Home Blog Page 2492

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

वर्क फ्रॉम होम’ मध्येही हातभार लावण्याचे गुगलला केले आवाहन

मुंबई, दि. ६ : सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, जी स्वीट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.

वर्क फ्रॉम होमसाठी सहकार्य करावे – मुख्यमंत्री

जे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, गुगलमुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल स्वीट च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की गुगलच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास यामुळे मदत होईल.

गुगल आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक – उपमुख्यमंत्री अजित पवार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी जी स्वीट  आणि राज्य शाळांकरिता गुगल क्लास रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.  गुगल क्लासरुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात,

कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येला संधीत रुपांतर करुन डिजिटल क्रांतीचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांना याचा उपयोग करुन घेता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण यामुळे मिळण्याची सोय झाली आहे, असेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.

शिक्षणातील अग्रेसर राज्य बनविणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन,ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले

ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे एक ध्येयवादी पत्रकार काळाच्या पडद्याआड

0

मुंबई, दि.६ :- दैनिक पुण्य नगरी समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे याचं दु:खद निधन झाल्याचं वृत्त समजल. अत्यंत दु:ख झालं. मराठी पत्रकारितेतील व्रतस्थ कर्मयोगी मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने आज एक ध्येयवादी पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याच्या शोक भावना अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

शोक संदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, मुळचे जुन्नर तालुक्यातील असलेले मुरलीधर शिंगोटे यांनी केवळ इयत्ता चौथीपर्यंत घेतलेलं शिक्षण अर्थवट सोडून नोकरी व्यवसायासाठी मुंबईची वाट धरली. सुरुवातीला पडेल ती कामे करुन उदरनिर्वाह केले आणि त्यातूनच बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र वितरणाची कामे सुरु केली. त्यानंतर हळूहळू स्वत:ची वृत्तपत्र एजन्सी सुरु करत आणि अल्पावधीतच मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी या वृत्तपत्रांच्या वितरणात मोठ यश मिळवलं. त्या काळात आख्ख्या मुंबईची वितरण व्यवस्था जुन्नरच्या दोन तरुणांनी ताब्यात घेतली होती. दक्षिण भारतातील इनाडू, गुजरातमधील गुजरात समाचार, संदेश यांसह डझनभर वृत्तपत्रांची वितरणाची एजन्सी ताब्यात घेत ८० ते ९० च्या दशकात महाराष्ट्रातील वितरण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेलं व्यक्तीमत्व म्हणून स्व.शिंगोटे यांच्याकडे पाहिलं गेलं.

स्व.मुरलीधर शिंगोटे यांनी माझ्या माझगाव मतदारसंघातील छोट्याश्या प्रेसमधून मुंबई चौफेर तसेच पुण्यनगरी या वर्तमानपत्रांची सुरुवात केली. त्यांच्याकडे वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी असल्याने वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. यासाठी प्रसंगी त्यांनी स्वतः वर्तमान पत्राचे गठ्ठे वाहून नेत त्याचे वितरण देखील केले. अपार कष्टाच्या जोरावर पत्रकारिता क्षेत्रात काम सुरु केल्यानंतर त्यांनी परत मागे वळून बहितले नाही. त्यांनी पुढे दैनिक वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता यासारखी दैनिक सुरु करत पुण्य नगरी समूहाच साम्राज्य निर्माण केलं. पत्रकारिता क्षेत्रात समर्पित भावनेतून काम करत असतांना मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात अभूतपूर्व असं काम उभं केलं. त्यांच्या निधनाने आज एक समर्पित व्यक्तीमत्व कायमच हरपलं आहे. मी व माझे कुटुंबीय शिंगोटे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो असे त्यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक,संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचे निधन

0

पुणेदैनिक पुण्यनगरी वृत्तपत्रसमूहाचे मालक, संस्थापक -संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचे दीर्घ आजाराने जुन्नर येथे आज (गुरुवारी) निधन झाले. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्रसमूहाचा मालक हा त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास होता. बाबा या टोपणनावाने राज्याला परिचित होते.

बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज या गावी 7 मार्च 1938 ला झाला. इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळ विक्री, त्यानंतर वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाऊंटन परिसरात आंदोलन झाले होते. त्याचे बाबा साक्षीदार होते.

वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. 1994 मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले.यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली.5 नोव्हेंबर 1999 रोजी पुण्यातून जोगेश्वरी बोळ येथून हे वृत्तपत्र प्रसिद्ध होऊ लागले .सुरुवातीस मुंबईतून छापून पुण्यात येणारे आणि तेच महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणारे दैनिक उभ्या महाराष्ट्राने स्वीकारले आणि नाशीक ,नगर ,ठाणे ,मुंबई,सोलापूर अशा महाराष्ट्रभर १८ आवृत्या त्याच्या प्रसिद्ध होऊ लागल्या महाराष्ट्रात अल्पावधीत दुसऱ्या क्रमांकावर या दैनिकाने भरारी घेतली आणि शिक्षणापेक्षा कामाची कदर करणाऱ्या ,मेहनतीची कदर करणाऱ्या बाबांच्या या कर्तुत्वाने महाराष्ट्रातील तमाम वृत्तपत्रसृष्टीचे डोळे चमकले .मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.

काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांचे जन्मगाव असलेल्या गायमुखवाडी (ता. जुन्नर) येथे आज दुपारी एकच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी गायमुख वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदाबादच्या कोविड रुग्णालयात अग्नितांडव, 8 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू

0

अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील एका कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत 8 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. यानंतर 30 पेक्षा अधिक रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनुसार, ‘पहाडे 3.30 सुमारास श्रेय रुग्णालयाच्या आयसीयूतून या आगीला सुरुवात झाली. यानंतर ती दुसऱ्या वॉर्डात पसरली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगतिले जात आहे. अद्याप याची पुष्टी झाली नाही. यामध्ये कोविड रुग्णांसाठी 50 बेड आहेत. घटनेवेळी 40 ते 45 रुग्ण भर्ती होते.’

मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान केअर फंडमधून प्रत्येकी 2-2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री रूपाणी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या तपासणीचे नेतृत्व अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) संगीता सिंह करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांत रिपोर्ट मागवला आहे.

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना बाहेर काढले

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात शिफ्ट केले. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मृतांचे कुटुंबियांचे म्हणणे आहे की, रुग्णालय प्रशासनाने आगीची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला उशिरा दिली.

सेनापती…

0

कर्तव्याला भावनेची जोड मिळाल्यास संवेदना जागी ठेवून सेवा पार पडते. माझ्या प्रशासकीय सेवेत कर्तव्याला भावनेची जोड देवून संवेदनशील मनाने सेवा बजावणारे अनेक वरिष्ठ अधिकारी भेटले. त्यामधे आवर्जून ज्यांचा सहवास कायम स्मरणात राहील असे नुकतेच निवृत्त झालेले पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती झालेले नवल किशोर राम

दीपक म्हैसेकर सर म्हणजे अखंड ऊर्जा देणारा स्त्रोत.
रत्नागिरी जिल्ह्यातून माझी जानेवारी २०१९ मध्ये पुण्याला बदली झाली. त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला. निवडणुकांच्या तयारीसाठी प्रशासनाच्या बैठका सुरू झाल्या. या बैठकांच्या माध्यमातून पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर सरांशी संपर्क आला. त्यातून त्यांच्या कार्याची पद्धत जवळून अनुभवता आली. प्रशासकीय अधिकारी म्हणून एखादी व्यक्ती किती झपाटून काम करू शकते हे त्यांच्याकडे पाहून समजले. आपल्या बरोबर असलेल्या अधिकारी वर्गाला अत्यंत संमजसपणे वागवण्याचा मोठेपणा त्यांच्यात पहायला मिळाला. कर्तव्य बजावताना प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिक पार पाडावी असा त्यांच्या स्वभावाचा गुणधर्म. हा गुणधर्मच त्यांची ओळख बनला. सेवानिवृत्तीला अवघे काही महिने उरले असतानाही कोरोनाच्या काळात म्हैसेकर सरांनी  केलेले काम प्रशासकीय अधिकारी वर्गाला प्रेरणा देणारे आहे. त्यामुळेच त्यांनी कोरोना आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. अगदी सेवानिवृत्तीच्या आदले दिवशी मा. मुख्यमंत्री सो यांच्या आढावा बैठकीत सादर केलेले प्लाझ्मा दान करण्यासाठी व्यासपीठ देणारं अँप  तयार करण्यातला त्यांचा उत्साह वाखण्याजोगा होता.  त्यांच्या भावी आरोग्यमय…आनंदी वाटचालीस शुभेच्छा… !

