Home Blog Page 2504

राज्यात आज कोरोनाच्या ९८९५ नवीन रुग्णांचे निदान-१ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर उपचार सुरू

0

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर

मुंबई, दि.२३: राज्यात आज ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९८९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले  २९८ मृत्यू हे मुंबई मनपा-५५, ठाणे-७, ठाणे मनपा-१, नवी मुंबई मनपा-७,कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर-२, वसई-विरार मनपा-२३, पालघर-२,रायगड-३, नाशिक-५, नाशिक मनपा-८, मालेगाव मनपा-२, अहमदनगर-१, धुळे मनपा-२, जळगाव-८, जळगाव मनपा-५, पुणे-१९, पुणे मनपा-३७, पिंपरी-चिंचवड मनपा-२२,सोलापूर-१, सोलापूर मनपा-२, सातारा-१, कोल्हापूर-३, कोल्हापूर मनपा-१, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-१०, जालना-३, हिंगोली-४, परभणी मनपा-१, लातूर-५, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, बीड-३, नांदेड मनपा-४, अकोला-१, अमरावती मनपा-२,यवतमाळ-२,  नागपूर मनपा-१, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य ६ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                                          

मुंबई: बाधित रुग्ण- (१,०५,९२३) बरे झालेले रुग्ण- (७७,१०२), मृत्यू- (५९३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९३), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,५९८)

ठाणे: बाधित रुग्ण- (८१,७०८), बरे झालेले रुग्ण- (४२,६५७), मृत्यू- (२१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,८५७)

पालघर: बाधित रुग्ण- (१३,१९४), बरे झालेले रुग्ण- (७४४९), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४६२)

रायगड: बाधित रुग्ण- (१३,१२५), बरे झालेले रुग्ण-(७३९९), मृत्यू- (२४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४८१)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१३९२), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२९५), बरे झालेले रुग्ण- (२४४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

पुणे: बाधित रुग्ण- (६६,५३८), बरे झालेले रुग्ण- (२३,५८९), मृत्यू- (१५९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,३५७)

सातारा:  बाधित रुग्ण- (२७५४), बरे झालेले रुग्ण- (१५०८), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११५२)

सांगली: बाधित रुग्ण- (११७९), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२८४४), बरे झालेले रुग्ण- (१००४), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७८३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (६९५०), बरे झालेले रुग्ण- (३०६०), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४७५)

नाशिक: बाधित रुग्ण- (११,३०१), बरे झालेले रुग्ण- (६१५४), मृत्यू- (३९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७४९)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२४१६), बरे झालेले रुग्ण- (१०६६), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०५)

जळगाव: बाधित रुग्ण- (८५०१), बरे झालेले रुग्ण- (५६६२), मृत्यू- (४४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३९७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४७७), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७)

धुळे: बाधित रुग्ण- (२२६२), बरे झालेले रुग्ण- (१४०६), मृत्यू- (८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१०,८९७), बरे झालेले रुग्ण- (५७७९), मृत्यू- (४२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६९२)

जालना: बाधित रुग्ण- (१५७८), बरे झालेले रुग्ण- (६८१), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३६)

बीड: बाधित रुग्ण- (४६२), बरे झालेले रुग्ण- (१८१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२६९)

लातूर: बाधित रुग्ण- (१२६७), बरे झालेले रुग्ण- (६२१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८)

परभणी: बाधित रुग्ण- (४१८), बरे झालेले रुग्ण- (१७८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (४७४), बरे झालेले रुग्ण- (३२२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१०९९), बरे झालेले रुग्ण (४९९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५४)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५९३), बरे झालेले रुग्ण- (३६९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

अमरावती: बाधित रुग्ण- (१४८६), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२८)

अकोला: बाधित रुग्ण- (२२५०), बरे झालेले रुग्ण- (१७१९), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२७)

वाशिम: बाधित रुग्ण- (४३६), बरे झालेले रुग्ण- (२०२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (७९५), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (६५७), बरे झालेले रुग्ण- (४२६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९)

नागपूर: बाधित रुग्ण- (२९२९), बरे झालेले रुग्ण- (१४९७), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९३)

वर्धा: बाधित रुग्ण- (९७), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

भंडारा: बाधित रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (२१०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण- (१७९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१२९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३०२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)

एकूण: बाधित रुग्ण-(३,४७,५०२) बरे झालेले रुग्ण-(१,९४,२५३), मृत्यू- (१२,८५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०३),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४०,०९२)

 (टीप:ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

… तर आरोग्यसुविधेसाठी तुम्हाला धरून हाणू ..मनसे चा शेवटचा इशारा (व्हिडीओ)

पुणे- रेल्वेच्या डब्यांमधील रुग्णांसाठी केलेली व्यवस्था गेली कुठे ? बालेवाडीतील रुग्णांच्या व्यवस्थेचे गाडे कुठे अडले ? शेखर गायकवाड सारखे महाराष्ट्रीयन अधिकारी हटवून राव आणि कुमारांनी कोणते दिवे लावलेत ? असे अनेक प्रश्न आता मनसेच्या वर्तुळात उपस्थित होत असताना आज माणसे चे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी कमला नेहरू रुग्णालयातील सर्व सुविधा धूळ खात पडून असताना तिथे आय सी यु कक्ष का सुरु करत नाहीत असा सवाल उपस्थित करत .. बऱ्या बोलानं ..आरोग्य सुविधा सर्वांना पुरवा, हवी तर सारी खाजगी रुगानालये देखील ताब्यात घ्या .. पण आरोग्य सुविधेवाचून कुणाला वंचित ठेवू नका ..अन्यथा .. रस्त्यावर गाठून हाणू असा इशारा आज स्पष्टपणे दिला आहे .



