Home Blog Page 2489

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याबाबत सूचना निर्गमित

0

प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधित गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्य सैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी नेमलेले सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे जिल्हा परिषदांना सूचित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ध्वजसंहितेनुसार ग्रामीण भागात सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ज्या गावांमध्ये सरपंच कार्यरत आहेत तिथे स्वातंत्र्यदिनी नियमानुसार ध्वजारोहण होईल. पण ज्या ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत तिथे कोरोना संकटामुळे निवडणुका झालेल्या नाहीत. या ग्रामपंचायतींवर गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण याबाबत सध्या उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या अंतरिम आदेशाप्रमाणे अशा ग्रामपंचायतींवर प्राधान्याने शासकीय अधिकारी व नंतर आवश्यक तेथे कारणे देऊन योग्य व्यक्तीस प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित शासन निर्णयास स्थगिती दिली आहे. शासनाने प्रशासक नियुक्तीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. या निर्णयास स्थगिती देऊन हे अधिकार शासनाचे आहेत, असे आदेश देण्यात आले. या दोन्ही निर्णयाप्रमाणे शासनास मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर खाजगी योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करणे शक्य होते. पण उच्च न्यायालयाचा अंतिम आदेश होत नाही तोपर्यंत खाजगी योग्य व्यक्तीची निवड करणे योग्य नाही असा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठांकडे याबाबत दाखल झालेल्या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालय येथील न्या. शिंदे साहेब यांच्या खंडपीठाकडे वर्ग केल्या आहेत. मागील आठवड्यात पावसामुळे सुनावणी होऊ शकली नाही. जोपर्यंत अंतिम सुनावणी होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत शासकीय अधिकारीच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची कारवाई झालेली आहे. एका अधिकाऱ्यास त्यांचा मुख्य कार्यभार व ३ ते ४ ग्रामपंचायतींचा प्रशासकाचा कार्यभार याशिवाय कोरोनाची ड्युटी असे कार्यभार आहेत.

त्यामुळे स्वातंत्र्य दिनी या प्रशासकांनी ध्वजारोहणासाठी एका गावाची निवड करुन त्या ठिकाणी ध्वजारोहण करावे. त्यांच्या कार्यभारामधील उर्वरित गावांमध्ये स्वातंत्र्यसैनिक असतील व ध्वजारोहण करण्यासाठी त्यांची तब्येत उत्तम असेल तर त्यांना प्राधान्य राहील. अन्यथा तंटामुक्त समिती अध्यक्ष ध्वजारोहण करतील. हे पद रिक्त असल्यास ग्रामसेवक किंवा या तीनपैकी शक्य नसल्यास गटविकास अधिकारी यांनी एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची ध्वजारोहणासाठी नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात यासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन झेंडावंदनाचा कार्यक्रम करावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

पुणे विभागात आज ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 878

0

पुणे विभागातील 95 हजार 48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 39 हजार 526 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे, :- पुणे विभागातील 95 हजार 48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 39 हजार 526 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 878 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 600 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.58 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 68.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 8 हजार 281 रुग्णांपैकी 79 हजार 597 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.51 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 650 रुग्णांपैकी 2 हजार 677 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 799 आहे. कोरोनाबाधित एकूण 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 925 रुग्णांपैकी 7 हजार 04 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 365 आहे. कोरोनाबाधित एकूण 556 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 हजार 505 रुग्णांपैकी 1 हजार 433 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 936 आहे. कोरोनाबाधित एकूण 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 165 रुग्णांपैकी हजार 4 रुग्ण 337 बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 563 आहे. कोरोनाबाधित एकूण 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 93 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 758 , सातारा जिल्ह्यात 272, सोलापूर जिल्ह्यात 675, सांगली जिल्ह्यात 212 तर कोल्हापूर जिल्ह्यात 176 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 4 हजार 454 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 39 हजार 526 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 9 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्सला चांगला प्रतिसाद

0

दोन दिवसीय राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्सला चांगला प्रतिसाद 
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (आझम कॅम्पस )आणि इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ आर्किटेक्ट्स (पुणे चॅप्टर ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या  दोन दिवसीय राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्स ला चांगला प्रतिसाद मिळाला. ७ आणि ८ ऑगस्ट 2020 रोजी  पुण्यात ही दोन दिवसीय राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्स ऑनलाईन स्वरूपात गुगल मीट माध्यमातून आयोजित करण्यात आली.  देशभरातून संशोधक ,प्राध्यापक ,विद्यार्थी सहभागी झाले. ‘ इम्पिरिकल थिअरीज इन  आर्किटेक्चर,प्लानिंग एंड कंसट्रक्शन  मॅनेजमेंट’ हा या परिषदेचा विषय होता.आर्किटेक्चर क्षेत्रातील नवीन संकल्पनांची देवाण घेवाण या परिषदेत करण्यात आली. 
‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या प्राचार्य डॉ लीना देबनाथ यांनी उदघाटन केले.  इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ आर्किटेक्ट्स चे माजी अध्यक्ष प्रकाश देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले . प्रा. डॉ पराग नारखेडे यांनी बीज भाषण केले . दुसऱ्या दिवशी कॉऊन्सिल ऑफ आर्किटेक्ट चे अध्यक्ष हबीब खान हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले तर  इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ आर्किटेक्ट्स (पुणे चॅप्टर ) च्या अध्यक्ष जयश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले .   महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या . पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी संशोधनपर निबंध सादर केले. 

कोरोना लस बाजारात आली तरी प्रत्येकाला उपलब्ध होण्यासाठी दोन वर्षे लागतील, तोपर्यंत मास्कच करेल बचाव : पुनावाला

0

पुणे-जगातील सर्वात मोठे लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांचे म्हणणे आहे की, कोरोना लस बाजारात आली तरी ती प्रत्येक भारतीयाला उपलब्ध होण्यास दोन वर्षे लागतील. मात्र आम्हाला निश्चिंत राहायचे नाही. बचावासाठी आपल्याला मास्क लावणे, दोन मीटरचे अंतर या सारख्या सवयींसोबत जगायचे आहे.

मीडिया प्लॅटफॉर्म ‘इन्क्वायरी’साठी ज्येष्ठ पत्रकार शाेमा चौधरी यांना दिलेल्या मुलाखतीचा संपादित भाग…

देशात आता लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही…

पहिले लॉकडाऊन आवश्यक होते. मात्र आता तेवढे परिणामकारक ठरणार नाही. यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल. लहान दुकानदार, रोजंदारीवर पोट भरणाऱ्यांसाठी आता उपजीविकेचे संकट उभे राहील.