नवल किशोर राम म्हणजे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व…

पुण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम सरांशी नेहमी संपर्क आला. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून ते कसे असतील…कडक स्वभावाचे असतील का?…असे अनेक प्रश्न मनात यायचे…पण जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांच्या विषयी एक आदर निर्माण झाला. त्यातूनच त्यांची झालेली मैत्री वृद्गधींगत होत गेली.

पुण्यासारख्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारश्याच्या जिल्ह्याचा भला मोठा व्याप सांभाळताना अगदी नियोजनबद्ध काम करण्याचा त्यांचा स्वभाव. सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बोलून चालून कर्तव्य पार पाडण्यावर त्यांचा विशेष भर. अधिकारीपद हे केवळ मिरवायचे नाही तर त्याचा समाजासाठी पुरेपूर उपयोग झाला पाहिजे ही भावना पावलोपावली मनात ठेवून ते कार्यरत राहत. निवडणूक काळात त्यांचे अहोरात्र काम पाहता आले.
पोलीस पाल्यांच्या विद्यार्थी वस्तीगृह इमारतीचे नुतनीकरण असो की, गुन्हे शाखेच्या इमारतीसाठीचा निधी असो… त्यांनी कधीच हात आखडता न घेता तत्परतेने जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांतील विकास निधी उपलब्ध करून देण्यात मोलाची भुमिका बजावली. आजही त्यांची कार्यपद्धती आमच्यासारख्यांना युवा अधिकाऱ्यांना ऊर्जा देणारीच आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीचाच सन्मान म्हणून त्यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती झाली असावी. या मानाच्या व कमालीच्या जबाबदारीच्या पदावरही ते निश्चितपणे आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवतील यात यत्किंचितही शंका नसावी. तेव्हा आम्हालाही नवप्रेरणेची उभारी मिळेल. श्री. नवलकिशोर राम सरांना भावी वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा.!
मागील दोन वर्षात पोलीस दलाशी उत्तम संवाद व समन्वय बाळगणाऱ्या तसेच पुणे जिल्हा व विभागात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या या दोन्ही सेनापतींची आठवण निश्चितच प्रत्येक सहकाऱ्याच्या व पुणेकरांच्या ह्दयी कायम असणार आहे…

मितेश घट्टे.
पोलीस उपायुक्त ( विशेष शाखा )
पुणे शहर.
दि. ०६ ऑगस्ट २०२०

खडकवासल्यातून पाणी सोडणार

0

पुणे- एकीकडे पाणी कपात करू नका अशी महापौरांची वक्त्वये माध्यमातून येत असताना गुरुवारी (ता.६) दुपारनंतर खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. खडकवासला धरणात सुमारे ६१ टक्के पाणीसाठा झाला असून, गुरुवारी दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाणी सोडावे लागणार आहे.धरणाची क्षमता १.९७ टीएमसी इतकी आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात चांगला पाऊस झाला. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिलिमीटर, पानशेत ५४ मिमी, वरसगाव ५५ मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दिवसभरात धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

श्रीराम पूजन,आरती,पेढ़े वाटप भाजपा कार्यालयात जल्लोष

0

पुणे-अयोध्या येथे बहुप्रतिक्षित श्री राम जन्म भूमी मंदिराचे भूमिपूजन आज (दि.5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. त्याप्रित्यर्थ संपूर्ण देशभरात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. भाजप पुणे शहराच्या वतीने आज शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते गुढी उभारून, श्री राम पूजन, आरती आणि पेढे वाटप करून शहर कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला.

शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, ‘शेकडो वर्षांची तपश्चर्या आज फळाला येत आहे, पावणे पाचशे वर्षांच्या संघर्षाचे यश आजच्या भूमिपूजनातून दिसून येत आहे.

या वेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, अनुसूचित मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, युवा मोर्चा संपर्क प्रमुख बापू मानकर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभा न चालविणे हे तर महापौरांचे पळपुटे धोरण -विरोधी पक्षांचा आरोप (व्हिडीओ)

0

पुणे- वारंवार सभा न चालविता तहकूब करून सत्ताधारी पळपुटे पणा करून कोरोनाबाबत च्या विविध प्रश्नांपासून पळपुटे धोरण अवलंबित  असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज  सुतार यांनी केला आहे तर ,महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असताना कोरोनाच्या नावाखाली पुण्याची विकास कामे ठप्प करून कोरोनाच्या नावावर बिले फाडण्याचा डाव सत्ताधारी भाजपकडून खेळला जातोय कि काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे असा आरोप कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे.
 राज्य सरकारने सर्व सभा  घेण्याबाबत ३ एप्रिल रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते त्यानंतर   ऑनलाईन ,व्हिडीओ कॉन्फरसिंग ने च सर्व सभा आणि बैठका  घेण्याचे आदेश ३ जुलैला दिले आहेत . त्याप्रमाणे स्थायी समितीसह अन्य बैठका सभा व्यवस्थित होत आहेत .मात्र जनतेपुढे पारदर्शक  असलेली मुख्य सभा मात्र कोरोनाच्या नावाने चालू न देता केवळ मुख्य सभेला शासन आदेशाचे चुकीचे कारण देत या सभा तहकूब केल्या जात आहेत . आणि सत्ताधारी भाजपा मनमानी कारभार करीत आहे .जे काही उपाय योजना करून खर्च केला आहे तो सांगण्यास ,आणि पुढील उपाय योजनांची मुख्य सभेत माहिती देण्यास , शंका ,प्रश्नांची उत्तरे देण्यास काय हरकत आहे. विकास कामे ठप्प करून नेमके भाजपला काय साध्याचे आहे ? असा सवाल या दोन्ही नेत्यांनी केला. 

राज्यात १ लाख ४५ हजार ९६१ ॲक्टिव्ह रुग्ण

0

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि. ५ : राज्यात आज दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४५  हजार ९६१  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

आज निदान झालेले १०,३०९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३३४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११२५ (४२), ठाणे- २३२ (४), ठाणे मनपा-२८१ (९),नवी मुंबई मनपा-२९० (४), कल्याण डोंबिवली मनपा-३७१ (२३),उल्हासनगर मनपा-३० (७), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (१८) , मीरा भाईंदर मनपा-१२५ (४),पालघर-११२ (२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-२८३ (१९), पनवेल मनपा-१७४ (१७), नाशिक-११९(१),नाशिक मनपा-५३५ (९), मालेगाव मनपा-५१, अहमदनगर-४२४ (३), अहमदनगर मनपा-२५०, धुळे-४, धुळे मनपा-४(२), जळगाव-३२३ (३), जळगाव मनपा-१४३ (१), नंदूरबार-१० (४), पुणे- ३६४ (१५), पुणे मनपा-१२८२ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-७१४ (१४), सोलापूर-२५३ (९), सोलापूर मनपा-३८, सातारा-१९३ (३), कोल्हापूर-२६४ (१२), कोल्हापूर मनपा-१६६, सांगली-८५ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-११४ (६), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-१० (२), औरंगाबाद-१७३ (१), औरंगाबाद मनपा-१०२ (४), जालना-११(१), हिंगोली-४, परभणी-१४, परभणी मनपा-३०,लातूर-१३४(१), लातूर मनपा-१८ (२), उस्मानाबाद-१४२ (३), बीड-८९ (२) , नांदेड-१२२ (३), नांदेड मनपा-१८ (२), अकोला-२८, अकोला मनपा-४, अमरावती- २२ (१), अमरावती मनपा-२७, यवतमाळ-४६, बुलढाणा-३९, वाशिम-५७, नागपूर-१२९ (२), नागपूर मनपा-३३१ (५), वर्धा-१० (३), भंडारा- ५,गोंदिया-४६, चंद्रपूर-३८, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-३९, इतर राज्य १६ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४० टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३४  करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील      