            ते म्हणाले ,’पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ICU  व व्हेंटिलेटर , ऑक्सिजन बेड ची सुविधा काही महिन्या पूर्वी तयार करण्यात आली आहे परंतु स्थानिक लोकप्रतींनिधीच्या हट्टा मुळे सदर विभाग अजूनही सुरू करण्यात आला नाही असे निदर्शनास आले आहे . इतका खर्च करून उभारलेले ICU  आशा पद्धतीने धूळ खात पडून रहाणे वाईट आहे पुणे शहरात करोना रुग्ण व्हेंटिलेटर मिळत नसल्याने मृत्यू मुखी पडत असताना प्रशासन ही हा विभाग सुरू करण्या साठी प्रयत्नशील नसावा हे पुणेकराचे दुर्देव आहे प्रशासनाला दोष यासाठी  कारण सत्ताधारी पक्ष हा फक्त अर्थकरणा भवती फिरणार्‍या सुविधा उभ्या करण्यास मग्न आहे. रुग्ण जगो अथवा मरो …
 सध्या कोरोना च्या या बिकट काळात नागरिकांना ICU व ऑक्सिजन बेड मिळत नसताना योग्य ते सोपस्कार पार पाडत त्वरित कमला नेहरू रुग्णालया मधील ICU  व व्हेंटिलेटर , ऑक्सिजन बेड ची सुविधा सुरू करावी. अन्यथा मनसे २४ तासात सदर विभाग ताब्यात घेऊन icu सुरू करेल याची नोंद घ्यावी. असे त्यांनी म्हटले आहे.

आज icu उपलब्ध नाही icu अभावी रुग्ण मरत आहेत काही उपाय योजना कराव्यात जेणे करून कमला नेहरू तील साध्य चालू असलेले विभाग डिस्टब होणार नाही अथवा वरील ठिकाणचे उपचार कमला नेहरूला वर्ग कराव्यात उदा राजीव गांधी वगैरे तर त्याच बरोबर खाजगी परंतु बंद अवस्थेत असलेले हरजीवन ,दीनदयाळ सारखे व काही प्रमाणात टिळक आयुर्वेदिक,आष्टागं, ताराचंद,बिबबेवाडीच esi च हॉस्पिटल अशी काही प्राथमिक नावं पण आहेत जिथे कोविड रुग्णालये त्वरित सुरू करता येतील
प्रशासनाने उपाय योजना तर केल्या पाहिजे हॉस्पिटलमध्ये उपचार होऊ शकणारे विभाग कसे वाढतील या बाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी ठरवून कार्यवाही करत नाही असं मनसे च म्हणणं आहे.चालू व्यवस्था बंद करा आणि आम्ही सुचवू तेच करा हे आमचं म्हणणं नाही
म्हणणं साधं आहे हॉस्पिटल आहेत ती ताब्यात घ्या त्यामुळे टाळू वरच लोणी कमी खायला मिळेल …पण उपचारा अभावी तडफडून मारणारे जीव तर वाचतील खाजगी रुग्णालयांच्या बाबतीत हि ते म्हणाले , महापालिकेने हि सारी रुग्णालये ताब्यात घ्यावीत आणि तिथूनही सुविधा पुरवाव्यात कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत हि मनसे ची भूमिका आहे त्या जर मिळाल्या नाहीत तर ..यांना रस्त्यावर हाणू .. हि वेळ आमच्यावर येवू देवू नका .हा शेवटचा इशारा समजा असे ते म्हणाले.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

महाराष्ट्र शासनाने आज पुढील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कुटुंब कल्याण आयुक्त श्री अनुपकुमार यादव यांची बदली विशेष विक्रीकर आयुक्त या पदावर तर कुटुंब कल्याण आयुक्त या पदावर विद्यमान विशेष विक्रीकर आयुक्त श्री परिमल सिंह यांची बदली करण्यात आली आहे. श्री साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए के डोंगरे यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्वसन मंडळ या पदावर तर मुख्य सचिवांच्या कार्यालयातील उपसचिव डाँ किरण पाटील यांची बदली रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.

परंपरेची जाणीव करून दिली, अनादर केलेला नाही – व्यंकय्या नायडूंचे स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली – काल राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शपथ दिली. यावेळी भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर, ‘जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिल्याने सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली होती. मात्र यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याआहेत.

याच पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडू यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत ट्विट करताना ते लिहतात, ‘मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक असून देवी भवानीचा उपासक आहे. परंपरेनुसार शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याचीच सभासदांना आठवण करून दिली. यात अजिबात अनादर केलेला नाही,’तत्पूर्वी काल, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष केल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी त्यांना, ‘सदनातील नवीन सदस्यांना सांगतो की, हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाणार आहे. सदनात कोणतीही घोषणा देता येणार नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ अशी समज दिली होती.

