Home Blog Page 2496

पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहा

0

‘महाराष्ट्र सायबर’चे पालकांना आवाहन

मुंबई दि.१ :- पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे  करण्यात येत आहे.

सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे. यामध्ये सायबर भामटे आधी सोशल प्रोफायलिंग (social profiling) करून  शक्यतो अशा जोडप्यांना लक्ष करतात जिथे आई, वडील दोघेही नोकरी करतात आणि त्यांचे पाल्य एकटे असते किंवा त्याच्याकडेपण  मोबाईल असतात.

सायबर भामटे विविध सोशल मिडियाद्वारे अशा पाल्यांशी मैत्री करतात आणि त्यांचे फोटो , पालकांची माहिती  काढून घेतात . त्यानंतर पाल्यास काही काळाकरिता आपला मोबाईल बंद करायला सांगतात, त्याच सुमारास सदर पालकांस  खोटे व्हिडीओ बनवून किंवा फेक फोटो  बनवून आपल्या पाल्याचे अपहरण झाले आहे अशा आशयाचा फोन करतात किंवा मेसेज पाठवतात . या मेसेजमध्ये पाल्यास सोडविण्यासाठी काही ठराविक खंडणी मागितली जाते व पालक घाबरून ती खंडणी भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात  जमादेखील करतात . इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात अपहरण झाले नसले तरी पालकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फसविले जाते.  अपहरणाचा आभास निर्माण केला जातो ज्यामुळे घाबरून पालक खंडणी देतात. यामध्ये खंडणी कमी वेळात नमूद बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले असते .पालक घाबरून जाऊन पाल्याच्या सुरक्षिततेच्या भीतीने व काळजीपोटी सारासार विचार न करता खंडणी भरून मोकळे होतात.

वरील नमूद प्रकार हे परदेशात जास्त होत असले तरी , आपण इथे सतर्क राहणे जरुरीचे आहे. तुम्ही तुमच्या पाल्याकडे शक्यतो एकदम साधा फोन द्या ज्यामुळे आपले पाल्य आपल्या नकळत जास्त सोशल मीडियावर वावरणार नाही व सायबर भामट्यांचा संपर्कात येण्याची शक्यता कमी होईल. पालकांनीसुद्धा सोशल मीडियावर वावरताना आपली काय माहिती सोशल मीडियावर प्रसारित करायची याचे तारतम्य बाळगले पाहिजे.अशा प्रकारचा अनोळखी मेसेज आला तर शक्यतो त्या अपहरणकर्त्याचा फोनवर संपर्क होतो आहे का याची खात्री करा. अशा प्रकारचे मेसेज आल्यावर आपले पाल्य कुठे आहे किंवा असू शकेल याचा आधी शोध घ्या. आपल्या पाल्याशी सतत संपर्कात राहा  .

अशा प्रकारचे मेसेज आल्यावर घाबरून न जाता त्याची तक्रार नजीकच्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये नोंदवा. असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत करण्यात आले आहे.

मुंबईत लवकरच अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक उभारणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. 1 : अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने त्यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक सर्वांच्या सहकार्याने मुंबईत लवकरच उभारले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरेशियन स्टडीज व रशियन विभागातर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, शताब्दीनंतरही अण्णा भाऊंची आठवण जिवंतपणा देते. त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर भाषा सातासमुद्रापार पोहोचविली. त्यांचे साहित्य अजूनही लोकप्रिय आणि अलौकिक आहे. परखड मत मांडणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही मोठे योगदान होते. त्यांनी आपले पोवाडे आणि गीतांच्या माध्यमातून जनमाणसांना त्यांच्यातील हिमतीची आणि कर्तव्याबाबतची जागृती करून दिली. कामानिमित्त मुंबईत आलेल्यांना मुंबई माझी असल्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण करून लौकिक कमावला.

हे वर्ष लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे तर लोकशाहीर म्हणून लौकिक मिळविलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे शताब्दी वर्ष आहे. एक तेज लोप पावले तर दुसरे उगवले हा विलक्षण योगायोग असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दोघांच्याही कार्याचा गौरव केला.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, रशियन स्टेट युनिव्हर्सिटीमधील अभ्यासक, मुंबई विद्यापीठातील मान्यवर, रशियन विभाग आणि विद्यापीठाच्या मध्य युरेशिया अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. संजय देशपांडे आदी उपस्थित होते.

लोकप्रिय गायक दिवंगत पद्मश्री मोहम्मद रफी यांचा मरणोत्तर भारतरत्न ‘किताबाने गौरव व्हावा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

0

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत अजरामर गाणी गायोलेले लोकप्रिय महान गायक दिवंगत पद्मश्री मोहम्मद रफी यांचा मरणोत्तर भारतरत्न किताबाने गौरव करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रामदास आठवले यांनी पाठविले आहे.

लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांना भारतरत्न ‘किताब मिळण्यासाठी ची शिफारस महाराष्ट्र्र सरकार ने केंद्र सरकारकडे करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपण पत्र पाठवून दिवंगत पद्मश्री मोहम्मद रफी यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे ना रामदास आठवले यांनी सांगितले.

