Home Blog Page 2493

एनपीसीआयतर्फे ‘एन्थ रिवॉर्डस’ हा बहुमाध्यमिक लॉयल्टी प्लॅटफॉर्म लाँच

0
  • बँका आणि व्यापाऱ्यांसाठी व्हाइट लेबल्ड लॉयल्टी सोल्यूशन्स लाँच
  • अक्टिव्हेशन आणि रिडम्प्शनसाठी कॅम्पेन व्यवस्थापन क्षमता
  • लॉयल्टी प्लॅटफॉर्ममध्येच अनालिटिक्स प्लॅटफॉर्मचा समावेश

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) एन्थ रिवॉड्स हे आपले स्वतःचे बिझनेस इंटेलिजन्स आणि अनालिटिक्स अनेबल्ड बहुमाध्यमिक, विविध ब्रँड्सचा समावेश असलेले लॉयल्टी प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. हा अनोखा लॉयल्टी रिवॉर्ड्स प्लॅटफॉर्म वापरकर्त्याला (युजर्स) बँक व्यवहारांमध्ये एन्थ (अमर्यादित शक्यतांचे प्रतीक) पॉइंट्स मिळवण्याची तसेच विविध आकर्षक उत्पादने, ई- व्हाउचर्स, देणग्या, हॉटेल्स आणि विमानांचे आरक्षण इत्यादींवर तातडीने रिडीम करण्याची संधी देतो. बँक ग्राहकांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने एन्थ रिवॉर्ड्सद्वारे जास्तीत जास्त खरेदी पर्यायांवर रिवॉर्ड्स पॉइंट्स सोप्या पद्धतीने मिळवणे आणि जलद रिडम्प्शन करण्याची सोय देण्यात आली आहे,

वापरकर्त्यांसाठी एन्थ रिवॉर्ड्स प्लॅटफॉर्मवर सोपा आणि स्मार्ट डॅशबोर्ड देण्यात आला आहे, ज्याच्यावर गोळा झालेले पॉइंट्स, रिडम्प्शन दाखवले जाते तसेच सर्व ऑफर्स आणि रिवॉर्ड्सही पाहाता येतात. ग्राहकांना बहुतांश डिजिटल व्यवहारावर विशेषतः क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून करण्यात आलेल्या व्यवहारांवर लॉयल्टी पॉइंट्स मिळतात. ग्राहकांना त्यांनी दाखवलेल्या निष्ठेसाठी रिवॉर्ड देण्यामुळे कंपनीला आपल्या अमूल्य ग्राहकांवर दीर्घकालीन नाते जपण्यास मदत होते. एन्थ रिवॉर्ड्स हे ग्राहकांमध्ये डिजिटल पेमेंटच्या सुविधांचा वापर करण्याचे प्रमाण वाढावे यासाठी एनपीसीआयने उचललेले आणखी एक पाऊल असून त्याचवेळेस यातून त्यांना योग्य मार्गांना बक्षिस देत वैयक्तिक नात्याचा ओलावा दर्शवता येतो.

ग्राहकांना लॉयल्टी रिवॉस पूर्णपणे नव्या पद्धतीने पुरवण्यासाठी एन्थ रिवॉर्ड्स महत्त्वांच्या स्तंभावर आधारित काम करतो.

  • एन्थ रिवॉर्ड्सच्या केंद्रस्थानी लॉयल्टी इंजिन आहे. ते ग्राहकांना बँकेच्या विविध डिजिटल व्यवहारांवर पॉइंट्स मिळवण्याची संधी देते. लॉयल्टी इंजिनमुळे बँक किंवा व्यापाऱ्या ग्राहकांनी दाखवलेल्या निष्ठेसाठी रिवॉर्ड देता येते आणि नियमितपणे त्याची मोजदाद करता येते.
  • अनालिटिक्स आणि बिझनेस इंटेलिजन्समुळे उत्पादन श्रेणी आणि कॅम्पेनची कामगिरी रियल- टाइममध्ये उपलब्ध होते. बीआयच्या मदतीने प्लॅटफॉर्मवरील वैयक्तिक डॅशबोर्ड बँकेला कार्यवाही करणे शक्य करणारी अंतर्गत माहिती देते. या माहितीच्या आधारे योग्य ग्राहकवर्ग ओळखून त्यांच्या विपणन खर्चावर जास्तीत जास्त परतावा देता येतो.
  • ऑफर्स आणि रिवॉर्ड्स प्लॅटफॉर्म ग्राहकासाठी विशिष्ट ऑफर्स तयार करतात, जे जिओ- मार्केटिंगच्या मदतीने योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. ग्राहकांना रिवॉर्ड्स प्लॅटफॉर्मच्या मदतीने मिळवलेले पॉइंट्स पर्यटन, मनोरंजन, भेटवस्तू, रिचार्ज अशा गोष्टींवर खर्च करू शकतात.
  • कॅम्पेन व्यवस्थापन ग्राहकांबरोबर रियल टाइम एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्क करतात. यामुळे बँकांना ग्राहक- स्नेही, बहुमाध्यमिक कॅम्पेन मोड्युल मिळते, जे सहजपणे तयार करता व डिझाइन करता येते तसेच त्याची सहज अंमलबजावणीही करता येते.