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१९,२४०) बरे झालेले रुग्ण- (९१,६७३), मृत्यू- (६५९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,६७९)

ठाणे: बाधित रुग्ण- (९९,५६३), बरे झालेले रुग्ण- (६६,३३३), मृत्यू (२८२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,४०६)

पालघर: बाधित रुग्ण- (१७,११६), बरे झालेले रुग्ण- (१०,५०७), मृत्यू- (३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२३३)

रायगड: बाधित रुग्ण- (१८,४४६), बरे झालेले रुग्ण-(१३,३०२), मृत्यू- (४५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६८९)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१९३८), बरे झालेले रुग्ण- (१२८४), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८६)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४२८), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३)

पुणे: बाधित रुग्ण- (१,०१,२६२), बरे झालेले रुग्ण- (५९,४४३), मृत्यू- (२४३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,३८५)

सातारा:  बाधित रुग्ण- (४८०९), बरे झालेले रुग्ण- (२७८१), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८७२)

सांगली: बाधित रुग्ण- (३६०५), बरे झालेले रुग्ण- (१३३३), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१७१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७०८७), बरे झालेले रुग्ण- (२७३१), मृत्यू- (१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१०,२९३), बरे झालेले रुग्ण- (५४८५), मृत्यू- (५४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२६६)

नाशिक: बाधित रुग्ण- (१७,२३९), बरे झालेले रुग्ण- (१०,८८८), मृत्यू- (५०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८४३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (६९०७), बरे झालेले रुग्ण- (३८३०), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९९६)

जळगाव: बाधित रुग्ण- (१२,५५१), बरे झालेले रुग्ण- (८५९५), मृत्यू- (५६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३९४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६७८), बरे झालेले रुग्ण- (४६५), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७१)

धुळे: बाधित रुग्ण- (३२८४), बरे झालेले रुग्ण- (२१९२), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४,९४७), बरे झालेले रुग्ण- (९७५०), मृत्यू- (५२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६७४)

जालना: बाधित रुग्ण-(२०२१), बरे झालेले रुग्ण- (१५३३), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०९)

बीड: बाधित रुग्ण- (१०७८), बरे झालेले रुग्ण- (३२७), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (७२६)

लातूर: बाधित रुग्ण- (२७५०), बरे झालेले रुग्ण- (१२९८), मृत्यू- (१२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३०)

परभणी: बाधित रुग्ण- (७८५), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६८)

हिंगोली: बाधित रुग्ण- (६७५), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१३)

नांदेड: बाधित रुग्ण- (२५०३), बरे झालेले रुग्ण (९२३), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१६१३), बरे झालेले रुग्ण- (५८९), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६५)

अमरावती: बाधित रुग्ण- (२४१६), बरे झालेले रुग्ण- (१६५४), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९२)

अकोला: बाधित रुग्ण- (२७४१), बरे झालेले रुग्ण- (२०९६), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८)

वाशिम: बाधित रुग्ण- (७५७), बरे झालेले रुग्ण- (४६३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१५८१), बरे झालेले रुग्ण- (८७०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१२०८), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७४)

नागपूर: बाधित रुग्ण- (६४१२), बरे झालेले रुग्ण- (२१७५), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०८५)

वर्धा: बाधित रुग्ण- (२४७), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

भंडारा: बाधित रुग्ण- (२६५), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (४४४), बरे झालेले रुग्ण- (२४७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५७३), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३४७), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (४५६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०३)

एकूण: बाधित रुग्ण-(४,६८,२६५) बरे झालेले रुग्ण-(३,०५,५२१),मृत्यू- (१६,४७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४५,९६१)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३३४ मृत्यूंपैक़ी २४२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

महापालिकेकडे हिशोब मागणाऱ्यांनो तुमच्या राज्य सरकारकडून पुण्याला अर्थसहाय्य मिळावे म्हणून तुम्ही काय केले ते सांगा -महापौरांचा पलटवार 