दिवंगत पद्मश्री मोहम्मद रफी यांनी अजरामर गीते गाऊन जनमानसाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक म्हणून मोहम्मद रफी यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचा नुकताच 31 जुलै रोजी 40 वा स्मृतिदिन संपन्न झाला. त्यानिमित्त रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि कपिल कला केंद्र चे कपिल खरवार यांनी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन दिवंगत पार्श्वगायक पद्मश्री मोहम्मद रफी यांना भारतरत्न ‘किताब द्यावा या मागणी चे निवेदन दिले. यावेळी दिवंगत पद्मश्री मोहम्मद रफी यांना भारतरत्न देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.

मास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची समिती तीन दिवसात अहवाल सादर करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. १ : मास्क आणि सॅनिटायजरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीला तीन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री श्री. टोपे  व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार काल दि. ३१ जुलै रोजी आरोग्य विभागाने शासन निर्णयाद्वारे समिती गठित केली. राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे समितीचे अध्यक्ष असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य औषध नियंत्रण प्राधिकारी सहआयुक्त हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. कोरोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हेच औषध असल्याने आणि नागरिकांनाही वेळोवेळी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन केले जात असल्याने या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे. या दोन्ही बाबी नियंत्रित दराने मिळण्यासाठी त्यांच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समितीने उपाययोजना करताना मास्क आणि सॅनिटायजरच्या कमाल दर मर्यादा ठरवायच्या आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सदर समितीला तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दोन्ही वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आल्यास सामान्यांना दिलासा मिळेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

तळेगावमध्ये २५० एकरवर अद्ययावत इलेक्ट्रॉनिक पार्क

0

कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची मर्यादा १० लाखांवरुन १४ लाख – एमआयडीसीच्या  वर्धापनदिनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा

मुंबई, दि. 1 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) 58 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची (उपदान) मर्यादा दहा लाखांहून 14 लाख करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे 250 एकरावर स्वयंपूर्ण असे इलेक्ट्रॉनिक पार्क सुरू केले जाणार आहे अशा दोन महत्त्वाच्या घोषणा महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केल्या.

श्री. देसाई म्हणाले, राज्याच्या प्रगतीत महामंडळाचा खारीचा वाटा राहिला आहे. जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त संघटनेत एमआयडीसीचा अभिमानाने उल्लेख केला जातो. त्यामुळे येत्या काळात एमआयडीसीला जागतिक दर्जाचे महामंडळ बनवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याशिवाय एमआयडीसीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी ग्रॅज्युएटीची मर्यादा दहा लाखांवरून 14 लाख करण्यात येईल. येत्या काळात महामंडळ इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठे काम करणार आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे स्वतंत्र, आदर्शवत असे इलेक्ट्रॉनिक पार्क उभे केले जाणार आहे. या निमित्ताने देश-विदेशातील गुंतवणूक राज्यात येईल. याशिवाय रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये आदर्शवत फार्मा पार्क सुरू केले जाईल.

कोरोना संकटात एमआयडीसीने उल्लेखनीय काम केले. गरजुंना अन्नधान्य वाटप केले. औरंगाबादमध्ये कोविड रुग्णालय सुरू केले. मराठवाड्यातील पहिली व्हायरालॉजी लॅब सुरू केली. याचे सर्व श्रेय महामंडळाला जाते, असे उद्योगमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन म्हणाले की, कोरोनाकाळात सर्व क्षेत्रे ठप्प असताना केवळ उद्योग विभाग सतत काम करत होता. राज्याच्या प्रत्येक तालुक्यात महामंडळाचे अस्तित्व आहे. लघु उद्योगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. 25 हजार कोटींचे सामजंस्य करार केले. महापरवाना, महाजॉब्ज, सीएम रिलिफ फंडला 160 कोटी रुपये मिळून दिले. साडेसातशे टन धान्य कोरोनाग्रस्त भागात दिले.

एमआयडीसीच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात उद्योग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव वी. वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन, अभिषेक कृष्णा, एमआयडीसी कर्मचारी संघटनेचे हेमंत संखे, विलास संखे, सुधाकर वाघ, डी. बी. माली, पी. डी. मलिकनेर यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण यावेळी सहभागी झाले होते.

आज पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 38 हजार 661

0

पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 5 हजार 973 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

   पुणे,:- पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 973 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 661 आहे. कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 844 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68  टक्के आहे. तसेच  1 हजार 83 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.83 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील 84 हजार 765 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 54 हजार 128 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 656 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार 122, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 983, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 78, पुणे कॅन्टोंन्मेंट 137, खडकी विभागातील 30, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 306 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 981 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 337, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 361, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 62, पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 41, ग्रामीण क्षेत्रातील 149 रुग्णांचा समावेश आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे. उर्वरित 808 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.86 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 3 हजार 849 रुग्ण असून 2 हजार 36 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 683 आहे. कोरोनाबाधित एकूण 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील 8 हजार 637 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 956 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 189 आहे. कोरोना बाधित एकूण 492 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 2 हजार 452 रुग्ण असून 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 769 आहे. कोरोना बाधित एकूण 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील 6 हजार 270 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 736 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 364 आहे. कोरोना बाधित एकूण 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 34 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 94, सातारा जिल्ह्यात 188, सोलापूर जिल्ह्यात 250, सांगली जिल्ह्यात 283 तर कोल्हापूर जिल्ह्यात 219 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 15 हजार 20 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 5 हजार 973 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.
( टिप :- दि. 31 जुलै 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


