Home Blog Page 2498

ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील संदेश फसवे; सायबर भामट्यांपासून सावध रहावे – महाराष्ट्र सायबरचे आवाहन

0

मुंबई दि.३० : ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील फसव्या व्हाट्सअप संदेशाला बळी पडू नये व सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

सध्या कोरोना महामारीच्या काळात असा फसवा व्हाट्सॲप मेसेज फिरत आहे की, एक विशिष्ट मोबाईल ॲप डाऊनलोड केले तर तर, तुम्ही घरच्या घरी आपले body pulse व रक्तातील oxygen चे प्रमाण मोजू शकता व त्याकरिता स्वतंत्ररित्या pulse-oxy meter हे उपकरण घ्यायची गरज नाही व त्याबरोबर सदर मोबाईल ॲप डाउनलोड करायची लिंक दिलेली असते.

महाराष्ट्र सायबर तर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की,

१) कृपया अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका.

२) वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा मोबाईल ॲप्स वरून oxygen च्या प्रमाणाचे आकडे हे अचूक नसतात.

३) मुळात pulse – pulse -oxy meter या उपकरणात वापरली गेलेली प्रणाली व या मोबाईल ॲपमधील सॉफ्टवेअर यामध्ये बराच फरक आहे. त्या प्रणाली मध्ये वैद्यकीय निकष वापरले गेले आहेत जे या मोबाईल ॲपमध्ये नाहीत.

४) अशी मोबाइल ॲप ही सुरक्षित नाहीत व त्यांचा उपयोग सायबर भामटे तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती मिळवण्यासाठी करू शकतात.

५) शक्यतो अशी मोबाईल ॲप डाउनलोड करून वापरणे टाळा.

६) जर अशी कोणतेही मोबाईल ॲप तुम्ही वापरत असाल तर आपल्या मोबाईलच्या settings मध्ये जाऊन या ॲप्सना ठराविकच access allow करा. 

केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

रक्षा मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव : इलेक्‍ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग : ३७

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : मेकॅनिकल इंजिनियरिंग : ३५

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग : ३१

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग : १२

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : मटेरियल सायन्स आणि इंजिनियरिंग/मेटॉलॉजिकल इंजिनियरिंग : १०

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : फिजिक्स : ८

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत फिजिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : केमिस्ट्री : ७

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : केमिकल इंजिनियरिंग : ६

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : एरोनॉटिकल इंजिनियरिंग : ४

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : मॅथमॅटिक्स : ४

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत मॅथमॅटिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : सिविल इंजिनियरिंग : ३

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आणि गेट परिक्षेत उत्तीर्ण

पदाचे नाव : सायकॉलॉजी : १०

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीत सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात नेट उत्तीर्ण

वयोमर्यादा : २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3hODyX6  

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/2X96Ojh

कोरोना वाढ -महापौरांचा रोख प्रशासनावरच .. जम्बो रुग्णालयाला पैसे देण्याबाबतची भूमिका अस्पष्टच

0

पुणे- पुणे शहर आणि विभागात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पुण्याच्या महापौरांनी प्रशासनालाच जबाबदार धरले आहे. मात्र त्यांनी थेट आरोप न करता प्रशासनाकडेच बोटे दाखविणारी वक्तव्ये केली आहेत .खाजगी हॉस्पिटल चे ८० टक्के बेड्स ताब्यात न घेणे, खाजगी हॉस्पिटलच्या मनमानीवर कारवाई न करणे ,चाचण्यांची आणि उपचारांची क्षमता वाढविण्यासाठी आपल्या अधिकारात निर्णय घेऊन प्रयत्न न करणे अशाप्रकरचे विविध ठपके महापौरांनी अखेर अप्रत्यक्ष का होईनात प्रशासनावरच ठेवले आहेत . या शिवाय पुण्यात कोरोना रुग्णाला उपचार देण्यासाठी जे जम्बो रुग्णालय उभारायचे आहे त्यासाठी महापालिका आर्थिक विवंचनेत असतानाही जवळपास ३०० कोटी + ७५ कोटी जम्बो सेंटरला देण्यास तयार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. मात्र महापालिकेलाही राज्य सरकारने आर्थिक मदत केली पाहिजे अशी हि भूमिका स्पष्ट केली आहे .दरम्यान जम्बो रुग्णालयाच्या खर्चाबाबत नेमकी स्पष्ट भूमिका नसल्याचे यावरून बोलले जाणार आहे. एकीकडे रुग्णालयाला २५ टक्के देतो म्हणायचे आणि दुसरीकडे रुग्णालयाला ५० टक्के निधी देणाऱ्याच राज्य सरकारने पुन्हा मदत करावी असे म्हणायचे हि भूमिका अनेकांना दुटप्पी वाटते आहे.

श्री. मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत मांडलेले मुद्दे…

१) ऑक्सिजन व आयसीयू बेडस, व्हेंटिलेटरची कमतरता.
२) टेस्टिंगची क्षमता वाढविणे.
३) खाजगी हॉस्पिटलवरचे नियंत्रण.
४) महापालिकेस आर्थिक मदत.
५) मृत्यूची चौकशी करावी, त्यामधील दोष दूर करून मृत्यूदर नियंत्रणात आणावा.

खाजगी हॉस्पिटल, बेड्स आणि अवाजवी बील

  • ८०% बेड्स ताब्यात घेण्याचे आदेश आहेत, मात्र कार्यवाही नाही
  • बिलामध्ये नागरिकांची प्रचंड लूट असल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे बिलांचे प्रिऑडिट करावे
  • सेंट्रली बेड्स मॅनेजमेंट तातडीनं करण्यात यावे
    (ससून /मनपा /खाजगी हॉस्पिटल)
  • खाजगी लॅबवर तूर्त तरी कोणतेही नियंत्रण नाही आणि प्रशासनाचा लॅबशी समन्वय नाही.
  • उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमले आहेत, त्यांची यावर नियंत्रण आणावे

महापालिका आर्थिक स्थिती

  • ४ हजार ४४३ कोटी जमा
  • ३००० कोटी – महसुली / मॅन्डेटरी खर्च / पगार / मेन्टेनन्स
  • १४०० – विकासकामे (६५० कोटी मागील वर्षीच्या विकासकामे)
  • शिल्लक ८०० कोटी
  • जवळपास ३०० कोटी + ७५ कोटी जम्बो सेंटरला
  • भांडवली कामांसाठी शिल्लक ४०० कोटी राहिले, यासाठी दरवर्षी ३००० कोटींची कामे होतात.
  • हा सर्व विचार करता राज्य सरकारने तातडीनं आर्थिक मदत जाहीर करावी

