Home Blog Page 2506

बीएमसीसीत कौशल्य विकासावर आधारित पदवी अभ्यासक्रम

0

बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडिज (ई कॉमर्स ऑपरेशन्स)शेवटच्या वर्षात इंटर्नशिपचा समावेश

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसीत) या शैक्षणिक वर्षापासून कौशल्य विकासावर आधारित बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडिज (बीएमएस) (ई कॉमर्स ऑपरेशन्स) हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सागर फडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
पदवीच्या शेवटच्या वर्षात दोन्ही सत्रांमध्ये नेमून दिलेल्या उद्योगसमुहामध्ये इंटर्नशिप हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत अशाप्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे बीएमसीसी हे पहिलेच महाविद्यालय आहे.
या अभ्यासक्रमात कौशल्यविकास आणि वाणिज्य शाखांवर  आधारित प्रत्येकी १५ विषय आणि व्यवस्थापन शाखेवर आधारित ३ विषयांचा समावेश असणार आहे. एमओओसीमधून विद्यार्थ्यांना २ विषय निवडता येतील. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती व नमुना अर्ज महाविद्यालयाच्या www.bmcc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बीएमसीसीने लॉजिस्टिक सेक्टर स्किल कौन्सिलसोबत (एलएसएससी) सामंजस्य करार केला आहे. त्याद्वारे प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिपची व्यवस्था करता येणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने स्किल इंडिया कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत एलएसएससीची स्थापना केली होती.
महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या  शिफारशीवरून महाविद्यालयाने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयातील अभ्यास, एक वर्षाचा उद्योगसमुहातील प्रत्यक्ष अनुभव व प्रशिक्षण आणि उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करणार्या विषयांचा अभ्यासक्रमातील समावेशामुळे विद्यार्थ्यांना उद्योग, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.  डॉ. वर्षा देशपांडे या अभ्यासक्रमाच्या समन्वयिका आहेत.  

राज्य मागासवर्ग आयोगाचे तातडीने पुनर्गठन करा

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

पुणे-मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर असताना आणि राज्यातील अनेक छोट्या जाती समुहांची मागासवर्गात समाविष्ट करण्याची मागणी प्रलंबित असताना राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन केलेले नाही. सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे तातडीने पुनर्गठन करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

आ.. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाची मुदत जानेवारी 2020 मध्ये संपुष्टात आली, पण तिघाडी सरकारला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याने आज सात महिने उलटून गेले आहेत तरी पण अजूनही हे ढिम्म सरकार या विषयात जागे होत नाही. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात ऐरणीवर असताना अशा अत्यंत महत्त्वपूर्ण समयी आणि महाराष्ट्रातील अनेक छोट्या जाती समूहांची मागासवर्गात त्यांना समाविष्ट करण्याची मागणी प्रलंबित असताना मागास आयोगाची पुनर्रचना न करणे म्हणजे महाराष्ट्राच्या मागास जनतेची घोर प्रतारणा करणे आहे. शासनाने त्वरित मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करावे अन्यथा मागासवर्गीयांच्या रोषाला त्यांना नक्कीच सामोरे जावे लागेल.

त्यांनी सांगितले की, डिसेंबर 14 मध्ये या पुनर्गठित आयोगाची मुदत संपली होती त्यानंतर भाजपा सरकारने आयोगाची पुनर्रचना करून उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागास आयोग स्थापन केला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या महत्त्वाच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाच्या अभ्यासाचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. परंतु काही दिवसातच अध्यक्ष न्यायमूर्ती म्हसे (निवृत्त) यांचे निधन झाले. त्यांच्या जागी त्वरित माजी न्यायमूर्ती गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य मागास आयोगाच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातून आणि अभ्यासाच्या मंथनातून मराठा समाजाला आरक्षणाची शिफारस करण्यात आली व त्यानुसार निर्णय झाला. अखेरीस न्याय मिळाला. पण आता मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर आला असतानाच नेमके राज्यातील मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन झालेले नाही.