‘मिशन बिगीन अगेन’ बाबत अधिसूचना जाहीर -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे, : कोविड- 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊन ची घोषणा यापूर्वी केलेली असून, त्यास 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी “मिशन बिगीन अगेन” (MISSION BEGIN AGAIN) बाबत अधिसूचना जाहीर केली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश जारी केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले आहे. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2020पर्यंत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेली मार्गदर्शक तत्वे व अधिसूचनेतील परिशिष्ठ 1,2, व 3 मध्ये नमूद केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शासन अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.
शासन अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात खालील प्रमाणे लागू करण्यात आली आहे. हे आदेश दि.2 ऑगस्ट 2020 ते दि.31 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू राहतील आणि सर्व संबंधित प्रशासकिय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशीत केले आहे.
शासन अधिसूचना सुधारणा पुढीलप्रमाणे – पुणे महानगरपालिका क्षेत्र :- पुणे महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील, पुणे व खडकी छावणी परिषद :- पुणे व खडकी छावणी परिषद क्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पुणे यांच्या आदेशातील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे व खडकी छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील, देहूरोड छावणी परिषद :- देहूरोड छावणी परिषद क्षेत्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पिंपरी-चिंचवड यांच्या आदेशातील व मुख्य कार्यकारी अधिकारी, देहुरोड छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.
वरील प्रमाणे क्षेत्र वगळता जिल्हयाचे उर्वरित सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्याकडील अधिसूचनेत परवानगी देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना अधिसूचनेतील अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी राहील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय साथ अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता चे कलम 188 आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशीत केले आहे.
००००

महामारीची खरी जबाबदारी राज्य सरकारची :तरीही पालिका आघाडीवर -महापौर 

0

पुणे- खरे तर महामारीची खरी जबाबदारी राज्य सरकारची आहे तरीही महापालिकेने पाऊल मागे घेतलेले नाही आतापर्यंत ३०० कोटी रुपये खर्च केले , आणि तरीही कोण म्हणतो ,आम्ही जम्बो रुग्णालयाला ७५ कोटी देणार नाही ? पुणेकरांच्या हितासाठी कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी  आम्ही ७५ कोटी देणारच आहोत असे स्पष्टीकरण देत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी १००० मृत्यू लपविल्याच्या त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या वक्तव्याबद्दल हि स्पष्टीकरण ‘माय मराठी’ कडे दिले .पहा आणि ऐका नेमके महापौर मुरलीधर मोहोळ नेमके काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका व पहा ….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा ‘त्याग, समर्पणाच्या शिकवणीचा वसा घेऊ या’

0

मुंबई,  : ‘त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (१ ऑगस्ट रोजी) साजरा होणाऱ्या बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, मुस्लिम बांधवांचा हा पवित्र बकरी ईद  सण त्यागाचा संदेश देतो. त्याग आणि समर्पणातून मानव कल्याणाचा विचार सांगतो. याशिवाय सण साजरा करताना गोरगरीबांचाही विचार करण्यास सांगतो. मानवतेच्या विकासाच्या दृष्टीने दिलेल्या या संदेशाचा वसा घेऊन आपण समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे हा सण आरोग्याची काळजी घेऊन आणि नियमांचे पालन करून शांततेत साजरा करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, : – सर्वसामान्य गरीब माणसाचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई महानगर वगळता उर्वरित एमएमआर क्षेत्रासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी स्ट्रेस फंड उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या स्ट्रेस फंडच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामासाठी बँकांकडून विकासकाला कर्ज उपलब्ध होईल व योजना गतीने पूर्ण होईल. तब्बल पाच वर्षानंतर आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची ही बैठक झाली.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कायद्यामध्ये जे काही बदल करणे गरजेचे आहे ते लवकरात लवकर केले जातील. तसेच स्ट्रेस फंड उभारण्याबाबत आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणला जाईल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महानगर वगळता उर्वरित मुंबई महानगर क्षेत्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण उभारण्यात यावे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवताना विकासकाला सवलती जरूर दिल्या पाहिजेत परंतु त्यांनी कालमर्यादेत काम करण्याचे बंधनही त्यांच्यावर घातले पाहिजे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी सांगितले.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. श्रीनिवास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

राम मंदिर भूमिपूजनासाठी पुण्यातून एक किलो चांदीची शिला

0

पुणे, : अयोध्येत दिनांक ५ ऑगस्ट रोजी होणार्या ऐतिहासिक राममंदिर भूमिपूजनासाठी पुणे शहर भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते नवीन सिंग यांच्या माध्यमातून चांदीची एक किलो वजनाची शिला आज अयोध्येकडे रवाना करण्यात आली.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या शिलेचे विधिवत पूजन करण्यात आले. संतोष खांदवे, नवीन सिंग, बापू खरात, मिलिंद गायकवाड, मोहनराव शिंदे सरकार, बाळासाहेब थोरवे, प्रेम राय, विनीत वाजपेयी, नितीन खरात, मुकेश जाधव, अतुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, ‘अयोध्येत श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारावे ही प्रत्येक भारतीयांची मनोकामना आहे. यासाठी प्रत्येकाला आपले योगदान द्यायचे आहे. त्याच भावनेतून माजी सैनिक दरोगा सिंग यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने एक किलो चांदीची शिला अर्पण केली आहे. आज तिचे पूजन करून अयोध्येकडे रवाना करताना विशेष आनंद होत आहे.’

