्यादेच्या विस्ताराशी संबंधित सर्व अधिकार,  प्रकल्पांचे बारकाईने निरीक्षण व प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालकांना व प्रादेशिक संचालकांना अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे औद्योगिक ग्राहकांना वीज शुल्काचा परतावा देण्याचे अधिकार प्रादेशिक स्तरावर सोपविण्यात आले आहे.
सन 2016 साली गांधी जयंतीनिमित्त राज्यात चार प्रादेशिक कार्यालयाची पुणे, औरंगाबाद, नागपूर व कल्याण येथे मोठा गाजावाजा करून स्थापना करण्यात आली. यातील कल्याण व औरंगाबाद येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी यांची नेमणूक तर पुणे व नागपूर येथे प्रादेशिक संचालक हे बिगर आयएएस अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली होती. परंतु त्यांना कोणतेच अधिकार मुख्य कार्यालयाने बहाल न केल्याने प्रादेशिक कार्यालय पांढरे हत्ती ठरले होते. मात्र आता त्यांना योजनेसंबंधी अधिकार मिळाल्याने वेगवेगळ्या योजना जलद गतीने राबविण्यात येतील व याचा लाभ सर्वच ग्राहकांना होणार आहे
वीज वितरण प्रणाली रोहित्रांवर अवलंबून असल्याने रोहित्रांचे वितरण व दुरुस्ती यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून नादुरुस्त वितरण रोहित्राचे तेलासाहित सर्वसमावेशक निविदा काढण्याचे अधिकार दिल्याने रोहित्र बदलण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. एचव्हीडीएस योजनेंतर्गत नवीन कृषीपंप जोडण्या देण्यासाठी जलद गतीने रोहित्राचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच कृषिपंपाना नवीन वीज जोडणी देण्याचे धोरण ठरविण्यात येणार आहे.
बाह्यस्रोत कर्मचार्‍यांसाठी क्यूसीबीएस निविदा प्रणाली अवलंबली जाणार असल्याने जिओ मॅपिंग, केआरए मॅपिंग, जिओ फेन्सिंगसह प्रभावी बाह्यस्रोत मनुष्यबळ सुनिश्चित करण्यास यामुळे मदत होऊन देखभाल दुरुस्तीच्या कामावरील खर्च कमी करता येईल.
यावेळी औरंगाबाद  प्रादेशिक कार्यालय अंतर्गत सुरू केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे माननीय ऊर्जामंत्री यांनी कौतुक केले व अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यात राबविण्याचे आवाहन केले.

व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता ‘कौशल्य विकास परीक्षा मंडळ’

0

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

मुंबई, – महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता “महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ” (Maharashtra State Board of Skill Development Examination) असे करण्यात आले आहे. राज्यातील कौशल्य विकासाला गती देणे आणि त्यामाध्यमातून बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. कौशल्य विकास विभागामार्फत अधिकाधिक तरुणांना विविध अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षित करुन त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येतील, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज येथे जाहीर केले.

सध्या या परीक्षा मंडळांतर्गत विविध गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार ६ महिने कालावधीचे १५२ अभ्यासक्रम, १ वर्ष कालावधीचे ९६ आणि २ वर्ष कालावधीचे ४४ अर्धवेळ व पूर्णवेळ असे एकूण २९२ अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यामध्ये जिल्हा, तालुकास्तरावर, ग्रामीण भागात मंडळाने मान्यता दिलेल्या १ हजार ०८४ संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे प्रतिवर्षी ५० ते ६० हजार विद्यार्थी प्रवेश घेत असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा या मंडळामार्फत घेण्यात येते. उत्तीर्ण उमेदवारांना शासनाच्या वतीने मंडळामार्फत प्रमाणपत्र देण्यात येते. राज्यातील विविध भागातील खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यासाठी वरदान ठरतात.

राज्यामध्ये या परीक्षा मंडळाच्या दोन वर्ष कालावधीच्या पूर्ण वेळ स्वरूपाच्या विविध गटातील अभ्यासक्रमांना +२ स्तराची समकक्षता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात. तसेच मंडळाचे १ वर्ष व २ वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाशी पर्यायी शैक्षणिक अर्हता म्हणून मान्यता असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीसाठी उपयोग होतो. त्याचप्रमाणे मंडळाच्या काही अभ्यासक्रमांना भारत सरकारतर्फे शिकाऊ उमेदवारी देखील प्रदान करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी इयत्ता दहावी ही शैक्षणिक अर्हता असलेल्या 2 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना “पदविका अभ्यासक्रम” (Diploma Course) अशा नावाने प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच मंडळाचे संगणक गटातील अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रधारक कर्मचारी हे शासकीय सेवेसाठी आवश्यक असलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येतात. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरीसाठी त्याचा लाभ होतो. मंडळाचे वास्तूशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन) व कनस्ट्रक्शन सुपरवायझर हे दोन अभ्यासक्रम सार्वजनिक बांधकाम विभागातील “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पाठ्यक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता मिळाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येतात. तसेच जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यासाठी मंडळाचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा अभ्यासक्रम समकक्ष समजला जातो. अशाप्रकारे मंडळाच्या विविध अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध लाभ होतात, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