कोरोनाबाधित रुग्णांचा आगामी अंदाज…

  • ५५ हजार होणार जुलैअखेर (अंदाज ४६ हजार इतका होता)
  • आज २९ जुलै रोजी एकूण रुग्ण एकूण ५१ हजार ७३८ तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १७ हजार ८६१ इतकी आहे.
    अंदाज
    १५ ऑगस्ट – एकूण १ लाख रुग्ण
    ३१ ऑगस्ट – एकूण २ लाख रुग्ण
  • यामुळे बेड्सचीची कमतरता, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स मोठ्या प्रमाणावर लागतील.
  • जम्बो सेंटर उभे उभारणीपर्यंत व्यवस्थाही अपुरी, त्याची सोय तातडीनं करण्यात यावी.
  • ७ हजार ऑक्सिजन बेड्स, ४ हजार ०६५ आयसीयू बेड्स आणि १ हजार ९०० व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता असणार आहे.

मृत्यूंचे प्रमाण व अवस्था…
ससून रुग्णालयात दररोज रोज १२ मूत्यू कोरोनाव्यतिरिक्त होत आहेत, ही संख्या खाजगी हॉस्पिटलमध्ये महिन्याला ५० ते १००; म्हणजेच ढोबळपणे अधिक ४०० ते ५०० मृत्यू कोरोनाचे असतात, पण ते आकडेवारीत दर्शविले जात नाहीत.

  • टेस्ट न होता हे मृत्यू होत आहेत, यात काही मृत्यू हॉस्पिटल पोहोचण्यापूर्वीचे आहेत.
  • छातीच्या एक्स-रे ने अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याची माहिती आहे.
  • याबाबत सविस्तर चौकशी करुन भविष्यातील या मृत्युंची संख्या कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत.

टेस्टिंग क्षमता वाढविणे

  • NIV आणि ससूनमध्ये चाचणीची मर्यादित क्षमता असल्याने ससूनमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठीची यंत्रणा उभी करणे याबाबत दोन महिने चर्चाच होत आहे, ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात यावी.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून

0

मुंबई, दि. ३० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून दिनांक ०१ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तथापी, आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री श्री.मलिक यांनी सांगितले.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही योजना – राज्यमंत्री शंभुराज देसाई

कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा. राज्यातील प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा शासनाचा निर्धार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री श्री.देसाई यांनी केले आहे.

दिड लाखाहून अधिक प्रवेशक्षमता

राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 92 हजार 556 इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 53 हजार 272 आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.

प्रादेशिक विभागनिहाय शासकीय व खाजगी संस्थांची संख्या व प्रवेशक्षमता पुढीलप्रमाणे आहे. अमरावती – ९० संस्था आणि १७ हजार ९८४ प्रवेशक्षमता, औरंगाबाद – १३३ संस्था आणि १९ हजार २६४ प्रवेशक्षमता, मुंबई – १०८ संस्था आणि २० हजार १२४ प्रवेशक्षमता, नागपूर – २४१ संस्था आणि २८ हजार १३६ प्रवेशक्षमता, नाशिक– २१८ संस्था आणि २९ हजार ५०० प्रवेशक्षमता, पुणे – १९६ संस्था आणि ३० हजार ८२० प्रवेशक्षमता.

वेबसाईटवर इत्यंभूत माहिती

आयटीआय प्रवेशासंबंधित नियम, प्रवेशासाठी उपलब्ध जागा, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व संपूर्ण प्रवेश कार्यपद्धती, याबाबत विस्तृत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका, प्रवेशाचे वेळापत्रक, शासकीय आयटीआय मधील वसतीगृहांची उपलब्धता, मागील तीन वर्षात प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांना व्यवसाय अभ्यासक्रम व संस्थानिहाय इयत्ता दहावीमध्ये प्राप्त झालेले प्रवर्गनिहाय महत्तम व किमान गुण, दिव्यांग विद्यार्थ्यांची व्यवसाय अभ्यासक्रम निहाय पात्रता, जिल्हानिहाय कौशल्याचा अभाव दर्शविणारा अहवाल (Skill Gap Study Report), व्यवसाय प्रशिक्षण पुतिपुर्ती योजनेची माहिती व कार्यपद्धती इत्यादींबाबतची माहिती https://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना  आवाहन करण्यात येते की, प्रवेश नियमावली काळजीपूर्वक वाचून प्रवेशासाठी अर्ज करावा.

आयटीआयविषयी अधिक माहिती

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येते. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.

होंडातर्फे 2020 सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड आणि फायरब्लेड एसपी इंडियाचे बुकिंग सुरू झाल्याचे जाहीर

नवी दिल्ली, 30 जुलै – रेसिंगचे चाहते असलेल्या मोटरसायकलप्रेमींची प्रतीक्षा आता संपली आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज सुपर स्पोर्ट विभागाताली सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड आणि फायरब्लेड एसपी इंडिया या दोन प्रकारांचे बुकिंग सुरू केल्याचे जाहीर केले आहे. सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड आणि फायरब्लेड एसपी इंडिया भारतात कम्प्लीटली बिल्ट- अप (सीबीयू) प्रकारात उपलब्ध केली जाणार आहे.

2019 च्या ईआयसीएमए शो मिलानमध्ये होंडाच्या सुपर स्पोर्ट्स लाइन- अप अंतर्गत अनावरण करण्यात आलेल्या सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड आणि फायरब्लेड एसपी इंडिया आतापर्यंत उपलब्ध करण्यात आलेल्या सर्वात ताकदवान बाइक्स आहेत.

सर्किट रायडिंगवर भर देत कामगिरी आणि नियंत्रणाची असामान्य पातळी असलेली 2020 फायरब्लेड होंडा रेसिंग कॉर्पोरेशनच्या (एचआरसी) भरीव योगदानासह तयार करण्यात आली आहे.

आरसी213व्हीएस ‘स्ट्रीट लीगल मोटोजीपी मशिन’च्या इंजिन व चासिस तंत्रज्ञानावर जास्त भर देत, आरसी213व्ही मोटो जीपी मशिनच्या एरोडायनॅमिक्सपासून प्रेरणा घेत बनवण्यात आलेल्या नव्या फायरब्लेडचे न्ही प्रकार जबरदस्त ट्रॅक कामगिरीसाठी इंजिन, हाताळणी व एरोडायनॅमिक्सच्या बाबतीत ग्राउंड अपपासून डिझाइन करण्यात आली आहे.