मुळीक पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होत आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. पुणेकरांनी हा क्षण एक उत्सव म्हणून साजरा करावा. सर्वांनी आपल्या दारात गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करावा. हा आनंद साजरा करीत असताना शारिरीक अंतर ठेवण्याचा नियम कटाक्षाने पाळावा.’

‘मंदीर वही बनाएंगे’

‘मंदीर वही बनाएंगे, मगर तारीख नही बताएंगे,’ या शब्दात भारतीय जनता पार्टीची खिल्ली उडवणाऱ्यांची या निमित्ताने बोलती बंद झाली असल्याचा टोला भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या निमित्ताने लगावला. मुळीक म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने कधीच धर्माचे किंवा भावनिक राजकारण केले नाही. न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास ठेऊन भाजपा मंदिराच्या बांधकामासाठी कटीबद्ध होता. त्यामुळे विलंब झाला. आता प्रत्यक्षात मंदिर बांधण्याचा दिवस जवळ आल्याने भाजपावर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत. मंदिराच्या बांधकामाला स्वच्छ मनाने पाठींबा देत येत नसेल तर हरकत नाही परंतु, अकारण विरोध करुन भारतीय समाजाच्या भावना दुखावण्याचे काम कोणी करु नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत ५४ हजार ७०७ प्रवाशांचे आगमन

0

मुंबई, : वंदेभारत अभियानांतर्गत 400 विमानांनी आतापर्यंत मुंबईत ५४ हजार ७०७ प्रवासी आले असून यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १८ हजार २६४ आहे. आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये उर्वरित महाराष्ट्रातील १८ हजार ७९८ प्रवासी असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या १७ हजार ६४५ इतकी आहे.३१ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आणखी ४८ विमानांनी प्रवाशी मुंबईत येणे अपेक्षित आहे

कोरोना विषाणुविरुद्ध शासन निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्‍ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.

या देशातून आले प्रवासी

ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनिशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया,स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग,  कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया,मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी,दुबई,मालावी,वेस्ट इंडिज,नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयॉर्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम  जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक  परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण,  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि.   यांच्या समन्वयाने केले जात आहे.

वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

सर्वसामान्‍य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केले- विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

0

पुणे :- आपण सर्वसामान्‍य माणूस ‘केंद्रबिंदू’ मानून काम केल्‍याची भावना मावळते विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्‍यक्‍त केली. लोकाभिमुख व सतत सकारात्मक भूमिका ठेवणारे अधिकारी अशी ओळख असणारे डॉ. म्हैसेकर आज (31 जुलै ) नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल मध्ये पार पडलेल्या निरोप समारंभात त्‍यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्‍या पत्‍नी रोहिणी आणि मुलगा अथर्व उपस्थित होते. त्याचबरोबर नूतन विभागीय आयुक्त सौरभ राव, अपर विभागीय आयुक्त राजेंद्र भोसले, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भागवत, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्‍त शांतनू गोयल, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून आपले कर्तव्य पार पाडतांना परिस्थितीची जाणीव ठेवावी लागते. समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेवून काम केल्यास कामाचा आनंद मिळतो. सामान्य नागरिकांचा प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड विश्वास असतो. या विश्वासाला तडा न जावू देता काम करणे गरजेचे असते. सामान्य माणसाला योग्य प्रकारे न्याय मिळेपर्यंत परिस्थिती हाताळली पाहिजे. आपण सर्वजण महत्त्वाच्या पदावर काम करतांना शासन व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत असतो. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून, सहकाऱ्यांना सोबत घेत काम करणे फार महत्त्वाचे असते. एखाद्या प्रकरणाचा निकाल देतांना सर्व बाजूंनी विचार करुन वस्तूनिष्ठ निकाल देण्याचा प्रयत्न असला पाहिजे. प्रत्येक संकट आपल्यासाठी संधी असते. या संकटावर मात करण्यासाठी नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून शांतपणे विचार करुन निर्णय घेणे अपेक्षित असते. या काळात सर्वांचे सहकार्य लाभले, याबद्दल सर्वांचा आभारी आहे, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले.

परभणी येथे जिल्‍हा परिषदेत उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून काम करत असतांना एका शेतकऱ्याने दुपारी 4 च्‍या दरम्‍यान नाव लिहून भेटण्‍यासाठी चिठ्ठी पाठवली. कामाच्‍या व्‍यापात त्‍याला सायंकाळी 6 वाजता चेंबरमध्‍ये बोलावले. पण तो निघून गेला होता. त्‍यानंतर तीन-चार दिवसांनी तो आल्‍यानंतर त्‍याला म्‍हणालो, ‘एवढी काय घाई होती, थांबायला काय झालं होतं?’,त्‍यावर तो शेतकरी नम्रपणे म्‍हणाला, ‘साहेब, मला गावाला परत जायला संध्‍याकाळी 6 ला शेवटची बस होती. मी जर थांबलो असतो, तर मला मुक्‍काम करावा लागला असता आणि माझी इथं काहीही सोय नाही’ या प्रसंगानंतर मी सामान्‍य माणसाला कधीही वाट पहायला लावली नाही, अशी आठवण डॉ. म्‍हैसेकर यांनी सांगितली.