इक्विटास बँकेचे अध्यक्ष आणि देश प्रमुख श्री. मुरली वैद्यनाथन म्हणाले, ‘ग्राहकांबरोबर विश्वास आणि समजुतीचे नाते तयार करण्यासाठी बँकेला आपल्या ग्राहकांशी नियमितपणे संवाद साधणे आवश्यक असते. सध्याच्या सहजपणे विचलित होण्याच्या काळात ग्राहकाला कायम राखण्यासाठी ग्राहक समाधान आणि मूल्यवर्धित सेवा देणे गरजेचे असते, कारण त्यांच्या मदतीने बँकेप्रती निष्ठा निर्माण करतायेते. चांगला लॉयल्टी प्लॅटफॉर्म आम्हाला योग्य वेळेस योग्य ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेलय यामुळे ग्राहक टिकून राहाण्याचे प्रमाण वाढेल तसेच व्यवहारांनाही चालना मिळेल. सर्व शक्य व्यवहारांना रिवॉर्ड दिले जाते, एका खात्यात ठेवले जाते आणि एकाच ठिकाणी रिडीम करता येते. यावरून यातील उच्च सोयीस्करपणा लक्षात येईल. म्हणूनच ‘एन्थ रिवॉर्ड’सारखा लॉयल्टी प्लॅटफॉर्म तयार केल्याबद्दल मी एनपीसीआयचे मनापासून आभार मानतो. मला खात्री आहे, की यामुळे ग्राहक टिकून राण्याचे, व्यवहारांचे प्रमाण वाढेल, शिवाय ग्राहक तसेच संस्थेसाठी आदर्शक प्लॅटफॉर्म तयार होईल.’

टीजेएसबी सहकारी बँकेचे व्यवस्थापक श्री. स्वप्नील जांभळे म्हणाले, आज ग्राहकांना कधी नव्हे इतके पर्याय उपलब्ध आहेत. हे लक्षात घेता बँकांना आपल्या ग्राहकांशी त्यांना महत्त्व देत व बँकेसाठी आपण खास आहोत अशी भावना निर्माण करत संवाद साधणे फार महत्त्वाचे झाले आहे. ग्राहकांना योग्य प्रकारचे रिवॉर्ड्स देऊन त्यांच्याशी अशाप्रकारचे नाते प्रस्थापित करणे गरजेचे झाले आहे. वैयक्तिक उत्पादनावर भर देण्याऐवजी प्लॅटफॉर्मने ग्राहकावर भर देणे, त्यांचा प्रवास सफाईदार बनवणे आवश्यक आहे. एन्थ रिवॉर्डसारखा बहुमाध्यमिक प्रोग्रॅम तयार केल्याबद्दल एनपीसीआयचे अभिनंदन. याचा सोपा, व्यावसायिक आराखडा उत्पादनांची व्याख्या तयार करण्यासाठी मदत करतो तसेच प्रोग्रॅम जलदपणे आणि कमी खर्चात अमलात आणण्यासाठी व्हाइट लेबलिंगसारख्या सवलतीही उपलब्ध करतो.

एनपीसीआयचे विपणन प्रमुख श्री. कुणाल कालावातिया म्हणाले, बँका आणि व्यापाऱ्यांसाठी एन्थ रिवॉर्ड्स प्लॅटफॉर्म लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या या अनोख्या उत्पादनामुळे बँका व व्यापाऱ्यांना डिजिटल प्रकारे पेमेंच करणाऱ्या आपल्याग्राहकांना रिवॉर्ड देता येईल. एनपीसीआयमध्ये आम्ही कायमच ग्राहकांसाठी सोयीस्करपणा निर्माण करण्यावर भर दिला असून एन्थ रिवॉर्डच्या मदतीने आता त्यांच्या निष्ठेची दख घेत त्यांना विविध प्रकारची उत्पादने व सेवा आम्ही पुरवणार आहोत. या लॉयल्टी प्लॅटफॉर्मद्वारे बँका आणि व्यापाऱ्यांना आपल्या ग्राहकाची मानसिकता चांगल्या प्रकारे समजून घेत त्यांच्यासाठी योग्य व आकर्षक डील्स तसेच सवलती तयार करता येतील.

बँकांना आपला ग्राहकवर्ग जपण्यासाठी व विस्तारण्यासाठी मदत करणारे वन स्टॉप शॉप बनण्याचे ध्येय या बहुमाध्यमिक प्लॅटफॉर्मने ठेवले आहे. एन्थ रिवॉर्ड आणि बँकेच्या यंत्रणेचे एकत्रीकरण सुरुवात झाल्यानंतर केवळ 4 ते 6 आठवड्यांत पीसीआय- डीएसएस पालन तसेच डेव्हलपर- फ्रेंडली एपीआयमुळे सफाईदार व सुरक्षित झाले आहे. यामुळे बँकेला खर्च तसेच मनुष्यबळाच्या कामाच्या तासात कपात करता येईल. हा वापरण्यास तयार असलेला प्लॅटफॉर्म कोणत्याही संकेतस्थळामध्ये किंवा अपमध्ये एकत्र करता येईल आणि पर्यायाने ग्राहक अनुभवात तडजोड न करता बाजारपेठेत जाण्याचा वेळ वाचवता येईल.