बिल गेट्स आदर्श, मदत विसरू शकत नाही…

बिल गेट्स माझे आदर्श आहेत. त्यांच्याकडून नेहमी शिकतो. धनादेश देणेच समाजकार्य नाही. संकटात जगाला किती वेळ देता हे महत्त्वाचे आहे. लस बनवण्यासाठी त्यांची मदत जग विसरू शकत नाही.

देशात खालच्या पातळीवरील व्यक्तीपर्यंत लस पोहोचवणार

लसीसाठी आम्ही १५०० कोटी रु. खर्च केले आहेत. सर्वात मोठे लस उत्पादक असल्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ती सहज उपलब्ध करून देणे आमचे कर्तव्य आहे. मानवता आमची पहिली प्राथमिकता आहे. मी माझ्या मुलांना हेच शिकवले की नेहमी गरिबांची मदत करा. माझ्या आईनेही मला हेच शिकवले आहे.

चाचणीत ९०% इम्युन रिस्पॉन्स, साइड इफेक्टही नाही

पुनावाला यांनी सांगितले की, आतापर्यंत लसीवर जे संशोधन करण्यात आले त्यात ९०% पर्यंत इम्युन रिस्पॉन्स असल्याचे दिसून आले. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालानंतर स्थिती आणखी स्पष्ट होईल. त्याचेही साइड इफेक्टही नाहीत. येत्या दोन- तीन महिन्यांत मानवी चाचणी यशस्वी झाल्यास आपण उत्सव साजरा करू.

आरोग्य नाही तर दुसरे कोणतेच क्षेत्र नसेल

महामारीने शिकवले की, जर आरोग्य नसेल तर दुसरे कोणतेही क्षेत्र नसेल. कोणतीही लस बाजारात येण्यासाठी ३ ते ४ वर्षांचा काळ लागतो. नियामक यंत्रणा आता वेगाने काम करत आहे. ज्या कामांना वर्ष लागायचे ती आता ३ ते ४ दिवसांत होताहेत. मंजुरी लगेच मिळत आहे.

भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार

0

पुणे : भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज स्वातंत्र्य सैनिक श्री. शंकर वासुदेव परांजपे यांचा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार केला. भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने दरवर्षी आज ९ अॉगस्ट रोजी महाराष्ट्रातून १० स्वातंत्र्य सैनिकांचा महामहिम राष्ट्रपती महोदय यांचे हस्ते नवी दिल्ली येथे सत्कार केला जातो. परंतु या वर्षी कोविड- १९ प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन ९ अॉगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांना राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे बोलावणे उचित ठरणार नसल्याने उपरोक्त परिस्थितीच्या अनुषंगाने सदरचा कार्यक्रम राष्ट्रपती भवन येथे न होता तो निवड करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार शाल वस्ञ देऊन करण्याचे केंद्रीय गृह मंञालयाचे निर्देश होते.
त्यानुसार महाराष्ट्रातुन १० नावे केंद्र शासनाकडे सादर करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे यांच्याकडुन स्वातंत्र्य सैनिक मा. श्री.शंकर वासुदेव परांजपे राहणार फ्लॕट नं.६, अथर्व, प्रभातरोड, लेन नं ११, पुणे यांचेही नावही सत्कारासाठी पाठविण्यात आले होते. या १० नावामधे श्री.परांजपे यांची निवड झाल्याने आज त्यांचा सत्कार केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपविभागिय अधिकारी श्री.संतोषकुमार देशमुख यांनी त्यांचे राहत्या घरी जाऊन शाल वस्ञ देऊन स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार केला. यावेळी मंडल अधिकारी श्री. ठुबे तसेच परांजपे कुटुंबीय उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 86

0

पुणे विभागातील 90 हजार 839 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 1 लाख 35 हजार 433 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

   पुणे, :- पुणे विभागातील 90 हजार 839 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 433 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 41 हजार 86 आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 508 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 67.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील 1 लाख 5 हजार 523 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 76 हजार 426 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 683 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.43 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 5 हजार 378 रुग्ण असून 2 हजार 493 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 714 आहे. कोरोनाबाधित एकूण 171 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील 10 हजार 250 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 हजार 486 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 218 आहे. कोरोना बाधित एकूण 546 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 4 हजार 293 रुग्ण असून 1 हजार 313 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 853 आहे. कोरोना बाधित एकूण 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील 9 हजार 989 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 121 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 618 आहे. कोरोना बाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 139 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 639, सातारा जिल्ह्यात 199, सोलापूर जिल्ह्यात 84, सांगली जिल्ह्यात 208 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1009 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 90 हजार 95 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 35 हजार 433 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 8 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न, उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड जाहीर

0

स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

नवकल्पनांना चालना देण्याबरोबरच शासकीय यंत्रणेत नाविन्यता आणण्याचा उद्देश

मुंबई, : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील, अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली.

जलप्रदूषण नियंत्रण, इलेक्ट्रिक स्कूटर, वीजवापर नियंत्रणासाठी स्टार्टअप्स

पशु आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा, रोबोटद्वारे जलप्रदूषणावर नियंत्रण, इलेक्ट्रिक स्कूटर शेअरिंग, सेन्सर आधारित सिंचन व्यवस्थापन, हृदयविकार समस्येवर उपाययोजना करणे, दिव्यांगांना (अंध) सक्षम करणे, कुशल कामगारांद्वारे निर्मित वस्तुंच्या विक्रीसाठी व्यासपीठ देणे, आरोग्य क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा नवीन मार्ग, माहितीचे प्रभावी विश्लेषण करणे, प्रशासकीय प्रक्रियेकरिता ब्लॉक चेनचा वापर, शेतकऱ्यांसाठी गोदाम आणि इतर सुविधांचे व्यवस्थापन. बोअरवेलमधील पाण्याचे शुद्धीकरणासाठी यंत्रणा, वीज वापराच्या नियंत्रणासाठी यंत्रणा, शहरी भागातील हवेच्या प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील यंत्रणा अशा नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सची निवड करण्यात आली. तरुणांनी सादर केलेली नावीन्यपूर्ण उत्पादने, सेवा यामध्ये विविध क्षेत्रातील स्टार्टअप्सचा समावेश होता. या स्टार्टअप्सची यादी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत जाहीर करण्यात आली.

देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सचा सहभाग

मंत्री नवाब मलिक म्हणाले की, ग्रामीण भागात आयटीआयच्या माध्यमातून स्टार्टअप पार्कची स्थापना करण्यात येईल. तरुणांच्या नवकल्पनांना चालना देण्याबरोबरच स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून शासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट होते. यंदाच्या स्पर्धेत देशभरातील १ हजार ६०० स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. त्यातील उत्कृष्ट १०० स्टार्टअप्सनी ४ ऑगस्टपासून झालेल्या सप्ताहात सहभाग घेतला. तरुणांनी वैशिष्ट्यपूर्ण कल्पकता दाखवत कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, प्रशासन आदी विविध क्षेत्रात अभिनव बदल घडवू शकणारे स्टार्टअपचे सादरीकरण केले. त्यातील २४ कल्पनांचा वापर शासनाच्या विविध विभागांमधील कामकाजासाठी करण्यात येणार आहे. ज्या स्टार्टअपची निवड झाली नाही त्यांनी नाराज न होता त्यांच्या संकल्पनेवर अजून सुधारणा केल्यास त्यांना नक्कीच यश मिळेल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातही स्टार्टअप्स विकसित व्हावीत – राज्यमंत्री शंभुराज देसाई

कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, शहरांबरोबर ग्रामीण भागातही स्टार्टअप्स विकसित व्हावीत यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येतील. ग्रामीण भागातील तरुणांनीही त्यांच्या विविध कल्पना योग्य व्यासपीठावर घेऊन जाणे गरजेचे आहे, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. स्टार्टअप वीकच्या संकल्पनेमुळे प्रशासकीय पद्धतीत विशेष बदल घडून येईल. यातील काही कल्पक स्टार्टअप्सचा उपयोग प्रशासकीय सुधारणांसाठी होऊ शकेल, असे ते म्हणाले.

सप्ताहात स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सादरीकरणसत्रे ऑनलाईन घेण्यात आली. उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मालिक, कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सहभागी होत मार्गदर्शन केले. याचबरोबर विविध विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी, स्टार्टअप इंडिया, सोशल अल्फा (टाटा ट्रस्ट), इंडिया एंजेल नेटवर्क, भारत इनोवेशन फंड, ओमिडियार नेटवर्क, आयआयटी मुंबई, सिडबी व्हेंचर कॅपिटल, जिओनेक्स्ट, वाडिया हॉस्पिटल, नीरी, आयएमसी, अग्नि, टाटा मोटर्स इत्यादी संस्थामधून तज्ज्ञ, पर्यवेक्षक उपस्थित होते.

महाराष्ट्र सायबर मध्ये इंटर्नशीपची सुवर्ण संधी

0

मुंबई, : महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in  या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे दि. 12/08/2020 पर्यंत पाठवावा.

यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005

इंटर्नशीपसाठी नियम, अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

उमेदवारास संगणकीय तांत्रिक ज्ञान असावे व त्याचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. संभाषण व लेखन कौशल्य असावे.

  • इंटर्नशीपचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. विहित कालावधी संपेपर्यंत उमेदवाराला इंटर्नशीप सोडता येणार नाही.  (अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक)
  • महाराष्ट्र सायबरकडून उमेदवारास कोणताही भत्ता, प्रवास भत्ता देण्यात येणार नाही. 
  • महाराष्ट्र सायबरच्या कार्यालयात उमेदवारास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे लागेल.
  • महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयांसाठीचे गोपनियतेसंदर्भातील सर्व नियम व कायदे यांचे पालन उमेदवारास कसोशीने करावे लागेल.
  • कार्यालयीन कोणतेही विषय/माहिती यांचा गैरवापर करणे, फेरफार करणे, ताब्यात घेणे असे गैरप्रकार उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाहीत.

असे महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत कळविण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यासाठी गृह विलगीकरण उपाययोजना पुस्तिकेचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

0

खासदार शरद पवार यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन कोल्हापूर आणि सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द

सातारा : सातारा जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणूसंदर्भात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात गृह विलगीकरण पुस्तिका तयार करण्यात आली आहे, या पुस्तिकेचे प्रकाशन आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात करण्यात आले.

प्रकाशन सोहळा खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत  पार पडला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास  मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय मंडलिक,  आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , सातारा जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नातून सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील गरीब नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मान्यवरांच्या उपस्थितीत सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

आपत्कालीन परिस्थितीतही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरुच

0

शालेय शिक्षण विभागातर्फेदिले जाते ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण

मुंबई, कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. असे असले तरी,  संचारबंदीच्या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्येही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली जाते आहे.

गुगल क्लासरुमच्या माध्यमातून विविध शाळांचे  शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये होणारे परस्परसंवादी शिक्षणाचे व्हीडिओ ऑफलाईन स्वरूपामध्ये देखील इतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देता येणार आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध माध्यमांद्वारे विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

मोबाईल, इंटरनेट नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष, लाखो विद्यार्थी शिक्षणापासून दूर; भाजपा शिक्षण आघाडीचा शासनावर आरोप”. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप आहे, असे गृहीत धरून जिओ व गुगल क्लासरूमद्वारे शिक्षण देणाऱ्या शालेय शिक्षण विभागाचे ऑनलाईन सुविधा नसलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा आशयाचे वृत्त, प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झाले आहे. हे वृत्त हे अर्धवट माहितीवर आधारित असून, वाचकांची दिशाभूल करणारे आहे. या विषयीचे स्पष्टीकरण करणारा विस्तृत खुलासा शालेय शिक्षण विभागाने केला आहे.

ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण

सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये ठेवण्याच्या दृष्टीने शासनामार्फत विविध शिक्षण माध्यमांचा वापर केला जात आहे. DIKSHA App वरील ई- साहित्य इयत्तानिहाय व विषयनिहाय दररोज अभ्यासमालेच्या माध्यमातून पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जात आहे ज्याचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्याच्या मार्फत ऑफलाईन स्वरूपात देखील केला जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन किंवा इंटरनेट अभावी शिक्षण प्रक्रियेत सहभागी होता येत नसेल यासाठी टी. व्ही वरील सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या  शिक्षणामध्ये सातत्य राहण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

घरपोच पाठ्यपुस्तकांचे वितरण

शिक्षण विभागामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आलेले आहेत. या पाठ्यपुस्तकांच्या आधारे विद्यार्थी या काळामध्ये आपले शिक्षण सुरु ठेवत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या व्हॉटसअप समूहाच्या माध्यमातून प्राप्त पाठ्यपुस्तकांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गृह शिक्षणासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.

इयत्ता १ ली ते ८ वी साठी आनंददायी शिक्षण

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत अभ्यासमालेच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचबरोबर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आलेली असून याच्या आधारे ‘दीक्षा अॅप’ च्या सहाय्याने विद्यार्थी ऑफलाईन स्वयंअभ्यास करू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने दिनांक २० जुलै, २०२० पासून सह्याद्री वाहिनीवर एमकेसीएल फाउंडेशन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत इयत्ता १ ली ते ८ वी साठी आनंददायी शिक्षण सुरु करण्यात आले आहे.