नूतन विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यात अनेक नामवंत अधिकारी होऊन गेले आहेत. त्यांची प्रशासकीय कार्यप्रणाली आमच्यासारख्या अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. या प्रशासकीय कार्यप्रणाली व संस्कृतीमुळे महाराष्ट्राचे नाव देशभरात नेहमी चर्चेत असते. डॉ. म्हैसेकर यांच्यासोबत काम करतांना त्यांच्या कार्यपद्धतीचा, बारकाईने अभ्यास करण्याच्‍या गुणाचा फायदा होणार आहे. कोविड परिस्थितीवर मात करण्यास आम्हा सर्वांसाठी त्यांचा अनुभव मार्गदर्शक ठरणार आहे. श्री. राव यांनी रामायणातील ‘धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परिखिअहिं चारी’ या उक्‍तीचा संदर्भ दिला. संकटकाळात धैर्य, धर्म, मित्र यांची खरी ओळख होते. कोरोनाच्‍या संकटकाळात काम करतांना सर्वांच्‍या मदतीने यश मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्‍त केला. या पुढील कालावधीत कोविड प्रादुर्भाव रोखणे हे आमच्यासमोरील प्रमुख आव्‍हान आहे, या करिता आपणाला ‘मिशन मोड’वर काम करुन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे,असे सांगून डॉ.म्हैसेकर यांचे पुढील आयुष्य सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व उत्तम आरोग्यदायी जावो, अशा शुभेच्छाही श्री. राव यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी नवल किशार राम म्हणाले, डॉ. म्‍हैसेकर यांच्या सोबत काम करतांना त्यांचा अनुभव आमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली, त्याचे श्रेय डॉ. म्हैसेकर यांच्‍या नेतृत्‍वाला जाते. त्यांच्या अंगी असलेली उत्तम सांघिक कार्य करण्याची क्षमता, नेतृत्वगुण, शांत आणि कार्यतत्पर वृत्ती आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. कोवीड-19 च्या अनुषंगाने त्‍यांनी नियोजनपूर्वक रणनिती आखली होती. त्‍याचा आम्‍हाला कोरोनाचे संकट कमी करण्‍यात मदत झाली.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माध्यमांच्यावतीने जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या सह विविध अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांनी केले.

राज्यात १ लाख ५० हजार ६६२ ॲक्टिव्ह रुग्ण

0

२१ लाखांहून अधिक झाल्या कोरोना चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, : राज्यात कोरोनाचे आज ७५४३ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार १५८ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.६८ टक्के आहे. आज १०,३२० नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले १०,३२० नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६५ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०८५ (५३), ठाणे- २३४ (१२), ठाणे मनपा-३१९ (१३),नवी मुंबई मनपा-४१२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३७६ (१३),उल्हासनगर मनपा-५० (९), भिवंडी निजामपूर मनपा-२७ (१) , मीरा भाईंदर मनपा-१४०(४),पालघर-१४१ (४), वसई-विरार मनपा-२०० (१), रायगड-२२७ (७), पनवेल मनपा-१५०(३), नाशिक-१३१, नाशिक मनपा-३१३ (५), मालेगाव मनपा-११ (१), अहमदनगर-१६४ (१),अहमदनगर मनपा-१५९, धुळे-९८ (१), धुळे मनपा-१०८, जळगाव-२५४ (३), जळगाव मनपा-१३४, नंदूरबार-४१, पुणे- ४५२ (१६), पुणे मनपा-१६३५ (३०), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (२५), सोलापूर-१६१ (६), सोलापूर मनपा-९५ (२), सातारा-१६८, कोल्हापूर-३४२ (६), कोल्हापूर मनपा-१४७ (४), सांगली-७३ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१८० (३), सिंधुदूर्ग-१०, रत्नागिरी-९ (१), औरंगाबाद-९८ (२), औरंगाबाद मनपा-६६ (२), जालना-२७ (१), हिंगोली-३, परभणी-४१ , परभणी मनपा-१४ (२), लातूर-६६ (१), लातूर मनपा-६२ (२), उस्मानाबाद-११३ (२), बीड-४० (१), नांदेड-७४ (५), नांदेड मनपा-९ (२), अकोला-३५, अकोला मनपा-२३ (१), अमरावती-८, अमरावती मनपा-४२ (१), यवतमाळ-८८, बुलढाणा-१०२ (६), वाशिम-२५, नागपूर-२१२ (१) , नागपूर मनपा-१२९ (२), वर्धा-१३, भंडारा-४, गोंदिया-१७, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-५, इतर राज्य २१.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २१ लाख ३० हजार ९८ नमुन्यांपैकी ४ लाख २२ हजार ११८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८१ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९९ हजार ५५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ५३५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                          

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१४,२८४) बरे झालेले रुग्ण- (८७,०७४), मृत्यू- (६३५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,५६३)

ठाणे: बाधित रुग्ण- (९३,३४२), बरे झालेले रुग्ण- (५८,८३६), मृत्यू (२५८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,९२०)

पालघर: बाधित रुग्ण- (१५,६१९), बरे झालेले रुग्ण- (९३२३), मृत्यू- (३२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९६९)

रायगड: बाधित रुग्ण- (१६,५३८), बरे झालेले रुग्ण-(१०,८५८), मृत्यू- (३७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३०५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१७००), बरे झालेले रुग्ण- (९२६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०)

पुणे: बाधित रुग्ण- (८९,२३१), बरे झालेले रुग्ण- (३७,३११), मृत्यू- (२०९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९,८२१)