विधानपरिषद चे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची नाहूर येथील महापालिकेच्या क्वारांटाईन सेंटरला भेट

0

मुंबई- विधानपरिषद चे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज सकाळी नाहूर रेल्वे स्टशन जवळील सनरुप इमारत येथील महापालिका (पीएपी) क्वारांटाईन सेंटरला भेट दिली व सेंटरची पाहाणी केली. याप्रसंगी खासदार मनोज कोटक, आमदार मिहिर कोटेजा, भाजपचे विनायक कामत , मुंबई महापालिकचे विभागीय सहाय्यक अधिकारी गांधी आदी उपस्थित होते. या सेंटरमधील डॉक्टर्सना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था नाही, याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करुनही पालिकेने दखल घेतली नसल्याचे डॉक्टर्संना सांगितले. अखेर या डॉक्टर्संनी विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे आपला प्रश्न मांडला ,त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी या गोष्टींची तात्काळ दखल घेतली व आज सकाळी या सेंटरला भेट दिली. तेथील डॉक्टर्सकडून सविस्तर माहिती घेतली व तेथे उपस्थित पालिका अधिका-यांना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी येथील सोयी सुविधा तातडीने करण्याचे निर्देश दिले. यानंतर या सेंटरमध्ये तात्काळ ऑक्वागार्ड व गरम पाण्याची व्यवस्था करण्याचे आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे तसेच अन्य काही असुविधा असतील त्या दूर करण्याचे आश्वासन मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी दिले.

मंदिरांसाठी पॅकेज द्या, गुरव समाजाला मदत करा

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे-कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर गेले सुमारे चार महिने राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे तेथे पूजाअर्चा करणाऱ्या गुरव समाजाचे उत्पन्न बंद झाले असून उपासमारीची वेळ आली आहे. त्याचवेळी, मंदिराच्या पूजेचा व देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी पॅकेज जाहीर करावे आणि गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरव समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीस वेब संवादाद्वारे संबोधित केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे गुरव समाजासाठी मागण्या केल्या. या बैठकीस राष्ट्रीय गुरव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंदिरांमध्ये पूजा करणाऱ्या व मंदिरांची देखभाल करणाऱ्या गुरव समाजाला गेले चार महिने सोसलेला आर्थिक ताण व आगामी दोन महिन्यांची तरतूद अशी सहा महिन्यांसाठी रोख आर्थिक मदत करावी. मंदिरांची साफसफाई, देखरेख, सुरक्षा व पूजाअर्चा याचा खर्च लॉकडाऊनमध्येही चालूच आहे. त्याचा भार गुरव समाजावरच पडत आहे. राज्य सरकारने मंदिरांसाठीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे. लॉकडाऊनच्या काळातील मंदिरांचे वीजबिल प्रचंड मोठे आले आहे. मंदिरांच्या वतीने राज्य सरकारने वीजबिल महावितरणकडे भरावे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी अशी मागणी केली की, आगामी काळात जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळी गुरव समाजातील मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी राज्य सरकारने फीसह थेट आर्थिक मदत करावी आणि गुरव समाजाला सध्याच्या संकटात तातडीच्या कर्जाचा पुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.
बैठकीत कार्याध्यक्ष गणेश सुराडकर, उपाध्यक्ष गणेश पुजारी, देवस्थान कमिटी प्रमुख रवी क्षीरसागर, प्रा. विवेक गुरव, मंदिर पर्यावरण अभ्यासक डॉ. राजेंद्र सराफ, महिला अध्यक्ष अर्चना नीळकंठ, रायगड विभाग प्रमुख बंडू खंडागळे, देवस्थान ईनाम प्रमुख वसंत टाकसाळे, देवस्थान ट्रस्टी बालाजी गुरव, युवा कार्याध्यक्ष डॉ. आनंद गुरव व कोंढाणपूर देवस्थान प्रमुख शिवदास भगवान सहभागी झाले.