पुणे- महापालिकेने कोरोना साठी खर्च केलेल्या ३०० कोटीचा हिशेब मागणाऱ्यांचे राज्यात सरकार आहे ,त्यांनी राज्य सरकारकडून पुण्यातील हि महामारी रोखण्यासाठी किती अर्थ सहाय्य आणले आणि आणण्यासाठी किती आवाज उठविला याबाबत प्रथम आत्मपरीक्षण करावे असा टोला मारीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील खाजगी हॉस्पिटल्स लुट करीत असल्याचा आरोप केला आणि यावर महापालिका आपल्या परीने कारवाई करीत आहे पण राज्य सरकार काय कारवाई करीत आहे ? असाही सवाल उपस्थित केला . एकूणच मुख्य सभेतील विरोधकांच्या आरोपांना महापौरांनी आज पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. ऐका आणि पहा नेमके महापौर काय म्हणाले …

दरवर्षी प्रमाणे गणेश मूर्ती विक्रीसाठी परवानगी द्यावी -दिपाली धुमाळ

0

पुणे- पुणे शहरातील मागीलवर्षाची अतिवृष्टी त्याच पाठोपाठ कोरोनाच्या महामारीमुळे अनेक व्यवसायांसोबतच गणेश मुर्तीकार यांच्या देखील उत्पन्नावर गदा आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने डिस्टसिंग चे पालन करुन विविध व्यवसाय व दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. सध्या गणेश उत्सवाचे दिवस जवळ येत असुन पुणेकरांना श्री.गणेशाची मुर्ती उपलब्ध होण्यासाठी श्री.गणेश मुर्तीचे स्टॉल उभारणे, गरजेचे असून त्याला त्वरित परवानगी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
दरवर्षी पुणे शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. दरवर्षी पुणे महानगरपालिकेकडुन गणेश मुर्ती विक्रिचे स्टॉल उभारण्यास परवानगी दिली जाते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुणेकरांना श्री.गणेश मुर्ती उपलब्ध होण्यासाठी शहराच्या विविध भागात शासनाच्या सोशल डिस्टसिंग नियमांचे पालन करुन दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी श्री.गणेश मुर्ती विक्रि स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यांत यावी. श्री.गणेश मुर्ती विक्रि स्टॉल हे सर्व पुणेकरांना मुर्ती उपलब्ध होईल, डिस्टसिंगचे पालन होईल व नागरीकांना नजिकच्या ठिकाणी उपलब्ध होईल अश्या प्रकारे कार्यवाही करावी. तसेच दरवर्षी श्री.गणेशमुर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते.उदा विसर्जन घाट, विसर्जन हौद यांची उपलब्धता केली जाते. या वर्षाच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर श्री.गणेश मुर्ती विसर्जनाबाबतचे नियोजन करण्याची मागणी संदर्भाकींत पत्राद्वारे पुर्वीच केलेली आहे. श्री.गणेश मुर्तीचे विसर्जन घरीच करणेबाबत नियोजन असुन त्याबाबतचे आवाहन आपण करुच. परंतु काही प्रमाणात श्री.गणेश मुर्ती या बाहेर विसर्जन करणेस येण्याची शक्यता असल्याने त्याबाबतचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. या संपुर्ण विषयाबाबत पुणेकरांमध्ये संभ्रमता असुन प्रशासनाची सदर विषयी असलेली स्पष्ट भुमीका तातडीने जाहीर करावी, असे पत्र महापौर यांना दिले आहे .असे धुमाळ यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे

ऑनलाईन मुख्य सभा महापौर गुंडाळीत आहेत -विरोधकांचा आरोप (व्हिडीओ)