दुर्गम भाग व कोरोना प्रादुर्भाव कमी आहे किंवा नाही अशा ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षण सुरु

याचबरोबर दुर्गम भाग व कोरोना प्रादुर्भाव कमी आहे अथवा नाही अश्या ठिकाणी शिक्षक स्वतः सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतराचे) चे नियम पाळून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या गृह भेटी देऊन आवश्यक गृह अध्यापन करून विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे आढळून येत आहे. तसेच काही शिक्षक शाळेमधील गावामध्ये लाउडस्पीकर च्या मदतीने देखील विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गावामधील शिक्षणप्रेमी, सुशिक्षित ग्रामस्थ व तरुण हे गावामध्ये स्वयंसेवकाच्या भूमिकेतून गावामधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे यासाठी आवश्यक सर्व कार्यप्रणाली शिक्षकामार्फत तयार केली जात आहे. याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती व माता – पालक संघ यांच्या मदतीने देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे.

असा होता आठवडा

0

दि.2 ऑगस्ट 2020 ते  दि.८ ऑगस्ट 20२० या कालावधीतील शासनाचे महत्वाचे निर्णय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.

कोरोना युध्द

2 ऑगस्ट2020

  • आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक, ९ हजार ९२६ रुग्णांची घरी रवानगी. ९५०९ नवीन रुग्णांची नोंद, आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण बरे,  बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के. सध्या १ लाख ४८  हजार ५३७  रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू २६०.
  • पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने   उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींमार्फत खर्च,राज्यात प्रथमच असा नावीन्यपूर्ण उपक्रम.मुस्लिम समाजामार्फत दोन मदरसे रुग्णांच्या क्वॉरंटाइनसाठी  उपलब्ध, चार मोहल्ला रुग्णालय सुरू.
  • २२ मार्च ते १ ऑगस्टपर्यंत २,१९,९७५   गुन्ह्यांची नोंद,   ३२,४६७ व्यक्तींना अटक, विविध गुन्हयांसाठी  १८ कोटी २४ लाख ४६ हजार १०४ रु. दंड.

3 ऑगस्ट 2020

  • वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत  419 विमानांनी 57 हजार 362 प्रवाशांचे मुंबईत आगमन. यामध्ये मुंबईतील प्रवासी- 19 हजार 383, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी- 19 हजार 570 आणि इतर राज्यातील प्रवासी- 18 हजार 409.
  • मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते महाड येथील एमआयडीसीमध्ये  केएसएफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरचे ई-उद्घाटन व लोकार्पण.  यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे उपस्थित.सुविधा- 114 सामान्य कोविड केअर रुग्णांसाठी,  86 ऑक्सिजन सुविधेसह बेड आणि  10 अतिदक्षता विभागातील बेड उपलब्ध.
  • महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे, मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई लोकार्पण. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित, ठळक मुद्दे विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील. कोविडशी सामना करण्यासाठी पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय महत्त्वाचा, क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग,ट्रॅकींग आणि टेस्टींग मोठ्या प्रमाणात आवश्यक, मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न आवश्यक. योग्य औषधोपचाराबरोबरच  रुग्णांची योग्य कळजी आणि रुग्णसेवा महत्त्वाची, स्थानिक यंत्रणेला औषधांचा पुरेसा साठा करुन देण्यात येईल परंतु औषधांचा वापर कसा होतो याबाबत जागरुकता आवश्यक.

सुविधा-

  • 7 हजार 980 चौरस फूट जागेमध्ये उभारलेल्या या आरोग्य केंद्रातील बेडची संख्या  206. सर्व बेड ऑक्सिजन सुविधायुक्त, केंद्रात नोंदणी, बाह्यरुग्ण व अतिदक्षता विभागाची निर्मिती, दोन व्हेंटिलेटर्सची व्यवस्था, सहा किलोलिटर साठवण क्षमता असणारी ऑक्सीजन टाकीची उभारणी.
  • भाईंदर पूर्व (जि. ठाणे) येथील स्व. मीनाताई ठाकरे मंडई येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्र- ऑक्सिजन सुविधायुक्त 165 बेडची व्यवस्था, सहा किलोलिटर साठवण क्षमतेची ऑक्सिजन टाकी. दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय तज्ञ व कर्मचारी 24 तास कार्यरत, विविध चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी लॅब, रुग्णांसाठी खानपान सुविधा
  • सायबर संदर्भात ५७८  गुन्हे दाखल,२९० व्यक्तींना अटक.
  • २२ मार्च ते २ ऑगस्ट पर्यंत  कलम १८८ नुसार  २,२०,२५६   गुन्ह्यांची नोंद ,३२,४६७ व्यक्तींना अटक, विविध गुन्ह्यांसाठी  १८ कोटी ३६ लाख ३९  हजार ४ रु. दंड
  • सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक, आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्णांची घरी रवानगी, ८९६८ नवीन रुग्णांची नोंद, आतापर्यंत २ लाख ८७ हजार ३० रुग्ण बरे, बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के. सध्या १ लाख ४७  हजार १७  रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू २६६

ऑगस्ट२०२०

  • नागपूर जिल्ह्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्फत आढावा. यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री श्री.सुनील केदार उपस्थित. निर्देश– ग्रामीण भागात कोरोना वाढीस लागला असून त्यावर मात करण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करा.
  • आज आतापर्यंत बरे झालेल्या सर्वाधिक रुग्णांची  घरी रवानगी. सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक. आज १२ हजार ३२६ रुग्णाची घरी रवानगी. ७७६० नवीन रुग्णांची नोंद. आतापर्यंत २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के. सध्या १ लाख ४२  हजार १५१  रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू  – ३००.
  • राज्यातील विविध उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांची  वेबिनारद्वारे चर्चा.ठळक मुद्दे अनलॉक तीनमध्ये मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाची तयारी, मात्र यासाठी उद्योजक संघटनांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श कार्यप्रणालीचे पालन करण्याची हमी देणे आवश्यक.
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांच्यामार्फत नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर,  तपासणी मोहीम, आरोग्यविषयक अत्यावश्यक सेवासुविधा, शासनस्तरावर लागणारी मदत याबाबींचा व्हीडिओ कॉन्फरंसिंगव्दारे आढावा. निर्देश कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवरील यंत्रणांनी समन्वय साधत अधिक दक्षता घ्या. जिल्हा रुग्णालयाचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करा. 