फायरब्लेड एसपीला अतिरिक्त आणि अत्याधुनिक ओहलिन्स स्मार्ट इलेक्ट्रॉनिक कंट्रोल (एस- ईसी) सस्पेंशन आणि युजर इंटरफेज, न्यू ब्रेम्बो स्टाइलेमा ब्रेक कॅलिपर्स – 330एमएम डिस्क, 2 लेव्हल एबीएस आणि क्विक शिफ्टरसह बसवण्यात आले आहेत.

फायरब्लेडचा वारसा आणि होंडाच्या प्रीमियम व्यवसाय योजनांविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘होंडाच्या जागतिक उत्पादन श्रेणीतील उत्पादने उपलब्ध करण्यातून आमचा रेसिंग डीएनए भारतात एका नव्या उंचीवर नेण्याचे आमची तीव्र इच्छा अधोरेखित झाली आहे. प्रसिद्ध फायरब्लेड योग्य हाताळणी, समतोल आणि चालवण्याचा असामान्य आनंद या गुणांसाठी गेली 28 वर्ष प्रसिद्ध आहेत.’

2020 साठी आरक्षण खुले केल्याची घोषणा करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री आणि विपणन विभागाचे श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘वारसा पुढे नेणारी नवी फायरब्लेड होंडाच्या आरसी213व्ही मोटो जीपी मशिनवरून प्रेरणा घेत बनवण्यात आली आहे. या ‘बॉर्न टु रेस’ मोटरसायकलीची ताकद जबरदस्त आहे, शिवाय ट्रॅकवर आधारित कामगिरीची असामान्य पातळी गाठण्याची क्षमता तिच्यात आहे. या परफॉर्मन्स बाइकसह चालकांना पूर्णपणे नवा आणि जबरदस्त अनुभव घेता येईल. आजपासून भारतातील होंडा बिगविंग वितरकांकडे आरक्षण खुले झाले आहे. वितरण ऑगस्ट 2020 पासून सुरू होईल.’

प्रमुख वैशिष्ट्ये

रेसिंगप्रेम जागं करा

2020 होंडा सीबीआर 1000आरआर फायरब्लेड मध्ये 1000 सीसी इन- लाइन फोर- सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहे, जे 160 केडब्ल्यू@ 14,500 आरपीएम, 113 एनएम उच्च टॉर्कची @ 12,500rpm निर्मिती करते. ते मोटोजीपीच्या आरसी213व्ही मोटरसायकलप्रमाणे पूर्णपणे नवे बोअर अँड स्ट्रोक (81एमएम x 48.5एमएम) वापरते. अल्युमिनीयमपासून तयार केलेले पिस्टन्स आरसी213व्ही मध्येही वापरण्यात आले असून ते सुमारे 5 टक्क्यांनी हलके आहे.

कमी वजन

सीबीआर 1000आरआर फायरब्लेडमध्ये हलक्या वजनाची अल्युमिनियम फ्रेम 2एमएम जाडीच्या वॉल सेक्शनसह वापरण्यात आली आहे. टायटॅनियम कनेक्टिंग रॉड्स आणि रॉड बोल्ट्स थ्रेड थेट रॉड बॉडीमध्ये जात असल्यामुळे त्यात स्वतंत्र फास्टनिंग नट्स देण्यात आलेला नाही. यामुळे स्टील रॉडच्या तुलनेत वजन अंदाजे 50 टक्क्यांनी कमी झाले आहे आणि त्याचे डिझाइन आरसी213व्ही- एस रॉड सारखेच आहे.

संपूर्ण नियंत्रण देणारे डिझाइन

सुधारित थ्रॉटल-बाय-वायर (टीबीडब्ल्यू) जलद प्रतिसाद देत असल्यामुळे नवी फायरब्लेड चालवण्याचा अनुभव आणखी उंचावतो. यामध्ये तीन डिफॉल्ट रायडिंग मोड (पॉवर (पी), इंजिन ब्रेक(ईबी) आणि व्हीली कंट्रोल (डब्ल्यू)) देण्यात आले आहेत. यात देण्यात आलेले होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल नऊ पातळ्यांमध्ये अडजस्ट करता येण्यासारखे असल्यामुळे चालकाला पूर्ण नियंत्रणाचा आत्मविश्वास मिळतो.

रॅपीड व्हील स्पिनवर नियंत्रण मिळावे यासाठी यात स्लिप रेट कंट्रोलही देण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक पॅकेजमध्ये आता स्टार्ट मोडही (अडजस्टेबल) देण्यात आले आहे. सीबीआर1000आरआर- आरमध्ये आता शोवाचे नवे तीन स्तरीय होंडा इलेक्ट्रॉनिक स्टिरयिंग डॅम्पर (एचईएसडी) देण्यात आले आहे, जे व्हील स्पीड सेन्सर्स आणि आयएमयूच्या इनपुटद्वारे नियंत्रित करता येते.

याच्या डॅम्पिंग व्हॉल्यूनुसार शोवा 43 एमएम बिग पिस्टन फोर्क (बीपीएफ) इन्व्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क अतिशय कार्यक्षमपणे कॉम्प्रेशन आणि एक्सटेन्शनअंतर्गत तयार झालेले हायड्रोलिक प्रेशर कमी करतो. रियर शॉक पूर्णपणे अडजस्टूल शोवा बॅलन्स फ्री रियर कुशन लाइट (बीएफआरसी- लाइट) आहे. रियर टायरचा आकार आता 200/55-ZR17 आहे.

बळकट चासिस

नव्या फायरब्लेडचे चासिस तंत्रज्ञान आरसी213व्ही- एसच्या ‘द स्ट्रीट लीगल मोटो मशिन’ प्रेरणा घेऊन बनवण्यात आले आहे. 1455 एमएमचा वाढीव व्हीलबेस आणि रेक व 

24°/102 एमएम (1405एमएम, 23°/96एमएम) स्थैर्य वाढवतो. समतोल आणि गुरुत्वाकर्षण बिंदू, क्रँकशाफ्टमध्ये करण्यात आलेले लक्षणीय बदल (3323°/96) वजनाचे समतोल वितरण करतात, तर उच्च गुरुत्वाकर्षण बिंदूमुळे पिचिंग कमी होते व साइड- टु साइड चपळाई वाढते.