पुणे- पुण्याचे महापौर मुलीधर मोहोळ हे गेली ३ ते ४ महिने महापालिकेच्या ऑनलाईन होणाऱ्या मुख्य सभा गुंडाळून लावीत असून त्याद्वारे कोरोनाच्या महामारीवर महापालिकेकडून होणारी कार्यवाही आणि विकासकामांबाबत च्या कारभाराला पडद्याआड ठेवीत आहेत असा आरोप आज महापालिकेच्या मुख्य सभेत कॉंग्रेस ,राष्ट्रवादी ,शिवसेने सह मनसे ने केला . मनसे चे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी आज पीपी इ कीट सारखा वाटणारा आणि ऑक्सिजन लावलेल्या अवस्थेतील सांकेतिक पेहराव करूनच मुख्य सभेत प्रवेश केला . आणि खाजगी हॉस्पिटल सह महापालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठविली .कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल,शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार ,विशाल तांबे, अविनाश बागवे ,विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आदींनी यावेळी विविध प्रश्न उपस्थित करीत सभा चालवा आणि आमच्या प्रश्नांची ,उत्तरे द्या ,माहिती द्या अशी मागणी केली . मात्र महापौरांनी हि सभा तहकूब केली . पहा प्रत्यक्ष हि मुख्य सभा … काय काय झाले थेट लाइव्ह केलेले प्रक्षेपण …

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/726977574538801/

सव्वा महिने पुरेल इतका पाणीसाठा एका दिवसात धरणात जमा

0

पुणे : पुणे महानगरपालिका व जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एका दिवसात २ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे .बुधवारी सकाळी खडकवासला धरण प्रकल्पात १२.०७ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला.मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणांत १६.२६ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. धरण क्षेत्रात याच पद्धतीने पाऊस सुरू राहिला तर पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट दूर होऊ शकते.
खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला , पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी ५ ऑगस्ट रोजी धरणात २८.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु, ५ ऑगस्ट २०२० रोजी या चारही धरणांमध्ये एकूण १२.०७ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक नसल्यास जलसंपदा विभागाकडून १५ ऑगस्टनंतर पाणी कपातीचा निर्णय घेतला जातो. परंतु, पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदा ५ ऑगस्टनंतर धरणातील पाण्याचे नियोजन केले जाईल,असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मंगळवारी खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणांमध्ये एकूण ९.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता. तर बुधवारी धरणात १२.०७ पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे एका दिवसात खडकवासला धरण प्रकल्प दोन टीएमसी पाणी साठा वाढला.
खडकवासला धरण प्रकल्पातील पानशेत व वरसगाव धरणात ५ टीएमसी , तर खडकवासला धरणात बुधवारी १ टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
———————–
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा
धरणाचे नाव ४ऑगस्ट ५ऑगस्ट
खडकवासला ०.६९ १.००
वरसगाव ४.२७ ५.०५
पानशेत ४.२४ ५.०९
टेमघर. ०.७७ ०.९३

बार्टीमार्फत आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास उमेदवारांचा प्रतिसाद