पारेषण वाहिन्यांची पाहणी व देखभालीची कामे आता ड्रोनव्दारे होणार

0

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पाठपुरावा केल्याने केंद्राने दिली परवानगी

मुंबई,: राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने आता महापारेषण ड्रोनच्या साहाय्याने अति उच्च दाब वाहिन्यांची निगा राखण्याचे व देखभाल दुरुस्तीची कामे  अचूक व जलदगतीने करणार असून वीज क्षेत्रात ड्रोनचा वापर करणारी महापारेषण सध्या देशातील एकमेव कंपनी ठरली आहे.
 यापुढे महापारेषण आपल्या अति उच्च दाब वाहिन्यांची देखभाल जसे ग्राऊंड पेट्रोलिंग, टॉवर टॉप पेट्रोलिंग, सर्व्हे आदी कामे ड्रोनव्दारे करणार असून यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे महापारेषणचा वेळ, पैसा व मनुष्यबळाची बचत होणार आहे. 
महापारेषण ड्रोनचा वापर करत असल्याची नोंद केंद्र सरकारने घेतली असून या स्तुत्य उपक्रमाचे केंद्राने कौतुक केले आहे. 
ऊर्जामंत्री डॉ  राऊत व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांनी सतत पाठपुरावा करून महापारेषणला ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून विजेच्या क्षेत्रात महाराष्ट्रात नवे नवे प्रयोग होत असल्याने सर्वत्र याचे कौतुक होत आहे.  प्रशिक्षित चमुद्वारे ड्रोनचा कुशल प्रकारे वापर करण्यात येत आहे.
महापारेषण ही देशातील सर्वात मोठी पारेषण कंपनी असून राज्यात एकूण 681 इएचव्ही उपकेंद्रे असून 48321 सर्किट किलोमीटरच्या पारेषण वाहिन्या आहेत. सध्या महापारेषण कडे 1,27,990 एमव्हीए क्षमतेची परिवर्तन क्षमता असून 25000 एमडब्ल्यू ऊर्जा हाताळणीची क्षमता असलेली पारेषण यंत्रणा आहे. विशेषतः दुर्गम भागातून जाणाऱ्या, समुद्रकिनारी व खाडीलगतच्या भागात पारेषण वाहिन्यांची कामे करताना ड्रोनचा उपयोग चांगल्या रीतीने होणार आहे.
 ड्रोनवर व्हिडिओ कॅमेरा व थर्मोव्हिजन कॅमेरा लावला असल्यामुळे पारेषण वाहिन्यांवर निर्माण होणारे विविध दोष त्वरित निदर्शनास आणून त्यांची तात्काळ दुरूस्ती करणे शक्य झाले आहे.
विशेषतः नवीन प्रकल्पाचे सर्व्हेक्षण करण्यासाठीही या ड्रोन कॅमेराचा उपयोग होणार आहे. टॉवरच्या अगदी जवळ जाऊन ड्रोनव्दारे तपासणी होत आहे. त्यामुळे हे डायग्नोस्टिक टूल ठरले आहे. तसेच कार्यालयात बसून ड्रोनची हालचाल पाहणेही शक्य झाले आहे. नियमानुसार ड्रोन उडविण्याची उंची ५० मीटरपर्यंत आहे. ड्रोनचा वापर अतिशय कुशलतेने करीत असल्याबद्दल  डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यांच्यासह महापारेषणच्या सर्व चमूचे कौतुक केले आहे

दुर्गप्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इन्स्टाग्रामवरील विजयदुर्गच्या पडझडीच्या पोस्टची दखल, पुरातत्त्व खात्याला निर्देश

0

विजयदुर्गच्या बुरूजाची पडझड रोखण्यासाठी उपाययोजना करा

मुंबई, : दुर्गप्रेमी आणि मुळातच छायाचित्रकाराची शोधक नजर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचे वृत्त इन्स्टाग्रामवर टिपले, अन् केंद्रातील भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रख्यात छायाचित्रकार आहेत. त्यांनी चित्रित केलेल्या छायाचित्रांचा ‘महाराष्ट्र देशा’ हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. याशिवाय त्यांचे महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे. या प्रेमातून ते दुर्गप्रेमी संघटनेचेही प्रणेते ठरले आहेत. छायाचित्रकार असल्यामुळे इन्स्टाग्राम या छायाचित्रांशी निगडीत समाज माध्यमावरील त्यातही गडकोट किल्ले आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत ते सजग असतात. यातून मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांना आज इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाचा एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले. या पोस्टची तत्काळ दखल घेत, त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविण्याचे तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर विजयदुर्गच्या पडझडीची दखल घेण्यापासून ते त्याबाबत प्रशासनाला सतर्क करून, थेट भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करण्याच्या मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या या प्रयत्नामुळे निश्चितच विजयदुर्गच्या या बुरूजाची पडझड रोखणे शक्य होणार. तसेच या जलदुर्गाच्या देखभालीचा मार्गही आणखी सुकर होणार आहे. गडकोट किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ते जतन करण्यासाठी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी एक संवेदनशील दुर्गप्रेमी आणि शोधक छायाचित्रकाराच्या नजरेने पुढाकार घेण्यामुळे दुर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्यात १ लाख २३ हजार ३७७ ॲक्टिव्ह रुग्ण