गोलाकार, थिन- वॉल अल्युनमिनियम ट्युबिंगमुळे कमीत कमी सब- फ्रेम तयार होते. ते वरपासून फ्रेमपर्यंत (बाजूने होण्याऐवजी) उंच होते व त्यामुळे इंधनाची टाकी आणि आसनामागचा भाग अरूंद होतो. पर्यायाने रायडिंगसाठी चपखल आणि एयरोडायनॅमिकली कार्यक्षम जागा तयार होते. आसनाची इंची 830 एमएम असून हँडलबार  पोझिशन पुढेच्या बाजूने (लेव्हरेजसाठी) आणि फूट पेग मागील बाजूस उंचावर हलवण्यात आले आहे.

सुधारित ब्रेकिंग

गाडीमध्ये नवे निस्सिन फोर- पिस्टन रेडियल माउंट फ्रंट ब्रेक कॅलिपर्स अधिक रिजडीटी व कमी वजन, मोठे 330 एमएम डायामीटर डिस्कसह (+10एमएम) बसवण्यात आले आहेत. ट्रॅक वापरासाठी ब्रेकिंगची ताकद वाढली असून 5एमएम डिस्कची जाडी उष्णतेचेही कार्यक्षमपणे वितरण करते. रियर ब्रेक कॅलिपर हे आरसी213व्ही- एस मध्ये वापरण्यात आलेले समान ब्रेम्बो युनिट आहे.

फुल कलर टीएफटी मीटर

होंडाच्या आरसी213व्ही- एस स्ट्रीट लीगल प्रकारातून प्रेरणआ घेऊन बनवण्यात आलेल्या नव्या फायरब्लेडमध्ये मोठे आणि चांगल्या रिझोल्यूशनचे फुलकलर 5 इंची हाय रिझोल्यूशन टीएफटी इन्स्ट्रुमेंट स्क्रीन देण्यात आले आहेत. ते रायडरला स्क्रीन सेटिंग पर्यायांच्या मेनूमधून निवडण्याचा पर्याय देतात व त्यानुसार हव्या त्या फॉरमॅटमध्ये माहिती दाखवली जाते.

टायटॅनियम मफलर

सीबीआर1000 आरआर- आर फायरब्लेड मफलरचा विकास अक्रापोव्हिकसह एकत्रितपणे करण्यात आला आहे. हलक्या वजनासाठी ते टायटॅनियमपासून बनवण्यात आले आहे आणि याचे डिझाइनची बाइकच्या मास सेंट्रलायझेशनमध्ये योगदान देणारे आहे. एक्झॉस्टमधील खास व्हॉल्वह टॉर्कला लोअर रेव्हमध्येवेग देण्यासाठी आणि जास्त आरपीएमला हॉर्सपॉवर वाढवण्यासाठी मदत करतो.

एयरोडायनॅमिक विंगलेट्स

सीबीआर1000 आरआर- आर फायरब्लेडमध्ये बसवण्यात आलेले विंगलेट्स ट्रॅक वेगावर कार्यक्षमपणे डाउनफोर्सची निर्मिती करतात. डाउनफोर्स निर्मितीसाठी प्रत्येक डाव्या आणि उजव्या डक्टमध्ये तीन विंग्ज बसवण्यात आले आहेत.

स्मार्ट की

आता किल्लीशिवाय इग्निशन करता येते व हँडलबारचे लॉकही त्याचप्रमाणे उघडता येते. दैनंदिन वापरासाठी हे अतिशय सोयीचे असून त्यामुळे स्पर्धेसारख्या टॉप योकचा वापर होतो, तर रॅम एयर सिस्टीमसाठी जास्तीत जागा खुली होते.

ब्रेम्बो ब्रेक्स (फायरब्लेड एसपीमधे खास बसवण्यात आलेले)

सीबीआर1000 आरआर- आर फायरब्लेड एसपीमध्ये फ्रंट ब रेक डिस्क 330 एमएम इतक्या मोठ्या असल्यामुळे ब्रेकिंगची ताकद वाढते. बाइकमध्ये ब्रेम्बो स्टाइलेमा फ्रंट कॅलिपर्स आहेत, तर रियर कॅलिपर आरसी213व्ही- एसप्रमाणे आहेत. ब्रेम्बोद्वारे देण्यात आलेले ब्रेक मास्टर सिलेंडर्स आणि फ्रंट ब्रेक लिव्हर रायडर्सचा ब्रेम्बोची एकंदर ब्रेकिंग कामगिरी सुधारतात.

ऑहलिन्स नवे तंत्रज्ञान स्मार्ट ईसी सस्पेंशन (फायरब्लेड एसपीमधे खास बसवण्यात आलेले)

सीबीआर1000 आरआर – आर फायरब्लेड एसपीमध्ये इलेक्ट्रॉनिक पातळीवर नियंत्रित करता येणारे, ऑहलिन्सने उत्पादित केलेले एनपीएक्स फोर्क्स बसवण्यात आले आहेत. आधीच्या सीबीआर1000 आरआर एसपी मध्ये वापरण्यात आलेले एनआयएक्स फोर्कमधे प्रेशराइज्ड डॅम्पिंग यंत्रणा बसवून डॅम्परमधील कॅव्हिएटेशन कमीत कमी करून डॅम्पिंगची ताकद स्थिर करण्यात आली आहे, तर धक्का पचवण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे.

होंडाने आजपासून आपल्या प्रीमियम बिगविंग वितरकांकडे सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड आणि फायरब्लेड एसपी इंडियाचे बुकिंग सुरू केले आहे.

प्रकार2020  सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड2020  सीबीआर 1000 आरआर- र फायरब्लेड एसपी
रंगग्रँड प्रिक्स रेड मॅट पर्ल मोरियन ब्लॅक ग्रँड प्रिक्स रेड