अनिल भैया गेले हा मोठा आघात.. लोकांसाठी जगलेला नेता गेला

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनिल भैया राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि ५ : अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला, अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली.

काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती, कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत असतांनाच अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे.

युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले अनिल भैया राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते. रस्त्यावर स्वत: उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना नगर जिल्ह्यात अक्षरश: रुजविली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरात तर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आणि ते यशस्वी करून दाखवले. नगर जिल्ह्यातून २५ वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले तरी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख सांगण्यात त्यांना अभिमान होता, कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे असे समजणाऱ्या अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील आमच्या अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक आम्ही गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

अक्सिस बँकेतर्फे बारामती आणि पुण्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी स्क्रीनिंगचे आयोजन

0

पुणे, – सध्याच्या कठीण काळात, संपूर्ण देश महामारीचा सामना करत असताना अक्सिस बँक या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने सर्वसामान्यांसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून अक्सिस बँकेने तज्ज्ञांची एक टीम तयार केली आहे, जी बारामती आणि पुण्यातील 50 पेक्षा जास्त वय असलेल्या सर्व पोलिस अधिकारी आणि सरकारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्क्रीनिंग करणार आहे. बारामतीमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

अक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि शाखा बँकिंग विभागाचे प्रमुख रवी नारायणन म्हणाले, ‘अक्सिस बँक देशभरातील विविध राज्यांतील नागरिकांना शक्य ती सर्व मदत करत आहे. आम्ही आता फ्रंटलाइन योद्ध्यांपर्यंतही पोहोचायचे ठरवले आहे, कारण ते आघाडीवर राहून या महामारीचा सामना करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत बारामती व पुण्यात मिळून 600 स्क्रीनिंग्ज केली असून अजून काही स्क्रीनिंग केली जाणार आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करेपर्यंत आम्ही अशाचप्रकारे समाजाच्या बरोबरीने उभे राहून सर्वांना मदत करत राहाणार आहोत.’

तज्ज्ञांची ही टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्स रे सीबीसी आणि इतर आवश्यक उपकरणांच्या मदतीने कोव्हिड- 19 चाचणीचे पूर्वव- स्क्रीनिंग करणार आहे. हा उपक्रम तालुका पोलिस आणि बारामती वैद्यकीय हॉस्पिटलाशी संबंधित आरोग्य क्षेत्रातील इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे स्क्रीनिंग करणार आहे.

बँकेने बारामतीमध्ये खास व्हॅन तैनात केली असून पुण्यात जास्तीत जास्त अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टेस्टिंगसाठी सर्वदृष्टीने सोयीस्कर ठिकाण निवडण्यात येत आहे. खास तयार करण्यात आलेल्या या व्हॅनमध्ये कोव्हिड- 19 चाचणीसाठी आवश्यक सर्व उपकरणे बसवण्यात आली आहेत.

अक्सिस बँकेबद्दल

अक्सिस बँक ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक आहे. बँकेद्वारे मोठे व मध्यम कॉर्पोरेट्स, एसएमई, शेती व रिटेल व्यवसाय अशा विविध प्रकारच्या ग्राहकांना सर्व सेवा पुरवल्या जातात. 4415 देशांतर्गत शाखा (विस्तारित काउंटर्ससह) आणि 11,971 एटीएम्ससह 30 जून 2020 रोजी अक्सिस बँकेचे नेटवर्क 2559 केंद्रांत पसरलेले असून त्यामुळे विस्तारित उत्पादन श्रेणी व सेवांसह मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचणे बँकेला शक्य झाले आहे. अक्सिस समूहामध्ये अक्सिस म्युच्युअल फंड, अक्सिस सिक्युरीटीज लि., अक्सि फायनान्स, अक्सिस ट्रस्टी, अक्सिस कॅपिटल, ए. टीआरईडीएस लि., फ्रीचार्ज आणि अक्सिस बँक फाउंडेशन यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी https://www.axisbank.com/ 