0

कोरोनाच्या आतापर्यंत १५ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, : राज्यात आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६५ हजार ६६३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३४८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख २२ हजार ५६४ नमुन्यांपैकी ३ लाख ९३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.७६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ५५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १४४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १४४ मृत्यू हे मुंबई मनपा-६५, ठाणे-१, नवी मुंबई मनपा-१, कल्याण-डोंबिवली मनपा-६,उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-८, रायगड-१, नाशिक-२, नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१, पुणे-९, पुणे मनपा-१६, पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, लातूर-१, उस्मानाबाद-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील           

मुंबई: बाधित रुग्ण- (१,००,३५०), बरे झालेले रुग्ण- (७०,४९२), मृत्यू- (५६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,९१७)

ठाणे: बाधित रुग्ण- (७३,२८९), बरे झालेले रुग्ण- (३४,०१७), मृत्यू- (१९६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७,२९५)

पालघर: बाधित रुग्ण- (११,५६६), बरे झालेले रुग्ण- (६२४१), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०९१)

रायगड: बाधित रुग्ण- (१०,८४१), बरे झालेले रुग्ण- (५७३३), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (११२५), बरे झालेले रुग्ण- (६८६), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

पुणे: बाधित रुग्ण- (५१,५७५), बरे झालेले रुग्ण- (१८,८८१), मृत्यू- (१३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,३८०)

सातारा:  बाधित रुग्ण- (२२५४), बरे झालेले रुग्ण- (१२१७), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६१)

सांगली: बाधित रुग्ण- (८७०), बरे झालेले रुग्ण- (४४०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१८६५), बरे झालेले रुग्ण- (९०४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (५३१८), बरे झालेले रुग्ण- (२४३३), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०२)

नाशिक: बाधित रुग्ण- (८९६८), बरे झालेले रुग्ण- (५०८५), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२२०), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२)

जळगाव: बाधित रुग्ण- (७१६६), बरे झालेले रुग्ण- (४५१५), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३६०), बरे झालेले रुग्ण- (१७२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२)

धुळे: बाधित रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१२२७), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (९४५५), बरे झालेले रुग्ण- (५२३४), मृत्यू- (३६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५७)

जालना: बाधित रुग्ण- (१२९८), बरे झालेले रुग्ण- (६६१), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८३)

बीड: बाधित रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६३)

लातूर: बाधित रुग्ण- (१०१५), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३३)

परभणी: बाधित रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (१५७), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३८७), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)

नांदेड: बाधित रुग्ण- (७८०), बरे झालेले रुग्ण (४०३), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४८१), बरे झालेले रुग्ण- (२९६), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)

अमरावती: बाधित रुग्ण- (११२७), बरे झालेले रुग्ण- (७३७), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४५)

अकोला: बाधित रुग्ण- (२०१८), बरे झालेले रुग्ण- (१६२३), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)

वाशिम: बाधित रुग्ण- (२३१४), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (४८२), बरे झालेले रुग्ण- (२२५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३४९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४३)

नागपूर: बाधित रुग्ण- (२४८३), बरे झालेले रुग्ण- (१४२८), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०३०)

वर्धा: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

भंडारा: बाधित रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (१००), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२२५), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (१०५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१६)

एकूण: बाधित रुग्ण- (३,००,९३७), बरे झालेले रुग्ण-(१,६५,६६३), मृत्यू- (११,५९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०१),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,२३,३७७)

 (टीप- आजच्या अहवालात पूर्वी ठाणे मनपा मध्ये दर्शविण्यात आलेले १९ मृत्यू त्यांच्या रहिवासी पत्त्यानुसार ठाणे ग्रामीण ( ७), कल्याण डोंबिवली (६), नवी मुंबई (५) आणि भिवंडी मनपा (१) च्या एकूण मृत्यूसंख्येत दाखविण्यात आले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