सातारा:  बाधित रुग्ण- (३८७२), बरे झालेले रुग्ण- (२१६९), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६४)

सांगली: बाधित रुग्ण- (२३४५), बरे झालेले रुग्ण- (९४०), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५०६०), बरे झालेले रुग्ण- (१५९०), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३६५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (९१२९), बरे झालेले रुग्ण- (४६१५), मृत्यू- (५०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००९)

नाशिक: बाधित रुग्ण- (१४,७५०), बरे झालेले रुग्ण- (८९३१), मृत्यू- (४६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४७४०), बरे झालेले रुग्ण- (२७६०), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९९९)

जळगाव: बाधित रुग्ण- (१०,८२६), बरे झालेले रुग्ण- (७३८५), मृत्यू- (५१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९२३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६२९), बरे झालेले रुग्ण- (४१४), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८४)

धुळे: बाधित रुग्ण- (३०६१), बरे झालेले रुग्ण- (१९४३), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३,८९६), बरे झालेले रुग्ण- (८२५०), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१६४)

जालना: बाधित रुग्ण- (१९४०), बरे झालेले रुग्ण- (१४३४), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३२)

बीड: बाधित रुग्ण- (७५७), बरे झालेले रुग्ण- (२६९), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४६८)

लातूर: बाधित रुग्ण- (२०६७), बरे झालेले रुग्ण- (१०२०), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५८)

परभणी: बाधित रुग्ण- (६४३), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५५०), बरे झालेले रुग्ण- (४२५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६९५), बरे झालेले रुग्ण (७४६), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७४)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९७१), बरे झालेले रुग्ण- (५१८), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८)

अमरावती: बाधित रुग्ण- (२०३४), बरे झालेले रुग्ण- (१३७०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०४)

अकोला: बाधित रुग्ण- (२५९३), बरे झालेले रुग्ण- (१९५१), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२६)

वाशिम: बाधित रुग्ण- (५९१), बरे झालेले रुग्ण- (३६१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१२८३), बरे झालेले रुग्ण- (६८५), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (९४३), बरे झालेले रुग्ण- (५०८), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८)

नागपूर: बाधित रुग्ण- (४८३५), बरे झालेले रुग्ण- (१९३०), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३१)

वर्धा: बाधित रुग्ण- (१९६), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)

भंडारा: बाधित रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१९४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (२३०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४३०), बरे झालेले रुग्ण- (२६१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२६९), बरे झालेले रुग्ण- (२२५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३९८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५०)

एकूण: बाधित रुग्ण-(४,२२,११८) बरे झालेले रुग्ण-(२,५६,१५८),मृत्यू- (१४,९९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५०,६६२)

 (टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

कोरोनाचा फैलाव रोखण्यास सत्ताधारी भाजप गंभीर नाही -महाविकास आघाडीचा आरोप (व्हिडीओ)

0

पुणे- शहरात मार्च महिन्यापासून वेगाने होणाऱ्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सत्ताधारी भाजप सर्व पातळीवर अपयशी ठरला असून आपण नेमके यासाठी केले तरी काय ? याचे आत्मपरीक्षण महापालिकेतील भाजप ने करण्याची गरज आहे .हा फैलाव रोखण्यास गंभीर न राहता स्थानिक पातळीवर त्यांनी थातूर मातुर कामे केल्याचा आरोप करत आज सर्व विरोधी पक्षांनी महापालिका आयुक्तांशी या विषयावर केलेल्या चर्चेची आणि काही उपाय योजना आवश्यक असल्याची माहिती येथे कॉंग्रेसचे गट नेते आबा बागुल आणि शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी ‘माय मराठी’ ला दिली

-काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, विरोधी पक्षनेत्या सौ.दिपाली प्रदीप धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराजसुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे, .महापालिका आयुक्त, शहर अभियंता.आरोग्य प्रमुख, मुख्य लेखापाल,आरोग्य विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या दालनात आज दि.३१/७/२०२० रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत सर्व पक्षाचे गटनेत्यांच्या मागणीनुसार खालील विषयांबाबत दोन तास बैठक झाली. यामध्ये खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली

.१.कोविड संदर्भात पुढील ३ महिन्याचे नियोजन

२.कोविड संदर्भात केंद्र व राज्य शासनाचे अनुदान

३.चालू वर्षांतील जमा खर्च माहिती

४.बजेटमधील विकासकामे

५.मनपा मिळकतींची देखभाल दुरुस्ती

६.एचसीएमटीआर रस्ता

७.आंबिल ओढा सिमाभिंत


आबा बागूल यांनी पुणे शहरातील कोरोना रुग्णांना  वेळेवर बेड उपलब्ध होत नसून रुग्णांचे हाल होत आहेत असे आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले व याबाबत उपाय योजना करणेबाबत चर्चा केली.यावेळी आयुक्तांनी पुणे शहरातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करणेसाठी २४ बाय ७ पुणे मनपाचे अधिकारी 3 शिफ्टमध्ये खाजगी रुग्णालयात बसून त्याठिकाणी असलेले आयसोलेशन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर याची उपलब्धतादैनंदिन जाहिर करण्यात येईल. तसेच प्रत्येक खाजगी रुग्णालयात असलेले अधिका-यांचे नंबर जाहिर करणार असे आयुक्त साहेबांनी  सांगितले. याबाबत पुणे मनपाचा डॅशबोर्ड तयार करून दैनंदिन पब्लिश केले जाईल असे आयुक्तांनी आश्वासितकेले.
यावेळी विरोधी पक्षनेत्या सौ. दिपाली प्रदीप धुमाळ व सर्व पक्षाचे गटनेते यांनी कोविड संदर्भात पुढील ३ महिन्याचे नियोजनाचा आराखडा तयार करा अशी मागणी केली असता १ महिन्याचा आराखडा २ दिवसात तयार देणार असे आयुक्तांनी सांगितले. यामध्ये कोरोना साठी भविष्यात किती खर्च येणार, किती बेड लागणार व तदनुषंगिक माहितीचा सविस्तर अहवाल २ दिवसात देतो असे आयुक्त यांनी  आश्वासित केले.
बिगर कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा चेस्ट एक्स-रे काढल्यास मयताच्या छातीचे काळे डाग आल्याचे दिसून येत आहे, असे साधारण १ हजार मृत्यूची आकडेवारी प्रशासनाकडून लपविण्यात आली आहे का? याबाबत पुणे शहराचे महापौर यांनी काल दि.३०/७/२०२० रोजी पुणे शहरात आजपर्यंत १००० रुग्णांचे संशयित मृत्यु झाले असे जाहिर केले असून त्याबाबत आयुक्त यांना  विचारणा केली असता त्यांनी पुणे शहरात असे १००० संशयीत मृत्यु झाले किंवा लपवले गेले असे काही झालेले नाही असे ठामपणे सांगितले. याबाबत मी महापोरांशी चर्चा करतो व याबाबत ससून सर्वोचपार रुग्णालयाकडे पत्र पाठवून माहिती घेतो असे  आयुक्त यांनी  सांगितले
पुणे मनपाचे सीसीसी सेंटर मध्ये १२००० बेड उपलब्ध असून त्यामध्ये ४००० रूण अॅडमिट असून 8000 बेड रिक्त आहेत अशी धक्कादायक माहिती मिळाली असून यामध्ये किमान ३००० बेड ऑक्सिजनचे बेड तातडीने तयार करावेत अशी मागणी  बागूल यांनी केली. जेणेकरून ऑक्सिजन विना मृत्यु कोणाचाही होणार नाही. यासाठीकिमान २ ते ३ कोटी रुपये खर्च येणार असून त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ६७, ३, क नुसार कार्यवाही करणेस हरकत नाही असे सर्व पक्षाचे गटनेते यांनी सांगितले. बागूल यांनी कोरोना झाल्यावर उपचार करतो परंतू कोरोना होवू नये यासाठी नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, व्हिटॅमिन, मल्टीव्हिटामिन, बी १२ हीऔषधे व गोळया वाटप करणेबाबत मी सातत्याने लेखी पाठपुरावा करीत असून याबाबत आयुक्तांनी प्रशासनास पुढील कार्यवाही करणेस आराखडा तयार करणेस सांगितले. यानुसार आजपर्यंत ५०००० औषधे व गोळ्यांचे किट वाटप करण्यात आले आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यानुसार पुणे शहरातील झोपडपटटी वसाहती व अन्य ठिकाणच्या नागरिकांना आर्युवेदिक, होमिओपथिक, व्हिटामिन औषधे व गोळ्या वाटप करणार असा निर्णय घेण्यात आला.शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणारे नागरिकांचे उत्पन्नथांबले असून खाजगी रुग्णालयात नागरिक अॅडमिट होणेस गेले असता त्यांचेवरील उपचाराचा खर्च करणेस पैसे नसतात, ही वस्तुस्थिती असून त्यासाठी पुणे शहरातील सर्व नागरिकांचा, प्रत्येक मिळकत धारकाचा कोरोनाचा विमा किमान ६ महिन्यासाठी करणार, जेणेकरून त्या अंतर्गत उपचाराचा खर्च होवून यामुळे मनपाची आर्थिक बचत देखील होईल. सर्वसामान्य उपचारासाठी गेला असता त्यास जागा उपलब्ध होत नाही व विमा असणाऱ्यास जागा मिळते, ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी याबाबत खातेप्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेतो असे आश्वासन दिले.
पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी मध्यांतरी एक कोविड विमा योजना सुरक्षा कवच योजना काढली होती त्यामध्ये महापालिका ५० लाख व केंद्र सरकारकडून ५० लाख रू. देण्यात येणार होते. परंतु काही कारणास्तव केंद्र सरकारकडून ती योजना नाकारण्यात आली. यावेळी महापौरांची सुरक्षा कवच योजनेची घोषणा होत राहिली असे आबा बागूल म्हणाले. यावेळी कमीत कमी मनपाचे ५० लाख व वारसास नोकरी बाबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतो असे आयुक्तांनी सर्व पक्षाचे गटनेते यांना आश्वासित केले.पुढील ३ महिन्याच्या उपाय योजनाबाबत पुणे शहरात जम्बो रूपालय उभारणार असून यामध्ये सध्या ८०० बेड