सन 1986 मध्ये तंत्रशिक्षण संचालनालयाचे तंत्रशिक्षण संचालनालय आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय असे विभाजन करण्यात आले होते. औद्योगिकीकरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल या बाबींचा विचार करता अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (एंड-ऑन कोर्सेस) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ सुरु करण्यात आले. कमी कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करुन अशा विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना मिळण्याच्या दृष्टीने या मंडळामार्फत व्यवसायभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यात येतात. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी व वेगवान अंमलबजावणीसाठी या परीक्षा मंडळामार्फत कामकाज केले जाते. आता हे परीक्षा मंडळ “महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ” या नावाने ओळखले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ अंतर्गत २ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

0

मुंबई, : महाराष्ट्र शासनाने या अधिसूचनेद्वारे शासनाच्या ०३ वर्षे मुदतीच्या एकूण २ हजार कोटी रूपयांचे  रोखे विक्रीस काढले आहे. राज्य शासनास १ हजार कोटीरुपये पर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शतीच्या अधीन राहील.

राज्य शासनाच्या क्र, एलएनएफ. १०.१९ / प्र.क्र. १० / अर्थोपाय, दिनांक १६ मे, २०१ ९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शती व अटीचे अधीन राहील. याकर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबधीच्या खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल.

भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद २९३ (३) अन्वये सदरील कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे. शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बैंक, फोर्ट, मुंबई ४०० ००१ द्वारे दिनांक १६ मे  २०१९ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र. एलएनएफ. १०.१९/ प्र.क. १० / अर्थोपाय, परिच्छेद ६.१ मध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.

अस्पर्धात्मक बिडर्सला प्रदान, – राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचना क्रमांक एलएनएफ. १०.१५ / प्र.क्र.१० / अर्थोपाथ, दिनांक १६, मे २०१ ९ मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक   गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल, मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादपर्यंत वाटप करण्यात येईल.

लिलावाचा दिनांक व ठिकाण,-भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फ दिनांक १४ जुलै , २०२० रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस दिनांक १४ जुलै, २०२० रोजी खालीलप्रमाणे संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन ( ई -कुबेर ) सिस्टोमनुसार सादर करण्यात यावेत – ( अ ) स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे, रिझर्व्ह  बैंक ऑफ इंडिया, कोअर बँकींग। सोल्यूशन ( ई कुबेर ) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत. (ब) अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया , कोअर बँकींग सोल्यूशन ( ई  कुबेर ) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत.  –               

लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व बैंक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल, यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक १५ जुलै, २०२० रोजी करण्यात येईल, अधिदानाची कार्यपद्धती. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक १५ जुलै, २०२० रोजी  रिझर्व्ह बैक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बैंकर्स धनादेश / प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किवा त्यांच्या रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बैंकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येईल

कर्जरोख्याचा कालावधी, – कर्जरोख्याचा कालावधी ०३ वर्षीचा असेल. रोख्याचा कालावधी हा दिनांक १५ जुलै २०२० रोजीपासून सुरू होईल.

लॉकडाऊन काळात ५३० सायबर गुन्हे दाखल; २७४ जणांना अटक

0

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५३० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ८ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप-  १९९ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स –  २२३ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ-  २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १५ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६१ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७४ आरोपींना अटक.

■  १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ मुंबई शहरांतर्गत बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ,त्यामुळे या विभागातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ३२ वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात एका  व्यक्ती  विरुद्ध बदनामी कारक आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या ट्विटर  प्रोफाईल वर पोस्ट केली होती.त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

लॉकडाऊन जाहीर होताच ग्राहकांची लुटमार सुरु …पुण्यात सुमारे १ लाख बेरोजगार वाढले

0

पुणे- येत्या सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर होण्याचा उशीर तो लगेचच पुण्यातील विविध दुकानांमधील विविध वस्तू जादा दराने विकण्यास प्रारंभ झाल्याचे चित्र दिसले. वाईन शॉप्स सह किराणा दुकानात गर्दी होत गेली . आणि वाईन शॉप मधूनही बाटलीमागे २० ते २५ रुपये जादा दर आकारणी सुरु झाली किराणा मालाच्या विविध वस्तूंच्या किमतीत हि भरमसाठ वाढ झाली . आधीच नौकरी गमावलेल्या अर्धवट पगार मिळालेल्या चाकरमान्यांचे व्यापाऱ्यांच्या या नाफेखोरीने आणखीच कंबरडे मोडले . मार्च अखेरीस सुरु झालेल्या या व्याधीने व्यापारी ,कंपन्या विविध संस्था , माध्यमे यामधील सुमारे १ लाख जणांचा रोजगार गेल्याचे कामगार नेत्यांचे म्हणणे आहे. मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या हाल अपेष्टांना पारावर उरणार नाही असे स्पष्ट चित्र दिसते आहे. सरकारचा महामारीचा फायदा घेऊन दरवाढ करून लुट करणाऱ्या व्यापारी दुकानदार आणि बेरोजगारी वाढविणाऱ्या कंपन्या यांच्यावर कोणताही अंकुश उरला नसल्याचे स्पष्ट चित्र आहे . त्यामुळे पुण्यातील हि महामारी आता पोलिसांना गुन्हेगारीच्या स्वरूपातही दिसू शकण्याची शक्यता नाकारता येणार नाही .

आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश – उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द

0

पुणे- उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना विरुध्द लढ्यासाठी देण्यात आली आहे. तसेच इतर आवश्यक साहित्यही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक संजय पणीकर तसेच विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.