लॉकडाऊनचा उपयोग परिस्थिती सुधारण्यासाठी व्हावा – मुख्यमंत्री ठाकरे

0

मुंबई, दि १८ : विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी झाला पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्याना सांगितले. ते आज सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत होते

मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन लावून रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी घट्टपणे हातात हात घालून काम केले पाहिजे. सरकारच्या वेळोवेळी सुचना येतात. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये. सरकारने  प्रयोगशाळा १३० पर्यंत वाढवल्या आहेत, एन्टीजेनबाबत सूचना दिल्या आहेत. धार्मिक, समाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सणवार साजरे करतांना नवे कंटेनमेंट क्षेत्र वाढू नये. काही दिवसांपूर्वी धारावीच्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. हे संकट किती भीषण आहे आणि त्याचा मुकाबला राज्य सरकारने कसा केला हे देखील आपण नागरिकांना विश्वासात घेऊन मोकळेपणाने सांगितले आहे. धारावीसारखा परिणाम आपल्याला राज्यात इतरत्रही दाखवता येऊ शकेल.   

रुग्णालयांमध्ये खर्च निरीक्षक नेमावेत

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी देखील आपल्या सुचना केल्या. प्रत्येक जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रांवर सर्व सुविधा व्यवस्थित असाव्यात. जिल्हाधिकारी यांनी रुग्णालयांच्या ठिकाणी ऑडीटर म्हणून अधिकारी नेमावेत आणि खर्च अव्वाच्या सव्वा लावणार नाहीत हे कटाक्षाने पहावे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयांत त्रास होऊ नये, डॉक्टरांनी रुग्णांविषयी त्यांना व्यवस्थित माहिती द्यावी. विश्वस्त संस्थेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १० टक्के रुग्णांवर मोफत उपचार देणे बंधनकारक आहे, त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही ते पाहावे.            

५४० रुग्णच व्हेंटीलेटरवर

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले की, ८० टक्के बेड्स राखीव ठेवले आहेत त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी व्हावी. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव अशा शहरांमध्ये अधिकाधिक ऑक्सिजन बेड्स व्यवस्था करा.

सध्या राज्यात ५ हजारपेक्षा जास्त व्हेंटीलेटर आहेत. मात्र केवळ ५४० रुग्णच व्हेंटीलेटरवर आहेत.

नोडल टेस्टिंग अधिकारी नेमा

प्रत्येक जिल्ह्यात, विभागांत  नोडल टेस्टिंग अधिकारी नेमणार आहोत. त्यांना प्रशिक्षित केले जाईल. औरंगाबाद, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण राज्यात जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या करा, एन्टीजेन चाचणी वाढवली पाहिजे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी सांगितले. १० जिल्ह्यांत आरटीपीसीआर प्रयोगशाळा नाहीत त्यांनी तातडीने त्या उभारण्याची कार्यवाही पूर्ण कराव्यात  २ हजार रुपये आपण प्लाझ्मा दात्याला देत आहोत, ती माहितीही मोठ्या प्रमाणावर नागरिकांना व्हावी असे ते म्हणाले.

एकच कमांड सेंटर हवे 

मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईमधल्या उपाययोजनांची माहिती देतांना सांगितले की, संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील शहरांमध्ये युनिफाईड कमांड सेंटर स्थापन करावे जेणेकरून एकाच ठिकाणी विविध सुविधांच्या उपलब्धतेची माहिती मिळेल.

बेड्सचे नियोजन संगणकीकृत व्हावे, लक्षणे नसलेल्या रुग्णांना बेड्स देता कामा नये त्यामुळे गरजू रुग्णांना बेड्स उपलब्ध होईल, २४ तासांत चाचणीचा अहवाल आलाच पाहिजे, रुग्णवाहिकाची गरज लक्षात घेता वाहने अधिग्रहित करावीत, त्या वाहनांत तात्पुरते बदल करता येतील अशा सूचना केल्या.