प्रलंबित मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे २८ जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन

0

पुणे :
राज्य सरकारकडे पदोन्नती सहित अनेक प्रलंबित मागण्यांसाठी  नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने २८ जुलै रोजी  लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत,कार्याध्यक्षअशोकराव चव्हाण, सचिव सागर पवार यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
 शासनाकडे मागील 3 वर्षापासून विविध मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आलेले आहेत. सदर निवेदनामध्ये एकुण 11 विषयाबाबत मागणी करण्यात आलेली आहे.प्रामुख्याने विभागामध्ये मागील तीन ते चार वर्षापासून थांबविलेली सर्व संवर्गातील पदोन्नती तात्काळ देण्याची   मागणी केलेली आहे. कोरोना महामारी मध्ये मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाचे १५ टक्के उपस्थितीचे आदेश असताना 100 टक्के  उपस्थितीमध्ये काम करत आहेत. तथापी विभागातील कर्मचाऱ्यांना मागणी करुन सुद्धा जीवन सुरक्षा वीमा कवच लागू केलेले नाही. विभागामध्ये कोरोना आजाराने आत्तापर्यंत 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला असून शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही  सुरक्षाविषयक सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप निवेदनामध्ये करण्यात आला आहे.
या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दि.28 जुलै रोजी एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन करण्याचे निश्चीत केलेले आहे . मागण्या मान्य न झाल्यास ४ ऑगस्ट पासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारणेबाबत निश्चय केलेला आहे. 

डॉक्टर्संनी मिशन मोडवर काम करावे -विशेष कार्य अधिकारी सौरभ राव

0

पुणे दि. 23 :- कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारीवर्ग चांगले काम करत आहेत. पुण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व टिकविण्यासाठी तसेच भविष्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेवून आयसीयू खाटा तसेच कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) खाटा उपलब्ध करण्यासाठी सर्वांनी मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक, संचालक व डॉक्टरांसोबत उपाययोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ससून हॉस्पिटलचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

टाळेबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढ केल्यामुळे कोराना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या दृष्टीने रुग्णांप्रती पर्यायाने शहराप्रती आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्व लक्षात घेवून प्रत्येक रुग्ण कोरोना मुक्त कसा बरा होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. रुग्णालयात येणारे प्रत्येक व्यक्ती कोरोना बाधित रुग्ण आहे असे समजूनच त्यावर उपचार करावे. खासगी रुग्णालयांनी कोरोना बाधित रुग्णाच्या उपचारांती देण्यात येणाऱ्या अवाजवी वैद्यकीय देयकावर नियत्रंण आणावे, रुग्णालयातील उपलब्ध खाटा गरजू रुग्णांना देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा. सहव्याधी रुग्णांवर प्राधान्याने उपचार करुन मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. रुग्णालयातील पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही विशेष कार्य अधिकारी श्री. राव यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोनाच्या संकटकाळात पुणे शहरासह जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम होत आहे. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर इतर शहराच्या तुलनेत बरा आहे. टाळेबंदीच्या काळात कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढ केल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्येमध्ये वाढ दिसून येत आहे. त्यामुळे वाढत जाणारी रुग्णसंख्या लक्षात घेवूनच ग्रामीण भागात आयसीयू खाटा तसेच कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाबाधित रुग्णांला वेळेत औषधोपचार देण्यावर भर द्यावा, रुग्णालयात औषधाचा साठा कमी पडणार नाही, याबाबत विशेष काळजी घ्यावी, अतिगंभीर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या परिस्थितीबाबत वस्तूनिष्ठ माहिती द्यावी, जेणेकरुन ते रुग्णावर चालू असलेल्या उपचाराबाबत समाधानी राहतील, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिल्या.

पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ८०० खाटा नव्याने उपलब्ध करण्याचे काम चालू आहे. त्यामध्ये २०० आयसीयू आणि ६०० ऑक्सिजनयुक्त खाटांचा समावेश असणार आहे. कोरोनाविरुध्दच्यालढाईत पुण्यातील गणेश मंडळ, सामाजिक संस्था, खासगी व्यक्ती यांचे सहकार्य महानगरपालिका घेणार आहे. त्यांना परिस्थितीनुसार योग्य ती जबाबदारी देण्यात येणार आहे. शहरातील जनरल प्रॅक्टिशनर्सना कोरोना संशयित किंवा सौम्य ते मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी महानगरपालिकेने दिली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या लढाईत खासगी रुग्णालय चांगले सहकार्य करीत असून यापुढे असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पुण्यातील खाजगी रुग्णालयांचे व्यवस्थापक, पदाधिकारी व प्रमुख डॉक्टर उपस्थितांनी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याबाबत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

तब्बल 49 खांबांची वीजयंत्रणा उभारून अतिदुर्गम तैलबैला गावात लखलखाट

0

पुणे, दि. 23 जुलै 2020 : मावळातील सुधागडच्या तोंडावर व घनगडाच्या समोर गिर्यारोहकांना साद घालणाऱ्या 3322 फुट उंचीच्या दोन अजस्त्र कातळभिंतीच्या कुशीत असलेले अतिदुर्गम तैलबैला गाव (ता. मुळशी, जि. पुणे) ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा अभूतपूर्व तडाखा बसल्यामुळे अंधारात गेले होते. मात्र तब्बल 49 वीजखांबांची जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा महावितरणने उभारल्यानंतर ऐतिसाहिक तैलबैला गाव प्रकाशाने लखलखत आहे.