५ ऑगस्ट २०२०

  • आज ६१६५ बऱ्या झालेल्या रुग्णांची घरी रवानगी. १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद. आतापर्यंत ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे, बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के, १ लाख ४५  हजार ९६१  रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू- ३३४
  • वंदेभारत अभियानांतर्गत 427 विमानांनी आतापर्यंत 58 हजार 233  प्रवाशांचे आगमन, यामध्ये मुंबईतील प्रवासी- 19 हजार 638, उर्वरित महाराष्ट्रातील  प्रवासी- 19 हजार 817,  इतर राज्यातील प्रवासी 18 हजार  778.
  • गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्लाझ्मादान . 
  • मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथील बैठकीत दूध भुकटी पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय. यावेळी दुग्धविकास मंत्री श्री. सुनील केदार, राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे,राज्यमंत्री श्री.बच्चू कडू, उपस्थित. ही योजना आणखी एक वर्ष राबविण्याचा निर्णय. लॉकडाऊन परिस्थितीत एप्रिल ते जुलै या कालावधीत ५ कोटी ९४ लाख ७३ हजार ६०६ लिटर दुधाची शेतकऱ्यांकडून खरेदी. ४९२७.७०२ मेट्रिक टन दूध भुकटीचे उत्पादन. २५७५. १७१ मेट्रिक टन लोण्याचे उत्पादन.

६ ऑगस्ट २०२०

  • मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या उप‍स्थितीत, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची गुगलसोबतच्या भागीदारीची ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे घोषणा. यामुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षकांना एकत्रित अध्ययन-अध्यापन करणे शक्य. जी स्वीट  फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय  उपलब्ध.ठळक मुद्दे- कोरोनाने उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्न हे दाखवले नाही तर ते स्वप्न प्रत्यक्षात आणले, जी स्वीट  आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा सार्थ अभिमान वाटतो.
  • वैशिष्ट्ये- जीस्वीट: जीमेल, डॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूम परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संच. हे कोठेही, केव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम.
  • गूगलक्लासरूमःशिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यास, पुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात सहाय्य, वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास सहाय्य.
  • गूगलफॉर्मः शिक्षकांना क्विझ आणि चाचण्या लवकर तयार करण्यासाठी उपयुक्त  ठरणारे साधन.
  • असाइनमेंट्सविश्लेषण आणि ग्रेड कोर्सवर्कची निर्मिती आणि विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता प्रदान करणारे साधन.
  • राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्यामार्फत मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोगशाळेचे (मॉलेक्युलर लॅब)  डिजिटल माध्यमातून लोकार्पण.        नव्या कोरोना तपासणी लॅबमुळे मीरा, भाईंदर, वसई व पालघर येथील जनतेची व रुग्णांची सोय.
  • 1 ऑगस्ट ते दि . 5 ऑगस्ट पर्यंत 4 लाख 79 हजार 402 गरीब व गरजू लोकांना शिवभोजन योजनेचा लाभ.
  • जुलै  महिन्यात  6 कोटी 64 लाख 23 हजार 346 लाभार्थ्यांना  63 लाख 53 हजार 268 क्विंटल अन्नधान्याचे वाटप.
  • आज बऱ्या झालेल्या १० हजार ८५४ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के.आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे, सध्या १ लाख ४६  हजार ३०५  रुग्णांवर उपचार सुरू, आज निदान झालेले नवीन रुग्ण ११,५१४,नोंद झालेले  मृत्यू ३१६.

७ ऑगस्ट २०२०

  • मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांची कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने दूरदृश्य बैठक. श्री ठाकरे यांच्या विनंतीवरुन केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांचा सहभाग. यावेळी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे उपस्थित. ठळक मुद्दे- कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही याची काळजी घ्या. रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष द्या, खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स राखीव न ठेवणे आणि रुग्णांच्याकडून अव्वाच्या सव्वा खर्च घेण्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन कारवाई करा, बेड्स आणि रुग्णवाहिकांचे व्यवस्थित नियोजन करा. मुंबईप्रमाणेच इतर शहरांमध्येही जम्बो सुविधांची निर्मिती करा. डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरत असलेला कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करा.
  • आज बऱ्या झालेल्या १० हजार ९०६ रुग्णांची घरी रवानगी. १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान. रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के . आतापर्यंत ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे. सध्या १ लाख ४५  हजार ५८२  रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू ३००.
  • उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत पिंपरी येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगण, शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्रांगण आणि महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम येथे  उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची पाहणी. ‘कोरोना’ संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुन या केंद्रांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.
  • आयात-निर्यात क्षेत्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरच्या वतीने ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’च्या डिजिटल सुविधेचे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.
  • खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे निर्देश.
  • पदवी आणि परदेशात प्रवेश मिळालेली पदव्युत्तर शाखा वेगळी असली तरी अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र ठरणार असल्याची सामाजिक न्यायमंत्री श्री धनंजय मुंडे यांची माहिती.
  • तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया दि. १०  ते २५ ऑगस्ट या कालावधीत राबवणार असल्याची  उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांची माहिती. संपर्क संकेतस्थळ-  http://www.dtemaharashtra.gov.in/

8 ऑगस्ट 2020

  • गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या पूर्ण. आज बरे झालेल्या ११ हजार ८१ रुग्णांची घरी रवानगी, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के, आतापर्यंत ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे. आज १२ हजार ८२२ नवीन रुग्णांचे निदान. सध्या १ लाख ४७  हजार ४८  रुग्णांवर  उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू- २७५.
  • वंदेभारत अभियानांतर्गत 448  विमानांनी आतापर्यंत 61 हजार 042 प्रवाशांचे आगमन. मुंबईतील प्रवाशांची संख्या 20  हजार 768, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या- 20 हजार 501 इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 19 हजार 773.
  • सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देण्याचे महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांचे जिल्हा प्रशासनाला आढावा बैठकित निर्देश.  
  • सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा भारतातून ऑनलाईन शिक्षण घेत असल्यास त्यांना फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता मंजूर करण्यात येणार असल्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती.

इतर निर्णय आणि घडामोडी

3 ऑगस्ट 2020

  • क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या नागरिकांना शुभेच्छा.  
  • पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने  गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्यामार्फत  महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरा.