0

पुणे दि.5 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत बार्टीने देखील आपले काही प्रशिक्षण वर्ग सध्यस्थितीत बंद ठेवले होते. परंतु एमपीएससी व आयबीपीएसचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण वर्ग बंद असल्याने महाराष्ट्रातील उमेदवार मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनापासून वंचित आहेत. लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी अडकलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी मोठी आर्थिक चणचण भासत आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी उमेदवाराकडे सद्यस्थितीत पैसे नाहीत. प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री विश्वजित कदम तसेच सचिव पराग जैन- नानुटीया यांनी केलेल्या सूचनांनुसार बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना एमपीएससी परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले व त्याबाबत सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गासाठी 90 हजारापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. या प्रशिक्षणाची सुरुवात 24 जुलै 2020 रोजी झाली असून या प्रशिक्षणासाठी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपण युट्युब व फेसबुक वर होत असून याचा दीड लाखांपेक्षा जास्त उमेदवारांना लाभ होत आहे. महाराष्ट्रातील सर्व भागातील उमेदवारांनी या प्रशिक्षणास मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील असून बार्टीमार्फत देण्यात येणारे हे प्रशिक्षण दर्जेदार असल्याबाबतही प्रतिक्रिया व्हिडीओवरील प्रतिक्रियांवरुन दिसून येते. या युट्यूब चॅनेलवर 6 लाखांपेक्षा जास्त दर्शकांनी भेटी दिल्या असून 77 हजारपेक्षा जास्त सबस्क्राईबर झाले आहेत. एमपीएससी प्रशिक्षण यासोबतच या दर्जाचे इतरही प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने बार्टी संस्थेने आयोजित करण्याबाबत विद्यार्थी मागणी करत आहेत.
बार्टीमार्फत देण्यात येणा-या प्रशिक्षणाकरीता महाराष्ट्रातील नामवंत प्रशिक्षक तज्ञ उमेदवारांना मार्गदर्शन करीत असून त्यात इतिहास या विषयाकरिता डॉ. शैलेश कोळेकर, राज्यशास्त्र या विषयाकरिता डॉ. चैतन्य कागदे. सीएसएटी विषयाकरिता प्रा. संतोष वट्टमवार हे मार्गदर्शन करीत असून पुढील सत्रांमध्ये अर्थशास्त्र या विषयाचे मार्गदर्शन डॉ. किरण देसले करणार आहेत तर भूगोल या विषयाचे मार्गदर्शन हे महाराष्ट्र विकास सेवेतील वर्ग १ चे अधिकारी श्री. सतीश पाटील करणार आहेत. तसेच सीएसएटी व विज्ञान या विषयासाठी श्री. विवेक पाटील व श्री.राहुल देशमुख मार्गदर्शन करणार आहेत.
सदरचे प्रशिक्षण हे प्रत्येक दिवशी सकाळी 8 ते 12 यावेळेत BARTI Online MPSC या यू ट्यूब चॅनेलवर होत असून ग्रामीण विद्याथ्यांना याचा विशेष लाभ होत आहे. जे विद्यार्थी प्रशिक्षणापासून वंचित आहेत त्यांनी या चॅनेलवर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहान बार्टीचे महासंचालक श्री. कैलास कणसे यांनी केले आहे. पुढील काळात पुढील आठवड्यात यूपीएससी व आयबीपीएसचे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण सुरु होणार आहे. त्याचा देखील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी बार्टीचे निबंधक श्री. यादव गायकवाड, स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प संचालक श्री. प्रशांत बुद्धिवंत, प्रकल्प अधिकारी दयानंद धायगुडे व नरेश जुड़े हे समन्वयाचे काम पाहतात.

अतिरिक्त दूध योजनेतील दूध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि ५ : दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला

या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, दुग्धविकास प्रधान सचिव अनुप कुमार, महिला व बालकल्याण सचिव आय. ए. कुंदन, आदिवासी विकास सचिव विनिता सिंघल, महानंदचे प्रतिनिधी हे देखील उपस्थित होते. ही योजना पुढे एक वर्ष राबविण्यात येणार असून 121 कोटी उत्पादन खर्च आला आहे. भुकटीचा प्रती किलो उत्पादन खर्च २४६ रुपये ७० पैसे इतका आहे.

दूध भुकटीत प्रोटीनचे प्रमाण ३४ टक्के आहे आणि या कोविड काळात पोषणासाठी ती उपयुक्त असल्याने मुलांना, स्तनदा व गरोदर मातांना त्याचा अधिक लाभ होईल यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

राज्य शासनाने लॉकडाऊन परिस्थितीत एप्रिल ते जुलै या कालवधीत ५ कोटी ९४ लाख ७३ हजार ६०६ लिटर दूध शेतकऱ्यांकडून घेतले. तर ४९२७.७०२ मेट्रिक टन दूध भुकटीचे उत्पादन केले. तसेच २५७५. १७१ मेट्रिक टन बटरचेही उत्पादन केले अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ही भुकटी आणि बटर हे वखार महामंडळाच्या शीतगृहांमध्ये ठेवण्यात आले आहे.

एकूण ७ दूध भुकटी प्रकल्पधारक आणि ३७ सहकारी संघ आणि ११ शासकीय दूध योजना या योजनेत आहेत. महानंदने ही योजना राबविली. दुधाचा खरेदी दर हा २२ रुपये १० पैसे ते २७ रुपये प्रती लिटर असा होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे कमी नुकसान झाले

यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे दूध भुकटीच्या बाबतीत खासदारांमार्फत जोरदार पाठपुरावा करावा अशीही सुचना केली तसेच यासंदर्भात एक पत्रही केंद्राला पाठविण्यात येत आहे असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भुकटी मुलाना आणि मातांना पुरविण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यास आणि यात कुठलीही अडचण येऊ न देण्याचे निर्देश दिले.