हिंजवडीच्या राम मंदिरात खिरापत वाटप : भंगार वेचणाऱ्या बाळू मावशींचा उपक्रम

0

पुणे:अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन झाल्याच्या आनंदात भंगारमालाच्या व्यवसायातील उद्योजक असलेल्या बाळूमावशी धुमाळ त्यांच्या  माण-हिंजवडी-गवारवाडी  खिंडीतील राम मंदिरात ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आरती करून खिरापतिचा प्रसाद वाटून परिसरातील उपस्थित  भाविकांचे तोंड गोड केले.   
 वारकरी संप्रदायातील बाळूमावशीनी याच  वर्षी २६ फेब्रुवारी २०२० रोजी राम मंदिर उभारून तेथे राम लक्ष्मण – सीतेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती.याच राम मंदिरमध्ये आज आनंदोत्सव साजरा  करण्यात आला. ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमी पूजन होत असल्याने हा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यानी साखर -खोबऱ्याची खिरापत वाटून परिसरातील उपस्थित  भाविकांचे तोंड गोड केले. अशीक्षित असलेल्या बाळूबाई धुमाळ यांनी भंगार मालाच्या  व्यवसायातून जमवलेली पुंजी खर्च करून हे मंदिर बांधले आणि साधू संताना बोलावून प्रतिष्ठापनेचा भव्य कार्यक्रम केला होता. या मंदिरासाठी जयपूर वरून मूर्ती आणण्यात आल्या होत्या .करवीर पिठाच्या शंकराचार्यांनी या मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती . 
रामावर विशेष श्रद्धा असलेल्या बाळू मावशी यांनी अयोध्येतील विवादास्पद भूमीचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला म्हणून आजारी असतानाही आनंदोत्सव साजरा केला होता .त्या वेळी डोळ्यांवर ३ शस्त्रक्रिया झाल्या होत्या ,अशी आठवण बाळू मावशी धुमाळ यांनी सांगितली . 
‘कोरोना मुळे मंदिर बंद असले तरी साफ सफाई ,स्वच्छतेसाठी तेथे जावे लागते . वीज नसली तरी जनरेटर लावून पाण्याची व्यवस्था करावी लागते . एकदा मंदिर उभारले की त्याची काळजी महामारी असली तरी घ्यावी लागते . श्रद्धेने आलेली ती जबाबदारी आहे . त्यात मी कमी पडत नाही . कोरोना काळातही माझ्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांसाठी काम करीत असते. ‘,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या . 
सत्तरी ओलांडलेल्या , वारकरी संप्रदायातील बाळूमावशी यांनी विठ्ठल मंदिर देखील उभारले असून दर वर्षी तेथे हरिनाम सप्ताह करतात . स्वखर्चाने या परिसरातील दिंडी त्या हरिद्वार ,काशीला घेऊन गेल्या आहेत. त्या अयोद्ध्येला ६ वेळा जाऊन आल्या आहेत .राम मंदिर बांधकाम  सुरु झाल्यावर परवानगी घेवून त्या अयोध्येला जाणार आहेत. 

महावितरणमधील उपकेंद्र व विद्युत सहाय्यकांच्या 7000 जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

0

महावितरणमधील उपकेंद्र व विद्युत सहाय्यकांच्या

7000 जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

नागपूर – महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक (२००० जागा) आणि विद्युत सहाय्यकाच्या(५००० जागा) भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी ४ ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले. यापूर्वी, २३ जूनला ऊर्जामंत्री यांनी या संदर्भात भरती करण्याचे आदेश दिले होते मात्र कोविड आणि लॉकडाऊनमुळे त्यास विलंब झाला. 

आता ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उप केंद्र सहाय्यकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर विद्युत सहाय्यक निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ७००० जागांची भरती असल्याने सोशल डीस्टंसिंग आणि कोविड नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

औषधी रानभाज्यांच्या संवर्धानातून आदिवासी बांधवांची समृद्धी

0

रानभाज्या महोत्सवाचा मंत्रालयात शुभारंभ

९ ऑगस्टला राज्यात रानभाज्या महोत्सव – कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई, दि. ५ : औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री व्यवस्था बळकट करून हा ठेवा सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करतानाच रानभाज्यांच्या संवर्धानातून आदिवासी बांधवांची समृद्धी ही संकल्पना कृषी विभागामार्फत अवलंबविण्यात येईल. यासाठी जागतिक आदिवासी दिनानिमित्त दि. ९ ऑगस्ट रोजी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे सांगितले.

कृषीमंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकारलेल्या रानभाज्या महोत्सवाची सुरूवात मंत्रालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली. कृषीमंत्री श्री.भुसे, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, सचिव एकनाथ डवले आणि शहापूर व वाडा येथील आदिवासी भगिनी उपस्थित होत्या.

यावेळी कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, जंगलात आढळणाऱ्या या रानभाज्या, फळं विविध आजारांवर गुणकारी असून त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी या रानभाज्या उपयुक्त ठरू शकतात मात्र शहरी भागातील नागरिकांपर्यंत त्या पोहोचण्यासाठी त्या केवळ प्रदर्शनात न राहता त्यांची विक्री व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज आहे. त्यासाठी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत राज्यभर रानभाज्या महोत्सवाची संकल्पना सुचली आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ही  संकल्पना प्रत्यक्षात आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून आदिवासी भागातील बाधवांना त्यामुळे रोजगार निर्माण होऊ शकेल.