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

पुण्यातील विधान भवन सभागृहात पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
  • जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींची उपस्थिती पुणे दि. 30 :- कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यु दर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
    पु
    ण्यातील विधान भवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्याुखतील मंत्री महोदय व लोकप्रतिनिधीकडून सूचना जाणून घेतल्या. बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व पिंपरी-चिंचवडच्याा महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सर्वश्री गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेवून लोकप्रतिनिधीच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोविड 19 चा संसर्ग जिल्ह्यात किती दिवसात वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाढता रुग्ण दर व मृत्यू दर कमी करणे हे आव्हान असून यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज आहे, असे सांगून कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.
    राज्यात व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून गरजेनुसार त्या-त्या भागात पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकांना कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्यात आली असून यापुढे ही मदत देण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स बनविण्याच्या सूचना दिल्या असून त्यानुसार टास्क फोर्स निर्माण होत आहेत. यामुळे कोरोना उपाययोजनामध्ये सुसुत्रता येईल.
    व्हेंटिलेटर, पी पी ई किट, एन 95 मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबर नंतरही केंद्राकडून करण्यात यावा, अशी विनंती प्रधानमंत्री महोदयांना केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींनी देखील आपआपल्या स्तरावर याबाबत विनंती करावी, जेणेकरुन राज्याला याचा लाभ होईल. कोरोना रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
    तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. असे होवू नये यासाठी खाजगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा, जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग यामध्ये एकसुत्रीपणा आणून सर्वांनी मिळून काम करावे, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
    पुण्यात वाढत्या रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टिने बेडची संख्या वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये महानगरपालिकेने पुढाकार घ्यायला हवा. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद महानगरपालिकांनीही बेडची संख्या वाढविण्यासाठी नियोजन करुन त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी राज्यशासन महापालिकांना आर्थिक मदत निश्चित देईल, असे ते म्हणाले.
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना करताना सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असून गाफील राहता कामा नये. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंग, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याबाबत महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांची गैरसोय होवू नये तसेच उपचारापासून रुग्ण वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविण्यासाठी विकेंद्रीकरण करावे.
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जम्बो रुग्णालयाचे काम गतीने करावे. संगणकीय प्रणालीमध्ये बेड व्यवस्थापन व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच याचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेने घ्यावा. झोपडपट्टी परिसरात छोटी घरे असल्यामुळे याठिकाणी गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक अलगीकरणांवर भर द्यावा. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होवू नये यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका तयार ठेवाव्यात.
    उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी दर आठवड्याला पुण्यात प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेवून आढावा घेत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आतापर्यंत पुण्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. भोर तालुक्यातील भूस्खलन होत असणाऱ्या गावांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन करण्याच्या दृष्टिने सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशा सूचना दिल्या.
    यावेळी खाजगी रुग्णायालयांच्या शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवावे,कोरोनाच्या रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा, व्हेटिंलेटरची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न करावेत. राज्य शासनाने महापालिकेला अर्थसहाय्य करावे. ससून रुग्णालयात तपासणी क्षमता वाढवावी अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्या. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरीतील शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या सुविधा मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांकडून आल्याचे सांगितले.
    विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या, कोरोनाच्या रुग्णांना औषधे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. डॅश बोर्डवरील माहिती गतीने उपलब्ध करुन द्यावी. सोसायट्यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली वागणूक द्यावी यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे,अशा सूचना केल्या.
    खासदार सर्वश्री गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, डॉ.अमोल कोल्हे यांच्यासह लोकप्रिनिधींनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली, तसेच सूचना केल्या. पुण्यासाठी व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, औषधसाठा उपलब्ध करुन द्यावा. खाजगी रुग्णालयांचे बेड उपलब्धतेची माहिती अद्ययावत ठेवावी, कोविड केअर सेंटर मधील भोजनाचा दर्जा चांगला ठेवावा. प्रतिबंधात्मक नियम पाळण्याबाबत जनजागृतीवर भर द्यावा. माहिती, शिक्षण आणि संवाद यावर भर द्यावा. कोरोना तपासणीसाठी फिरते तपासणी केंद्र सुरु व्हावे, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना उपस्थित लोकप्रतिनधिींनी केल्या.
    प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदि विषयी माहिती दिली.

आदित्य सरपोतदार करणार ‘झोंबिवली’ या मराठीतल्या पहिल्या झॉम-कॉम सिनेमाचं दिग्दर्शन

0

 ‘लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन’ म्हणण्यासाठी राज्य सरकारने मनोरंजनसृष्टीला ग्रीन सिग्नल दिला आहे… पण अर्थात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच चित्रीकरणाला परवानवगी मिळाली आहे. सेटवर निवडक लोकांची उपस्थिती, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करणे हे सेटवरील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.

सध्या जगात काय घडतंय, आपल्या आजूबाजूला कशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण सर्वजण पाहतोय आणि अशा परिस्थितीत एखाद्या नव्या गोष्टीची सुरुवात करणं हे जरा चॅलेंजिंगच आहे. परंतु एका नव्या को-या मराठी सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात करुन मराठी सिनेसृष्टीने हे चॅलेंज स्विकारलं आहे.

प्रेक्षकांचे आगळ्या-वेगळ्या पध्दतीने मनोरंजन करण्यासाठी मराठीतला पहिला झॉम-कॉम सिनेमा ‘झोंबिवली’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ऍक्शन, सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. आदित्य यांनी क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे आदी मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. सारेगम प्रस्तुत आणि Yoodlee Films निर्मित ‘झोंबिवली’ या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबई येथे पार पडला आणि या सिनेमातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूर येथे होणार आहे. या सिनेमाचे पहिले-वहिले पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

ब-याच कालावधीनंतर मराठी सिनेमात हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित सिनेमे पाहिले आहेत…पण मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित सिनेमा बनतोय. या सिनेमाचे शिर्षक इंटरेस्टिंग आहेत आणि डोंबिवलीमधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे सिनेमाचे नाव ‘झोंबिवली’ असे आहे. युथ स्टार्स अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांच्या मते ‘झोंबिवली’ हा सिनेमा तरुण पिढीला लक्षात ठेवून बनवला आहे. त्याच बरोबर हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण प्रेक्षकांना या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे.

Lawrence D’Cunha हे सिनेमाचे डिओपी आहेत तर साईनाथ गणुवाड, सिध्देश पुरकर, महेश अय्यर आणि योगेश जोशी हे लेखक आहेत. एव्ही प्रफुल्ल चंद्रा यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे.

सिनेमाचा नविन विषय, कलाकारांच्या नवीन जोड्या या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाणार हे नक्की. डोंबिवलीमध्ये घडणारी ही ‘झोंबिवली’ची कथा काय आहे याचे उत्तर पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये प्रेक्षकांना मिळेल.