मुंबईप्रमाणे इतर शहरांतील रुग्णालयांत तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी रुग्णालयांवर देखरेख करण्यासाठी नियुक्त करावेत जेणेकरून रुग्णांना प्रवेश, त्याचा खर्च, त्यांना रुग्णालयांतून सोडणे आदी बाबींवर लक्ष राहील अशीही सूचना त्यांनी केली. मुंबईत मिशन सेव्ह ह्युमन लाईफ सुरु केले आहे, त्याचा परिणाम दिसत आहे. तशीच कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांनी करावी.

ऑक्सिजन, रुग्णसेवेवर लक्ष केंद्रित करा

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले की, शहरी भागातून ग्रामीण भागात चालला आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात १० दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत ही चिंतेची बाब आहे. साथ ग्रामीण भागात पसरू देऊ नका. ग्राम दक्षता समित्या सक्रीय करणे महत्त्वाचे आहे. ऑक्सिजन, रुग्णसेवा, वेळेवर मिळेल हे पाहिले तर मृत्यू दर कमी होईल असेही ते म्हणाले.

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे देखील उपस्थित होते.

कोरोनाच्या तडाख्यातून सावरतंय दक्षिण पुणे -विशाल तांबे (व्हिडीओ)

0

पुणे- कोव्हिडं स्वॅॅब रॅपिड टेस्टिंग कलेक्शन सेंटर आता सुरु झालंय ,त्याची क्षमता आता दुपटीने वाढवीत आहे. खाजगी रुग्णालयांसह महापालिकेच्या सहकार्याने ,नागरिकांच्या योग्य प्रतिसादाने कोरोनाच्या तडाख्यातून आता दक्षिण पुणे सावरणार आहे .तपासण्या वाढल्याने जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढती दिसली तरी तेवढ्याच प्रमाणात संसर्ग आणि कोरोनाचा तडाखा कमी होत जाईल आणि दक्षिण पुण्याची कोरोनाच्या तडाख्यातून साधारणतः दीड महिन्यात मुक्तता होईल असा आशावाद आज राष्ट्रवादीचे वरिष्ठ नगरसेवक ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ,विद्यमान नगरसेवक विशाल तांबे यांनी व्यक्त केला आहे . नेमके त्यांनी काय म्हटले आहे ते ऐका व पहा त्यांच्याच शब्दात ….

२० जुलैपासून ‘सावित्रीजोती’ या मालिकेचे नवीन भाग सुरू – सोमवार-शनिवार संध्या. ७:३० वा.

0

सावित्रीजोती – आभाळाएवढी माणसं होती’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या दांपत्याच्या सहजीवनाचा प्रवास दाखवला आहे. अश्विनी कासार हिने सावित्रीमाईंची तर ओम्‌कार गोवर्धन याने जोतीरावांची भूमिका या मालिकेत साकारली आहे. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून सावित्रीजोती या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. येत्या २० जुलैपासून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

जोतीरावांचं शिक्षण, त्यांनी समाजात बदल घडवून आणण्यासाठी केलेली धडपड, त्यांना मिळालेली सावित्रीमाईंची साथ; हे सर्व या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्त्रियांना कोणतेही स्वातंत्र्य नसलेल्या काळात सावित्रीबाई स्वतः शिकल्या व पहिल्या स्त्री-शिक्षिका झाल्या. क्रांतीसाठी शास्त्र आणि शस्त्र यांपैकी जोतीराव काय निवडणार, त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक प्रवास कसा होणार, सावित्रीमाई  त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कशा उभ्या राहणार; हे सर्व येत्या भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

पाहा,’सावित्रीजोती – आभाळाएवढी माणसं होती’ या मालिकेचे नवीन भाग २० जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 803

0

पुणे विभागातील 35 हजार 538 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 58 हजार 98 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे :- पुणे विभागातील 35 हजार 538 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 58 हजार 98 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 20 हजार 803 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 755 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.02 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 48 हजार 192 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 30 हजार 283 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 656 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 11 हजार 568 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 473 व पुणे कॅन्टोंन्मेंट 152 , खडकी विभागातील 48 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 324 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 91 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 253 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 942, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 174 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 21 , ग्रामीण क्षेत्रातील 59, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 28रुग्णांचा समावेश आहे. तसेच 500 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.84 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 490 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 916 , सातारा जिल्ह्यात 70, सोलापूर जिल्ह्यात 232, सांगली जिल्ह्यात 50 तर कोल्हापूर जिल्ह्यात 222 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 214 रुग्ण असून 1 हजार 225 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 916 आहे. कोरोनाबाधित एकूण 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 4 हजार 941 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 642 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 936 आहे. कोरोना बाधित एकूण 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 891 रुग्ण असून 417 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 449 आहे. कोरोना बाधित एकूण 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 1 हजार 860 कोरोना बाधीत रुग्ण असून 971 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 846 आहे. कोरोना बाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 87 हजार 787 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 82 हजार 846 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 941 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 24 हजार 55 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 58 हजार 98 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