रानभाज्या महोत्सव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले. या रानभाज्या नागरिकांना कायमस्वरूपी कशा उपलब्ध होतील यांचेही नियोजन करण्यात येत असून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हा रानभाज्यांचा औषधी ठेवा शहरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी शहापूर आणि वाडा येथून आलेल्या महिलांनी रानभाज्यांची ओळख सांगितली. त्याचबरोबर त्यांचे औषधी गुणधर्मही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना कृषीमंत्र्यांकडून रानभाज्यांची भेट

दरम्यान, कृषीमंत्री श्री.भुसे यांनी आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना रानभाज्या महोत्सवाविषयी माहिती दिली. यावेळी विविध रानभाज्या एकत्रित असलेली पेटी श्री.पवार यांना भेट देण्यात आली. उपमुख्यमंत्री‍ अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना देखील कृषीमंत्री श्री.भुसे व राज्यमंत्री डॉ.कदम यांनी रानभाज्यांची पेटी दिली. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांना सचिव श्री.डवले यांच्या हस्ते रानभाज्यांची पेटी देण्यात आली.

दोन पिढ्यांना जोडणारे, मार्गदर्शक नेतृत्व हरपले’

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ५ : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या विकास वाटचालीत योगदान देणारे, दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात,  स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते निलंगेकर यांचा समावेश होता. बाणेदार आणि ठाम विचारसरणीचे नेते अशी त्यांची ओळख होती. मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी नेहमी आग्रही असणाऱ्या शिवाजीराव पाटील यांनी तितक्याच तडफेने राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. निष्ठावंत राजकीय विचारसरणीच्या पाटील यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान

0

कोरोनावर मात करणाऱ्यांनीही प्लाझ्मादान करावे – डॉ.जितेंद्र आव्हाड

ठाणे : गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले.  कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे; जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डींग्ज लावू नये; त्याऐवजी कोविड योद्ध्यांना आणि गोरगरीब जनतेला लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले होते.

गृहनिर्माणमंत्री डॉ.आव्हाड यावेळी म्हणाले जर कोरोनातून मुक्त झालेल्या प्रत्येक माणसाने प्लाझ्मा दान केला तर महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच आपण हे दान केले आहे. इतरांनीही हे दान करावे. तसेच आनंद परांजपे यांनी कोरोनावर मात केली आहे व त्यांनी देखील आज प्लाझ्मादान केले आहे. आता इतर कोरोनाग्रस्तांना बरे करण्याची जबाबदारी आपली आहे. कोरोनामुक्त झालेल्या सर्वच रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला प्लाझ्मा स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे. ठाणे-मुंबईमध्ये सहा ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होते. मुंबईमध्ये चार आणि नवी मुंबई, नालसोपाऱ्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होते. परिणामी, वाहतुकीच्या समस्येमुळे ठाण्यातील रुग्णांना त्याचा लाभ घेणे जिकिरीचे होत होते. मात्र, आता ही समस्या निकाली निघाली आहे. ठाणे शहरातील ब्लड लाइन या रक्तपेढीला ही परवानगी मिळाली आहे. या रक्तपेढीमध्ये एकावेळी तीन जणांचे प्लाझ्मा संकलन करणे शक्य होणार असून किमान 100 जणांचे प्लाझ्मा साठवणे शक्य होणार आहे.

173 बेवारस वाहनांच्या मालकांनी त्यांची वाहने घेवून जाण्यासाठी आवाहन

0

पुणे दि.5 : – पुणे शहरात वाहतुक शाखेस 173 वाहने जमा असलेली वाहने ही पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत. या 173 बेवारस वाहनांच्या मालकांनी त्यांची वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे या ठिकाणी समक्ष हजर राहून ओळखून घेवून जावीत.
ही वाहने 4 दिवसात ओळखून न नेल्यास या वाहनांवर बेवारस वाहने या सदराखाली लिलावाची कार्यवाही करण्यात येईल, असे येरवडा वाहतुक विभाग, पुणे शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 38 हजार 122

0

पुणे विभागातील 79 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 1 लाख 20 हजार 597 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :- पुणे विभागातील 79 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 20 हजार 597 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 122 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 94 हजार 978 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 66 हजार 640 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 153 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 185 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.16 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 382 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 98, सातारा जिल्ह्यात 160, सोलापूर जिल्ह्यात 251 , सांगली जिल्ह्यात 188 तर कोल्हापूर जिल्ह्यात 685 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 549 रुग्ण असून 2 हजार 287 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 121 आहे. कोरोनाबाधित एकूण 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 9 हजार 490 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 949 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 23 आहे. कोरोना बाधित एकूण 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 440 रुग्ण असून 987 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 351 आहे. कोरोना बाधित एकूण 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 8 हजार 140 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 449 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 474 आहे. कोरोना बाधित एकूण 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 27 हजार 410 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 20 हजार 597 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 4 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोरोनाच्या लढाईत ‘सूर्यदत्ता’चे भरीव सेवाकार्य