मुळशी तालुक्यातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या सिमेवर घाटमाथ्यावर असलेले आणि मुळशी धरण भागातील शेवटचे टोक असलेले तैलबैला गाव पुण्याहून 100 किलोमीटर तर लोणावळ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. अतिदुर्गम डोंगरदऱ्यातील पण विद्युतीकरण झालेल्या भांबुर्डे, गुटके, आसनवाडी, एकोले व तैलबैला या पाच गावांची भांबुर्डे ही गटग्रामपंचायत आहे. या गावांना महावितरणकडून माले उपकेंद्रातून कुंभेरी 11 केव्ही वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. गेल्या महिन्यात ‘निसर्ग’ चक्रावादळाने या घाटमाथ्यावरील पाचही गावांमध्ये होत्याचे नव्हते केले. सोबतच माले उपकेंद्रातून शेवटचे टोक असलेल्या तैलबैला गावापर्यंत जाणाऱ्या 90 किलोमीटर लांबीच्या कुंभेरी 11 केव्ही वीजवाहिनीचे तब्बल 127 वीजखांब अक्षरशः जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे या वीजवाहिनीवरील सुमारे 40 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

   डोंगरदऱ्या, घनदाट जंगलातील धुके, संततधार पाऊस, खळाळून वाहणारे आढे, नाले, चिखलमय व निसरड्या वाटा अशा प्रतिकूल परिस्थितीत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर सुमारे 15 दिवसांत कुंभेरी 11 केव्ही वीजवाहिनीवरील 79 वीजखांबांची यंत्रणा पुन्हा उभारण्यात आली व तैलबैला गाव वगळता सर्व गावांचा वीजपुरवठा टप्प्याटप्पाने पूर्ववत करण्यात आला. ही वीजवाहिनी 99 टक्के कार्यान्वित झाली होती. मात्र वीजवाहिनीचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम असलेल्या तैलबैला गावात वीजपुरवठा सुरु करण्यासाठी जमीनदोस्त झालेले आणखी 48 उच्चदाब वीजखांब उभारणे गरजेचे होते. भांबुर्डे गावापर्यंत वीजपुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा ही यंत्रणा उभारण्याचे काम अभियंते व कर्मचाऱ्यांकडून सुरु झाले होते.

      दरम्यान मुसळधार पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे नवीन वीजखांब वाहून नेणे, ढगांच्या धुक्यात व भरपावसात काम करणे, दिवसा कमी प्रकाश असल्याने तसेच डोंगरदऱ्या व जंगलात अपघाताचे धोके टाळून वीजयंत्रणा उभारण्याचे काम अतिशय खडतर होते. सुरवातीला सलग दोन-तीन दिवस सतत पाण्यात राहून काम केल्यामुळे अनेकांच्या पायाला जखमा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सुमारे 40 कर्मचाऱ्यांनी दोन-तीन दिवसाआड एक दिवस आळीपाळीने दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले.

जगाच्या संपर्काबाहेर राहून खाण्यापिण्याचे हाल सोसत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी ऐतिहासिक तेलबैला गावाला प्रकाशमान करण्याचा विडा उचचला. जंगलात झाडांच्या फांद्यामध्ये विस्कटून पडलेल्या तारा काढणे, संततधार पावसात नवीन वीजखांब रोवणे, तारा ओढणे आदी कामे त्यांनी परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने अविश्रांतपणे केले. तैलबैला गावाच्या वीजपुरवठ्यासाठी उच्चदाबाचे 48 व लघुदाबाचा एक अशा 49 वीजखांबांची यंत्रणा उभारली. या अथक व खडतर परिश्रमानंतर तेलबैलातील वीजजोडणी असलेले 40 घरे पुन्हा एकदा प्रकाशाने उजळली आहेत. ग्रामस्थांनी महावितरणच्या या कामगिरीचे कौतुक केले.

अपारंपरिक ऊर्जावर भर देणार

0

इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या ई बैठकीत  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा
मुंबई – राज्यात वसुंधरा व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पारंपरिक ऊर्जेवरील राज्याची निर्भरता कमी करण्यासाठी राज्यात सौर ऊर्जेवर आधारित अपारंपारिक ऊर्जा निर्मिती करण्यावर अधिक भर देण्यात येईल अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या ई बैठकीत केली.राज्यात सौरऊर्जा प्रकल्प मोठया प्रमाणावर राबविण्यासाठी इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉ नितीन राऊत यांनी आज मंत्रालयातून संवाद साधला. राज्याला नुतनीकरण ऊर्जा प्रकल्प क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व नवीन सौरऊर्जा धोरण निश्चित करण्यासाठी प्रधान उर्जा सचिव यांच्या नेतृत्वाखाली उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज ऊर्जा विभागाला दिले आहेत.

 हे धोरण ठरविण्यासाठी गुजरात व राजस्थान मॉडेल्सचा अभ्यास करण्यात येणार आहे. राज्यात पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प कसे राबविता येईल, यासाठी सरकार व ऊर्जा कंपनीच्या सध्याच्या पडीक जमिनी तसेच खासगी जमिनीवर हे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात येईल. त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम राबविण्यात येणार आहे.
 हरित योजनेअंतर्गत शासनाकडून पडीक जागा विकत घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यात येणार असून प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सिंगल विंडो प्रक्रिया करून कामे तडीस नेण्यात येणार आहे.
 मुंबई येथील फ्रेंच वाणिज्य दूतावासच्या सोनिया बारब्रि व अणुऊर्जा सल्लागार थॉमस मीएस्सेट यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ऊर्जामंत्री समवेत महानिर्मितीच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक शैला ए व महापारेषणचे  अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे उपस्थित होते.————-Attachments area