ऑगस्ट२०२०

  • उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळाच्या समस्यांबाबत  बैठक. यावेळी परिवहनमंत्री श्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री श्री सतेज पाटील उपस्थित. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय.
  • केंद्रीय लोकसेवा आय़ोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राज्यातील उमेदवारांचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे  आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत अभिनंदन.
  • ख्यातनाम नाट्यकर्मी व नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक पद्मविभूषण इब्राहिम अल्काझी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत दुःख व्यक्त.
  • उद्योग, ऊर्जा, विधी व न्याय आदी विभागात शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यातील त्रुटी तत्काळ दूर करण्याचे, मराठी भाषा मंत्री श्री सुभाष देसाई यांचे संबंधित विभागांना निर्देश. इतरसूचना     –औद्योगिक विकास मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीसोबत मराठी भाषेत असले पाहिजे. कामगार विभागाने दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेतून आहेत का याची तपासणी करावी. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांवर मराठीत पाट्या नसतील तर त्यांना कारवाईतून मिळणारी सूट बंद करण्यासाठी नियमात बदल  करा. महावितरणच्या तक्रार निवारण कक्षामध्ये मराठी भाषेतून कामकाज आवश्यक. राज्यात कायदे तयार होताना त्याचा मूळ प्रस्ताव मराठी भाषेतच तयार करणे शक्य आहे का, याची तपासणी करा. जिल्हा सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय व लघु न्यायालयात मराठीचा वापर कोणत्या स्तरावर केला जातो, याची सांख्यिकी माहिती उपलब्ध करून द्या.
  • पलूस पाणीपुरवठा योजनेबाबत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. यावेळी नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विश्वजित कदम, उपस्थित. निर्देश-पलूस शहरासाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानामधून प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता द्यावी, त्याआधारे नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता द्यावी.

५ ऑगस्ट २०२०

  • रानभाज्या महोत्सवाचा मंत्रालयात शुभारंभ,औषधी रानभाज्यांच्या संवर्धानातून आदिवासी बांधवांची समृद्धी शक्य, ९ ऑगस्टला राज्यात रानभाज्या महोत्सव घेणार असल्याची   कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांची माहिती.
  • अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रलंबित विद्युत विकास कामांबाबत महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या उपस्थितीत बैठक. जिल्ह्यात नवीन उपकेंद्रांची उभारणी,उपकेंद्रांमधील क्षमता वाढ व अति उच्च दाब उपकेंद्रे प्रस्तावित करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश, संगमनेर तालुक्यातील खांबे, खिरविरे, पारेगाव खुर्द येथील उपकेंद्रांच्या उभारणीसाठी तातडीने मंजुरी घेण्याची सूचना.
  • माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री अमित देशमुख,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,गृहमंत्री श्री अनिल देशमुख,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण,महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात,शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्यामार्फत शोक व्यक्त.
  • माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार ,महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री श्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील  यांच्यामार्फत शोक व्यक्त.

६ ऑगस्ट २०२०

  • केंद्र शासनामार्फत 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्याचा विभागाचा निर्णय, यामुळे गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार असल्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. 
  • पुण्यनगरी वृत्तपत्रसमुहाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ व्यावसायिक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,सांस्कृतिक कार्य मंत्री श्री अमित देशमुख,अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांची श्रध्दांजली.
  • अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून मदत कार्य करण्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश, जिल्हाधिकारी आणि  नियंत्रण कक्षांच्या संपर्कात राहून कोकण, कोल्हापूर भागातील परिस्थितीचा आढावा.नागरिकांना तातडीने सहाय्य करण्याचे निर्देश,मुंबईतील परिस्थिती प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना केले अवगत.
  • राज्यात सलग दोन दिवस पडत असलेल्या  मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य  करण्यासाठी  विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्याची मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन  मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांची माहिती. 

७ ऑगस्ट २०२०

  • महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री.
  • महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2028 अंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री.
  •  मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक. महत्वाचे निर्णय-‘सफेद चिप्पी’ ( sonneratia alba) या कांदळवन वृक्षाला राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यास मान्यता, असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर अभ्यास करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना, वन्यजीव उपचार केंद्रांची तातडीने उभारणी, आंग्रीय पठार नियुक्त क्षेत्र घोषित करण्याची शिफारस, राज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक, अकोला- खांडवा पर्यायी ब्रॉडगेजसाठी व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडण्याच्या मताचे वन्यजीव मंडळाकडून समर्थन.
  • ज्येष्ठ नेते, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार शामराव भीमराव पाटील (पानीवकर) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत दु:ख व्यक्त.

8 ऑगस्ट 2020

  • डॉ. सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती.
  • महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2020 ची 8 सप्टेंबर 2020 रोजी परतफेड.
  • समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत प्रायोजकत्व दिलेल्या अनुसूचित जातीतील १४ विद्यार्थ्यांनी नागरी सेवा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्यल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याद्वारे अभिनंदन केले.
  • नागपूर शहरांतर्गत कायदा व सुव्यवस्था, दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाई, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना आदीबाबत गृहमंत्री श्री.अनिल  देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
  • कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांची भरतनगर येथील श्री साठे यांच्या निवासस्थानी भेट आणि कुटुंबियांची सांत्वना.
  • गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर सांगली भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे भेट. पंचगंगा नदीची पाणी पातळी व नदी काठावरील पूरपरिस्थिती बाबत पाहणी. दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक.

करोनाच्या संकट काळात असंघटीत कला क्ष्रेत्रावर सांस्कृतिक कार्य खात्याची वक्रदृष्टी…!

0

पहिली नोट बंदी, नंतर अवकाळी पाऊस, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाची आचार संहिता ,अशी एका मागून एका संकटाला तोंड देत असताना चालू वर्षी “करोना”सारख्या महामारीने कला क्षेत्रावर मोठा अघात केला आहे. जत्रा-यात्रेत ढोलकी आणि हलगीवर कडाडणारी बोटं स्थिरावली.. पिसारा फुलवून मोरासारखे थुई थुई नाचणारे पायातील चाळ थबकले.. बतावणीतून विनोद करून लोकांना हास्याचे फवारे उडवायाला लावणारे सोंगाड्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लोप पावला.. कलेसाठी झोकून. देणारे जीवनमान बंद पडलेल्या पेटी सारखे बेसूर झाले. तमाशातील गण गवळण सुरू झाल्यावर”घ्या दूध,घ्या दही, घ्या लोणी”म्हणाऱ्या राधा, गवळणी कृष्ण, पेंद्या, अशी पात्र साकारणाऱ्या लोककलावंतावर सध्या खऱ्या जीवनात रस्त्यावर उतरून “घ्या केळी.. घ्या फळं.. घ्या बोंबील घ्या सुकट” अशी विकण्याची वेळ आली आहे.तरी अजून ही करोनाच्या वक्रदृष्टी सापडलेल्या लोककलावंतावर सांस्कृतिक कार्य खात्याने चार महिने झाली तरी अद्याप कृपादृष्टी का दाखवली नाही. हे एक बारीवरच्या सवाल-जवाब सामन्याप्रमाणे पडत चाललेलं कोडं आहे.
दि.१मे २०२० रोजी आपला महाराष्ट्र हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.अशा या राज्यातील लोककलावंताचे महाराष्ट्राच्या जडघडणीत मोठे योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो.. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न असो.. अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळ.. लोककलावंतानी यामध्ये नेहमीच पुढाकार घेतला आहे.अनेक लोककलावंतानी वगनाट्य, भारुडातून जनजागृती करून समाजाला डोळे उघडायला लावले.