0

पुणे- मार्च उजाडला आणि कोरोनाचं संकट देशासह महाराष्ट्रावर गडद होऊ लागलं. संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाऊन केलं आणि असंख्य आव्हानं उभी ठाकली. अर्थव्यवहार ठप्प झाले. रोजगार बंद झाले. अनेकांची रोजी-रोटी गेली. काही जणांवर उपासमारीची वेळ आली. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशावेळी समाजातील असंख्य हात उपेक्षितांच्या, गरजूंच्या पोटात दोन घास घालण्यासाठी पुढं आले. अनेक संस्थांनी कोरोनाबाबत जनजागृती करून, लोकांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक नाव म्हणजे शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था असलेल्या पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं. 
‘सूर्यदत्ता’ परिवार सहभागीसूर्यदत्ता संस्थेने कोरोनाच्या या संकटकाळात शहराच्या विविध भागातील शोषित, वंचित आणि गरजू लोकांना मदत करत एक नवा आदर्श घालून दिला आहे. लाखो लोकांना या मदतीचा लाभ झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या पुढाकारातून संपूर्ण ‘सूर्यदत्ता’ परिवार या सेवाकार्यात सहभागी झाला. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वानीच आपापल्या परीने या कोरोना विरुद्धच्या लढाईत योगदान दिले आहे.
गरजूंना सर्वतोपरी मदतकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, त्याचा फटका मजूरवर्ग, मध्यमवर्गीय लोकांना सर्वाधिक बसला. हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी होती आणि त्यांची अवस्थाही भयावह होती. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं एप्रिल महिन्यापासून हे कार्य ‘मदत नव्हे, सेवाकार्य’ या भावनेतून सूर केले. आजही ते कार्य सुरु आहे. धनकवडी, बावधन, कोथरूड, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, हडपसर, दांडेकर पूल आदी भागातील गरजूना अन्नधान्याचा पुरवठा, भोजनव्यवस्था करणाऱ्या संस्थांना साहाय्य, पोलिसांना पाणी, फळे, मास्क, सॅनिटायझर पुरविण्यात आले. संस्थेच्या फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी मास्क तयार करून वाटले. वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. 
दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीसूर्यदत्ता ग्रुपने दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीची जाणीव नेहमीच जपलेली आहे. समाजातील गरजूना भरीव मदत करण्यासह कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे मोठे कार्य ‘सूर्यदत्ता’ने केले. कोरोनापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, कोरोना झाल्यास घाबरून न जाता धैर्याने सामोरे जाण्याचा मार्ग, यासह शिक्षण क्षेत्रातील बदलत असलेल्या गोष्टी, शिक्षणप्रणाली, नवतंत्रज्ञान आदींविषयी तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन सत्रे, वेबिनार्स नियमितपणे चालू आहेत. कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातील काही रक्कम संस्थेच्या कोरोना फंडात जमा केली आहे. ही रक्कम पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रिलिफ फंडाला लवकरच देण्यात येणार आहे. या सामाजिक कार्यासह शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी सूर्यदत्ताच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम, आंतरशाखीय ज्ञान, आत्मनिर्भर भारत आदी विषयांवर विपुल मार्गदर्शन झाले.
‘कॅम्पस’चे नियमित निर्जंतुकीकरणकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सूर्यदत्ता’मध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. परिसरात विविध ठिकाणी सॅनिटायझर्स स्टॅन्ड बसवले आहेत. सर्वाना मास्क अनिवार्य केला आहे. प्रवेशद्वारावर येणारे प्रत्येक वाहन निर्जंतुक करून आत सोडले जात आहे. परिसर नियमितपणे निर्जंतुक केला जात आहे. आवश्यक कर्मचारी वर्ग संस्थेत बोलावला जात असून, उर्वरित लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठिकठिकाणी कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी याचे फलक लावण्यात आले आहेत.
सुरक्षेसह प्रवेशप्रक्रिया सुरुसर्वच प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु केले आहेत. ऑनलाईन प्रक्रियेतून हे प्रवेश होत आहेत. माहितीसाठी येणाऱ्या विद्यार्थी-पालकांची तपासणी करून, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टनसिंग पाळून त्यांना प्रवेशाची माहिती दिली जात आहे. विद्यार्थी-पालकांनी प्रवेशासाठी अथवा माहितीसाठी कॉलेजात येण्यापेक्षा संस्थेच्या www.suryadatta.org या संकेतस्थळावर किंवा admission@suryadatta.edu.in या ईमेलवर किंवा 8956932402, 8956932418, 8956932400, 7776072000 यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोना योद्धयांप्रती कृतज्ञताकोरोनाच्या लढाईत अहोरात्र लढत असलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, पत्रकार आदी कोरोना योद्ध्यांच्याप्रती सूर्यदत्ताने नेहमी कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पार पडत आहे. चोरडिया दाम्पत्याच्या पुढाकारातून झालेल्या या सामाजिक योगदानाबद्दल अनेक संस्थांनी सूर्यदत्ता ग्रुपला व डॉ. चोरडिया यांना ‘कोरोना वॉरियर्स’चे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. यामध्ये ‘डिक्की’, सीओईपी, दिव्यांग क्रिकेट मंडळ, वर्ल्ड रेकॉर्ड बिनाले फाउंडेशन, भारतीय महाक्रांती सेना, सर्वश्रेष्ठ ब्राह्मण महासमिती मध्यप्रदेश, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्स आदी संस्थांचा समावेश आहे.
माणुसकी जपणे गरजेचेकोरोनाच्या संकटकाळात समाजातील प्रत्येकाला झळ बसली. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. सामाजिक जाणिवेतून माणुसकीचा पूल उभारत समाजातील वंचित, शोषित घटकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांपासून केला जात आहे. शिवाय, कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील नवे बदल, सामाजिक जनजागृती यावर तज्ज्ञांची असंख्य वेबिनार्स घेण्यात आली आहेत.- प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी तर ७७६० नवीन रुग्णांची नोंद