चेअरमनसाहेब पैशापेक्षा जीव महत्वाचा-विरोधी पक्षनेत्यांचा सल्ला

पुणे- कोरोना च्या आक्रमणा मुळे पुण्यात जम्बो रुग्णालय उभारणीस अवघे 25 टक्के रक्कम महापालिका देणार असताना त्यास आडकाठी आणणाऱ्या स्थायी समिति अध्यक्ष रासने यांना, चेअरमनसाहेब, पैशापेक्षा जीव महत्वाचा, जान है ते जहाँ है…असा सल्ला विपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी दिला आहे.आणि जम्बो रुग्णालयाला एक पैसा ही न देण्याच्या भूमिके बद्दल रासने यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांचा निषेध केला आहे.

यासंदर्भात त्यांनी असे म्हटले आहे की, राजकारण करण्याची हि वेळ नाही, तुम्ही मानधन रक्कम निधि म्हणून देताना टी राज्या कड़े न देता पीएम फंडा स म्हणजे केन्द्राला दिली, महामारीच्या काळात असे राजकारण करणे हे कोत्या बुद्धीचे लक्षण आहे.आपल्या सारख्या गणेश भक्ताने कसे वागले पाहिजे हे आम्ही सांगावयास नको उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विष्णाणु प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुण्यातील रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ  होत असल्यामुळे जम्बो रुग्णालयाची उभारणी  करणेबाबत निर्णय झाला असुन पुणेकरांसाठी पुणे शहरात जम्बो रुग्णालय  उभारणी कामी २५ % निधी  पुणे महानगरपालिकेने द्यावा असे ठरले होते.
भाजप सत्ताधारी व पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यांनी या निर्णयास विरोध दर्शविला असुन या पुर्वी कोरोनासाठी पुणे महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे सांगितले आहे. वास्तविक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांनी जम्बो रुग्णालय उभारण्याचा निर्णय हा पुणेकरांसाठी घेतला असुन यासाठी पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीत कररुपी जमा केलेले नाममात्र पैसे खर्च करण्यास विरोध करणे म्हणजे भाजपचे सत्त्ताधारी यांना पुणेकरांविषयी कोणतेही गांभीर्य नाही असे दिसते. 75 टक्के रक्कम अन्यत्र ठिकानाहून येईल, पालिकेला केवळ 25 टक्के रक्कम वापरायचीआहेभाजपचे सत्त्ताधारी यांनी कोरोना विषयक नियोजन करताना गांभीर्य लक्षात न घेतल्याने निष्पाप पुणेकरांना आपला जीव गमवावा लागला हि वस्तुस्थिती आहे. पुणे महानगरपालिका स्तरावर आम्ही वेळोवेळी  कोरोनाविषयक उपाय योजनाबाबत लेखी पत्र व्यवहा र,  तोंडी सुचना देत असुन  याकडे देखील भाजप सत्ताधारी यांनी जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जाते. राजकारण करण्याची व श्रेय घेण्याची  हि वेळ नाही याचे भान भाजप सत्ताधारी यांना राहिलेले नाही. एका बाजुला पुणेकरांसाठी जम्बो रुग्णालय उभे करण्यास निधी नाही असे कारण द्यायचे व दुस-या बाजुला भाजप नगरसेवकांचे मानधन पी.एम केअर्स फंडा मध्ये जमा करायचे. खासदार निधी महापालिकेस द्यायचा नाही अशी दुटप्पी भुमिका भाजपचे सत्त्ताधारी घेत आहे.     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व .सभासदांनी ओक्सिजन बेडसाठी सव्वा दोन कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच सर्व सभासंदच्या सह यादीतुन दहा टक्के निधी कोरोना विषयक कामासाठी पुर्वीच दिलेला आहे. पुणे शहरावर जेव्हा जेव्हा संकट आले त्या त्या वेळी पुणे शहरातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येवुन  संकटाचा सामना केला. सद्यस्थितीत आमच्या माहितीप्रमाणे २००० ते २२०० कोंटीची मुदत ठेव पुणे महानगरपालिकेची असुनही पुणेकरांसाठी जम्बो रुग्णालय उभारणी कामी २५ % निधी  देताना विरोध दर्शविणे हे पुणे शहराच्या संस्कृतीस धरुन नाही.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सभासदांच्या वतीने आयुक्तांना विनंती आहे की, जम्बो रुग्णालय उभारणी कामी  घेतलेला निर्णयानुसार कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र महापालिका आधिनियमानुसार आणीबाणीचा  परिस्थितीत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार आयुक्त यांस असुन त्यानुसार आयुक्तांनी जम्बो रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तातडीने करावी. निर्णयाची अंमबजावणी  करण्यात यावी, असे आयुक्त यांना पत्र देण्यांत आले आहे असे ही  त्या म्हणाल्या.

31 ऑगस्टपर्यंत लॉक डाउन पण निर्बंध थोड़े शिथिल

0

मुंबई- केंद्र सरकारकडून कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम असणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आदेशात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यासोबत ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचं कठोरपणे पालन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.

नव्या आदेशात जुन्या गाइडलाइन्समध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. पण महत्त्वाचं म्हणजे मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्तराँ आपलं किचन सुरु ठेऊ शकतात.

सोबतच आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखंब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी नाही.

दरम्यान दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे.

अत्यावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधीही परवानगी होती ते सुरु राहतील तसंच अनावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधी सुरु ठेवण्याची परवानगी आहे ते सुरु राहतील. अत्यावश्यक तसंच अनावश्यक मार्केट, मार्केट परिसर आणि दुकानांना सकाळी ९ चे संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मद्य दुकानांना परवानगी असेल तर सुरु ठेऊ शकतात. अत्यावश्यक तसंच अनावश्यक गोष्टींसाठी ई-कॉमर्सला परवानगी असून सध्या सुरु असलेल्या सर्व इंडस्ट्रियल युनिट्सना काम सुरु ठेवण्याची परवानगी आहे.

राफेल आगमना बद्दल वायुसेनेचे अभिनंदन पण.. या 3 प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यावीत-राहुल गांधी

0

नवी दिल्ली -काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही राफेलच्या आगमनाबद्दल भारतीय वायूसेनेचं अभिनंदन केलंय.

मात्र, त्यासोबतच केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय वायू दलाचं अभिनंदन करत, मोदी सरकारला ३ प्रश्न विचारले आहेत. भारत सरकार या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल का, असे राहुल यांनी म्हटलंय.

526 कोटी रुपयांचं राफेल विमान 1670 कोटी रुपयांना का खरेदी केलं?
126 ऐवजी केवळ 36 राफेल विमानंच का खरेदी करण्यात येत आहेत?
HAL ऐवजी दिवाळखोर अनिल यांस 30 हजार कोटींचं कॉन्ट्रॅक्ट का देण्यात आलंय?