  

( टिप :- दि. 18 जुलै 2020 रोजी दुपारी 5.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पुण्यात उद्याचा दिवस स.८ ते साय.६ पर्यंत दुकाने सुरु राहणार

0

पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. यातील पहिले पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनची मुदत शनिवारी संध्याकाळी संपते आहे. रविवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदीकरिता वेळ मिळावा याकरिता सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यात  किराणा, भाजी तसेच चिकन, मासे आणि अंडी यांच्या दुकानाचा समावेश असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार, जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या आयुक्तांनी लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार, काय बंद राहणार याचे सविस्तर आदेश काढले होते. पहिले पाच दिवस कडक आणि नंतरचे पाच दिवस सौम्य लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यातील पहिल्या पाच दिवसांची मुदत शनिवारी संध्याकाळी संपते आहे. रविवारपासून सौम्य लॉकडाऊन सुरू होणार आहे.
रविवारपासून दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ वेळेत उघडण्यास मुभा देण्यात येणार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस आल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ रविवार करिता सकाळी ८ ते संध्याकाळी ६ अशी वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सहा तासांची सवलत प्रशासनाने दिली आहे. सोमवारपासून मात्र सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेतच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. दुपारनंतर पुन्हा सर्व बंद ठेवावे लागणार आहे. नागरिकांनी नियम व निकषांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

https://www.facebook.com/1501539223422053/posts/2668207210088576/

पाणी वाहण्यासाठी निरचक्राची साथ..

0

दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे जगणे निरचक्राच्या सहाय्याने सुकर झाले.

ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील ७६ आदिवासी कुटुंबांना ३५ निरचक्राचे वाटप…

पुणे,: एकीकडे संपूर्ण जग  कोविड -१९ च्या जागतिक साथीच्या आजाराचा सामना करीत असताना, दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोक पूर्वीपासूनच अस्तित्त्वात असलेल्या पाणी आणण्याच्या जागतिक समस्येचा सामना करीत आहे. आजही लाखो आदिवासी कुटुंब एकाच वेळी कोरोना आणि पाणी या दोन्ही समस्यांचा सामना करीत आहेत. मात्र ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या निरचक्रामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या पाणी वाहतुकीचे ओझे आता हलके होत आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वारोटी बुद्रुक आणि ढोपेखिंड गावामधील ७६ आदिवासी कुटुंबांना ३५ निरचक्रांचे वाटप ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. यावेळी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक तन्वीर इनामदार उपस्थित होते.
ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या मिशन परिवर्तनद्वारे  गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील दुर्गम गावांतील २०० हून अधिक कुटुंबाचा ओझे कमी केले आहे. निरचक्र हे असे यंत्र आहे कि ज्याद्वारे पाण्याची ने-आण अगदी सोप्या पद्धतीने करता येते. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतांवर आधारित हि वाहतूक गाडी आहे, ज्यामध्ये एक ८० लिटर पाण्याचा पिंप बसवण्यात आला आहे. रस्त्यातील खड्डे अथवा चढ उतार किंवा इतर अडथळा आला तरी यामध्ये भरलेल्या पाण्याची हेळसांड न होता अगदी सहजरित्या पाण्याची वाहतूक करता येते. वृद्ध असो किंवा लहान मुले हे देखील या निरचक्र वाहनाद्वारे ८० लिटर पाणी वाहतूक करू शकतात तेही केवळ ५ तर ७ किलो एवढ्या वजनाची टाकत वापरून. 
पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या बहुमूल्य पाठबळावर आणि समन्वयाने आम्ही वेल्हे तालुक्यातून मिशन परिवर्तन – नीरचक्र हा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. दोन्ही फाउंडेशनच्या वतीनेआतापर्यंत ४५० हुन अधिक आदिवासी कुटुंबांचा विकास होत आहे. शासनाच्या कोविड १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या निरचक्रांचे वाटप करण्यात येत आहे.  २०२१ च्या अखरेपर्यंत महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यातील २०० गावांमधील ७००० कुटुंबांपर्यंत मिशन परिवर्तन- निरचक्र पोहचवण्याचा मानस तन्वीर इनामदार यांनी यावेळी व्यक्त केला. 

सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजने घवघवीत यश संपादन केले. यंदा कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, कला शाखेचा 96 टक्के, वाणिज्य शाखेचा 93 टक्के, तर एमसीव्हीसीचा निकाल 100 टक्के लागला आहे, असे प्राचार्या वंदना पांडे  यांनी सांगितले.
विज्ञान शाखेत मृगजा ओगले (93.2) हिने प्रथम, सिद्धार्थ साठे (92 टक्के) याने द्वितीय, तर साहिल कलिंग (90.8 टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत अंजली झुंजा व किशिका चौहान (88.15 टक्के) यांनी संयुक्तपणे प्रथम, साक्षी डांगी (87.2 टक्के) हिने द्वितीय, तर ध्रुव नायक (85.6 टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत नेहा शिंगणे 90 टक्के गुण मिळवून प्रथम आली. जुई शिंत्री व श्रेया कुलकर्णी यांनी 89.5 टक्के गुण मिळवून संयुक्तपणे द्वितीय, तर जान्हवी कापघाटे हिने 89.3 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. ‘एमसिव्हीसी’मध्ये देव जोशी (87.1 टक्के) याने प्रथम, पार्थ पटेल (85.7 टक्के) याने द्वितीय, तर सिद्धांत कुलकर्णी (79.5 टक्के) याने तृतीय क्रमांक पटकावला, असेही वंदना पांडे यांनी नमूद केले.
सुर्यदत्ता ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सर्वांचे अभिनंदन केले. डॉ. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाचा फायदा झाला. विविध संसथांबरोबर सामंजस्य करार, डिजिटल लर्निंग, लाईव्ह सेमीनार्स आणि इतर उपक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, सल्ला व समुपदेशन केल्याचा हा परिपाक आहे.”

कोरोना नियंत्रणात राज्य शासन गंभीर नाही महापालिकेला केवळ ३ कोटी रुपयांचा निधी- जगदीश मुळीक यांची टीका

0

कोरोना नियंत्रणात राज्य शासन गंभीर नाही महापालिकेला केवळ ३ कोटी रुपयांचा निधी

महाविकास आघाडीचे आकसाने राजकारण भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

पुणे, : पुणे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तब्बल २०० कोटी रुपयांचा खर्च होत असताना, राज्य शासन याबाबत गंभीर नसून, महापालिकेला केवळ ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडी आकसाने राजकारण करत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण, वैद्यकीय चाचण्या, स्वॅब तपासण्या, अटिंजेन किटचा वापर, कोव्हिड सेंटरची निर्मिती, क्वारंटार्इन सेंटरवरील सुविधा, रुग्णालयांतील सुविधा, व्हेंटिलेटर, पीपीर्इ किट, शिधावाटप आणि जनजागृती अशी कोरोना नियंत्रणासाठी लागणारा खर्च महापालिका करीत आहेत. तसेच दहा खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठीचा खर्चही महापालिकेला करावा लागत आहे.

या सर्व कामांसाठी महापालिकेने आतापर्यंत सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तर राज्य शासनाने केवळ ३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. महापा लिकेचा आजपर्यंत झालेला खर्च, कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयाची निर्मिती, महापालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या सुविधा निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, पुढील काळात कोरोनावर नियंत्रण आणणे आदी कामांसाठी राज्य शासनाने ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी मुळीक यांनी केली आहे.

मुळीक म्हणाले, ‘राज्य शासनाने निधीचे वितरण करताना महापालिकेच्या वर्गवारीचा निकष न लावता उपचार घेणार्या रुग्णांच्या संख्येचा विचार करावा. पुणे शहरात आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३४ हजार ४० इतकी असून, २१ हजार १०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अक्टिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार १६ इतकी आहे.’