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 29 हजार 732,एकुण 2 हजार 126 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 43 हजार 430 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 75 हजार 288 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि. 23:- पुणे विभागातील 43 हजार 430 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 75 हजार 288 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 29 हजार 732 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 126 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 815 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.69 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 61 हजार 944 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 37 हजार 323 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 100 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 11 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 991 व पुणे कॅन्टोंन्मेंट 232, खडकी विभागातील 43, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 717, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 106 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 99, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 254 व पुणे कॅन्टोंन्मेंट 30, खडकी विभागातील 27, ग्रामीण क्षेत्रातील 73, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 38 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 572 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.25 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.46 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 587 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 917, सातारा जिल्ह्यात 123, सोलापूर जिल्ह्यात 198, सांगली जिल्ह्यात 79 तर कोल्हापूर जिल्ह्यात 270 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 753 रुग्ण असून 1 हजार 495 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 165 आहे. कोरोनाबाधित एकूण 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 6 हजार 327 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 70 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 857 आहे. कोरोना बाधित एकूण 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 182 रुग्ण असून 459 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 681 आहे. कोरोना बाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 3 हजार 82 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 83 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 929 आहे. कोरोना बाधित एकूण 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख 68 हजार 768 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 64 हजार 319 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 449 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 88 हजार 258 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. तर 75 हजार 288 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 23 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको

0

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या कुलगुरूंना सूचना

मुंबई, दि. 23:  – राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता  अनुकूल वातावरण  निर्माण होताच  त्या घेण्यात  याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या.

प्रथम, द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.

अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी. कोविड -19 चा  प्रादुर्भाव  कमी होताच  या विद्यार्थ्यांच्या  परीक्षा घेण्यात याव्यात व तसे केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पस मध्येच असल्यामुळे याबाबत  फारशी अडचण येणार नाही. तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा 15 सप्टेंबर रोजी असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठरल्यानुसार  वेळेवर घेण्यात याव्यात मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे  ऐन वेळी  अडचण निर्माण झाल्यास  परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात यावा  अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी महाराष्ट्र  आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिल्या आहेत.

कोरोना ,तेरी टाय टाय फिश .. नृत्य करणाऱ्या ‘त्या’ सलोनीच्या पाठीवर भाजपकडून कौतुकाची थाप

0

पुणे- घरातले सारेच कोरोना पाॅझीटीव्ह,घरी उरलेल्या एकट्या तरुणीने आपल्या आप्तीयांच्या,स्थानिक लोकप्रतिनिधींच्या  मदतीने ..साऱ्या समस्यांवर मात केली आणि मग काय तिच्या घरच्यांनी हि कोरोनावर मात करत हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेतला तिच्या आनंदाला पारावर उरला नाही अशा धनकवडीतील सलोनी सातपुते च्या पाठीवर आज भाजपने थाप दिली . भाजपच्या नगरसेविका वर्षा  तापकीर ,तसेच मोहिनी देवकर ,गणेश भिंताडे यांनी आज या कुटुंबाची भेट घेऊन सलोनी च्या धैर्याचे कौतुक केले .आणि तिच्या घरच्या सर्वांचाच सन्मान केला.

घरातले सारेच कोरोना पाॅझीटीव्ह ,एकटीच हि तरुणी उरली जीचा रिपोर्ट  निगेटिव्ह आला , सारे हॉस्पिटलमध्ये ..आणि ‘ती ‘एकटीच घरात ..हॉस्पिटल चा खर्च ..देखभाल ..घरातल्या समस्या साहजिकच सर्वांना ‘टेन्शन’..पण शालेय जीवनापासून सामजिक कार्याबाबत अनुकुलता असलेल्या तिच्या मनाने हे आव्हान स्वीकारले , आप्तीयांसह नगरसेविका असलेल्या वर्ष तापकिरांना फोन केला . आणि कुठून कोण जाणे तिला बळ मिळाले .. हे सारे आव्हान तिने लीलया पेलले … १४ दिवसांच्या एकांतवासीय जीवनाला तिने फोन ,व्हिडीओ कॉल, आप्तीयांच्या मदतीने आपलेसे केले आणि ते पाहून ‘ती च्या घरातील पाॅझीटीव्ह निघालेल्या आणि उपचार घेणाऱ्यांनी हि भरारी घेतली आणि मग कोरोनावर मात करून  घरी परतलेल्या आपल्या आई ,बाबा, आजी, आजोबा आणि बहिणीचे तिने असे केले स्वागत ..आणि कोरोना ला असे केले ..टाय टाय फिश ..कि तिच्या स्वागतपर आनंदाचा मोबाईल व्हिडीओ असा व्हायरल झाला कि सर्वांच्या नजर वेधल्या … आनंदी राहा ,खंबीर राहा आणि कोरोनाचा मुकाबला करा असा सहजगत्या संदेश तिच्या नृत्याच्या लहरीने वाऱ्यासारखा पसरला . ..तो एवढा व्हायरल झाला कि , तिच्यावर शाबासकीचा पाउस पडला . तिने आपल्याला मदत करणाऱ्या आणि नैराश्य येवू न दिलेल्या आप्तीयांचे देखील आभार मानले.