उपलब्ध आहेत त्याऐवजी २४०० बेड उपलब्ध करुन देण्यात येतील. १८०० ऑक्सिजन बेड आणि ६०० आयसीयु चे बेड उपलब्ध करून देण्याबाबत उपाय योजना करण्यात येत आहे असे आयुक्त म्हणाले. तसेच कोविड केअर सेंटर मधील बेडची संख्या १० टक्यांनी वाढविणार आहोत. याबाबत चर्चा करताना पुणे शहराच्या हिताच्या निर्णयाबरोबर आम्ही ठामपणे आहोत असे सर्व पक्षाचे नेत्यांनी सांगितले.केंद्र आणि राज्य सरकारकडून मदतनिधी उपलब्ध व्हावा म्हणून एक सक्षम अधिकारी नेमावा किंवा तसा सेल निर्माण करून याबाबतचा दैनंदिन फालोअप घ्यावा. तसेच या सेल मधून केंद्र सरकार व राज्य सरकारकडून पुणे
महानगरपालिकेस किती अनुदान येते, मदतनिधी व साहित्य येते याबाबत देखील पाठपुरावा करता येईल. जेणेकरून पुणे महापालिकेस मिळणारी रक्कम वेळेत मिळेल. फक्त पत्राद्वारे अनुदान, निधी, सहाय मदत मिळणार नाही, त्यासाठीस्वतंत्र कक्ष उभारल्यास प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होईल असे सर्व पक्षाचे गटनेते यांनी सांगितले, यावरआयुक्तांनी यावेळी यासाठी खातेप्रमुख नेमतो असे सांगितले.पुणे महानगरपालिका विविध विभाग उदा,पाणी पुरवठा, उद्यान, अतिक्रमण, सुरक्षा, शिक्षण विभाग इ.ठिकाणी जेथे ठेकेदार पध्दतीने व तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ पुरवठा करण्यात येतो, अशा ठिकाणची टेंडर संपली असून देखील
मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात आला आहे. त्या कामगारांचे वेतन त्यांना व्यवस्थित होण्यासाठी याला ६महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी अशी चर्चा झाली. शिक्षण मंडळाकडील सेवकांना तातडीने कामावर घेण्यात यावेत्यांची उपासमार होत आहे. यासाठी आयुक्त यांनी  होकार दिला आहे. तसेच पुणे शहरातील मनपाच्या वास्तूंची देखभाल दुरूस्ती बंद असून नाट्यगृहे, शाळा, वास्तू बंद असून त्यांची देखभाल दुरुस्ती करणेसाठी निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करतो असे आयुक्तांनी सांगितले. यावेळी पुणे शहरातील विकासकामांबाबत विचारणा केली असून पुणे महानगरपालिकेकडे आज रोजी २५०० कोटी उपलब्ध आहेत अशी माहिती सर्व पक्षाचे गटनेते यांनी आयुक्त यां च्या निदर्शनास आणून दिली. यावेळी आयुक्त यांनी नगरविकास विभागाशी चर्चा करून २ दिवसात निर्णय घेतो असे आश्वासित केले.
शहरातील अत्यंत महत्त्वाचा एच.सी.एम.टी.आर.योजनेबाबत आबा बागूल यांनी विचारणा केली असून आयुक्तांनी याबाबत मी प्रशासनाकडून एच.सी.एम.टी.आर योजनेची माहिती घेऊन आपणास कळवितो, असे आयुक्त यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेने मागील चार महिन्यात ६७-3 (क) अंतर्गत अंदाजे २२५ ते २५० कोटी रू. कोविडउपाययोजनेवर खर्च केले आहेत. मग महानगरपालिकेने इतका खर्च करून देखील हे प्रशासनाचे अपयश आहे का?त्यामुळे या सर्व कामांची तपासणी ऑडीट करावे अशी मागणी बागूल यांनी केली.बालेवाडी किंवा इतर कोविड सेंटर्स वर नागरीकांना योग्य त्या अद्यापही सुविधा नसल्याचे पृथ्वीराज सुतार,
सौ. दिपाली धुमाळ, विरोधी पक्षनेते यांनी बैठकीमध्ये सांगितले. यावेळी राजेंद्र मुठे, उप आयुक्त यांच्याकडून शहरातील विविध कोविड सेंटर्स बालेवाडी, सणस ग्रांड, अवेटेड कोविड सेंटर मधील बेडसची उपलब्धतता यांची माहिती दिलीडॅश बोर्ड, कंट्रोल रूम किंवा महानगरपालिका अधिकाऱ्यांनी किती रुग्णांची दूरध्वनी स्वीकारून त्यांना बेड उपलब्ध करुन दिले? याबाबतची माहिती सर्व पक्षाचे गटनेते यांनी विचारली असता प्रशासनाकडून सर्व माहिती २ दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले.
कोरोनामुळे घबराट झाली असून प्रत्येक नागरीक तपासणीसाठी येत आहेत, त्यामुळे यंत्रणेवरील ताण व खर्च वाढत आहे. त्याऐवजी पूर्वी जसे लक्षणे असतील तर तपासणी केली जात होती. त्या पध्दतीने अंमलबजावणी करावी, असे पृथ्वीराज सुतार, वसंत मोरे यांनी सांगितले. यावर आयुक्तांनी अन्टीजेन रपिड, स्वैब टेस्ट इ.चाचण्या मोठ्या प्रमाणात करून कोरोना रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करणे महत्वाचे असल्याने या चाचण्या मोठ्या प्रमाणात करणे, हे अतिशय महत्वाचे आहे असे आयुक्त यांनी सांगितले. यावर तपासणी नंतरची सुविधा सुध्दा महापालिकेने केली पाहिजे. त्याचे नियोजन केले पाहिजे, याकडे पृथ्वीराज सुतार यांनी लक्ष वेधले.