0

मुंबई, दि.४: राज्यात आज आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. आज दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२  हजार १५१  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज निदान झालेले ७७६० नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७०९ (५६), ठाणे- १४२ (६), ठाणे मनपा-२२६ (७),नवी मुंबई मनपा-२५९ (७), कल्याण डोंबिवली मनपा-१०३ (६),उल्हासनगर मनपा-३९ (१), भिवंडी निजामपूर मनपा-१५ (१६) , मीरा भाईंदर मनपा-८९ (८),पालघर-१२३ (१), वसई-विरार मनपा-८६ (४), रायगड-१२९ (६), पनवेल मनपा-१०६, नाशिक-११०(४),नाशिक मनपा-३३७ (५), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-२०७ (२), अहमदनगर मनपा-१२०, धुळे-१० (२), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-२४९ (७), जळगाव मनपा-४१ (५), नंदूरबार-१० (२), पुणे- ३२६ (१०), पुणे मनपा-१२९६ (२९), पिंपरी चिंचवड मनपा-५८५ (१७), सोलापूर-१६३ (३), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-२०९ (२९), कोल्हापूर मनपा-३४ (४), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४६ (३), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५८, औरंगाबाद-१२४ (१), औरंगाबाद मनपा-९७ (१०), जालना-१, हिंगोली-३, परभणी-१८, परभणी मनपा-२४,लातूर-७५(१), लातूर मनपा-४४ (५), उस्मानाबाद-३४४ (२), बीड-५७ , नांदेड-४३ (२), नांदेड मनपा-५५ (१), अकोला-११ (२), अकोला मनपा-५ (१), अमरावती- ३ (१), अमरावती मनपा-६९, यवतमाळ-५२, बुलढाणा-८७ (१), वाशिम-६४, नागपूर-६२ (३), नागपूर मनपा-१७४ (१४), वर्धा-११ (१), गोंदिया-१७, चंद्रपूर-११, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-१२, इतर राज्य १३.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१८,११५) बरे झालेले रुग्ण- (९०,९६०), मृत्यू- (६५४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,३०९)

ठाणे: बाधित रुग्ण- (९८,२१६), बरे झालेले रुग्ण- (६४,८५०), मृत्यू (२७५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,६११)

पालघर: बाधित रुग्ण- (१६,८१७), बरे झालेले रुग्ण- (१०,३०५), मृत्यू- (३६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१४४)

रायगड: बाधित रुग्ण- (१७,९८९), बरे झालेले रुग्ण-(१३,२०७), मृत्यू- (४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३६३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१९२८), बरे झालेले रुग्ण- (१२४२), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४१४), बरे झालेले रुग्ण- (२९४), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३)

पुणे: बाधित रुग्ण- (९८,८७६), बरे झालेले रुग्ण- (५८,१३७), मृत्यू- (२३४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८,३९७)

सातारा:  बाधित रुग्ण- (४६१६), बरे झालेले रुग्ण- (२६५०), मृत्यू- (१५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१३)

सांगली: बाधित रुग्ण- (३४०६), बरे झालेले रुग्ण- (१२४५), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६६५७), बरे झालेले रुग्ण- (२५७७), मृत्यू- (१६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९१५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१०,००२), बरे झालेले रुग्ण- (५२६६), मृत्यू- (५३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२०३)

नाशिक: बाधित रुग्ण- (१६,५३४), बरे झालेले रुग्ण- (१०,४१९), मृत्यू- (४९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६१७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (६२३३), बरे झालेले रुग्ण- (३६०९), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५४६)

जळगाव: बाधित रुग्ण- (१२,०८५), बरे झालेले रुग्ण- (८३१८), मृत्यू- (५५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२०९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६६८), बरे झालेले रुग्ण- (४४१), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८९)

धुळे: बाधित रुग्ण- (३२७६), बरे झालेले रुग्ण- (२१४५), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४,६७२), बरे झालेले रुग्ण- (९४००), मृत्यू- (५१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७५४)

जालना: बाधित रुग्ण-(२०१०), बरे झालेले रुग्ण- (१५१२), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२०)