असे तीन प्रश्न राहुल गांधींनी विचारले आहेत. राफेल खरेदीवरुन यापूर्वीही काँग्रेसने मोदी सरकारला संसंदेत प्रश्न विचारले होते. तसेच, या खेरदीत मोठा घोटाळा असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता.

रुग्णालयासाठी पैसे देणार नसाल तर स्थायी समिती अध्यक्षांची खुर्ची खाली करा..!! -नितीन कदम

0

पुणे- कोरोना सारख्या महामारी च्या काळात रुग्ण सेवेत अपयशी ठरत असलेल्या भाजपच्या सत्तेत स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी जम्बो रुग्णालयाला पैसे देण्यास वाजविलेली नकार घंटा संतापजनक असून काम करता येत नसेल तर त्यांनी खुर्ची खाली करावी, लोकांच्या जीवाशी खेळण्या चा त्यांना अधिकार कोणी दिलेला नाही असही सणसणीत चपराक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नितिन कदम यांनी लगावली आहे.

यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्या मुळे बेड्स कमी पडत असलेल्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन जम्बो हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र शासन 50 टक्केबरोबर पुणे महानगरपालिकेने 25 टक्के निधी देण्याबाबत निर्णय झालेला आहे. हा 25% चा पुणे मनपाचा वाटा देण्यास स्थायी समिती अध्यक्ष श्री हेमंत रासने यांनी नकार दिलेला आहे.पुण्यात रोज एक हजार ते दीड हजार कोरोणा बाधित रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंतची संख्या ही पंचवीस हजाराच्या वर गेली आहेत. जवळजवळ दोन हजार पुणेकर मयत झाले आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना स्थायी समिती अध्यक्ष यांचे भूमिका अत्यंत चुकीची व संतापजनक आहे. लाखो पुणेकरांनी आपले कर्तव्य बजावत बाराशे ते पंधराशे कोटीचा मिळकत कर भरलेला आहे. त्यांचेच पैसे देण्यासाठी नकार देण्याचा स्थायी समिती अध्यक्षांना काय अधिकार आहे..! ते काय पुण्याचे सावकार आहेत का..? त्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (पर्वती) तीव्र निषेध करत आहे व त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे.

जम्बो रुग्णालयाला पैसे देण्यास स्थायी समिती अध्यक्षांचा नकार

0

पुणे-

: शहरात उभारण्यात येणाऱ्या नव्या जम्बो आयसोलेशन सेंटर (हॉस्पिटल) उभे करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने 25 टक्के खर्च करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र यासाठी महापालिका पैसे देणार नाही, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले आहे. त्यामुळे यावरून राज्य शासन आणि महापालिका वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोरोना निर्मूलन आढाव्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिोमवारी वभागीय आयुक्त कार्यालय बैठक झाली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा पुढाली काळातील वाढती संख्या लक्षांत घेऊन तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन व आयसीयू बेड्स उभे करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 300 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यात राज्य शासन 50, पुणे महापालिका 25, पिंपरी चिंचवड महापालिका 12.5, आणि पीएमआरडीए 12.5 टक्के निधीचा असा हिस्सा उचलणार आहेत.’

लॉक डाऊन आता नकोच : सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर देऊया :विजयसिंह डुबल

0

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ ‘ चे आवाहन

पुणे :लॉक डाऊन  हा कोरोना रोखण्याचा उपाय नसल्याचे सिध्द झाल्याने सरकारने आता पुन्हा लॉक डाऊन हा पर्याय विचारात घेऊ नये, सर्वांनी मिळून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर देऊया , असे आवाहन  फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ ‘ चे प्रदेशाध्यक्ष  विजयसिंह डुबल यांनी पत्रकाद्वारे केले आहे. ‘ पुण्यात   उद्योजक, व्यापारी आता लॉक डॉऊन सहन करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जयेंद्र टण्णा   आणि राष्ट्रीय सचिव व्ही.के .बंसल यांनी डुबल यांच्याशी , तसेच राज्यातील इतर व्यापारी संघटनांशी आज लॉक डाऊन विषयावर चर्चा झाल्यावर महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापाऱ्यांच्या परिस्थितीची माहिती विजयसिंह डुबल यांनी दिली.
 ‘सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये  व्यापारी उद्योजक आणि उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, धीर देणे आवश्यक आहे. आणि सुरक्षिततेच्या योजनांची जनजागृती करणे आवश्यक आहे, ‘ असे विजयसिंह डुबल हे यांनी म्हटले आहे.
 ‘कोरोना साथीच्या  काळात व्यापारी, उद्योजक आणि उद्योगांना सर्व पातळीवर अडचणींना तोंड द्यावे लागत असून या अडचणी सोडवणे, सरकार दरबार चे प्रश्न सोडवणे, मनोधैर्य उंचावणे,  हे काम प्राधान्याने करणे आवश्यक आहे., पुन्हा लॉक डाऊन हा पर्याय विचारात घेऊन व्यापारी, उद्योजकांना संकटात टाकू नये, असे विजयसिंह डुबल यांनी म्हटले आहे.

राज्यात आज आज ९२११ नवीन रुग्णांचे निदान- सध्या १ लाख ४६ हजार १२९ रुग्ण ॲक्टिव्ह

0

आज बरे झाले ७४७८ रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२९: राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण ५९.८४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील ७४७८ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३९ हजार ७५५ झाली आहे.आज ९२११ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४६  हजार १२९  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ९२११ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९८ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०९ (६०), ठाणे- २३१ (१३), ठाणे मनपा-२८८ (१३),नवी मुंबई मनपा-३८० (६), कल्याण डोंबिवली मनपा-३०९ (१५),उल्हासनगर मनपा-८१ (७), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (७), मीरा भाईंदर मनपा-१११ (३), पालघर-७९ (१), वसई-विरार मनपा-२१५ (७), रायगड-३४७ (५), पनवेल मनपा-१५० (२), नाशिक-९९ (३), नाशिक मनपा-४१० (२), मालेगाव मनपा-१८, अहमदनगर-१३३, अहमदनगर मनपा-१७४, धुळे-९० (२), धुळे मनपा-५६ (३), जळगाव-१५४ (१०), जळगाव मनपा-३७ (२), नंदूरबार-११ (३), पुणे- २९४ (१०), पुणे मनपा-१४५८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-८३९ (१०), सोलापूर-२०४ (११), सोलापूर मनपा-४८ (४), सातारा-१४१ (७), कोल्हापूर-११२ (३), कोल्हापूर मनपा-४४ (१), सांगली-२९, सांगली मिरज कुपवाड मनपा-११०, सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५४, औरंगाबाद-१२९ (५), औरंगाबाद मनपा-४०९ (१२), जालना-१७ (४), हिंगोली-१० (१), परभणी-९, परभणी मनपा-२३ (२), लातूर-५२ (२), लातूर मनपा-१७, उस्मानाबाद-५१ (१), बीड-३८ (२), नांदेड-८९ (१), नांदेड मनपा-४ (२), अकोला-८ (३), अकोला मनपा-३ (१), अमरावती-२४, अमरावती मनपा-८० (३), यवतमाळ-२३, बुलढाणा-४० (२), वाशिम-२१ (१), नागपूर-९३ , नागपूर मनपा-१५३ (५), वर्धा-१३, भंडारा-६, गोंदिया-६, चंद्रपूर-१४, चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-६, इतर राज्य ११ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ नमुन्यांपैकी ४ लाख ६५१ नमुने पॉझिटिव्ह (१९.८७ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ७७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६१ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                                