पैशाअभावी अत्यवस्थ रुग्ण आणि कुटुंबांपुढे अपेष्टांचा महासागर …

0

पैशाअभावी अत्यवस्थ रुग्णाला डिस्चार्ज -घरीच झाला मृत्यू -अन अंत्यसंस्काराची झाली परवड

आम्ही त्या रुग्णालयाचे स्थानिक लोकप्रतिनिधीकडून बरेच कौतुक ऐकले होते , महापालिकेने याच रुग्णालयास बरीच बिले अदा देखील केली . मग अशी हि दुर्दैवी कथा आणि व्यथा पुंन्हा आमच्यापुढे का यावी ? हाच पडलेला प्रश्न होता . पण अखेरीस तोही कॉंग्रेसच्या एका जबाबदार घराण्यातील तरुणाने पुढे मांडलेला .कोरोना महामारीच्या काळात तशा खाजगी -सरकारी हॉस्पीटलच्या , व्यापारी ,दुकानदार आणि सोसायट्यांचे मालक बनून उभारलेले पदाधिकारी यांची अनेक चांगली वाईट रूपे पुढे आली . महामारीच्या या काळात माध्यमे देखील संकटात होतीच ,सामाजिक अवहेलनेचे राक्षसी रूप माध्यमांपुढे देखील उभे होतेच. वास्तविक पाहता ती सर्वच प्रकर्षाने मांडण्यात माध्यमांना सामाजिक भान राखण्याच्या दडपणाखाली मर्यादा येत राहिल्या असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही .

कॉंग्रेसचे गटनेते ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांचे सुपुत्र अमित बागुल कोरोना वर मात करून परतल्यानंतर हि कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धाऊन जाताना त्यांना आलेला हा अनुभव मोठा हृद्यदायी ,आणि संताप आणणारा हि आहे ..जो आम्ही येथे जसाच्या तसा सादर करतो आहे .

व्यथा आहे हि दक्षिण पुण्यातील ….

…धनकवडी   येथे 10 जणांचे कुटुंब वास्तव्यास असून 6  दिवसांपूर्वी घरातील जेष्ठ आजोबांना ससून येथे कोरोना असल्यामुळे ऍडमिट करण्यात आले.दुर्दैवाने त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.महानगरपालिकेने घरातील इतर सदस्यांचे कोरोनाचे नमुने घेतले त्यापैकी 5 जण पॉझिटिव्ह आले,त्यातील तीन महिलांना हमी पत्र दिल्या नंतर घरामध्ये क्वारंटाईन करण्यात आले व दोन जणांना सिंहगड हॉस्टेल येथे क्वारंटाईन सेंटर येथे ठेवण्यात आले.परंतु घरामध्ये क्वारंटाईन केलेल्या पैकी रंजना (वय 67) वर्ष यांना अचानक  त्रास सुरू झाला त्यामुळे कोरोना झालेल्या या आजींना धनकवडी मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. त्यांना त्या ठिकाणी व्हेंटिलेटर बेड पाहिजे होता त्या साठी हॉस्पिटलकडून त्यांच्या घरच्यांना वारंवार पैसे भरण्यासाठी सांगण्यात येत होते. अचानक पैसे कुठून आणणार आणि घरातील कर्ते पुरुष माणसे सुद्धा ऍडमिट असल्यामुळे त्यांच्या कडे हॉस्पिटला भरायला पैसे नव्हते  हॉस्पिटल रुग्णांबरोबर योग्य वागणूक देत नसून पैशासाठी मागणी करत आहेत. घरातील कर्ते पुरुष क्वारंटाईन असल्याने पैसे भरू शकत नाहीत त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला विनंती केली.कोणत्या सरकारी योजनेमधून यांच्यावर उपचार करता येतात का ते पहा,परंतु हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांचे काहीच ऐकले नाही.आता आजींना ऍडमिट करून संध्याकाळ झाली आणि हॉस्पिटल कडून पैसे भरण्यासाठी दबाव वाढत होता.त्यातच आजींचे ऑक्सिजन कमी झाल्याने ऑक्सिजन लावण्याची वेळ आजींवर आली होती.हॉस्पिटलने सांगितले आताच्या आता 80,000 रुपये भरा नाहीतर पेशंटला घेऊन जा ऑक्सिजन बेड एकच असून पैसे भरले नाहीतर तो बेडही मिळणार नाही.शेवटी नाईलाजास्तव पैसे नसल्यामुळे या हॉस्पिटलने आजींना कोरोना असताना देखील डिस्चार्ज दिला. आजींना घरी आणले. परंतु घरामध्ये सकाळी 6 च्या सुमारास दुर्दैवाने त्यांचा कोरोनामुळे मृत्य झाला. ह्या सगळ्या घटने मुळे त्या कुटुंबाला काय करावे हे सुचत नव्हते कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे त्यांना इतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येत नव्हते.अश्या कठीण प्रसंगात त्यांनीअमित बागुल ह्यांना फोन करून सगळी घटना सांगितली त्या वेळेस लगेच पुणे महानगरपालिकाचे सर्व अधिकारी यांना फोन करून या घटनेची माहिती देऊन त्या आज्जीची अंत्यसंस्कार कश्या पद्धतीने  करता येइल ह्या बाबत सूचना दिल्या व त्याच बरोबर त्या कुटुंबाच्या सदस्य यांच्या बरोबर फोन वर चर्चा देखील चालू होती जसा जसा वेळ जाऊ लागला रात्रीचे 12 वाजले आज्जी जाऊन 6 तास झाले होते शेवटी रात्री 12 वाजता आरोग्य प्रमुख डॉ. वावरे साहेब वॉर्ड ऑफिसर देशमुख साहेब dsi भालेराव यांना अमित बागुल ह्यांनी पुन्हा संपर्क करून त्या आज्जीना लवकर अंत संस्कार करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी यंत्रणा लगेच पाठवण्यासाठी सुनावले  कोरोना रुग्णांसाठी आर टीओ येथील कैलास स्मशानभूमी येथे पुणे महानगरपालिकाने ठेकेदार नेमले आहेत ते देखील आले नाहीत शेवटी वॉर्ड ऑफिसर देशमुख आणि dsi भालेराव यांनी दुसरी व्यवस्था करून रात्री 2 वाजता त्या आज्जींवर अंत्यसंस्कार करण्यात आले  जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या या आजींना आता मृत्यू नंतरही अंत्यविधीसाठी या जीवघेण्या व्यवस्थेशी झुंज द्यायची आली आहे. अशी वेळ कोणावर येऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना. यामुळेच असे वाटते की, कोरोनाच्या या बाजारात पैसा झाला माला माल.