मात्र करोनाच्या घट विळख्यात सापडलेल्या लोककला क्षेत्रावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्यावर कधी नव्हे बेकारीची कुऱ्हाड कोसळली. चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ हे तीन महिने कलावंतांसाठी सुगीचे दिवस असतात.कला ही आमची शेती आहे.आज तीच शेती नापिक झाल्यासारखी वाटत असल्याने आत्महत्या करायची वेळ आम्हावर आली आहे.असे तमाशा क्षेत्रातील कलावंतांचे स्पष्ट मत आहे.आजारपण, मुलांचं शिक्षण, हंगामा पुर्वी सावराकडून घेतलेलं कर्ज, त्याचे व्याज अशा संकटात फड मालक आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे लोक कलाकार अडचणींत सापडला आहे.
ग्रामीण भागतील लोककला म्हटली की, आजही डोळ्यासमोर उभा राहतो आणि रसिकांना पटकन समजला जातो तो रांगडा तमाशा. पण ही कला गावोगावी सादर करताना अनेक वेळा गावातील गावगुंडा पासून अमानुष छळ होतच असतो. त्यांच्या मनाप्रमाणे नाही वागले की, कनाती फाड, गाड्यावर दगड फेक कर, नृत्यागना याचा छळ कर . असे अनेक प्रसंगाला तोंड दयावे लागते.तरी खचून न जाता दरवर्षी पुन्हा नव्या उमेदीने हे कलाकार आपल्या पोटासाठी चार पाच महिने घरदार,आपली लेकरं बाळ सोडून गावोगावी भटकत राहतात. गेल्यावर्षी दि २५ एप्रिल २०१९रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका गावात हरिभाऊ बढे नगरकर सह शिवकन्या बढे यांच्या तमाशातील गाव गुंडानी नर्तिकांची चक्क छेड काढली.पुरुष कलाकारांना अमानुष मारले.कसेल पोलीस संरक्षण नाही. आरोग्याची हमी नाही. आर्थिदृष्ट्या सक्षम नाही. तरी समाधानात राहणारा हा कलावंत आज डोळ्यात अश्रू आणून रड आहे.पण अद्याप सरकारमधील प्रमुखांना तातडीने याची दखल घ्यावी वाटली नाही. सर्वात मोठी झळ ही तमाशा कला क्षेत्राला पडली आहे. तमाशा हा असा एकच मोठा पक्ष आहे की, गावात बारा पक्ष असेल तरी सर्व पक्षांचे लोकं फक्त तमाशाच्या तंबूत एकत्र येतात.सर्व पक्षाला एका तंबूत आणण्याची ताकद फक्त तमाशा फडात आहे.म्हणूनच प्रेक्षक हाच आपला मायबाप आहे.आज तो दुरावला असल्याची खंत या कलाकारांमध्ये आहे.मग आता खऱ्या अर्थाने लोककलेला आता राजश्रयाची गरज वाटते.
दि २३मार्च २०२० रोजी देशात लॉकडाउन झाल्यानंतर कमाईच्या हंगामात राज्यातील सर्वच लोक कलाकारांचा रोजगार बुडाला.घेतलेल्या सुपाऱ्या रद्द झाल्या,उपासमारीची सुरुवात झाली.त्यामुळेच अनेक कलावंतांनी आपल्या जिविकेचे साधन आपणच शोधलं आहे. शासनाकडे तरी किती मागायचं.आताच्या काळात शासनाकडे सगळेच मागणारे आहेत.सामाजिक संस्था तरी किती मदत करणार.शेवटी आपला मार्ग आपणच शोधावा.आता कलेवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले. अशाही काही कलवांताच्या भावना आहे.म्हणूनच काही कलावंतांनी फळं, भाजीपाला,बोंबील,सुकट विकायला सुरुवात केली आहे.
तरीही राज्य सरकारला या लोक कलावंतांचे उत्तरदायित्व नाकारु चालणार नाही . कारण हे अचानक आलेले संकट हे आज हया कलावंताना पेलवणारे नाही. करोडो रुपयांची मालमत्ता असणारे फिल्मी कलाकार या लॉकडाऊन काळात मानसिक तणावाखाली येवू जर आत्महत्या करीत आहेत., हे तर लोककलावंत आहेत. त्यांच्यावर खऱ्या अर्थानं उपासमारीची वेळ आली आहे.मग त्यांनी काय दशा झाली असावी. याची कल्पना करवत नाही. आता याचा मार्ग सरकारला दाखवावा लागेल. कारण करोना सारखी महामारी ही कोणा व्यक्तीमुळे आली नाही. तर ही जागतिक समस्या म्हणून पुढे आली आहे.त्यामुळे सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.खिसा रिकामा असला तरी चालेल.पण समोरची जागा रिकामी नसावी.या धुंदीत जगणारा हा कलावंत असतो.त्यांना अर्थ नियोजन कशाला म्हणतात,हे माहित नसते. शेवटच्या श्वासापर्यंत कलेशी प्रमाणिक राहणे हा त्यांच्यात सर्व संपन्न गुणभाव असतो. आज तो संकटात म्हणजे त्याचे सारे कुटुंब संकटात आले आहे.म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागांच्या प्रमुखांनी खूप सुईत दोरा ओवावा, येवढ्या बारीक नजरेतून न बघता शक्य तेवढे लवकर महाराष्ट्रातील लोक कलाकाराला आर्थिक मदत केली पाहिजे.त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.कारण हे लोककला क्ष्रेत्र असंघटीत आहे.”एक जत्रा आणि पुढारी सत्रा”अशी या क्षेत्राची अवस्था आहे.म्हणून अनेक शासकीय योजना पासून हा गरीब वर्ग दूरच राहिला आहे.म्हणून त्यांना आधाराची गरज आहे.याबद्दल दुमत नाही. आज महाराष्ट्रातील विविध कला प्रकार आणि कला पथकांची संख्या पाहिली तर वीस ते पंचवीस कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची गरज भासणार नाही.किंवा त्यामुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट होणार नाही.सांस्कृतिक कार्य खात्याला सहानुभूतीने या समस्याकडे बघावे लागेल.