बीड: बाधित रुग्ण- (९८९), बरे झालेले रुग्ण- (३०२), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (६६४)

लातूर: बाधित रुग्ण- (२५९८), बरे झालेले रुग्ण- (१२५९), मृत्यू- (११९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२०)

परभणी: बाधित रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३८)

हिंगोली: बाधित रुग्ण- (६७१), बरे झालेले रुग्ण- (४४६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१०)

नांदेड: बाधित रुग्ण- (२३६३), बरे झालेले रुग्ण (९०४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३७३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४७१), बरे झालेले रुग्ण- (५६१), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५४)

अमरावती: बाधित रुग्ण- (२३६७), बरे झालेले रुग्ण- (१५८८), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१०)

अकोला: बाधित रुग्ण- (२७०९), बरे झालेले रुग्ण- (२०५५), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२७)

वाशिम: बाधित रुग्ण- (७००), बरे झालेले रुग्ण- (४६१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१५४२), बरे झालेले रुग्ण- (८४०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (११६२), बरे झालेले रुग्ण- (६७९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५३)

नागपूर: बाधित रुग्ण- (५९५२), बरे झालेले रुग्ण- (२१७४), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६३३)

वर्धा: बाधित रुग्ण- (२३७), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)

भंडारा: बाधित रुग्ण- (२६०), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (३९८), बरे झालेले रुग्ण- (२४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५३४), बरे झालेले रुग्ण- (२८२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३०८), बरे झालेले रुग्ण- (२४९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (४४०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८)

एकूण: बाधित रुग्ण-(४,५७,९५६) बरे झालेले रुग्ण-(२,९९,३५६),मृत्यू- (१६,१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४२,१५१)

 (टीप:ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 38 हजार 328

0

पुणे विभागातील 75 हजार 812 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 1 लाख 17 हजार 215रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि. 4 :- पुणे विभागातील 75 हजार 812 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 17 हजार 215 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 328 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 64.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 92 हजार 880 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 63 हजार 930 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 821 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 68.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 499 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 487 , सातारा जिल्ह्यात 161, सोलापूर जिल्ह्यात 193 , सांगली जिल्ह्यात 347 तर कोल्हापूर जिल्ह्यात 311 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 389 रुग्ण असून 2 हजार 218 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 35 आहे. कोरोनाबाधित एकूण 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 9 हजार 239 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 439 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 282 आहे. कोरोना बाधित एकूण 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 252 रुग्ण असून 955 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 203 आहे. कोरोना बाधित एकूण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 7 हजार 455 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 270 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 987 आहे. कोरोना बाधित एकूण 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 99 हजार 788 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 17 हजार 215 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

एसटी महामंडळासाठी ५५० कोटींचा निधी देण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

0

मुंबई दि. 4 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटीसमोरील वाढलेली आव्हाने, महसुलात झालेली घट लक्षात घेऊन एसटी महामंडळाला हा निधी देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात आज एसटी महामंडळाच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, वित्त विभागाचे, तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत एसटीला साडेपाचशे कोटी देण्याचा निर्णय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे एसटी महामंळाच्या समोरील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. बैठकीत एसटी महामंडळाच्या सद्यस्थितीवर चर्चा होऊन आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाला मोठा दिलासा मिळणार आहे.

अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक -सुभाष देसाई

0

मुंबई, दि. 4 कोरोनाचे संकट कायम असले तरी उद्योगचक्र बंद ठेवणे अर्थकारणासाठी परवडणारे नाही, त्यामुळे अनलॉक तीनमध्ये मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे. परंतु  यासाठी उद्योजक संघटनांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श कार्य प्रणालीचे पालन करण्याची हमी देणारे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई सांगितले.

राज्यातील विविध उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आज उद्योगमंत्र्यांनी वेबिनारद्वारे चर्चा केली. यावेळी कंटेनमेंट झोन परिसरातील अत्यावश्यक  सेवा देणाऱ्या उद्योगांसोबत इतर उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व इतर कंटेनमेंट झोन परिसरातील उद्योग मागील चार महिन्यांपासून ठप्प आहेत. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याचे उद्योजकांनी सांगितले. दरम्यान, उद्योग सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्योगचक्र  पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक आहेत. परंतु त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे, सॅनिटायझेन, वाहतूक व्यवस्था आदी बाबीं पाळणे आवश्यक आहे.  शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची हमी देणारा प्रस्ताव सादर केल्यास शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

मुंबई व परिसरात ज्या भागांत कोरोनाचा प्रभाव नाही, त्याठिकाणी वाहतूक व्यवस्थेसह उद्योग सुरू करण्यासाठी शासन नक्कीच विचार करील, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

नागपूर, औरंगाबाद व इतर ठिकाणी वाहतुकीच्या समस्या असल्याचे काही उद्योजकांनी सांगितले. त्या सोडविण्याची ग्वाही एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांनी दिली. यावेळी उद्योग सचिव  वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते. यावेळी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, तळोजा, औरंगाबाद, नागपूर आदी भागातील उद्योजकांनी सूचना केल्या.