राज्यात आज : कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान- १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.२२: राज्यात आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले  २८० मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे-१६, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-३,कल्याण-डोंबिवली मनपा-६, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर-७, वसई-विरार मनपा-४,पालघर-१,रायगड-१,पनवेल-३, नाशिक-२, नाशिक मनपा-४, अहमदनगर-३, अहमदनगर मनपा-३, धुळे-१,  जळगाव-८, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-३, पुणे मनपा-३६, पिंपरी-चिंचवड मनपा-१८,सोलापूर-६, सोलापूर मनपा-६, सातारा-२, कोल्हापूर-६, कोल्हापूर मनपा-१०, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-३, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-२३, जालना-१, हिंगोली-१, परभणी-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड मनपा-३, अकोला-१, अकोला मनपा-२, बुलढाणा-१, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                                           

मुंबई: बाधित रुग्ण- (१,०४,६७८) बरे झालेले रुग्ण- (७५,११८), मृत्यू- (५८५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,३९३)

ठाणे: बाधित रुग्ण- (७९,९११), बरे झालेले रुग्ण- (४१,५८४), मृत्यू- (२१४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,१८०)

पालघर: बाधित रुग्ण- (१२,७७३), बरे झालेले रुग्ण- (७१७६), मृत्यू- (२५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३३९)

रायगड: बाधित रुग्ण- (१२,६१६), बरे झालेले रुग्ण-(६७०३), मृत्यू- (२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६७१)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१३२८), बरे झालेले रुग्ण- (७३८), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२९०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)

पुणे: बाधित रुग्ण- (६३,३५१), बरे झालेले रुग्ण- (२२,४८४), मृत्यू- (१५१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,३५३)

सातारा:  बाधित रुग्ण- (२६४९), बरे झालेले रुग्ण- (१३८७), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६९)

सांगली: बाधित रुग्ण- (१०९५), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२६४६), बरे झालेले रुग्ण- (९८८), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (६६५५), बरे झालेले रुग्ण- (२९४१), मृत्यू- (४११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३०२)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०,७४५), बरे झालेले रुग्ण- (५८१८), मृत्यू- (३८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५४४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२३५९), बरे झालेले रुग्ण- (१०००), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१५)

जळगाव: बाधित रुग्ण- (८१३८), बरे झालेले रुग्ण- (५४५५), मृत्यू- (४२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४६६), बरे झालेले रुग्ण- (१९८), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४८)

धुळे: बाधित रुग्ण- (२१८७), बरे झालेले रुग्ण- (१३९५), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१०,६२९), बरे झालेले रुग्ण- (५५९०), मृत्यू- (४१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२३)

जालना: बाधित रुग्ण- (१५७१), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४०)

बीड: बाधित रुग्ण- (४३४), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)

लातूर: बाधित रुग्ण- (१२६७), बरे झालेले रुग्ण- (५६९), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३६)

परभणी: बाधित रुग्ण- (४१३), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (४५३), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०)

नांदेड: बाधित रुग्ण- (९९९), बरे झालेले रुग्ण (४६३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५७३), बरे झालेले रुग्ण- (३४९), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५)

अमरावती: बाधित रुग्ण- (१४२९), बरे झालेले रुग्ण- (९९३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८)

अकोला: बाधित रुग्ण- (२१८३), बरे झालेले रुग्ण- (१७०२), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७८)

वाशिम: बाधित रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (६६९), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (६११), बरे झालेले रुग्ण- (४१२), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)

नागपूर: बाधित रुग्ण- (२८०६), बरे झालेले रुग्ण- (१४७९), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८९)

वर्धा: बाधित रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

भंडारा: बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१६०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२३१), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२११), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

एकूण: बाधित रुग्ण-(३,३७,६०७) बरे झालेले रुग्ण-(१,८७,७६९), मृत्यू- (१२,५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,३६,९८०)

 (टीप:ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

सोन्याच्या किमतीने गाठला 50 हजार रुपयांचाया नवीन उच्चांक, चांदीही 60 हजारांच्या पुढे

0

नवी दिल्ली– कोरोना महामारीदरम्यान सोन्याने उच्चांक गाठला आहे. बुधवारी प्रती 10 ग्राम सोन्याची किंमत 50,021 रुपये झाली. दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सप्टेंबरमध्ये डिलीव्हर होणाऱ्या चांदीचे किमतीनेही सात वर्षातील उच्चांक गाठला आहे. चांदीची किंमत 60,782 प्रती किलो झाली आहे.