(राज्यात विविध कला प्रकार असून अंदाजे खालीलप्रमाणे कला पथकांची संख्या असू शकेल.)

सर्व साधारण माहितीनुसार १)पूर्ण वेळ तमाशा फड- १४ते १५ आहेत.२)हंगामी तमाशा फड- ९० ते १००आहेत.३) शाहीरी पथके- १७५ आहे, ४) खडीगंमत संच – १३५ ते १५० आहे. ५) दशावतार संच – ५० ते ५५, ६)भारुड पथके – ५० ते ७५
७) संगीतबारी कला पथके – ४५० ते५०० अंदाजे संख्या.८) आदिवासी कला पथके – एक हजार अंदाजे.९) लोकप्रबोधत्मक कला पथके – ५५० (कला प्रकार समावेश- जागरण गोंधळ पार्टी ,सामाजिक जनजागृती करणारे कला पथके, विविध प्रकारचे वाजंत्री,

खंडूराज गायकवाड

संपर्क ९८१९०५९३३५
Khandurajgkwd@gmail.com

कर्नाटक राज्यात छत्रपतींचा पुतळा रातोरात हटवल्याच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीने केला तीव्र निषेध…

0

भाजपचे महाराजांबद्दलचे प्रेम हे फक्त मतांपुरतचे आहे – जयंत पाटील

मुंबई दि.८ अॉगस्ट – भाजपचे छ्त्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम फक्त मतांपुरते आहे हे कर्नाटक राज्यात छत्रपतींचा पुतळा रातोरात हटवून सिध्द झाले असून या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे या घटनेबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली असून भाजपच्या बेगडी प्रेमावर कडाडून टिका केली आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदार पदाची शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष त्यांनी केला तेव्हा काय घडले हे आपल्याला माहिती आहे. भाजपच्या मनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत द्वेष का आहे ? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

छत्रपतींच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करा असे पत्र नगरविकासमंत्री व सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे .

बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती, दि. 8 : बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या ‘व्हिआयटी’ सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव  आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या कालावधीमध्ये येणारे सण, उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नागपूर पोलीसांची कामगिरी प्रशंसनीय – गृहमंत्री अनिल देशमुख

0

नागपूर, दि. ८ :  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम नागपूर शहर पोलीस उत्तम प्रकारे करीत आहेत. त्यासाठी पोलीस विभाग राबवत असलेल्या उपाययोजना आणि उपक्रम प्रशंसनीय आहेत, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज व्यक्त केले.

नागपूर शहरांतर्गत कायदा व सुव्यवस्था, दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाई, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना आदीबाबत श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयाच्या सभा कक्षात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रभारी सहआयुक्त निलेश भरणे, अपर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) राकेश ओला, पोलीस उपायुक्त विनिता साहू, विवेक मसाळ, श्री. निलोत्पल, गजानन राजमाने, विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाच्या संकट कालावधीत जनजागृती करुन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या जबाबदारीसह वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची दुहेरी कामगिरी नागपूर शहर पोलीस पार पाडीत आहेत. पूर्वी शहराला ‘क्राईम कॅपिटल’ म्हणून संबोधले जात होते. परंतु आता पोलिसांच्या उत्तम कामगिरीमुळे ही प्रतिमा बदलली आहे. नागपूर शहर तसेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच लॉकडाऊन काळात शेल्टर होममधील नागरिकांची पोलीस विभागाने चांगली व्यवस्था केली. इतर राज्यातील नागरिकांना स्वगावी जाण्यासाठी रेल्वे तसेच बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. या काळात शहरातील कोणतीही गोरगरीब व्यक्ती उपाशी राहणार यासाठी पोलीसांनी कटाक्षाने लक्ष पुरविले.

सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे असून सायबर क्राईम, हॅकींग आदी प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरासाठी स्वतंत्र ‘सायबर पोलीस ठाणे’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्यामुळे सायबर प्रकरणांचा तपास सायबर पोलीस ठाण्यातूनच होईल. यामुळे सायबर गुन्हेगारीला निश्चितच चाप बसेल, असा विश्वास श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबविले जातात. ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखेत प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये पोलीस स्टेशनमधील अभिलेखावरील असलेल्या सर्व गुन्हेगारांची तपासणी करण्यात येते. संशयित हालचाली किंवा सराईत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. ‘ऑपरेशन वाईप आऊट’अंतर्गत लपूनछपून अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द धाडसत्र राबविण्यात येते. ‘गुन्हेगार दत्तक योजना’ सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित असून येथील कर्मचारी नेमून दिलेल्या आरोपीची नियमित तपासणी करुन त्यांच्यावर पाळत ठेवतात.

नागपूर शहरात ‘स्मार्ट सीटी प्रोजेक्ट’अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामध्ये मुख्य चौकात फेस रिकगनेशन, नंबर रिकगनेशन कॅमेरे कार्यान्वित आहेत. या अंतर्गत ‘सी.ओ.सी. संपर्क पथका’मुळे शहरातील बरेच गुन्हे उघडकीस आले आहे. रात्रीच्या वेळेस महिलांना घरी जाण्यास साधन उपलब्ध नसल्याने फोनद्वारे नियंत्रण कक्षास माहिती मिळाल्यास ‘होम ड्रॉप’ योजनेद्वारे त्यांना तात्काळ वाहन पाठवून महिला पोलीसासह घरी सोडण्यात येते. तसेच ‘वुमन हेल्पलाईन’ क्रमांक 1091 / 0712-2561222 कार्यान्वित असून 24 तास सुरु आहे. तक्रारी आल्यास तात्काळ त्या ठिकाणी जावून कार्यवाही करण्यात येते. या योजनेचा महिलांना खुप फायदा होत आहे. तसेच ‘ऑपरेशन स्ट्रीट ड्राईव्ह’, ‘हिट स्कॉट’, ‘इंटेलिजन्स पथक’, ‘सराईत गुन्हेगारांचे डोजीयर्स’, ‘अंमली पदार्थ विरोध पथक’, ‘फरार पाहिजे आरोपी अटक पथक’, ‘छात्र पोलीस उपक्रम’, तसेच ‘स्टॅर्न्डड कम्युनिटी पोलीसींग स्कीम्स’ यासारखे उपक्रम शहर पोलिसांतर्फे राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे तसेच नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे खून, मालमत्ताविषयक तसेच महिला व मुलींच्या बाबतीतील गुन्ह्यात घट होत आहे, अशी माहिती श्री. उपाध्याय यांनी यावेळी दिली.

कोरोना संसर्गामुळे दगावलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान शेजुळ, तसचे पोलीस हवालदार सिध्दार्थ सहारे यांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.