मुंबई: बाधित रुग्ण- (१,११,९९१) बरे झालेले रुग्ण- (८५,३२७), मृत्यू- (६२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,१२३)

ठाणे: बाधित रुग्ण- (९०,२८३), बरे झालेले रुग्ण- (५५,२५०), मृत्यू- (२४९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२,५३७)

पालघर: बाधित रुग्ण- (१४,९०४), बरे झालेले रुग्ण- (९०४९), मृत्यू- (३१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५३८)

रायगड: बाधित रुग्ण- (१५,७४५), बरे झालेले रुग्ण-(१०,५३२), मृत्यू- (३५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८५६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१६६६), बरे झालेले रुग्ण- (८९५), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३५६), बरे झालेले रुग्ण- (२६९), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

पुणे: बाधित रुग्ण- (८२,९१६), बरे झालेले रुग्ण- (३२,०७६), मृत्यू- (१९४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,८९५)

सातारा:  बाधित रुग्ण- (३४९६), बरे झालेले रुग्ण- (१९३०), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४३७)

सांगली: बाधित रुग्ण- (१८४०), बरे झालेले रुग्ण- (८२५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४१७६), बरे झालेले रुग्ण- (१२८८), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८५४९), बरे झालेले रुग्ण- (४०५४), मृत्यू- (४८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००८)

नाशिक: बाधित रुग्ण- (१३,७९२), बरे झालेले रुग्ण- (७९०७), मृत्यू- (४४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४३८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३९५३), बरे झालेले रुग्ण- (२१४१), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५९)

जळगाव: बाधित रुग्ण- (१०,०६३), बरे झालेले रुग्ण- (६८५६), मृत्यू- (५०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७००)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५७३), बरे झालेले रुग्ण- (३६४), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)

धुळे: बाधित रुग्ण- (२७८८), बरे झालेले रुग्ण- (१७३१), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३,३१४), बरे झालेले रुग्ण- (७५२१), मृत्यू- (४७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२१)

जालना: बाधित रुग्ण- (१८६३), बरे झालेले रुग्ण- (१४१८), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७२)

बीड: बाधित रुग्ण- (६५६), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४०३)

लातूर: बाधित रुग्ण- (१८०८), बरे झालेले रुग्ण- (९००), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२६)

परभणी: बाधित रुग्ण- (५२०), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५३७), बरे झालेले रुग्ण- (३८१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१४६१), बरे झालेले रुग्ण (६४९), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (७५९), बरे झालेले रुग्ण- (४८६), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (१८३४), बरे झालेले रुग्ण- (१२९२), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८४)

अकोला: बाधित रुग्ण- (२४६९), बरे झालेले रुग्ण- (१८९४), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६०)

वाशिम: बाधित रुग्ण- (५५७), बरे झालेले रुग्ण- (३२५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (११५६), बरे झालेले रुग्ण- (६४०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (८२७), बरे झालेले रुग्ण- (४६०), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४०)

नागपूर: बाधित रुग्ण- (४१५२), बरे झालेले रुग्ण- (१८९८), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१८५)

वर्धा: बाधित रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (८४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)

भंडारा: बाधित रुग्ण- (२१७), बरे झालेले रुग्ण- (१८८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२५९), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३९०), बरे झालेले रुग्ण- (२४०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२५०), बरे झालेले रुग्ण- (२१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३६३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१५)

एकूण: बाधित रुग्ण-(४,००,६५१) बरे झालेले रुग्ण-(२,३९,७५५),मृत्यू- (१४,४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४६,१२९)

 (टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

कोरोनाच्या लढाईत मदतकार्य मोलाचे – महापौर मुरलीधर मोहोळ

0

पुणे-कोरोनाच्या लढाईत सामान्य नागरिकां कडून केल्या जाणाऱ्या मदतीचा आधार वाटतो आणि लढण्यासाठी उर्जा मिळते असे भावूक उद्गार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.सद्यस्थितीत केली जाणारी मदत अत्यंत मौल्यवान असून त्यातूनच माणुसकीचे दर्शन घडते असेही ते म्हणाले.
प्रभाग १३ मधील महाराष्ट्र पी डब्ल्यु डी ए को.ऑ.हौसिंग सोसायटी ( भरतकुंज सोसायटी ) च्या वतीने नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या माध्यमातून रुग्ण तपासणीसाठी पुणे मनपा स ७५ पल्स ऑक्सीमीटर ची भेट देण्यात आली त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ भावनिक झाले व यासंकट काळात पुणेकर विविध माध्यमातून करत असलेल्या मदतीचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
आम्ही सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून ही मदत करत असून सद्यस्थितीत प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे व कोरोना योद्धांवरील भार कमी करावा या हेतूने सदर मदत करत असल्याचे भरतकुंज सोसायटीचे अध्यक्ष ॲड.एम एस रानडे म्हणाले.
प्राप्त परिस्थितीत सर्वाधिक मदतीची गरज ही वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या घटकास आहे व त्यातही अत्यवस्थ रुग्णांची ऑक्सीजन लेव्हल ची चाचणी महत्त्वाची असल्याने आम्ही मनपा स पल्स ऑक्सीमीटर भेट देण्याचा निर्णय घेतला असे डॉ.संजीव खुर्द यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,
भरतकुंज सोसायटीचे सचिव दिलीप थत्ते ,कोषाध्यक्ष दिलीप भट इ उपस्थित होते.