यूरोपीय संघातील नेत्यांनी कोरोनामुळे झालेल्या आर्थिक संकटातून वर येण्यासाठी 750 बिलियन यूरोंचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. अमेरिकाही एक ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजवर काम करत आहे.

सोन्याच्या किमतीत 30% उसळी

यावर्षी मार्चमध्ये सोन्याची किंमत 38,500 रुपये प्रती 10 ग्रामवर पोहचली होती. या हिशोबाने एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीने 30 टक्के उसळी मारली आहे. दुसरीकडे, मार्चमध्ये चांदीची किंमतीत 81 टक्के घट होऊन 33,580 रुपये प्रती किलोवर आली होती. यापूर्वी 2011 मध्ये चांदीची किंमत 73,600 रुपये प्रती किलोवर पोहचली होती.

सोन्याचा भाव 1965 च्या तुलनेत आतापर्यंत 746 पट वाढला

भारतात सोन्याचा भाव 1965 च्या तुलनेत आता 746 पट वाढला आहे. कोरोना संक्रमणानंतर जगभरात सोन्याची मागणी वाढली आहे. यापुढे तीन ते पाच वर्षांसाठी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

80 हजार रुपये प्रती 10 ग्रामवर जाऊ शकते किंमत

जगभरात पसरलेल्या कोरोना संक्रमणामुळे शेअर बाजार आणि बॉन्डमध्ये कमतरता आलेली दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता, गुंतवणूकदारांनी सोन्याच्या गुंतवणुकीकडे भर दिला आहे. यामुळे सोन्याच्या किमतीत उच्चांक पाहायला मिळत आहे. यादरम्यान बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज (BofA Sec) च्या एनालिस्टने अंदाज व्यक्त केला आहे की, 2021 च्या अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रती औंसपर्यंत जाऊ शकते. 3000 डॉलरला भारतीय रुपयात कन्वर्ट केल्यावर 2,28,855 रुपये होतात.

बेड मिळविण्याची ८ तासाची लढाई जिंकला पण अखेर कोरोनापुढे हरला ..

0

33 वर्षीय करोनाबाधिताची व्यथा

पुणे : शहरात अवघ्या 33 वर्षीय करोनाबाधित युवकाला तब्बल आठ तास उपचारासाठी बेड न मिळाल्याने उपचारास दिरंगाई झाली. अखेर रात्री उशीरा बेड मिळाला पण तोपर्यंत करोनाने त्याच्या शरीरात गंभीर रूपधारण केल्याने बुधवारी सायकांळी या युवकाने अखेरचा श्‍वास घेतला.मात्र, या प्रकारामुळे करोनाच्या रूग्णांसाठी बेड उपलब्ध असल्याचा डिगोंरा पिटणाऱ्या महापालिका प्रशासनाचा फोल पणा उघड झाला आहे.

धायरी भागात राहणाऱ्या या 33 वर्षीय युवकाला मागील आठवडयात करोना सदृश लक्षणे होती. त्यामुळे फॅमिली डॉक्‍टर कडे तपासणी करून हा रूग़्ण घरीच थांबून होता. मात्र, मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास त्याला अचानक श्‍वास घेण्यास त्रास सुरू झाला. सुदैवाने त्याच्या कुटूंबियांना ऑक्‍सिजनची सुविधा असलेली ऍम्बुलन्स मिळाली.

त्यात, ऑक्‍सिजन लावून त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी दुपारी दोन वाजता धायरी सोडली त्यानंतर सिंहगड्‌ रस्त्यावरील दोन हॉस्पीटल मध्ये चौकशी करून ते रूग्णाला घेऊन शहरातील जवळपास सर्व मोठया हॉस्पीटलमध्ये गेले. त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास ते नवी पेठेतील एका मोठया रूग्णालयातही गेले.

मात्र, तिथेही त्यांना बेड नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतापलेले नातेवाईक या युवकासह ऍम्बुलन्स घेऊन टिळक चौकातील छत्रपती संभाजी महाराज पोलीस चौकीच्या समोरच रस्त्यावर ठाण मांडून बसले. आधीच बेड मिळत नव्हता, तसेच ऍम्बुलन्स मधील ऑक्‍सिजनही केवळ 20 टक्केच शिल्लक होता. त्यावेळी चौकात असलेल्या पोलिसांनी त्यांना बेड मिळवून देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला.

अखेर रात्री दहाच्या सुमारास त्यांना विश्रांतवाडी येथे एका खासगी रूग्णालयात बेड मिळाला. मात्र, तो पर्यंत या रूग्णाच्या उपचारास तब्बल 10 तास उशीर झालेला होता. मात्र, आज दुपारी या युवकाची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारादरम्यान, दुपारी चारच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.

ऑनलाईनला शहरात दाखविले 40 बेड

दरम्यान, या प्रकाराची माहीती रात्री नऊच्या सुमारास मिळाल्यानंतर युवकाच्या नातेवाईकांसह, हेल्परायडर्स या संघटनेचे सदस्य आणि महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी स्वत: शहरातील बेडची ऑनलाईन तपासणी केली. त्यावेळी शहरात ऑक्‍सिजनची सुविधा असलेले 40 बेड शिल्लक असल्याची माहीती विभागीय आयुक्तांच्या डॅशबोर्डवर दाखवत होते.मात्र, त्या ठिकाणी फोन केला असता रूग्णाला पाठवू नका असे सांगण्यात येत होते. त्यामुळे हा डॅश बोर्ड जाळायचा का असा सवाल या रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.